Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘सीसीटीएनएस’ने बदलेल पोलिसिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्राइम अॅण्ड क्राइम ट्रॅकिंग नेटवर्क अॅण्ड सिस्टीम्समुळे (सीसीटीएनएस) पोलिसिंगची परिभाषा बदलत असून, याकडे एक मिशन म्हणून पाहावे. या कामाला गतिमान करताना सातत्य ठेवण्याचे आदेश सीआयडीचे पोलिस महानिरीक्षक (आयजी) संजीवकुमार सिंघल यांनी दिले.

सीसीटीएनएस कार्यप्रणालीचा आढावा घेण्यासाठी पोलिस आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान ते बोलत होते. बैठकीला पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्यासह परिक्षेत्रातील सर्व पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त हजर होते. सकाळी ११ वाजता सुरू झालेली बैठक दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान संपली. या वेळेत आयजी सिंघल यांनी सर्व अधिकाऱ्यांकडून त्यांच्या क्षेत्रात सीसीटीएनएस कार्यप्रणालीचा कितपत वापर होतो, याची माहिती घेतली. शहर पोलिसांनी २०१५ तसेच २०१६ मधील माहिती सीसीटीएनएसवर टाकली असून, कामाच्या टक्केवारीत शहर पोलिस अव्वल राहिले. नाशिक ग्रामीण पोलिसांनीही ९३ टक्के काम पूर्ण केले आहे. सिंघल यांनी सीसीटीएनएसमध्ये नव्याने झालेल्या बदलाची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. तीन महिन्यापूर्वीही याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सीसीटीएनएसच्या वापराबाबत सूचित केले होते.

असे आहेत फायदे

स्टेशन डायरीची कॉपी हवी असेल तर संबंधित फिर्यादी किंवा आरोपीला ती डायरी पूर्ण झाल्याशिवाय कॉपी मिळत नाही. तसेच प्रत्यक्ष पोलिस स्टेशनला जाऊन ती मिळवावी लागते. लोकांना तक्रारी दाखल करणे, एफआयआरची प्रतीची मागणी करणे, भाडेकरूची तपासणी करणे, परवान्यासाठी अर्ज, आंदोलन-अर्जासाठी परवाना, चारित्र्य प्रमाणपत्रासाठी अर्ज, कर्मचाऱ्यांची पडताळणी, हरवलेल्या व्यक्तींची तसेच वस्तूंची तक्रार दाखल करता येणार आहे. सीसीटीएनएस प्रणालीमुळे देशभरातील पोलिस स्टेशन एकमेकांना जोडली गेली आहेत. ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यन्वित झाल्यास खूप फायदा होऊ शकतो. वाहन, अनोळखी, मृतदेह, सराईत गुन्हेगार अशा सर्वांची माहिती पोलिसांना सहजतेने उपलब्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्येही डॉक्टर, नर्सेसना मारहाण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

धुळे येथील डॉ. रोहन म्हामुनकर यांच्या मारहाणीचे प्रकरण अद्याप ताजे असतानाच जिल्हा रुग्णालय नाशिक येथे वैद्यकीय अधिकारी, प्रक्षिक्षणार्थी डॉक्टर व नर्सिंग कर्मचारी यांना मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी घडली. धुळ्यातील घटनेला आठवडा उलटत नाही तोच पुन्हा असा प्रकार घडल्याने डॉक्टर आणि परीचारिकेच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गुरुवारी रात्री उशिरा स्वा स्वाइन फ्लू वॉर्डमधील रुग्ण नसीर शाह (४०)शहा यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणणे, दमबाजी करणे आदी कलमान्वये, रुग्णाचे आईवडील आणि अन्य एकजण असा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेमुळे शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वच डॉक्टरांनी बंद पुकारला. तसेच आरोपींना अटक होऊन शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी पूर्ण होईपर्यंत काम बेमुदत बंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टमनचे धरणे आंदोलन

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस येथील डाक कर्मचारी व पोस्टमन यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी आखिल भारतीय डाक कर्मचारी पोस्टमन संघटना वर्ग-४ आणि ऑल इंडिया पोस्टल एम्प्लाईज युनियन पोस्टमन व ग्रूप-डी आणि आखिल भारतीय डाक कर्मचारी संघटना वर्ग-३ यांच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन मुख्य पोस्ट ऑफिसबाहेर करण्यात आले.

यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यानुसार, आऊट सोर्सींग पोस्टल एजंट योजना करा करण्यात यावी, पोस्टमन व एमटीएसच्या जागा त्वरित भरण्यात याव्यात, नोडल वितरण व्यवस्थेबाबत संघटेशी चर्चा करून बदल करावा, नवीन भरती होईपर्यत रोजंदारी कर्मचारी लावण्यावरील निर्बंध उठविण्यात यावे, रविवार व सुटीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना कामावर बोलविणे थांबविण्यात यावे, कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळोवेळी बैठका घेवून त्यातील निर्णयाची अंमलबजावणी करावी.

