Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गावठी पिस्तूलासह कुख्यात गुंडाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चॉपरने वार करून चायनीज व्यावसायिकाला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात फरार संशयित तुकाराम दत्तू चोथवे याला गुन्हे शाखा एकच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

मखमलाबाद नाका येथील ड्रीम कॅसल चौकात रोशन कटारे या चायनीज व्यावसायिकाकडे चोथवे व त्याच्या साथीदारांनी १७ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता चार हजार रुपयांची खंडणी मागितली होती. नकार दिल्याने कटारे यांच्यासह विनोद ठाकरे यांच्यावर चॉपरने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चोथवे त्याच्या साथीदारांसह गंगाघाटावरील गौरी पटांगणावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक या परिसरावर लक्ष ठेऊन होते. चोखवेसह त्याचा साथीदार नीलेश दौलत खांदवे (२७, रा. मखमलाबाद) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोटरसायकल, गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रवीण उर्फ समीर सुरेश हांडे यांच्या खून प्रकरणातही चोथवे आरोपी असून ५ जून २०१७ रोजी तो जामिनावर सुटला होता. त्यानंतर त्याच्यावर हा गुन्हा दाखल झाला. त्याला पुन्हा जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बियॉण्ड द क्लाउडस’चे नाशिकला शूटिंग

$
0
0

मटा विशेष

माजिद माजिदींसोबत काम करण्याची मिळाली संधी

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

आपण ज्याला गुरूस्थानी मानतो त्यांच्याबरोबर आयुष्यात एकदा तरी काम करायला मिळावे अशी इच्छा असते. चित्रपट क्षेत्रात तर अत्यंत बुद्धिवादी माणसे काम करतात, ज्यांना मैलाचे दगड म्हणता येईल अशांसोबत काम करण्याचे स्वप्न असते; परंतु ते सत्यात उतरले तर... नाशिकची रंगकर्मी सुहास जाधवच्या बाबतीत असे झाले. तिला चक्क सुप्रसिद्ध दिग्दर्शक, शोमन माजिद माजिदींसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तिच्या आयुष्यातील तो सोन्याचा क्षण ठरला.

माजिद माजिदी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले इराणी चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट निर्माता आणि पटकथाकार. माजिदींच्या वैविध्यपूर्ण चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्दर्शकाबरोबर काम करणे हे बॉलिवूडच्या प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते. हिंदी, मराठीचा गंध नाही, इंग्रजी भाषाही तोडकी मोडकी येणारे परंतु प्रचंड व्हिजन समोर असेलेले इराणी भाषिक माजिदी स्वत: नाशिकला येतात काय आणि त्यांच्या आगामी 'बियॉण्ड द क्लाउडस' या चित्रपटातील पोलिस कॉन्स्टेबलच्यया भूमिकेसाठी मराठमोठ्या नाशिकच्या सुहास जाधवची निवड करतात काय, हे सारेच अनपेक्षित सुहासच्या बाबतीत घडले आणि नाटकांमध्ये भूमिका करणारी सुहास इतक्या बिगबजेट चित्रपटाचा हिस्सा होऊ शकली.

'बियॉण्ड...' चे चित्रीकरण बहुतेक मुंबईत झाले आहे. कारण ही कथा मुंबईची आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये मुंबई पाहिली असली, तरी माजीद माजिदी यांनी निवडलेली लोकेशन्स अनोखी आहेत. रिअल लोकेशन्सवर चित्रीकरण झाले आहे. नाशिकलाही जेलरोड येथे जेलमध्ये दोन दिवस त्यांनी चित्रीकरण केले. सुहास जाधवने यात पोलिस कॉन्स्टेबलचा अभिनय केला असून प्रवीण काळोखे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मंजुळा' या एकांकिकेत केलेल्या पोलिसाच्या अभिनयाचा यासाठी तिला फायदा झाला.

माजिद माजिदी यांचे चार चित्रपट यापूर्वी मी पाहिलेले होते; मात्र त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा सगळेच चित्रपट पाहिले. त्यांची काम करण्याची पद्धत... अशा सगळ्याच गोष्टी पाहिल्या. ते ग्रेट डिरेक्टर आहेत. त्यांचे व्हिजन खूप मोठे आहे. कथा सांगण्याची त्यांची पद्धत चांगली आहे.

- सुहास जाधव, रंगकर्मी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरे कुटुंबीय राष्ट्रवादीच्या वाटेवर?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

देशात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात मोदीलाटेत हिरे कुटुंबातील माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे, आमदार अपूर्व हिरे व अद्वय हिरे हे भाजपवासी झाले होते. आता मात्र संपूर्ण हिरे कुटुंब पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असून, २१ रोजी शनिवारी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात हिरेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा शहर व तालुक्यात सुरू आहे.

राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सातत्याने अद्वय हिरे पक्षात सक्रिय राहिले होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे आपण मालेगाव बाह्य मतदार संघासाठी तिकिटाची मागणी केल्याचेदेखील अनेकवेळा त्यांनी बोलून दाखवले होते. भाजपच्या अनेक कार्यक्रमांत हिरे कुटुंबीय एका व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले होते. अद्वय यांच्या सक्रियतेने भाजपला मोठे बळ मिळाले होते. मात्र, आता संपूर्ण हिरे कुटुंबीय राष्ट्रवादीत म्हणजे स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याने भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

