Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सवलती, सेलचा भूलभुलय्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

वस्तू सेवाकराच्या भीतीपोटी काही करबुडव्या व्यावसायिकांनी आपल्याकडील वस्तूंची विक्री करण्यासाठी भरघोस सवलती, सेलचा उतारा शोधला आहे. अशा व्यावसायिकांचे पितळ उघडे पाडण्यासाठी ग्राहकांनी जीएसटी लागू होईपर्यंत अशा सेलमधून वस्तूंची खरेदी करू नये, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

सध्या सर्वच शहरांत विविध वस्तूंच्या सेलचे पीकच फोफावलेले दिसून येत आहे. त्यात कपडे, फर्निचर, होम अॅप्लायन्सेस, कॉस्मेटिक्स, पादत्राणे, इमिटेशन ज्वेलरी, मोबाइल फोन्स अशा व इतर वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंच्या सेलमध्ये वस्तूंच्या खरेदीवर २० टक्क्यांपासून ते थेट ८० टक्क्यांपर्यंत ग्राहकांना सवलत दिली जात आहे. त्यामुळे अशा सेलमध्ये आजवर महाग असलेल्या वस्तू अगदी स्वस्तात ग्राहकांना मिळत आहेत.

काळाबाजार उघड

येत्या एक जुलैपासून देशात जीएसटी करप्रणाली लागू होणार आहे. त्यानंतर देशातील सर्वच व्यापाऱ्यांना खरेदी-विक्रीची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे. मुळातच ज्या व्यापाऱ्यांनी याआधी कर चुकवलेला आहे, अशा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. जीएसटी लागू होण्याच्या आत आपल्याकडील माल विक्रीसाठी अशा व्यापाऱ्यांचा आटापिटा सुरू झाला आहे. जीएसटीमुळे करबुडव्या व्यापाऱ्यांचा काळाबाजार उघड होणार असल्यानेच अशा व्यापाऱ्यांनी सेलचा उतारा शोधला आहे.

हवी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट

कोणत्याही वस्तूवर एमआरपीऐवजी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट छापली गेली पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने शासनाकडे गेल्या काही वर्षांपासून लावून धरलेली आहे. मात्र, व्यापारीधार्जिण्या सरकारकाने आतापर्यंत या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. परिणामी एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची मोठी आर्थिक लूट होत आहे.


ग्राहकांची लूट

अशाप्रकारच्या सेलद्वारे ग्राहकांना स्वस्तात वस्तू मिळत असल्या, तरी ग्राहकांची व्यावसायिकांकडून मोठी लूट केली जात असल्याचे त्याद्वारे स्पष्ट होत आहे. सवलतीत वस्तूंची विक्री करूनही संबंधित व्यावसायिकांना नफा मिळत आहे. याचा अर्थ सेलपूर्वी या वस्तू एमआरपी मूल्याने विक्री होत होत्या. एमआरपी मूल्याने विक्री झाल्यामुळे ग्राहकांची मोठी आर्थिक लूट करण्यात येत होती, असा दावा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.


--

सध्या एमआरपी अॅक्ट आहे. एमआरपीला मर्यादा नाही. त्याऐवजी प्रत्येक वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट शासनाने जाहीर करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतीने लावून धरली आहे.

- विजय सागर, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाल्यांचा अतिक्रमणाने कोंडला श्वास

$
0
0

औरंगाबाद रोडवरील नैसर्गिक नाल्यांचे अस्तित्व नष्ट

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

महापालिकेच्या पावसाळी गटार योजनेसह शहरातील नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि बांधकाम झाल्याचे गंभीर स्थिती झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशीच परिस्थिती औरंगबाद रोडवरील नाल्यांवर झाली आहे. या अतिक्रमणाकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून केली जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जोराच्या पावसात औरंगाबाद रोड जलमय होऊन वाहतूक ठप्प होण्याचे तसेच घरांमध्ये पाणी जाण्याचे प्रकार घडत आहेत. नाल्यावरील अतिक्रमण रडारवर घेणाऱ्या महापालिका प्रशासनाने औरंगाबाद रोडवरील नाल्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

औरंगाबाद नाका ते मानूर शिव या महापालिकेच्या हद्दीच्या पाच किलोमीटरच्या या रस्त्यावर १३ नाले असून, त्यातील तब्बल ११ नाले बुजविण्यात आलेले आहे. मुंबई-आग्रा महामार्गापासून दक्षिणेला गोदावरी नदीकडे उताराने पावसाचे पाणी वाहून आणणाऱ्या या नैसर्गिक नाले बुजविण्यात आल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याचा मार्गच खुंटला आहे.

या ठिकाणी आहेत नाले

शिंदी ओहळ (कपिला), लक्ष्मी लॉन्ससमोर, सेलिब्रेशन लॉन्ससमोर, सेवा सोसायटी, कैलास नगर, निलगिरी बाग, सिद्धीविनायक चौक, रामसीता लॉन्ससमोर, नांदूर नाला, मजा हॉटेलजवळ, मानूर शिवनाला, मानूर नाला असे नाले आहेत.

औरंगाबाद रोडच्या दोन्ही बाजूच्या परिसरात नव्याने बांधकामे होऊ लागली आहेत. त्या बांधकामांसाठी नैसर्गिक नाले बुजविण्यात येत आहे. गोदावरीकडे थेट पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद केल्यास भविष्यात मोठे संकट येऊ शकते. त्यामुळे त्यावर महापालिका प्रशासनाने वेळीच दक्षता घेऊन हे अतिक्रमण रोखले पाहिजे.

- देवांग जानी, गोदाप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोनशेवर दुचाकीस्वारांना दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हेल्मेटचा वापर न करता वाहन चालविणाऱ्या जवळपास दोनशेपेक्षा अधिक दुचाकीस्वारांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम थंडावली होती. मात्र, शनिवारी अचानक शहराच्या विविध भागात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली.

हेल्मेटचा वापर करीत नसलेल्या दुचाकीस्वारांवर शहर वाहतूक शाखेमार्फत कारवाई करण्यात येते. या वर्षाच्या सुरुवातीलाच हेल्मेटसक्तीच्या नियमाबाबत पोलिस आग्रही झाले. गेल्या काही दिवसांपासून या कारवाईकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. शुक्रवारी ४५ दुचाकीस्वारांवर कारवाई झाली. गुरुवारी हा आकडा ९५ होता.

