Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पोलिस बंदोबस्तात ‘समृध्दी’साठी सर्वेक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यात अवघे २२ टक्के सर्वेक्षण झाले आहे. नाशिक जिल्हा राज्यात सर्वात पिछाडीवर आहे. ग्रामस्थांच्या विरोधामुळे सर्वेक्षणात अडथळे येत असल्याच्या निष्कर्षापर्यंत जिल्हा प्रशासन आले असून यापुढे पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाबाबतचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, राहुल पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक गिरे आणि दत्तात्रय घोगरे आदी उपस्थित होते. समृध्दी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी गावागावातून सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. परंतु, या सर्वेक्षणाला ठिकठिकाणी विरोध होत असून जमीन मोजणीच्य कामात व्यत्यय येऊ लागला आहे. हे अडथळे दूर व्हावेत आणि प्रशासनाला सर्वेक्षणाचे काम पूर्ण करता यावे यासाठी ग्रामीण पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यापुढे महसूल आणि पोलिस विभागाच्या समन्वयातून या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. समृध्दी महामार्गासाठी भूमी अभिलेख विभागाद्वारे जागेची मोजणी करण्यात येत आहे. परंतु, या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याने मोजणी करण्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थ पिटाळून लावत आहेत. सर्वेक्षणाचे काम रखडल्याने प्रकल्प मुदतीत कसा पूर्ण होणार असा प्रश्न बैठकीत उपस्थित झाला. मराठवाडा, कोकण, विदर्भात सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे. सरकारकडून प्रशासनावर दबाव वाढत आहे. या प्रकल्पाला आणि सर्वेक्षणाला होणारा शमविण्यासाठी सर्वेक्षणवेळी पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र, पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या समन्वयातून ग्रामस्थांशी चर्चा करूनच कार्यवाही करा अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न

मुंबई-नागपूर समृध्दी महामार्ग जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातून जातो. २४ जिल्ह्यांमध्ये या महामार्गासाठी सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे. नाशिक आणि औरंगाबाद वगळता अन्य जिल्ह्यांनी गती घेतली आहे. नाशिक जिल्ह्यात अवघे २२ टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यात या कामात व्यत्यय येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने पोलिसांची मदत घेऊन सर्वेक्षण लवकर आटोपण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अहो आश्चर्यम्, गुन्ह्यांचा आलेख फ्रीझ!

$
0
0

नाशिक : नऊ वर्षात शहराचा चेहरा झपाट्याने बदलला. याच काळात लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली. नवनवीन झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या. तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हे करण्याची मानसिकता फोफावली. मात्र, क्राइम रेट मात्र जैसे थे आहे. जवळपास ९ वर्षांपूर्वी शहरात जितके गुन्हे घडले तितकेच आताही घडलेत. यास नेमकी काय घटक कारणीभूत आहेत, याचा उलगडा मात्र पोलिसांना करणेही अवघड बनले आहे.

शहरीकरण आणि लोकसंख्या वाढीचा थेट परिणाम गुन्हेगारीवर होत असतो. बेरोजगारी अथवा ऐषोआराम जीवन पध्दती गुन्हेगारी फोफवण्यास मदत करते. जलद दळणवळण आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळते. यामुळे घरफोड्या, चेन स्नॅचिंग, दरोडे, खून, वाहनचोरी, फसवणूक, चोऱ्या गंभीर गुन्हे वाढीस लागतात. दुसरीकडे कमी मनुष्यबळ, कामाचा ताण, नवीन चोरट्यांची वाढती संख्या अशा विविध कारणांमुळे पोलिस हतबलता व्यक्त करतात. शहरीकरणाच्या दुष्परिणामाचे हे चित्र नाशिकमध्ये मात्र उलटे दिसते. २००८ मध्ये जितके गुन्हे (३६३६) झाले त्यापेक्षाही कमी गुन्ह्यांची (३५६८) नोंद २०१६ मध्ये झाली. हा चमत्कार कशामुळे झाला याचे ठोस उत्तर पोलिसांनाही सांगता येत नाही. साधारणतः गुन्ह्यांचा आलेख गत वर्षाच्या तुलनेत कमीच राहावा यासाठी पोलिस अधिकारी प्रयत्नशील असतात. यासाठी साम-दाम-दंड-भेद अशी उघड रणनीती वापरली जाते. गुन्हेगारी वाढली की त्याचा परिणाम पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर होतो. त्यामुळे प्रत्येक गुन्हा दाखल करताना ठाणे अंमलदार ताकही फुंकून पितो. गुन्हेगारी किती फोफावली यापेक्षा गुन्हे किती दाखल होतात, याकडे सर्वांचे लक्ष असते. वाहनचोरी वा मोबाइल चोरीचे गुन्हे अगदी १५ ते २० दिवसांनी दाखल होत असतात. अनेकदा तर त्याची गहाळ म्हणून नोंद होते.

गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया अत्यंत सहज आहे. एखाद-दुसरा अपवाद असू शकतो. मात्र, टार्गेट ठेऊन गुन्हे दाखल होत नाही. शहरीकरण वाढले असले तरी पोलिस त्यादृष्टीने काम करीत असून, त्याचा हा परिणाम असू शकतो. खूनाच्या गुन्ह्यात पोलिसांचा थेट संबंध नसतो. मात्र, त्याचाही ट्रेंड कायम दिसतो.
- डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त

तीन वर्षांचा अपवाद

२००८ ते २०१६ या नऊ वर्षात २००९ ते २०११ या काळात गुन्हेगारीने शहरात थोडे डोके वर काढले होते. साडेतीन हजार गुन्ह्यांची संख्या या काळात २००९ मध्ये प्रथमच चार हजार २० वर पोहचली. यानंतर चार हजार २०३ आणि चार हजार ३५७ अशी त्यात वाढ झाली. २०१२ मध्ये पोलिस आयुक्त म्हणून कुलवंतकुमार सरंगल यांनी पदभार स्वीकारला. यानंतर, क्राइम इंडेक्स पुन्हा साडेतीन हजारांवर स्थिरावला. २०१६ मध्ये एकूण तीन हजार ५३८ गुन्ह्याची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुणालाही स्पष्ट बहुमत न ‌मिळाल्याने नाशिक जिल्हा परिषदेची सत्ता कोण काबीज करणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर शिवसेनेने काँग्रेस व माकप सोबत अनोखी मोट बांधत भाजप-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे पराभव करीत जिल्हा परिषदेत सत्ता स्‍थापन केली. अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल उदय सांगळे यांची, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नयना रमेश गावित यांची निवड झाली.

राजकीयदृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस, माकप व अपक्षांची मोट बांधत शिवसेनेने २० वर्षांनंतर भगवा फडकावत राष्ट्रवादी-भाजप आघाडीचा पराभव केला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शीतल सांगळे यांना ३७ मते, तर राष्ट्रवादीच्या उमेदवार मंदाकिनी दिलीप बनकर यांना ३५ मते मिळाली.

उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गावित यांना ३७ मते, तर भाजपचे उमेदवार डॉ. आत्माराम कुंभार्डे यांना ३५ मते मिळाली. अटीतटीच्या या निवडणुकीत माकपच्या तीन सदस्यांपैकी दोन सदस्यांनी शिवसेना-काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान केले, पण या आघाडीचे गटनेनेत रमेश बरफ यांनी दोन्ही निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

सर्वांच्या उंचावल्या भुवया!

निवडणुकीसाठी शिवसेना व काँग्रेसच्या सदस्यांनी भगवे फेटे बांधून सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रसेच्या सदस्यांची शिवसेनेला दिलेली साथ सर्वांच्या भुवय्या उंचावणारी ठरली. या निवडणुकीत सर्व सदस्य बसमधून आले होते. त्यांना गेटवर पास देण्यात येत होते. त्यामुळे येथे काही वेळ गोंधळ झाला.

प्राथमिक गरजा सोडविण्यास प्राधान्य देऊ. महिला अधिक प्रमाणात निवडून आल्या आहेत. यामुळे महिलांना पुढे आणण्याचे काम करू. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वार्थाने प्रयत्न करू.

- शीतल सांगळे, अध्यक्ष

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू. रस्ते व पाणीप्रश्न सोडविण्यास प्राथमिकता देऊ. महिलांचे प्रश्नही तत्परतेने सोडवू.

- नयना गावित, उपाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक टन फुलांनी होणार इस्कॉन मंदिरात अभिषेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पौर्णिमा बसस्टॉपजवळ असलेल्या इस्कॉन मंदिराला सहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक टन पुष्पांनी राधामदन गोपालजींच्या मूर्तींना अभिषेक घालण्यात येणार आहे. यावेळी दोन दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये ‘हरे कृष्ण’ संस्थेच्या कार्याला १९९६ साली सुरुवात झाली. या संस्थेच्या कार्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून, एक हजाराहून अधिक भक्त या संस्थेस जोडले गेले आहेत. २३ मार्च रोजी श्री श्री राधा मदनगोपालजींच्या प्राणप्रतिष्ठेला सहा वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मूर्तिला पुष्पाभिषेक करण्यात येणार असून, हा महोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. इस्कॉन मुंबईचे मंदिर अध्यक्ष श्रीमान गौरांग प्रभू या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाला सकाळी ५ वाजता मंगल आरतीपासून सुरुवात होणार असून, त्यानंतर ‘हरे कृष्ण’ महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद भागवत प्रवचन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता मूर्तिंचा पंचामृताने अभिषेक करण्यात येईल व त्यानंतर श्रीमान गौरांग प्रभूंचे प्रवचन असेल. यावर्षी १००० किलो पुष्पांच्या पाकळ्यांनी श्री श्री राधा मदनगोपालजींच्या विग्रहांचे अभिषेक करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदारांच्या अंगणात वाजणार ढोल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

येथील नगर परिषद प्रशासनाने विविध कर थकविणाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या मालमत्ता सील केल्यानंतर थकबाकीदारांच्या नावांच्या यादीचे होर्डिंग शहरातील विविध चौकात लावण्यात आले आहे. त्यामुळे थकबाकीदार नरमले असून, अनेकांनी नगरपरिषदेच्या वसुली विभागाकडे भरणा करण्यासाठी धाव घेतली आहे. दरम्यान,

काही थकबाकीदार अजूनही बाकी भरण्यास तयार नसल्याने स्थानिक प्रशासनाने आता अशांच्या घरांसमोर ढोलताशे वाजविण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच काही थकबाकीदारांचे नळ कनेक्शनही तोडण्यात आले. यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून रांगा लावून थकबाकी भरली जात आहे. शहरात घरपट्टी, पाणीपट्टी व व्यापारी संकूल तसेच प्लॉट धारकांकडे विविध प्रकारच्या करांची थकबाकी आहे. वसुलीसाठी पालिकेच्या वतीने वारंवार तगादा लावूनही थकबाकीदार दादच देत नसल्याच्या वर्षानुवर्षाचा पुर्वानुभव आहे. त्यामुळे शासननिर्देशानुसारच करवसुलीसाठी पालिकेने यावर्षी अधिक सक्तीने कार्यवाही सुरू केली आहे.

