Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नोकरभरतीप्रकरणी बारा जणांना नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विभागातील तीनशे कोटींच्या वादग्रस्त नोकरभरती घोटाळ्याच्या चौकशी अहवालात बड्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असून, या सर्वांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली.

विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालानंतर तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव, महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळेंसह १२ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यापैकी जाधव यांचा खुलासा प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त होताच दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन सावरा यांनी दिले आहे. सोबतच ही नोकरभरती रद्द करण्यासंदर्भात विधी विभागाचा सल्ला मागवला असल्याची माहिती सावरा यांनी दिली आहे.

आदिवासी विकास महामंडळातील वादग्रस्त नोकरभरतीसंदर्भात भाजपचेच खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. तीनशे पदांसाठी झालेल्या या भरतीत जवळपास तीनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच या चौकशीचे आदेश दिले होते. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी या संदर्भात चौकशी करून राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे. या चौकशी अहवालावरून गुरुवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वादळी चर्चा झाली होती, तर शुक्रवारच्या महामंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भरती रद्द करण्याचा ठराव मांडला होता. त्यावर बोलताना सावरा यांनी डवले यांच्या चौकशी अहवालात या भरतीप्रक्रियेत काही अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. भरतीप्रक्रियेत अनियमितता आढळून आली आहे. त्यानुसार महामंडळाच्या वतीने तत्कालीन एमडी बाजीराव जाधव, महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांच्यासह बारा अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याचे सावरा यांनी सांगितले. या बारापैकी ११ जणांनी खुलासा सादर केला असून, जाधव यांचा खुलासा येणे बाकी आहे. त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्याही दोषीला माफी दिली जाणार नाही. निकषानुसार कारवाई केली जाईल, असे सावरा यांनी स्पष्ट केले. लवकरच त्या संदर्भातील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे नोकरभरती चांगलीच अडचणीत आली असून, भरती झालेल्यांचे आता काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

रद्दसाठी विधीचा सल्ला

महामंडळाच्या सर्वसाधारण सभेत आदिवासी महामंडळात झालेली भरती रद्द करण्याची मागणी करणारा ठराव पारित करण्यात आला आहे. त्यावर बोलताना सावरा यांनी नोकरभरती चौकशीचा अहवाल हा विधी व न्याय विभागाकडे असून, त्यांच्याकडे नोकरभरती रद्द करता येईल काय, याबाबतही सल्ला मागितला असल्याचे सावरा यांनी या वेळी सांगितले. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सल्ला आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय नेता रडारवर

भरती प्रकरणात महामंडळाचे तत्कालीन एमडी बाजीराव जाधव, नरेंद्र मांदळेंसोबतच एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. या संदर्भातील चौकशी एसीबीकडून केली जात असून, आता हा नेताही रडारवर आला आहे. चौकशी समितीला दिलेल्या जबाबात या नेत्याचेही नाव पुढे आले असून, विधी विभागाच्या सल्ल्यानंतर अधिकाऱ्यांसह काही पदाधिकाऱ्यांवरही फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यासह त्याच्या पक्षाच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रीय स्पर्धेत २४ पदके!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय पातळीवर झालेल्या चित्रकला स्पर्धेत शहरातील व्हीनस आर्ट अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल २४ पदके मिळविली आहेत. त्यात १७ सुवर्ण आणि ७ रौप्यपदकांचा समावेश आहे. गुजरातमधील भावनगरच्या मारुती आर्ट अॅकॅडमीतर्फे ही स्पर्धा झाली.

शहरात गेल्या ३५ वर्षांपासून व्हीनस आर्ट अॅकॅडमी सुरू असून, विद्यार्थ्यांना कला सादर करण्यासाठी उत्तम संधी मिळावी यासाठी अॅकॅडमीचे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. मारुती आर्ट अॅकॅडमीकडून घेण्यात आलेली स्पर्धा तीन गटांमध्ये झाली. पहिल्या गटात चित्र काढण्यासाठी कुठल्याही विषयाचे बंधन नव्हते. दुसऱ्या गटातील स्पर्धा कार्टून या विषयावर आधारित होती, तर तिसऱ्या गटासाठी ग्रीटिंग कार्ड हा विषय होता. व्हीनस अॅकॅडमीकडून या तीनही गटांसाठी चित्रे पाठविण्यात आली होती. एकूण १४३ चित्रे पाठविण्यात आली. यात पेंटिंग स्पर्धेत ७ सुवर्णपदके, २ रौप्यपदके, कार्टून स्पर्धेत ५ सुवर्णपदके, २ रौप्यपदके, ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत ४ सुवर्णपदके व ३ रौप्यपदके, याशिवाय एका छायाचित्राला सुवर्णपदक अशी एकूण २४ बक्षिसे मिळाली आहेत.

--

चित्रांद्वारे विविध संदेश

विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या या चित्रांद्वारे विविध संदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ही चित्रे विशेष आकर्षक ठरली. ही सर्व चित्रे अभ्यासपूर्ण असून, प्रत्येक चित्रामध्ये विद्यार्थ्यांचा स्वतंत्र विचार दिसतो, असे व्हीनस अॅकॅडमीचे सुहास जोशी यांनी सांगितले. या सर्वच चित्रांमधील सुबकता, रंगसंगती, रेखीवपण याची दखल परीक्षकांकडून घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड रेल्वे स्थानकातही वाढता धोका!

