Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘ते’ दगड हटविले

$
0
0

रस्ते रुंदीकरणात वापरणार खाणीचा  दगड; कॅन्टोन्मेंट प्रशासनाची कारवाई 

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प 

 देवळालीच्या सदर बाजार भागातील  विविध रस्ते रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये रस्त्यांच्या पायाभरणीत विहीर खोदकामातील दगड वापरण्याचे संबंधित ठेकेदारामार्फत वापरले जात होते. यासाठी आता कॅन्टोन्मेंट बोर्डाने चांगल्या दर्जाचे दगड वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष  बळवंतराव  गोडसे  यांनी केला होता. तसेच ' मटा'ने याबाबतचे 'रस्त्यासाठी निकृष्ट दगड'  मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. परिणामी, संबंधित ठेकेदाराला कॅन्टोन्मेंट प्रशासनाने धारेवर धरत टाकण्यात आलेले दगड काढण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. 

 

 शहरात नियमित होणारी  वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाय म्हणून  प्रशासनाने  मिठाई रोड, मशिद रोड, मेन रोड आदी भागातील फुटपाथ काढून त्या ठिकाणी लाखो रुपये खर्चाचे  रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. त्यासाठी संबंधित रस्ते खोदून खाली पाया भरण्याचे काम सुरू असताना  मिठाई रोड परिसरात कंत्राटदाराकडून  रस्त्याच्या कामासाठी  वापरण्यात येणारा दगड हा कच्च्या स्वरूपाचा असल्याचे माजी उपाध्यक्ष बळवंत गोडसे यांसह येथील व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

पाहणीनंतर ठेकेदारास समज

हे वृत्त प्रसिद्ध होताच कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून टाकण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे  दगड काढण्याबाबत  कंत्राटदाराला समज दिली आहे. तसेच या कामामध्ये प्रस्तावित  करण्यात आलेल्या इस्टिमेट  व  स्टँडर्ड शेड्यूल रेटप्रमाणे खाणीतील दगडाचा वापर करण्याचे निर्देश दिल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे  कनिष्ठ अभियंता विलास पाटील यांनी दिले आहे. यामुळे चुकीच्या पद्धतीने  होत असलेले  काम थांबविल्याचे मत  माजी उपाध्यक्ष बळवंत गोडसे यांसह  व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.    

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिक कारखान्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

$
0
0

प्लास्टिक कारखान्यांच्या

अहवालाची प्रतीक्षा

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील प्लास्टिक कारखान्यांना वारंवार लागणारी आग व त्यामुळे होणारे प्रदूषण, नागरिकांच्या जीविताला निर्माण झालेला धोका यामुळे शहरातील बेकायदेशीर प्लास्टिक कारखान्यांवर पालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दोन दिवसापूर्वी याबाबत प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन प्रभागातील प्लास्टिक कारखान्यांची पाहणी करून बेकायदा प्लास्टिक कारखान्यांचे वीज व नळ जोडणी खंडित करण्याचे आदेश आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रभाग अधिकारी यांच्याकडून आपापल्या प्रभागात असलेल्या प्लास्टिक कारखान्यांची पाहणी सुरू करण्यात आली असून, उद्या गुरुवार सायंकाळपर्यंत त्याचा अहवाल येणे अपेक्षित असल्याचे कर उपायुक्त राजू खैरनार यांनी सांगितले. पालिकेकडून कारवाईचा सुरू झाल्याने प्लास्टिक कारखानदारांचे धाबे दणाणले आहे. बुधवारी प्लास्टिक कारखाना युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्त खैरनार यांची भेट घेतली. त्यावर खैरनार यांनी कारखानदारांनी मोकळ्या भूखंडांवर, गोदामात असलेले प्लास्टिक तत्काळ हटवावे अशा स्पष्ट सूचना देत प्रसंगी कारवाईचे संकेत दिले आहेत. तसेच महावितरणला देखील बेकायदेशीर प्लास्टिक कारखान्यांची वीज जोडणी तर पाणी पुरवठा विभाग नळ जोडणी खंडित करण्याबाबत कळविण्यात आले आहे. दोन्ही विभागांनी याबाबत कारवाईची तयारी सुरू केली असून प्रभाग अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर प्रत्यक्ष कारवाईस सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी ऑनलाइन प्रक्रियेला प्रारंभ

$
0
0

शाळांमध्ये आजपासून माहितीपुस्तिकांचे वितरण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरीही शहरात अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. निकालाच्या अगोदर विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती असणारा भाग १ ऑनलाइन भरला जाऊन निकालानंतर उर्वरित माहिती ऑनलाइन पद्धतीने अद्ययावत करण्यात येणार आहे.

या प्रक्रियेसाठी शहरातील ५७ महाविद्यालय सज्ज आहेत. दरम्यान शहर आणि परिसरातील शाळांच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना गुरुवारपासून (दि. १०) माहितीपुस्तिका देण्यात येणार आहे. या माहितीपुस्तिकेतच विद्यार्थ्यांसाठी लॉग इन आयडी आणि पासवर्ड देण्यात आला आहे. त्याच्या आधारे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन खाते उघडावे आणि मार्गदर्शकांच्या सहाय्याने अचूकपणे अर्जाचा पहिला भाग भरावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश समितीच्या वेबसाइटवर नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्या होणार आहेत. वेळापत्रकानुसार गुणवत्ता यादी आणि प्रवेशाची कार्यपद्धती वेळोवेळी जाहीर करण्यात येणार आहे. दिलेल्या वेळेत व नियमांनुसार प्रवेश घेणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही खासगी क्लासेस किंवा सायबर कॅफेमधून अर्ज भरू नये. विद्यार्थ्यांनी यासाठी केवळ शाळेचाच आधार घ्यावा, असेही आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

इतर विद्यार्थ्यांना २० मेपासून माहितीपुस्तिका

गुरुवारपासून वितरित करण्यात येणारी माहितीपुस्तिका ही केवळ एसएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. नाशिक महापालिका हद्दीबाहेरील माध्यमिक विद्यार्थ्यांनी ही माहितीपुस्तिका २० मेपासून जवळच्या मार्गदर्शन केंद्रावरून घ्यावी. तर इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांनी आपल्याच शाळांमधून ही माहितीपुस्तिका घ्यावी. संबंधित बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग १ भरण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह नाशिकरोड बिटको कॉलेजमध्ये प्रवेश अर्ज व्हेरीफाय करून घ्यावेत, अशा सूचना शिक्षण विभागाचे उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिल्या आहेत.

