Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दीड लाखांचा चेक बळकावला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून तिघांनी बेदम मारहाण करीत आणि ठार मारण्याची धमकी देत एका व्यक्तीला दीड लाख रुपयांचा चेक लिहून देण्यास भाग पाडले. ही घटना ६ ते ७ जून या दिवशी महात्मानगर परिसरातील प्रकाश अपार्टमेंटमधील गाळा क्रमांक एक ते तीनमधील थॉमस कुक हौ. लि. येथे घडली.

या प्रकरणी प्रितीश कांतीलाल खिंवसरा (४१, मनमंदिर अपार्ट, ठक्कर डोमसमोर, लवाटेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. खिंवसरा यांच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी देवेन आहेर (रा. जेलरोड) आणि त्याच्या साथिदारांनी खिंवसरा यांच्या कार्यालयात अनधिकृत प्रवेश करीत मारहाण केली. गोल्डन हॉलिडेज ट्रॅव्हल्सचे अधिकारी संतोष भंडारी यांच्या नावे चेक देण्यास तयार असताना संशयितांनी तब्बल दीड लाख रुपयांचा चेक आपल्या नावे लिहून घेतला. तसेच चेक वटला नाही तर डबल पैसे द्यावे लागतील असे फिर्यादीकडून बळजबरीने लिहून त्यावर कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सह्या घेतल्या तसेच ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक बुराडे करीत आहेत.

बनावट परवान्याच्या आधारे वाळूची तस्करी

बनावट परवाना तयार करून त्याआधारे टॅक्स चुकवणाऱ्या दोन जणांवर गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झााला आहे. राहुल विजय धात्रक (२५, रा. गंधर्वनगरी) सुदर्शन सानप (रा. नाशिक) अशी या दोघा संशयितांची नावे आहेत. गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कूलजवळील समाधानगादी सेंटर समोर शनिवारी (दि.९) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. संशयित आरोपी वाहनात (एमएच १२ के.पी. ४२२२) वाळू भरून जात असताना पोलिसांना त्यांना अडवले. वाळू वाहतुकीबाबत कागदपत्रांची मागणी केली असता संशयितांनी ती सादर केली. मात्र, पोलिसांनी बारकाईनी तपासणी केली असता परवानाच बनावट असल्याचे समोर आले. बनावट परवान्याच्या आधारे वाळूची तस्करी करून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पीएसआय माळी करीत आहेत.

जाचक मळ्यात घरफोडी

बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील तब्बल एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना ८ जूनच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी सचिन संदेश सातारकर (३८, रा. प्लॉट क्रमांक १२, जय भवानीरोड, जाचक मळा, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. सातारकर कुटुंबीय शुक्रवारी (दि. ८) घराबाहेर पडले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेली एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भडीकर करीत आहेत.

महिलेची आत्महत्या

अंबड परिसरातील जाधव संकुल येथे राहणाऱ्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.९) रात्री पाऊणेदहा वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल केला आहे. इंद्रायणी झवर (३६) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला जाधव संकुल येथे भाडेकरू म्हणून राहत होती. शनिवारी घरातच तिने गळफास लावून आत्महत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इगतपुरीजवळ रेल्वे घसरली

$
0
0

- मुंबई-हावडाचे तीन डबे घसरले

- प्रवासी किरकोळ जखमी

- पंचवटी, राज्यराणी, गोदावरी रद्द

- अन्य रेल्वेगाड्यांना दहा तासांपर्यंत विलंब

म. टा. वृत्तसेवा, घोटी/जेलरोड

मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघालेल्या मुंबई-हावडा एक्स्प्रेसचे तीन डबे इगतपुरी रेल्वे स्टेशनजवळ शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास रुळावरून घसरले. यामुळे प्रवाशांना किरकोळ मार बसला असला तरी जीवित व वित्तहानी टळली. या अपघातामुळे मध्य रेल्वेची उत्तर भारताकडे होणारी वाहतूक रविवारी विस्कळीत झाली. पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. अन्य रेल्वेगाड्यांना दोन ते दहा तास विलंब झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. रविवारी सकाळी सहाला अपघातग्रस्त डबे हटविण्यात आल्यानंतर सकाळी सातनंतर वाहतूक सुरळीत झाली.

मुंबईहून मुंबई-हावडा एक्सप्रेस (१२८०९) रात्री नाशिककडे येत होती. इगतपुरी स्टेशननजीकच्या तीन लकडी पुलाजवळ इंजिनापासून नवव्या क्रमाकांच्या कोचची काही चाके, पँट्रीकारचे चाक व त्यानंतर असलेल्या कोच क्रमांक एस १२ची पुढील बाजूची चाके रेल्वे रुळावरून घसरली. हे कोच डाऊन व मिडल लाइनच्या दरम्यान जाऊन पडले. त्यामुळे अप व डाऊनची वाहतूक ठप्प झाली. रेल्वे प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन युद्धपातळीवर घसरलेले डबे काढण्याचे काम सुरू केले. हावडा मेलचे उर्वरित डबे कसारामार्गे मागे नेऊन पुन्हा इगतपुरी रेल्वे स्टेशनमध्ये आणून प्रवाशांची सुटका केली. अपघातामुळे रात्री दोन ते सकाळी सातपर्यंत मुंबईला जाणारी व नाशिकला येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

गाड्यांना विलंब

अपघातानंतर काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. भुसावळ-मुंबई एक्स्प्रेस नाशिकरोडला येऊन माघारी गेली. मुंबईच्या दिशेने जाणारी पंचवटी, गोदावरी, राज्यराणी रद्द करण्यात आली. रविवार असल्याने या गाड्यांना नोकरदार, व्यावसायिकांची गर्दी नव्हती. भुसावळ-पुणे ही पहाटे सव्वापाचला नाशिकरोडला येणारी गाडी तीन तास उशिरा नाशिकरोडला आली. मंगला एक्स्प्रेस तीन तास, तर हावडा मेल दोन, जनता एक्स्प्रेस पाच, महानगरी अडीच तास आणि सेवाग्राम तीन तास विलंबाने आली. मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांनाही उशीर झाला. कोलकाता एक्स्प्रेस रात्री बाराला नाशिकरोडला येते. ती आज सकाळी साडेनऊला आली. कुशीनगर एक्स्प्रेसची नाशिकची वेळ रात्री अडीचची आहे. तथापि, ही गाडी सकाळी दहाला आली. देवगिरी तब्बल दहा तास उशिराने धावली. काशी एक्स्प्रेला एक तास विलंब झाला.

