Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘तू-तू मैं-मैं’चे उद्योग बंद करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

औद्योगिक क्षेत्राशी संबंधित प्रश्न सुटावेत, गोलगोल उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचे धोरण न ठेवता स्पष्ट शब्दांत उत्तरे देऊन तक्रार निवारणावर भर द्यावा, असे आदेश देत जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला फटकारले. 'तू-तू मैं-मैं' बंद करून कामाला लागा, असे आदेशच त्यांनी दिले. जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक दर महिन्यात घेण्याचा निर्णयही जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी जाहीर केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक झाली. बैठकीला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. पी. रेंदाळकर, 'एमआयडीसी'च्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, कामगार उपायुक्त जी. जे. दाभाडे, 'निमा'चे अध्यक्ष मंगेश पाटणकर, मनीष रावळ, माथाडी कामगार संघाचे उत्तम कर्डक आदींसह उद्योजक, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातपूर, अंबड, माळेगावसह जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मूलभूत सुविधांची वानवा असल्याचा उद्योजकांच्या तक्रारींचा रोख होता. त्यावर सरकारी यंत्रणांकडून वरवर उत्तरे दिली जात असल्याचा आक्षेप उद्योजकांकडून बैठकीत नोंदविण्यात आला. जिल्ह्यात नवीन उद्योग कसे येतील, उद्योगवाढीला आणि पर्यायाने रोजगारनिर्मितीला चालना कशी मिळेल, उद्योजकांच्या समस्या दूर होऊन औद्योगिक विकास गतिमान कसा होईल, यावर बैठकीत चर्चा अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी त्या-त्या विभागांनी आपल्या स्तरावर निकाली काढाव्यात, असे आदेशही यावेळी दिले. दिंडोरीतील अक्राळे औद्योगिक वसाहतीत अद्याप भूखंड वाटप सुरू न झाल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. आतापर्यंत दोन बैठकांत हा चर्चिला गेला, तरीही कार्यवाही का झाली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझ्या कार्यकाळात किमान भूखंडांचे वाटप सुरू व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मेच्या पंधरवड्यापर्यंत पहिल्या टप्प्यात २२ भूखंड वाटपासाठी उपलब्ध होतील, अशी माहिती पाटील यांनी त्यांना दिली.

--

निम्म्या तक्रारी निकाली

अंबड एमआयडीसीतील गाळेवाटपाचा प्रश्न समन्वयातून निकाली काढा, असे निर्देश राधाकृष्णन बी. यांनी दिले. अंबड परिसरात फायर स्टेशन सुरू करणे, मोकळ्या भूखंडांना कुंपण करणे, रस्त्यांची डागडुजी, पथदीप दुरुस्ती, घंटागाडीच्या फेऱ्या वाढविणे, प्रथमोपचार केंद्र, सायकल ट्रॅक सुरू करणे, वैद्यकीय बिले मुदतीत मिळणे, अवैध व्यवसाय याबाबतच्या तक्रारींवर बैठकीत चर्चा झाली. ३६ पैकी सुमारे निम्म्या तक्रारी निकाली निघाल्या.

--

एमआयडीसीला व्हॅक्युम क्लीनर व्हॅन

शहरातील औद्योगिक वसाहतींमध्ये महापालिकेने ड्रेनेज सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी 'आयमा' आणि 'निमा'ने केली आहे. परंतु, महापालिकेने त्यास नकार दिला आहे. उद्योजक करांच्या रूपाने महापालिकेला मोठ्या प्रमाणावर महसूल देतात. तरीही महापालिकेची भूमिका अडेलतट्टूपणाची असल्याबाबत उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली. या मुद्द्यावरून उद्योजक आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वादावादीही झाली. सिव्हेज वहनासाठी व्हॅक्युम क्लीनर व्हॅनचा पर्याय पुढे आला. त्यासाठी जिल्हा प्रशासन महापालिकेला निधी उपलब्ध करून देईल. या निधीतून महापालिकेने औद्योगिक वसाहतीसाठी ही व्हॅन उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलगी झाली म्हणून अधिकारी पत्नीचा छळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुलगा-मुलगी समानतेच्या आपण कितीही गप्पा मारत असलो तरी अजूनही वंशाचा दिवा मुलगाच असतो, हा भ्रम समाजात ठाण मांडून बसला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुलगी झाली म्हणून थेट पत्नीला मारझोड करून तिला घर सोडण्यास प्रवृत्त करण्याची मजल मुंबई पोलिस दलातील एका पोलिसाने मारली आहे. पैसा आणि कायदा आपल्या हातात असल्याची दर्पोक्तीही या पोलिस कर्मचाऱ्याने केल्याने सहाय्यक विक्रीकर निरीक्षक असलेल्या पत्नीला नाइलाजाने माहेरी येऊन पोलिसांत फिर्याद देण्याची दुर्दैवी वेळ आली.

या धक्कादायक प्रकाराबाबत पीडित महिला माया महेंद्र पगारे यांनी पती महेंद्र निंबा पगारे (रा. रोझविव्ह चाळ कमिटी, अंधेरी पूर्व, मुंबई) याच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात जिल्हा विधी प्राधिकरण समितीच्या आदेशानुसार फिर्याद दिली आहे. मुलगी झाली म्हणून माझा छळ केला जात असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. माया पगारे यांचा विवाह २०१० मध्ये मुंबईतील महेंद्र पगारेशी झाला होता. मात्र, भांडणाला कंटाळून माया यांनी २०१३ मध्ये पती महेंद्र पगारे याच्याशी घटस्फोट घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडित वीजपुरवठ्याने जेलरोडवासीय हैराण

$
0
0

खंडित वीजपुरवठ्याने जेलरोडवासीय हैराण

जेलरोड : उन्हाळा लागल्यावर भारनियमन हमखास होते. महावितरणने यंदा पुरेशी वीज उपलब्ध असल्याने भारनियमन केले जाणार नसल्याचे सांगितले असतानाच जेलरोडला मात्र वीजपुरवठा खंडित होत आहे. मंगळवारी सायंकाळीही सातत्याने वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी सात ते आठ वाजेदरम्यान पाच-सहा वेळा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे भारनियमन केले जाणार असेल, तर तसे नागरिकांना अगोदर कळविण्याची मागणी होत आहे.

