Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘त्या’ शिक्षकांना निलंबित करा

$
0
0

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थिनींशी असभ्य वर्तणूक करणाऱ्या शिक्षकांना तत्काळ कायमस्वरुपी निलंबित करा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. विद्यार्थिनींची सुरक्षा आणि शिक्षकांकडून होणारे अत्याचार याबाबत पदाधिकाऱ्यांनी महापालिका शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांची भेट घेतली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिकच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली साक्षी पठाडे या विद्यार्थिनीच्या हस्ते उपासनी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की महापालिका हद्दीत अनेक इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळा आहेत. गेल्या काही महिन्यांत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनींना टवाळखोर मुलांपासून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास दिला जातो. यामुळे अनेक विद्यार्थ्यांनींनी शाळेत जाणे बंद केले आहे. सेंट फ्रान्सिस हायस्कूलमधील सुनील कदम नावाच्या शिक्षकाने तर अतिशय लज्जास्पद कृत्य केल्याचे उघडकीस आले. विद्यार्थ्यांमध्ये आई-वडिलांनंतर शिक्षकाचे स्थान आदराचे असते. परंतु, या शिक्षकाच्या कृत्यामुळे शिक्षकवर्गालाच काळिमा फासला गेला आहे. या शिक्षकावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, हिना शेख, प्रतिभा भुजबळ, विभागीय अध्यक्षा आशा भंदुरे, संगीता गांगुर्डे, पुष्पा राठोड, संगीता सानप, रजनी चौरसिया, मीनाक्षी गायकवाड, सुरेखा पठाडे, रंजना गांगुर्डे, वैशाली तायडे यांनी केली. तसेच, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने शिक्षण विभागांनेही शाळांना कडक निर्देश द्यावेत, असे प्रकार होऊ नये याची खबरदारी घ्यावी, अशी विनंती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२३ शाखांचे विलीनीकरण

$
0
0

आर्थिक बचतीसाठी बँकेचे प्रयत्न; नोकरभरतीही तपासणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी अध्यक्षांनी आवश्यकता नसलेल्या २३ शाखांचे नजीकच्या शाखांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वार्षिक तीन कोटींचा खर्च वाचणार असल्याचा माहिती बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली. एकीकडे गरज नसलेल्या शाखा बंद करण्याचा धडाका सुरू झाला असला तरी, या शाखांसाठी अपुरे मनुष्यबळ असल्याचे कारण सांगत यापूर्वी झालेली नोकरभरतीही वादात सापडल्याचे चित्र आहे.

सन २०१६-१७ मध्ये अनावश्यक कर्जवितरण आणि २०१८-१९ या आर्थिक वर्षात कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांनी कर्जफेडीकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हा बँक सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची घसरती आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विद्यमान अध्यक्ष केदा आहेर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्याची स्थिती लक्षात घेता बॅँकेच्या प्रशासनाने प्रत्येक शाखेनिहाय होणारे व्यवहार व त्यातून बॅँकेला मिळणारा लाभ तसेच, प्रशासकीय खर्च याचा ताळमेळ घेण्यास सुरुवात केली होती. त्यातून पहिल्या टप्प्यात बँकेच्या २३ शाखांमध्ये अल्प व्यवहार होत असल्याचे समोर आले आहे. या शाखांमध्ये उलट प्रशासकीय खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, कार्यालयीन खर्चाचे प्रमाण पाहता या शाखा तोट्यात असल्याचे आढळून आले. त्यानुसार प्रशासनाने या बॅँक शाखांचे विलीनीकरण करण्याचा सादर केलेल्या प्रस्तावास संचालक मंडळाने मंजुरी दिली. त्यानुसार येत्या ३० जूनपर्यंत या शाखांचे विलीनीकरण नजीकच्या बँक शाखांमध्ये केले जाईल.

नोकरभरती तपासणार!

जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही यापूर्वी संचालक मंडळाने शाखांमध्ये मनुष्यबळ कमी असल्याचे सांगत जवळपास ४०० कर्मचाऱ्यांची भरती केली होती. या भरतीतून मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचाही आरोप करण्यात आला होता. या शाखांमध्ये उत्पन्नापेक्षा कर्मचारीच जास्त आढळून येत असल्याने यापूर्वी करण्यात आलेली नोकरभरतीची गरज होती काय? हे तपासण्याची वेळ आली आहे. नोकरभरतीची आवश्यकता तपासल्यास अनेकांचे बुरखेही फाटले जाण्याची शक्यता आहे.

विलीनीकरण होणाऱ्या शाखा

नाशिक नगरपालिका (आग्रारोड नाशिक), मॉडेल कॉलनी (आनंदवल्ली), दरी (मखमलाबाद), देवळालीगाव (नाशिकरोड), पळसे शूगर (शिंदे), गांधीनगर (देवळाली नाका), लहवित कक्ष (भगूर), चास (नांदूरशिंगोटे), मऱ्हळ बु. (वावी), बारागाव प्रिंपी (मार्केट यार्ड सिन्नर), पिंपळस (भाऊसाहेब नगर), वाकद (शिरवादे वाकद), गोंदेगाव (विंचूर), लासलगाव (मार्केट यार्ड लासलगाव), मुखेड गोंडेगाव (पिंपळगाव बसवंत), येवला (मार्केट यार्ड येवला), विराणे (वडनेर खाकुर्डी), पाडळदे (सायणे बु.), मालेगाव कॅम्प (मार्केट यार्ड मालेगाव), टिळकरोड मालेगाव (वसंतवाडी मालेगाव), तळवाडे (रावळगाव), सटाणा शहर (सटाणा), सांजेगाव (वाडीवऱ्हे).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांची बेसुमार लूट

$
0
0

प्रवाशांची बेसुमार लूट

-

एसटीच्या संपामुळे खासगी वाहनांचे भाडे दुप्पट; रेल्वेला पसंती

-

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एसटी कर्मचाऱ्यांच्या अचानक पुकारलेला संप दुसऱ्या दिवशी कायम असल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागला. शनिवारी (दि. ९) तुरळक ठिकाणी बससेवा सुरू असली तरी त्याची शाश्वती नसल्यामुळे बसस्टॅण्डवर गर्दी कमी झाली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाची संधी साधत दुसरीकडे खासगी वाहन धारकांनी दुप्पट भाडेवाढ करत बेसुमार लूट सुरू केल्याचे चित्र दिसून येत होते. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. खासगी वाहनांची ही भाडेवाढ नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी आज या विषयावर बैठक घेणार आहेत.

रिक्षाचालकांनी घेतला फायदा

संप सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्या दिवशी ४६४७ फेऱ्यापैकी १०३६ पूर्ण झाल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशी फक्त ६५४ फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या. त्यात १५० फेऱ्या या नाशिक सिटीबसच्या होत्या. या फेऱ्यांमध्ये मोठी घट झाली असून, कर्मचाऱ्यांचा विरोध तीव्र होत असल्याचे चित्र आहे. बसच्या संपामुळे वाहतूक सुरळीत राहवी यासाठी आरटीओने विविध खासगी वाहनांना सेवा देण्याचे आवाहन केले. मात्र, यावेळी त्यांनी भाडेवाढीकडे दुर्लक्ष केले. सिटीबसची सेवा दुसऱ्या दिवशीही विस्कळीत होती. पण, शनिवारी औद्योगिक वसाहतीला असलेल्या सुटीमुळे चाकरमान्यांची संख्याही कमी होती. या बस बंद असल्यामुळे रिक्षाचालकांनी या संधीचा फायदा घेत प्रवाशांची लूट केल्याच्याही तक्रारी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

बसस्टॅण्ड पडले ओस

एसटीची वाहतूक तुरळीत प्रमाणात सुरू असली तरी प्रवाशांनी बस स्टॅण्डकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. त्यामुळे बस स्टॅण्ड ओस पडल्याचे चित्रही शहरात दिसत होते. शनिवार व रविवार सरकारी कार्यालयांना सुटी असल्यामुळे गर्दीचा ओघही कमी झालेला जाणवत होता.

