Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गौरीला व्हायचंय आयटी इंजिनीअर

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

वडिलांना चार बहिणी, आईलाही चार बहिणी, आईला पहिली मुलगी झाली, दुसरीही मुलगीच झाली. यामुळे आईचं फारस प्रेम मिळालं नसलं तरी आजीनं तिला मोठं केलं. ही मुलगी प्रचंड हुशार, मेहनती, जिद्दी निघाली. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असताना तिने कुठलाही क्लास न लावता इयत्ता दहावीत चक्क ९६.४० टक्के गुण मिळविले. तिचे नाव आहे गौरी जाधव. तिला आयटी इंजिनीअर व्हायचं आहे. यासाठी तिला आर्थिक पाठबळ हवं आहे.

पंचवटीतील गौरी जाधव हिने दहावीत ९६.४० टक्के गुण मिळविले. विशेष म्हणजे हे सर्व गुण अभ्यासाचेच आहेत. त्यात क्रीडा किंवा इतर अतिरिक्त गुण नाहीत. गौरीचे वडील मेनरोड येथे रस्त्यावर पथारी टाकून सॉक्स विकण्याचा व्यवसाय करतात. त्या कमाईतून कसेबसे कुटुंबाच्या गरजा भागविण्यात कसरत करतात. आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याने तिच्यापुढे पुढील शिक्षणाचा प्रश्न पडला आहे. आता तिला तिच्या पुढच्या शिक्षणासाठी व स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजाकडून आर्थिक पाठबळ हवं आहे.

रुपाली आणि रवींद्र जाधव यांची गौरी ही दुसरी मुलगी आहे. रुपाली या दहावीपर्यंत तर रवींद्र यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. रुपालीच्या भावाच्या फ्लॅटमध्ये सध्या त्यांचे वास्तव्य आहे. वडील मेनरोड येथे रस्त्यावर पथारी टाकून सॉक्स विकण्याचा व्यवसाय करतात. त्या कमाईतून कसेबसे कुटुंबाच्या गरजा भागविण्यात कसरत करतात. मोठी मुलगी पंचवटी कॉलेजमध्ये बीसीएसचे शिक्षण घेत आहे. तिच्या फी ची त्यांना नेहमी काळजी पडते. त्यात आता एवढे गुण मिळवून गौरीला चांगले शिक्षण देण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.

वडिलांची गरिबी बघून गौरीने कधीही क्लासचा आग्रह धरला नाही. शाळेत जे शिकविले जाई ते लक्षपूर्वक ऐकायचे, घरीच तासनतास अभ्यास करायचा एवढंच ती करीत होती. स्वतःच्या बळावर तिने ९६.४० टक्के गुण मिळविले आहे. तिला पुढे इंजिनीअर व्हायचे असा निर्धार तिने केला आहे. दररोज सात ते आठ तास अभ्यास करून मिळविलेल्या या यशाला पुढे नेण्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे. गौरीला तिच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने तिने कधी कुठली हौस पुरविण्याचा हट्ट धरला नाही. मात्र, अभ्यासासाठी लागणारी सर्व पुस्तके पुरविण्यासाठी वडील इतर जीवनावश्यक गोष्टींना फाटा देत तिला देण्याचा प्रयत्न करतात. तिला ९६ टक्के गुण मिळाले, पण पुढच्या शिक्षणाचा भार कसा पेलायचा, असा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे. या काळजीने तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू जमा होतात. श्रीराम विद्यालयात शिक्षण घेतलेल्या गौरीला तिच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने दहावीपर्यंतचे शिक्षण दिले. आता तिला तिच्या पुढच्या शिक्षणासाठी व स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजाकडून आर्थिक पाठबळ हवं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अविरत सेवाव्रती...

$
0
0



उपचारांद्वारे रुग्णाला जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांचे महत्त्व अनन्यसाधारणच. काळाच्या ओघात डॉक्टरीपेशा बदलला असला, त्याला नवे आयाम लाभले असले, तरी आजही असंख्य डॉक्टर्स सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. आदिवासी, तसेच ग्रामीण भागात सुशृषा करणारे, मोफत किंवा अत्यल्प दरात आरोग्यसेवा देणारे डॉक्टर्स व त्यांच्या सेवाभावी संस्था आजही सेवारत आहेत. आरोग्यसेवेतूनच ईश्वरसेवेचा ध्यास घेणारे हे डॉक्टर्स त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा देत आहेत. काहींनी मोठे यश संपादन केले आहे, तर काहींनी आदर्शवत कार्याचा वास्तुपाठच घालून दिलेला आहे. नीतिमूल्ये सांभाळून आणि सामाजिकतेद्वारे अविरत सेवाव्रत जोपासणाऱ्यांच्या कार्यावर डॉक्टर्स डेच्या निमित्ताने टाकलेला हा प्रकाश...

--

संकलन ः फणींद्र मंडलिक, प्रवीण बिडवे, अश्विनी कावळे, डॉ. बाळकृष्ण शेलार, रामनाथ माळोदे, नवनाथ वाघचौरे

--

फोटो ः पंकज चांडोले, विजय चव्हाण

--

सामाजिक कार्याचा भक्कम ‘आधार’वड

समाजकार्याविषयी जिद्द, समाजाप्रति निर्माण झालेली ओढ काहींना कोणत्याही परिस्थितीत शांत बसू देत नाही. आपले जीवन गरजूंच्या कामी यावे, आपल्या कार्याचा लाभ कोणाच्या तरी जीवनास व्हावा, अशी इच्छा त्यामागे असते. ही इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती अस्वस्थ असते. डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे हेदेखील त्यापैकीच एक. १९८३ सालापासून आजपर्यंत आधाराश्रमामार्फत समाजसेवेसाठी ते झटत आहेत. व्यवसायाने डॉक्टर असले, तरी आधाराश्रमाच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. घरोघरी जाऊन आधाराश्रमासाठी निधी जमा करण्याबरोबरच निराधार महिलांचे जीवन उभे करण्यापर्यंत अनेकांना त्यांनी आधार दिला आहे.

डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांना तरुणपणापासून समाजसेवेची आवड. लायन्स क्लब, जेसीज्, इंडियन मेडिकल असोसिएशन अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये सभासद होऊन डॉ. पूर्णपात्रे समाजसेवेचे काम करीत होते. त्यांच्या पत्नी शशी यांना मात्र डॉ. पूर्णपात्रे यांनी एकाच संस्थेला वाहून घेत समाजसेवा करावी, असे वाटत असे. ज्यावेळी ते आधाराश्रमात गेले तेव्हा तेथील काम पाहून ते प्रभावित झाले. त्यांच्या पत्नी शशी यांनीही ‘जर आधाराश्रमाच्या कार्याला पूर्णपणे वाहून घेणार असशील तर माझाही पूर्ण पाठिंबा असेल’, असा शब्द त्यांना दिला. त्यानंतर लगेचच म्हणजे १९८३ सालापासून आजतागायत आधाराश्रमासाठी डॉ. पूर्णपात्रे कार्य करीत आहेत.

आधाराश्रमाचा औषधांवरील खर्च खूप होतो आहे हे लक्षात घेऊन लहान मुलांच्या डॉक्टरांकडून सॅम्पल गोळा करण्यास सुरुवात करून त्यांनी कामाला सुरुवात केली. संस्थेच्या इमारती जुन्या झाल्या होत्या. त्या पाडून नवीन इमारती उभ्या करण्याचे काम लोकसहभागातूनच करवून घेणे गरजेचे होते. अशावेळी घरोघरी जाऊन ते लोकांना सांगायचे, की आमची संस्था बघायला या. संस्थेची गरज लक्षात घेत निधीसाठी अनेक हात पुढे आले. असे करीत करीत निधी गोळा करून इमारत बांधली गेली. आधाराश्रमातील बालकांसाठी हक्काचा व कायमस्वरूपी निवारा यातून उभा राहिला. आजपर्यंत या संस्थेच्या प्रत्येक कार्यात डॉ. पूर्णपात्रे यांचा सहभाग आहे. याबरोबरच निराधार महिलांचे विवाह करवून देण्याचे, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी केले. आजपर्यंत ५९ मुलींचे विवाह लावून देत त्यांना स्थिरस्थावर केले आहे.

सामाजिक कार्य करताना कौटुंबिक, व्यावसायिक बाबींकडे काहीसे दुर्लक्ष झाले असले, तरी या कार्यातून मोठे समाधान मिळाल्याची भावना ते व्यक्त करतात. संस्थेचे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. अनेक निःस्वार्थी कार्यकर्ते, ध्येयवादी तरुण आजही काम करण्यासाठी स्वतःहून आमच्याकडे येतात. या मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मार्गदर्शन मिळाल्यास सामाजिक कार्यासाठी कधीही हात कमी पडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

--

वैद्यकीय समाजसेवेतला पथदर्शी ‘यशवंत’

काही व्यक्ती वयाची पर्वा न करता समाजसेवेसाठी झटत असतात. काही वेळा समाजसेवा कारायची म्हणून व्यवसायही त्याच स्वरूपाचा निवडतात. नाशिकमधील डॉ. यशवंत बर्वे हे त्यातीलच एक म्हणावे लागतील. डॉ. बर्वे यांचा परिचय एकाच वाक्यात करायचा झाला, तर सामाजिक बांधिलकी मान्य करून झटणारा डॉक्टर, असा करावा लागेल.

