Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

प्रदर्शनातून घडली नोटांची सफर

$
0
0

वेलकम सहकार्य मित्रमंडळाकडून आयोजन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

प्रजासत्ताक दिनानिमित्त 'नाणे, स्टॅम्पस व नोटांचे' प्रदर्शन आयोजित केले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी चार हजार विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थिती लावली. या अनोख्या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध देशातील सफर पासपोर्टशिवाय करण्याचा आनंद बघणाऱ्यांनी घेतला.

येथील वेलकम सहकार्य मित्रमंडळाने आयोजित केलेल्या प्रदर्शनात लिबेरिया देशाचे बोलणारे नाणे तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधील जगातील सर्वात मोठ्या झिम्बाबे या देशाची १०० ट्रिलियन डॉलर्सची नोट हे खास आकर्षण ठरले. त्याचबरोबर कझाकच्या स्टॅम्पवर शंकर पार्वती, जर्मनीच्या स्टॅम्पवर देवी, इंडोनेशियाच्या नोटेवर गणपती-सरस्वतीचा फोटो, कॅनडातील चलनात वापरले जाणारे रंगीत नाणे, मॉन्टेसरी यांचे छायाचित्र असलेली इटलीची नोट, छत्रपती शिवाजी महाराज, अकबर व औरंगजेब यांच्या कारर्किदीतील नाणी बघून नागरिक व विद्यार्थी भारावून गेले.

मुंबई येथील संजय जोशी यांनी या स्टॅम्प आणि नोटांचा संग्रह केला असून, त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली. महात्मा गांधींचा फोटो हा केवळ भारत देशातील नोटा व स्टॅम्पवर नसून, तो आणखी इतरही ११० देशांच्या स्टॅम्पवर आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमास आमदार जयंत जाधव, देवयानी फरांदे, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, वसंत गिते, अजय बोरस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जॉगर्स करणार गोल्फ क्लबची स्वच्छता

$
0
0

महिन्यातून एकदा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेला सहकार्य व्हावे यासाठी महिन्यातून किमान एकदा गोल्फ क्लब मैदानाची स्वच्छता करण्याचा निर्णय जॉगर्सने घेतला आहे. विविध संघटनांना एकत्रित घेऊन गुरुवारी (दि. २५)गोल्फ क्लब स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर दरमहा एकदा स्वच्छतेचा ठराव करण्यात आला.

नाशिक येथील कौशल्य फाउंडेशन, जॉगर्स क्लब, मोरया क्लब, रोटरी क्लब या तिन संस्थांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. त्यास सुजाण नागरिक मंच, जय बजरंग क्लब, गाडगेबाबा क्लब, योगा क्लब,जेष्ठ नागरिक संघटना, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, जैन युथ क्लब, निपम, जैन ग्रुप या संघटनांचे सहकार्य लाभले. या स्वच्छता अभियानात शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. यामध्ये डॉक्टर्स, वकील, इंजिनीअर्स, एच. आर. प्रोफेशनल, उद्योजक, कामगार, उच्च पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. कौशल्य फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीधर व्यवहारे, मोरया क्लबचे अध्यक्ष मोहन सुतार, भगवान पाटील, दीपक काळे, दिलीप पाटील, कृष्णा नागरे, जय बजरंग ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेव मथुरे, अतुल खाकरीया, मुश्ताक बागवान, जयंत खैरनार यांच्या हस्ते विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडई अडकली अतिक्रमणात

$
0
0

मंडई अडकली अतिक्रमणात

सातपूरच्या मार्केटमधील गाळ्यांचे झाले गोडाऊन; चौकांचा श्वास कोंडला

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेत प्रशासकीय व्यवस्था असताना सातपूरला छत्रपती शिवाजी भाजी मंडईची उभारणी केली होती. गाळेधारक व भाजीपाला विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था मंडईत करण्यात आल्याने शहरातील ग्राहक खरेदीसाठी सातपूरला नेहमीच गर्दी करतात. परंतु, कालांतराने वाढलेल्या लोकसंख्येमुळे मंडईच्या बाहेर अतिक्रमण वाढले. यामुळे मंडईला अवकळा सुरू झाल्या असून, चौकांचाही श्वास कोंडला गेला आहे.

सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी मंडई अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेली पहायला मिळत आहे. महापालिकेने गाळेधारकांच्या मागणीनुसार नवीन गाळे पहिल्या मजल्यावर उभारले होते. मात्र या गाळ्यांमध्ये पहिल्याच गाळेधारकांनी गोडाऊन सुरू केले आहेत. त्यातच स्वच्छता केली जात नसल्याने नेहमीच मंडईत येणाऱ्या ग्राहकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने मंडईत बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांसाठी उन्हात बसावे लागू नये, याकरीता डोम उभारण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. याकडे महापालिकेने आजही दुर्लक्ष केल्याचे चित्र पहायला मिळते. विशेष म्हणजे, हॉकर्स झोनची जागा महापालिकेने दिल्यावरदेखील अतिक्रमणधारक मुजोरगिरी करत असल्याचे सातपूरकरांचे म्हणणे आहे.

अतिक्रमण कधी हटविणार?

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीसाठी शेतकऱ्यांनी हजारो एकर शेतजमिनी दिल्या होत्या. शहराची वाढती लोकसंख्या बघता महापालिकेने प्रशासकीय काळात सन १८८५ साली सातपूर गावात छत्रपती शिवाजी मंडई बांधली होती. यामध्ये तब्बल ६२ गाळे व भाजीपाला विक्रेत्यांसाठी ओटे उभारण्यात आले. सुंदर असलेल्या छत्रपती भाजी मंडईत शहरातील ग्राहक आवडीचे पदार्थ व भाजीपाला घेण्यासाठी ग्राहकांची पसंती होती. कालांतराने वाढलेल्या लोकवस्तीत सातपूर गावात असलेल्या शिवाजी मंडईला अतिक्रमणाचा सिलसिला सुरू झाला. यानंतर महापालिकेने २००३ मध्ये मंडईलीत गाळ्यांवर मजला उभारत ६५ नवीन गाळे तयार केले. मात्र या गाळ्यांना योग्य जाण्याची व्यवस्थाच नसल्याने केवळ गोडाऊनसाठीच वापर होत असल्याचे चित्र आहे. न्यायालयाच्या आदेशावरून हॉकर्स झोनसाठी ठिकठिकाणी महापालिकेने जागा दिली असताना सातपूरच्या शिवाजी मंडई बाहेरील अतिक्रमण कधी हटविणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पुतळ्याला टपरीधारकांचा वेढा

सातपूर गावात महापालिकेने छत्रपती शिवाजी मंडईची उभारणी केली होती. यानंतर शिवाजी महाराजांचा पुर्णकृती पुतळा मंडईच्या बाहेर बसविण्यात आला. सद्यस्थितीत मंडईच्या बाहेर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला टपरीधारक व फळ विक्रेत्यांनी वेढा घातलेला दिसतो. याबाबत स्थानिक नगरसेवक तसेच नागरिकांनी वेळोवळी अतिक्रमण हटविण्याची मागणी करूनदेखील याकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शौचालयांची दुरवस्था

शिवाजी मंडईत शौचालयांची अत्यंत दुरवस्था झाली असून, स्वच्छतेसाठी पाण्याची व्यवस्थाच नसल्याने दुर्गंधीच्या त्रास नेहमीच व्यावसायिकांनी सहन करावा लागतो. शौचालयात पाण्याची योग्य व्यवस्था उपलब्ध करावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. शिवाजी मंडईच्यावर उभारण्यात आलेल्या ६५ गाळ्यांचा लिलाव अगदी कमी दरात झाला होता. खाली व्यावसाय करणाऱ्यांनीच वरील गाळे घेतले. या गाळ्यांमध्ये जाण्यासाठी योग्य जागाच नसल्याने अनेकांनी गोडाऊन तयार करीत माल ठेवण्याची व्यवस्था केली आहे. मंडईच्या वरील भागात केवळ गाळ्यांचे गोडाऊन झाल्याने मद्यपींचे रोजच अड्डे भरत असतात. अनेकदा सातपूर पोलिसांकडून मद्यपींवर कारवाईदेखील केली जाते. यानंतर पुन्हा मंडईच्या टेरेसवर मिळेल त्याठिकाणी मद्यपींचे अड्डे भरत असतात.

पायऱ्यांवर घाणीचा त्रास

महापालिकेने भव्य उभारलेल्या शिवाजी मंडईच्या गाळ्यांवर जातांना पाय-यांवरच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गाळेधारक व भाजीविक्रेते नको असलेल्या वस्तू पाय-यांवर ठेवत असल्याने घाण, कचरा नेहमीच साजलेला असतो. महापालिकेला वेळेवर कर देऊनदेखील स्वच्छता केली जात नसल्याचे गाळेधारकांचे म्हणणे आहे.