या गाड्यांच्या मार्गात बदल

पुणे-दौंड-मनमाडमार्गे मुंबई- अमृतसर, लोकमान्य टिळक गुवाहाटी, वाराणसी या गाड्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या. मुंबई- वाराणसी महानगरी, लोकमान्य टिळक-पाटलीपुत्र सुपर, पनवेल-गोरखपूर, लोकमान्य टिळक हाटिया या गाड्या वसई- सुरत जळगावमार्गे वळविण्यात आल्या. सुट्या संपत आल्याने प्रवासी स्वगृही निघाले होते. त्यामुळे गाड्यांना गर्दी होती. अपघातामुळे मात्र या प्रवाशांची गैरसोय झाली.

प्रवाशांना नाश्ता

अनेक गाड्या रद्द झाल्या तर अनेक गाड्यांना प्रचंड विलंब झाला. विविध स्थानकांवर प्रवासी अडकून पडले. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना नाशिकरोड, मनमाड येथे नाश्ता, तर भुसावळ रेल्वे स्थानकावर मोफत जेवण दिले. त्यामुळे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्कच्या जागेवर झोपड्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

गरजू व्यावसायिकांसाठी महापालिकेने गंगापूररोडवरील आनंदवली गावात मुख्य रस्त्यालगत गाळे प्रकल्प साकारला असून, त्याच्या बाजूलाच चिल्ड्रेन पार्कसाठी जागा आरक्षित आहे. मात्र, या जागेवर आता झोपड्यांचे अतिक्रमण फोफावले आहे. यासंदर्भात तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

एकीकडे पार्कच्या जागेवर झोपड्यांचे अतिक्रमण झालेले असतानाच दुसरीकडे कोट्यवधी रुपये खर्चून महापालिकेने येथे उभारलेले गाळे आजही धूळ खात पडून आहेत. त्यामुळे महापालिकेचा आणि पर्यायाने नागरिकांकाच पैसा पाण्यात गेल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात असून, आता आयुक्तांनीच याप्रश्नी लक्ष घालावे, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

आनंदवली येथे धूळ खात पडलेल्या शॉपिंग सेंटरच्या बाजूस सर्व्हे नंबर २८/१/१ ला लागून महापालिका शाळेसमोर पोलिस चौकीमागे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, त्या ठिकाणी महापालिकेने चिल्ड्रेन पार्कसाठी आरक्षित केलेल्या भूखंडांवर झोपड्यांचे अतिक्रमण फोफावले आहे. याबाबत तक्रारी करूनदेखील कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या अतिक्रमणांचा वाहतुकीसही अडथला होत असून, त्यामुळे किमान स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने तरी महापालिकेने येथील झोपड्यांचे अतिक्रमण त्वरित हटवून येथे चिल्ड्रेन पार्क साकारावे, अशी मागणी आनंदवलीकर करीत आहेत.

गाळे खुले करण्याची मागणी

महापालिकेकडून स्मार्ट सिटीअंतर्गत वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन नाशिकच्या वैभवात भर टाकली जात असतानाही येथील समस्या जैसे थे असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. आनंदवली येथे गंगापूररोडलगत वावरे विद्यालयाजवळ कोट्यवधी रुपये खर्च करून चार-पाच वर्षांपूर्वी महापालिकेने शॉपिंग सेंटर बांधले आहे. परंतु, या शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांचे वाटप होऊनही ते बंद स्थितीतच आहेत. त्यामुळे महापालिकेने एवढा खर्च केला तरी कशासाठी, असा प्रश्न आनंदवलीकरांना पडला आहे. या शॉपिंग सेंटरमधील गाळे

लवकरात लवकर खुले करावेत, अशी मागणीही होत आहे.

---

आनंदवलीतील महापालिकेचे गाळे धूळ खात पडून असून, चिल्ड्रेन पार्कसाठी आरक्षित केलेल्या जागेवरही झोपड्यांचे अतिक्रमण झालेले आहे. याप्रश्नी आता आयुक्तांनीच लक्ष देण्याची गरज आहे.

-राधा बेंडकुळे, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाह सोहळ्यात जीवन संजीवनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लग्नांमधील धांगडधिंगा आणि त्यावर होणारी पैशांची वारेमाप उधळपट्टी समाजाला काही नवीन नाही. परंतु, शुभविवाहाच्या सोहळ्यात जीवन संजीवनीची प्रात्यक्षिके दाखवून नाशिकमधील गुंजाळ आणि पुण्यातील कामठे या सुशिक्षित कुटुंबांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. या एका लग्नाची गोष्ट सध्या शहरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

प्रा. डॉ. बाबासाहेब गुंजाळ यांचा मुलगा तुषार हा सिनेकलावंत असून दिग्दर्शन, संवाद, पटकथालेखन आणि अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कासव' चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्याने काम केले आहे. त्याचा विवाह पुणे येथील रमेश कामठे यांची सुकन्या शीतल हिच्याशी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा झाला. लग्नामध्ये होणारा भरमसाठ खर्च आणि अनावश्यक प्रथांना फाटा देऊन त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. तुषार यांचे मोठे भाऊ विशाल हे वेदना निवारण तज्ज्ञ (पेन फिजिशियन) असून, त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून स्वागत समारंभात 'जीवन संजीवनी' हा उपक्रम राबविण्याची संकल्पना मांडली. दोन्ही पक्षाकडील मंडळींनी त्यांच्या या प्रस्तावाचे स्वागत केले. नातलग काय म्हणतील ही धास्ती होतीच. परंतु तरीही त्यांनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.