भुजबळांशी मतभेद संपुष्टात

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याशी असलेल्या राजकीय मतभेदांतून हिरे कुटुंबाने भाजपची वाट धरली असली तरी आता भुजबळ व हिरे कुटुंबातील हे मतभेद संपुष्टात आले आहे. भुजबळ सध्या तुरुंगात असल्याने राष्ट्रवादी पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून, हिरेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नक्कीच पक्षाला मोठे बळ मिळणार असल्याचे बोलले जाते आहे. दि. २१ रोजी तालुक्यातील कौळाणे येथील फाट्यावरील राधिका लॉन्स येथे हिरे समर्थकांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात हिरेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचार विनिमय होणार असून, त्यास समर्थकांनीदेखील दुजोरा दिला आहे. याबाबत अद्वय हिरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी प्रवेशाची घाई नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव/नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा अशी कोणतीही तातडी आलेली नाही, त्यामुळे लगोलग राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा कोणताही विचार नसून कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करुनच पुढचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी मटाशी बोलतांना केला. भारतीय जनता पक्षात जीव गुदमरत आहे, ही केवळ आमचीच नव्हे तर अनेकांची मनस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे, पण पक्ष सोडण्याबाबात अद्याप काहीही विचार झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात मोदीलाटेत हिरे कुटुंबातील प्रशांत हिरे, आमदार अपूर्व हिरे व अद्वय हिरे हे भाजपवासी झाले होते. पण गेल्या काही महिन्यांपासून हिरे कुटुंबीय व भाजप नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने हिरे मंडळी दुरावले आहेत. अपूर्व हिरे यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात निवडणूक लढण्याच्या दृष्टीने तेथे काम करायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्यात व विद्यमान भाजप आमदार सीमाताई हिरे यांच्यात संघर्ष सुरू झाला. संघटनात्मक पातळीवर पदाधिकारी नियुक्तीवरुन उभयतांत वाद झाल्यानंतर पक्षाने अपूर्व हिरेंना दुर्लक्षित करण्यास सुरुवात केली. अशातच त्यांनी शिक्षक मतदार संघातून यापुढे निवडणूक न लढविता नाशिकमधून लोकसभेची जागा लढविणार असल्याचे जाहीर केले. भाजपने उमेदवारी द्यावी, दिली नाही तरी आपण लढणारच असे जाहीर करून त्यांनी प्रचाराचा श्रीगणेशाही सुरू केल्यानंतरच खरे तर हिरेंचे भाजपमधील अवतारकार्य संपल्याचे स्पष्ट झाले होते. अलिकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसचे जयंत पाटील यांनी हिरेंच्या घरी भेट दिल्यानंतर हिरेंच्या घरवापसीची चर्चा नव्या जोमाने सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशांत हिरे यांच्याशी संपर्क साधला असता, असा काहीही निर्णय झालेला नाही हे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार व पाटील यांनी राष्ट्रवादीत काम करण्याबाबत विचारणा केली, हे खरे असले तरी कार्यकर्त्यांशी विचार करुन निर्णय घेऊ असे आपण स्पष्ट केल्याचेही हिरेंचे म्हणणे आहे. भुजबळांशी तीव्र मतभेद झाल्यामुळेच हिरेंनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेतला होता. आता तर हिरेंनी भुजबळांची थेट कारागृहात जाऊन भेट घेतल्याने ती कटुता राहिलेली नसल्याने पवारांनीही आग्रह धरला असल्याचे सांगितले जाते. पक्षात येताना भाजपने जो उत्साह दाखविला, मानमरातब दिला तो अलिकडे राहिलेला नाही. किंबहुना दुर्लक्ष करणे, अनेक कार्यक्रमांना टाळणे असे वर्तन सुरू झाल्याने तूर्तास आम्ही शांत राहण्याचे ठरविले आहे.

शनिवारी मांडणार भूमिका

येत्या शनिवारी(दि. २१) कौळाणे रस्त्यावरील राधिका लॉन्स येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात आपण भूमिका स्पष्ट करू व तेथे होणाऱ्या विचारमंथनातून पुढील निर्णय घेऊ असेही ते म्हणाले. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सातत्याने अद्वय हिरे पक्षात सक्रिय राहिले होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे आपण मालेगाव बाह्य मतदार संघासाठी तिकिटाची मागणी केल्याचे देखील अनेकवेळा त्यांनी बोलून दाखवले होते. भाजपच्या अनेक कार्यक्रमांत हिरे कुटुंबीय एका व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले होते. अद्वय यांच्या सक्रियतेने भाजपला मोठे बळ मिळाले होते. मात्र, आता संपूर्ण हिरे कुटुंबीय नाराज झाल्याने भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस बॅण्डच्या धूनवर बडी दर्गा उरुस सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतातील सर्वधमिर्यांचे श्रद्धास्थान असलेल्या बडी दर्गाच्या उरुसला बुधवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. १२ दिवस सुरू राहणाऱ्या या उरुससाठी पीर सय्यद सादिकशहा हुसेनी वक्फ ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

उरुस २९ एप्रिलपर्यंत सुरू रहाणार असून यावेळी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उरुसच्या पहिल्या दिवशी पोलिस विभागाच्या वतीने पोलिस बॅण्डच्या धूनवर मानाची पहिली चादर चढविण्यात आली. ही चादर भद्रकाली पोलिस स्टेशन मधून सायंकाळी साडेसात वाजता गाजत बडी दर्गा येथे आणण्यात आली. त्यानंतर आठ वाजता पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते चादर चढविण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पिरजादे पंच कमिटीच्या वतीने पोलिस आयुक्त व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. रात्री १० वाजता संदलचा कार्यक्रम झाला. यावेळी कबरीला चंदनाची पावडर लावून मानाची चादर चढवण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या भाविकांना ट्रस्टच्या वतीने मलिदा आणि नानकटाईच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.