लोगो : शाळा-कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस अपहारप्रकरणी गुन्हा दाखल

$
0
0

गॅस अपहारप्रकरणी गुन्हा दाखल

मालेगाव : येथील मालेगाव गॅस एजन्सीत उज्ज्वला योजनेत झालेल्या अपहारप्रकरणी अखेर येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी अचानक केलेल्या तपासणीत या एजन्सीच्या कार्यालयात तसेच कथित एजंट वाजीद मामू यांच्याकडे संशयास्पद अशी कागदपत्रे आढळून आली होती. दरम्यान हा सगळा मुद्देमाल जप्त करीत पंचनामा करण्यात आला. याबाबत देवरे यांनी पोलिस उप अधीक्षक गजानन राजमाने यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करणेबाबत हालचाली सुरू केल्या होत्या. अखेर बुधवारी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक साबणे यांनी फिर्याद दिली असून मालेगाव गॅस एजन्सी मालक, कर्मचारी, कथित एजंट वाजीद मामू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचा पोलिसांशी पंगा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अतिक्रमणाच्या पोलिस बंदोबस्त निधीवरून महापालिका आणि पोलिस आयुक्तालय यांच्या वाद सुरू असतानाच, आता २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी नियुक्त केलेल्या पोलिस अधिकारी-कर्मचारी, होमगार्ड यांच्या निवडणूक भत्त्यावरून महापालिका आणि पोलिस पुन्हा आमने-सामने आले आहेत. या निवडणुकीत ५६४५ पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित असताना, महापालिकेने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केवळ १३६२ पोलिस कर्मचाऱ्यांनाच आठ लाखांचा निवडणूक भत्ता मंजूर केला आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पुन्हा पालिकेला पत्र लिहून उर्वरित ३२ लाख ३७ हजार रुपये तातडीने देण्याची मागणी केली आहे. महापालिका आणि पोलिसांमध्ये रंगलेल्या पत्रापत्रीआडून दोन संस्थांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.

महापालिका आणि पोलिसांमध्ये सध्या विविध कारणांवरून शीतयुद्ध सुरू आहे. महापालिकेने पाणीचोरांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याच्या निर्णयामुळे पोलिसांच्या गुन्हेगारीचा ग्राफ बिघडला होता. त्यामुळे पोलिस आयुक्तांनीच महापालिकेला आस्तेकदम घेण्याचा सल्ला दिला होता. पटापट गुन्हे दाखल झाल्यास पोलिसांची कामगिरी योग्य नसल्याचा संदेश जाईल, म्हणून या गुन्ह्यांची संख्या थांबली होती. त्यानंतर अतिक्रमणाच्या थकबाकीवरून पालिका आणि पोलिस यांच्यात वाद सुरू झाला होता. पाठोपाठ आता निवडणूक भत्त्यावरून दोन संस्थामंधील संघर्ष उफाळून आला आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी नाशिक शहर तसेच धुळे, नंदूरबार व जळगाव येथील होमगार्ड, तसेच पोलिस प्रशिक्षण शाळा, धुळे येथील पोलिस कर्मचारी व इतर जिल्ह्यांतील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. महापालिकेच्या ३१ प्रभागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ५४८ मतदान केंद्रांवरील १४०७ बुथवर हा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्वसाधारण मतदान केंद्रांवर एक पोलिस अधिकारी व चार पोलिस कर्मचारी, तर संवेदनशील मतदान केंद्रांवर राज्य राखीव पोलिस दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रक पथक, राखीव फोर्सची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर या निवडणुकीसाठी मनपाने नियुक्त केलेल्या १४२ झोनल अधिकाऱ्यांना प्रत्येकी एक याप्रमाणे १४२ पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. एक पोलिस अधिकारी व त्यांच्या समवेत ६ ते १० अधिकारी असे एकूण ५६४५ पोलिस अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले होते.

या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता हा महापालिकेकडून अदा केला जातो. त्यासंदर्भातील बिल पोलिस आयुक्त कार्यालयाकडून मनपाला पाठविण्यात आले होते. परंतु, पालिकेने बिलाची संपूर्ण रक्कम मंजूर न करता फक्त बुथवरील बंदोबस्तासाठी १४०७ पैकी १३६२ कर्मचाऱ्यांच्या निवासव्यवस्थेचे प्रत्येक दिवसासाठी १५० रुपये व भोजन व्यवस्थेचे प्रतिदिन १५० रुपये याप्रमाणे एकूण ८ लाख १७ हजार रुपयांचा धनादेश पोलिस आयुक्त कार्यालयाकडे पाठविला. शासन निर्णयातील दरांनुसार बंदोबस्तासाठी मतदानाच्या दिवशी नियुक्त ४९९७ पोलिस अधिकारी व होमगार्ड तसेच मतमोजणीच्या दिवशी नियुक्त ६४८ पोलिस कर्मचारी अशाप्रकारे एकूण ५६४५ पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्डसाठी निवडणूक भत्ता व अल्पोपहार भत्त्यापोटी एकूण ४० लाख ५५ हजार रुपये महापालिकेने पोलिसांना देणे बंधनकारक आहे. परंतु, महापालिकेने केवळ आठ लाख रुपये देऊन पोलिसांचा रोष ओढवून घेतला आहे. महापालिकेच्या नकारानंतर पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी मनपाच्या निवडणुक शाखेला पत्र पाठवून उर्वरित ३२ लाख ३७ हजारांची रक्कम तातडीने पोलिसांना देण्याची सूचना केली आहे.

निवडणूक आयोगाचा आधार

शासन निर्णयाच्या दरांनुसार बंदोबस्तासाठी उपस्थित सर्वांना निवडणूक भत्ता देणे बंधनकारक असले तरी, महापालिकेने मात्र याबाबतीत कायद्याचा किस पाडला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार केवळ बुथवर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्याच निवडणूक भत्ता देण्याची जबाबदारी पालिकेची असून, निवडणूक काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाचीच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे केवळ बुथवर नियुक्त कर्मचाऱ्यांचाच भत्ता देऊ, अशी भूमिका घेतली आहे.

