Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कांदा तीनशे रुपयांनी गडगडला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गुरुवारी क्विंटलमागे कमाल २६४९ रुपये असा उच्चांकी भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती टेकवणाऱ्या उन्हाळ कांद्याने शुक्रवारी मात्र उत्पादक शेतकऱ्यांची काहीशी निराशा केली. गुरुवारी उन्हाळ कांदा बाजारभावाने घेतलेली मोठी उसळी बघता शुक्रवारी अनेकांनी बाजार समितीची वाट धरली. मात्र आवक वाढताच गुरुवारच्या तुलनेत उन्हाळ कांदा बाजारभाव कमाल व सरासरी तीनशे रुपयांनी खाली आला.

ज्यांनी कांदा चाळीत उन्हाळची साठवण केली आहे त्यांच्यात खुशीचे वातावरण दिसत आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दहा दिवसात उन्हाळ कांदा बाजारभावाचा आलेख वरवर सरकताना गुरुवारी उन्हाळला प्रतिक्विंटल किमान ८०० ते कमाल २६४९ रुपये (सरासरी २४००) असा बाजारभाव मिळाला होता. या हंगामातील हा कमाल उच्चांकी बाजारभाव असल्याने उत्साहित झालेले शेतकरी शुक्रवारच्या कांदा लिलावासाठी गुरुवारी सायंकाळपासूनच येवला बाजार समितीत मुक्कामी डेरेदाखल झाले होते. एकदम ट्रॅक्टरची वाढलेली संख्या बघता बाजार समिती हाउसफुल्ल होताना मार्केट कमेटीसमोरील मनमाड-नगर राज्य महामार्गावर लांबच लांब ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, गुरुवारच्या तुलनेत उन्हाळचा बाजारभाव सरासरी तसेच कमाल देखील तीनशे रुपयांनी खाली आल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला.

शुक्रवारी येवला बाजार समितीत जवळपास साडेसातशे ट्रॅक्टर दाखल झाले होते. त्यातील सहाशे ट्रॅक्टर तसेच गुरुवारच्या राहिलेल्या २२० पिकअप रिक्षा यातील कांद्याचा शुक्रवारी दिवसभरात लिलाव झाला. त्यात उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान १ हजार ते कमाल २३५० (सरासरी २१००) असा भाव मिळाला. मात्र दुपार सत्रात कमाल बाजारभाव पुन्हा ५० रुपयांनी खाली आल्याचे दिसले. अंदरसूल उपबाजार आवारात शुक्रवारी उन्हाळ कांद्याला किमान १ हजार ते कमाल २४५३ (सरासरी २१००) असा भाव मिळाला. कांदा अधिक गडगडू नये याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंतप्रधानांना पत्र लिहिले अन् महिलेला हक्काचे घर ​मिळाले

$
0
0

धुळे जिल्हा प्रशासन यंत्रणा कुचकामी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवा यासाठी जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही तक्रारीची दखल न घेतल्याने साक्री तालुक्यातील निजामपूर गावातील महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. या महिलेच्या पत्राची दखल घेत पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री कार्यालयातील मुख्य सचिवांना आदेश्‍ा देत निराधार महिलेला पंतप्रधान आवास योजनेचे घर मिळवून दिले आहे. मात्र यामुळे धुळे जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा पुन्हा एकदा समोर आला असून, जिल्ह्यात सरकारच्या विविध योजनांचा नागरिकांना लाभ होत नसल्याने शासकीय यंत्रण्‍ाा कुचकामी ठरत आहे.

निजामपूर येथील विधवा महिला मंगलाबाई उत्तम शिंदे या मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. तसेच गेल्या तीस वर्षांपासून सरकारकडून देण्यात आले दारिद्र्यरेषेखालील कार्डही मंगलाबाईंना मिळाले आहे. मात्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळावे यासाठी त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांकडे आवश्यक असलेले कागदपत्रे जमा केली होती. मात्र शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी मंगलाबाई यांच्या घराच्या प्रस्तावाबाबत कोणताही खुलासा गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनदेखील मिळत नसल्याने अखेर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचे ठरविले.

यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून, गेल्या अनेक वर्षांपासून माझ्याकडून कोणताही कामधंदा होत नाही. घरोघरी धुणी-भांडी करून कसेतरी पोट भरण्यासाठी काम करीत आहे. मात्र माझे घर जुने झाले असून, ते बांधणे शक्य नाही. त्यामुळे मला सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घर मिळावे, अशी मागणी केली. हे पत्र मंगलाबाईंनी दि. ७ जुलै २०१७ रोजी पाठविले. त्यावर तत्काळ पंतप्रधान कार्यालयाचे विभागीय सचिव अलोक सुमन यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून योग्य ती कारवाई करण्याचे पत्र दि. २ ऑगस्ट २०१७ रोजी पाठविले. त्यामुळे मंगलाबाई यांनी पाठविलेल्या पत्राची दखल घेत अखेर सरकारच्या योजनेतून त्यांना हक्काचे घर मिळणार हे नक्की.

