Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मतमोजणीला हिंसक वळण; पोलिसांचा गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आरोप प्रत्यारोपातून वाढलेल्या वादानंतर पंचवटीतील प्रभाग तीनमध्ये संध्याकाळनंतर हिंसक आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. आंदोलनकर्त्यांना आवरताना पोलिसांना लाठीचार्ज आणि नंतर हवेत तीन ते चार राऊंड फायर करावे लागले. आंदोलनकर्त्यांच्या दगडफेकीत एका पोलिस कर्मचाऱ्यासह तीन ते चार अधिकाऱ्यांना गंभीर दुखापत झाली. रात्री उशिरा हा गोंधळ आवरण्यात पोलिसांना यश आले.
भाजपचे शहराध्यक्ष, तसेच आमदार बाळासाहेब सानप यांच्या पुत्राच्या उमेदवारीमुळे लक्ष लागलेल्या प्रभाग तीनच्या मतमोजणीतील गोंधळ उशिरापर्यंत सुरू राहिला. दोन ईव्हीएम टाकण्यात आले, निवडणूक अधिकारी आणि पर्यवेक्षक अधिकारी दारू प‌िऊन आले, मेमरी कार्ड बदलण्यात आले असे डझनभर आरोप विरोधकांकडून करण्यात आले. या प्रश्नांना पूरक उत्तरे देण्यात निवडणूक अधिकारी अपयशी ठरल्याने कार्यकर्त्यांमधील असंतोष वाढत गेला. त्यातच भाजपच्या तीन तर सेनेच्या अवघ्या एका उमेदवारास विजय मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यातच शहरात सर्वत्र भाजपाला बहुमत मिळाल्याची वार्ता पुढे आल्याने असंतोष निर्माण झाला. रात्री आठ वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांसह निवडणूक कर्मचाऱ्यांच्या दिशेने जोरदार दगडफेक केली. पोलिसांनी सुरुवातीला लाठीचार्ज करीत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्त्यांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी यानंतर हवेत गोळीबार केला. मीनाताई ठाकरे स्टेड‌ियमच्या आजूबाजूस असलेल्या काळोखाचा फायदा घेत लपलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी शोधून ताब्यात घेतले.
अंधारातून दगडफेक
या बाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले की, संध्याकाळी अंधार पडल्यानंतर आंदोलकांचा जोर वाढला. त्यानुसार आम्ही सुरूवातीस समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लाठीचार्ज व शेवटी हवेत गोळीबारा झाला. आता परिस्थिती नियंत्रणात असून, संबंध‌ितांना अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे.
काही समाजकंटकांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला केला होता. माझ्यासह आमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
- डॉ. रवींद्रकुमार सिंघल,
पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ईव्हीएममध्ये घोळ केल्याचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मुंबईनाका परिसरातील दीपालीनगर येथील शर्मा मंगल कार्यालयात अखेरच्या टप्प्यात मतमोजणी करणारे कर्मचारी आणि मनसेचे उमेदवार व कार्यकर्ते यांच्यात उडालेल्या शाब्द‌िक चकमकीचे रुपांतर अल्पावधीतच तुफान गोंधळात झाले. यादरम्यान मनसेसह विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि उमेदवारांनी ईव्हीएममध्येच घोळ असल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करीत आक्षेप घेतला. परिणामी, तणावाच्या बनलेल्या वातावरणानंतर सुमारे एक ते दीड तास येथील मतमोजणी प्रक्र‌िया रखडली होती.
या केंद्रावर १६, २३ आणि ३० या तीन प्रभागांच्या मतमोजणीस सकाळी १० वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. अतिशय संथगतीने सुरू असलेल्या या प्रक्र‌ियेत क्रमानुसार तिसऱ्या प्रभागाची मोजणी सुरू होण्यास दुपारचे ४.३० वाजले. पहिल्या दोन फेऱ्यांची मोजणी निवडणूक निर्णय अधिकारी विजय भांगरे यांनी जाहीर केली होती. या दोन्हीही फेऱ्यांमध्ये प्रभागात चारही जागांवर भाजपाच्या उमेदवारांची आघाडीची मते होती. निर्णायक अवस्थेकडे ही मोजणी चालली असताना मनसेचे उमेदवार निक‌ितेश धाकराव यांनी ईव्हीएममध्ये गोंधळ जाणवत असल्याची शंका उपस्थित करत पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली. यावर मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, अगोदर तुम्ही झोपेत होता का? असा सवाल केल्याची तक्रार केली. यापाठोपाठ ईव्हीएम मशीनमध्येच फेरफार करण्यात आल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी मतमोजणीवर बहिष्कार टाकल्याच्या जोरदार घोषणा दिल्या. मनसेला साथ देत इतरही राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी गोंधळ घालत केंद्र डोक्यावर घेतले. काही कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांना व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना थेट शिवीगाळ करत असहकाराची भूमिका घेतली. कर्मचाऱ्यांनाही धमक्या देत मतमोजणी थांबवून ठेवली. येथील तणाव वाढत चालल्याने अखेर बंदोबस्त वाढविण्यात आला. पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. यावेळी दोन्हीही बाजूंमध्ये समन्वय साधत लोकशाहीच्या मार्गाने तक्रार दाखल करण्याचे आवाहन त्यांनी नेते व कार्यकर्त्यांना करत परिस्थिती नियंत्रणात आणली. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पुन्हा मतमोजणीला प्रारंभ झाला तरीही वातावरणातील तणाव कायमच होता.
ईव्हीएममध्ये घोळ करून एकतर्फी विजय मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न या केंद्रावर उघड झाला आहे. याबाबत रीतसर तक्रार निवडणूक लढवत असलेले सर्वच उमेदवार निवडणूक आयोगाकडे करणार आहोत. याप्रकरणी कायदेशीर मार्गाने लढा देऊ.
-संजय चव्हाण, शिवसेना पुरस्कृत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा झंझावात

