Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नियमितता...

$
0
0

चिंटू हा सहावीत शिकणारा चुणचुणीत मुलगा. पण, कुठल्याच गोष्टीत तो सातत्य व नियमितता ठेवत नसे. परीक्षा जवळ आली तरच तो अभ्यास करीत असे. आई त्याला रोजच्या रोज अभ्यास करायला बसवत असे. पण, चिंटूला अभ्यासाचा कंटाळा येत असे म्हणून त्याने एक दिवस अभ्यास केलाच नाही. पूर्ण दिवस खेळून टाइमपास केला. चिंटूच्या अशा वर्तणुकीमुळे आईला राग आला. पण, आईने त्यावेळी शांत राहण्याची भूमिका घेतली. आईने मनाशी ठरवले, की चिंटूला सातत्य व नियमितता आपल्या जीवनात किती आवश्यक आहे हे ओरडून सांगण्यापेक्षा कृतीनेच सिद्ध करून दाखविणे योग्य राहील. कारण, बोलण्यापेक्षा कृती केव्हाही उत्तम व श्रेष्ठ असते. त्या दिवशी आईने स्वयंपाकच केला नाही, ना घरात कोणती साफसफाई केली. त्यामुळे घरात सर्वत्र पसारा व धूळ होती. घरात साचलेली धूळ व पसारा पाहून चिंटू आईला म्हणाला, 'आई, आज तू घर स्वच्छ न केल्याने किती धूळ साचली आहे व पसारापण झालाय. हे आरोग्यला चांगले नाही ना!' नंतर भूक लागली म्हणून किचनमध्ये जाऊन पाहतो तर काय, आईने खाण्यास काहीही बनवले नव्हते. त्यामुळे चिंटू जरा विचारातच पडला. चिंटूची ही अवस्था पाहून आई म्हणाली, की मी एकदा घरात स्वच्छता नाही केली तर धूळ साचली ना? एक वेळ स्वयंपाक नाही केला, तर तू हिरमुसलास! जशी घरात स्वच्छता आवश्यक आहे तशीच अज्ञानरुपी धूळ आज तू अभ्यास न केल्याने तुझ्या मनावरही साचली गेली आहे. धूळ वेळीच साफ केली, तरच घर स्वच्छ दिसते, तसेच वेळच्या वेळी व नियमित अभ्यास केला, तरच ज्ञान अद्ययावत राहते. सगळ्याच गोष्टींचा कंटाळा करणे योग्य नाही. आळस, कंटाळा हे मानवाचे मोठे शत्रू आहेत. आज आळस, कंटाळा केल्याने आजच्या दिवसापुरती आपली प्रगती थंडावते. जीवनात प्रगतिशील व विकसित होण्यासाठी आळस झटकून कामाला लागले पाहिजे. आईने एक दिवस कंटाळा केला, तर जेवायला मिळेल का, हा विचार कर. हे ऐकून चिंटूला आपली चूक लक्षात आली आणि त्याने आईची क्षमा मागितली. खरं तर बालवयातच मुलांवर योग्य संस्कार करणे हितावह ठरते.

तात्पर्य : नियमितता ही मोठी शक्ती असून, तिच्या बळावरच अज्ञानरुपी धूळ झटकता येते.

-स्नेहा शिंपी, नाशिक

--

बालकथा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिटिझन रिपोर्टर- फोटो

तृप्ती पाराशरचे मनमाडमध्ये स्वागत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथील जय भवानी व्यायामशाळेची राष्ट्रीय खेळाडू तृप्ती शेखर पाराशर हिने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ यशस्वी पूर्ण करून पात्रता संपादन केल्याबद्दल तिचा बुधवारी मनमाड येथे सत्कार करण्यात आला. सन २०१७-१८ या वर्षात भारतीय क्रीडा प्राधिकरण पतियाळा येथून एक वर्षाचा एनआयएस डिप्लोमा तसेच भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाची श्रेणी दोन पंच परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल जय भवानी अद्यावत व्यायामशाळा व पाराशर कुटुंबियांच्या वतीने तृप्तीचा गौरव करण्यात आला. माजी नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील, जय भवानी व्यायामशाळेचे संस्थापक अध्यक्ष जयराम बाबा सानप, सचिव मोहन गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, माजी उपजिल्हाधिकारी अरुणा इटाई आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरपंचांनी गावाचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढवावा

$
0
0

सरपंच संसदेत श्रीकांत भारतीय यांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

ग्रामविकासाचा खरा निर्माता सरपंच आहे. सर्वांगीण विकास घडवणे त्याच्याच हातात आहे. मात्र केवळ विकासकामांमुळे समाधान नांदत नसते. विकासाबरोबरच गावात समाधान निर्माण करण्यासाठी सरपंचांनी प्रयत्न करावा, गावाचा 'हॅपिनेस इंडेक्स' वाढवावा, असे आवाहन मुख्यमंत्रांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांनी केले.

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या अंतर्गत स्थापित महाराष्ट्र सरपंच संसदेच्यावतीने आणि ग्रामसमृद्धी फाउंडेशन व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अग्रीकल्चरच्या सहकार्याने जिल्ह्यातील निवडक सरपंच व उपसरपंचांच्या मार्गदर्शनासाठी पिंपळगाव बसवंत येथे दोन दिवसीय सरपंच संसदेचे आयोजन करण्यात आले होते. या संसदेच्या समारोप सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बोलत होते.

