Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आडगाव पोलिसाकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आडगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी (दि.२३) मुंबई आग्रा महामार्ग लगत एका हॉटेल समोर सापळा रचला आणि दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली. या दोघांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोविंद शाम पवार (१९, रा. धनगरवाडी, आडगाव शिवार) व मनोज संतोष आराध्ये (२४, रा. शांताई मंगल कार्यालयासमोर, पळसे) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ९ वा मैल परिसरात दुचाकी चोरटे येणार असल्याची माहिती मिळाली. यानुसार मुंबई-आग्रा महामार्ग लगत असलेल्या खालसा पंजाब हॉटेल परिसरात आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे मुनीर काझी, विजयकुमार सूर्यवंशी, विनोद लखन, मनोज खैरे यांच्यासह आदींनी सापळा रचला. रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित दुचाकी चोरटे या भागात आले असता, पोलिसांची चाहूल लागताच पळ काढला. पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. त्यांनी पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या दोघांकडून दोन होंडा शाईन, दोन अॅक्टिव्हा, एक हिरो होंडा सीडी डिलक्स या दुचाकी जप्त करीत सुमारे १ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट मुखत्यारपत्राद्वारे

जमीन मालकाची फसवणूक

पंचवटी : दिंडोरी रोडलगत असलेल्या जमिनीचे बनावट साठेखत व मुखत्यारपत्र तयार करून अहमदाबाद येथे राहणाऱ्या वृद्धाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदाबाद येथील सायन सिटी येथे असलेल्या अवध बंगलोज येथे राहणारे गौतम शांतीलाल मिश्री (वय ६५) हे राहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित किशोर मोहनलाल सुगंध याने एक जून २००८ रोजी मिश्री यांच्या मालकीच्या पंचवटीतील दिंडोरी रोडलगत सिटी सर्व्हे नं. १३२/७/२ मधील ३९८५.५७ चौरस मीटरपैकी १४८५.७८ या क्षेत्राचे बनावट साठेखत व मुखत्यारपत्र तयार केले. त्यावर मिश्री व त्यांच्या नातेवाइकांच्या बनावट सह्या केल्या. संशयिताने यामध्ये मिश्री यांच्या वडिलोपार्जित जमिनीत स्वामित्वदोष निर्माण करून ते बनावट कागदपत्र खरे असल्याचे भासविले. या घटनेतील साक्षीदार हेमराज पाटील यांच्याकडून संशयिताने वीस लाख रुपये घेऊन पुन्हा वीस लाख रुपयांची मागणी करून गौतम मिश्री व हेमराज पाटील यांची फसवणूक केली. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेगर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंद दुकानामध्ये चोरीचा प्रयत्न

$
0
0

नाशिक : वडाळारोडवरील साईनाथनगर परिसरातील बंद दुकानाचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या विशाल उर्फ इंद्या वसंत बंदरे (वडाळा गाव) यास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी प्रकाश कैलास कटारिया यांनी फिर्याद दिली आहे. चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २२) पहाटे उघडकीस आली. इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितास अटक केली. घटनेचा अधिक तपास हवालदार सी.व्ही.माळोदे करीत आहेत.

वाहनचोरी

नाशिक : जनरल वैद्यनगर येथील व्यंकटेश अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये असलेली मोपेड (एमएच १५, एफएक्स ०९९५) चोरट्यांनी हॅण्टल लॉक तोडून हातोहात लंपास केली. ही घटना शुक्रवारी (दि. २२) मध्यरात्री घडली. या प्रकरणी ऐश्वर्या बिरारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा अधिक तपास हवालदार युनूस शेख करीत आहे.

तरुणाचा मृत्यू

नाशिक : चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. संतोष चोखाजी खिल्लारे (रा. राजीवनगर) असे या तरुणाचे नाव आहे. शनिवारी (दि. २३) बेशुद्धावस्थेत पडल्याने संतोषला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास हवालदार एल. बी. भामरे करीत आहेत.

पैसे न दिल्याने मारहाण

नाशिक : मद्य पिण्यासाठी पैसे न दिल्याने रोहित काळे आणि त्याच्या जोडीदाराने शरद शिवाजी गवळी (२६, रा. अरिंगळे मळा, सिन्नर फाटा) या तरुणास मारहाण केली. ही घटना मुक्तिधाम मंदिराच्या मेनगेटसमोर मंगळवारी (दि. १९) रात्री आठ वाजता झाली. आरोपी आणि फिर्यादी ओळखीचे आहेत. संशयिताने पैसे देण्यास नकार देणाऱ्या गवळीच्या डोक्यात काचेची बॉटल फोडून मारहाण केली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

रेल्वे स्टेशनजवळ वाहनचोरी

नाशिक : सिन्नर येथील भाटवाडी येथे राहणाऱ्या सुजित महाले (३२) याने नाशिकरोड रेल्वे स्टेशन जवळील भगत हॉटेल जवळ पार्क केलेली दुचाकी (एमएच १५, सीडब्लू ४७०९) चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना ८ ते ९ जून या दरम्यान घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनेचा अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पावसाची रिपरिप

$
0
0

कुठे सामसूम तर कुठे रिमझिमने दिलासा

टीम मटा

जिल्ह्यात पावसाने रविवारीही काही ठिकाणी हजेरी लावली तर काही ठिकाणी उघडिप दिल्याची परिस्थिती होती. जिल्ह्यात इगतपुरी, घोटी परिसरासह त्र‌यंबकेश्वर, येवला येथे पावसाने हजेरी लावली. तर सटाणा, कळवण, मालेगाव तालुक्यात विश्रांती घेतली होती.

इगतपुरीत बळीराजा सुखावला

घोटी : घोटी, इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दडून बसलेल्या पावसाला रविवारी (दि. २४) दुपारपासून सुरुवात झाली. हा पाऊस दमदार नसला तरी रिपरिप असल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचा भाग समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात पावसाने काही अंशी दडी मारली होती. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी शेतात भाताची पेरणी केल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा होती. त्यामुळे या पावसाने शेतकऱ्यांनाही दिलासा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस होत होता. तर इगतपुरी तालुक्याकडे मात्र वरुणराजाने पाठ फिरवली होती. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसत असल्याने पावसाची चिन्हे जाणवत होती. अखेर दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरू झाल्याने बळीराजा काही अंशी सुखावला.

