Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘एआयसीटीई’चा प्राध्यापकांना दिलासा

$
0
0

विद्यार्थी गुणोत्तर सूत्रात यंदापासून बदल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) प्राध्यापक व विद्यार्थी या गुणोत्तरात यंदाच्या शैक्षणिक वर्षात बदल केले आहेत. या बदलांचा फायदा उचलत राज्यातील काही शैक्षणिक संस्थांनी त्यांच्याकडे असणाऱ्या मनुष्यबळातून काही प्राध्यापकांना कामावरून कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शैक्षणिक संस्थांच्या या भूमिकेवर प्राध्यापकांच्या काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर 'एआयसीटीई'ने या प्राध्यापकांना दिलासा दिला आहे.

'एआयसीटीई'ने याबाबत राज्यातील विविध विद्यापीठे आणि राज्य सरकारला पत्र पाठवून कुठल्याही कॉलेजातील प्राध्यापक व विद्यार्थी गुणोत्तराच्या प्रमाणावरून प्राध्यापकांना कामावरून कमी करण्यात येऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. या सूचनांची व्यवस्थित अंमलबजावणी होते किंवा नाही याचाही आढावा संबंधित संस्थांना 'एआयसीटीई'ने घ्यायला लावल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यभरात इंजिनीअरिंगसह व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेजेसची मोठी संख्या आहेत. यातही इंजिनीअरिंग कॉलेजेसची संख्या लक्षणीय असल्याने या अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकांनी तात्पुरता सुटकेचा सुस्कारा टाकला आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी 'एआयसीटीई'च्या वतीने विविध प्रयोग केले जात आहेत. या प्रयोगाचा भाग म्हणून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवीसाठीचा प्राध्यापक व विद्यार्थी हे गुणोत्तर बदलण्यात आले. अगोदर १५ विद्यार्थ्यांमागे १ प्राध्यापक कार्यरत असण्याचा निकष होता आता हा निकष प्रति २० विद्यार्थ्यांमागे १ प्राध्यापक असा करण्यात आला. तर पदव्युत्तर पदविकेच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी हा निकष प्रति २० विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक असा होता. आता प्रति २५ विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक असा हा निकष करण्यात आला आहे.

प्राध्यापक संघटनांच्या प्रयत्नांना विरोध

'एआयसीटीई'च्या वतीने या गुणोत्तरात करण्यात आलेल्या बदलांचा फायदा उचलत काही कॉलेजेसने प्राध्यापकांना कमी करण्याचा घाट घातला आहे. बदलत्या गुणोत्तरामुळे काही प्राध्यापक अतिरिक्त ठरत असल्याची संस्थांची भूमिका आहे. यास प्राध्यापक संघटनांनी विरोध दर्शविल्यानंतर 'एआयसीटीई'ने संस्थांच्या अशा प्रकारच्या निर्णयांना विरोध दर्शविला आहे. यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकांना तात्पुरता दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी अभ्यासक्रमावर उद्या मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दहावीचा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, मूल्यमापन पद्धती बदलण्यात आली आहे. या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके, अभ्यासक्रम पालकांना समजावा, यासाठी नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या वतीने 'नवीन अभ्यासक्रमाची दहावी' या विषयावर ३ जुलै रोजी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दादासाहेब गायकवाड सभागृहात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होईल. बालभारतीच्या ज्या लेखकांचा नवीन पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम रचनेत समावेश आहे, अशा तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पाठ्यपुस्तकाची ओळख, नवीन अभ्यासक्रमांची रूपरेषा, स्वअध्ययनाची गरज, पालकांचा सक्रिय सहभाग, गुण वाढविण्यासाठी टिप्स या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. बालभारतीचे संचालक सुनील मगर, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष महेश दाबक, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव या वेळी उपस्थित राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'या' गावात सत्तर वर्षांनी आली एसटी

$
0
0

मनमाड:

देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली तरी नांदगाव तालुक्यातील तांबेवाडीमध्ये एसटी पोहचली नव्हती. मात्र, दि. २९ जून रोजीची सकाळ या ग्रामस्थांसाठी पर्वणी घेऊन आली. तब्बल सात दशकांनंतर या गावात बस आली आणि ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. ही बस आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली त्यांचे आभार मानताना ग्रामस्थ हेलावले आणि गावात बस आलेली पाहताना हरखून गेले होते.

नांदगाव तालुक्यातील तांबेवाडी गाव गेल्या ७० वर्षांपासून बससेवेपासून वंचित होते. या गावात बस यावी यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न सुरू होते. बस नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत असल्याचे पाहून युवा मल्हार सेनेने गावात एसटी यावी यासाठी धडपड केली. जिल्हाध्यक्ष सीताराम पिंगळे यांच्यासह बिरू शिंदे, शिवसेनेचे सुनील जाधव, बिरदेव देवकाते, खुशाल सोर, संदीप पाटील, पंकज शिंदे, हिंमत शिंदे, होनाजी खरात आदींनी यासाठी प्रयत्न केले. गावात बस सुरू होण्यासाठी आगारप्रमुख विनोद इप्पर यांना निवेदन देऊन आग्रही मागणी करण्यात आली. त्यानंतर तांबेवाडीत एसटी अवतरली. गावात बस पाहून लहानांपासून अबालवृद्धांपर्यंत सारेच हरखून गेले होते. गत ७० वर्षांनंतर आलेली बस गावाला या पुढे विकासाच्या गावाला नेणारी ठरेल, बस नसल्याने येणाऱ्या अडचणी थांबतील, अशी ग्रामस्थांना आशा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साक्षीच्या मदतीवरच घरट्याची भिस्त

$
0
0

साक्षी घरटे

९२.००

प्रतिकूलतेवर मात करीत दहावीत मिळविले यश

-

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : bidvepravinMT

नाशिक : पोलिओच्या बाधेने आईच्या वाट्याला आलेले कायमस्वरूपी दिव्यांगत्व, यातच एका किडनीची पूर्णत: हानी होऊन या दु:खात पडलेली भर, लहानग्या भावाचे सातत्याचे आजारपण, कुटुंबाला कसाबसा टेकू देणारी वडिलांची शैक्षणिक संस्थेतील शिपाईपदाची नोकरी अन् कुटुंबाच्या पोटाला आजीच्या हस्ते येणारा रेशनच्या धान्याचा आधार अशी प्रतिकूलतेची आव्हान पेलण्यासाठी साक्षी घरटे या विद्यार्थिनीला कॉम्प्युटर इंजिनीअर बनायचं आहे. त्याच स्वप्नापोटी तिने दहावीत प्रतिकूलतेवर मात करीत ९२ टक्के मिळविले आहेत. पण, आर्थिक विवंचनेपोटी तिचा खरा संघर्ष आता सुरू झाला आहे.