सरपंच संसदेच्या पहिल्या दिवशी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, पुण्याच्या अभिनव फार्मर्स क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके, भाजपचे महाराष्ट्र प्रांत चिटणीस लक्ष्मण सावजी, सामाजिक कार्यकर्ते शेखर बोराडे, ग्रामप्रशासनतज्ज्ञ शरद बुट्टे पाटील, नगर जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी मार्गदर्शन केले. संसदेच्या दुसऱ्या दिवशी माजी सनदी अधिकारी डॉ. बी. जी. वाघ, महाराष्ट्र सरपंच संसदेचे पुणे विभागाचे समनव्यक जयंतराव पाटील, माहिती तंत्रज्ञानतज्ञ प्रतीक कर्पे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

श्रीकांत भारतीय म्हणाले, की लोकशाही व्यवस्थेत केवळ गावाचा सरपंच स्वतंत्र असून, कोणत्याही पक्षाशी बांधील नाही. तर तो गावातील लोकांशी बांधील आहे. थेट सरपंच निवडणुकीमुळे गावासाठी भरीव कामगिरी करण्याची संधी निर्माण झाली आहे. हिवरेबाजारच्या पोपटराव पवारांनी निर्माण केलेला आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी समाधान बोडके,गंगाधर निखाडे,ज्योती देशमुख,संगीत पवार,शिवाजी सुरासे,विकास जाधव, विनोद पगार, मेघराज आव्हाड या सरपंचांनी अनुभव व कामातील अडचणी मांडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिपीन गांधी यांचे हृदयविकाराने निधन

$
0
0

नाशिक:

पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श एक्स्प्रेस बनविण्यात मोलाचा वाटा असलेले रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी (वय ६५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पंचवटी एक्स्प्रेसच्या २१ डब्यांच्या नवीन गाडीच्या स्वागतासाठी ते नाशिकरोड रेल्वे स्थानकात आले होते. तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

गांधी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. पंचवटी एक्स्प्रेसच्या नवीन २१ डब्यांच्या गाडीच्या स्वागतासाठी ते रेल्वेस्थानकावर आले होते. मात्र नवीन गाडी स्थानकात येण्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते रेल्वे स्थानकावर कोसळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साक्ष फिरविणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील एका खुन खटल्यात खोटी साक्ष दिल्यामुळे न्यायालयाने साक्षीदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खोटी साक्ष देणाऱ्या अथवा साक्ष फिरवणाऱ्यांवर जरब बसणार आहे.

सातपूर येथील दुहेरी हत्याकांडाच्या खटल्यात आरोपी रामदास शिंदे याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी फाशीची शिक्षा सुनावली. या खटल्यात महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या सुभाष कालीचरण राजपूत याने न्यायालयात साक्ष फिरविली. पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात त्याने फिर्यादी कचरू संसारे यांच्या पत्नी व मुलाचा खून केल्यानंतर संशयिताने मला पहाटे साडेतीनच्या सुमारास मोबाइलवर फोन करून आपल्या हातून घडलेल्या कृत्याची माहिती दिली होती. राजपूत याचा फौजदारी प्रक्रियासंहिता कलम १६४ प्रमाणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदविण्यात आला. त्यामध्ये देखील त्याने या बाबी सांगितल्या. परंतु, सत्र न्यायालयात खुनाच्या खटल्याच्या सुनावणीवेळी त्याने साक्ष फिरविली.

त्यामुळे साक्षीदाराच्या आवाजाचे नमुने व आरोपीबरोबर संभाषण करतानाच्या आवाजाचे नमुने तज्ज्ञ विश्लेषकामार्फत तपासून अहवाल मागविण्यात आला होता. यामधील आवाज राजपूत याचाच असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पिंगळे यांची देखील न्यायालयात साक्ष नोंदविण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी या प्रकरणात आरोपीला फाशीच निर्णय देतानाच राजपूत याने न्यायालयात खोटी साक्ष दिल्याचा निष्कर्ष काढला.

जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधकांनी राजपूत याच्यावर भा. दं. वि. कलम १९३ प्रमाणे खटला दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रबंधक सूर्यभान महाजन यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यवान डोके यांच्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. न्यायालयाने राजपूत विरूद्ध समन्स जारी केले असून २८ मे रोजी त्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

सात वर्षांच्या कारावासाची शक्यता

राजपूत याच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. न्यायालयात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या निर्देशावरून साक्षीदारावर फौजदारी खटला दाखल झाला आहे. त्यामुळे या पुढे न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्यांवर जरब बसू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेततळ्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. लासलगाव येथे बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेत मनमाडच्या छत्रे विद्यालयाचा दहावीची परीक्षा देऊन निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याचा समावेश आहे. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सोमनाथ शेजवळ (रा. राजवाडा, लासलगाव) यांच्या शेततळ्यातील पाण्यात भारत वसंत शिंदे (वय १९, रा ब्राह्मणगाव, ता. निफाड) व मुजमिल फारूक शेख (वय १७, रा. मनमाड) हे दोघे पोहण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांना लासलगाव येथील लोटस हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची लासलगाव पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मुजमिल हा मनमाडच्या छत्रे विद्यालयात शिकत होता. नुकतीच त्याने दहावीची परीक्षा दिली होती. बुधवारी तो आपल्या गावी लासलगावला आला होता. त्यावेळी हा प्रकार घडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोकोविच पुन्हा अपयशी

$
0
0

माद्रिद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत एडमंडकडून पराभूत

वृत्तसंस्था, माद्रिद

नोव्हाक जोकोविचला बुधवारी माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेतून दुसऱ्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत ब्रिटनच्या काइल एडमंडने जोकोविचवर ६-३, २-६, ६-३ अशी मात केली. ही यंदाच्या मोसमातील सलग सहावी स्पर्धा आहे, ज्यामध्ये जोकोविचला उपांत्यपूर्व फेरीतही प्रवेश करता आला नाही.

उजव्या कोपरावरील शस्त्रक्रियेनंतर पुरेशी विश्रांती घेऊन मग जोकोविचने आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुनरागमन करणे अपेक्षित होते; पण त्याने काही महिन्यांतच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. ज्याचा फटका त्याला बसतो आहे. अशा सलग स्पर्धांमध्ये लवकर गाशा गुंडाळावा लागत असल्याने १२वेळा ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या जोकोविचचा आत्मविश्वास डगमगू लागला आहे. खरेतर हार्ड कोर्ट हे जोकोविचचे फेव्हरिट टेनिस कोर्ट आहे; पण यंदा इथेही त्याच्याकडून बिरूदाला साजेशी कामगिरी झाली नाही. माँटेकार्लो स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत तो हरला, तर मायामी आणि इंडियन वेल्स या दोन्ही स्पर्धांमध्ये जोकोविच दुसऱ्या फेरीत गारद झाला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही त्याला उपउपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता.