त्र्यंबकला पर्यटक भिजले

त्र्यंबकेश्वर : येथे पावसाची रिपरिप सुरू झाली असून, रविवारी (दि. २४) पर्यटनास आलेल्या भाविकांमुळे शहर फुलले होते. त्र्यंबकेश्वरला दुपारनंतर पावसाचे आगमन झाले. दरम्यान, या पावसाने मंदिराच्या पूर्वदरवाजास असलेला कापडी मंडप पडला आहे. त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणे उत्तर दरवाजाने प्रवेश देण्यात येत आहे. मंदिरासमोरील रस्त्यावर भाविक त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी या पावसात भिजत असल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. मंदिर प्रांगणात आल्यानंतर मात्र दर्शनबारीत भाविकांना पावसापासून निवारा मिळत आहे. पाऊस सुरू होताच पहिणे बारीतील सौंदर्य बहरास आले असून, शनिवार, रविवार पर्यटकांची पाऊले वळली आहेत. त्यामुळे या मार्गावर परिसरातील आदिवासी बांधवांनी पर्यटकांना खाद्यपदार्थ पुरविण्यासाठी झाडांच्या पानांपासून साकारलेले शेड तयार केले आहेत.

येवल्यात शिडकावा

येवला : मृग नक्षत्राने बराच काळ दगा दिल्यानंतर त्यापाठोपाठ हत्ती वाहन घेऊन दोन दिवसांपूर्वी प्रवेशकर्ते झालेल्या आर्द्राने जोरदार सलामी दिली आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने शनिवारी आणि रविवारी रिपरिप सुरूच ठेवली होती. या आर्द्राच्या पर्जन्यधारा खरीप हंगामासाठी आसुसलेल्या बळीराजासह सर्वांनाच दिलासा देणाऱ्या आहेत. रविवारी अधूनमधून ढगांचा गडगडाट होताना दुपारनंतर येवला शहर व तालुक्यात पावसाने शिडकावा केला. येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातील अंदरसूल, मुखेड, पाटोदा परिसरासह सर्वदूर या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळताना रखडलेले खरिपाचे चक्र वेगाने पुढे सरकण्यास मदत होणार आहे. तसेच ओस पडलेली बि-बियाण्यांची दुकाने पुन्हा गजबजू लागली. मृगाने अंतिम पर्वातील गेल्या तीन दिवसांत मोठा दिलासा देताना येवला तालुक्यात पर्जन्यधारा बरसल्या. तीन दिवसांच्या या वरुणकृपेने तालुक्यातील शेतकऱ्यांची पावले येवला शहर व तालुक्यातील विविध ठिकाणच्या बि-बियाणे व रासायनिक खते विक्रीच्या दुकानांकडे वळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी संभ्रमात

$
0
0

विद्यार्थ्यांचे नुकसानीस कॉलेज जबाबदार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या प्रवेशाचा माहोल सुरू आहे. फार्मसीसारख्या विद्याशाखांना सध्या सुगीचे दिवस असल्याने अनेक कॉलेजांचे प्रस्तावदेखील शासन दरबारी पडून आहेत. या शाखेकडे काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहता प्रवेश क्षमता वाढविण्याची मागणी होत होती. यानुसार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रम आदींच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्यास मान्यता दिली आहे. मात्र ही मान्यता देताना विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी कॉलेजांसाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता असल्याची अट बंधनकारक करण्यात आली आहे. मान्यतेशिवाय विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास महाविद्यालयांची जबाबदारी असणार याचा अर्थ शिक्षण विभागाने हात झटकले, असा होत असल्याने विभागाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पालक अन् विद्यार्थीही संभ्रमात पडले आहेत.

राज्यात फार्मसीच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमांची प्रक्रिया सुरू झाली असतानाही अनेक कॉलेजांच्या हाती अद्यापही कौन्सिलची मान्यता मिळालेली नाही. परिणामी, मान्यता नसलेले हे कॉलेज प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा उलट परिणाम विद्यार्थ्यांवर होऊन त्यांच्या प्रवेशाचा खोळंबा होऊ नये, यासाठी कौन्सिलची मान्यता नसलेल्या कॉलेजांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एक पर्याय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने खुला करून दिला आहे. या पर्यायाच्या आधारावर प्रवेशाचा जुगार आता फार्मसीच्या पदवी, पदविका आणि पदव्युत्तर स्तरावर मान्यता नसलेल्या कॉलेजांनाही खेळता येणार आहे.

बोगस कॉलेजेसचा धोका

विद्यार्थी व पालकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेकदा कौन्सिलच्या मान्यतेशिवाय प्रवेश देणारी बोगस कॉलेजेसही या प्रक्रियेत डोके वर काढण्याचा मोठा धोका आहे. यासाठी कौन्सिल व संबंधित वरिष्ठ संस्थांनी निश्चित केलेले निकष तपासल्याशिवाय प्रवेश घेऊ नयेत, असेही आवाहन वेळोवेळी शिक्षण विभागाकडून करण्यात येते. यंदा मात्र प्रवेश क्षमता वाढविणे अन् कौन्सिकडून विलंबाने प्रतिसाद असल्यामुळे हमीपत्राचा निर्णय घेत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने म्हटले आहे.

...म्हणून ठेवला पर्याय

नाशिक विभागात कौन्सिलची मान्यता नसणाऱ्या कॉलेजांचा तपशील माहिती करण्यासाठी तंत्रशिक्षण संचलनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याबाबतचा अध्यादेश नवीन असल्याने संबंधित कॉलेजांची आकडेवारी व इतर तपशील तातडीने उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. अध्यादेश जाहीर होण्यापाठोपाठ शनिवार व रविवार आल्याने हा तपशील मिळविण्यास उशीर लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने मान्यतेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कॉलेजांसाठी कौन्सिलची मान्यता मिळण्यास विलंब लागतो, तर दुसरीकडे यंदा प्रवेशक्षमता वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे हमीपत्राचा पर्याय कॉलेजांसाठी उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरात-केंद्रासोबत करार करू नये

$
0
0

पाणीप्रश्नी भुजबळांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील दमणगंगा व नार-पार खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातील संपूर्ण पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क अबाधित राहण्यासाठी पार-तापी-नर्मदा या नदीजोड प्रकल्पास महाराष्ट्राची असहमती असल्याबाबत कळवून या प्रकल्पाबाबत गुजरात सरकार व केंद्र सरकारशी करार करू नये, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

नार, पार, औरंगा, अंबिका या खोऱ्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडील गिरणा उपखोऱ्यात वळविण्यासाठी नार-पार-गिरणा उपसा जोड योजना राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने ६ एप्रिल रोजी घेतला. मात्र, तो तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण आहे. नार-पार-औरंगा-अंबिका खोऱ्यामध्ये ३७ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. नार-पार-गिरणा उपसा जोड योजनेद्वारे ३६२.६२ दलघमी (१२.८० टीएमसी) पाणी गिरणा उपखोऱ्यात वळवले जाईल. उर्वरित २४.२० टीएमसी गुजरातमध्ये वापरण्याचे नियोजन असल्याचे अहवालावरून दिसून येते.