साक्षीच्या कुटुंबात आजी, आई, बाबा आणि लहान भाऊ यांचा समावेश आहे. आई उज्ज्वला भोसला शिक्षण संस्थेमध्ये शिपाई होत्या. तर वडील रोजंदारीवर मिळेल तेथे काम करायचे. पोलिओमुळे आई पायाने अधू. त्यातच त्यांना एक किडनीही नाही. त्यामुळे काम करताना अनेक मर्यादा येत. साक्षी सहावीपर्यंत याच शाळेत होती. आई शाळेतच नोकरीस असल्याने साक्षीला फी मध्ये ५० टक्के सवलत मिळत होती. परंतु, आईने नोकरी सोडली आणि ही सवलतही बंद झाली. आर्थिक अडचणींमुळे सात हजार रुपये फी भरणे या कुटुंबाला अशक्य ठरू लागले. कामगारनगरमधील आनंद निकेतन या विद्यालयात तिला फीमध्ये सवलत मिळणार होती. त्यामुळे तिने या शाळेत प्रवेश घेतला. सातवी आणि आठवीला तिने अर्धी फी भरली. परंतु, चांगले गुण मिळविल्याने नववीला पूर्ण फी माफ झाली. शाळेतील शिक्षक आणि घराजवळील रहिवाशांनी साक्षीची वेळोवेळी पाठ थोपटली. तिला हवी नको ती मदत केली. कुणी वह्या-पुस्तके दिली. कुणी शाळेचा गणवेश घेऊन दिला. क्लासच्या शिक्षकांनीही फी घेतली नाही. कुणी दिलेले जुने कपडेही आनंदाने परिधान करते. अशा परिस्थितीतही तिने न डगमगता दहावीत ९२ टक्के गुण मिळवले. तिला आता पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

- साक्षीला व्हायचंय कॉम्प्युटर इंजिनीअर...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणी कारागिराचा अंत्ययात्रेत गोंधळ

$
0
0

मद्य प्राशन करून पाहुण्याला मारहाण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंत्ययात्रेपूर्वी घराबाहेर सुरू असलेल्या तयारीवेळी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत आणि दुचाकी दामटवित मद्यपी पैठणी कारागिराने शनिवारी (दि. ३० जून) रात्री गोंधळ घातला. तसेच दु:खाचा प्रंसग असल्याने समजून घ्यावे, असे सांगण्यास गेलेल्या पाहुण्याच्याच श्रीमुखात मारण्यापर्यंत त्याची मजल गेली. कासार गल्लीत घडलेला प्रकार सुसंस्कृत येवला शहरास काळीमा फासणारा ठरल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.

प्रशांत नारायण खंडाळकर असे मद्यपी कारागिराचे नाव असून त्याच्या विरोधात येवला पोलिस ठाण्यात भारत रेघाटे यांनी तक्रार दिली आहे. येवल्यातील प्रतिष्ठित व्यावसायिक देविदास भिंगारकर यांच्या मावशी लीलाबाई जगन्नाथ नाळके यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी शनिवारी निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी नाशिक, पुणे, नगर जिल्ह्यातून नातेवाईक आले होते. अंत्ययात्रा काढण्यापूर्वी भिंगारकर यांच्या घराबाहेर सायंकाळी तयारी केली जात होती. यात व्यत्यय येऊ नये म्हणून नागरिकांनी कासार गल्लीतील रस्ता बंद केला. तसेच नागरिकांना पर्यायी मार्गाने वाहने घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, प्रशांत खंडाळकर या पैठणी विणकाम करणाऱ्या कारागिराने कासार गल्लीतून दुचाकी दामटण्याचा उद्योग केला. यावेळी भारत रेघाटे यांनी पुढे येऊन खंडाळकर यांना 'दु:खाचा प्रसंग आहे, आपण सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गाने दुचाकी न्यावी', अशी विनवणी केली. मात्र, मद्याच्या धुंदीत तर्र असलेल्या खंडाळकरने समजून सांगण्यासाठी आलेल्या रेघाटे यांच्या श्रीमुखात भडकाविली. तसेच गाड्या लावून असले उद्योग करतात का, असा उर्मट सवाल केला. अन्य दोन-तीन ज्येष्ठ मंडळी समजून सांगण्यासाठी पुढे आली. तर खंडाळकरने त्यांनाही धमकावले. यामुळे उपस्थित सगळेच जण अवाक् झाले. उपस्थितांमधील काही तरुण मंडळी पुढे येताच खंडाळकर शिवीगाळ करीत निघून गेला.

कारवाईची प्रतीक्षा

या प्रकरणी भारत रेघाटे यांनी येवला पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी 'रेघाटे यांनी दिलेली तक्रार दाखल करून घेतली आहे. संबंधित मद्यपी कारागिरावर कारवाई केली जाईल', असे सांगितले आहे. पोलिसांकडून काय कारवाई होते, याची येवलावासीयांना प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व मृत भिक्षुक?

