Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘एमआयडीसी’मध्ये कचरादहन

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातपूर

एमआयडीसी वसाहतीत उघड्यावर सर्रासपणे कचरा जाळला जात आहे. कचरा जाळणाऱ्या अशा व्यक्तींवर महापालिका आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नेमकी कारवाई करणार कोण असा प्रश्न जागरुक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

उघड्यावर घाण, कचरा फेकणे गुन्हा असतांना कचरा जाळण्याचे प्रकार मात्र सातत्याने दिसून येत आहेत. अंबड आणि सातपूर एमआयडीसी परिसरात पडून असलेल्या भूखंडांच्या बाजूला कचरा जाळण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. परंतु, कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे वर्षांनुवर्ष बंद असलेल्या कारखान्यांच्या भूखंडांवर व त्याबाजूला असलेल्या जागेवर कचरा जाळण्याचे प्रकार सर्वाधिक होत असतात. उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर महापालिकेने दंडात्मक कारवाईची जोरदार मोहीम राबविली. मात्र, काही दिवसांपासून आरोग्य विभागाची मोहीम थंड पडल्याने उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे तात्काळ लक्ष घालत उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

सातपूर व अंबड एमआयडीसी वसाहतीत बंद कारखान्यांच्या भूखंडांवर उघड्यावर कचरा जाळला जात आहे. मात्र, याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
- राहुल आहिरराव, पर्यावरण प्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनपा उपकार्यालय समस्यांच्या गर्तेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिकेच्या जेलरोड येथील कार्यालयातून नुकताच टॅब चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. त्यामध्ये मतदार सर्वेक्षणाची माहिती होती. या घटनेमुळे या कार्यालयाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

महापालिकेचे नाशिकरोड येथे दुर्गा मंदिराशेजारी विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली जेलरोड येथे उपकार्यालय आहे. हे कार्यालय महापालिकेच्या सावरकरनगर उद्यानामध्येच आहे. महापालिका निवडणुकीच्या दरम्यान मतदारांचा सर्व्हे करण्यात आला. मतदार यादीत दिल्यानुसार मतदार दिलेल्या पत्त्यावर राहतो की नाही, याची खातरजमा करण्याबाबत हा सर्व्हे करण्यात आला होता. जेलरोड परिसरात हा सर्व्हे पूर्ण झाला होता. त्याची माहिती चोरीस गेलेल्या टॅबमध्ये होता. या टॅबची किमत चार हजार रुपये होती.

मुठभर जागा; ढिगभर कामे

महापालिकेच्या जेलरोड कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. कार्यालय अत्यंत छोटे आहे. नागरिकांना आत उभेही राहता येत नाही. कर्मचाऱ्यांनाही वावर करणे अवघड जाते. घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना कडक उन्हात बाहेर रांग लावावी लागते. हे लक्षात घेऊन बाहेर शेड उभारण्यात आले होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनानेच राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत हे शेड हटविण्यात आले. कार्यालयात इंटरनेटच्या रेंजचा प्रश्न असल्याने संगणक स्लो चालतात. त्यामुळे नागरिकांचा त्रागा होतो. या कार्यालयात जे फर्निचर आहे, ते जुने आहे. दस्तएवज उघड्या रॅकवर ठेवावा लागतो. कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जुन्या खुर्च्या आहेत.

कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण

कमी कर्मचाऱ्यांमध्ये हे कार्यालय चालवावे लागत आहे. जेलरोडची लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे. त्या तुलनेत कर्मचारी संख्या खुपच कमी आहे. त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे. तरीही हे कर्मचारी घरपट्टी व पाणीपट्टी मोठ्या प्रमाणावर संकलित करतात. मतदार सर्वे व अन्य कामेही या कर्मचाऱ्यांना करावी लागतात. पुरेशी कर्मचारी संख्या देण्याची मागणी होत आहे.

जेलरोड कार्यालयामुळे नाशिकरोडच्या कार्यालयात जाण्याचा त्रास वाचला आहे. तथापी, कार्यालयात सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याची दखल घेऊन त्वरित बेंच, शेड आदी सुविधा द्याव्यात.
- बापूसाहेब बोराडे

महापालिकेचे जेलरोड कार्यालय कमी मनुष्यबळात सुरू असूनही चांगला महसूल गोळा करते. येथे फर्निचर, संगणक, टेबल, खुर्ची आदी सुविधा दुय्यम दर्जाच्या आहेत. महापालिका प्रशासनाने त्या दिल्यास कर्मचाऱ्यांचा कामाचा उत्साह वाढू शकेल.
- मंदा फड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर डॅमशेजारी मोनोरेल राईड्स!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर डॅम नजिकच्या परिसरात ग्रेप रिसॉर्टच्या कामास सुरुवात झाली असून न्यूझीलंडमधील मानव संचलित पॅडलिंग मोनोरेल राईड्स बसविता येण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली. सिटीझन फोरमच्या शिष्ट मंडळासोबत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. याच परिसरात पर्यटन विभाग वॉटर स्पोर्टससाठीही प्रस्ताव मांडणार आहे.

सिटीझन फोरमच्या वतीने विविध प्रस्ताव ‘एमटीडीसी’कडे सादर करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक परिसरातील पर्यटन वाढीसाठी करायच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. हिरवाई, धबधबे, किल्ले, जलाशय यांची विपुल उपलब्धता असल्याने नाशिक-इगतपुरी-त्र्यंबक परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास तिकडे पर्यटक मोठ्या संख्येने आकर्षित करता येऊ शकतात. यासाठी नाशिक-इगतपुरी-त्र्यंबक अर्थात एनआयटी टूरिझम ट्रँगल विकसित करण्यासाठी सखोल अभ्यासाअंती विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी नाशिक सिटीझन्स फोरमच्या शिष्टमंडळाने ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांच्याकडे केली.

या शिष्टमंडळात एनसीएफचे अध्यक्ष सुनील भायभंग, संस्थापक अध्यक्ष विक्रम सारडा, उपाध्यक्ष हेमंत राठी आदींचा सहभाग होता. यावेळी एनआयटी ट्रँगलची संकल्पना मांडताना भायभंग म्हणाले की, नाशिक-इगतपुरी-त्र्यंबक या त्रिकोणात वर्षातील ९ महिने अतिशय आल्हाददायक वातावरण असते. त्यामुळे हा त्रिकोण वेलनेस हब म्हणूनही विकसित होऊ शकतो. योग, निसर्गोपचार अशा विविध थेरेपींची वेलनेस सेंटर्स येथे उभी व्हावीत, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सरकारी स्तरावरून सवलती असणारे धोरण स्वीकारल्यास अशी सेंटर्स उभारण्यासाठी लोक उद्युक्त होतील.