पार-तापी-नर्मदा प्रकल्पाचा महाराष्ट्राला फायदा नाही. गुजरातची सिंचन क्षमता ४५ टक्के तर महाराष्ट्राची सिंचन क्षमता २२ टक्के आहे. त्यातही गोदावरी व गिरणा खोऱ्यातील सिंचन क्षमता ही सुमारे १३ टक्केच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विपुलतेच्या खोऱ्यातून तुटीच्या खोऱ्यात पाणी वळविण्यासाठी नदी जोड योजना करण्याऐवजी अतिरिक्त सिंचन क्षमता असलेल्या गुजरातसाठी पाणी वळविणे अन्यायकारक असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

गोदावरी व गिरणा हे अतितुटीचे खोरे आहे. या खोऱ्यांमधील तूट भरून काढण्यासाठी अभिकरणाने विपुलतेच्या खोऱ्यातून पाणी आणण्यासाठी योजना तयार करण्याची गरज आहे. मात्र, गुजरातच्या हिताच्या योजना केल्या जात आो. नार-गिरणा लिंकचा १२.६० टीएमसीचा डीपीआर 'डब्ल्यूएपीसीओएस' या संस्थेस बनवण्यास दिला आहे. त्यातही चणकापूर धरणापासून थेट पाइपलाइनने उजवा व डावा कालवा काढल्यास कसमादे-नांदगाव-चाळीसगाव-पारोळा-जामनेर तालुक्यास त्याचा लाभ होईल. तरी, त्याबाबत सरकारने आदेश द्यावा, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.

पाण्यावरील हक्क सोडू नका

केवळ ३०० मीटर उंचीपर्यंतच्या नदी जोड योजना आर्थिक व्यवहार्यतेच्या निकषात बसत नाही म्हणून राज्याच्या पाण्यावरचा हक्क सोडण्यात येऊ नये. दमणगंगा व नार-पार खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क अबाधित राहण्यासाठी पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पास महाराष्ट्राची असहमती असल्याबाबत कळवून या प्रकल्पाबाबत गुजरात सरकार व केंद्र सरकारशी कोणताही करार करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रामा सेंटर शोभेपुरते!

$
0
0

अपुऱ्या सुविधा-डॉक्टरांचा वणवा; अपघातातील जखमींची परवड

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : शहर आणि जिल्ह्यात रस्ते अपघातात किमान एक हजार व्यक्ती मृत्युमुखी पडतात. जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचे मजबूत जाळे पसरले असून, रस्ते अपघातात वेळीच वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षणीय ठरते. यामुळे जिल्ह्यात चांदवडसह चार ठिकाणी ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात आले. न्युरोसर्जनसह इतर तज्ज्ञ डॉक्टर आणि सुविधांअभावी हे ट्रामा सेंटर शोभेची वास्तू ठरतात. शिरवाडे-वणी येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमींना सिव्हीलसह खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याने ही बाब अधोरेखीत झाली.

अपघातातील जखमींना वेळेवर उपचार मिळाल्यास जीव वाचण्याची शक्यता वाढीस लागते. यासाठी आरोग्य विभागाने हायवेलगत आणि अपघात प्रणव क्षेत्रांमध्ये ट्रामा सेंटर उभे करण्यास सुरुवात केली. नाशिकमध्ये सिव्हिल हॉस्पिटल, मालेगाव, चांदवड, सटाणा, इगतपुरी अशा पाच ठिकाणी ट्रामा सेंटर असून, सिन्नरला लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. शिरवाडे-वणी येथे झालेल्या अपघातात सहा व्यक्ती जागेवरच मृत्युमुखी पडल्या होत्या. उर्वरीत जखमींपैकी काहींना नजिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये तर उर्वरित एका बालिकेसह दोन महिलांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातील १२ वर्षांच्या मुलीसह एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. वास्तविक चांदवड येथे ट्रामा केअर सेंटर असताना जखमींना इतर ठिकाणी हलवण्याची गरज का भासते, असा प्रश्न समोर येतो. चांदवडच नाही तर इतर सर्व ट्रामा केअरमधील सुविधांबाबत हीच ओरड असून, पूर्ण क्षमतेने ट्रामा केअर सुरूच होणार नसतील तर फक्त इमारती उभारण्याचा काय फायदा असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होतो. ट्रामा केअर सेंटरमध्ये किमान चार ते पाच तज्ज्ञ डॉक्टर आणि २० पेक्षा अधिक सहायक कर्मचाऱ्यांची गरज असते. अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री देखील आवश्यक आहे. मात्र, हे निकष पूर्ण होत नाही. अपघातानंतर जखमींना थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात येते.

'१०८'वर निर्णयाची धुरा!

शहरापासून दूरवर झालेल्या अपघातग्रस्तांना दोन ते तीन तासांनी उपचार मिळतो. काही दिवसांपूर्वी चांदवड तालुक्यातच एक मोठा अपघात झाला होता. यातील सात ते आठ जखमींना सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. चांदवड ट्रामा सेंटरमध्ये डॉक्टर नसल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे १०८ सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्याने स्पष्ट केले.

न्युरोसर्जनची प्रतीक्षा

आरोग्य उपसंचालक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले, की नाशिक तसेच मालेगाव ट्रामा सेंटरसाठी दोन न्युरो सर्जनची पदे मंजूर आहेत. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे न्युरो सर्जन उपलब्ध होत नाही. या जागा भरण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी, की १०८ ची सेवा गतिमान असून, शक्य तितक्या पेशंट्सला सर्व सुविधा असलेल्या ठिकाणी दाखल करण्याकडे लक्ष दिले जाते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इतर महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध असल्याने कमीत कमी वेळेत जखमींना येथे आणण्यात येते.

लोगो : मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघमारे खूनप्रकरणाचा मुंबईच्या दिशेने तपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

संत कबीरनगर येथे जागेच्या झालेल्या वादातून राजू वाघमारे यांचा मारहाणीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी संशियतांचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी मुंबईच्या दिशेने तपास सुरू केला आहे.

वाघमारे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांनी मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत गंगापूर पोलिस स्टेशन बाहेर धरणे आंदोलन केले होते. खुनाच्या गुन्हातील दोषींना अटक करण्याची मागणी करीत वाघमारे कुटुंब व त्यांच्या सहकार्यांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. याबाबत तपासी अधिकारी बी. वाय. बुऱ्हाडे यांना विचारले असता त्यांनी वाघमारे खून प्रकणात तपासासाठी पथके तयार केल्याचे सांगितले. तसेच पोलिसांचा तपास मुंबईच्या दिशेने सुरू असून लवकरच आरोपींना बेड्या ठोकल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाघमारे खून प्रकरणात संशयित संजय लक्ष्मण खरात, कल्पेश संजय खरात, सुंदर लक्ष्मण खरात (रा. संत कबीरनगर) तसेच प्रशांत सुंदर खरात, त्यांचा मुलगा व त्यांच्या समवेत असलेले तीन ते चार एमआयडीसीतील अंबड गरवारे पॉइंट, गौतमनगर येथे आहेत.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्तेवर अंकुश; विनयभंगाच्या गुन्ह्यात वाढ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जबरी चोरीचे गुन्हे वगळता इतर गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मात्र फसवणूक आणि विनयभंगासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसते आहे.