$
0
0

पाचही जण मंगळवेढ्यातील डवरी गोसावी समाजाचे

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून साक्री तालुक्यातील राईनपाड्यात जमावाच्या अमानूष मारहाणीत मृत्युमुखी पडलेले पाच जण हे भिक्षुक असल्याची माहिती हाती आली आहे. भिक्षुकीसाठीच रविवारी ते गावात आले आणि स्थानिकांच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

मारहाणीत मृत झालेले पाचही जण मंगळवेढा परिसरातील डवरी गोसावी समाजाचे असून या घटनेने या समाजात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवेढा तालुक्यातील खवे येथील दादाराव भोसले, भारत भोसले आणि भारत माळवे यांच्यासह मानेवाडी येथील आप्पा इंगोले आणि कर्नाटक सीमेवरील राजू भोसले या पाच जणांचा या मारहाणीत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांत डवरी गोसावी समाज वास्तव्यास आहेत. बहुतांश परिवारांना शेतीवाडी नसल्याने हे कुटुंब देशभर फिरतात व कुटुंबाची उपजीविका चालवितात. मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी, खवे, गणेशवाडी, निंबोणी जिंती या परिसरातील शेकडो कुटुंबे सध्या बाहेर असून, रविवारच्या घटनेमुळे डवरी गोसावी समाजात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

या घटनेत मृत झालेल्या दादाराव भोसले यांच्यामागे वयोवृद्ध आई असून, त्यांची पत्नी व भाऊ हे त्यांच्यासोबतच बाहेर भटकंती करतात. तर मानेवाडी येथील आप्पा इंगोले अविवाहित असून, त्याच्या मागे आई आणि एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेनंतर मंगळवेढा पोलिसांनी गावात बंदोबस्त ठेवला आहे.

अफवेतूनच मारहाण

'धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो. अफवाच्या माध्यमातून ही घटना घडली असून, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ही लोकं होती. ते ज्योतिषी पाहणे किंवा भिक्षुकी मागणे यासाठी आले असल्याचे समजत आहे. घटना घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांशी बोलणे झाले आहे', अशी माहिती धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. तर 'राईनपाड्यात घडलेल्या घटनेत लोकांनी एकत्र येत पाचही जणांची चौकशी न करता त्यांना मारहाण केली. या घटनेपूर्वीही धुळे व नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून अशा घटना घडत असून, गावकऱ्यांनी त्या सर्वांना पोलिसांच्या हाती द्यायला पाहिजे होते. पण कायदा हातात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली', असे साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेभान जमावाकडून पाच जणांची हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून साक्री तालुक्यातील राईनपाड्यात जमावाने अमानुष मारहाण करून रविवारी दुपारी पाचजणांची हत्या केली. मृत्युमुखी पडलेले सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही जमावाने मारहाण केली. यामध्ये दोन पोलिस जखमी झाले असून, दहाजणांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत मुले चोरणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा पसरत आहेत. याच घटनेची पुनरावृत्ती रविवारी धुळ्यात घडली. आठवडा बाजार असल्याने गावकऱ्यांची गर्दी होती. त्या वेळी काहीजण लहान मुलांना पळवून नेत असल्याची आवई उठली व या पाचजणांना गावकऱ्यांनी पकडले. त्यांची चौकशी केली जात असतानाच, जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. विटांनी व दगडांनी त्यांना ठेचण्यात आले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृतांपैकी एकाची ओळख पटली आहे. दादाराव शंकरराव भोसले असे त्याचे नाव असून, तो सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे राहणारा आहे. या घटनेची माहिती मिळताच नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे साक्रीकडे रवाना झाले आहेत. धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार फौजफाट्यासह गावात तळ ठोकून आहेत.

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून साक्री तालुक्यातील राईनपाड्यात जमावाच्या अमानूष मारहाणीत मृत्युमुखी पडलेले पाच जण हे भिक्षुक असल्याची माहिती हाती आली आहे. भिक्षुकीसाठीच रविवारी ते गावात आले आणि स्थानिकांच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. 'धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो. अफवाच्या माध्यमातून ही घटना घडली असून, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हे लोक होते. घटना घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांशी बोलणे झाले आहे,' अशी माहिती धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. 'राईनपाड्यात घडलेल्या घटनेत लोकांनी एकत्र येत पाचही जणांची चौकशी न करता त्यांना मारहाण केली. या घटनेपूर्वीही धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत गेल्या आठवड्यापासून अशा घटना घडत असून, गावकऱ्यांनी त्या सर्वांना पोलिसांच्या हाती द्यायला पाहिजे होते. पण कायदा हातात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली,' असे साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे यांनी सांगितले.

परिस्थिती नियंत्रणात

मृत्युमुखी पडलेले पाचजण खरेच मुले पळवून नेणारे होते, की केवळ संशयावरून जमावाने त्यांची हत्या केली, हे पोलिस तपासानंतर समोर येणार आहे. संशयितांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून, सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. गेल्या आठवडाभरापासून धुळे व नंदुरबारमध्ये अशा प्रकारच्या अफवा पसरत आहेत.

----

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व मृत भिक्षुक?

$
0
0

पाचही जण मंगळवेढ्यातील डवरी गोसावी समाजाचे

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून साक्री तालुक्यातील राईनपाड्यात जमावाच्या अमानूष मारहाणीत मृत्युमुखी पडलेले पाच जण हे भिक्षुक असल्याची माहिती हाती आली आहे. भिक्षुकीसाठीच रविवारी ते गावात आले आणि स्थानिकांच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

मारहाणीत मृत झालेले पाचही जण मंगळवेढा परिसरातील डवरी गोसावी समाजाचे असून या घटनेने या समाजात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवेढा तालुक्यातील खवे येथील दादाराव भोसले, भारत भोसले आणि भारत माळवे यांच्यासह मानेवाडी येथील आप्पा इंगोले आणि कर्नाटक सीमेवरील राजू भोसले या पाच जणांचा या मारहाणीत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांत डवरी गोसावी समाज वास्तव्यास आहेत. बहुतांश परिवारांना शेतीवाडी नसल्याने हे कुटुंब देशभर फिरतात व कुटुंबाची उपजीविका चालवितात. मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी, खवे, गणेशवाडी, निंबोणी जिंती या परिसरातील शेकडो कुटुंबे सध्या बाहेर असून, रविवारच्या घटनेमुळे डवरी गोसावी समाजात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

या घटनेत मृत झालेल्या दादाराव भोसले यांच्यामागे वयोवृद्ध आई असून, त्यांची पत्नी व भाऊ हे त्यांच्यासोबतच बाहेर भटकंती करतात. तर मानेवाडी येथील आप्पा इंगोले अविवाहित असून, त्याच्या मागे आई आणि एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेनंतर मंगळवेढा पोलिसांनी गावात बंदोबस्त ठेवला आहे.