पालिका मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी अधिकारी, कर्मचारी वर्गासह प्रसंगी पोलिस बंदोबस्त सोबत घेऊन धडक वसुली सुरू केली आहे. प्रारंभी नोट‌िसा बजावून नळ कनेक्शन कट करण्यात आले. त्यानंतर मालमत्ता सील करण्यात आल्या. अखेर थकबाकीदारांच्या नावांचे होर्डिंग शहरातील मुख्य चौकात लावण्यात आले आहेत. यावरील नावे पाहताच अनेकांनी बाकी भरली. सटाणा पालिकेने अचानक व अनपेक्षितपणे हे पाऊल उचल्यामुळे थकबाकीदार चांगलेच धास्तावले असून, कर वसुलीस चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे थकबाकी वसुलीत हयगय न करता अधिकाधिक प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी अनुभवला कांदा लिलाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीस अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्रा. अलेक्स टँबॉरॉक, प्रा. मोनिका टँबॉरॉक, मॅक्सवेल टँबॉरॉक यांनी भेट दिली. त्यांनी लासलगाव येथे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्याकडून भारतातील व विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे प्रकार व लागवड, खर्च, सध्याचे बाजारभाव या संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.

बाजार समितीत प्रत्यक्ष लिलाव पद्धती व कांदा खरेदी विक्री विषायांवर शेतकरी व व्यापारी वर्गासोबत संवाद साधला. वॉशिंग्टन येथील नामवंत विद्यापीठमधील अर्थशास्त्रज्ज्ञ प्रा. अलेक्स टँबॉरॉक हे भारतीय कांद्याविषयी विशेष माहिती घेण्यासाठी आले होते. यावेळी शंतनू पाटील यांनी त्याचे स्वागत व सत्कार केला. टँबॉरॉक यांनी सांगितले की, आशियातील सर्वात मोठ्या कांद्याच्या बाजारपेठेत कांद्याची खरेदी विक्री व कांदा लागवड करणाऱ्या शेतकरी वर्गाची माह‌िती व त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या. तसेच प्रत्यक्ष कांदा लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन कांदा या पिकाची महिती मिळाली. या विषयावर अमेरिकेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​आरोग्य विभागाला अल्टिमेटम!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाढती अस्वच्छता, स्वाइन फ्लूचा फैलाव, डेंग्यू तसेच डासांचा वाढता प्रादूर्भाव आणि घंटागाड्यांची अनियमितता याबद्दल महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य विभागाला थेट जबाबदार धरले आहे. आरोग्य विभागाचे कामकाज असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवत या विभागाला कारभार सुधारण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. महापालिकेचे सफाई कर्मचारी कामच करीत नसल्याचे सांगत, कर्मचाऱ्यांचे प्रभागनिहाय फेरनियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

शहरातील आरोग्य व स्वच्छतेच्या प्रश्नावर महापौर भानसी यांनी बुधवारी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर, आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकांटेसह अधिकारी या वेळी उपस्थित होते. या बैठकीत महापौरांनी पहिल्याच दिवशी आरोग्य विभागाच्या कामकाजाचे वाभाडे काढले. शहरात अस्वच्छतेचे प्रमाण जास्त असल्याने साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच स्वाइन फ्लूचा फैलाव जोमाने होत आहे. मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांचाही प्रादूर्भाव वाढत आहे. घंटागाड्या अनियमितपणे धावत असताना आरोग्य विभागाचे यावर नियंत्रण नसल्याचा ठपका महापौरांनी ठेवला.

पालिकेतच अस्वच्छता

अस्वच्छतेबाबतच्या आरोपांना नकार देणाऱ्या डॉ. डेकाटे यांना महापौरांनी पालिकेच्या शौचालयांमध्येच आरसा दाखवला. बैठक सुरू असतानाच त्यांनी महापौर कार्यालयाबाहेर असलेल्या महिलांच्या स्वच्छतागृहात अधिकाऱ्यांना नेले. तेथील अस्वच्छतेची जाणीव आरोग्याधिकाऱ्यांना करून देत परिस्थितीची जाणीव करून दिली. तसेच या ठिकाणीच अशी अवस्था असेल शहराची स्थिती काय असेल, असा सवाल त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परखड राजकीय भाष्यकार हरपला!

$
0
0

टीम मटा, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंद तळवळकर यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने सामाजिक विचारांची बैठक असलेला परखड राजकीय भाष्यकार हरपल्याची प्र‍‌तिक्रिया नाशिकमधून उमटली. तळवळकरांचे अग्रलेख वाचणे म्हणजे स्वत: समृद्ध होत असल्याची अनुभूती मिळत असल्याचे मत नाशिककरांनी व्यक्त केले.

विलक्षण व्यक्तिमत्व

अत्यंत व्यासंगी, स्पष्टवक्ता आणि ग्रंथ दुनियेत तल्लीन असलेली व्यक्ती अशी गोविंद तळवळकर यांची ओळख होती. सर्वच क्षेत्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. एखाद्या घडामोडीचा इतिहास, निरीक्षण आणि अभ्यास हे विलक्षणच होते. जनमानसाचा वेध त्यांना घेता येत होता. मितभाषी स्वभाव आणि दिलदार असेही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू होते.
- हेमंत टकले, आमदार

प्रकाशमान संपादक

सर्वसामान्य माणसाला गोविंदराव म्हणजे कोडे वाटायचे. दिसायला गंभीर, बोलायला तोलूनमापून. कार्यालयात अभ्यागतांच्या वाट्याला फक्त नमस्कार-चमत्कार आणि मोजके दोनचार मिनिटे. त्यांच्या यशस्वी आणि उत्तुंग संपादकीय कारकिर्दीचा तो भरभक्कम पाया होता. वाचन दांडगे. त्यावर अव्याहत विचार. राजकीय-सामाजिक गुंतागुंत उकलण्यात त्यांचा हातखंडा. त्यांचे ‘संपादकीय’ म्हणजे ‘समाज प्रबोधन’ असायचे. त्यांची लेखणीच त्यांच्यावतीने बोलायची. वाचकांवर अधिराज्य गाजवायची! प्रत्यक्षात कमीत कमी दिसणारे ते प्रकाशमान संपादक होते.
- दत्ता सराफ, ज्येष्ठ पत्रकार