महापालिकेने सुंदर असे शिवाजी मंडईची उभारणी केली होती. परंतु, मंडईच्या बाहेरच अतिक्रमण वाढल्याने येणाऱ्या ग्राहकांना वाहने लावण्यासाठी जागाच राहिली नसल्याने व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे महापालिकेने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची गरज आहे.

-शंकर पाटील, अध्यक्ष, छत्रपती शिवाजी मंडई

सातपूर गावातील शिवाजी मंडईबाहेरील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामस्थांना सोबत घेत महापालिकेकडे निवेदन सादर केले. यानंतर अतिक्रमण मोहीम महापालिकेने हाती घेतली असे असताना आजही गावाच्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याने याकडे महापालिका आयुक्तांनीच लक्ष दिले पाहिजे.

-सीमा निगळ, नगरसेविका प्रभाग ११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंगसा... तुला रामाची शपथ! …

$
0
0

जितेंद्र तरटे

jitendra.tarte@timesgroup.com

--
माणूस जो शकून किंवा अपशकून निसर्गातल्या चिन्हांमध्ये शोधत फिरतो अन् सोयीनुसार ही चिन्ह स्वीकारतो, त्याच्या या अप्पलपोट्या वृत्तीवर संत कबीरांची परखड वाणी प्रहार करते....

गावकुंसाकडे जाणाऱ्या एखाद्या निर्जन पायवाटेच्या दुतर्फा पसरलेल्या दाट झाडीतून एखाद्या दुपारी दोन वीतभर लांबीचं मुंगूस मुखदर्शन देऊन चपळाईन झाडांच्या दाट सावलीत पसार व्हायचं. त्यावेळी त्या पायवाटेवरून जाणाऱ्या प्रवाशाच्या तोंडातनं सहज शब्द बाहेर पडायचे, 'मुंगसा, मुंगसा तोंड दाखव, तुला रामाची शपथ'.

आता पायवाटेनं आपल्या मार्गाला जाणाऱ्या वाटसरूचं मुंगसाचं तोंड पाहण्यापासून काय अडलं, अगदी त्यासाठी त्याने त्याला थेट रामाची शपथ का बरं घालावी, असे प्रश्न मोठ्यांची कृती बघून त्यावेळी लहानांनाही पडायचे. पण, निसर्गातल्या विविध प्रतीकांभोवतीही मानवी मनाचं भावविश्व घिरट्या घालतं. या प्रतीकांबाबतच्या संपर्कातून काळानुसार काही मिथके जन्माला आली. काही मिथकांना तत्कालीक अर्थ होता, काहींमागे विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारे आडाखे होते, तर काहींच्या मागे तर्कबुध्दीचे आडाखे होते. काळगतीनुसार हे आडाखे अपभ्रंशात परावर्तीत होऊन त्यांच्या दंतकथा, लोककथा कधी बनल्या हे कुणाच्याही लक्षात आले नाही.

लोकजीवनात असलेली मुंगसाची प्रतिमाही याच मिथकांच्या संदर्भाने अधिक उजळून निघाली. तसे पाहता विज्ञानाच्या दृष्टीने या प्राण्याचे भूतलावरील अस्तित्व म्हणजे अन्नसाखळीतला एक दुंवा इतकेच. पण, या निरस शास्त्रीय विश्लेषणामागे अनेक रम्य अन् सुरस समज-गैरसमज, मिथकांचा पाऊस पडलेला असतो अन् एका प्रतिमेचे अनेक अन्वयार्थ असू शकतात हे आपल्याला या विषयांकडे नव्या दृष्टीने बघितल्यावर लक्षात येते.

सस्तन व संमिश्र प्राण्यांच्या व्हायव्हेरिडी कुलातील हर्पेस्टीनी उपकुलात या जीवाचा समावेश होतो. भारतीय उपखंडासह हा छोटासा प्राणी आफ्रिकेमध्येही आढळून येतो. भौगोलिक क्षेत्रातील फरकांनुसार यांच्या विविध जातीही अस्तित्वात आहेत. निमुळत्या तोंडाचा, आखूड कानांचा, अंगावर पिवळसर केसांचा साज मिरविणारा, आखूड पाय अन् लांब शेपटीचा हा इवलासा भासणारा हा जीव आक्रमक अन् हिंस्त्र म्हणून ओळखला जातो. पण साप, नाग, विंचवासारख्या शत्रूंसाठीच तो प्रामुख्याने आक्रमक आहे. एरव्ही तो माणसाळला तर माणसाच्या सान्निध्यात मांजरीसारखाही राहू शकतो. सर्पाचा काळ म्हणून मुंगसाची ओळख आहे. साप-नागांचे मर्दन करताना त्यांच्याशी कडवी झुंज देण्याच्या त्याच्या अनोख्या क्षमतेमुळे तो मानवी समूहाच्या आकर्षणाचा विषय पूर्वीपासून ठरत आला. कारण, मानवाच्या भावविश्वात सर्पकुळाचीही अशीच मोठी धास्ती आहे. या सर्पधास्तीवर मुंगूस त्याच्या नैसर्गिक गुणांमुळे उतारा ठरू शकतो असे मानवाला वाटत आले, हे ही त्याला शुभलक्षणी मानण्यामागचे एक कारण असावे. सर्पाची अंडी नष्ट करण्यापासून ते त्याच्या हालचालीवर बारीक कटाक्ष ठेवून त्याचा खात्मा करेपर्यंत मुंगसाचा आक्रमकपणा कायम असतो. या अर्थाने मानवावरचा संकटनिवारक म्हणून त्याला शुभ मानण्यात आले. पुढे हेच मुंगूस इसापनितीतल्या कथांमधून डोकावले. माणसाला नीती शिकविणाऱ्या यातील एका कथेत मुंगूस माणसाशी कृतज्ञ असल्याने पण माणूस त्याच्याशी कृतघ्न असल्याचे दर्शविण्यात आले. यासारख्या कथांनीही मुंगसासारख्या प्राण्याची मानवी भावविश्वातील प्रतिमा उंचावली.

मुंगसाचा अधिवास जमिनीखाली तीक्ष्म नखांनी खणलेल्या बिळांमध्ये असतो. महाभारतातील एका दृष्टांत कथेत याच मुंगसाचा अर्धा देह सोन्याचा असल्याचा उल्लेख आहे. युधिष्ठीर राजा सर्वश्रेष्ठ राजसूय यज्ञ केल्याचा अभिमान होतो. त्यावेळी यज्ञस्थळी एक अर्धे शरीर सोन्याचे असलेले मुंगूस प्रकट होऊन या यज्ञाची खिल्ली उडविते. त्यावेळी युधिष्ठीराला आपण पाहिलेला मोठा यज्ञ सांगताना हे मुंगूस एका ब्राह्मण जोडप्याची कथा युधिष्ठीरास सांगते. ती कथा अशी, एका गरीब ब्राह्मणाच्या घरात अनेक दिवसांनी चूल पेटली. त्यातही मोजके अन्न हाती असताना अर्ध्या रात्री दारी याचक उभा राहिला. तेव्हा स्वत:साठी काही न बाळगता या कुटुंबाने घरातले सर्व अन्न त्या याचकाला दिले. या पुण्यकर्माच्या प्रभावाने एक चमत्कार घडला. या घरात जमिनीवर सांडलेल्या चिमूटभर धान्यात लोळण्याचा मला मोह झाला अन् लोळण घेताच माझा अर्धा देह सोन्याचा झाला. मला उर्वरित देहसुध्दा करायचा आहे. त्यासाठी मी मोठ्या यज्ञकर्त्या यजमानाच्या प्रतीक्षेत आहे. पण तसे अद्याप घडलेले नाही, असे मुंगसाने युधिष्ठीराला सांगताच यज्ञकर्मातील उणिवांची जाणीव होऊन त्याचे डोळे उघडले असावेत. या यज्ञात विपूल धन खर्च केले पण त्या खर्चण्यात मनाच्या भावाचा अभाव होता. त्यामुळे तुझे पुण्यकर्म पुरेसे प्रभावी होऊ शकलेले नाही, हे सांगण्यासाठी रचनाकाराने मुंगसाचे रूपक या कथेत वापरले आहे. मुंगसाचा अधिवास अफ्रिकेसारख्या खंडात आढळत असला तरीही त्याच्या भारतातील प्रजातींचे अस्तित्व हे महाभारतकालीन खंडापेक्षाही जुने असावे, असे ही महाभारतील मुंगूस विषयक दृष्टांत कथा सांगते.