$
0
0

प्रशासनाकडून उपाय योजने गरजेचे

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुंबईतील दुर्घटनेनंतर नाशिकरोडच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे. प्लॅटफार्म क्रमांक एक व दोनवरील पायऱ्या अरुंद व उंच असल्याने येथे गर्दीच्यावेळी दुर्घटना घडू शकते. यामुळे रेल्वे प्रशासनकडून उपाय योजने गरजेचे आहे.

नाशिकरोड स्थानकातून दररोज दहा ते पंधरा हजार प्रवासी प्रवास करतात. दररोज सुमारे शंभर रेल्वेगाड्या धावतात. सकाळी पाचपासून ते दहापर्यंत तर सायंकाली पाच ते दहापर्यंत गर्दी असते. प्रवाशांना गाडी पकडण्यासाठी प्लॅटफार्म एक व दोनवर धावपळ करावी लागते. यासाठी दोन प्लॅटफार्मवरील जिन्यांचा उपयोग करावा लागतो. त्यांच्या पायऱ्या अरुंद व उंचही आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना सावध पावले टाकावी लागतात. गर्दीच्यावेळी धक्का लागून एखादा प्रवासी पडल्यास मुंबईसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिकरोड स्थानकातील पादचारी पुलावरही भिकारी व चरसी असतात. त्यांच्यामुळे प्रवाशांना अडथळा येतो.

पूल जोडणार कधी?

कुंभमेळ्यात प्लॅटफार्म क्रमांक चार तयार करण्यात आला. त्यावर जाण्यासाठी नवीन व प्रशस्त जिने तसेच, पादचारी पूल उभारण्यात आला. मात्र, त्याचा वापर फार कमी वेळा होतो. सायन्स ट्रेन आली तेव्हा चौथ्या फ्लॅटफार्म व या जिन्यांचा वापर झाला होता. हा व जुना पादचारी पूल जोडण्याचे नियोजन दोन वर्षांपासून झाले आहे. मात्र, कृतीच होत नाही. हे पूल जोडल्यास गर्दी व धोकाही कमी होईल.

सरकत्या जिन्यांची गरज

अनेक दिवसांच्या मागणीनंतर नाशिकरोड स्थानकात प्लॅटफार्म एक व दोनवर लिफ्ट उभारण्यात आली. स्थानकात मोठ्या व्यापारी संकुलात असतात तसे स्वयंचलित सरकते जिने उभारण्याचा निर्णय झाला आहे. गेल्या दिवाळीत लिफ्टबरोबरच सरकत्या जिन्यांचे काम सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, अद्याप ते सुरू झालेले नाही. सूत्रांनी सांगितले की, या जिन्यांची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच काम सुरू होईल.

प्रवाशांचे साहस

एका पादचारी पुलावरून दुसऱ्यावर जाताना पायऱ्या चढाव्या लागतात. त्या चढणे कष्टप्रद असल्याने अनेक प्रवासी बिनधास्त रूळ ओलांडतात. आरपीएफ जवान मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाईही करते. परंतु, तरीही प्रवासी बोध घेत नाहीत. त्यामुळे दोन रुळांच्यामध्ये कायमचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. ते ओलांडून प्रवासी जातात. दोन्ही प्लॅटफार्मवरील पादचारी पुलाची रुंदी वाढवली आणि जिन्यांच्या पायऱ्या प्रशस्त केल्यास प्रवासी त्यांचा नक्कीच उपयोग करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी मंत्र्यांचा आश्वासनांचा पाऊस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास महामंडळाची सर्वसाधारण सभा ही ज्या वार्षिक अहवालावरून होणार होती, तोच अहवाल सभासदांपर्यंत पोहोचू नये अशी व्यवस्था अधिकाऱ्यांनी केल्याने सभेत गोंधळ झाला. संतप्त सभासदांनी अहवालच फेटाळण्याची तयारी केल्यानंतर आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरांनी बाजू सावरत, पुढे असे होणार नाही, असे आश्वासन दिले. दरम्यान, सभासदांनी मांडलेल्या अडचणींवर सावरा यांनी आश्वासनांची खैरात केली. आदिवासी विकास सेवा सोसायट्यांना वाढीव कमिशन, खावटी कर्ज संपूर्ण माफीसाठी प्रयत्न, ओटे बांधण्यासाठी दोन लाखांपर्यंत कर्ज, रोजंदारी वाहनचालकांचा प्रश्‍न, गोदाम उभारणीसाठी पुढाकार असा आश्वासनांचा पाऊस पाडला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात झाली. खासदार हरिश्चंद्र चव्हाण, व्यवस्थापकीय संचालक दिनकर जगदाळे, आदिवासी आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, धनराज महाले यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. आदिवासी विकास महामंडळाच्या सदस्यांना वार्षिक अहवालाची प्रत आठ दिवस अगोदर पाठविणे बंधनकारक असताना राज्यातील अनेक सदस्यांना ती मिळाली नाही, तर काहींना एक-दोन दिवस अगोदर प्रती मिळाल्या. यात अनेक चुका असल्याचे सदस्यांनी सांगत, अहवालाची चिरफाड केली. अहवाल फेटाळण्याची घोषणाही सभापतींनी केली. मात्र, मंत्र्यांनी वेळ मारून नेल्यानंतर सभासदांनी तक्रारींचा पाढा मंत्र्यांसमोर वाचला.

