Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दिल्लीतील यश अण्णांचे; केजरीवालांचे नाही

$
0
0
दिल्लीतील यशानंतर देशभरात आम आदमी पार्टीची(आप) चर्चा असताना आपची लाट केवळ दिल्लीत असून ती महाराष्ट्रात टिकणार नाही असे मत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडले.

जिल्ह्यात राडा

$
0
0
कांद्याचे कोसळलेले बाजारभाव, महावितरणचा भोंगळ कारभार आणि हिन्दुस्थान एअरॉनॉटिक्स लिमिटेडची संशयास्पद भरती या सर्वांचे पडसाद सोमवारी जिल्ह्यात उमटले. त्यामुळेच जिल्ह्यात विविध ठिकाणी तीव्र आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली.

राजकीय टोलेबाजीत ‘आप’, मोदी लक्ष्य

$
0
0
नाशिकरोड येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाच्या सोहळ्याच्या निमित्ताने सोमवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले नाशिकमध्ये होते.

अंबड लिंकरोडवर भंगार गोदाम खाक

$
0
0
सातपूर अंबडलिंकरोड येथील भंगार मार्केटमधील एका गोदामाला सोमवारी अचानक आग लागली. आगीमध्ये भंगाराचे गोदाम जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे अग्निशामक विभागाकडून सांगण्यात आले. सातपूर अंबडलिंकरोड परिसरात अनेक वर्षांपासून भंगार बाजार आहे.

बिनपगारी फुल अधिकारी!

$
0
0
पिंपळगाव बसवंत ग्रामपंयातीत बेकायदापणे नक्की काय चालते आहे हे पाहताना, याठिकाणी चक्क पदावर नसतानाही अधिकार गाजविले जात असल्याची बाब उघडकीस येत आहे. त्यामुळेच एकाच जावक क्रमांकाखाली दोन सरपंचांनी बांधकाम नकाशाला मंजुरी देण्याचे ‘उद्योग’ केले आहेत.

जनलक्ष्मीतील संप बेकायदा

$
0
0
आर्थिक अडचणीत सापडलेल्या जनलक्ष्मी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप कामगार उपायुक्तांनी बेकायदेशीर ठरवल्याची माहिती बँकेचे संचालक उत्तम उगले यांनी दिली.

मनसेकडून सुरुवात... सेनेकडून शेवट

$
0
0
मराठीसह विविध मुद्द्यांवरून एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेना व मनसेच्या या राजकारणाचा आणखी एक नमुना सोमवारी पहायला मिळाला. एचएएलमधील(हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड) भरतीत स्थानिकांना डावलण्यात येत असल्याचा आरोप करत मनसे व शिवसेनेतर्फे सोमवारी एचएएलच्या व्यवस्थापनाला जाब विचारला.

वीज कोसळताच, ठिकाण समजणार

$
0
0
पावसादरम्यान कोसळणाऱ्या विजेची तीव्रता आणि योग्य ठिकाण शोधण्यासाठी आता अधिक कष्ट करावे लागणार नाहीत. कारण, भारतीय हवामान विभागाने नाशकात वीज शोधक (लाईटनिंग डिटेक्टर) लावले असून त्यामुळे नाशिकपासून २०० किलोमीटरचा परिसर त्याच्या टप्प्यात येणार आहे.

‘JEE मेन’च्या अर्जांसाठी उद्या अंतिम मुदत

$
0
0
एमटी सीईटी ऐवजी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या जेईई मेन या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी गुरुवार, २६ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून इंजिन‌ीअरींगच्या प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना आता ‘जेईई मेन’ला सामोरे जावे लागणार आहे.

नव्या वर्षाचा मुहूर्त फलदायी?

$
0
0
नाशिकच्या विकासाचा महत्त्वपूर्ण दुवा असणाऱ्या नाशिक-पुणे या हायवेला गेल्या अनेक वर्षांनंतर मुहूर्त लाभला आहे. काही महिन्यांपूर्वीच हे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, भूसंपादनाच्या प्रश्नावरून हे काम रखडले आहे. हायकोर्टाने स्थगिती उठविल्यानंतर आता हे काम नव्या वर्षाच्या प्रारंभी सुरू व्हायला हवे, तरच आगामी तीन वर्षात हा हायवे पूर्ण होईल.

‘मुकणे’ भागविणार भविष्याची तहान

$
0
0
जवाहरलाल नागरी पुनर्निर्माण योजनेने ना​शिकसह देशभरातील ६० पेक्षा जास्त शहरांचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. बकालवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या अनेक विकसनशील तसेच विकसीत शहरांसाठी ही योजना नवसंजीवनी ठरली.