नाशिकरोडलाही शुकशुकाट

या संपाबाबत पूर्वकल्पना नसल्याने व्यवस्थापन हतबल झाले. अनेक प्रवासी स्टॅण्डवरच अडकून पडले होते. त्यांना जादा पैसे मोजून खासगी ट्रॅव्हल्स, टॅक्सी, रिक्षा यांचा आश्रय घ्यावा लागला. गर्दीने नेहमी गजबजणाऱ्या नाशिकरोड बसस्थानकावर शनिवारीही शुकशुकाट होता. एसटी बरोबरच शहर वाहतुकीच्या बसही धावत नव्हत्या. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रवासी येतात. त्यांच्यासाठी शहराच्या विविध भागांसाठी बसस्थानकावर बस उपलब्ध असतात. संपामुळे बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे रिक्षा व टॅक्सी चालकांनी दामदुप्पट पैसे घेतले.

प्रवाशी वळाले रेल्वेकडे

नाशिकरोड : वेतनवाढीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.९) दिवसभरात नाशिकरोड बसस्थानकावरून शहरी बससेवेच्या ९४ तर ग्रामीण बससेवेच्या २० फेऱ्या झाल्याने काही प्रमाणात संपाची तीव्रता कमी झाली. या संपाची व्याप्ती राज्यभर असल्याने संपाच्या दुसऱ्या दिवशी रेल्वेने प्रवासास प्रवाशांनी पसंती दिल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रवाशांच्या गर्दीने खच्चून भरलेले होते.

एसटी कर्मचाऱ्यांनी दि. ८ मेपासून अचानक संप पुकारल्याने शहर व ग्रामीण बससेवा ठप्प झाली आहे. या संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी बहुतांश प्रवाशांनी रेल्वेने प्रवासासाठी प्राधान्य दिल्याचे दिसत होते. जिल्ह्यातील नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, देवळाली, इगतपुरी या रेल्वे स्थानकांवर शनिवारी प्रवाशांची गर्दी वाढली होती. नाशिकरोडकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बहुतांश गाड्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम म्हणून शनिवारी अचानक गर्दी वाढल्याचे दिसत होते. राज्यराणी, पंचवटी, गोदावरी, सेवाग्राम, जनता एक्स्प्रेस, तपोवन या गाड्यांना मोठी गर्दी होती.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा आधार घेतला. मात्र, सकाळी मुंबईला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे हाल कायम आहेत. नवीन पंचवटी सुरू झाल्यावर ते कमी होतील अशी अपेक्षा होती. मात्र, नवीन गाडीत पूर्वीपेक्षाही कमी जागा आहे.

-सुभाष पाटील, प्रवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिल्पकार होण्यासाठी आधी चित्रकार बना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मातीमध्ये काम करण्याचा प्रवास चित्रकलेतून होतो. चित्रकला चांगली असेल, तर कलेच्या कोणत्याही प्रांतात यशस्वी होता येते. मात्र, कलेत यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट शोधू नका. जर तुम्हाला शिल्पकार व्हायचे असेल, तर त्यापूर्वी चित्रकार व्हा, अशा टिप्स प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी उभरत्या कलावंतांना दिल्या.

'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'कलासंगम' महोत्सवात शनिवारी कांबळे यांच्या शिल्पकलेचे डेमोन्स्ट्रेशन व संवादाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील शिल्प व चित्राची आवड असणाऱ्या विद्यार्थी, व्यक्तींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून शिल्पकलेतील बारकावे, डेमोसह जाणून घेतले. यावेळी कांबळे यांनी त्यांच्या आजवरच्या प्रवासातील अनुभव स्पष्ट केले. शिल्पकलेत करिअर करण्यासाठी खूप मेहनत लागते. कोणत्याही कलेत यश मिळविणे हे एखाद्या तपश्चर्येपेक्षा कमी नाही. शिवाय, कोणत्याही कलेत प्रावीण्य मिळविण्यासाठी मोठ्या क्षमतेची, सातत्याची आवश्यकता आहे. पण, एकदा मात्र तुम्ही स्वत:ला सिद्ध केले, की हीच कला तुम्हाला मोठा आनंद देईल व तुमचे कामच तुमची ओळख बनेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लाइव्ह चित्र व शिल्प सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कॅलिग्राफीचे सुरेख सादरीकरण

कॅलिग्राफी आर्टिस्ट महेंद्र जगताप यांनी इंग्रजीतील मूळाक्षरे, नावे विविध टूल्स वापरून कॅलिग्राफीचे तंत्र अगदी सोप्या पद्धतीने सादर केले. स्टँडिंग लाइन, स्लीपिंग लाइन, त्रिकोण, अर्धत्रिकोण हे स्पंज टूल, मेटल टूल, स्पंज रोलर वापरून अक्षरांची सुरेख मांडणी अवघ्या काही सेकंदांत, मिनिटांमध्ये केली. कॅलिग्राफी टूल कसे पकडायचे, कोणत्या पद्धतीच्या अक्षरांसाठी कोणते टूल वापरावे आदी माहितीदेखील त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. कॅलिग्राफीच्या वळणांबाबत, अक्षरांबाबत उपस्थितांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळेच या डेमोन्स्ट्रेशनला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पादचाऱ्याचा मोबाइल खेचला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रस्त्याने मोबाइलवर बोलत चाललेल्या तरुणाच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील चोरट्याने ओरबाडून नेल्याची घटना द्वारका परिसरात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशन जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलींद मधुकर भालेराव (रा. वनराज हौ. सोसा. द्वारका) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. गुरुवारी रात्री घराजवळ रस्त्याने ते पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्यांनी त्यांच्या हातातील २३ हजार रुपये किमतीचा मोबाइल खेचून नेला.

--

चार मोटारसायकल चोरीस

चार मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्याप्रकरणी गंगापूर, आडगाव आणि मुंबईनाका पोलिसस्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर येथील प्रकाश हिरामण गोतरणे यांची दुचाकी (एमएच १५ एफएस ४२१९) सर्वज्ञ बिल्डिंगच्या पार्किंगमधून, सिडकोतील सौरभ पगार यांची दुचाकी (एमएच १५ बीएस ४०११) बलराम नगर येथील स्वप्नसंकूल अपा.च्या पार्किंगमधून, तर गोल्फ क्लब मैदान परिसरातून खडकाळी भागात राहणारे मुक्तार सलीम सय्यद यांची दुचाकी (एमएच १५ डीव्ही ७१२६) चोरट्यांनी चोरून नेली. राजेंद्र दत्तात्रेय पुराणीक (रा. नववेद अपा. आदित्यनगर,रविशंकर मार्ग) यांचीही दुचाकी (एमएच १५ एफएल ५६७६) सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी पळवून नेली.