गेल्यावर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यांत विनयभंगाच्या ४८ तक्रारी समोर आल्या होत्या. यंदा मात्र याच कालावधीत हा आकडा ८६ इतका झाला आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांची आकडेवारीदेखील अनुक्रमे ७५ आणि १११ इतकी आहे. दरम्यान, घरफोडी, वाहनचोरी, चेन स्नॅचिंग, चोऱ्या यासारख्या मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश मिळालेले दिसते. याबाबत बोलताना क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले, की विनयभंगाच्या तक्रारींची लागलीच दखल घेतली जाते. बहुतांश गुन्ह्यांमध्ये अल्पवयीनांचा समावेश असतो. शेजारी राहणारे वा शाळा कॉलेजमध्ये असलेले ओळखीचे या गुन्ह्यातील आरोपी असतात. सोशल मीडिया अथवा इतर भौतिकवस्तूंचा प्रभाव समाजावर पडत असून, त्याचे प्रतिबिंब अशा गुन्ह्यांच्या वाढीतून दिसते आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांचा विचार करता जमिनींच्या खरेदी-विक्रीत होणारे गुन्हे सर्वांत जास्त दिसतात. यापूर्वी अशा गुन्ह्यांची नोंद होत नव्हती. प्रकरण थेट कोर्टात पोहचत होते. आता गुन्हे दाखल होतात. यामुळे फसवणूक करणाऱ्यांना चाप लावणे हा उद्देश असून, त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार असल्याचे नखाते यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मालमत्तेच्या गुन्ह्यांवर अंकुश निर्माण होण्याच्या कारणांबाबत बोलताना नखाते यांनी सांगितले, की या वर्षी क्राईम ब्रँचसह पोलिस स्टेशन पातळीवर गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करण्यात आला. अगदी दिल्लीसह कल्याण, श्रीरामपूर येथील इराणी टोळ्या जेरबंद झाल्या. गुन्हा केल्यानंतर क्राईम ब्रँच पकडतेच, असा संदेश सराईत गुन्हेगारांमध्ये पसरला असून, त्यामुळे ते दूर राहतात. स्थानिक किंवा परजिल्ह्यातील गुन्हेगार छोठे मोठे गुन्हे अधूनमधून करतात. विशेषत: हातातील मोबाइल खेचण्याचे प्रकार होत असून, त्यांच्यावर देखील कारवाई होईल, असे नखाते यांनी स्पष्ट केले.

--

गुन्हा २०१७ २०१८

दाखल-उघड दाखल-उघड

इतर जबरीचोरी ४०-१८ ५२-३५

चेन स्नॅचिंग ४७-९ ३७-१५

दिवसा घरफोडी २८-४ २०-६

रात्र घरफोडी ९९-१५ ८५-१९

इतर चोऱ्या १८०-३० १४४-५४

वाहनचोरी २३५-४० २१३-३६

फसवणूक ७५-५७ १११-८२

विनयभंग ४८-४५ ८६-८३

(आकडेवारी जानेवारी ते मे या महिन्यातील)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्यांच्या पश्चात उरली दृष्टी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागात बंबचालक म्हणून कार्यरत असलेल्या जगन्नाथ रामभाऊ पोटिंदे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मात्र, यातून सावरत कुटुंबियांनी सामाजिक भान जपत त्यांचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून त्यांचे डोळे इतरांना दृष्टी देणार आहेत.

नाशिक महापालिकेच्या शिंगाडा तलाव येथे जगन्नाथ पोटिंदे हे बंबचालक म्हणून कार्यरत होते. शहरात लागलेल्या अनेक आगींमध्ये व दुर्घटनांमध्ये त्यांनी प्राणांची बाजी लावून कामगिरी बजावली होती. बंबचालक असूनही ते सातत्याने आग विझविण्याच्या कामात सक्रिय असायचे. शुक्रवारी शिंगाडा तलाव येथे सकाळी ८ वाजता कामावर आले. संध्याकाळी चहा पिऊन आल्यानंतर ते दूरध्वनी कक्षात काम करीत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. अचानक त्यांच्या छातीत कळ आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी खासगी दवाखान्यात नेले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे हृदय निकामी झाले होते. परंतु, डोळे चांगले होते. येथे उपस्थित त्यांच्या सहकाऱ्यांनी ही बाब त्यांच्या नातेवाईकांना बोलून दाखवली. त्यांच्या नातेवाईकांनीही नेत्रदानाला लगेच होकार दिला. शहरातील एका नेत्रपेढीच्या तज्ञांना पाचारण करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या नेत्रांचे रविवारी एक रुग्णावर रोपण करण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांनी दाखवलेल्या दानशूरतेमुळे एका अंध व्यक्तीला दृष्टी मिळाली आहे. मृत्यूनंतरही त्यांच्या स्मृती नेत्ररुपाने आपल्यात असल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी बोलून दाखवली. गेल्या २८ वर्षांपासून कार्यरत असणारे पोटिंदे अत्यंत मनमिळावू म्हणून परिचीत होते. आग लागल्याची खबर मिळताच क्षणाचाही विलंब न करता त्यांची धावून जाण्याची प्रवृत्ती सर्वांना परिचित होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाण तालुक्यास ‘जलयुक्त’साठी निधी द्यावा

$
0
0

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सोनवणे यांचे अर्थमंत्र्यांना निवेदन

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यात यंदाच्या आर्थिक वर्षात तब्बल २८ गावांचा जलयुक्त शिवार योजनेत नव्याने समावेश करण्यात आल्यामुळे या गावांना जलसंजीवनीची मात्रा मिळणार आहे. तरी या कामांसाठी शासनाकडून भरीव निधीची प्रतीक्षा कायम आहे.

या अंतर्गत वनविकास व जलसंधारणाच्या कामांसाठी भरीव निधी मिळावा या मागणीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी निवेदन सादर करून याबाबतच्या निधीची मागणी केली आहे.

