Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘प्रवेशोत्सवा’ने होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यांच्या आनंदांनतर विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे तसेच त्यांना हसत खेळत शिक्षण मिळावे, यासाठी यंदाही शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. शाळेच्या परिसरात रांगोळ्या काढून, वर्ग पताकांनी सजवून तसेच विद्यार्थ्यांना फूल देऊन, त्यांना गोड खाऊ वाटून हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खास बनवला जाणार आहे.

शाळेचे नवे शैक्षणिक वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी उत्सुकतेबरोबरच पुढील वर्गाच्या अभ्यासाची चिंताही घेऊन येते. नवे विषय, नवे शिक्षक, नवी पाठ्यपुस्तके यात रमण्यात विद्यार्थ्यांना वेळ द्यावा लागतो. तर काही विद्यार्थ्यांना याचे दडपण येते. उन्हाळ्याच्या सुटीत केलेल्या मौजमजेमुळे अनेकांना तर शाळेत जाणेच नकोसे होऊन जाते. अशा विद्यार्थ्यांना शाळा हवीहवीशी वाटावी, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून शाळा प्रवेशोत्सव ही संकल्पना शाळेच्या पहिल्या दिवशी राबवली जाते. १५ जूनला शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांकडे तीन दिवसांचा कालावधी प्रवेशोत्सवाच्या तयारीसाठी आहे. त्यादृष्टीने शिक्षकांनी नियोजनही केले आहे. यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी देशभक्तीपर गीते, प्रभातफेरी, प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची नावे लाऊड स्पीकरवर घोषित करण्यात येणार आहे. शाळेत बालकांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच वर्षभर शंभर टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती, एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नाही, याविषयी प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठई वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही काही शाळा करणार आहेत.

शाळा सजावटीवर भर

शाळेचा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्यात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थी शाळेत येताच त्याला प्रसन्न वाटावे यासाठी शाळा सजावटीवर भर देण्यात येणार आहे. यासाठी शाळा परिसर स्वच्छ करुन, सडा टाकून, रांगोळी, फुलापानांची तोरणे, पताका बांधून वर्ग खोल्या सुशोभित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाम नाही, तर काम नाही!

$
0
0

पगार मिळत नसल्याने १९ जूनपासून शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या चार महिन्यांपासून पगार थकले असून त्यावर कोणताही मार्ग काढला जात नसल्याने आता ‘दाम नाही तर काम नाही’ अशी भूमिका शिक्षकांनी घेतली आहे. त्यामुळे १९ जूनपासून बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य संस्थाचालक संघटना (महामंडळ) व नाशिक जिल्ह्यातील सर्व संघटना यांची संयुक्त सहविचार सभा रविवारी व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. विजय नवल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडली. संस्थाचालक महामंडळानेही यावेळी शाळा बंदला पाठिंबा दिला.

गेल्या चार महिन्यांपासून शिक्षकांचे पगार जिल्हा बँकेकडे थकीत आहेत. वारंवार आंदोलने करुनदेखील हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आता दाम नाही तर कामदेखील नाही, अशी भूमिका शिक्षकांनी घेतली आहे. याविषयी या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार १५ जूनपासून सर्व शाळा सुरू होणार असून, सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करावे, १६ जून रोजी पालक मेळावे घेऊन पगाराबाबत पालकांमध्ये जागृती करावी व सरकार कशा पद्धतीने शिक्षकांच्या पगाराबाबत निर्दयी भूमिका घेत आहे व हक्काचे पैसेदेखील देत नाही ही बाब त्यांच्या लक्षात आणून देत पालकांचा पाठिंबा मिळवावा, असे नियोजन आखण्यात आले आहे. त्यानंतर १७ जून रोजी मुख्याध्यापकांसह संपाची नोटीस संस्थाचालकांना देऊन १९ जूनपासून बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला. संस्थाचालक, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वांनी एकत्र येऊन हे शाळा बंद आंदोलन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जोपर्यंत पगार हातात मिळत नाही, तोपर्यंत शाळा बंदच राहतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी कोंडाजीमामा आव्हाड, अॅड. जयसिंग सांगळे, संदीप गुळवे, राजेश गडाख, जिल्हा समन्वय समिती शिवाजी निरगुडे, फिरोज बादशाहा, संजय चव्हाण, शशांक मदाने, साहेबराव कुटे, के. के. अहिरे, एस. बी. देशमुख, एस. बी. शिरसाठ, मोहन चकोर, प्रकाश सोनवणे आदी उपस्थित होते.


बैठक घेण्याचे आवाहन

मुख्याधापक संघ, जिल्हा टीडीएफ अध्यक्ष व कार्यवाह, माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक परिषद, शिक्षक सेना, शिक्षक भारती, मनसे शिक्षक सेना, शिक्षक परिषद, कला व क्रीडा संघटना, शहर मुख्याध्यापक संघ व सर्व संघटना, शिक्षकेतर संघटना, कास्ट्राइब संघटना, अपंग संघटना, खासगी प्राथमिक शाळा, इस्तू संघटना, आश्रम शाळा संघटना यांनी आपापल्या तालुक्यातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याचा अहवाल मुख्याध्यापक संघाला १४ जूनपर्यंत कळवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरगावचा पाणीसाठा ४० लाख लिटरने वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी परिस्थ‌िती निर्माण होऊ नये, यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविली जात आहे. सूलानेही सीएसआर निधीतून योगदान दिले असून त्यातून सावरगाव येथील पाझर तलावाची पाणीसाठवण क्षमता ६४ लाख लिटरने वाढली आहे.

या योजनेंतर्गत कामे करण्यासाठी सीएसआर निधी द्यावा, असे आवाहन राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाने उद्योगांना केले आहे. नाशिकमधील सूला कंपनीने त्याअंतर्गत मे २०१६ पासून काही कामे हाती घेतली होती. त्याअंतर्गत गंगापूर धरणातून २८८ ट्रक गाळाचा उपसा करण्यात आला. त्यामुळे २५ लाख लिटर पाणीक्षमता वाढली आहे. सावरगाव येथेही पाझर तलावातूनही ६४३ ट्रक वाळूचा उपसा करण्यात आला. त्यातून ६४ लाख लिटर पाण्याची क्षमता वाढविण्यात यश आले आहे. यापूर्वीही निफाड तालुक्यातील महाजनपूर, भेंडाळी, औरंगपूर या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे ३४७ लाख लिटर पाण्याचे क्षेत्र वाढले आहे. सावरगाव पाझर तलावात २५ मेपासून गाळ उपसा प्रकल्प हाती घेण्यात आला. आतापर्यंत तीन हजार ७७८ क्युबिक मीटर माती काढण्यात आली आहे. या माध्यमातून ४० लाख लिटर पाणी साठवण क्षमता वाढेल आणि सावरगावमधील रहिवाशांना त्याचा लाभ मिळेल, असा विश्वास सूला व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अफवांचा बाजार त्रासदायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोमवारची सकाळ.. दहावीचा निकाल काय लागणार या चिंतेत विद्यार्थी, पालक. तर दुसरीकडे किती मार्क्स विचारले हे विचारण्यासाठी सातत्याने खणाणणारे फोन.. दहावीचा निकाल सोमवारी, १२ जून रोजी जाहीर होणार या अफवेचे गारुड इतके पक्के झालेले की ज्या घरात दहावीची परीक्षा दिलेला मुलगा, मुलगी आहे, त्यांना या परिस्थितीचा सामना सोमवारी करावा लागला. दहावीचा निकाल १२ जून रोजी जाहीर होणार, व्हॉट्सअॅपवरून फिरणाऱ्या या अफवेमुळे अनेकांना डोकेदुखी झाली.