वाहतूक विभाग सतत कारवाई करतो. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करायला हवा, याकडे आम्ही कटाक्षाने पाहतो. मात्र, वाहतुकीच्या इतर नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरदेखील कारवाई होते, असे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी स्पष्ट केले. दुचाकी अपघातात अनेक मृत्यू डोक्याला मार लागून होतात. त्यामुळे हेल्मेटचा वापर दुचाकी चालकांनी करावा, यासाठी कारवाईला वेग दिला जात असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

--

येथे झाली कारवाई

शनिवारी सकाळी शहरातील कॉलेजरोड, शरणपूररोड, मायको सर्कल, मुंबई नाका, नाशिकरोडसह इतर प्रमुख चौकांत पोलिसांनी कारवाईवर जोर दिला. सायंकाळपर्यंत दंडात्मक कारवाई सुरू होती. दिवसभरात दोनशेपेक्षा अधिक दुचाकीस्वारांकडून दंड वसूल करण्यात आला. हेल्मेटचा वापर न केल्यास वाहनचालकाकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात येतो. मात्र, त्यावेळी वाहनचालकाने पैसे भरण्यास असमर्थता दर्शविली, तर वाहन जप्त करण्यात येते. वाहनचालकाने तडजोड शुल्क भरल्यानंतरच त्यास वाहन परत करण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य सरकारकडे १०० कोटींची मागणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत राज्य सरकारने तातडीची आर्थिक मदत म्हणून दहा हजार रुपये देण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी जिल्हा बँकेसाठी राज्य सरकारकडे १०० कोटी रुपयांची आर्थिक मदत माग‌ितली आहे. त्यासाठी त्यांनी दिवसभर मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांसह विविध अधिकाऱ्यांशी संपर्क करून जिल्हा बँकेच्या सध्यस्थितीची माहिती दिली. यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या जिल्हा सहकारी बँकेला थोडासा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या दोन दिवसाच्या बैठकीला जिल्हाधिकारी गेले होते. त्यानंतर त्यांनी शनिवारी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बैठकीत त्यांनी बँका अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठीच्या सूचना केल्या. बैठकीत बँक अधिकाऱ्यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, राज्य शासनाने बँकांना ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरिपासाठी तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपयांपर्यंतचे पीककर्ज शासन हमीवर देण्याच्या सूचना केली आहे. पण, एनपीएमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून सूचना आल्यास कर्ज देणे सुकर होईल.त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिझर्व्ह बँकेला पत्र दिले असल्याचे सांगितल्यानंतर बैठकीत उपस्थित बँक अधिकाऱ्यांनी सुस्कारा सोडला.

जिल्ह्यात १० हजार रुपयांच्या मदतीसाठी ८१ हजाराच्या आसपास शेतकरी पात्र आहेत. या बैठकीसाठी जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे, लीड बँकेचे अशोक चव्हाण उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संदीप विद्यापीठ आणि प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनतर्फे शनिवारी संदीप विद्यापीठात नाशिक जिल्ह्यातील सर्व क्लासेसच्या दहावी व बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. या वेळी शिक्षकांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या हस्ते पीटीएचे अध्यक्ष प्रा. जयंत मुळे यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वी, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या वेळी गौरविण्यात आले. संदीप पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. प्रशांत पाटील यांनी नाशिक जिल्ह्याचा यशस्वी शैक्षणिक वाटचालीचा उत्तरोत्तर वाढणारा टक्का पाहता शिक्षकांचे योगदान कसे महत्त्वाचे आहे याची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने मागोवा घेणाऱ्या शिक्षकांच्या अथक प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी अँड रिसर्च सेंटरचे प्राचार्य डॉ. एस. टी. गंधे यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा व पर्यायाने समाजाचा विकास करणे कसे शक्य आहे, याविषयी मार्गदर्शन केले. संदीप इन्स्टिट्यूटच्या वेगवेगळ्या कॉलेजांचे प्राचार्य, नाशिक जिल्हा खासगी क्लासेस संघटनेचे पदाधिकारी व खासगी क्लासेसचे संचालक, तसेच सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.

यशवंत बोरसेंना जीवनगौरव

श्री साई कम्प्युटर, टायपिंग अँड कोचिंग क्लासेसचे संचालक यशवंत बोरसे यांना ‘शिक्षक जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. गिरीश कश्यप, प्रा. जगदीश शेलार, प्रा. गोरक्षनाथ लांडे, प्रा. विजय जाधव, प्रा. धनंजय शिंदे, प्रा. सचिन जाधव, प्रा. घनश्याम अहिरे, प्रा. निरामय भट्ट, प्रा. हितेश सिंग, प्रा. प्रीतीश कुलकर्णी, प्रा. प्रमोद गुप्ता, प्रा. चंद्रकांत सुपेकर, प्रा. नीलेश दुसे, प्रा. यशवंत भामरे, प्रा. नीलेश सुराणा, प्रा. उमेश गारे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. हर्षा कश्यप, प्रा. नीता आहेर, प्रा. लीना ठाकरे, प्रा. राजकमल हेलकर यांना आदर्श शिक्षका पुरस्काराने गौरविण्यात आले. खासगी क्लासेसच्या प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या सर्व यशस्वी सातशे विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला पोलिसांना धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अतिक्रमण काढत असताना विरोध करणाऱ्या दोन महिलांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. ही घटना ओमकारनगर भागात घडली असून, या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयश्री चव्हाण आणि मोना उर्फ धनश्री केदारे (रा. रुक्मिणी मंदिराजवळ, ओमकारनगर) अशी धक्काबुक्की करणाऱ्या महिलांची नावे आहेत. ओमकारनगर भागात शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविली. त्या वेळी ही घटना घडली. रुक्मिणी मंदिराजवळ राहणाऱ्या चव्हाण व केदारे यांच्या घराजवळील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाल्यानंतर हा प्रकार घडला. संतप्त महिलांनी अतिक्रमण काढण्यास विरोध करीत संबंधित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. या वेळी महिला पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी महिला पोलिस कर्मचारी जाधव आणि बोरसे यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी शैलजा माळोदे यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, उपनिरीक्षक जोपळे तपास करीत आहेत.