अफवेतूनच मारहाण

'धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो. अफवाच्या माध्यमातून ही घटना घडली असून, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ही लोकं होती. ते ज्योतिषी पाहणे किंवा भिक्षुकी मागणे यासाठी आले असल्याचे समजत आहे. घटना घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांशी बोलणे झाले आहे', अशी माहिती धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. तर 'राईनपाड्यात घडलेल्या घटनेत लोकांनी एकत्र येत पाचही जणांची चौकशी न करता त्यांना मारहाण केली. या घटनेपूर्वीही धुळे व नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून अशा घटना घडत असून, गावकऱ्यांनी त्या सर्वांना पोलिसांच्या हाती द्यायला पाहिजे होते. पण कायदा हातात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली', असे साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीव गमावलेले भिक्षुक?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, धुळे

'धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेली घटना अंत्यत दुर्दैवी आहे. या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो. अफवाच्या माध्यमातून ही घटना घडली असून, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ही लोकं होती. ते ज्योतिषी पाहणे किंवा भिक्षुकी मागणे यासाठी आले असल्याचे समजत आहे. घटना घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांशी बोलणे झाले आहे', अशी माहिती धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. तर 'राईनपाड्यात घडलेल्या घटनेत लोकांनी एकत्र येत पाचही जणांची चौकशी न करता त्यांना मारहाण केली. या घटनेपूर्वीही धुळे व नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून अशा घटना घडत असून, गावकऱ्यांनी त्या सर्वांना पोलिसांच्या हाती द्यायला पाहिजे होते. पण कायदा हातात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली', असे साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात जमावाकडून पाच जणांची हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून साक्री तालुक्यातील राईनपाड्यात जमावाने अमानूष मारहाण करीत रविवारी दुपारी पाच जणांची हत्या केली. मृत्युमुखी पडलेले सर्व जण सोलापूर जिल्ह्यातील आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही जमावाने मारहाण केली. यामध्ये दोन पोलिस जखमी झाले असून, दहा जणांचा अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत मुले चोरणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा पसरत आहेत. याच घटनेची पुनरावृत्ती रविवारी धुळ्यात घडली. आठवडा बाजार असल्याने गावकऱ्यांची गर्दी होती. त्याचवेळी काही जण लहान मुलांना पळवून नेत असल्याची आवई उठली व या पाच जणांना गावकऱ्यांनी पकडले. त्यांची चौकशी केली जात असतानाच, जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. विटांनी व दगडांनी त्यांना ठेचण्यात आले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृतांपैकी एकाची ओळख पटली आहे. दादाराव शंकरराव भोसले असे त्याचे नाव असून, तो सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे राहणारा आहे. या घटनेची माहिती मिळताच नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक छोरींग दोरजे साक्रीकडे रवाना झाले आहेत. तर धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार फौजफाट्यासह गावात तळ ठोकून आहेत.

मृत्युमुखी पडलेले पाच जण खरेच मुले पळवून नेणारे होते की, केवळ संशयावरून जमावाने त्यांची हत्या केली, हे पोलिस तपासानंतर समोर येणार आहे. संशयिताचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून, सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. गेल्या आठवडाभरापासून धुळे व नंदुरबारमध्ये अशा प्रकारच्या अफवा पसरत आहेत. (जीव गमावलेले भिक्षुक?...१०)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेभान जमावाकडून पाच जणांची हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून साक्री तालुक्यातील राईनपाड्यात जमावाने अमानुष मारहाण करून रविवारी दुपारी पाच जणांची हत्या केली. मृत्युमुखी पडलेले सर्व जण सोलापूर जिल्ह्यातील आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही जमावाने मारहाण केली. यामध्ये दोन पोलिस जखमी झाले असून, दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत मुले चोरणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा पसरत आहेत. याच घटनेची पुनरावृत्ती रविवारी धुळ्यात घडली. आठवडा बाजार असल्याने गावकऱ्यांची गर्दी होती. त्या वेळी काही जण लहान मुलांना पळवून नेत असल्याची आवई उठली व या पाच जणांना गावकऱ्यांनी पकडले. त्यांची चौकशी केली जात असतानाच, जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. विटांनी व दगडांनी त्यांना ठेचण्यात आले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृतांपैकी एकाची ओळख पटली आहे. दादाराव शंकरराव भोसले असे त्याचे नाव असून, तो सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे राहणारा आहे. या घटनेची माहिती मिळताच नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे साक्रीकडे रवाना झाले आहेत. धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार फौजफाट्यासह गावात तळ ठोकून आहेत.

जीव गमावलेले भिक्षुक?

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून साक्री तालुक्यातील राईनपाड्यात जमावाच्या अमानूष मारहाणीत मृत्युमुखी पडलेले पाच जण हे भिक्षुक असल्याची माहिती हाती आली आहे. भिक्षुकीसाठीच रविवारी ते गावात आले आणि स्थानिकांच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. 'धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो. अफवाच्या माध्यमातून ही घटना घडली असून, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हे लोक होते. ते ज्योतिष पाहणे किंवा भिक्षुकीसाठी आले असल्याचे समजते. घटना घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांशी बोलणे झाले आहे,' अशी माहिती धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. 'राईनपाड्यात घडलेल्या घटनेत लोकांनी एकत्र येत पाचही जणांची चौकशी न करता त्यांना मारहाण केली. या घटनेपूर्वीही धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत गेल्या आठवड्यापासून अशा घटना घडत असून, गावकऱ्यांनी त्या सर्वांना पोलिसांच्या हाती द्यायला पाहिजे होते. पण कायदा हातात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली,' असे साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे यांनी सांगितले.

परिस्थिती नियंत्रणात

मृत्युमुखी पडलेले पाच जण खरेच मुले पळवून नेणारे होते, की केवळ संशयावरून जमावाने त्यांची हत्या केली, हे पोलिस तपासानंतर समोर येणार आहे. संशयिताचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून, सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. गेल्या आठवडाभरापासून धुळे व नंदुरबारमध्ये अशा प्रकारच्या अफवा पसरत आहेत.