राज्य सरकारने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. या योजनेत जलसंधारण अंतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनांद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. गेल्या आर्थिक वर्षात बागलाण मधील एकवीस गावांचा या योजनेत समावेश होता. यंदाही बागलाणच्या सर्वाधिक २८ गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी कृती आराखडा तयार केला आहे. त्यामुळे या सर्व गावांना जलसंजीवनी मिळणार असली तरी या कामांना भरीव निधीची प्रतीक्षा आहे. अशावेळी या गावांना भरीव निधी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी नुकतेच अर्थ मंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांना भेटून तालुक्यातील गावांना जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात, बागलाण हा आदिवासी बहुल तालुका असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. त्याच्या विकासासाठी वाहून जाणारे पाणी अडवून दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून भरीव निधी मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाला खंडणीसाठी आई-वडिलांकडून धमकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असलेल्या मुलास त्याच्या वडिलांसह दोन मामांनी दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद नाशिकरोड कोर्टाच्या आदेशानुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

संजय सुदाम जाधव ( वय ५४, रा. लोखंडे मळा, जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वडील सुदाम सखाराम जाधव (वय ७४), संगिता आनंदा उन्हवणे उर्फ संगिता सुदाम जाधव (वय ४६, दोघेही रा. शिंदेगाव), दिलीप आनंदा उन्हवणे (वय ४२) आणि काळू आनंदा उन्हवणे (वय ३०, दोघेही रा. वडनेर गेट) या चौघा जणांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संजय जाधव यांची शिंदे गावात जमीन व घर आहे. या मालमत्तेवरून त्यांच्यात आणि आई-वडीलांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नाशिकरोडच्या शिवाजी पुतळा येथे उड्डाणपुलाखाली अडवून वडील सुदाम सखाराम जाधव, मामा दिलीप उन्हवणे आणि काळू उन्हवणे या तिघांनी दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यास नकार दिल्याने त्या तिघांनी ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर जाधव यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. परंतु, असाच प्रकार सप्टेंबरमध्ये शिंदे गावात घडला. त्यामुळे फिर्यादीने शहर पोलिस आयुक्तांसह नाशिकरोड पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर ऑक्टोबरमध्येही जाधव यांना तिघांनी घरात मारहाण केली. मानसिक त्रास देणे, खंडणी मागणे, ठार मारण्याची धमकी देणे या प्रकारांनंतर जाधव यांनी तक्रार दिल्यानंतरही पोलिस कडक कारवाई करीत नसल्याचा आरोप करून थेट नाशिकरोड कोर्टात धाव घेतली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात वरील संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

..

चुलत भावाकडून मारहाण

नाशिकरोड : मागील भांडणाच्या कारणावरून चुलत भावाने दुसऱ्या भावास फावड्याच्या प्लास्टिक दांड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना पळसे येथील कारखाना रोडवरील बेद मळा परिसरात शनिवारी (दि. २३) सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली. या मारहाणीत प्रदीप बाळू गायधनी (वय ३०) जखमी झाला. त्याच्यावर महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी प्रदीपच्या जबाबानुसार, नाशिकरोड पोलिसांनी त्याला मारहाण करणाऱ्या सुनील होणाजी गायधनी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीत वापरलेला फावड्याचा प्लास्टिकचा दांडाही पोलिसांनी जप्त केला आहे.

..

छेडप्रकरणी दोघांवर गुन्हा

सिडको : कामटवाडे, वृंदावननगर भागातील अल्पवयीन मुलीच्या छेडछाड करण्यासह तोंड दाबून ब्लेडने वार केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात दोघा अल्पवयीन मुलांवर पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, वृंदावननगरमधील अल्पवयीन मुलगी किराणा दुकानात जात असताना चार अल्पवयीन मुलांपैकी दोघा जणांनी तिला बळजबरीने काहीतरी खाण्यास दिले. त्यानंतर एकाने तिच्या मानेवर ब्लेडने वार केला. पोलिसांनी या प्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. यातील एक मुलगा व पीडिता एकाच शाळेत शिकत असल्याचेही समोर आले आहे. पोलिस उपनिरीक्षक रुपाली खांडवी पुढील तपास करीत आहेत.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना खेळातून शिक्षणाचे धडे

$
0
0

अल्का सिंग यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खेळातून स्वच्छता व शिक्षणाचे धडे दिल्यासे मुलांचा बौद्धिक विकास घडतो, त्यांचे मन प्रसन्न राहते, अभ्यासात मन लागते, त्यांच्यात नेहमी उत्साह असतो, असा मंत्र रोटरी क्लब ग्रेप सिटीच्या प्रेसिडेंट अल्का सिंग यांनी दिला.

रोटरी क्लब ग्रेप सिटी नाशिक यांच्यातर्फे मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यामंदिरामधील विद्यार्थ्यांना सफाई सापशिडीचे नुकतेच वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून क्लबच्या डायरेक्टर नेहा गायकवाड उपस्थित होत्या. 'करील मनोरंजन जो मुलाचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे' या प्रमाणे रोटरी क्लब ग्रेप सिटी नाशिक यांच्या माध्यमातून सफाई सापशिडीच्या माध्यमातून वैयाक्तिक, शारीरिक व परिसराची स्वच्छता कशी ठेवावी, याची माहिती खेळातून दिली जात आहे, असे अल्का सिंग यांनी यावेळी सांगितले.

मुले हे देवाघरची फुले असतात, त्यांना आनंदी बघितले की आम्हाला आनंद होतो. मुले आनंदी राहण्यातच आम्हाला समाधान आहे, असे नेहा गायकवाड यांनी मत व्यक्त केले. यावेळी इयत्ता दुसरी ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना सफाई सापशिडीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास रोटरी क्लब ग्रेप सिटीच्या डायरेक्टर अचमा अलू, प्राचार्य अमोल कदम आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनील शेवाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रकाश खैरनार यांनी सूत्रसंचालन केले तर मोहन माळी यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगिता महाजन, विद्या महाजन, जयश्री पवार, प्रशांत गवळी, नीलिमा पडोळ, लक्ष्मण काशीद यांनी योगदान दिले. नियोजन सांस्कृतिक प्रमुख वैशाली राजभोज यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभराच्या बाँडवर फार्मसीत प्रवेशाचा जुगार

$
0
0

मान्यतेच्या प्रतीक्षेतील कॉलेजांना मुभा; प्रवेश देण्यास परवानगी

jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : jitendra.tarte@MT

- बोगस कॉलेजांचा धोका

- न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास संस्था जबाबदा

- शिक्षण विभागाची दुटप्पी भूमिका

नाशिक : व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना चारदा कॉलेजची मान्यता व तत्सम निकष पडताळून बघा, असे आवाहन करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने फार्मसी कॉलेजेसच्या बाबतीत मात्र घूमजाव केले आहे. ज्या फार्मसी कॉलेजांना अद्याप फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता नाही त्यांच्यासाठी शंभर रुपयांच्या बाँडचा पर्याय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने खुला करून दिला आहे. मात्र, प्रवेशप्रक्रियेत राहण्यासाठी या कॉलेजांना स्टॅम्प पेपरद्वारे भविष्यात मान्यता न मिळाल्यास याप्रश्नी संस्था स्वत:च जबाबदार असल्याचे लिहून घेतले जाणार आहे.