कारमध्ये चोरी

सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी म्युझिक सिस्टीमसह किमती मुद्देमाल लंपास केल्याची घटना कलानगर भागात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जयेश टेकचंद तन्ना (रा. मित्रविहार सोसायटी, कलानगर) यांच्या तक्रारीनुसार, तन्ना यांची कार (एमएच १५/एफएफ ०७९१) बुधवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावली होती. चोरट्यांनी कारची चालकाच्या बाजूची काच फोडली, तसेच म्युझिक सिस्टीम, स्क्रीन टच प्लेअर व स्पीकर असा सुमारे १३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सहाय्यक निरीक्षक मेश्राम तपास करीत आहेत.

तरुणीचा विनयभंग

कामावरून घराकडे परतणाऱ्या तरुणीस रस्त्यात अडवून ओळखीच्या तरुणाने विनयभंग केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. ही घटना डीजीपीनगर भागातील कॅनॉल रोड परिसरात घडली. आशिष अंकुश थोरात (रा. जगदीश अपार्टमेंट, इच्छामणी लॉन्समागे, उपनगर) असे या संशयिताचे नाव आहे. मूळची पनवेल येथील २६ वर्षीय तरुणी इंदिरानगर परिसरातील कॅनॉल रोड भागात राहते. ती शुक्रवारी सायंकाळी कामावरून घराकडे परतत असताना आशिषने तिला अमृत बारसमोरील रोडवर अडवले. तू आता माझ्याशी पहिल्यासारखी वागत नाही, असे म्हणत त्याने तरुणीचा विनयभंग केला. या वेळी त्याने तरुणीस शिवीगाळ करीत, जर माझ्याशी लग्न केले नाही तर माझ्याशी गाठ आहे, अशी धमकी दिल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. उपनिरीक्षक तेली तपास करीत आहेत.

पॉलिशच्या बहाण्याने दागिने लंपास

दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या दोन भामट्यांनी महिलेच्या बांगड्या हातोहात लांबवल्या. ही घटना सिडकोतील बडदेनगर भागात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सुनीता दिलीप सोनवणे (वय ५१, रा. घोडेमळा, बडदेनगर) यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी सोनवणे घरात एकट्या असताना ही घटना घडली. साडेअकराच्या सुमारास दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन संशयित घरात घुसले. दोन्ही तरुणांनी सुमारे एक लाख २० हजार रुपयांच्या चार तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या गरम पाण्यात टाकल्या. काही वेळाने बाहेर काढण्याचा सल्ला देत संशयितांनी बांगड्या हातोहात लंपास केल्या. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमरधाम सुविधांपासून वंचितच

$
0
0

पिंपळगाव बहुल्यातील स्मशानभूमी दुर्लक्षित

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर असलेल्या पिंपळगाव बहुला गावात आजही नागरी सुविधा मिळत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. त्यातच गावात असलेल्या अमरधाम सुविधांपासून वंचित असल्याने नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या आप्तेष्ट व नातेवाईकांना बसण्याचीही व्यवस्था नसल्याने मोठी गैरसोय होत असते. तसेच लाकडांसाठी शेड नसल्याने ओल्या लाकडांचाच पुरवठा होत असतो.

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ खेड्यांमध्ये पिंपळगाव बहूलाचाही समावेश करण्यात आला होता. परंतु, अनेक वर्ष महापालिकेत समावेश होऊनदेखील आवश्यक सुविधा ग्रामस्थांना दिल्याच गेल्या नाहीत. रस्ते, स्ट्रिट लाइट व पाण्याची समस्या आजही पिंपळगाव बहुला गावात कायम आहे. यात काही प्रमाणात समस्या जरी सुटल्या असल्या, तरी गावातील अमरधाम मात्र सुविधांपासून वंचितच आहे.

शेडही उपलब्ध नाही

अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना साधी आसन व्यवस्था अमरधाममध्ये झालेली नाही. तसेच उभे राहण्याचीही व्यवस्था नसल्याने मोठी गैरसोय होत असते. किमान अंत्यविधीला येणाऱ्यांना बसण्याची अथवा उभे राहण्याकरीता शेडची उभारणी महापालिकेने करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पावसाळ्यात अंत्यविधीला लागणाऱ्या लाकडांसाठीही छोटे पत्र्याचे शेड देण्याचीही मागणी होत आहे. अंत्यविधीसाठी असलेले पलंगही मोडकळीस आले असून, पलंग तुटून अंत्यविधीचे शव खाली पडण्याची शक्यता असल्याने तात्काळ दुरूस्तीची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गानतंत्र’साठी नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्ल्ड म्युझिक डे (दि. २१ जून)निमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे ‘गानतंत्र’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ई-मेलद्वारे गाणे मागविण्यात आले होते. नाशिककरांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, शनिवारी रात्री उशिरापर्यंत पावणेदोनशे नाशिककरांनी यात सहभाग नोंदवला आहे. सोमवारी (दि. १९) या स्पर्धेचा स्टुडिओ राउंड रेडिओ मिर्चीमध्ये होणार आहे. २० स्पर्धकांमधून १० स्पर्धक या ठिकाणी निवडले जातील आणि या १० स्पर्धकांना २१ जून रोजी होणाऱ्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गाण्याची संधी मिळणार आहे. अंतिम तीन विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे रेडिओ मिर्ची हे म्युझिक पार्टनर आहेत. आपल्याकडील सांग‌ीतिक वारशाला अभिवादन हा तर या स्पर्धेमागचा हेतू आहेच; त्याशिवायही आतापर्यंत लोकांच्या कानापर्यंत न पोहोचलेल्या उत्तमोत्तम आवाजांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचाही उद्देश यामागे आहे. आपला आवाज उत्तम असूनही आपल्याला केवळ चांगले व्यासपीठ न मिळाल्यामुळे आणि तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचता आले नाही, अशी खंत वाटणाऱ्या सर्वांसाठी ‘गानतंत्र’ ही स्पर्धा होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कॅशलेस’ कॉलेजकडे वाटचाल

$
0
0

‘कॅशलेस’ कॉलेजकडे वाटचाल

देशाची वाटचाल सध्या ‘कॅशलेस’कडे सुरू आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने व्यवहार व्हावेत यासाठी विविध स्तरांवर सरकारी व्यवस्थेकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये कॉलेजांची भूमिकाही महत्त्वाची आहे. त्यामुळे ‘कॅशलेस’ कॉलेजकडे आमचे कॉलेज वाटचाल करीत आहे, असे केव्हीएन नाईक आर्टस, कॉमर्स व सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. वसंत वाघ यांनी सांगितले. याविषयी तसेच कॉलेजविषयी अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला संवाद...

