Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भगूर उपनगराध्यक्षपदी प्रतिभा घुमरे यांची वर्णी

$
0
0

देवळाली कॅम्प :  भगूर  नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रतिभा घुमरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी घुमरे समर्थक व शिवसैनिकांनी शिवाजी चौकात फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. 

  रोटेशन पद्धत असल्याने मनीषा कस्तुरे यांनी उपनगराध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिला होता. तो मंजूर करत या पदासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन पालिका सभागृहात करण्यात होते. यावेळी प्रतिभा घुमरे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आहिरराव यांनी घुमरे यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांनी काम पाहिले. सभेस शिवसेना जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, वनश्री तानाजी भोर, उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, चंद्रकांत गोडसे, नाना ताजनपुरे, शहरप्रमुख अंबादास कस्तुरे, नगराध्यक्षा अनिता करंजकर, मुख्य लिपिक रमेश राठोड आदिसंह सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिमांशू रॉय यांच्या अस्थींचे विसर्जन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी 

राज्याचे दिवंगत एटीएस प्रमुख व अतिरिक्त पोलिस महासंचालक, १९८८ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले हिमांशू रॉय (५४) यांच्या अस्थी सोमवारी सकाळी रामकुंड येथे आणण्यात आले. शोकाकुल वातावरणात धार्मिक विधीनंतर त्या रामकुंडात विसर्जित करण्यात आल्या. 

हिमांशू रॉय यांनी शुक्रवारी (दि. ११) आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. रॉय यांनी नाशिकचे आयुक्तपद भूषविले असल्याने ते नाशिककरांना चांगले परिचित होते. त्यांच्या निधनाची वार्ता नाशिककरांना चटका लावणारी ठरली. रॉय यांच्या पत्नीसह त्यांची आई,  मुले, बहीण, मेहुणे, आप्तेष्ट व गुजरातमधील त्यांच्या मूळ गावचे नातेवाईक रामकुंड येथे सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पोहचले. पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांनी यावेळी पौरोहित्य करीत धार्मिक विधी पार पाडले. सुमारे दीड तास चाललेल्या या धार्मिक विधीनंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात रॉय यांच्या अस्थी रामकुंडात विसर्जित करण्यात आल्या. 

 पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, माजी महापौर अशोक मुर्तडक, डॉ. प्रदीप पवार, अतुल चांडक, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी व त्यांचे निकटवर्तीय उपस्थित होते. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा भूमिका - विमान सेवा- वापरली...

$
0
0

विमानसेवा अन् नाशिक हे समीकरण काही जमत नाही याचा अनुभवही आता जुना झाला असतानाच नव्याने जेट एअरवेज या आणखी एका आघाडीच्या विमान कंपनीने नाशिकला स्वप्न दाखविले आहे. जूनपासून जेट ही कंपनी दिल्लीसाठी सेवा सुरू करीत असल्याने नाशिककरही लागलीच हुरळून गेले आहेत. वारंवार धक्के बसूनही नाशिककरांची उड्डाणाची आस काही जाता जात नाही. अर्थात हा आशावादच एक दिवस या सेवेला नियमित होण्यास कारणीभूत ठरू शकतो. किमान ही सेवा तरी सुरळीत होऊ दे, अशी प्रार्थना करण्यापलीकडे लोकांच्याच हातात तरी दुसरे काय आहे?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीन हजार जणांची अकरावीसाठी नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावीच्या निकालाचा कालावधी नजिक असल्याने आता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाने प्राथमिक माहिती असलेला भाग १ मधील माहिती भरण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. ही प्रक्रिया चार दिवसांपासून सुरू झाली आहे. या काळात सोमवारी सायंकाळपर्यंत ३ हजार ६६० विद्यार्थ्यांनी भाग १ मधील माहिती भरून नावनोंदणी केली. यातील १०३४ विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाने तपासले असून अद्याप १ हजार ५८९ अर्ज हे तपासणी प्रक्रियेत आहेत.

एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या अर्जाच्या दुसऱ्या भागातील माहिती विद्यार्थ्यांना अद्ययावत करता येणार आहे. तोपर्यंत अकरावी प्रवेशासाठी माहितीपुस्तिका घेतल्या नसतील अशा विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रावरून त्या मिळवून घ्याव्यात. माहिती पुस्तिका बारकाईने वाचून नंतरच त्यातील लॉग इन आयडी आणि पासवर्डच्या आधारे पहिल्या भागातील माहिती पूर्ण भरावी. हे अर्ज भरण्यासाठी शाळा आणि अधिकृत मार्गदर्शन केंद्रांशिवाय इतरत्र ठिकाणाहून अर्ज भरू नये, असे आवाहन विद्यार्थी व पालकांना शिक्षण विभागाने केले आहे.

आयसीएसईसाठी माहितीपुस्तिका १५ पासून

सोमवारी दुपारी आयसीएसई बोर्डाचा बारावी सोबतच दहावीचाही निकाल जाहीर करण्यात आला. या विद्यार्थ्यांसाठी अद्याप अकरावी प्रवेश माहिती पुस्तिकेचे वितरण सुरू झालेले नाही. १५ मेपासून या विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका घेता येतील. या विद्यार्थ्यांनी नाशिकरोड, बिटको महाविद्यालयात हे प्रवेश अर्ज तपासून घ्यावेत, असेही आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन युवा महासभा कार्याध्यक्षपदी लोहाडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतवर्षीय दिगंबर जैन युवा महासभेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नाशिकचे पारस लोहाडे यांची निवड झाली आहे. नाशिक शहराला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे. नांदगाव येथील आनंद काला यांचीही राष्ट्रीय सहसचिवपदी निवड झाली आहे.

महावीरजी तीर्थक्षेत्र राजस्थान येथे १२ मे राजी झालेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत पारस लोहाडे यांची युवा महासभेच्या कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. नाशिक शहरातून आजपर्यंत कोणीही या संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नव्हते. संस्थेचे मुख्य अध्यक्ष म्हणून लखनौ येथील निर्मलकुमार सेठी यांची निवड झाली आहे. भारतवर्षीय दिगंबर जैन महासभा देशभरातील दिगंबर जैन समाजातील सर्वांत मोठी संस्था असून, या संस्थेद्वारे जैन संस्कृतीचे रक्षण, संवर्धन, जतन करण्यास प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यासह वेगवेगळ्या तीर्थांचे रक्षण, युवकांच्या समस्या, साधू-संतांची सेवा अशा अनेक उपक्रमांतही ही संस्था अग्रेसर आहे. पारस लोहाडे नाशिकमधील अनेक संस्थांमध्ये कार्यरत असून, त्यांच्या नावावर वेगवेगळे १३ विश्वविक्रमही आहेत. असे करणारे ते राज्यातील एकमेव आहेत. त्यांच्या निवडीचे सर्व समाजबांधवांनी स्वागत केले आहे.

(फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅसविना कूकिंगच्या टिप्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे बच्चेकंपनीसाठी आयोजित करण्यात आलेल्या किड्स कार्निवलमध्ये बच्चेकंपनी भलतीच खूश आहे. हँडीक्राफ्ट वर्कशॉप, त्यानंतर बालनाट्याची मेजवानी आणि आता नॉनफायर कूकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या गुरुवारी (दि. १७ मे) नॉनफायर कूकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. फिटनेस स्टुडिओ बाय सई संघई, महात्मानगर या ठिकाणी सकाळी १० वाजता हे वर्कशॉप होणार आहे.

अनेकदा बच्चेकंपनीला स्वतः काही बनवायचे असते. पण, आई गॅसजवळ येऊ देत नाही. मग बच्चेकंपनी पदार्थ बनविण्याची हौस पूर्ण करणार कधी? गॅस न वापरता सॅण्डविच पिनव्हील्स, पिझ्जा टार्ट्स, ओरिओ शॉट्स, बिस्किट कॅनापाइज्, चायनिज् भेल आदी पदार्थ कसे बनवायचे याचे मार्गदर्शन विवेक सोहनी करणार आहेत. त्यासाठी १०० रुपये नोंदणी फी आहे. हे वर्कशॉप ६ ते १६ या वयोगटातील मुलांसाठी असून, मुलांनी येताना वही आणि पेन घेऊन येणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच कल्चर क्लबच्या ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला भेट द्यावी.

- - -

कल्चर क्लब, किड्स कार्निव्हल लोगो, फेसबुक, ट्विटर लिंक, क्यूआर कोड वापरावा.

बातमी पहिल्या पानावर घ्यावी.

- - -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोड रोखण्यासाठी मोबाइल स्कॉड

$
0
0

'आम्ही मालेगावकर'च्या उपोषणानंतर वनविभागाचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव उपविभागीय वनक्षेत्रात होत असलेल्या अवैध वृक्षतोडीबाबत उपाययोजना कराव्यात या प्रमुख मागणीसाठी येथील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी येथील वनविभाग कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. दरम्यान समितीच्या मागण्यांबाबत उपविभागीय वन अधिकारी जगदीश येडलावर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लेखी आश्वसन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

मालेगाव उपविभागीय वनक्षेत्रातील जंगलात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून शहरातील विविध सायाजिंगमध्ये सर्रासपणे हे लाकूड वापरले जात असल्याची तक्रार समितीने वारंवार वनविभागाकडे केली आहे. मात्र याबाबत कारवाई होत नसल्याने अखेर सोमवारी उपोषण सुरू केले. निखील पवार यांनी आपल्या मागण्या पुढे ठेवल्या. यात अवैध वृक्षतोडीतील लाकडू सॉ मिलमध्ये आढळल्यास त्या एक वर्षासाठी सील कराव्यात, त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून पुन्हा परवाने देऊ नये, अवैध वृक्षतोड करून लाकूड वाहतूक करणारी वाहन जप्त कारवाई व रोख दंड तसेच सश्रम कारावास शिक्षेची तरतूद करावी, तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या सर्व वनकर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, अवैध वृक्षतोड थांविण्यासाठी पथक नेमण्यात यावे, दास्ता डेपो परवाने सक्तीचे करावेत, चराई व कुऱ्हाडबंदी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या होत्या.

उपविभागीय वनअधिकारी येडलावर यांनी समितीला लेखी आश्वसन दिले. त्यात अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी फिरते पथक नेमण्याचे आश्वासन आहे. या पथकात एक वन परिक्षेत्र अधिकारी, ५ ते ६ शस्त्रधारी वनरक्षक (मोबाईल स्कॉर्ड) नियुक्तीला तत्वतः मान्यता दिली आहे. तसेच शहरातील सहा सॉ मिल एक महिन्यासाठी सील करण्यात आल्या आहेत. पाच सायजिंगवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सश्रम कारावास व रोख दंड शिक्षेचा प्रस्ताव शासनास पाठीवण्यात येतील, दास्तान डेपो परवाना न घेणाऱ्यांवर कायदेशीर करावाई करण्याचे लेखी आश्वसन देण्यात आले आहे. या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी पवार यांच्यासह समितीचे रवीराज सोनार, देवा पाटील, राहुल देवरे सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवत्यातील अतिक्रमण मुख्याधिकाऱ्यांचा रडारवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून विविध धडक कारवाईतून आपली आक्रमकता दाखविणाऱ्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर-शहाणे यांनी आता अतिक्रमणाकडे मोर्चा वळविला आहे. याआधी त्यांनी रुवातीला राज्य महामार्गासह शहरातील विविध रस्त्यांवरील फेरीवाल्यांसह छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करून रस्त्यांचा श्वास मोकळा केला आहे.

शहरातील गटारींवर पायऱ्या, भिंती आदी बांधकाम केलेल्या दुकानदार व रहिवाशांना त्यांनी 'हे अतिक्रमण काढून घ्या, अन्यथा कडक कारवाई करू', असा इशारा दिला आहे. त्यामुळे गेल्या तीनचार दिवसात शहरातील विविध भागातील व्यापारी, नागरिकांनी स्वतः हाता टिकाव पावडे हाती घेत हे वाढीव बांधकाम काढून घेतले आहे.

संगीता नांदुरकर-शहाणे या गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्या आहेत. शहरातून जाणाऱ्या मनमाड-नगर आणि नाशिक-औरंगाबाद या दोन मुख्य महामार्गासह शहरातील विविध रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी प्रारंभी त्यांनी महामार्गालगतच्या असंख्य फेरीवाल्यांबरोबरच छोट्या विक्रेत्यांची उचलबांगडी केली. पुढे महामार्गावरील अनेक दुकानदारांना त्यांच्या दुकानासमोरील शेड, छत काढायला लावले. आणि आता शहरातील गटारींवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई हातात घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पालिका अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसह स्वतः नांदुरकर रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामुळे शहराच्या विविध भागातील गटारींवरील पायऱ्या, भिंती आदींचे वाढीव बांधकाम नागरिक काढून घेत आहेत. नांदुरकर यांनी सोमवारी (दि.१४) देखील ही मोहीम पुन्हा सुरू ठेवल्याचे दिसून आले. या मोहिमेंतर्गत त्यांनी शहरातील अनेक कॉलनी भागाकडे आपला मोर्चा वळवल्याने नागरिकांना आपल्या घरासमोरील पोर्च, कंपाउंड देखील काढून घेण्याची वेळ आली. मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी नाले व गटारी मोकळया वाहण्यासाठी मोहीम हाती घेतल्याने अनेकांना आपल्या घरांच्या पायऱ्या व ओटे काढावे लागत आहे.