हा सर्व प्रकार पाहता धुळे जिल्ह्यातील अधिकारी हे नागरिकांना सरकारच्या विविध योजनांचा लाभापासून वंचित ठेवत असल्याचे स्पष्ट होते. यामुळे सरकारच्या योजना जिल्ह्यातील सर्व तालुक्यात व गावागावात पोहोचविणे गरजेचे झाले आहे. त्याचप्रमाणे त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ हा नागरिकांना मिळतो की नाही, याची खातरजमादेखील जिल्हाधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार गोटेंचे वादग्रस्त संभाषण उघड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

भाजपचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासंदर्भातील भ्रष्टाचाराची प्रकरणे राज्यभर गाजत असताना भाजप आमदार अनिल गोटे यांची एका पदाधिकाऱ्याकडून नवीन चलनातल्या पैशांची मागणी करणारी ऑडिओ क्लिप धुळे जिल्हा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज मोरे यांनी एका पत्रकार परिषदेत उघड केली आहे. तर त्यातील आवाज आपलाच असल्याचे गोटे यांनी मान्य करून याचा खुलासा लवकरच करणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे आता आमदार गोटे हे तेलगी घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा गोत्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीने ऐकवलेली ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा आहे. संभाषणही माझेच आहे. मी काही घाबरत नाही. याचा सविस्तर खुलासा मी पत्रकार परिषदेत देईन.

-अनिल गोटे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपर मिलसाठी अर्थमंत्र्यांना साकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

चलनी नोटा छापण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रस्तावित पेपर मिलच्या जागेची निश्चिती गुणवत्तेवरच केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प नाशिकमध्ये होण्याची शक्यता वाढली आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्लीत अर्थमंत्र्यांची नुकतीच भेट घेऊन पेपर मिलसाठी गुणवत्तेवर जागेची निश्चिती करावी, अशी मागणी केली होती.

खासदार गोडसे यांनी नाशिक सर्वदृष्ट्या कसे उपयुक्त आहे, हे मांडताना नाशिकरोड प्रेसकडे मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. कापूसही जळगावहून उपलब्ध होणार आहे. पाण्यासाठी गोदावरी व दारणा नद्या नाशिकरोड येथे आहेत. मिलसाठी लागणाऱ्या पाण्याचा आरक्षणाचा दाखलादेखील मिळाला आहे. वीज व पर्यावणाची परवानगी मिळाली आहे. रेल्वे स्टेशनही जवळ आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचणार आहे. राज्य शासनाने प्रकल्पासाठी सवलत जाहीर केली आहे. या गोष्टींमुळे प्रकल्पाला किंमत कमी लागणार आहे. जो कागद निर्माण केला जाणार आहे त्याचा वापरदेखील नाशिकरोड प्रेसमध्ये केला जाणार आहे. त्यामुळे नाशिक हे या प्रकल्पासाठी योग्य ठिकाण असल्याचे अर्थमंत्री जेटली यांना सांगितले. यावेळी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे व अन्य कामगार नेते उपस्थित होते. त्यावेळी अर्थमंत्र्यांनी वरील आश्वासन दिले. पंधरा दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थ उपसचिव सौरव गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयावर मंत्री निर्णय घेतील, असा निर्णय घेण्यात आला होता.

--

सरकारी समितीमार्फत सर्वेक्षण

गेल्या नऊ महिन्यांपासून पेपर मिल प्रकल्प कोणत्या राज्यात कोणत्या व ठिकाणी असावा याचे सर्वेक्षण सरकारच्या समितीतर्फे सुरू आहे. शासनाच्या मेक इन इंडिया कार्यक्रमानंतर जो कागद करन्सी नोट प्रेससाठी आयात होत होता, त्यासाठी देशातच कागदाचे कारखाने असावेत, असे उद्दिष्ट केंद्र शासनाचे ठेवले आहे. त्यानुसार प्रस्तावित पेपर मिलचा १२ हजार टन कागद निर्माण करण्यासाठी ओरिसा, आंध्र प्रदेश व नाशिक या तीन ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहीहंडीला ‘साउंड’ बंद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा ७५ डेसिबलपेक्षा जास्त असू नये असा आदेश दिल्याने काम करणे अवघड आहे. या मर्यादेत काम करताना ध्वनिक्षेपणाची मर्यादा ओलांडण्याची भीती असल्याने दहीहंडीपासून (दि. १५) राज्यव्यापी बंद पुकारला आह. यात नाशिक जिल्ह्यातील सर्व साऊंड सिस्टीम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती साउंड सिस्टिम वेल्फेअर असोसिएशनने शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

दहीहंडीच्याच दिवशी स्वातंत्र्यदिन असल्याने यावेळी असोसिएशनतर्फे साऊंड सिस्टीम बंद करून सन्मानपूर्वक राष्ट्रगीत सादर केले जाणार आहे. या आंदोलनाबरोबरच शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही साउंड सिस्टिम वेल्फेअर असोसिएशनकडून यावेळी सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी ७५ डेसिबल आवाजाची मर्यादा घालून दिली आहे. ती ओलांडणाऱ्या साउंट व लायटिंग व्यावसायिकांवर पोलिस गुन्हे दाखल करत असल्याने व्यवसायापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे. सदर मर्यादा पाळत साउंट सिस्टिम चालविणे शक्य नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे. सरकारने साउंटचे परवाने देणे बंद केल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात दोन ते तीन हजार व शहरात ४५० जणांचा यावर रोजगार आहे. तसेच या व्यवसायवर प्रत्येकी पाच जणांचे कुटुंब अवलंबून आहे. पण आवाजाच्या मर्यादेमुळे या व्यावसायिकांना आता हा सर्व त्रास सहन करावा लागत आहे.