यासह विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे आर.ए. पाटील, डी.एल. पाटील, डी.ए. सैंदाणे. पी.के. जोशी. ए.बी. बागूल, एस.आर. पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेल्डिंग सिलिंडरचा देवळालीगावात स्फोट

$
0
0

नाशिकरोड : वेल्डिंग करणाऱ्या गॅसच्या टाकीचा देवळालीगावात शनिवारी (दि. १८) पहाटे अचानक स्फोट झाला. त्यानंतर आग लागली. त्यामध्ये एकजण किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देवळालीगाव येथील पाटील गॅरेजच्या मागे नेहे मळ्यात जियाउद्दीन डेपो आहे. त्याच्याशेजारी तनू मोटर गॅरेज आहे. शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास गॅस वेल्डिंगच्या टाकीचा अचानक स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने नागरिक खडबडून जागे झाले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग भडकू लागल्याने नागरिकांनी अग्नीशमन दलाला फोन केला. अग्नीशमनचे दोन बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाले. अग्नीशमनचे मुख्य अधिकारी एस. बी. निकम, वाहनचालक आर. एस. खर्जुल, पी. एस. कांदे, एस. के. आडके यांनी आग आटोक्यात आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमिकनगरला तरुणीचा विनयभंग

$
0
0



रंग लावण्याच्या बहाण्याने दुकानात घुसून एकाने तरुणीचा विनयभंग केला. ही घटना श्रमिकनगर येथे घडली असून, या प्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत संशयितास गजाआड केले आहे. बाळा उर्फ रोहित मेहंदळे (२९, रा. हनुमान मंदिराजवळ,श्रमिकनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. रंगपंचमीनिमित्त शुक्रवारी (दि. १७) तो परिसरातील एका दुकानात शिरला होता. मायलेकींना रंग लावण्यासाठी गेलेल्या संशयिताने तरुणीचा विनयभंग केला. ही घटना लक्षात येताच तरुणीच्या आईने जाब विचारला. मात्र, संशयितांने दोघा मायलेकींना शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयित मेहेंदळेस अटक केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक देवरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याच्या तयारीतील तिघे जेरबंद

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने मेळा बस स्थानकाजवळ थांबलेल्या पाच पैकी तीन जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. सरकारवाडा पोलिसांच्या गस्ती पथकाने ही कारवाई केली असून संशयितांच्या ताब्यातून देशी बनावटीचा पिस्तुलासह दुचाकी आणि दरोड्यात वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

सागर गणपत बोडके (१९), प्रकाश गुलाब रणमाळे (१८, रा. दोघे फुलेनगर, पंचवटी) व आदित्य श्याम पाटील (१९ रा. गिरणारे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. शनिवारी (दि. १८) पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संशयीत व त्यांचे दोन साथिदार ठक्कर बाजार ते सीबीएस दरम्यान दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शाईन (एमएच १५ एफजे ३७४२) गाडीजवळ थांबले होते. सरकारवाडा पोलिस स्टेशनचे पीएसआय सोनोने, हवालदार पंकज पळशीकर, वसंत पांडव, पोलिस नाईक प्रवीण वाघमारे, राजेश शेळके, प्रशांत मरकड, हेमंत पाटील, धनंजय शिंदे हे रात्री एक वाजेपासून गस्तीवर होते. पहाटे पाच वाजेच्या दरम्यान, पीएसआय सोनने यांना सदर संशयितांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने मेळा बस स्थानक परिसरात छापा मारला. यावेळी मेळा बसस्टॉपच्या कॉर्टरजवळील रोडवर पाच व्यक्ती संशयास्पद दिसून आल्या. पोलिसांनी त्यांच्याकडे मोर्चा वळविला असता संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांच्यापैकी तिघांना जेरबंद केले. त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल, जिवंत काडतुसे, फायटर, लोखंडी सुरा, मिरची पुड असा ऐवज सापडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

नोकराकडूनच गंडा

वाहन बॅटरी वितरकास एका नोकरानेच तीन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश दत्ताराव इक्कर (रा. महात्मानगर, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. थत्तेनगर येथील राजेंद्र मुलचंद हे वाहनातील बॅटरीचे मुख्य वितरक आहे. तर योगेश इक्कर हा त्यांच्याकडे वितरण आणि वसुलीचे काम करतो. त्याने तीन महिन्यात नाशिकसह भगूर परिसरातील वितरकांकडून सुमारे दोन लाख ९२ हजार २३२ रुपयांची वसुली केली. मात्र, ती रक्कम कंपनीत अथवा गोठी यांच्या बँक खात्यात न भरता परस्पर अपहार केला. संशय आल्याने गोठी यांनी सबडिलरकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

शरयू पार्कमध्ये घरफोडी
आडगाव शिवारातील शरयू पार्क भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी लॅपटॉप चोरी केला. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुश्मिता श्रीपती चंद्र (रा. मढवई हाईटस, शरयू पार्क) यांच्या तक्रारीनुसार, गुरूवारी (दि. १६) कामानिमित्त घराबाहेर गेल्या. या काळात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून हॉलमध्ये ठेवलेला १५ हजारांचा लॅपटॉप चोरी केला.

वाहनांचे नुकसान

नवरात्रोत्सवातील वर्गणीच्या कारणातून दाम्पत्यास धक्काबुक्की करीत तिघांनी वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी एकास अटक केली आहे. संशयितांचे दोन साथिदार फरार असून, ही घटना सावरकरनगर येथे घडली आहे. स्वप्निल शांताराम आव्हाड (रा. राजश्री पार्क, सावरकरनगर) असे संशयिताचे नाव आहे. रवींद्र भास्कर धुमाळ (रा. मृत्युंजय अपार्ट. सावरकरनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. शुक्रवारी (दि. १७) दुपारी धुमाळ सावरकरनगर येथे आपल्या घरासमोर उभे असतांना संशयित व त्याचे दोन साथीदार तेथे आले. त्यांनी धुमाळ यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तसेच मधे आलेल्या धुमाळ यांच्या पत्नीला दूर लोटले. तिघांनी दगडफेक केल्याने घराबाहेर असलेल्या कारच्या व खिडकीच्या काचा फुटल्या. या प्रकरणी सातपूर पोलिसांत नोंद झाली आहे.