महिला एकेरीत अव्वल मानांकित सिमोना हॅलेपने क्रिस्टिना प्लिसकोव्हावर ६-१, ६-४ अशी मात केली. मात्र कॅरोलिना वॉझ्नियाकीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. २०व्या मानांकित किकी बर्टन्सने कॅरोलिनवर ६-२, ६-२ असा विजय मिळवला. माद्रिद स्पर्धा जिंकली असती, तर वॉझनियाकीला जागतिक रँकिंगमध्ये अव्वल होण्याची संधी होती; पण किमान या आठवड्यात तरी ते शक्य नाही.

सामन्यांचे निकालः रावनिक विजयी वि. दिमित्रोव्ह ७-५, ३-६, ६-३. डेल पोट्रो विजयी वि. दामिर झमहूर ६-३, ६-३. अँडरसन विजयी वि. मिखाइल कुकुश्किन ५-७, ७-६ (७-३), ६-२. गॉफिन विजयी हास ७-५, ६-३. महिलाः कॅरोलिना प्लिस्कोव्हा विजयी वि. स्टीफन्स ६-२, ६-३.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदाघाटावर रुजल्या अनेक संस्कृती

$
0
0

सुरेखा गायखे-बोऱ्हाडे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी ही पुरातन काळातील नदी असून ती दंडकारण्यातही होती, जनस्थानातही होती पद्मपूर, त्रिकंटक, गुलशनबादच्यावेळीही गोदावरी होती. या नदीच्या काठावर अनेक संस्कृती रुजल्या, वाढल्या असे सांगत गोदावरीच्या इतिहासाचा लेखाजोखा मांडला तो सुरेखा गायखे-बोऱ्हाडे यांनी.

वसंत व्याख्यानमालेत बुधवारी नववे पुष्प 'गोदा आली अंगणी' या विषयावर बोऱ्हाडे यांनी गुंफले. गोदाघाटावरील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर ही व्याख्यानमाला सुरू आहे. गोदावरी नदीला प्रचंड मोठा इतिहास आहे, परंतु आज गोदेची अवस्था काय आहे? गोदावरीत सगळीकडे प्रदूषण होत आहे. कचरा, मैल्यामुळे या पावन तीर्थाचे रुपच बदलून गेले आहे. गोदावरी मैली करण्यातच अनेकांना धन्यता वाटत आहे. दुष्काळ पडला होता तेव्हा या नदीचे महत्त्व आपल्याला कळले होते. परंतु, ते शाबूत राखण्याचे काम मात्र नंतर झाले नाही. मोजक्या दिवसांच्या अंतराने गोदावरीची साफसफाई होते. महापालिका त्यासाठी निधीही खर्च करते; मात्र, नंतर पुन्हा या नदीची अवस्था काय होते, त्याकडे कुणाचे लक्ष जाणार आहे का? गोदावरीला प्रचंड पावन अशी परंपरा आहे. गोदेच्या काठी अनेक देवीदेवतांनी वास केलेला आहे. महादेव येथे कपालेश्वराच्या निमित्ताने आले. प्रभू रामचंद्रही गोदेच्या काठावर वास्तव्याला होते. इतकी थोर परंपरा या नदीला आहे, असे असताना आता येथे प्रदूषण होत आहे. त्यामुळे गोदामाईला काय वाटत असेल याचा विचार करावा व प्रदूषण टाळावे असे आवाहन देखील सुरेखा बोऱ्हाडे यांनी केले. प्रारंभी श्रीकांत येवलेकर यांनी सदूभाऊ भोरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. शैलेश भोरे, राजेंद्र भोरे, प्रगती भोरे, हर्षल भोरे यांची मंचावर उपस्थिती होती.

आजचे व्याख्यान

वक्ते : पांडुरंग गोरे

विषय : तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

वसंत व्याख्यानमाला : पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनडीए’त नाशिकचा झेंडा

$
0
0

वेदांत घंगाळे, प्रणव जोपळे यांचा गुणवत्ता यादीत समावेश

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) च्या वतीने नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी (एनडीए) यांच्यासाठी सप्टेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेच्या अंतिम गुणवत्ता यादीत नाशिकच्या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. वेदांत प्रशांत घंगाळे याने या यादीत देशभरात २०७ वी तर प्रणव राजू जोपळे याने ३५१ वी रँक मिळवून यश संपादन केले आहे. देशभरात एकूण ४४७ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

'एनडीए'साठी १० सप्टेंबर २०१७ रोजी लेखी परीक्षा पार पडली होती. लेखी परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची मुलाखत प्रक्रिया जानेवारी महिन्यात पार पडली होती. हे आणि इतर महत्त्वाचे टप्पे पार पडल्यानंतर एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येते. ही गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये नाशिकमधून वेदांत आणि प्रणव या दोन विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

वेदांत घंगाळे हा मूळ नाशिकमधील विद्यार्थी असून त्याचे वडिल नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील नामांकीत कंपनीत अधिकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. वेदांतने दहावीपर्यंत अशोका यूनिव्हर्सल स्कूलमधून शिक्षण घेतले. यानंतर त्याने अकरावी आणि बारावी मविप्रच्या केटीएचएम कॉलेजमधून पूर्ण केले आहे. त्याचा बारावीचा निकाल अद्याप जाहीर होणे बाकी असतानाच 'एनडीए'च्या गुणवत्ता यादीने घंगाळे कुटुंबीयांना सुखद धक्का दिला. वेदांतने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. त्याने गुणवत्ता यादीत २०७ वी रँक मिळविली आहे.

याच परीक्षेत यश मिळविणारा दुसरा विद्यार्थी प्रणव राजू जोपळे हा देखील नाशिककर आहे. त्याचे आई व वडिल हे दोघेही दिंडोरी तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रणव याने दहावीपर्यंत सीडीओ-मेरी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. यानंतर अकरावी आणि बारावीचे शिक्षण गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आरवायके कॉलेजमधून पूर्ण केले. प्रणवदेखील बारावीच्या निकालाच्या प्रतिक्षेत असताना 'एनडीए'च्या गुणवत्ता यादीने त्याच्या कुटुंबीयांना सुखद धक्का दिला आहे. वेदांत व प्रणव दोघांनाही डिफेन्स मार्गदर्शक हर्षल आहेरराव यांचे मार्गदर्शन मिळाले.