मुंगसाविषयीच्या आपल्या समाजातील मिथकांमध्ये हा प्राणी सर्पविषापासून बचावासाठी मुंगूसवेल नामक वनस्पतीची मुळे खात असल्याचाही एक समज आहे. प्रत्यक्षात जीवशास्त्रीय दृष्टीने या प्राण्याच्या पाठीवरील राठ केस हे बाणाप्रमाणे टोक घेऊन उभे राहून शत्रूचा प्रतिकार करतात. जेणेकरून सर्पाला दंश करण्यात ते बाधा उत्पन्न करतात. परिणामी त्याचे रक्षण होते. अशी मिथके केवळ आपल्याचकडे आहेत असे नाही तर जगाच्या पाठीवरील अनेक देश त्याला अपवाद नसतात. मुंगसाच्या जिभेचा पृष्ठभाग हा खडबडीत असून, सर्पविषावरील उतारा त्याघ्या याच वैशिष्ट्यात दडलेला असतो, अशी समजूत ब्रह्मदेशात आहे.

श्री गुरूचरित्रासाख्या धार्मिक ग्रंथातही मुंगसाचा उल्लेख एकोणतिसाव्या अध्यायात आढळून येतो. सन ४८७ ते ५५० या कालावधीत होऊन गेलेल्या भूगर्भजल अभ्यासक विराहमिहिरच्या विख्यात ग्रंथांमध्येही मुंगसाचे संदर्भ आहेत. जमिनीच्या पोटातील पाण्याचा ठिकाणाचा आडाखा वर्तविताना विराहमिहिर मुंगसाच्या विशिष्ट पध्दतीतील वावरण्याचे संदर्भ देतात.

आपल्या हितशत्रूंपासून किंवा आप्तेष्टांपासूनही माणसे अनेक पिढ्यांपासून धन लपवित आली. माणसाला धनाची विशेष लालसा असते. हे धन लपविण्यासाठी माणसांनी पूर्वीपासून निर्जन जमिनीचा आधार घेतल्याचे असंख्य संदर्भ आहेत. मुंगसाचा अधिवासही निर्जन जमिनीखालील खोल बिळांमध्ये असतो. या घरट्याचे निर्माण हा प्राणी आपल्या तीक्ष्ण नखांनी करतो. त्याच्या या नैसर्गिक स्वभावामुळेच त्याला कुबेराचा खजिना ठाऊक असल्याची आख्यायिका जोडली गेली असावी.

निसर्गाने दिलेले जीवन समरसपणे जगणाऱ्या जीवांमध्येही माणसाने सोयीस्कर भेद निर्माण केले. 'टिटवी...' विरहाचा संदेश देते, म्हणून ती लोकांच्या शिव्यांची धनीण झाली. मुंगूस सुवर्णात लोळण घेणारे असल्याच्या आख्यायिकेमुळे ते माणसाला धनलाभ करून देते या समजुतीने त्याला थेट रामाच्या नावाने तोंड दाखविण्याची गळ घातली गेली.

माणूस जो शकून किंवा अपशकून निसर्गातल्या चिन्हांमध्ये शोधत फिरतो अन् सोयीनुसार ही चिन्ह स्वीकारतो, त्याच्या या अप्पलपोट्या वृत्तीवर संत कबीरांची परखड वाणी प्रहार करते. कबीर म्हणतात,

बुरा जो देखन मै चला!

बुरा न मिलीया कोय!!

जो दिल खोजा अपना !

मुझसे बुरा न कोय !!

या दुनियेमध्ये मी वाईट काय याचा शोध सुरू केला पण मला कुणीही वाईट असं सापडलं नाही. पण जेव्हा मलाच माझं अंतर्मन शोधण्याची प्रेरणा झाली म्हणजे 'जो दिल खोजा अपना...' या पायरीनंतर जे मला गवसलं ते अतिशय धक्कादायक आहे. ते म्हणजे, 'मुझसे बुरा न कोय...' माझ्या अंतर्मनाला वाईटाची जी किनार लगडली आहे ना, त्यापेक्षा अधिक वाईट या दुनियेत असूच शकत नाही, असं कबीरवाणी सांगते. त्यामुळे मुंगसाचा शकून शुभ किंवा अशुभ वर्गात लोटण्याअगोदर आपलं मन कुठल्या वर्गात बसतं त्याला महत्त्व द्या, असंही कबीर ठणकावून सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांना तंबी

$
0
0

गौतम संचेती

Gautam.Sancheti@timesgroup.com


जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देत त्यांचे कान टोचले. तब्बल दहा तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. पण, या बैठकीनंतर अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीत बदल होईल का? हा खरा प्रश्न आहे.

मिनी मंत्रालय समजली जाणारी जिल्हा परिषद ग्रामीण भागाचे प्रतिनिधीत्व करणारी स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिखर संस्था आहे. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ५७ टक्के लोक या भागात राहतात. त्यामुळे या संस्थेचे विशेष महत्त्व आहे. नऊ महिन्यांपूर्वी या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली व नवे पदाधिकारी या संस्थेत दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दीपककुमार मीना हे रुजू झाले. त्यामुळे या संस्थेतील कामाला वेग येईल, अशी अपेक्षा असताना, मात्र सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच पडली.

नव्या पदाधिकाऱ्यांनी निवडून आल्यानंतर अनेक आश्वासने दिली. पण, त्यातील काम प्रत्यक्षात येत नसल्यामुळे त्यांचा संताप वाढू लागला. त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटू लागले. त्यातून बोध घेऊन कामकाजात सुधारणा होईल, अशी अपेक्षा असताना त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी घेतलेली आढावा बैठक परिणामकारक ठरली. या बैठकी अगोदरच कामकाजाला वेग आला. रेंगाळत पडलेल्या २०० फायली एका रात्रीत क्लिअर झाल्या. गेल्या काही महिन्यांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी या फायली रखडवून ठेवल्या होत्या. त्याला यानिमित्ताने पाय फुटले.

तीन महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यपध्दतीबाबत नाराजीला सुरुवात झाली. त्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले. पदाधिकाऱ्यांना ताटकळत ठेवल्यामुळे त्यांच्यावर रोष व्यक्त करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर खातेप्रमुखांनी फायली रखडत ठेवल्या जात असल्याचे सांगत अडचणी मांडण्यास सुरुवात केली. त्यानंतर नाराजीचा सूर उमटू लागला. त्यामुळे एकूण कामकाज ठप्प झाले. त्यात ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन पुकारुन थेट मीना यांना लक्ष्य केले. त्यानंतर त्यांनी धरणे आंदोलन करून हे आंदोलन बदलीपर्यंत कायम ठेवण्याचा इशाराही दिला. त्यामुळे ही कोंडी फोडणे अवघड असताना आढावा बैठकीत त्याचे नकळतपणे पडसाद उमटले. महसूल आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढून एकूण कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करीत कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

विभागीय आयुक्त केवळ सूचना देण्यापर्यंत थांबले नाहीत, तर त्यांनी अधिकाऱ्यांना आपल्या कामात सोमवारपासून सकारात्मक बदल करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशाराही दिला. ३१ मार्चला मी या सभागृहात बैठक घेईन, त्यावेळेस चर्चेत झालेले विषय मार्गी लागले पाहिजेत असेही बजावले. आता त्यात काय बदल होतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. कोणतीही आढावा बैठक तीन ते चार तासांत संपते. पण, सकाळी १०.३० वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी सहा वाजता संपली. तब्बल दहा तास चाललेल्या या सभेत अनेक विषयांवर विभागवार चर्चा झाली. त्यावर सूचना व कार्यवाही करण्याची काल मर्यादाही देण्यात आली. त्यामुळे केवळ मीनाच नाही, तर सर्वच अधिकाऱ्यांची जबाबदारी त्यामुळे वाढली आहे.

जिल्हा परिषदेच्या आर्थिक वर्षातील विविध योजनांसाठी आलेल्या २०० कोटींच्या निधीतून केवळ २.५ टक्के निधी खर्च झाल्याबद्दल या बैठकीत चिंता व्यक्त करून हा निधी मार्चअखेर खर्ची झाला पाहिजे, अशा सूचना आयुक्त झगडे यांनी दिल्या. त्यामुळे सर्वांनाच कामाचा वेग वाढवावा लागणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. त्यांचे कामकाज कसे सुरू आहे, याबद्दल माहिती घेताना मात्र सर्वांनाच झगडे यांनी रडारवर घेतले. या योजनांमध्ये स्वच्छ भारत मिशन, विविध घरकुल योजना, पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, ग्रामपंचायतविषयक सुधारणा करण्याबाबत उपाययोजना, आपले सरकार सेवा केंद्र, बेटी बजाओ कार्यक्रम, वनयुक्त शिवार योजनांसह ३३ योजना आहेत. त्या सक्षमपणे राबविल्या जाणे आवश्यक असताना त्यातून अधिकाऱ्यांचा अॅटिट्यूड समोर आला. त्यामुळे तो बदलावा, असे सांगत झगडे यांनी त्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली. त्याचप्रमाणे प्रशासनाशी निगडित असणारी प्रलंबित प्रकरणे, आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीसह १४ विषयांवरसुध्दा त्यांनी जोर देत कानउघाडणी केली.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, तालुक वैद्यकीय अधिकारी, उपअभियंता, बालविकास प्रकल्प अधिकारी व विस्तार अधिकारी या बैठकीला उपस्थित असल्यामुळे त्याचे वेगळे महत्त्व होते. आयुक्तांची ही बैठक केवळ नाशिकला झाली असे नाही. याअगोदर अशीच बैठक त्यांनी जळगाव व अहमदनगरला घेतली. त्यात इतका वेळ लागला नाही. जो नाशिकला आयुक्तांना खर्ची करावा लागला. ही बैठक नियमित असली, तरी याला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या कार्यपध्दतीवरील नाराजीची किनार होती. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष होते.

आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांचे काम सोपे केले असले, तरी पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी व भूमिका ठोसपणे मांडणे गरजेचे आहे. जिल्ह्याला ग्रामविकास राज्यमंत्रिपद दादा भुसे यांच्यानिमित्ताने मिळाले आहे. त्यामुळे त्याचा फायदा जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणात व्हावा ही अपेक्षा आहे. राष्ट्रवादीची सत्ता जाऊन शिवसेना सत्तेवर आली आहे. ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाहीत तर त्यांची नाराजी दूर करणे अवघड असणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या वेगाबरोबरच त्याचा पाठपुरावा करुन दर्जेदार कामे कशी होतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मीना हे आयएएस अधिकारी आहेत. प्रशासनात पारदर्शकता यावी, हा त्यांचा उद्देश असला तरी त्यातून काम रखडणे ही गोष्ट समर्थनीय ठरत नाही. त्यांनी आपल्या कामकाजात सुधारणा केल्यास त्याचा फायदा सामान्य जनतेलाच होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी साहित्याच्या अनुवादासाठी प्रयत्नशील

$
0
0

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठी साहित्याचे अनुवाद होऊन ते सर्व भाषांमध्ये प्रकाशित होणे गरजेचे आहे. मराठीतून इंग्रजी असे अनुवादही कमी होते. त्याचप्रमाणे इतर प्रादेशिक भाषेतही हे अनुवादाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मी अनुवादासाठी राज्यभर कार्यशाळा घेणार आहे. त्याचप्रमाणे अनुवादाचे केंद्र व्हावे यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करणार असल्याची माहिती ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

नाशिक येथे शनिवारी एका कार्यक्रमासाठी आले असता देशमुख यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधत अनेक विषयांना स्पर्श केला. या कार्यशाळेसाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. मराठी साहित्याचे अनुवाद झाले, तर ते सर्वांपर्यंत पोहचणार आहे. मराठी साहित्य समृध्द असून, त्याच्या अनुवादासाठी हवे तितके काम झाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मी कार्यकर्ता अध्यक्ष आहे. त्यामुळे काही तरी ठोस काम करण्याची माझी इच्छा आहे. मी वर्षभरात काम केले नाही, तर जाब विचारा असेही त्यांनी यावेळी सांगितले. या भेटीत त्यांनी सोशल मीडिया, शेतकरी आत्महत्या, पुरोगामी चळवळ, सीमावाद, यासारख्या विषयांवरही परखड मते मांडली.

कौळाणेच्या पालखीचे स्वागत

बडोदा येथे साहित्य संमेलन होत असल्यामुळे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कौळाणे गावातून पालखी आली तर त्याचे स्वागत आम्ही करू, शिवाय त्या पालखीचे भोई होईल असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोल्ट्री उद्योगाला प्रोत्साहन देणार

$
0
0

पशू संवर्धनमंत्री जानकरांची भूमिका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोल्ट्री उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असून, त्या माध्यमातून राज्यात अंडी व ब्रॉयलरचे उत्पादन वाढवण्यासाठी शासन सर्व सुविधा देईल. पोल्ट्री उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन राज्याचे पशू संवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केले.

दोन दिवसीय 'इंडिया पोल्ट्री एक्सो २०१८'च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, प्रदर्शनाचे आयोजक मनोज शर्मा, पीपल फॉर पोल्ट्री संघाचे अध्यक्षा वसंत कुमार, अरुण पवार, डॉ. पी. जी. पेडगावकर आदी उपस्थित होते. यावेळी जानकर म्हणाले, की राज्यात अंडी व चिकन मागणीच्या प्रमाणात उत्पादन होत नाही. त्यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यातून याची मागणी पूर्ण केली जात आहे. उद्योगांसारखा रोजगार देण्याची पोल्ट्रीत क्षमता आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे शासनाचे प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

-

दोन दिवस चर्चासत्र

या प्रदर्शनाला जानकर यांनी भेट देऊन पाहणी केली. प्रदर्शन २७ ते २९ जानेवारी या कालावधीत ठक्कर डोम येथे सुरू राहाणार असून, पोल्ट्री उद्योगासाठी लागणारे फिड, पशूंची औषधे व शेड उभारणीसाठी लागणारे विविध साहित्य येथे उपलब्ध आहे. या दोन दिवसांत मार्गदर्शन व चर्चासत्रे होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवडे ग्रामसभेत इच्छामरणाचा ठराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्गाला विरोध करूनही राज्य सरकार दखल घेत नसल्याने शिवडे येथील ग्रामसभेत इच्छामरणाचा ठराव करण्यात आला. जिल्ह्यातील एखाद्या गावात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींकडे अशा मागणीचा ठराव होण्याची ही पहिलीच घटना आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला होणाऱ्या विरोधाची धार जिल्ह्यात कमी झाली असली तरी शिवडे आणि घोरवड गावांमधील काही शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध कायम आहे. त्यामुळे या गावांमध्ये संयुक्त मोजणीदेखील होऊ शकलेली नाही. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत राष्ट्रपतींकडे इच्छामरणाच्या मागणीचा ठराव करण्यात येणार असल्याचे समृद्धी विरोधी कृती समितीने जाहीर केले होते. त्यानुसार शिवडे गावात बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेत समृद्धी महामार्गाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात न घेता हा महामार्ग बळजबरीने रेटण्याचा प्रयत्न प्रशासन आणि सरकारकडून सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सरकारने हा प्रकल्प प्रतिष्ठेचा केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नसतील तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशा मागणीचा ठराव यावेळी करण्यात आला. त्यावर बाधित १७ शेतकऱ्यांपैकी हरिभाऊ शेळके, रावसाहेब हारक, सोमनाथ वाघ, उत्तम हारक, विलास हारक, राजाराम हारक आणि निवृत्ती हारक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. समृद्धीला विरोध करणाऱ्या अन्य काही गावांमध्येही असे ठराव झाल्याचे समितीकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'शिवशाही'तून एसटी मालामाल

$
0
0

Gautam.Sancheti@timesgroup.com

नाशिक : शिवशाही बसमुळे राज्य परिवहन महामंडळाला चार महिन्यांत ४ कोटी ४ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. ऑक्टोबर महिन्यात ११ बस दाखल झाल्या. त्यानंतर यात वाढ होऊन आतापर्यंत ४२ बसेस नाशिकहून धावत आहेत. या सर्व बसनी आतापर्यंत ७ लाख ९० हजार किलोमीटर अंतर प्रवास केला असून, विविध मार्गांवरच्या ६ हजार ८३१ फेऱ्या पूर्ण केल्या आहेत.

नाशिकमधून सुटणाऱ्या ४२ बसपैकी तब्बल २२ बस पुणे मार्गावर धावत आहेत. त्यानंतर औरंगाबाद, बोरीवली, मुंबई सेंट्रल, कोल्हापूर येथे या बस सोडल्या जातात. पण त्यांची संख्या पुण्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने खासगी बसशी स्पर्धा करण्यासाठी कमी दरात वातानुकूलित बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या सर्व बस टप्प्याटप्प्याने राज्यभर दाखल झाल्या. नाशिकमध्ये या पहिल्या टप्प्यात दिलेल्या बस नागपूरला पळवण्यात आल्यामुळे संतापही झाला. पण काही दिवसांनंतर या बस पुन्हा नाशिकमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर पुणे मार्गावर या बस प्रथम धावल्या. त्याला मोठा प्रतिसादही मिळाला. त्यानंतर मुंबईसह इतर मार्गांवरही या बस सोडण्यात आल्या.

शिवशाहीचे भाडे शिवनेरी बसच्या अर्धे तर हिरकणीपेक्षा थोडे जास्त आहे. त्यामुळे या बसला प्रवाशांकडून पसंती मिळत आहे. एसटीने २५ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू केल्यानंतर पुणे मार्गावर ६०५१ फेऱ्या झाल्या आहेत. त्याखालोखाल बोरीवली येथे ४५० फेऱ्या मारल्या आहेत.

कोल्हापूरसाठीही बस

कोल्हापूरसाठी २१ जानेवारीपासून शिवशाही बस सुरू झाली आहे. रात्री ९.३० वाजता ही बस नाशिकहून निघाल्यानंतर सकाळी ६.३० वाजता ती कोल्हापूरला पोहचते. त्यामुळे प्रवाशांना रात्रीतून कोल्हापूर गाठणे शक्य होत आहे.