$
0
0

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत; शिवसेनेला धक्का, मनसेची वाताहत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिका निवडणुकीत सर्व अंदाज फोल ठरवत भाजपने एकहाती विजय खेचून आणत स्पष्ट बहुमत मिळवले. शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते देण्याबरोबरच नाशिककरांनी मनसेला भुईसपाट करीत गोदावरी काठावर प्रथमच कमळ फुलविले. भाजपच्या झंझावाती लाटेत शिवसेना बचावली असली तरी मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पुरती वाताहात झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेवटच्या सभेने नाशिकच्या निकालाला कलाटणी दिली असून, शहराचे संपूर्ण चित्रच फिरल्याने महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. शहरातील सर्वच भागात भाजपने घौडदौड करीत सेनेला पिछाडीवर टाकले. विशेष म्हणजे नऊ प्रभागांमध्ये सर्व जागा जिंकत तब्बल 66 जागांवर विजय मिळवल्याने महापालिकेवर भाजपचाच महापौर बसणार हे निश्चित झाले आहे.

अपेक्षेपेक्षा महापालिकेचे निकाल धक्कादायक ठरले असून, शिवसेना नंबर वन राहील या राजकीय धुरिणांच्या दाव्याला खोटे ठरवत आपणच नंबर वन असल्याचे भाजपने सिद्ध केले आहे. मतमोजणी सुरू झाल्यापासूनच घेतलेली आघाडी भाजपने शेवटपर्यंत कायम राखली. त्यामुळेच बहुमताचा जादुई आकडा गाठता आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप व पाच आमदारांचे प्रयत्न सार्थकी लागले आहेत. उमेदवारी वाटपावेळी झालेले आरोप व पक्षातील बंडाळीने भाजप पिछाडीवर जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, हे अंदाज भाजनपे खोटे ठरवले.

दत्तकविधान पावले

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या सभेनंतर नाशिककर भाजपला प्रतिकूल झाले असे वाटत होते. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या सभेत संपूर्ण चित्र फिरवले. त्यांनी नाशिकला दत्तक घेण्याचा शब्द दिल्याने परिवर्तन झाले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णायकी सभेमुळेच भाजपला गोदाकाठावर प्रथमच कमळ फुलवता आले आहे. गेल्यावेळेस सत्तेवर असलेल्या मनसेचे पानिपत होऊन संख्याबळ 40 वरून थेट पाचवर उतरले आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या विकासाला मतदारांनी नाकारल्याचे चित्र आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या आहेत. मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसला दोन अंकी संख्याही गाठता आलेली नाही.