पत्रकारितेतील दीपस्तंभ

१९६८ ते १९९६ दरम्यान दरम्यान तळवळकरांनी अत्यंत कठीण असणारे विषय सोपे करून ते आपल्या लेखांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहचवत असत, आपल्या पत्रकारितेच्या काळात त्यांनी विविध सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर केलेले लिखाण हे पत्रकारांना निश्चित मार्गदर्शक होते. पत्रकारितेतील दीपस्तंभासमान कार्य आहे. अशा ज्ञानवंतांच्या आपल्यातून जाण्याने पत्रकार सृष्टीला मोठा धक्काच बसला आहे.
- पां. भा. करंजकर, ज्येष्ठ पत्रकार

प्रशंसनीय पत्रकारिता

गोविंदराव यांचे नाशिकशी स्नेहाचे नाते होते. साहित्यिक वि. वा. शिरवाडकरांवरील प्रेमापोटी ते नाशिकला आले. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांची पत्रकारिता प्रशंसनीय होती. त्यांच्या पत्रकारितेमुळे मटा सुखावला अन् बहरलाही. त्यांच्या जाण्याने पत्रकारितेतील आजच्या पिढीची मोठी हानी झाली आहे.
- मधुकर झेंडे, माजी अध्यक्ष, सावाना

अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व

मी पाहिलेल्या संपादकांमध्ये प्रकांड पंडितांची परंपरा गोविंदरावांच्या जाण्याने खंडीत झाली आहे. ही परंपरा त्यांच्यापर्यंत येऊन थांबली. देशांतर्गत व देशाबाहेरील विषयांवर त्यांचा किती बारकाईने अभ्यास होता हे त्यांच्या अग्रलेखांतून स्पष्ट होते. भारतीयांना स्वतःबद्दल व स्वतःच्या देशाबद्दल किती माहिती आहे हेदेखील त्यांच्या अग्रलेखांतून जनतेपुढे आले.
- देवकिसन सारडा, उद्योगपती

व्यासंगी, साक्षेपी संपादक

व्यासंगी आणि साक्षेपी संपादक म्हणून तळवलकर यांनी उभ्या महाराष्ट्रात आदरयुक्त दरारा निर्माण केला होता. विचार आणि अग्रलेखांचे चालते बोलते स्कूल तळवलकर होते. या महाराष्ट्राच्या एका पिढीची वैचारिक जडण घडण त्यांच्या अग्रलेखांवर झाली. त्यांच्या व्यासंगाला कुठल्याही क्षेत्राचा अटकाव नव्हता. १९६५ ते १९९५ या काळात ‘मटा’ची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांचे योगदान अतुलनीय राहिले. विशेष म्हणजे त्यांचे मत विचारात घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील महत्त्वाचे निर्णय, घटना घडल्या नाहीत. अफाट व्यासंगामुळे अखेरपर्यंत त्यांच्या मताचा सर्वत्र आदर झाला.
- प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, साहित्यिक

सव्यसाची संपादक

आपल्या ग्रंथसंपदेवर पोटच्या अपत्यांइतकेच प्रेम करणारा, समाजमनावर ६५ वर्षे अधिराज्य गाजविणारा सव्यसाची संपादक, लेखक, विचारवंत आणि अनेक घटनांचा साक्षीदार शांत झाला. अगदी अलिकडील मराठा आंदोलनाबाबतच नव्हे तर मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल इस्पितळात असतानाही ते सजग आणि सडेतोड होते. विचारांतील कमालीची शुध्दता, काळाचेच नव्हे तर त्या पलिकडचेही भान त्यांना होते.
- प्रमोद भार्गवे, कार्यवाह, शंकराचार्य न्यास

समाज कल्याणकारी विचारवंत
अभ्यासू पिंड, भाषेवरील पकड, अफाट व्यासंग, सुसंस्कृत पण तत्वनिष्ठ भूमिका, प्रखर सामाजिक भान यामुळे तळवलकरांनी लोकमान्य टिळकांची परखड पत्रकारितेची पालखी समर्थपणे खूप पुढे आणली. पत्रकारितेतून सामाजिक कल्याणाचा विचार सातत्याने मांडणारे गोविंद तळवलकर हे खऱ्या अर्थाने सव्यसाची पत्रकार होते. त्यांचे लेखन आणि त्यांची ग्रंथसंपदा पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या सर्वांना मार्गदर्शक आहेत.
- प्रा. कमलाकर देसले, साहित्यिक

लिखाणातून पिढी घडविली

महाराष्ट्र टाइम्सचे संपादक तब्बल २८ वर्षे काम केल्यामुळे आमची पिढी त्यांचे अग्रलेख वाचून घडली. ‘मटा’चा अग्रलेख वाचणे व त्यावर चर्चा करणे हे नेहमीच असायचे. तळवलकर यांच्या लिखाणामुळे आमची पिढी बौद्धिकदृष्ट्या संपन्न झाले. त्यांचे सखोल लिखाण राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करण्याबरोबरच समाजाला दिशा देणारे असायचे.
- प्रकाश होळकर, कवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्या दो​न सदस्यांची माकपमधून हकालपट्टी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत पक्ष निर्णयाविरोधात मतदान करणाऱ्या दोन सदस्यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हकालपट्टी केली आहे. सुरगाणा तालुक्यातील गोंदूण गटातून निवडून आलेल्या ज्योती जाधव व भावाडा गटातून निवडून आलेल्या अनिता बोडके यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. पण तीन सदस्यांपैकी दोघांनी शिवसेना व काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान केल्याने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती माकपचे जिल्हा सेक्रेटरी सुनील मालुसरे यांनी दिली.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माकप किंगमेकर ठरला होता. पण त्यानंतर दोन तासांतच माकपचे आमदार जिवा पांडू गावित यांनी दोन सदस्यांवर कारवाई करण्यास सांगितलेे. त्यानुसार बुधवारी कारवाई करण्यात आली. हकालपट्टी झाली असली तरी दोघांचेही सभासदत्व मात्र कायम राहील असे बोलले जात आहे. या निवडणुकीत माकपचे गटनेते रमेश बरफ हे तटस्थ राहिले. पक्षाचा व्हीप असूनही दोन सदस्यांनी अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवार शीतल सांगळे व उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या नयना गावित यांना मतदान केले.