नाशिकमधून प्रणव आणि वेदांत या दोघांनीही 'यूपीएससी-एनडीए'च्या परीक्षेत मिळविलेले यश प्रशंसनीय आहे. दहावीनंतर दोघांनीही लक्ष्यावर सर्वार्थाने एकाग्रचित्त केले होते. दोघांच्या कुटुंबीयांकडूनही त्यांना चांगले प्रोत्साहन मिळाले. नाशिकच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट क्षमता दडल्या आहेत.

- हर्षल आहेरराव, डिफेन्स मार्गदर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघांवर निलंबनाची कुऱ्हाड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन दिवसात तीन जणांना निलंबित करीत, सात कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ रोखली आहे. याशिवाय नाशिकरोडचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांचे एक दिवसाचे वेतन कापले आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या कारभारात कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासह कामकाज गतिमान होऊन नागरिकांना सुविधा मिळण्यावर मुंढे यांनी तीन महिन्यांपासून भर दिला आहे. तीन महिन्यांत मुंढे यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका डझनाहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच तीन जणांवर बडतर्फीची कारवाई केली आहे. शंभरपेक्षा अधिक कर्मचारी व अधिकाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षाही केली आहे. कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कारवाईचा धडाका सुरूच आहे. तीन महिन्यांपूर्वीच महापालिकेतील सर्वच अधिकाऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश देतानाच कामात सुधारणा न झाल्यास घरी जाण्याची तयारी ठेवा, असे संकेत आयुक्तांनी दिले. पी. डी. पाटील (विभागीय स्वच्छता निरीक्षक, घनकचरा व्यवस्थापन), वंदना तळवे (कनिष्ठ लिपिक, पश्‍चिम विभाग कार्यालय) व तुकाराम मोंढे (उपलेखापाल, लेखा विभाग मुख्यालय) यांना निलंबित करण्यात आले आहे.

सात जणांची वेतनवाढ रोखली

एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई केलेल्यांत राजेंद्र शिंदे (उपअभियंता, पंचवटी विभाग), सी. बी. आहेर (उपअभियंता पंचवटी), अनिल गायकवाड (उपअभियंता, विद्युत विभाग पंचवटी), गणेश मैंद (उपअभियंता), गौतम हांडगे (सहा. कनिष्ठ अभियंता), मनिषा जांध (कनिष्ठ लिपिक), शैलजा माळोदे (अधीक्षक, पंचवटी विभाग) यांचा समावेश आहे. सोबतच नाशिक रोडचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांचे एक दिवसाचे वेतन कापण्यात आले. नाशिकरोड विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर हे आयुक्तांच्या बैठकीला उशिरा आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राणघातक हल्ला; आरोपीस सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुन्या वादाची कुरापत काढून मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या व्यक्तीवर कुऱ्हाडीने मारहाण केल्याप्रकरणी संशयित राजाराम नामदेव रानडे (वय ५०, रा. वांगणी, ता. पेठ) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणि सहा महिने कारावासात काढावे लागणार आहेत.

वांगणी येथे ३० ऑक्‍टोबर २०१६ रोजी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली होती. चिंतामण गोविंद हिरकुडे (रा. वांगणी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यांचे वडील गोविंद लक्ष्मण हिरकुडे हे घराबाहेर ओसरीमध्ये झोपलेले असताना संशयित राजाराम याने त्यांच्यासोबत झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढली. हिरकुडे यांना अंथरुणासह बाहेर ओढत नेले. त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. या प्रकरणी पेठ पोलिस स्टेशनमध्ये ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्यासमोर खटल्याचे कामकाज चालले. सरकारी पक्षातर्फे शिरीष कडवे यांनी १० साक्षीदार तपासले. आरोपी रानडे याने आपणास सात मुले असल्याचे सांगत न्यायाधीशांपुढे दयायाचना केली. शिंदे यांनी त्याला एक वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांसाठी लढणारे सच्चे व्यक्तिमत्व हरपले

$
0
0

बिपीन गांधी यांचे हृदयविकाराने निधन

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

रेले परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व बांधकाम व्यावसायिक बिपीन गांधी (६५) यांचे बुधवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर हृदयविकाराने निधन झाले. पंचवटी एक्स्प्रेससाठी आणि नाशिककर प्रवाशांच्या हक्कासाठी सच्चेपणाने लढा देणारे उमदे व्यक्तिमत्व हरपल्याची प्रतिक्रिया उमटली.

मूळचे बिदडा (कच्छ, रा. गुजरात) येथील रहिवासी असलेल्या गांधी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. रेल्वे मंत्रालयात नाशिककरांसाठी वर्षभर पाठपुरावा करुन गांधी यांनी चेन्नईच्या कारखान्यात तयार झालेली २२ डब्यांची नवीन आधुनिक पंचवटी एक्सप्रेस मिळवली. तिला बुधवारी सकाळी सातच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर हिरवा झेंडा दाखविण्यात येणार होता. गाडीला उशीर झाला आणि गाडी नाशिकरांच्या सेवेत दाखल होताना पाहण्याचे गांधी यांचे अनेक वर्षांचे स्वप्न अधुरे राहिले. गाडीच्या आगमनाच्या पाच मिनिटे अगोदर त्यांच्या छातीत कळ आली. त्यांना नाशिकरोडच्याच जयराम हॉस्पिटलमध्ये तातडीने नेण्यात आले. या सर्व घटनाक्रमामुळे ढोल ताशे वादन रद्द करून साध्या स्वरुपात गाडीला माजी मंत्री बबनराव घोलप यांनी हिरवा झेंडा दाखविला. गाडी देवळालीला पोहचेपर्यंत गांधी यांच्या मृत्यूची वार्ता आली. त्यामुळे त्यांच्या सहकारी व मान्यवरांनी तेथूनच जयराम हॉस्पिटलकडे धाव घेतली.