व्यवसायाने डॉक्टर असल्याने रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची जी जी संधी मि‍ळाली, ती तर त्यांनी पूर्ण केलीच; पण त्या पलीकडे जाऊन समाजसेवेसाठी त्यांनी अनेक दालने उघडली. त्यांच्या जीवनकार्यावर व विचारसरणीवर विनोबा भावे, साने गुरुजी, बाबा आमटे अशा समाजसेवकांच्या विचारांचा प्रभाव पडला आहे. तोच वारसा घेऊन डॉ. बर्वेंनी निरनिराळ्या माध्यमातून समाजसेवेस प्रारंभ केला. त्यांच्या कार्याला राष्ट्र सेवा दलापासून सुरुवात झाली. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळाल्यानंतर त्यांनी नांदगाव येथे खासगी व्यवसाय सुरू केला. समाजसेवेचे पाईक असल्याने या व्यवसायात ते तेथे स्थिरावले. वैद्यकीय व्यवसायाकडे अर्थार्जन म्हणून न पाहता रुग्णांना मदत करण्याची संधी म्हणून त्यांनी पाहिले. रात्री-अपरात्री पेशंटसाठी उठणे, पैशाची फिकीर न करता त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरे करणे याचाच नेहमी त्यांनी विचार केला. त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यांतून त्यांच्याकडे पेशंटचा ओढा वाढला. वैद्यकीय क्षेत्राप्रमाणेच त्यांनी शिक्षण क्षेत्रातही काम करण्यास सुरुवात केली. वि. जे. हायस्कूल, ना. शि. प्रसारक मंडळ, आयुर्वेद सेवा संघ, आर्टस, कॉमर्स कॉलेज अशा शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी कामास सुरुवात केली. त्यातही सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या कामचा ठसा उमटवला. त्यानंतर त्यांनी लायन्स क्लबसारख्या संस्थांमध्येही काम करण्यास सुरुवात केली. या संस्थेत उत्साहाने काम करून त्यांनी उत्कृष्ट लायन म्हणून प्रतिमा निर्माण केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकारच्या वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून नाशिकच्या आधाराश्रम, आयर्वेद सेवा संघ, महाराष्ट्र सेवा समाज अशा संस्थांच्या कार्यकारी मंडळाचे ते सभासद आहेत. सध्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आदिवासी विभागात वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे, नाशिक परिसरातल्या आदिवासी खेड्यांमध्ये नाशिकमधील इतर डॉक्टरांना एकत्र करून नियमितपणे शिबिरे घेण्याचे काम ते करीत असतात. काही खेड्यांमध्ये त्यांनी वाचनालयेदेखील सुरू केली आहेत. शिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, बालमेळावे आदींचे आयोजन ते सातत्याने करीत असतात. वयाच्या ८० व्या वर्षाकडे वाटचाल करताना त्यांचा कामाचा उरक वाखाणण्यासारखा आहे. डॉ. बर्वे यांना त्याच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानीत केले गेले आहे. ‘यश सुमनांच्या अंतरंगी’ हा त्यांचा आत्मकथा संग्रहही प्रकाशित झालेला अाहे.अखंड समाजसेवेचा संकल्प त्यांनी केला आहे.

--

गोरगरिबांना मोफत सेवा पुरविणारा ‘धन्वंतरी’

सेवावृत्तीने व प्रसंगी रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर आजकाल तसे दुर्मिळच. पण, रुग्णसेवा एक व्रत समजून गेल्या ३९ वर्षांपासून अत्यंत सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा करीत आलेल्या देवळालीगावातील डॉ. काशीनाथ दादानाथ बुवा यांनी आजकालच्या वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींपुढे एक अनोखा आदर्श उभा केला आहे. गोरगरीब रुग्णांसाठी अत्यंत तळमळीने व प्रेमाने दिवस-रात्र काम करणारे डॉक्टर म्हणून त्यांचा परिसरात नावलौकिक आहे. आज वयाची ६३ वर्षे पूर्ण केली असली, तरी एखाद्या तरुणाला लाजवणारी त्यांची कार्यक्षमता बघून आपल्याला आपल्या जीवनशैलीबद्दल संकोच वाटल्याशिवाय राहत नाही. हा मातृहृदयी धन्वंतरी आजही शेकडो गोरगरीब रुग्णांची मोफत सेवा करीत आहे.

डॉ. के. डी बुवा म्हणून शहरात परिचित असलेल्या डॉ. बुवा यांच्या घराण्याला मोठा आध्यात्मिक वारसा आहे. त्यांचे आजोबा विठ्ठलनाथ व वडील दादानाथ मोठे अाध्यात्मिक प्रस्थ होते. नाथपंथी गोसावी असलेल्या या कुटुंबाने निःस्वार्थीपणे अनेक पिढ्यांपासून सामान्य गोरगरिबांची मनोभावे सेवा केल्याचे आजही डॉ. बुवा आभिमानाने सांगतात. देवळालीगावाचा कारभार पूर्वी त्यांचे वाडवडीलच चालवत होते. गावातील कौटुंबिक अथवा सार्वजनिक भांडणे असोत, की काही दुखले-खुपले असो, त्यावर हमखास उतारा मिळण्याचे ठिकाण म्हणजे बुवा डॉक्टरांचे वडील होते. आध्यात्मिक साधनेमुळे त्यांना राज्यभर शिष्य परिवार लाभला होता. समाजातील गोरगरिबांवर बुवा डॉक्टरांचे वडील वैद्यकीय उपचारही करीत असत. स्वतःची शेती असूनही त्या शेतीचा त्यांनी कधी लोभ धरला नाही. उलट गावात भिक्षा मागून या कुटुंबाची गुजराण चालत असे. कवडीची माया जमविण्याचा विचारही या कुटुंबाला कधी शिवला नाही. त्यातूनच डॉ. के. डी. बुवा यांना मिळालेल्या सेवाभावी संस्कारांची खोली समजते.

वडिलांचाच वसा त्यांनीही पुढे कायम करण्यासाठी नाशिकच्या धन्वंतरी मेडिकल कॉलेजमधुन १९७८ साली बीएएमएस केले. या कॉलेजमध्ये त्यांना डॉ. वि. म. गोगटे यांच्यासारखे निःस्पृह वृत्तीचे गुरु लाभले. त्यांच्या सहवासात बुवा डॉक्टरांचे व्यक्तिमत्त्व आणखी सेवाभावी झाले, ते आजपर्यंत कायम आहे. बुवा डॉक्टरांची खासीयत म्हणजे ते रुग्णांकडून केवळ एक रुपया फी घेत. कित्येक वर्षे त्यात त्यांनी बदल केलाच नाही. नव्या पिढीतील डॉक्टरांनी त्यांना समजावले व फी वाढविण्यास सांगितले. घडले मात्र उलटे, फी वाढविली खरी; परंतु कोमलहृदयी बुवा डॉक्टर शेकडो गोरगरीब रुग्णांवर मोफतच उपचार करीत आहेत. अाध्यात्मावर त्यांची नितांत अन् अढळ श्रद्धा आहे. डॉक्टर झाल्यावर जवळ एक फुटकी कवडीही नव्हती. परंतु, वडिलांच्या राज्यभरातील शिष्यांनी एका रात्रीत आर्थिक मदत उभी केली अन् देवळालीगावात त्यांच्या दवाखान्याची वास्तू उभी राहिली. आजही बुवा डॉक्टर या वास्तूचा वापर निःस्वार्थीपणे रुग्णसेवेसाठी करीत आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

--

निरलस रुग्णसेवा पुरविणारे रविवार कारंजा मित्रमंडळ

सण आणि उत्सवांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या रविवार कारंजा मित्रमंडळ ट्रस्टतर्फे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांपासून रुग्णसेवेचे व्रत अविरतपणे सुरू ठेवण्यात आले आहे. रविवार कारंजा येथे सिद्धिविनायक धर्मार्थ दवाखाना सुरू करून अत्यल्प दरात रुग्णसेवा देण्याचे काम येथे करण्यात येत आहे.

रविवार कारंजा मित्रमंडळाचा सिद्धिविनायक हा चांदीचा गणपती भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंडळाचा गणेशोत्सव हा शहरातील सर्वांच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय असतो. भव्य चलतचित्रांचा देखावा करणाऱ्या या मंडळाचा इतरही उत्सवांत सक्रिय सहभाग असतो. एवढ्यावर न थांबता विविध प्रकारचे उपक्रम राबविणाऱ्या या मंडळाने संस्थापक नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून १९९९ मध्ये सिद्धिविनायक धर्मार्थ दवाखाना सुरू केला. सुरुवातीच्या काळात सात ते आठ रुग्णच या सेवेचा लाभ घेत होते. हळूहळू या दवाखान्याच्या सेवेची माहिती झाल्यानंतर शहर परिसरातील विविध भागातील रुग्णही येथे येऊन उपचार करून घेऊ लागले. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळी येथे रुग्णसेवा केली जाते. सध्या डॉ. नीतेश चौधरी हे येथे येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देण्याचे काम करीत आहेत. रोज सुमारे ८० पेक्षा जास्त रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. मंडळाच्या माध्यमातून सेवा पुरवित असताना कधी आर्थिक मदतीची गरज भासल्यास मंडळाने स्थापन केलेल्या सिद्धिविनायक बॅंकेच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जातो.