मतमोजणीला गालबोट; चकमकीत चार जखमी

सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतमोजणीला सांयकाळी गालबोट लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि गोळीबार करावा लागला. प्रभाग ३ मध्ये बॅलेट मशिनमध्ये गडबड केल्याचा आरोप भाजप वगळता अन्य पक्षांनी करीत मतमोजणीच थांबवली. तसेच भाजपवर गंभीर आरोप केले. त्यामुळे संतप्त जमावाने निकाल जाहीर करणाऱ्या प्रशासनासह पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार केला. त्यात चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. प्रभाग ३० मध्ये मनसेच्या उमेदवाराने गोंधळ घालत मतमोजणी बंद पाडली होती. आकडेवारीत गोंधळ असल्याने ही मतमोजणी बऱ्याच वेळ रखडली होती. परंतु, भाजपचे तीन उमेदवार निवडून आल्यानंतर विरोधी उमेदवारांनी थेट महापालिकेसमोर आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासाचे दिवस दूर नाहीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्या आवाहनाला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद देत, भाजपला घवघवीत यश देत महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवून दिले आहे. नाशिकचा विजय हा सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा विजय असून, आता नाशिकच्या विकासाचे दिवस दूर नसल्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विजयानंतर दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर विश्वास प्रकट करून भाजपच्या बाजूने कौल दिल्याने आपण नाशिककरांचे ऋणी राहू, अशा शब्दांत त्यांनी आभार मानले आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नाशिकचा विकास करू, असे आश्वासन त्यांनी नाशिककरांना दिले आहे.

पालकमंत्री महाजन म्हणाले, की नाशिकच्या विजयानंतर माध्यमांशी बोलताना महाजन यांनी जनतेने आमच्यावर दाखविलेल्या विश्वासास आम्ही नक्कीच पात्र ठरणार असून, विकास काय असतो ते आम्ही दाखवणार आहोत. नाशिकच्या जनतेने विकास आणि पारदर्शक प्रशासनाच्या बाजूने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास प्रकट करीत दिलेला हा कौल आहे. त्यासाठी मी नाशिकच्या जनतेचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी शहर दत्तक घेणे या विधानाला खूप महत्त्व आहे. पुढच्या काळात याचा प्रत्यय जनतेला निश्चितपणे येईल. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राज्याच्या प्रमुखाचे पाठबळ मिळणे ही मोठी गोष्ट आहे. नाशिकच्या विकासासाठी जमेची बाजू आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचा सर्वांगीण विकास करण्यावर, एक आदर्श शहर म्हणून या शहराची ओळख करण्यावर आमचा भर राहणार आहे. आम्ही आमची भूमिका निवडणुकीपूर्वीच स्पष्ट केली होती, की कुणावर टीका करण्याऐवजी आम्ही विकासाचे व्हिजन घेऊन ‘स्मार्ट नाशिक’ची कल्पना घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. त्याप्रमाणे आम्ही आमच्या विकासाच्या कल्पना प्रचारादरम्यान मांडल्या. जनतेला त्या भावल्या, असेच म्हणावे लागेल.

निवडणुकीपूर्वी अनेक आरोप करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. नाशिकची जनता सुसंस्कृत आणि तितकीच सुजाण आहे. त्यांनी या आरोपाला जराही किंमत न देता भाजपवर विश्वास व्यक्त केला आहे. माझी भूमिका कार्यकर्त्याची आहे आणि जनसेवेचा माझा पिंड आहे. त्यामुळे हा विजय मोठा जरी असला तरी ती जनतेने टाकलेली जबाबदारी म्हणून मी नम्रपणे स्वीकारतो. नाशिकच्या जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवीत आमच्या ध्येयनाम्यातील कामे मूर्त रूपात आणण्याचा माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न राहील. पक्षीय मतभेद बाजूला सारून सर्वांना सेाबत घेऊन नाशिकचा विकास हेच उद्दिष्ट आता समोर आहे. मी इतरही पक्षांना आवाहन करतो, की त्यांनीदेखील विरोधी पक्षाची भूमिका बजावताना विकासाच्या मुद्द्यावर एकत्र यावे. शेवटी जनतेने विकासाच्याच बाजूने कौल दिला आहे. या विजयासाठी सर्व आमदार, पदाधिकारी, तसेच सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न केले, असेही महाजन म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला नाशिककरांनी भरभरून साद दिली आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हा विजय असून, सगळ्यांनी या विजयासाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे नाशिककरांचा आभारी असून, त्यांना अपेक्षित विकास आम्ही करू.
- आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप

नाशिककर एखाद्याला डोक्यावर घेतात आणि पायाखालीही आणतात हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. यापुढे आम्ही सर्व नाशिकच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करणार आहोत.
- वसंत गिते, उपाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉँग्रेसला पक्षांतराचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील नगरसेवकांनी इतर पक्षांत स्थलांतर केल्याने त्याचा मोठा फटका कॉँग्रेसला बसला. मागील निवडणुकीत असलेले १५चे बलाबल घसरून सहावर आले आहे.