सोशल मीडियाचे वाढता प्रभाव सामाजिक परिस्थितीच्या संवेदनशीलतेला धक्का पोहोचवत असल्याचे वारंवार समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी शहरात घडलेली एक घटना अधिक पेटवण्यासाठी समाजकंटकांनी व्हॉट्सअॅप या माध्यमाचा वापर केला होता. अखेरीस आठवडाभर शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यापर्यंतचे पाऊल प्रशासनाला उचलावे लागले होते. सोशल मीडियामुळे सामाजिक शांतता कशी संकटात सापडली आहे, याचे प्रत्यक्ष चित्रच यानिमित्ताने समोर उभे राहिले होते. तशीच परिस्थिती दहावी, बारावीच्या निकालांबाबत सोमवारी दिसून आली. निकालाबाबत राज्य मंडळाकडून कोणतीही तारीख जाहीर केली जात नसतानाही खोट्या तारखा पसरवल्या जात आहेत. या दोन्ही परीक्षांना विद्यार्थी अधिक महत्त्व देतात. त्यामुळे साहजिकच पालक, विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता, चिंता सर्व काही असते. त्यातच सातत्याने कानावर आदळणाऱ्या या अफवांनी पालक, विद्यार्थी हैराण झाले होते.

नेटिझन्सचा उतावीळपणा

इंटरनेट, सोशल मीडिया यांच्या चांगल्या वापरापेक्षा गैरवापरामुळे समाजात सातत्याने वेगवेगळ्या अफवांचे पेव फोफावत आहे. कोणत्याही पोस्टची शहानिशा न करता सरळ ते इतर मित्रांना किंवा ग्रुप्समध्ये पाठवण्याचे प्रकार वाढले आहे. यामुळे कित्येकांची दिशाभूल होत आहे. एखादा तापलेला विषय अधिक पेटवून लोकांच्या मानसिकता भडकविण्याच्या उद्देशानीही अफवा पसरविल्या जात असल्याचे सातत्याने समोर येते. तर काही सुजाण नागरिकही अशा पोस्ट्सची शहानिशा न करता ते पुढे पाठवत असल्याने निकालाच्या अफवा वाढल्या आहेत.

... त्यांच्यावर गुन्हे दाखल करा!

समाजाची दिशाभूल करून त्यांना मानसिकदृष्ट्या वेठीस धरणाऱ्या समाजकंटकांवर सायबर क्राइम विभागाने गुन्हे दाखल करावे, अशा तीव्र प्रतिक्रिया पालक व्यक्त करत आहेत. मेच्या शेवटच्या आठवड्यापासून व्हॉट्सअॅपवर दहावी निकालाच्या अफवा पसरवल्या जात आहेत. सोमवारी निकाल जाहीर होणार या भीतीने एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटनाही शहरात घडली. त्यामुळे अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई व्हावीच, असा संताप व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॉगल विक्रेत्यास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गॉगल विक्रेत्यास टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना त्र्यंबकरोडवरील वेदमंदिरजवळ घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये दुचाकीस्वार टोळक्याविरोधात जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

दानिश प्यारेमिया अन्सारी (रा. वडाळारोड) यांनी फिर्याद दिली आहे. अन्सारी यांचे मेव्हणे ऐतेशाम इरशाद अन्सारी रविवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर रोडवरील वेदमंदिर परिसरात रस्त्यावर चष्म्याचे दुकान थाटून विक्री करीत होते. त्यावेळी तीन-चार मोटरसायकल्सवर आलेल्या टोळक्याने कुठलेही कारण नसताना ऐतेशाम अन्सारी यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली.

आयशरसह बाइकची चोरी

शहरात वाहनचोरीच्या घटना वाढत आहेत. आयशर मालट्रकसह दोन मोटारसायकली चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलिस स्टेशन्समध्ये दाखल झाल्या आहेत. सातपूर येथील क्रांती चौकात राहणारे रतन धर्माजी पवार यांचा तीन लाख रुपयांचा आयशर मालट्रक बुधवारी रात्री सातपूर गावातील टेम्पो स्टॅण्ड भागात उभा होता. चोरट्यांनी तो चोरून नेला. सिडकोतील उत्तमनगर भागात राहणारे विजय दिलीप सूर्यवंशी हे गुरूवारी रात्री नाशिकरोड येथे गेले होते. जयराम हॉस्पिटलसमोर त्यांनी पल्सर मोटरसायकल उभी केली. चोरट्यांनी ती चोरून नेली. नाशिकरोड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. गायवाडमळा भागात राहणारे चेतन सुभाष चौधरी परिसरातील खासगी हॉस्पिटलमध्ये गेले होते. चोरट्यांनी त्यांची स्प्लेंडर मोटारसायकल चोरून नेली. उपनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

दुहेरी शुल्काविषयी तक्रार

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या दुहेरी शुल्कवाढीसंदर्भात नाशिकमधील व्यापाऱ्यांनी सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांची मुंबई येथे भेट घेऊन नुकतेच निवेदन दिले. बाजार समितीत दुहेरी बाजार शुल्क व प्रक्रिया केलेल्या मार्केट फी संदर्भात देशमुख यांनी वस्तुस्थिती सांगितली. या प्रकरणी लक्ष घालण्याचे देशमुख यांनी आश्वासन दिले. राजू राठी, प्रफुल्ल संचेती, परेश बोधाणी, हेमंत पवार यांनी निवेदन दिले.

विवाहिता बेपत्ता

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव (अंजनेरी) येथील विवाहित महिला शुक्रवारपासून (दि. ९) बेपत्ता झाली आहे. भारती मधुकर पगार (४१) असे महिलेचे नाव आहे. जेवण झाल्यानंतर रात्री ११ वाजेच्या दरम्यान शतपावली करण्यास जाते, असे सांगून त्या घराबाहेर पडल्या. मात्र, त्या परत आल्याच नाही. याबाबत भारती यांचे पती मधुकर पगार यांनी तक्रार दाखल केली आहे. भारती यांच्या गळ्यात आखुड लांबीचे मंगळसूत्र आहे. तसेच त्यांनी निळ्या रंगाचे ब्लाउज, निळी साडी आणि पायात काळ्या रंगाचे सॅण्डल आहेत. भारती यांना हिंदी व मराठी दोन्ही भाषा उत्तमपणे बोलता येतात. त्र्यंबक पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मागदर्शनाखाली हवालदार ए. जी. कोरडे पुढील तपास करत आहेत.

