Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘शिक्षक मतदार’साठी आज मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज (दि. २५) जिल्ह्यातील २१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

या निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले. तसेच हे अधिकारी व कर्मचारी आपापल्या साहित्यासह मतदान केंद्रांकडे रवाना झाले.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रशांत भामरे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, चिटणीस मंदार कुलकर्णी, तहसीलदार अमोल निकम, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी यांच्यासह निवडणूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यात एकूण २१ मतदान केंद्रे आहेत. त्यामध्ये जळगाव तालुक्यात चार, चाळीसगाव, भुसावळ व अमळनेर तालुक्यात प्रत्येकी दोन तर धरणगाव, एरंडोल, पारोळा, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण २१ मतदान केंद्रांचा समावेश आहे.

फिरती भरारी पथके कार्यरत

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण १२०५६ इतके मतदार असून, त्यात पुरुष मतदारांची संख्या ९३६३, तर स्त्री मतदारांची संख्या २६९३ इतकी आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक २३८० मतदार जळगाव तालुक्यात असून, त्यानंतर भुसावळ तालुक्यात १३६४, अमळनेर तालुक्यात १०३३ तर चाळीसगाव तालुक्यात ९९२ इतके मतदार आहेत. या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, जिल्हास्तरावर आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तालुकास्तरावर फिरती भरारी पथके कार्यरत आहे. या पथकांसमवेत व्हिडिओग्राफर देण्यात आले आहेत. मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्राकरीता केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान कर्मचारी यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.

या निवडणूकीसाठी सेक्टर ऑफिसर म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी त्या त्या तालुक्याचे तहसीलदार हे मतदान केंद्रावर लक्ष ठेवून असणार आहेत. तर सूक्ष्म निरीक्षक म्हणून जिल्ह्यातील राष्ट्रीय बँकाचे अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनातर्फे सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रांची यादी...

जळगाव - आर. आर. विद्यालय, पूर्व-पश्चिम इमारत, खोली क्र. ६ व १३

भाऊसाहेब काशिनाथ लाठी विद्यामंदिर, पूर्व-पश्चिम इमारत, पूर्वेकडून खोली क्र. २ व ४

अमळनेर - तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय आणि राजसारथी सभागृह, अमळनेर

भुसावळ - डी. एस. हायस्कूल, भुसावळ पूर्व-पश्चिम इमारत, पूर्वेकडील खोली क्र. २ व ३

चाळीसगाव - चव्हाण कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव पूर्वेकडील उत्तर-दक्षिण इमारत उत्तरेकडील खोली क्र. ३ व ५

चोपडा - तलाठी मिटिंग हॉल, तहसील कार्यालय,

यावल - तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय,

रावेर - संजय गांधी योजना शाखा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नवीन तहसील कार्यालय,

मुक्ताईनगर - तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय,

बोदवड - सभागृह तहसिल कार्यालय,

धरणगाव - तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय

एरंडोल - तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय

पारोळा - मिटिंग हॉल तहसील कार्यालय

भडगाव - तहसीलदार यांचे दालन तहसील कार्यालय

पाचोरा - तहसीलदार यांचे दालन तहसील कार्यालय

जामनेर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेन हॉल, वाकी रोड, जामनेर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपनगर नाक्यावर आज चार कॅमेऱ्यांचे लोकार्पण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

उपनगर नाका येथील अपघातांना आळा घालण्यासाठी चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण होत आले आहे. आज, मंगळवारी (दि. २६) दुपारी दोनला त्यांचे लोकार्पण होणार आहे. रोटरी क्लब ऑफ व्हिजन नेक्स्ट आणि उपनगर पोलिस ठाण्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रोटरीचे अध्यक्ष कौसर आझाद आणि उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांनी ही माहिती दिली.

उपनगर येथील आमंत्रण दुकानाचे संचालक प्रवीण अग्रवाल आणि माजी नगरसेवक शिवाजी सहाणे यांनी सीसीटीव्हीसाठी मदत केली आहे. रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्टचे सचिव अजित गुप्ता, विनायक बेडीस, मोहन भावे, ऋषिकेश मऱ्हाळकर, महेश दंदणे, दिनेश खांदरे आदी उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. टाकळीतील महापालिका शाळेतील चार आणि सामनगाव शासकीय तंत्रनिकेतनमधील ३२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पणही आजच होणार आहे. उपनगर नाक्यावर सिग्नल लावण्यात आल्यानंतरही वाहनचालकांमध्ये बेशिस्तीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत, अशी माहिती कौसर आझाद यांनी दिली. या आधी क्लबतर्फे चिंचोलीत १२० सीसीटीव्ही, तसेच वायफाय यंत्रणा बसविण्यात आली आहे. तेथे सहा-सात लाखांचे काम झाले आहे. दि. १ जुलैपासून सीसीटीव्ही कार्यान्वित होणार आहेत. क्लबने चिंचोली दत्तक घेतले आहे. या गावाला आदर्श गावाचे बक्षीसही मिळाले आहे.

--

(२ कॉलम, फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्याय द्या, मग कारवाई करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्लास्टिकबंदीसाठी सुरू केलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुढाकाराने पंचवटी येथील पाटिदार समाजाच्या कार्यालयात बोलावलेल्या सर्व व्यापारी संघटना व उद्योजकांच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत बंदी केलेल्या नियमांचे पूर्ण स्पष्टीकरण होत नाही व प्लास्टिकला पर्याय उपलब्ध होत नाही, तोपर्यंत कारवाई करू नये, असा पवित्राही व्यापाऱ्यांनी यावेळी घेतला. ही कारवाई सुरूच ठेवली तर व्यापाऱ्यांनी त्याविरोधात लढा देण्याची तयारीसुद्धा या बैठकीत व्यक्त केली.

चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महानगरातील सर्वच व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपल्या अडचणी मांडत कारवाईविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीत चेंबरचे उपाध्यक्ष अनिल लोढा, माजी अध्यक्ष खुशाल पोद्दार, दिग्विजय कापडिया, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, लेवा पाटिदार समाज ट्रस्टचे अध्यक्ष बकेश पटेल यासह विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी पी. एम. जोशी, उपप्रादेशिक अधिकारी अशोक करे, महापालिकेचे आरोग्यधिकारी डॉ. सचिन हिरे यांनी प्लास्टिकबंदीबाबत माहिती दिली. या बैठकीचे प्रास्ताविक माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी केले. यावेळी त्यांनी कायद्याची अमंलबजावणी करताना व्यापाऱ्यांपुढे काय अडचणी येतात, या गोष्टी अधिकाऱ्यांनी सरकारपर्यंत पोहचवायला हव्यात. त्याचप्रमाणे येथील अधिकाऱ्यांनी प्लास्टिकबंदी कशावर आहे, याची माहिती द्यावी असे आवाहन केले.