रामकुंडावर हवा रामायण आधारित शो

गंगापूर डॅमवरील बोट क्लब, रेस्टॉरंट आदी सुविधा लोकांसाठी खुल्या करून द्याव्यात, नाशिक ‘एमटीडीसी’ची वेबसाइट अद्ययावत करावी, अशी सूचना ‘एनसीएफ’च्या शिष्टमंडळाने मांडली. उत्तर महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रावर ‘एनसीएफ’ने तयार केलेल्या फिल्मचा प्रसार शासकीय स्तरावरून व्हावा, नाशिकच्या रामकुंडावर कायमच भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे तिथे रामायणावर आधारित लाईट अॅण्ड साऊंड शो सुरू करावा. गेल्यावर्षी पर्यटन आढावा बैठकीत पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी गोदावरी आरतीसाठी २० लाखांचा निधी देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्याआधारे गोदावरी आरती कायमस्वरूपी होईल, अशी योजना आखून ती अंमलात आणली जावी, असे दोन प्रस्ताव भायभंग यांनी मांडले.

ब्रह्मगिरीसाठी हेलिकॉप्टर जॉय राईड

त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक मुक्कामी थांबतात. ते केंद्रस्थानी ठेवून त्र्यंबक परिसरात पर्यटनाची आकर्षणे निर्माण करावीत या प्रस्तावर मुंडावरे म्हणाले, की केंद्राच्या प्रसाद योजनअंतर्गत त्र्यंबकेश्वरचाही समावेश आहे. केंद्र सरकाची एक टीम त्र्यंबकला येऊन गेली आहे. त्र्यंबक येथून ब्रह्मगिरी आणि विविध किल्ल्यांचे विहंगम दृश्य दाखविणारी हेलिकॉप्टर जॉय राईड सुरू करण्यासाठीही पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी त्र्यंबक परिसरात एक हेलिपॅड उपलब्ध करून दिले जाईल आणि एजन्सी नेमून त्यांच्याकडे जॉय राईडचे काम सोपवले जाईल.


टूरिझन सर्किट विकसित व्हावे

पावसाळ्यात जिल्ह्यात दुगारवाडी (त्र्यंबक), विहिगाव (इगतपुरी), कळवण व हरसूल निसर्गरम्य ठिकाणी पायाभूत सुविधा द्याव्यात, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विचार करून टूरिझम सर्किटस् विकसित करावेत, त्र्यंबक सर्किट, नाशिक सिटी टूर, पक्षी अभयारण्य आणि वन्य जीवन दर्शन, येवला सर्किट, वणी भंडारदरा, नाशिक-इगतपुरी-त्र्यंबक (एनआयटी) मान्सून फेस्टीवल सर्किट, सायकल सर्किट, ट्रेकर्स सर्किट आणि मोटारसायकलिस्ट सर्किट आदींचा समावेश असावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतिमान कामकाजासाठी ‘महावितरण’चे मंथन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महावितरण कंपनीचे दैनंदिन कामकाज अधिक गतिमान, पारदर्शी आणि परिणामकारक बनविण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी राज्यभरातील तंत्रज्ञांशी नुकताच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला.

तंत्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांकडून आलेल्या सूचनांच्या आधारावर संजीव कुमार यांनी ग्राहकसेवेत सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश देतानाच सेवेत हयगय करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला आहे. तंत्रज्ञांशी थेट संवाद साधणारे संजीव कुमार हे ‘महावितरण’चे पहिलेच अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आहेत.

दर्जा सुधारण्यासाठी...

ग्रामीण ग्राहकांना मराठीतून एसएमएस पाठवावा, सर्व ग्राहकांचे मीटर रीडिंग प्रत्येक महिन्यात वेळेत करावे, नवीन वीजजोडणी, नावात बदल आदींच्या फॉर्ममध्ये सुटसुटीतपणा ठेवावा, नवीन वीजजोडणी ऑनलाइनद्वारेच देण्यात यावी, फोटो मीटर रीडिंग, मीटरचे छायाचित्र, फीडर व डीटीसी मीटर रीडिंग, नवीन वीजजोडणी, वीजबिल भरणा व इतर दैनंदिन कामे मोबाइल अॅपद्वारेच करण्यात यावीत, ही कामे करणाऱ्या संस्थेने यामध्ये हयगय केल्यास संबंधित संस्थेविरोधात कारवाई करावी, प्रत्येक ग्राहकाला वेळेत वीजबिल द्यावे, विजेसंबंधीचे महत्त्वाची कामे प्राधान्याने करावीत व देखभालीची ठरविलेली कामे ग्राहकांना पूर्वसूचना देऊन करावीत, प्रत्येक महिन्याला वीजबिलाच्या रकमेएवढी वसुली केली जावी, थकबाकी वाढू देऊ नये, ग्राहकाला त्रास होणार नाही, याकडे कटाक्षाने बघावे, प्रत्येक पातळीवर पारदर्शकता ठेवावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाट ओसरली पारा सामान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या बहुतांश भागाला तीव्र झळांनी भाजून काढणारी उष्णतेची लाट ओसरली आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान पाच अंशांनी घसरून ३५ अंशावर, तर मालेगावचे तापमानही ४० अंशाच्या खाली आले आहे. यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवड्यात नाशिकचे तापमान चाळीशी पार गेले होते. मालेगावचे तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचले होते. उष्णतेची ही लाट रविवारी ओसरली. विदर्भातही सर्वत्र पारा ४२ ते ४३ अंशांसह सामान्य झाला. अमरावती व बुलडाण्यात तर तो ३७ अंशांपर्यंत घसरला आहे. विशेष म्हणजे, वर्षापूर्वीदेखील पारा असाच सामान्य होऊन त्यादिवशी लाट ओसरली होती. राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण व शुष्क वाऱ्यांमुळे आठवडाभरापासून उष्णतेची लाट होती.

तापमान स्थिर राहणार!

राज्यात पुढील तीन दिवसांत तापमानात बदल होणार नाही, तर मुंबईत पुढील चोवीस तासांत आकाश ढगाळलेले राहिल. कोकण व गोव्यात उकाडा कायम राहिल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकान हल्ल्याप्रकरणी पोलिसांची सावध भूमिका

$
0
0

मळगाव प्रकरणात अद्याप कोणालाही अटक नाही

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या आरमनदी पात्रातील देशी दारू दुकानाचे तोडफोड व हल्ल्याप्रकरणी सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असली तरीही सटाणा पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. यामध्ये पोलिस यंत्रणा अत्यंत सावधपणे भूमिका घेऊन यामागील सत्य शोधण्याचा तयारीत आहे. दरम्यान, प्राथमिक चौकशीअंती याप्रकरणी मळगाव येथील स्थानिक पोलिसपाटील चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता असून, या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

विदेशी दारूचे दुकाने बंद झाल्याकारणाने देशी दारू कडे तळीरामांचा कल वाढला आहे. तसेच दिवसेंदिवस होत असलेल्या गर्दी व दर्दीमुळे देशी दारूचा धंदा तेजीत आल्याने आपल्यालादेखील हप्ता व खंडणी वाढवून मिळावा यासाठी हा सारा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मळगाव ग्रामपंचायत हद्दीत व सटाणा शहरातील आरमनदी पात्रात असलेले हे देशी दारूचे दुकान एका रात्रीतून उभे राहिलेले नाही. सुमारे १९७४ पासून या देशी दारू दुकानाची स्थापना याच ठिकाणी झाली आहे. यामुळे तब्बल ४० वर्षांपासून देशी दारूची विक्री होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मग सध्याच का महिलांना याचा मानसिक त्रास झाला, असा सवालदेखील उपस्थित करण्यात येत आहे.