--

डिक्कीतील पर्स लंपास

गार्डन परिसरात पार्क केलेल्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीतून रोकड व दागिने असा सुमारे नऊ हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. या प्रकरणी शिवानी माहोरिया (रा. नवीन पंडित कॉलनी) या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिसात योगेश जाधव व अभिषेक पाटील या

संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवानी (रा. नवीन पंडित कॉलनी) या युवती सायंकाळी फिरण्यासाठी प्रमोद महाजन गार्डन भागात गेली होती. गार्डनच्या प्रवेशद्वारावर तिने आपली दुचाकी पार्क केली असता जवळ उभ्या असलेल्या भामट्यांनी बनावट चावीने डिक्की खोलून पर्स पळवून नेली. पर्स मध्ये सहा हजाराची रोकड व चांदीचे दागिने असा नऊ हजार रूपये किमतीचा ऐवज होता.

--

दुकानास टाळे ठोकले

उधारीच्या वादातून ग्राहकांना बाहेर काढीत एकाने किराणा दुकानास टाळे ठोकल्याची घटना घनकर लेन परिसरात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ अशोक वैश्य असे दुकानास टाळे ठोकणाऱ्या संशयीताचे नाव आहे. प्रशांत गणेश कोळसकर (रा. आदर्शनगर, रामवाडी) यांनी तक्रार दाखल केली. कोळसकर सिद्धी विनायक धान्य व किराणा भांडार दुकान आहे. वैश्य यांच्याकडून ते उधारीवर माल घेतात. दरम्यान कोळसकर शुक्रवारी सांयकाळी दुकानात असतांना संशयीत तेथे आला व शिवीगाळ केली. तसेच संशयीतांने ग्राहकांसह मालकास दुकानाबाहेर काढून दुकानाला टाळे ठोकले.

--

विवाहितेचा विनयभंग

पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाप्रसंगी पतीच्या बचावासाठी धावून आलेल्या पत्नीचा संशयितांनी विनयभंग केल्याची घटना जयभवानी रोड भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू दौंड व त्याचे तीन साथीदार अशी संशयीतांची नावे आहेत. साई किरण सोसायटीत राहणारे दांम्पत्य २६ मे रोजी रात्री आपल्या घरात असतांना ही घटना घडली. संशयितांनी तक्रारदारास घराबाहेर बोलावून वाद घातला ही बाब विवाहितेच्या लक्षात येताच ती आपल्या पतीच्या बचावासाठी धावून येताच संशयितांनी तिचे कपडे फाडून विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक मुळे करीत आहेत.

--

गंजमाळला जुगारी गजाआड

गंजमाळ परिसरातील हॉटेल रॉयल हेरिटेज भागात उघड्यावर जुगार खेळणाऱ्या सहा जुगारींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. संशयितांकडून रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी छापा टाकला असता शंकर शेट्टी व त्याचे पाच साथीदार पत्यांच्या कॅटवर पैसे लावून जुगार खेळतांना मिळून आले. याप्रकरणी पोलिस शिपाई साहिल सय्यद यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार ढोली करीत आहेत.

--

दुचाकी घसरून एक ठार

पादचारी महिलेस वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून जखमी झालेल्या चालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री जुने आडगाव पोलिस ठाण्यासमोर झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संदीप जगन्नाथ मंडलीक (३५ रा.शिवाजीनगर,ओझरमिग,ता.निफाड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. संदीप सोमवारी रात्री आपल्या दुचाकीने नांदूरनाक्याकडे जात असतांना हा अपघात झाला. जुने आडगाव पोलिस ठाणे मार्गाने ते नांदूरनाक्याकडे प्रवास करीत असतांना अचानक वळणावर पादचारी वृद्धा समोर आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरली होती. या अपघातात संदीप जखमी झाले होते. त्यांना तातडीने नजीकच्या अपोलो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

--

नानावलीत एकाची आत्महत्या

जुने नाशिक परिसरातील नानावली भागात राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उमर दाऊद अत्तार (५० रा.घर नं. ३८९२ नानावली दर्गाजवळ) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनप्रकरणी मुख्य संशयित गजाआड

$
0
0

धुळे पोलिसांकडून पारोळ्यात अटक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील देवपूर परिसरात दत्तमंदिर भागात शुक्रवारी सायंकाळी आपसातील वादामध्ये पिता-पुत्राचा खून करण्यात आला. या घटनेतील हल्लेखोरांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले असून, याप्रकरणी संशयित म्हणून माजी नगराध्यक्षलादेखील चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले आहे. तर खून झालेल्या पिता-पुत्रावर शनिवारी शवविच्छेदनानंतर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

धुळे शहरातील दत्तमंदिर परिसरात सरस्वती कॉलनीत राहणारे रावसाहेब दगाजी पवार आणि शहरातील गल्ली क्रमांक सहा मध्ये राहणारे माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. घटना घडल्यानंतर जयराज हा महामार्गावरील ट्रकला हात देऊन पारोळ्याकडे फरार झाला होता. मात्र, पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पारोळा पोलिसांना याची माहिती देत त्यास पकडण्यास यश मिळविले. पारोळा ग्रामीण रुग्नालयात जयराज उपचार घेत असल्याचे समजताच धुळे पोलिस पथकाने पारोळा येथे जाऊन जयराजला ताब्यात घेतले. तर उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

गेल्या आठवड्यात रावसाहेब पाटील यांनी बाजीराव पवार यांना तुमच्यातील काही मुलांनी आमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात जयराज व त्याचे साथीदारांना समजून सांगून तसेच भेटून वाद मिटवूण टाका, असे सांगितले होते. मात्र, बोरसे नगरात राहणारा जयराज पाटील हा दि. ८ मे रोजी साथीदारसोबत रावसाहेब पाटील यांना दिसताच त्यांनी त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी जयराजसोबत असलेल्या साथीदारांनी रावसाहेब पाटील यांचा मुलगा वैभववर हल्ला करीत जखमी केले. तसेच प्रशांत पाटील यांच्यावर वार करून पसार झाले. यानंतर प्रशांत पाटील यांनी आपल्या कारमध्ये रावसाहेब व वैभव यांना जखमी अवस्थेत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैभवची वैद्यकीय तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला होता तर रावसाहेब पाटील यांचा उपचारादरम्यान रात्री ९ वाजेला मृत्यू झाला. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात प्रशांत पाटील यांच्या फिर्यादीवरून माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार, गौरव पवार, जयराज पाटील, ऋषिकेश पाटील, वैभव पवार, हर्षल रवींद्र पाटील, भूपेंद्र वाल्मिक पाटील, भूषण बाबूराव कापकर (सर्व रा. धुळे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

mail derail:मुंबई-हावडा मेलचे तीन डबे घसरले

$
0
0

नाशिक:

मुंबईवरून हावडाला जाणाऱ्या मुंबई-हावडा मेलचे तीन डबे रेल्वे रुळावरून घसरले. रात्री १२ वाजता इगतपुरी स्टेशनजवळ ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र मेलचे डबे घसरल्याने या मार्गावरून जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या १२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

रात्री १२ वाजता झालेल्या या अपघातामुळे पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेससह १२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या इतर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई-पटना एलटीटी-पाटलीपुत्र एक्स्प्रेस व मुंबई-बनारस महानगरी एक्स्प्रेस या गाड्यांचे मार्ग बदलून त्या पुणे मार्गे सोडण्यात आल्या आहेत.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाला घसरलेले डबे बाजूला काढण्यात यश आले आहे. प्रशासनाने मुंबईकडे जाणारी अप लाईन मोकळी केली असून त्यावरून धीम्या गतीने काही गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र डाऊन लाईन अजून ही बंद असल्याने दिल्ली व उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्याचा खोळंबा झाला आहे. रेल्वे प्रशासनाने गाडीतील प्रवाशांसाठी मनमाड येथे चहा, नाष्ट्याची व्यवस्था केली आहे. सध्या मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

64526137

या नंबरवर संपर्क करा...

