Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गुरू गोविंदसिंग संस्थेत कौशल्य विकसन उपक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील गुरू गोविंद सिंग इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी लेथ आणि वेल्डिंग अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना सुमारे चारशे तासांचे सत्र उपलब्ध करून देण्यात आले. संस्थेतील अद्ययावत सुविधांद्वारे उद्दिष्ट्ये व अभ्यासक्रमासोबत प्रॅक्टिकल्सचे ज्ञान देण्यात आले.

नोंदणी केलेल्या ६० विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन, प्रात्यक्षिक व तोंडी अशा तीन सत्रांमध्ये घेण्यात आली. यासाठी प्रा. पराग सोमवंशी आणि मनीष शर्मा यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. नोडल ऑफिसर प्रा. संदीप पाटील व मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डॉ. सी. डी. मोहोड यांनी हा अभ्यासक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. काठे, चौहान आणि पगार यांनी प्रशिक्षक म्हणून काम बघितले. गाडीलोहार, केले, खैरनार, सांगळे आणि लोखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले. गुरुगोविंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार गुरुदेवसिंग बिर्दी, मुख्य कार्यकारी अधिकारी परमिंदर सिंग आणि गुरुगोविंद सिंग इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम यांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्द्ल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघात कारणमीमांसा होणार ‘अॅटोमॅटिक’

$
0
0

नाशिक : शहरात होणाऱ्या प्राणांतिक अपघातांची नोंद स्वयंचलित पद्धतीने करण्याचे काम शहर वाहतूक शाखेने सुरू केले आहे. 'थर्ड आय' या अॅप्लिकेशनच्या मदतीने होणाऱ्या कामामुळे अपघातांच्या कारणांसह ब्लॅक स्पॉटसह इतर माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते.

शहर परिसरात जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये ८२ जीवघेणे अपघात झाले तर ८३ जणांना आपला जीव गमवावा लागला. यापूर्वी जीवघेण्या अपघातांची माहिती कागदोपत्री घेतली जात होती. यामुळे अपघातांच्या कारणांची मिमांसा करणे किचकट ठरत होते. आता जीवघेणा अपघात झाला की याची नोंद 'थर्ड आय' अप्लिकेशनवर होते. हे अॅप्लिकेशन वाहनांचा प्रकार, वाहनचालकाचे वय, अपघाताचे कारण अशा वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करून त्याची नोंद करते.

याबाबत अधिक माहिती देताना वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले, की बहुतांश अपघातांत वाहनचालकाचा निष्काळजीपणा हे प्रमुख कारण असते. मात्र, या व्यतिरिक्त रस्त्यावरील अपुरा प्रकाश, रस्त्यावरील झाडे अथवा पोल, साइन बोर्ड्सचा अभाव अशी कारणे पुढे येतात. ती वेळेच समोर येण्यासाठी हे अॅप्लिकेशन महत्त्वाचे ठरले आहे. काठेगल्ली सिग्नल रात्री १० वाजेनंतर ब्लिंकर मोडवर असते. यामुळे हायवेवरून गतीने येणाऱ्या वाहनास चौफुलीचा अंदाज येत नाही. याठिकाणी रोडवर कॅटआइज आणि रस्ता दुभाजकावर रिलफेक्टर लावण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास सुचित करण्यात आले. ब्लॅक स्पॉट सतत अपटेड्स होण्याबाबत काही तांत्रिक अडचणी असून, त्या लवकरच दूर सारण्यात येतील, असे देवरे यांनी स्पष्ट केले. ब्लॅक स्पॉटची अद्यावत व अचूक यादी समोर येत राहिल्यास त्या ठिकाणी ठोस उपाययोजना राबवणे शक्य होईल.

उपायासाठी तातडीने पत्र

अपघातांची कारणे पुढे आल्यानंतर महापालिका किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास उपाय राबविण्याचे पत्र लागलीच दिले जाते. जानेवारी ते मे या काळात अशा प्रकारे महापालिकेस १७ तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दोन पत्र देण्यात आली. याशिवाय महामार्ग बस स्थानकात झालेल्या अपघातानंतर त्या प्रशासनालाही बस पार्किंगबाबत नियोजन करण्यास सांगण्यात आल्याची माहिती देवरे यांनी दिली.

'थर्ड आय' अप्लिकेशन पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. दैनंदिन गुन्हे अहवालाचे तंतोतंत विश्लेषण यामुळे समोर येते. याशिवाय गस्तीवरील कर्मचारी आणि वाहनांवर लक्ष ठेवणे यामुळे सोप्पे होते. अपघाताचा डेटा क्लिकसरशी उपलब्ध झाल्याने त्यादृष्टीने नियोजन करणे सोपे होईल. यामुळे अपघातांची संख्या कमी करणे शक्य होईल. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यानंतर काम प्रभावित होणार नाही.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

महिना मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी एकूण सर्व अपघात

जानेवारी १६ ३६ ७ ५२

फेब्रुवारी १५ ४७ १७ ५७

मार्च १६ ३३ १२ ५१

एप्रिल २१ ४५ २७ ५६

मे १५ ३४ १९ ४६

एकूण ८३ १९५ ८२ २६२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतन थकल्याने कोंडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

लोखंडी टॉवरसाठी नावाजलेल्या ज्योती स्ट्रक्चर कंपनीचे कामगार अनेक महिन्यांपासून वेतनवापासून वंचित आहेत. कामगारांसह अनेक अधिकाऱ्यांनाही वेतन मिळत नसल्याने संतप्त कामगारांनी सोमवारी कंपनीच्या उपाध्यक्षा कुंदा देशमुख यांना कार्यालयात घेराव घालत जाब विचारला. मात्र, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिल्याचे समजते.

बँकांचे कर्ज थकल्याने कामगारांसह व्यवस्थापनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही वेतन मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत कामगारांनी कामगार उपायुक्तांकडेही तक्रार केली असल्याचे संतप्त कामगारांनी सांगितले.

खासगी, तसेच शासकीय विभागातील विद्युत पारेषण विभागाचे मोठे टॉवर बनविण्याचे उत्पादन ज्योती स्ट्रक्चर कारखान्यात केले जाते. देशात विविध ठिकाणी कारखान्याचे प्लँट आहेत. त्यापैकी नाशिकमध्ये दोन, घोटी व रायपूरमध्ये प्रत्येकी एक प्लँट आहे. सर्व प्लँट मिळून कारखान्यात हजारो कर्मचारी काम करतात. यात कामगारवर्गासह कार्यालयातील शिपाई ते व्यवस्थापकांचा समावेश आहे. दिवाळखोरी कायद्यानुसार कंपनीचे प्रकरण दीड वर्षापूर्वी एनसीएलटी न्यायालयात गेले आहे. त्यामुळे कारखान्यातील कामगारांना गेल्या सात महिन्यांपासून ते कार्यालयीन कर्मचाऱ्यांना गेल्या पंधरा महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. निवृत्त कर्मचाऱ्यांनाही अद्याप मोबदला मिळालेला नाही. बँकेत पैसे जमा झाले असूनही व्यवस्थापन पैसे देत नसल्याचा आरोप करीत सोमवारी कर्मचाऱ्यांनी घेराव घातल्यानंतर याप्रश्नी बोलण्यास उपाध्यक्षा देशमुख यांनी नकार दिला. यावेळी मधुर जैन, राजेंद्र मुळे, नीलेश इंगळे, ईश्वर पाटील, संतोष पवार, मिलिंद मथुरे, किरण क्षत्रिय, सचिन साळी, जॉन भालेराव आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

१५ महिन्यापासून विनावेतन

देशभत जाळे पसरलेल्या ज्योती स्ट्र्क्चर कंपनीतील बहुसंख्य कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या काही महिन्यापासून थकले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारखान्यातील शिपाई, कामगारवर्ग ते व्यवस्थापक गेल्या १५ महिन्यांपासून पगाराविना काम करीत आहेत. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी सातपूर येथील कंपनीच्या गुरुकुल कार्यालयावर कंपनीच्या उपाध्यक्षा (एचआर) कुंदा देशमुख यांना घेराव घालत जाब विचारला.