प्रथमोपचाराची प्रात्यक्षिके

हृदयविकार किंवा तत्सम अटीतटीच्या वेळी रूग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंतच्या कालावधीत संबंधित व्यक्तीवर कोणते प्रथमोपचार करावेत याचे प्रात्यक्षिके या जीवन संजीवनी उपक्रमामध्ये दाखविण्यात आली. कृत्रिम श्वासोच्छ्वास कसा द्यावा, छातीवर दाब देऊन हृदयाचे ठोके कसे सुरू करावेत याची माहिती व प्रात्यक्षिक यावेळी उपस्थित २०० वऱ्हाडी मंडळींनी पाहिली. 'जीवनसंजीवनी' हा नाशिक भूलतज्ज्ञ संघटनेचा उपक्रम असून तो सादर करण्यासाठी भूलतज्ज्ञ संघटनेच्या डॉ. सरला सैंधानी, सचिव डॉ. राहुल भामरे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. नितीन वाघचौरे, डॉ. दिनेश महाजन तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले. विवाहाला उपस्थितांनी 'जीवन संजीवनी' आत्मसात करून एका गरजू व्यक्तीचे प्राण वाचविले तरी या उपक्रमाचा उद्देश सफल होईल, अशी भावना यावेळी गुंजाळ कुटुंबियांनी व्यक्त केली.

विवाह सोहळ्यासारख्या शुभकार्यात जीवन संजीवनीचा उपक्रम लोक स्वीकारतील का, याची धास्ती होती. परंतु डॉ. विशाल यांच्या आग्रहामुळे आम्ही हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. उपस्थितांनीही तो कुतुहलाने अनुभवला. अवघ्या २० ते २५ मिनिटांत उपस्थितांना जीवन संजीवनीबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे नवरदेव तुषार यांनी स्वत: ही प्रात्यक्षिके करून पाहिली. जीवन संजीवनीला सर्व स्तरातून प्रतिसाद वाढतो आहे.

- डॉ. राहुल भामरे, सचिव, नाशिक भूलतज्ज्ञ संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडेंच्या अटकेवरून तणाव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवप्रतिष्ठान संस्थेचे संभाजी भिडे यांची सभा रविवारी रामकुंड परिसरात आयोजित करण्यात आली होती. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात भिडे यांचे नाव असल्याने या सभेस विरोध होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले होते. दुपारी चारच्या सुमारास शालिमार चौकातील आंबडेकर पुतळ्याजवळ २५० ते ३०० कार्यकर्ते जमा झाले. भिडेंना अटक करण्यासह सभा रोखण्याची मागणी आंदोलकांनी करीत रामकुंडाच्या दिशेने कूच केली. त्यामुळे पोलिसांनी नेहरू गार्डन, शालिमार, रविवार कारंजा, सीबीएस, अशोकस्तंभ अशा विविध ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली. तसेच, रामकुंडाच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांना रोखले.

पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आंदोलक पुन्हा आंबेडकर पुतळ्याजवळ जमा झाले. तेथून काही कार्यकर्ते सीबीएस चौकात आले. तिथे त्यांनी रस्ता रोको केला. याच दरम्यान जिल्हा कोर्टासमोर एका समाजकंटकाने म्हसरूळला निघालेल्या सिटीबसवर चालकाच्या दिशेने दगड फेकला. यानंतर पेट्रोल असलेली बॉटल फेकून आग लावली. सुदैवाने पेट्रोल जमिनीवरच सांडले. यामुळे अनर्थ टळला. या वेळी प्रवाशांसह परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. विविध शाळा या आठवड्यात सुरू होत असल्याने खरेदीसाठी रविवारी नागरिकांची मोठी गर्दी या भागात झाली होती. दुसरीकडे अधिक महिन्यातील एकादशीचा मुहूर्त साधून रामकुंडाकडे येणाऱ्या भाविकांचे यामुळे हाल झाले. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह सहाय्यक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शीघ्र कृती दलाचे जवान, दंगल नियंत्रण पथक असा पोलिस बंदोबस्त तैनात होता. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली तरी रात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

सिन्नरमधील नगरसेवक श्रीकांत जाधव यांसह त्याच्या कुटुंबातील तीन जणांविरुद्ध भगूर येथील देवानंद घायवटे यांचा छळ करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तिघा संशयितांना अटक झाली असून त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

घायवटे यांची कन्या डॉ. कादंबरी योगेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. कादंबरी व डॉ. योगेश आनंदा जाधव यांचा २०१२ मध्ये विवाह झला होता. त्यानंतर त्यांना दोन अपत्य झाली. एकत्रित कुटुंबातील पती डॉ. योगेश, सासरे आनंदा जाधव, सासू रमाबाई जाधव, दीर श्रीकांत जाधव जाव शोभा जाधव यांनी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी भांडण करून मुले हिसकावून घेत डॉ. कादंबरी यांना घराबाहेर हाकलून दिले. त्यामुळे त्या माहेरी वडील देवानंद घायवटे यांच्याकडे निघून आल्या. दुसरी बायको करायची आहे, असे सांगून पती व सासरच्या लोकांनी मानसिक त्रास दिला. तसेच डॉ. योगेश व दीर श्रीकांत यांनी भगूरला येऊन शिवीगाळ केली. फारकत दे नाही तर तुझ्या वडिलांना बघून घेईन, अशी धमकी दिली. याचा त्रास झाल्याने वडील २९ मे रोजी घर सोडून निघून गेले. ३१ मे रोजी त्यांचा मृतदेह दारणा नदीपात्रात आढळून आला. वडिलांच्या मृत्यूला सासरची मंडळी कारणीभूत असल्याची तक्रार डॉ. कादंबरी यांनी केल्यानंतर पोलिसांनी जाधव कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीचालकाची लहान मुलास मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