कारवाईचा अतिरेक करू नका

चेंबरचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांनी व्यापाऱ्यांच्या वतीने भूमिका मांडत आपला संताप व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, प्लास्टिकबंदी करताना व्यापाऱ्यांना व उद्योजकांना विश्वासात घ्यायला हवे होते. वेफर्सच्या पाकिटाला सूट देता, मग साडीच्या प्लास्टिक वापराला का नाही? साडीचे ५० प्रकार आहेत, ते व्यापारी कसे दाखवतील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी रोटी, कपडा और मकानचे उदाहरणही दिले. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये. ब्रिटिशांना जसे हाकलले तशी वेळ तुमच्यावर येऊ नये. ग्राहक नसला तर व्यापार बंद होईल व सरकारला करही मिळणार नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचे पगार कसे होतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

..तर व्यापारी रस्त्यावर उतरतील

व्यापारी संघटनेचे प्रफुल्ल संचेती म्हणाले की, नोटाबंदीचा एक त्रास संपला व दुसरा घाला सरकारने घातला. पर्यावरणाच्या नावाखाली व्यापाऱ्यांची लूट अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. पर्यावरण वाचवायचे असेल तर अगोदर पर्याय द्या. नोटाबंदीने आधीच व्यापारी बेजार झाले असून त्यांची अवस्था वाईट आहे. त्यामुळे जोपर्यंत पर्याय देत नाही, तोपर्यंत कारवाई करू नका, अन्यथा व्यापाऱ्यांचा उद्रेक होईल व ते रस्त्यावर येतील, असे ते म्हणाले.

दोन दिवसांनंतर पुन्हा बैठक

व्यापाऱ्यांचा संताप बघून अधिकाऱ्यांनी कारवाई थांबवावी, कायद्याचे पूर्ण स्पष्टीकरण करावे. याबाबात दोन दिवसांनी पुन्हा बैठक घेऊ व त्यानंतर पुढची दिशा ठरवू असा निर्णय या बैठकीत सर्वांच्या वतीने चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी जाहीर केला.

आज चेंबरची मुंबईत बैठक

प्लास्टिक बंदीमुळे व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या असून, त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी राज्यातील व्यापारी पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर कॉमर्सच्या पुढाकाराने होणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसमोर व्यापारी व उद्योजकांच्या अडचणी मांडून चर्चा करणार असल्याचे चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाणे-भुजबळ भेट

$
0
0

सहाणे-भुजबळ भेट

जेलरोड : नाशिकरोड येथील माजी नगरसेवक शिवाजी सहाणे यांनी सोमवारी (ता.२५) मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. सहाणे यांनी नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश करून विधान परिषद निवडणूक लढविली. मात्र, शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्याकडून त्यांचा धक्कादायक पराभव झाला. नाशिक जिल्ह्यात आपल्याला कुठे मते मिळाली, कुठे धोका झाला याची माहिती सहाणे यांनी भुजबळ यांना दिल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रीन फिल्ड’साठी टेंडर मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या अंगलट आलेल्या ग्रीन फिल्ड लॉन्सप्रकरणी भिंत पुन्हा बांधून द्यावी, असे कोर्टाने आयुक्तांना आदेश दिल्यानंतर १७ लाख ५१ हजार रुपयांच्या टेंडरला मंजुरी देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळताच येत्या काही दिवसांत या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

नाशिक महापालिकेने शहरातील लॉन्सवर धडक कारवाईचा विडा उचलला होता. या कामाची सुरुवात गंगापूर रोडवर असलेल्या ग्रीन फिल्ड लॉन्सपासून होणार होती. मात्र, या लॉन्सचे मालक विक्रांत मते यांनी न्यायालयातून या कारवाईबाबत मनाई हुकूम मिळवला होता. या हुकमाची प्रत महापालिकेच्या कार्यालयात पोहच करण्यात आली होती. मात्र मनाई हुकूम मिळूनही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी भिंत पाडण्याची कारवाई सुरूच ठेवली होती. महापालिकेने भिंत पाडून टाकल्यानंतर, आम्हाला मनाई हुकूम मिळाल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र विक्रांत मते यांनी हा मनाई हुकूम बांधकाम पाडण्याअगोदर महापालिकेत सादर केल्याचा पुरावा न्यायालयात दिला. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर न्यायालयाने ताशेरे ओढले होते. ही पाडलेली भिंत महापालिकेने आपल्या खर्चाने बांधून द्यावी असे आदेश देण्यात आले. त्यामुळे महापालिकेने ही भिंत बांधण्यासाठी टेंडर काढले होते. या कामासाठी एकूण ५ टेंडर आले होते. १९ लाख ५८ हजार रक्कम प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र ठरवलेल्या रकमेपेक्षा १२ टक्के कमी दराने टेंडर मंजूर करण्यात आले आहे. हे टेंडर गडाख असोसिएट्स या कंपनीला देण्यात आले असून, या कामापोटी १७ लाख ५१ हजार रुपये निधी खर्च होणार आहेत.

नागरिकांच्या खिशाला झळ

महापालिकेने केलेल्या कारवाईचा भुर्दंड नाशिकरांच्या खिशातून जाणार असून, हा खर्च दोषी अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगर रस्त्यावर खडीचा ढीग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

उपनगर येथील अप्पू चौक रस्त्याचे काम रखडले असून, या कामासाठी आणलेल्या खडीचा ढीग रस्त्यावर टाकण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून होत आहे. ढिगातील खडी मुख्य रस्त्यावर पसरली असल्याने दुचाकी घसरून अपघातांचा धोका वाढला आहे.

या चौकापासून इच्छामणी गणेश मंदिरापर्यंत सिमेंटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. जुना रस्ता पूर्ण उखडण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता बंदच आहे. त्याच्या कामाबाबत हालचालही दिसत नाही. त्याचे काम अर्धवट आहे. नाशिकला जाण्यासाठी जेलरोडचे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक उपनगरच्या रस्त्याचा वापर करतात. दुसरा मार्ग टाकळीतून जातो. मात्र, उपनगरचा रस्ता जवळचा असल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत वाढ झाली आहे. चौकात जेथे खडी आहे, तेथेच गतिरोधकही आहेत. दोन्हींमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्ताकामासाठी आणलेली खडी आठवडाभरापासून चौकातच पडून आहे. ती मुख्य मार्गावर पसरू लागली असून, रस्ताकाम त्वरित पूर्ण केल्यास खडीचा प्रश्नही मार्गी लागेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

फोटो आहे. (सिंगल)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीचे रणांगण सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल अखेर सोमवारी वाजला. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची करण्याबरोबरच सोमवारपासूनच आचारसंहिता लागू केल्याची घोषणा केली. १ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, ३ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर प्रभाग रचना, त्यानंतर आरक्षण सोडत, दोन वेळा मतदार याद्यांची पडताळणी झाली. निवडणूक जाहीर झाल्याबरोबर अनेक इच्छुकांनी हालचालींना गती दिली.

महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण २० प्रभागातून ७८ सदस्य निवडण्यासाठी १ ऑगस्टला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी एकूण ४ लाख २३ हजार मतदार पात्र ठरले आहेत. यावेळी सैन्यात असणाऱ्यांसाठी मतदानाची संधी देण्याचा निर्णय यंदा प्रथमच निवडणूक आयोगाने घेतला आहे. याचबरोबर आदर्श मतदान केंद्र खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. प्रत्येक उमेदवाराला तीन लाख रुपयांपर्यंतचा खर्च करता येणार आहे.

निवडणूक काळातील आचारसंहितेबाबत सोमवारी निवडणूक आयोगाने व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सूचना दिल्या. निवडणूक तयारीची माहिती घेतल्यानंतर आयोगाने निवडणूक आचारसंहिता लागू करत एकूण निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला, अशी माहिती सांगली महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकारांना दिली.

विद्यमान सभागृहाची मुदत १३ ऑगस्टला संपत आहे. त्याआधी नवे सभागृह अस्तित्वात येणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची घोषणा होत नसल्याने पंधरा दिवसांपासून निवडणूक होणार की प्रशासक येणार, अशा चर्चेने जोर धरला होता. ही चर्चा सुरु असतानाच मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला. यावर हरकती घेताना काही प्रभागातील लोकसंख्येपेक्षाही मतदारांची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या घोळाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका सहा महिने पुढे जातील, अशी अफवाही पसरली. आता रितसर निवडणूक जाहीर झाल्याने महापालिका पदाधिकाऱ्यांची वाहने, मोबाइल आणि इतर सुविधा काढून घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

आयुक्त म्हणाले, 'निवडणूक आयोगाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडणूक तयारीची माहिती घेतली. यावेळी मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी काही नवीन योजना राबवण्याचे ठरवले आहे. सैनिकांना मतदान करता यावे, यासाठी सर्व्हिस वोटर उपक्रम राबवला जाणार आहे. तीनही शहरांतील सर्व म्हणजे ५६४ मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्रे ठरावीत, अशी उपाययोजना राबवली जाणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील समिती असेल.

त्याचबरोबर उमेदवारांना सायबर कॅफेधारकांना उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज भरणे : ४ ते ११ जुलै

छाननी : १२ जुलै

उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत : १७ जुलै

निवडणूक चिन्हांचे वाटप :१८ जुलै

मतदानाचा दिनांक : १ ऑगस्ट

मतमोजणी : ३ ऑगस्ट

...........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संततधारेने समाधान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संततधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरवासी सुखावले आहेत. सोमवारी दिवसभर पावसाने शहरात मुक्काम ठोकल्याने जनजीवन विस्कळीत झाले. बाजारपेठांमधील गर्दीचा ओघही पावसामूळे ओसरला. दिवसभरात शहरात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ९ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात १ ते २५ जून या कालावधीत ८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

रविवारी रात्रीपासून शहराच्या बहुतांश भागात संततधार पावसाला सुरूवात झाली. शहरवासियांची सकाळ उजाडली तीच पावसाच्या दर्शनाने. त्यामुळे अनेक भागात नागरिकांना सोमवारी सूर्यदर्शनही होऊ शकले नाही. कधी भूरभूर तर कधी संततधार पावसामुळे नागरिकांना छत्र्या, रेनकोटसारखी साधने घेऊन घराबाहेर पडणे भाग पडले. सकाळी दहा ते साडेबाराच्या सुमारास शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दुपारी दोननंतर पावसाचा जोर वाढला. संततधार पावसाने नागरिकांना चिंब भिजविले. या पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पावसाची तळी साचल्याने त्यामधून वाहने नेताना नागरिकांची धांदल उडाली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने विद्यार्थी तसेच कामावरून सुटलेल्या नोकरदार वर्गाची धांदल उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत हा जोर कायम राहिला. शहरात कॉलेजरोड, गंगापूर रोड, सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, इंदिरानगरच्या काही भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

पंचवटीत सरींवर सरी

पंचवटी : जून महिन्याअखेर मान्सूनचे खऱ्या अर्थाने आगमन झाले आहे. गेल्या आठवड्यात पडलेल्या वळवाच्या पावसानंतर सोमवारी (दि. २५) सकाळपासून पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या. कधी हलका तर कधी जोरदार पाऊस झाला. यंदा पावसाळी गटारींची साफसफाई व्यवस्थित झालेली नसल्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचत असल्याचे चित्र होते.

पंचवटी परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचू लागले आहे. त्यात औरंगाबाद रोडवर नांदूरनाका परिसर, श्रीसेवा सोसायटी, सेवाकुंज, मखमलाबाद नाका, नवीन शाहीमार्ग, चरणपादुका रोड आदी परिसरात पाणी साचले होते. रिमझिम असला तरी दमदार पाऊस असल्यामुळे पाणी वेगाने वाहून जात नाही. साचलेल्या पाणी उताराच्या मार्गाने वाहत आहे. अनेक ठिकाणी ढापे बुजलेले असल्यामुळे पाणी तुंबत असल्याचे चित्र होते. हे ढापे मोकळे करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून केला जात होता.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. मात्र, मुंबईला पडत असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची मागणी कमी होऊन दरांत घसरण झाली. पावसामुळे सर्वच लिलाव आता सेलहॉलमध्ये घेण्यात येत आहेत. सोमवारच्या दिवसभराच्या पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी होण्याची शक्यता असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

सखल भागांत साचले पाणी

नाशिकरोड : नाशिकरोड परिसरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने शहर परिसरातील सखल भागात पावसाचे पाणी साचून शहराला तलावाचे स्वरुप आले आहे. शहरातील शिवाजी पुतळा, दत्तमंदिर, बिटको चौक, विभागीय आयुक्त कार्यालय रस्ता, उड्डाणपूल, एकलहरे टी पॉइंट, सिन्नर फाटा, हनुमान मंदिर, चेहेडी शिव आदी ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर फाटा येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागील बाजूस पावसाच्या पाण्याचे तळेच निर्माण झाले आहे. या पाण्याचा नैसर्गिक प्रवाहच अडवला गेल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी दरवर्षी साचत असते. नाशिक-पुणे महामार्गावर चेहेडी गाव ते सिन्नर फाटा या दरम्यान ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. चेहेडी जकात नाका, चेहेडी शिव, अस्वले मळा, निसर्ग लॉन्स, सिन्नर फाटा पोलिस चौकी, हनुमान मंदिर, एकलहरे टी पॉइंट या ठिकाणी महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. चेहेडी शिव येथे महामार्गावरील खड्ड्यांमुळे पावसाची संततधार सुरू असताना दुचाकीस्वारांचे अपघातही झाले आहेत.