अशा धावतात नाशिकहून बस

पुणे - १६

स्वारगेट - ४

हिंजवडी - २

मुंबई सेंट्रल -१

बोरिवली -५

औरंगाबाद - ९

कोल्हापूर - २

राखीव - ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिमंडळ दोनमध्ये वाहनांची पडताळणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनमधील नाशिकरोड, उपनगर, देवळाली कँप, इंदिरानगर, अंबड आणि सातपूर या सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नोव्हेंबर २०१७ पासून आढळून आलेल्या बेवारस दुचाकी वाहने पडताळणीसाठी नाशिकरोड पोलिस ठाण्यच्या आवारात ठेवण्यात आलेली आहेत. ज्या नागरिकांची दुचाकी वाहने गहाळ झालेली आहेत व अद्यापपर्यंत मिळून आलेली नाहीत अशा नागरिकांनी नाशिकरोड पोलिस ठाणे येथील दुचाकी वाहनांची कागदपत्रांसह पडताळणी करून घेण्याचे आवाहन नाशिकरोड पोलिसांनी केले आहे. या दुचाकी वाहनांची माहिती नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरही प्रदर्शित करण्यात आलेली आहे. या माहितीशी साधर्म्य आढळून आलेल्या नागरिकांनी सदरची माहिती संकेतस्थळावर प्रदर्शित झाल्यापासून सात दिवसांच्या आत पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवनातल्या प्रत्येक क्षणाला महत्त्व द्या

$
0
0

जीवनातल्या प्रत्येक क्षणाला महत्त्व द्या

कळवणला श्री विठ्ठल गौरव पुरस्काराचे वितरण

म. टा. वृत्तसेवा, कळवण

मानव जन्म पुन्हा नाही म्हणून प्रत्येकाने जीवनातल्या प्रत्येक क्षणाला महत्त्व दिले पाहिजे, असे मत डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले. नकारात्मक विचारांपासून दूर राहून मुक्तपणे जगावे. कळवण परिसराला एक इतिहास असून, या भूमीने जिल्ह्याला व राष्ट्राला असे भूमिपुत्र दिले आहेत की त्यांच्या विचारांचा हा गौरव आहे, असेही डॉ. गायकवाड म्हणाले.

कळवणच्या सार्वजनिक व सामाजिक वाटचालीत भरीव योगदान देणाऱ्या सफाई कामगारापासून ते उपक्रमशील शेतकऱ्यापर्यंत, सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते उद्योजकापर्यंत या सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कार्य करणाऱ्या ११ समाजधुरिणांचा शुक्रवारी (दि. २६) सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. एखाद्या कार्यात आयुष्यातील तीन ते चार दशके सतत झोकून घेणे ही तशी सहज सोपी बाब नाही. नैतिकतेचा वस्तुपाठच त्यासाठी आवश्यक ठरतो. श्री विठ्ठल फाउंडेशन ग्रुपच्या माध्यमातून गावाच्या विकासात कार्यरत असलेल्यांच्या हा सन्मान होणे अभिमानास्पद गोष्ट असल्याचेही ते शेवटी म्हणाले.

येथील श्री विठ्ठल फाउंडेशन ग्रुप ऑफ कळवणच्या माध्यमातून 'श्री विठ्ठल गौरव पुरस्कार' मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी पुंडू बाबाजी बेजकर सार्वजनिक वाचनालयाच्या डॉ. न्याती सभागृहात हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. या हृदयस्पर्शी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नाशिकचे संमोहनतज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कळवण महाविद्यालयाच्या प्राचार्या व साहित्यिक डॉ. उषाताई शिंदे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कळवणच्या नगराध्यक्षा सुनीता पगार, कळवण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ, रावसाहेब शिंदे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. परशुराम पगार, श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुनील शिरोरे, डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पी. एच. कोठावदे, प्रा. के. के. शिंदे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. या वेळी पुरस्कारार्थीच्या वतीने उद्धव आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त करत ग्रुपच्या या उपक्रमाचे कौतुक केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या शिंदे यांनी ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देत तिची जपवणूक ग्रामीण भागातच होताना दिसून येत असल्याचे मत व्यक्त केले. संस्कृती जोपासत आपल्या कार्यात सर्वोत्तम ठरणाऱ्यांचा हा गौरव असल्याचेही ते म्हणाल्या.

या पुरस्कारांर्थींचा गौरव

या गौरव पुरस्कारांर्थीमध्ये मधुकर जगन्नाथ मालपुरे (सामाजिक ), काशिनाथ दोधु पगार (प्रगतशील शेतकरी), उद्धव आनंदा आहेर (उद्योजक), सुधाकर पगार (सहकार), दिनकर व्यवहारे (अध्यात्मिक), प्रा. दगडू सोनवणे (शैक्षणिक), डॉ. सुहास कोटक (वैद्यकीय), जिजाबाई बस्ते (सफाई कामगार), देविदास गोयर (सामाजिक), मोयोद्दीन नुरुद्दीन शेख (सामाजिक), अभय कजगावकर (क्रीडा) यांचा समावेश होता. सूत्रसंचालन प्रा. पवन कोठावदे यांनी केले तर आभार प्रा. रवींद्र पगार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे अध्यक्ष संजय पगार, कार्याध्यक्ष किरण अमृतकार यांच्यासह सर्व पदाधिकारी व संचालकांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद संस्थांना हवी कर्जमुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील आठ बंद उपसा जलसिंचन सहकारी संस्थांमधील सभासदांनी कर्जमुक्तीसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. संघटीत लढ्यासाठी बंद उपसा जलसिंचन सहकारी संस्थाबाधित शेतकरी संघर्ष समिती गठीत केली गेली आहे. समितीची पहिली बैठक शनिवारी, ३ फेब्रुवारी रोजी किसान सभा केंद्रात दुपारी १२ वाजता होणार आहे. या लढ्याला सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी पाठबळ दिले असून अन्य आमदारांनीही पाठिंबा द्यावा, अशी या समितीची अपेक्षा आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) नेते राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली सीबीएस येथील किसानसभेच्या कार्यालयात रविवारी दुपारी बंद उपसा जलसिंचन सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. केंद्र सरकारच्या जलसिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यात १९९५ मध्ये आठ उपसा जलसिंचन योजना सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत एक थेंबही पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही. याउलट लाखो रुपयांच्या कर्जाची नोंदणी बाधित शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर केल्यामुळे अशा शेतकऱ्यांना जिल्हा व अन्य बँकांतून कर्ज मिळविण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अशा संस्थांमधील १३२४ सभासदांच्या नावावर मुद्दल व व्याज पकडून सुमारे ५५ कोटी ५२ लाखांचे कर्ज आहे. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रश्न तडीस गेलेला नाही. एकीकडे जिल्ह्यात अशी परिस्थिती असताना जळगावात मात्र बंद उपसा संस्थांचे कर्ज माफ करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी २५ कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी या बैठकीत केला. त्यामुळेच न्याय मिळविण्यासाठी संघटीत होण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून ३ फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत पुढील लढ्याची दिशा ठरविण्यात येणार आहे. बैठकीला प्रकाश गामणे, दिनकर पवार, भास्कर उगले, निवृत्ती कसबे, भीमा उगले, भास्कर उगले, रघुनाथ आव्हाड, बाळासाहेब चौधरी आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांबद्दल नाराजी

जळगाव जिल्ह्यातील १७ बंद उपसा जलसिंचन सहकारी संस्थांचे ४२ कोटींचे कर्ज सरकारने २००८ च्या दरम्यान माफ केले. तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची भूमिका यावेळी महत्त्वाची ठरली. विद्यमान जलसंपदामंत्री व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमधील बंद उपसा संस्थांसाठी २५ कोटी रुपये मंजूर करून दिले आहेत. नाशिकचे पालकत्व असलेल्या महाजन यांनी जळगावसाठी पुढाकार घेतल्याने जिल्ह्यातील बाधितांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.

बंद संस्थांची यादी (कंसात शाखा)

कै. व्यंकटराव हिरे संस्था,उबंरदे (कळवाडी, ता. मालेगाव)

श्री गजानन संस्था, बेलगाव तऱ्हाळे (घोटी, ता. इगतपुरी)

गोदावरी संस्था, बारागाव प्रिंपी(बारागाव प्रिंपी, ता. सिन्नर)

सोनाई संस्था, कोंढार (मनमाड, ता. नांदगाव)

संत ज्ञानेश्वर संस्था, ठाणगाव (पाटोदा, ता. येवला)

योगेश संस्था, नळवाडी (करंजवण, ता. दिंडोरी)

व. फु. नाईक संस्था पिंपरखेड (करंजवण, ता. दिंडोरी)

आळंदी संस्था, वाडगाव (गिरणारे, ता. नाशिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालिमारला आढळला महिलेचा मृतदेह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवस-रात्र प्रवाशांची वर्दळ असलेल्या शालिमार चौकात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर काहीही स्पष्ट झाले नसून, महिलेच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, तिची ओळख पटल्यानंतरच पुढील बाबी स्पष्ट होऊ शकणार आहे.