रेल्वेच्या धडकेने मृत्यू

मनमाड : गोवा रेल्वे एक्स्प्रेसची धडक बसल्याने ५५ वर्षीय व्यक्ती ठार झाल्याची घटना शनिवारी नांदगाव येथे घडली. शंकर तुकाराम पुंडे (रा. कोपरगाव) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. साकोरे (ता. नांदगाव) येथे त्यांची सासुरवाडी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेने वृद्ध महिला ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील उत्तमनगर येथील गतिरोधकावर तोल गेल्याने आणि मागून आलेल्या ट्रकच्या धडक बसल्याने एका वृद्ध महिला शुक्रवारी (दि. १७) ठार झाली. शोभा जयप्रकाश भांबेरे (६२) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेमंत जयप्रकाश भांबेरे हे आई शोभा यांना दुचाकीवरून (एमएच १५ बीटी ६४७७) घेऊन घरी जात होते. यावेळी उत्तमनगर येथे त्यांची दुचाकी गतिरोधकावर आदळली. गतिरोधकांची उंची अधिक असल्याने शोभा यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर खाली पडल्या. याच वेळी मागून आलेल्या आयशर ट्रकच्या (एमएच ४ सीजी ३०६६) त्या चाकाखाली आल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. भांबेरे कुटुंबीय सिडकोतील श्रीरामनगर परिसरात राहतात. या अपघातासंदर्भात अंबड पोलिसांनी ट्रकचालक अप्पा बच्छाव (रा. महाले फार्म, सिडको) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

गरज पट्टे आखण्याची
काही दिवसांपूर्वी लेखानगर येथे अशाच प्रकारे अपघात झाला होता. गतिरोधकांमुळे होणारे अपघात सध्या वाढत आहेत. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याची गरज निर्माण झाली. लेखानगर येथे झालेल्या अपघातानंतर आम आदमी पार्टीच्या वतीने पांढरे पट्टे मारण्यात आले होते. महापालिकेकडून गतिरोधकांवर असे पट्टे मारले जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेशंटच्या नातेवाइकांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उपचारासाठी दाखल झालेल्या पेशंटच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यासह प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर आणि आधिपरिचारिकेस बेदम मारहाण केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीचा प्रकार गुरूवारी रात्री घडला होता. तर, शुक्रवारी या विरोधात कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला.

नासिर शौकत शाह याला गुरूवारी (दि.१६) दुपारी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. उपचाराअंती त्यास स्वाइन फ्लू सदृष्य लक्षणे आढळून आली. त्यानुसार शाहला लागलीच स्वाइन फ्लू कक्षात हलविण्यात आले. कक्षातील रूम क्रमांक एकमध्ये उपचार घेत असताना रात्री अचानक त्याची प्रकृती खालावली. पुढील औषधोपचार होईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. ही घटना नातेवाइकांना कळताच त्यांनी हॉस्पिटलमध्ये आरडाओरड करीत गोंधळा घातला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच नासिरचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. या दरम्यान, पेशंटची आई व अन्य नातेवाइकांनी थेट स्वाइन फ्लू कक्षात धाव घेत डॉ. राहुल पाटील आणि आधिपरिचारिका चारुशिला इंगळे यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या घटनेमुळे हॉस्पिटलमध्ये रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी डॉ. पाटील यांच्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये शाहच्या आईसह अन्य दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी नोकारास मारहाण करणे तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुरूवारी रात्री घडलेल्या या घटनेचे पडसाद शुक्रवारी सकाळी उमटले. सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेहमीच नातेवाइकांच्या रोषास सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आणि नर्सेस संघटनांनी शुक्रवारी दुपारी कामबंद आंदोलन छेडले. संशयितांना अटक करावी तसेच हॉस्पिटलमध्ये पुरेसे कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी करण्यात आली.

कारवाईचा इशारा
सिव्हिलमध्ये पेशंट दगावल्यानंतर असे प्रसंग नेहमीच घडतात. मात्र, कायदा हातात घेऊन काही साध्य होत नाही. अशा प्रकारे कृत्य केल्यास वैद्यकीय अधिनियम २०१० या विषेश कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाते. किंबहुना अशा घटनेत मोठी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे नातेवाईकांनी अथवा आप्तेष्ठांनी संयम राखावा. वैद्यकीय हलगर्जीपणा बाबत काही तक्रार असल्यास नातेवाईकांनी पोलिस अथवा संबंधित आरोग्य यंत्रणेकडे तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाइकस्वारावर बिबट्याचा हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील जळगाव येथे बिबट्याने शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी केलेल्या हल्ल्यात २७ वर्षीय महिलेसह एक पुरुष जखमी झाल्याची घटना घडली.