उपजीविकाच धोक्यात

हतबल झालेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापक, कामगार उपायुक्त, लोकप्रतिनिधी ते थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. मात्र, कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच आली. पैसे मिळतील या आशेने कामगारांसह अधिकाऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी भविष्यनिर्वाह निधी (पीएफ), एलआयसी, काहींनी दागदागिने विकून, तर काहींनी व्याजाचा मार्ग अवलंबून उपजीविका सुरू ठेवली. मात्र, आता देणेकऱ्यांचा तगादा सुरू झाल्याने आत्महत्येचा विचार कर्मचाऱ्यांमध्ये येऊ लागला असल्याचे कर्मचारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

---

'महिंद्रा'तील बडतर्फ पदाधिकाऱ्यांचे उपोषण

सातपूर : महिंद्रा कंपनीच्या कामगारांनी वेतनवाढीच्या करारावरून कामगार उपायुक्त कार्यालयासमोर मे २०१४ मध्ये आंदोलन पुकारले होते. त्यावेळी असलेले युनियनचे सरचिटणीस प्रवीण शिंदे व उपाध्यक्ष अमोल सोनवणे यांना कंपनी व्यवस्थापनाने दोषी ठरवत बडतर्फ केले होते. त्यानंतर कामगार न्यायालयात दोन्ही पदाधिकाऱ्यांनी तक्रार करीत अन्याय झाल्याचे नमूद केले होते. सन २१०४ पासून बडतर्फ असलेले शिंदे व सोनवणे यांनी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर २० जूनपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. सध्याच्या महिंद्रा कंपनीतील कमिटीने आमची दिशाभूल केल्याचा आरोप उपोषणार्थींनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकांनी नोकरी नव्हे; व्यवसायाची कास धरावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

युवकांनी नोकरी मागे न धावता स्वतंत्र व्यवसाय करण्याकडे वाटचाल करावी, असे आवाहन देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव कुलकर्णी यांनी केले.

संस्थेच्या युवक शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या गो. ह. देशपांडे सभागृहात उत्साहात झाली. यावेळी ते बोलत होते. मंचावर संस्थेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील, खजिनदार मकरंद सुखात्मे, युवक शाखेचे कार्याध्यक्ष अजय चौधरी, महिला शाखेच्या कार्याध्यक्षा जयश्री पोळ उपस्थित होते. या सभेस विद्यार्थी, पालक, सभासद यांचीही उपस्थित होती.

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होणे, समाज संघटित होण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे, याचे महत्व ओळखून पालकांनीच पाल्याला युवक शाखेचे सभासद होण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. येत्या वर्षात अधिकाधिक रोख पारितोषिके व कॉलेजमधील सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचा मानस आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

युवक शाखेचे कार्याध्यक्ष अजय चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यकारी मंडळाचे सदस्य अनंत दशपुत्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की बँकेकडून शैक्षणिक कर्ज दिले जाते, त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी अवश्य घ्यावा. यासाठी लागेल ती मदत संस्थेच्या वतीने केली जाईल. मुंबईच्या आपल्या मध्यवर्ती संस्थेकडूनही विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात गुणवत्तेनुसार शैक्षणिक मदत केली जाते. उच्च शिक्षणासाठी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, त्यासाठी मध्यवर्ती संस्थेची सभासद होणे आवश्यक आहे, असे सहकार्याध्यक्ष मंदार तगारे यांनी सांगितले.

ब्राह्मणांना आरक्षण नाही, शैक्षणिक खर्च लाखोंच्या घरात, कॉलेज लायब्ररीत पुस्तके मिळत नाहीत, या पार्श्वभूमीवर संस्था विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात गुणवत्ता पारितोषिक देते, सर्व पुस्तके देते, ही मदत अनमोल आहे, असे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. यानंतर 'तुझीच रे!' या आगामी चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केलेल्या तेजस कुलकर्णी हिचा अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्या दिवशी १३ जणांवर कारवाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू करताच, नाशिक महापालिकेने प्लास्टिक वापराविरोधात जोरदार मोहीम उघडली असून, सलग तिसऱ्या दिवशी मोहीम राबवत १३ जणांवर कारवाई केली आहे. महापालिकेच्या तीन विभागांतील पथकांनी १३ जणांकडून ६५ हजार रुपयांचा दंडही वसूल केला. व्यापारी वर्गाकडून विरोध होत असल्याने व नागरिकांना दंड न करण्याचे पर्यावरण मंत्र्यांनी आवाहन केल्याने पालिकेची कारवाई काहीशी थंडावली आहे.

पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना-२०१८ मागील २३ मार्चला प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी व नियमांतर्गत कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा २००६ च्या कलम बारा अन्वये प्लास्टिकबंदी केली आहे. तसेच या विरोधात कारवाईसाठी उपायुक्त, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य अधिकारी, प्रभाग अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात मनपा आयुक्तांकडून प्राधिकृत केले गेले आहे. सहा विभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विभागीय स्वच्छता निरिक्षकांची सहा पथके तयार करण्यात आली. कारवाईला आता वेग आला आहे. विभागातील बाजारपेठा, व्यापारी संकुलांमध्ये धडक मोहीम राबवण्यात येत आहे. तिसऱ्या दिवशी महापालिकेने तीन विभागात कारवाई करत १३ जणांकडून ६५ हजारांचा दंड वसूल केला. त्यात नाशिक पूर्व विभागात ४ जणांकडून २० हजाराचा दंड तर नाशिक पश्चिम विभागात ५ वापरकर्त्यांकडून २५ जणांना दंड वसूल करण्यात आला. सिडको परिसरात ४ वापरकर्त्यांविरोधात २० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. सोमवारी सातपूर,नाशिकरोड आणि पंचवटी परिसरात कारवाई झाली नसल्याचे पालिकेच्या अहवालावरून समोर आले आहे.