>> कल्याण: ०२५१-२३११४९९
>> दादर: ०२२-२४११४८३६
>> इगतपुरी: ०२५५३-२४४०२०

पुणे-दौंडमार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या

>> ११०५७ CSMT- अमृतसर एक्सप्रेस
>> १५६४५ LTT- गुवाहाटी एक्सप्रेस
>> १२१६७ LTT- वाराणासी एक्सप्रेस

वसई रोड- सूरत- जळगाव मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या

>> ११०९३ CSMT-वाराणासी महानगरी एक्सप्रेस
>> १२१४१ LTT-पाटलीपुत्र एक्सप्रेस
>> १५०६६ पनवेल-गोरखपुर एक्सप्रेस
>> १२८११ LTT-हटिया एक्सप्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार पलटली; शिवशाही धडकली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावर पळसे गावाजवळील पुलावर तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोन जण जखमी झाला तर दोन वाहनांचे नुकसान झाले. किशोर विजयविठ्ठल माथड (रा. थत्तेनगर, कॉलेजरोड, नाशिक) यांच्या फिर्यादीवरून या अपघाताची नोंद नाशिकरोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

माथड यांच्या मालकीची होंडा डॉल्फिन कार (एमएच १५ बीएन ९१४६) चालक चेतन सुरेश हिरे (रा. ओझरखेड कॉलनी, दिंडोरी) हा हैदराबाद येथील घेऊन नाशिकच्या दिशेने येत होता. पळसे गावाजवळील महामार्गावरील पुलावर शुक्रवारी रात्री पुढे जाणारी इर्टिका कार (एमएच ४१ एएस ०१५२) अचानक पलटली. त्यामुळे चेतन हिरे याने आपली कार तात्काळ थांबविली. याच वेळी पाठीमागून वेगाने आलेली राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस (एमएच ०६ बीडब्ल्यू ०१९६) जोराने येऊन धडकली. परिणामी चेतनच्या ताब्यातील डॉल्फिन कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातात चेतनसह इर्टिका कारचा चालक शेख आकम शेख बशिद (रा. मालेगाव) हा देखील किरकोळ जखमी झाला. शिवशाही बसचा चालक भाऊसाहेब बाबुराव चव्हाण (रा. म्हसरुळ) याच्या विरोधात माथड यांच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ड्रायव्हरवर हल्ला

नाशिकरोड : ओळखीच्या व्यक्तीचे खिसे जबरदस्तीने चाचपडत असल्याचे लक्षात आल्यावर जाब विचारणाऱ्या ड्रायव्हरवर हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना रेल्वे मालधक्का परिसरात शनिवारी (दि. ९) रात्री उशिरा घडली. पप्पू सोनू घोडके (वय २१, रा. रमाबाई आंबेडकरनगर, मालधक्का रोड, देवळालीगाव) असे हल्ल्यात जखमी झालेल्या ड्रायव्हरचे नाव आहे. पप्पू याच्या परिचयाच्या काडू मुंडे याला रस्त्यात अडवून भुऱ्या चारोळे नावाचा टवाळखोर त्याचे खिसे चाचपडत होता. ही बाब पप्पूच्या लक्षात आली. त्याने काळू मुंडे याच्या मदतीला जात भुऱ्या चारोळे यास जाब विचारला. भुऱ्याने पप्पू याच्याशी वाद घालून त्याच्या डोक्यात लोखंडी पट्टी मारून जखमी केले. हल्ल्यानंतर भुऱ्या फरार झाला. जखमी पप्पू घोडके यास विजय पवार याने महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पप्पूच्या जबाबावरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात भुऱ्या याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दुचाकीची चोरी

नाशिकरोड : शिंदे गावातील राजयोग लॉन्सच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद कार्तिक अर्जुन डांगे (रा. शिंगवे बहुला) यांनी नाशिकरोड पोलिसात दिली आहे. त्यांच्या मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी डांगे हे राजयोग लॉन्समध्ये गेले होते. त्यांनी लॉन्सच्या पार्किंगमध्ये दुचाकी (एमच १५ सी वाय ९७७५) उभी केलेली होती. मात्र, पुन्हा गेले असता त्यांना दुचाकी आढळून आली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुण गोळीबारप्रकरणी तीन संशयितांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

म्हसरुळ येथील एकतानगरात झालेल्या गोळीबारात फरार दोन संशयितांना अटक करण्यात आली. गोळीबार केल्यानंतर संशयितांना फरार होण्यास मदत करणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघा संशयितांकडील दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गोळीबार का केला याचा मात्र, अजूनही उलगडा झाला नाही.

एकतानगर येथे बुधवारी (दि. ६) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास नितीन दिलीप परदेशी हा युवक साती आसरा मंदिराजवळ असलेल्या बाकड्यावर बसलेला होता. तेथे दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी त्याच्या डोक्यात जवळून गोळी मारली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला, शेजारच्या रहिवाशांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसांच्या उपचारात डॉक्टरांनी अथक प्रयत्नानंतर नितीन परदेशी याचा शुक्रवारी (दि. ८) रात्री ११ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

म्हसरुळ पोलिस स्टेशनमध्ये अगोदर मारण्याचा प्रयत्न असा अज्ञात संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात वाढ करून हत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला. गोळीबारात संशयितांना फरार होण्यास मदत करणाऱ्या विजयकुमार पुंडलिक गांगोडे (वय २१, रा. फ्लॅट नं. ३२, वेदश्री अपार्टमेंट, चाणक्यपुरी सोसायटी) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. म्हसरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी मुख्य संशयितांना अटक करण्यासाठी तीन पथकांची निर्मिती केली. रविवारी (दि. १०) पहाटेच्या सुमारास संशयित मयूर राजाराम जाधव (२२, रा. श्रीएकता अपार्टमेंट, बोरगड) आणि हितेश उर्फ चिक्या रवींद्र केदार (२३, रा. वेदांत अपार्टमेंट चाणक्यपुरी, मखमलाबाद लिंकरोड) यांना अटक केली. त्यांच्याकडून गोळीबारानंतर फरार होण्यासाठी वापरलेली दुचाकी (एमएच १५ ईक्यू ९६१४) ही दुचाकी जप्त केली.