सुंदरपूर येथील दीपक सूर्यवंशी हे पत्नीसह निफाड येथे बाजारात गेले होते. परतत असतांना सूर्यवंशी हे मोटारसायकलने सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान सुंदरपूर येथे परत जात असताना जळगाव-काथरगाव रस्त्यावर कदम वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला दबा बसलेल्या बिबट्याने अचानक सूर्यवंशी यांच्या मोटारसायकलवर झेप घेतली. गाडीवर मागे बसलेल्या रत्ना (२७) यांच्या पायाला चावा घेतला. अचानक झालेल्या हल्ल्याने दीपक सूर्यवंशी हे पत्नी रत्ना, आपल्या लहान मुलासह गाडीवरून खाली पडले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला तेव्हा जागीच उभ्या असलेल्या बिबट्याने त्यांच्याकडे रोखून पाहिले. नंतर मात्र तो पळून गेला. तात्काळ आलेल्या नागरिकांनी जखमी रत्ना यांना तातडीने निफाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. नंतर त्यांना नाशिकमधल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. रत्ना यांना शनिवारी (दि. १८) घरी सोडण्यात आले.

कोल्हा विहिरीत पडला
निफाड : तालुक्यातील रानवड येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास जिवंतपणे विहिरीबाहेर काढण्यास वन विभागाला यश आले. रानवड येथील सावरगाव रस्त्यालगत असलेल्या शेतात पांडुरंग वाघ हे राहतात. त्यांना शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी घराजवळ कोल्हा दिसला. कोल्हा निघून जाईल, असे त्यांना वाटले. मात्र, तोच कोल्हा शनिवारी (दि. १८) सकाळी घराशेजारील २० ते २५ फूट खोल विहिरीत पडलेला वाघ यांना दिसला. त्यांनी वन विभागाला कळवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूजल पातळी घटल्याने वृक्षसंकट

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक जिल्ह्यातील जवळपास निम्मी म्हणजेच तब्बल सात तालुक्यांमधील भूजल पातळीत घटली आह. त्यामुळे राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी दोन कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात नाशिक जिल्ह्यात लागवड करण्यात आलेल्यांपैकी ९८.३५ टक्के रोपे जगविण्याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी १ जुलै रोजी राज्यात एकाच दिवशी वन महोत्सव राबविण्यात आला. राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राज्यभरात एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य होते. या उपक्रमाला नाशिक जिल्ह्यातही सर्वच शासकीय विभागांसह, अशासकिय, निमशासकिय विभाग व सेवाभावी संस्था, नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात नाशिक जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त रोपांची लागवड झाली. परंतु, आता ही रोपे टिकविण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या उपक्रमात ३० लाख १९ हजार ४८७ इतकी रोपे लागवड झाली. ऑक्टोबर २०१६ अखेर लागवड झालेल्यापैकी २९ लाख ६९ हजार ६६९ इतकी रोपे जिवंत होती. या जिवंत रोपांचे प्रमाण ९८.३५ टक्के इतके होते. पावसाळ्यात उशिरा पाऊस झाला होता. त्यामुळे जिवंत रोपांची टक्केवारी नाशिक जिल्ह्यात वाढली. परंतु आता ही जिवंत रोपे टिकविण्याचे वन खाते, सामाजिक वनीकरण खाते, वनविकास महामंडळ, वन्यजीव विभाग यांच्यासह इतर शासकीय विभागांमार्फत मोठे आवाहन उभे राहिले आहे.

डोंगर-दऱ्यांमध्ये भकास
भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या जानेवारी २०१७ च्या अहवालानुसार जिल्ह्यातील सात तालुक्यांतील ७२ गावांतील भूजल पातळीत १ मीटरपेक्षा जास्त घट आली आहे. त्यामुळे डोंगर-दऱ्यांमधील जलस्त्रोत येत्या काही महिन्यांत कोरडेठाक पडण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर या जिवंत रोपांना वाचविण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. भूजल पातळी घटलेल्या तालुक्यांत बागलाण, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक व येवला या तालुक्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विभागनिहाय जिवंत रोपे
विभाग........लागवड केलेली संख्या....जिवंत रोपे संख्या......टक्केवारी
- उपवनसंरक्षक पश्चिम भाग....११,६१,५३२....११,४५,९२५....८६.६५
- उपवनसंरक्षक पूर्व भाग........९,३८,५७१....९,३०,६४६....९९.१६
- उपविभागीय वन अधिकारी मालेगाव....५,७६,८००....५,७१,३८१....९९.०६
- इतर शासकिय विभाग....२,८७,४८७....२,६६,९०७....९२.८४
- विभागीय वनविकास महामंडळ....२९,९९७....२९,८६३....९९.५५
- उपसंचालक सामाजिक वनीकरण....२५,०००........२४,८५७....९९.४२
- वन्यजीव विभाग....१००....९०....९०
- एकूण....३०,१९,४८७....२९,६९,६६९....९८.३५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेला दिलासा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील जमा नोटा स्वीकारण्यावरील निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असलेल्या ३४१ कोटी रुपये आता स्टेट बँक व आयडीबीआयच्या करन्सी चेस्टमध्ये जमा होणार आहेत.

जमा होणाऱ्या नोटा स्वीकारल्या जात नसल्यामुळे बँकेच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे या निर्णयामुळे जिल्हा बँकेला दिलासा मिळणार आहे. अद्याप याबाबत कोणतेही आदेश आले नसले तरी तसा निर्णय झाल्याची चर्चा रंगली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. येत्या मंगळवारपासून (दि. २१) या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने आठ नोंव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशातील ​जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे राज्यात या जिल्हा बँकेचे आर्थिक कंबरडे मोडले होते.