आम्ही व्यवसाय करतांना आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे परवडणारे नाही. त्यामुळे सरकारने आवाजाच्या मर्यादेचा फेरविचार करावा. तसेच ७५ डेसिबलच्या मर्यादेपेक्षा आमच्या व्यवसायाला आवश्यक असलेली आवाजाची मर्यादा वाढवून द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे यावेळी असोसिएशनतर्फे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेत अध्यक्ष अमर वझरे, मंगेश पठाडे, हितेश इंगळे, पराग जोशी, अरविंद म्हसाणे, अमिट पोटे ,सतीन माने याच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

गाणे ऐकायला मिळणार नाही
प्रोफेशनल ऑडिओ अ‍ॅण्ड लायटिंग असोसिएशन अर्थात ‘पाला’तर्फे १५ ऑगस्ट रोजी राज्यभर साउंड म्यूट डे पाळला जाणार आहे. त्यालाही आमचा पाठिंबा आहे. साउंट सिस्टिम असोसिएशनच्या साउंट म्यूट डे आंदोलनाने १५ ऑगस्टची देशभक्तीपर गिते, दहीहंडीच्या कार्यक्रमाची गाणी ऐकायला मिळणार नाही.

पोलिसांचे वर्तन उद्धट
साउंट सिस्टिम चालविताना आम्ही तांत्रिक शिक्षण घेतो; पण पोलिस आमच्याशी उद्धट वर्तन करतात, मारहाणही करतात. इतकेच नाहीतर साउंट सिस्टिमचे नुकसान करतात. त्यामुळे आमचे नुकसान होते. बऱ्याच प्रकरणात तर पोलिस आम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक देतात. त्याचाही आम्हाला या व्यवसायत त्रास सहन करावा लागत असल्याचे मत साउंड सिस्टिम व्यावसायिकांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलित वस्ती होणार आता ‘स्मार्ट’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
राज्य सरकारच्या स्मार्ट दलित वस्ती योजनेत एकलहरे ग्रामपंचायतीचा समावेश झाला आहे. या योजनेंतर्गत एकलहरेगाव व सिद्धार्थनगर दलित वस्तीत विविध विकासकामांसाठी सुमारे २० कोटी रुपयांपर्यंतच्या निधीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेशही अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.
एकलहरेगावासह सिद्धार्थनगर या दोन्ही दलित वस्तीतील विविध विकासकामांचा प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारे अधिकारी अनिल लांडगे यांच्या उपस्थितीत एकलहरे ग्रामपंचायतीत नुकतीच बैठक झाली. जिल्ह्यातून एकलहरे या एकमेव ग्रामपंचायतीचा स्मार्ट दलित वस्ती योजनेत समावेश झाला आहे. यासाठी देवळालीचे आमदार योगेश घोलप व जिल्हा परिषद सदस्य शंकरराव धनवटे यांनी पाठपुरावा केला. या योजनेअंतर्गत दलित वस्तींचा बकालपणा दूर केला जाणार आहे. या सर्व कामांसाठी सुशांत पाटील यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक करण्यात आली. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग, समाज कल्याण विभागाचे अधिकाऱ्यांसह गटविकास अधिकारी, सरपंच राजाराम धनवटे यांच्यासह अशोक राजोळे, रामदास डुकरे, मधुकर कापसे, सागर जाधव, हरीश भवर आदी उपस्थित होते.

ही कामे केली जाणार
स्मार्ट दलित वस्ती योजने अंतर्गत भूयारी गटार, पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण केंद्र, सार्वजनिक शौचालये, सभागृह, अंतर्गत जोडरस्ते, गार्डन, स्मशानभूमी दुरुस्ती, दशक्रिया विधी शेड, घाट, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना घरकूल व गॅस जोडणी, वीजजोडणी अशा स्वरुपाची नागरी विकासांची कामे केली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेत मोबाइल चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विजया बँकेतील बँक अधिकाऱ्याच्या केबिनमधून ४० हजार रुपये क‌िमतीचा आयफोन चोरीस गेला. याप्रकरणी प्रियाली प्रदीप कांबळे (रा. ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
सारडा संकुलमध्ये विजय बँक असून बुधवारी (दि. ९) दुपारी एक ते दीडच्या सुमारास त्यांच्या केबिनमध्ये एक तरुण युवक आला. त्याने कांबळे यांचा ४० हजार रुपये किमतीचा आयफोन त्यांची नजर चुकवून चोरून नेला. कांबळे यांनी सरकारवाडा पोल‌िस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएममध्ये गंडविले

$
0
0

नाशिक : बॅलन्स पाहण्यासाठी एटीएममध्ये गेलेल्या व्यक्तीकडील एटीएम कार्ड हातचलाखीने काढून घेत त्याचा वापर करून तब्बल सव्वा दोन लाख रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार घडला.
शिवाजी कचरू आव्हाळे (रा. अश्‍विननगर, पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. सिडकोतील संभाजी स्टेडियमजवळच्या एटीएम केंद्रावर १० जुलै रोजी ते पत्नीच्या बँक खात्यातील बॅलन्स पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयित राजीव हसमुखभाई भट (२९, रा. हेमगेट टॉवर, कासीमिरा गाव, मुंबई) याने हातचलाखीने त्यांच्याकडील एटीएम कार्ड बदलून घेतले. त्यानंतर त्याच कार्डचा वापर करून संशयिताने तब्बल दोन लाख २० हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी अंबड पोल‌िसांनी सायबर गुन्हे कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामगारांना धमकावले