संचालकांनी उपस्थित केलेल्या समस्यांना उत्तर देताना सावरा म्हणाले, की खावटी कर्ज योजना ही बंदच करण्यात आली आहे. मात्र, आदिवासी विकास महामंडळातर्फे वितरित करण्यात आलेले २४४ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यासंदर्भात शासनदरबारी आमचा पाठपुरावा सुरू असून, ते कर्जमाफीसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. धान खरेदीसंदर्भात संस्थांच्या कमिशनचा प्रश्‍नदेखील गंभीर असून, कमिशनच्या रूपात दोन टक्के रक्कम मिळत असून, त्यात वाढ करून आम्ही ती १० टक्के करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. धान साठवणुकीसाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर राज्यात गोदामे उभारली जाणार असल्याचे सांगत शक्‍य झाल्यास इतर कुठल्या स्रोताद्वारे धान साठवणुकीसाठी गोदामे उभारता येईल, याचेही आश्‍वासन देण्यात आले. राज्यातील ९६८ सोसायट्यांची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे. त्यामुळे या संस्थांना बळकट व सक्षमीकरणासाठी सर्व सोसायट्यांच्या सदस्यांची बैठक आयोजित करून समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल. सोसायटी व महामंडळाचा अनुदान, कमिशन व वित्त मदतीचा प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल, तसेच महामंडळ व संस्था सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

तक्रारींचा वाचला पाढा

आम्ही इथे फक्त हात वर करायला आलो असे सांगत, सभासदांनी मंत्र्यांसमोरच महामंडळाच्या कारभाराची पोलखोल केली. नोकरभरती, धान खरेदीतील रखडलेले कमिशन, गोदामाची स्थिती, कर्मचाऱ्यांचा समस्या, खावटी व शबरी कर्जमाफी, महामंडळाच्या नफ्यातून संस्थांचा विकास का नाही?, रोजंदारी वाहनचालक, एकाधिकारी धान खरेदी योजनेतील अडचणी, वर्षानुवर्षे वापरत असलेले बारदाणे, संस्था चालविताना येणाऱ्या अडचणी, महामंडळाच्या पडून असलेल्या जमिनीचा रखडलेला विकास आदी प्रश्‍नांवर मंत्र्यांचे लक्ष्य वेधत सभासदांनी तक्रारीचा पाढा वाचला.

उपाध्यक्ष संचालकाला करा

खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सभेची वेळ चुकीची निवडल्याचे सांगत, अधिकाऱ्यांच्या कारभारावर टीका केली. महामंडळाचा उपाध्यक्ष हा संचालक मंडळातून निवडून करा, अशी मागणी केली. राज्यमंत्र्याला उपाध्यक्षपद देण्याऐवजी लोकांमधून निवडून आलेल्या संचालकाला उपाध्यक्षपद देण्याची मागणी करत, सभेत ठरावच करावा, असे त्यांनी सांगितले.

दोन लाख बोगस आदिवासी

आदिवासींच्या नोकऱ्यांवर बोगस आदिवासींनी कब्जा केला आहे. जवळपास दोन लाखांवर बोगस आदिवासींची संख्या असून, त्यांच्यावर ६ जुलैच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत असल्याचे सावरा यांनी सांगितले. या बोगस आदिवासींना त्यांच्या जातप्रवर्गात नोकऱ्या द्या अन् आमच्या आदिवासींच्या नोकऱ्या मुक्त करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे सावरा यांनी सांगितले. लवकरच या जागा मोकळ्या करून आदिवासींना नोकरी देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरडिया समितीच्या अहवालानंतर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयाचे सदस्य रमेश विश्वनाथ जुन्नरे यांचे एकरकमी सभासद यादीतून नाव कमी करण्याच्या कार्यकारी मंडळाच्या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यासाठी बोलवण्यात आलेली सभा रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली. या वेळी सावानात आर्थिक गैरव्यवहार केलेल्या दोषींवर चोरडिया समितीचा अहवाल प्राप्त होताच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी दिली.

सभेची सुरुवात वाचनालयाचे अध्यक्ष औरंगाबादकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. या वेळी ते म्हणाले, की हे सांस्कतिक सभागृह आहे. हा राजकीय आखाडा नाही. त्यामुळे सभासदांनी संयमाने सभेचे कामकाज चालू द्यावे. सभासदांनी त्यांच्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. ते म्हणाले, की सहा महिन्यांपासून लोकशाही पद्धतीने कामकाज सुरू आहे. त्यात वेळोवेळी सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न राहील. सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमच्या कामकाजाचा लेखाजोखा सभासदांपुढे ठेवणार आहोत. नव्याने सुरू करण्यात आलेसे कवितांचे दालन या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. संपूर्ण वर्षात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. २९ जानेवारी व ५ मार्च २०१७ रोजी झालेल्या सभांच्या इतिवृताचे वाचन अॅड. भानुदास शौचे यांनी केले. या काळात पदच्युत पदाधिकाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी कशी सुरू आहे, याची विचारणा काही पदाधिकाऱ्यांनी केली. यावर चोरडिया समितीचा अहवाल प्राप्त होताच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे वाचनालयाचे सचिव श्रीकांत बेणी यांनी सांगितले. या वेळी शिरोडे म्हणाले, की दोषींवर कारवाई करण्याचा कालावधी सांगण्यात यावा. त्यावर पदाधिकाऱ्यांनी कालावधी न सांगता लवकरात लवकर करू, असे आश्वासन दिले. गिरीश नातू यांनी आर्थिक ताळेबंद सादर केला. रात्री उशिरापर्यंत सभेचे कामकाज सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांचा प्रभाग कचरामय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार दि. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र, या मोहिमेनंतरही खुद्द महापौरांचा प्रभागच ‘कचरामय’ असल्याची स्थिती दिसून येत आहे.