घंटागाडी चालकाने सिडकोतील दत्त चौकात एका लहान मुलास मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभाग २९ मधील प्रभागात घंटागाडी (एमएच १५ एफव्ही ०९८४) नेहमीप्रमाणे कचरा गोळा करण्यासाठी आली. अमृत कापसे हा घंटागाडीचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. तसेच कचरा टाकण्यासाठी परिसरातील आलेल्या महिला व नागरिकांना तो शिविगाळ करत होता. त्याचवेळी अविनाश पाटील या एका लहान मुलाने 'घंटा वाजवा' असे सांगितल्याचा त्याला राग आला. त्याने लहान मुलाच्या पोटात लाथदेखील मारली. लहान मुलाची आई वनिता तुलशीराम पाटील यांनी कापसेच्या तावडीतून आपल्या मुलास सोडवले. याबाबतची माहिती नागरिकांनी नगरसेविका रत्नमाला राणे यांना कळवली. नगरसेविका राणे घटनास्थळी धाव घेत स्वछता निरीक्षक व घंटागाडी सुपरवायजर यांना या घटनेची तातडीने माहिती दिली. पाटील यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात कापसेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुपोषणाची खरी माहिती आवश्यक

$
0
0

जिल्हा परिषद सीईओ डॉ. नरेश गिते यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज असून, प्रथम कुपोषणाबाबत खरी माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले. यासाठी प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामसेवक यांनी पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून वंचित बालकांचा शोध घ्यावा. त्यांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही डॉ. गिते यांनी केले.

सटाण्यातील नंदनवन लॉन्स येथे आयोजित बागलाण व देवळा तालुक्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या एकत्रित आढावा बैठकीत डॉ. गिते बोलत हेाते. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रदीप पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेलकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील उपस्थित होते.

कुपोषण निर्मुलनासाठी जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात आले असून, त्यामधून कुपोषित बालकांना आहार व औषधे देण्यात येत आहेत. मात्र, बागलाण व देवळा तालुक्यात सर्वेक्षणातून प्राप्त माहितीवर मी समाधानी नसून दोन्ही तालुक्यांनी येत्या आठ दिवसांत पुन्हा सर्वेक्षण करून वंचित राहिलेल्या बालकांना शोधून त्यांना केंद्रात भरती करावे, असेही डॉ. गिते म्हणाले. या वेळी डॉ. गिते यांनी विविध विभागांचा सविस्तर आढावा घेताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. प्रधानमंत्री आवास योजनेत गेल्या दोन महिन्यांत नाशिक जिल्ह्याने देशात २२५ वरून १३२ क्रमांकावर झेप घेतली आहे. राज्याच्या क्रमवारीत नाशिक जिल्ह्यातील चार तालुके पहिल्या दहांमध्ये असून, त्यात नाशिक प्रथम, त्र्यंबक सहावा, दिंडोरी सातवा व कळवण तालुका आठव्या क्रमांकावर आहे. याबाबत डॉ. गिते यांनी चारही तालुक्यांचे अभिनंदन करून देवळा व बागलाण तालुक्यांनी जलदगतीने काम पूर्ण करण्याचे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रचना’त आज कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रचना विद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून, साने गुरुजींच्या स्मृतिदिनी म्हणजे ११ जून रोजी या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर परशुराम साइखेडकर नाट्यगृहात आज (११ जून) सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके व महाराष्ट्र समाज सेवा संघ, नाशिकचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. शेकटकर अध्यक्षपदी

$
0
0

\Bसीएचएमई सोसायटीवर बिनविरोध निवड \B

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या (\Bसीएचएमई\B) अध्यक्षपदी ले. जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांची, तर सरकार्यवाहपदी डॉ. दिलीप बेलगावकर यांची निवड करण्यात आली. रविवारी संस्थेच्या भोसला मिलिटरी स्कूल येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, उपाध्यक्ष अविनाश भिडे, उपाध्यक्ष शैलेंद्र जोगळेकर, सहकार्यवाह सुहास जपे, कोषाध्यक्ष मनोहर नेवे यांची निवड करण्यात आली आहे.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या सरकार्यवाहपदी डॉ. दिलीप बेलगावकर निवड झालेले हे नाशिकरोड बिटको महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत व्यवस्थापन आणि वाणिज्य विषयातील १० पुस्तकांचे लेखन केले आहे. पंधरापेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंधांचे वाचन केले आहे. सार्वजनिक वाचनालयाचा त्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाले आहे.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची ८२ वी सर्वसाधरण सभा भोसलामध्ये पार पडली. संस्थेचे ५५० आजीव सभासद यांनी बिनविरोध निवडलेल्या नाशिक विभागीय समितीची आणि नागपूर विभागीय समितीची घोषणा केली. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या ११ उमेदवारांनी अर्ज भरल्याने सर्वांचा बिनविरोध निवड झाली. संस्थेचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी यांनी सभासदांसमोर संस्थेचा अहवाल मांडला. त्यास एकमताने मंजुरी मिळाली. यावेळी संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. के. जी. कुलकर्णी यांनी सभासदांपुढे निवडणूक वृत्तांत मांडला.

पाच वर्षांसाठी निवड

अध्यक्षपदी ले. जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर, तर कार्याध्यक्षपदी प्रमोद कुलकर्णी यांच्यासह तेरा जणांची सदस्य म्हणून १० जून २०१८ ते मे २०२३ पर्यंत या पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. एस. जी. नरवणे, कार्यवाह हेमंत देशपांडे, तर नागपूर विभागाचे अध्यक्ष सूर्यरतन डागा, कार्यवाह कुमार काळे हे असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलेचे अविस्मरणीय लेणे!