$
0
0

नाशिक : अंबड एमआयडीसीतील प्रिसाईज व्हॅक्‍युम सिस्टिम प्रा. लि. कंपनी विरोधात घोषणाबाजी करून कामगारांना कंपनीत येण्यास मज्जाव केल्याप्रकरणी सहा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय वसंत जोशी (रा. विहंग विहार कॉलनी, पाइपलाइन रोड, आनंदवल्ली) यांनी फिर्याद दिली आहे.
अंबड एमआयडीसीत असलेल्या प्रिसाईज व्हॅक्‍युम सिस्टिम प्रा. लि. कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास संशयित तुषार गाडेकर, सुभाष शिंदे, राजेंद्र मांडवले, रवींद्र पगार, देवराम लचके, अंकुश राऊत यांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात घोषणाबाजी केली. कंपनीत येणाऱ्या कामगारांना दमदाटी करीत मज्जाव केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवी जिल्हा परिषदेची इमारत एबीबी सर्कलवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिक जिल्हा परिषदेस नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी त्र्यंबकरोडवरील एबीबी सर्कल येथील जागा उपलब्ध करण्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी तत्वत: मान्यता दिली आहे.
मुंबई येथे मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव विकास देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
नाशिक जिल्हा परिषदेच्या सध्याची इमारत प्रशासकीय कामकाजासह वाहनतळाअभावी अडचणीची ठरली आहे. जि. प. अध्यक्षा शीतल सांगळे यांनी राज्यमंत्री दादा भुसे व ग्रामविकास पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सधन कुक्कुट केंद्राची जागा जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाच्या मंजुरीसाठी मिळावी, अशी मागणी महादेव जानकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार, मंत्रालयीन स्तरावर बैठक होऊन एबीबी सर्कल येथील सधन कुक्कुट केंद्राच्या जागेत जि. प. ची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी हस्तांतरित करण्याबाबत तत्वतः मान्यता प्रदान करण्यात आली. सद्यस्थितीत कार्यरत पशुसंवर्धन विभागाचे सधन कुक्कुटपालन केंद्र जि. प. च्या मालकीच्या नाशिक तालुक्यातील बेलगावढगा, महिरवानी किंवा सैय्यदपिंपरी अशा जागांवर स्थलांतरित करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवानाची हरविलेली बॅग सापडली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर
भारतीय सैन्य दलात नोकरी असणाऱ्या जवानाची साडेचार लाख रुपये व महत्त्वाचे कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात राहिली होती. इंदिरानगर व भद्रकाली पोलिसांनी केवळ रिक्षाचालकाच्या वर्णनाने व विविध ठिकाणाच्या सीसीटीव्ही फुटेजवरून या रिक्षाचालकास गाठून ही बॅग मिळवून संबंधित जवानाला दिली. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतीय सैन्य दलातील जवान योगेश बाबुराव पाटील यांची त्र्यंबकनाका ते पाथर्डी फाटा दरम्यान रिक्षात बॅग राहिली हेाती. या बॅगेत रोख साडेचार लाख रुपये व ओळखपत्र, बँक पासबुक, चेकबुक यासारखे अनेक महत्त्वाचे कागदपत्रे होती. ही बॅग रिक्षातच राहिल्याचे लक्षात आल्यावर पाटील यांनी यांसदर्भातील इंदिरानगर पोलिसांना अर्ज दिला. या अर्जावरून पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहाय्यक आयुक्त श्रीकांत कोकाटे, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्श्नाखाली इंदिरानगर व भद्रकाली पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या मार्गावरील सर्व रिक्षा स्टॅण्डची तपासणी केली. तसेच विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ही बॅग अनिल गबरू राठोड यांच्या रिक्षात राहिल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी राठोड याची चौकशी केली असता, त्याने ही बॅग चाळीसगाव तालुक्यातील त्याची घरी ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने चाळीसगाव येथील त्याच्या गावी जाऊन ही बॅग ताब्यात घेत पाटील यांना सुपूर्द केली. रिक्षाचा नंबर नसतानाही केवळ रिक्षाचालकाच्या वर्णनावरून बॅग हस्तगत केल्याने नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भजन स्पर्धे‌त १८ मंडळांचा सहभाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अभिनव लेडीज ग्रुप, नाशिक यांच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्याच्या निमित्ताने भजन स्पर्धा घेण्यात येतात. याही वर्षी नाशिककरांच्या भरघोस प्रतिसादात ही स्पर्धा झाली. शहर परिसरातील एकूण १८ मंडळे या स्पर्धेत सहभागी झाली.
स्पर्धेमध्ये पंचम ग्रुपला ‘रामाचे रूप’ या भजनासाठी प्रथम क्रमांकाचे रोख १५०० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. कालिका मंडळाला ‘धनगराची लेक’ या भजनासाठी द्वितीय क्रमांकाचे १००० रुपयांचे तर चैतन्य ग्रुपला ‘सांगा पांडुरंगा’ या भजनासाठी तृतीय क्रमांकाचे रोख ७०० रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी स्वरगंधार ग्रुपतर्फे ‘पंढरीचे वारकरी’ या भजनासाठी विशेष पारितोषिक प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्षा रजनी जातेगांवकर यांनी केले. जाई कुलकर्णी, नवीन तांबट, शाम दशपुत्रे यांनी परीक्षण केले. याप्रसंगी ग्रुपच्या रंजना तांबट, विमल कलंत्री, उषा जातेगांवकर, सुरेखा तांबट, लिला तांबट, राजश्री चांडक, हेमा झंवर, नयना भुतडा यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची निष्ठा मराठवाड्याशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेला सत्ताधारी भाजप नेत्यांनी अजब उत्तर देत आपली निष्ठा मराठवाड्याशी असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे.