पोलिसांत नैराश्य

महापालिकेने सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता न देता, केवळ १३६२ पोलिस कर्मचाऱ्यांच्याच भत्त्याची रक्कम अदा केली. पालिकेच्या या कृतीवरच पोलिस आयुक्त सिंगल यांनी आक्षेप घेतला आहे. महापालिकेची भूमिका ही प्रशासकीय दृष्टिकोनातून संयुक्तिक नसून तत्त्वत: अयोग्य आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनास नाहक त्रास होत असल्याने अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांना निवडणूक काळात रक्कम देय न झाल्याने नैराश्याचे वातावरण निर्माण झाल्याचे सिंगल यांनी मनपा आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात दोन दिवसांत वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांनी जीव गमावला. त्यामध्ये तीन पुरुषांसह दोन महिलांचा समावेश आहे. पाथर्डी गाव, काठेगल्ली, शिंदेगाव, गंगापूर-मखमलाबाद लिंक रोड, त्र्यंबकरोड, चोपडा लॉन्सजवळ हे अपघात झाले. या अपघातांची संबंधित पोलिस स्टेशनमध्ये नोंद घेण्यात आली आहे.

भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत काठे गल्ली सिग्नल येथे मंगळवारी (दि. ८) च्या सुमारास आयशर ट्रक द्वारका चौकाकडे येत होता. संशयित चालक पांडुरंग दिगंबर इंबडे (वय ३५, रा. मुखेड, जि.नांदेड) याने ट्रक भरधाव चालवित मधुसूदन गोराई (वय ३०, रा. विसू गोराई, ता. जि. धनबाद, झारखंड) याला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी इंबडे याला ताब्यात घेतले आहे. पोलीस नाईक सुरेश गांगुर्डे यांनी फिर्याद दिली असून तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.

दुसरा अपघात इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पाथर्डी गावाजवळ झाला. भरधाव ट्रकने पायी चाललेल्या पिंटू सिध (वय २५, रा. ओव्हाटे-बरडेवाडी, ता. त्र्यंबकेश्‍वर) याला जोरदार धडक दिली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अज्ञात ट्रक चालकाविरोधात पोपट देसले (रा. पाथर्डी गाव) यांनी फिर्याद दिली आहे. उपनिरीक्षक बोडके तपास करीत आहेत.

गंगापूर रोडलगतच्या चोपडा लॉन्सजवळ भरधाव मोटरसायकल दुभाजकाला धडकल्याने सुनील (रा. हनुमानवाडी, पंचवटी) यांचा मृत्यू झाला. सरकारवाडा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. ते पंचवटीकडून गंगापूर नाक्याकडे येत असताना हा अपघात झाला. मधुकर यादव सोळसे (रा. शेरे मळा, गणेशवाडी, पंचवटी) यांनी फिर्याद दिली असून उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील रहिवाशी असलेल्या फुलाबाई हरिदास वाजे (वय ५५) या बुधवारी (दि. ९) लग्नासाठी त्र्यंबक रोडवरील शिवगंगा लॉन्स येथे आल्या होत्या. त्यांना एका भरधाव मोटरसायकलस्वाराने धडक दिली. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. दुपारी चारच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विद्यानगर बसस्टॉपजवळून पायी चाललेल्या मनीषा लक्ष्मण नेहे (वय ४०, रा. विद्यानगर, मखमलाबाद) यांना सोमवारी (दि.७ मे) सायंकाळी सहाच्या सुमारास भरधाव मोटरसायकलस्वाराने धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गाभोवती वाढले अतिक्रमण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. पालिकेच्या हद्दीतील अतिक्रमणे व लहान मोठ्या फेरीवाल्यांचे महामार्गालगतचे अतिक्रमणे दूर करण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था सध्या अत्यंत धोकादायक झाली आहे. शहरातून जाणारा हा दोन किलोमीटरचा महामार्ग धोकादायक ठरत आहे. बायपास, रिंगरोडची मागणी होत असून सर्वच प्रश्न शासनस्तरावर तांत्रिक दृष्टया अडचणीच्या ठरू लागल्या आहेत. परिणामी शहरवासीयांची जीवघेणी स्पर्धा यामुळे सुरू झाली आहे. लग्नसमांरभाच्या दाट तिथीमुळे तर या राष्ट्रीय महामार्गावरून पायी चालणे देखील अवघड होत आहे. जिजामाता उद्यान ते पुष्पाजंली थिएटर पर्यंतचा हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलपंप, बँका, शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये, खासगी प्रतिष्ठाने यामुळे महामार्गाच्या दोघा बाजुंना दुचाकी व चारचाकी वाहने, हॉकर्स, रिक्षा, अनाधिकृत खासगी वाहतुकीने महामार्गाचीच कोंडी झाली आहे. शहरातील पोलिस व पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि आमदार दीपिका चव्हाण यांच्यात विकासकामांच्या श्रेयवादाची लढाई सुरू आहे. मात्र कुणालाही या समस्येकडे पाहण्याची गरज वाटत नाही.

कोट---

बायपास विषयावर लोकप्रतिनिधी राजकारण करीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत या विषयावर तोडगा काढावा अशी अपेक्षा आहे. अन्यथा शिवसेना वेगळ्या पद्धतीने आपला मार्ग अवलंबेल.- जयप्रकाश सोनवणे, शिवसेना शहरप्रमुख.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इ-मेल अकाउंट हॅक करूनच फोडला पेपर

$
0
0

हॅकर्सची आज संपणार पोलिस कोठडी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पेपर हा परीक्षा विभागाचे ई मेल अकाउंट हॅक करून त्यावरूनच 'लिनीअर अल्जेब्रा' या विषयाचा पेपर फोडण्यात आला. केवळ प्रयोग म्हणून फोडण्यात आलेला हा पेपर सोशल मीडियावरून व्हायरल होत गेला तेव्हा आपल्या चुकीतील गांभीर्य हॅकर्सना जाणवत गेल्याची माहिती विद्यापीठातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. पोलिस कोठडीत असणाऱ्या दोन्हीही हॅकर्सची कोठडी गुरुवारी (दि. १०) संपणार असून त्यांना न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे.