या बँकेतून गैरप्रकार झाल्याच्याही अनेक तक्रारी होत्या. त्यात नाशिक जिल्हा बँकेचा विषय राज्यभर गाजला. या बँकेत ४७ कोटींच्या नोटांची अदलाबदली आणि २७३ कोटींच्या संशयास्पद ठेवी जमा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आयकर, लाचलुचपत विभागापाठोपाठ नाबार्डनेही नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी केली होती. अशाच तक्रारी राज्यभरातून आल्यानंतर त्यामुळे रिझर्व्ह बँकेने रद्द केलेल्या नोटा या बँकांद्वारे करन्सी चेस्टमध्ये स्वीकारण्यास मनाई केली होती. त्यामुळे या बँकांमध्ये सुमारे चार महिन्यांपासून या नोटा पडून आहेत.

जिल्हा बँकांमधील जमा नोटा स्वीकारण्यावरील निर्बंध मागे घेतल्याची माहिती मिळाली आहे. पण त्याबाबतचे अधिकृत पत्र प्रास्त झालेले नाही. तसे पत्र मिळताच एसबीआय आणि आयडीबायच्या करन्सी चेस्टमध्ये ती रक्कम जमा केली जाईल. गेल्या चार महिन्यांपासून ३४१ कोटींच्या नोटा बँकेकडे पडून आहे. मात्र, आता बँकेला दिलासा मिळेल.
- वाय. आर. शिरसाठ, कार्यकारी संचालक, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळवारपासून रोजगार मेळावा

$
0
0

३९ उद्योगांतील ६६६ रिक्त पदांसाठी नियुक्ती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुशिक्षित बेरोजगारांसाठी २१ व २२ मार्च रोजी सकाळी ९.३० ते ५.३० वाजेपर्यंत महात्मा फुले कलादालन, शालिमार चौक, नाशिक येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या ३९ उद्योगांतील एकूण ६६६ रिक्त पदांसाठी नियुक्ती देण्यात येणार आहेत.

महारोजगार नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर १५ अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे. सेवायोजना नोंदणी केली नसल्यास http:// rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच याबाबत काही अडचण असल्यास १८६०२३३०१३३ या क्रमांकाचा उपयोग करावा. रोजगारासाठी किमान वय १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे असून एसएससी, एचएचसी, एमसीव्हीसी, कोणत्याही शाखेचे पदवीधर, आयटीआयमधील फिटर, इलेक्ट्रीशियन, टर्नर, बॉयलर अटेंडट, मेकॅनिकल ड्राप्समन, पेंटर, ग्राईंडर, ऑटोमोबाइल, मोटार मेकॅनिकल, वेल्डर, शिट मेटल, डी.फार्म, बी.फार्म, नर्सिंग जीएनएम/ एएनएम, नर्सिंग बीएसस्सी, डिप्लोमा इंजिनीअरिंग मेकॅनिकल/ऑटोमोबाइल, बीई/ बीटेक सर्व क्षेत्र, एच आर एमपीएम/एमबीए, एमबीबीएस/बीएचएमएस, टॅली, सीएनसी, हार्डवेअर व नेटवर्किंग अशा शैक्षणिक पात्रता असाव्यात.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग मार्गदर्शन केंद्र आणि दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

येथे करा नावनोंदणी

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी व किमान पाच प्रतीत बायोडाटा, फोटो, आधारकार्ड, सेवायोजना नोंदणीसह मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन विभागाचे सहायक संचालक संपत चाटे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रावसाहेब थोरात ऑडिटोरियम दोन महिन्यांत चकाचक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सभागृह केवळ चांगले असून, पुरेसे ठरत नाही, त्यासाठी व्यवस्थाही तितकीच चोख हवी, असा मुद्दा रावसाहेब थोरात सभागृहाविषयी ‘मटा’ने मांडल्यानंतर मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेने तितक्याच तत्परतेने त्याची दखल घेत सभागृहासंदर्भात येत्या दोन महिन्यांत अपेक्षित सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. कुठल्याही स्थितीत रसिकांची गैरसोय होऊ दिली जाणार नसल्याचेही ‘मविप्र’ने अधोरेखित केले आहे.

‘सभागृह चांगले, पण अव्यवस्थेने नाडले’ या शीर्षकाखाली ‘मटा’ने १२ मार्चच्या अंकामध्ये ‘मटा कॅम्पेन’अंतर्गत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत ‘मविप्र’ने अपेक्षित बदल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे रावसाहेब थोरात ऑडिटोरियम हे गंगापूर रस्त्यावर शहराच्या मध्यवर्ती भागात येते. त्यामुळे येथे बाराही महिने सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध कार्यशाळा, चर्चासत्रे आदी उपक्रमांसाठी वर्दळ असते. चांगल्या सुविधा, ऐसपैस जागा आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या या सभागृहाभोवताली काही समस्यांचा विळखा आहे. या मुद्द्यावर ‘मटा’ने प्रकाशझोत टाकला होता. येथील समस्यांच्या निवारणासाठी प्रामुख्याने नियोजनावर भर द्यायला हवा, अशा आशयाच्या प्रतिक्रियाही रसिकांमधून व्यक्त झाल्या होत्या.

यासंदर्भात संस्थेची बाजू मांडताना ‘मविप्र’च्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी आगामी दोन महिन्यांत सभागृहाच्या व्यवस्थेत अपेक्षित सुधारणा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्या म्हणाल्या, की सभागृहाच्या व्यवस्थेत संस्थेने कुठेही कमतरता ठेवलेली नाही. मात्र, तरीही पार्किंग किंवा प्रवेशद्वारासारख्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या सूचना संस्थेच्या संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. याशिवाय येथे सभागृहाच्या देखभालीत सातत्य ठेवले जाते. गरजेनुसार कामे प्रलंबित न राहू देता नित्याने दुरुस्ती व स्वच्छता केली जाते. मात्र, ‘मटा’च्या वृत्तात सुचविलेल्या अपेक्षांनुसार कार्यवाही करून नाशिककरांच्या सेवेत तत्पर सभागृह उपलब्ध करू, असे त्यांनी सांगितले.