कॉलेजमध्ये कोणकोणते अभ्यासक्रम शिकवले जातात?

आर्टस, कॉमर्स, सायन्स शाखांशी संबंधित विविध अभ्यासक्रम आमच्या कॉलेजमध्ये शिकवले जातात. बीए, बी.कॉम., बी.एस्सी., बीसीएस, बीबीए, बीसीए, एम.एस्सी. फिजिक्स, झूलॉजी, केमिस्ट्री, एमए, एम. कॉम. आदी अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे.

विद्यार्थी विकासासाठी राबविले जाणारे उपक्रम कोणते?

विद्यार्थ्यांचा विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. अभ्यासेतर कौशल्यांचाही त्यांच्यात विकास व्हावा, या हेतूने विविध उपक्रम राबवले जातात, तसेच त्यांच्यात सामाजिक भान रुजावे, याची काळजीही आम्ही घेत असतो. त्यासाठी शहरातील चामरलेणी, पांडवलेणी, गोदाघाट अशा पर्यटनाच्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जातात. याबरोबरच दरवर्षी गणेशमूर्ती संकलन, रस्तासुरक्षा अभियान, कन्यारत्न वाचवा, स्कील डेव्हलपमेंटविषयी कार्यशाळाही घेण्यात येतात. स्पर्धापरीक्षांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा, यासाठी एमपीएससी, यूपीएससीविषयी मार्गदर्शनही केले जाते. याशिवाय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केल्या जातात. याशिवाय मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्भयकन्या अभियानही आम्ही राबवतो.

कॉलेजचे वैशिष्ट्य काय?

सध्या देशात कॅश व्यवहारापेक्षा ऑनलाइन व्यवहाराला प्राधान्य देण्याचा प्रयत्न सरकारी व्यवस्थेकडून केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून कॅशलेस कॉलेजकडे आम्ही वळलो आहोत. प्रवेशप्रक्रियेची रक्कम विद्यार्थ्यांना थेट ऑनलाइन ट्रान्स्फर करता येईल, अशा सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही ७० टक्के कॅशलेस व्यवहारापर्यंत पोहोचलो आहेत. ते शंभर टक्के करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर कॉलेज स्तरावरील परीक्षादेखील आम्ही ऑनलाइन पद्धतीने घेतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा तांत्रिक दृष्टीनेही विकास होत आहे. कॉलेज व विद्यार्थ्यांशी निगडित प्रत्येक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी एसएमएसची सुविधादेखील आहे. एसएमएसद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना ही माहिती देतो.

गरजू विद्यार्थ्यांसाठी काय सुविधा कॉलेजकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत?

‘एक रुपया सन्मानाचा, माझ्या गरजू मित्र-मैत्रिणीचा’ हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. जे विद्यार्थी अनाथ, निराधार आहे त्यांना यामार्फत मदत होते. या उपक्रमातून मिळालेली रक्कम आम्ही या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरतो, तसेच जे विद्यार्थी अजिबात फी भरू शकत नाही, त्यांना वेळप्रसंगी मोफत शिक्षणही दिले जाते.

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी काय सल्ला द्याल?

पारंपरिक शाखांमधून मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शाखांचा विचार केला पाहिजे.

(शब्दांकन ः अश्विनी कावळे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांना फेरीवाल्यांचा ताप

$
0
0

अपघातांची शक्यता; शहरातील रस्त्यांवर विक्रेते, भिकाऱ्यांचे ठाण

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील चौकांमध्ये किरकोळ विक्रेते आणि भिकारी यांनी वाहनचालकांना त्रस्त करुन सोडले आहे. त्यांच्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. दत्त मंदिर चौकात दोन दिवसांपूर्वी असाच एक अपघात होता होता टळला. त्यामुळे आता या रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शहरातील हे महत्त्वाचे चौक आता अपघात क्षेत्र बनलेत की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून नाशिक-पुणे मार्ग असल्याने या ठिकाणी वाहनांची गर्दी होत असते. परराज्यातून नाशिकला पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले हे विक्रेते अशा वर्दळीच्या चौकांमध्ये सिग्नलवर वाहन थांबले की गजरे, नॅपकिन, खेळणी, गृहोपयोगी वस्तू विक्रीसाठी धाव घेतात.

चालकाच्या विनवण्या करून वस्तू घेण्यास भाग पाडतात. काही भिकारीही भीक मागतात. हिरवा सिग्नल लागला तरी हटत नाहीत. त्यामुळे वाहनचालक वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि अचानक हे विक्रेते व भिकारी मध्ये आल्याने अपघात होऊन दुचाकी घसरते. द्वारकेजवळील काठे गल्ली सिग्नल येथे वाहन थांबले की, गजरे विक्रेते व भिकारी वाहनचालकापुढे येतात. त्यांना वारंवार विनवणी करतात. अशा परिस्थितीत वाहतुकीला अडथळा आणतात. विजय-ममता चौकातही भिकाऱ्यांची मुले तसेच कडेवर मूल घेऊन महिला चालकाला आडव्या येतात. उपनगर नाका तसेच दत्त मंदिर चौकातही अशीच समस्या आहे. शहरातील सीबीएस, मुंबई नाका, कॅनडा कॉर्नर, त्र्यंबकरोडचा सिग्नल, आयटीआय सिग्नल आदी ठिकाणी विक्रेते दिसतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सट्टेबाजांना रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आज, रविवारी (दि. १८) भारत-पाकिस्तानचे संघ भिडणार आहेत. या लढतीकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले असून, सामन्यावर जोरदार बेटिंग होण्याची दाट शक्यता आहे. बेटिंग रोखण्यासाठी, तसेच समाजकंटकांना वठणीवर आणण्यासाठी शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच लढत होत आहे. भारताने साखळी सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली असून, फायनलमधील रोमांच नक्कीच वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर सट्टेबाजदेखील सरसावले असून, भारताला फेव्हरेट मानले जात आहे. दरम्यान, बेटिंग रोखण्यासाठी पोलिस सरसावले असून, बंदोबस्तात वाढ केली आहे. आयपीएल सामन्यांदरम्यान पंचवटीत सुरू असलेल्या बेटिंग अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यापूर्वी असे अनेक प्रकार पोलिसांनी उघड केले आहेत. याबाबत बोलताना परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले, की भारत-पाकिस्तान सामन्याच्या निकालानंतर समाजकंटकदेखील सक्रिय होण्याची शक्यता असते. त्यामुळे भद्रकाली परिसरासह वडाळा गाव येथे बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. बेटिंगचे प्रकार रोखण्यासाठी तयारी सुरू असून, त्यादृष्टीने सूचना देण्यात आले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा दुजाभाव