उरुसच्या कालावधीत रोज सायंकाळी सहा वाजता कुराण पठण करण्यात येणार असून साडेसहा वाजता दुवा पठण केले जाईल. हे सर्व कार्यक्रम फईम नसुमुद्दीन पिरजादे, अलीम रुकनुद्दीन पिरजादे, अन्सार खलील पिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून रोज सायंकाळी हाजी वसीम पिरजादे व हाफिज अंजुम पिरजादे यांच्याकडून दुवा पठण करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदी शंकराचार्य विलक्षण प्रज्ञावंत

$
0
0

लक्ष्मीकांत जोशी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोणताही समाज एका विचारधारेला मानतो. या विचारधारेतून समाजाचे विकसन होत असते. सनातन वैदिक धर्माची परंपरा आपल्याला लाभली आहे. परंतु, आदी शंकराचार्य हे केवळ धर्मप्रसारक नव्हते तर त्यांनी धर्म आपल्या आचरणात कसा आणावा याची दृष्टी दिली. विलक्षण प्रज्ञावंत असे त्यांचे व्यक्तित्व होते, असे प्रतिपादन लक्ष्मीकांत जोशी यांनी केले.

शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागाच्या वतीने आदी शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय जगद्गुरू आदि शंकराचार्य चरित्र निरुपण, चिंतनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेला बुधवारी प्रारंभ झाला. यावेळी लक्ष्मीकांत जोशी बोलत होते. श्रृती, स्मृती, सदाचार, आत्मज्ञान या आचार लक्षणांना आचार्यांनी व्यावहारिक रुप दिले. शंकराचार्य म्हणजे भगवान शंकराचा अंश होते. त्यांचे कुटुंब हे वैदिक परंपरांना मानणारे होते. भगवान शंकरानी शंकराचार्यांच्या आई-वडिलांना म्हटल्याप्रमाणे शंकराचार्य हे सर्वज्ञ होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांनी मल्याळम भाषेतील रामायणाचे वाचन केले होते, अशी माहिती जोशी यांनी दिली.

वेद, उपनिषदे याचा अभ्यासही लहान वयातच त्यांनी केला. वयाच्या आठव्या वर्षी चारही वेदांमध्ये आचार्य पारंगत होते. हे ज्ञान ते इतरांनाही देत. त्यामुळे गुरू वयाने लहान व शिष्य मोठे असे चित्र तेव्हा होते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जोशी यांनी शंकराचार्य यांच्या जीवनातील विविध बाबी उदाहरणासह स्पष्ट केल्या. ही तीन दिवसीय व्याख्यानमाला २० एप्रिलपर्यंत सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंब्याची निर्यातवारी लांबणीवर

$
0
0

एप्रिल अखेरिस अमेरिकासह युरोपात जाणार आंबा

म. टा. वृत्तसेवा, निफाड

परतीचा पाऊस, ओखी वादळाचा परिणाम यामुळे आंब्याचा मोहोर गळाल्याने गेल्याने उत्पन्नात ३० ते ३५ टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे या वर्षी निर्यातक्षम आंबे उपलब्ध न झाल्याने परदेशात निर्यात करण्याची प्रक्रिया १० ते १५ दिवस लांबणीवर पडली आहे.

कोकणातील हापूस आंबा सन २००७ पासून लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या माध्यमातून विकिरण प्रक्रिया करून अमेरिकेसह इतर युरोपीय देशात निर्यात केला जातो. मागील वर्षी ४ एप्रिलपासून १२ जूनपर्यंत निर्यात सुरू होती. यावर्षी मंगळवार, बुधवारपासून ही निर्यातीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन होते. परंतु निर्यातक्षम आंबे उपलब्ध नसल्याने या वर्षीची निर्यात १० ते १५ दिवस लांबणीवर पडली आहे. अवकाळी पाऊस व ओखी वादळाचा परिणाम झाल्याने आंब्याचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे या वर्षी निर्यात नियोजित वेळेत सुरू झाली नाही. मात्र २५ ते २६ एप्रिल दरम्यान ही प्रक्रिया सुरू होईल, असे लासलगाव येथील प्रक्रिया प्लांटचे मशिन ऑपरेटर असलेले संजय आहेर यांनी सांगितले.

परतीचा पाऊस, ओखी वादळामुळे बहुतेक ठिकाणी आंब्याच्या बागांना फटका बसला. खास करून कोकण पट्ट्यात या पावसाचा आणि वादळाचा विपरित परिणाम झाला. बहरलेली आंब्याची झाडे पावसामुळे झोडपली गेली. मोहोर गळून पडल्यामुळे फळधारणाही कमी झाली आणि त्याचे चक्रही बिघडले. त्यामुळे दरवर्षी एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात राज्यासह परदेशातील बाजारात 'गोडवा' पेरणारा आंबा यंदा अजून तयार झालेला नाही. साहजिकच निर्यातीवर त्याचा प्रतिकूल पिरणाम झाला असून, आंब्याची परदेशवारी जरा लांबणीवर पडली आहे. मात्र आता आंबा येत्या दहा त पंधरा दिवसात परदेशात निर्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच स्थानिक बाजारपेठेतही यामुळे आंब्याचा पुरवठा कमी झाला आहे. साहजिकच मागणी जास्त असल्याकारणाने आंब्याचे दरही वाढले आहेत. बुधवारी अक्षय्य तृतियेनिमित्त स्थानिक बाजारपेठेतही आंबा भाव खात होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोड रोमियोवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तरुणीचा वारंवार पाठलाग करून तिला फेसबुकवरून अश्‍लिल छायाचित्र पाठविणाऱ्या रोड रोमियोवर आडगाव पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. कुणाल प्रकाश रामराजे (वय २६, रा. देवळाली कॅम्प) असे या संशयिताचे नाव आहे.