हाणामारी करणाऱ्या संशयितांची धिंड

जेलरोड : नाशिक-पुणे मार्गावरील आंबेडकरवाडीत तीन दिवसांपूर्वी दोन गटात हाणामारी झाली होती. त्यात एकाला गंभीर जखमी करणाऱ्या संशयितांची उपनगर पोलिसांनी समतानगर, आंबेडकर पुतळा, पंचशीलनगर, शिवाजीनगर आदी भागातून धिंड काढली. यामुळे परिसरातील तणाव दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. कुणाल साळवे, कुणाल भालेराव अशी या संशयितांची नावे असून यापूर्वी संशयितांवर विविध गुन्हे दाखल झाले आहेत. उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी अकरा वाजता संशयितांची धिंड काढण्यात आली. पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण, गणेश जाधव, महेंद्र चव्हाण आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदेशी सिगारेटसाठा पंचवटीमध्ये जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विक्रीस बंदी असलेल्या विदेशी सिगारेटची राजरोस विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी मयुरेश ट्रेंडर्स या दुकानावर छापा टाकून सुमारे २२ हजार रुपयांचा सिगारेटचा साठा जप्त केला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत कोपटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने कारवाई केली. गोरेराम लेन भागातील मयुरेश महाले (रा. शनी मंदिराजवळ) यांच्या दुकानात मोठ्या प्रमाणात विदेशी सिगारेटचा साठा असल्याची माहिती युनिट १ चे सहाय्यक निरीक्षक दीपक गिरमे यांना मिळाली. त्यानुसार, शुक्रवारी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. वैधानिक इशारा आणि चिन्ह नसलेल्या विदेशी सिगारेटला राज्यात विक्रीस बंदी असताना संशयित मोठा साठा करून तो शहरातील विक्रेत्यांना पुरवित असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता संशयिताच्या दुकानात २२ हजार रुपयांचा विदेशी सिगारेटचा साठा आढळून आला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात कोपटा अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. युनिटचे निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, एस. एम. वाघ, दीपक गिरमे, उपनिरीक्षक पालकर, जमादार चंद्रकांत पळशीकर, जाकीर शेख, हवालदार रवींद्र बागूल, अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे, संजय मुळक, वसंत पांडव, प्रवीण कोकाटे, येवाजी महाले, विजय गवांदे, पोलिस नाईक आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, मोहन देशमुख, शिपाई विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, गणेश वडजे, राहुल पालखेडे, रावजी मगर, शांताराम महाले, प्रवीण चव्हाण, प्रतीभा पोखरकर, दीपक जठार आदींच्या पथकाने कारवाई केली.

पतीची आत्महत्या

जेलरोड : पत्नी व तिच्या नातेवाईक त्रास देत असल्याच्या कारणाने पतीने आत्महत्या केल्याचा प्रकार विहितगाव येथे घडला. उपनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज लतीफ पठाण (२५, रा. विहितगाव, मारुती मंदिरासमोर, नाशिकरोड) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पत्नी शहनाज पठाण व तिचे नातेवाईक जावेद, फरीद व अशफाक या चौघांनी फिरोजचा सातत्याने छळ केल्याची तक्रार आहे. इम्तियाज नूरमोहम्मद यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारचा परिसंवाद--छायाप्रकाश कालचा की आजचा

$
0
0

डिजिटलमुळे छायाचित्रातील कला हरवतेय!

छायाप्रकाश कालचा की आजचा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फोटोग्राफी ही एक कला आहे, साधना आहे. प्रकाशाचा अभ्यास करण्याचे आणि त्या प्रकाशाच्या उजेडात मानवी चेहऱ्यावरील भावना टीपण्याचे फोटोग्राफी हे एक शास्त्र आहे. काळानुसार या कलेत बदल होत असले तरी 'मॅन बिहाईंड द कॅमेरा'चे महत्त्व आजही आहे. मात्र तसेच आताच्या डिजिटल मोबाइलमुळे छायाचित्र ही कला हरवत आहे. तरीही ज्याला प्रकाश कळला, दिसला अन् त्या प्रकाशात चेहरा वाचता आला तोच खरा छायाचित्रकार. छायाचित्रणातील अशा अनेक रंगछटा कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा हॉलमध्ये 'छायाप्रकाश कालची की आजचा'या परिसंवादात उमटल्या.

परिसंवादात ज्येष्ठ छायाचित्रकार धनंजय गोवर्धने, प्रसाद पवार, समीर बोंदार्डे यांनी आपापल्या काळातील फोटोग्राफीतले अनेक रंग, छटा रसिकांसमोर उलगडल्या. छायाचित्रकार संजय अमृतकर यांनी मान्यवरांशी मनमोकळ्या गप्पा मारताना छायाचित्र या कलेतील कृष्णधवल ते डिजिटल अशी छानशी सैर घडवून आणली. फोटोग्राफी मग ती कालची अवघड होती, की आजची सहज-सोपी आहे. त्यावेळचा नैसर्गिक प्रकाश की आजचा शटरचा स्पीड आणि अॅप्रेचरची सांगड, की आजची डिजिटलची इफेक्टची किमया, अशा अनेक पैलूंचे निरनिराळे पदर या परिसंवादात उलगडत गेले.

धनंजय गोवर्धने यांनी साधारणपणे चार-पाच दशकांपूर्वीचे छायाचित्रण कसे होते यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, कॅमेरा जुना असो की आताचा डिजिटल, डीएसएलआर याला महत्त्व नाही. त्यामागचा माणूस महत्त्वाचा. कॅमेरा एक तंत्र आहे. मात्र ते तंत्र कोणत्या प्रकाशात चालवायचे, त्याच्या व्ह्यू फाईंडरमधून प्रकाशमान झालेला मानवी चेहरा कसा टिपायचा हे ज्याला कळले तो उत्तम फोटोग्राफर. दिसणं आणि पाहणं यात फरक आहे. फोटोग्राफर हा कॅमेरातून दिसणाऱ्या असंख्य बाबींकडे दुर्लक्ष करून केवळ एकाच गोष्टीकडे पाहत असतो. आणि योग्य प्रकाश, पाहिजो तो भाव दिसताच 'क्लिक' करतो, हीच खरी कला आहे.

प्रसाद पवार यांनी पूर्वीची आणि आताची अशा दोन्ही काळातील फोटोग्राफीवर प्रकाश टाकला. अजिंठा लेण्यांमध्यील मूर्तींच्या चेहऱ्यांवरील भाव टिपताना आलेले अनुभव कथन करताना प्रेक्षक भारावून गेले होते. ते म्हणाले, चित्रकार अनेक दिवस एका चित्रावर काम करीत असतो. त्याला जे सांगायचे असते ते त्या चित्रातून तो सांगत असतो. मात्र यात खूप वेळ जातो. याऊलट फोटोग्राफी ही एक अशी कला आहे जी कमीत कमी वेळात खूप काही सांगून जाते. पण तरीही छायाचित्र आणि पेंटिंग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र आज खूप कमी वेळात फोटो हातात येत असल्यामुळे त्यातील उत्सुकता कमी झाली आहे. 'वेटिंग पिरेड' कमी झाला आहे. तरीही चांगल्या फोटोसाठी खूप वाट पहावीच लागते, जास्त काम करावेच लागते.

समीर बोंदार्डे यांनी डिजिटल फोटोग्राफीचे फायदे आणि तोटे सांगितले. डिजिटल फोटोग्राफीमुळे मूळ छायाचित्र हरवत चालले आहे, अशीही भीतीही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, डिजिटल फोटोग्राफीमुळे काम वाढले असले तरी फायदाही झाला आहे. साधारण पंधरा वर्षांपूर्वी फोटोग्राफी कशी होती याबाबत त्यांनी अनेक गमतीशीर किस्से सांगितले. या परिसंवादात स्टुडिओतील दोन छत्र्या, चेहऱ्यांवरील अनेक खुणा कशा नाहीशा होतात, मुला-मुलीला लग्नासाठी काढावे लागणारे फोटो अशा अनेक मुद्द्यांवर तिनही व्यक्त्यांनी अनेक विनोदी किस्से सांगितले. तसेच कॉपीराईटसाठी फोटोग्राफर्सनी एकत्र यायला हवे, अशी एक भूमिकाही त्यांनी 'मटा'च्या व्याासपीठावर मांडली. अपर्णा क्षेमकल्याणी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोंडे न्हाण्यासाठी भाविकांची गर्दी

$
0
0

अधिकमास, वद्य एकादशीनिमित्त त्र्यंबकला पसंती

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे अधिकमास, वद्य एकादशीच्या निमित्ताने धोंडे न्हाण्यासाठी भाविकांची आलोट गर्दी उसळली आहे. कुशावर्तावर रविवारी (दि. १०)स्नानासाठी पहाटेपासून दाटी झाली होती. आंघोळीच्या दरम्यान महिला पुरूष भाविक दीपदान करताना आढळत होते.

तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या अधिकमासात कुशावर्तला स्नान करण्यासाठी देशभरातील भाविकांनी गर्दी केली आहे. सोबतच संत निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिरात दर्शनासाठी वारकरींच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. विद्यावाचस्पती द्वाराचार्य रामकृष्ण महाराज लहवीतकर यांनी अशा प्रकारची वारी आपल्या आठवणीत प्रथमच भरली असल्याचे सांगितले. शनिवार, रविवार आणि अधिकमास असा योग जुळून आल्याने भाविकांनी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला आणि कुशावर्तात स्नानासाठी गर्दी केली होती.

संत निवृत्तिनाथ मंदिरात रविवारी अनेक भाविकांनी दर्शनासाठी तसेच देणगी देण्यासाठी नंबर लावले होते. अवघ्या एका महिन्याच्या आत दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम प्राप्त झाली असून, मंदिराचे काम प्रगतीपथावर होत असल्याचे संस्थान ट्रस्ट अध्यक्ष ह. भ. प. संजय महाराज धोंडगे यांनी सांगितले. या कामाच्या बाबत ठेकेदार यांनी हमी पत्र दिले असून, उशीर झाल्यास दंड करण्यात येणार आहे. येत्या २८ जून रोजी पालखी प्रस्थान होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसाठी वकिलांचा ‘चक्काजाम’

$
0
0

सटाण्यात राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शेतकरी वर्गाच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी वर्गाचा लढा सुरूच राहील. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सटाणा वकील असोशिएशनने येथील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि. १०) तीन तासांहून अधिक वेळ चक्काजाम आंदोलन केले. बागलाणचे प्रांताधिकारी यांनी चक्काजाम आंदोलनस्थळी येवून आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले.

येथील बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गावर सटाणा वकील संघ असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडितराव भदाणे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन झाले. या वेळी आंदोलनात शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी व वकील मोठ्या संख्येने सहभागी होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर वकील संघ व शेतकरी वर्गाने चक्काजाम आंदोलनास प्रारंभ केला. यामुळे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. त्यातच एस. टी. बसेस सुरू झाल्याने प्रवासासाठी बाहेर पडलेल्या चाकरमाने व प्रवाशांना या आंदोलनाचा मोठा पटका बसला.

शेतकऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय आता आत्महत्येकडे वळू लागले असून, ही शरमेची बाब आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी करावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतमालाला रास्तभाव द्यावा यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले, असे अॅड. भदाणे म्हणाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष भास्कर सोनवणे, वकील संघाचे अ‍ॅड. नाना भामरे, अ‍ॅड. वसंतराव सोनवणे, अ‍ॅड. रेखा शिंदे यांची भाषणे झाली. या वेळी बागलाणचे प्रांताधिकारी प्रवीण महाजन, पोलिस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे, पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आंदोलनात अ‍ॅड. हिरामण सोनवणे, अ‍ॅड. अभिमन्यू पाटील, अ‍ॅड. विष्णू सोनवणे, अ‍ॅड. रवींद्र पाटील, डोंगर पगार, देविदास निकम, सुभाष सावकार आदींसह तालुक्यातील शेतकरी सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदास्नानासाठी तुडूंब गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुण्यफल देणारा अधिक महिना, कमला एकादशी आणि रविवारची सुटी असा तिहेरी योग जुळून आल्याने पंचवटीतील रामकुंडासह गोदाघाटावर स्नानासाठी नाशिककरांची झुंबड उडाली. त्यामुळे सिंहस्थ पर्वणी काळासारखाच माहोल येथे जमून आल्याने तीन वर्षांपूर्वी झालेल्या सिंहस्थाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

कमला एकादशीला उपवास केल्याने पापांपासून मुक्ती मिळते, अशी धारणा आहे. अधिक मासामध्ये येणाऱ्या या एकादशीला परमा तसेच हरिवल्लभा एकादशी असेही म्हटले जाते. तीन दिवसांनी म्हणजेच बुधवारी दर्श अमावस्या असून, अधिक महिन्याची समाप्ती होते आहे. तत्पूर्वी रविवारी सुटीच्या दिवशी एकादशी आल्याने सकाळपासूनच रामकुंड आणि गोदाघाट परिसरात नागरिकांची गर्दी झाली. कोणी गोदेमध्ये स्नानास तर कोणी हात-पाय धुण्यास पसंती दिली. बच्चेमंडळींसह अबालवृद्धांनी गोदेच्या पाण्यात डुंबण्याचा आनंद यानिमित्ताने लुटला. देवांना वाण देण्यासाठीदेखील गोदाघाटालगतच्या मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली. त्यामुळे कपालेश्वर मंदिर, सांडव्यावरची देवी, काळाराम मंदिर परिसरात भाविकांची लांबच लांब रांग लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. नागरिकांच्या गर्दीमुळे अनुचित घटना अथवा गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त वाढवला होता. तसेच या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहनांनाही काही वेळासाठी प्रवेश बंद ठेवण्यात आला. रामकुंड आणि परिसरात दिवसभर भाविकांच्या गर्दीचा ओघ सुरूच होता. पुढील दोन-तीन दिवस गोदाघाटावर भाविकांचा ओघ असणार आहे.

देवदर्शनालाही पसंती

अधिक मासाच्या निमित्ताने गोदास्नानासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यांमधूनही भाविक मोठ्या संख्येने नाशिकमध्ये आले. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे गर्दी अधिकच वाढली. गोदास्नानाबरोबरच पर्यटनाचा आनंद लुटण्यासही पसंती देण्यात आली. कपालेश्वर मंदिर, काळाराम मंदिर, सीतागुंफा, गोरेराम मंदिर, सुंदर नारायण मंदिर, तपोवन या परिसरात भाविकांची गर्दी पहावयास मिळत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिस ‘टार्गेट’

$
0
0

पोलिसांना दमबाजी-मारहाण केल्याचे पाच महिन्यांत आठ गुन्हे दाखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक नियमांचे पालन न करता पोलिसांनाच अरेरावी करण्याचे प्रमाण गत वर्षीपेक्षा वाढले आहे. २०१७ मध्ये पूर्ण वर्षात वाहतूक पोलिसांना दमबाजी किंवा मारहाण केल्याप्रकरणी सात गुन्हे दाखल झाले होते. यंदा पहिल्या पाच महिन्यातच आठ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यातील तीन घटना शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयातच घडल्या आहेत.