विजेचा लपंडाव

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील बहुतेक उपनगरांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सोमवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. सोमवारी सायंकाळी चार वाजेपासून खंडित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरळीत झालेला नव्हता. असे असतानाही शहरातील कोणतेही फिडर ब्रेक डाऊन झालेले नसल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

देवळाली जलमय

देवळाली कॅम्प : आद्रा नक्षत्राने देवळालीसह पंचक्रोशीवर चांगलीच कृपादृष्टी केल्याने दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने देवळाली परिसर जलमय झाला आहे. देवळाली भागात परवाच्या दुपारपासून मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहे तर काल पुन्हा दिवसभर चांगलाच भिज पाऊस दिवसभर सुरु होता.दुपारनंतर सुरु झालेल्या या पावसाने शहरातील विविध रस्त्यांवर पाण्याचे तळे निर्माण झालेले पहायला मिळाले.सतत सुरु असलेल्या या पावसामुळे दुपारी दोन व सांयकाळी साडेपाचच्या सुमारास परतणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवून दिली. सोमवारी अनेक दुकाने व लेव्हीट मार्केट बंद असल्याने शहर परिसरातील रस्ते पावसामुळे सुने-सुने होते. देवळाली शहरात प्रवेश करणाऱ्या लामरोड, हौसन रोड, सतीश कॉम्प्लेक्स, मेन स्ट्रीट, आनंद रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले होते. दस्तगीर बाबा रोड, ओमशांती नगर, संसरी लेन या परिसरात पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ओमशांती नगर परिसरात तर थेट पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. यामुळे येथील नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला धारेवर धरत रस्त्यांची अर्धवट स्वरूपाची कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

पावसाने उडविली दाणादाण

सातपूर : शहरात पावसाने संततधार सुरू केल्याने सुखद धक्का दिला. परंतु, चाकरमान्यांची पावसाने चांगलीच दाणादाण उडविली. रात्रीपासून सुरू

असलेल्या पावसाने रस्ते जलमय झाले होते. यात कामावर जाणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्यातून कसरत करून वाहने चालविण्याची वेळ आली.

सातपूर भागातील सर्वच रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहत असल्याने पादचाऱ्यांनाही वाहत्या पाण्यातून बचाव करत प्रवास करावा लागला. पावसाळी पाइपलाइनीत पावसाचे पाणी

वाहून जाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली नसल्याने रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. तसेच पाणी वाहून जाण्यासाठी असलेले

नैसर्गिक नालेच गायब झाल्याने रस्ते जलमय होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातपूर परिसरात उघड्यावर मांसविक्री

$
0
0

(पेज फोटोशेजारी)

सातपूर परिसरात उघड्यावर मांसविक्री

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर परिसरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानांमुळे अस्वच्छता पसरत आहे. श्रमिकनगर भागात जलनगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उघड्यावर मांस फेकले जात असल्याने या रस्त्यावर प्रचंड अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत असल्याचे दिसून येत आहे.

उघड्यावर फेकण्यात येणाऱ्या मांसामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या उघड्यावर मांस फेकलेल्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावरदेखील वाढल्याने नागरिकांना येथून जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेने उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांवर, तसेच उघड्यावर मांस फेकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांसह वाहनचालकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोडवरील त्रिवेणी पार्क येथे शुक्रवारी (दि. २२) रात्री पावणे आठवाजेच्या सुमारास दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत डोक्याला मार लागल्याने अमोल रामभाऊ लेंगुळे (रा. बोराडे मळा, सायट्रिक, जेलरोड) या दुचाकीस्वाराचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

अपघातातील मृत अमोल लेंगुळे शुक्रवारी रात्री सैलानी बाबा चौकाकडून बिटको चौकाकडे जात असताना त्रिवेणी पार्क येथे त्याच्या दुचाकीस (एमएच १५ सीएफ २५८५) सचिन सुरेश शहाणे (रा. श्रीकृष्णनगर, जेलरोड) याच्या दुचाकीची (एमएच १५ सीझेड २९३९) जोरदार धडक झाली. या अपघातात अमोल लेंगुळे याच्या डोक्यास गंभीर इजा झाली. त्यास स्थानिक नागरिकांनी तात्काळ महापालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, बिटको रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमी अमोल यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले. येथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर जखमी अमोल यास त्याच्या नातेवाइकांनी शहरातील खासगी रुग्णालयात हलविले. मात्र औषधोपचारांचा खर्च जास्त असल्याने त्यास पुन्हा सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना जखमी अमोलचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत भारत ज्ञानेश्वर नाईकनव्हरे यांनी सचिन शहाणे याच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंदसरी!

$
0
0

जिल्ह्यात संततधार; बळीराजा सुखावला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार कमबॅक केले असून, सोमवारी दिवसभर संततधार पावसाने नाशिकमध्ये तळ ठोकला. जवळपास सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यांतील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने नद्या आणि धरणांमधील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. नाशिकसह धुळे आणि नंदुरबारमध्ये पुढील २४ तासांत मुंबई हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना पावसाने सोमवारी दिलासा दिला. रविवारी रात्रीपासून अनेक भागात संततधार पावसाला सुरुवात झाली. सोमवारी कधी भूरभूर, उघडीप तर कधी संततधार पावसाचा अनुभव नाशिककरांनी घेतला. शहरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्याने जनजीवनावर विपरीत परिणाम झाला. पावसामुळे ठिकठिकाणी पावसाची तळी साचली. तसेच, बाजारपेठांमधील गर्दी ओसरली होती.