या दवाखान्यात सर्वच प्रकारचे रुग्ण तपासणी करण्यासाठी येत असतात. किरकोळ स्वरूपाचा आजार असलेल्यांना तपासणी करून येथेच औषधे देण्याची व्यवस्था केली जाते. गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, आयुर्वेद रुग्णालय किंवा मेडिकल कॉलेज रुग्णालय आदी ठिकाणी पाठविण्याची व्यवस्था केली जाते. ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती चांगली असते अशा रुग्णांना खासगी रुग्णालयांची नावे सुचविण्यात येतात. येथील डॉक्टर, परिचारिका आणि मदतनीस यांच्याकडून मिळणाऱ्या उत्कृष्ट सेवेमुळे सकाळ आणि सायंकाळ या दोन्ही वेळेस येथे तपासणीसाठी रुग्णांची गर्दी होत असते. विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असणाऱ्या रविवार कारंजा मित्रमंडळ ट्रस्टतर्फे दाखविले जाणारे सामाजिक आरोग्यभान अनेकांना तंदुरुस्त ठेवण्यास उपयुक्त ठरत असल्याने त्याबाबत कौतुकाची भावना व्यक्त होताना दिसते.


--

हिमोफिलियाच्या रुग्णांसाठी ‘ते’ ठरताहेत देवदूत!

हिमोफिलिया या क्लिष्ट आणि दुर्मिळ आजाराचे देशभरात १५ हजार, तर नाशिकमध्ये ४२५ नोंदणीकृत रुग्ण आहेत. या आनुवंशिक आजाराच्या रुग्णांवरील उपचारपद्धती काहीशी गुंतागुंतीची आणि खर्चिक असल्याने असंख्य रुग्ण उपचारांपासून वंचित राहण्याचा धोका असतो. नेमकी हीच बाब हेरून उपनगर येथील डॉ. तापस कुंडू हे नाशिकमध्ये गेल्या नऊ वर्षांपासून हिमोफिलियाच्या रुग्णांवर काही संस्थांच्या मदतीने मोफत उपचार करीत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांसाठी ते जणू देवदूतच ठरले आहेत.

हिमोफिलियाच्या एका रुग्णाला वर्षाला सुमारे किमान दहा हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. नाशिकसारख्या शहरात अनेक रुग्णांना तो खर्च पेलवणे अवघड असल्याची बाब हेरून डॉ. तापस कुंडू यांनी डिसेंबर २००७ पासून होमिओपॅथी इन हिमोफिलिया हा मोफत शिबिर-प्रकल्प सुरू केला. प्रारंभी हा प्रकल्प उपनगर येथे होता. आता अशोक स्तंभावरील अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूमध्येही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी मोफत शिबिर होते.

नाशिकमधील शिबिरात हिमोफिलियाच्या रुग्णांवर उपचार होत असून, त्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा समावेश आहे. नाशिकमध्ये हिमोफिलियाचे नोंदणीकृत ४२५ रुग्णांपैकी शंभर जण या शिबिरात येतात. उर्वरित त्यांच्या वेळेनुसार उपनगर किंवा अशोक स्तंभावर येतात. काही जण ऑनलाइन उपचार घेतात. त्यांना औषधे कुरिअर केली जातात. डॉ. कुंडू यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथी इन हिमोफिलिया प्रकल्प नाशिकप्रमाणेच परळ (मुंबई), सुरत, अमरावती, ठाणे, नागपूर येथे मोफत राबविला जातो. आतापर्यंत सहा केंद्रांत मिळून ३१४ शिबिरे झाली आहेत.

विविध शिबिरांतर्गत उपचारांचा खर्च दोन संस्था करतात. अशोका बिल्डकॉनने शिबिरासाठी जागा दिली असून, इमर्जन्सी औषधांचा खर्चही अशोका देते. नाशिक रन ही दुसरी संस्था असून, ती पन्नास रुग्णांचा खर्च दोन वर्षांपासून देत आहे. त्यामध्ये महिनाभराची औषधे, इमर्जन्सी मेडिसीन किट, ड्रेसिंग मटेरिअल, रक्तस्त्राव थांबविण्याचे औषध, फिजिओथेरपी व सायकोलॉजिकल कौन्सिलिंगचा खर्च याचा समावेश आहे. डॉ. तापस कुंडू यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अफरोज शेख, डॉ. आफिया शेख, डॉ. हिरल शहा, डॉ. ओमकार कुमट, डॉ. अपर्णा नलवडे हे उपचार करतात. त्यांनी घेतलेल्या शिबिरांची दखल इंडिया बुक ऑफ रेकार्डसमध्ये झाली आहे. वारंवार रक्तस्त्राव झाल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन रक्त घ्यावे लागते. रक्त घेण्यामुळे कावीळ, एड्स यांसारखे रोग होण्याची भीती असते. त्यामुळे यासंदर्भात समाजात व्यापक जनजागृती करून अशा रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत, यादृष्टीनेदेखील डॉ. कुंडू पुढाकार घेत आहेत.

--

आदिवासी बांधवांच्या विकासाचा ‘संकल्प’

गेली सात-आठ वर्षे आदिवासी भागातील बांधवांना मोफत वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्या श्री गुरुजी सेवा संकल्प समितीने आता पुढचे पाऊल टाकले आहे. आदिवासी पाड्यांवरील बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समितीने गतवर्षीपासून आश्वासक कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. तो नियोजनबद्धरीत्या राबविला जात असून, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यांतील १५ ते २० हजार कुटुंबांना त्याचा लाभ होत आहे. आदिवासी बांधवांना केवळ मोफत वैद्यकीय सुविधा पुरविल्या, तरी त्यांच्या समस्या कायमस्वरूपी संपणार नाहीत. त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणायचे असेल, तर सर्वांगीण दृष्टीने त्यांचा विकास घडविण्याचा संकल्प समितीने केला आहे. आरोग्य, शैक्षणिक, आर्थिक दृष्टीने त्यांचा विकास करण्यासाठी ठोस कार्यक्रम समितीने हाती घेतल्याची माहिती समन्वयक डॉ. राजेंद्र खैरे यांनी दिली. हे लोक तीन महिने गावाकडे राहतात, तर उर्वरित नऊ महिने रोजगारासाठी अन्यत्र स्थलांतरीत होतात. त्यामुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहाते. या लोकांचे स्थलांतर थांबवायचे असेल, तर त्यांना त्यांच्या गावात किंवा आसपासच्या परिसरात रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न समितीने सुरू केले आहेत. पोषणमूल्ये असलेले अन्नधान्य सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील तज्ज्ञ आदिवासी भागात जाऊन मार्गदर्शन करतात. पेठ तालुक्यातील करंजखेड आणि पाहूची वाडी, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेरवळ आणि कोटुंबी येथे चार केंद्रे तयार करून तेथे महिन्यात दोन कार्यशाळा घेतल्या जातात. शेतीविषयक सर्व मार्गदर्शन त्यामध्ये केले जाते. भात व नागली ही येथील मुख्य पिके असून, त्यांच्या या उत्पादनाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून चांगले दाम मिळवून देण्याचे काम समिती करीत आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांनाही रोजगार मिळवून देण्यात आला आहे. येथील अनेक गावांमधील जलस्रोत स्वच्छ करून पाइपलाइनद्वारे थेट गावापर्यंत पाणीपुरवठा करण्यात आल्याने महिलांची वणवण थांबली आहे. सांडपाणी जलस्रोतांमध्ये मिसळू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुलांसाठी मूल्य शिक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. जानेवारीत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून दोन हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोनशे गरजूंवर मोफत शस्त्रक्र‌यिा व तत्सम उपचार करण्यात आले. शहरातही प्रबुद्धनगर आणि आम्रपालीनगर येथे नियमित वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत असून, डॉ. मोरेश्वर राठोड, सचिन देवरे आणि सहेली सेवा मंडळ ही संस्था हे उपक्रम पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान देत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठाचा आज वर्धापनदिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन आज (१ जुलै) रोजी होत आहे. त्यानिमित्ताने विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समारंभात माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

समाजातील वंचित घटकांपर्यंत ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेस १ जुलैस २८ वर्षे पूर्ण होत आहेत. विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. राम ताकवले प्रमुख पाहुणे असतील. आमदार हेमंत टकले, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे यांची विशेष उपस्थिती असेल. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन अध्यक्षस्थानी असतील. सकाळी आठ वाजता मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर ध्वजारोहण करण्यात येईल, रक्तदान शिबिराचे उदघाटन, विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात येईल. याबरोबरच सुरक्षा व कामगार महिला सुविधा केंद्राचे उदघाटन, विद्यार्थी, कर्मचारी सेवेच्या नवीन वाहनाचे उदघाटन होईल. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित अभिवादनही केले जाणार आहे. याप्रसंगी प्रा. राम ताकवले यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानही शैक्षणिक इमारत सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे योगदान देवून विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याचा प्रचार आणि प्रसार विविध प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्धी दिल्याबद्दल माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांचा प्रा. राम ताकवले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी केले आहे.