नांदुरकर यांच्या पवित्र्याने शहराचा गावगाडा हाकणाऱ्या येवला नगरपालिकेच्या जवळपास सर्वपक्षीय नगरसेवकांची मोठी 'कोंडी' झाली आहे. या मोहिमेदरम्यान प्रत्येक वार्डातील नागरिक आपआपल्या नगरसेवकांकडे धाव घेत असले तरी, सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता सुरू असल्याने मुख्याधिकाऱ्यांशी कसे बोलावे? असा यक्षप्रश्न येथील पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वच नगरसेवकांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आचारसंहितेच्या बडग्याने विकासकामांबाबत संभ्रम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने महापालिकेच्या करवाढीच्या प्रश्नावरून वाढलेला संभ्रम विधान परिषदेच्या निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर दूर होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.

नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने विधान परिषदेसाठी लागू असलेली निवडणूक आचारसंहिता १२ जूनपर्यंत लाबंली होती. त्यामुळे करवाढीच्या निर्णय १२ जूनपर्यंत लांबेल असा संभ्रम होता. दरम्यान, विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला असून, नवी कामे जवळपास ठप्प झाली आहेत. स्मार्ट सिटीच्या कामांनाही या आचारसंहितेचा फटका बसला असून, पदाधिकारी आणि नगरसेवक फिरकत नसल्याने धोरणात्मक निर्णयही लटकले आहेत.

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक येत्या २१ मे रोजी होणार असून, २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने २९ मेपर्यंत आचारसंहिता लागू केली आहे. विधान परिषदेच्या एका जागेवरील निवडणुकीमुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला असून, धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याने कामकाज ठप्प झाले आहे. त्यातच शहरात पेटलेल्या करवाढीच्या मुद्द्यावरून रान उठले असून, करवाढीचा प्रश्न आचारसंहितेनंतर सुटेल असे चित्र होते. त्यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ३१ मार्च रोजी काढलेल्या करवाढीच्या अधिसूचनेला स्थगिती देणारा ठराव आचारसंहिता संपताच पाठविला जाईल, असे चित्र होते. परंतु, ही आचारसंहिता संपण्याआधीच नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचाही कार्यक्रम घोषित झाला आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ८ जून रोजी निवडणूक होणार असून, १२ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीचीही आचारसंहिता नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसाठी लागू झाली होती. त्यामुळे करवाढीचा संभ्रमही अधिकच वाढला होता. परंतु, निवडणूक आयोगाने आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली आहे. त्यामुळे महापालिकेला काहीसा दिलासा मिळाला असून, २९ मेनंतर धोरणात्मक निर्णयासह करवाढीच्या निर्णयाचा संभ्रम दूर होणार आहे.

करवाढीचा तिढा

करवाढीसंदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काढलेली अधिसूचना ही प्रभाग क्रमांक १३ च्या आचारसंहितेदरम्यान काढल्याचे आदेश देत करवाढीला महासभेने स्थगिती दिली होती. परंतु, जिल्हा प्रशासनाने या निर्णयावर आक्षेप घेत थेट आचारसंहिता भंगाच्या कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे महापौरांनी दोन पावले मागे येत कारवाईच्या भीतीने अद्यापही ठराव दिलेला नाही. आचारसंहिता संपताच हा ठराव जाईल, असे चित्र होते. परंतु, महापौरांनी अद्यापही ठराव दिला नसल्याने करवाढीचा संभ्रम कायम राहिला आहे.

पदाधिकारी गायब

महापालिकेत आचारसंहिता लागू असल्याने व धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याने महापालिकेतील महापौर, उपमहापौर, गटनेते, विरोधी पक्षनेत्यांसह स्थायी समिती सभापतींनी महापालिकेपासून अंतर राखले आहे. पदाधिकारी महापालिकेत फिरकत नसल्याने महापालिकेत शुकशुकाट पसरला असून, महापालिकेत तक्रारी व अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांची कैफियत ऐकण्यास कोणीही उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे तक्रारी आणि कामे होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे.

महासभाही साप़ली कात्रीत

महापालिकेत दरमहा महासभा बोलावली जाते. परंतु, सध्या आचारसंहितेच्या कात्रीत महासभाही अडकली आहे. गेल्या वेळच्या महासभेत करवाढीच्या मुद्द्यावरून बराच खल झाला होता. परंतु, प्रत्यक्षात आचारसंहितेमुळे अद्यापही करवाढीच्या स्थगितीचा ठराव आलेला नाही. त्यातच आता पुन्हा महापौरांनी येत्या शनिवारी (दि. १९ मे) महासभा बोलावली आहे. या महासभेतही आचारसंहितेमुळे धोरणात्मक निर्णयांवर चर्चा करता येणार नाही. त्यामुळे केवळ इतिवृत्त मंजुरीवरच भागवावे लागणार आहे.

---

(निष्पक्षचा लोगो वापरणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटारी होणार बंदिस्त

$
0
0

स्वतंत्र मलवाहिका; १९ नैसर्गिक नाल्यांमध्ये सांडपाणी सोडण्यास बंदी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी नदीला जोडलेल्या नैसर्गिक नाल्यांमध्ये थेट गटारीचे पाणी सोडले जात असल्याने गोदा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे गोदेला मिळणाऱ्या १९नैसर्गिक नाल्यांमध्ये गटारीचे पाणी सोडले जाऊ नये, अशी मागणी निरी आणि महापालिके दरम्यान झालेल्या संयुक्त बैठकीत पर्यायवरणप्रेमींनी केली. त्यानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नैसर्गिक नाल्यांमध्ये जोडलेल्या गटारी बंद करून या गटारींचे पाणी मलवाहिकांना जोडण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील काम महापालिकेने सुरू केल्याचा दावाही आयुक्तांनी केला आहे.

गोदावरी प्रदूषणाच्या समस्येवर सोमवारी महापालिका आयुक्तांच्या दालनात निरी आणि पर्यायवरण प्रेमींच्या उपस्थितीत उपाययोजनांसदर्भात बैठक झाली. यावेळी 'निरी'चे राकेशकुमार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, प्राचार्य प्राजक्ता बस्ते, पर्यावरण प्रेमी राजेश पंडित, निशिकांत पगारे उपस्थित होते. या बैठकीत गोदावरीच्या प्रदूषण आणि त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी पर्यावरण प्रेमींनी गोदावरी नदीला मिळणाऱ्या नैसर्गिक नाल्यांमध्ये थेट गटारीचे पाणी सोडले जाते. त्यामुळे गटारीचे पाणी हे नाल्यांद्वारे थेट नदीपात्रात मिसळून नदीचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे नैसर्गिक नाल्यांना मिळणारे गटारीचे पाणी तातडीने बंद करण्याची मागणी केली. त्यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही पर्यावरण प्रेमींच्या मागणीला दुजोरा देत यावर काम सुरू असल्याचे सांगितले. महापालिकेमार्फत शहरातील गटारींचे पाणी स्वतंत्र मलवाहिकाद्वारे एसटीबी प्लान्टपर्यंत आणण्याचे नियोजन असून त्यासाठीचे कामही सुरू झाले आहे. त्यासाठी जवळपास ८० कोटींची तरतूद केली आहे. यात नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडण्यात येणारे गटारीचे पाणी हे स्वतंत्रपणे मलवाहिकाद्वारे वाहिले जाणार आहे. त्यामुळे गटारींचे हे पाणी नैसर्गिक नाल्यांमध्ये जाणार नसल्याने गोदावरीच्या प्रदूषणाला आळा बसणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