-

बळीराजा सुखावला

पावसाचे पुनरागमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येणार असून, बियाणे खरेदीची लगबग सुरू झाली आहे. इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. दहा तासांत नाशिक (१७.१ मिमी), इगतपुरी (२७ मिमी), त्र्यंबकेश्वर (२५ मिमी), पेठ (३६.५ मिमी) पाऊस झाला. सिन्नर, चांदवड, येवला, बागलाण, कळवण, मालेगाव, देवळा आणि नांदगाव तालुक्यात सोमवारी अवघ्या दोन ते पाच मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

-

मराठवाडा, विदर्भात दोन दिवसांत चांगला पाऊस

मुंबई : मध्य भारतात या आठवड्यात एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने २७ व २८ जूनला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत, तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त मुंढेंबाबत अहवाल मागविला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका प्रभाग क्रमांक १३ ची पोटनिवडणूक आणि नाशिक विधानपरिषदेची आचारसंहिता सुरू असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या 'वॉक विथ कमिशनर' या उपक्रमाबाबत मनसेचे संदीप भवर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीबद्दल आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे.

आयुक्त मुंढे यांनी आचारसंहितेच्या काळात 'वॉक विथ कमिशनर' हा उपक्रम घेऊन आचारसंहिता भंग केल्याची तक्रार भवर यांनी केली होती. त्यावर अभिप्राय सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाचे उपसचिव अ. ना. वळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती संदीप भवर यांनी दिली आहे. त्यामुळे मुंढे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी सुरू असलेल्या मतदानादरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या समर्थकांमध्ये सोमवारी सकाळी हाणामारी झाली. शिवसेनापुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांनी माघार घेतल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांची 'राष्ट्रवादी'चे समर्थक योगेश गांगुर्डे यांच्याशी शाब्दिक वाद झाला. लागलीच त्याचे पर्यवसन हाणामारीत होऊन दराडे आणि बेडसे समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर एकमेकांवर खुर्च्या टाकून पोलिसांसमक्ष तुंबळ हाणामारी केली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत वाद मिटवला.

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी बी. डी. भालेकर शाळेतील पाच मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी व टीडीएफ गट पुरस्कृत संदीप बेडसे आणि शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांच्या समर्थकांना बूथ लावले होते. निवडणूक काळात दराडे यांनी शिक्षकांना पैठण्या वाटल्याचा व पैठणी जाळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ 'राष्ट्रवादी'च्या बेडसे समर्थकांनी व्हायरल केल्याचा आरोप दराडे समर्थकांकडून केला जात होता. त्यामुळे दोन्ही उमेदवारांसह समर्थकांमध्ये अगोरदच तणाव होता. मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी समर्थक योगेश गांगुर्डे यांना जाब विचारण्यासाठी उमेदवार किशोर दराडे यांचे बंधू आमदार नरेंद्र दराडे हे गेले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. किशोर दराडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याचा संदेश नाशिकमध्ये फिरत होता. यावरून आमदार दराडे आणि त्यांच्या समर्थकांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त बेडसे समर्थकही मग हमरीतुमरीवर आले. दोघांच्या समर्थकांमधील एकमेकांना शिव्याची लाखोळी वाहत हाणामारी सुरू केली. राष्ट्रवादी समर्थकाने दराडे समर्थकावर थेट खुर्चीने हल्ला केला. त्यामुळे वाद आणखी चिखळला. आमदार दराडे यांनीही यावेळी बेडसे समर्थकांना मारहाण करण्याचा प्रयत्न करीत शिवीगाळ केली. वातावरण तापल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. बेडसे आणि दराडे समर्थकांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेत, प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे मतदान केंद्रावरील तणाव निवडला. या वादानंतर या केंद्रावरील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली.

दराडेंची शिवराळ भाषा

बेडसे आणि दराडे समर्थकांमध्ये शाब्दिक वाद सुरू असतानाच आमदार नरेंद्र दराडे हे 'राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करीत त्याच्या अंगावर धावून गेले. या संदर्भात झालेल्या चित्रीकरणातही दराडे हे बेडसे समर्थकांना अपशब्द वापरत असल्याचा दावा 'राष्ट्रवादी'च्या समर्थकांनी केला आहे. यासंबंधीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. दराडे यांनी शिवीगाळ केल्यानंतर हा वाद चिघळून थेट हाणामारीपर्यंत गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. दुसरीकडे, हा केवळ कार्यकर्त्यांमधील वाद असल्याचा दावा दराडे यांनी केला आहे.

शिवसेनेची फौज

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये थेट हाणामारी झाल्यानंतर शिवसैनिकांनी या केंद्राकडे धाव घेतली, तर राष्ट्रवादीचेही नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी धावून आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय कंरजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह शिवसेना नगरसेवकांनी या ठिकाणी गर्दी केली. त्यामुळे तणावात अधिकच भर पडली. परंतु, आमदार दराडे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी समंजसपणा स्वीकारत हा वाद मिटवला.

'राष्ट्रवादी'च्या उमेदवारांकडून आमच्या उमेदवाराबाबत चुकीचे संदेश पसरविले जात होते. त्यासंदर्भात आमच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. परंतु, ही लढाई केवळ दोन कार्यकर्त्यांमध्येच होती. परंतु, हा विषय मोठा करण्यात आला. जिल्हा बँक असो वा विधान परिषद निवडणुकीत मला राज्यस्तरावर प्रसिद्धी देऊन मोठे केले जाते. यासंदर्भात आमची कोणताही तक्रार नाही.

- नरेंद्र दराडे, आमदार, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रमी मतदानाने उमेदवारांना धडकी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी नाशिकचा वाद वगळता शांततेत मतदान झाले असून, राजकीय पक्षांच्या सहभागामुळे प्रथमच ९२.३० टक्के एवढे विक्रमी मतदान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक ९५ टक्के, तर नाशिकमध्ये सर्वांत कमी म्हणजे ९१.८० टक्के मतदान झाले. वाढलेल्या मतदानामुळे उमेदवारांना धडकी भरली असून, विक्रमी मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

निवडणुकीत एकूण १६ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत राष्ट्रवादी पुरस्कृत संदीप बेडसे, शिवसेनापुरस्कृत किशोर दराडे, भाजपचे अनिकेत पाटील, 'टीडीएफ'चे भाऊसाहेब कचरू पाटील, अपक्ष प्रतापदादा सोनवणे आणि शालीग्राम भिरुड यांच्यात आहे. राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने उत्कंठा अधिक वाढलेली आहे. पाच जिल्ह्यांमध्ये ९४ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. एकूण ५३ हजार ८९२ मतदारांपैकी ४९ हजार ७४२ मतदारांनी हक्क बजावला. सकाळी पावसाचा जोर असल्याने नाशिकमध्ये संथ मतदान सुरू झाले. परंतु, दुपारनंतर मात्र मतदानाचा जोर वाढला. गेल्या वेळी ८२.३० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे सुमारे १० टक्के मतदान वाढल्याने त्याचा फायदा की तोटा होणार याचे गणिते मांडण्यास उमेदवारांनी सुरुवात केली आहे.