नागरिकांनी केले ३५० किलो प्लास्टिक जमा

नाशिकरोड : प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची कठोरपणे अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आर्थिक दंडाच्या भीतीपोटी व्यावसायोक,व्यापारी आणि नागरिकांनी स्वतःहून पालिकेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाकडे सोमवारी (दि. २५) तब्बल ३५० किलो प्लास्टिक जमा केल्याची माहिती विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांनी दिली. देवळाली गावात दर सोमवारी भरणारा आठवडे बाजारही प्लास्टिकमुक्त करण्यात पालिका प्रशासनाला यश मिळाले.

रद्दीचे भाव वाढले

सिडको : प्लास्टिकबंदीनंतर रद्दीच्या दरांत चांगलीच वाढ झाली असल्याचे दिसत आहे. अनेक दुकानदारांनी आता कागदी पिशव्या खरेदी करून त्यातून साहित्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे साहजिकच कागदाला चांगलीच मागणी आली आहे. मागील आठवड्यात शहरात पेपरच्या रद्दीचा भाव हा ९ ते १० रुपये किलो होता, आता तो दोन रुपयांनी वाढला आहे. येत्या काळात भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साक्री तालुक्यात जोर‘धार’ पाऊस

$
0
0

शेतीपिके, विहिरी, कांदाचाळीचे मोठे नुकसान

म. टा. वृत्तसेवा,धुळे

जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील सालटेक, पेरेजपूर परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये शेतीपिके, विहिरी, कांदाचाळीचे मोठे नुकसान झाले आहे. साक्री तालुका तहसीलदार संदीप भोसले यांनी पथकासह नुकसानीची पाहणी केली. त्यांनी तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, पंचनाम्यानंतर आकडेवारी समजू शकणार आहे.

साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात गेल्या आठवडयाभरापासून ढगाळ वातावरण होते. मात्र, रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तर पेरेजपूर ग्रामपंचायत परिसरातील सालटेक गावात ढगफुटीसदृश परिस्थिती होती. या पावसामुळे नाल्यांना पूर आला. परिरातील शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा चाळी वाहून गेल्या. तसेच नवीन लागवड केलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले. सुमारे अर्धा-पाऊण तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांसह काही ठिकाणी काम सुरू असलेल्या विहिरीदेखील बुजल्या गेल्या आहेत. सोमवारपासून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर सरकारकडे नुकसानीचा अहवाल सादर करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेच्या जागेवर पार्किंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेने सातपूर भागात तब्बल चार एकरचा भूखंड महापालिका विद्यालयाकरिता आरक्षित केलेला आहे. मात्र, महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षाने या जागेला जणू पार्किंगचेच स्वरूप आले आहे. येथे सट्ट्याचा अड्डादेखील चालविला जात असून, पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतरही येथील शाळेच्या कामाबाबत कार्यवाही केली जात नसल्याने परिसरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेच्या विद्यालयासाठी आरक्षित असलेल्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. विशेष म्हणजे कंटेनरचे अतिक्रमण रोजच असते, त्यात भर म्हणून चक्क मोकळ्या भूखंडावर परदेशी नावाच्या व्यक्तीने सट्ट्याचा अड्डाच सुरू केल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नाशिकचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका विद्यालयासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा शिवाजीनगरच्या एका कार्यक्रमात केली होती. मात्र, त्यांची घोषणा केवळ नावापुरतीच होती की काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

श्रमिकनगर, शिवाजीनगर व ध्रुवनगर भागात महापालिकेच्या पाचहून अधिक शाळा आहेत. त्यातील माध्यमिक शाळा चक्क महापालिकेच्या अभ्यासिकेत भरत असल्याने भाजपचे सभागृह नेते तथा स्थानिक नगरसेवक दिनकर पाटील यांनी चार एकर आरक्षित जागेवर विद्यालय उभारण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर महापालिकेने महसूल विभागाला कोट्यवधी रुपये भरून आरक्षित असलेली शाळेची जागा ताब्यात घेतली. शिवाजीनगर भागात तीन हजार विद्यार्थी महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आरक्षित जागेवर विद्यालयाची इमारत उभारण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक पाटील यांनी सातत्याने केली आहे.

पालकमंत्री महाजन शिवाजीनगर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असताना शाळेच्या इमारतीसाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, तरीही महापालिका शिक्षण मंडळाकडून आरक्षित जागेवर विद्यालयाची उभारणीबाबत कार्यवाही झालेली नाही. आरक्षित भूखंडावर मात्र रोजच कंटेनर अनधिकृतपणे उभे राहत असतात. अनेकांनी कच्चे बांधकामे करत अतिक्रमणही केले आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या जागेवर चक्क सट्ट्याचा अड्डाही सुरू असल्याने महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन कारवाई करणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिकेकडून आरक्षित असलेल्या जागेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेच्या अडचणीच्या जागेत बसावे लागत आहे. आता आयुक्तांनीच याप्रश्नी लक्ष घालून शाळेच्या आरक्षित जागेवर इमारत उभारण्यास गती द्यावी.

-दिनकर पाटील, नगरसेवक तथा सभागृह नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकमुक्तीसाठी पुढाकार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर येथील व्यापारी मर्चंट असोसिएशनने शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पुढाकार घेत दुकानांतील प्लास्टिक भगूर नगरपालिकेकडे सुपूर्द करीत प्लास्टिकबंदीचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले.

परिसरातील व्यावसायिकांनी आपल्या दुकानांतील ट्रॅक्टरभर प्लास्टिक पिशव्या आणि वस्तूंच्या गोण्या नगरपालिकेकडे सुपूर्द केल्याने परिसरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. भगूर शहर परिसर प्लास्टिकमुक्त व्हावा यासाठी नगरपालिकेच्या कार्यालयात नगराध्यक्षा, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आणि सर्व सदस्यांची एकत्रित बैठक झाली.त्यात परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर शिवाजी चौकात एकत्रित येत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फुलफगर, उपाध्यक्ष श्याम चांडक,सेक्रेटरी जगदीश कासार आदींसह सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांतून बंदी असलेल्या सर्व प्लास्टिक पिशव्या आणि वस्तू गोण्यांत भरून नगरपालिकेच्या ताब्यात दिल्या. या ट्रॅक्टरभर प्लास्टिकची नगरपालिकेने योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली.

यावेळी नगराध्यक्षा अनिता करंजकर, उपनगराध्यक्षा प्रतिभा घुमरे, रमेश राठोड, नगरसेवक मोहन करंजकर, संजय शिंदे, भाऊसाहेब गायकवाड, नगरसेविका मनीषा कस्तुरे, कविता यादव, संगीता पिंपळे, स्वाती झुटे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम सोनवणे, सोसायटी संचालक श्याम ढगे आदींसह पालिका कर्मचारी उपस्थित होते.

या व्यापाऱ्यांनी घेतला पुढाकार (स्वतंत्र चौकट)

मनोहर आंबेकर, द्वारकानाथ झंवर, रमेश बोराडे, प्रकाश बूब, विनोद पमनानी, मोहन नाहटा, संजय लाहोटी, रमेश हेंबाडे, राजू लोया, मयूर शेटे, प्रवीण यादव, उमेश नहार, गणेश जाधव, भूषण कांकरिया, प्रशांत लोया, रामदास गाढवे, चेतन आंबेकर, गणेश निसाळ, बाळासाहेब वाईकर आदी.