नव्या शासन निर्णयानुसार कौन्सिलची मान्यता नसणाऱ्या फार्मसीच्या कॉलेजांना १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र सादर करावे लागणार आहे. हमीपत्र सादर केल्यापासून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांची मान्यता सहा महिन्यांच्या आत घेण्याचे लिहून द्यायचे आहे. हमीपत्र सादर करून मग ही कॉलेज प्रवेश करू शकतील. पण, भविष्यात या मान्यतेअभावी काही न्यायालयीन प्रकरण उद्भविल्यास या प्रकरणी संबंधित संस्था पूर्णत: जबाबदार राहील, असा आशय या हमीपत्रात कॉलेजांनी सादर करायचा आहे. यापूर्वीच्या शैक्षणिक वर्षांपर्यंत शासन मान्यता दिलेल्या व अद्याप फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता न मिळविलेल्या संस्थांनाही लागू असणार आहे. संबंधित संस्थांनी दिलेल्या मुदतीत कौन्सिलची मान्यता न मिळविल्यास त्या संस्थेत पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश दिले जाऊ नयेत, असेही या आदेशात म्हटले आहे.

- विद्यार्थी संभ्रमात...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेरा स्कूलबसवर कारवाई

$
0
0

मालेगाव विभागात आरटीओची विशेष तपासणी मोहीम

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, मालेगाव शहरासह विभागात अनेक शाळांच्या स्कूलबसेसने विद्यार्थ्यांची ने-आण केली जात आहे. मात्र, या बसेस विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियमांची पूर्तता करीत आहेत का, हा मोठा प्रश्न आहे. अशाच नियमांची पूर्तता न करणाऱ्या एकूण १३ बसेसवर मालेगावचे उपविभागीय परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने कारवाई केल्याची माहिती अधिकारी किरण बिडकर यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

येथील आरटीओ कार्यालयाकडून स्कूलबस धारकांनी स्कूलबसची तपासणी करून घेत नियमांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मालेगावसह विभागातील २४५ पैकी १६७ स्कूलबसेसने तपासणी करून घेतली होती. त्यानंतर वायूवेग पथकाकडून गेल्या दोन दिवसांमध्ये स्कूल बसेस विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीत २५ हून अधिक बसेस तपासण्यात आल्या. त्यात मालेगाव विभागातील देवळा व सटाणा तालुक्यातील एकूण १३ स्कूलबसेसकडून नियमांची पूर्तता करण्यात आली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या सर्व तेरा बसेस आरटीओंकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व स्कूलबसेस विरुद्ध मोटार वाहन कायद्यातील विविध कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

स्कूलबसधारकांनी आपल्या वाहनांची तपासणी आरटीओ कार्यालयामार्फत करून घ्यावी. तसेच वाहन परवाना, योग्यता प्रमाणपत्र, विमा, चालकाचे लायसन्स मुदतीत असल्याची खात्री करावी. त्यानंतरच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करावी.

- किरण बिडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मालेगाव

स्कूलबसमध्ये आवश्यक बाबी...

वेग नियंत्रणासाठी स्पीड गव्हर्नर बसवणे

प्रथमोपचार पेटी

अग्निशामक उपकरण

खिडक्यांना दांडे बसवणे

वाहनाचा रंग पिवळा

शाळेचे नाव

मदतनीस व्यक्ती नेमणूक

विद्यार्थ्यांच्या नावांची यादी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छगन भुजबळ करणार राज्यभर दौरे

$
0
0

मुंबईमधील समता परिषदेच्या बैठकीत घोषणा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बहुजन समाजातील लोकांनी नाशिकसह राज्यभरात विविध मोर्चे काढले या मोर्च्यात सहभागी झालेल्या सर्व जाती धर्मातील व विविध राजकीय पक्ष संघटना सहभागी झाले. या सर्व मोर्चेकऱ्यांचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आभार व्यक्त केले. यावेळी सर्वसामान्य जनतेला भेटण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रभर दौरे करावे अशी उपस्थितांनी साद घातली. यावेळी आपण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात दौरे करणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राज्य कार्यकारिणी बैठक मुंबई येथे रविवारी समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, समता परिषद मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कुशवाह, उपाध्यक्ष बापू भुजबळ, प्रा. हरी नरके, ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, माजी आमदार जयंत जाधव, आमदार लक्ष्मणराव तायडे, तुकाराम बिडकर, तोतरांम कायंदे, माजी आमदार हरीराम वरखेडे, दिलीप खैरे आदी मंचावर उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले, की समता परिषदेच्या माध्यमातून अडीच वर्षांनंतर आपण भेटलो; सगळ्यांनी या अडीच वर्षाच्या काळात मोलाची साथ दिली. आंदोलन, मोर्चे काढले त्याबद्दल सर्वांचे आभार. या पुढील काळातही आपण जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. देशात ओबोसींचे संघटन करून जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी आपण प्रयत्न केले. मात्र, सरकारकडून अद्यापही जातनिहाय आकडेवारी घोषित करण्यात येत नसल्याने यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मध्य प्रदेशात आमचा संघर्ष

बैठकीत सिद्धार्थ कुशवाह म्हणाले, की आज संपूर्ण देशात भययुक्त स्थिती आहे. मध्य प्रदेशात १५ वर्षांपासून आमचे शोषण सुरू आहे. छोट्या-छोट्या प्रश्नासाठी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येते. त्यामुळे मध्य प्रदेशात छगन भुजबळ यांनी येऊन दौरा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रस्तावित जल आराखड्याची व्हावी प्रभावी अंमलबजावणी

$
0
0

सरकारने जल आराखड्यास मान्यता दिल्याने अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन चांगल्या पद्धतीने होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्‍त केला आहे. हा आराखडा जल परिषदेने मंजूर केल्यावर त्यावर योग्य पद्धतीने कार्यवाही व्हावी आणि नद्यांचे होणारे प्रदूषण थांबविण्याकडे सरकारने सकारात्मकतेने पाहावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली आहे. मात्र, यापूर्वीचा अशा योजनांच्या अंमलबजावणीचा अनुभव पाहत यापूर्वी जाणवलेल्या उणिवा प्रारंभापूर्वीच दूर कराव्यात. असे झाले, तरच यामागचा मूळ उद्देश सफल होऊ शकेल, अशी अपेक्षादेखील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पाण्याचे नियोजन करण्यास उपयुक्त

जल आराखड्यास मान्यता देऊन सरकाने चांगले काम केले आहे. हा अत्यंत चांगला निर्णय असून, यामुळे पाण्याचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. नदीखोऱ्यांचा आराखडा करणारे आपले राज्य पहिले ठरल्याने अभिमान वाटत आहे. त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व चांगली होणे अपेक्षित आहे. त्यामुळे जुना तिढा सुटण्यास मदत होईल.