शालिमार चौकातील सार्वजनीक शौचालय आणि संदर्भ हॉस्पिटल यांच्यात एक छोटीशी बोळ आहे. दुर्गंधी येत असल्याने परिसरातील एका नागरिकांनी तेथे जाऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहितीची मिळताच भद्रकाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. महिलेचे वय साधारणत: ३२ ते ३५ असून, तिने अंगावर लाल ठिपक्यांची साडी परिधान केली आहे. तिच्या मृतदेहाशेजारी एक पर्स आणि हॉल तिकीट सापडले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतेदह शव विच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. सकाळी ११ ते साडेअकरा वाजेच्या सुमारास हा घटनाक्रम घडला. सिव्हिलमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत डॉक्टरांनी महिलेच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला. मात्र, त्यात फारसे काही हाती लागले नाही. याबाबत सूत्रांनी सांगितले, की महिलेच्या अंगावर वार केल्याच्या खाणाखूणा दिसून येत नाही. हा मृतदेह दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असून, अतिप्रसंगाचे पुरावेही समोर येत नाही. त्यामुळे महिलेचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, त्याच्या अहवालातच सर्व बाबी स्पष्ट होतील.

याबाबत सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांनी सांगितले, की मृतदेहाजवळ एका तरुणीचे हॉल तिकीट आणि पर्स आढळून आली होती. त्यावरून संबंधित तरुणीला शोधून काढले. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता काही दिवसांपूर्वी तिची पर्स याच परिसरात चोरीला गेल्याचे समोर आले. पर्समध्ये फारसे पैसे नसल्याने तिने कोणतीही तक्रार दिली नाही. दिवसभरात आजुबाजूच्या परिसरातून या वयोगटातील मिसिंग महिलांचाही शोध घेण्यात आला. मात्र, त्यातही फारेसे काही पुढे आले नाही. या घटनेबाबत तसेच महिलेबाबत काही माहिती असल्यास पोलिसांसी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

महिला शहरातील की बाहेरगावची?

शालिमार परिसरात प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. जिल्ह्याच्या काही भागात प्रवाशांची वाहतूक करणारी काळी पिवळी वाहनेही येथेच थांबतात. विशेषत: बुधवारी बाजारासाठी ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने येतात. ही महिला बाहेरगावाहून आली आणि परत जाताना काहीतरी घटना घडली असावी, अशी शक्यता तापसून पाहिली जात आहे. तसेच अडचणीच्या ठिकाणी ही महिला कशी गेली, काही त्रास होता तर तिने कोणाची मदत का घेतली नाही, तिच्या कुटुंबाने महिलेचा शोध का घेतला नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने महिलेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. व्हिसेरा राखून ठेवला आहे. त्याद्वारे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला होणार ‘सेंटर फॉर एक्सलन्स’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
पाणी पुरवठा, स्वच्छता, पाण्याचा पुनर्वापर आणि घनकचरा विल्हेवाट याविषयी तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि संशोधनाची सुविधा असणाऱ्या 'सेंटर फॉर एक्सलन्स' या केंद्राची स्थापना नाशिकरोड येथील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या आवारात होणार आहे. राज्यात एकमेव असणाऱ्या या केंद्रास जागतिक बँकेकडून राज्य सरकारच्या जलस्वराज्य योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे.
नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी तसेच आणि स्वच्छतेवर केंद्राकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. स्वच्छ भारत अभियान, केंद्रीय स्वच्छ पेयजल योजना, जलस्वराज्य या योजना त्यापैकीच आहेत. पाणीपुरवठा आणि स्वच्छता, घनकचरा नियोजन याविषयीचे उपाययोजना, नियोजन, अंमलबजावणी आणि नियंत्रणावर जलस्वराज्यच्या दुसऱ्या टप्प्यात भर देण्यात आला आहे. त्याअंतर्गतच नाशिकरोड येथे 'मित्रा'च्या आवारात 'सेंटर फॉर एक्सलन्स' या केंद्राची स्थापना केली जाणार आहे. केंद्राच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपयांचा खर्च येणार असून, तो निधी जागतिक बँकेच्या सहकार्याने जलस्वराज्यच्या दुसऱ्या टप्प्यातून मिळणार असल्याची माहिती 'मित्रा'च्या सूत्रांकडून मिळाली. या केंद्राची ब्ल्यू प्रिंट मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आलेली आहे.

असे असेल केंद्र
'सेंटर फॉर एक्सलन्स'च्या उभारणीसाठी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यात तीन ग्रीन बिल्डिंग्जचा समावेश असेल. एका बिल्डिंगमध्ये संशोधनविषयक कामकाज असेल. दुसऱ्या बिल्डिंगमध्ये प्रशिक्षण केंद्र आणि प्रशासकीय कार्यालय असेल तर तिसऱ्या ग्रीन बिल्डिंगमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा असेल. सध्या अस्तित्वात असलेल्या 'मित्रा'च्या प्रशिक्षण केंद्रात ७० प्रशिक्षणार्थ्यांची क्षमता आहे. मात्र, नव्या केंद्राची क्षमता २०० प्रशिक्षणार्थी इतकी असेल. 'सेंटर फॉर एक्सलन्स' या केंद्रावर राज्यभरातील शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पाणीपुरवठा व स्वच्छता यासारख्या विभागांसह व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय पाणीपुरवठाविषयक विविध समस्यांवर या केंद्रात संशोधनही केले जाणार आहे. पाण्याचा अपव्यय रोखणे,पाण्याचा पुनर्वापर, पाण्याचे न्याय्य वाटप, पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्याच्या पद्धती, पाणी पुरवठा योजनांची निर्मिती, नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी शास्त्रीय पद्धती, घन कचऱ्याची विल्हेवाट याविषयी या केंद्रात संशोधन केले जाणार आहे. या केंद्रात राज्यातील सर्व विभागांतील पिण्याचे पाणी व घन कचरा विल्हेवाट योजनांचा तपशील जतन केला जाणार आहे.

"पाणी पुरवठा, मलनिस्सारण, पाण्याचा पुनर्वापर यासारख्या योजनांच्या सध्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेत सुधारणा व्हावी यासाठी आवश्यक ते संशोधन करण्यासाठी 'मित्रा'च्या आवारात 'सेंटर फॉर एक्सलन्स'ची स्थापना जलस्वराज्यच्या दुसऱ्या टप्प्यातील निधीतून केली जाणार आहे. या केंद्रामुळे प्रशिक्षणाची क्षमताही वाढण्यास मदत होईल.
- ए. जी. कालिके, संचालक, 'मित्रा'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमोहक पुष्परचनांनी फेडले नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
फुले म्हणजे निसर्गाचा अविष्कार. त्यांचा दरवळ मनाला उल्हसित करतोच, परंतु त्याचबरोबर त्यांची मोहकता एखाद्या आनंद सोहळ्याचे रंग अधिक गहिरे करते. अशा या मनमोहक फुलांची देखणी आरास नाशिककरांच्या नेत्रांचे पारणे फेडत आहे. गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात आयोजित या पुष्पोत्सवात फुलांच्या कलात्मक रचना सादर करण्यात आल्या असून, त्या नागरिकांना मोहीत करीत आहेत.
गुलाबाच्या फुलांचे शहर अर्थात गुलशनाबाद अशी मुघलकालीन नाशिकची ओळख आहे. या फुलांच्या अनोख्या रंगछटा आणि त्यांद्वारे केलेली आकर्षक कलाकुसर या पुष्पोत्सवातून सादर करण्यात आली आहे. हरी हरी सर्व्हिसेसच्या वतीने आयोजित या उत्सवाचे उद्घाटन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांच्या हस्ते झाले. गुलाब, शेवंती, कार्निशन, निलियम, ऑर्किड, हेलिखुन्या आणि आँथोनियम यांसारख्या विविध जातींच्या आणि रंगांच्या फुलांपासून येथे सजावट करण्यात आली आहे.

फुलांच्याच वस्तू...
गिटार, ढोलकी, मोर, जहाज, सायकल अशा विविध आकारांत केलेली फुलांची सजावट नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यासाठी ड्रेसिना, टेबलपाम, मनीप्लान्टच्या पानांची मदत घेण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या पुष्पोत्सवाचा रविवारी समारोपाचा दिवस होता. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची रिघ लागली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिन्नरला जाणारा अनधिकृत मद्यसाठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'ड्राय डे'च्या पार्श्वभूमीवर सिन्नरला जाणारा अनधिकृत मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आडवा फाटा येथे सापळा लावून पकडला. यामुळे मोठे रॅकेट समोर येणार असून, मद्याचे खरेरीदारही विभागामार्फत शोधून काढले जात आहेत.