दोन मित्रांना मारहाण

चौकात बसलेल्या दोघा मित्रांना तिघांनी जबर मारहाण केली. सिडकोतील कामटवाडा भागात ही घटना घडली. यामध्ये दोघे मित्र जखमी झाले असून अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दर्शन दोंदे, पिंटू दोंदे व उत्तम दोंदे अशी संशयितांची नावे आहेत. रायगड चौकातील अशोक मोहन सानप (३१) व अजय मनोज परदेशी (१८, रा. पवननगर) यांनी या प्रकरणी वेगवेगळ्या दोन तक्रारी दिल्या आहेत. रविवारी सायंकाळी ते दोघे कामटवाड्यातील गोपाल चौकात बसले होते. त्यावेळी तिघेजण तेथे आले. येथे बसू नका, असे सांगून त्यांच्याशी वाद घातला. तसेच त्यांना मारहाण करू लागले. यावेळी संशयित दर्शन याने दोघांच्या डोक्यात धारदार चाकू मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडेराव टेकडीवर पुन्हा ‘नो एन्ट्री’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

काही दिवसांपासून लष्करी विभागाचा देवळाली परिसरात मनमानी कारभार चालला असल्याचे निदर्शनास येत आहे. आता तर नाशिक तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडेराव टेकडीकडे जाणारा मार्गच लष्करी प्रशासनाने बंद केला आहे.

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या व धार्मिक भावना रुजलेल्या खंडोबा टेकडीवर जाण्यासाठी असलेला आपल्या हद्दीतील केवळ २५ मीटरचा रस्ता लष्करी आस्थापनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव काही वर्षांपासून बंद केला होता. त्यानंतर कॅन्टोन्मेंट प्रशासनाने लष्कराची बाजू समजून घेत टेम्पल हिल उद्यानातून पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला होता. मात्र, तोही रस्ता लष्कराने बंद करण्यास कॅन्टोन्मेंट प्रशासनाला भाग पाडले. त्यानंतर बनविण्यात आलेला रस्ताही काटेरी तारीचे कुंपण उभारीत बंद केला आहे. यामुळे भाविकांचा हिरमोड झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यापूर्वी हेगलाईन, वर्क्स शॉप, स्टेशनरोड यासह इतरही रस्ते लष्कराने नागरिकांसाठी बंद केले आहे. या रस्त्यांच्या निर्मितीसाठी कॅन्टोन्मेंटचा लाखो रुपयांचा फंड वापरण्यात आला आहे.

टेकडीवर दर्शनासाठी कसे जायचे? आणि शेजारी उभारलेल्या उद्यानात बालगोपाळांनी कसे खेळायचे? अशी समस्या निर्माण झाली आहे. प्रशासनाने लष्करी आस्थापनाशी चर्चा करून तातडीने बंदिस्त केलेले गेट उघडण्यात यावे; अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे, मंदिराचे विश्वस्थ उत्तम मांडे, पूजारी आमले यांच्यासह सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

उद्यानातून देणार रस्ता

खंडेराव टेकडी परिसरात अनेक नागरिक पहाटेपासूनच व्यायाम, योगा करण्यासाठी येतात. तसेच नागरिकांचा भावनिक दृष्टीकोन लक्षात घेता पहाटे ४ ते रात्री १० वाजे दरम्यान टेम्पल हिल उद्यानाचे प्रवेशद्वार कायम उघडे ठेवण्यात येईल. यासाठी तशी तयारीही कॅन्टोन्मेंट प्रशासनाने केली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगमधील संधी आज उलगडणार

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

‘महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस’उपक्रमांतर्गत ‘इंजिनीअरिंग क्षेत्रांमधील करिअर संधी’ या विषयावर मंगळवारी (दि. १३) करिअर गाइडन्स सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीमधील आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेजमधील सेमिनार हॉलमध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

बारावीच्या निकालानंतर अनेकांनी इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे. सोबतच दहावीनंतर डिप्लोमा करत इंजिनीअर होण्याचे स्वप्नदेखील अनेक विद्यार्थी बघतात. सोबतच अनेक नामवंत प्लेसमेंट इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत. याच अनुषंगाने ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ‘प्लॅनेट कॅम्पस’उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रातील करिअर संधी, प्लेसमेंट, अभ्यासक्रम तसेच इतर महत्त्वपूर्ण माहिती देण्यात येत आहे. इंजिनीअरिंगच्या कॅप राउंडची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यभरातून सुमारे ३ लाख विद्यार्थ्यांनी यावर्षी सीइटीची परीक्षा दिली आहे. जेईई देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही काही लाखातच आहे. सध्याच्या प्लेसमेंट्समध्ये सर्वाधिक नोकरीच्या संधी या इंजिनीअर्ससाठी असल्याचे दिसते. इंजिनीअर्सला देशाबाहेरही चांगल्या पॅकेजच्या संधी मिळतात. या करिअर संधीची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी तसेच त्यांच्या मनातील शंकाचे निरसन व्हावे यासाठी ‘इंजिनीअरिंग क्षेत्रातील करिअर संधी’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. सी. कुलकर्णी तसेच इंजिनीअरिंग ए. आर. सी. सेंटरचे अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्यांची ‘स्मार्ट’ चुणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोठ्या माणसांची कल्पनाशक्ती जेथे संपते अशा ठिकाणी लहान मुलांची सुरू होते, असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे सोमवारी तीन गटांत झालेल्या चित्रकला स्पर्धेत बच्चेकंपनीने आपल्या कल्पनेतील स्मार्ट सिटी चितारून या उक्तीचा प्रत्यय आणून दिला. स्पर्धेसाठी असलेल्या स्मार्ट सिटीसंदर्भातील विषयाला अनुसरून चिमुकल्यांनी आपल्या स्मार्ट कल्पनाशक्तीची चुणूकच जणू दाखवून दिली.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त बच्चेकंपनीला खास स्थान देण्याच्या उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकला वा. गो. कुलकर्णींपासून ते शिवाजीराव तुपे आदींपर्यंत प्रसिद्ध व दिग्गज चित्रकारांची परंपरा आहे. या परंपरेला सलाम करून शहरात चित्रकलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि लहानग्या कलाकारांच्या प्रतिभेला वाव मिळावा, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सोमवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत मते लॉन्स, सावरकरनगर येथे झाली. स्पर्धेत शहरातील शाळांचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी नंदनवन लॉन्स हे व्हेन्यू पार्टनर होते.