मनमाडमध्ये निषेध

मनमाड ः सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी असून मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समितीसोबत केलेल्या वाटाघाटीत शेतकऱ्यांच्या हातात वाटाण्याच्या अक्षता ठेवल्याची टीका महाराष्ट्र किसान सभेच्या बैठकीत करण्यात आली. कर्जमाफी, समृद्धी महामार्ग या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा किसान सभेने शुक्रवारी मनमाडमध्ये देण्यात आला. या वेळी कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या जीआरची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिसांकडून चक्का ‘जॅम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एमजीरोडवर बेशिस्तपणे पार्क होणाऱ्या चारचाकी वाहनांना आवर घालण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी कारवाई केली. दुपारपर्यंत ६० वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. रात्रीपर्यंत कारवाईचा आकडा १०० पर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली जात होती. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस कारवाई झाल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एमजीरोडवर शेकडो दुकाने आहेत. दुर्दैवाने येथील इमारती बांधताना पार्किंगचा विचार करण्यात आलेला नव्हता. किंबहुना जागेच्या किमतीचा विचार करता असलेल्या जागा हडपण्यात आल्या. त्यामुळे व्यावसायिकांसह येणाऱ्या ग्राहकांना रस्त्यावरच वाहने पार्क करावी लागतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पार्क होणाऱ्या वाहनांमुळे धावणाऱ्या वाहनांसाठी फारच कमी रस्ता उपलब्ध होतो. त्यात पार्क केलेल्या वाहनांपैकी एखादे वाहने पुन्हा जाण्यासाठी निघाले की वाहतूक कोंडीला सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अचानक रस्त्यावर पार्क झालेल्या चारचाकी वाहनांवर कारवाई सुरू केली. त्यात काही दुचाकींचाही समावेश होता. गुरुवारी दिवसभरात तब्बल ८० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी झालेल्या कारवाईबाबत पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले की, दुपारपर्यंत जवळपास ६० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. संध्याकाळपर्यंत हा आकडा १००च्या घरात पोहचेल. या रस्त्यावर नो पार्किंगबाबत फलक लावण्यात आले असून, सर्वांनी त्याचे पालन करणे आवश्यक आहे. इमारतीत पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्यास संबंध‌ितांनी मोठे वाहन आणताना विचार करावा, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

विरोध मोडून कारवाई

शुक्रवारी सकाळी वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू करताच काही व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केला. कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी कळवावे, अशी मागणी करण्यात आली. मात्र, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी ही मागणी फेटाळून लावत कारवाई करण्याचे आदेश दिले. रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग करण्यास सूट देण्यात आली आहे. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तसेच रस्त्यात वाहने लावण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. पोलिस आपल्या भूमिकेवर ठाम असून, सुरळीत वाहतुकीसाठी नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

कॉलेजरोडवर धावपळ
संध्याकाळच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी आपला मोर्चा कॉलेजरोडकडे वळवला. ३० ते ४० कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रस्त्यावर पार्क झालेल्या चारचाकी वाहनांना जॅमर बसवून दंडात्मक कारवाई केली. दुसरीकडे ओव्हर स्पीड, बेशिस्त पार्किंग आणि हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचे आता स्वतंत्र वृक्षधोरण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वृक्षतोड, छाटणी, पुर्नरोपणासंदर्भात वारंवार होणारे न्यायालयीन वाद टाळण्यासाठी महापालिका आता पुणे महापालिकेच्या धर्तीवर स्वतंत्र वृक्षधोरण तयार करणार आहे. याबाबत शुक्रवारच्या वृक्ष प्राध‌िकरण समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. वृक्षधोरण तयार करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती तयार केली जाणार आहे. या समितीत मेरी, के. के. वाघ कॉलेज, मुक्त विद्यापीठ, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रतिनिधी, पर्यावरण प्रेमी व वनविभागाचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. या वृक्षधोरणामुळे वृक्षतोडीसंदर्भातील वाद टळणार असून, शहरातील झाडांचेही संतुलन करता येणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली.
आयुक्त कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी वृक्ष प्राध‌िकरण समितीची बैठक झाली. या बैठकीत वृक्षतोडीचे ८० प्रस्ताव होते. याशिवाय नाशिकरोड येथील नाट्यगृहाच्या ३६ वृक्षांचाही समावेश होता. ८० वृक्षतोडीच्या प्रस्तावांची समितीमार्फत पुन्हा पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. बोरगड एअरफोर्स येथील दोन वृक्षांच्या तोडीला मंजुरी देण्यात आली. या बैठकीत वृक्षधोरण तयार करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. शहरात सध्या वृक्षतोडीचे प्रस्ताव आल्यानंतर त्यासंदर्भात हायकोर्टात धाव घेतली जाते. वृक्षतोड, छाटणी, पुनर्रोपण यासंदर्भात वाद कायमचे झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या कामांसह विकासकामेही अडखळतात. यासंदर्भात निश्चित धोरण तयार केल्यास हे वाद टळणार आहेत. वृक्षधोरण तयार करण्यासाठी एक छानणी समिती प्रथम तयार करण्यात येणार आहे. ही समिती एका तज्ज्ञ समितीची रचना तयार करेल. समिती सर्वंकष धोरण तयार केल्यानंतर ते छाननी समितीला सादर करेल. छाननी समितीने हे धोरण तयार केल्यानंतर ते वृक्षप्राध‌िकरणामार्फत महासभेला सादर केले जाईल. त्यानंतर सरकारची मान्यता घेतली जाईल. त्याला मंजुरी दिल्यानंतर मनपाची घटना तयार केली जाणार आहे. त्यामुळे न्यायालयाकडे गेलेले काही अधिकार महापालिकेला मिळणार आहेत. यामुळे वृक्षांसंदर्भात होणारे वादविवाद पालिका स्तरावरच मिटवले जाणार आहेत.
वृक्षलागवडीचे संतुलन
सध्या महापालिकेच्या वतीने जेथे जागा कमी, तेथे वृक्षलागवड केली जाते. परंतु, वृक्षसर्वेक्षणात शहरातील प्रत्यक्ष वृक्षांची संख्या समोर येणार आहे. कोणत्या भागात किती वृक्ष आहेत, याचाही आकडा समजणार आहे. त्याचा फायदा वृक्षधोरणाला होणार आहे. यामुळे कोणत्या भागात वृक्षलागवडीची आवश्यकता आहे, त्याची निश्चिती केली जाणार आहे.
नाट्यगृह रखडले
नाशिकरोड येथील प्रस्ताव‌ित नाट्यगृहाच्या जागेवर असलेल्या ३६ वृक्षांच्या तोडीला प्राध‌िकरणाने मंजुरी दिली आहे. परंतु, या वृक्षतोडीपूर्वी ठेकेदाराला एका वृक्षाच्या बदल्यात १० वृक्षांची लागवड करावी लागणार आहे. हे वृक्ष दहा फूट लांबीचे असावेत अशी अट आहे. या कामाची माहिती संबंधित ठेकेदाराने हायकोर्टात सादर करावी. हायकोर्टाने मंजुरी दिली तर कामाला सुरुवात करावी असी सूचना कमीटी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीनंतरच ७५ लाखांचा विचार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक स्थिती खराब असल्याने नगरसेवकांना ७५ लाख निधी देण्यास आयुक्तांनी नकार दिल्यानंतरही महापौर रंजना भानसी ७५ लाखांवर ठाम आहेत. नगरसेवकांना प्रत्यक्ष ७५ लाखांचा निधी देण्यासाठी महापौरांनी घरपट्टी करात १४ तर पाणीपट्टी करात ५ टक्के करवाढ करून देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना ७५ लाखांचा नगरसेवक निधी हवा असेल, तर त्यांनी करवाढीचा प्रस्ताव स्थायी समिती व महासभेत मंजूर करून प्रशासनाला द्यावा. त्यानंतर आर्थिक स्थितीचा विचार करून ७५ लाखांचा निधी देऊ, असे स्पष्टीकरण आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहे. दरम्यान, मालमत्ता सर्व्हेक्षणातून पालिकेला ५० कोटी रुपये अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना महापौरांनी स्थायी समितीने मंजूर केलेला नगरसेवक निधी ४० लाखांवरुन ७५ लाख केला होता. परंतु, प्रशासनाने आर्थिक स्थिती चांगली नसल्याने नगरसेवक निधी ४० लाख रुपयेच देण्याची घोषणा केली होती. तथापि, महापौर ७५ लाखांवर अडून बसल्या आहेत. नगरसेवक निधीसाठी घरपट्टी व पाणीपट्टी करात वाढ करून देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यावर प्रशासनाच्या वतीने आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांनी मालमत्ता व पाणीपट्टी करात वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती व महासभेत मंजूर करून तो प्रशासनाला द्यावा. त्यानंतर आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन ७५ लाखांचा निधी देण्यासंदर्भात विचार केला जाईल, असे कृष्णा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील वर्षापासून नाशिककरांवर करांचा बोजा अटळ झाला आहे.


सर्वेक्षणातून ५० कोटी

महापालिककडून सध्या मालमत्ता सर्वेक्षण केले जात आहे. आतापर्यंत सातपूर आणि पश्चिम विभागात १ लाख ६८ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास ३६ हजार मालमत्ता नव्याने सापडल्या आहेत. शहरात सध्या चार लाख मालमत्ता आहेत. या सर्वेक्षणात जवळपास २० टक्के मालमत्ता नव्याने नोंदणीकृत होणार आहेत. त्यातून पालिकेच्या तिजोरीत जवळपास ४० ते ५० कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. नव्याने रेकॉर्डवर आलेल्या मालमत्तांना लगेच ब‌िले अदा केली जाणार असल्याने मालमत्ता सर्वेक्षणातून पालिकेला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रार निवारण समिती जमेची बाजू

$
0
0

तक्रार निवारण समिती जमेची बाजू

खासगी डॉक्टरांविरोधातील तक्रार कुणी ऐकतच नाही, ही भावना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना अधिक अस्वस्थ करते. कोर्टाची पायरी चढल्यास रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील दरी अधिकच वाढत जाते. म्हणूनच आयएमएने पुढाकार घेऊन पेशंट तक्रार निवारण समिती स्थापन केली. डॉक्टरांबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत आणि रुग्णांवर अन्याय होत असेल, तर त्यांनाही न्याय मिळावा हा यामागचा उद्देश असल्याची माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांनी दिली.