----

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात जमावाकडून पाच जणांची हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून साक्री तालुक्यातील राईनपाड्यात जमावाने अमानूष मारहाण करीत रविवारी दुपारी पाच जणांची हत्या केली. मृत्युमुखी पडलेले सर्व जण सोलापूर जिल्ह्यातील आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही जमावाने मारहाण केली. यामध्ये दोन पोलिस जखमी झाले असून, दहा जणांचा अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत मुले चोरणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा पसरत आहेत. याच घटनेची पुनरावृत्ती रविवारी धुळ्यात घडली. आठवडा बाजार असल्याने गावकऱ्यांची गर्दी होती. त्याचवेळी काही जण लहान मुलांना पळवून नेत असल्याची आवई उठली व या पाच जणांना गावकऱ्यांनी पकडले. त्यांची चौकशी केली जात असतानाच, जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. विटांनी व दगडांनी त्यांना ठेचण्यात आले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृतांपैकी एकाची ओळख पटली आहे. दादाराव शंकरराव भोसले असे त्याचे नाव असून, तो सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे राहणारा आहे. या घटनेची माहिती मिळताच नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक छोरींग दोरजे साक्रीकडे रवाना झाले आहेत. तर धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार फौजफाट्यासह गावात तळ ठोकून आहेत.

मृत्युमुखी पडलेले पाच जण खरेच मुले पळवून नेणारे होते की, केवळ संशयावरून जमावाने त्यांची हत्या केली, हे पोलिस तपासानंतर समोर येणार आहे. संशयिताचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून, सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. गेल्या आठवडाभरापासून धुळे व नंदुरबारमध्ये अशा प्रकारच्या अफवा पसरत आहेत. (जीव गमावलेले भिक्षुक?...१०)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेभान जमावाकडून पाच जणांची हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून साक्री तालुक्यातील राईनपाड्यात जमावाने अमानुष मारहाण करून रविवारी दुपारी पाच जणांची हत्या केली. मृत्युमुखी पडलेले सर्व जण सोलापूर जिल्ह्यातील आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही जमावाने मारहाण केली. यामध्ये दोन पोलिस जखमी झाले असून, दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत मुले चोरणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा पसरत आहेत. याच घटनेची पुनरावृत्ती रविवारी धुळ्यात घडली. आठवडा बाजार असल्याने गावकऱ्यांची गर्दी होती. त्या वेळी काही जण लहान मुलांना पळवून नेत असल्याची आवई उठली व या पाच जणांना गावकऱ्यांनी पकडले. त्यांची चौकशी केली जात असतानाच, जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. विटांनी व दगडांनी त्यांना ठेचण्यात आले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृतांपैकी एकाची ओळख पटली आहे. दादाराव शंकरराव भोसले असे त्याचे नाव असून, तो सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे राहणारा आहे. या घटनेची माहिती मिळताच नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे साक्रीकडे रवाना झाले आहेत. धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार फौजफाट्यासह गावात तळ ठोकून आहेत.

जीव गमावलेले भिक्षुक?

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून साक्री तालुक्यातील राईनपाड्यात जमावाच्या अमानूष मारहाणीत मृत्युमुखी पडलेले पाच जण हे भिक्षुक असल्याची माहिती हाती आली आहे. भिक्षुकीसाठीच रविवारी ते गावात आले आणि स्थानिकांच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. 'धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो. अफवाच्या माध्यमातून ही घटना घडली असून, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हे लोक होते. ते ज्योतिष पाहणे किंवा भिक्षुकीसाठी आले असल्याचे समजते. घटना घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांशी बोलणे झाले आहे,' अशी माहिती धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. 'राईनपाड्यात घडलेल्या घटनेत लोकांनी एकत्र येत पाचही जणांची चौकशी न करता त्यांना मारहाण केली. या घटनेपूर्वीही धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत गेल्या आठवड्यापासून अशा घटना घडत असून, गावकऱ्यांनी त्या सर्वांना पोलिसांच्या हाती द्यायला पाहिजे होते. पण कायदा हातात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली,' असे साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे यांनी सांगितले.

परिस्थिती नियंत्रणात

मृत्युमुखी पडलेले पाच जण खरेच मुले पळवून नेणारे होते, की केवळ संशयावरून जमावाने त्यांची हत्या केली, हे पोलिस तपासानंतर समोर येणार आहे. संशयिताचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून, सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. गेल्या आठवडाभरापासून धुळे व नंदुरबारमध्ये अशा प्रकारच्या अफवा पसरत आहेत.

----

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व मृत भिक्षुक?

$
0
0

पाचही जण मंगळवेढ्यातील डवरी गोसावी समाजाचे

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून साक्री तालुक्यातील राईनपाड्यात जमावाच्या अमानूष मारहाणीत मृत्युमुखी पडलेले पाच जण हे भिक्षुक असल्याची माहिती हाती आली आहे. भिक्षुकीसाठीच रविवारी ते गावात आले आणि स्थानिकांच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

मारहाणीत मृत झालेले पाचही जण मंगळवेढा परिसरातील डवरी गोसावी समाजाचे असून या घटनेने या समाजात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवेढा तालुक्यातील खवे येथील दादाराव भोसले, भारत भोसले आणि भारत माळवे यांच्यासह मानेवाडी येथील आप्पा इंगोले आणि कर्नाटक सीमेवरील राजू भोसले या पाच जणांचा या मारहाणीत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांत डवरी गोसावी समाज वास्तव्यास आहेत. बहुतांश परिवारांना शेतीवाडी नसल्याने हे कुटुंब देशभर फिरतात व कुटुंबाची उपजीविका चालवितात. मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी, खवे, गणेशवाडी, निंबोणी जिंती या परिसरातील शेकडो कुटुंबे सध्या बाहेर असून, रविवारच्या घटनेमुळे डवरी गोसावी समाजात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

या घटनेत मृत झालेल्या दादाराव भोसले यांच्यामागे वयोवृद्ध आई असून, त्यांची पत्नी व भाऊ हे त्यांच्यासोबतच बाहेर भटकंती करतात. तर मानेवाडी येथील आप्पा इंगोले अविवाहित असून, त्याच्या मागे आई आणि एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेनंतर मंगळवेढा पोलिसांनी गावात बंदोबस्त ठेवला आहे.