गोदापात्रातील काँक्रिट काढणार

गोदावरी नदीत गोदाप्रकल्पासह रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणावर क्रॉक्रिटीकरण झाल्याने नदीतले नैसर्गित स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे नदीपात्रातील सर्व काँक्रिटीकरण काढून टाकण्याची मागणी बैठकीत पर्यायवरण प्रेमींनी केली. त्यावर स्मार्ट सिटी अंतर्गत नदीपात्रातील सर्व काँक्रिटीकरण काढून टाकले जाणार असल्याची माहिती आयुक्त मुंढेंनी दिली. स्मार्ट सिटी अंतर्गत स्वतंत्र गोदाप्रकल्प राबविला जाणार असून त्यात गोदापात्र सुशोभिकरणा अंतर्गत नदीपात्रातील काँक्रिटीकरण काढले जाणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.

असे आहेत शहरातील नैसर्गिक नाले

मल्हारखाना नाला, चोपडा नाला, जोशीवाडा नाला, निर्मला कॉन्व्हेंट नाला, आसाराम बापू आश्रमातील नाला, आंनदवल्ली नाला, चिखली नाला, सोमेश्वार नाला, बारदान फाटा जवळील नाला, गंगापूरगाव नाला, गांधारवाडी नाला, कुसुमाग्रज उद्यानालगतचा नाला, रामवाडी लेंडी नाला, सरस्वती नाला, नागझरी नाला, नासर्डी नदी, कपिला नाला, वाघाडी नाला, अरुणा नाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उर्दू पत्रकारावर मालेगावात हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील एका उर्दू पत्रकारावर व वृत्तपत्र कार्यालयावर हल्ला करून आरोपी फरार झाल्याची घटना समोर आली आहे. या बाबतीत मालेगाव शहर पोलिस ठाण्यात सदर आरोपींविरुद्ध फिर्याद नोंदविली आहे. येथील स्थानिक उर्दू वृत्तपत्र दिवाने-ए-आयच्या बादशहा खान नगर येथील कार्यालयामध्ये शनिवारी, १२ मे रोजी रात्रीच्या सुमारास नदीम अहमद या आरोपीने पत्रकार मोमीन वहेदुद जाहिद अख्तर (वय २१) यांना मारहाण केली. आरोपीला अडविण्याचे प्रयत्न केले असता आरोपी नदीम अहमदने धारदार कटरने मोमीन यांच्या डाव्या कानावर वार केले. तसेच कार्यालयातील सामानाची नासधूस करून तेथून पळ काढला. पत्रकार मोमीन यांनी याबाबत फिर्याद मालेगाव शहर पोलिस ठाण्यात नोंदविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंब संस्थेला घटस्फोटाची वाळवी

$
0
0

तीन वर्षांमध्ये अडीच हजार कुटुंबे दुभंगली

नवनाथ वाघचौरे, नाशिकरोड

शहर कौटुंबिक न्यायालयात गेल्या तीन वर्षांमध्ये दाखल ३ हजार ३०० पैकी तब्बल २ हजार ५२९ दाव्यांमध्ये जोडप्यांचे घटस्फोट झाले. घटस्फोटांच्या या वाढत्या आलेखातून कुटुंब संस्थेला घरघर लागल्याची बाब उघड झाली. निकाली निघालेल्या दाव्यात अवघ्या ३२४ जोडप्यांची मने पुन्हा जुळली असून त्यांचे संसार सुरळीत सुरू झाले.

नाशिक शहराचे कौटुंबिक न्यायालय नाशिकरोड येथे कार्यरत आहे. या न्यायालयात २०१५-ते २०१७ या तीन वर्षांमध्ये तब्बल ३ हजार ३०० दावे दाखल झाले. त्यापैकी २ हजार ८५३ दावे या न्यायालयात निकाली निघाली. या निकाली निघालेल्या दाव्यांतील तब्बल ८८.६४ टक्के म्हणजेच २ हजार ५२९ दाव्यांतील जोडप्यांचे घटस्फोट झाले. निकाली निघालेल्या दाव्यांपैकी तडजोड घडवून आणून ११.३५ टक्के म्हणजेच ३२४ दाव्यांतील जोडप्यांचे संसार पुन्हा उभे राहिले. या तीन वर्षांमध्ये दाखल झालेल्यापैकी अजूनही ४०० पेक्षा जास्त दावे प्रलंबित आहेत. जानेवारी ते एप्रिल २०१८ या चार महिन्यांमध्ये दाखल दाव्यांमुळे प्रलंबित दाव्यांची संख्या आणखी वाढली आहे. कौटुंबिक वादात तडजोड होण्याचे प्रमाण घटस्फोटांच्या तुलनेत अगदी नगण्य असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. एकंदरीत कुटुंब व्यवस्थेलाच घरघर लागल्याचे या वास्तवातून सिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षांत घटस्फोटांचे वाढते प्रमाण हे कुटूंबातील नात्याची वीण सैल होत असल्याचे प्रतीक मानले जात आहे.

यामुळे नात्यात दुरावा

सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, मोबाइल फोनद्वारे वेळी अवेळी जास्त प्रमाणात बोलणे, त्यातून निर्माण होणारे संशय, सिनेमातील लाइफ स्टाइलचे अनुकरण, उच्च शिक्षणामुळे वाढलेल्या अवास्तव अपेक्षा आणि अहंकार, इतर नातेवाइकांची ढवळाढवळ, नोकरी, अवेळी व कुटुंबीयांच्या विरोधात केलेले लग्न यासारख्या कारणांमुळे कौटुंबिक नात्यात दुरावा निर्माण होत असल्याचे या दाव्यांतून निदर्शनास आले आहे. न्याय व्यवस्थेकडून या दाव्यांमधील पती-पत्नी व त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशनही केले जाते.

