Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वोक्हार्टच्या टीमने केली दुर्मिळ आजारापासून मुक्तता

$
0
0
दिवसेंदिवस मेडिकल टेक्नोलॉजी इतकी बदलली आहे की, असाध्य आजारांचे निदान होऊ लागले आहे. त्यामुळे पेशंटचे जीव वाचतातच शिवाय त्यांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळून जाते, असे मत वोक्हार्ट हॉस्पिटलचे डॉ. अतुल वडगावकर यांनी व्यक्त केले.

‘MBA’ निकालाबाबत आंदोलनाचा इशारा

$
0
0
‘एमबीए’च्या ऑनलाइन परीक्षेतील अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होत असल्याने विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी मनविसेचे शहर उपाध्यक्ष अजिंक्य गिते यांनी विद्यापीठाकडे केली आहे.

ग्रंथपालांबाबत दिरंगाई का?

$
0
0
राज्यभरात काम करणाऱ्या पदव‌ीधर ग्रंथपालांना जीआरनुसार प्रशि‌क्षित पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात सरकार दिरंगाई का करत आहे? असा प्रश्न उपस्थित करत सोमवारी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले.

रिक्षा-टॅक्सीचालकांसाठीही ‘कामगार कल्याण’

$
0
0
‘राज्यातील असंघट‌‌ीत कामगारांच्या विकासासाठी स्थापना करण्यात आलेल्या कामगार कल्याण मंडळात आता रिक्षाचालक, टॅक्सीचालक आणि शेतमजूरांनाही सहभागी केले जाणार आहे.’ असे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी केले.

पार्किंगचा वनवास संपणार केव्हा ?

$
0
0
शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या ठक्कर बसस्थानकात सध्या पार्किंगची समस्या दत्त म्हणून उभी आहे. बसस्थानकात खासगी वाहने आणू नका असे महामंडळाने म्हणायचे. आमच्या आस्थापनांसमोर वाहने उभी करू नका असे म्हणून व्यावसायिकांनीही त्यांची हेटाळणी करायची, असे प्रकार नेहमीच घडत आहेत.

आजचा पेट्रोलपंप बंद मागे

$
0
0
पेट्रोल आणि डिझेलवरील कमिशन वाढवून मिळावे यासाठी पेट्रोलपंपचालकांच्या सीआयपीडी या संघटनेने आज पुकारलेला लाक्षणिक संप मागे घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयातर्फे कमिशन वाढीची मागणी मान्य करण्यात आल्यामुळे हा संप मागे घेण्यात आल्याची माहिती नाशिक पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे सचिव विजय ठाकरे यांनी दिली.

दिवाळीतील सुट्ट्यांचा एलबीटीला फटका

$
0
0
महिंद्रासह मायको व इतर मोठ्या कंपन्यांना नोव्हेंबर महिन्यात दिपावलीच्या काळात आठ ते दहा दिवसांच्या सुट्ट्या मिळाल्या होत्या. या सुट्ट्यांचा सर्वाधिक फटका स्थानिक संस्था कराच्या वसुलीला (एलबीटी) बसला आहे. सरासरी वसुलीचे प्रमाण पाहता डिसेंबर महिन्यात किमान ७ कोटी रूपयांच्या उत्पन्नाला महापालिकेला मुकावे लागले आहे.

'डे'ज आमच्या हक्काचेच

$
0
0
वर्षभर लेक्चर, प्रॅक्ट‌िकल व असाईनमेंटमध्ये गुंतलेल्या कॉलेजियन्ससाठी कॉलेजात साजरे केले जाणारे विविध 'डे' म्हणजे उत्साह आणि आनंदाची पर्वणी. कॉलेजमधील सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत 'टाय अॅन्ड सारी डे', 'ट्रॅडिशनल डे', कल्चरल 'डे'सारखे विविध 'डे' साजरे केले जातात. मात्र, शहरातील एचपीटी आणि आरवायके कॉलेजने आपल्या यंदाच्या सांस्कृतिक महोत्सवातून 'डे'ज वगळले आहेत.