$
0
0

टीम मटा

नांदगाव, येवला, निफाड तालुक्यात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. काही ठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. याउलट कळवण, दिंडोरी, चांदवड, देवळा, त्र्यंबकेश्वरसह मालेगाव तालुक्याचा पश्चिम पट्टा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

मालेगाव तालुक्यातही असमान पाऊस

मालेगाव - शहरात शुक्रवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दोन दिवस शहरात उकाडा वाढला होता. शुक्रवारी झालेल्या पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला . तालुक्यातील झोडगे परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी एक तास पाऊस कोसळला. यामुळे शेतकरी सुखावला असून, पेरणीच्या कामांना वेग आला आहे. याऊलट दाभाडी परिसरात मात्र पावसाने दडी मारली आहे. मालेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात तुरळक सरी वगळता दमदार पाऊस झालेला नाही.

निफाडला जोरदार

निफाड ः शहर व परिसरात शुक्रवारी रात्री विजांचा कडकडाट आणि वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून विश्रांतीवर गेलेला पाऊस परतल्यामुळे शेतकरी समाधानी झाले असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यातील उगाव, शिवडी, सोनेवाडी, शिवरे, जळगाव आदी गावांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली.

त्र्यंबकेश्वर तालुका अद्याप कोरडाच

त्र्यंबकेश्वर ः शहरासह तालुक्यात पात्र पावसाने दडी मारली आहे. वळावाच्या किरकोळ पावसानंतर अद्यापही या भागात पावसाने पाठ फिरवली आहे. अधूनमधून एखादी सरी कोसळण्यापलीकडे तालुक्यात पावसाने कुठेही दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे.

कळवण, देवळ्यात बळीराजा चिंतेत

कळवण ः गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाने कळवण, देवळा तालुक्याकडे पाठ फिरवली आहे.कळवण शहरालगतच्या काही भाग वगळता तालुक्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. देवळा परिसरही अजून कोरडा असल्यामुळे बळीराजा च‌िंतेत आहे.

नांदगावात नुकसान

नांदगाव शहर व परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार वादळाने अनेक घरांवरचे पत्रे उडाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे नुकसान झाले. मविप्र संस्थेच्या नांदगाव महाविद्यालयाला या वादळवाऱ्यासह पावसाचा फटका बसला आहे. महाविद्यालयाचे तब्बल सात लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. शुक्रवारच्या वादळी वारा व पावसाने महाविद्यालयातील तीन वृक्ष कोसळले. तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेले पत्र्याचे सायकल स्टँण्ड पडले. महाविद्यालयातील सोलर व्यवस्थेची देखील दुर्दशा झाली. शहर व परिसरात देखील बरीच पडझड झाली. विद्युत तारा तुटल्याने काही ठिकाणी रात्रभर वीज नव्हती.
येवल्यात बरसल्या मृगधारा

येवलाः यंदाच्या पावसाळ्यात मृग नक्षत्राने तालुक्यातील बळीराजाला मोठा दिलासा दिला असला, तरी शुक्रवारी रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी मोठा तडाखा दिला. विशेषतः तालुक्याच्या उत्तर-पूर्व पट्ट्यातील अनेक गावात या

वाऱ्याच्या तडाख्याने शेतशिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या घराचे पत्रे उडून गेले. काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या. अनेक ठिकाणी चाळींचे पत्रे उडाल्यामुळे उन्हाळ कांदा भिजला. अर्ध्या तास सुरू असलेल्या या वादळीवाऱ्यांच्या तडाख्यामुळे लाखो रुपयांचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शुक्रवारी दिवसभर दमट वातावरण होते. त्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास येवला शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात मृगधारा बरसल्या. तालुक्यातील अनेक गावातील घरे, कांदा चाळी, पोल्ट्री फार्मला तडाखा बसला. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने काही वेळ वीजपुरवठा बंद केला होता.

तहसीलदारांकडून पाहणी

तालुक्याच्या पूर्व भागातील सायगाव, पांजरवाडी, गोल्हेवाडी आदी काही ठिकाणी वाऱ्याबरोबरच किरकोळ स्वरुपात गारांचा माराह‌ी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी शनिवारी सकाळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

अनेकांचे नुकसान

अंदरसूल गोल्हेवाडी रस्त्यावरील गजानन जिवाजीराव देशमुख यांच्या पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून भिंती कोसळल्या. उंदिरवाडी रस्त्यावरील तुळशीराम मेहतर यांच्या घराचे १५ पत्रे उडाले. नगरसूल येथील गोल्हेवाडीतील विश्वनाथ नारायण शिंदे यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडली. त्यामुळे चाळीतील दीडशे क्विंटल उन्हाळ कांदा पूर्ण भिजला. गोल्हेवाडीमधीलच संभाजी कोतकर यांच्या राहत्या घराची भिंत पडली. याच गावातील भास्कर कोतकर यांच्या डाळिंब बागेलाही वादळी वाऱ्याने तडाखा बसला. कोतकर यांच्या कांदा चाळीचेही नुकसान झाले. धामोडे येथील सावरगाव रोडवरील वाल्मिक भड, ममदापूर येथील हरिभाऊ साबळे यांच्या घराचे पत्रे उडाले.