नाशिक कौटुंबिक न्यायालयातील दाव्यांची स्थिती

वर्ष....दाखल दावे....निकाली दावे....प्रलंबित दावे....घटस्फोट....तडजोड

२०१५....९०१............७७५............१२६................६८८........८७

२०१६....१,१९३........१,०५७..........१३६................९३५........१२२

२०१७....१,२०६........१,०२१..........१८५................९०६........११५

एकूण....३,३००.........२,८५३...........४४७..............२,५२९........३२४

लोगो : जागतिक कुटुंब दिन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच छताखाली मायेचा ओलावा

$
0
0

मनमाडच्या आंधळे परिवाराचा 'हम साथ साथ चा नारा'

संदीप देशपांडे, मनमाड

'हम दो हमारे दो'च्या जमान्यात मनमाड शहरात आंधळे परिवारात तब्बल २७ जण एका कुटुंबात, एकाच छताखाली गुण्यागोविंदाने राहत आहेत. एकमेकांची सुख-दुःखे वाटून घेत एकमेकांच्या आनंदात सामील होत आहेत. संकटकाळी परस्परांच्या मदतीला धावून जात आहेत. आंधळे परिवाराचा हा डोळस आदर्श आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या जमान्यात 'मिले सूर मेरा तुम्हारा'चे सूर पेरणारा आहे.

मनमाड येथे रेल्वे स्थानकावर एकेकाळी हमाली करणाऱ्या काशिनाथ आंधळे यांचा हा बुधलवाडीतील हा परिवार आजच्या काळात इतरांना आदर्शवत ठरणारा आहे. काशिनाथ आंधळे व त्यांच्या पत्नी सुमनबाई यांनी बुधलवाडी परिसरात आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही सुखी समाधानाने राहत एकत्र कुटुंब पद्धतीचे बीज रोवले. आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. काशिनाथ आंधळे यांचा मोठा मुलगा वाल्मिक आंधळे यांनी आपल्या वडिलांचा वसा पुढे नेला आहे. आज वाल्मिक आंधळे आपल्या ५ भावांसह २७ जणांचे कुटुंब मोठ्या निष्ठेने चालवत आहेत. त्यांच्या आई सुमनबाई यांच्या निधनानंतर वाल्मिक यांच्या पत्नी व मोठ्या सूनबाई कमलबाई या सासूबाईंच्या पावलावर पाऊल ठेऊन घरातील सर्वांना भक्कम आधार देत आहेत. रिक्षा चालवणारे वाल्मिक आंधळे आज आपल्या सुरेश, बाळू, छबू, शरद या भावंडांसह वेल्डिंगच्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहे. एकत्र कुटुंब हा आमचा श्वास आहे, आम्हाला नात्यांचा ध्यास आहे, आमच्या घरातील मुलगी देखील आम्ही एकत्र कुटुंबात दिली आहे. कारण एकत्र कुटुंबात दुःख फार काळ टिकत नाही. सोसायला बळ येते. अडचणीत माणसे धावून येतात. आमच्या मुलांवरही तेच संस्कार आहेत. त्यामुळे आमचे घर २७ जणांचे गोकुळ आहे. या गोकुळाचा आधारवड असलेली आई आज हयात नाही, याचे वाईट वाटते असे वाल्मिक आंधळे सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ वाहनचोर अखेर गजाआड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दुचाकी चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. शहराच्या विविध भागात त्याने दुचाकी लंपास केल्या आहेत. त्याचा कसून तपास करताना शहर परिसरातील दुचाकी चोरीच्या अनेक घटना समोर येण्याची शक्यता आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २च्या पथकाने या चोरट्याला बेड्या घातल्या.

रोहित मोहन जाधव (वय २१, रा. दसकगाव, जेलरोड) असे अटक केलेल्या दुचाकी चोराचे नाव आहे. नाशिकरोडसह उपनगर हद्दीतून त्याने पाच दुचाकी चोरी केल्याची पोलिसांकडे नोंद आहे. दोन-तीन वर्षांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. मात्र, जेलरोड भागात त्यास बेड्या ठोकण्यात आल्या. रोहित हा अट्टल चोर असल्याचे समजते. उपगनर पोलिस ठाणे हद्दीत तीन व नाशिकरोड हद्दीतील दोन वाहन चोरीच्या गुह्यात पोलिस त्याचा शोध घेत होते. रविवारी तो जेलरोड भागात येणार असल्याची माहिती युनिट २ चे हवालदार श्रीराम सपकाळ यांना मिळाल्याने तो पोलिसांच्या हाती लागला. संशयित रोहित जेलरोड परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्याने दिली. पोलिसांनी उपनगर हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यात त्यास अटक झाली. ही कारवाई गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली व निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार श्रीराम सपकाळ, पोलिस नाईक परमेश्वर वराडे व कॉन्स्टेबल बाळा नांद्रे यांच्या पथकाने केली आहे. अधिक तपास हवालदार राजाराम वाघ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन जुगार अड्ड्यांवर छापे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या नऊ जुगारींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई कांबळेवाडी व द्वारका परिसरात करण्यात आली. संशयितांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी सातपूर आणि भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

कांबळेवाडी (भीमवाडी) परिसरातील नासर्डी नदी शेजारील एका घरापाठीमागे काही तरुण जुगार खेळत असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटच्या पथकास मिळाली. त्यानुसार रविवारी (दि. १३) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. विठ्ठल आहेर व त्याचे चार साथीदार जुगार खेळतांना आढळून आले. संशयितांच्या ताब्यातून २ हजार ९८० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दुसरी घटना द्वारका परिसरात घडली. तिगराणिया कंपनी पाठीमागील मोकळ्या जागी काही जण जुगार खेळत असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली. त्यानुसार, रविवारी (दि. १३) सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. रामराव नरवाडे व त्याचे चार साथीदार जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून २ हजार १०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

प्रवासात ५० हजारांची चोरी

नाशिकहून मुंबई प्रवासादरम्यान एका व्यक्तीचे ५० हजार रुपये अज्ञात चोरट्याने लांबविले. मुंबईतील गोरेगाव पूर्व येथे असलेल्या एनएनपी नागरी निवारा, उत्तरा सोसायटीजवळ ४० वर्षीय अण्णासाहेब कृष्णाजी चकोर राहतात. नाशिकहून मुंबईतील गोरेगाव येथे जाण्यासाठी ते रविवारी (१३ मे) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आग्रा महामार्गावरील गरवारे पॉईंट येथून सफारी कारमध्ये बसले. त्यांच्यासोबत आणखी संशयित सहप्रवासी होते. प्रवासादरम्यान गाडीतील एका संशयित प्रवाशाने चकोर यांच्या बॅगेतून ५० हजार रुपये काढून घेतले. काही वेळाने ही घटना चकोर यांच्या लक्षात आली. त्यांनी अंबड पोलिस ठाणे गाठत घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार गाडीतील अज्ञात संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जाधव पुढील तपास करीत आहेत.