ट्रान्सफॉर्मर १.५ महिन्यांत चौथ्यांदा नादुरुस्त

$
0
0
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील उंबरदरी धरणाजवळील ट्रान्सफॉर्मर दीड महिन्यात चौथ्यांदा नादुरुस्त झाला असून, वेळेवर बीले भरूनही तो बदलून मिळत नसल्याने येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

नुकसानग्रस्त शेतक-यांसाठी १.२५ कोटी रुपये मंजूर

$
0
0
गेल्या वर्षी झालेल्या बेमोसमी गारपिटीने कांदा, बटाटा, टमाटा, द्राक्ष या पिकाचे व रोपांचे प्रचंड नुकसान होऊन कर्जबाजरी झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने कळवण तालुक्यातील एक कोटी पंचवीस लाख रुपये मजूर केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा यांनी दिली आहे.

मनमाडला रास्ता रोको

$
0
0
मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याचे भाव अचानक कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन मनमाड-मालेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. कांद्याचे दर असेच राहिल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

लासलगाव बाजार समितीत ३ तास लिलाव बंद

$
0
0
कांद्याचे किमान बाजारभाव एक हजार रुपयांच्या आत आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव सोमवारी बंद पाडले. तसेच, शेतकऱ्यांनी यावेळी तीव्र रोष व्यक्त केला. अखेर शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तीन तासांनी लिलाव पुन्हा सुरु झाले.

कांदा उत्पादकांचा जिल्हाभरात राडा!

$
0
0
केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य ३५० डॉलर केल्यानंतरही शुक्रवारी बाजारभावाच्या तुलनेत पाचशे रुपयांनी कांद्याचे भाव कोसळल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सटाणा, देवळा आणि उमराणे येथे सोमवारी लिलाव बंद पाडले.

सिंहस्थ निधींच्या कामांना भूमिपुजनाची प्रतीक्षा

$
0
0
डीफर पेमेंटच्या निविदांकडे ठेकेदारांनी पाठ फिरवल्यानंतर प्रशासनाने सिंहस्थ निधीतून रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भातील निविदा प्रक्रीया पार पडल्या असून रस्त्यांच्या कामांना भूमिपुजनाची प्रतिक्षा असल्याचे सांगितले जात आहे.

मोटार अपघाताची ११ प्रकरणे निकाली

$
0
0
जिल्हा विधी सेवा केंद्र आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी मोटार अपघात नुकसान भरपाईची दाखलपूर्व ११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये तक्रारदारांना २६ लाख १२ हजारांची भरपाई मिळवून देण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा केंद्राचे सचिव आर. आर. पठारे यांनी दिली.

सन्मानासाठी सैनिक वारसच नाही

$
0
0
पहिल्या महायुद्धात इंग्रज सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या वीर सैनिकांच्या वारसांचा १०० वर्षांनी शोध घेण्यात येत असला तरी नाशिक जिल्ह्यात सन्मानासाठी एकही सैनिक किंवा त्यांचा वारस नसल्याचे स्पष्ट होत आहे.

नगरस​चिव कार्यालयातील १८ कर्मचा-यांच्या बदल्या

$
0
0
महापौर कार्यालयातंर्गत येणाऱ्या नगरसचिव कार्यालयातील वर्षानुवर्षे मुक्काम ठोकलेल्या १८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात शिपाई तसेच लिपीक वर्गातील कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे.

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या परवानगीसाठी आजची मुदत

$
0
0
नववर्षच्या स्वागतासाठी येत्या ३१ डिसेंबरला आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांसाठी परवानगी घेण्याची जिल्हा प्रशासनाने हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट आणि बार मालकांना दिली आहे. या परवानगीसाठीचे अर्ज सादर करण्यासाठी आजचीच (२४ डिसेंबर) मुदत देण्यात आली आहे.

वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

$
0
0
वाडीव-हे आणि दिंडोरी येथे सोमवारी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. वाडीवऱ्हे येथे महिंद्रा पिकअप मोटारीतून पडल्याने अंकुश बुधा वारघडे (१०, रा. गडगडसांगवी) हा मुलगा सकाळी साडेदहाला गंभीर जखमी झाला.

रंगली राजकीय टोलेबाजी

$
0
0
सतत एकमेकांना कोंडीत पकडणारे शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय व मनसेचे नेते एकाच व्यासपीठावर आल्यावर वक्त्यांमध्ये कसा कलगीतुरा रंगतो याचा प्रत्यय सोमवारी नाशिककरांना आला. नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित केला होता.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images