स्पर्धेची सुरुवात नाशिक जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष द. वा. मुळे यांच्या मार्गदर्शनाने झाली. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, की स्पर्धेत तुम्हाला पारितोषिक मिळाले नाही तरी चालेल, तुमचा सहभाग महत्त्वाचा आहे. चित्रे रेखाटण्याविषयीदेखील त्यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मुळे यांच्यासह अशोक धिवरे, राहुल मुळे, सुनील गवळी, विनोद जांभोरे, मिलिंद टिळे आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी कलाध्यापक संघाचे पदाधिकारी महादेव जगताप, चेतना बैरागी आदींनी प्रयत्न केले.


स्वच्छ-हरित नाशिकवर भर

‘आपल्या स्वप्नातले नाशिक कसे असावे? स्मार्ट सिटी म्हणजे काय?’ असा विषय देण्यात आला होता. सहभागी विद्यार्थी चित्रकारांनी स्वच्छ नाशिक व हरित नाशिक या विषयावर चित्रे रेखाटली. आम्हाला स्मार्ट सिटी आवश्यक आहे. परंतु, आमचे गावपण टिकू द्या, असा संदेशही अनेकांनी आपल्या चित्रांद्वारे दिला. केवळ भौतिक विकास नको, तर हरित नाशिकचा विकास झाला पाहिजे, असेही अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे अमृताचे थेंब नाशिकमध्ये पडले, त्यामुळे येथे कुंभमेळा सुरू झाला असे म्हणतात, त्याचप्रमाणे विकासाचे थेंब नाशिकमध्ये पडू द्या व नाशिकची भरभराट होऊ द्या, हरित नाशिक, स्वच्छ नाशिक, स्वच्छ व चांगले रस्ते, उद्योगनगरी, रिंगरोड, पर्यावरण संतुलन आदी गोष्टींची नाशिकला आवश्यकता आहे, असे चित्राद्वारे विद्यार्थ्यांनी सांगितले.


विजेते जाहीर, आज पारितोषिक वितरण

पाचवी व सहावी (एक गट), सातवी व आठवी (दुसरा गट), नववी व दहावी (तिसरा गट) अशा तीन गटांत झालेल्या या चित्रकला स्पर्धेतील विजेते जाहीर करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थसाठी सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. पारितोषिक वितरण आज, मंगळवारी (दि. १३) दुपारी २ वाजता महाराष्ट् टाइम्सच्या ऑफिसमध्ये होईल. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, सेमिनार हॉल, चौथा मजला, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड.

स्पर्धेचे विजेते असे

पहिला गट (पाचवी ते सहावी) ः

प्रथम- सिद्धी साहेबराव गुंजाळ, सहावी, मराठा हायस्कूल, द्वितीय- सुजल सुनील धोत्रे, पाचवी, तृतीय- हिमानी विजय माळी, सहावी, सेंट फ्रान्सिस हायस्कूल, उत्तेजनार्थ - पूर्वा महाजन, पाचवी, आत्मजा भालचंद्र पवार, सहावी, होरायझन अॅकॅडमी

---

दुसरा गट (सातवी ते आठवी) ः

प्रथम- भूषण वसंत गायकवाड, आठवी, गुरू गोविंद सिंग हायस्कूल,

द्वितीय- कृष्णा दीपक गिरमे, आठवी, न्यू इरा इंग्लिश स्कूल,

तृतीय- सृष्टी नरेंद्र नेरकर, आठवी, रचना विद्यालय, उत्तेजनार्थ- रिद्धी अतुल कुकेकर, आठवी, अनुष्का रविकुमार गोसावी, निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल.

---

तिसरा गट (नववी ते दहावी) ः

प्रथम - श्रुती संजय बागूल, नववी, केंद्रीय विद्यालय, आयएसपी, नाशिकरोड, द्वितीय- अदिती अशोक फोफलिया, नववी, बॉइज टाउन पब्लिक स्कूल, तृतीय- प्रियंका दत्तात्रय कोठुळे, दहावी, श्रीराम विद्यालय, उत्तेजनार्थ- ऋषिकेश पाटील, दहावी, पिंपळगाव हायस्कूल, पिंपळगाव बसवंत, अंकिता देवीदास बाविस्कर, दहावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा जुलैमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेषा असोसिएट्सतर्फे नाशिक येथील स्वामिनारायण बँक्वेट हॉलमध्ये १८ ते २३ जुलैदरम्यान तिसरी आंतरराष्ट्रीय रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. स्पर्धेला फिडे, एआयसीएफ, एएमसीए, स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ इंडिया व नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेची (एनडीसीए) मान्यता आहे. स्पर्धेसाठी एकूण तीन लाखांची घसघशीत पारितोषिके देण्यात येणार असून, विविध वयोगटांसाठी एकूण ८२ पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती आयोजक अर्चना कुलकर्णी यांनी दिली.

राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष असून, नाशिकच्या नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळविण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे. स्पर्धेत विविध वयोगटांसाठी एकूण ८२ पारितोषिके दिली जाणार असून, पहिल्या क्रमांकासाठी ६१ हजार, दुसरे ४१ हजार, तिसरे २५ हजार, चौथे १८ हजार तर पाचव्या क्रमांकासाठी १२ हजार रुपये अशी एकूण १८ मुख्य पारितोषिके आहेत. याशिवाय फिडे रेटिंग १४००, १८००, २१०० खालील खेळाडूंसह बालगट, प्रौढ गट, नाशिक ग्रामीण व शहर अशा विविध गटांसाठी स्वतंत्र पारितोषिके दिली जाणार आहेत.

मानांकित खेळाडूंचे डाव पाहण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी एलसीडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. त्यामुळे पटावरील चुरशीचे द्वंद्व सहजपणे पाहण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. नाशिक जिल्याच्या खेळाडूंना १५ जून पर्यंत सहभाग नोंदविल्यास त्याना सुद्धा प्रवेशात विशेष सवलत देण्यात आली आहे . स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत १२ जुलै सायंकाळी पाचपर्यंत असून, त्यानंतर प्रवेश स्वीकारले जाणार नाही. ऐनवेळी कोणाचेही प्रवेश स्वीकारले जाणार नसल्याचेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

स्पर्धेत इलेक्ट्रॉनिक चेसबोर्डचे आकर्षण

स्पर्धेत प्रथमच इलेक्ट्रॉनिक चेसबोर्ड रेषा असोसिएट्सतर्फे दरवर्षी फिडे रेटिंग स्पर्धेत नावीन्यपूर्ण बदल केले जात असून, यंदा इलेक्ट्रॉनिक चेस बोर्डवर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. एकूण वीस चेस बोर्ड स्पर्धेत समाविष्ट केली जाणार आहेत. या बोर्डचे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेत सुरू असलेले अव्वल मानांकितांचे डाव ऑनलाइन पाहता येऊ शकतील. ५०० चाली स्टोअर करण्याची या बोर्डची क्षमता असून, फिडेने या बोर्डला मान्यता दिलेली आहे. या चेस बोर्डचा वापर जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत केला जातो. भारतात मुंबईनंतर प्रथमच नाशिकमध्ये हे चेसबोर्ड उपयोगात आणले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचोरीची तक्रार करा ऑनलाइन

$
0
0

पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर

वाहनचोरी झाल्यावर बऱ्याचदा पोलिस स्टेशनच्या चकरा मारून सामान्य नागरिक वैतागून जातो. तुम्हाला तुमच्या चोरीस गेलेल्या वाहनाची तक्रार पोलिस स्टेशनला न जाता करता आली तर? होय, आता वाहनचोरीची तक्रार तुम्हाला अॉनलाइनसुद्धा करता येणार असून, तक्रारीनंतरचे स्टेटसही पाहता येणार आहे.