दुचाकी लंपास

पार्क केलेली अपघातग्रस्त अ‍ॅक्टिव्हा चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना मधुबन कॉलनीत घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शोभा हेमंतकुमार गायकर (रा. जाणता राजा कॉलनी, पंचवटी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. मधुबन कॉलनीतून दुचाकीवर प्रवास करीत असताना हेमंत गायकर यांचा शुक्रवारी (दि. ११) दुपारी कुणाल अपार्टंमेंट परिसरात अपघात झाला. यावेळी गंभीर दुखापत झाल्याने गायकर दाम्पत्याने त्यांची अॅक्टिव्हा (एमएच १५ एफआर ६९१९) कुणाल सोसायटीत पार्क करून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेले. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्यांनी सोसायटी आवारात पार्क केलेली दुचाकी पळवून नेली.

मोबाइल लांबवला

उघड्या खिडकीत हात घालून चोरट्यांनी मोबाइल पळवून नेल्याची घटना एकलहरा रोडवरील अरिंगळे मळा भागात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आसिफ आलिम शेख (रा. मजिंद जवळ, अरिंगळे मळा) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेख यांनी शनिवारी रात्री आपल्या घरातील बेडरुममध्ये मोबाइल चार्जिंगला लावलेला होता. चोरट्यांनी घराची खिडकी उघडी असल्याची संधी साधत टेबलावर ठेवलेला मोबाइल चोरून नेला.

दुचाकीसह तरुण पाटात कोसळला

पंचवटीतील मखमलाबाद रोडजवळील पाण्याच्या पाटात भरधाव दुचाकी कोसळल्याने झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णा संजय तांदळे (वय २४, रा. धोडांबे, ता. चांदवड) असे मृत तरुणाचे नाव आहे. पंचवटी पोलिस ठाण्याचे हवालदार अरुण गायकवाड यांनी फिर्याद दिली. कृष्णा याने (दि. १९ एप्रिल) रात्री नऊ वाजता त्याच्याकडील दुचाकी (एमएच १५ जीएफ ५८२३) ही आसाराम बापू आश्रमाजवळील पुलाकडून पाटालगतच्या मखमलाबादकडे जाणाऱ्या मार्गाकडून भरधाव वेगात चालविली. मखमलाबाद रोडजवळील पाटाजवळ आला असता त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. तो दुचाकीसह पाटात कोसळला. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तसेच अपघातात दुचाकीचे नुकसान झाले. या अपघाताप्रकरणी अखेर तपासाअंती गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ए. बी. गायकवाड करीत आहेत.

मद्यपी चालकाला अटक

शहरातील ठक्कर बाजार बस स्टॅण्डजवळ मद्याच्या नशेत सफारी कार चालविणाऱ्या पवननगर येथील एकाला अटक केली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्याचे विलास शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सुदर्शन राजाराम पवार (वय २६, रा. एन-४२/३/७, लोकमान्यनगर, पवननगर, सिडको, नाशिक) हा रविवारी (दि. १३) दुपारी ठक्कर बाजार बस स्टॅण्डजवळून आपल्या ताब्यातील टाटा सफारी कार (एमएच २० बीएल ८१५५) मद्याच्या नशेत चालविताना आढळून आला.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३५० रिक्षाचालकांवर कारवाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कर्णकर्कश्श हॉर्न, म्युझिक सिस्टिमचा मोठा आवाज तसेच वाहतूक नियमांना तिलांजली देऊन रिक्षा चालविणाऱ्या ३५० रिक्षाचालकांवर शहरात कारवाई करण्यात आली. यातील ५८ रिक्षा चालकांवर शालिमार येथे भद्रकाली पोलिसांनी कारवाई केली. नियमभंग करणाऱ्या चालकांच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक वाहतुकीत महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या प्रामाणिक रिक्षाचालकांबरोबरच बेशिस्त आणि महिलांचा अनादर करणाऱ्या रिक्षाचालकांचेही प्रमाण वाढते आहे. कॉलेजरोडसह शालिमार आणि नाशिकरोड पट्ट्यावर अशा उनाडटप्पू चालकांची मुजोरी वाढली आहे. याबाबतच्या तक्रारी थेट वरिष्ठ पातळीवर पोहचत असून, नियमबाह्य वर्तणूक असलेल्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचे काम वाहतूक पोलिसांनी हाती घेतले आहे. मंगळवारी सकाळी भद्रकाली पोलिसांनी शालिमार येथे तब्बल ५८ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली. तर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी २९२ रिक्षा चालकांवर वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यातील बहुतांश रिक्षा जप्त करण्यात आल्या असून, कोर्टातूनच त्या सोडविता येणार आहेत.

त्या रिक्षाचालकावर कारवाई

कर्णकर्कश म्युझिक सिस्टिमचा आवाज कमी करण्यास नकार देऊन महिलेला भर रस्त्यात उतरवून तिच्याशी वाद घालणाऱ्या रिक्षाचालकाचा वाहतूक पोलिसांनी शोध घेतला आहे. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी कॉलेजरोडवर घडला होता. सदर महिलेने फेसबुकवर सर्व प्रकार मांडल्यानंतर वाहतूक शाखेसह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी त्याची दखल घेतली. विशेष म्हणजे ही महिला एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची नातलग आहे. अल्ताफ दादामिया पानसरे (खडकाळी, भद्रकाली) असे या रिक्षाचालकाचे नाव असून, एमएच १५, इएच १४६२ या क्रमांकाची रिक्षा तो चालवत होता. कारवाईसाठी संबंधित रिक्षा चालकास कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान, संबंधित रिक्षाचालकावर कारवाई न करता सरकारवाडा पोलिस स्टेशनला जाण्याचा सल्ला देणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचीदेखील चौकशी सुरू असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्युत परवान्यांबाबत मार्गदर्शन मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडून विद्युत पर्यवेक्षक प्रमाणपत्र व परवाने आणि विद्युत ठेकेदार अनुज्ञप्तीबाबत मार्गदर्शन मेळाव्याचे शहरात आयोजन करण्यात आले आहे.

विद्युत निरीक्षक कार्यालय, महालक्ष्मी चेंबर्स, टाकळी फाट्यासमोर, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाजवळ, मुंबई-आग्रारोड, द्वारका येथे शनिवारी (दि. १९) सकाळी १०.३० वाजता हा मार्गदर्शन मेळावा होणार आहे. मेळाव्यामध्ये विद्युत पर्यवेक्षक परवानाधारकांसाठी विद्युत ठेकेदार अनुज्ञप्ती प्राप्त करण्याबाबत, तसेच तसेच विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी, पदविका, आयटीआय वायरमन, इलेक्ट्रिशियन पात्रता असणाऱ्या आणि एक वर्षाचा अनुभव घेतलेल्यांना तारतंत्री, विद्युत पर्यवेक्षक प्रमाणपत्र व परवाना मिळविण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. मेळाव्यास विद्युत तंत्रज्ञांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्युत निरीक्षक हे. ना. गांगुर्डे यांनी केले आहे.