शहराच्या महापौरांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग १ मधील म्हसरूळ येथील कॉलनी परिसरातील रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून, बऱ्याच ठिकाणचा कचरा अनेक दिवसांपासून उचललाच जात नसल्याने तो कुजून दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

म्हसरूळ येथील कॉलनी परिसरातील नागरिक अनियमितपणे येणाऱ्या घंटागाडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे जमा झालेल्या कचऱ्याची आजूबाजूच्या ठिकाणी विल्हेवाट लावली जाते. परिणामी परिसरात अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शिवाय ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. कचरा उचललाच जात नसल्याने कुजून दुर्गंधी पसरली आहे. डासांचे प्रमाण व रोगराईदेखील वाढत आहे. महापौरांच्या निवासस्थानाच्या फलकापासूनच्या मुख्य रस्त्यावरदेखील ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

--

जनावरांचा वाढता वावर

महापौरांच्या प्रभागात मोकाट जनावरांचे प्रमाणदेखील वाढले आहे. कॉलनी रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरांचा कळप बघायला मिळतो. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिसरातील मोकळ्या भूखंडांवर नागरिक सर्रासपणे कचऱ्याची विल्हेवाट लावतात. मोकळ्या भूखंडाशेजारीच रहिवासी इमारती, उद्याने आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे भूखंडमालकांना, तसेच कचरा टाकणाऱ्यांना नोटीस देण्याची मागणी होत आहे.

--

पंचवटीतही कचऱ्याचे ढीग

स्वच्छता ही सेवा अभियान होऊनदेखील पंचवटीतील फुलेनगर, दिंडोरीरोड, हिरावाडीरोड, हनुमाननगर, विडी कामगारनगर, तपोवन परिसर, कपिला संगम येथील नदीकाठ आदी ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वच्छता अभियान लोकप्रतिनिधींनी फोटोसेशनसाठी राबविले का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत.

--

या भागात भेडसावतेय समस्या

म्हसरूळ परिसरातील सावरकरनगर, गीतानगर, स्नेहनगर, गुलमोहर कॉलनी, हरिहरनगर, वृंदावननगर, स्वामी समर्थ केंद्र, गणेशनगर, कलानगर, म्हाडा कॉलनी येथील कॉलनी रस्त्यांच्या कडेला ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. अनियमितपणे येणाऱ्या घंटागाड्यांमुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. शहरात नुकतेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले असले, तरी महापौरांना त्यांच्या स्वतःच्या प्रभागाच्या स्वच्छतेचा विसर पडला की काय, असा प्रश्न प्रभागातील नागरिकांना पडला आहे.

--

आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळे भूखंड आहेत. काही तेथे नागरिक कचऱ्याची विल्हेवाट लावतात. त्यामुळे परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरते. डासांचे प्रमाणदेखील वाढले आहे. या समस्येकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.

-विशाल भोसले, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन स्नॅचर्सकडून १६ लाखांचा माल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या चौघा जणांच्या टोळक्यास शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आणखी दोघे फरार असून, या टोळीकडून पोलिसांनी तब्बल १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित गुन्हेगारांपैकी तिघांना मध्य प्रदेशातील सैंदवा येथून तर उर्वरित संशयितांना अंबिवली व भिवंडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

अतुल राजेश बामनका (१८, पिपलधार, सेंधवा मध्य प्रदेश), अशोक अर्जुननाथ जोगी (२६, निवाली रोड, सेंधवा) अशी दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर वासिम शमिम पटेल (१९, सेंधवा), समीर मुशिर सैय्यद (४०, अंबिवलर, ता. श्रीरामपूर, जि. नगर) या त्यांच्या साथीदारांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. शहरात गुरूवारी (दि. १४) सकाळी सहा ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. या घटनेची दखल घेत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या गँगला रडारवर घेण्याचे आदेश दिला. सहाही घटनांमध्ये गुन्हे करण्याची पद्धत एकसारखी असल्याची बाब घटनास्थळी भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्या अनुषंगाने तपास करण्यात आला. सदर घटनांमध्ये इराणी टोळ्यांचा सहभाग असल्याचा अंदाज असल्याने पोलिसांनी शोध घेतला. सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सारिका अहिरराव, शिवाजी भालेराव, पंकज पळशीकर, सुरेश शेळके, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, संतोष संगम, रवींद्र ठाकूर, सुनल जगदाळे , अरुण भोये, दीपक खरपडे आदींनी ठाणे जिल्ह्यातील अंबविली येथे छापा मारून समीर सैय्यद या संशयितास ताब्यात घेतले. यानंतर टोळीचा उलगडा झाला. त्याच्या ताब्यातील सुमारे १७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. पोलिसांनी मध्यप्रदेश येथील सेंधवा या दुर्गम भागात पोहचून वसिम शमिम पटेल यास सर्वप्रथम अटक केली. तसेच त्याचे साथीदार अतुल बामनका व अशोक जोगी यांनाही अटक केली. या टोळीकडून एक कार, दोन महागड्या दुचाकी आणि १५ तोळे सोने तर अन्य गुन्ह्यातील सुमारे साडेआठ तोळे सोने असा सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांनी शहरात १४ चेन स्नॅचिंग व एक तोतया पोलिस असे १५ गुन्हे केल्याची कबुली दिली.