अफवेतूनच मारहाण

'धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो. अफवाच्या माध्यमातून ही घटना घडली असून, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ही लोकं होती. ते ज्योतिषी पाहणे किंवा भिक्षुकी मागणे यासाठी आले असल्याचे समजत आहे. घटना घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांशी बोलणे झाले आहे', अशी माहिती धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. तर 'राईनपाड्यात घडलेल्या घटनेत लोकांनी एकत्र येत पाचही जणांची चौकशी न करता त्यांना मारहाण केली. या घटनेपूर्वीही धुळे व नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून अशा घटना घडत असून, गावकऱ्यांनी त्या सर्वांना पोलिसांच्या हाती द्यायला पाहिजे होते. पण कायदा हातात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली', असे साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे यांनी सांगितले.

...

अशी घडली घटना...

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या पिंपळनेर गावापासून २० ते २२ किलोमीटरवर राईनपाडा गाव आहे.

रविवारी आठवडे बाजार होता. दुपारी गावात ३५ ते ५० वयोगटातील ५ ते ७ अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांच्या हातात बॅग व पिशव्या होत्या.

गळ्यात माळा वगैरे असल्याने ग्रामस्थांना त्यांच्याविषयी संशय निर्माण झाला.

दोन दिवसांपूर्वी डवन्यापाडा गावातून मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली होती.

हे अनोळखी लोक मुले पळविणाऱ्या टोळीतील असल्याचा संशय ग्रामस्थांना आला.

त्यांच्याकडून काही ग्रामस्थांनी माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता भाषेची अडचण

जमावात आणि त्या अनोळखी व्यक्तींमध्ये वाद होऊन जमावाकडून मारहाण करण्यास सुरुवात

जमावाच्या तावडीतून दोघे हातून निसटले तर पाच जणांना बेदम मारहाण झाली

त्यानंतर पाचही जणांना राईनपाडा ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये नेले

या ठिकाणी पुन्हा मारहाण; यातच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

जिल्ह्यातील या खळबळजनक घटनेची तत्काळ दखल घेत नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक छोरींग दोरजे हे राईनपाडा येथे दाखल झाले. त्यांनी पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांना घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहे. राईनपाड्याजवळील डवन्यापाडा येथून दोन दिवसांपासून एक मुलगा बेपत्ता झाला होता. त्यातच धुळे जिल्ह्यात व आजूबाजूच्या भागात मुले पळविणारी टोळी येत असल्याची अफवा पसरली आहे. अशात या अनोळखी व्यक्तींविषयी लोकांना संशय आल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. जमावाच्या मारहाणीत ठार झालेले सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यामध्ये भरत शंकर भोसले, राजेश श्रीमंत भोसले, भारत शंकर माळवे, दादाराव शंकर भोसले (सर्व रा. खवे ता. मंगळवेढा जि. सोलापूर) तर अमित हिंगोणे (पत्ता माहित नाही) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात पाच जणांची हत्या

$
0
0

मुले पळविणारी टोळी समजून जमावाकडून बेदम मारहाण

- राईनपाड्यात घडला प्रकार
- दोन जण जमावाच्या तावडीतून निसटले
- मारहाणप्रकरणी दहा जणांना अटक
- घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात
...
म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून रविवारी (दि. १) दुपारी राईनपाड्यात (ता. साक्री, जि. धुळे) जमावाने पाच जणांची काठी, विटा, दगडाने ठेचून अमानूष हत्या केली. हे सर्व जण सोलापूर जिल्ह्यातील आहेत. या खळबळजनक घटनेने धुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. घटनास्थळी पोलिसांनाही जमावाकडून मारहाण करण्यात आली असून, दोन पोलिस जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे.

देशभरात मुले पळवून नेणाऱ्या टोळीबाबात व्हॉट्सअॅप व फेसबुकवर मेसेज फिरत आहेत. यामुळे देशभरात मारहाणीच्या घटना घडत आहेत. राईनपाड्यातही त्याची पुनरावृत्ती घडली. राईनपाडा गावात रविवारी (दि. १) आठवडे बाजार असल्याने लोकांची गर्दी होती. या ठिकाणी काही लोक लहान मुले पळवून घेऊन जात असल्याची आवई उठली. राईनपाड्याजवळील डवन्यापाडा येथून दोन दिवसांपूर्वी एक मुलगा बेपत्ता झाला होता. यामुळे अनोळखी व्यक्तींकडील पिशव्या व त्यांच्या गळ्यातील माळा वगैरे पाहून ग्रामस्थांचा त्यांच्याविषयी संशय बळावला. त्यांच्याकडून काही ग्रामस्थांनी माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता, भाषेची अडचण निर्माण झाली. या अनोळखी व्यक्तींसोबत वाद झाल्यानंतर संतप्त जमावाने काठी, विटा आणि दगडांनी पाचही जणांना मरेपर्यंत मारहाण केली, तर दोन जण जमावाच्या तावडीतून निसटून पळाले. मृतांमध्ये भरत शंकर भोसले, राजेश श्रीमंत भोसले, भारत शंकर माळवे, दादाराव शंकर भोसले (सर्व रा. खवे ता. मंगळवेढा जि. सोलापूर) तर अमित हिंगोणे (पत्ता माहित नाही) यांचा समावेश आहे.
--
अफवांवर विश्वास ठेवू नये
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुले चोरत असल्याच्या संशयावरून लोकांना मारहाण केली जात आहे. अशा प्रकारांमध्ये निर्दोष लोकांनाही इजा झाल्याचे गेल्या काही घटनांत समोर आले आहे. त्यामुळे लोकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता कुणी संशयित व्यक्ती अथवा वस्तू आढळल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिस यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
-
राईनपाड्यात आठवडे बाजाराच्या दिवशी मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून सोलापूर जिल्ह्यातील पाच जणांची जमावाने हत्या केली. आता परिस्थिती नियंत्रणात असून, घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
- एम. रामकुमार, पोलिस अधीक्षक, धुळे
--
राईनपाड्यात घडलेली घटना अंत्यत दुर्दैवी आहे. या घटनेचा मी निषेध करतो. अफवाच्या माध्यमातून ही घटना घडली असून, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ही लोकं होती. ते ज्योतिषी पाहणे किंवा भिक्षुकी मागणे, यासाठी आले असल्याचे समजते. घटना घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना आदेश दिले आहेत.
- दादा भुसे, पालकमंत्री, धुळे
--
पोलिस अधीक्षकांचे चौकशीचे आदेश
जिल्ह्यातील या खळबळजनक घटनेची तत्काळ दखल घेत नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक छोरींग दोरजे हे राईनपाडा येथे दाखल झाले. त्यांनी पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांना घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरत महामार्गावरील रस्त्याचा भराव खचला