-----

(थोडक्यात)

क्लब हाऊस भागाला कंटेनरचा वेढा (फोटो)

सातपूर : सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींत अवजड वाहनांना पार्किंगसाठी पुरेशा सुविधा मिळत नसल्याने रस्त्यांवरच वाहने उभी केली जातात. शनिवारी एमआयडीसीतील कारखाने बंद असल्याने सातपूर क्लब हाऊला कंटेनर्सचा वेढा पडल्याचे चित्र दिसून आले. केवळ योग्य पार्किंगची जागा उपलब्ध होत नसल्याने रस्त्यांवरच अवजड वाहने उभी करावी लागत असल्याचे चालकांनी सांगितले. त्यामुळे याप्रश्नी एमआयडीसीने पुढाकार घेण्याची अपेक्षा परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पांढऱ्या पट्ट्यांनी दिलासा

जेलरोड : उपनगर नाका ते जेलरोडदरम्यान रस्ता रुंद करण्यात आला आहे. या कॅनॉलरोडवर आता दोन्ही बाजूंना, तसेच मध्यभागी पांढरे पट्टे मारण्यात आल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. या पट्ट्यांमुळे रात्रीही दिशा मिळत आहे. त्यामुळे अपघातांची शक्यता कमी झाली आहे. उपनगर नाका ते इंगळेनगर चौकापर्यंत हे पट्टे मारण्यात आले असून, विजेच्या खांबांपुढे पिवळ्या रंगाचे फलक लावले आहेत. त्यामुळे येथे खांब असल्याचे वाहनचालकांच्या लगेचच लक्षात येते. त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

'इप्कॉस'मध्ये रक्तदान शिबिर (फोटो)

सातपूर : 'सीटू'च्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून इप्कॉस कंपनीत आयोजित रक्तदान शिबिरात कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांच्यासह १३० कामगारांनी सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कंपनीचे अध्यक्ष बॅनर्जी, राजेंद्र गाढवे,डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, तानाजी जायभावे यांच्या हस्ते करण्यात आले. विभागीय संदर्भसेवा रुग्णालयाच्या रक्तपेढीमार्फत आयोजित या शिबिरास कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिर यशस्वितेसाठी गणेश चौधरी, छगन सनेर, प्रशांत सोनजे, भरत कोळंबे, जे. डी. पाटील, सचिन बोरसे, संदीप दाभाडे, चंद्रकांत पाटील, प्रणव पटेल, नितीन देशमुख यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काझीगढीप्रश्नी पुन्हा ‘खल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदाकाठालगतच्या काझीगढी येथील रहिवाशांच्या सुरक्षेचे घोंगडे वर्षानुवर्षे भिजत पडले आहे. यंदाही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भूस्खलनचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने येथे सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, असा पत्रव्यवहार जिल्हा प्रशासनाने केला आहे. मात्र, काझीगढीप्रश्नी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी असा काही तरी 'खल' होतो, ठोस उपाययोजना मात्र होत नसल्याची भावना येथील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

यंदा सरासरीएवढा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात असले, तरी दुसरीकडे शहरी आणि ग्रामीण भागातील रहिवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी उपाययोजना करणे अपरिहार्य ठरले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून त्यासंदर्भात नियोजनास प्रारंभ झाला आहे. त्याअंतर्गत उपाययोजनेच्या पत्रव्यवहारामुळे काझीगढी येथील रहिवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शहरातील गोदाघाटालगत उंच कड्यावर वसलेल्या धोकादायक स्थितीतील काझीगढीसंदर्भात सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजनांसंदर्भात सालाबादप्रमाणे पुन्हा 'खल' सुरू झाला आहे. येथे दोनशेहून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. ढासळण्याच्या स्थितीत असलेल्या मातीच्या टेकडीवर ही लोकवस्ती असून, पावसाळ्यात येथे दुघर्टना घडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे येथील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येतो. पावसाळ्यापूर्वी दर वर्षी महापालिका गढी खाली करण्याच्या नोटिसा रहिवाशांना बजावते. परंतु, येथे थाटलेला संसार हलविण्यास रहिवासी सहजासहजी तयार होत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या नोटिसांना अनेकदा रहिवाशांकडून दादही दिली जात नाही. मात्र, दोन वर्षांपूर्वी घडलेल्या माळीण येथील दुर्घटनेनंतर काझीगढी परिसरातील नागरिकांची सुरक्षा गांभीर्याने घेण्यात आली. त्यांच्या पुनर्वसनाबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने पूर्वीच्या घटनांची माहिती देत महापालिका प्रशासनाला मान्सूनपूर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबत पत्रव्यवहार केला असून, दोनशे कुटुबांचे पावसाळ्यापूर्वीच पुनर्वसन करून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

संरक्षक भिंत कागदावरच!

काझीगढीचा काही भाग गतवर्षी पावसाळ्यात कोसळला होता. या दुर्घटनेत २० जण जखमी झाले होते. भुयारी गटारीचे पाणी जमिनीत सातत्याने मुरल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर महापालिकेने नागरिकांचे स्थलांतरही केले. मात्र, रहिवाशांनी कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली असली, तरी ती अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे काझीगढी येथील रहिवाशांना अजूनही धोकादायक स्थितीत राहावे लागते आहे. महापालिकेनेही येथे संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. मात्र, अद्याप ही संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुमचे काम खूपच छान आहे

$
0
0

जवखेड्यात अभिनेता आमिर खानचे गौरवोद्गार

म. टा. वृत्तसेवा, अमळनेर

‘आम्ही तुमचे गावात आलो आणि खूप छान वाटले. तुमचे काम खूपच छान आहे. छान तुमची टीम आहे, असे गौरवोद्गार अभिनेता आमिर खान याने जवखेड्यात काढले. मंगळवारी (दि. १५) पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील जवखेड्यात मंगळवारी (दि. १५) बॉलिवूड अभिनेता आमिर खान, किरण राव यांच्या उपस्थितीत श्रमदान करण्यात आले.

धुळे येथून नवलनगर, मोहाडीमार्गे पूर्ण टीम मंगळवारी सकाळी जवखेडा येथे पोहोचले. सुरुवातीला पथनाट्य सादर करण्यात आले. या वेळी गावाच्या तरुणींनी पाणी फाउंडेशनवरील अहिराणी गीत ‘चैत्र ना महिनामा, जागृत व्हयनाय, जवखेडाना विकास करणाय’, ‘जुनं सारं विसरूया, जवखेड्याचा विकास करूया’ या गीतांचे मंदिरासमोर सादरीकरण केले. येथील एकजूट कधी कुठे पाहिलेली नसून, मोठ्या प्रमाणात महिला शक्ती मला गावात दिसून आली, असेही आमिर म्हणाला. जलसंधारणाचे काम करत असतानाच मनसंधारणही झाले. याप्रकारे आपण केलेल्या कामाने प्रेरणा मिळाल्याची कबुलीही आमिरने बोलताना दिली.