राजकीय नेत्यांची हजेरी

शहरातील महत्त्वाचे केंद्र म्हणून पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी मोठी गर्दी केली होती. आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप यांनी या केंद्रावर हजेरी लावली. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे यांनीही उपस्थित राहून कार्यकर्त्यांना बळ दिले. 'राष्ट्रवादी'चे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनीही हजेरी लावत मारहाणीच्या घडलेल्या प्रकाराची शहानिशा केली. राजकीय नेत्यांच्या हजेरीमुळे पोलिसांचा ताण वाढला. शिवाय वाहतूक व्यवस्थेवरही विपरित परिणाम झाला.

जिल्हाधिकाऱ्यांनी झापले

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बी. डी. भालेकर शाळेतील मतदान केंद्रास भेट दिली. यावेळी एक कर्मचारी त्यांच्यासमोर फोनवर बोलत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी या कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतरही या महाशयांनी आपले बोलणे थांबविले नाही. याचा संबंधित कर्मचाऱ्यास जाब विचारत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मतदानाचा टक्का

जिल्हा झालेले मतदान

नाशिक ९१.८०

जळगाव ९१.८९

अहमदनगर ९२.१४

धुळे ९२.२७

नंदुरबार ९५.०८

सरासरी ९२.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपटाच्या पटकथा उत्तम होतात

$
0
0

दिग्दर्शक राजू फिरके यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'हुंदका' चित्रपटात त्याकाळातील आघाडीची स्टारकास्ट असूनही केवळ पटकथा चांगली नसल्याने शुटिंग थांबवावे लागले. त्यानंतर मी पटकथेचा अभ्यास हाती घेतला आणि त्यातील बारकावे शिकलो. पुढे मात्र माझ्या चित्रपटांच्या पटकथा उत्तम असल्याचे सर्व कलाकार आवर्जून सांगतात, असे प्रतिपादन नाशिक येथील सुप्रसिद्ध पटकथा लेखक, सिनेदिग्दर्शक राजू फिरके यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे आयोजित संवाद सृजनशी या मालिकेतील १२ वे पुष्प फिरके यांनी गुंफले. ते म्हणाले, की 'इन्हे सम्हालिये' या डॉक्युमेंटरीपासून मी वयाच्या १९ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. पहिलीच कलाकृती सर्वांनी उचलून धरल्याने, पुढे सिनेमातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. 'वाहिनी साहेब' या पहिल्या फिचर फिल्मने चांगले यश संपादन केल्यावर, 'हुंदका' नावाची फिल्म सुरू केली. 'गाईड' हा चित्रपट विजयानंद या हरहुन्नरी दिग्दर्शकामुळे खूप गाजला. 'चायना टाउन' सिनेमाची पटकथा आदर्श असून सर्वजण तिचा संदर्भ घेतात, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, कार्यवाह रवींद्र मालुंजकर, कार्यकारणी सदस्य दशरथ लोखंडे व सुरेखा गणोरे, अरुण गिते, राजेश जाधव, रफिक सय्यद, राजेश भालेराव, मंगेश कदम, ललित कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यकारणी सदस्य प्रशांत केंदळे यांनी शाल, स्मृतीचिन्ह, ग्रंथभेट देऊन फिरके यांचा सत्कार केला. मनीषा विसपुते यांनी सूत्रसंचलन केले तर योगिता मिंडे यांनी स्वागत काव्य सादर केले. महेश वाजे यांनी प्रास्ताविक केल्यावर मनोज नाग्पुरेंनी अतिथींचा परिचय करून दिला. रविकिरण औटे यांनी आभार मानले तर अनिल गुरव यांनी पसायदान गायले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यकारणी सदस्य सुदाम सातभाई, शिवाजी म्हस्के, रेखा पाटील, संतोष हुदलीकर, जयंत गायधनी, रमेश औटे, मंगला सातभाई यांनी प्रयत्न केले.

अशी निर्मिती पटकथेची

ऑरसन वालेसचे 'सिंगल शॉट टेक्निक' म्हणजे काय, हे फिरके यांनी रसिकांना समजावून सांगितले. जागतिक स्तरावरील तीन अंकी पटकथा म्हणजे आरंभ-मध्य-शेवट अशा स्वरूपाची असते. पहिला प्लॉट महत्त्वाचा असतो आणि त्याहूनही महत्त्वाचा असतो चेतवणारा प्रसंग. अशातून कथा निर्माण होते, असेही फिरके म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्र्याच्या घरात मिळवले ‘विशाल’ यश

$
0
0

विशाल शेवाळे

VISHAL SHEVALE

९३.८० टक्के

--

bhavesh.brahmankar@timesgroup.com

@BhaveshBMT

--

नाशिक : म्हणतात ना, जिथे लक्ष्मी नांदत नाही तिथे सरस्वतीचा वास असतो. अवघ्या काही चौरस फुटांच्या चार भितींमध्ये राहणाऱ्या शेवाळे कुटुंबीयांच्या ठिकाणी याचा प्रत्यय येतो. उदरनिर्वाहासाठी अहोरात्र सामना चालू असताना शिक्षणाचा मार्ग खडतरच राहणार. पण, विशालने आपल्यातील प्रज्ञेच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. ५०० पैकी ४६९ गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला आहे, पण आता करायचे काय, असा प्रश्न त्याच्यासह कुटुंबीयांना पडला आहे. समाज पाठीशी उभा राहिला, लढ म्हणाला तर कॉम्प्युटर इंजिनीअर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे विशालचे ध्येय आहे.

'घरभाडे पण परवडत नाही, पोरगं हुशार आहे, असे शिक्षक कायम सांगायचे म्हणून दहावीच्या परीक्षेसाठी आम्ही दोनशे रुपये वाढवून दिवसा एका लाइटचं कनेक्शन घेतलं. दिवसरात्र अभ्यास करून पोरानं ९३ टक्के पाडले. पण, आता काय करायचं? कसं होणार त्याचं? शिक्षण कसं करायचं?', विशाल मारोतराव शेवाळे या गुणवंत विद्यार्थ्याची आई राधा या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सांगत होत्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी धुणीभांडी करते, राबराब राबते. साधा चहापण बाहेर कधी पित नाही. विशालची हुशारी पाहूनच जगण्याचं आणि कामाचं बळ येतं. एवढं सारं करूनही पोराचं शिक्षण करू असं वाटत नाही. महागडी फी, कॉलेजचे पैसे, कसं करणार सारं? त्यांच्या या प्रश्नांनी त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष ठळकपणे समोर येतो.