---

-आयएमए सध्या काय करतेय?

-आयएमएचा पदभार स्वीकारला तेव्हापासून डॉक्टर्स, तसेच समाजातील अन्य घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आयएमएचे शालिमार येथे कार्यालय असून, ते अद्ययावत करण्यात आले. तेथे अनेक कार्यक्रम, बैठका होतात. त्याची माहिती, आयएमएच्या हॉलचे शुल्क याबाबतची इत्थंभूत माहिती विविध घटकांना समजावी यासाठी आयएमएची वेबसाइट अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे आयएमएविषयीची माहिती तेथे लोकांना उपलब्ध होऊ लागली आहे. डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यातील संवाद वाढावा हाच आयएमएचा मुख्य उद्देश आहे.

--

-डॉक्टरांवरील हल्ले वाढताहेत, काय सांगाल?

-काही महिन्यांपूर्वी तशी परिस्थ‌िती होती. परंतु, आता हे प्रकार बरेच कमी झाले आहेत. डॉक्टरांवरील हल्ले वाढत असल्यामुळे सेफ डॉक्टर फॉर सेफ सोसायटी हा उपक्रम आयएमएने हाती घेतला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याशी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत व‌िचारमंथन करण्यात आले. एप्र‌िलमध्ये पदभार स्वीकारल्यानंतरही असे एक-दोन प्रसंग शहरात घडणार होते. पोलिसांची तत्काळ मदत मिळाल्यामुळे हे प्रसंग आयएमएने टाळले. डॉक्टरांवरील तणाव वाढत असल्याने त्यांच्यासाठी उपक्रम राबविले जात आहेत.

--

-डॉक्टरांच्या आरोग्यासाठी संघटना काय करीत आहे?

-डॉक्टरांचेही दैनंदिन जीवन धकाधकीचे झाल्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक तणावाखाली वावरावे लागत आहे. डॉक्टरांचे आयुर्मान कमी होत असून, त्यांचे आरोग्य जपले जावे यासाठी आयएमएने एप्र‌िलच्या शेवटच्या आठवड्यात हास्य क्लबची स्थापना केली. या क्बलद्वारे गेल्या तीन महिन्यांत दोन सत्रं घेण्यात आली. त्यामध्ये २०० हून अधिक डॉक्टर्स सहभागी झाले. त्यांना सुषमा दुगड यांचे मार्गदर्शन लाभले. डॉक्टरांसाठी योगाचा मार्गदर्शन वर्गही घेण्यात आला.

--

-डॉक्टरांची नवीन पिढी कार्यरत होतेय, त्यांच्यासाठी काय?

-वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांची नवीन पिढी दमदार पावले टाकत आहे. उपचारपद्धती विकसित होत असून, त्यासाठीची साधनेही बदलत आहेत. त्याची माहिती व्हावी म्हणूनच जुलैमध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय जेरिकॉन कॉन्फरन्स नाशिकमध्ये होणार आहे. राज्यातून एक हजारहून अधिक डॉक्टर्स सहभागी होतील. उतारवयात होणारे आजार व उपचार यावर त्यामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. नवीन उपचारपद्धती, त्यासाठीचे नवीन मोबाइल अॅप्स, संसाधनांमध्ये झालेला बदल याची माहिती त्यामध्ये मिळेल. आपल्याकडील सरासरी आयुर्मान वाढविण्यासाठी येथील मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.

--

-आयएमएच्या सोशल अॅक्टिव्हिटीबद्दल सांगा?

-आयएमएने ट्रेकिंग क्लब स्थापन केला असून, हे ट्रेकर्स दर रविवारी किल्ल्यांना भेट देतात. किल्ल्यांची साफसफाई आणि संवर्धनात योगदान देतात. सायकलिंगबाबतचा अवेअरनेस वाढविण्याच्या कामात आयएमए योगदान देत असून, अलीकडेच रमाकांत पाटील व डॉ. राजेंद्र नेहते यांच्यासह डॉ. श्र‌ीनिवास बोकोळनार यांनी सायकलिंगमध्ये गौरवास्पद कामगिरी केली आहे. अॅँटी टोबॅको दिन, तसेच कॅन्सर अवेअरनेस परिषदेद्वारे जनजागृती केली. नो हॉर्न डेमध्ये सक्रिय सहभागी झालो. आता डब्ल्यूएचओच्या मानांकनानुसार मानसिक आजारांबाबतचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी लेटस टॉक (चला बोलूया) हा उपक्रम हाती घेत आहोत. ज्यामध्ये नागरिक आपल्या समस्या खुलेपणाने मांडू शकणार आहेत.

--

-डॉक्टर्स आणि पेशंट्समधील संवाद कसा वाढविणार?

-केवळ संवाद नव्हे, तर सुसंवादावर आमचा भर आहे. डॉक्टर्सविरोधात कुणी कोर्टात जाऊ नये, रुग्णालाही मनःस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये, हा यामागील उद्देश आहे. आयएमचे सुमारे दोन हजार सदस्य आहेत. त्यापैकी कुणाविषयी तक्रार असेल, तर अशा तक्रारींची दखल घेण्यासाठी एक विशेष चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉक्टर व रुग्ण यांच्यात सुसंवाद राखण्याचा प्रयत्न ही समिती करते. अशा दोन-तीन प्रकरणांचा समितीने निपटारा केला आहे.

(शब्दांकन : प्रवीण बिडवे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी विभाग आजपासून बंद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरात एक कर समान प्रणाली अर्थात जीएसटी लागू होत असताना महापालिका जीएसटीबाबत अजूनही अंधारातच आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीसंदर्भात अद्याप पालिकेला कोणतेही मार्गदर्शन आलेले नाही. त्यामुळे जीएसटीतून किती निधी मिळणार याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रमावस्था वाढली आहे, तर जीएसटीमुळे शनिवारपासून एलबीटी विभाग पूर्णपणे बंद होणार असला, तरी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पालिकेतील एलटीबी विभाग सहा महिने सुरू राहणार आहे. दरम्यान जीएसटीतून महापालिकेला सरकारकडून दरमहा किमान ७५ कोटींचे अनुदान अपेक्षित आहे.

देशभरात शनिवारपासून जीएसटी करप्रणाली लागू होत आहे. यात स्थानिक स्वराज्य संस्थांना करवसुलीचे अधिकार राहणार नाहीत. त्यामुळे पालिकेचा एलबीटी विभाग आता बंद होणार आहे. सध्या महापालिकेला ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांकडून ३५ कोटी, तर सरकार ३५ कोटींचे अनुदान देत आहे. मुद्रांक शुल्कातून पाच कोटी मिळत आहे. सरकारने जूनपर्यंतचे एलबीटी अनुदान पालिकेकडे जमा केले असून, जवळपास तीन महिन्यांत १८० कोटी रुपये जमा झाले आहेत. केवळ ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांकडून जून महिन्याचे ३५ कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे जूनपर्यंत आर्थिक खर्चाचा गाडा ओढला जाणार आहे.

सध्या एलबीटी व मुद्रांक शुल्कातून पालिकेला दरमहा ७५ कोटी रुपये अनुदान मिळते. आता हेच अनुदान जीएसटीतून मिळणार आहे. मात्र, जुलैपासून हे अनुदान कसे मिळणार, याबाबत सरकारकडून कोणतेही मार्गदर्शन आलेले नाही. त्यामुळे पालिका प्रशासनच संभ्रमात पडले आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा साधारण ४० कोटी रुपये द्यावे लागतात. जीएसटी अनुदान जुलैचे मिळाले नाही तर वेतन कसे करायचे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे प्रशासनाला जीएसटी गाइडलाइनची प्रतीक्षा लागली असून, सध्या तरी पालिका पूर्णपणे अंधारातच आहे.

एलबीटी विभाग सुरूच

एलबीटीची वसुली शनिवारपासून पूर्णपणे बंद होणार आहे. त्यामुळे पालिकेतील एलबीटी विभागही बंद पडणार आहे. या विभागात सध्या ५० कर्मचारी कार्यरत आहेत. एलबीटीचे प्रलंबित न्यायालयीन निवाडे आणि अभय योजनेच्या सुनावणीसाठी सध्या तरी सहा महिने हा विभाग सुरूच राहणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी एलबीटी बंद झाली तरी मागील वसुली बंद होणार, असा समज करू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अक्कलकुवा बसला सटाण्यात अपघात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीनजीक बस आणि ट्रक अपघात झाला. शनिवारी सकाळी साडेसात वाजता हा अपघात झाला. ही बस नाशिकहून अक्कलकुवाला जात होती. या धडकेमुळे बस चालकाच्या बाजूने कापली गेली असून, बसमधील १३ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये ५८ प्रवासी होते. जखमींवर सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अक्कलकुवा आगाराची बस (एमएच २० बीएल ३०२४) नाशिककडून ५८ प्रवाशांना घेवून अक्कलकुव्याकडे पहाटे साडेपाच वाजता निघाली होती. सटाणा बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ बस आली असता सटाण्याहून देवळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकने (एम एच १९ जे ४५२३) बसला धडक दिली. यामुळे बसचे मागील दोन्ही चाके निखळून पडली. तर अपघातग्रस्त ट्रक थेट बाजूच्या शेतात घुसला. सटाणा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून ट्रक चालक फरार आहे.
00000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाच्या कठड्यांची दुरवस्था

$
0
0

पिंपळगाव बहुला पूल बनला धोकादायक

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणा-या पिंपळगाव बहुला गावातील पूल धोकादायक बनला आहे. नेहमीच रहदारी असलेल्या पिंपळगाव बहूला पुलावर अनेकदा अपघातही झाले आहेत. गेल्यावर्षी स्कॉर्पिओ गाडी थेट पुलावरून खाली पडल्याने तरुण उद्योजकाचा मृत्यू झाला होता. यानंतर महापालिकेने केवळ नावालाच डागडुजी करत लोखंडी पोल बसविण्याचे काम केले आहे. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. हा पूल वर्दळीचा असल्याने पुलाच्या कठड्यांचीही दुरवस्थेकडेही महापालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी वाहन चालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.