नांदूर नाका परिसरात राहणाऱ्या युवतीचा कुणाल २१ मार्च ते १६ एप्रिल दरम्यान वारंवार पाठलाग करीत होता. त्यानंतर पीडित तरुणीच्या फेसबुक अकाउंटवर बनावट अकाऊंटद्वारे अश्‍लिल फोटो पाठवून त्याने शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइलच्या बनावट साहित्याची विक्री

विविध कंपन्यांच्या मोबाइलचे बनावट साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर सरकारवाडा पोलिसांनी फसवणुकीसह कॉपीराइट कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सरकारवाडा पोलिसांनी महात्मा गांधी रोडवरील चामुंडा आणि ओम साई मोबाइल शॉप या दुकानात मंगळवारी (दि.१७ ) दुपारी अडीचच्या सुमारास ही कारवाई केली.

चामुंडा मोबाइल आणि ओम साई मोबाईल शॉपमध्ये मोबाइलचे बनावट साहित्य विक्री केली जात असल्याची तक्रार मयूर राजेंद्र धुमाळ (वय २९, रा. कोल्हापूर) यांनी केली होती. त्यानुसार शहानिशा करून सरकारवाडा पोलिसांनी दोन्ही दुकानात छापा टाकून ९५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये मोबाइलचे डिस्प्ले, टचपॅड, बॅटरी, विविध ऍक्सेसरीजचा समावेश आहे. बनावट साहित्य कंपनीच्या कमी किंमतीत विक्री करून कंपनीसह ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी बाबुराव लाचाराम चौधरी (वय ३५, रा. उदय कॉलनी) व सुजरपाल सिंग स्वरुपसिंग राठोड (वय २८, रा. उदय कॉलनी) या दोघा दुकानचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तडीपार गुंडास अटक

जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले असतानाही विनापरवानगी शहरात वास्तव्य करणाऱ्या तडीपार गुंडाला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. पंकज मुरलीधर नरवाडे (वय ३०, रा. संत कबीरनगर) असे या संशयिताचे नाव आहे. पंकज यास दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तरीही तो संत कबीरनगर परिसरात फिरताना आढळून आला. गंगापूर पोलिसांनी मंगळवारी (दि. १७) सकाळी साडेआठच्या सुमारास त्याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोकाट गायींचा हल्ला, महिला जखमी

$
0
0

नाशिक: पाटील गार्डन येथे पाच ते सहा मोकाट गायींनी एका महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात सदर महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाशिकच्या पाटील गार्डन जवळील निरंजन पार्क मर्चंट बँकेसमोर हा प्रकार घडला. मर्चंट बँकेसमोरून जात असताना शोभा जोशी या महिलेवर समोरून आलेल्या पाच-सहा मोकाट गायींनी जोरदार हल्ला चढवला. त्यामुळे त्या रक्तबंबाळ झाल्या. शोभा जोशी यांच्यावर गायींनी हल्ला सुरू केल्याचं लक्षात आल्यानंतर प्रवीण खरात, अजय खरात, कल्पेश सोनावणे आणि राहुल विंचूरकर या चौघांनी जीव धोक्यात घालून शोभा यांचे प्राण वाचवले. त्यानंतर त्यांना पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मनपा आरोग्य विभागाचे डॉक्टर प्रमोद सोनावणे यांनी गायींच्या वाढत्या प्रादूर्भावाची नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. कलानगरमध्ये राहणारे चव्हाण यांच्या मालकीच्या या गायी असल्याचं सांगण्यात येतं.

63827632

बँकेसमोरून जात असताना आधी मला एका वासराने जोरात धडक दिली. त्यामुळे मी पडले आणि सावरून उठण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात पाच ते सहा गायी माझ्या अंगावर धावून आल्या आणि त्यांनी मला शिंगाने मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे मी जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे चार मुलांनी येऊन या गायींच्या हल्ल्यातून त्यांनी माझी सुटका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नीट’लाही परीक्षार्थींचा तपासणीशी सामना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कडक नियमावली लागू केल्याने जेईई परीक्षेला विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्यात आल्यानंतर आता 'नीट'साठीही विद्यार्थ्यांना तपासणीचा सामना करावा लागणार आहे. येत्या ६ मे रोजी सकाळी १० ते १ या वेळेत ही परीक्षा देशभरात पार पडणार आहे.

मेडिकल प्रवेशांसाठी 'सीबीएसई'कडून घेण्यात येणाऱ्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेसाठी मोठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ठराविक पद्धतीचाच पोषाख परिधान करण्याबरोबरच पेन, पेन्सिल, पाण्याची बाटली, शूज घालणे यावर बंदी घालण्यात आली आहे. हे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे.