$
0
0

तज्ज्ञांकडून पाहणी करण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बाब समोर आली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावरील रस्त्याचा भराव वाहू लागल्याने महामार्ग खचला आहे. यामुळे महामार्गाच्या कामाची तपासणी तज्ज्ञांकडून करण्याची मागणी तालुक्यातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

सुरत-नागपूर महामार्गावरील साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणाजवळून जाणाऱ्या भरावाच्या मातीचे पावसानंतर खचले आहे. धरणाजवळून जाणाऱ्या रस्त्याच्या भरावाच्या कामात इतका कामचुकारपणा असेल तर धरणालाही धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अक्कलपाडा धरणाला लागून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काम सुरू आहे.

अक्कलपाडा धरणालाही धोका
गेल्यावर्षी अक्कलपाडा धरणात ९८ टक्के जलसाठा झाल्यानंतर आता या धरणासाठी वाढीव जमीन संपादित करण्यात येत आहे. त्यामुळे हा महामार्ग थेट अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या मध्यातून जाणार आहे. त्यासाठी किमान अक्कलपाडा प्रकल्पातून जाणाऱ्या महामार्गाचे काम तेवढेच व्हायला पाहिजे. मात्र, महामार्ग प्राधिकरणाबरोबरच महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या कंपनीने सक्षमीकरणाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे पहिल्याच पावसानंतर महामार्ग खचून गेला. धुळे व साक्री तालुक्यातील नेर, कुसुंब, तामसवाडी, वसमार, अक्कलपाडा आदी परिसरात पावसाने हजेरी लावली. अद्याप पाऊस कमी असला तरीदेखील मुसळधार पाऊस झाला तर महामार्ग पूर्ण खचल्याशिवाय राहणार नाही. यामुळे या महामार्गाची तज्ज्ञांकडून तपासणी करून चौकशीअंती संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव: मुले पळविणारी टोळी समजून एकास मारहाण

$
0
0

मालेगाव:

मुलं पळवणारी टोळी समजून धुळे येथील जमावाच्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असताना, मालेगावमध्येही जमावाने अशाच प्रकारे एकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. आझादनगर भागातील सनिउल्ला नगर येथे ही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी या दाम्पत्याला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

परभणीतील जिंतूर येथील एक दाम्पत्य काल सायंकाळी आझाद नगर भागात 'आमच्याकडे पिक-पाणी नाही पैशांची मदत करा', असे म्हणत ते फिरत होते. त्यांच्यासोबत त्यांचा लहान मुलगादेखील होता. परंतु, काही लोकांना हे मुले पळविणाऱ्या टोळीतील असल्याचा संशय आला. त्या संशयातून काही वेळातच हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले. जमावातील काहींनी कुठलाही विचार न करता या महिलेच्या पतीस मारहाणीस सुरुवात केली. त्याचवेळी काही जणांनी कायदा हातात घेऊ नका. पोलिसांना त्यांचे काम करु द्या असे आवाहन करत या दाम्पत्याला परिसरातील एका घरात कोंडून ठेवल्यामुळे पुढील अनर्थ प्रसंग टळला. घटनेचे वृत्त समजल्यानंतर संतप्त जमावाला समजविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

64822616

या घटनेची माहिती समजताच माजी आमदार मुफ्ती इस्माईल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव ऐकण्याचा मनःस्थितीत नव्हते. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले हे आपल्या पथकासह तातडीने हजर झाले. दंगल नियंत्रण पथकही घटनास्थळी दाखल झाले. परंतु, जमावाने दगडफेक सुरु केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवड प्रातिनिधिक नसणार

$
0
0

संमेलनाध्यक्ष निवडीवर साहित्यिकांचे परखड मत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड आता थेट महामंडळ करणार असल्याची बातमी वाचून अनेक साहित्यिकांच्या भुवया उंचावल्या असून अनेकांनी याबाबत समाधानही व्यक्त केले आहे. परंतु, ही निवड प्रातिनिधिक होणार नसल्याने ती स्वीकारार्ह असणार का अशा शंकाही काहींनी उपस्थित केल्या आहेत. नाशिकमधील साहित्यिकांनी याबाबत काही निराशाजनक तर काही समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

प्रक्रिया आणखी मर्यादित

महामंडळ थेट अध्यक्षांची निवड करणार; परंतु त्या प्रक्रियेमध्ये गुंतागुंत होणार असे वाटते. निवडीचे निकष काय असणार, वाङमयीन गुणवत्ता कशी तपासणार? वाचणारे, लिहिणारे यांनी ठरवले तर ते प्रतिनिधित्त्व करतात, असे गृहीत धरता येते. परंतु आता तसे काही राहणार नाही. या निर्णयाने प्रक्रिया आणखी मर्यादित झाली आहे.