शिवशंकर महादेवाचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरला जाताना लागणार्‍या पिंपळगाव बहुला पुलाची दुरवस्था झाली आहे. नेहमीच वाहनांची वर्दळ असलेल्या पुलाचे स्तंभ जुने झाले आहेत. या पुलाच्या बाजूलाच शाळा आहे. त्यामुळे वाहनांसह शाळकरी विद्यार्थ्यांची यावरून दररोज ये-जा असते. अशा परिस्थितीत पुलावर भविष्यात मोठा अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण, असाही सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, पिंपळगाव बहुला गावातील जुन्या पुलाला महापालिकेने समांतर पूल उभारला होता. परंतु, जुन्या असलेल्या पुलाची देखभाल करण्यात आली नसल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. त्यातच नव्याने उभारण्यात आलेल्या पुलासाठी दुभाजक महापालिकेने टाकले होते. दुभाजक वाहनचालकांना दिसत नसल्याने अनेकदा अपघातही झाले आहेत. महापालिकेने पिंपळगाव बहुला गावातील जुन्या पुलाची

दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या तृप्ती धारणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक‌ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या तृप्ती पंकज धारणे यांची बिनविरोध निवड झाली आाहे. २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या ‌भाजपकडून बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. विजया लढ्ढा या राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदासाठी त्यांनी निवड करण्यात आली.

शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. धारणे यांच्या समर्थनार्थ त्यांच्यासह सर्व १३ नगरसेवक उपस्थित होते. त्याचबरोबर विरोधी गटातील चारपैकी एक सदस्य देखील त्यांना येवून मिळाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान धारणे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड झाल्याचे राहुल पाटील यांनी घोष‌ित केले. त्यानंतर तेथेच अभिनंदन आणि स्वागताची सभा घेण्यात आली. त्या करिता जिल्हाध्यक्ष दादा जाधव, आमदार डॉ. अपूर्व हिरे, सचिन ठाकरे, सुनील बच्छाव, बाळासाहेब कोकणे आदी उपस्थित होते.

या सभेचे सूत्रसंचलन ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र यांनी केले. नगराध्यक्षा तृप्ती धारणे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत पदग्रहण केले. यावेळेस त्यांनी त्र्यंबक शहराचा विकास आराखडा लवकरच शासनाला सादर केला जाईल, नागरिकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करून तक्रारपेटीची सुविधा निर्माण करू असे आश्वास दिले. जून २०१७ मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना एका मताने पराजय स्वीकारावा लागला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण

$
0
0

टीम मटा

हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत शनिवारी (दि. १) नाशिक शहरात ठिकठिकाणी विविध संस्थांकडून वृक्षारोपण करण्यात आले. सृष्टीसंवर्धनाचा संदेश देत सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्था, शाळा-कॉलेजेसनी या चळवळीत सहभाग नोंदविला. शहरातील विविध संस्थांकडून वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच मागील वर्षी लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शहर परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, तसेच अन्य संस्था-संघटनांतर्फे पर्यावरण संवर्धनाचा जागर करून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली. अनेकांनी वृक्षारोपण करतानाचे सेल्फीही काढून सोशल मीडियावर शेअर केले.
राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक महानगरपालिका, सोशल नेटवर्किंग फोरम आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १) म्हसोबावाडी येथे ५००० रोपांची यशस्वी लागवड करण्यात आली. या वृक्षारोपणासाठी फेसबुक आणि व्हॉटस अॅपवर केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दीड हजार नाशिककरांनी या वृक्षारोपणास भर पावसात हजेरी लावली.

या अभूतपूर्व प्रतिसादामुळे अतिशय शिस्तबद्ध रितीने केवळ १ तासात ५००० रोपांची योग्य शास्त्रीय पद्धतीने लागवड झाल्याने एका नव्या हरित इतिहासाला सुरुवात झाली आहे. यावेळी उपमहापौर प्रथमेश गीते, शिवाजी गांगुर्डे, आयएमएचे अध्यक्ष मंगेश थेटे, फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, पंकज भदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली.

दिंडोरी रोडवर आरोग्य विज्ञान पीठामागे नाशिक मनपाची जागा असून, या जागेतील साडे चार एकर जागेवर मागील वर्षी सोशल नेटवर्किंग फोरमने २२०० झाडांची लागवड केली होती. वर्षभर त्यांचे जतन करण्यातही फोरमला यश मिळाले. यातून प्रोत्साहन मिळून यावर्षीही उर्वरित जागेवर वृक्षारोपण करण्याचे ठरले होते. या कामासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्यापासून खड्डे खोदणे, रोपे उपलब्ध करून देणे यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. या नंतरचे खरे आवाहन या रोपांचे संवर्धन आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन ही वैद्यकीय प्रॅक्टिशनर्स संघटनेने पुढाकार घेतला असून, पावसाळ्यानंतर कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय राखण आणि रोपांची दैनंदिन निगा ठेवण्यासाठी रखवालदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी आयएमएच्या सदस्यांनी घेतली आहे. या ‌अभियानाला नागरिकांनी पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


एकलहरे औष्णिक वीज केंद्र

नाशिकरोड : एकलहरे येथील औष्णिक वीज केंद्रातर्फे आज वृक्षारोपण करण्यात आले. महानिर्मितीचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे यांच्याहस्ते सुरुवात झाली. केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे, मनुष्यबळाचे मुख्य अभियंता भिंताडे, वितरणच्या मुख्य अभियंता पगारे, उपमुख्य अभियंता राजेंद्र खालापूरकर, सुनील इंगळे, अधीक्षक अभियंता राजेशकुमार कमटमकर, मनोहर तायडे, नितीन पुणेकर, माशळकर, लीना पाटील, सूर्यकांत पवार, कल्याण अधिकारी निवृत्ती कोंडवले, उपमुख्य अभियंता राजेश मोराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शासनाने या केंद्राला ९३३ झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते तेही पूर्ण करण्यात आले. विविध बारा कर्मचारी संघटनांनी मिळून बाराशे झाडे लावली.

'पर्यावरणात झाडे बजावतात महत्त्वाची भूमिका'

देवळाली कॅम्प : महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे त्यात पर्यावरणात झाडे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. राज्य शासनाने ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचे यंदा केलेल्या संकल्पास आपण हातभार लावत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कारप्राप्त तानाजी भोर यांनी केले. ओम साई राम सेवाभावी संस्था व भोर नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाचे औचित्य साधत शनिवारी (दि. १) येथील नूतन माध्यमिक विद्या मंदिरात बदाम, काशिद, रेन ट्री, गुलमोहर, कडुलिंब सारख्या ५० वृक्षांचे रोपण करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापिका लता जोशी, अशोक बोराडे, जितेंद्र भावसार, अनिल ढोकणे, जितेंद्र पावशे, देविदास आंबेकर, अनिल कपडे, संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.


महावितरणतर्फे वृक्षांचा वाढदिवस साजरा

नाशिकरोड : जेलरोड परिसरातील शिवाजीनगर येथील स्काडा सेंटरच्या आवारात मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात झाली. या मोहिमेत नाशिक व नगर जिल्ह्यातील महावितरणच्या विविध कार्यालयांच्या परिसरात जवळपास सात हजार वृक्षांची लागवड होईल. तसेच या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. गतवर्षी राबविलेल्या मोहिमेतील बहुतांश वृक्ष सुस्थितीत आहेत. यातील काही वृक्षांचा वाढदिवस शनिवारी (दि. १) साजरा करण्यात आला. नाशिक शहर विभाग-२ कार्यालय परिसरातील वृक्षाजवळ केक कापून वाढदिवस साजरा करतानाच नवीन वृक्षाचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटीमुळे कररचना अधिक पारदर्शी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्यानंतर सात दशकांनी आलेला जीएसटी संदर्भातील बदल हा
हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. गेल्या १४ वर्षांच्या प्रयत्नांनंतर आपण या दिशेने यशस्वी पाऊल टाकले. जीएसटीचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होणार असून, सध्या असलेली गुंतागुंतीची कररचना अधिक सुरळीत आणि पारदर्शक होईल, असा विश्वास कर सल्लागार प्रदीप कोरडे यांनी व्यक्त केला.

जीएसटीचा परिणाम समजून घेण्यासाठी शहरातील तज्ज्ञ व्यावसायिक आणि संस्था जीएसटीइ फाईलतर्फे डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

कर व्यावसायिक प्रदीप क्षत्रीय यांनीही मार्गदशेन केले. यावेळी व्यासपीठावर विक्रीकर विभागाचे उपायुक्त संजय पोखरकर आणि जीएसटीइ फाईलचे संचालक हेमंत देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत देशपांडे यांनी केले.