-महेश महाजन

नदी परिसराचा व्हावा विकास

या निर्णयामुळे नद्यांलगतच्या परिसरात सरकारने चांगली झाडे लावून तो परिसर आकर्षक केला पाहिजे. आदिवासी भागात किंवा शहरी भागातही मोठ्या प्रमाणावर नद्यांचे प्रदूषण होत असते. नद्यांमध्ये केर, कचरा टाकला जात असल्याने त्यांची त्यापासून मुक्तता होणे गरजेचे आहे. सरकारने नद्यांचे प्रदूषण होणार नाही यादृष्टीने सुरक्षा ठेवली पाहिजे.

-कुणाल जाधव

गोदावरी खोऱ्याचा समावेश लाभदायक

जल आराखड्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे पाण्याचे नियोजन होण्यास मदत होणार आहे. यात गोदावरी खोऱ्याचा समावेश करणे लाभदायक ठरणार आहे. वास्तविक सरकारने हा निर्णय यापूर्वीच घेणे अपेक्षित होते. मात्र, आता हा निर्णय घेतल्याने त्याचे स्वागतच आहे. पण, हा निर्णय जरी चांगला असला, तरी त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही हेही पाहावे.

-मनोज सावंत

पाण्याचे स्रोत वाढण्यास मदत

पाण्याचे नियोजन ही काळाची गरज आहे. या आराखड्यामुळे पाण्याचे स्रोत वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा निर्णय चांगला आहे. याला विरोध झाला, तरी उत्तर महाराष्ट्रातील व राज्यातील नद्यांचे संवर्धनदेखील महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र हे जल आराखडा तयार करणारे पहिले राज्य ठरल्याने आता उत्तम नियोजन करून आदर्श निर्माण करावा.

-पवन शेवाळे

नद्यांच्या संवर्धनाची करावी तरतूद

पाण्याचे नियोजन होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, पाण्याबरोबरच नद्यांचेदेखील संवर्धन केले गेले पाहिजे. आज शहरातील अनेक नद्या प्रदूषणाला बळी पडल्याचे वास्तव आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण करण्याची तरतूद यात केली पाहिजे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करणे गरजेचे आहे.

-निशिकांत पाटील

---

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण शेतकऱ्याची मालेगावात आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील शेरूळ येथील एका तरुण शेतकऱ्याने रविवारी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. संदीप सुपडू महाले (वय ३५) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत संदीप यांच्या नावे शेतजमीन नाही. मात्र, त्यांचे वडील सुपडू महाले यांच्या नावे पाडळदे येथे १.२७ हे. आर शेतजमीन आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी शेतात कपशीची लागवड केली होती. परंतु, पाऊस लांबल्याने दुबार पेरणी करावी लागेल या तणावात त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते आहे. या आत्महत्येसंदर्भात तलाठ्यांनी प्राथमिक अहवाल तहसील कार्यालयास दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिक-पुणे मार्गाची कामे त्वरित करावीत’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिक-पुणे महामार्गाची अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस ग्रामीण कमिटीचे सरचिटणीस रतन जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या महामार्गाची कामे अद्याप सुरू असून, नागरिक, प्रवाशांची गैरसोय होत आहे. कामे सुरू असतानाही चार महिन्यांपासून टोल वसुली होत आहे. शिंदे गावच्या सर्व्हिसरोडचे काम अपूर्ण आहे. महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याने गावकऱ्यांना मुख्य रस्त्यावर येताना त्रास सहन करावा लागतो. शिंदे, बंगालीबाबा, चिंचोली फाटा येथील भरावांवरील पथदीपांची कामे अपूर्ण आहेत. याच रस्त्यावरील सर्व्हिसरोडवर मात्र पथदीप लावले आहेत. टोल नाक्यावर स्थानिकांसाठी स्वतंत्र लेन ठेवावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

------------------------------------

पेठरोडवरील इमारतींना झुडपांचा विळखा (फोटो)

पंचवटी : पेठरोड येथे असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य रेसिडेन्शिअल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ असलेल्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. वापराविना पडून असलेल्या या इमारतींना झुडपांचा विळखा पडला आहे. काटेरी झुडपे, तसेच गाजरगवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जवळच वस्तीत राहणाऱ्या रहिवाशांना या झुडपांच्या विळख्यामुळे गैरसोय सहन करावी लागत आहे. त्यामुळे हा परिसर स्वच्छ करण्याची मागणी होत आहे.

--

देशी दारू जप्त

नाशिकरोड : शिंदे गावातील भांगरे मळा येथे बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या नितीन श्यामराव तुंगार (वय ३० ) याला नाशिकरोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५२ रुपये किमतीच्या देशी दारूच्या १५ बाटल्या आढळल्या.पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

--

रस्त्यांची दुर्दशा (फोटो)

सातपूर : सातपूर परिसरातील मळे विभागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने परिसरातील रहिवाशांचा प्रवास खडतर बनला आहे. पावसाळा सुरू होऊनदेखील या रस्त्यांची दुरुस्ती झालेली नसल्याने स्थानिक रहिवाशांच्या गैरसोयीत आणखी भर पडत आहे. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने किमान खड्डे पडलेल्या ठिकाणांची तरी तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

--

रिक्षाच्या धडकेत मृत्यू

पंचवटी : पेठरोडवरील आरटीओ कॉर्नर येथे रिक्षा बोलावण्यासाठी गेलेल्या हिरामण महादेव बेंडकुळे (वय ३८, चारी नंबर ७, माडसांगवी) यांचा भरधाव रिक्षाच्या धडकेने मृत्यू झाला. दुपारी चार वाजता झालेल्या या अपघातात बेंडकुळे यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. हवालदार माळी यांनी पंचवटी पोलिसांना माहिती कळविली असून, हवालदार सोनवणे तपास करीत आहेत.

--

फांदीचा अडथळा (फोटो)

पंचवटी : औरंगाबादरोडवर नांदूरच्या मळे परिसरातील भागात वादळी वाऱ्याने तुटलेली फांदी अर्ध्या रस्त्यावर पडली आहे. झाडाच्या वरच्या बाजूची तुटलेली फांदी खालच्या फांदीवर पडल्याने खालची फांदी रस्त्याच्या अर्ध्या भागावर लोंबकळत आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांना या फांदीचा अडथळा सहन करावा लागत आहे. रात्री या फांदीचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.

--

पावसाची प्रतीक्षा

सातपूर : सातपूर पंचक्रोशीतील बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. थोडाफार पाऊस झाला असला, तरी पेरणीसाठी लागणारा पाऊस पडला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जून महिना संपत आला, तरी जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत सापडला असून, त्याच्याकडून जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईत पाऊस, नाशिकमध्ये प्रतीक्षा

$
0
0

पेरण्यांना उशीर, बळीराजा चिंताक्रांत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई परिसरात व मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला असला तरी, राज्यातील इतर भागात मात्र मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. विदर्भात दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले असून, जूनचा शेवटचा आठवडा उजाडूनही उत्तर महाराष्ट्रात विशेष करून नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबारमध्ये पेरण्यांनाही सुरुवात झालेली नाही.