आगामी दोन महिन्यांत सभागृहाच्या व्यवस्थेत काही सुधारणा करण्यात येणार आहेत. येथील व्यवस्थेत संस्थेने कमतरता ठेवलेली नाही. मात्र, पार्किंग किंवा प्रवेशद्वारासारख्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.

- नीलिमा पवार, सरचिटणीस, ‘मविप्र’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भलिंग निदान रडारवर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या प्रमाणात लक्षणीय घट होत असून, सिन्नरसारख्या निम्म्याहून अधिक तालुक्यांत परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कठोर कायदे असतानाही गर्भलिंग निदानासारखे प्रकार चोरीछुप्या पद्धतीने सुरू असून, संबंधित डॉक्टर्सवर कठोर कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. विशेष मोहिमेद्वारे पुढील महिनाभर धाडसत्र सुरू राहणार असून, अशा डॉक्टरांची नावे उघड करणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस देण्याची घोषणा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी केली.

या मोहिमेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी दुपारी पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त दत्तात्रय कराळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी सुशील वाघचौरे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डेकाटे आदींसह अधिकारी उपस्थित होते. मुलींचे घटते प्रमाण, तसेच लिंग गुणोत्तर प्रमाण रोखणे जिल्हा प्रशासनासाठी आव्हान ठरले आहे. खरेतर दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण किमान ९६५ असणे आवश्यक असताना नाशिक जिल्ह्यात ते अवघे ९२५ एवढेच आहे. याचाच अर्थ मुलींचा जन्मदर घटला असून, त्यामागची कारणे प्रशासनाने शोधून काढली आहेत.

गर्भलिंग निदान चाचणी हे त्यापैकी एक प्रमुख कारण असून, अशा चाचण्या रोखून संबंधित डॉक्टर्सवर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पुढील महिनाभर जिल्ह्यात धडक मोहीम राबविण्यात येणार असून, त्याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. त्यासाठी शहर, नगरपालिका आणि ग्रामीण पातळीवर विशेष पथके स्थापण्यात येणार असून, प्रत्येक पथकामध्ये महसूल, पोलिस, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि वैद्यकीय विभागाच्या एका अधिकाऱ्याचा समावेश राहणार आहे. जिल्ह्यात ४२३ नर्सिंग होम्स, तर ६१८ सोनोग्राफी सेंटर्सअसून, गर्भलिंग निदान चाचण्या करून देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.


एजंट्सवर नजर

एजंटगिरीच्या माध्यमातून अशा चाचण्या करण्यासाठी सावज शोधले जात असून, मुलीचा गर्भ असेल, तर तपासणीनंतर किमान आठ ते दहा दिवसांनी त्याची माहिती संबंधित कुटुंबाला दिली जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. डॉक्टर, एजंटप्रमाणेच संबंधित कुटुंबीयांवर कठोर कारवाई होऊ शकते, असा इशारा यावेळी देण्यात आला.

गर्भलिंग निदान चाचणी करणारे डॉक्टर्स, तसेच हॉस्पिटल्सची माहिती देणाऱ्या नागरिकांना संबंधित प्रकरण कोर्टात दाखल झाल्यानंतर लगेचच सरकार २५ हजारांचे बक्षीस देणार आहे. अशा गैरप्रकारांची माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येणार असून, नागरिक १८००२३३४४७५ या टोल फ्री क्रमांकावर तसेच www.amchimulgi.in या वेबसाइटद्वारेही तक्रार करू शकणार आहेत.

-राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका मैदानाची दुरवस्था

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महापालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवक यांच्या दुर्लक्षामुळे चेहेडी पंपिंग स्टेशन येथील एकमेव असलेल्या पालिका मैदानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हे मैदान केवळ शोभेचे बाहुले बनले आहे. चेहेडी पंपिंग स्टेशन येथे प्रभाग क्र. १९ मधील भगवा चौक येथे महामार्गालगत पालिकेचे मैदान आहे. या मैदानाचे उद्घाटन झाले होते. विधानपरिषदेचे आमदार जयंत जाधव व तत्कालिन स्थानिक नगरसेविका शोभा आवारे यांच्या प्रयत्नांतून या मैदानाच्या देखभालीकडे पालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याने सध्या या मैदानाची दुरवस्था झालेली दिसून येत आहे. त्यामुळे या मैदानाचा वापर स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने करता येणेही अशक्य झाले आहे.

ट्रॅकची प्रतीक्षाच

या मैदानावर जॉगिंग ट्रॅकची अद्यापही सुविधा उपलब्ध झालेली नाही. जॉगिंग ट्रॅक उपलब्ध करण्यासाठी शोभा आवारे यांनी या ठिकाणी झाडेही लावली होती. परंतु, पाण्याअभावी ही सर्व झाडे दिसेनासी झाली आहेत. शिवाय जॉगिंग ट्रॅकच्या नियोजित जागेवर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे व गवत उगवले आहे. मैदानाला दगडी भिंतीचे कुंपण घालण्यात आलेले आहे. मात्र पूर्व व दक्षिण बाजुकडील कुंपण गेल्या तीन वर्षांपासून अपुर्णावस्थेत आहे. त्यामुळे या बाजुने या मैदानाचा वापर खासगी कामांसाठीही होत आहे. शिवाय कुंपणाच्या अपूर्ण कामामुळे या मैदानावर सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रवेशद्वार गायब

या मैदानाला दोन बाजुने प्रवेशद्वार आहेत. त्यापैकी भगवा चौकाच्या बाजुकडील प्रवेशद्वार गायब झालेले आहे. त्यामुळे या मैदानाचे प्रवेशद्वार कायम उघडे राहते. परिणामी, महामार्गावरील काही वाहने या मैदानावरूनच ये-जा करतात. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी या मैदानावर खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.