पोलिसपाटील चौकशीच्या फेऱ्यात?

याठिकाणी असलेले पोलिसपाटील यांनी या साऱ्या प्रकारामागे निश्चितपणे नियोजन व सूत्रबद्धपणे संघर्ष निर्माण करून पोळी भाजण्याचा प्रयत्न केला असल्याची खुली चर्चा आता रंगू लागली आहे. देशी दारू दुकानाचे संचालक यांनीदेखील पोलिसपाटील यांच्याविरुद्ध थेट तक्रार दाखल करून त्यांना रणांगणात घेतले आहे. संबंधित पोलिसपाटील यांच्यावर दोन ते तीनवेळा निलंबनाची कार्यवाही करण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चाही आहे. एकूणच याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत संयमी भूमिका घेऊन या साऱ्या प्रकाराची अत्यंत गोपनीय चौकशी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळी सुटीत ३३ जादा बसेस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शाळांना सुटी लागली आहे. त्यामुळे गावाकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या सोयीसाठी धुळे विभागातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नऊ आगारातून ३३ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १५ एप्रिल ते ३० जूनदरम्यान जादा बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज राहणार असल्याची माहिती यावेळी विभाग नियंत्रक देवरे यांनी ‘मटा’ला दिली.

मार्च ते एप्रिल या कालावधीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपुष्टात येतात. बाहेरगावाहून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये तसेच सुट्टीच्या काळात वाढती प्रवाशांची संख्या लक्षात परिवहन महामंडळाच्या धुळे विभागतून निरनिराळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ३३ अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्राबाहेर सुरत, वापी, बडोदा, अहमदाबाद, राजकोट, सेलवास तसेच इंदौर याठिकाणी जाण्यासाठी २४ जादा बसेस सुरू करण्यात येणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. मे महिन्याच्या सुट्टीत लग्नसराईच्या तारखा असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त बसेस फायद्याच्या ठरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रघूजीबाबा यात्रोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहर संस्थापक राजे रघूजीबाबा यांच्या शहरातील तीनदिवसीय यात्रोत्सवाला मंगळवार (दि. २५) पासून प्रारंभ होत आहे. यात्रेनिमित्त संयोजकांनी यंदाही जोरदार तयारी केली असून, मंगळवारी सकाळी दहा वाजता शहरातून काढण्यात येणाऱ्या पालखी अन् कावडींच्या सवाद्य मिरवणुकीने यात्रेला सुरुवात होणार आहे.

येवला शहराचे संस्थापक असलेल्या रघूजीबाबा यांच्या तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवाला दरवर्षी कावडी व पालखी मिरवणुकीने सुरुवात होते. शहरातीलच पाटलांच्या गढीवरील सुनील शिंदे यांच्या घरात रघूजीबाबाचा मुखवटा असतो. अक्षय तृतीयेच्या आधी येणाऱ्या मंगळवारी सकाळी त्याची पुजाविधी करून पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. तत्पुर्वी आज (दि. २४) रात्री येथील रघुजीबाबाच्या गढीवर त्यांच्या वंशजांसह सर्व जातीतील युवक एकत्रित येऊन पायी मार्गक्रमण करत आपल्या खांद्यावरील कावडीद्वारे कोपरगाव येथील गोदावरीचे पाणी आणणार आहेत. यात्रेनिमित्त बुधवारी (दि. २६) सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आले आहे. तर गुरुवारी (दि. २७) सांयकाळी रघूजीबाबांचा मुखवट्याची छबी गोंडा पालखी पुन्हा गढीवर नेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरक्षणाच्या रक्षणासाठी एकजूट हवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रस्थापित व्यवस्था सातत्याने मागासवर्गीयांचे आरक्षण धोक्यात आणण्याचा प्र्रयत्न करते आहे. सरकारी क्षेत्रासोबतच खासगी क्षेत्रातही या प्र्रकारचे प्रयत्न आता घडू लागले आहेत. समानतेची तत्त्वे प्रस्थापित करण्याऐवजी त्यांना विरोध करणाऱ्या प्रवृत्तींपासून आरक्षणाच्या रक्षणासाठी एकजूट साधा, असे आवाहन निवृत्त न्यायमूर्ती अनिल वैद्य यांनी केले.

नाशिक जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेतर्फे आयोजित अध्यापक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ‘मागासवर्गीय कर्मचारी गुणवत्ता व आरक्षणामागे घटनाकारांची भूमिका’ या विषयावर वैद्य बोलत होते. प. सा. नाट्यगृहात रविवारी दुपारी हा कार्यक्रम पार पडला.

व्यासपीठावर वैद्य यांच्यासमवेत शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, सहआयुक्त प्रकाश आंधळे, राज्य सरचिटणीस राजेंद्र म्हसदे, जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे उपस्थित होते. यावेळी ‘गुणवंत शिक्षक’ आणि ‘राज्य स्तरीय शैक्षणिक व्हीडिओनिर्मिती’ अशा दोन प्रकारच्या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

गुणवंत शिक्षक पुरस्काराचे मानकरी (कंसात तालुका)

विशेष पुरस्कार ः गुलाब संसारे (येवला), सूरज झाल्टे, (येवला) सुरेखा क्षीरसागर (बागलाण), अर्चना गरुड (मालेगाव), मालती पवार (त्र्यंबकेश्वर), समीना तांबोळी (आडगाव), तात्या मोरे (नाशिक), सतीशकुमार लाडे (त्र्यंबकेश्वर), नारायण गावित (दिंडोरी), दिलीप बोराडे, नामदेव साबळे (दोघेही इगतपुरी), केशव महाले (सुरगाणा), राजेंद्र खैरनार (नांदगाव), संगीता खंबाईत (दिंडोरी), अरुणा पटाईत (सिन्नर), सतीश बैरागी (निफाड), सुरेश खांडबहाले (नाशिक), अनिता अहिरे (कळवण), खंडू मोरे (देवळा), अमोल पवार (पेठ), सचिन सोर (नाशिक), किरण केदार (मालेगाव).

राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडीओनिर्मिती पुरस्काराचे मानकरी

प्रथम पुरस्कार- संजय गोरे (जिल्हा परिषद शाळा : चिंचणी, ता. खटाव, जि. सातारा), द्वितीय पुरस्कार- अमोल हंकारे (जिल्हा परिषद शाळा, खोत वस्ती, जि. सांगली), तृतीय- राजेंद्र गणवीर (जिल्हा परिषद शाळा घोडेगाव, देवळी, जिल्हा : वर्धा), उत्तेजनार्थ : सूरज शिकलगार (जिल्हा परिषद शाळा खंडोबाची वाडी, पलूस, जि. सांगली), उत्तेजनार्थ- समिरा बदीउद्दीन काझी (शेवगाव उर्दू मुलींची शाळा, जि. नगर).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सजावट स्पर्धेत धोंडीराम वस्ताद तालीम संघ प्रथम

$
0
0

राज्य सरकारच्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेत यश

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य सरकारच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाने लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियानांतर्गत गतवर्षी राज्यभर घेतलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. ‘लेक वाचवा,लेक शिकवा’ चा संदेश देताना येवला शहरातील धोंडीराम वस्ताद तालीम संघ या स्पर्धेत येवला तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. नाशिक येथील नियोजन भवनात गुरुवारी (दि. २०) अधिकाऱ्यांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळ्यात या मंडळास २५ हजार रुपये धनादेशासह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्राचा मानबिंदू समजल्या जाणाऱ्या कुस्तीसह क्रीडा क्षेत्रात आजवर नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक उंचावतानाच विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या येवला शहरातील धोंडीराम वस्ताद तालीम संघाने या स्पर्धेत तालुकास्तरावर पहिला क्रमांक पटकावत बाजी मारली.

‘बेटी बचाव’चा सामाजिक संदेश

शेकडो वर्षांची परंपरा जोपासणाऱ्या धोंडीराम वस्ताद तालीम संघाने गतवर्षीच्या गणेशोत्सवात ‘आदर स्त्री शक्तीचा,जागर स्त्री शक्तीचा’ करत लक्षवेधी डिजीटल फ्लेक्सद्वारे समाजमनाला ‘बेटी बचाव,बेटी पढाओ’चा संदेश दिला होता. आजवर देशातील ज्या स्त्रियांनी विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली अशा स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाची यशोगाथा मंडळाने फ्लेक्सद्वारे पुढे आणली होती. तालुकास्तरावरील दुसऱ्या क्रमांक जय विक्रांत फ्रेंड्स सर्कल, तर तिसरे फत्तेसिंग सेवाभावी प्रतिष्ठानला मिळाले.

मंडळाच्या आजवरच्या कार्याची दखल राज्य शासनाकडून घेतली गेली. प्रथम क्रमांकाचे पारितोषिकाने गौरविण्यात येताना मंडळाची पाठ थोपटली आहे.

- राजेंद्र लोणारी, धोंडीराम वस्ताद तालीम संघ, येवला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्याजवळ अपघातात तिघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा-मालेगाव रस्त्यावरील आराई फाट्यावर रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विप्ट डिझायर कारचे पुढील चाक निखळल्याने कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एका युवतीसह तिघांचा मृत्यू झाला.

देवळा एज्युकेशन सोसायटी विद्यालयातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक डॉ. रामराव वामन आहेर (वय ६२) हे सातमाने (ता. मालेगाव) येथील त्यांचे व्याही विजय जाधव (वय ६५) व डॉ. आहेर यांची नात गौरी गोरख निकम (वय १३, रा. ढवळीविहीर आघार) हे तिघेही मालेगावकडून स्विप्ट कारने (एमएच ४१ व्ही ३७२१) देवळ्याला परतत होते. आराई फाट्याजवळ पुढील चाक निखळून पडल्याने कार समोरील एका झाडावर जाऊन आदळली. या अपघातात कारमधील तिघेही जण जागीच मृत्युमुखी पडले. कार झाडावर आदळल्याने मोठा आवाज झाला. यावेळी परिसरातील रहिवाशांनी तातडीने धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली. नगरसेवक राहुल पाटील, काकाजी सोनवणे यांच्यासह मित्रपरिवाराने तातडीने तिघांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिघांची प्राणज्योत मालवली होती. सटाणा पोलिसात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वऱ्हाडींना मिळाले हेल्मेट गिफ्ट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मानपान आणि बडेजाव बाजूला ठेवून एका विवाहाच्या स्वागत समारंभात आलेल्या पाहुणे मंडळींना चक्क हेल्मेट वाटप करण्यात आले. शहरात रंगलेला हा छोटेखानी स्वागत समारंभाचा सोहळा चर्चेचा विषय ठरला.

डॉ. राजेंद्र आणि मायादेवी साबद्रा यांची कन्या प्रियदर्शना आणि नाशिकमधील उद्योजक हरीश आणि वंदना गोगड यांचा मुलगा ऋषभ यांनी १९ एप्रिल रोजी रजिस्टर पद्धतीने विवाह केला. जवळचे नातलग आणि स्नेहीजनांसाठी रविवारी गंगापूर रोडलगतच्या एका लॉन्समध्ये स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण सोहळ्यालाच सामाजिक बांधिलकी लाभल्याने हा सोहळा आगळावेगळा ठरला. जैन समाजात विवाह सोहळ्यांवर वारेमाप खर्च केला जात असला तरी वर आणि वधूकडील मंडळींनी या खर्चाला फाटा देऊन तो पैसा सामाजिक कार्यासाठी देऊ केला. या विवाह सोहळ्यात लग्नपत्रिकेचा खर्च टाळण्यात आला. निमंत्रितांना व्हॉट्सअॅपद्वारेच निमंत्रण पाठविण्यात आले. भूज भूकंपग्रस्तांसाठी काम करणाऱ्या पन्नालाल सुराणा यांच्या ‘आपले घर’ या सामाजिक संस्थेत सध्या २६८ मुले-मुली आहेत. त्यापैकी चार मुलींच्या लग्नाचा खर्च या लग्नात वाचविलेल्या पैशांमधून करण्यात येणार आहे. आज झालेल्या स्वागत समारंभासाठी आलेल्या ५०० निमंत्रितांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते हेल्मेटवाटप करण्यात आले. स्वागत समारंभात कोणताही गोड पदार्थ न ठेवता शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या द्राक्षाच्या पेट्या निमंत्रितांना वाटण्यात आल्या.

साबद्रा आणि गोगड परिवाराने राबविलेला हेल्मेटवाटपाचा निर्णय स्तुत्य आहे. इतरांनीदेखील असे उपक्रम राबवायला हवेत. ज्या निमंत्रितांकडे कार आहेत ते आपल्या वाहनचालकाला किंवा अन्य कुणाला हेल्मेट वापराबाबत प्रोत्साहन देऊ शकतात. दंडात्मक कारवाई हा पोलिसांचा उद्देश नाही, तर लोकांनी स्वसुरक्षेसाठी हेल्मेट वापरावे, असा आमचा आग्रह आहे.

- डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उटी सोहळ्यात रंगले भाविक

$
0
0

त्र्यंबकेश्वरला संत निवृत्तिनाथ महाराज मंदिरात भक्तांची गर्दी

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

धन्य धन्य निवृत्तिदेवा | काय महिमा वर्णवा || शिवावतार तुचि धरून | केले त्रैलेक्य पावन ||
समाधी त्र्यंबक शिखरी | मागे शोभे ब्रम्हगिरी || निवृत्तीनाथांच्या चरणी |शरण एका जनार्दन ||

या ओळींप्रमाणे रविवारी (दि. २३) त्र्यंबकेश्वर येथी श्री संत निवृत्तिनाथ महाराज मंदिरात चैत्र वद्य एकादशीला दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला उटीचा सोहळा हरीनामाच्या गजरात पार पडला. चैत्र वद्य एकादशीला संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीस दाहक उन्हाळा शितल व्हावा म्हणून चंदनाचा लेप म्हणजेच उटी लावली जाते. ती उटी लावत असताना सभामंडपात उपस्थित वारकरी हे संत एकनाथांचा अभंग म्हणत विधीवत उटी सोहळा अनुभवत भजनात तल्लीन झाले होते.

त्र्यंबकेवरला दशमीपासूनच भाविकांची मांदियाळी अनुभवास आली. रविवारी (दि. २३) भागवत एकादशीस वारी असल्याने दोन दिवस शहरात भाविकांचा राबता होता. याचबरोबर काही भाविक हे मंदिर आणि परिसरात मंडप टाकून भजन कीर्तनात दंग झालेले होते. एकादशीच्या पहाटे पासूनच तीर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी रीघ लागली होती. टाळ मृदुंग, भगव्या पताका यांनी यात्रा पटांगणासह संपूर्ण शहर गजबजले होते. भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिरातदेखील वारकरी भाविकांची गर्दी झाली होती.

परंपरेचा वारसा

गत काही वर्षांपासून पायी येणारे वारकऱ्यांची संख्या यावेळेस वाढीस लागल्याने नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर भगव्या पताकांची रीघ लागली होती. याच बरोबर जव्हार, मोखाडा, ठाणे परिसरातूनदेखील मोठ्या प्रमाणात पायी भाविक या यात्रेस आले होते. उटीसाठी असलेले चंदन काही भाविक स्वत: घेऊन येत असतात.

उटी लावून झाल्यावर दर्शन रांग सुरू करण्यात आली. भाविक रात्री साडे अकरा वाजेपर्यंत दर्शनासाठी रांगा लावून होते. याप्रसंगी विधीवत पुजनाने उटी उतरवण्यात आली आणि भाविकांना ती प्रसाद म्हणून रांगेत देण्यात आली. याप्रसंगी सभामंडपात ह. भ. प. सुरेशमहाराज गोसावी यांनी अभंग सेवा सादर केली. दुपारी दोन वाजता दर्शनरांग थांबवून संत निवृत्तीनाथांच्या समाधीस चंदनाची उटी लावण्यात आली.

याप्रसंगी समाधी मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय महाराज थोंडगे, विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलीकराव थेटे, ह. भ. प. जयंत महाराज गोसावी, ह.भ.प. पंडित महाराज कोल्हे, जिजाबाई लांडे, रामभाऊ मुळाणे, अविनाश गोसावी, ललीता शिंदे, योगेश गोसावी, मधुकरराव लांडे तसेच नित्यसेवेकरी, भाविक उपस्थित होते.

शेकडो वर्षांच्या पूर्वपरंपरेने श्री संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीस चंदनाचा उटी लावण्यात आली आहे. सकल सृष्टीस शीतलता, शांतता नांदावी, असा यामागे उद्देश आहे.

- संजय महाराज धोंगडे,

अध्यक्ष, निवत्तिनाथ महाराज समाधी मंदिर संस्थान ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमगावची विकासाकडे वाटचाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर तालुक्यातील निमगाव येथे सरकारच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेबरोबरच शेतकऱ्यांनी वैयक्तिक खर्चानेदेखील शेततळी तयार केली आहेत. ‘आत्मा’ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या रोकडेश्वर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून विपणन व्यवस्था आणि नव्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांकडून होणारा वापर यामुळे या गावातील शेतकऱ्यांची वाटचाल शाश्वत शेतीच्या दिशेने होत आहे.

गावात प्रारंभी राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत शेततळे तयार करण्यात आले. त्याचा फायदा झाल्याचे पाहून इतरही शेतकरी शेततळ्यांकडे वळले. गावात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत १७ शेततळी तयार करण्यात आली. योजनेअंतर्गत आणखी काही शेततळ्यांचे काम सुरू असून, इतर ५० विनाअनुदानीत शेततळीदेखील तयार करण्यात आल्याने पिकांसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. पाण्याच्या उपलब्धतेसोबतच नव्या तंत्रज्ञानाचा वापरदेखील शेतकऱ्यांकडून होत आहे. गावातील ३१ शेतकरी सेंद्रीय पद्धतीने शेती करीत आहेत. कोरडवाहू क्षेत्र विकास अंतर्गत विविध प्रशिक्षण सत्र आणि अभ्यासदौऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून त्याचा उपयोग शेतीत बदल घडवून आणण्यासाठी होत आहे. या योजनेअंतर्गत दोन हरितगृह आणि २८ विद्युतपंप देण्यात आले आहेत. सर्व योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी एकूण १ कोटी ४१ लाखांचा निधी कृषी विभागातर्फे वितरित करण्यात आला आहे.

एकत्रित प्रयत्नांना यश

यासाठी आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे, तालुका कृषी अधिकारी अरुण दातीर, मंडळ कृषी अधिकारी बी. के. सातपुते यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य ग्रामस्थांना उपयुक्त ठरत आहे. अनुभवी शेतकरी जनार्दन सानप आणि नारायण सांगळे यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून गावातील शेतीच्या विकासासाठी नवी दिशा दिली असून, गावाची वाटचाल शाश्वत शेतीच्या दिशेने सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना कृषी विभागाने पुढाकार घेत दिलेली साथ या प्रक्रियेत महत्त्वाची ठरली आहे.

अभियानाची वैशिष्ट्ये

गावात तीन कांदा चाळींची उभारणी, एकूण ७५ मेट्रिक टन एवढी क्षमता

दहा शेडनेटची उभारणी केली

उच्च दर्जा भाजीपाला लागवडीसाठी

तीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य

संगणक, वजनकाटे, शिलाई मशिन, पॅकिंग मशीन, ग्रेडिंग टेबल, कॅरेटस् असे

एकूण १४ लाखांचे साहित्य वितरित


साहित्यांची उपलब्धता

ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मल्चिंग, पॉली हाऊस, शेडनेट आदी सुविधा निर्माण झाल्याने उत्पादकता वाढली आहे. शिवाय वर्षात दोन किंवा तीन पीक घेणे शक्य झाले आहे. राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियानाचा लाभ ६० शेतकऱ्यांनी घेतला. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत रोकडेश्वर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापण्यात आली. या कंपनीचे जवळपास ५३८ सदस्य असून, शेतकऱ्यांचे उत्पादन त्यांच्या बांधावरून खरेदी करून ते बाजारापर्यंत नेण्याची व्यवस्था कंपनीमार्फत करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत आहे. या योजनेअंतर्गत डाळ मिल, आर्द्रतामापक यंत्र आणि चाळणी यंत्रदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.