------------------------------------------

(स्वतंत्र सिंगल बातमी)

--

प्लास्टिक संकलन केंद्रांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प शहरात आधीच प्लास्टिकबंदी असताना आता राज्य सरकारच्या आदेशानुसार प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

मात्र, देवळाली परिसरात आजही अनेकांकडे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आहे. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी देवळाली परिसरात कॅन्टोन्मेंट बोर्डाने नाशिक महापालिकेप्रमाणे प्लास्टिक संकलन केंद्रे सुरू करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा अध्यादेश दोन महिन्यांपूर्वी जारी केला.त्यानुसार ही बंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्लास्टिकबंदीला गेल्या शनिवारपासून जोमाने सुरुवात झाली. बंदीचे पडसाद जागोजागी पाहायला मिळत आहेत. त्यासाठी नाशिक महापालिकेने महापालिका विभागीय कार्यालयांत प्लास्टिक संकलन केंद्रे सुरू केली आहेत.

त्याच धर्तीवर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन प्लास्टिकबंदीची कारवाई करीत असताना प्लास्टिक संकलन केंद्रे का सुरू करीत नाही, असा प्रश्न नागरिक आणिपर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात कार्यवाहीची मागणीही करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस वाहनांवर २४ तास ‘नजर’

$
0
0

पोलिस वाहनांवर २४ तास 'नजर'

सत्तरहून अधिक वाहनांवर जीपीएस

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कार केल्यास कामाला गती मिळते, तसेच पारदर्शकता निर्माण होते. शहर पोलिसांनी काही कामांमध्ये आणलेली आधुनिकता पोलिसांपुरतीच मर्यादित नाही, तर नागरिकांनासुद्धा फायदेशीर ठरणार आहे. याची माहिती देण्यासाठी 'डिजिटल पोलिस' ही वृत्तमालिका आजपासून...

नाशिक : गस्तीवरील आणि पोलिसांसाठी वापरण्यात येणाऱ्या इतर वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी तब्बल ७० वाहनांवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) प्रणाली कार्यान्वित केली आहे. आणखी १५ ते २० वाहनांवर जीपीएस बसवण्याचे काम हाती घेण्यात आले असून, यामुळे रिस्पॉन्स टाइम कमी होऊन घटनास्थळ गाठणे पोलिसांना सोपे होणार आहे.

जीपीएस बसवण्यात आलेल्या वाहनांमध्ये १३ पोलिस स्टेशनमधील प्रत्येकी पाच वाहनांचा, निर्भया व्हॅन, टूरिस्ट पोलिस, पीसीआर मोबाइल आदी वाहनांचा समावेश आहे. जीपीएसद्वारे एखादे वाहन कोठे उभे आहे, कोणत्या दिशेने चालले आहे, एखाद्या ठिकाणी किती वेळापासून उभे आहे, दिवसभरात किती फिरले याची सविस्तर माहिती मिळते. यासाठी शहर नियंत्रण विभागात कंट्रोल स्टेशन सुरू करण्यात आले आहे. यासाठी एक मोबाइल अॅपही संबंधित कंपनीने विकसित केले असून, त्यांचा कंट्रोल लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. याबाबत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की बंदोबस्त आणि स्ट्रायकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवरदेखील लवकरच जीपीएस यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. यामुळे सव्वाशेपेक्षा अधिक वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसेल. या यंत्रणेमुळे वाहनांच्या प्रवासाची तंतोत माहिती उपलब्ध होते, तसेच वायरलेसद्वारे संदेश देण्यास अडचणी आल्या तर मोबाइलवर वाहनातील पोलिसांना कॉल करता येणे शक्य होणार आहे. शहराचा विस्तार मोठा असून, पोलिसांचे वाहन नक्की कोठे आणि काय करते हे यामुळे समोर येते. एखादी घटना समजल्यानंतर पोलिसांनी कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचणे महत्त्वाचे असते. अशा वेळी नियंत्रण कक्षातील टेलिव्हिजन स्क्रीनवर घटनास्थळ पाहून नजीक दिसणाऱ्या वाहनास त्या ठिकाणी पाठवणे सोपे होणार आहे. विशेषत: चेन स्नॅचिंगसारख्या घटनांमध्ये पोलिसांना वेळीच माहिती मिळाली तर या यंत्रणेचा खूप फायदा होऊ शकतो. या यंत्रणेचा नेमका वापर कसा करायचा यासाठी वेगवेगळ्या विभागातील पोलिस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

क्रमश:

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन पोलिस स्टेशनला मिळाली हक्काची जागा

$
0
0

महसूल विभागाने पाठविलेल्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उपनगर आणि गंगापूर या दोन पोलिस स्टेशनच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या जागा पोलिस विभागासाठी वर्ग करण्याबाबत महसूल विभागाने मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यावर नुकतेच शिक्कामोर्तब झाले असून, लवकरच या पोलिस स्टेशनच्या इमारतींच्या कामांना गती मिळणार आहे. आता पोलिसांनी आपले लक्ष पंचवटी, म्हसरूळ पोलिस स्टेशनसह परिमंडळ दोन कार्यालयाच्या जागेकडे वळविले आहे.

सर्वाधिक झोपडपट्ट्या आणि रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीमुळे स्ट्रिट क्राइमबाबत सतत चर्चेत येणाऱ्या उपनगर पोलिस स्टेशनला स्वमालकीची जागा नाही. अत्यंत अपुऱ्या जागेत उपनगर पोलिस स्टेशनचा कारभार सुरूवातीपासूनच सुरू आहे. पोलिसांनाच सुविधा नसल्याने तिथे येणाऱ्या नागरिकांचीही अबाळ होते. गंगापूर पोलिस स्टेशनचेही हेच दुखणे असून, हे पोलिस स्टेशन भाडेतत्वावर सुरू आहे. याबाबत मुख्यालयाच्या पोलिस उपायुक्त माधवी कांगणे यांनी सांगितले, की गंगापूर पोलिस स्टेशनसाठी सोमेश्वर येथे तर उपनगर पोलिस स्टेशनसाठी उपनगर परिसरातील शांतीपार्कच्या पुढे असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ जागा मिळाली आहे. या जागा पोलिस विभागाला मिळाव्यात यासाठी काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने मंत्रालयाला प्रस्ताव सादर केला होता. त्यास आता मंजुरी मिळाली आहे. पुढील कामांना गती देण्यात येईल, असे कांगणे यांनी स्पष्ट केले.