येवला तालुक्यातील अंदरसूल, सायगाव, भारम, नगरसूल, राजापूर, ममदापूर या उत्तर-पूर्व पट्ट्यात गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीलाच वरुणराजाने जोरदार सलामी दिली होती. यंदाही याच पट्ट्यात मृग नक्षत्राने दमदार श्रीगणेशा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंदिराच्या प्रवेशद्वारातच आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

हाताची नस कापून घेत स्वतःवर रॉकेल टाकून पेटवून घेत एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जेलरोडच्या मॉडेल कॉलनीत घडली आहे. सुभाष रामराव डोहिफोडे (५८, रा. आविष्कार अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्यानंतर मॉडेल कॉलनीतील विघ्नहर्ता गणेश मंदिराला प्रदक्षिणा घालण्याच्या प्रयत्नांत असतांना खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी सुभाष डोहिफोडे याचा मुलगा रितेश (१८) याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी फिर्याद दिली. नाशिकरोड पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. रितेशच्या फिर्यादीनुसार, त्याचे वडील सुभाष डोहिफोडे यांनी रविवारी पहाटे घरात हाताच्या नसांसह कमरेखालील भाग कापून घेत स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले. त्यानंतर घराबाहेर पडून ते जवळच असलेल्या विघ्नहर्ता गणेश मंदिराजवळ गेले. या मंदिराजवळ खाली कोसळून सुभाष डोहिफोडे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपुर्वी त्यांनी गणेश मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी जेलरोडला खुनाची घटना घडल्याची माहिती जेलरोडला वाऱ्यासारखी पसरली. मात्र, पोलिसांमुळे खरा प्रकार लक्षात आल्याने अफवा बंद झाली. मृत्यूपूर्वी सुभाष डोहिफोडे याने मॉडेल कॉलनीतील विघ्नहर्ता गणेश मंदिर गाठले. तेथे त्याने गणेश मंदिराला प्रदक्षिणा घातल्याचे उमटलेल्या रक्ताच्या पावलांवरून दिसून आले. याशिवाय मंदिराच्या पायऱ्यांसह मुख्य दरवाजावरही रक्त उडालेले दिसले.

विक्षिप्तपणातून कृत्य

सुभाष डोहिफोडेला अध्यात्माचे वेड होते. तो अनेकदा घर सोडून बाहेर कुठेतरी राहत असे, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. विक्षिप्तपणातूनच त्याने असे कृत्य केले असल्याचा संशय आहे.

गणेशा वाचव...!

नसा कापलेल्या व अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतलेल्या अवस्थेत वेदनांनी विव्हळणाऱ्या सुभाष डोहीफोडे याने गणेश मंदिरात येऊन याचना केली. ‘गणेशा वाचव...’ अशा हाका त्याने घातल्या. मात्र, स्थानिक नागरिकांना या घटनेची कल्पना आली नाही. त्याचे नेहमीचे गणपती मंदिरातील वागणे परिसरातील नागरिकांना माहित असल्याने कुणीही लक्ष दिले नाही. त्याचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचेपर्यंत सुभाषचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चा नऊ ऑगस्टलाच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मुंबई येथे काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा ९ ऑगस्ट २०१७ रोजची काढण्यात येणार असल्याचा निर्णय राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आलेल्या सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी या मोर्च्याच्या नियोजनावर चर्चा केली. या मोर्चासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चासाठी नांदूर येथील रुख्मिणी लॉन्स येथे रविवारी बैठक झाली. यात औरंगाबाद, नगर, नाशिक, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, जळगाव आदी जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांनी नियोजनाविषयी मत व्यक्त केले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सूचनांचा विचार केला जाईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोर्चाविषयी जो अपप्रचार सुरू आहे तो बंद करण्याची ताकीद देण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चासाठी एकच प्रकारचे बिल्ले, बॅर्नर, शासनाला देण्यात येणारे निवेदन एकच असावे, अशी सूचना औरंगाबादच्या प्रतिनिधींनी केली.

मोर्चा मुंबईला होणार असल्याने यजमान मुंबईकरांना विचारात घेणे गरजेचे आहे. आतापर्यंत मूक मोर्चे झाले आता ठोक मोर्चा झाला पाहिजे, असे मत मुंबईच्या दिलीप जगताप यांनी व्यक्त केले.

मोर्चाला समाजाची नोंदणी करण्यात यावी तसेच जिल्हावार प्रतिनिधींची निवड त्वरित करण्याची सूचना अॅड. राहुल पवार यांनी केली. मागण्या करताना त्या राज्यासाठी कोणत्या आणि केंद्रासाठी कोणत्या याचे विभाजन करावे. ठराविक मागण्यांचा निवेदनात समावेश करावा. मोर्चासाठी राणीचा बाग ते आझाद मैदान असा मार्ग आहे. त्यानुसार रेल्वे आणि महामार्गाच्या वाहतूकीचा विचार करायला हवा. मुंबईत येणे आणि जाणे अडचणीचे होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्यात यावे, अशा सूचना मांडण्यात आल्या.

आरक्षण मुद्यावर भर

मोर्चात मराठा आरक्षण या विषयावर भर दिला पाहिजे. अॅट्रॉसिटीसारखा विषय हा केंद्राचा विषय असल्यामुळे तो या मोर्चात घेऊ नये. या विषयामुळेच यापूर्वी महाराष्ट्रात प्रतिमोर्चे निघाले आहेत, असेही मुद्दे मांडण्यात आले. तत्पूर्वी, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन महिलांच्या हस्ते झाले. दिव्या महाले या चिमुरडीने मनोगत व्यक्त केले. गणेश कदम यांनी स्वागत केले. करण गायकर यांनी सूत्रसंचालन केले.

हवी विश्वासू समिती

राज्यस्तरीय १५ पदाधिकाऱ्यांची एक समिती असावी, त्यात ५ महसूल विभागातून ही निवड करावी, ही समिती विश्वासू असावी, शासनाकडून फूट पाडण्याचे प्रकार घडत असल्याचे अनभुव आहे, मोर्चांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहिला आहे, त्यांच्याही विचार व्हावा, असे अॅड. शिवाजी सहाणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सपकाळ’च्या साठ विद्यार्थ्यांची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंजनेरी येथील कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हबच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग या शाखेतील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे झाले. यात कॉलेजमधील साठहून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली. नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे.