शिवसेना व काँग्रेस आघाडीकडे ३३ मते होती. त्यांना एका अपक्षाने पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ ३४ झाले होते. माकपचे दोन व माकप समर्थक एका सदस्याने पाठिंबा दिल्याने ३७ हा जादुई आकडा पार केला गेला. माकप तटस्थ राहिला असता तर राष्ट्रवादी व भाजपलाच फायदा झाला असता. या पक्षांकडे ३५ संख्या होती. माकपची भूमिका कोणाच्या फायद्याची होती की त्यात राजकीय खेळी होती याबाबत संभ्रम कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​भाजपचा नामकरण अजेंडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सबका साथ, सबका विकास अशी घोषणा देत महापालिकेत सत्ता संपादन करणाऱ्या भाजपने विकासाऐवजी प्रथम नामकरणाचा अजेंडा राबविण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या मनोगत पाक्षिकाचे समन्वयक रवींद्र अमृतकर यांनी महापालिका संकुलाचे ‘पंडित दीनदयाळ संकुल’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव महापौरांना दिला आहे. महापौर निवासस्थान व राजीव गांधी भवनला एकत्रितपणे हे नाव दिले जाणार आहे. या नामकरणावरून भाजप आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत.

सध्या भाजपेयींकडून देशभरात ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देण्यात येतो आहे. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या संस्थांमध्ये प्रवेश करून त्यांच्यावर आपला शिक्का उमटविण्याचे काम या भाजपकडून सुरू आहे. खादी ग्रामोद्योग मंत्रालयाने चरख्यावरून महात्मा गांधी यांना हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदींची तसबीर लावून भाजपने मोठा वाद ओढवून घेतला होता. केंद्र व राज्यातील योजनांचेही जोमात नामकरण केले जात आहे. नाशिकमध्ये रवींद्र अमृतकर यांनी महापौर, पालकमंत्री, आमदारांना पत्र लिहून नामकरणाचा प्रस्ताव दिला आहे. दीनदयाळ उपाध्याय यांनी आपले आयुष्य समाजातील शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी उन्नतीसाठी समर्पित केले. त्यामुळे महापालिका संकुलाला त्यांचे नाव द्यावे असे पत्रात म्हटले आहे. सर्वसामान्य नाशिककर आणि बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांचा गोंधळ टाळण्यासाठी, पत्त्याची अडचण टाळण्यासाठी पुढील सूचनेचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक वाटत असल्याचे अमृतकर यांनी म्हटले आहे. राजीव गांधी भवन व रामायण बंगला या दोन्ही वास्तूंचे स्वतंत्र अस्तित्व असले तरी त्या एकाच आवारात, एकाच कुंपणात आहेत. त्यामुळे त्यांची ओळख स्वतंत्र नावाने असण्याऐवजी एकाच नावाने असावी, असे कारण देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​रामायण सर्किट’मध्ये नाशिकचा समावेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

प्रभू रामचंद्रांचा संपूर्ण देशात ज्या ज्या ठिकाणी अस्तित्वाचा इतिहास असेल, अशी ठिकाणे धार्मिकदृष्ट्या केंद्रीय पर्यटन विभागाने स्वदेश योजनेंतर्गत विकसित करण्याचे ठरवले आहे. यामुळे नाशिकमधील रामकुंड, पंचवटी, टाकेद परिसराचा विकास होऊन नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.

रामायणच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांच्या इतिहासाची ओळख सर्वांनाच झालेली आहे. भारतातील त्यांच्या वास्तव्याचा इतिहास आता रामायण सर्किटमार्फत उजळविण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्या, नंदिग्राम, श्रींग्वेरपूर, चित्रकूट तसेच बिहारमधील सीतामढी, बक्सर, दरभंगा तसेच मध्य प्रदेशमधील चित्रकूट, ओडिशामधील महेंद्रगिरी, छत्तीसगडमधील जगदलपूर, महाराष्ट्रातील नाशिक व नागपूर, तेलंगणमधील भद्रचालम, कर्नाटकमधील हम्पी, तामिळनाडूतील रामेश्वरम या ठिकाणांची निवड झाली आहे.

या सर्किटमुळे धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून अधिक भाविक-भक्त सहभागी होतील व पर्यटनाला चालना मिळेल. यासाठी नाशिक व नागपूरसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्रीय पर्यटन विभागाने मागवला आहे. हा अहवान नॅशनल स्टिरिंग कमेटीकडे सादर केला जाईल. त्या समितेचे चेअरमन पर्यटनमंत्री असणार आहेत. त्या मंजुरीनंतर केंद्रीय मंजुरी व देखरेख कमेटीकडे अहवाल सादर करून त्यास मंजुरी दिली जाईल. त्या समितीचे चेअरमन पर्यटन विभागाचे सचिव असतील.