मराठवाड्याला पाणी देणे हे कायदेशीर बंधनकारक आहे, असा जावईशोध भाजप नेत्यांनी लावला. नाशिककर तहानलेले राहिले तरी चालेल; परंतु मराठवाड्याची समृद्धी झाली पाहिजे, असा पवित्रा घेतला. भाजपचे सभागृहनेते दिनकर पाटील यांनी तर मराठवाड्याला पाणी देणे आपले आद्य कर्तव्य असल्याचे सांगत, नाशिककरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

दोन वर्षांपूर्वी गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचे दुःख नाशिककर विसरले नसतांना त्यांच्या या जखमेवर पुन्हा मीठ चोळण्याचे काम भाजप नेत्यांनी सुरू केले आहे. नाशिकमध्ये दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची रास्त मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनाच भाजपने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. गंगापूर धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला होता. त्यास उत्तर देताना सभागृहनेते दिनकर पाटील यांनी जायकवाडीबाबत चर्चा करणे चुकीचे असल्याचे सांगितले. जायकवाडीला पाणी सोडणे हे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच जायकवाडीचा हिस्सा ठरला असून त्यांना माणुसकीच्या नात्याने देणे आपले आद्य कर्तव्य असल्याचा दावा पाटील यांनी केला. जायकवाडीचे राजकारण न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

मेंढेकर समितीच्या चुकीच्या अहवालाच्या आधारे जायकवाडीला पाणी सोडले जात असल्याचा आरोप नाशिक व नगरमधील नेते करतात. मात्र, नाशिकमधील भाजप नेत्यांकडून मराठवाड्याच्या गुणगान गायिले जात आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या प्रेमापोटी भाजप नेते आता चक्क नाशिकच्या पाण्यावर मराठवाड्याचा हक्क सांगायला लागले आहेत. भाजप नेत्यांच्या या भूमिकेपायी आता जायकवाडीसाठी मराठवाड्याला पुन्हा पाणी सोडले जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. यात नाशिककरांचे मोठे नुकसान होणार आहे.

बळीराजा तहानलेलाच

सध्या जायकवाडीत ५० टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. तेथे शेतीसाठी पाणी सोडले जात आहे. परंतु, जायकवाडीला पाणी पुरविणाऱ्या नाशिकमधील शेतकऱ्यांना अजूनही पाण्याचा थेंब मिळालेला नाही. अशी बिकट परिस्थिती असताना, भाजपचे नेते जायकवाडीला सोडले जाणाऱ्या पाण्यावर आपला नव्हे तर जायकवाडीचा हक्क असल्याचा दावा करत आहेत. नाशिकमधील भाजप नेते हे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या निष्ठेपायी नाशिककरांना घशाला कोरड पाडायला सांगत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यात्रेकरूंना वाचविणाऱ्या सलिमचा सत्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

दहशतवादी हल्ल्यातून ५० अमरनाथ यात्रेकरूंचे प्राण वाचविणारे बसचालक सलीम शेख यांचा शुक्रवारी येथील जमिअतुल उलमा, सम्राट मंडळ, हम हिंदुस्तानी एकता संघटना यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

येथील मोसमपूलवरील गांधी पुतळा येथे सलीम यांचे आगमन झाल्यावर माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनतर सलीम यांची मिरवणूक काढण्यात आली. महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सलीम यांनी अभिवादन केले. संगमेश्वर, किदवाई रोडमार्गे मदनी रोडवरील जमितअतुल उलमाच्या कार्यालया येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी हजारो मुस्ल‌िम बांधवांनी गर्दी केली होती.