संशयित दोघा तरुणांनी या पद्धतीने इतर विद्याशाखांचेही पेपर फोडले आहेत काय, या दृष्टीनेही चौकशी समिती आणि विद्यापीठ प्रशासन तपास करते आहे. मात्र, तशी शक्यता कमी असल्याचे पुणे विद्यापीठातील वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे. तज्ज्ञ मंडळाने प्रश्नपत्रिका काढल्यानंतर ती विद्यापीठाच्या प्रिंटींग प्रेसला पाठविण्यात येते. येथे सुरक्षेच्या कारणामुळे वापरण्यात येणारे वॉटरमार्क्स आणि इतर तांत्रिक बाबींची पूर्तता करून या गोष्टी प्रेसच्या अकाउंटवरून परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या अकाउंटवर प्रश्नपत्रिका पाठविण्यात येते. 'लिनीअर अल्जेब्रा' या एसवायबीएससीच्या पेपरच्या बाबतीतही तशीच प्रक्रिया झाली होती. पण २७ एप्रिलच्या रात्री सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्या दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा मंडळाचा इ-मेल आयडी हॅक करून पेपर डाउनलोड केला होता, अशी प्राथमिक माहिती चौकशी समितीच्या अहवालातून पुढे येत आहे. नाशिकमध्ये झालेल्या या पेपरफुटीच्या घटनेमुळे शहरातील चार कॉलेजमधील सुमारे दोनशे विद्यार्थी प्रभावित झाल्याची प्राथमिक शक्यता आहे.

परीक्षा मंडळाची शनिवारी बैठक

पेपर २८ एप्रिल रोजी सुरू झाल्यानंतर काही जागृत सामाजिक कार्यकर्त्यांमुळे या प्रकरणाला वाचा फुटली. यानंतर विद्यापीठाने नेमलेल्या चौकशी समितीने या प्रकरणी अभियांत्रिकी शाखेतील आदेश गजेंद्र चोपडे आणि चिन्मय दीपक अटराव्हलकर या दोन विद्यार्थ्यांबाबत संशय व्यक्त केला होता. विद्यापीठ प्रशासनाने सायबर क्राइम विभागात अधिकृत तक्रार नोंदविल्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान शनिवारी (दि. १२) परीक्षा मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत या प्रकरणी फेरपरीक्षेबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने अमृतधाम येथील निवासस्थानी बुधवारी पहाटे चार वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर पंचवटीतील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नेताजी भोईर यांना सर्व लोक 'दादा' म्हणून संबोधत. दादा भोईरांनी नाशिक शहरातील नाट्यचळवळीला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. सलग ५० वर्षे राज्यनाट्य स्पर्धेत सहभाग घेऊन ही चळवळ पुढे नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. विजय नाट्यमंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक अभिनेते घडवले. उत्तम वाद्य वाजवीत असल्याने नाटकांचे संगीत देण्यात त्यांचा हातखंडा होता. मूर्तीकला हा आपला पिढीजात व्यवसाय त्यांनीही स्वाकारला होता. त्यांनी तयार केलेले अनेक मूर्तीकार राज्याच्या विविध भागात आपली कला पेश करून चरितार्थ चालवत आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत सादर करीत असलेल्या नाटकाचा सेट ते स्वत: करीत असल्याने अनेक लोक खास सेट पाहण्यासाठी दुरून येत असत. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर नाशिकमधील अनेक रंगकर्मींनी त्यांच्या अमृतधाम येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ३ वाजता अमृतधाम येथून काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जुन्या घरी पाथरवट लेने येथे काही वेळ पार्थिव ठेवण्यात येऊन पंचवटी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नाशिकमधील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या जाण्याने नाशिक शहराच्या नाट्यचळवळीची मोठी हानी झाल्याचे मत रंगकर्मींनी व्यक्त केले.

- संबंधित वृत्त....

--

फर्स्ट पर्सन

-

शाम लोंढे

आज मोठ मोठी कामे करीत असताना दादांची शिकवण मला एका दीपस्तंभासारखी नेहमीच मार्ग दाखवत असते. आज दादा आपल्यात नाहीत, ते नसल्याने झालेल्या हानीचे मोजमाप करता येणे शक्य नाही. हृदयात एक प्रकारची हूक उठते आहे. नेमके सांगता येत नाही. कशा भावना व्यक्त कराव्या...? मानसपुत्र म्हणून, शिष्य म्हणून? नाही कळत नेमकं. पण एकमात्र अगदी सत्य आहे की, जर दादांचा मला परिसस्पर्श झाला नसता तर हा शाम लोंढे... शाम लोंढे घडलाच नसता!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑन द वे लघुपट

$
0
0

'ऑन द वे'मधून

हेल्मेटविषयी मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील नागरिकांनी हेल्मेटचा अधिकाधिक वापर करावा यासाठी एमडीआर अॅण्ड सोनस फिल्म्सच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'ऑन द वे' हा हेल्मेट जनजागृती विषयक लघुपटाचे अनावरण पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

याच कार्यक्रमात यू ट्यूब चॅनेलवरही प्रक्षेपण करण्यात आले. या लघुपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा व अधिकाधिक लोकांनी हेल्मेट परिधान करावे, यासाठी हा लघुपट तयार करण्यात आला आहे. या लघुपटाचे कार्यकारी निर्माते पार्थसारथी चव्हाण हे असून लेखन सचिन जाधव यांनी केले आहे. दिग्दर्शन विशाल दवंगे यांचे आहे. तसेच कॅमेरा प्रसाद आंबेकर यांनी केला आहे. गुलाम शेख यांनी प्रॉडक्शनची जबाबदारी पेलली आहे. यात पियू पवार, सागर कोरडे, भूषण सोनार, विशाल दवंगे या कलाकारांनी अभिनय केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिंगळटवाळी करणारे विरोधी बाकावर

$
0
0

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा टोला

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

देशातील सर्वोच्च पदापासून ते तळागाळापर्यंत भाजप सत्तेत आहे. भाजप देशातील क्रमांक एकचा पक्ष आहे. कधीकाळी भाजपची टिंगलटवाळी करणाऱ्यांवर आज विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. भाजपकडे असलेली कार्यकर्त्यांची ताकद आणि याच ताकदीमुळे पक्षाचे स्वरूप विशाल झाले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत देखील भाजपच क्रमांक एकचा पक्ष असेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला .

येथील भाजपच्या वतीने एकता चौकात गुरुवारी कार्यकर्ता मेळावा व ज्येष्ठ कार्यकर्ता सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून दानवे बोलत होते. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, आमदार सीमा हिरे, किशोर काळकर, लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, तालुकाध्यक्ष दीपक पवार, महानगरध्यक्ष सुनील गायकवाड, सुरेश निकम, केदा आहेर, मदन गायकवाड, समाधान हिरे, मनीषा पवार, नितीन पोफळे, लकी गिल, संदीप पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

दानवे म्हणाले, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कधीकाळी केवळ दोन खासदार असेलल्या पक्ष आज कार्यकर्त्यांच्या बळावर विशाल झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आणेवारीची ब्रिटीशकालीन पद्धती बंद करून किमान ३५ टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील नुकसानभरपाई मिळवून दिली. सरसकट पिक विमा योजना लागू केली. युरियाच्या किमती स्थिर ठेवल्या. राज्यशासनाने ऐतिहासिक अशी कर्जमाफी दिली. मागेल त्याला शेततळे यांसारख्या योजनांनी शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

दानवे यांनी आपल्या भाषणात विरोधकांचाही समाचार घेतला. भाजपचा विकासाचा अजेंडा विरोधकांना मान्य नाही. त्यामुळे राज्यात जातीपातीत भांडणे लावणे, शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम काँग्रेस, राष्ट्रवादी करीत आहे. गेल्या सत्तर वर्षात त्यांनी किती विकासकामे केली याचा हिशेब द्यावा. भाजपच्या सरकार जनतेसाठी कामे करू शकते हा विश्वास निर्माण झाला आहे. म्हणून निवडणुकीत भाजपला यश मिळत आहे. तर नार पारच्या प्रश्नी देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लागेल तेवढा पैसा देण्याचे आश्वासन दिले असल्याने त्यांनी स्पष्ट केले. डॉ. भामरे यांनी मतदारसंघातील ९० टक्के सिंचन प्रकल्प मार्गी लावले असून नार पारसाठी देखील प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

..अन् हिरे भेटले

मेळाव्याच्या निमित्ताने हिरे कुटुंबियांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेवरही टीका झाली. दरम्यान गायकवाड यांनी आपल्या भाषणातून एक हिरे गेले आता दुसरे तुम्हाला भेटायला आलेत असे सांगत प्रसाद हिरे यांनी रावसाहेब दानवे यांची मेळाव्याआधी भेट घेतल्याचे सांगितले. त्यामुळे प्रसाद हिरेंच्या दानवे भेटीने अनेक चर्चा रंगल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडित वीजपुरवठ्याने नाशिकरोडवासीय हैराण

$
0
0

खंडित वीजपुरवठ्याने नाशिकरोडवासीय हैराण

जेलरोड : नाशिकरोड परिसरात गुरुवारी सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाला होता. सात वाजेच्या सुमारास दोन वेळा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजप्रवाह सुरू होणे व खंडित होणे सातत्याने सुरू होते. त्यामुळे नागरिकांना काम करणे अवघड झाले होते. व्यावसायिकांचीही गैरसोय झाली. असा प्रकार वारंवार होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महावितरणने भारनियमनाची गरज नसल्याचे स्पष्ट केले असतानाही वीजपुरवठा खंडित होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

--

पक्षध्वज हटविले (फोटो)

जेलरोड : नाशिकरोड परिसरात विविध पक्षांनी लावलेले ध्वज महापालिकेने नुकतेच काढून घेतले. विधान परिषद निवडणुकीचा आचारसंहिता लागू असल्याने ध्वज काढून घेण्यात येत आहेत. शिडी असलेल्या वाहनाचा वापर त्यासाठी करण्यात येत आहे. जेलरोडला गुरुवारी सकाळी ही मोहीम राबविण्यात आली. रस्ता दुभाजकातील पथदीपांवर लावलेले ध्वज महापालिका कर्मचाऱ्यांनी काढले.

--

अस्वच्छतेने दुर्गंधी

पंचवटी : काझी गढीच्या खालच्या भागातील गोदाघाटाची स्वच्छता होत नसल्यामुळे या भागात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. या घाटावर उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या दुर्गंधीत आणखी भर पडली आहे. गोदापात्रात टाकलेला कचरा या भागातील घाटावर साचत आहे. साचलेला कचरा आणि शेवाळलेल्या पायऱ्या यामुळे या भागातील अस्वच्छता वाढली आहे.

(थोडक्यात)

--

(पॉइंटर्स)

जेईई, नीटपेक्षा सीईटी सोपीच -२

सांडपाणी नाल्यांमध्येच -३

गोंगाटावर शोधावी मात्रा -४

हिरवाईने नटलेले केरळ -५

भूमिकेत जपा स्त्रीपणाचा मान -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्थानक भागातच रिक्षाचालकांना जागा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालकांना त्यांच्या सध्याच्या ठिकाणीच व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली आहे. ओला व उबेर या खासगी टॅक्सीसेवेला सिन्नर फाटा येथील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर जागा मिळणार आहे. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे यांनी ही माहिती दिली.

रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे, नितीन चिडे, नाशिकरोड रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष किशोर खडताळे, अनिल शिंदे, रमेश दाभाडे यांचे शिष्टमंडळ गुरुवारी भुसावळला गेले होते. भुसावळचे डीआरएम आर. के. यादव यांच्याशी त्यांची या प्रश्नावर दीड तास चर्चा केली. फोकणे यांनी त्यांना खासदार हेमंत गोडसेंचे पत्र दिले. खासदार गोडसे यांनीही यादव यांच्याशी फोनवर संवाद साधून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. रिक्षाचालकांवर संक्रांत आणू नये. ओला व उबेर टॅक्सीचालकांना प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर जागा द्यावी, अशी सूचना गोडसेंनी केली. त्यानंतर रिक्षाचालकांना सध्या तरी रेल्वे स्थानकाच्या आवारातच व्यवसायासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. ओला, उबेर टॅक्सीसेवेसाठी सिन्नर फाटा येथील प्लॅटफॉर्म चारवर जागा देण्यात येणार आहे. त्याबाबत लवकरच टेंडर काढले जाईल. तेथे ही सुविधा झाल्यानंतर त्या भागाचाही विकास होणार आहे. रिक्षाचालक या रेल्वे स्थानक आवारात गेल्या चाळीस वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. वेळोवेळी रेल्वेला सहकार्यही करीत आहेत. त्यामुळे त्यांना तेथून हटविल्यास उपासमारीची वेळ येईल, तसेच प्रवाशांचेही हाल होतील, असा दावा खडताळे यांनी केला. काही दिवसांपासून रिक्षाचालकांनी आंदोलनही सुरू केले होते. गेल्या आठवड्यात रिक्षा स्टँडवर रात्री अडीचला रेल्वे प्रशासनाने अचानक बॅरिकेड्स लावल्याने रिक्षाचालक संतप्त झाले होते. त्यांनी बॅरिकेड्स काढण्यास रेल्वेला भाग पाडले. त्यानंतर चार दिवस रिक्षासेवा बंद होती. अखेर खासदार गोडसे यांनी रेल्वे स्थानकात येऊन प्रशासनाशी चर्चा केली. त्यावेळी भुसावळला शिष्टमंडळ नेण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाचे रिक्षाचालकांनी स्वागत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लीडसाठी....

$
0
0

बॅँकनिहाय ठेवींची स्थिती

७८.४५ कोटी : पंजाब नॅशनल बॅँक

६२.७५ कोटी : देना बॅँक

५६.९१ कोटी : ओरिएंटल बॅँक

४६.९८ कोटी : बॅँक ऑफ महाराष्ट्र

३८.९४ कोटी : सेंट्रल बॅँक

३८.२१ कोटी : बॅँक ऑफ बडोदा

३५.१४ कोटी : स्टेट बॅँक ऑफ इंडिया

२७.२७ कोटी : इंडियन बॅँक

१९.९६ कोटी : बॅँक ऑफ इंडिया

१६.१४ कोटी : स्टेट बॅँक ऑफ हैद्राबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनुष्यापाशीच ईश्वरी ठेवा

$
0
0

पांडुरंग गोरे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी 

 जगात सर्वात जुने तत्वज्ञान हे भारतीय तत्वज्ञान आहे. ते  ईश्वराची ओळख करून देते. आपला संबंध निसर्ग नियमांशी आहे. परमेश्वर हा जीवनाचा पाया असून, ईश्वरी ठेवा मनुष्यापाशी आहे. तो जसा विचार करतो तशी परिस्थिती त्याच्या भोवती तयार होत असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील आध्यात्माचे अभ्यासक पांडुरंग गोरे यांनी केले.

गोदाकाठावरील यशवंतराव महाराज पटांगणावर ९७ व्या वसंत व्याख्यानमालेचे १० वे पुष्प गुंफताना प्रा. सुरेश मेणे स्मृती व्याख्यानात 'तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या विषयावर ते बोलत होते. देव मनुष्य जीवनात हस्तक्षेप करीत नसल्याने कोप होणे किंवा त्याची कृपा प्राप्त होणे हे खरे नाही. हे सर्व त्याच्या कर्मानुसार घडत असल्याचे गोरे यांनी सांगितले. निसर्ग आणि ईश्वर यांचा जवळच संबंध असून, निसर्गाचे अनेक सिद्धांत आहेत. त्यातील मनुष्य जीवनाशी निगडित निसर्ग सिद्धांत आहेत. क्रिया तशी प्रतिक्रिया या सिद्धांतात न्यूटनचा नियम सामावलेला आहे. जेथे परिणाम तेथे कारण या निसर्ग नियमात मनुष्याला जशी सांगत असते तसे व्यसन जडते. जमिनीत जशी बी पेरू तसे फळ मिळत असते. म्हणून मनुष्याने संत संग धरावा, असेही ते म्हणाले.

जसा विचार तसा जीवनाला आकार हा महत्त्वाचा निसर्ग सिद्धांत असून, मन हे मनुष्य इंद्रियांचे प्रधान आहे. मानवी मनाचे पाच प्रकार असून, बहिर्मन व अंतर्मन यावर सर्व अवलंबून आहे. नकारात्मक विचार केल्यास सभोवताली नकारात्मक परिस्थिती उभी राहत असते. म्हणून सकारात्मक विचार नेहमी मनुष्याने करावे असे त्यांनी सांगितले.  कवी सुभाष सबनीस, शोभना मेणे उपस्थित होते. प्रा. संगीता बाफना यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले. 

आजचे व्याख्यान 

विषय : उत्सव आणि विज्ञान 

वक्ते : दा.कृ. सोमण 

लोगो : वसंत व्याख्यानमाला : पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकरोडला मजुराची हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दगडाने डोके ठेचून एका मजुराचा खून करण्यात आल्याची घटना नाशिकरोडला गुरुवारी सकाळी उघडकीस आली. बाळू उर्फ बाळासाहेब दिनकर दोंदे (वय ४५, रा. रोकडोबावाडी, देवळालीगाव) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. अत्यंत वर्दळीच्या वास्को चौकातील भंडारी ब्रदर्स प्लायवुड सेंटरपुढे त्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.