जानेवारीत विविध डेज संपल्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यूची प्रक्रिया कॉलेजमध्ये पार पडली. यामध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, इंटर्नस सोल्युशन, जिंदाल, सीएमएस आयटी सोल्युशन्स, पार्ले एलिझाबेथ टूल्स प्रा. लि, ऑपुलांत इंफोटेक प्रा. लि, इ-क्लर्क्स, अॅमेझॉन, एपिक रिसर्च प्रा. लि, क्रियोस इन्फो सोल्युशन प्रा. लि, होस्टप्रपल्स, ई-डिझाईन प्रा. लि. आदी कंपन्यांनी विविध पदांसाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र सपकाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. साहेबराव बागल, प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. महेश आडके आदींचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सामाजिक प्रयत्नातून कोंडीवर तोडगा

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान वाहतुकीचे नियोजन वारंवार कोलमडत आहे. नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे गावाजवळ तर हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबतचे वृत्त ‘मटा’तून प्रसिद्ध होताच महामार्गा प्राधिकरणासह, ठेकेदार व स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या कारणांचा शोध घेत तडकाफडकी सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी शिंदे येथील हिंदू, मुस्लिम आणि महानुभव समाजबांधवांची स्मशानभूमी स्थलांतरीत करण्यासाठी ग्रामपंचायतीची जागा देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मंजुरी दिली.

नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे गावाजवळ गेल्या आठवड्यात तब्बल चार तास वाहतूक ठप्प झाली होती. त्याचा फटका हजारो वाहनधारकांना व प्रवाशांना सहन करावा लागला. त्यातच पावसानेही हजेरी लावल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झाले. वाहनांच्या दुतर्फा कित्येक किलोमिटर रांगा लागल्याने महामार्ग ठप्प पडला होता. शिंदे गावाजवळ महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. याठिकाणी अरुंद रस्ता असल्याने हा रस्ता रहदारीसाठी अपूर्ण पडत असल्यानेच अशा प्रकारच्या वाहतुक कोंडीचा प्रवाशांना वारंवार सामना करावा लागत आहे.

तहसीलदारांकडून पाहणी

वाहतूक कोंडीनंतर तहसीलदार राजश्री आहिरराव यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता आर. एस. सोमवंशी, सुनील भोसले, सी. आर. सोनवणे, आर. ए. महाजन आदींनी शिंदे येथे धाव घेत वाहतूक कोंडीवर उपाय काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरीब मुलांच्या पाठीवर पोलिसांची शाबासकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अभ्यास केला, मेहनत घेतली तर झोपडपट्टीतील मुलेही मोठे अधिकारी होऊ शकता. बरेचसे मोठे अधिकारी हे गरीब घरातूनच आले आहेत. दहावी पास गुणवंताना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन हवे असल्यास केव्हाही पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.

उपनगर येथील इच्छमणी मंगल कार्यालयात शांतता समिती आणि पोलिसांतर्फे झोपडपट्टीतील गुणवंतांचा सत्कार झाला. त्यावेळी डॉ. सिंगल बोलत होते. उपायुक्त विजय मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त राजू भुजबळ, विजय चव्हाण, अशोक नखाते, मोहन ठाकूर, अजय देवरे, वरिष्ठ निरीक्षक बाजीराव जाधव, मधुकर कड, पंढरीनाथ ढोकणे, अविनाश सोनवणे, खुलदास भोये, एस. वाय. बिजली यांची प्रमुख उपस्थिती होती. सचिन पवार यांनी स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन केले. शांतता समिती सदस्य मीराबाई कदम, भारत निकम, रामबाबा पठारे यांनी मनोगत व्यक्त केले.

डॉ. सिंगल म्हणाले की, झोपडपट्टीत केवळ गुन्हेगारच जन्माला येत नाहीत तर गुणवंतही जन्माला येतात. गुणवत्तेला जिद्द व परिश्रमाची जोड दिल्यास यश हमखास मिळते. गरीबी हा प्रगतीतील अडथळा ठरू शकत नाही. पोलिसांना नागरिकांची मदत हवी असते तेव्हा सहकार्य करावे. स्वतः शिस्तीचे पालन करावे. तसे झाले तरच गुन्हेगारी नियंत्रणात येईल. शशिकांत मोजाड, दिलीप आहिरे, साहेबराव पवार, राजरत्न पवार, सुनंदा मोरे आदी उपस्थित होते. वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी सूत्रसंचलन केले. बाजीराव जाधव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी ‘जीआर’ची होळी

$
0
0

कारसूळ गावातील शेतकरी आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केल्यामुळे शेतकरी आंदोलन स्थगित झाले होते. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना अनेक निकष व नियम लावल्याने आपले कर्ज माफ होते की नाही अशी धास्ती ग्रामीण भागात आता व्यक्त होत आहे. यामुळे कारसूळ (ता. निफाड) येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत या शासकीय ‘जी आर’ची होळी केली.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अशी घोषणा केल्यानंतर तमाम शेतकरीवर्गाने फटाके फोडीत, पेढे वाटून आंदोलनाला यश मिळाले म्हणून आनंदोत्सव साजरा केला होता. मात्र आता शासनाच्या कर्जमाफी घोषणेच्या अनुषंगाने अनेक जी आर बाहेर येत असून, ते सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यात सरसकट, तत्वतः व निकष अशा शब्दांमुळे शेतकऱ्यांना अर्थ उमगत नाही. आता कर्जमाफीसाठी अनेक निकष लावलेले पुढे येत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्याला आपल्या पदरात काहीच पडणार नाही, अशी शक्यता दिसत असल्याने त्यांचा रोष वाढत आहे. यामुळे कारसूळ (ता. निफाड) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकारच्या ‘जी आर’ची होळी करीत संताप व्यक्त केला. शब्दाचे खेळ न करता आणि कोणतेही निकष न लावता कर्जमाफी करावी, अशी मागणी केली आहे.

याप्रसंगी माजी सरपंच देवेंद्र काजळे, सीताराम जाधव, श्रीराम शंखपाळ, भास्करराव गाडे, दत्तू काजळे, जयवंत ताकाटे, बाबाजी उगले, बबन उगले, रंगनाथ पगार, हनुमंत शंखपाळ, शिवाजीराव ताकाटे, दिलीप उगले, माधव क्षीरसागर, केशव काजळे, राजेंद्र ताकाटे, आदी उपस्थित होते.