गुन्ह्यासाठी कारचा वापर

इराणी टोळीतील सर्व संशयित वेगवेगळ्या ठिकाणी राहत असले तरी त्यांच्यात समन्वय होता. या टोळीने चेनस्नॅचिंगसाठी नवीन मोडस ऑपरेंडी शोधून काढली. त्यानुसार, ही टोळी कार तसेच दुचाकीने शहरात दाखल होत असे. दुचाकीवरील चोरट्यांनी चेन स्नॅचिंग केली की ते थोड्याशा अंतरावर कारमध्ये बसून घेत. तर, कारमधील संशयित दुचाकी घेऊन पसार होत असे. चेन स्नॅचिंगनंतर नाकाबंदी लावणाऱ्या पोलिसांना सदर वर्णनाचा व्यक्ती दुचाकीवर दिसत नव्हता.

चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा शोध लागला असून, तपासात आणखी काही महत्त्वपूर्ण बाबी समोर येतील. संशयित वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे असून, त्यांनी संघटित गुन्हे केल्याचे पुरावे समोर येत आहे. त्यानुसार, संशयितावर मोक्क्का कलमानुसार कारवाई करण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थान हद्दीबाहेर आज बोकडबळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सप्तशृंग गडावर दसऱ्याच्या दिवशी देवस्थानमार्फत दिला जाणारा बोकडबळी महसूल प्रशासनाने बंद केला असला, तरी देवस्थान हद्दीबाहेरील सुरक्षित जागेवर सालाबादाप्रमाणे होणारे सर्व विधी व बोकडबळी परंपरेनुसार करण्याची तयारी गड ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्यावर्षी या विधिदरम्यान केलेल्या फायरिंगमुळे बंदुकीच्या बुलेटचे छर्रे उडून १२ भाविक जखमी झाले होते. त्यामुळे यावर्षापासून प्रशासनाने बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे देवस्थान हद्दीबाहेर असलेल्या व्यायामशाळेजवळ हा विधी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. दसऱ्याला बोकडाची शिवालय तलाव ते शाळा अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. कुठलीही मानवंदना यंदा दिली जाणार नसल्याचे राजेश गवळी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेंट्रल गोदावरीच्या सभेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

गंगापूर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गोदावरी सेंट्रल कृषक सेवा सहकारी बँकेची सभा आरोप-प्रत्यारोपांनी गाजली. कर्जवसुली व गरजू शेतकऱ्यांना कर्जवाटप याबाबत ठोस चर्चा झाली नसल्याने अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

बँकेचे अध्यक्ष मधुकर खांडबहाले यांच्या उपस्थित ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या प्रागंणात पार पडली. अध्यक्ष खांडबहाले यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी प्रयन्त केला जात असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याज दरात कपात करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू असल्याचे सांगितले. यावेळी मंचावर उपाध्यक्ष अरुण पाटील, संचालक दिनकर पाटील, तानाजी पिंगळे, दौलत पाटील, रामदास पिंगळे यांसह संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते.

वार्षिक सभेत सभासदांनी कर्जवसुली व शेतकऱ्यांसाठी वेळेवर होणारा आर्थिक सहाय्य यावर ठोस चर्चा झाली नसल्याने सभासदांनी नाराजी व्यक्त केली होती. बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक दिनकर पाटील बोलण्यासाठी उभे राहिल्यावर माजी महापौर दशरथ पाटील यांनी हस्तक्षेप केला. दिनकर पाटील यांचा बोलणे मधेच तोडत बोलू देण्यास टाळले. दिनकर पाटील यांनी विविध बाबी यावेळी उपस्थित केल्या. परंतु, अन्य काही संचालकांकडून केवळ आवाज करत सभेच्या कामकाजात गोंधळ निर्माण करण्यात आला. दरम्यान, दिनकर पाटील यांनी आपली बदनामी केल्याप्रकरणी संस्थेच्या १२ संचालकांविरोधात पाच कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा दाखल केला असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयशरची धडक; वीज कंपनीचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव आयशर मालट्रकने धडक दिल्याने विजेच्या दोन खांबांचे नुकसान झाले. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. सोमवारी (दि. २५) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.

