Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सरकार चालवणे अवघडच!

$
0
0
केवळ दहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाने दिल्लीत काँग्रेसला धूळ चारली आणि वर त्यांच्याच पाठिंब्याने सरकार स्थापन केले पक्षाचे प्रणेते अरविंद केजरीवाल यांना त्याचे श्रेय जाते. काँग्रेसला धूळ चारल्यामुळे तो पक्ष पाठिंबा देत आहे, मात्र हा पक्ष केजरीवाल सरकार सहजासहजी चालू देणार नाही.

अखेर डेंग्यूला लगाम

$
0
0
मागील पाच महिन्यांपासून शहरात तळ ठोकून बसलेल्या जीवघेण्या डेंग्यू आजाराला डिसेंबरमध्ये लगाम बसल्याचे दिसत आहे. या महिन्यात अवघ्या सहा जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला असून मागील महिन्याच्या तुलनेत पेशंटची संख्या ३९ने घटली आहे.

चार्वाक चौक रस्ता होणार रूंद

$
0
0
अनेक वर्षांपासून रूंदीकरणाच्या प्रतीक्षेत असलेला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते चार्वाक चौक हा डीपी रस्ता रूंद होण्याची चिन्हे आहेत. रूंदीकरणात जाणारी पक्की बांधकामे महापालिका प्रशासनाने बांधून द्यावीत, अशी मागणी संबंधित जागामालकांनी केली आहे.

बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाही बिनदिक्कतच

$
0
0
बांधकामाचा परवाना दिल्यानंतर संबंधित काम पूर्ण झाल्याचा दाखला देण्याच्या बाबतीतही पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे कामकाज ‘आदर्श’च आहे. अवघ्या दोन ओळींच्या अर्जावरच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जात असल्याने नियमानुसार बांधकाम होण्याची अपेक्षा फुकाचीच असल्याचेही दिसून येत आहे.

एसटीचा तक्रार दिन कागदावरच!

$
0
0
प्रवासी सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी एसटी महामंडळाने सर्व विभागीय कार्यालये तसेच आगारांना काही उद्दीष्ट ठरवून दिली खरी; परंतु त्यानुसार काम होत नसल्याचे प्रत्ययास येत आहे. या मंगळवारीही एसटीचा नाशिकमध्ये तक्रारदिन होऊ शकला नाही.

वसुली अधिकाऱ्यास अटक

$
0
0
गृहकर्ज फिटल्याचा दाखला देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह हाउसिंग फायनान्स कॉरपोरेशनच्या नाशिक विभागाच्या विशेष वसुली अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पकडले.

प्रदूषण: फैसला जानेवारीत

$
0
0
गोदावरी नदीच्या प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या विविध सरकारी यंत्रणांसह नाशिक महापालिकेच्या कारभाराची दखल घेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई हायकोर्ट ठोस आदेश देणार आहे.

नव्या वर्षात नवे कुलसचिव

$
0
0
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान व‌िद्यापीठाच्या कुलसच‌िवांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने विद्यापीठाने आता या पदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केला आहे. विद्यापीठातील पदांच्या रचनेनुसार या त‌िसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वाच्या पदासोबतच अर्थ आण‌ि वित्त अध‌िकाऱ्यांचाही शोध विद्यापीठाने सुरू केला आहे.

जिल्ह्यातील ७०० वाहने बेपत्ता

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून आठ वर्षांत चोरीस गेलेल्या वाहनांपैकी सुमारे ७०० वाहने शोधण्यात पोलिसांना यश येऊ शकलेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या लेखी ही वाहने ‘बेपत्ता’ ठरली असून ती शोधण्याचा खटाटोपही बंद केल्यासारखाच आहे.

संख्या कमी, कर्तृत्व अधिक

$
0
0
आमचा पक्ष नवा आहे, मात्र आमचे कार्यकर्ते गावागावात असल्याचे सांगत लोकसभेत आमची संख्या कमी असली तरी आम्ही कर्तृत्वाने व गुणाने अधिक आहोत, असे मत केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.