स्वदेश योजनेच्या माध्यमातून रामकुंड, टाकेद, पंचवटी परिसराचा विकास होऊन नाशिकच्या पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालव्याचे झाले डबके

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गंगापूर धरणाचा डावा कालवा नाशिक शहराच्या पंचवटीतील फुलेनगरजवळून जातो. सध्या या कालव्यात धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आलेले नाही. तरी या कालव्यात फुलेनगरच्या जवळच्या भागात पाणी साचून राहिलेले आहे. या साचलेल्या पाण्यातच कचरा टाकण्यात येत असल्याने या पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. तसेच साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वाढू लागल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याकडे तातडीने लक्ष देत सफाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

फुलेनगरची वस्ती या कालव्याच्या दोन्ही बाजूने पसरली आहे. अत्यंत दाट असलेल्या या वस्तीतून वाहणाऱ्या डाव्या कालव्याचा दक्षिणेकडील रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. अगदी कालव्याच्यालगत झोपड्या झालेल्या आहेत. या झोपडपट्टीच्या भागातील कचरा थेट कालव्यात टाकला जात आहे. कालव्याच्या साफसफाईच्या वेळी जेसीबीच्या सहाय्याने येथील कचरा काढून बाहेरच्या बाजूला टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरी सर्वत्र कचराच कचरा दिसतच आहे. कालव्यात कचऱ्यामुळे पाणी साचून राहते. या साचलेल्या पाण्यावर शेवाळ तयार झालेले आहे. काळपट रंगाच्या या पाण्याची दुर्गंधी पसरल्यामुळे या भागातून जाताना त्रास होतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत असून, तो लवकर दूर व्हावा, याची मागणी केली जात आहे.

कचराही कालव्यातच

झोपडपट्टी भागातील कचरा गोळा करून तो घंटागाडीत टाकण्याची सुविधा येथे नाही. येथील अरुंद रस्त्याच्या ठिकाणी घंटागाडी पोहचू शकत नसल्याने साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाटही कालव्यातच केली जाते. त्यामुळे कालव्यात पाणी आणि कचरा साचून राहतो. कालव्याला आवर्तन सोडण्यात आल्यानंतर हा कचरा वाहून जातो. पुन्हा आवर्तन बंद झाल्यावर कचरा साचण्याचे प्रमाण वाढते. पेठ रोडने जाताना पूलावरून हा कालव्यात साचलेला कचरा सहज नजरेस पडतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू

$
0
0

कामटवाडे रस्त्याची समस्या सुटली

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक महापालिकेने शेवटच्या टप्प्यात शहरातील सर्वच रस्त्यांची कामे जोमाने हाती घेतली होती. यात नवीन नाशिक सिडकोतील त्रिमूर्ती चौक ते कामटवाडे पर्यंतचा रस्ता रुंदीकरणासाठी साइडपट्ट्या खोदण्यात आल्या होत्या. याबाबत ‘मटा’ने ‘साइडपट्ट्या खोदून ठेकेदार झाला गायब’ या आशयाखाली बुधवारी (दि. २२) वृत्त प्रसारित केले होते. महापालिकेतील बांधकाम विभागाची यंत्रणा तातडीने जागी होत साइडपट्ट्यांचे काम जोमाने हाती घेतले आहे.

महापालिकेने शहरातील सर्वच रस्त्यांची कामे मंजूर करत तब्बल १९२ कोटींचा निधी मंजूर केला होता. यात शहरातील अनेक रस्त्यांची कामे महापालिकेने केली होती. परंतु, काही रस्त्यांची कामे आजही सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यातच त्रिमूर्ती चौक ते कामटवाडे रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रुंदीकरणासाठी साइडपट्ट्या खोदून ठेवल्या होत्या. यात पाच महिने उलटूनही खोदलेल्या साइडपट्ट्यांचे काम ठेकेदाराने हाती घेतले नव्हते. त्याचा वाहनचालक व रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. खोदून

ठेवलेल्या साइडपट्ट्यांमुळे शाळा, कॉलेजेसचे विद्यार्थ्यांसह अनेक व्यावसायिकांना त्रास सहन करण्याची वेळ आली होती.

काम तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश

‘मटा’ने या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर महापालिकेने तात्काळ रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. ‘मटा’च्या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या बांधकाम विभागाने ठेकेदारास खोदलेल्या साइडपट्ट्यांचे काम तत्काळ मार्गी लावण्याचे आदेशही दिले असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील गतिरोधक ठरताहेत जीवघेणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक शहराच्या वाढत्या विस्तारात लोकवस्ती झपाट्याने वाढल्याने वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे वेगाने चालविणाऱ्यांवर रोख बसावा म्हणून महापालिकेने गतिरोधक ठिकठिकाणी टाकले आहेत. परंतु, गेल्या दहा दिवसांत गतिरोधकांच्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यासाठी महापालिकेने तात्काळ गतिरोधकांची पाहणी करावी, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने महापालिकेच्या सिडको विभागाचे विभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वेगाने वाढणाऱ्या नाशिक शहरात वाहनांची संख्या लक्षणीय वाढली असून, रस्ते मात्र अरूंद झाले आहेत. त्यामुळे वेगाने वाहन चालविणाऱ्यांचा त्रास इतरांना सहन करावा लागतो. यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी रस्त्यांवर गतिरोधक टाकले होते. परंतु, टाकण्यात आलेले गतिरोधक अती उंचीचे असल्याचा आरोप मनसेच्या विद्यार्थी सेनेने केला आहे. याबाबत सिडको विभागीय अधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. या निवेदनात महापालिकेने तात्काळ गतिरोधकांची पाहणी करत नियमानुसार असेच गतिरोधक ठेवण्यात यावे असे म्हटले आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांना गतिरोधक टाकले आहेत. परंतु, पांढरे पट्टे व रिफ्लेक्टरच लावलेले नसल्याने गतिरोधकांवर तोल जात अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याचे नमूद केले आहे.