मेडिकल कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीट ही परीक्षा देणे बंधनकारक आहे. दर वर्षी 'सीबीएसई'कडून ही परीक्षा घेण्यात येते. यंदा नीट परीक्षेचे अॅडमिट कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर परीक्षेसाठीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या कठोर नियमावलीमुळे विद्यार्थ्यांना 'नीट'चा अभ्यास करण्याबरोबरच परीक्षेला जाताना काय घालावे, याचा विचार करणेही आवश्यक झाले आहे. या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांचे कपडे हे फिकट रंगाचेच असावेत, मुलींच्या कपड्यांवर एम्ब्रॉयडरी नसावी, अर्ध्या बाह्यांचेच कपडे असावेत, अशा अनेक नियमांचा यात समावेश आहे. परीक्षेच्या तारखेत व वेळेत कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही, असेही 'सीबीएसई'कडून जाहीर करण्यात आले आहे. ५ जून रोजी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे

या वस्तूंना परवानगी

स्लीपर, कमी हिलची सॅण्डल्स, हाफ टी शर्ट, शर्ट, ट्राऊजर, जीन्स, नंबर असलेला चष्मा, सलवार, कुर्ती, टॉप (अर्ध्या बाह्या)

- -

या वस्तूंना बंदी

बूट, पूर्ण बाह्यांचा शर्ट, टी शर्ट, घड्याळ, ब्रेसलेट, बांगड्या, नेकलेस, चेन, हेअर क्लिप, मोठे रबर, साडी, बुरखा, टोपी, कुर्ता, पायजमा, गॉगल, स्टेशनरी, गॅजेट्स, पेन, पेन्सिल, पाण्याची बाटली, हॅण्डबॅग, दप्तर.

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’ची आज दुसरी लॉटरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रक्रियेची दुसरी लॉटरी शुक्रवारी (दि. २०) काढली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६ हजार ५८९ पैकी ३ हजार १ विद्यार्थ्यांची पहिल्या लॉटरीत निवड झाली होती. त्यापैकी २ हजार १८२ जागा भरल्या गेल्या आहेत. उर्वरित ४ हजार ४०७ जागांसाठी ही लॉटरी काढली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे.

आरटीई प्रक्रियेतून प्रवेशाविषयी तक्रारी असलेल्या पालकांचे दोन दिवस शिक्षण विभागाकडून तक्रार निवारण करण्यात आले. यामध्ये बागलाणमधील एक, नाशिक ग्रामीणमधील एक, येवल्यातील दोन आणि नाशिक शहरातील १५ अशा एकूण १९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्वांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आल्यानंतर दुसऱ्या लॉटरीचे नियोजन आखण्यात आले आहे. या लॉटरीमध्येही एक किलोमीटरच्या आतील अर्ज शिल्लक असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पहिल्या लॉटरीमध्ये भाग्यवान पद्धतीत क्रमांक काढले गेल्यानंतर आता एनआयसी पुणे यांच्याकडून संगणकीय लॉटरी पद्धतीने ही प्रक्रिया केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या भांडणातून कोयत्याने केले वार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सिन्नर फाटा येथील टपरीचालक गजानन साहेबराव थोरात (३४, रा. किसान चौक, एकलहरे रोड, नाशिकरोड) यांच्यावर बुधवारी (दि. १८) सायंकाळी कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा शेख, इरफान शेख आणि अक्षय नाईकवाडे अशी संशियतांची नावे आहेत. यांच्याव्यतिरिक्त अन्य दोघे आहेत.

दरम्यान, जखमी थोरात यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून गुरुवारी शुद्धीवर आल्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवित कोयत्याने हल्ला करणाऱ्यांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. फेब्रुवारी महिन्यात संशियतांचा गजानन थोरात यांचा भाऊ सुनील थोरात यांच्याशी वाद झाला होता. या वादात गजाननने मध्यस्ती करून वाद मिटवला होता. त्यानंतर बाबा शेख याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर बाबा शेख, इरफान शेख व अक्षय नाईकवाडे व त्यांच्या इतर दोन साथिदारांनी बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सिन्नर फाटा येथील पान स्टॉलवर गजानन यांच्यावर कोयत्याने हल्ला चढविला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. समाधान थोरात, अन्वर देशमुख यांनी जखमी गजानन यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या गुन्ह्यातील हल्लेखोर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

..

शेतकरी आत्महत्या;

संशयिताला कोठडी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शिंदे येथील पुरुषोत्तम आगळे या शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी भाऊसाहेब विठोबा देवकर याची कोर्टाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. भाऊसाहेब देवकर या शेतकऱ्याने शिंदे गावातीलच पुरुषोत्तम आगळे या शेतकऱ्याची चार एकर शेती आठ वर्षांपासून अर्ध्या वाट्याने करण्यासाठी दिलेली होती. परंतु, दोन वर्षांपासून भाऊसाहेब देवकर याने पुरुषोत्तमला जमीन कसण्याचा मोबदला दिला नव्हता.

त्यामुळे पुरुषोत्तम त्याच्याकडे मोबदल्यासाठी वारंवार मागणी करीत असे. सोमवारी (दि. १६) दुपारी चार वाजता भाऊसाहेब व त्याची पत्नी सविता देवकर या दोघांनी पुरुषोत्तमच्या घरी येऊन जमीन सोडून देण्यासाठी धमकावले. पुरुषोत्तम यांनी थकीत मोबदला मागितला असता भाऊसाहेब यांनी त्यास हातपाय तोडण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर आलेल्या नैराश्यातून पुरुषोत्तम यांनी त्याच रात्री आत्महत्या केली. पोलिसांनी भाऊसाहेब देवकर याला ताब्यात घेतले होते. त्याला नाशिकरोड न्यायालयात गुरुवारी हजर करण्यात आले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी प्रकरणी पाच जणांना बेड्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