पाणी, विजेची सोय नाही

या मैदानावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. याशिवाय या मैदानावर पालिकेने वीजेची सोय केलेली नसल्याने येथे अद्याप एककी पथदीप नाही. त्यामुळे रात्री या मैदानावर मद्यपींचा वावर वाढतो. पाणी नसल्याने या मैदानावर धुळीचे साम्राज्य दिसून येते. त्याचाही नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो.

चेहेडी पंपिंग स्टेशन येथील मनपाच्या मैदानाची कोणत्याही प्रकारची देखभाल केली जात नाही. त्यामुळे या मैदानाची दुरवस्था झाली आहे. या मैदानावर पिण्याचे पाणी, पथदीप, जॉगिंग ट्रॅक, कुंपण या सोयी उपलब्ध झाल्यास नागरिक या मैदानाचा वापर करतील.

-नितीन पेखळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खोदलेले रस्ते दुरुस्त करावेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक महापालिका हद्दीत विविध मोबाइल कंपनी व महावितरण कंपनी वीज वायर लाइन टाकायचे काम करतात. त्या लाइन टाकायच्या कामासंदर्भात महापालिकेकडून रितसर परवानगी घेऊन ठरलेल्या दराप्रमाणे रक्कम जमा करतात. काम झाल्यावर आहे त्या परिस्थितीत करून देण्याचा अटी मान्य करतात. मात्र महापालिका प्रशासन अशा कामांना फक्त परवानगी देऊन मोकळी होते. ते काम पूर्ण झाले की नाही याची कुठली ही खात्री करत नाही. आणि नाशिककरांच्या कर रूपातून जमा झालेल्या पैशांवर रस्ते दुरुस्तीचे ठेके काढतात, या बाबीकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत स्वप्नील येवले यांनी निवेदन दिले आहे. यात गेल्या आठवड्याभरापासून घारपुरे घाट ते रामवाडी परिसराला जोडणारा जो पूल आहे. त्या पुलाच्या पादचारी मार्गावर अशाच एका मोबाइल कंपनीने केबल टाकली होती. पण आता अचानक त्याला सिमेंटचे पक्के बांधकामच केलेले दिसते. अगोदरच त्या पूलाला पादचारी मार्ग छोटा आहे. या पूलावरून शाळा व कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. अनेक ठिकाणी फूटपाथवर पेव्हर ब्लॉक काढून केबल टाकल्या जातात. मात्र पुन्हा पेव्हर ब्लॉक टाकले जात नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक पडून जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक ठिकाणी लोक पादचारी मार्ग न वापरता रस्त्यातून चालतात. एखाद्या हातावर पोट भरणाऱ्यांने हाताडी लावली तर महापालिका अतिक्रमण विभाग लगेच त्याची हातगाडी जमा करते. मग आता जर या मोबाइल कंपनीने अतिक्रमण केले असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी यात करण्यात आली आहे.

एकीकडे महापालिका चांगले रस्ते बनवते आणि हे कंपनीवाले ते रात्रीतून खड्डे पाडून तो रस्ता खराब करतात. त्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात. महापालिकेनेच एक मोठा व्यासाचे पाइप रस्त्याच्या बाजूने शहरभर फिरवून या मोबाइल कंपन्यांना भाडेतत्त्वावर वापरावयास दिल्यास महापालिकेला आर्थिक फायदा होईल.

स्वप्नील येवले, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे १७ रुग्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात स्वाइन फ्लूबाधित १७ रुग्ण असून, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूचा प्रसार रोखता यावा, तसेच रुग्णांना तत्काळ योग्य उपचार मिळावेत, यासाठी आयसोलेटेड स्वाइन फ्लू कक्ष सुरू करण्यात आला असून, जिल्ह्यात १६ हजार टॅमी फ्लूच्या गोळ्या उपलब्ध आहेत.

स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक-दोन दिवसांपूर्वी नाशिकला स्वाइन फ्लूच्या बाबतीत संवेदनशील जिल्हा म्हणून घोषित केले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे १६ रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यंदादेखील हे प्रमाण अल्पसे वाढल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यंदा स्वाइन फ्लूचे १७ रुग्ण आढळले. त्यापैकी सात रुग्ण धुळे, अहमदनगर, औरंगाबाद आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधील असून, त्यांच्यावर नाशिकमध्येच उपचार सुरू आहेत. सहा रुग्ण नाशिक महापालिका कार्यक्षेत्रात आढळले असून, ग्रामीण भागात चार रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी निफाड तालुक्यात दोन, तर सिन्नर व नांदगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या १७ रुग्णांपैकी चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्यामध्ये सिन्नर आणि महापालिका क्षेत्रातील एकाचा समावेश आहे.