वाहनचोरी झाल्यानंतर पोलिसांत जाऊन तक्रार केली, तरीही अनेक दिवस वाट पाहावी लागते. वाट पाहूनही वाहनचोरीची काही ठोस माहिती समोर येत नाही. पण, आता वाहनचोरीच्या तक्रारी नागरिकांना अॉनलाइन मांडता येणार असून, पोलिस दलाच्या या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांना मात्र दिलासा मिळणार आहे. चोरीस गेलेल्या वाहनांची व सापडलेल्या वाहनांची सर्व माहिती या वेबसाइटद्वारे आपल्याला मिळू शकते. तुमच्या वाहनचोरीच्या तक्रारीचा मागोवासुद्धा या वेबसाइटद्वारे तुम्हाला घेता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वेबसाइटचे मागील वर्षी १५ जूनला लाँचिंग झाले होते. गेल्या एक वर्षात या वेबसाइटला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

---

असे करता येईल रजिस्ट्रेशन

www.vahanchoritakrar.com या वेबसाइटवर जाऊन मेन्यू अॉप्शन निवडावा. त्यानंतर मोबाइल नंबर, इमेल आयडी, नाव, आधार क्रमांक, पासवर्ड अशी सर्व माहिती टाकावी. नंतर रजिस्टर अॉप्शन निवडल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. तुम्हाला तक्रार नोंदवण्यासाठी मोबाइल नंबर, पासवर्ड आणि सिक्युरिटी कोड टाकणे आवश्यक आहे.

---

गाडी चोरीला गेल्यानंतर सामान्य नागरिकाला मोठा त्रास सहन करावा लागतो. पण, आता या वेबसाइटमुळे त्यांना तक्रार घरबसल्याही नोंदवता येईल. पोलिस प्रशासनाचा हा उपक्रम खरोखर वाखाणण्याजोगा आहे.

-रुपेश घुगे, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणची फसवणूक केल्यास कारवाई

$
0
0

रिडिंग एजन्सींना महावितरणकडून इशारा

म. टा. वृत्तसेवा सिन्नर फाटा

वीज बील रिडिंगकामी नेमलेल्या एजन्सीच्या चुकीच्या व अनियमित बिलिंगमुळे महावितरणला दरमहा कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. यापुढे अशाप्रकारचे चुकीचे व खोटे रिडिंग घेतल्यास महावितरणची जाणीवपूर्वक फसवणूक केल्याप्रकरणी एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्याचा थेट इशारा महावितरणचे प्रभारी संचालक (संचालन) शंकर शिंदे यांनी रिडिंग एजन्सींच्या प्रतिनिधींना दिला आहे.

एकलहरे येथील महावितरणच्या प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात रिडिंग एजन्सीच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत शिंदे यांनी हा इशारा दिला. याप्रसंगी शिंदे म्हणाले की, वीज ग्राहकांच्या मीटरचे शंभर टक्के अचूक व नियमित रिडिंग आणणे एजन्सीजना बंधनकारक आहे. मात्र तसे होत नसल्याने महावितरणला दरमहा कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्याचा परिणाम महावितरणच्या व्यवसायावर होत असून, त्यासाठी सर्वप्रकारच्या वीज ग्राहकांच्या मीटर रिडिंग अचूक व नियमितपणे होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

यासाठी रिडिंग एजन्सीच्या कमिशनमध्येही नुकतीच वाढ करण्यात आली असून, अडचणीही जाणून घेत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. सभेस महावितरणचे नाशिक परिमंडलचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, नाशिक शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे, मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता शैलेन्द्र राठोड यांच्यासह अभियंता, उपविभागीय अभियंता, एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा धोकादायक पूल अवजड वाहतुकीस बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंडळाने नाशिक जिल्ह्यातील सहा धोकादायक पुलांवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमुख राज्यमार्ग, तसेच जिल्हा मार्गांवरील या धोकादायक पुलांच्या देखभाल दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून, सुरक्षेच्या कारणास्तव ही वाहतूक बंद करण्यात येत असल्याचे पत्र बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

सावित्री नदीवरील पूल कोसळल्याने दोन बसेससह काही वाहने वाहून गेली होती. या घटनेच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. या दुर्घटनेनंतर राज्यातील कमकुवत पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. अशा पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या वेळी दिले होते. नाशिक जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन व सुरक्षा कालावधी संपलेल्या पुलांचा मुद्दाही या घटनेनंतर चर्चेत आला. धोकादायक पुलांवरील वाहतूक बंद करा, अशी मागणीदेखील होऊ लागली. जिल्ह्यातील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम हाती घेण्यात आले. अशा धोकादायक पुलांची माहिती सादर करा, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गेल्या वर्षी देऊनही ही माहिती सादर केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘महाराष्ट्र टाइम्स’ने अलीकडेच उघडकीस आणले होते. या विभागातील अधिकाऱ्यांना स्मरणपत्र पाठविण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढवली होती. धोकादायक पुलांची माहिती १५ जूनपूर्वी सादर करा, असा अल्टिमेटम जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर आता काही धोकादायक पुलांवरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला आहे.