गार्डनसाठी श्रमदान

जेलरोड : जेलरोड येथील टाकेकर वसाहतीतील गार्डनमध्ये नागरिकांनी पशुपक्ष्यांसाठी मातीचे मोठे भांडे ठेवले आहे. त्याचा उपयोग भटकी कुत्री, गायी, तसेच पक्ष्यांना होत आहे. या गार्डनमध्ये कोणतीही झाडे किंवा हिरवळ नाही. त्यामुळे एक भूखंड म्हणूनच त्याचा वापर होत आहे. नागरिकच या गार्डनची झाडलोट करतात. नागरिकांनी हे गार्डन स्वच्छ ठेवले असून, आता त्याता जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. या गार्डनमध्ये शोभेची झाडे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रेसजवळच पार्किंग

जेलरोड : जेलरोड येथील नोट प्रेसने पार्किंग न करण्याची सूचना भिंतीवर लावलेली आहे. परंतु, प्रेस कामगारच मोठ्या प्रमाणावर भिंतीशेजारी वाहनांचे पार्किंग करीत आहेत. त्यामुळे प्रेसची सुरक्षा धोक्यात आल्याची नागरिकांची तक्रार आहे. सामान्य नागरिक प्रेसच्या भिंतीजवळ वाहने उभी करत नाहीत. प्रेस कामगारांसाठी पार्किंगकरिता स्वतंत्र शेड व्यवस्था आहे. मात्र, तरीही प्रेसच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराशेजारी, तसेच भिंतीशेजारून भीमनगर गेट क्रमांक दोनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी वाहने, तसेच सायकली उभ्या केल्या जात आहेत. सुरक्षा कर्मचारीही त्यांना रोखत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस कडक वागतात

$
0
0

सिडको वसंत व्याख्यानमाला

मधुकर कड यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पोलिस हे कडक वागत असले तरी ते केवळ गुन्हेगारासाठीच कडक असतात. पोलिस हा पण माणूस असून त्यांच्यातील माणुसकीचा अभ्यास नागरिकांनी केला पाहिजे. अनेक गुन्हे समोपचाराने मिटविण्याचेही काम पोलिस करतात. पोलिस हे नागरिकांचे शत्रू नसून मित्रच असतात, याचेही भान नागरिकांनी ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी केले.

माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्यादय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्यातर्फे आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालाचे दुसरे पुष्पातील 'पोलिसांमधील माणूस' या विषयावर कड बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर कावळे, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे आदी उपस्थित होते. यावेळी कड यांनी सांगितले, की गुन्हेगारांसाठी वचक बसवा म्हणून पोलिस कडक वागतो. पोलिस सणवार, वेळकाळ याचे बंधन न पाळता नागरिकांच्या सेवेसाठी तयार असतात. पोलिस कर्तव्याला जागून अनेकदा आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात. पोलिसांमधील माणूस प्रत्येकाने ओळखला पाहिजे. पोलिसांना नागरिकांनी समजून घेत सहकार्य केल्यास अनेक गुन्हे घडण्यापासून रोखणे शक्य होऊ शकेल.

व्याख्यानमालेचे अध्यक्ष किरण सोनार यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार दुसानिस यांनी वक्त्यांचा परिचय केला. जयराम गवळी यांनी आभार मानले. व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी श्रीकांत सोनार, शालिग्राम चौधरी, विजय गोसावी, मधुकर पाटील, देविदास निकम, बाळकृष्ण गोळे आदी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

महासत्तेसाठी सर्वांनी

एकत्र येण्याची गरज

सिडको : स्वांतत्र्यानंतरच धार्मिक आणि जातीची व्यवस्था बिघडली असून भारताला महासत्ता करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांनी केले.

सिडको वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुफंताना स्वातंत्र्याच्या '७० वर्षांनंतरचा भारत' या विषयावर माने बोलत हेाते. आजही भारत विकासाच्या वाटेवर आहे. काळानुरूप विकासाची गती बदली असून माणूस माणसापासून दूर जात आहे. सध्याच्या सोशल मीडिया व आधुनिक तंत्रज्ञानामुळे मनुष्य हा मनुष्यापासूनच दूर जात आहे. भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. स्वातंत्र्य पूर्वी ब्रिटिशांमुळे भारताला आधुनिक जगाचे दरवाजे उघडले गेले. विकासासोबत सामाजिक सुधारणाही झाल्याचे त्यांनी सांगितले.

आजचे व्याख्यान : स्वामी विवेकानंदाचे विचार

वक्ते : प्रा. प्रवीणसिंग गिरासे

वेळ : सायंकाळी - ६.३०

स्थळ - स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागातील मदरशांची आकडेवारीच नाही!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक विभागात मदरशांची संख्या किती आहे याची खात्रीलायक आकडेवारीच प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण समितीचे अध्यक्ष सतीश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. २४) विभागीय बैठक झाली. मदरशांसाठी राज्य व केंद्र सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीतच हे वास्तव समोर आले आहे.

विभागातील विविध जिल्ह्यांत सध्या किती मदरसे कार्यरत आहेत, याची खात्रीलायक माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे विभागात किती मदरसे कार्यरत आहेत याची आकडेवारी पुन्हा एकदा गोळा करण्याचे आदेश या बैठकीत पाचही जिल्ह्यांच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यात मोठ्या संख्येने मदरसे कार्यरत आहेत. मात्र त्यापैकी नोंदणीकृत मदरशांची संख्या अल्प असल्याची बाब नियोजन विभागाच्या अहवालातून उघड झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये सरकारच्या अनुदान मागणीसाठी विभागातून अवघ्या ३६ मदरशांचे अर्ज प्रशासनाकडे आले होते. त्यापैकी २१ प्रस्तावांना मान्यता मिळून त्यांना ३८ लाख ३५ हजारांचे अनुदान मिळाले होते. २०१६-१७ वर्षात विभागातून मदरशांचे अनुदानाच्या प्रस्तावात मोठी घट आली.

पाच मदरशांनाच मंजुरी

यंदा विभागातून अवघ्या १४ मदरशांचे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. त्यापैकी अवघ्या पाच मदरशांचे प्रस्ताव मंजूर झाले. या पाच मदरशांना १९ लाख ४० हजारांचे अनुदान मिळाले होते. २०१७-१८ या वर्षी विभागातून अवघे १३ प्रस्ताव आले. त्यापैकी सहा प्रस्तावांना मंजुरी मिळाली. त्यांना २१ लाख ९० हजारांचे अनुदान वितरित करण्यात आले. असे असले तरी विभागात प्रत्यक्ष कार्यरत मदरशांची संख्या शेकडोच्या घरात आहे. मात्र, यापैकी नोंदणीकृत मदरशांची संख्या अगदी किरकोळ आहे.