भंगार बाजारातील दुकान हटविल्यानंतर नवीन जागा मिळवून देण्याचे सांगून दोघांकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका कथित पत्रकाराचा सहभाग असल्याचेही उघडकीस झाले असून, पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की नूर अली सादिक अली शेख (वय ६४, व्यवसाय- भंगार व्यापार) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे, की संशयित आरोपी महिला कथित पत्रकार अस्मिता रुपवते (२८, रा. पंचवटी) यांनी ओळख असल्याने मला कंपनी टाकण्यासाठी जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांना सिडकोतील उत्तमनगर येथील मैत्रिणीच्या घरी आणले. या ठिकाणी रुपवते घरातून बाहेर पडल्या त्याच वेळी संशयित आरोपी इम्रान मुनिर मनियार (२५), शाहारुख रमझान मनियार (२४), नदीम अन्वर मनियार (२२), वसीम सलीम शेख (२७) या चार जणांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी शेख व त्यांचे मित्र शब्बू खान यांना शिवीगाळ करून मारहाण केली व आरोपींनी त्यांचे चित्रीकरण करून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा दम देऊन सहा लाख रुपयांची खंडणी मागितली. यावेळी त्यांच्याकडून सुमारे तीस ते चाळीस हजार रुपये व मोबाइल काढून घेतले. उर्वरित रक्कम भंगार मार्केट येथून आणण्यासाठी शेख यांचा मित्र शब्बू व दोन संशयित गेले. भंगार मार्केट येथे तेथील व्यापाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी संशयितांना पकडले व पोलिसांना माहिती दिली. यादरम्यान उत्तमनगर येथे शेख यांना घरात दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत घरात डांबून ठेवले होते. या घटनेची माहिती पोलिसांना समजली याची कुणकूण इतर दोघांना लागली आणि ते फरार झाले. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने चारही संशयितांना मुंबई नाका परिसरातून ताब्यात घेत अटक केली. अंबड पोलिसांनी त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली. या घटनेतील पाचवी संशयित आरोपी कथित माहिला पत्रकार अस्मिता रुपवते यांना ताब्यात घेत अटक केली. पोलिस त्यांना आज, शुक्रवारी न्यायालयात हजर करणार आहेत. वरिष्ठ निरीक्षक कड यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विजय पवार तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेने होर्डिंग्ज हटविण्याची मागणी

$
0
0

जेलरोड : नाशिकरोड, जेलरोड, उपनगर परिसरात पुन्हा एकदा अनधिकृ होर्डिंग्ज लागले आहेत. अभिनंदन, जयंती, वाढदिवस आदींचे हे होर्डिंग्ज लावल्याने परिसर विद्रूप झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. होर्डिंग्जवरून वादही होत आहेत. महापालिका अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवीत आहे. मात्र, होर्डिंग्जकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार आहे. जेलरोडच्या प्रेससमोर, बिटको चौकात, जेलरोडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, नांदूर नाका, उपनगर सिग्नल, नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर चौक येथे ही होर्डिंग्ज लावलेली आहेत.

--

डीपीवरील फांद्या छाटल्या (फोटो)

जेलरोड : जेलरोड येथील सावरकरनगरमधील डीपीवर आलेल्या फांद्या अखेर छाटण्यात आल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार थांबले आहेत. येथील नागरिक अमोल पांडे, भास्कर गुरव, संदीप मुळाणे, गणेश गडाख आदींनी याबाबत तक्रार केली होती. फांद्या डीपीवर आल्याने घर्षण होऊन ठिणग्या पडत होत्या. त्यामुळे लहान मुले, नागरिक जखमी होण्याचा धोका होता. वीजपुरवठाही खंडित होत होता. आता फांद्या छाटल्याने धोका टळला आहे.

--

प्लास्टिक पिशव्यांचा वापर

जेलरोड : नाशिकरोडला दूधविक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतरही अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्यांमधून दूधविक्री होत आहे. अशा दूधविक्रेत्यांवर कारवाईसाठी गेलेल्या स्वच्छता निरीक्षकांना दूधविक्रेत्यांकडून मारहाणीचे दोन प्रकार झाले होते. दूधविक्रेत्याला अटक होऊन लगेच जामीनही मिळाला. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचले आहे. त्याचा गैरफायदा घेत दूधविक्रेते प्लास्टिक पिशव्यांतून कॅनॉलरोड, जेलरोड, देवळालीगाव, जत्रा चौक आदी ठिकाणी दूधविक्री करीत आहेत.

--

'बीजीव्हीएस'चे अधिवेशन

नाशिकरोड : भारत ज्ञानविज्ञान समुदाय या सामाजिक संघटनेचे नाशिक तालुका ग्रामीण अधिवेशन शनिवार (दि. २१) दुपारी ३ वाजता पळसे येथील संत आईसाहेब विद्यालयात होणार आहे. त्यास उपस्थित राहण्याचे आवाहन बीजीव्हीएसचे नानासाहेब सरोदे, सुनीता सिंग, नारायण जाधव, विजया बंदरे, जयदीप जोशी, प्रशांत धात्रक, सचिन टिळे, सतीश टिळे, उज्ज्वला कासार, योगिता कासार, कैलास पाटील, योगिता देवराळे, संजय जाट, धनंजय तुंगार, सागर ढेरिंगे, नितीन पाटील, संतोष सोनवणे आदींसह भारत ज्ञानविज्ञान समुदाय जिल्हा कमिटीने केले आहे.