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना अनेकदा आरेरावीचा सामना करावा लागतो. कधीतरी पोलिसही चुकत असतील. मात्र, यामुळे हल्ल्यासारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यात सरकारवाडा आणि मुंबई नाका पोलिस स्टेशन सर्वात पुढे असून, येथे मागील १७ महिन्यात प्रत्येकी पाच गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यानंतर, नाशिकरोड, उपनगर, सातपूर, गंगापूर, भद्रकाली या पोलिस स्टेशन हद्दीत प्रत्येक एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले, की सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकारांमध्ये यंदा वाढ का झाली, त्याचे कारण सांगता येणार नाही. सरकारवाडा आणि मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या समस्या असून, वाहनांची वर्दळ अधिक असते. 'नो इंट्री' तसेच 'वन वे' सारखे नियम मोडल्यानंतर कारवाई करताना वाहनचालकांकडून त्रागा होतो. वास्तविक जागेवर दंड भरायचा नसल्यास आणि आपण काहीही चूक केली नसल्याची खात्री असल्यास वाहनचालक कोर्टात दाद मागू शकतो. दुर्दैवाने काही वेळा वाहनचालक हमरीतुमरीवर उतरतात. रस्त्यावर वाहतूक नियोजनाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ, दमदाटी किंवा मारहाण झाल्यास ते खपवून घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

पुरावे कॅमेऱ्यात कैद

शहर पोलिसांकडे १२५ बॉडी वॉर्न कॅमेरे असून, त्यातील ९९ कॅमेरे शहर वाहतूक शाखेकडे तर उर्वरित २६ कॅमेरे पोलिस स्टेशनकडे आहे. बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचा वापर सुरू झाल्यापासून पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करण्याच्या दोन घटना यात कैद झाल्या आहेत. हे तांत्रिक पुरावे महत्त्वाचे असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास पुढील समस्याच उद्भवणार नाहीत, असे एसीपी देवरे यांनी स्पष्ट केले.

..

२०१७

पोलिस स्टेशन.....ठिकाण..............................घटनेचा दिनांक

सरकारवाडा.....शरणपूर पोलिस चौकी सिग्नल.....१३-४-१७

नाशिकरोड.....शिंदेगाव..................................११-७-१७

मुंबईनाका.....गोविंदनगर लिंकरोड....................३०-८-१७

भद्रकाली.....शालिमार रिक्षा स्टॅण्ड....................४-९-१७

सातपूर.......आयटीआय सिग्नल.......................१०-९-१७

मुंबई नाका.....फेम टॉकीज सिग्नल....................१४-१०-१७

सरकारवाडा.....वकीलवाडी चौक.....................१-१२-१७

..

२०१८

पोलिस स्टेशन.....ठिकाण....................घटनेचा दिनांक

मुंबई नाका.....इंदिरानगर अंडरपास..........१०-२-१८

गंगापूर..........आकाशवाणी टॉवरजवळ.....११-३-१८

सरकारवाडा.....शहर वाहतूक शाखा.........१८-३-१८

सरकारवाडा.....शहर वाहतूक शाखा.........१६-४-१८

मुंबई नाका.......द्वारका सर्कल.................२२-४-१८

सरकारवाडा.....शहर वाहतूक शाखा..........१०-५-१८

उपनगर..........उपनगर नाका सिग्नल........२१-५-१८

मुंबई नाका.....इंदिरानगर अंडरपास...........२६-५-१८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पदन्यासाने हरखले नाशिककर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नृत्यनुष्ठान म्हणजे कथकच्या एकल नृत्यपरंपरेला चालना मिळावी, यासाठी उभा केलेला डोलारा आहे. यामध्ये २५ गुरूंचे २५ शिष्य नृत्यनुष्ठान करीत आहेत. गुरुशिष्य परंपरेसाठी या कार्यक्रमाचे समर्पण केले गेले आहे. या कार्यक्रमासाठी विविध विषय दर महिन्याला हाताळले जात असून, हे या कार्यक्रमाचे दहावे पर्व होते. या पर्वाचा या महिन्याचा विषय मल्हार आणि १४ मात्रा असा घेण्यात आला. यासाठी सुरुवातीला मधुश्री वैद्य आणि दुसऱ्या पर्वात सोनिया परचुरे यांनी सादरीकरण केले.

कीर्ती कलामंदिरतर्फे रविवारी परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे 'नृत्यनुष्ठान'चे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात हिमगौरी आडके, नगरसेविका, डॉ. मीना बापये यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सुरुवातीच्या पर्वात मधुश्री वैद्य यांच्या विष्णूवंदनाने केली. त्यामध्ये दरबारी कानडा आणि यमन या दोन रंगांमध्ये आशिष रानडे यांनी संगीतबद्ध केलेली विष्णूवंदना सादर झाली. यानंतर १४ मात्रांचा अडा चौताल यामध्ये थाट, आमद, चलन, तिहाईया, परण, प्रिमलू, लडी आदी प्रस्तूत केले. तसेच, मल्हार रागातील 'घन छाये गगन अत घोर घोर' ही बंदिश सादर झाली.

दुसऱ्या पर्वामध्ये कृष्णवंदना सोनिया परचुरे यांनी कस्तुरी तीलकमं, ताल धमारमधील पं. सुरेश तळवलकर यांचा रचना नृत्यातून सादर केल्या. त्यांनी अभिनय प्रकारामध्ये झमकी झुकी आयी, बदरिया कारी हा मांड रागातील झुला प्रस्तूत केला. त्यांना साथ देण्यासाठी हार्मोनियमवर दिव्या रानडे, श्रेयस गोवित्रीकर, तबला रोहित धारप, सुजित काळे, गायन आशिष रानडे, आशय कुलकर्णी, सूत्रसंचालन पियू आरोळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी ऑर्किड शाळेचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांची खास उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशा-गट प्रवर्तक समिती स्थापन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रात आशा-गटप्रवर्तकांसाठी कार्यरत सर्व संघटनांची कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या कृती समितीमध्ये सहभागी संघटनांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यामध्ये एका महिला आशा अथवा गट प्रवर्तक असणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटने(आयटक)चे राजू देसले, महाराष्ट्र आशा गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने सलीम पटेल, महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गतप्रवर्तक महासंघ लातूरचे भगवान देशमुख, महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक स्वयंसेविका संघ ठाणे (सर्व श्रमिक संघ NTUI) चे एम. ए. पाटील, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघचे राजेंद्र बावके यांची या समितीवर निवड करण्यात आली आहे. पत्रलेखन मसुदा जबाबदारी आयटक सीटूवर राहणार आहे. समितीने पुढील आंदोलनाची दिशा ठरविली असमन, २ जुलै रोजी मागणी दिवस पाळण्यात येणार आहे. तसेच, १८ जुलैला नागपूर येथे पावसाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. २० जून ते ३० जून या कालावधीत आमदारांना निवेदन देण्यात येणार आहे. राज्यभरातील कार्यरत ६५ हजार आशा आणि चार हजार गटप्रवर्तक एकत्र येऊन समितीच्या नेतृत्वाखाली संघटितपणे लढा देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी द्यावे नैतिकतेला प्राधान्य

$
0
0

डॉ. जयश्री मेहता यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अलिकडे डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. या केवळ घटना नाहीत तर समाजरचनेत सूक्ष्म स्तरावर घडणाऱ्या या नोंदी अस्वस्थतेच्या सूचक आहेत. जुन्या कालखंडाच्या तुलनेत असे प्रकार अलिकडील काळातच वाढीला लागले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील नितीमत्तेचा स्तर घसरतो आहे काय, अशा शंकाही या चित्रामुळे समाजाच्या विविध स्तरातून उपस्थित होत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. या स्थितीत व्यावसायिकता सांभाळताना नैतिकतेचा पायाही प्राधान्याने जपण्याचे मोठे आव्हान वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांपुढे उभे आहे, असे प्रतिपादन भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री मेहता यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विसाव्या वर्धापनदिन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. डॉ. मेहता म्हणाल्या, की केवळ संस्थेची स्थापना होणे महत्त्वाचे नाही. तर भविष्यात ही संस्था किती आणि कशी रुजते, ही संस्था समाजासाठी नेमके काय योगदान देते, समाजाला किती आशावाद यातून मिळतो या मापकांवर संस्थेचे महत्त्व ठरते. आरोग्य विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करून या निकषांवर स्वत:ला सिद्ध केले आहे. मात्र, या यशावर समाधान मानून चालणार नाही. नव्या डॉक्टरांना वैद्यकीय शाखेतील दर्जेदार शिक्षणासोबतच नैतिकतेचे धडे देऊन सुदृढ समाज घडविण्याची अपेक्षा आरोग्य विद्यापीठाकडून या प्रसंगी समाज करतो आहे, असेही डॉ. मेहता म्हणाल्या.