तंत्रज्ञानाची ओळख

प्रमुख वक्ते प्रदीप कोरडे यांनी जीएसटीकडे सकारात्मकतेने बघण्याचा सल्ला दिला. जीएसटीचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे. व्यापारी, ग्राहक, किंमती आणि सरकारी महसूल सर्वांवरच याचा परिणाम जाणवेल. ‘वन नेशन वन टॅक्स’ या संकल्पनेवर जीएसटी आधारित आहे. जीएसटीला मूर्त रूप देण्यासाठी तंत्रज्ञानाची मोठी मदत होणार आहे. यासाठी अगदी छोटे ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत व्यवहार बिले हे जीएसटी पोर्टलवर अपलोड करावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात १५ सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधकांनी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या सहकारी संस्थांत नाशिकच्या चिंतामणी नागरी सहकारी पतसंस्थेबरोबरच सहा पतसंस्था व ८ विविध कार्यकारी सोसायट्यांचा समावेश आहे. या पतसंस्थांच्या निवडणुकीसाठी मतदारयाद्या तयार केल्या जात आहेत. त्यात प्रारूप मतदारयादी एक जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्या जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयासह तालुका उपनिबंधक कार्यालयांत पाहायला मिळणार आहे.

प्रारूप मतदारयादीवर हरकती व स्वीकारण्यासाठी १ जुलै ते १० जुलै ही मुदत दिली आहे. त्याचप्रमाणे या हरकतींवर २० जुलैला निर्णय देण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदारयादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध होईल. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदानाचा कार्यक्रमही घोषित होणार आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या निवडणुकांमध्ये नाशिकची चिंतामणी, पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था, शरयूताई व गंगोत्री नागरी पतसंस्थेबरोबरच मनमाडची छत्रपती शिवाजी महाराज नागरी सहकार पतसंस्था, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पतसंस्था, देवळ्यातील श्रीमान सुगनमलजी सुराणा पतसंस्थेचा समावेश आहे. त्याचप्रमाणे विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये कळवण, निफाड, येवला या तालुक्यांतील आठ संस्थांचा समावेश आहे.

...तरीही चुरस कायम

सहकार कायद्यात पाच वर्षांनी निवडणुका घेण्याचा नियम असला तरी या निवडणुका अगोदर कागदावरच होत होत्या; पण त्यावर तक्रारी होऊ लागल्यानंतर जाहीर स्वरूपात त्याचा कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचू लागला आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये चुरस वाढली आहे. या निवडणुकांमध्ये लाखो रुपयांचा खर्च केला जातो. त्यामुळे या निवडणुका स्थानिक पातळीवर महत्त्वाच्या असतात. नोटाबंदीनंतर या सर्व संस्था अडचणीत आलेल्या आहेत. त्यांच्या कामकाजावरही त्याचा परिणाम झालेला आहे. असे असले तरी या निवडणुकांध्ये मात्र चुरस कायम असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयओटी प्रकल्पाची संधी कौतुकास्पद’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञान न मिळविता प्रज्ञावंत होणेही महत्त्वाचे असून, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने विद्यार्थ्यांना कमी वयातच ‘आयओटी’चे प्रकल्प तयार करण्याची दिलेली संधी कौतुकास्पद आहे. मंडळाच्या शतकी महोत्सवातील इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी)च्या माध्यमातून तयार करण्यात येणारे प्रकल्प, उपक्रम स्तुत्य असून, या प्रकल्पांना अमेरिकेतील एमआयटी बोस्टनच्या भारतातील शाखेतर्फे सहकार्य केले जाईल, असे आश्वासन ‘एमआयटी’चे शास्त्रज्ञ व पुरुषोत्तम शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. रमेश रासकर यांनी दिले.

पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये ‘आयओटी’च्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रासकर बोलत होते. संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाबक, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, डॉ. रमेश तिवारी, संगणक विभागप्रमुख दिवाकर यावलकर, ‘एमआयटी’चे मॅगी चर्च व अला मुराबिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

महेश दाबक म्हणाले, की संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त ‘आयओटी’च्या माध्यमातून विद्यार्थी दैनंदिन जीवनातील उपयोगी गोष्टींपासून स्मार्ट शालेय स्तरावरील, तसेच विज्ञानाच्या संकल्पनांवर आधारित प्रकल्प तयार करणार आहेत. त्याचे प्रदर्शन मुख्यमंत्री पाहणार आहेत. शालेय स्तरावरच प्रकल्पाचे विषय मिळतील. डॉ. रमेश तिवारी, विवेक गोगटे, पंकज देवरे, प्रा. एम. यू. खरात, प्रकाश भिडे, अनुराग केंगे आदींनी मार्गदर्शन केले. वैशाली जाधव यांनी सूत्रसंचालन केले. खजिनदार वैशाली गोसावी, सहसचिव पी. एम. कुलकर्णी, मुख्याध्यापक प्र. ला. ठोके, संजीवनी धामणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणेश चौकात भरदिवसा घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिडकोतील गणेश चौकातील घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, साड्या व रोकड असा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

लक्ष्मीकांत मधुसूदन भार्गवे (रा. कमोदनगर, इंदिरानगर) यांच्या तक्रारीनुसार, भार्गवे कुटुंबीय शुक्रवारी कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी दुपारी एकच्या सुमारास भार्गवे यांच्या गणेश चौकातील शीतल इलेक्ट्रीकल्ससमोरील बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, साड्या व रोकड असा सुमारे ८,७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हवालदार उघडे तपास करीत आहेत.

संशयित गजाआड

घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या भारतनगर झोपडपट्टीतील दोन संशयितांच्या मुसक्या आवळण्यात मुंबई नाका पोलिसांना यश आले. हे संशयित वेगवेगळ्या ठिकाणी शुक्रवारी मध्यरात्री लपलेले असताना गस्तीपथकाने त्यांना पकडले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फकिरा रमेश बढे (वय २५) व अजय जीवन बिचडे (१९, दोघे रा. म्हाडा कॉलनी, भारतनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. बढे याला विधातेनगर भागात, तर बिचडे याला रजा कॉलनीत पकडण्यात आले. मुंबई नाका पोलिसांचे गस्तीपथक शुक्रवारी गस्त घालत असताना बढे साक्षी अपार्टमेंट परिसरात, तर बिचडे पूजानगरी सोसायटी परिसरात चोरीच्या उद्देशाने लपलेला आढळला. या प्रकरणी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, हवालदार माळोदे आणि उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

घरात घुसून महिलेस मारहाण

घरात नवीन वीजमीटर बसविण्याच्या कारणातून चौघांनी घरात घुसून महिलेला मारहाण केल्याची घटना पंचवटीतील सुकेणकर लेन परिसरात घडली. या घटनेत महिलेस लाकडी बॅटने मारहाण करण्यात आली असून, या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पद्माकर पाटील, रोहिणी पाटील, रोहित पाटील (तिघे रा. तारवालानगर) व प्रतिभा देसाई (रा. सुकेणकर लेन) अशी संशयितांची नावे आहेत. वैशाली प्रवीण पाटील (रा. सुकेणकर लेन) यांच्या तक्रारीनुसार, पाटील यांनी आपल्या घरात नवीन वीजमीटर बसविण्याचे काम हाती घेतल्याने ही मारहाण करण्यात आली. १७ जून रोजी रात्री संशयितांनी घरात घुसून वीजमीटर बसवायचे नाही, असे म्हणत कुरापत काढली. तसेच शिवीगाळ करीत मारहाण केली. या वेळी पद्माकर पाटील यांनी हातातील लाकडी बॅट त्यांच्या डोक्यात मारून जखमी केले. हवालदार झाडे तपास करीत आहेत.

सातपूरला दुचाकी पळविली

घरासमोर पार्क केलेली दुचाकी चौघांनी पळवून नेल्याची घटना समतानगर परिसरात घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये चार संशयितांविरुद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख उर्फ पप्पू विजय बागडे, श्रावण पोपट भालेराव, अक्षय प्रदीप कुरकुरे आणि विक्रम यादव अशी दुचाकी चोरी करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. समतानगर भागात राहणारे अविनाशचंद सुरेहप्रसाद श्रीवास्तव यांची हिरो होंडा मोटारसायकल (एमएच १५/बीके १७०९) २५ जून रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असताना या संशयितांनी ती पळवून नेली. उपनिरीक्षक कुऱ्हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवीदास पिंगळेंचा राजीनामा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी अविश्वास प्रस्तावाचा सामना करण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे. येत्या ४ जुलै रोजी विरोधक त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करणार होते. बाजार समितीतील १८ पैकी १३ संचालक पिंगळे यांच्या विरोधात गेले आहेत. बाजार समितीवरही बरखास्तीची टांगती तलवार आहे. न्यायालयीन अडचणीमुळे राजीनामा दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व दिवाळी बोनस फरकाच्या रकमेच्या अपहाराप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली होती. या कारवाईत बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या कारमधून ५८ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांसह पिंगळे यांच्यावर म्हसरूळ पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.बाजार समितीत १८ संचालक असून, त्यातील बरेच संचालक हे भाजपच्या गोटात गेले आहेत. त्यामुळे अविश्वासबाबतच्या हालचाली सुरू होत्या. या प्रस्तावाला भाजपने बळ दिल्याने गेल्या महिन्यात २३ तारखेला त्यांच्या १३ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. परंतु या सुनावणीपूर्वीच पिंगळे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकाकडे आपला राजीनामा सादर केला. न्यायालयीन अडचणीमुळे येवू शकत नसल्याने दिलीप थेटे यांच्यामार्फत त्यांनी राजीनामा सादर केला आहे.