नाशिक महापालिका २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉँग्रेसला १५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे महापालिकेत कॉँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या चांगली होती. मात्र, केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका कॉँग्रेसला बसला. या पक्षातील अनेक नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षाचा रस्ता धरला. नगरसेवक पक्ष सोडून इतर पक्षांत जाऊ लागले. कॉँग्रेसशी अनेक वर्षे निष्ठावान असलेले शिवाजी गांगुर्डे यांच्यासारखे नगरसेवक पक्ष सोडून गेल्याने त्याचाही परिणाम झाला. यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये मरगळ दिसून येत होती. मुलाखतीदरम्यान असलेला गोंध‍ळ अनेकांनी पाहिला होता, तसेच शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेते येऊन सभा घेतील, असा अंदाज होता. मात्र, राज्यातील नेत्यांनीही नाशिककडे पाठ फिरवली. के‍वळ अशोक चव्हाण यांची सभा झाली. इतर पक्षांचा जाहीरनामा येऊन गेल्यानंतर आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. आघाडी असतानाही दोन्ही पक्षांनी आपापले स्वतंत्र्य जाहीरनामे प्रकाशित केले. यामुळे कॉँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले.

मतदारांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारत आहोत. या वेळी झालेल्या चुकांची पुढच्या वेळी निश्चित सुधारणा केली जाईल. भाजपने सत्तेचा दुरुपयोग करून मताधिक्य मिळवले आहे. मतदारयाद्यांमध्ये घोळ करण्यात आले, तसेच मोठ्या प्रमाणात पैसा वाटण्यात आला. त्यामुळे भाजपला जागा मिळाल्या. विरोधात राहून जनतेच्या प्रश्नांची तड लावू.
- शरद आहेर, अध्यक्ष नाशिक शहर कॉँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमळाच्या लाटेत राष्ट्रवादीचे पानिपत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गतवेळी सत्ताधारी मनसेच्या खालोखाल संख्याबळ गाठणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे यंदा कमळाच्या लाटेत पानिपत झाले आहे. गतवेळी महापालिकेतील २० जागांवर हक्क सांगून मनसेशी राष्ट्रवादीने हातमिळवणी करून सत्तेचे सिंहासन काबीज केले होते. यंदाच्या निवडणुकीत एकूण १२२ जागांपैकी राष्ट्रवादीच्या पदरात अवघ्या ६ जागा पडल्या आहेत.

इतर सर्वच पक्षांप्रमाणे यंदाही नाशिकसाठी राष्ट्रवादीने जोरदार फिल्डिंग लावली होती. गतवेळी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या सावलीखाली वाटचाल करणाऱ्या राष्ट्रवादीने निवडणुकीला जाताना अंतर्गत समीकरणेही बदलवली होती. अजित पवारांसारख्या पक्षनेत्यांनी या निवडणुकीत लक्ष घातल्याने नवी समीकरणे मांडतानाच राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र, पक्षातील कारवाईच्या फेऱ्यात भुजबळ अडकल्यानंतर स्थानिक स्तरावर दमदार पक्षनेतृत्वाची उणीव, बोगस नोटांच्या प्रकरणात पक्षाचे पदाधिकारी छबू नागरे, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देविदास पिंगळे यांच्यासारख्या नेत्यांची अडकलेली नावे याही परिस्थितीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसल्याचे बोलले जात आहे.