गंगापूररोडवरील सप्तशृंगी देवी मंदिर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ हा प्रकार झाला. भरधाव येणाऱ्या आयशरने (एमएच ४३ बीजी २८१०) वीज कंपनीच्या दोन सिमेंट पोलला धडक दिली. यात पोल व त्यावरील वायरिंगचे नुकसान झाले. ही घटना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने घडली होती. घटनेचा अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीजे ध्वनीप्रदूषण; दोघांविरूद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रास-दांडियात डीजेचा आवाज वाढवून ध्वनी प्रदूषण कायद्याचे उलंघन केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण विजय कापडणे (रा. महाराष्ट्र कॉलनी, सातपूर) आणि सचिन रंगनाथ तिडके (रा. रथचक्र चौक, इंदिरानगर) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांनी विनापरवाना सिटीसेंटर मॉल परिसरातील ठक्कर डोम भागात रास-दांडियाचे आयोजन करून डीजे साउंड सिस्टीमचा मर्यादापेक्षा जास्त आवाज ठेवून न्यायालयीन आदेशाचे उलंघन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून लॅपटॉप लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप व महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मनीष रमेश पटेल (रा. सत्यम पार्क, नाशिक-पुणे महामार्ग) यांनी फिर्याद दिली. पटेल हे सोमवारी (दि. २५) रात्री कामानिमित्त मुंबईनाका भागात गेले होते. महामार्ग बसस्थानकाकडून चांडक सर्कलच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर त्यांनी आपली कार (एमएच १५ सीटी ६८४७) पार्क केली. चोरट्यांनी कारची काच फोडून लॅपटॉप व शैक्षणिक आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग चोरून नेली. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक बोडके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेशी अश्लील संभाषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोबाइलद्वारे कॉल करून एकाने ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी महेश पाटील नावाच्या अज्ञात मोबाइलधारकाविरुद्ध सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळ जळगाव जिल्ह्यातील आणि सध्या अशोकस्तंभ भागात राहणाऱ्या महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. गुरूवारी सकाळी ही घटना घडली. पीडित महिला घरात एकटी असतांना त्यांच्या मोबाइलवर कॉल आला. महेश पाटील बोलत असल्याचे सांगून त्याने महिलेच्या पतीबाबत विचारपूस केली. तसेच काही खासगी विचारणा करण्यास सुरुवात केली. यावेळी संतप्त महिलेने त्यास जाब विचारीत पुन्हा फोन करू नको, असा दम दिला. त्यावेळी संशयित आरोपीने थेट शरीरसुखाची मागणी करीत महिलेस अश्लिल भाषा वापरून विनयभंग केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंगळवाद्याविरोधात आणखी एक गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गुन्हे शाखेने पकडलेल्या चंगळ करणाऱ्या संशयिताविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधव बापू आहेर (२४, रा. कसबे-सुकेणे, ता. निफाड) या संशयितास आठ दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्या चौकशीत पाचहून अधिक गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्यानंतर शिवाजीनगर येथील रहिवासी नारायण मारूती चौधरी (५५) यांनी उपनगर पोलिस ठाण्यात माधव आहेर विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

पाच सप्टेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवाजी नगर येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये चौधरी गेले होते. त्यावेळी माधवने त्यांना धक्का देत त्यांच्या हातातील एटीएम कार्ड खाली पाडले. त्यावेळी माधवने चौधरी यांच्याकडील एटीएम स्वत:कडे ठेवत त्यांना दुसऱ्याचे एटीएम कार्ड दिले. त्यानंतर चौधरी यांचे एटीएम कार्ड वापरून माधवने ६३ हजार २०० रुपये काढून घेत चौधरींची फसवणूक केली. दरम्यान, पोलिस तपासात माधवने अनेकांना याचप्रमाणे गंडा घालून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्याने हे पैसे जुगार आणि मुंबई, ठाणे येथील चंगळवादात उडवल्याचीही कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोटमगाव यात्रेत चोरट्यांचा सुळसुळाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

कुठलीही यात्रा असो की गर्दीचे ठिकाण, चोरट्यांकडून हमखास डल्ला मारला जातो. नवरात्रीनिमित्त कोटमगावच्या यात्रेत अनेक स्टॉल्समधून वस्तूंवर चोरट्यांनी हात साफ केला. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांसह विक्रेत्यांनी केली आहे.

कोटमगाव यात्रेत यंदाही अनेकांनी आपली छोटी मोठी दुकाने (स्टॉल्स) थाटले आहेत. या स्टॉल्सच्या मंडपाचे कापड फाडून रात्री चोरट्यांनी हात साफ केल्याने दुकानदार चिंतेत आहेत. बाळकृष्ण दौंडे (तालुका कोपरगाव) यांनी यात्रेत लावलेल्या ज्वेलरी, बांगडीच्या दुकानातील हिरो होंडा कंपनीचे तीस हजार रुपये किमतीचे जनरेटर चोरट्यांनी चोरुन नेले. तर विशाल सोनार (येवला) यांच्या इमिटेशन ज्वेलरी दुकानातील ज्वेलरी बॉक्सवर चोरट्यांनी हात साफ केला. यात त्यांना १५ हजार रुपयांचा फटका बसला. भगवान धनगे (तालुका श्रीरामपूर) यांच्या दुकानातून चोरट्यांनी गॅस सिलिंडर गायब केले. संस्थान तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रा परिसरात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मोठा पोलिस फौजफाटाही तैनात आहे. तरीही चोरट्यांनी केलेल्या या धाडसी चोऱ्यांबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासले असता त्यात काहीच आढळून आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी येवला शहर पोलिसात अदयापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतजमिनीची विक्री; आठ जणांवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील निमगाव येथील शेत गट नं. १९५, २२७ ही शेतजमीन आठ जणांनी संगनमतकरून अशोक सखाराम अहिरे (बागुल) या नावाने बनावट सातबारा तयार करून भरत भामरे (रा. दरेगाव) यांना परस्पर विक्री करून फसवणूक केली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेबीबाई यशवंत साबळे (७५, रा. पुष्पाताईनगर, भायगाव) यांनी फिर्याद दिली. सब रजिस्टर कार्यालयात २५ मार्च २०१६ रोजी हा प्रकार घडला. एच. डी. गांगुर्डे (रा. निमगाव), अशोक सखाराम अहिरे (बागुल रा. द्याने-रमजानपुरा), भरत किसन भामरे (रा. पवारवाडी), अशोक हरी पिंपळे, अशोक मंगळू खरे, रतन शामराव अहिरे, दिनकर प्रकाश वाल्मिक अहिरे यांनी फिर्यादी व साक्षीदार (वारसदार) यांच्या कायदेशीर मालकीची शेत जमिन बनावट सातबारा तयार करून परस्पर विक्री करून खरेदी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागडती हरणे अन् काळविटांनी खुलले ममदापूर