बाळू यांच्या खुनप्रकरणी त्याचा भाऊ अनिल दिनकर दोंदे (रा. चेहेडी शिव) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या घटनेनंतर एका संशयितास ताब्यात घेतले असून त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. बाळू यांना दारू पिण्याचे व्यसन होते; त्यामुळे अनेकदा ते घर सोडून बाहेरच राहत असे. रात्री ते विविध बाजारपेठांतील रस्त्यावर फिरून पुठ्ठे व भंगार जमा करून त्याची विक्री करीत असे. गुरुवारी रात्री तीन ते चार वाजेच्या सुमारास पुठ्ठे व भंगार गोळा करीत असताना बाळू यांना अज्ञात तीन व्यक्तींनी मारहाण केल्याची माहिती भंगार जमा करणारा त्यांचा साथीदार संतोष चंदू कटारे याला दिली. तिकडे न जाण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे घाबरलेला संतोष गोसावीवाडीत जाऊन झोपला. बाळू यांचा डोक्यात दगड मारून खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. नाशिकरोड पोलिसात अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मखमलाबादला गॅस चोरास अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मखमलाबाद गावाजवळील भारत गॅस गोडाउनमधून ग्राहकांना डिलिव्हरी व्हॅनद्वारे गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते. या व्हॅनचा चालक भरलेल्या सिलिंडरमधून गॅस काढून ग्राहकांना कमी वजनाचे सिलिंडर देत असल्याची गुप्त माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ ला मिळाली. पोलिसांनी गुरुवारी (दि. १०) सापळा रचून चालकास ताब्यात घेत सुमारे दोन लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

संजय खंडू चव्हाण (४२, रा. गंगोत्री विहार कॉलनी, अमृतधाम) असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव असून, मखमलाबाद गावाजवळ असलेल्या भारत गॅस गोडाउनमध्ये गॅस डिलिव्हरी व्हॅनचालक म्हणून कामास आहे. ग्राहकांना देण्यासाठी असलेल्या गॅस सिलिंडरमधून काही गॅस काढून घेत ग्राहकांची फसवणूक करीत होता. संजय गुरुवारी (दि. १०) गंगोत्री विहार कॉलनीमधील साई बंगल्याच्या मागील मोकळ्या जागेत गॅस काढत असल्याची गुप्त माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलिस निरीक्षक आंनद वाघ यांना मिळाली. त्यानुसार याठिकाणी पोलिसांनी सापळा रचून संशयित संजयला ताब्यात घेतले. यावेळी १३ गॅस सिलिंडर, तान काटा व गॅस ट्रान्सफर निप्पल असा एकूण दोन लाख ३६ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेवी ६०० कोटींवर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासकीय शिस्तीपाठोपाठ आर्थिक शिस्तीलाही प्राधान्य दिल्याने प्रथमच महापालिकेचा स्पीलओव्हर शून्यावर आल्याने महापालिकेची आर्थिक घडी काहीशी स्थिरावली आहे. आयुक्तांनी एकीकडे नगरसेवकांच्या विकासकामांना आर्थिक स्थितीचे कारण देत ब्रेक लावला असतानाच विविध राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये महापालिकेच्या तब्बल ६०० कोटी रुपयांच्या ठेवी असल्याची माहिती पुढे आली आहे.

दहा बॅँकांमध्ये विविध १५ हेडखाली सुमारे सव्वाशे ठेवींच्या माध्यमातून ही रक्कम गुंतविण्यात आली असून, या ठेवींच्या माध्यमातून महापालिकेला वार्षिक ४०.६४ कोटी रुपयांचे व्याज मिळत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांकडून आता पुन्हा विकासकामांचा हट्ट धरला जाण्याची शक्यता आहे. महापालिकेतील कारभाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून मूलभूत सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याऐवजी रस्ते आणि डांबरीकरणावरच भर दिल्याने महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली होती. सिंहस्थ कुंभमेळ्यात जवळपास पाचशे व मनसेच्या काळात दोनशे कोटींचे रस्ते झाले असताना भाजपने पुन्हा अडीचशे कोटींचे डांबर ओतण्याची तयारी केली होती. परंतु, आयुक्त मुंढेंनी त्रिसूत्री लावत ही सर्व कामे रद्द केली होती, तसेच प्रभाग समित्या व विषय समित्यांनी सुचविलेली फुटकळ विकासकामेही आयुक्तांनी रद्द केल्याने प्रथमच महापालिकेचा स्पीलओव्हर साडेचारशे कोटींवरून शून्यावर आला आहे. त्यामुळे प्रथमच महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारली आहे. दायित्व शून्यावर असताना महापालिकेची ठेवींच्या माध्यमांतूनही आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे समोर आले आहे.

दुसरीकडे महापालिकेवर सिंहस्थ कामांसाठी घेतलेल्या १३० कोटींच्या कर्जाचा भार आहे. अजूनही सिंहस्थाचे ७० कोटी रुपये देणे बाकी आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंजूर केलेल्या २६० कोटींच्या कर्जाच्या रकमेतूनच ही रक्कम देण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विविध बॅँकांमधील ठेवींचा आढावा घेतला असता महापालिकेला कर्ज उचलण्याची गरजच काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विविध राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये महापालिकेच्या ६०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवींपोटी सुमारे ४० कोटी ६४ कोटींचे व्याजही मिळत आहे. इमारत घसारा निधी, विकास निधी, डीसीपीएस, अग्नि प्रतिबंधनक निधी, जनरल निधी, कामगार कल्याण निधी, महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजना निधी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, वेतन राखीव निधी, सुरक्षा ठेव, सिंकिंग फंड, घनकचरा व्यवस्थापन निधी, वृक्ष निधी, यंत्रसामग्री घसारा निधी, वाहन घसारा निधी या हेडखाली या सव्वाशे ठेवी ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे नीरव मोदीने लुबाडलेल्या पंजाब नॅशनल बॅँकेतही महापालिकेच्या ७८.४५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. दरम्यान, महापालिकेची आर्थिक सुबत्ता कायम असताना नगरसेवकांच्या विकासकामांनाच कात्री का, असा प्रश्न नगरसेवकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.