इतर जागांबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की या दोन ठिकाणांसह म्हसरूळ, पंचवटी आणि मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या सुसज्ज इमारती स्वतंत्र जागेवर उभ्या राहणे आवश्यक आहे. तसेच परिमंडळ दोनचे कार्यालयही भाडेतत्त्वावर घेण्यात आले असून, तेही स्वतंत्र जागेत सुरू होणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंचवटी पोलिस स्टेशनची जागा पोलिसांची असली तरी ती कमी आहे. हायकोर्टाच्या आदेशाने नुकतेच शहर पोलिस मुख्यालयाची अडीच एकर जागा जिल्हा कोर्टाला वर्ग करण्यात आली. शहरात दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. राज्यभरातील पोलिस शहरात बंदोबस्तासाठी दाखल होतात. त्यांच्या राहण्याची तसेच बंदोबस्ताच्या अनुषंगाने सुविधा पुरविण्याचे काम हाती घेणे आवश्यक आहे. पंचवटी पोलिस स्टेशनजवळील जागा उपलब्ध झाल्यास तिथे अशा सुविधा निर्माण करणे शक्य होईल, असे सिंगल यांनी स्पष्ट केले.

ट्रॅफिक युनिट्सला जागेची प्रतीक्षा

शहर वाहतूक शाखेच्या तीन युनिट्स असून, त्यांची कार्यालयेही सुरू आहेत. मात्र, सातपूर, अंबड, इंदिरानगर या भागातील आणि पंचवटी तसेच नाशिकरोड या भागातून रहदारीला अडथळा ठरणारी वाहने हटवून नक्की कोठे ठेवावीत, असा प्रश्न उपस्थित होतो. या परिसरात वाहतूक शाखेला जागाच उपलब्ध नसल्याने टोईंग व्हॅन सुरू करता येत नाही. शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात मुबलक जागा असल्याने दोनच वाहने सुरू आहेत. इतर ठिकाणी एक तर शहराच्या मध्यवर्ती भागात एक असा वाहनचालकांना न्याय लागू पडतो.

गंगापूर पोलिस स्टेशन : सोमेश्वरजवळ, गंगापूर रोड

उपनगर पोलिस स्टेशन : म्हसोबा मंदिराजवळ, शांतीपार्कपुढे

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग अभ्यासक्रमाला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा योगदिन घोषित केल्यानंतर जागतिक पातळीवर योगाभ्यासाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. मात्र, योग शिकविण्यासाठी असलेल्या शिक्षकांची कमतरता भासू लागली. ही गरज ओळखून नाशिकच्या योग विद्या धाम या संस्थेच्या वतीने कालिदास विद्यापीठाच्या मान्यतेने योगशास्त्र पदविका, योग शास्त्र पदवी, योगशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून, त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याची माहिती योग विद्या धामचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

योग विद्या धाम या केंद्राला आयुष मंत्रालयाची मान्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रात योगाचे महत्त्व विचारात घेऊन संस्थेने २०१३ पासून योग महाविद्यालयाची स्थापना केली आहे. हे महाविद्यालय कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूर यांच्याशी संलग्न आहे. या ठिकाणी योगशास्त्र पदविका, योग शास्त्र पदवी, योग शास्त्र पदव्युत्तर पदवी हे अभ्यासक्रम सलग पाच वर्षांपासून शिकविले जातात. या महाविद्यालयाचा निकाल कायमच १०० टक्के लागला असून, येथे उच्चविद्याविभूषित प्राध्यापक वृंद, सुसज्ज ग्रंथालय, योगानुकूल वातावरण, भव्य सभागृह, प्रशस्त इमारत इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. योगशास्त्र पदविकेचा कालावधी एक वर्षाचा असून १२ वी उत्तीर्ण किंवा त्या समकक्ष उत्तीर्ण असणाऱ्यांना यात प्रवेश घेता येतो. या अभ्यासक्रमाला पाच विषय असून १०० गुणांची परीक्षा आहे. योगशास्त्र पदवी हा अभ्यासक्रम सेमिस्टर पद्धतीचा आहे. हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून, १२वी उत्तीर्ण असणाऱ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. ४० गुण महाविद्यालयाकडे व ६० गुण विद्यापीठाकडे अशी याची गुण पद्धती आहे. योगशास्त्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी दोन वर्षे (४ सत्र) कालावधी असून, बी. ए. योग शास्त्र किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि कालिदास विद्यापीठाचा योगशास्त्र पदविका किंवा योग विद्या गुरुकुल संस्थेचा योगशिक्षक पदविका वर्ग असणाऱ्यांना प्रवेश दिला जातो. यातही ४० गुण महाविद्यालयाकडे तर ६० गुण विद्यापीठाकडे अशी याची गुणरचना आहे. महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाली असून संस्थेच्या कार्यालयात प्रवेश देणे सुरू आहे. प्रथम येईल त्याला प्राधान्य याप्रमाणे प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमासाठी फक्त शनिवार व रविवार ११ ते ५ या कालावधीत कॉलेज असते. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, त्यांचे कॉलेज १४ जुलैपासून सुरू होणार आहे. इच्छुकांनी योग विद्याधाम, योग भवन, कॉलेजरोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन कॉलेजच्या प्राचार्या डॉ. आशा वेरुळकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाग फुलविण्यासाठी कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाळा सुरू झाला की अनेकजण आपल्या बागेत रोपे लावतात. परंतु, यामधील काहीच रोपे तग धरतात. अधिकाधिक रोपे जगावीत यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने हा बगीचा तयार करणे आवश्यक आहे. याबाबत मार्गदर्शन मिळावे याकरीता हौशी नागरिकांसाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या वतीने गार्डनिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी १ जुलै रोजी सकाळी १० वाजता एचपीटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. उपलब्ध जागेमध्ये बगीचा कसा तयार करावा याचा डेमो त्यामध्ये घेण्यात येणार आहे. कोणत्या ऋतूत कोणती फळझाडे, पालेभाज्या तसेच फुलांची रोपे लावावीत, रोपांची छाटणी कशा पद्धतीने करावी, कीड नियंत्रण तसेच घरच्या घरी खते कशी तयार करावीत याचे मार्गदर्शनही या कार्यशाळेत संदीप चव्हाण करणार आहेत. गच्ची किंवा गॅलरीमध्ये बाग तयार करताना येणाऱ्या अडचणींविषयीदेखील या कार्यशाळेत मार्गदर्शन मिळणार आहे. कार्यशाळेत सहभागासाठी नावनोंदणी अनिवार्य असून, महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी २०० रुपये तर इतरांसाठी ४०० रुपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२५३-६६३७९८७, ९४२२५१३५६९ या क्रमांकावर अथवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे संपर्क साधावा. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजच करा उपवास आणि वटपूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वटपौर्णिमेचा उपवास आणि वटपूजन आज, बुधवारीच (दि. २७ जून) करावे, असे पंचांग अभ्यासकांनी सांगितले आहे. दिनदर्शिकेत गुरुवारी पौर्णिमा दिलेली आहे, असे असले तरी शास्त्र वचनाप्रमाणे उपवासासह वटपूजन बुधवारी सूर्योदयापासून दुपारी दीड वाजेपर्यंत करायचे आहे.