रेल्वेचा ढिसाळपणा

बिपीन गांधींना हृदयविकाराचा झटका येताच प्रवाशांनी रुग्णवाहिकेसाठी धावपळ केली. परंतु, रेल्वेची रुग्णवाहिका नेहमीप्रमाणे आलीच नाही. त्यातच थोडावेळ गेला. स्टेशनमास्तर आर. के. कुठार यांनी कुलीला व्हीलचेअर घेऊन बोलावले. जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच गांधींची प्राणज्योत मालवली. रेल्वेची रुग्णवाहिका सुरू व्हावी यासाठी गाधींनी मुंबई, भुसावळ कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. श्रध्दांजली म्हणून त्यांच्या नावाने रेल्वेस्थानकावर रुग्णवाहिका सुरु करण्याचा मनोदय सहप्रवाशांनी व्यक्त केला.

आयुष्य रेल्वेसाठी वाहिले

शिक्षण बारावीच्या आसपास असताना चिकाटीने बांधकाम व्यवसाय करून बिपीन गांधी यांनी प्रगती केली. १९९२ च्या सुमारास नाशिकला आल्यापासून त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी जीवन अर्पण केले. काम असो-नसो, ते दररोज पंचवटीने प्रवास करायचे. देवळाली कॅम्पमधून एसी थ्री कोचमध्ये बसल्यावर प्रवाशांना जय हो करायचे. हात मिळवायचे. सर्वांची आस्थेने चौकशी करायचे. कोचचे पडदे लावायचे. कसारा आल्यावर दिवे बंद करून प्रवाशांना झोपण्यास सांगायचे. प्रवाशांनी ऐकले नाही तर वडिलकीच्या नात्याने रागवायचे. नंतर प्रेमाने जवळही करायचे. त्यांनी रेल्वेसाठी आपले आयुष्य वाहिले. रेल्वेच्या सुधारणांसाठी त्यांनी एक हजारावर पत्र रेल्वे मंत्र्यांना लिहिली होती.

बुलेटट्रेनचे स्वप्न

नव्या पंचवटीचे स्वप्न पूर्ण झाल्यावर त्यांनी बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहिले होते. त्यांचा सात मे रोजी वाढदिवस होता. तो प्रवाशांनी उत्साहात साजरा केला. शंभरावा वाढदिवस आपण बुलेट ट्रेनमध्ये साजरा करू, असे त्यांनी मिश्कीलपणे जाहीर केले होते. कधी पंचवटीवारी चुकली तर रात्री मुंबईहून पंचवटी नाशिकला येईपर्यंत वाट पहायचे. लॅमरोडला रुळाशेजारीच त्यांचा बंगला आहे. छतावरून ते रुमालाने मित्रांना गुडबाय करायचे. एकदा गाडी रात्री दीडला आली. तोपर्यंत ते छतावर प्रतीक्षा करत होते.

विक्रमांची नोंद

पंचवटी ही चाकरमाने, व्यावसायिकांची गाडी आहे. दररोज अप-डाउन करून प्रवाशांना दगदग होते. यावर उपाय म्हणून या गाडीचा एसी कोच क्रमांक तीन त्यांनी आदर्श केला होता. त्याची पाचवेळा विक्रमांच्या लिम्बा बुकमध्ये नोंद झाली. गाडी सुरू झाल्यावर आराम मिळावा व मुंबईला उतरल्यावर जोमाने काम करता यावे म्हणून प्रवाशांनी मोबाइल बंद ठेवायचे, कोणाशी बोलायचे नाही. कसारा आल्यावर झोपी जायचे. गाडी स्वच्छ ठेवायची. भिकारी, फेरीवाल्यांना बंदी रहायची असा नियम होता. या कारणांमुळे हा कोच आदर्श झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिवादन समारंभ आज

$
0
0

नाशिक : येथील तीळ भांडेश्वर लेनमध्ये अभिनव भारत मंदिरात '१८५७ च्या स्वातंत्र्य समरातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुणेचा' हा कार्यक्रम गुरुवारी (दि. १०) सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आमदार देवयानी फरांदे व नगरसेवक शाहू खैरे उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विश्वस्त सूर्यकांत राहळकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामान्यांवर कारवाई, पोलिसांचे काय?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शहर पोलिसांनी धूम्रपानविरोधी अभियान राबविले असून याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर सिगारेट्स आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण यांचा कायदा) अधिनियम, २००३ अंतर्गत आर्थिक दंडाच्या कारवाईचा बडगा उचलला आहे. मात्र, या कायद्यान्वये कारवाई करणाऱ्या पोलिसांकडूनच या नियमाचा भंग केला जात असल्याचे चित्र आहे. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण' अशी अवस्था पोलिसांची झाली असून, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या  पोलिस कर्मचाऱ्यांवर मात्र शहर पोलिस आयुक्तांचे दुर्लक्ष झाले आहे.

धूम्रपानाचे व्यसन मानवी जीवनास घातक असल्याने शहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी शहरात 'कोट्पा' या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या आणि तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर या मोहिमेत कारवाई करण्यात आली. शहरात तब्बल २९३ विक्रेत्यांवर कारवाईचा वरवंटा फिरवण्यात आला. या कारवाईतून पोलिसांनी तब्बल ५८ हजार ६०० रुपयांचा दंडही वसूल केला. या कारवाईचे सामान्य नागरिकांनी स्वागतच केले आहे. परंतु या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ज्या पोलिसांवर आहे, त्यांच्याकडूनच या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र सर्वच पोलिस ठाण्यांत आढळून येते. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्या आपल्याच पोलिस कर्मचाऱ्यांकडे शहर पोलिस आयुक्त लक्ष देतील का, असा सवाल सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे.

ड्युटीवरही व्यसने

बहुसंख्य पोलिस कर्मचारी ड्युटीवर असताना विविध तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना दिसून येतात. या महिला पोलिस कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. काही कर्मचारी तर थेट ठाणे अंमलदार कक्षातच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. याशिवाय पोलिस ठाण्याच्या आवाराभोवती असणाऱ्या चहाच्या दुकानांतूनही पोलिसांना तंबाखूजन्य सर्व पदार्थांचा खास 'रतिब' उपलब्ध करून दिला जातो. खासकरून गुटखा, तंबाखूचे सेवन करणारे आणि सिगारेटचा झुरका मारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.