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह अन्य सरकारी कार्यालयांमार्फत आपत्तीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम मंडळाने जिल्ह्यातील राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गावरील सहा जुन्या धोकादायक पुलांवरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी चार पूल काही दिवसांपूर्वीच अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. त्यामध्ये निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवरील चांदोरी ते सायखेडा गावास जोडणारा पूल, सिन्नर तालुक्यातील दारणा नदीवरील भगूर गावाजवळील पूल, इगतपुरी तालुक्यातील घोटी गावाजवळील दारणा नदीवरील पूल आणि नांदगाव तालुक्यातील मनमाड गावाजवळील पांझण नदीवरील पुलाचा समावेश आहे. या पुलांच्या दुरस्तीचे काम सुरू असून, ते ३० जूनपर्यंत पूर्ण होईल, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सुरगाणा तालुक्यातील सौंदाणे- कळवण -बोरगाव- सुरगाणा- उंबरठाण- बर्डीपाडा राज्य मार्ग क्र. २२ गावनाला नदीवरील दोन ठिकाणचे पूल आजपासून अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या धोकादायक पुलांवरून अवजड वाहने नेण्यास बंदी आहे. जिल्हा प्रशासनानेही सर्व तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना पत्र देऊन याबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. परिवहन अधिकारी कार्यालयालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

हे आहेत सहा धोकादायक पूल

१. निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवरील चांदोरी ते सायखेडा गावास जोडणारा पूल

२. सिन्नर तालुक्यातील दारणा नदीवरील भगूर गावाजवळील पूल

३. इगतपुरी तालुक्यातील घोटी गावाजवळील दारणा नदीवरील पूल

४. नांदगाव तालुक्यातील मनमाड गावाजवळील पांझण नदीवरील पूल

५ व ६. सुरगाणा तालुक्यातील राज्य मार्ग क्र. २२ गावनाला नदीवरील दोन ठिकाणचे पूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरज नसल्यास टँकर बंद करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील काही भागांत चांगला पाऊस झाला असून, टँकरग्रस्त गावे आणि वाड्यांवर गरजेपुरते पाणी उपलब्ध झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा काही गावांमधील टँकर कमी करण्याचा विचार जिल्हा प्रशासन करीत असून, तहसीलदारांना पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हक्काचे साधन म्हणून टँकरचा पर्याय अवलंबला जातो. उन्हाळ्यात ग्रामीण भागातील रहिवाशांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणेही पूर्ण क्षमतेने भरली. ग्रामीण भागातील विहिरी, तलाव आणि तत्सम जलाशयांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध असल्यामुळे यंदा उन्हाळा काहीसा सुसह्य झाला. मात्र, एप्र‌िलपासून काही भागात पाणीटंचाईची परिस्थ‌िती निर्माण झाली. ग्रामस्थांकडून टँकरची मागणी होऊ लागल्याने आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून टँकरही सुरू करण्यात आले. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने यंदा दमदार हजेरी लावल्यामुळे ग्रामीण भागात पाण्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे गरज नसेल तर टँकर का सुरू ठेवावेत, याचा विचार जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे. तालुक्यात ज्या ज्या गावांमध्ये टँकर सुरू आहेत तेथील परिस्थ‌ितीची पाहणी करावी. गरजेपुरते पाणी उपलब्ध झाले असेल तर तेथील टँकर बंद करावेत, अशा सूचना तहसीलदारांना देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, अशीही सूचना करण्यात आली आहे.

७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा

जिल्ह्यात सद्यःस्थ‌ितीत ७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासनाकडील अहवालानुसार जिल्ह्यात ११३ गावे आणि १३३ वाड्या अशा एकूण २४६ ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण कमी असल्याचे प्रशासनाने सांगितले. केवळ टँकरद्वारे पाणीपुरवठा शक्य नसल्याने काही गावांमध्ये ग्रामस्थांच्या सोयीसाठी प्रशासनाने विहिरीच अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्यात अशा एकूण १७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून, एकट्या कळवण तालुक्यात १७ विहिरींची मदत घेतली जात आहे. विशेष म्हणजे या तालुक्यात एकही टँकर सुरू करण्याची गरज भासलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लंडनमध्ये जाणाऱ्यांना शेतकऱ्यांचा कळवळा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

दरवर्षाच्या उन्हाळ्यात कुटुंबासह परदेशात फिरायला जाणाऱ्या आमदार कुणाल पाटील यांना शेतकऱ्यांप्रती खोटा कळवळा असल्याची टीका शिवसेनेचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी केली आहे. त्यामुळे सेनेने काय करावे हे त्यांनी शिकवू नये असे पत्रकातून प्रा.पाटील यांनी नमूद केले आहे.

चार दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा ठराव करण्याची सूचना मांडतांना एकटे पडलेले आमदार कुणाल पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर टीका केली. यावर माजी आमदार शरद पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक काढून त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. या पत्रकात ज्यांच्या परिवाराने तालुक्यातील सहकारी संस्था लुटून बंद पाडल्या त्यामुळे सहकारी संस्थांमधील शेतकऱ्यांचे करोडोंच्या भाग भांडवलाचे मुल्य शून्य झाले त्यांना आता शेतकऱ्यांचा कळवळा येतो आहे, असा आरोप केला आहे. प्रत्येक उन्हाळ्यात तालुक्यातील शेतकरी असंख्य प्रश्नांशी, दुष्काळाचा सामना करीत असताना आमदार कुणाल पाटील हे दरवर्षी कुटुंबासह महिनाभर परदेशी आराम करण्यासाठी जातात. यंदा त्यांचा मुक्काम लंडनमध्ये होता. त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना काय कळणार, असाही सवाल पाटील यांनी केला आहे.

चार दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीत शेतकरी कर्जमाफीचा ठराव करण्याची मागणी करणाऱ्या आमदार महोदयांचा मुळात अभ्यासच नाही. असे प्रश्न सभागृहात मांडायचे असतात. त्यावर संबंधित मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायचे असते. परंतु, हे महोदय उपस्थित नसतात, असेही या पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईओंनी घेतली झाडाझडती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच येवला दौऱ्यावर आलेल्या दीपककुमार मीना यांनी रविवारी येवला पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. पंचायत समिती तसेच झेडपीच्या येवला तालुक्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी अन् ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक यांच्या तब्बल तीन तास चाललेल्या या आढावा बैठकीत ‘सीईओ’ मीना यांनी सविस्तर माहिती घेत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

कुठल्याही कामाच्या बाबतीत कुणाच्याही तक्रारी येता कामा नयेत, अशी तंबी देतानाच मीना यांनी प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. आढावा बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ दीपककुमार मीना यांनी रविवारी येवल्यात पंचायत समितीची विशेष आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत मीना तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांकडून विकास कामांची सदयस्थिती, अडचणी जाणून घेत सूचना केल्या. मीना यांनी स्वच्छ भारत अभियान, घरकुल, पेयजल, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना आदी विविध योजनांसह पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, कृषी, बांधकाम, ग्रामपंचायत अशा अनेक विभागांचा आढावा घेतला. या बैठकीस येवला तालुक्यातील पंचायत समितीच्या विविध विभागांचे खातेप्रमुख व ग्रामसेवकांसह जिल्हा परिषदेतील अनेक महत्त्वाच्या विभागाचे वरिष्ट अधिकारी उपस्थित होते. मीना यांनी विविध कामांबाबत येथील खातेप्रमुखांना जाब विचारला. घरकुल तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गतची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत त्यांनी दिल्या. स्वच्छ भारत अभियानांतंर्गत ३१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण येवला तालुका हागणदारीमुक्त करण्याचे काम पूर्ण झाले पाहिजे असेही ते म्हणाले. मीना यांनी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय कामांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत लोकसहभागातून किमान एक कक्ष तरी डिजिटल असेल याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.

बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाघचौरे, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, येवला पंचायत समिती सभापती आशा साळवे, उपसभापती रुपचंद भागवत उपस्थित होते.

अध्यक्षांनीही केल्या सूचना

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी अनेक सूचना दिल्या. पावसाळा सुरू असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने लोकप्रतिनिधींना बरोबर घेवून वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबवावा. तालुका हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने ग्रामसेवक व सरपंच यांच्या सोबत प्राथमिक शिक्षक, आरोग्य कर्मचारी व विस्तार अधिकारी यांनी जनजागृती करावी, असे आवाहन सांगळे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांचे ज्वलंत विषय मांडणारे ‘फारमर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी हा खरे तर जगाचा पोशिंदा, परंतु आज त्याचेच खूप हाल सुरू आहेत. आत्महत्या करून घेण्याइतपत दु:खाने तो गांजला आहे. जगायचे तर त्यासाठी पैसा नाही, जमिनीत काही पिकत नाही, पिकते ते विकत नाही, अशा अनेक अडचणींचा डोंगर त्याच्यासमोर उभा आहे. त्यातून मार्ग काढायचा म्हणजे अत्यंत अवघड होऊन बसले आहे. अशात सरकारही त्याच्या बाजूने नाही, अशा आशयाचे कथानक घेऊन शेतकऱ्यांवर प्रकाशित झालेल्या, तसेच अप्रकाशित साहित्यातून एका कलाकृतीची निर्मिती सचिन शिंदे यांनी केली. ‘फारमर’ ही ती कलाकृती.

कुसुमाग्रज स्मारकामध्ये सोमवारी ही कलाकृती सादर करण्यात आली. या कलाकृतीत विविध तुकड्यांचा कोलाज करण्यात आला होता. आयुष्यभर कष्ट करून हाती धुपाटणे आल्याने शेतकऱ्यांच्या पिढ्यान् पिढ्या बरबाद झाल्या आहेत. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटांनी त्यांना घेरलेले आहे. पाऊस आला नाही तरी पंचाईत आणि जास्त आला तरी अडचण अशा द्विधा अवस्थेत शेतकरी सापडलेला दिसतो. अशा वेळी त्यांना दिलासा असतो तो हमी भावाचा. मात्र, सरकार मालाला हमी भाव देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी अठराविशे दारिद्र्य असते. या आशयाला धरून काही कोलाज तयार करण्यात आले होते. त्यांचे सादरीकरण करण्यात आले.

प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाची संकल्पना दत्ता पाटील यांची होती. दिग्दर्शन धनंजय गोसावी व राहुल गायकवाड यांचे होते. लेखन हेमंत टकले, दत्ता पाटील, प्रकाश होळकर, प्राजक्त देशमुख, कल्पना दुधाळ, विष्णू थोरे, संदीप जगताप, राजेंद्र उगले, अरुण इंगळे यांचे होते. संगीत राहित सरोदे, तर निर्मितीप्रमुख लक्ष्मण कोकणे होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित नाट्यसंस्कार कार्यशाळेतील सर्व गुणवंतांनी यात भूमिका निभावल्या.

या कलाकृतीनंतर ‘अद््भुत बाग’ हे बालनाट्य सादर करण्यात आले. लेखक सुजित जोशी, तर दिग्दर्शक उर्वराज गायकवाड होते. चिमुरड्यांच्या कल्पनेतील बाग यात साकारण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीने फुलला आनंदमळा!

$
0
0

टीम मटा, नाशिक

राज्य सरकारने शेतकरी आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्याही मान्य केल्याबद्दल जिल्हाभरात शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना, वकील संघटनेसह भाजपनेही फटाक्यांची आतषबाजी करीत, तसेच पेढे, मिठाईवाटप करून जल्लोष केला.

वकील कृती समितीतर्फे आनंद

नाशिक ः शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याने शेतकरी बचाव नाशिक जिल्हा वकील कृती समितीतर्फे सोमवारी आयोजित केलेली बैठक स्थगित करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने सुकाणू समिती व शेतकऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या मान्य झाल्या, त्याची अंमलबजावणी करून घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी व शेतकऱ्यांच्या संघटनांना कायदेशीर सहकार्य व मदत करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. पुढील दिशा ठरविण्यासाठी समितीची लवकरच बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक अॅड. वसंत पेखळे यांनी दिली.

येवल्यात भाजपचा जल्लोष

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याबद्दल भाजपचे येवल्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी सायंकाळी पक्षाचे ध्वज फडकावत जल्लोष केला. शहरातील विंचूर चौफुलीवर फटाके फोडत आनंद व्यक्त करण्यात आला. भाजपचे शहराध्यक्ष आनंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष करण्यात आला.

सायगावमध्ये जल्लोष

येवला ः येवला तालुक्यातील सायगाव येथील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करण्यात आला. सायगावकरांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजता एकत्र येताना वाद्याच्या तालावर फेर धरला होता. या वेळी गुलालाची उधळण करणाऱ्या शेतकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजीही केली. एकमेकांच्या मुखात पेढा भरवत आनंद साजरा करण्यात आला. शिवाजी भालेराव, गणपत खैरनार, सुभाष पठारे, काशिनाथ सोनवणे, विलास उशीर, ज्ञानेश्वर भालेराव, एकनाथ भालेराव, रामभाऊ उशीर, रामनाथ रोकडे, सुभाष उशीर, शिवाजी दौंडे, अॅड. सुभाष भालेराव, अनिल दारुंटे, दत्तू उशीर, भाऊसाहेब रोकडे, भास्कर पठारे, बाबूराव पठारे, देवीदास जानराव, पोपट वालतुरे, शिवाजी उशीर आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते.