विपूल मोहनभाई कहार, रोशन प्रमोद राय, संतोष हेराना बगले आणि विजय सियाराम यादव (रा. सर्व सिल्वासा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दादरा नगर हवेली येथून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा रवाना झाला असून, हा मद्यसाठा सिन्नर व परिसरात पोहचविला जाणार असल्याची माहिती विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक योगेश सावखेडकर यांना मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक-सिन्नर मार्गावर शुक्रवारी सायंकाळी सापळा लावण्यात आला. बोलेरो पिकअप (डीएन ०९) व आय टेन (डीएन ०९ एल २५७९) या वाहनातून मद्याची वाहतूक होणार असल्याची पक्की माहिती असल्याने पथकाने याच वाहनांवर लक्ष केंद्रित केले. आडवा फाटा येथे सापळा लावून थांबलेल्या पथकास दोन्ही वाहने नरजेस पडताच त्यांनी वाहन थांबवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, हुलकावणी देत चालकाने वाहने पळवण्याचा प्रयत्न केला. पुढील टप्प्यावर थांबलेल्या पथकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पाठलाग करून दोन्ही वाहनातील चौघांना ताब्यात घेतले. वाहन तपासणीत केली असता राज्यात बंदी असलेल्या आणि दमण निर्मित तसेच दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशात विक्रीस असलेला विदेशी दारू तसेच बिअर असा चार लाख ३३ हजार ०८० रुपये किमतीचा मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. या कारवाईत सुमारे दहा लाख रुपये किमतीची दोन्ही वाहनेदेखील जप्त करण्यात आली. ही कारवाई पथकाचे निरीक्षक एम. बी. चव्हाण, दुय्यम निरीक्षक वाय. आर. सावखेडकर, आर. आर. धनवटे यांच्या नेतृत्वाखाली जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके आदींच्या पथकाने केली. अधिक तपास योगेश सावखेडकर करीत आहेत.

जिल्ह्यातील मद्यविक्रीचा होणार पर्दाफाश

'ड्राय डे'मुळे मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्याची वाहतूक होणार असल्याच्या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने ही कारवाई केली. ही टोळी राज्यात बंदी असलेली व केंद्रशासित प्रदेशात विक्रीस असलेले मद्य जिल्हाभरातील व्यावसायिकांना पुरवित असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यात बेकायदा सुरू असलेल्या मद्यविक्रीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लसीकरणाचा वाढला टक्का

$
0
0

लसीकरणाचा टक्का वाढला

पोलिओ लसीकरण मोहिमेत मालेगावी ४३.६४ टक्के लसीकरण

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील पोलिओचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने रविवारी (दि. २८) पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात आले. विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत लसीकरण टक्केवारी वाढत असून, रविवारी झालेल्या पोलिओ अभियानासदेखील ४३.६४ टक्के बालकांना लसीकरण करण्यात आले आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यातील पोलिओ लसीकरणाच्या एका दिवसात ४१ टक्के लसीकरण साध्य झाले होते. त्या तुलनेत यावेळी राबविलेल्या अभियानात लसीकरणाचा टक्का वाढला आहे.

शहरातील ३८२ केंद्रांवर हे पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात आले. शहरातील मोसमपूल, रावळगाव नाका, सटाणा नाका यासह बसस्थानक यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी पोलिओ लसीकरण अभियान राबविले. या अभियानात १ लाख २२ हजार २७० बालकांना लसीकरण देण्याचे लक्ष्य आरोग्य विभागाने निश्चित केले होते. यातील ५२ हजार ९९३ बालकांना रविवारी राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत पोलिओ देण्यात आला आहे.

या अभियानात राहिलेल्या बालकांसाठी पुढील सात दिवस आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहेत. या अभियानात गेल्यावेळी पोलिओसाठी नकार दिलेल्या १ हजार कुटुंबांचे मतपरिवर्तन घडवण्यासाठीही प्रबोधन करण्यात आले होते. त्यासाठी येथील आरोग्य अधिकारी डॉ. किशोर डांगे, हेमंत गडरी यांच्यासह डॉ. डोईफोडे हे पुण्याहून निरीक्षक म्हणून मालेगावी आले होते. विशेष मिशन इंद्रधनुष्यअंतर्गत शहरातील पूर्व भागात असलेल्या मुस्लिम कुटुंबांचे मतपरिवर्तन घडवून आणण्यात आरोग्य विभागाला यश आले असल्यानेच दोन टप्प्यानंतर लसीकरणाची टक्केवारी ७० टक्क्यांहून अधिक झाली होती. रविवारी राबविण्यात आलेल्या पोलिओ अभियानातदेखील मुस्लिमबहुल पूर्व भागात लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

आयेशानगरात सर्वाधिक लसीकरण

शहरात रविवारी (दि. २८) ९ आरोग्य केंद्रांवरील ३८२ बूथवर हे पोलिओ लसीकरण राबविण्यात आले. यासाठी एकूण १ हजार २८५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. यात बुथवर ४६ हजार ०६७ बालकांना लसीकरण करण्यात आले. तर मोबाइल टीमने १ हजार ४६१ तर ट्रान्झिट टीमने ४ हजार ६४८ बालकांना लसीकरण केले. शहरातील नऊ आरोग्य केंद्रांवरील आयेशानगर वॉर्डातील ५८ बूथवर सर्वाधिक ६ हजार ७२९ बालकांना लसीकरण करण्यात आले. तर निमा- २ आरोग्य केंद्रावरील ४६ बुथवर सर्वात कमी ३ हजार ४९४ बालकांना लसीकरण करण्यात आले.

मोहिमेतील आकडेवारी

..............................

अभियानाचे लक्ष्य.................१ लाख २२ हजार २७०

प्रत्यक्षात साध्य लक्ष्य.............५२ हजार ९९३

अभियानाची टक्केवारी............४३.६४ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांविरोधात रास्ता रोको

$
0
0

वाहनचालकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वाहतूक पोलिसांविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यासमोर वाहनचालकांनी रास्ता रोको आंदोलन केले. हेल्मेटसक्तीच्या नावाखाली वाहनचालकांकडून आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप करीत वाहनचालकांनी निषेध नोंदवला. दरम्यान, नाशिकरोडच्या बिटको चौक परिसरात वाहतुकीला अडथळा होईल, अशा पध्दतीने चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल दुचाकीचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

नाशिकरोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिस हेल्मेटसक्ती व कागदपत्र तपासणी करीत आहेत. मात्र, त्याच्या नावाखाली आर्थिक लूट करीत असल्याची वाहनचालकांची तक्रार आहे. दोन दिवसांपासून पुन्हा वाहनचालकांना त्रास देणे सुरू झाले असून, ५ ते १० वाहतूक पोलिस रस्त्यावर उभे राहून वाहनचालकांच्या गाड्या अडवतात. हेल्मेट व कागदपत्र तपासणीच्या नावाखाली पाचशेचा दंड आकारतात. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिस ठाण्यासमोर ही कारवाई सुरू झाली. काही वाहनचालकांकडे पैसे नसल्याने ते संतप्त झाले. त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. अचानक घडलेल्या या प्रकाराने वाहतूक पोलिस गोंधळले. काही पोलिसांनी काढता पाय घेतला. सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर यांनी तातडीने घटनास्थळी येऊन परिस्थिती आटोक्यात आणली.

या महिन्यातच एमजी रोडवरही वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या कारवाई विरोधात आवाज उठवला होता. वाहतूक पोलिस दुचाकीचालकांवरच कारवाई करतात. कारचालकांवर कारवाई केला जात नाही, असा आरोप करीत वाहतूक पोलिसांना धारेवर धरले होते. या प्रकारामुळे वाहतूक पोलिसांना माघार घ्यावी लागली होती. कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांविरोधातच शहरातील वाहनधारकांमध्ये असंतोष वाढू लागला असून, सर्वांना समान न्याय याप्रमाणे कारवाई होणे गरजेचे आहे.