मिरवणुकीनंतर येथील सम्राट मंडळाच्यावतीने सुभाष परदेशी व राजेंद्र भोसले यांच्यावतीने देखील सल‌िम यांचा सत्कार करण्यात आला. रात्री उशिरा शहीदो की यादगार स्मारकाजवळ सल‌िम यांचा गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भद्रकालीत तरुणाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मोबाइल मागितल्याचा राग आल्याने एका तरुणाचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. गुरूवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास एन. डी. पटेल रोड जवळील पंचशीलनगरमध्ये ही घटना घडली. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
भद्र‍काली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल प्रकाश झाल्टे (३०, रा. ध्रुवनगर, सातपूर सध्या पंचशीलनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून प्रकरणी पोलिसांनी कैलास रामचंद्र शेजूळ (३५) या संशयिताला अटक केली आहे. विशाल त्याचा मोबाइल घेण्यासाठी रात्री शेजूळ याच्या घराजवळ गेला. त्याने मोबाइलची मागणी करीत शेजूळ यांच्या घराचा दरवाजा जोरात वाजविला. शेजूळने दरवाजा उघडला. मात्र, दोहोंमध्ये त्यावेळी वाद झाला. संतप्त शेजूळ याने घरातील कुऱ्हाडीने विशाल याच्यावर दोन घाव घातले. त्यामुळे काही क्षणातच तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजू भूजबळ, पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. विशालला सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये हलविण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. विशाल झाल्टे हा कधी रिक्षा चालवित असे तर कधी मजुरीवर जात असे. संशयित शेजूळ पूर्वी रखवालदारी करायचा. हल्ली तो एका दवाखान्यात कामाला जात असल्याची माहिती तपास अधिकारी साबळे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौफुल्या नव्हे, मृत्यूचा सापळाच!

$
0
0

अपघातात पाच वर्षांत १४४ जण ठार

अभिजीत राऊत, आडगाव

मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुल्या मृत्यूच्या सापळा ठरत आहेत. आडगाव पोलिस स्टेशन हद्दीत पाच वर्षांत तब्बल १४४ जणांचा मृत्यू झाला असून, २५४ जखमी झाले आहेत. यामध्ये मुंबई-आग्रा महामार्ग आणि औरंगाबाद रोडवर अनेकांचा बळी गेला आहे, तर काही लोकांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. यामुळे भूमिपूजन झालेल्या उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम, रासबिहारी, जत्रा चौफुली धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी रोज लहान-मोठे अपघात होत असतात. त्यामध्ये काही लोक मुत्युमुखी पडतात, तर काहींना कायमस्वरुपी अपंगत्व येते. या चौफुलीवर अनेक संघटना, स्थानिक नागरिकांनी आंदोलने करून पाठपुरावा केला. त्यानंतर प्रशासनाने सर्वेक्षण करून उड्डाणपूल मंजूर करण्यात आला. पण, उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय लाटणाऱ्या शिवसेना आणि भाजप या दोन्ही सत्ताधारी जणू या कामाचा विसर पडला की, काय असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत. मागील वर्षी मोठ्या दिमाखात हा भूमिपूजन सोहळा पार पडला असला तरी तब्बल एक वर्ष उलटूनही उड्डाणपुलाच्या कामाला मुहूर्त मिळत नाही. अजून किती बळी घेण्याची प्रशासन वाट बघत आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.

रस्त्यावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. तसेच, हा रस्ता एका बाजूने औरंगाबाद महामार्गा, पुणारोडकडे जातो. चारही बाजूने अवजड व मालवाहतूक गाड्यांची वर्दळ असते. वाहनांचा वेग प्रचंड असतो. लहानमुले, वयोवृद्द नागरिकांना रस्ता ओलांडताना नाकीनव येते. शिवाय, दुचाकीचालकांना रस्ता ओलांडणे अडचणीचे ठरत आहे. कोण कोणत्या बाजूने येईल व जाईल याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांना रोज आमंत्रण मिळत आहे.

सन २०१३ पासून जुलै महिन्यापर्यंत ३५४ अपघातांची नोंद आडगाव पोलिस स्टेशन हद्दीत दाखल झाली आहे. त्यामध्ये १४४ लोकांचा मृत्यू झाला असून, २५४ जण जखमी झाले आहेत. आडगाव पोलिस स्टेशन इतकेच अपघात पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीतदेखील दाखल झाले आहेत.

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या दिमाखात उड्डाणपूल कामाचे भूमिपूजन झाले. मात्र, त्यानंतर उड्डाणपुलाच्या कामाचा विसर पडलेला दिसतो. रोज छोटे मोठे अपघात होत असून, अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे काम लवकरात लवकर काम सुरू करण्यात यावे.

- संतोष जगताप, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीचा थांबा महागात!

$
0
0


नाशिक ः एसटी महामंडळाने निश्चित केलेल्या अधिकृत हॉटेल थांब्याऐवजी दुसऱ्याच थांब्यावर बस उभी करणे १६७ बसचालकांना चांगलेच महागात पडले आहे. लांबपल्ल्याच्या बसेससाठी एसटीने अधिकृत हॉटेल थांबे जाहीर केलेले आहेत. पण, त्याएेवजी दुसऱ्याच हॉटेलच्या ठिकाणी बस थांबविल्याने या बसचालकांकडून महामंडळाने तब्बल १ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर काही ठराविक टप्प्यांवर हे थांबे निर्धारित केलेले आहेत. पण, गेल्या तीन महिन्यांत अधिकृत हाॅटेल थांब्यांवर बस न थांबविल्यामुळे एसटीचे उत्पन्न घटल्यानंतर एसटीने निर्धारित केलेल्या अधिकृत हॉटेल थांब्यावर बस न थांबविणाऱ्या १६७ चालकांच्या पगारातून १ लाख ९० हजार रुपये वसूल केले आहेत. या वसुलीत मूळ शुल्काचीच रक्कम वसूल केली गेली आहे. जुलैपासून मात्र अधिकृत बस न थांबल्यास या वाहकांवर हाॅटेलकडून घेतले जाणारे शुल्क व ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याची आकडेवारी अद्याप आलेली नाही.