‘पुढे गतिरोधक आहे’ अशा आशयाचे फलक गतिरोधकाच्या काही फूट मागेच लावण्यात यावेत, अशीही मागणी यात केली आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, सागर कोठावदे, नितीन माळी, भालचंद्र देसले, संदेश जगताप, राम बिडवे उपस्थित होते.

 गेल्या काही दिवसांतील घटनेत तीन जणांना गतिरोधकांमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. यासाठी महापालिकेने रस्त्यांवर टाकलेल्या गतिरोधकांची तत्काळ पाहणी करून गतिरोधकांच्या ठिकाणी पांढरे पट्टे व रिफ्लेक्टर लावावेत.

-गणेश मोरे, मनसे विद्यार्थी सेना, जिल्हाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांचा प्रवास खडतर

$
0
0

अंधारमय रस्त्यावरील बंद पथदीपांची दुरुस्ती करण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सरकार कुठलेही येवो महिला सक्षमीकरणाच्या भाषा सर्वच करतात. परंतु, सातपूरच्या औद्योगिक वसाहतीत १२ तास काम करणाऱ्या महिलांच्या समस्येकडे कोणालाही लक्ष देण्यास वेळ नसल्याचे चित्र आहे. सायंकाळी कंपनीतून घरी परततांना अंधारमय रस्त्यावरून कामगार महिलांचा प्रवास खडतर झाला आहे. सातपूर एमआयडीसीच्या सिएट कंपनी ते शिवाजीनगर कार्बननाका पर्यंत पथदीपांखालीच अंधार पसरल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाने किमान बंद पथदीपांची दुरुस्ती करावी, अशी मागणी महिला कामगारांनी केली आहे.

सरकारकडून मोठ्या दिमाखाने महिला सक्षमीकरणाच्या भाषा केली जाते. परंतु, प्रत्यक्षात महिलांना त्याचा लाभ मिळतो का हेच सरकारकडून पाहिले जात नाही. वाढत्या महागाईच्या काळात घरातील कर्त्या पुरूषाच्या पगारावर घर भागात नाही म्हणून महिला देखील कारखान्यांमध्ये कामाला जात असतात. सातपूरच्या शिवाजीनगर व श्रमिकनगर भागातील सर्वांधिक महिला कारखान्यांमध्ये मिळेल तेथे काम करत आहेत.

सातपूर एमआयडीसीतून कारखान्यातून काम आटोपत घरी परत येताना सिएट ते शिवाजीनगर कार्बननाक्यापर्यंत महिला कामगारांना अंधारमय रस्त्यावरून रोजच प्रवास करावा लागतो. महापालिकेची आर्थिक तिजोरी भरणाऱ्या एमआयडीसीत पथदीप बसविण्यात दुर्लक्ष होत असल्याच आरोप महिला कामगारांनी केला आहे. तसेच काही ठिकाणी पथदीप बसविले आहेत, परंतु, ते नादुरूस्त असल्याने त्याची दुरूस्ती कोण करणार, असाही सवाल महिला कामगार उपस्थित करत आहेत.

टवाळखोरांचाही त्रास

अशा परिस्थितीत कामगार महिलांना सर्वाधिक त्रासाला समोरे जावे लागते. कंपनी सुटल्यावर सायंकाळी सातवाजेला घरी जातांना अंधारमय रस्त्यावरून महिला कामगारांना खडतर प्रवास करण्याची वेळ येते. त्यातच एकाचवेळी हजारो महिला पायी रस्त्याने घराकडे जात असतांना दुचाकी व चारचाकी वाहनांचाही त्रास महिलांना सहन करावा लागतो. लहान मुले घरी असल्याने घरी जाण्यासाठी महिलांची लगबग असतांना टवाळखोरांचाही जाच अनेकदा महिलांना सहन करण्याची वेळ येते. या सर्व गोष्टींना तोंड देत अंधाराच्या वाटेवरून कधीतरी उजेड पडेल या आशेने महिला मुकाटपणे घराची वाट धरत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

उंटवाडी येथील जगतापनगरमधील मनीषा राजेंद्र साळवी (वय ४८) या महिलेचे स्वाइन फ्लूच्या आजाराने मृत्यू झाल्याचे समजते.

गेल्या आठवड्यापासून त्या आजारी होत्या. उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी जाहीर केले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. स्वाइन फ्लूच्या आजाराने हा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले असून, या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने या भागासह सिडकोतील सर्वच भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना आखली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या​ सत्ताधाऱ्यांना २० कोटींची बक्षिसी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेच्या सत्ताकाळात नाशिक महापालिकेला शिल्लक सिंहस्थ निधी देण्यास नकार देणाऱ्या राज्य सरकारने आता मात्र पालिकेच्या पदरात दान टाकण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेचे घेणे असलेल्या ६७ कोटींपैकी सरकारने पालिकेला शिल्लक सिंहस्थ कामांसाठी २० कोटी २९ लाख रुपये दिले आहेत. हा निधी सिंहस्थाच्या शिल्लक कामांसाठी वापरला जाणार आहे. हे पैसे देतानाच, बचत केलेला ६७ कोटींचा सिंहस्थ निधी सरकारने कापून घेतल्याने आता सिंहस्थाचा हिशेब जवळपास पूर्ण झाला आहे.