 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आनंद अन् उत्साहात धावली पंचवटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिककरांची अनेक वर्षांची मागणी असलेली नवी पंचवटी एक्स्प्रेस' अखेर बुधवारपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. सकाळी साडेसातला नाशिकरोड रेल्वेस्थानकात माजीमंत्री बबनराव घोलप यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंचवटी मार्गस्थ झाली. नवीकोरी पंचवटी पाहून प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.

मुंबईच्या लोकलप्रमाणे इंटरसिटी दर्जा असलेली पंचवटी १ नोव्हेंबर १९७५ रोजी सुरू झाली. मनमाड ते मुंबई हे २६१ किलोमीटर अंतर ती वेगात पार करते. हा वेग आता १६० किमीपर्यंत राहील. एक बोगी वाढवल्याने गाडी २२ बोगींची झाली आहे. सुमारे ४२ वर्षांनंतर रंग बदलून तो निळा व राखाडी करण्यात आला आहे. बोगींची बांधणी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत झाली. बैठक व्यवस्था आरामदायक असून, सीट पुढे-मागे करता येतात. बोगीची आंतरबाह्य रंग-रचना व कार्य नावीन्यपूर्ण आहे. सर्व कोचमध्ये बायोटॉयलेट असून, प्रत्येकी तीन शौचालये आहेत. कोच हलके असून, स्टेनलेस स्टीलचे पत्रे आहेत. चाकांच्या गतीची घेणारी यंत्रणा आहे. प्रत्येक बोगीतील पाण्याच्या टाकीमध्ये पाणीपातळी दाखविण्याची सोय आहे. दरवाजे व खिडक्या रुंद असून, आसनसंख्या वाढली आहे. सी थ्री हा कोच आदर्श असून, त्याची लिम्का बुकमध्ये पाचवेळी नोंद झाली आहे. महिला व पासधारकांसाठी स्वतंत्र कोच आहे.

उद्घाटनावेळी भुसावळचे सिनीयर डीसीएम सुनील मिश्रा, नाशिकरोड स्थानकप्रमुख आर. के. कुठार, वाणिज्य निरीक्षक आर. एस. गोसावी, आर. के. जैन, एम. बी. डोके, आरपीएफचे जुबेर पठाण, शिवाजीराव मानकर, डॉ. कैलास कमोद, रेल्वे सल्लागार समितीचे राजेश फोकणे, नितीन चिडे, गुरुमितसिंग रावल, दत्ता गोसावी, दिलीप विसपुते, राजेंद्र तुपे, प्रशांत शिंदे, संदीप गायकवाड, विजय कोर, तुषार भंवर, सागर कासार, पवन दोडामणी, अशोक हुंडेकरी, सुनील आडके, जयराम दियलानी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाणे अंमलदारास मारहाण

$
0
0

सातपूर पोलिस स्टेशनमध्ये तरुणांचा धुडगूस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतुकीचे नियम मोडून मोटरसायकल चालविणाऱ्या दोघांना गाडी पोलिस स्टेशनच्या पार्किंगमध्ये लावण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्यांनी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये धुडगूस घातला. ठाणे अंमलदाराच्या शर्टाची कॉलर पकडून पोलिस अधिकाऱ्यांनाही शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

शशिकांत पांडुरंग निर्मळ आणि शशिकांत एकनाथ काळे (दोघे रा. स्वारबाबानगर, सातपूर) अशी त्यांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. ८) सकाळी साडेअकराच्या सुमारास दोघे मद्याच्या नशेत विनाहेल्मेट दुचाकीवरून जात होते. सातपूर पोलिस स्टेशनजवळील सर्कलजवळ त्यांना पोलिसांनी अडविले. त्यावेळी त्यांनी मोटरसायकल नो पार्किंगमध्ये उभी केली. पोलिस नाईक संदीप देवरे यांनी त्यांना 'मोटरसायकल नो पार्किंग'मध्ये लावू नका, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी देवरे यांना शिवीगाळ सुरू केली. 'मी हेल्मेट घालणार नाही. काय करायचे ते करा. एपीआय देवरेंना माझ्यासमोर हजर करा व एपीआय वराडेंना अटक करा', अशी अरेरावी ते करू लागले. यानंतर पोलिसांनी त्यांना रितसर तक्रार देण्यास सांगितले असता दोघांनी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर ठाणे अंमलदार कक्षात गोंधळ घातला. संदीप देवरे यांच्या छातीवर बुक्का मारून त्यांची नेमप्लेट तोडली. तसेच ठाणे अंमलदारांच्या शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ व धक्काबुक्की केली. यानंतर त्यांनी 'पोलिस स्टेशनमध्येच आत्महत्या करू', अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मल्हारखाणीमध्ये

महिलेची आत्महत्या

नाशिक : अशोकस्तंभाजवळील मल्हारखाण झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी ही घटना घडली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. सरकारवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. मंगल बोकारू भगवती (वय ५०, रा. मल्हारखाण झोपडपट्टी, अशोकस्तंभाजवळ, नाशिक) असे या महिलेचे नाव आहे. त्यांनी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास घरात गळफास घेतला.

तरुणाला जिममध्ये डांबले

नाशिक : गंगापूर भागातील सहा ते सात संशयितांनी एका तरुणास फोन करून बोलावून घेत मारहाण केली. त्यानंतर त्याला गोवर्धन गावातील जिममध्ये डांबण्यात आले. या प्रकरणी सात जणांवर गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गोवर्धन गावातील पठाडे गल्ली येथील दर्ग्याजवळ इम्रान लतीफ शेख (वय २०) राहतो. संशयितांनी सोमवारी (दि. ७) दुपारी त्याला फोन करून गंगापूर गावातील स्मशानभूमीत बोलावून घेतले. 'आशिष महिरे कुठे आहे?' अशी विचारणा त्यास करण्यात आली. इम्रानने माहीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याला गोवर्धन गावातील जिममध्ये डांबून ठेवले. उपनिरीक्षक पाळदे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तमाशा लोककलेपुढे अस्तित्वाचा प्रश्न

$
0
0

डॉ. संतोष खेडलेकर यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

तमाशा ही लोककला आहे. तमाशाकडे चांगल्या नजरेने पाहण्याची गरज आहे. आज कर्जात डुबलेल्या तमाशाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर तमाशा ही लोककला दहा-पंधरा वर्षात इतिहासजमा होईल, असे प्रतिपादन संगमनेर येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले.