$
0
0

संजय लोणारी, येवला

येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागातील हजारो हेक्टर विस्तीर्ण असे वनक्षेत्र अन् या वनक्षेत्रातील हजारोंच्या संख्येने असलेला हरीण, काळवीट या वन्यजीवांचा संचार म्हणजे निसर्गाने दिलेला एक मोठा अनमोल ठेवाच. याच उत्तरपूर्व भागात राजापूर, ममदापूर, देवदरी, खरवंडी, सोमठाण जोश आदी भागातील वनक्षेत्रात पाउल ठेवले तर जागोजागी नजरेत पडतात ते इकडून तिकडे बागडणारे, मनुष्याला क्षणभर पाहून टूणकन लांब उडी घेत अगदी वायुवेगाने दूर दूर जाणारे हरणे, काळवीटे. निसर्गाच्या या ठेव्यातील हरणांचा एखादा कळप नजरेत पडतो तेव्हा, पाहणाऱ्याच्या डोळ्यांची पारणे न फिटली तर नवलच. गेल्या काही दिवसात परतीच्या पावसाने तालुक्यात मोठी विश्रांती घेतली असली तरी त्याअगोदर यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे या वनक्षेत्रात जागोजागी मोठी हिरवळ निर्माण झाली आहे. जागोजागी गवत उगवल्याने या हिरव्यागार कुरणात वन्यजीवांच्या अन्नाची चांगलीच सोय झाली आहे. त्यातूनच सध्या हे वन्यजीवन बहरल्याचे चित्र दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थानच्या जागेत त्र्यंबकराजाचे सीमोल्लंघन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकराजाचे सीमोल्लंघन शनिवारी मोठ्या थाटामाटात पार पडले. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर नगराध्यक्षा तृप्ती धारणे यांच्या कुटुंबीयांनी देवस्थानला दिलेल्या जागेत शमीवृक्ष पूजन झाले.

गत पाच वर्षांपासून पूर्वीच्या श्री कामेश्वरानंद आश्रमात शमी पूजनासाठी पालखी नेण्यास यावर्षी देखील देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने विरोध दर्शविला.

शनिवारी पालखी कामेश्वरानंद महाराज आश्रमाच्या समोर आली तेव्हा बिंदू महाराज यांनी विनंती केली. मात्र देवस्थान प्रशासनाने पालखी थांबविली नाही. त्यामुळे काही वेळ वादाचा प्रसंग निर्माण झाला. उपविभागीय पोल‌िस अधिकारी शाम वळवी, पोलिस निरीक्षक सोनवणे आदींनी बिंदू महाराज यांच्याशी संवाद साधत वाद मिटवला. कामेश्वरानंद महाराज यांच्या आश्रमाचे शेजारच्या जागेत मंडप टाकून सजावट करण्यात आली होती. तेथे पालखी उतरविण्यात आली. याच ठिकाणी देवस्थान चेअरमन न्यायाधिश बोधनकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यं सैनिक तथा विश्वस्त यादवराव तुंगार, कैलास घुले, अॅड. श्रीकांत गायधनी, सचिन पाचोरकर, डॉ. सत्यप्रिय शुक्ल आदींनी शमी वृक्षाचे पूजन केले. नगराध्यक्षा तृप्ती धारणे, पंकज धारणे आदी उपस्थित होते.

सजवलेल्या बैलगाड्या, पारंपरिक पेहराव असलेले सशस्त्र पहारेकरी, पालखी सोबत मनोज तुंगार, गिरीश जोशी, अजिंक्य जोशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कामेश्वरानंद आश्रमाच्या भक्तमंडळाने पालखी परत फिरल्यानंतर प्रवेशद्वारी डॉ. बिंदू महाराज, ओमगिरी महाराज, नीलेश खैरे, रामसींग परदेशी, आदींनी पूजन केले.

कामेश्वरानंद महाराज आश्रमात अनेक वर्षांपासून पालखी उतरविण्यात येत होती. ती प्रथा अचानक बंद केली. देवस्थान ट्रस्टने पालखीची जागा स्वतःच्या मनाने बदलली आहे. आश्रमात शमीचा वृक्ष आहे. असे असतांना पालखीची जागा बदलण्याची आवश्यकता नव्हती.
-डॉ. बिंदू महाराज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’रूपी रावणाचे दहन

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला जिल्ह्यात अद्याप विरोध कायम आहे. तो दर्शविण्यासाठी दसऱ्याचे औचित्य साधून राज्य सरकाररूपी रावणाचे दहन करण्यात आले. इगतपुरीतील अवचितवाडी आणि सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे रावणरूपी सरकारचे दहन करण्यात आले.