'रोजगाराभिमुख शिक्षण हवे'

मदरशांतील विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणासोबत शालेय शिक्षण मिळाल्यास त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण समितीचे अध्यक्ष त्रिपाठी यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात मदरसा आधुनिकीकरणाबाबत आयोजित विभागीय बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर आयुक्त ज्योतिबा पाटील, उपायुक्त रघुनाथ गावडे, डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण समितीचे सदस्य ज. मो. अभ्यंकर, तहसीलदार एस. डी. मोहिते आदी उपस्थित होते. या वेळी त्रिपाठी यांनी मदरशांसाठी सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनिकेत पाटील यांना भाजपकडून उमेदवारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येत्या जुलैमध्ये होणाऱ्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी भाजपतर्फे माजी मंत्री विजय नवल पाटील यांचे पुत्र अनिकेत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दि. २५ फेब्रुवारी रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पाठोपाठ त्यांना पक्षातर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपचे विद्यमान आमदार अपूर्व हिरे हे सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व करीत असून, त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपने अगोदरच अनिकेत पाटील यांना उमेदवारी देऊन निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर होताच भाजपनेही येत्या जुलैमध्ये होणाऱ्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच आपला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबई शिक्षक मतदारसंघात अनिलकुमार राजेसिंग देशमुख व नाशिक शिक्षक मतदारसंघात अनिकेत विजय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारांच्या विजयासाठी भाजपचे कार्यकर्ते सर्वतोपरी प्रयत्न करतील, असे त्यांनी सांगितले. या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी शिक्षक मतदारांना केले. अनिकेत विजय पाटील हे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे प्रवक्ते आहेत, तसेच संजय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी मिळावी या उद्देशानेच ते भाजपत गेले होते. भाजपकडून दुसऱ्यांदा आयात उमेदवाराला या निवडणुकीत संधी देण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाल्याने ‘चलाखी’ उघड!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिकेच्या येथील दुर्गा उद्यानाजवळील नाशिकरोड विभागीय कार्यालयाची इमारत बांधताना या ठिकाणावरून वाहणारा नैसर्गिक नाला बुजविण्यात आल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. दोन दिवसांपूर्वी याच नाल्यावरील स्लॅब कोसळून मुरूम वाहणारा ट्रक फसल्याची घटना घडल्यानंतर बुजविलेला नैसर्गिक नाला उघडा पडल्याने महापालिका प्रशासनाची चलाखी उघड झाली होती. ही उघडी पडलेली चलाखी झाकण्यासाठी मंगळवारी दिवसभर या खचलेल्या स्लॅबच्या ठिकाणी पडलेल्या खड्डयात माती टाकण्याचे काम सुरू होते.

दुर्गा उद्यानाच्या जवळून पूर्वी मोठा नैसर्गिक नाला वाहत होता. परंतु, काही वर्षांपूर्वी दुर्गा उद्यानाजवळील जागेवर महापालिकेने विभागीय कार्यालयाची भव्य इमारत उभारली. या इमारतीच्या उभारणीसाठी या नैसर्गिक नाल्याचा बळी दिल्याची महापालिका प्रशासनाची चलाखी दोन दिवसांपूर्वी या नाल्यावरील स्लॅब खचल्याने उघड झाली. उघड झालेली आपली चलाखी झाकण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोठी घाई केली. मंगळवारी दिवसभर या नाल्यावरील स्लॅब कोसळलेल्या ठिकाणी माती टाकण्याचे काम सुरू होते. या नैसर्गिक नाल्यावरील स्लॅब कोसळल्याने मोठा खड्डा निर्माण झाला होता. या खड्ड्यामुळे पूर्वीचा नैसर्गिक नाला स्पष्टपणे दिसून आला. पूर्वी या नाल्याचे दगडी बांधकाम सुस्थितीत दिसून आले. या दगडी बांधकामावर बसविण्यात आलेली संरक्षक लोखंडी जाळीही अजून सुस्थितीत दिसून आली. या नाल्यावर सिमेंट काँक्रीटचा स्लॅब घालून हा नाला कायमचा बंद करण्यात आला होता. देवळालीगावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने व महापालिकेच्या सध्याच्या विभागीय कार्यालयापुढील उद्यानाखालून हा नाला सिमेंटचे पाइप टाकून वळविण्यात आला होता. मूळच्या नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहावरच महापालिकेने विभागीय कार्यालयाची इमारत उभारली होती. त्यासाठी टाकण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या स्लॅबचे काम अत्यंत सुमार दर्जाचे करण्यात आल्याने काही वर्षांतच हा स्लॅब कोसळला. याच स्लॅबवर गेल्या काही वर्षांपासून फळबाजार भरत होता. तो स्थलांतरित करण्यात आल्यावर या ठिकाणी रस्ताकामासाठी ट्रकद्वारे मुरुम वाहून आणाला जात होता. या अवजड वाहनांमुळे या नाल्यावरील स्लॅब कोसळल्यानेच महापालिका प्रशासनाने नैसर्गिक नाल्यावर केलेल्या अतिक्रमणाला वाचा फुटली.

दुर्गा उद्यान भाजीबाजाराजवळून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर महापालिकेनेच अतिक्रमण केले आहे. येथील नाला बुजवून त्याच्यावरच विभागीय कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. आता स्लॅब कोसळल्याने निर्माण झालेल्या खड्ड्यातही केवळ माती भरून महापालिकेकडून डागडुजी केली जात आहे. मात्र, नैसर्गिक नाल्याने पुन्हा काही दिवसांनी हा रस्ता खचण्याचा धोका आहे.

-मनोज ठाकरे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्टसाठी

$
0
0

अपघातात युवतीचा मृत्यू

सटाणा : सटाणा-नामपूर रस्त्यावर दोधेश्वर फाट्याजवळ सोमवारी (दि. २३) दुपारी चारचाकी व पिकअप या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात साक्षी संजय शेवाळे (वय १७, रा. चौगाव, ता. बागलाण) या युवतीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर जखमींना नाशिक येथे रुग्णालयात हलविण्यात आले असून, सटाणा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मनमाडमध्ये प्रबोधन रॅली

मनमाड : जागतिक हिवताप दिनानिमित्त शहरात प्लास्टिक मुक्त शहर, ओला सुका कचरा संदर्भात मंगळवारी प्रबोधन रॅली कढण्यात आली. नागरिकांनी हिवतापाचे निर्मूलन करण्यासाठी सहकार्य करावे, घर परिसरातील डास व डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावी, शहरातील व्यापारी, नागरिक यासह सर्वांनी प्लास्टिकचा वापर टाळावा. प्लास्टिकचा वापर करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, ओला व सुका कचरा वर्गीकरण करून कचरा गाडीत टाकावा, असे विविध संदेश रॅलीनिमित्त देण्यात आले. हस्तपत्रकाचे वाटप झाले. मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, अन्न निरीक्षक संदीप तोरणे यांनी आशा स्वयंसेविका, सफाई कर्मचारी, मलेरिया कर्मचारी, नगरपरिषद कार्यालयीन कर्मचारी, करुणा हॉस्पिटल नर्सिंग स्टाफ यांना यावेळी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करप्रश्नी कृती समिती लवकरच घेणार बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

महापालिका आयुक्तांनी नाशिककरांवर लादलेल्या अन्याय्य करवाढीविरोधात शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीने आंदोलन सुरू केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता सर्वांना सोबत घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे. त्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, उन्मेष गायधनी, दत्ता गायकवाड, नितीन ठाकरे यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.