कामटवाडे येथील इंद्रानगरी परिसरात एका चाळीमध्ये पत्र्याच्या खोलीत शेवाळे कुटुंब राहते. घर म्हणजे काय तर केवळ चार भिंती. माणसं चार अन् उत्पन्न केवळ तीन आकडी. विशालचे वडील मारोतराव हे पहाटे पाच वाजता उठून परिसरातील कार आणि अपार्टमेंटच्या स्वच्छतेचे काम करतात. घरी परतायला दुपारचे १२ होतात. त्यानंतर काही हमालीची व इतर कामे करतात. आई आणि वडील दोघांच्या कष्टातून महिन्याकाठी कुटुंबाच्या पदरी काही शेकडा रुपयेच पडतात. त्यात त्यांच्या संसाराची गाडी पुढे चालली आहे.

- इंजिनीअर होण्याचे स्वप्न...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर जणांची यादी जाहीर करणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष केदा आहेर यांनी थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. वारंवार जप्ती आदेश बजावूनही थकबाकी न भरणाऱ्या सातशे बड्या थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. बँकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात टॉप शंभर बड्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात जाहीर केली जाणार आहेत. त्यानंतरही थकबाकी जमा केली नाही तर थेट कायदेशीर कारवाईचा इशारा अध्यक्ष आहेर यांनी दिला आहे.

जिल्हा बँकेची थकबाकी मोठ्या प्रमाणावर असून, मार्चअखेर केवळ मुद्दल ५३५ कोटी आणि व्याज अवघे २६० कोटी वसूल झाले आहे. आजमितीस बँकेची थकबाकी दोन हजार ७६९ कोटींची असल्याने बँक अजूनही आर्थिक अडचणीत आहे.

बँकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर आहेर यांनी कर्जवसुलीसाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश देऊन वसुलीचे प्रयत्न केले होते. त्यात जंगम जप्तीद्वारे थकबाकी झालेली वाहने म्हणजे ट्रॅक्टर, जीप, मोटारसायकल अशा जवळपास १२५ वाहनांच्या जप्तीद्वारे २ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे मुद्दलाची वसुली ही ५३५ कोटींवरून ६९१ कोटींपर्यंत पोहचली होती. तर व्याज २६० कोटींवरून २७० कोटींपर्यंत वसूल झाले आहे. जून २०१८ अखेर जास्तीत जास्त कर्जवसुली होण्यासाठी १ जूनपासून पुन्हा कर्जवसुली मोहीम राबवून व जुन्या तसेच ऐपतदार थकबाकीदारांचे बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना कलम १५६ च्या प्राप्त अधिकारान्वये सहकार नियम १९६१ चे नियम १०७ नुसार जप्ती करून जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ६०० ते ७०० थकबाकीदारांचे स्थावर जप्ती आदेश दैनिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले असून पुढील लिलाव प्रक्रिया पर्यंतच्या कार्यवाहीसाठी आदेश देण्यात आलेले होते. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तसेच सेंट्रल ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही जुने मोठे व ऐपतदार थकबाकीदारांकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आता ७०० पैकी १०० टॉप थकबाकीदारांची नावे थेट वर्तमानतत्रात जाहीर केली जाणार आहेत. वर्तमान पत्रात नावे जाहीर करूनही जर त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर कायद्यातील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आहेर यांनी सांगितले.

वन टाइम सेटलमेंट

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअतंर्गत ज्या शेतकऱ्याकडे मुद्दल व व्याजासह दीड लाखावरील थकीत कर्ज आहे व ज्यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आलेली आहेत, अशा शेतकऱ्यांनी दीड लाखांवरील त्यांच्या हिश्श्याच्या रकमेचा भरणा केल्यानंतर शासनाकडून एकवेळ समझोता योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील २१ हजार ७०० खातेदारांपैकी फक्त ११ हजार खातेदारांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. सदर योजनेची अंतिम मुदत ३० जून २०१८ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेटी बचाओ’चा जागर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

लिंगभेद चाचणी व स्त्रीभ्रूणहत्या या समाजविघातक कृत्यांना आळा बसावा, जनमानसात मुलींच्या जन्माचे महत्त्व पटावे, मुलगा व मुलगी असा भेदभाव समाजात राहू नये, या हेतूने नाशिक डिस्ट्रिक्ट मेडिकल असोसिएशनतर्फे विविध संस्थांच्या सहकार्याने सोमवारी बेटी बचाओ जनजागृती रॅली काढण्यात आली.

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचा संदेश देण्यासाठी या रॅलीत शेकडो डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यांनी दिलेल्या 'बेटी बचाओ'च्या घोषणांनी शहर दुमदुमले. पंचवटीतील स्वामीनारायण मंदिर परिसरातून डॉ. सोनाली मळगावकर, पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे, दीपाली गिते, माधवस्वामी, वासंतीदीदी आदींच्या हस्ते रंगीत फुगे आकाशात सोडून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे रॅलीचा समारोप झाला.

डॉ. नरहरी मळगावकर म्हणाले, की देशात अजूनही स्त्रीचे स्थान दुय्यम आहे. ही विचारसरणी बदलणे गरजेचे आहे. मुलींच्या घटणाऱ्या संख्येचे कालांतराने दुष्परिणाम दिसतील. ते टाळण्यासाठी आतून बदलले पाहिजे. पोलिस आयुक्त डॉ. सिंगल म्हणाले, की मुलगा आणि मुलगी यांच्या भेदभाव करू नका. मुलगी म्हणून अर्भकाला टाकून दिले जाते, त्यावेळी खूप वाईट वाटते. हे होऊ नये म्हणून मेडिकल असोसिएशनने सुरू केलेले काम प्रशंसनीय आहे. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्याम थविल यांनी या कार्यासाठी कृती आराखडा तयार करून हे काम पुढेही चालू ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

सरचिटणीस डॉ. चारुदत्त कुलकर्णी यांनी स्त्रीभ्रूणहत्या व स्त्रीजन्माकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे हे फार मोठे आव्हान आहे. मुलींचा गर्भ वाचविण्यासाठी भविष्यातही एकत्र काम करू, असे सांगितले. रॅलीसाठी हैदराबाद येथून आलेल्या गीता मूर्ती यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. स्वप्निता कुलकर्णी, दर्शन सोनवणे, सुनील परदेशी, सूरज सोनार, डॉ. वैभव जोशी, मंगेश घुगे, चित्रा धनजल यांनी रॅलीचे संयोजन केले. श्याम देशमुख यांनी आभार मानले.