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

एकीकडे चित्रकारांच्या कलेचं रेखाटन, तर दुसरीकडे शिल्पकलेतून आकार घेणाऱ्या कलाकृती... कुठे शास्त्रीय संगीताचा नजराणा, तर कुठे हटके डान्सचा तडका... परिसंवादातून कलेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करीत काही महत्त्वाच्या विषयांवर होणारे विचारमंथन... कॅलिग्राफीतून उमटणारे अक्षरांचे सौंदर्य अन् मनमोहक कॅरीकेचर पाहण्यात दंग झालेले कलारसिक... असा अविस्मरणीय माहोल होता 'महाराष्ट्र टाइम्स'च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'कलासंगम' महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा. रविवारची सुटी आल्याने रसिकांसाठी हा दुग्धशर्करायोगच ठरला.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये रविवारी कलेची खास पर्वणी नाशिककर कलारसिकांनी अनुभवली. यानिमित्ताने 'कलेची साधना आणि आजचा विद्यार्थी', 'वादन- हौस साधना की फॅड', 'छायाप्रकाश : कालचा की आजचा', 'कला आणि व्यवसाय' या विषयांवर परिसंवाद पार पडले. या परिसंवादांत कलेच्या क्षेत्रातील दिग्गजांना संवादकांनी विचारलेल्या प्रश्नांतून कला क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या बाबी प्रकाशझोतात आल्या. तसेच कलासंगममध्ये हौशी कलाकारांच्या कलाविष्कारांचा खास नजराणा नाशिककरांसाठी पेश झाला. यामध्ये तराना कथ्थक, तिल्लाना, भरतनाट्यम, सतार वादन, एकपात्री, नर्तनरंग, कीर्तन तराना, लोकनृत्य, समकाल कथ्थक, तबला वादन, मेलोडिका, पोवाडा, सोलो साँग, पॉप साँग, सेक्सोफोन, ड्युएट यांसारख्या अनेक बहारदार कलांचे सादरीकरण झाले. सर्व परफॉर्मन्सेसना कलारसिकांची दाद मिळत होती. यानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या प्रांगणात कॅरीकेचर डेमो, शिल्पकलेतून साकारले जाणारे व्यक्तिशिल्प, निसर्गाच्या छायेत कॅनव्हॉसवर वॉटर कलर पेंटिंग आणि पेन स्केचच्या माध्यमातून साकारले जाणारे निसर्ग चित्र, कॅलिग्राफीमधून मराठी अक्षरांचं सौंदर्य खुलवण्याची कला यासर्वांचे साक्षीदार नाशिककर कलारसिक होत होते. प्रत्येक कलेचा आविष्कार सादर होताना, तसेच तो पूर्णत्वाकडे येताना कलाकारांच्या चेहऱ्यावरील मनमोहक भाव तर कलारसिकांची उत्सुकता आणि आनंद नक्कीच उल्लेखनीय ठरला. कलासंगमचा दुसरा दिवस कलाकार आणि कलारसिक या दोघांच्या दृष्टीने यादगार ठरला. कलाकारांना अतिशय कलामय माहोलात कला सादर करता आली. सोबतीला कलारसिकांची उत्स्फूर्त दाद आणि कलाकारांना मिळणारी पावती प्रेरणादायी होती.

सायंकाळीही कलेची मेजवानी

संध्याकाळी गणेशवंदना सादर झाली. 'पंचतुंड नररुंडमालधर' या गाण्यातून गणेशाला आणि शंकराला नमन करण्यात आले. सोबतच कथ्थक कलेचे बहारदार सादरीकरण झाले. यानंतरचा गायनाचा कार्यक्रम कमालीचा रंगला. संध्याकाळी कलासंगममध्ये सादर झालेल्या सर्व कलाविष्कारांना प्रेक्षकांनी गर्दी केली होती. कलासंगमचा समारोप यादगार करण्यासाठी कलारसिक कलेच्या संगमात दंग झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना मुलं: भिडे

$
0
0

नाशिक

माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असा दावा शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केला. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भिडे यांचे वक्तव्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असल्याची टीका होत आहे.

रविवारी संभाजी भिडे यांची नाशिक येथे सभा झाली. या सभेत त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केलीत. माझ्या शेतातील आंबा खाल्लास अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत १८०हून अधिक जोडप्यांना मी हा आंबा दिला. त्यातील दीडशे जणांना अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावा भिडे यांनी केला. आपल्या शेतातील आंब्यामुळे अपत्यप्राप्ती होते ही गोष्ट कोणालाच सांगितले नाही. आता तुम्हाला सांगत असल्याचे भिडे यांनी सभेत म्हटले.

अहमदनगर आणि नाशिक येथील सभेत संभाजी भिडे यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यात अपत्यप्राप्तीच्या या दाव्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीची झाडे नदीस घातक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नदीचे स्वतःचे असे हक्क आणि कर्तव्ये आहेत. आपण तिच्या हक्कांवर आणि कर्तव्यांवर घाला घालीत आहेत. नदीपात्रातील काँक्रिटीकरणामुळे नदीची जैवविविधता नष्ट होत आहे. गोदेभोवती तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच झाडे लावली पाहिज्त. चुकीचे झाड लावल्यास नदीला अधिक धोका निर्माण होऊ शकतो. नदी ती झाडे स्वीकारत नाही, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासिका कीर्ती अमृतकर यांनी केले.

वारसा व रिकनेक्टिंग विथ गोदावरीतर्फे गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी घेण्यात येणाऱ्या गोदावरी परिक्रमेंतर्गत सातव्या परिक्रमेत त्या बोलत होत्या. या परिक्रमेप्रसंगी रिकनेक्टिंग विथ गोदावरीच्या शिल्पा डहाके, वारसाचे नीलेश गावंडे, अमोल पाध्ये, मिलिंद चव्हाण आदी उपस्थित होते.