तरुणाईचा जल्लोष
आमिर खान गावी पोहोचताच गावातील तरुणांनी जल्लोषात घोषणा द्यायला सुरुवात केली. या वेळी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी रफिक शेख, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, तहसीलदार प्रदीप पाटील, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक विजय कोळी, उज्ज्वला पाटील, सरपंच सुभाष पाटील, सभापती वजाबाई भिल यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटी’त जेलची भरारी

$
0
0

वर्षभरात सव्वा सहा कोटींची कमाई

डॉ. बाळकृष्ण शेलार, जेलरोड

सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर अनेक उद्योग व्यवसायांचे कंबरडे मोडले. मात्र, जीएसटी लागू झाल्यानंतर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाने २०१७-१८ या वर्षात सुमारे सव्वासहा कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले. तसेच शेतीतूनही ४० लाखांचे उत्पन्न प्राप्त करत राज्यात अव्वल क्रमांक मिळवला, अशी माहिती कारागृह अधीक्षक राजकुमार साळी आणि कारखाना प्रमुख पल्लवी कदम यांनी दिली.

ब्रिटिशांनी १९२७ मध्ये नाशिकरोड कारागृह बांधले. येथे साडेतीन हजार कैदी आहेत. राज्यात नाशिकसह नऊ मध्यवर्ती कारागृह आहेत. मध्यवर्ती कारागृहात महसूलसाठी विविध कारखाने, उपक्रम असतात. नाशिकरोड कारागृहाचे दोनशे एकरवर क्षेत्र आहे. मुख्य कारागृहात नऊ कारखाने चालतात. त्यामध्ये विणकाम, सुतारकाम, शिवणकाम, चर्मकला, बेकरी, लोहकाम, धोबीकाम, रसायन, मूर्तीकला यासह नऊ विभागांचा समावेश आहे. शेती विभाग वेगळा आहे. या सर्व विभागात पक्के कैदी काम करतात. त्यांना या कामाचे वेतन मिळते.

पोलिस मोठे ग्राहक

महाराष्ट्र पोलिस हे नाशिकरोड कारागृहाचे मुख्य ग्राहक आहेत. पोलिसांना ४० हजार मच्छरदाण्या शिवणकाम विभागाने पुरविल्या. तर लोहकाम विभागाने पोलिसांसाठी तब्बल ६० हजार लोखंडी किटबॉक्स तयार केले. हे काम २०१५ पासून सुरू आहे. कारागृहातील पैठणीलाही मोठी मागणी आहे. एक पैठणी तयार करायला पंधरापेक्षा जास्त दिवस लागतात. आतापर्यंत शंभर पैठणींची विक्री झाली. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती आहे. लंडनमधील स्वंयसेवी संस्थेला कारागृहाने सतरंज्या पुरवल्या होत्या. ही संस्था पुन्हा उत्सुक आहे. कारागृह प्रशासन दर्जाशी तडजोड करत नाही. विणकाम विभागाला दर्जेदार कच्चा माल न मिळाल्याने काम अनेक दिवस बंद होते. या वर्षा अमरावती कोर्टाची ८३ लाखांची फर्निचरची मागणी असून काम सुरू आहे. नंदुरबारचीही ३७ लाखांची मागणी आहे.

ब्रॅण्डिंगचा प्रयत्न

शुद्धता, दर्जा, टिकाऊपणा आदींबाबत कारागृहाच्या वस्तू नंबर वन आहेत. त्यांचे आतापर्यंत ब्रॅण्डिंग, प्रसिद्धी होत नव्हती. आता त्यावर भर दिला जात आहे. दोन वर्षांपूर्वी मंत्रालयातील प्रदर्शनात भाग घेऊन हे कारागृह अव्वल आले. नाशिकच्या औद्योगिक प्रदर्शनातही स्टॉल लावण्यात आला. यंदा नाशिक वाइन फेस्टिवलमध्ये कारागृहाने लावलेल्या विविध वस्तूंच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाला. कारागृह गेटवर दिवाळी मेळ्यात यंदा साडेचार लाखांच्या वस्तू विकल्या. रक्षाबंधन मेळ्यातही मोठी विक्री झाली. कारागृहात प्रथमच मूर्ती विभाग सुरू झाला. त्यामध्ये तयार झालेल्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती उत्सवापूर्वीच संपल्या. त्यामुळे आगामी उत्सवासाठी ११ महिन्यांपूर्वीच मूर्तीकाम सुरू झाले असून दोन हजार मूर्ती तयार केल्या जाणार आहेत.

कारखान्याच्या नऊही विभागात बंदीजनांच्या मदतीने उत्पादन घेतले जाते. कारागृह प्रशासनाने चालू आर्थिक वर्षासाठी नऊ कोटी उत्पन्नाचे लक्ष्य ठेवले आहे. विक्रमी घौडदोड कायम ठेवत राज्यात अव्वल स्थान कायम टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वांची चांगली साथ मिळत आहे.

- राजकुमार साळी, कारागृह अधीक्षक

जीएसटी लागू होऊनही आम्ही सहा कोटीचा आकडा पार करु शकलो याचे समाधान वाटते. साळी साहेबांचे कुशल व्यवस्थापन व मार्गदर्शन उपयोगी पडले. विश्वासहर्ता, दर्जामुळे कारागृहाच्या वस्तूंना मोठी मागणी असते. नवी यंत्रे घेतल्याने उत्पन्नात आणखी वाढ होणार आहे.

- पल्लवी कदम, कारखाना व्यवस्थापक

कारागृह उपाशी

नाशिकरोड कारागृह कल्पक उपक्रम राबवून दरवर्षी विक्रमी महसूल मिळवते. कारागृहाच्या विकासासाठी हा महसूल वापरता येत नाही. तो राज्य सरकारकडे जमा करावा लागतो. नंतर अनुदान स्वरुपात कारागृहाला निधी येतो. कारागृहाचे अनेक चांगले प्रकल्प, विकास कामे लालफितीच्या कारभारामुळे रखडली असून निधी वेळेवर मिळत नाही.

……………

विभाग................मिळलेले उत्पन्न

शिवणकाम : १,८९,३८,०००

लोहकाम : १,४७,००,०००

सुतारकाम : १,४४,००,०००

विणकाम : ६६,३६,०००

रसायन : ३७,४३,०००

बेकरी : १५,००,०००

धोबी : ६,५०,०००

मूर्तीकला : ५,७५,०००

चर्मकला : २,२५,०००

जेलचा वाढता उत्पन्न आलेख

आर्थिक वर्ष................उत्पन्न (रुपये)

२०१७-१८................६,१४,३७,०००

२०१६-१७................५,७५,४६,०००

२०१५-१६................४,३५,११,९५०

२०१४-१५............... २,५१,०४,०१७

२०१३-१४...............२,४५,५०,४६५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images