--

...यांनी नोंदविला सहभाग

पंचवटी डेपो, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, एम. जी.रोड या मार्गाने जाऊन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीत मविप्र संस्था, काकासाहेब देवधर स्कूल, संदीप फाऊंडेशन, इस्कॉन, प्रजापिता ब्रह्माकुमारी, भारतीय मानव अधिकार परिषद, भोसला मिलिटरी स्कूल, छत्रपती सेना यांच्यासह विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला. डॉ. नरहरी मळगावकर, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, डॉ. गणेश राख, स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके-आहेर, सुधर्म हॉस्पिटलचे डॉ. मृगराज मुर्तडक, श्रीजी हॉस्पिटलचे डॉ. सचिन तांबे, डॉ. चारुदत्त कुलकर्णी, डॉ. संदीप पाटील आदींच रॅलीत प्रमुख उपस्थिती होती.

(फोटो आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरणतलाव मार्गावरील बहुतांश पथदीप बंदच

$
0
0

तरणतलाव मार्गावरील

बहुतांश पथदीप बंदच

जेलरोड : नाशिकरोड येथील गुरुद्वाराशेजारून तरणतलावाकडे जाणाऱ्या मार्गावरील बहुतांश पथदीप बंद असल्याने सायंकाळनंतर येथे अंधार पसरत आहे. त्यामुळे अपघात, लूटमार, चेन स्नॅचिंगची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या मार्गाने सायंकाळी महिला, युवतींना जाणे अशक्य झाले आहे. येथे समोरून चारचाकी वाहन आले, तर त्याच्या प्रखर प्रकाशझोताने डोळे दीपतात. त्यामुळे अपघात होऊ शकतो. त्यामुळे येथील बंद पथदीप त्वरित सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

--

तपोवनात पुन्हा झोपड्या (फोटो)

पंचवटी : चार दिवसांपूर्वी तपोवनातील झोपड्यांचे अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले होते. येथे करण्यात आलेल्या धडक करावाईत अतिक्रमण केलेल्या झोपड्या येथे राहणाऱ्यांनी काढून घेतल्या होत्या. मात्र, तरीही ते तेथेच थांबून होते. सोमवारी या झोपड्या पूर्ववत उभारण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या परिसराला पुन्हा अवकळा आली असून, महापालिकेच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

--

'मसाप'ची जुलैत सभा

जेलरोड : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) नाशिकरोड शाखेची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २२ जुलै रोजी होणार आहे. चेहेडी जकात नाका येथील म्हस्के लान्स येथे सकाळी अकराला ही सभा होईल. शाखा कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी आणि कार्यवाह रवींद्र मालुंजकर यांनी ही माहिती दिली. शाखेचे उपाध्यक्ष दत्ता गायकवाड अध्यक्षस्थानी राहतील. मागील इतिवृत्त, कार्यवृत्त वाचून संमत करणे, २०१७-१८ या वर्षाचा ताळेबंद आणि उत्पन्न खर्चपत्रक संमती, हिशेब तपासनिसाची नेमणूक, शाखा कार्यालयासाठी निधी संकलऩ आदी विषयांवर चर्चा होईल. सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शाखेने केले आहे.

---

कुत्र्यांची दहशत (फोटो)

सातपूर : कामगारनगरी असलेल्या सातपूर भागात मोकाट कुत्र्यांनी दहशत निर्माण केली आहे. कंपनीत पहिल्या शिफ्टमध्ये कामाला जाताना व रात्रपाळीवरून घरी येताना कामगारांना मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनदेखील समस्या सुटत नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. महापालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

--

जनावरांचा अडथळा (फोटो)

सातपूर : सोमवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळत असतानाच अशोकनगर रस्त्यावरील मोकाट जनावरांच्या मुक्त संचाराने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. अगदी दुभाजकांप्रमाणे एका रांगेत जाणाऱ्या जनावरांमुळे अपघातास आमंत्रण मिळत होते. परिसरात वाढलेली वाहनांची संख्या पाहता महापालिकेने येथे दुभाजक टाकावेत, तसेच गरजेच्या ठिकाणी गतिरोधकही बसवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान एकवरून

$
0
0

विशालचे इंजिनीअर होण्याचे स्वप्न

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विशाल आणि त्याचा लहान भाऊ विष्णू हे दोन्ही त्रिमूर्ती चौकातील पेठे शाळेचे विद्यार्थी. विष्णूही विशालसारखाच हुशार. प्रत्येक वर्षाला वर्गात आणि शाळेत पहिला येतो. दोघांनाही आई-वडिलांचे हाल पाहवत नाहीत. आपण नाही शिकलो तर आपल्या कुटुंबाचे पुढे कसे येणार? आई-वडिलांना चांगले दिवस दाखविण्यासाठी आपण शिकायला हवे, असे विशाल आणि विष्णू सांगतो. परिस्थितीशी झुंज देत विशालचे इंजिनीअर होण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी त्याला आर्थिक मदत हवी आहे.

मूळचे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातले हे कुटुंब गेल्या सहा-सात वर्षांपासून नाशकात राहते. मोलमजुरी करून त्यांचा चरितार्थ चालला आहे. घरातला संसार पाहिला तर तो जेमतेमच. चारही जण कसे तरी घरात राहतात. रोजचा दिवस काढणं असंच काहीसं आव्हान त्यांच्यापुढं आहे. विशालला कॉम्प्युटर इंजिनीअर होऊन आपल्या कुटुंबाला तर सावरायचे आहे पण त्याला समाजसेवाही करायची आहे. आरवायके कॉलेजमध्ये अकरावीला प्रवेश घेण्यास तो इच्छुक आहे. कुटुंबाकडं असलेल्या एकमेव सायकलद्वारे तो पुढील प्रवास करणार आहे. पुढचं शिक्षण महागडं आहे, हे विशालला कळून चुकलं आहे. त्यामुळेच आता दहावीपेक्षा आणखी जास्त अभ्यास करेन पण इंजिनीअर होईनच, असा त्याचा निर्धार आहे. आई-वडिलांनी माझ्याच शिक्षणावर जास्त खर्च केले, तर लहान भाऊ विष्णूचे कसे होणार, हा प्रश्न त्याला सतावतो आहे. त्यामुळेच समाजातील दानशुरांनी विशालच्या शिक्षणासाठी हातभार लावला तर विष्णूचे शिक्षण आई-वडिल करू शकतील. आजवर शिक्षकांनी भरपूर मदत केली. कधी फीसाठी तगादा लावला नाही. शिक्षकांचे ऋण फेडायचे तर चांगले शिकायला हवे. म्हणूनच मला मदत मिळायला हवी, असे सांगताना विशाललाही रडू कोसळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images