भारतासाठी मत मागणार- पवार

$
0
0
'कधीकाळी देशात ईस्ट इंडिया कंपनी होती, मात्र स्वातंत्र्यसैनिकांनी ती देशाबाहेर फेकली. आज पुन्हा कुणी इंडियासाठी मत मागणार असेल तर, त्यांचा विचार देशाला मागे नेणारा आहे. त्यामुळे आम्ही इंडियासाठी नव्हे तर भारतासाठी व भारतीयांसाठी मत मागणार', असे म्हणत केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री तथा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

चार्ली चॅप्लीनच्या हसऱ्या दु:खाने रसिक भारावले

$
0
0
चार्ली चॅप्लीनच्या आईला गाण्याची आवड होती. परंतु आवाज गेल्याने ती गाऊ शकली नाही. तिची ही खंत चार्ली चॅप्लीनने बालपणीच ओळखली. तो गाणे गाऊ लागला. हसून दु:ख पचविण्याची कला अवगत असलेल्या चार्ली चॅप्लीनने आपल्या अनोख्या कलेद्वारे जगाला हसविले.

शहरात तीन बसेसची तोडफोड

$
0
0
शहरात मंगळवारी दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास तीन बसेसची तोडफोड करण्यात आली. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा नाशिक दौऱ्याला विरोध दर्शविण्यासाठी अज्ञात समाजकंटकांकडून बसेसची तोडफोड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

एव्हरेस्ट मोहिम म्हणजे क्षमतेचा कस

$
0
0
‘एव्हरेस्ट सर करण्याचा अनुभव आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या अनुभवांपैकी एक होता. ही मोहिम म्हणजे तुमच्या क्षमतेचा कस असते’, असे मत एव्हरेस्टवीर डॉ. मुराद लाला यांनी व्यक्त केले. इंडियन मेड‌िकल असोसिएशनच्या नाशिक शाखेला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते.

वीज ग्राहकांसाठी हेल्पलाइन

$
0
0
महावितरण कंपनी वीज सेवेत अनेकदा ग्राहकांना विविध समस्या आणि अडी-अडचणींना सामोरे जावे लागते. त्याची दखल आता थेट वीज कामगार महासंघानेच घेतली आहे. वीज ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचा निर्णय महासंघाने घेतला असून ती लवकरच कार्यन्वित होणार आहे.

स्पर्धा आयोजनातली ‘राजेशाही’ खेळात होणार का?

$
0
0
राज्याचे क्रीडाधोरण जसे चर्चेत आले, तसे आता महापालिकेच्या क्रीडा धोरणाची चर्चा नाशिककरांमध्ये सुरू झाली आहे. शहराला जशा वीज, पाणी, रस्ता या मूलभूत गरजा आवश्यक आहेत, तशा खेळाच्या मुलभूत गरजा महापालिका खरंच सोडवणार आहे का, असा प्रश्न संघटनांमध्ये उपस्थित होत आहे.

महिलांच्या रोजगारासाठी ५ कोटी

$
0
0
शहरी भागातील महिला व मुलींना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेतर्फे तब्बल पाच कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ही योजना राबवण्यात येणार असून यापूर्वी सुवर्ण जयंती रोजगार योजनेत झालेला गोंधळ यापुढे होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नाशिककर अनुभवणार ‘७ डी’ची धमाल

$
0
0
थिएटरमध्ये चित्रपटात फेकलेले हत्यार आपल्या अंगावर येते की काय असा इफेक्ट देणाऱ्या ‘थ्रीडी’ फिल्मस आता नवीन राहिलेल्या नाहीत. परंतु या तंत्रज्ञानाचा पुढचा टप्पा गाठत नाशिकमधील ‘५ डी सिनेमा’ने ‘थ्रीडी’, ‘५डी’नंतर आता ‘७ डी’ तंत्रज्ञान नाशिककरांच्या भेटीला आणले आहे.

शहराला जननी-शिशु सुरक्षेचे कवच

$
0
0
माता व बालक यांची आरोग्य विषयक विशेष काळजी घेऊन त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेली जननी शिशु सुरक्षा योजना जानेवारी महिन्यात महापालिका क्षेत्रात देखील लागू होणार आहे. यासाठी पाच कोटी रूपये खर्चाची तरतूद करण्यात आली असून महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे.

....तरीही नशिबी न्यायाची प्रतीक्षा

$
0
0
सलग सहा दशकांपासून सेवेचा आदर्श न‌िर्माण करणारा नाश‌िककरांचा ‘आधाराश्रम’ उच्च सेवामूल्यांमुळे राष्ट्रीय स्तरावर नुकताच पोहचला आहे. तरीही, राज्य सरकारच्या चमत्कारीक भूम‌िकेमुळे या संस्थेच्या मान्यताप्राप्त दोन श‌िशुगृहांपैकी एका श‌िशुगृहाची ग्रॅण्ट तीन वर्षांपासून खोळंबली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>