नाशिकरोड बँकेच्या वसंत व्याख्यानमालेत डॉ. खेडलेकर यांनी 'तमाशा-काल, आज आणि उद्या' या विषयावर आठवे पुष्प गुंफले. डॉ. खेडलेकर म्हणाले, की महाराष्ट्रात आजच्या घडीला नऊच तमाशे राहिले आहेत. त्यांच्यावर प्रत्येकी एक कोटीचे कर्ज आहे. बँका कर्ज देत नसल्याने तमाशाचालकांना सावकारांकडून वर्षाला ४० टक्के दराने कर्ज घ्यावे लागते. एक कोटीमध्ये ४० लाख व्याजाचेच जातात. तमाशाचा दिवसाचा खर्च ७० हजार रुपये आहे. एक तमाशाची उलाढाल एक ते दीड कोटी होते. यातील बहुतांश पैसे तंबू, वाहने, कलावंतांचे मानधन, वेशभूषा यावरच खर्ची पडतात. टीव्ही, मोबाइलमुळे चाहता वर्ग कमी झाल्याने तमाशाचे आर्थिक गणित बिघडले आहे.

डॉ. खेडलेकर म्हणाले, की पेशव्यांच्या काळात तमाशाला राजाश्रय मिळाला. १८९० च्या सुमारास तमाशाला सोन्याचे दिवस होते. ज्येष्ठ तमाशा कलावंत पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी मुंबईत तिकीट काढून चाहत्यांच्या रांगा लागायच्या. असा सन्मान जगात कोणत्याच कलाकाराला मिळालेला नाही. त्यांच्या नियमावलीनुसारच आजचा तमाशा चालत आहे. त्यात प्रथम गण, गवळण, मुजरा, मावशी, बतावनी, सादरीकरण, पोवाडा, शिलकार होते. स्वातंत्र्यानंतर गिरणी कामगारांनी तमाशाला लोकाश्रय दिला. बालगंधर्वांनी संगीत नाटकात स्त्रीपात्र केले. परंतु, त्या काळात खेडकरांच्या तमाशात कातांबाईंनी शिवाजी महाराजांची भूमिका केली. दाणपट्टा फिरवला. त्याची दखल कोणीच घेतली नाही. वर्षभर शेतात राबणाऱ्या ग्रामीण जनतेचे दुःख दूर करण्याचे महत्त्वाचे कार्य तमाशा करत आहे. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्यावर वगनाट्ये सादर करण्याची कल्पकता तमाशाने दाखवली. डॉ. खेडकरांच्या भगिनी मंदाताईंनी राजीव गांधीची भूमिका केली. रघुवीरांच्या तमाशात फटाक्यांचा स्फोट होऊन बेबीताईंच्या मुलाचा मृत्यू झाला. ताईंनी वगनाट्य सादर केले.

हवा लोकाश्रय, राजाश्रय

१९८० नंतर व्हिडिओ, टीव्हीच्या आक्रमणामुळे सिनेमागृहांना घरघर लागली. अस्तित्व टिकविण्यासाठी तमाशात आर्केस्ट्रा आणावा लागला. तमाशाचे नेपथ्य करणारे उत्तर भारतीय आहेत. कारण त्यांची मजुरी कमी आहे. तमाशाला लोकाश्रय व राजाश्रय मिळाला नाही तर ही लोककला लोप पावेल, अशी भीती डॉ. खेडकर यांनी व्यक्त केली.

वसंत व्याख्यानमाला : नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामपूर बाजारात लिलाव ठप्प

$
0
0

रोख पेमेंटवरून व्यापारी प्रशासनात वाद

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना २४ तासांच्या आत रोख पेमेंट करण्यास असहमती दर्शविल्याने बाजार समिती आवारात बुधवारपासून कांदा खरेदी बंद करण्यात आली. कांदा व्यापारी धनादेश देण्याच्या निर्णयावरच ठाम असल्याने बाजार समिती प्रशासन व कांदा व्यापारी यांच्यात संघर्ष उभा ठाकला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितींना जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी बरखास्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. यात तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर नामपूर बाजार समितीचे सचिव अशोक गायकवाड यांनी जिल्हा उपनिबंधकाच्या निर्देशानुसार बाजार समितीशी निगडीत दहा कांदा व्यापाऱ्यांची बैठक घेवून कांदा खरेदीनंतर शेतकऱ्यांना पेमेंट आरटीजीएस अथवा एनएफटीद्वारे २४ तासांच्या आत करण्याच्या सूचना केल्या. या नंतर देखील व्यापाऱ्यांनी त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी नोटिसा बजावण्यात आल्या. यावरही कांदा व्यापाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद न देता शेतकऱ्यांना कांद्याचे पेमेंट आरटीजीएस अथवा एनएफटी न करता धनादेशद्वारेच करण्याची भूमिका घेतली. यामुळे कांदा व्यापारी व बाजार समिती प्रशासन यांच्यात संघर्ष पेटला आहे.

दरम्यान मंगळवार दि. ८ रोजी देखील कांदा व्यापाऱ्यांनी दिलेले धनादेश न वटल्याने तब्बल ३० लाखांहून अधिक रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी आज बाजार समितीकडे पाठ फिरविली. परिणामी आज दिवसभरात नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कांदा खरेदी बंद असल्याने १० हजारांहून अधिक क्विंटल कांदा लिलाव होवू शकला नाही.

शेतकऱ्यांना धनादेश दिल्यास धनादेश वटत नाही, किंवा बाऊन्स होतो. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत आहे. या फ सवणुकीला आळा बसावा यासाठी शासनाने आरटीजीएस अथवा एनएफ टी करण्याचे बंधन कांदा व्यापारी वर्गास केले आहे. - अशोक गायकवाड,सचिव, नामपूर, बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खतप्रकल्प ठरेल आकर्षण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पाथर्डी शिवारात असलेल्या महापालिकेच्या खत प्रकल्पात खासगी कंपनीकडून करण्यात येणाऱ्या सुविधांमुळे आगामी काळात प्रकल्प सर्वांचेच आकर्षण ठरणार आहे. या प्रकल्पात जास्तीत जास्त अत्याधुनिक सेवांचा वापर करून स्वयंचलित यंत्रांचा वापर वाढविण्यात यावा, अशा सूचना आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी केल्या.