यंदा ज्येष्ठ पौर्णिमा गुरुवार (दि. २८ जून) रोजी सकाळी १०.२३ पर्यंत आहे. मात्र, वटपौर्णिमेची सुरुवात आज (दि. २७) रोजी होत आहे. बुधवारी सूर्यास्तापूर्वी ६ घटींपेक्षा अधिक व्यापिनी अशी चतुर्दशीयुक्त पौर्णिमा आहे. यामुळे सावित्रीव्रत म्हणजेच वटपौर्णिमेनिमित्त उपवास आणि वटपूजन बुधवारीच करावे, असे वचन आहे. बुधवारी ज्येष्ठ शुक्ल १४, सकाळी ८ वाजून १३ मिनिटांपर्यंत आहे. याच दिवशी पौर्णिमेची तिथी सायंकाळी ६ घटींपेक्षा आधिक आहे. म्हणून, बुधवारीच वटपौर्णिमेचा मुहूर्त आहे. बुधवारी सकाळी जरी चतुर्दशी असली तरीही सूर्योदयापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत कोणत्याही वेळेत वटपूजन करावे. याचवेळी नेहमीप्रमाणे उपवासासह वटपूजन करावे, असे शास्त्र वचनानुसार सांगण्यात आले आहे. यापूर्वी शके १९२७, १९३२, १९३८ व १९३९ मध्येही याचप्रमाणे वटपौर्णिमेचे मुहूर्त होते.

जे महिन्यातील पौर्णिमेचा नियमित उपवास करतात, त्यांनी गुरुवारी उपवास करावा. वटपूजन आणि वटपौर्णिमेचा उपवास मात्र बुधवारीच करावा.

- अमोर किरपेकर, पुरोहित

चतुर्दशीयुक्त पौर्णिमा ज्यावेळी असते, तेव्हा वटसावित्रीचे व्रत करायचे असते. त्यामुळे उपवासासह वटपूजन बुधवारीच सूर्योदयापासून दुपारी दीडपर्यंत करावे.

- नीलेश धर्माधिकारी, पुरोहित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीन वर्षांनंतर लुटीचा गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बेदम मारहाण करीत एकास बळजबरीने लुटल्याची घटना पंचवटी परिसरात घडली. साडेतीन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेबाबत कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याने राजू तुकाराम मंजुळे या संशयिताविरोधात पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय मुरलीधर चव्हाण (रा. शनी मंदिरामागे, नवनाथनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. संशयित राजू मंजुळे याने २४ नोव्हेंबर २०१४ रोजी ठार मारण्याच्या उद्देशाने चव्हाण यांना बेदम मारहाण केली होती. यावेळी संशयिताने चव्हाणच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यातील सोन्याचे लॉकिट बळजबरीने काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यास पंचवटी पोलिसांनी टाळाटाळ केली. यामुळे चव्हाण यांनी कोर्टात धाव घेतली होती. तब्बल साडेतीन वर्षानंतर कोर्टाने पंचवटी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक के. डी. वाघ करीत आहेत.

हॉटेलमध्ये जुगार; सहा जण गजाआड

लॉजिंग व बोर्डिंग असलेल्या हॉटेलमध्ये सुरू असलेला जुगार अड्डा पोलिसांनी उद्धवस्त केला. या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली. संशयितांच्या ताब्यातील रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. वडाळा नाका येथील द स्क्वेअर हॉटेलमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. त्यानुसार मुंबई नाका पोलिसांनी सोमवारी छापा मारला. यावेळी गुलाम जिलानी मैनुद्दीन मलबारी हा रुम क्रमांक ४०१ मध्ये त्याच्या पाच साथिदारांसमवेत जुगार खेळतांना आढळून आला. हॉटेल मॅनेजर सचिन आव्हाड यांनी जुगारींना साहित्यासह रुम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी पोलिसांनी त्याचेही नाव आरोपींच्या यादीत टाकले आहे. पोलिस नाईक रामदास खुळात यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

बालकामगारांची बेकरीतून मुक्तता

कमी वेतन देऊन बालकामगारांचा आर्थिक, शारिरीक आणि मानसिक छळ करणाऱ्या द्वारका भागातील दोन बेकरीचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बालकामगारांची सुटका करण्यात या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जेकब धर्मराज नाडर (४८, रा. खोडेनगर, अशोकामार्ग) आणि मोईनुद्दीन अब्दुल खालिक खान (३२, रा. दयावान बेकरी, हरीनगरजवळ, द्वारका) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बेकरी चालकांची नावे आहेत. द्वारका परिसरातील रत्ना स्विटस बेकरी आणि दयावान बेकरीमध्ये बालकामगारांकडून काम करून घेतले जात असल्याची माहिती शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि. १३) रात्री छापा टाकला असता तेथे बालकामगार आढळून आले. संशयित स्वत:च्या फायद्यासाठी बालकामगारांची नियुक्ती करून त्यांना कमी वेतन देऊन वेळा निश्चित न करता त्यांच्याकडून जास्त श्रमाचे व जिवास धोका होईल, असे काम करून घेताना आढळून आले. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सावंत करीत आहेत.

पिस्तुल बाळगणारा अटकेत

बेकायदा गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या सिडकोतील युवकाला पोलिसांनी किशोर सूर्यवंशी मार्गावर अटक केली. संशयिताच्या ताब्यातून ३० हजार रुपयांचा गावठी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.

रोहित आनंदा उघाडे (२७, रा. उपेंद्रनगर, क्लासिक आर्केडसमोर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पेठरोड ते किशोर सूर्यवंशी मार्गावर तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सोमवारी (दि. २५) दुपारी येथे सापळा लावला. संशयित पवार लॉन्स पाठीमागील किशोर सूर्यवंशी मार्गाकडे जाणाऱ्या कच्चा रस्त्यावर आढळून आला. त्याच्या अंगझडतीत गावठी कट्टा मिळून आला. या प्रकरणी हवालदार महाले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास हवालदार पठाण करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेभाज्या मातीमोल...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पावसाच्या दमदार सरींमुळे सोमवारी नाशिक जिल्हा चिंब झाला होता. दिवसभर पाऊस सुरू असल्यामुळे पालेभाज्यांची काढणी करणे अवघड झाले होते. अशा स्थितीत पालेभाज्यांची काढणी करून त्या बाजार समितीच्या आवारात लिलावासाठी आणण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. मात्र, या पालेभाज्या भिजलेल्या असल्यामुळे त्या खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शविल्याने त्या मातीमोल ठरल्या. कोथिंबिरीचा अक्षरशः कचरा झाला. शेवटी ही कोथिंबीर घंटागाडीत फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

जिल्ह्यातील सर्वच भागात सोमवारी पाऊस झाल्याने पालेभाज्या भिजलेल्या होत्या. पाऊस सुरू असताना मुश्किलीने काढणी करून बाजारात लिलावात नेण्यात आलेल्या पालेभाज्यांचा चांगले दर मिळतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. त्यामुळे मजूर उपलब्ध नसताना आख्ख कुटुंब पाण्यापावसात पालेभाज्यांची काढणी करतात. अशीच स्थिती सोमवारी बघायला मिळाली. पावसामुळे पालेभाज्यांची आवक मर्यादित असली, तरी ओल्या पालेभाज्या खरेदी करण्याची जोखीम व्यापाऱ्यांनी घेतली नाही. त्यामुळे अशा ओल्या झालेल्या पालेभाज्या शेतकऱ्यांना अक्षरश: फेकून द्याव्या लागल्या.