परिक्रमेच्या माध्यमातून गोदावरी नदीला समजून घ्यावे, तिच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करावा. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी किती गरज आहे, याबाबत जनजागृती निर्माण करता येईल. सध्या स्मार्ट सिटीअंतर्गत नदीकाठावर, तसेच पात्रात झाडे लावण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे नदीकाठी योग्य ती झाडे लावण्याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. आधीच गोदावरीच्या जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गोदेच्या पर्यावरणाला वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. शिल्पा डहाके यांनी परिक्रमेचे संचालन केले. नीलेश गावंडे यांनी प्रास्ताविक केले.

--

ही झाडे ठरतात उपयुक्त

नदीभोवती कोणती झाडे लावावीत व कोठे लावावीत, याबाबत अमृतकर यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, की नदीच्या काठावर कोणती झाडे लावावीत याचे ठोकताळे ठरलेले आहेत. नदीभोवती जांभूळ, पानजांभुळ, वाळूंज, उंबर, करंज, कदंब, भोकर ही झाडे लावावीत. त्यांचे पालन व्हायला हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचे जीपीएफ खाते लवकरच ऑनलाइन

$
0
0

नाशिकच्या शिक्षकांनीच बनवली वेबसाईट

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भविष्य निर्वाह निधी खात्याच्या लेखचिठ्ठ्या मिळविण्यासाठी सहन कराव्या लागणाऱ्या जाचातून जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची कायमची सुटका होणार आहे. या शिक्षकांना आता आपल्या जीपीएफ खात्याची माहिती घरबसल्या आपल्या स्मार्ट फोनवर मिळणार असून, पीएफ स्लीपही काढता येणार आहे. या योजनेचा फायदा जिल्ह्यातील सुमारे १७ हजार माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होणार आहे. यासाठीची वेबसाईट जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनीच तयार केली आहे. अशा प्रकारची वेबसाईट तयार करून शिक्षकांचे जीपीएफ अकाउंट ऑनलाइन करणारा नाशिक हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरणार आहे.

जीपीएफ खात्यावर जमा रकमांची माहिती मिळविण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी मोठे जिकिरीचे काम होते. कित्येक शिक्षकांना जीपीएफ खात्याच्या स्लिपा वर्षानुवर्षे मिळणेही मुश्किल होते. काही शिक्षकांना शिक्षण संस्थाचालकांच्या ससेमिऱ्याचाही सामना करावा लागत होता. मात्र, आता या सर्व त्राग्यातून जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कायमची सुटका झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे १७ हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या जीपीएफ खात्याची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वेतन व भविष्य निर्वाह पथक कार्यालयाने जिल्ह्यातील दाभाडी येथील किसन जयराम निकम विद्यालयातील शेखर ठाकूर आणि संदीप ठोके या शिक्षकांच्या सहकार्याने एक स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटद्वारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आता येथून पुढे त्यांच्या जीपीएफ खात्याची माहिती घरबसल्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वेतनपथक करणार खातरजमा

वेतन पथक कार्यालयामार्फत शिक्षकांच्या जीपीएफ अकाउंटची माहिती वेबसाईटवर लवकरच उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शिक्षकांची माहिती संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून शाळेतूनच भरली जाणार आहे. वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेल्या माहितीची वेतनपथक कार्यालयाद्वारे खात्री केली जाणार आहे. या वेबसाईटवर अपलोड केलेली माहिती संबंधित शिक्षकांना घरबसल्या स्मार्टफोनवरही बघता येणार आहे. या वेबसाईटच्या कामकाजाचे सादरीकरण राज्याच्या शिक्षण संचालकांसमोरही करण्यात आले होते.

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे जीपीएफ अकाउंट लवकरच ऑनलाइन होणार आहे. त्यासाठी www.pyunitsecnsk.in ही वेबसाईट विकसित केली आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची माहिती या वेबसाईटवर अपलोड करण्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

- उदय देवरे, अधीक्षक, वेतन भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय, जि. प. नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाम्पत्याच्या वादात कुटुंबकल्याण समितीही हैराण

$
0
0

मटा विशेष

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : कौटुंबिक कलहानंतर थेट गुन्हा दाखल झाल्यास वाद विकोपाला जातो. त्यामुळे गुन्हा दाखल होण्यापूर्वी पती-पत्नींच्या वादाची कारणे शोधून त्यावर पर्याय शोधण्यासाठी कुटुंबकल्याण समिती गठित करण्यात आली. मात्र, असे वाद मिटवणे समुपदेशकासह समितीलाही अवघड ठरते. गेल्या वर्षीपासून आतापर्यंत समोर आलेल्या २८२ तक्रारींपैकी अवघ्या सहा प्रकरणांमध्ये समितीद्वारे समझोता घडून आला आहे. उर्वरित प्रकरणांत समितीने आपले अहवाल संबंधित पोलिस स्टेशनला सादर केले आहेत.

कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील तरतुदींचा गैरफायदा घेण्याचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कुटुंबकल्याण समिती गठित करण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०१७ पासून समितीचे तीन सदस्य जिल्हा विधी प्राधिकरणाच्या इमारतीत काम करतात. हे सदस्य निवृत्त जिल्हा न्यायाधीश आहेत. कुटुंबकल्याण समिती अस्तित्वात येण्यापूर्वी विवाहितेच्या पती व सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाबाबत कलम ४९८ अ नुसार पोलिसांकडे किंवा न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात तक्रार करण्यात येत होती. मात्र, आता दोन्ही बाजूंच्या पक्षकारांना कुटुंबकल्याण समितीसमोर हजर राहावे लागते. समिती सदस्य दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून आपला अहवाल सादर करतात. या तज्ज्ञ समितीसमोर प्रकरण आल्यानंतर समुपदेशन व समझोता याकडे लक्ष दिले जाते. मात्र, एकमेकांना दूरच करायचे, या विचारांनी प्रेरित झालेले दाम्पत्य, त्यांना चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करणारे नातेवाईक अशा वेगवेगळ्या घटकांचा परिणाम होत असतो. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत समितीसमोर ९६ केसेस आल्या होत्या. त्यातील दोन प्रकरणांत समितीसमोर समझोता झाला. उर्वरित केसेसचे रिपोर्ट समितीने संबंधित पोलिस स्टेशनला पाठवले आहेत. समितीने रिपोर्ट दिला म्हणजे कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार गुन्हा दाखल होतोच असे नाही. अनेकदा खोट्या तक्रारीसुद्धा असतात. दरम्यान, या वर्षी ११ जूनपर्यंत समितीकडे ४४४ तक्रारी आल्या आहेत. यातील १८६ प्रकरणांमध्ये सुनावणी झाली असून, चार प्रकरणांत तडजोडी स्वीकारण्यात आल्या. उर्वरित २५८ प्रकरणांची सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. याबाबत बोलताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ स्तर जिल्हा दिवाणी न्यायाधीश एस. एम. बुक्के यांनी सांगितले, की पती-पत्नीच्या भांडणाच्या शेकडो तक्रारी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाकडे येत असतात. यातील बहुतांश तक्रारीमध्ये तडजोडी करण्यात यश मिळते. या दाम्पत्यांना एकत्र राहण्याची इच्छा असते. मात्र, काही तरी वाद होत असतात. याउलट, कुटुंबकल्याण समितीकडे येणारे तक्रारदार गुन्हा दाखल करायचा याच निश्चयाने येतात. पोलिस स्टेशन, वकील यांच्याकडून तक्रारदार थेट समितीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे बऱ्याच वेळा समुपदेशनाने फरक पडत नाही. कौटुंबिक कलहाची अनेक कारणे असून, परस्पर अविश्वास असणे आणि सहन करण्याची मानसिकता नसणे यामुळे वाद सुरू होतात. नातलग आणि पालकांनी प्रोत्साहन दिले, की परिस्थिती हाताबाहेर जाते, असे बुक्के यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आपत्ती व्यवस्थापनाला ठेंगा

$
0
0

मटा विशेष

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : नैसर्गिक, तसेच मानवनिर्मित आपत्तीबाबत तीव्र जोखमीच्या जिल्ह्यांमध्ये नाशिक देशात आठव्या स्थानी असल्याची धक्कादायक बाब नॅशनल डिझास्टर इंडेक्सच्या अहवालातून पुढे आली आहे. विशेष म्हणजे या विभागाकरिता स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे या जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावालाही सरकारने केराची टोपली दाखवली आहे. सिंहस्थाच्या आधीपासून हा प्रस्ताव लाल फितीत अडकला असून, या विभागासाठी स्वतंत्र वाहन देण्याचे दातृत्वही सरकार दाखवू शकलेले नाही.

पूर, भूकंप, ढगफुटी, भूस्खलन, आग यांसारख्या नैसर्गिक आपत्ती केव्हाही आणि कोठेही उद्भवू शकतात. कळवण तालुक्यातील दळवट आणि आसपासच्या परिसरात तर सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असतात. पावसाळ्यात अनेकदा नाशिक शहरासह निफाड आणि इगतपुरी तालुक्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांच्या जीविताचे आणि शक्य तेवढे मालमत्तांचे रक्षण करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागावर सोपविण्यात आली आहे. मात्र, शस्त्र हाती नसताना युद्धावर धाडण्यात आल्यासारखी या विभागाची दयनीय अवस्था झाली आहे.

उदासीनतेचा फटका

अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या आपत्ती व्यवस्थापनच्या नॅशनल डिझास्टर इंडेक्सच्या अहवालात आपत्तीबाबतची तीव्र जोखीम आणि तोकड्या उपाययोजनांच्या क्रमवारीमध्ये नाशिकचा देशातील ६४० जिल्ह्यांमध्ये आठवा क्रमांक लागला आहे. याचाच अर्थ नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीबाबत शहरासह जिल्हा हाय रिस्क झोनमध्ये असून, ही धोक्याची घंटा मानली जाते आहे. जिल्हा प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग वर्षानुवर्षे कार्यरत असला तरी या विभागाकडे स्वत:चे असे कायमस्वरूपी मनुष्यबळ नाही. आपत्ती व्यवस्थापनासाठीची स्वतंत्र यंत्रणा असायला हवी. दुर्दैवाने ही यंत्रणा अजूनही या विभागाला मिळू शकलेली नाही. सिंहस्थापूर्वीच या विभागासाठी २९ कर्मचाऱ्यांच्या मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सरकारला पाठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अव्वल कारकून, कारकून, समन्वयक, वाहनचालक यांसारख्या अनेक पदांचा त्यामध्ये अंतर्भाव आहे. मात्र, तीन वर्षे उलटूनही हा प्रस्ताव सरकारने मंजूर केलेला नाही. याखेरीज आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारे कटर, जॅकेट, रोप यांसारखी सामग्री मागूनही ती अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पथकाला घटनास्थळी पाठवावे लागते. त्यासाठी वाहनाची आवश्यकता असली तरी या विभागाकडे वाहन नाही. सामग्री वाहून नेण्यासाठी पिकअपसारखे वाहन, तर कर्मचारी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र वाहन मिळावे अशीदेखील जिल्हा प्रशासनाची मागणी असून, या मागण्याही सरकारने अद्याप पूर्ण केलेल्या नाहीत. आपत्ती व्यवस्थापनाबाबत सरकारच उदासीन असून, याचा फटका नाशिककरांना बसण्याची भीतीही व्यक्त होऊ लागली आहे.