चुंभळे नवे सभापती?

बाजार समितीतील पिंगळे यांच्या गटातील सदस्य फोडण्यात पिंगळे यांचे विरोधक व संचालक शिवाजी चुंभळे यांचा मोठा वाटा राहीला आहे. त्यामुळे पिंगळेच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या सभापती पदावर चुंबळे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या फुटीर गटाचे नेतृत्व चुंभळे करीत आहेत. त्यामुळे भाजपमधे गेलेले संचालकही त्यांनाच मदत करण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंग प्रवेशाला विलंब

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

डिप्लोमा इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यानंतर डिग्री अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश दिला जातो. मात्र, डिप्लोमा इंजिनीअरिंगचे निकाल लागून महिना उलटला तरी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटवर प्रवेशप्रक्रियेसंबंधी प्राथमिक माहितीही दिलेली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. इंजिनीअरिंगच्या थेट द्वितीय वर्षासाठीची प्रवेशप्रक्रिया नक्की कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डिप्लोमा इंजिनीअरिंगचे निकाल लागून एक महिना उलटला आहे. मात्र, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटवर प्रवेशाची माहितीच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. बहुतांश इंजिनीअरिंग कॉलेजांनी डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल प्रवेशप्रक्रिया देणे सुरू केले असले तरी अधिकृत कोणतीही माहिती पुढे येत नसल्याने हे प्रवेश निश्चित मानले जाणार नाहीत.

विलंबामुळे शैक्षणिक नुकसान

यापूर्वी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटवर, प्रवेश जूनच्या शेवटच्या आठवड्यात होणार, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली होती. आता जुलै उजाडूनही प्रवेशप्रक्रियेविषयी काहीही माहिती वेबसाइटवर देण्यात आलेली नाही. ही प्रवेशप्रक्रिया जर उशिरा सुरू झाली तर ऑगस्टमध्ये विद्यार्थांचे प्रवेश निश्चित होतील आणि लगेच परीक्षा सुरू होईल. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगची प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे विद्यार्थांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्री, रेनकोट रंगवा मनासारखे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाचा जोर जून महिन्याच्या अखेरीपासूनच वाढू लागला असून, पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री, रेनकोटसारख्या साधनांचा वापरही अत्यावश्यक ठरत आहे. दर वर्षी छत्री, रेनकोटची खरेदी करताना बाजारात काही तरी हटके शोधण्याकडे अनेकांचा कल असतो. यावेळी मात्र स्वतः डिझाइन केलेली छत्री, रेनकोट वापरण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे आयोजित केलेल्या वर्कशॉपमधून याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेष म्हणजे, कॅलिग्राफीच्या माध्यमातून छत्री, रेनकोटवर पेंटिंग केले जाणार आहेत.

पावसाची मजा लुटणे हा अनेकांच्या आनंदाचा भाग असतो. पण, पावसात भिजल्यामुळे आरोग्य खराब होऊ न देणेदेखील महत्त्वाचे असते. त्यामुळे पावसापासून बचाव करणाऱ्या साधनांचा वापर या ऋतूत महत्त्वाचा असतो. ही साधने इतरांपेक्षा वेगळी व तितकीच आकर्षक असावीत, यासाठी हे वर्कशॉप महत्त्वाचे ठरणार आहे. आज, रविवारी (दि. २) दुपारी ३ ते ५ या वेळेत गंगापूररोडवरील मविप्रच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये या कॅलिग्राफी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. सुलेखनकार नंदू गवांदे त्यात मार्गदर्शन करणार आहेत. छत्रीवर किंवा रेनकोटवर कॅलिग्राफी करण्याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे. या वर्कशॉपला येताना काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची छत्री किंवा रेनकोट, तसेच अॅक्रेलिक कलर, एक आणि दोन इंचांचा ब्रश, प्लास्टिकचा मग, बाउल, कापड बरोबर आणायचे आहे. कल्चर क्लब सदस्यांना विनामूल्य प्रवेश आहे, तर इतरांसाठी ३०० रुपये प्रवेशमूल्य आहे. नोंदणीसाठी कमलेश यांच्याशी संपर्क साधावा.

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड संपर्क ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनश्रीने यशासाठी केला रात्रीचा दिवस

$
0
0

नाशिक : कुटुंबाचा चरितार्थ चालव‌िता यावा म्हणून त्यांनी बेडरूमचे रुपांतर सायकल दुरुस्तीच्या दुकानात केले. सायकलचा वापर कमी झाल्यामुळे या व्यवसायालाही उतरण लागली. आर्थिक परिस्थ‌िती पूर्वीपासूनच बेताची. कसाबसा उदरनिर्वाह होईल एवढेच पैसे पदरात पडतात. घर म्हणाल तर दहा बाय दहाची खोली आणि छोटेसे किचन. तेथेच चिमुकल्या भावंडाची लुडबूड. अशा परिस्थ‌ितीत धनश्रीने जीवतोड अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत ९४.४० टक्के गुण मिळविले. डॉक्टर होण्याचे स्वप्न ती उराशी बाळगून आहे. पण त्यासाठी तिला हवाय दातृत्वाचा हात.

धनश्री भाऊसाहेब राजोळे असे या गुणी विद्यार्थिनीचे नाव. नवजीवन डे स्कूलमधून घवघवीत गुण मिळवून तिने यश संपादन केले. दहावीच्या अभ्यासाला सुरुवात केली तेव्हाच तिने घरातील भिंतीवर टार्गेट ९१ ते ९८ % असे लिहून ठेवले. हे ध्येय गाठण्यासाठी वाट्टेल तेवढे कष्ट घेण्याची तयारी ठेवली. दिवसा अभ्यासात अनेक अडचणी येत. त्यामुळे रात्रीचा दिवस केला. पहाटे किमान तीन तास अभ्यास करू लागली. अभ्यासाचा हा नियम तिने कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न केला. ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकले नाही याची खंत तिच्या बोलण्यातून डोकावते. विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन तिला मेडिकल क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. स्पर्धा परीक्षांचा पर्याय देखील तिने प्राधान्याने डोळ्यांसमोर ठेवला आहे.

दहावीत घवघवीत यश मिळविणाऱ्या धनश्रीने मेडिकल आणि स्पर्धा परीक्षा ही दोन क्षेत्रे डोळ्यांसमोर ठेवून अभ्यास सुरू केला आहे. तिच्या या स्वप्नपूर्तीसाठी तिला दातृत्वाचा हात हवा आहे. राजोळे कुटुंब मूळचे निफाड तालुक्यातील करंजगावचे. धनश्रीचे वडील भाऊसाहेब शिक्षणासाठी गाव सोडून शहरात आले. बहिणीकडे राहिले. त्यांच्या सायकल दुरुस्तीच्या व्यवसायाला हातभार लावत त्यांनी कला शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. इतिहासाचा प्राध्यापक होण्याचे त्यांचे स्वप्न; पण आर्थिक परिस्थ‌िती बेताची. शिक्षण अर्ध्यावर सोडल्यामुळे हे स्वप्न भंगले. सायकल दुरुस्तीचे काम शिकल्यामुळे सिडकोलगतच्या शाहूनगर परिसरात टपरीवजा दुकानात व्यवसाय सुरू केला. कामगार वर्गाकडे सायकलच असल्याने व्यवसाय सुरळीत सुरू होता. पैन् पै जमवून त्यांनी परिसरात घर खरेदी केले. पोटाची खळगी भरता यावी, यासाठी या घराच्याच बेडरूमला गाळ्याचे रूप देऊन त्यामध्ये सायकल दुरुस्तीचा व्यवसाय थाटला. त्यासाठी इमारतीमधील रहिवाशांची परवानगी आवश्यक होती. रहिवासीही मोठ्या मनाचे. त्यांनी आढेवेढे न घेता राजोळे यांना परवानगी दिली. मात्र, सायकल कमी आणि मोटारसायकल्सचे प्रमाण वाढल्यामुळे राजोळे यांच्या व्यवसायालाही उतरती कळा लागली. मोटारसायकलचे पंक्चर काढण्यास त्यांनी सुरुवात केली. मात्र, हा व्यवसायही बिनभरवशाचा. धनश्रीची आई मनीषा गृहिणी आहे. जीविका आणि देवदत्त ही तिची लहान भावंडे. धनश्री अभ्यासात हुशार. भावंडांना सांभाळून ती आईला घरकामात मदतही करते. ना अभ्यासाला स्वतंत्र खोली, ना पुरेशी शांतता. तरीही तिने अभ्यासावर मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे.

मेडिकल आणि स्पर्धा परीक्षा या दोनपैकी कुठल्याही क्षेत्रात गेले तरी यशस्वी होऊन दाखवेन, असे ती आत्मविश्वासाने सांगते. आपली आर्थिक परिस्थ‌िती बिकट असल्याची तिला जाणीव आहे. जास्तीत जास्त अभ्यास करून सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ती सांगते. या गुणी मुलीला गरज आहे आर्थिक पाठबळाची. तिची स्वप्ने प्रत्यक्षात अवतरावी यासाठी दानशूरांनी पुढे यायलाच हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images