पावसाळ्यात भिजलेल्या पालेभाज्या पॅक करून मुंबई किंवा गुजरातच्या बाजारात पाठविताना ओल्या पालेभाज्या सडण्याची भीती असते. परिणामी बाजारपेठेत अशा पालेभाज्या मातीमोल ठरतात. त्यामुळे अशा पालेभाज्या व्यापारी खरेदी करीत नाहीत. अशा स्थिती पावसात न भिजलेल्या कोरड्या पालेभाज्यांना चांगली मागणी असते. मात्र, पावसाच्या संततधारेत पूर्णपणे कोरड्या पालेभाज्या मिळणे अवघड झाले होते. दरम्यान, मंगळवारी पावसाने उसंत दिली असली, तरी सोमवारी झालेल्या पावसामुळे फळभाज्या शेतातून काढणे अवघड झाले होते. त्यामुळे मंगळवारी फळभाज्यांची आवक कमी झाली होती.

सुकविण्याची कसरतही वाया

शेतकऱ्यांनी शेतातून काढलेल्या पालेभाज्या पंख्याखाली सुकवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही पालेभाज्या पूर्णपणे कोरड्या झाल्या नव्हत्या. काही व्यापारी रात्रीच्या पालेभाज्यांच्या लिलावात पालेभाज्या खरेदी करून दुसऱ्या दिवशी किरकोळ विक्रीसाठी बाजार समितीच्याच सेल हॉलमध्ये ठेवतात. याच पालेभाज्या विशेषतः कोथिंबीर ओली असल्यामुळे मंगळवारी रोजी तिची विक्रीच झाली नाही. त्यामुळे ती फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजार समितीत दलदल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वेळच्या वेळी स्वच्छता होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे येथे ठिकठिकाणी भाजीपाल्याचे पडलेले अंश सडून त्यांची दुर्गंधी पसरत आहे. सडलेल्या कचऱ्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे या आवारात दलदल तयार झाली असून, येथील अस्वच्छता असह्य ठरत असल्याच्या तक्रारी त्रस्त शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील, तसेच जिल्ह्याबाहेरून येणारा भाजीपाला नाशिक बाजार समितीच्या आवारात विक्री केला जातो. दिवस-रात्र गजबजलेल्या या बाजार समितीतील साफसफाईच्या बाबतीत फारशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे कचरा तसाच पडून राहतो. विशेष म्हणजे येथे होणारा कचरा हा घनकचऱ्यापेक्षा ओला आणि सडणारा कचरा असल्यामुळे तो त्वरित उचलला गेला पाहिजे. मात्र, तसे होत नसल्यामुळे या कचऱ्याची दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात या कचऱ्याचा त्रास जास्त प्रमाणात होतो.

बाजार समितीच्या आवारात स्वच्छतागृहांचा अभाव असल्यामुळे सेल हॉल आणि गाळ्यांच्या बाजूच्या भाग अस्वच्छ बनला आहे. त्याचीही दुर्गंधी पसरत असताना आता भाजीपाल्याच्या कचरा सडत असल्यामुळे त्या दुर्गंधीचीही भर पडली आहे. सेल हॉलमध्येही भाजीपाल्याचे अंश पडून त्याची दुर्गंधी वाढू लागली आहे. त्याच जागेवर किरकोळ स्वरुपात भाजीपाला विक्री करणारे विक्रेते बसलेले असतात. अशा अस्वच्छ भागातूनच भाजीपाल्याची विक्री होत आहे. या भागातील स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्याचा त्रास शेतकरी, व्यापारी, ग्राहक यांना सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी असून, हा परिसर त्वरित स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

--

चालणेही झालेय अवघड

बाजार समितीच्या आवारात काँक्रिटीकरण करण्यात आलेले असले, तरी अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांत पाणी साचते. बाजार समितीच्या आवारात वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या वर्दळीत पडलेला कचरा तुडविला जातो. या तुडविलेल्या कचऱ्याची या परिसरात दलदल तयार झाली आहे. त्यातून चालणेही अवघड होत आहे. दोन्ही सेल हॉलच्या मध्ये असलेल्या जागेत पाणी आणि कचरा साचलेला असल्यामुळे तेथेही दलदल निर्माण झाली आहे.

(लीड, २ फोटो आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामकाज मराठीत, अर्ज, अहवाल इंग्रजीत

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व कॉलेजांना व विभागांना कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याची सूचना केली आहे. यानुसार कॉलेजांनी कार्यालयीन कामकाज मराठीत करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ऑनलाइन प्रवेश अर्ज, राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेस सादर करायचे अहवाल, विद्यापीठाचे परीक्षा अर्ज मात्र इंग्रजीत आहेत. या कागदपत्रांचा मराठी अनुवाद करायचा की इंग्रजीतच कागदपत्र ठेवायचे, याबाबतचा संभ्रम कॉलेज प्रशासनासमोर कायम आहे.

सध्या सर्व कॉलेजांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. सर्व कॉलेजांचे तसेच अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखांचे प्रवेश अर्ज ऑनलाइन सादर करायचे आहेत. हे अर्ज इंग्रजीत आहेत. तसेच यूजीसीअंतर्गत येणारा अँटिरॅगिंग फॉर्मदेखील इंग्रजीत आहे. यासोबतच विद्यापीठाकडून पुनर्मूल्यांकनासाठीचा व परीक्षेचा अर्ज इंग्रजीतच उपलब्ध आहे. तसेच अनेक कॉलेजांचे राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून होणे बाकी आहे. नॅकसमोर अहवाल व कागदपत्रे सादर करताना इंग्रजीतच असणे बंधनकारक आहे. या कागदपत्रांमध्ये बदल होणार का? अथवा इंग्रजी व मराठी दोनही भाषेत कागदपत्रे तयार करावी लागणार, असा पेच प्रश्न कॉलेज प्रशासनांसमोर निर्माण झाला आहे.

सरकारच्या व विद्यापीठाच्या सूचनेनुसार कार्यालयीन कामकाज मराठी भाषेतूनच होत आहे. कॉलेजेस सर्व नियमांचे तंतोतंत पालन करताहेत. मात्र, नॅक समितीस अहवाल इंग्रजीतच सादर करावा लागतो. यामुळे इंग्रजी व मराठी या दोनही भाषेत सध्या कागदपत्रे तयार केली जात आहे.

- प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी, प्राचार्य, एचपीटी-आरवायके कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविकेच्या पतीची अधिकाऱ्यांना दमदाटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक महापालिकेत नगरसेवकांबरोबरच झेरॉक्स नगरसेवकांची अरेरावी अनेकदा अनुभवास येते. सिडको विभागीय कार्यालयातही शिवसेनेच्या एका झेरॉक्स नगरसेवकाने प्रभागात घंटागाडी येत नसल्याच्या कारणाने थेट कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी हा प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर या व्यक्तीने अधिकाऱ्यांना दमदाटी केली. यापूर्वीही या झेरॉक्स नगरसेवकाने आरोग्याधिकाऱ्याच्या गाडीवर कचरा टाकण्याचा प्रयत्न केला हेाता.