प्रवाशांच्या सोयीसाठी राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर एसटीने असे विविध थांबे देण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे थांबे अधिकृत करण्यात आले. या थांब्यांवर मिळणाऱ्या सुविधांबाबत एसटीने तपासणी केल्यानंतर त्यांना परवानगी दिली गेली. त्यांच्याकडून नाममात्र शुल्क एसटी घेत असल्यामुळे त्यातून एसटीचे उत्पन्नही वाढले. पण, असंख्य बसचालक या अधिकृत थांब्यांवर बस न थांबविता अनधिकृत थांब्यांवर बस थांबवू लागल्यामुळे एसटीच्या नुकसानीबरोबरच प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर एसटीने ही धडक कारवाई केली. एसटीने एप्रिल, मे व जूनमध्ये कोणत्या थांब्यांवर कोणत्या बस थांबल्या नाहीत याची तपासणी करून ही कारवाई केली.

---

असा केला हिशेब

एसटीने प्रत्येक थांब्यावर थांबा आकार प्रतिफेरी असा दर दिलेला आहे. याचे दर वेगवेगळ्या थांब्यांवर वेगवेगळे असले, तरी सर्वसाधारणपणे साध्या बससाठी १०५, निमआराम बससाठी १२५, शिवनेरीसाठी २२० रुपये शुल्क एसटी हाॅटेल मालकांकडून आकारते. त्यासाठी रीतसर पावतीसुद्धा दिली जाते. पण, या शुल्काचे पैसे न आल्यामुळे एसटीने याचा शोध घेतल्यानंतर हा घोळ समोर आला. एसटीने कोणत्या गाड्या केव्हा व कुठे थांबतील याचे वेळापत्रक दिले आहे. त्यामुळे त्यांचे पैसे अपेक्षित आहेत. पण, ते न आल्यामुळे हा गैरव्यवहार उघडकीस आला.

---

असे दिले जातात हाॅटेलला थांबे

हाॅटलचे बस थांबे ठरविताना संबंधितांकडून निविदाही मागविण्यात येते. त्यानंतर संबंधित हॉटेलना मासिक परवाना शुल्कावर लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स पद्धतीने हे थांबे चालविण्यास देण्यात येतात. थांबे चालविण्यास घेणाऱ्या हॉटेलचालकाकडून तेथे मद्यविक्री होत नसल्याचे हमीपत्र घेऊन स्वच्छतागृहाची व्यवस्था, तसेच हॉटेलच्या स्वच्छतेबाबतही लक्ष दिले जाते. त्याचप्रमाणे हॉटेलकडे आवश्यक क्षमतेची डांबरीकरण केलेली पार्किंगची व्यवस्था, हॉटेल व इमारत दाखला, हॉटेल चालविण्याचा अनुभव असलेला दाखला, अन्न व औषध प्रशासनाचा परवाना आदी तांत्रिक गोष्टीही पाहिल्या जातात.

--

हे आहेत अधिकृत थांबे

---

हॉटेल - मार्ग

--

ग्रीन व्ह्यू- नाशिक- मुंबई

मिर्चोमॅटिक- पुणे-संगमनेर

इंद्रप्रस्थ- पुणे-नाशिक

फाउंटन फूड अॅण्ड फन- नाशिक-पुणे

हेमंत गार्डन- नाशिक-पुणे

आदित्य फूड- नाशिक-आैरंगाबाद

दत्त टी हाउस- धुळे-नाशिक

शाहू रस्सा- नाशिक-नंदुरबार

अन्नपूर्णा- नाशिक-आैरंगाबाद

राधिका गार्डन- नाशिक-आैरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहतुकीतून गोदास्वच्छतेचा प्रस्ताव

$
0
0

महासभेचा हिरवा कंदील; बीओटीचाही पर्याय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. सध्या पालिकेची आर्थिक अवस्था बिकट झाल्याने प्रदूषणासाठी होणारा खर्चही पालिकेला परवडणारा नाही. त्यामुळे भाजपच्या नगरसेविका प्रा. वर्षा भालेराव यांनी पालिकेला गोदावरीतून जलवाहतुकीचा अफलातून प्रस्ताव पालिकेला दिला आहे. गोदावरीत आंनदवल्ली ते अहिल्याबाई होळकर पुलापर्यंत बीओटी तत्त्वावर जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला असून, यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गोदावरीचे प्रदूषण नियंत्रण करण्याची सूचना करण्यात आली आहे. महासभेनेही या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे.