‘संपूर्ण कर्जमाफी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन’

तत्वतः, सरसकट व निकषांच्या आधीन राहून राज्यातील फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई भेटीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे प्रदर्शन त्यांच्यासमोर नको म्हणून घाईगडबडीत व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या डोळ्यात धूळ फेकत कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण कर्जमाफी व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही तर झाले त्यापेक्षा तीव्र आंदोलनाची तयारी शेतकऱ्यांनी ठेवावी, अशा शब्दात आपली उद्विग्न प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या तीव्र लढ्याला फसवणुकीच्या नावाने सरकारने कर्जमाफी मान्य केली आहे. मात्र नियम व निकषांत कर्जमाफी कशी शक्य आहे. दहा हजार रुपयांची पीककर्जाची घोषणा फसवी निघाली आहे. संपूर्ण कर्जमाफी व सातबारा कोरा हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांना आज वाचवू शकतो. याचे भान सर्वांनी ठेवायला हवे. कर्जमाफीचे नियम, निकष हे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी बनवले की काय? असा सवालही देवीदास पवार यांनी केला आहे. जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शेतकरीवर्गाला उभे केले जात नाही. दहा हजाराचे पीककर्ज हिवाळ्यात देणार का? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉमर्स क्षेत्रातून घडेल उज्ज्वल भविष्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही वर्षांपासून कॉमर्स या क्षेत्रात विविध संधी निर्माण झाल्या असून, या क्षेत्रातून उज्ज्वल भविष्य घडवता येते. दहावीमधील गुणांच्या आधारावर अकरावी कॉमर्समध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांना या क्षेत्राचा अभ्यास करता येतो. अकरावीच्या विषयांवर या क्षेत्रातील पुढील संधी ठरणार असल्याने विद्यार्थ्यांनी विषय निवडताना योग्य विचार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पारख क्लासेसचे संचालक प्रा. सीए लोकेश पारख यांनी केले.

पारख क्लासेसतर्फे कॉमर्स शाखेतील करीअर संधींविषयी सेमिनारचे रविवारी (दि. १८) पारख क्लासमध्ये आयोजन करण्यात आले होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या सेमिनारचे मीडिया पार्टनर होते. मागील वर्षात अकरावी, बारावी कॉमर्समध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले. या करिअर सेमिनारला कॉमर्सच्या विविध संधींचा उलगडा विद्यार्थ्यांसमोर करणयात आला.

अकरावी कॉमर्समध्ये इंग्रजी व मराठी माध्यमात पुढील करिअरच्या दृष्टीने काय महत्त्वाचे आहे, हेही यावेळी सांगण्यात आले. तसेच अकरावी कॉमर्ससोबत विद्यार्थ्यांनी सीए परीक्षांची तयारी कशी करावी, त्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत. तसेच त्यासाठीच्या

कोर्सेसबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आता दि. ३० जूननंतर सीएचा अभ्यास पूर्णपणे बदलत आहे. त्यामुळे सीएच्या अभ्यासक्रमात होणारे बदल आणि त्यात नव्याने समाविष्ट होणारे विषय, त्या विषयांची संख्या, या नवीन बदलानुसार त्यात उत्तीर्ण होण्याचे निकष, लागणारा वेळ व अनेक इतर बदल

याबद्दलही माहिती देण्यात आली. कॉमर्स शाखेमधून सीए कोर्सचा अभ्यासक्रम करता येतो, असेही यावेळी प्रा. पारख यांनी स्पष्ट केले. तसेच त्यासाठी कशाप्रकारे तयारी करावी याचीही उदाहरणासह माहिती विषद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता मोहिमेत दुजाभाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
नाशिक महापालिकेत सातपूर भागातील पदावर असलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात जोरदार स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु, इतर नगरसेवकांच्या प्रभागात स्वच्छता मोहीम कधी राबवणार, असा सवाल पदावर नसलेल्या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. स्वच्छता मोहीम राबविताना ती सरसकट राबविण्यात यावी असेही मत इतर नगरसेवकांनी व्यक्त केले आहे.
सर्वात प्रथम सभागृहनेता तथा नगरसेवक दिनकर पाटील यांच्या प्रभाग ९ मध्ये स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या प्रभागाची पूर्ण स्वच्छता झालेली नसताना शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक विलास शिंदे यांच्या प्रभाग ८ मध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. त्यातच शनिवारी पुन्हा सातपूर प्रभाग सभापती माधुरी बोलकर यांच्या प्रभाग १० मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता मोहिमेत सर्वच प्रभागांतील घाण, कचरा उचलावा असे नागरिकांनी व्यक्त केले आहे.
सत्ते शिवाय शहाणपण दिसत नाही, असाच काहीसा प्रकार सातपूर विभागात पहायला मिळत आहे. महापालिकेचे सभागृहनेता पाटील यांनी प्रभागात स्वच्छता मोहीम हाती घेण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केल्या होत्या. यानंतर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासह सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. प्रभाग ९ मधील स्वच्छता मोहीम पूर्ण होत नाही, तोच शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक शिंदे यांनी प्रभाग ८ मध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली. आता पुन्हा सातपूरच्या सभापती बोलकर यांनीदेखील प्रभाग १० मध्ये शनिवारी स्वच्छता मोहीम हाती घेतली. यामुळे स्वच्छता मोहीम केवळ पदावर असलेल्या नगरसेवकांसाठीच का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिका आयुक्तांनी सरसकट सर्वच प्रभागांत स्वच्छता मोहीम राबवावी असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
उकिरडे करणाऱ्यांना रोखा
उघड्यावर कचरा टाकणारे कोण, याचेही कारण शोधण्याची गरज आहे. उघड्यावर घाण, कचराच टाकला गेला नाही तर स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज पडणार नाही. महापालिका आयुक्तांनी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना दोषी ठरवत दंडात्मक तसेच वेळप्रसंगी फौजदारी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तरच कचरा टाकणाऱ्यांवर वचक बसेल.

उघड्यावर कचराच पडला नाही, तर स्वच्छता मोहीम हाती घेण्याची गरजच पडणार नाही. आरोग्य विभागाचे कर्मचारी नेमून दिलेले काम रोजच करत असतात. परंतु, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी कोणाची, हा खरा प्रश्न आहे.
- नितीन बोरसे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images