सिडकोतील प्रभाग २७ मध्ये घंटागाडी येत नसल्याची तक्रार करीत प्रभागाच्या नगरसेविका किरण दराडे यांचे पती बाळा दराडे यांनी थेट विभागीय कार्यालयात धाव घेऊन आरोग्य विभागाच्या कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी हा प्रयत्न उधळून लावला. त्यामुळे संतप्त झालेल्या दराडे यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून याप्रकरणी महासभेत आवाज उठविणार असल्याचा दम दिला. त्याचबरोबर सर्व प्रभागांमध्ये घंटागाडी येत असून, आमच्या प्रभागात का येत नाही, असा सवाल केला. यावेळी अधिकारी व दराडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या प्रकारामुळे महापालिका अधिकाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. सिडकोत मागील काही दिवसांपासून घंटागाडी अनियमित येण्याच्या तक्रारी कमी झाल्या असतानाही आजच ही तक्रार कशी करण्यात आली, याबाबत चर्चा सुरू होती.

सिडकोच्या आरोग्य विभागाच्या यापूर्वीही असलेल्या अनेक अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने झेरॉक्स नगरसेवकांनी दमदाटी केल्याचे प्रकार घडले आहेत. महानगर पालिकेच्या कामात झेरॉक्स नगरसेवकांचा अनेकदा हस्तक्षेप होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. सिडकोतही अनेक झेरॉक्स नगरसेवक आपणच नगरसेवक असल्याच्या अविर्भावात अधिकाऱ्यांना दमदाटी करीत असल्याच्या घटना घडल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

$
0
0

येवला तालुक्यातील घटना

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला-नांदगाव राज्य मार्गावर मातूलठाण (ता. येवला) शिवारात मंगळवारी (दि.२६) दुपारी साडेतीनच्या सुमारास टाटा मॅजिक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. भरधाव वेगात समोरासमोर जोरदार धडक होताना अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रवाशी वाहतूक करणारी खासगी टाटा मॅजिक (एमएच १५, सीडी ६५१८) मंगळवारी येवल्याकडून नगरसूलच्या दिशेने जात असतानाच समोरून येणारी होंडा मोटारसायकल (एमएच १७, एल ७१६०) यांच्यात जोरदार धडक झाली. येवला-नांदगाव राज्य मार्गावर येवला तालुक्यातील वडगाव बल्हेच्या पुढे मातूलठाण शिवारात हा अपघात झाला. टाटा मॅजिचा चालक तारिक अहमद मोहम्मद हसन (वय २८, रा. मुल्तानपुरा, येवला) व मोटारसायकल चालक बाळू पंढरीनाथ माळी (वय ३२, रा. वडगाव बल्हे, ता. वला) हे दोघे जागीच ठार झाले. दोन वाहनांमधील धडक इतकी जोरदार होती, की त्यात दोनही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ दोघांना येवला ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी सुरक्षेवर ‘स्मार्ट’ उपाय

$
0
0

शाळेने घटविल्या तासिका; रस्त्यासाठी कामाने केले शैक्षणिक नुकसान

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

स्मार्ट शहरांच्या यादीत लवकरात लवकर ठाण मांडण्याचे स्वप्न बघताना नाशिक महापालिका प्रशासनाच्या आडमुठ्या कारभारामुळे एका शाळेला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तासिका घटवाव्या लागल्या आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची सुरक्षा, असा पेच उभा राहिल्यानंतर शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नाईलाजास्तव हा निर्णय घेतला आहे.

स्मार्ट सिटी संकल्पनेंतर्गत शहरातील अशोक स्तंभ ते त्र्यंबकरोड या मार्गावरील रस्त्याच्या कामास ऐन पावसाळ्यात सुरुवात करण्यात आली आहे. या मार्गावर काम सुरू करताना या परिसरात येणाऱ्या शासकीय कन्या विद्यालय, डी. डी. बिटको बॉइज हायस्कूल आणि डी. डी. बिटको गर्ल्स हायस्कूल या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या गैरसोयीचा विचार प्रशासनाने केला नाही. विकासाच्या कामास कुणाचाही विरोध नसला तरीही नियोजनपूर्वक काम झाले असते तर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गाची पर्यायी व्यवस्था करता आली असती. याबाबत शाळा सुरू झाल्यानंतर पालक वर्गातून ओरड झाल्यानंतर प्रशासनाने शाळेच्या मागील बाजूच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमनजिकच्या एका पायवाटेद्वारे विद्यार्थ्यांना मार्ग उपलब्ध करून दिला. मात्र, शहरात सोमवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळल्याने मंगळवारी या पायवाटेची अवस्था बिकट झाली व विद्यार्थ्यांना येथून ये-जा करणे अशक्य बनले. शाळेच्या समोर ऐन पावसाळ्यात खणून ठेवलेला रस्ता तर पर्यायी पायवाटेवर चिखलाचे राज्य. या स्थितीमुळे अखेर दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या डी. डी. बिटको बॉईज आणि गर्ल्स हायस्कूलमधील दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या अखेरच्या एक ते दोन तासिका कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे सुरक्षित प्रवास करता येणार आहे.

शाळेचा परिसर तसा बाराही महिने गजबजलेला आहे. शाळेसमोर जुने सीबीएस, कोर्ट, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य चौकांमध्ये जाणारे रस्ते असल्याने या मध्यवर्ती परिसरात वाहन थांबविणे तसे रस्ते चांगले असतानाही शक्य होत नाही. यातच ऐन पावसाळ्यात आता रोडचे 'स्मार्ट' काम महापालिकेने उकरून काढल्याने शाळेत ये-जा करणे विद्यार्थ्यांसाठी जिकीरीच बनले आहेत.

तासभर अगोदर सुटी!

शाळेत विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी येणारे पालक व शालेय वाहनांना जवळपास थांबणे शक्य होत नाही. परिणामी, येथून प्रवास करताना धोका निर्माण होतो, हे लक्षात घेऊन दुपारच्या सत्रातील नियमित वेळेप्रमाणे सायंकाळी ५.१० वाजता सुटणारी शाळा आता तासभर अगोदरच सोडण्याची तयारी सुरू होते. अखेरच्या टप्प्यातील शक्य त्या तासिका रद्द करून विद्यार्थ्यांना पालक आणि शालेय वाहनांपर्यंत पोहचवून विद्यार्थी सुरक्षेस प्राधान्य दिले जाते.

शाळेलगतच्या रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू असल्याने येथून विद्यार्थ्यांना शाळेत येणे-जाणे कठीण बनले आहे. पर्यायी पायवाटेचीही अवस्था पावसाने बिकट झाली आहे. विद्यार्थी सुरक्षेच्या मुद्द्याला प्राधान्य देत दुपारच्या सत्रातील शेवटच्या टप्प्यात शक्य त्या तासिका कमी करण्यात आला आहे. शालेय वाहने किंवा पालकांपर्यत विद्यार्थ्यांना सुरक्षित पोहचविण्यासाठी हा निर्णय शालेय प्रशासनास घ्यावा लागला आहे.

- रेखा काळे, मुख्याध्यापिका, डी. डी. बिटको बॉईज हायस्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images