उपाययोजनांवर भर

स्वाइन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करा, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी यंत्रणेला दिले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमधील स्वाइन फ्लू कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. महापालिकेनेही स्वाइन फ्लू संशयितांवर उपचारांसाठी उपाययोजना केल्या आहेत. स्वाइन फ्लूवर टॅमी फ्लूची गोळी उपयुक्त मात्रा ठरत असून, जिल्ह्यात १६ हजार गोळ्या उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली आहे.

खासगी हॉस्पिटलनाही परवानगी

सर्व वैद्यकीय साधनसामग्रीने सज्ज खासगी हॉस्पिटल्सना स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करता येणार आहेत. हॉस्पिटल्सना तशी परवानगी असली तरी संबंधित रुग्णावर कोणते उपचार सुरू आहेत, किती दिवस उपचार सुरू राहणार आहेत यासह संबंधित रुग्ण दगावल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला देणे बंधनकारक असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेचा खांब बनलाय धोकादायक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोड येथील नारायणबापू नगर येथील इंदिरा गांधी पुतळा ते जेलरोड मार्गावरील विजेचा खांब वाकलेला आहे. तो कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी तो हटविण्याची मागणी केली आहे.

विजेच्या वायरींचा कनेक्शन असणारा हा खांब अनेक दिवसांपासून वाकलेला आहे. तो बदलण्याची मागणी नागरिकांनी वेळोवेळी केली आहे. इंदिरा गांधी पुतळा ते कोयना सोसायटी व गोदावरी कॉलनी रस्त्यावर चौफुली आहे. या चौफुलीवर असणारा हा विजेचा खांब धोकादायक झाला आहे. या मार्गावर नोकरदार, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची ये-जा असते. दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूकही वाढली आहे. हा खाब वादळी वाऱ्यामुळे कोसळला तर अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वाकलेल्या विजेच्या खांबांवर वीजतारांचा मोठा भार आहे. या ठिकाणी कधीही शॉर्ट सर्किट होते. महापारेषण हे विजेचे मुख्यालय येथून जवळच आहे. तरी अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

जेलरोड-उपनगर मार्गावरील विजेचा खांब वाकल्याने धोकादायक झाला आहे. विजेच्या तारा असल्यामुळे तो अधिकच धोकादायक झाला आहे. रात्री हा खांबच दिसत नाही त्यामुळे अनेकदा वाहने त्यावर धडकली आहेत. हा खांब त्वरित हटविणे आवश्यक आहे.

-सोपान वाटपाडे, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात रंगले पारंपरिक ‘रंगयुद्ध’

$
0
0

सामुदायिक रंगवर्षावात ‘इंद्रधनू’चा मनोहारी नजारा

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवल्यात शनिवारी (दि. १८) सायंकाळच्या पाचच्या सुमारास टिळक मैदानातील दोन्ही बाजूने आमनेसामने उभे ठाकणारे ट्रॅक्टर्स अन् त्यात रंगाने भरलेल्या असंख्य पिंपासह रंगांचा सामना खेळण्यासाठी आतूर झालेली येवलेकर. हे, उत्साहवर्धक चित्र यंदाही दिसले.

निमित्त ठरलं ते रंगपंचमीच्या दिवशी परंपरेप्रमाणे शहरात खेळल्या गेलेल्या रंगपंचमीच्या सामुदायिक रंगांच्या सामन्याचे. रंगपंचमीनिमित्त शहरातील ऐतिहासिक अशा टिळक मैदानासह डी. जी. रोडवर यंदाही हे सामुदायिक रंगांचे सामने मोठया चुरशीने खेळले जाताना येवला शहरवासीयांनी त्याची पर्वणी साधत आनंद द्विगुणीत केला. शहरातील टिळक मैदानात शनिवारी सायंकाळी (दि. १७) मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या हस्ते हवेत विविधरंगी फुगे सोडून व माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सामुदायिक रंगपंचमीच्या सामन्याचा प्रारंभ केला गेला. सामन्याला सुरुवात होताच पुढे जवळपास पाऊणतास टिळक मैदानातील दुतर्फा असलेल्या...हळुवार आमने-सामने पुढे सरकणाऱ्या ट्रॅक्टर्सवरील पिंपातून परस्परावर रंगाचा जोरदार वर्षाव होत जणू ‘रंगयुद्ध’ रंगले होते. या जोरदार रंगवर्षावात हवेत नाना रंगांचा अनोखा मिलाप होताना एकप्रकारचे इंद्रधनुष्याची मनोहारी कमानच निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत होते. यावेळी पोलिस निरीक्षक संजय पाटील, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, संजय कुक्कर आदींची उपस्थिती होती. मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी यांनी स्वतः ट्रॅक्टरवर उभे राहून रंग उडवून आनंद लुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यही सहलीला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या २१ मार्च रोजी होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य हे स्वतंत्ररित्या सहलीला रवाना झाले. याअगोदरच शिवसेना व काँग्रेसचे सदस्य सहलीला गेले आहेत. अटीतटीच्या या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेस एकत्र आले असून, राष्ट्रवादी व भाजपचे सूत जमल्याची चर्चा आहे. माकपने अद्याप भूमिका जाहीर न केल्यामुळे दोन्ही आघाडीत माकपचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

एकूण ७३ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी ३७ चा आकडा आवश्यक आहे. राष्ट्रवादीने एक अपक्ष व आपल्या १८ सदस्यांसह १९ सदस्य आपल्याकडे असल्याचे म्हटले आहे. भाजपने एका अपक्षासह १५ सदस्य आपल्याकडे असल्याचे म्हटले आहे. यामुळे सत्ता स्थापण्यासाठी चुरस वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images