मनमाडमध्ये आतषबाजी

मनमाड ः राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल मनमाड येथे सोमवारी भाजपतर्फे आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. या ऐतिहासिक कर्जमाफीचे श्रेय भाजप नेतृत्वाचे असल्याचे स्पष्ट करत याबद्दल मनमाड शहर भाजपच्या वतीने जिल्हा सरचिटणीस भाऊराव निकम, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, पंकज खताळ, चिटणीस नारायण पवार, शहराध्यक्ष जय फुलवाणी यांच्या नेतृत्वात एकात्मता चौकात फटाक्यांची आतषबाजी करून मिठाईवाटप करण्यात आले. वयोवृद्ध शेतकरी शिवाजी नामदेव शेरेकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाके फोडण्यात आले. ज्येष्ठ नेते नीळकंठ त्रिभुवन, भीमराव बीडगर, शहर सरचिटणीस अंकुश जोशी, शहर उपाध्यक्ष तिलोक संकलेचा, सतीशसिंह परदेशी, जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन आहेरराव, महेंद्र गायकवाड, डॉ. सागर कोल्हे आदी उपस्थित होते. अंकुश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

पिंपळगावात आनंद

पिंपळगाव बसवंत ः पिंपळगाव बसवंत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे फटाके फोडून जल्लोष केला आणि कर्जमाफीचे स्वागत केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव मोरे, भाजपचे प्रदेश चिटणीस सतीश मोरे यांच्या नेतॄत्वाखाली सोमवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी येथील निफाड फाट्यावर फटाक्यांची आतषबाजी केली. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भाजप सरकारचे समर्थन केले. इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी दिल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकराव मोरे, वैकुंठ पाटील, बापूसाहेब पाटील, प्रा. रवींद्र मोरे, प्रकाश घोडके, दत्तात्रेय काळे, किरण लभडे, परेश शहा, प्रशांत घोडके आदी या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूकंपाच्या इशाऱ्यानंतर कर्जमुक्ती

$
0
0

शिवसेना खासदार संजय राऊतांचे वक्तव्य

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिवसेना पक्षाने भूकंपाची भाषा केल्यानंतर अवघ्या चोवीस तासात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र भाजप सरकारने ही कर्जमाफी मनापासून दिलेली नाही. शिवसेनेचा दबाव होता त्यामुळेच कर्जमाफीची घोषणा करण्यात आली, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. ते सोमवारी (दि. १२) धुळ्यात आयोजित शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. शेतकऱ्यांचे आंदोलन अजून संपलेले नाही, जर राज्यात भूकंप होऊ द्यायचा नसेल तर येत्या २५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. मोदी असो की, मुख्यमंत्री शिवसेनेला घाबरतात, असा इशाराही खासदार त्यांनी यावेळी दिला.

‘मी कर्जमुक्त होणारच’ या मोहिमेंतर्गत धुळे जिल्हा दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी शहरातील शाहू महाराज नाट्यमंदिरात शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सरकारवर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना स्थानिक पक्षातील गटबाजी, भाजपचा विरोध यावरही भाष्य केले. आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आदेशही शिवसैनिकांना त्यांनी दिले. या मेळाव्याला पालकमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख बबन थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख सतीश महाले, डॉ. माधुरी बाफना आदींसह शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते.

पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होतील, त्यात उत्तर महाराष्ट्राचे मोठे योगदान असायला हवे, असे प्रतिपादन खासदार राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना केले. त्यामुळे आता राजकीय भूकंप जुलै महिन्यात होऊन कोण मुख्यमंत्री होईल, या चर्चेला तोंड फुटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनधारकांची पीएफ कार्यालयात गर्दी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

निवृत्त झालेल्या कामगार, कर्मचारी व अधिकारी यांना भविष्य निधी कार्यालयात दरवर्षी मार्च महिन्याच्या आत हयातीचा दाखला सादर करणे गरजेचे असते. परंतु, अनेक पेन्शनधारकांचे हयातीचे दाखलेच पीएफ कार्यालयात जमा होत नसल्याने त्यांची पेन्शन बंद पडण्याची वेळ येत असते. यासाठी भविष्य निधी कार्यालयाने पेन्शन धारकांचा मेळावा सोमवारी (दि. १२) घेतला.

याप्रसंगी शेकडोच्या संख्येने पेन्शन धारकांनी तोबा गर्दी केली होती. याप्रसंगी पीएफ कार्यालयाचे अधिकारी बकरे यांनी हयातीचा दाखला आता डिजिटल प्रणालीद्वारे मिळणार असल्याबाबत धारकांना माहिती दिली. दरम्यान, पीएफ कार्यालयाकडून दरवर्षी ‘निधी आपके निकट’ हा उपक्रम राबविण्यात येतो. तसेच, ‘अधिकारी पेन्शनधारकांच्या दारी’ असाही उपक्रम माजी पीएफ आयुक्त जगदीश तांबे यांनी राबविला होता, असे असतानादेखील अनेक पेन्शनधारकांचा हयातीचा दाखलाच पीएफ कार्यालयाला मिळत नसल्याने पेन्शन बंद होण्याची वेळ येत असते. यासाठी पीएफ कार्यालयाने स्वतंत्रपणे पेन्शनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला उपलब्ध करण्याबाबत माहिती दिली. तसेच मार्च महिन्याचा अगोदरच हयातीचे प्रमाणपत्र दाखल करण्याचेही सूचना अधिकाऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने सरसकट पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केल्यानंतर त्याचा सर्वाधिक फायदा कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. तथापि कर्जमाफीच्या निकषानंतरच या शेतकऱ्यांचा आनंद किती काळ टिकेल हे कळेल. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने २०१६ -१७ मध्ये या दोन पिकांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना १७१९ कोटींपैकी तब्बल १४१८ कोटी रुपये वाटप केले आहेत. यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ८०७ कोटी, तर द्राक्ष उत्पादकांना ६११ कोटी रुपये पीक कर्ज देण्यात आले आहे. मात्र, या पीक कर्जाला माफी मिळेल किंवा नाही, याबाबत शेतकऱ्यांसह बँकाच संभ्रमात आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या परिपत्रकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कांदा, द्राक्ष या दोन पिकांबरोबरच भाजीपाल्यासाठी ११७ कोटी, तर डाळिंबासाठी १११ कोटी रुपये पीक कर्ज म्हणून दिले आहे. त्या खालोखाल ऊस, तेलबिया, भात, बाजरी व कपाशीला पीक कर्ज दिले आहे. या वर्षाच्या पीक कर्जाबरोबरच ९०५ कोटी रुपये कर्जाची थकबाकीसुद्धा आहे. कांदा पिकासाठी एकरी २५ हजार रुपये शेतकऱ्यांना पीक कर्ज या वर्षी देण्यात आले होते, तर द्राक्ष शेतीसाठी एक लाखाची मर्यादा होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला; पण कर्जफेड करण्याचे प्रमाण खूपच कमी होते.

शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी जिल्हा बँक पीक कर्जपुरवठा करते. मात्र, वसुली रखडण्यासोबतच बँकेला जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने बँकेचे व्यवहारदेखील ठप्प झाले. त्यात पुरेसा चलनसाठा नसल्याने बँकेच्या रोखीच्या व्यवहारांवर बंधने आली. त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून खरीप हंगामासाठी कर्जपुरवठा झाला नाही. त्यानंतर कर्ज मिळावे, यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले; पण त्याचाही फायदा झाला नाही. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने जिल्हा बँकेला पीक कर्जासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज असताना सरकारने त्याकडे दुर्लक्षच केले; पण आता राज्य सरकारने सरसकट पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. त्याचा कितपत फायदा शेतकऱ्यांना होतो हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images