महापालिकेसाठी गोदावरी प्रदूषणावरील खर्च हा दिवसेंदिवस डोईजड होत चालला आहे. गोदावरी प्रदूषणासंदर्भात हायकोर्टाने फटकारल्यानंतर सध्या शासनाकडून मिळणाऱ्या निधी हा गोदावरीच्या स्वच्छतेवर खर्च केला जात आहेत. सध्या पालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. तरीही गोदावरी स्वच्छतेसाठी सुरक्षारक्षक नियुक्त केले असून, मनपा कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता केली जात आहे. त्यावर प्रा. वर्षा भालेराव यांनी पालिकेची कोंडी फोडणारा प्रस्ताव दिला आहे. आनंदवल्ली ते अहिल्याबाई होळकर या पाच किलोमीटरच्या अंतरात गोदावरी नदीत बारमाही पाणी असते. त्यामुळे एवढ्या अंतरावर कायमस्वरुपी जलवाहतूक करण्याचा प्रस्ताव त्यांनी सादर केला आहे. ही जलवाहतूक बीओटी तत्त्वावर करण्यात यावी. यातून ठेकेदारासह पालिकेलाही उत्पन्न मिळणार असून, या उत्पन्नातून मिळणारा पैसा हा गोदावरीच्या स्वच्छतेसाठी व प्रदूषण नियंत्रणासाठी वापरण्यात यावा, असा प्रस्ताव त्यांनी प्रशासनाला सादर केला आहे. नाशिकमध्ये दररोज हजारो पर्यटक येतात. त्यांनाही या जलवाहतुकीचा पर्याय देऊन त्यांची सहल आयोजित करावी. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रा. भालेराव यांचा प्रस्ताव महासभेनेही मंजूर केला असून, तो आता अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव प्रत्यक्षात अमलात आल्यास गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न कायमचा मिटणार असल्याचा दावा प्रा. भालेराव यांनी केला आहे.

वाहतूक कोंडीही फुटेल

गंगापूर रोडवर सर्वाधिक वाहतुकीची कोंडी होते. आनंदवल्ली ते अहिल्याबाई होळकर पुलापर्यंत जलवाहतूक सुरू झाल्यास स्थानिक नागरिक या जलवाहुतीला प्राधान्य देतील. त्यामुळे पर्यायी गंगापूर रोडवरील वाहतुकीची कोंडी कमी होईल. या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाणही कमी होऊन हा रस्ता अधिक मोकळा श्वास घेईल.

जलवाहतुकीच्या प्रस्तावाची अंमलबजावणी केल्यास पालिकेचीही आर्थिक बचत होऊन एकाच वेळी गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न मिटेल आणि वाहतुकीचीही समस्या दूर होणार आहे. महासभेत त्याला मंजुरी मिळाली आहे.

- प्रा. वर्षा भालेराव, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरच्या मळे परिसरात रस्त्यांची चाळण

$
0
0

शेतकऱ्यांचा अडखळत प्रवास सुरूच

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या सातपूर गावातील मळे परिसरातील रस्त्यांची समस्या काही सुटत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारखान्यांसाठी हजारो एकर जमिनी देऊनदेखील शेतकऱ्यांना घराकडे जाण्यासाठी खडतर प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या परिसरातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. याबाबत प्रभाग २६ चे नगरसेवक रस्ते कामांकडे लक्ष देणार का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. नुकत्याच झालेल्या प्रभाग बैठकीत प्रभाग ११ च्या नगरसेविका सीमा निगळ यांनी मळे परिसरातील रस्त्यांना महापालिका व नगरसेवकांनी प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाल्यावर सातपूरकरांच्या हजारो एकर जमिनी सरकारने आरक्षित केल्या होत्या. सातपूर नगरपालिका असताना दिवंगत नगराध्यक्ष रामचंद्र पाटील-निगळ यांनी जकातीच्या माध्यमातून नगरपालिकेला उत्पन्न सुरू केले होते. यानंतर महापालिकेत समावेश झालेल्या सातपूर गावाकडे सातत्याने दुर्लक्षच केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

पाणी, वीजसमस्याही सोडवा

कारखान्यांना जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना घराकडे जाताना खडतर रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो. याबाबत वेळोवेळी मळे परिसरातील रहिवाशांनी रस्ते, पाणी व विद्युत पोलांची सुविधा मिळावी, अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या मागणीकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याने चाळण झालेल्या रस्त्यांवरूनच मळे परिसरातील हजारो रहिवाशांना प्रवास करण्याची वेळ येते. महापालिका व नगरसेवकांनी मळे परिसरातील रहिवाशांची मागणी लक्षात घेता रस्त्यांची उभारणी करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिव्हेश्वर जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड येथील स्वकुळ साळी समाजातर्फे भगवान श्री जिव्हेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री जिव्हेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सचिव महेंद्र गायकवाड यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. धनंजय सरोदे, मृत्युंजय सरोदे आणि सुनील धारणकर यांच्यातर्फे दहावी आणि बारावीतील गुणवंतांना रोख बक्षिसे देण्यात आली. गुणवंतांमध्ये सुनील गायकवाड, ऋतुजा विखे, प्राजक्ता सरोदे, संतोष वकारे, रसिका गायकवाड, सिद्धांत ढोरे, शिवानी सरोदे, ललिता सरोदे, सागर जांभळे, तुषार पिंगटे आदींचा समावेश होता. या कार्यक्रमास मंत्रालयातील सहसचिव मनोहर पोकळे, महापालिका उपअभियंता नीलेश साळी, संतोष आकडे, डॉ. अमृत पाठक, अशोक सरोदे, नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील माळी, शारदा गायकवाड, सचिन चांगटे आदी उपस्थित होते.

संयोजन संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद भानोसे, दिगंबर सरोदे, जालिंदर गायकवाड, रवींद्र गायकवाड, सुनील ढगे, प्रमोद म्हात्रे, रामदास पिंगटे, प्रवीण शेरे आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर जांभळे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images