रोकडेश्वर कंपनीच्या माध्यमातून बांधावर मका, गहू विकत घेतला जातो. मालाचे ग्रेडिंग आणि पॅकिंग करून मुंबईच्या बाजारात विक्री केली जाते. त्यामुळे दलालांची साखळी कमी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत आहे. यापुढील काळात प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्याला उमेदीने उभे करण्याचे प्रयत्न राज्य सरकार व कंपनी एकत्रितपणे करीत आहे.

-जनार्दन सानप, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ आठवड्यानंतरचे गर्भपात सिव्हिलमध्येच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारी गर्भपात केंद्रांमध्ये होणाऱ्या गर्भपात प्रकरणात पारदर्शकता आणण्यासाठी आरोग्य उपसंचालक विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सहा ते १२ आठवड्यापर्यंतच्या गर्भपात प्रकरणी संबंधित स्त्रीरोग तज्ज्ञासह तेथील केंद्र प्रमुखावर जबाबदारी सोपवली आहे. तर, १२ ते २० आठवड्यापर्यंतचे गर्भपात अपवाद वगळता संबंधित सिव्हिल हॉस्पिटलमध्येच करण्यात यावेत, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपातप्रकरण समोर आल्यानंतर सिव्हिल प्रशासनाने विभागप्रमुखांची सद्दी संपवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः १२ ते २० आठवड्यापर्यंतचा गर्भपात करण्यासाठी सिव्हिल प्रशासनाने तब्बल चार डॉक्टरांवर जबाबदारी टाकली. हे डॉक्टर सर्व तपासण्यांचा विचार करूनच गर्भपाताचा निर्णय घेतील. या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक लोचन घोडके यांनीदेखील अशा प्रकारचा नियम नाशिक विभागात लागू केल्याचे सांगितले. विभागात नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो.

सर्व सरकारी गर्भपात केंद्रामध्ये यापुढे सहा आठवड्यापर्यंतच्या गर्भपाताबाबत स्त्रीरोग तज्ज्ञ निर्णय घेऊ शकतील. सहा ते १२ आठवड्यापर्यंतचा गर्भ काढून टाकताना मात्र स्त्रीरोग तज्ज्ञांसह तेथील वैद्यकीय अधीक्षक अथवा प्रमुख नियंत्रकाची मंजुरी आवश्यक असेल. १२ ते २० आठवडे गर्भवती असलेल्या महिलांचा फक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्येच गर्भपात केला जाईल.

खासगी हॉस्पिटलमध्ये सातत्याने तपासणी करणे आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या गर्भपातांचा आढावा घेऊन कामकाजातील पारदर्शकता आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

-डॉ. लोचन घोडके, आरोग्य उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रसायन ड्रमच्या स्फोटात दोन जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील औद्योगिक वसाहतीतील कंपनीत रसायन भरलेल्या ड्रमचा स्फोट झाल्याने रविवारी दोन कामगार गंभीर जखमी झाले. किशोर भुफा (वय १८) व संतोष कुपरेकर (२६, रा. दोघेही मुसळगाव, सिन्नर) अशी या अपघातांत जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील गोल्ड केमिकल कंपनीत भुफा व कुपरेकर सफाईचे काम करत होते. सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक रसायनांचा ड्रम लिक होऊन त्याचा स्फोट झाला. ड्रम व त्यातील रसायन अंगावर उडाल्याने दोघे जखमी झाले. त्यांना तातडीने नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये व यानंतर सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

एकाची आत्महत्या

नाशिक तालुक्यातील शिलापूर येथील एकाने राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. दिलीप शिवराम सशेरे (५८, रा. शिलापूर) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सशेरे यांनी अज्ञात कारणातून शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध सेवन केले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना मध्यरात्री त्यांचे निधन झाले. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ धरणे कोरडीठाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हावासीयांकडून दररोज होणारा पाण्याचा वापर आणि उन्हामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन यामुळे धरणांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस घटत चालला आहे. जिल्ह्यातील २४ पैकी आठ धरणांमधील पाणी तळाला गेले असून, सर्व धरणांमध्ये मिळून अवघा २९ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. या पाण्यावर पुढील किमान ६८ दिवस जिल्हावासीयांची आणि शेतीची तहान भागवावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात अनेक ठिकाणी पाण्याची सर्रास उधळपट्टी सुरू असून, ती रोखणे महापालिका प्रशासनापुढे आव्हान ठरत आहे.

पाणी उपलब्धतेबाबत गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यंदा चांगली परिस्थिती आहे. परंतु, पाऊस लांबणीवर पडला, तर पाण्याच्या नियोजनाचे गणित फसण्याची शक्यता बळावते. जून महिन्यात पाऊस हुलकावणी देत असल्याचा नाशिककरांचा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. या महिन्यात पाऊस झाला, तरी धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास त्याची फार मदत होत नाही. त्यामुळे जूनअखेरपर्यंतच्या पाण्याची भिस्त धरणांमध्ये सद्यःस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्यावरच अवलंबून असणार आहे.

नाशिक जिल्ह्यात गंगापूर, पालखेड आणि गिरणा धरण समूह मिळून २४ धरणे आहेत. या धरणांची साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट असून, सद्यःस्थितीत त्यामध्ये अवघा १९ हजार २०२ दशलक्ष घनफूट उपलब्ध पाणीसाठा शिल्लक आहे.

२३ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील धरणांमध्ये ७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गेल्या चार महिन्यांत तो सुमारे ५० टक्क्यांनी घटला आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठा २९ टक्के असून, तो आणखी किमान सव्वादोन महिने पुरवावा लागणार आहे. पालखेड धरणातून मंगळवारी (दि. २५ एप्रिल) रोजी निफाड, येवला, नांदगावसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. पुढील दहा दिवस हा विसर्ग सुरू राहण्याची शक्यता असून, त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा आणखी कमी होणार आहे.

--

उधळपट्टी ; कारवाईची गरज

उन्हामुळे जिवाची काहिली होऊ लागली असताना शहरात नागरिकांकडून पाण्याचा वारेमाप वापर सुरू आहे. गतवर्षी पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने शहरात पाणीकपातीचे धोरण अवलंबिले होते. यंदा पुरेसे पाणी उपलब्ध असले, तरी ते काटकसरीने वापरणे आवश्यक आहे. सिडकोसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात पाण्याचा गरजेपेक्षा अधिक वापर केला जात असल्याचे पाहावयास मिळते. वाहने, तसेच रस्ते धुण्यासाठी नागरिक पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. जिल्ह्याची आणि आता महापालिकेचीही धुरा सांभाळणारे राधाकृष्णन बी. पाण्याची उधळपट्टी रोखण्यासाठी ठोस कार्यवाही करणार का, याकडे लक्ष लागले आहे.