यावेळी त्यांच्यासमवेत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव संजय देशमुख, आयुष संचालनालयाचे संचालक प्रा. कुलदीप राज कोहली, वैद्यकीय शिक्षण आणि संषोधन संचालनालयचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर होते. दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये वर्धापन दिनानिमित्त सकाळी ध्वजवंदन करण्यात आले.

यांचा झाला सन्मान

समारंभात विद्यापीठातर्फे डॉ. अशोक अनंत महाशूर, डॉ. सयैद अब्दुस सामी, डॉ. विलास दत्तोपंत वांगीकर, डॉ. अनंत भगवंत धर्माधिकारी, डॉ. गांधीदास सोनाजीराव लवेकर यांना मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम ते तृतीय वर्षाच्या वैद्यकीय, दंत आयुर्वेद व युनानी, होमिओपॅथी आणि तत्सम विद्याशाखेच्या ४० विद्यार्थ्यांना एकूण ४५ सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. तसेच २०१७-१८ या वर्षासाठी विविध विभागातील उत्कृष्ट कामगिरीकरीता पुरस्कारही देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अचानक संप पुकारण्याच्या प्रवृत्तीला घालावा आळा

$
0
0

अचानक संप पुकारण्याच्या प्रवृत्तीला घालावा आळा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांनाच हाल सहन करावे लागले. बस कर्मचाऱ्यांना जाहीर केलेल्या वेतनवाढीवरून हा संप पुकारण्यात आला होता. मात्र, त्यामुळे खासगी वाहनचालकांनी प्रवाशांची लूट केल्याचेही समोर आले. बसच्या संपाने नियमित प्रवास करणाऱ्यांचीही चांगलीच दमछाक केली. एरवीदेखील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडून प्रवाशांची लूट होते. त्यामुळे अचानक संप पुकारण्याची प्रवृत्ती रोखण्यासह खासगी वाहनचालकांकडून केल्या जाणाऱ्या लुटीला प्रशासनाने वेळीच आळा घातला पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

योग्य नियोजनाची गरज

एसटी बससेवा शहरी व ग्रामीण प्रवाशांसाठी अतिमहत्त्वाची मानली जाते. परंतु, अचानक बससेवा बंद पडल्याने त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अतिमहत्त्वाच्या सुविधा अशा प्रकारे अचानक बंद करणे योग्य नाही. याबाबत योग्य नियोजनाची गरज आहे.

-वाल्मीक जाधव

परिणामकारक धोरण आखावे

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना योग्य वेतनवाढ दिली गेली नसल्याने बससेवा बंद करण्यात आली. विशेष म्हणजे सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या संघटनेने बंदला पाठिंबा दिला नसला, तरी बससेवा खंडित झाल्याने प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. वास्तविक ही अत्यावश्यक सेवा असल्याने त्याबाबत परिणामकारक धोरण आखले जावे.

-भाऊसाहेब पाटील

प्रवाशांना नाहक मनस्ताप

अचानक बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. त्यात मात्र काही खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट करण्यात आल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे याबाबत नाराजीही व्यक्त करण्यात आली. सरकारची अतिमहत्त्वाची सेवा असलेली प्रवासी वाहतूक बससेवा बंद करताना प्रवाशांना अगोदर पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे.

-वसंत माळी

कडक कारवाईची करावी तरतूद

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक बससेवा बंद केल्याने स्थानकांवर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. बससेवा बंद करण्यामागे नेमके कारण काय, याची माहितीच प्रवाशांना झाली नसल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त करण्यात आला. फारसे गंभीर कारण नसतानाही असा बंद पुकारणे चुकीचेच असून, यापुढे असे झाल्यास कडक कारवाईची तरतूद करावी.

-कपिल भावले

मनमानीला लावावा चाप

बससेवा बंद पडल्याने रेल्वेने आलेल्या प्रवाशांना सर्वाधिक हाल सहन करावे लागले. खासगी वाहनचालकांनी बंद बससेवेचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा भाडे शहरात आलेल्या प्रवाशांकडून लुटले. परिणामी शहरात बाहेरून आलेल्या पाहुण्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या मनमानीला चाप लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

-किरण लवांड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लवकरच २५० प्राध्यापक होणार रुजू

$
0
0

वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

केवळ तज्ज्ञ प्राध्यापकांच्या उपलब्धतेअभावी वैद्यकीय शिक्षणाची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी घेण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. यानुसार वैद्यकीय शिक्षणासाठी एमपीएससीऐवजी थेट महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून २५० प्राध्यापकांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व प्राध्यापक आगामी महिनाभरातच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूजू होतील, अशी माहिती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. देशमुख पुढे म्हणाले, की वैद्यकीय शाखा ही अतिशय संवेदनशील आहे. सर्व समाजाचे आरोग्य या शाखेवर अवलंबून असते. त्यामुळे या शिक्षणाच्या दर्जाविषयी तडजोड करून चालत नाही. या अगोदर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची नियुक्ती होत होती. मात्र, यासाठी मोठा कालावधी खर्च होत होता. दरम्यान, तज्ज्ञ डॉक्टर प्राध्यापकांना इतर संधी निर्माण झाल्यास नियुक्तीही रखडली जात होती. याचे दुरगामी परिणाम वैद्यकीय शिक्षणावर होत होते. हे टाळण्यासाठी शासनाने यापूर्वी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार आता या प्राध्यापकांच्या नियुक्त्या थेट शासकीय स्तरावरून होणार आहेत. त्यामुळे अलिकडे २५० प्राध्यापकांची यासाठी निवड करण्यात आली असून, येत्या महिनाभराच्या कालावधीत हे प्राध्यापक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सेवेत रूजू होतील. या प्रक्रियेच्या कालावधीत वाढ करीत सन २०२० पर्यंत ही भरती शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, रखडलेल्या पदोन्नतींबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की या पदोन्नती दुसऱ्या टप्प्यात आहेत. यातील पहिल्या टप्प्यात अॅकॅडमिक पदोन्नतीसाठी १५० प्राध्यापकांची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रासाठी शासकीय मेडिकल कॉलेज

उत्तर महाराष्ट्रासाठी यंदा जळगावमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाल्याची बाब स्वागतार्ह असल्याचेही संजय देशमुख यांनी सांगितले. या निर्णयामुळे वैद्यकीय विद्याशाखेच्या नव्या १०० जागांची भर उत्तर महाराष्ट्रात पडणार असल्याचे ते म्हणाले. या जागांसाठी आता सन २०१८-२०१९ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. गेल्या दोन वर्षात सुमारे ३५० पेक्षा जास्त पदव्युत्तर जागा वैद्यकीय शिक्षणासाठी निर्माण केल्या गेल्याचा फायदा राज्याच्या वैद्यकीय सेवेत होणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images