पार्किंगवर कारवाई करा

बिटको चौकातील पवन हॉटेलसमोर तसेच विरुध्द बाजूला बस, कार अशी वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. वास्को चौकातही असाच अडथळा होतो. सिग्नल सुटल्यानंतर प्रामुख्याने ही अडचण येते. पोलिसांनी निदान फक्त दंड वसुली करण्यापेक्षा बिटको चौकातील वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी अशी कारवाई सुरू झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीनमजली इमारतींची चाळण

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

दिंडोरीरोडवर दक्षिणेला फुलेनगरचा परिसर, पश्चिमेला पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, उत्तरेला गंगापूर धरणाचा डावा कालवा अशा ठिकाणी वसलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणाच्या पंचवटीतील मार्केट यार्ड शाखा कार्यालयालगत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या इमारतींची अक्षरशः चाळण झाली आहे. या तीन मजली इमारतींची दारे-खिडक्या गायब झाल्यामुळे या इमारतींच्या भिंतींचे सांगाडेच उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अस्वच्छता, पाण्याच्या उद्ध्वस्त झालेल्या टाक्या, डुकरांचा सुळसुळाट, कचऱ्याचा खच, अस्ताव्यस्त पडलेले ड्रेनेजचे ढापे अशा बिकट परिस्थितीमुळे येथील कर्मचाऱ्यांनी या वसाहती सोडल्यामुळे या इमारती भकास झाल्या आहेत. पंचवटीतील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणाचे मार्केट यार्ड शाखा कार्यालय दिंडोरीरोडवर सुरू करण्यात आलेले आहे. या कार्यालयात कामकाजाच्या दिवसांत अधिकारी, कर्मचारी, तसेच ग्राहकांची दिवसभर वर्दळ असते. हा वर्दळीचा भाग वगळता इतर मोठ्या परिसराची अवस्था अत्यंत गंभीर झालेली आहे.

या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी येथे आठ इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक इमारत तीन मजली असून, त्या १९८५ मध्ये बांधण्यात आल्याचा उल्लेख या इमारतींवर आजही ठळकपणे दिसतो. या आठ इमारतींपैकी चार इमारती जवळजवळ आहेत. या इमारतींची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झालेली आहे. या इमारतींच्या जवळच असलेल्या फुलेनगर झोपडपट्टीच्या बाजूला असलेले भिंतीचे कुंपण तोडण्यात आलेले आहे. या भिंतीला मोठे छिद्र पाडण्यात आलेले आहे. त्यातून या भागात कुणीही प्रवेश करू शकतो. येथील इमारतींच्या खिडक्या, त्यांच्या काचा, त्यांची लाकडी चौकटी, दरवाजे एवढेच नाही, तर त्यांच्या विटाही चोरीस गेल्या आहेत. त्यामुळे दिंडोरीरोडला जाताना या भागाकडे नजर टाकल्यास इमारतींची चाळण झालेले सांगाडे नजरेस पडतात.

रातोरात होते साहित्य गायब

दिंडोरीरोडवर महावितरणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या सेवेच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करणाऱ्या इमारती पूर्वी दिमाखात उभ्या राहिल्या होत्या. त्या काळात अशा प्रकारे बांधकाम नजरेत भरत होते, त्याच बांधकामांची आजची अवस्था या इमारती कोरल्या आहेत की काय, अशी झाली आहे. येथील एकही दरवाजा किंवा खिडकी शिल्लक राहिलेली नाही. केवळ मोठ-मोठी छिद्रे असलेल्या भिंती दिसत आहेत. त्या काळी लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या ज्या इमारतींच्या खोल्या आजही वापरात आहेत त्यांची अवस्था आजही चांगली आहे. जेथे कुणी राहत नाहीत, त्या खोलीच्या दारे-खिडक्या रातोरात गायब झालेल्या दिसतात, असे येथे राहणारे कर्मचारी सांगतात.

मोजक्याच रहिवाशांतही धास्ती

सध्या या कार्यालयात बाहेरगावांहून बदली होऊन आलेले कर्मचारी राहत असल्याचे दिसते. त्यांना दुसरीकडे निवासाची व्यवस्था नसल्यामुळे येथे नाइलाजास्तव राहावे लागत आहे. अशा परिस्थितीमुळे त्यांनाही येथे राहणे नकोसे झाले आहे. येथे चोरट्यांच्या त्यांना त्रास नसल्याचे ते सांगत असले, तरी शेजारीच्या रिकाम्या इमारतींची झालेली अवस्था बघून त्यांच्या मनातही धास्ती निर्माण झालेली दिसते. येथील इमारतींना पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वी येथे टाकी बांधण्यात आलेली होती. या टाकीच्या बांधकामाचे गज काढण्याच्या प्रयत्नात येथील टाकीचीही मोडतोड झालेली आहे. त्यात आजही पाणी साचलेले दिसते. या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असल्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

डुकरांचा मुक्त संचार

खिळखिळ्या अवस्थेत वापराविना पडलेल्या इमारतींच्या जागेत अनेक प्रकारचे अवैध प्रकार घडत असल्याची दबक्या आवाजात चर्चा होते. मात्र, त्याविषयी उघड बोलण्यास कुणी धजावत नाही. या सरकारी इमारतींच्या जागेत डुकरांचा सुळसुळाट झालेला आहे. या सरकारी जागेत जणू वराहपालनाचा व्यवसायच सुरू आहे की काय, असा प्रश्न पडत आहे. येथे लहान-मोठी वीस-पंचवीस डुकरे आरामशीर पडलेली दिसतात. येथील दलदलीच्या भागात त्यांचा वावर ठराविकच भागात असल्याचे दिसते. त्यांना दोन पसरट प्लास्टिकच्या ट्रेमध्ये मलमूत्र स्वरूपातील खाद्य आणून टाकले जाते, हे स्पष्ट दिसते.


या भागातील इमारतींची एखादी खोली रिकामी दिसली, की त्या खोलीत जे काही असेल ते सर्व गायब केले जाते. भुरट्या चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे येथे कोणतीही वस्तू शिल्लक राहत नाही. त्यामुळे या इमारतींची अशी दयनीय अवस्था झालेली आहे.

-वसंत ढुंबेरे, स्थानिक रहिवासी


येथे राहणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वतःच्या घराची व्यवस्था आपापल्या परीने शहराच्या इतर भागात केल्यामुळे त्यांनी या इमारतीमधील त्यांच्या खोल्या रिकाम्या केल्या आहेत. या रिकाम्या झालेल्या खोल्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे दरवाजे, खिडक्या आदी भुरट्या चोरट्यांनी गायब केल्या आहेत.

-अमित घुगे, सामाजिक कार्यकर्ता


या इमारतींच्या सुरक्षेसाठी पक्क्या सिमेंट काँक्रिटच्या भिंती असत्या, तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. येथील दारे-खिडक्या, त्यांचे लोखंड कुणी लंपास केले हे उघडपणे कुणी बोलू शकत नाही. हे प्रकार रात्रीच्या वेळी अंधारात घडत असल्यामुळे ते लक्षातही येत नाहीत.

-सदाशिव जाधव, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयातकराची कोंडी सोडविणार

$
0
0

आयातकराची कोंडी सोडविणार

खासदार राजू शेट्टी द्राक्ष निर्यातदारांना आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

नाशिक जिल्ह्यातून बांगलादेशात खूप मोठ्या प्रमाणावर द्राक्ष रवाना होतात. यंदा बांगलादेशाने द्राक्षावर आयातकर लावल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली असून, बाजारभाव कमालीचे घसरले आहे, असे गाऱ्हाणे द्राक्ष निर्यातदारांनी खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर मांडले. यावर खासदार शेट्टी यांनी द्राक्ष उत्पादकांच्या समस्या समजून घेत लवकरच शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्ली येथे संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांसोबतसमवेत चर्चा करण्याची ग्वाही दिली.

पिंपळगाव बसवंतजवळील चिंचखेड येथील मान्सून द्राक्ष निर्यात युनिटला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच भेट दिली. या वेळी परिसरातील द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीसह द्राक्ष शेतीबाबतच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.

बांगलादेशात द्राक्ष निर्यात झाली तर द्राक्षांना मोठी मागणी होते व चांगला भाव शेतकऱ्यांना मिळतो. याशिवाय परप्रांतातून नाशिक जिल्ह्यात द्राक्ष खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना पणन मंडळाचे परवाने सक्तीचे करावे यामुळे शेतकऱ्यांची रक्कम सुरक्षित होईल व व्यापारी पळून जाण्यावर नियंत्रण येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. या वेळी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, प्रांतिक सदस्य साहेबराव मोरे, संदीप जगताप, प्रवीण संधान, गंगाधर निखाडे आदी उपस्थित होते.

द्राक्षनिर्यात युनिटची पाहणी

बेदाण्यावर लावलेला भरमसाठ जी. एस.टी. रद्द करावा. नवीन सुधारित द्राक्ष जातींचे संशोधन करण्यासाठी अत्याधुनिक संशोधन केंद्र उभारावे, सध्याची किचकट पीकविमा पद्धतीत बदल करावा, शेती औषधांच्या एमआरपी नियंत्रित कराव्या, विद्राव्य खतांना अनुदान मिळावे, द्राक्षांना योग्यवेळी धरणातून पाणीपुरवठा व्हावा आणि 'अपेडा' या संस्थेकडून द्राक्ष अवशेष अहवाल मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे या अहवालाची प्रत इमेल किंवा एसएमएस द्वारे शेतकऱ्यांना मिळावी अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. खासदार शेट्टी यांनी द्राक्ष निर्यात युनिटची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>