--

जलसाठ्यावर दृष्टिक्षेप

दिनांक घटत गेलेला साठा (टक्के)

२३ डिसेंबर २०१६ ७८

२३ जानेवारी २०१७ ६७

२३ फेब्रुवारी २०१७ ५३

२३ मार्च २०१७ ३६

२३ एप्रिल २०१७ २९

--

तळाला गेलेली धरणे

---

धरण शिल्लक साठा (टक्के)

गौतमी गोदावरी १० टक्के

वाघाडमध्ये ७

केळझर ७

पुणेगावमध्ये ५

नांदूरमध्यमेश्वर ०

नागासाक्या ०

माणिकपुंज ०

--

जिल्ह्यातील धरणांची साठवण क्षमता : ६५,८१४ दलघफू

सध्या उपलब्ध साठा : १९,२०२ दलघफू

--

धरण समूहनिहाय उपलब्ध पाणीसाठा

धरण समूह उपलब्ध साठा (टक्के)

गंगापूर ४२

पालखेड २१

गिरणा ६८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालस्वास्थ्य’ ठरली संजीवनी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात राबविला जाणारा राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यातील हजारो बालक व शालेय विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरला आहे. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील तब्बल ७२० बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात १६७ बालकांवर हृदयशस्त्रक्रिया, तर उर्वरित ५५३ बालकांवर इतर आजारांशी संबंधित शस्त्रक्रियांचा समावेश आहे. या योजनेमुळे शेकडो बालकांना जीवनदान मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

एप्रिल २०१३ पासून अंगणवाडी व शालेय मुलांचे आरोग्यसंवर्धन व विकासासाठी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यात आढळून आलेल्या आजारांवर वेळीच उपचार करणे व आजारांना पायबंद घालण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. वय वर्षे ० ते १८ या वयोगटातील मुला-मुलींची आरोग्य तपासणी व त्यांच्या आजारांवर मोफत उपचार या कार्यक्रमातून केले जातात. नाशिक जिल्ह्यात सध्या ७५ पथके या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असून, १५० वैद्यकीय अधिकारी, ७५ औषधनिर्माता व ७५ परिचारिका अशा एकूण १५० कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. जन्मतःच व्यंग, पोषणमूल्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासास विलंब व इतर आजार यांचे निदान व उपचार केले जातात.

--

अशी होते अंमलबजावणी

प्रत्येक शैक्षणिक वर्षात अंगणवाडी बालकांसाठी दोनदा, तर शालेय विद्यार्थ्यांसाठी एकदा आरोग्य तपासणीचे आयोजन केले जाते. यातील किरकोळ आजाराचे निदान झालेल्या बालकांवर शाळेतच उपचार केले जातात, तर गंभीर आजाराचे निदान झालेल्या बालकांवर जिल्हा रुग्णालय अथवा राजीव गांधी जीवनदायी योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांत पुढील उपचार करून त्यांचा पाठपुरावा केला जातो.

गरजूंना मिळाला लाभ

गेल्या शैक्षणिक वर्षी अंगणवाडी व विविध शाळांतील ७२० विद्यार्थ्यांवर या योजनेतून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यातील बहुतांश बालके आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कष्टकरी कुटुंबांतील आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षी दोन्ही टप्प्यांत अंगणवाडीतील ३४ हजार ९१७ बालकांवर किरकोळ, तर २ हजार ४९२ बालकांवर उच्चस्तरीय रुग्णालयांत उपचार करण्यात आले. शाळांतील ३३ हजार ६१६ विद्यार्थ्यांवर शाळांतच किरकोळ, तर ४ हजार ७०५ विद्यार्थ्यांवर पुढील उपचार करण्यात आले.

--

जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेमार्फत राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जातो. या योजनेतून निदान झालेल्या आजारांवर आतापर्यंत शेकडो बालके व विद्यार्थ्यांवर वेळीच उपचार झाल्याने त्यांच्यासाठी ही योजना संजीवनी ठरली आहे.

-डॉ. अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी, योजना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिली व्यवसायातील ‘दौलत’

$
0
0

आयुष्यात कुणालाही दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढायला लागू नये, असे म्हटले जाते. पण, त्याच कोर्टाची पायरी चढावी लागली, तर ती वाट सुसह्य कशी होईल यासाठी अॅड. दौलतराव घुमरे प्रयत्नशील असतात. याच वाटेवरून प्रवास करताना अॅड. घुमरे यांनी अनेकांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळवून दिली आहे. गोरगरिबांच्या केसेस मोफत लढवून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला अशांसाठी ते देवदूत ठरले आहेत, तर ज्यांनी अन्याय केला त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरले आहेत. वयाची नव्वदी ओलांडूनही त्यांचे कार्य आजही अविरत सुरू आहे.