एक एप्रिलपासून महापालिकने बेकायदेशीररीत्या करवाढ केल्यानंतर कृती समितीने करवाढ करणारा आदेश क्रमांक ५२२ हा बेकायदेशीर असल्याची खात्री केली. राज्यघटना व कायद्याची होणारी पायमल्ली रोखण्यासाठी ठोस भूमिका घेतली. या आदेशाने शेतकरी, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, व्यावसायिक, शाळा तसेच नागरिक बाधित झाले आहेत. या सर्वांना एकत्र आणून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी समितीने मेळावे घेत मी नाशिककर जनआंदोलन सुरू केले. शहरातील विविध संघटनांना एकत्र आणले. दि. २३ एप्रिल रोजी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत आदेश क्रमांक ५२२ रोखण्यात आला. मात्र, रद्द झालेला नाही. ही करवाढ पूर्णपणे मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. आंदोलनात सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, उद्योजक, डॉक्टर, वकील आदी सर्वांना सोबत घेण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार असल्याचे कृती समितीचे शिवाजी म्हस्के, जयराम शिंदे, सोमनाथ बोराडे, हरपालसिंग बाजवा, भास्कर निमसे, तानाजी जायभावे नितीन निगळ, संजय माळोदे आदींनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळिंब उत्पादकांसाठी गुरूवारी परिसंवाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व नाशिक जिल्हा डाळिंब उत्पादक संघातर्फे सेंद्रीय डाळिंब शेती या विषयावर गुरुवारी (दि. २६) परिसंवाद होणार आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इ. वायुनंदन यांच्या हस्ते राज्यातील २० डाळिंब उत्पादकांना 'डाळिंब मित्र पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच 'डाळिंब शेतीतील तंत्र' या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असल्याची माहिती आयोजक कृषी विज्ञान शाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ व बाळासाहेब म्हैसधुणे यांनी दिली.

मुक्त विद्यापीठात होणाऱ्या या परिसंवादास प्रमुख पाहुणे म्हणून राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकळ, डाळिंब निर्यातदार सचिन देशमुख, 'न्युट्रिशन मॅनेजमेंट' या विषयावर भूषण गोसावी यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच जिल्हा डाळिंब उत्पादक संघाचे बाळासाहेब म्हैसधुणे यांचे 'सेंद्रिय डाळिंब शेती तंत्रज्ञान' या विषयावर व्याख्यान होणार आहे. याचबरोबर राज्यभरातील यशस्वी डाळिंब उत्पादकांचे मनोगत सादर होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सूर्या गुंजाळ, बाळासाहेब म्हैसधुणे, रवींद्र डेरे, धनंजय गायखे, मदन चौधरी, ललित चोपडा, पोपटराव पवार, तेजस भागवत, रमेश आव्हाड, रमेश खापरे यांनी केले आहे.

यांचा होणार गौरव

गायत्री निचित, डॉ. उज्ज्वला कापसे, मनीषा हरदे, मंगला ठाकरे (नाशिक), शिवाजी तावरे, गणेश पाऊलबुद्धे, गजानन दहिभाते, प्रवीण उकिरडे, राधेश्याम कोळकर (जालना), संभाजी काटे, गंगासागर डोईफोडे (औरंगाबाद), डॉ. अशोक वर्मा (नागपूर), नामदेव फलके (वर्धा), नितीन मुळीक (पुणे), विजय गायकवाड (सांगली), धर्मेश पटेल (गुजरात), कादीर मन्सुरी (मध्य प्रदेश), सचिन देशमुख (अमरावती), अमर देशमुख (अकोला), अनिलराज शेवतकर (सोलापूर) यांचा गौरव करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनजागृतीसह प्रशिक्षणावर भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक नियम व रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याकरिता सुरू असलेल्या २९ व्या रस्ता सुरक्षा अभियानात जनजागृतीसह वाहनचालकांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे. या अभियानाची सुरुवात झाली. अवैध प्रवाशी वाहतुकीवर विशेष कारवाई सुरूवात करण्यात आली आहे.

ग्रामीण पोलिस दलातर्फे सात मेपर्यंत जिल्ह्यातील ४० पोलिस स्टेशन तसेच आठ उपविभागीय कार्यालयानिहाय रस्ता सुरक्षा अभियान हाती घेण्यात येणार आहे. शहर पोलिस तसेच आरटीओप्रमाणे ग्रामीण पोलिसांचा जनजागृती, मार्गदर्शनावर भर आहे. जनजागृतीच्या टप्प्यानंतर हेल्मेट, सीटबेल्ट तपासणी, अवैध प्रवाशी वाहतूक, ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, अवजड वाहने यावर लक्ष केंद्रीत करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर करावाई करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सर्व नियमांचे पालन करून अपघात आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी केले आहे.

दरम्यान, शहर पोलिस सतत कारवाईबरोबर जनजागृती करतात, असे शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले. शहरात जेहान सर्कल येथे दररोज सकाळी ९ ते १० या वेळेत जनजागृतीपर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने वाहनचालकांपर्यंत नियमांची माहिती पोहचवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१५ दिवसांचा आराखडा

प्रादेशिक परिवहन विभागानेही १५ दिवसांचा आराखडा आखला असून, यात प्रशिक्षण तपासणी शिबिरांसह कारवाईवर जोर देण्यात आला आहे. विभागामार्फत प्रत्येक तालुक्यात विविध कार्यक्रम होणार असून, जनजागृतीसह कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी विनय अहिरे यांनी कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषय समित्या बिनविरोध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सहा प्रभाग समित्यांपाठोपाठ महापालिकेतील चारही विषय समित्यांच्या सभापती व उपसभापतिपदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने सभापती व उपसभापतिपदांची निवडही बिनविरोध झाली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी कावेरी घुगे, आरोग्य समितीच्या सभापतिपदी सतीश कुलकर्णी आणि शहर सुधारणा समितीच्या सभापतिपदासाठी पूनम सोनवणे यांचा एकमेव अर्ज आला आहे. या समित्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे.