--

सिंहस्थ कामे तपासण्याचे आदेश

सिंहस्थ कुंभमेळ्याला तीन वर्षांचा कालावधी उलटला असला, तरी अजूनही काही सिंहस्थ कामे प्रलंबितच असून, या कामांपोटी महापालिकेला सुमारे ७० कोटी रुपयांचे दायित्व शिल्लक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारने मंजूर केलेल्या महापालिकेच्या ९१९ कोटींपैकी ७५ टक्के म्हणजेच ६२६ कोटी रुपयांचे सिंहस्थ अनुदान महापालिकेला सरकारकडून प्राप्त झाले आहे. सिंहस्थाची अनेक कामे अजूनही प्रलंबित असून, त्यात रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. वृक्षतोडीला न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे काही रिंगरोड, रस्तेविकासाची कामे, तसेच वैद्यकीय विभागांसाठी यंत्रसामग्री खरेदी अद्यापही प्रलंबित आहे. या कामांसाठी सुमारे ७० कोटी रुपयांचा खर्च महापालिकेला उचलावा लागणार आहे. ही रक्कम मंजूर कर्जातून घ्यावी, असा प्रयत्न सुरू होता. परंतु, आयुक्त मुंढे यांनी त्यालाही ब्रेक लावला असून, सिंहस्थ कामे तपासण्याचे आदेश दिले आहेत.

------------------------------------------------

बॅँकनिहाय ठेवींची स्थिती

७८.४५ कोटी : पंजाब नॅशनल बॅँक

६२.७५ कोटी : देना बॅँक

५६.९१ कोटी : ओरिएंटल बॅँक

४६.९८ कोटी : बॅँक ऑफ महाराष्ट्र

३८.९४ कोटी : सेंट्रल बॅँक

३८.२१ कोटी : बॅँक ऑफ बडोदा

३५.१४ कोटी : स्टेट बॅँक ऑफ इंडिया

२७.२७ कोटी : इंडियन बॅँक

१९.९६ कोटी : बॅँक ऑफ इंडिया

१६.१४ कोटी : स्टेट बॅँक ऑफ हैद्राबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्होकेशनल’च्या प्रयोगशाळा निधीपासून वंचित

$
0
0

खर्चाची तरतूद करण्याबाबत संस्थांना अजब सूचना

jitendra.tarte@timesgroup.com

नाशिक : 'स्किल एज्युकेशन'च्या प्रचार अन् प्रसारासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना व्होकेशनल अभ्यासक्रमांच्या प्रयोगशाळांसाठी सरकारकडे पुरेसा निधीच नाही. व्होकेशनल अभ्यासक्रम असलेल्या संस्थांच्या माथी प्रयोगशाळा आणि संसाधनांचा खर्च मारण्याचे काम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयाच्या माध्यमातून पद्धतशीरपणे सुरू आहे. पण या निधीच्या खोळंब्यात दोन वर्षांपासून नवीन अभ्यासक्रम शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे.

कौशल्यपूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयाच्या माध्यमातून राज्यभरात विविध अभ्यासक्रम चालविले जातात. यात अधिक दोन स्तरावर सहा गटांमध्ये एकूण २० अभ्यासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांमधूनही चांगली मागणी आहे. विविध विद्याशाखांमधून विद्यार्थीसंख्येचा कोटा पूर्ण करण्यासाठी होणाऱ्या विद्यार्थी पळपळवीच्या समस्येचा सामना अलिकडे काही वर्षांपासून व्होकेशनल अभ्यासक्रमासही करावा लागतो आहे. तरीही या अभ्यासक्रमांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समतोल आहे. गेल्यावर्षी या अभ्यासक्रमात उपलब्ध सुमारे ६० हजारांपैकी ५९ हजार प्रवेश झाले. एकीकडे इंजीनिअरिंग अन् पॉलिटेक्निकच्या जागा रिक्त राहत असताना व्होकेशनल अभ्यासक्रमांचे हे यश मानले जायला हवे. पण, दुर्दैवाने शासनास त्याची दखल घ्यावीशी वाटत नसल्याने अद्ययावत साधनांअभावी केवळ पुस्तकातील ओळींवर बोटे फिरवून व्यावसायिक शिक्षणाचे धडे गिरविण्याची वेळ या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांवर आली आहे.

दोनच वर्षांपूर्वी व्होकेशनल विद्याशाखेचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. नव्या अभ्यासक्रमास पूरक अशा संसाधनांसह अद्ययावत प्रयोगशाळा निर्मितीचीही गरज या बदलापासून आहे. पण या सुधारणा करण्यासाठी वारंवार होणाऱ्या मागणीस उत्तरादाखल निधी नसल्याचे शासनाकडून ऐकविण्यात येते. यावर वरकडी म्हणून गेल्यावर्षी संचलनालयाने या सुविधांच्या उभारणीसाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. हे नवे उद्दिष्ट गाठण्यासाठी अगोदरच आर्थिक प्रतिकूलतेमुळे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर शुल्कवाढ लादणेही योग्य नाही अन् संस्थांना उत्पन्नाचा दुसरा स्त्रोतही नाही. अशा स्थितीत कौशल्य शिक्षणाचे गाडे लोटायचे तरी कसे, असा सवाल आता राज्यातील व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना पडला आहे. राज्यात व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शासनाच्या ५३ व्यावसायिक शिक्षणसंस्था, अनुदानित ९७० संस्था तर अशासकीय विनाअनुदानित ९१७ संस्था आहेत. यातील शासकीय संस्था वगळल्यास इतर संस्थांची अवस्था याबाबतीत संघर्षाचीच आहे.

उच्चस्तरीय समिती गठीत करा

व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांचे महत्त्वाचे प्रश्न सातत्याने प्रलंबित आहेत. या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी शासनाने उच्चस्तरीय समिती गठीत करून त्या शिफारशींवर विचार करावा. अन्य बाबतीत या विभागात देशस्तरावर आदर्श मॉड्युल उभे करण्याची क्षमता महाराष्ट्रातील व्यवसाय शिक्षणात आहे. या क्षमतेचा उपयोग शासनाने करून घ्यावा, असे मत महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रा. जयंत भाबे यांनी मांडले आहे.

लोगो : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’अंतर्गत ३,१९० प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रक्रियेत दुसऱ्या फेरीपर्यंत ३ हजार १९० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. दुसऱ्या फेरीसाठी दिलेली १० मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, या फेरीतील प्रवेशासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता शिक्षण विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ४६६ शाळांमध्ये ६ हजार ५८९ जागांसाठी आरटीई प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिली फेरीत ३ हजार १ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील २ हजार १८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तर दुसऱ्या फेरी १ हजार ६ विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप निश्चित झाले आहेत. तर राज्यात १ लाख २६ हजार ६८ जागांपैकी ४७ हजार २२० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images