दौलतराव घुमरे यांचा जन्म चांदवड तालुक्यातील शेलू या गावी झाला. वडिलांचे शेतीतून मिळणारे उत्पन्न अत्यंत अल्प असल्याने त्यांना गरिबीत दिवस काढावे लागले. शाळेत जायची इच्छा होती म्हणून वडिलांनी पाटी आणि पेन्सिल आणून दिली तेवढाच काय तो वडिलांचा शिक्षणाशी संबंध आला. पुढील सर्व शिक्षण घुमरे यांनी स्वतःच्या मेहनतीवर पूर्ण केले. शाळेत जाण्याचा रस्ता गरीब वस्तीतून जात असल्याने त्यांचे होणारे हाल पाहून मन हेलावून जायचे. त्यांच्यासाठी काही तरी करावे, असे मनोमन वाटायचे. पण, आपल्याकडेच काही नाही, तर त्यांना कशी मदत करणार म्हणून पाय पुन्हा मागे वळायचे. याच काळात शाळेतील शिक्षक चांगले असल्याने त्यांनी देशसेवेचे संस्कार केले. एका शेतावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट झाली आणि तो दिवस आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्या काळात स्वातंत्र्याची चळवळ जोरात होती. घुमरेंनी तेव्हा जमेल त्या मार्गाने चळवळीला हातभार लावला. काही काळ ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही गेले. संघाच्या शाखेत त्यांची घुसमट होऊ लागल्याने त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कार्याला सुरुवात केली. येथे त्यांचा थोरा-मोठ्यांशी संबंध आला. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांना जवळून पाहता आले. त्यामुळे सावरकर, गांधी, नेहरू या तीनही व्यक्तींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर आजही जाणवतो. त्या काळात त्यांनी अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतला. भात लढ्याच्या चळवळीत त्यांना अडीच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. पुढे मुंबई येथून कायद्याची पदवी घेतल्यानंतर नाशिकमध्ये वकिली व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी दिवाणी स्वरूपाचे खटले चालविण्यास प्रारंभ केला. मात्र, त्यात तोच तोपणा आल्याने ते काही कालावधीनंतर फौजदारी दाव्यांकडे वळाले. वकिली हा एकमेव ध्यास असल्याने महाराष्ट्र बँक दरोडा, वैभव कट्यारे खून खटला अशा अनेक मोठ्या केसेस त्यांनी जिंकल्या. अनेक गुन्हेगारांना त्यांनी जेलची हवा खायला लावली. नाशिक कोर्टात सध्या सुरू असलेल्या तेलगी प्रकारणीची केसदेखील त्यांच्याकडेच आहे. वकिली व्यवसाय म्हणण्यापेक्षा त्यांनी ते एक व्रत मानले. त्यामुळे ते यशस्वी होऊ शकले. मला ज्या क्षेत्राची आवड होती, त्याच क्षेत्रात काम करायला मिळाल्याने मी आजही तंदुरुस्त आहे, असे ते म्हणातात. नाशिकचेच नव्हे, तर हायकोर्टात प्रॅक्टिस करणारे अनेक वकील त्यांच्याकडून ज्ञानाची शिदोरी घेऊन गेले आहेत. नाशिक जिल्ह्यात त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. शिक्षण, समाजकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत ते आजही कार्यरत असतात. नाशिक शहरात प्रॅक्टिस करणारे अनेक नामवंत वकील त्यांचे ज्युनिअर आहेत. माणसाच्या तोंडाकडे पाहिले, की त्याची अार्थिक अवस्था समजते. वकिली व्यवसायात लोकांनी पैसे दिले, तर त्यांनी घेतले. केवळ पैशासाठीच केस घेणार, असे त्यांनी कधी केले नाही. अनेक गरिबांना मोफत न्याय मिळवून दिला व आजही ते कार्य करीत आहेत. वयाची नव्वदी उलटली, तरी गोरगरिबांची सेवा करण्यासाठी ते सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कोर्टात हजर असतात. ते म्हणतात, देवाने मला भरभरून दिले. मान-सन्मान, प्रसिद्धी आणि जगण्यापुरता पैसा. त्यामुळे मी पूर्णपणे समाधानी आहे. माझी दोन्ही मुले माझी गादी चालवत असून, आता नातीदेखील वकिली व्यवसायाला सुरुवात करणार आहेत. अॅड. घुमरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर अनेक मानसन्मान मिळाले आहेत.


नाशिककरांनो, लिहिते व्हा!

ज्येष्ठ नागरिक म्हटले, की वयाचा उत्तरार्ध आणि त्यामुळे कमी झालेला अॅक्टिव्हनेस असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण, अनेक ज्येष्ठ हे केवळ वयाने वृद्ध असतात, त्यांचे मन मात्र तरुणच असते. त्यांच्या कामातून, समाजसेवेतून किंवा अन्य अॅक्टिव्हिटीजमधून ते आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवून देतात. अशाच ज्येष्ठांसाठीचे हे व्यासपीठ म्हणजे आमचा ‘यंग सीनिअर्स’ कॉलम. चला तर मग, तुम्ही जर असे यंग सीनिअर असाल, तर थेट आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या ओळखीत, पाहण्यात असे कोणी असेल, तर त्यांचे नाव सुचवा. योग्य व्यक्तींना या सदरातून नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, तिसरा मजला, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, ना‌शिक.

समन्वय : फणिंद्र मंडलिक- ९४२३१७४४९५.

ई-मेल : fanindra.mandlik@timesgroup.com

(पाकीट आणि ई-मेलवर ‘यंग सीनिअर्स’ उल्लेख करावा.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अच्छे दिन’साठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे!

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

कामानिमित्त घराबाहेर पडलेला व्यक्ती परत येईपर्यंत भरदिवसा चोरटे लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करतात. रस्त्यावरून जाताना गळ्यातील दागिन्यांवर भामटे कधी डल्ला मारतील याचा नेम नाही. वाहनचोरी तर चोरट्यांच्या हातचा मळ झाला आहे. चोरीच्या घटनांकडे पोलिस दुर्लक्ष करून चोरट्यांना हिंमत देण्याचे काम करतात. गुन्हेगारी १०० टक्के कमी होईल, असे नाही. मात्र, झालेल्या गुन्ह्यांचा शोध तत्परतेने लागणे महत्त्वाचे! नागरिकांच्या चांगल्या दिवसांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाने रामबाण उपाय शोधण्याची आवश्यकता आहे.

कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस दलावर मालमत्ता गुन्हे रोखण्याचे आणि झालेले गुन्हे शोधण्याची मोठी जबाबदारी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत मालमत्तेशी संबंधित गुन्हे शोधून काढण्याची यंत्रणा कोलमडून पडली आहे. पोलिसांची इच्छाशक्ती घटनेतील ‘अर्था’वर भर देणारी असून, यात सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठे बदल अपेक्षित आहेत. व्यक्तीनिहाय म्हणजे खून, हल्ला, फसवणूक असे गुन्हे पोलिस लागलीच शोधून काढतात. किंबहुना त्यातील संशयितांची माहिती तरी असते. मात्र, मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये तसे होत नाही. विशेष म्हणजे व्यक्तिकेंद्री गुन्ह्यांची ढाल करीत पोलिस मालमत्तेच्या गुन्ह्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मालमत्तेच्या गुन्ह्यात चटका बसलेल्या ७० टक्के नागरिकांना न्यायच मिळत नाही. याउलट पोलिस मात्र दागिने का घातले, इतके पैसे डिक्कीत का ठेवले, सोने बँकेत ठेवायचे असे फुकटचे सल्ले नागरिकांना देतात. सुरक्षेच्या दृष्टीने पुरेपूर यंत्रणा असलेल्या घरांमध्ये चोरटे घरफोडी करतात. सीसीटीव्ही फूटेजमध्ये चोरट्यांचे स्पष्ट चेहरे येऊनही ते पोलिसांना सापडत नाही. अनेकदा तर बँकेच्या लॉकरमधून घरी जाणाऱ्या दागिन्यांवरदेखील चोरटे डल्ला मारतात. सुरक्षेची हमी कोठेही नाही. त्यात मालमत्तेसंबंधी गुन्हे १०० टक्के बंद होतील, अशी शक्यता नाही. अशा वेळी पोलिसांनी गुन्हेगारांना त्वरित शोधून कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. दरवर्षी चोरट्यांची उलाढाल लाखो करोडोंत होते. कष्टाने कमवायचे अन् चोरट्यांनी पोलिसांच्या वरदहस्ताने डल्ला मारायचा, असा प्रकार सुरू आहे. यामुळे चोरटे गुन्हेगारीपासून परावृत्त होत नाहीत, किंबहुना पोलिसही अर्थकारणांमुळे तसे होऊ देत नाहीत. यात भरडला जातोय सर्वसामान्य नागरिक. मुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालमत्ताविषयक गुन्ह्यांचा या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. किमान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमोशनसाठी मालमत्ता गुन्ह्यांच्या शोधांचा निकष अधिक कडक करायला हवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images