महापालिकेत महिला व बालकल्याण समिती अस्तित्वात असताना भाजपने सत्तेत येताच नव्याने विधी, आरोग्य आणि वैद्यकीय सहाय्य, तसेच शहर सुधारणा या तीन विषय समित्या गठित केल्या होत्या. गेल्या वर्षी जुलै २०१७ मध्ये सदर विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. परंतु, यंदा प्रभाग समित्यांच्या सभापतिपदांच्या निवडणुकांसोबतच महिला व बालकल्याणसह चारही विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदांसाठी निवडणुका घेण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला. त्यामुळे गेल्या वेळच्या पदाधिकाऱ्यांना केवळ नऊ महिन्यांचाच कालावधी मिळाला आहे.

येत्या २६ तारखेला या चारही सभापती व उपसभापतींची निवडणूक होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. हे पीठासीन अधिकारी राहणार आहेत. मंगळवारी (दि. २४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या समित्यांमध्ये भाजपचे बहुमताएवढे पाच सदस्य आहेत. त्यामुळे भाजपचेच सभापती व उपसभापती होणार हे निश्चित आहे. त्यामुळे मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी सभापती व उपसभापतिपदांसाठी केवळ भाजपच्याच नगरसेवकांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केलेत. सभापती व उपसभापतिपदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली असून, आता केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

---

यांनी केले अर्ज दाखल

शहर सुधारणा समिती सभापती : पूनम सोनवणे, उपसभापती : अंबादास पगारे

वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापती : सतीश कुलकर्णी, उपसभापती : पल्लवी पाटील

महिला व बालकल्याण समिती सभापती : कावेरी घुगे, उपसभापती : सीमा ताजणे,

विधी समिती सभापती : सुनीता पिंगळे, उपसभापती : सुमन सातभाई

(लीड, महापालिका इमारत, निष्पक्षचा लोगो)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा प्रचाराचा बिगुल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने दराडेंच्या प्रचाराची तयारीही सुरू केली आहे. दराडेंच्या उमेदवारीवरून शिवसेनेतील धुसफूस शांत करण्यासाठी उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत हे आज, बुधवारी (दि. २५) नाशिकमध्ये येत असून, त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यात पक्षातील मतभेद मिटविण्यासह विधान परिषद निवडणुकीचा बिगुल फुंकला जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर केली असून, येत्या २१ मे रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेने आघाडी घेत आपला उमेदवार जाहीर केला असून, नरेंद्र दराडेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. नरेंद्र दराडेंच्या उमेदवारीवरून शिवसेनेत धुसफूस होऊन थेट गेल्या वेळेचे उमेदवार शिवाजी सहाणेंची हकालपट्टी पक्षाला करावी लागली होती. सहाणे यांनीही या उमेदवारीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरच आर्थिक तडजोडीचे आरोप केले होते. त्यामुळे शिवसेनेत मोठे वादळ उभे राहिले होते. सोबतच महानगरप्रमुखपदाचेही खांदेपालट झाले आहे. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना बदलण्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे बुधवारी नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी मतदार असलेल्या सर्व लोकप्रतिनिधींना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपमध्ये नाराजी

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका जागेसाठी शिवसेनेने भाजपला विश्वासात न घेताच एकतर्फी उमेदवाराची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेला भाजपच्या मदतीची गरज असून, शिवसेनेपाठोपाठ भाजपचे मतदार आहेत. परंतु, शिवसेनेने एकतर्फी उमेदवाराची घोषणा झाल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असून, भाजपनेही उमेदवार द्यावा, अशा हालचाली आता पक्षाकडून सुरू झाल्या आहेत. भाजपकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, परवेज कोकणींसह माणिकराव कोकाटेंच्या नावाची चर्चा आहे. शिवाजी सहाणेसुद्धा भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भाजपच्या नाराजीचा शिवसेनेला अपशकुन होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीतही दावेदार

दरम्यान, विधान परिषदेचे विद्यमान आमदार जयंत जाधव यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने राष्ट्रवादीने उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. शिक्षण समितीचे माजी सभापती अशोक सावंत यांच्या नावासह संदीप गुळवे यांच्या नावाचीही चर्चा आहे. सोबतच शिवाजी सहाणे भाजपसोबतच राष्ट्रवादीच्याही संपर्कात आहेत. त्यासाठी भाजपच्या निर्णयाची राष्ट्रवादीकडून वाट पाहिली जात आहे.

--

स्ट्रिप : विधान परिषद निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चीनसोबत मैत्रीतूनच विकास’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्राचीन काळापासून भारत आणि चीन ही दोन राष्ट्रे शेजारी म्हणून नांदत आहेत. या दोन्ही राष्ट्रांना मोठ्या संस्कृतीची पार्श्वभूमी असल्याने जगात त्यांची वेगळी ओळख आहे. दोन्ही राष्ट्रांच्या आपसांतील संबंधांवर आंतरराष्ट्रीय राजकारणातील मोठ्या घडामोडी अवलंबून आहेत. त्यामुळे युरोप खंडातील देश या दोन्ही देशांना वेगवेगळे महत्त्व देतात. पण, मैत्रीचे नाते प्रस्थापित करणे हेच दोन्हीही राष्ट्रांच्या हिताचे आहे. त्यातच दोन्हीही राष्ट्रांचा फायदा आहे, असे मत श्रीरंग कोगेकर यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये आयोजित 'चायना इकॉनॉमी अॅण्ड कल्चर' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कोगेकर हे चीनमध्ये १२ वर्षांपासून वास्तव्यास होते. या वास्तव्यादरम्यान त्यांनी चीनमधील संस्कृती, भाषा, खाद्यसंस्कृती, पर्यटन, तसेच तेथील उद्योग, व्यापार, व्यावसायिकतेचा सखोल अभ्यास केला. अनुभव कथनाद्वारे त्यांनी नागरिकांशी चीनबद्दल सांकृतिक आणि औद्योगिक व्यापारविषयक संवाद साधला.