--

सर्वाधिक प्रतिक्रिया मिळालेली बातमी

टेलरचा मुलगा बनला लखपती

केरळमधील टेलरचा मुलगा जस्टिन फर्नांडिस नागपुरात लखपती बनला आहे. नागपूर आयआयएमचा विद्यार्थी असलेल्या जस्टिनला १९ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजचा जॉब मिळाला आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राऊत यांनी घेतला आढावा

$
0
0

नाशिक : शहर शिवसेनेतील फेरबदलानंतर शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी नाशिकमध्ये येऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी राऊत गुरुवारी नाशिकमध्ये आले होते. यावेळी राऊत यांनी कार्यक्रम आटोपल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बंद दाराआड बैठक घेऊन संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. गतकाळात झालेल्या वादावरही चर्चा केली. महानगरप्रमुख पदावरील फेरबदल आणि शिवाजी सहाणे यांच्या हकालपट्टीनंतर झालेल्या आरोप प्रत्यारोपांबाबत झालेल्या डॅमेज कंट्रोलचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच येत्या काळात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकांच्या तयारीसंदर्भात त्यांनी चाचपणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगाव मार्गावरील चार लुटारू अटकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव-चाळीसगाव मार्गावर मंगळवारी (दि. १७) मध्यरात्री लुटमारीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुरुवारी येथील चार सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश आले.

भगवान सीताराम करगळ (रा. सवंदगाव), काळू तुकाराम शिंदे (रा. काजवाडे), विठोबा रामचंद्र वायकर, बबन चैत्राम महानोर, (दोन्ही रा. खालचे टिपे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघ संशयितांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून ३ दुचाकी, चोरी केलेले तीन मोबाईल, सोन्याचे मंगळसूत्र, रोख रक्कम असा एकूण १ लाख २६ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मालेगाव-चाळीसगाव मार्गावरून प्रवास करताना शहरातील ललवाणी दाम्पत्य, पिलखोड येथील शेख दाम्पत्य व अजून एका महिलेस मारहाण करून लुटमार केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. अवघ्या काही तासात एकाच मार्गावर असे हल्ले झाल्याने पोलिसांपुढे त्या हल्लेखोरांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले होते. या लुटमार प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अशोक करपे व पथकाने मिळविलेल्या गुप्त माहितीचे आधारे चौघा सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेदांच्या शेवटी आलेले तत्त्वज्ञान परमेश्वर मांडते

$
0
0

लक्ष्मीकांत जोशी यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रत्येक गोष्टीचा शेवट हा परमेश्वर असतो. अगदी वेदांच्या शेवटी आलेले तत्त्वज्ञान परमात्व तत्त्वाचे स्वरूप मांडते. आत्मानंद हा शेवटी महत्त्वाचा असून जे नाशिवंत धर्माचे आहे तेथे किती वेळ रहायचे हे आपण ठरवायचे असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध निरुपणकार व अभ्यासू लक्ष्मीकांत जोशी यांनी केले.

शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागातर्फे 'जगद्गुरू आदी शंकराचार्य - चरित्र, चिंतन व चार मठांची स्थापना' या विषयावर तीन दिवसांची व्याख्यानमाला सुरू असून गुरूवारी दुसऱ्या दिवसाचे पुष्प जोशी यांनी गुंफले. ते म्हणाले, की शंकराचार्य यांचे जीवन परमानंदाने व्यापलेले होते. त्यांना परमेश्वराची व्याख्या कळालेली होती. त्यामुळे त्यांनी पंचदेवता व पंचयज्ञाची संकल्पना मांडली. सूर्यादी देवता आणि पितृयज्ञाज्ञी कर्मे महत्त्वाची असून त्यामुळे चित्तशुद्धी होते. घरात कामे करीत असताना छोटे मोठे किडे मारले जातात. त्या दोषातून परिमार्जन होण्यासाठी ही कर्मे सांगितली आहेत. आनंदाच्या प्राप्तीसाठी चित्तशुद्धी अत्यंत गरजेची असते. विज्ञाननौका या स्तोत्रांमध्ये आठच स्तोत्र आहेत; परंतु त्यात आत्मशोधाचा भाग आलेला आहे. प्रपंचामध्ये आनंदाची व्याख्या संकुचित असते, आज मोठा आनंद मिळाला तर आपण लहान आनंदाला विसरून जातो. त्यामुळे निश्चित आनंदासाठी प्रयत्न करावे, असेही जोशी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संवैधानिक न्याय’वर आज व्याख्यान

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संगिनी महिला जागृती मंडळातर्फे आज, शुक्रवारी (दि. २० एप्रिल) डॉ. नरेंद्र दाभोलकर व्याख्यानमालेत 'संवैधानिक न्याय : सद्य:स्थिती आणि भविष्यातील दिशा' या विषयावर व्याख्यान होणार आहे. मु. शं. औरंगाबादकर सभागृह, परशुराम साईखेडकर नाट्यगृहामागे या ठिकाणी डॉ. संजय दाभाडे यांचे हे व्याख्यान सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे.

डॉ. दाभाडे हे दलित, आदिवासी अधिकार आंदोलनाचे राज्य कमिटी सदस्य, आरक्षण हक्क सरंक्षण समिती पुणेचे निमंत्रक, जनआरोग्य मंचाचे सदस्य, आदिवासी अधिकार मंचाचे राज्य कमिटी सदस्य, तर शिक्षण, आरोग्य, आरक्षण आणि अॅट्रॉसिटीज या विषयांवर काम करणारे, संशोधन करणारे कार्यकर्ते, लेखक आहेत. या व्याख्यानात ते अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये वेगवेगळ्या मार्गाने होत असलेली छेडछाड, एसएसी, एसटी, तसेच ओबीसींच्या शिष्यवृत्तीमध्ये सतत होत असलेली कपात आणि आरोग्यासारख्या मूलभूत सेवांचे छुप्या मार्गाने होत असलेले खासगीकरण याचा संशोधनात्मक अभ्यास, तसेच पुढील रणनीती मांडणार आहेत.

नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संगिनी महिला जागृती मंडळाच्या अध्यक्षा अनिता पगारे, शीतल पवार, कल्याणी ए. एम., जयंत बोरीचा आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला, नाशिकचे समन्वयक सचिन मालेगावकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनर्नियुक्ती नियमात दुरुस्तीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्यभरात ११ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. पुनर्नियुक्तीच्या नियमांमध्ये केलेला बदल दुरुस्त करावा, कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या मागण्यांसाठी महासंघाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात जिल्ह्यातील ९५० कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले असून १६ एप्रिलपासून जिल्हा परिषद समोर कामबंद आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान मागण्याच्या पूर्ततेसाठी आणि आंदोलन मागे घेण्यासाठी वित्त मंत्री, आरोग्यमंत्री, प्रधान सचिव, आयुक्त, आरोग्य सेवा, काही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासह राज्य संघटनेची बैठक बोलावण्यात आली. यावेळी आंदोलन मागे घ्यावे असे सूचित करण्यात आले. परंतु नियमित सेवेत रिक्त पदावर समायोजन आणि समायोजन होत नाही, समान काम समान वेतन या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील, असे राज्य संघटनेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कामबंद आंदोलनाकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी आणि संघटनेच्या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या शासनाने पूर्ण करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदेशी कंपन्या देशात गुंतवणुकीस सकारात्मक

$
0
0

सचिव डॉ. अरुणा शर्मा यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

उद्योग क्षेत्रास चालना देण्यासाठी केंद्र सरकारचे सुरू असणारे प्रयत्न आणि मेक इन इंडियासारख्या योजनांच्या परिणामी सद्यस्थितीत विदेशातील नामांकीत कंपन्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास सकारात्मक आहेत. सद्यस्थितीत या कंपन्यांशी प्रशासकीय स्तरावर आशावादी संवाद सुरू आहे. यासारख्याच प्रयत्नांचा प्रतिसाद म्हणून नाशिकमध्ये थिसेनक्रूपच्या माध्यमातून ३५ हजार टन क्षमतेचे सीआरजीओ ग्रेडचे स्टील उत्पादित होणार आहे. यासारख्या घडामोडींमुळे स्टील उद्योगाच्या क्षेत्रात दोन वर्षांपासून आशावादी पर्व सुरू असल्याची माहिती केंद्रीय स्टील मंत्रालयाच्या सचिव डॉ. अरुणा शर्मा यांनी दिली.

थिसेनक्रूप कंपनीच्या सीआरजीओ इलेक्ट्रिकल स्टील निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन डॉ. शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. आजमितीस स्टील उत्पादनाच्या स्पर्धेत भारताची दखल जागतिक स्तरावर घेतली जाते. अद्याप भारताचे स्थान काही वर्षांपासून पाचव्या ते सहाव्या स्थानावर आहे. पण केंद्र सरकारकडून या उद्योगास चालना देण्याचे प्रयत्न देशभरात सुरू आहेत. याच्या परिणामी भारत लवकरच स्टील उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावेल, असा विश्वासही डॉ. शर्मा यांनी व्यक्त केला.

भारतीय बाजारपेठेत सातत्याने कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेडची मागणी वाढते आहे. आजमितीस ४ लाख टन सीआरजीओ स्टीलची गरज देशाला आहे. नाशिकमधील या प्रकल्पामुळे यातील ३५ हजार एमटी क्षमता विकसित केले जाणे स्वागतार्ह असले तरीही एकूण गरज ही पूर्णत: भारतातच पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. देशात स्टील निर्मितीस चालना देणे म्हणजे सरकार स्टील इर्म्पोटच्या विरोधात असल्याचा अर्थ काढला जाऊ नये. सरकार इर्म्पोटच्या विरोधात नाही पण स्टील डम्पिंगला सरकारचा पूर्ण विरोध असेल, असेही त्या म्हणाल्या.

..

जमीन उपलब्धतेवर भर हवा

नाशिक परिसर हा शेती आणि सेवा क्षेत्रासोबतच उद्योगालाही अनुकूल आहे. कुठल्याही उद्योगांसाठी आवश्यक असे पोषक वातावरण येथे असले तरीही उद्योगांसाठी मूलभूत सुविधा आणि बिनाशेती जमिनीच्या उपलब्धतेसाठी सरकारच्या वतीने योग्य धोरणे आखली जाण्याची अपेक्षा थिसेनक्रूपचे व्यवस्थापकीय संचालक के. व्यंकटेशन यांनी व्यक्त केली. नव्या उद्योगांसमोर आवश्यक जमिनीचा प्रश्न मोठा असतो, असेही त्यांनी सांगितले.

टाटा स्टीलसोबत जॉईंट व्हेंचर शक्य

डिसेंबर २०१८ अखेर टाटा स्टीलसोबत जॉईंट व्हेंचर सुरू होण्याबाबत आम्ही आशावादी असल्याचे थिसेनक्रूप इलेक्ट्रिकलचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. जेन्स ओव्हेरॅथ यांनी सांगितले. नाशिकमध्ये सीआरजीओ इलेक्ट्रिकल स्टील निर्मितीत दरवर्षी ३५ हजार टन क्षमतेची वाढ थिसेनक्रूप करणार आहे. नाशिकमधील या प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ भारतच नव्हे तर भारताशेजारील श्रीलंका, थायलंड किंवा इंडोनेशियासारख्या देशांमधील बाजारपेठेवरही कंपनीचे लक्ष असणार आहे. आशिया ही आमच्यासाठी मोठी बाजारपेठ आहे. युरोपातील आमच्या एकूण उत्पादनापैकी १५ टक्के उत्पादन हे या भागात येते. यातही आशियात भारताची बाजारपेठ अतिशय मोठी आहे. यामुळेच हा प्रकल्प नाशिकमध्ये उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images