आयुक्‍त मुंढे यांनी बुधवारी सकाळी खतप्रकल्पाची संपूर्ण पाहणी करून येथे असलेल्या सुविधांची माहिती घेतली. येथे आणखी काय करता येईल, याबाबत सूचना दिल्या. सुरुवातीलाच कचरा घेऊन गाडी आल्यानंतर तिचे वजन कसे होते, याची माहिती घेऊन ती खोली कायम स्वच्छ ठेवण्याची सूचना केली. त्यानंतर प्रयोगशाळेचीही पाहणी करून येथील सर्व कारभार हा अत्याधुनिक पद्धतीने यंत्राच्या सहाय्याने करण्याची सूचना करून प्रयोगशाळेतील वस्तूंची दुरवस्था पाहून नाराजी व्यक्‍त केली. प्रयोगशाळा हीच चांगली असली पाहिजे व संध्याकाळपर्यंत संपूर्ण स्वच्छता झाली पाहिजे, अशी सूचना केली. त्यानंतर आयुक्‍तांनी खत प्रकल्पात येणाऱ्या ओल्या, सुक्या कचऱ्यापासून खत तयार करणे, प्लास्टिक स्वच्छ करून त्यापासून तयार होणारे डिझेल, सुक्या कचऱ्यापासून बॉयलरसाठी लागणारे कच्चे साहित्य कसे तयार होते याची पाहणी करून सूचना केल्या. कचरा साठविलेल्या ठिकाणची दुर्गंधी कमी करण्यासाठी काय करता येईल, याबाबत सूचना केल्या. तसेच स्वच्छ केलेले प्लास्टिक साठवून ठेवलेल्या जागेला कंपाउंड करून तेथे संरक्षक भिंत बांधण्याची सूचना केली. यावेळी प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या डिझेलची पूर्ण पाहणी त्यांनी केली. त्याचबरोबर मृत झालेल्या जनावरांचे दहन होणाऱ्या पद्धतीचीही माहिती घेऊन कोणतेही प्रदूषण न करता ही जनावरे दहन होत असल्याचे सांगितले. संपूर्ण खत प्रकल्पातील मशिनरींची पाहणी करून ज्या मशिन बंद आहेत, त्यांची विल्हेवाट लावून त्या जागेचा वापर सुरू करण्याची सूचना त्यांनी केली.

कचऱ्यावर होणार हिरवळ

अनेक वर्षांपासून साठवून ठेवलेल्या कचऱ्याचा आज काहीही उपयोग होत नसल्याने व हा कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न आहे. त्यामुळे या कचऱ्यावर प्लास्टिक व जाळी टाकून त्यावर हिरवळ लावण्याचे काम सुरू असलेल्या कामाचीही पाहणी केली. याठिकाणी हिरवळीबरोबरच फुलझाडेही लावण्याबाबत त्यांनी आदेश दिले. येत्या पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरून दिसणारे कचऱ्याचे ढीग पूर्णपणे हिरवळीखाली झाकले जाणार असल्याने प्रदूषणाचा त्रास होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर हॉटेल्स किंवा खाद्य पदार्थांच्या वेस्टेजपासून तयार होणाऱ्या वीज प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी केली. सध्या या दोन्ही प्रकल्पांमध्ये खत, डिझेल, गॅस व वीज तयार होत असून आगामी काळात ही सर्व कामे अत्याधुनिक पद्धतीने करण्याचा मानस असून, तसे झाल्यास हे प्रकल्प सर्वांचेच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतील, असा विश्वास आयुक्‍त मुंढे यांनी व्यक्‍त केला. यावेळी खत प्रकल्पाचे कर्नल रेगे यांनी आयुक्‍तांना संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली.

उद्यान विभागासाठी १९ गाड्या

उद्यान विभागातील झाडांचा पालापाचोळासुद्धा खत प्रकल्पावर आणून त्यावर प्रक्रिया करून तो शेतकऱ्यांना विक्री करण्यात येत आहे. सध्या शहरात उद्यानातील पालापाचोळा उचलण्यासाठी गाड्या नसल्याची तक्रार होती. मात्र, आता नव्याने १९ गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याने प्रत्येक उद्यानातील पालापाचोळा उचललाच जाणार असल्याची ग्वाही आयुक्‍त मुंढे यांनी दिली. या गाड्या साधारणतः पुढील आठवड्यापासून सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खत प्रकल्पात तयार होणारे डिझेल, खत, बॉयलरसाठी लागणारा कच्चा माल तसेच उद्यानातील पालापाचोळ्याची कापणी केलेले साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असले तरी त्याचे फलक याठिकाणी लावण्याची गरज आहे. या तयार होणाऱ्या उत्पादनाचे फलक सर्वत्र लावून त्याचे ब्रॅण्डिंग करण्याची गरज असल्याचे मत आयुक्‍तांनी व्यक्‍त केले.

कचरा वर्गीकरणाचा फायदा

ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्याबरोबरच हॉटेल व्यवसायिकांनाही कचर्याचे वर्गीकरण करण्याची सूचना दिली असल्याने ७० टक्‍के कचरा वर्गीकरण करून येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच हॉटेल व्यवसायिकांकडूनही ६० टक्‍के वर्गीकरण येत असल्याचे सांगण्यात आले. वर्गीकरण करूनच येथे कचरा किंवा खाद्य पदार्थ आल्याने कमी वेळेत जास्त काम होत आहे. मात्र, अजूनही वर्गीकरण न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश आयुक्‍तांनी दिले आहेत. वर्गीकरण करूनच कचरा किंवा खाद्यपदार्थ येथे आले पाहिजेत व तो आकडा शंभर टक्‍केच असला पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. कचऱ्याच्या डोंगरावरून उतरून आयुक्‍तांनी थेट वीज प्रकल्पाला भेट दिली. सुमारे चार तास सुरू असलेल्या या दौऱ्यानंतर हे प्रकल्प आकर्षण ठरणार असून, नाशिकचे हे युनिक मॉडेल म्हणून चर्चेत आल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images