कोगेकर म्हणाले, की विकासाच्या बाबतीत चीनची धोरणे अतिशय आक्रमक आहेत. देशाचे हित जपण्यासाठी आवश्यक ते कठोर निर्णय घेण्यास हा देश मागे हटत नाही, हे वैशिष्ट्य सांगता येईल. भारतामध्ये सोशल मीडियावर अर्थाचा विपर्यास होऊन अनेकदा जातीय दंगली होतात. तेथे मात्र यासारख्या माध्यमांवर संपूर्णत: बंदी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण, आरोग्य आणि उद्योग विकासाला चीनने गेल्या काही वर्षांमध्ये विशेष प्राधान्य देऊन देशाचा विकास दर उंचीवर नेऊन ठेवला आहे. चीनच्या प्रगतीचा डंका जगात वाजत असला तरीही आजमितीस चीन कृषिमालासारख्या जीवनावश्यक वस्तूंसाठी भारतावर बहुतांशी अवलंबून आहे. यासारखे अर्थकारण, विकास आणि सांस्कृतिक ऋणानुबंधांचे धागे विचारात घेतल्यास चीनसारख्या देशासोबतचे शत्रूत्व परवडणारे नाही. याउलट मैत्रीतूनच जितका विकास साधता येईल तितके दोन्हीही देशांचे हितच साधले जाईल, असे ते म्हणाले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनिवाल, सचिव मनीष चिंधडे, मंथ लीडर सुधीर जोशी, वैशाली रावत आदींसह नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत धर्म मान्यतेस विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शिवा संघटनेचा लिंगायत धर्म मान्यतेच्या मागणीला तीव्र विरोध आहे. या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चात सामील होऊ नये, असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी केले आहे. माहेश्वरी बालाजी मंदिर मंगल कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वीरशैव आणि लिंगायत हे समान अर्थी शब्द आहेत. मूळ प्राचीन शब्द हा वीरशैव असून बोलीभाषेतील प्रचलीत शब्द लिंगायत असा आहे. त्यामुळे वीरशैव आणि लिंगायत हे वेगवेगळे होऊ शकत नाहीत. मात्र, सध्या कर्नाटकातील काही धर्मगुरू राज्यकर्त्यांच्य हातचे खेळणे बनून शब्दछल व बुद्धीभेद करून वीरशैव आणि लिंगायत हे वेगळे असल्याचे सांगत लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळविण्याच्या गोंडस नावाखाली आमच्या धर्मात फूट पाडून वीरशैव-लिंगायत धर्माचा सात हजार वर्षांचा प्राचीन इतिहास पुसून काढण्याचे षडयंत्र करीत आहेत. त्यामुळे शिवा संघटनेला लिंगायत धर्म मान्यता मान्य नाही. लिंगायत धर्माच्या महामोर्चात कोणीही सामील होऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वीरशैव धर्म (संस्कृती) ही अत्यंत प्राचीन आहे. कालांतराने लिंगायत हे त्याचे पर्यायवाचक व प्रचलीत नाव रुढ झाले आहे. त्याचा गैरफायदा घेऊन शब्दछल व बुध्दीभेद करीत १२ व्या शतकातील महात्मा बसवेश्वर यांनी स्थापन केलेला लिंगायत धर्म हा वेगळा धर्म असल्याचे सांगून त्याचा वीरशैव धर्माशी संबंध नाही असे चुकीचे सांगत आमच्या धर्माचा प्राचीन इतिहास पुसून काढून समाजात फूट पाडण्याचे कटकारस्थान चालू आहे. लिंगायत धर्म मान्यतेसाठीच मोर्चे काढले जात आहेत. हे समाजाने समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शब्दछल व बुद्धीभेद करून समाजात फूट पाडण्याचे कटकारस्थान करणाऱ्यांना संधी मिळू नये म्हणूनच आम्ही वीरशैव-लिंगायत धर्म असे नाव एकत्रित मान्य करीत असल्याचे प्रा. धोंडे यांनी सांगितले. यावेळी पंडिताराध्य शिवाचार्य वडांगळीकर महाराज, शिवा संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस रुपेश होतराव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल कोठुळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आर्थिक वादातून प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

चेक न वटल्याच्या कारणावरून पाठलाग करुन दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. २३) रात्री चाडेगाव फाटा येथे घडली. या हल्ल्यात कोटमगाव येथील चंद्रभान शिवाजी घुगे गंभीर तर चंद्रकांत सुकदेव धात्रक (रा. हिंगणवेढे) किरकोळ जखमी झाले आहेत.

या प्रकरणी चंद्रभान घुगे यांनी फिर्याद दिली. घुगे आणि त्यांचा मावसभाऊ चंद्रकांत धात्रक हे दोघेजण सोमवारी सायंकाळनंतर सिन्नर फाटा सामनगाव रस्त्याने त्याच्या इनोव्हा कारने (एमएच १५ जीएफ २००७) कोटमगावच्या दिशेने जात होते. चाडेगाव फाटा येथे पांढऱ्या कारमधून संशयित आरोपी आले. भगवान धात्रक, हिरामण धात्रक, अक्षय धात्रक व त्यांचा एक जोडीदार अशा चौघांनी कार आडवी उभी करीत चेक न वटल्याचे कारण सांगून घुगे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढविला. धात्रक यांनी घुगे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तर हल्लेखोरांनी त्यांनाही जखमी केले. हल्ल्यात डोक्यात वार झाल्याने घुगे हे गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी इनोव्हा कारचीही तोडफोड केली आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत लाखलगाव रस्त्याने पोबारा केला. हल्ल्यात घुगे यांचे साडेचार हजार रुपयेही गहाळ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या हल्ल्यातील हल्लेखोर उमराळे येथील आहेत. हल्लेखोरांचा नाशिकरोड पोलिसांकडून शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलत्या ऋतुचक्राचे शेतकऱ्यांपुढे आव्हान

$
0
0

कृषितज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जे शेतीवर बोलतात, ते शेती करत नाहीत, आणि जे शेती करतात ते बोलत नाही हे आजचे चित्र आहे. जगाचा पोशिंदा आज विवंचनेत आहे. अन्न हे प्रयोगशाळेत तयार होत नाही. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन शेतकऱ्यांना ऋतुचक्रातील अनाकलनीय बदलांना तोंड देत सात्विक अन्न निर्माण करण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य व कृषितज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे झालेल्या कृषी विस्तार सेवा प्रदाता प्रशिक्षणाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. सुमारे महिनाभर चाललेल्या कृषी विस्तार सेवा प्रदाता प्रशिक्षणाचा समारोप आणि आडगांवच्या पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित कृत्रिम रेतन सेवा दाता प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ प्रा. देसरडा तसेच कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

कृषी विस्ताराबाबत सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या या कार्यशाळेत ग्रामीण भागातील युवा शेतकरी सहभागी झाले. प्रा. देसरडा यांनी ढासळत्या जागतिक पर्यावरणाबाबत चिंता व्यक्त करीत शेतकऱ्यांना बदलत्या ऋतुचक्रामुळे आव्हानात्मक बनलेली काळाची पावले ओळखावी. कोणत्याही गोष्टीचा विनाश न करता होतो त्यालाच विकास म्हणतात. रसायनांच्या बेसुमार वापरामुळे निकस आणि पार्थिव बनत चाललेल्या शेतजमिनीला पुन्हा कसदार बनवणे आणि त्यातून विषमुक्त शेती करणे हे तरुण शेतकऱ्यांपुढील आव्हान आहे, असेही ते म्हणाले. प्रा. रावसाहेब पाटील म्हणाले, की युवा शेतकऱ्यांनी आता या प्रशिक्षणाच्या माध्यमातून कृषिसेवादूत बनावे आणि महाराष्ट्रातील शेतकरी समृद्ध करावा. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देताना नैसर्गिक साधनांचा योग्य नियंत्रित वापर करायला शिकले पाहिजे.