ग्रेप हार्वेस्ट फेस्टिव्हल फेब्रुवारीत

$
0
0
इंडिया ग्रेप हार्वेस्ट वाइन फेस्टिव्हल येत्या फेब्रुवारीत घेण्यात येणार आहे. त्याची घोषणा केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार बुधवारी करणार आहेत. हा फेस्टिव्हल फेब्रुवारीत विंचूर वाइन पार्क येथे होणार आहे.

रस्त्याच्या कामांवर उद्या शिक्कामोर्तब

$
0
0
डिफर पेमेंटवर ठेकेदारांनी ‘अविश्वास’ दाखवल्यानंतर प्रशासनाने रस्त्याची कामे सिंहस्थ कुंभमेळा निधीतून करण्याचा निर्णय घेतला होता. सद्य:स्थितीत निव‌िदा प्रक्रिया पार पडल्याने पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाने तसा ठराव प्रशासनाने गुरूवारच्या स्थायी समितीसमोर ठेवला असून येत्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांचा जय हो !

$
0
0
दोन दिवसापासून टेन्शनफुल्ल वातावरण असलेल्या एचपीटीत मंगळवारी हशा, टाळ्यांची बरसात होत होती. निमित्त होते कॉलेजच्या सांस्कृतिक महोत्सवातून गायब झालेले 'डे' परत आल्याचे.

कांद्याला हमी भावासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको

$
0
0
बागलाण तालुक्यातील नामपूर उपबाजार समितीत मंगळवारी कांद्याचे भाव इतर बाजार समित्यांच्या तुलनेत पाचशे रुपयांनी घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा फेक करुन लिलाव बंद पाडले. संतप्त शेतकऱ्यांनी मालेगाव-अहवा राज्यमार्ग तब्बल तीन तास जाम केला.

छावाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध

$
0
0
अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे मंगळवारी नाशिक येथे केंद्र‌िय कृषिमंत्री शरद पवार यांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस प्रशासनाने सतर्कतेचा उपाय म्हणून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सभा संपेपर्यंत स्थानबद्ध केले होते. कळवण येथेही संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप पगार व त्यांच्या सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

आदिवासी महिलांनी फुलवली बीटी वांग्यांची शेती

$
0
0
कळवण तालुक्याच्या आठबे परिसरातील आदिवासी कष्टाळू शेतकरी महिलांनी आपल्या शेतात दहा गुंठ्याच्या क्षेत्रावर बीटी वाणाच्या वांग्यांचे पिक यशस्वीरित्या घेतले आहे. भरीताच्या या वांग्यांना नाशिक, दिंडोरी, सुरत, कळवण परिसरातून मोठी मागणी मिळत असतून खरेदीदार थेट आठबे गावाकडे धाव घेत आहेत.

सिन्नर पाणी पुरवठा योजनेला मंजुरी

$
0
0
सिन्नर शहरातील नागरिकांसाठी चोवीस तास पाणी पुरवठ्याची योजनेस राज्य व केंद्र शासनाची प्रशासकीय मंजुरी दिली असून, कडवा धरणातून सिन्नर शहरापर्यंत पाइपलाइनद्वारे हे पाणी येणार असल्याने यासाठी ६६.७२ लाख रुपये खर्चाच्या योजनेस विशेषबाब म्हणून मान्यता मिळाल्याचे तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनो, मी तुमच्या पाठीशी

$
0
0
‘कांद्याचे भाव वाढले आणि कोसळले तरी मलाच जबाबदार धरले जाते. एवढेच नाही तर जेवढे प्रश्न निर्माण होतात ते मीच सोडवले पाहिजे, अशी सर्वांची अपेक्षा असते हे चित्र बदलले पाहिजे.’ असे मत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी नांदगाव येथे केले. शेतकऱ्यांनी मला साथ द्यावी, मी नक्की पाठीशी उभा राहीन, असेही विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

माळवाडीची शाळा झाली सुरू

$
0
0
देवळा तालुक्यातील माळवाडी येथील महात्मा फुले हायस्कूलच्या वादग्रस्त शिक्षकाबरोबर त्या शिक्ष‌िकेचीही उचलबांगडी करण्याचा पर्याय संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांपुढे ठेवला. हा पर्याय मान्य झाल्याने विद्यार्थ्यांनी बंद आंदोलन मागे घेत मंगळवारपासून शाळा पूर्ववत सुरु झाली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images