- प्रा. एकनाथ पगार, ज्येष्ठ समीक्षक

... तर स्वागतार्ह आहे

अध्यक्षांच्या निवडणुकीचे अनेक फायदे तोटे होते. मतदारांची संख्या वाढेल तेव्हा अध्यक्षपदाला अर्थ आहे. साहित्यिकांत अनेक गटतट आहेत. कोणता गट प्रभावी ठरतो त्यांचा अध्यक्ष होणार. दबावतंत्र वेगळ्या पद्धतीने प्रभाव पाडू शकते. सर्वानुमते ठरले तर ही चांगली गोष्ट आहे. निवडणुकीदरम्यान चिखलफेक होते, वातावरण दूषित होते ती पद्धत बंद होईल.

- किशोर पाठक, ज्येष्ठ कवी

चुकीचा पायंडा

अत्यंत चुकीचा पायंडा आहे. त्यामुळे गुंतागुंत वाढणार आहे. आपण लोकशाही मानतो मग साहित्यात ती का नसावी? महामंडळाला तर हे सोयीचे झाले आहे. साहित्यिक लाचार होतील. मतदानच हजार ऐवजी पाच हजार केले असते तर काय बिघडले असते. काहींना त्यांचे साहित्यातील योगदान बघून मतदानाचा अधिकार दिला असता.

- संजय चौधरी, सुप्रसिद्ध कवी

दूषित वातावरण निवळायला मदत

महामंडळाचा निर्णय योग्य आहे. भालचंद्र नेमाडे, भारत सासणे, रंगनाथ पठारे, आशा बगे, राजन गवस असे कितीतरी सकस असे साहित्यिक आपल्याकडे आहेत. त्यांना सन्मानपूर्वक अध्यक्ष बनवावे. त्यांना या मंचावर आणण्याची गरज आहे. मराठी संस्कृतीचा झेंडा अटकेपार नेणाऱ्यांमध्ये नामदेव ढसाळही होते; परंतु त्यांना तो सन्मान मिळू शकला नाही. यामुळे आधी संमेलनाविषयी असणारे दूषित वातावरण निवळायला मदत होणार आहे.

- राजू देसले, सुप्रसिद्ध कवी

खरे साहित्यिक पुढे येत नाहीत

निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे, निवडणूक प्रक्रियेने त्यात राजकारणाचा शिरकाव होत होता. आपलं साहित्यिक कर्तृत्त्व सिद्ध न केलेले लोकही अलीकडे अध्यक्ष व्हायला लागले होते, खरे साहित्यिक निवडणूक प्रक्रियेत उतरायला नाखूश होत होते. आयुष्यभर शब्दांची निस्सीम सेवा केली, अन् मत मागण्यासाठी साहित्याची कवडीची जाण नसलेल्या मंडळीच्या पुढे पदर पसरायचा, हे कसं मान्य होऊ शकेल? त्यामुळे झाला तो निर्णय अतिशय योग्य आहे.

- ऐश्वर्य पाटेकर, युवा कवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधी गटात तूर्त शांतता!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेची प्रशासकीय राजवट हटवण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिल्यानंतर संचालक मंडळाची निवडणूक डिसेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी माजी संचालकांची औपचारिक बैठक झाली असली तरी विरोधी गटात मात्र तूर्त शांतता आहे. या निवडणुकीत बँक बरखास्त होण्यापूर्वी असलेल्या सत्ताधारी गटाचे पॅनल कसे बनते यावरच विरोधी गटाची भूमिका ठरणार असल्यामुळे त्यासाठी त्यांना बरीच वाट बघावी लागणार आहे.

एकूण २३ संचालकांची ही निवडणूक डिसेंबर अखेर होणार असली तरी त्याचे पडघम वाजू लागले आहे. माजी चेअरमन वसंत गिते यांनी यापूर्वीच जिल्हा दौरा करून सभासदांच्या भेटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आतापासून चुरस असली तरी ती सत्ताधारी गटातच असणार आहे. या पॅनलतर्फे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सर्वांना कसे सामावून घ्यायचे, हा मोठा प्रश्न आहे. त्यात हुकुमचंद बागमार यांचे निधन झाल्यामुळे इच्छुकांना धोपावून धरण्याचे कसब इतरांकडे नसल्यामुळे हा प्रश्न कायम राहणार आहे.

सत्ताधारी गटातून संधी न मिळाल्यास विरोधी पॅनल उभे राहू शकते. त्यामुळे या निवडणुकीत आतापासून सर्वांचे मन राखून काम केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच गेल्या वेळेस विरोधात असलेल्या विरोधी गटाबरोबरही चर्चा करून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा आहे. बँकेचे राज्यभर १ लाख ८० हजार सभासद असून त्यांच्यापर्यंत पोहचणे इतके सोपे काम नाही. त्यामुळे आतापासून तयारी करावी लागणार असली तरी तूर्त विरोधी गट मात्र 'वेट अॅण्ड वॉच'च्या भूमिकेत आहे.

लोगो : नामको निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज होणार बैठक

$
0
0

दुसऱ्या दिवशी अर्जाची विक्री नाही

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (निमा) २९ जुलै रोजी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी एकाही अर्जाची विक्री झाली नाही. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १२ जुलै आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी मंगळवारी प्रमुख माजी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सातपूर येथील निवेकमध्ये बैठक आयोजन केले असून त्यात एकता पॅनलचे प्रमुख सदस्य उपस्थित राहणार आहे. या बैठकीत नवीन चेहरे देण्याचा आग्रह केला जाणार असल्याची चर्चा आहे. पॅनलमध्ये चार वर्षात सुरू असलेली अंतर्गत गटबाजी व काही सदस्यांची नाराजीचे पडसादही या बैठकीवर उमटणार आहे. फारशी कोठेही चर्चा न करता या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यात पुढील रणनीती ठरवली जाणार आहे.

एकता पॅनलच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी अनेक उपक्रम केल्याचा दावा केला असला तरी विरोधी गटाला तो मान्य नाही. त्यामुळे तेच-ते चेहरे न देता नवीन सदस्यांना यात संधी मिळावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. २ हजार ९६४ सदस्य असलेली निमा ही जिल्ह्यातील उद्योजकांची शिखर संस्था असल्याने या निवडणुकीला महत्त्व आहे. या निवडणुकीत नूतन अध्यक्षांसह सहा पदाधिकारी व ३४ कार्यकारिणी सदस्यांची निवड केली जाणार आहे.

लोगो : निमा निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live

Latest Images