कार्यक्रमास जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय विसावे, संजीवन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. संपतराव पाटील, मंगेश व्यवहारे, प्रा. परदेशी आदी उपस्थित होते. कृषी विस्तारचे विशेषज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी प्रास्ताविक केले. उद्यान विद्या विभागाचे विषय विशेषज्ञ हेमराज राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. पशुसंवर्धनाचे विशेषज्ञ डॉ. शाम पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीच्या धडकेत मजूर जखमी

$
0
0

दुचाकीच्या धडकेत मजूर जखमी

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्ग पायी ओलांडणाऱ्या मजुरास दुचाकीस्वाराने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना सिन्नर फाटा परिसरातील योगायोग वाहन बाजार येथे घडली. या अपघातात जगन्नाथ अभिमान मोरे (वय ३५, मूळ रा. आचळगाव, जि. जळगाव, सध्या रा. मोहदरी) हा डांबरकाम करणार मजूर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकरोड पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

----

(लोगो म. टा. इम्पॅक्ट)

दुभाजकातील झाडांना पाणी

जेलरोड : बिटको ते जेलरोडदरम्यान दुभाजकांत असलेल्या झाडांना पाणी मिळत नसल्याने ती कोमेजू लागली होती. याबाबतचे वृत्त 'मटा'मध्ये प्रसिद्ध होताच महापालिकेचा उद्यान विभाग जागा झाला. नुकतेच या झाडांना टँकरद्वारे पाणी देण्यात आले. बिटको ते जेलरोडदरम्यानच्या दुभाजकांतील झाडे सुकू लागल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या झाडांना नियमितपणे पाणी देण्याची मागणी होत आहे.

--

विहितगाव येथे कोंडी

देवळाली कॅम्प : लग्नाच्या दाट तिथीमुळे मंगळवारी विहितगाव परिसरात वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. येथील हांडोरे चौक येथून वडनेररोडवरील विविध लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर चारही बाजूंनी वाहतूक कोंडी झाल्याने एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

---

'वारली'वर कार्यशाळा (फोटो)

जेलरोड : नाशिकरोड येथील ऋतुरंग परिवार आणि वारली आर्ट फाउंडेशनतर्फे सोमवारी (दि. ३०) आणि मंगळवारी (दि.१) वारली चित्रसृष्टी प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. विजय संकलेचा व संतोष जोशी यांनी ही माहिती दिली. दत्त मंदिर चौकातील ऋतुरंग भवनमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेत अभ्यासक संजय देवधर यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. सकाळी १० ते दुपारी एकपर्यंत बेसिक कोर्स होईल. दुपारी २ ते ५ या वेळेत अॅडव्हान्स कोर्समध्ये कापड व पॉटवर वारली चित्रे कशी रंगवायची याचे मार्गदर्शन केले जाईल.

---

सर्वाधिक वाचलेली बातमी :

नाणार : शिवसेना एक पाऊल मागे

नाणार प्रकल्पाबाबत काढलेल्या अधिसूचनेवर मुख्यमंत्री ठाम असून ही अधिसूचना रद्द करण्यासाठी अखेर शिवसेनेला मुख्यमंत्र्यांकडे विनंती करावी लागली आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिता भंगाचे दडपण!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्तांनी नाशिककरांवर लादलेल्या करवाढीचा बोजा उतरविण्यासाठी राणा भीमदेवी थाटात घोषणा करणाऱ्या समस्त नगरपित्यांना आता मात्र आचारसंहिता भंगाची भीती वाटू लागली आहे. करवाढ रद्दचा प्रस्ताव तयार केल्यानंतर मंगळवारी दिवसभर नेतेमंडळी भीतीच्या छायेखाली वावरताना दिसून आली.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रस्तावित केलेल्या करवाढीस सर्वच स्तरातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. या करवाढी विरोधात राजकीय पक्षांसह नाशिककरांनी सोमवारी राजीव गांधी भवनबाहेर जोरदार निदर्शने केली. महासभेतही करवाढीचा मुद्दा चांगलाच गाजला. तब्बल १० तास सुरू असलेल्या महासभेत करवाढ रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. परंतु हा ठरावच आता अडचणीत आणतो की काय अशी भीती महापालिकेतील समस्त नेत्यांना वाटू लागली आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही महासभा होती. महासभेत घेतल्या जाणाऱ्या निर्णयामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे पत्र जिल्हाधिकारी प्रशासनाने महापालिकेला दिले होते. महासभेमध्ये मतदारांवर प्रभाव पडेल असा कुठलाही निर्णय घेऊ नये असे कटाक्षाने या पत्रामध्ये नमूद करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या सभेमध्ये करवाढ रद्दचा ठराव करण्यात आला. परंतु यामुळे मतदारांवर प्रभाव पडण्याची शक्यता असल्याने लोकप्रतिनिधींपुढील अडचणी वाढल्या आहेत. करवाढ रद्दच्या ठरावाचा निर्णय आचारसंहिता भंगमध्ये बसतो की नाही हे पाहण्यासाठी मंगळवारी दिवसभर लोकप्रतिनिधींची धावाधाव सुरू होती. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली जात होती. आचारसंहितेमधील तरतुदी समजून घेण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून सुरू होता. हा ठराव अंतिम करण्यात आला तर तो आचारसंहिता भंग ठरण्याची दाट शक्यता असून, त्यामुळे महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या अडचणी वाढू शकतात अशी शक्यता जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'म. टा.' शी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसांत काय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, हा प्रस्ताव स्वीकारण्यास जिल्हा प्रशासनाने नकार दिल्याची आवई उठविण्यात आल्याने गोंधळाच्या परिस्थितीत अधिकच भर पडली आहे.