सरकारच्या आदेशानुसार प्रशासनाने समृद्धी महामार्गासाठी जमिनी संपादनाचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत ८० हेक्टर जमिनींचे संपादन करण्यात आले आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांनी विरोधाचे निशाण फडकवत ठेवले आहे. दसऱ्याचे औचित्य साधून अवचितवाडी येथे सरकारच्या निषेधार्थ रावणदहन करण्यात आले. शिवडे येथेही अशाच प्रकारचे आंदोलन करून सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे समृद्धी महामार्गास इगतपुरी तालुक्यात विरोध मावळला असल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. अवचितवाडी येथे समृद्धीविरोधी संघर्ष समितीचे सचिव भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली ‘समृद्धी’नामक राक्षसाचे दहन करण्यात आले. या वेळी दौलत दुभाषे, अरुण गायकर, ज्ञानेश्वर तोकडे, विजय कडू, मच्छिंद्र भगत, ज्ञानेश्वर कडू, गोरख हाडके यांच्यासह शेकडो शेतकरी व महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणारोडची कोंडी फुटणार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

द्वारका ते दत्त मंदिर चौकादरम्यान प्रस्तावित उड्डाणपुलासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या अभिनव आकार या तांत्रिक सल्लागार समितीने नुकतीच या मार्गाची पाहणी करून सर्वेक्षण केले. समिती आपला अहवाल केंद्राला तीन महिन्यात देणार आहे. त्यामुळे नाशिकरोडची कोंडी लवकरच फुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

द्वारका ते नाशिकरोडदरम्यानचा वाहतुकीचा मुद्दा कळीचा झाला आहे. या मार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, अनेकांचा बळी गेला आहे. द्वारका ते दत्त मंदिर चौक यादरम्यान उड्डाणपूल करून ही कोंडी सोडविण्याची मागणी नागरिक व वाहनचालक अनेक वर्षांपासून करीत आहेत. नाशिकरोड व नाशिक या दोन शहरांना जोडणारा हा प्रस्तावित उड्डाणपूल वाहतूक कोंडीवर नामी उपाययोजना ठरणार आहे. हा ५.९ किलोमीटरचा रस्ता महापालिका हद्दीत येतो.

या पार्श्वभूमीवर नवीन उड्डाणपूल तयार करताना जागेवर काय अडचणी येऊ शकतात हे जाणून घेऊन जुन्या उड्डाणपुलावेळी उद्भवलेल्या त्रुटी राहू नयेत म्हणून हा पाहणी दौरा करण्यात आला. या मार्गावर बिटको चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आहे. परंतु, त्याने वाहतुकीचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. या मार्गावर सिन्नर, शिर्डी, पुणे अशी वाहतूक सुरू असते. भविष्यात ही वाहतूक वाढणार आहे.

गडकरींचे सहकार्य

द्वारका ते दत्त मंदिरदरम्यान उड्डाणपुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव खासदार गोडसे यांनी नाशिक दौऱ्यावर आलेले केंद्रीय रस्ते व अवजड उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडला होता. हा मार्ग महापालिकेच्या हद्दीत आहे. महापालिकेकडे उड्डाणपुलासाठी निधी नाही. हा राष्ट्रीय महामार्ग घोषित केल्यास निधी मिळेल, असे त्यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणत निधीची मागणी केली. तिला गडकरींनी तत्त्वतः मान्यता दिली. त्यानुसार आता कार्यवाही सुरू झाली आहे.


समस्या उद््भवणारी ठिकाणे

नाशिक-पुणे महामार्गावर वाहतुकीची सर्वांत जास्त कोंडी होणाऱ्या ठिकाणांमध्ये द्वारका, आयनॉक्स, आंबडेकरनगर सिग्नल, उपनगर नाका चौक, सेंट झेवियर्सचा चौक, म्हसोबा, दत्त मंदिर बस स्टॉप यांचा समावेश आहे. या ठिकाणी बेशिस्त नागरिक, सिग्नल न पाळणारे वाहनचालक यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. द्वारका चौकात रिक्षाचालक बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करतात, तर तेथून पुढे जनरल वैद्यनगरपर्यंत टेम्पो, ट्रक उभे असतात. आयनॉक्स चौक ते आंबेडकर चौकापर्यंत वाहने बेकायदेशीरपणे पार्क केलेली असतात. उपनगर ते दत्त मंदिर चौक रस्ता अरुंद आहे. या मार्गावरील चौकांमध्ये व सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक पोलिस नसतो. या सर्व कारणांमुळे नाशिक-पुणे महामार्ग वाहतुकीस अपुरा पडत आहे.


अहवाल तीन महिन्यांत

आकार अभिनव कंपनी सविस्तर अहवाल तयार करून केंद्र सरकारला तीन महिन्यांत सादर करेल. या मार्गाच्या सर्वेक्षणावेळी खासदार हेमंत गोडसे, केंद्राने नियुक्त केलेल्या आकार अभिनव संस्थेचे मुख्य सल्लागार व व्यवस्थापक अमोल खेर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता एस. टी. कोलते, महापालिकेचे कार्यकारी अभियंता टी. बी. चव्हाण, महापालिका शाखा अभियंता रमेश पाटोळे, उपअभियंता एस. के. कोलते, एस. टी. बडगुजर, शाखा अभियंता व्ही. के. चौधरी, आर. जी. पालवे, सिटी फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग आदी उपस्थित होते. या उड्डाणपुलासंदर्भात संबंधित केंद्रीय समितीने केलेल्या पाहणीमुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images