तालुकानिहाय आपत्तीची शक्यता

तालुका आपत्ती

इगतपुरी : अतिवृष्टी

नाशिक : पूर, आग, अपघात, चेंगराचेंगरी

त्र्यंबकेश्वर : अतिवृष्टी

पेठ : अतिवृष्टी

मालेगाव : दंगल, अपघात

चांदवड : भूकंप, दुष्काळ

नांदगाव : भूकंप, दुष्काळ, अपघात, वीज पडणे

निफाड : पूर

येवला : भूकंप, दुष्काळ

कळवण : भूकंप

देवळा : भूकंप, दुष्काळ

बागलाण : भूकंप, दुष्काळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षलागवडीला परवानगी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून सुरू करण्यात येणाऱ्या १५ हजार वृक्षलागवडीच्या मार्गातील आचारसंहितेचा अडथळा आता दूर झाला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी महापालिकेला निविदा प्रक्रिया राबवता येईल असा अहवाल दिला आहे. त्यामुळे महापालिकेला पावणेचार लाख रुपये खर्च करून १५ हजार रोपांची खरेदी करता येणार आहे. राज्य शासनाच्या वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत महापालिका १५ हजार वृक्ष लागवड करणार आहे. तसेच स्वनिधीतून जवळपास १२ हजार वृक्षांची लागवड करणार आहे. १५ हजार वृक्षलागवडीसाठी पावणेचार लाख रुपयांचा खर्च येणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. परंतु, सध्या शिक्षक विधानपरिषदेची आचारसंहिता सुरू असल्याने निविदा प्रक्रियेला अडचण होती. त्यासाठी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गदर्शन मागवले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने वृक्षलागवडीसाठी निविदा प्रक्रिया राबविता येईल असा अहवाल दिला आहे. त्यामुळे महापालिकेत आता १५ हजार वृक्षलागवड करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गायकवाड यांना ब्रिटनचा पुरस्कार

$
0
0

\B

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

\Bजागतिक स्तरावर नेतृत्व विकसनासाठी ब्रिटिश सरकारच्या वतीने देण्यात येणारा चिवनिंग अॅवॉर्ड यंदा भारतातून नाशिकच्या डॉ. भार्गव विश्वासराव गायकवाड यांना जाहीर झाला आहे. ब्रिटिश सरकारच्या आंतरराष्ट्रीय पारितोषिक योजनेंतर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या अंतर्गत पारितोषिकविजेत्या सदस्यास इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्यात येते. भारतातून सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांमधून डॉ. भार्गव यांची निवड झाली.

डॉ. भार्गव केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांचे पुत्र आहेत. 'चिवनिंग'च्या वतीने 'चिवनिंग स्कॉलरशिप' व 'लो शिप' ही स्कॉलरशिप देण्यात येते. जगभरातील स्कॉलरशिपच्या मूल्यमापनात या स्कॉलरशिपच्या यशाची टक्केवारी ०.६ टक्के आहे. ब्रिटिश उच्चायुक्त व उच्च आयुक्तालयाच्या वतीने १४४ देशांमधून पुरस्कारार्थींची निवड करण्यात येते. या योजनेला ब्रिटिश फॉरिन अँड कॉमनवेल्थ ऑफिसकडून अनुदान देण्यात येते. नेतृत्वक्षमता असलेल्या जागतिक विद्वानांना इंग्लंडमधील विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणाची संधी दिली जाते. डॉ. भार्गव इंग्लंडमध्ये ससेक्स विद्यापीठात अध्ययन करणार आहेत. 'डेव्हलपमेंट स्टडीज'मध्ये ससेक्स विद्यापीठ जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या स्कॉलरशिपअंतर्गत ट्युशन फी, मासिक स्टायपेंड, इंग्लंडमध्ये जाण्या-येण्याचा खर्च, आगमन भत्ता, एका व्हिसासाठीच्या अर्जासाठीचा खर्च व इंग्लंडमध्ये वास्तव्यास असताना चिवनिंग इव्हेंटला जाण्यासाठी ट्रॅव्हल ग्रँट दिली जाते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमा पवार आदींनी डॉ. भार्गव यांचा गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समाजकल्याण’ कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजकल्याण कर्मचारी संघटना (गट क) महाराष्ट्र राज्य, पुणे या राज्यस्तरीय संघटनेच्या नाशिक विभागाच्या वतीने सोमवारी सरकारच्या कर्मचारीविरोधी धोरणांचा काळ्या फिती लावून व प्रवेशद्वारावर निर्दशने करून निषेध व्यक्त करण्यात आला. शासन स्तरावरून १२ जूनपर्यंत प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास १३ जूनपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

समाजकल्याण विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची नियमित पदोन्नती करणे, ५० टक्क्यांपेक्षा जास्त रिक्त असलेल्या जागा तत्काळ भरणे, नव्याने कार्यान्वित योजनांसाठी जादाची पदे निर्माण करणे, जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीसाठी आकृतिबंध निर्माण करणे, नवीन शासकीय वसतिगृहांसाठी पदे मंजूर करणे, अंतिम कार्यवाहीचे अधिकार नसतानाही कर्मचाऱ्यांविरुद्ध विनाकारण केलेले निलंबन मागे घेणे, जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत समाजकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणालीतून वेतन अदा करणे, मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करणे, वैद्यकीय देयकांचे प्रतिपूर्तीच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करणे, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी संघटनेची शासन व आयुक्त स्तरावरून वेळोवेळी बैठकी घेणे व प्रश्न सोडविणे आदी मागण्या समाजकल्याण कर्मचारी संघटनेने सरकारकडे वारंवार केलेल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली न गेल्याने त्याचा निषेध म्हणून कर्मचारी संघटनेने ११ व १२ जून रोजी काळ्या फिती लावून कामकाज करणे व दुपारच्या सुटीत सरकारविरुद्ध निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारपासून राज्यभरातून समाजकल्याण कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून कामकाज करण्यास सुरुवात केली आहे. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन प्रवेशद्वारासमोर निर्दशने करण्यात आली. या वेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे, नाशिक विभागीय अध्यक्ष अश्विनी मोरे, उपाध्यक्ष राजेंद्र देवरे, श्रीधर त्रिभुवन व नाशिक जिल्हाध्यक्ष जयश्री राठोड, तसेच विभागीय व जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजकल्याण फोटो

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images