सिंहस्थासाठी शासनाने महापालिकेला ९२९ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता. त्यातील एक तृतीयांश रक्कम राज्य शासनाकडून, तर उर्वरित एक चतुर्थांश रक्कम महापालिकेने खर्च केली आहे. शासनाकडून ६८९ कोटी ४६ लाख महापालिकेला प्राप्त होणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापपर्यंत ६२२ कोटी चार लाख रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत. पालिकेने ६७ कोटी ४२ लाखांची बचत केली आहे. हा निधी अन्य विकासकामांसाठी द्यावा अशी मागणी पालिकेने केली होती. परंतु, त्यास दाद देण्यात आली नव्हती. ३१ ऑगस्ट २०१६ मध्ये झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत २० कोटी २९ लाख देण्याचे आश्वासन मात्र देण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने २० कोटी २९ लाख रुपये पालिकेकडे वर्ग केले आहेत. त्यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविले आहे. भाजपची सत्ता आल्याने सरकारकडून महापालिकेला ही पहिली बक्षिसी देण्यात आली आहे.

आता वाद व्याजाचा!

शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून महापालिकेने ६७ कोटींची बचत केली. त्या रकमेतून काही कामे मार्गी लावण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. परंतु, महापालिकेने बचतीच्या रकमेची मागणी करताच शासनानेही व्यवहारवादी भूमिका स्वीकारत ६२२ कोटी रुपयांवर बँकेत जमा १३ कोटींचे व्याज खर्च न करण्याचे फर्मान काढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फडणीस’वर आणखी एक गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यावंधींना गंडा घालणाऱ्या पुणे येथील फडणीस इन्फास्ट्रक्चरच्या संचालक मंडळाविरोधात म्हसरूळ पोलिसांनी आणखी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. संचालक मंडळाच्या आश्वासनानंतर पोलिसांकडून टोलवाटोलवी झाल्याने दिंडोरीरोड भागात राहणाऱ्या दाम्पत्याने कोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशान्वये म्हसरूळ पोलिसांनी गुन्ह नोंदवला. यापूर्वी, सदर संचालकांविरोधात मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

शशांक बाळकृष्ण कुलकर्णी व सीमा शशांक कुलकर्णी (रा. साईनगर, पोकार कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार फडणीस ग्रुपचे संचालक विनय प्रभाकर फडणीस, शरयू विनायक ठकार, भाग्यश्री सचिन गुरव, सायली विनय फडणीस व अनुराधा विनय फडणवीस आदींविरुध्द फसवणूक व ठेवीदार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड, फडणीस प्रॉपर्टीज, फडणीस इन्फ्रा, फडणीस रिसॉर्टस् अ‍ॅण्ड स्पा लि. अशा वेगवेगळ्या नावाने कंपन्या थाटून त्यात पैसे गुंतवण्यास गुंतवणुकदारांना उद्युक्त केले. अधिक व्याजदर मिळणार असल्याने २०१३ मध्ये कुलकर्णी दाम्पत्याने ४ लाख ९२ हजार ४४४ व ७ लाख तीन हजार ४९१ अशी अकरा लाख ९५ हजार ९३५ रुपयांची गुंतवणूक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविकाच्या पतीने शिवसैनिकाला चोपले

$
0
0

सिन्नर फाटा : नाशिकरोड येथील मित्रमेळा सामाजिक संस्थेचा संस्थापक राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे याने दारुच्या नशेत बुधवारी (दि. २२) रात्री भर रस्त्यात शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यास गंभीर मारहाण केली. त्याच्याविरोधात उपनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला. कन्नू ताजणे प्रभाग २० मधील भाजप नगरसेविका डॉ. सीमा ताजणे यांचा पती आहे.

उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठ वाजेदरम्यान सानेगुरुजीनगर येथे कन्नू ताजणे आपल्या सहकाऱ्यांसह उभा होता. त्याच दरम्यान सानेगुरुजीनगरमध्ये वास्तव्यास असलेला प्रशांत बळवंत तारे आपल्या घराकडे जात होता. कन्नू ताजणे याने त्यास थांबविले आणि आपल्याला जबर मारहाण केली, अशी फिर्याद प्रशांत तारे याने उपनगर पोलिसांत दिली आहे. या मारहाणीप्रसंगी कन्नू ताजणे दारुच्या नशेत असल्याचे फिर्यादी प्रशांत तारे यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे प्रशांत तारे व कन्नु ताजणे एकमेकांचे जुने मित्र आहेत. असे असतांना कन्नू ताजणे याने प्रशांतला मारहाण केल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. कन्नू ताजणे व प्रशांत तारे दोघेही मित्र आहेत. कन्नू ताजणे काही महिन्यांपूर्वीच भाजपवासी झाले. तर प्रशांत याने राष्ट्रवादी काँग्रेसमधून‌ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओवैसींना मारहाण, शिवसैनिकाचा दावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचा समर्थक व शिवसैनिक गोरख खर्जुल याने एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांना मारहाण केल्याचा दावा केला आहे. संसदेच्या आवारात ओवैसींची भेट घेऊन तुम्ही वादग्रस्त वक्तव्य का करता, असा सवाल आपण केला. त्यावेळी ओवैसींनी माझ्यासोबत बाचाबाची केली, असा दावा खर्जुल यांनी केला. तर ओवैसी यांनी अशी कोणतीही मारहाण झाली नसल्याचा खुलासा केला आहे.

देवळाली गावातील रहिवासी गोरख खर्जुल हा गुरुवारी संसद पाहण्यासाठी गेला होता. तेथे त्याला एमआयएमचे खासदार ओवैसी दिसले. यावेळी आपण ओवेसींची भेट घेऊन तुम्ही वादग्रस्त वक्तव्य का करता, असे विचारले. त्यावेळी ओवैसींनी बाचाबाची केली. त्यानंतर आपण त्यांच्या कानशिलात लगावल्याचा दावा खर्जुल याने केला. या घटनेचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचेही त्याने म्हटले आहे. तर सदर घटनेसंदर्भात ओवैसीनी ट्विट करीत आपल्याला कोणताही मारहाण झाली नसल्याचा खुलासा केला. प्रसिद्धीसाठीचा हा प्रकार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे खर्जुल यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, हा स्टंट तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या घटनेची आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images