प्रशासनाचे 'आयुक्त बचाव'

ही करवाढ आचारसंहितेच्या काळात झाली असल्याने हा आचारसंहितेचा भंग असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यावर आयुक्त तुकाराम मुंढे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांना वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ही चाल खेळली जात असल्याचे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. एकीकडे आयुक्त करवाढ मागे घेण्यास तयार नाहीत. दुसरीकडे नगरसेवकांनी व आमदारांनीही याला विरोध दर्शविल्याने मुख्यमंत्र्यांनाच हस्तक्षेप करून या वादावर पडदा टाकावा लागणार आहे.

जनतेच्या भावना लक्षात घेऊन विशेष महासभेने करवाढीचा ठराव रद्द केलेला नाही तर स्थगित ठेवण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे हा ठराव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जाणार आहे.

रंजना भानसी, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने तरुणास गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एचडीएफसी बँकेमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवित भामट्यांनी सिडकोतील एका तरुणाकडून पावणे दोन लाख रुपये उकळले. या प्रकरणी भूषण गोटीराम राऊत (रा. नंदनवन चौक, सिडको) यांनी अंबड पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीची फिर्याद दिली आहे.

भूषण राऊत यांना ५ डिसेंबर २०१७ रोजी भामट्यांनी वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून संपर्क साधला. एचडीएफसी बँकेत मोठ्या प्रमाणात नोकरभरती होत असून, तुम्हालाही तेथे नोकरी मिळू शकण्याचे आमिष दाखविण्यात आले. दोन-तीन दिवस सातत्याने संपर्कात राहून संशयितांनी राऊत यांचा विश्वास संपादन केला. नोकरी हवी असेल तर थोडे पैसे देण्याची तयारी ठेवा, असे त्यांना सांगितले. एसबीआय बँकेचा खातेक्रमांकही त्यांना देण्यात आला. या खात्यामध्ये राऊत यांनी १,७३,४५५ रुपये भरले. अनेक दिवस उलटूनही नोकरी न मिळाल्याने राऊत यांनी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली. उपनिरीक्षक घुगे तपास करीत आहेत.

-

दिंडोरीरोडवर मोबाइल दुकान फोडले

नाशिक : दिंडोरी रोडवरील किशोर सूर्यवंशी मार्गालगतचे मोबाइल दुकान फोडून चोरट्यांनी ५० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. मेघराज रमेश भोसले (रा. हिरावाडी) यांनी फिर्याद दिली आहे. भोसले यांचे स्काय एजन्सी नावाचे मोबाइल विक्री आणि दुरूस्तीचे दुकान आहे. सोमवारी, रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून गल्ल्यातील दोन हजार रुपयांची रोकड आणि महागडे मोबाइल असा ४९,३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

-

वृद्धेला मारहाण

नाशिक : दारू सेवनासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आली. ही घटना गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीतील डी. के. नगरमध्ये घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन संशयितांना अटक केली आहे. छोटू गोमाजी पहाडे (वय २५) व खंडू हिरालाल खरे (वय ४५, रा. डी. के. नगर) अशी संशयितांची नावे आहेत. डी. के. नगर येथील नायर गॅरेजसमोर राहणाऱ्या लिलाबाई रामकृष्ण मालखेडे (वय ६०) या सोमवारी, रात्री नऊच्या सुमारास घराच्या ओट्यावर बसल्या होत्या. त्यावेळी संशयित छोटू पहाडे याने शिवीगाळ करीत त्यांच्याकडे दारू सेवनासाठी पैशांची मागणी केली. लिलाबाई यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. याचवेळी आलेल्या खंडू खरे या साथीदारासह पहाडे याने वृद्धेला बेदम मारहाण केली.

-

तरुणावर चाकू हल्ला

नाशिक : रस्त्याने चाललेल्या तरुणावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. कस्तूरबानगर भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश बाळकृष्ण साळवे (रा. सावळे मळा, मखमलाबाद) व रूतीक रामदास गायकवाड (रा. कस्तूरबा नगर) अशी चाकू हल्ला करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. साळवे याला पोलिसांनी अटक केली आहे. होलाराम कॉलनीतील बॉबी राजू वर्मा (२०) हा युवक मंगळवारी, (दि. २४) दुपारी तीन वाजेच्या सुमारास कस्तुरबानगर येथील दत्ता वाघ यांच्या घरासमोरून पायी चालला असताना संशयितांनी त्याला अडविले. 'भावास दम का देतो', अशी विचारणा करून किरकोळ कारणातून त्याच्या पायावर धारदार चाकूने वार करून जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

-

जाळपोळ प्रकरणी माजी चेअरमन गजाआड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोसायटीतील एका रहिवाशाच्या मोटरसायकलची जाळपोळ केल्याप्रकरणी सोसायटीच्या एका माजी चेअरमनला अंबड पोलिसांनी अटक केली. सावतानगर येथील खांडेनगरमध्ये हा प्रकार घडला.

जयप्रकाश भास्कर तोरवणे (वय ४२, रा. सदाशिव रेसिडेन्सी, लासुरे हॉस्पिटलसमोर खांडेनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. कैलास विष्णू जवांदे (रा. सदाशिव रेसिडेन्सी, खांडेनगर सावतानगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. संशयित आणि आरोपी एकाच सोसायटीतील रहिवासी आहेत. संशयित तोरवणे हा सोसायटीचा माजी चेअरमन आहे. जवांदे यांची स्प्लेंडर मोटरसायकल सोमवारी रात्री पार्किंगमध्ये लावली असताना संशयिताने ज्वलनशील पदार्थ टाकून ती पेटवून दिल्याची तक्रार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जुन्या भांडणाच्या कारणातून हा प्रकार घडल्याची जवांदे यांची तक्रार आहे.

-

अपघातात मोटरसायकलस्वार ठार

नाशिक : भरधाव मोटारसायकल दुभाजकावर आदळल्याने तरुणाचा मृत्यू झाला. इंडियन टुल्सकडून महिंद्रा सर्कलकडे जाताना औद्योगिक वसाहत कर्मचारी कॉलनीजवळ हा अपघात झाला. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी मोटारसायकल चालविणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील शनीशिंगणापूर येथील तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. विशाल प्रकाश प्रधान (वय १८ रा. संतोषी मातानगर,सातपुर) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. विशाल व संशयित प्रतीक विष्णू गायकवाड हे दोघे मित्र सोमवारी, रात्री साडे दहाच्या सुमारास इंडियन टूल्स कारखान्याकडून मायको सर्कलच्या दिशेने दुचाकीवर प्रवास करीत होते. औद्योगिक कर्मचारी वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images