जूनच्या प्रारंभी पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. अधूनमधून हलक्या सरी कोसळत असल्या तरी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. मुंबईत विशेष करून वसईत रविवारी जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यातही औरंगाबाद वगळता सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाला. मात्र, नाशिकमध्ये फक्त शिडकावा झाला. जूनचा शेवटचा आठवडा उजाडला असून, अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली आहे. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने पाणीटंचाई जाणवत नसली तरी ग्रामीण भागातून टँकरची मागणी वाढू लागली आहे.

१ जूनपासून जिल्ह्यात ११७९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७८.५६ मिमी पाऊस पडला आहे. गतवर्षी पावसाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. १४ जून २०१७ रोजी तर शहरात अवघ्या दोन तासांत ९२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. यंदा मात्र पाऊस काहीसा लांबणीवर पडला आहे.

धरणांमध्ये ११ टक्के पाणीसाठा

जिल्ह्यात एकीकडे पावसाला विलंब होत असून, धरणांमधील उपलब्ध पाण्याची पातळीदेखील दिवसेंदिवस खाली जाते आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून सध्या सात हजार ११८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा ११ टक्क्यांवर आला आहे. गंगापूर धरण समूहात १९ टक्के, तर गंगापूर धरणात २५ टक्के पाणी शिल्लक आहे. गतवर्षी सद्यस्थितीत धरणात २० टक्के पाणीसाठा होता. यंदा तो पाच टक्क्यांनी अधिक आहे.

-

धरण समूहातील पाणीसाठा

गंगापूर धरण समूह : १९ टक्के

पालखेड धरण समूह : ८ टक्के

गिरणा धरण समूह : २४ टक्के

---

विदर्भावर दुबारसंकट

नागपूर : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच विदर्भात मान्सूनचे आगमन झाले. तीन दिवस दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. कापूस, सोयाबीनच्या सुमारे ५५ टक्के पेरण्या पूर्ण करण्यात आल्या. नंतर चौदा दिवसांपासून पाऊस न झाल्याने दुबारचे संकट गडद झाले आहे. पावसाअभावी वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील वडद येथील ३० शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला.

- सविस्तर वृत्त...९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक महापालिकेकडून चारशे किलो प्लास्टिक जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने महाराष्ट्र विघटनशील व अविघटनीशल कचरा नियंत्रण कायदा, २००६ नुसार रविवारी सुट्टीच्या दिवशीदेखील प्लास्टिक बाळगणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यावेळी शहराच्या सहाही विभागांतून अंदाजे चारशे किलो प्लास्टिक व अंदाजे एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रविवारी खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना कापडी पिशव्या घेऊनच निघावे लागले. व्यापाऱ्यांनीही कागद, कापडी पिशव्यांचाच वस्तू देण्यासाठी वापर केला.

नाशिक महानगरपालिका कायक्षेत्रात २३ जूनपासून प्लास्टिकबंदी करण्यात आली. पहिल्या दिवशी प्रभावी अंमलबजावणी झाल्यानंतर रविवार असूनही दुसऱ्या दिवशी कारवाई सुरू ठेवण्यात आली. या कारवाईसाठी विभागीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात सहा निरीक्षक नेमण्यात आले असून, बाजारपेठा व संकुलांमध्ये कडक तपासणी करण्यात येत आहे.

पहिल्या दिवशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी याचा चांगलाच धसका घेतला. बाजारात नागरिक कापडाच्या पिशव्या घेऊन जाताना दिसत होते. त्याचप्रमाणे भाजीविक्रेत्यांनी देखील पिशवी घेऊन येणाऱ्यांनाच भाजी देण्यास प्राधान्य दिले. कारवाईच्या आदल्या दिवशी स्वच्छता निरीक्षकांनी बाजारात फिरून नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांची मिटिंग घेऊन त्यांना सूचनादेखील केल्या होत्या. रविवारी व्यापाऱ्यांवरच कारवाई करण्यात आली. नाशिकरोड विभागात जेलरोडवर असलेल्या भवानी स्वीट्स या दुकानात प्लास्टिकच्या पिशव्यांचा साठा सापडल्याने त्या दुकानदारावर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे सुभाषरोडवर असलेल्या काही मटण विक्रेत्यांवरदेखील कारवाई करण्यात आली. या परिसरात स्वच्छता नसल्याने अधिकाऱ्यांनी कडक सूचना केल्या. नाशिकरोड विभागात २० किलो प्लास्टिक जमा करण्यात आले असून, २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पंचवटी विभागातदेखील तीन व्यापाऱ्यांकडे प्लास्टिकच्या पिशव्यांचा साठा सापडला. त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यांच्याकडून १५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. सर्वात जास्त कारवाई नाशिक शहरातील पूर्व विभागात करण्यात आली. या ठिकाणी ७ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच एका व्यापाऱ्याच्या दुकानासमोर कचरा आढळल्याने त्याला एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. शालिमार परिसरात असलेल्या फळविक्रेत्यांची देखील तपासणी करण्यात आली. पश्चिम विभागात दोन व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच किरकोळ प्लास्टिक जप्त करण्यात आले.

अडगळीतून निघाल्या कापडी पिशव्या

नागरिकांना रिकाम्या हाती जाऊन वस्तू खरेदी करण्याची सवय लागली होती. मात्र महापालिकेने प्लास्टिकबंदीबाबत कडक धोरण अवलंबल्याने अडगळीत गेलेल्या कापडी पिशव्या बाहेर निघाल्या आहेत. नागरिक मुकाट्याने गाडीच्या डिकीत कापडी पिशव्या ठेवू लागल्याचे दृष्य पहायला मिळते आहे. महापालिकेने केलेली प्लास्टिकबंदी योग्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुरुवातीला थोडा त्रास होईल, मात्र एकदा सवय लागल्यावर त्याचे चांगले परिणाम याच पावसाळ्यात पहायला मिळतील असे नागरिकांचे म्हणणे आहे. भाजी विक्रेतेही या त्रासातून बाहेर पडले असून, प्लास्टिकच्या पिशव्या खरेदीचा त्यांचा मोठा खर्च वाचला आहे.

सरकारने योग्य कारवाई केली आहे. नाशिक महापालिकेने कडक कारवाई करावी व प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करावे. सवय लागण्यास थोडा अवधी लागेल. परंतु, त्याचे दूरगामी चांगले परिणाम होतील.

- उल्हास शुक्ल, नागरिक

--

लोक पावशेर भाजी घ्यायचे व प्लास्टिक पिशवी मागायचे. बरे झाले सरकारने हा कायदा केला. आमचे पैसेही वाचतील व पावसाळ्यात पाणीही तुंबणार नाही.

-सरिता पवार, भाजी विक्रेती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images