निवडणूक जाहीर झाल्यानंतरही पक्षातील अंतर्गत वर्तुळात समन्वय दिसून आला नाही. आघाडी होणार की नाही, या प्रश्नापासून तर जाहीरनामे प्रत्यक्षात येईपर्यंत काहीच चित्र कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट नव्हते. जाहीरनामे प्रत्यक्षात आले तेही वेगवेगळे. दरम्यान, ज्या सहा जागांवर यंदा राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले, तेथे बहुतांश मुस्लिम मतदारांनीच राष्ट्रवादीला साथ दिल्याने हा पक्ष थोडीशी प्रतिष्ठा राखू शकला. पक्षातील नामांकित नेत्यांच्या घरातीलही उमेदवारांना पराभवाची धूळ चाखावी लागली, यावरून या राष्ट्रवादीच्या दारुण पराभवाची कल्पना यावी, अशा चर्चांनी सायंकाळी शहरात जोर धरला होता. मात्र, या पराभवाचे विश्लेषण करताना राष्ट्रवादीने भाजपवर तोफ डागत सत्तेच्या गैरवापरावर त्यांनी ही निवडणूक खिशात घातल्याचा आरोप केला आहे.

निवडणुकीत भाजपने पैशांचा वारेमाप वापर केला होता. अनेक मतदान केंद्रांवर गडबड करून मोठा घोळ केला आहे. एकूणच भाजपने सत्तेचा गैरवापर करून निवडणुकीत फायदा उचलला आहे.

- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत सेनेचा गड आला, पण सिंह गेला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन नाशिकमध्ये शिवसेनेने आपला बालेकिल्ला कायम राखण्यात यश मिळविले. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या अंडरकरंटमुळे शिवसेनेला काही प्रमाणात बॅकफूटवर जावे लागले. भाजपाला क्लीन स्वीप देण्यात शिवसेना अपयशी ठरली असून, गड आला, पण सिंह गेला अशी परिस्थिती पक्षाची झाली आहे. विभागात शिवसेना १५, भाजपा आठ आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले असून, काँग्रेस, मनसेसह इतर छोट्या आघाड्यांचे मतदारांनी पानिपत केले.

नवीन नाशिकमधून २४ नगरसेवक निवडून आले आहेत. सर्वाधिक ताकद शिवसेनेकडे असले तरी भाजपाचे आठ नगरसेवक निवडून आले असून, नंबर दोनचा हा पक्ष ठरला आहे. भाजपाच्या अंडरकरंटमुळे सिडकोत काही धक्कादायक निकाल लागल्याचे दिसते. विशेषतः शिवसेनेला पॅनलनुसार मतदान झालेले दिसत नाही. प्रभाग २४ मध्ये तीन शिवसेनेचे तर एक राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. या प्रभागात नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांना पराभवाचा सामना करावा लागला. कल्पना पांडेना भाजपाच्या सुनंदा गीते यांनी चांगली लढत दिली. एका ठिकाणी काँग्रेसचा पराभव झालेल्या असताना राजेंद्र महाले यांनी राष्ट्रवादीची घौडदौड प्रतिकुल परिस्थितीत सुरू ठेवली. महालेंना कैलास चुंभळे यांनी प्रतिकार केला मात्र, त्याचा फायदा झाला नाही. गत पंचवार्षिकमध्ये येथे चुंभळे कुटुंबियाचे दोन सदस्य होते. मात्र, शिवाजी गांगुर्डे यांनी निवडणूक लढवली नाही तर त्यांचा पुतण्या कैलास हाही पराभूत झाला. भाजपाचे जगन पाटील यांनी लढाई आधीच तलवार म्यान केल्याचे परिणाम दिसून आले. कल्पना चुंभळे यांनी मोठा विजय मिळवला तर सेनेच्या प्रविण तिदमे यांनी जवळपास नऊ हजार मतांनी भाजप उमेदवारास धुळ चारली. प्रभाग २५ मध्ये बडगुजर दाम्पत्याने घवघवीत यश मिळवले. मात्र, त्यांचे सहकारी श्यामकुमार साबळे पाटील यांना विजयासाठी लढावे लागले. तर, चारूशीला गायकवाड यांना पराभवाचा सामाना करावा लागला. सेनेच्या एकतर्फी विजयाला यामुळे धक्का बसला. प्रभाग २६ मध्ये माकपाला धक्का बसला. अनेक वर्षांपासून चळवळीतून काम करणाऱ्या तान्हाजी जायभावे आणि वसुधा कराड यांच्या पराभवामुळे पक्ष पिछाडीवर गेला आहे. भंगार बाजार हटवण्याच्या कामात सातत्याने पाठपुरावा करण्याचे श्रेय मतदारांनी दिलीप दातीर यांना दिले. भाजपाच्या अलका आहिरे यांचा अपवाद वगळता सेनेचा येथे वरचष्मा राहिला. प्रभाग २७ मध्ये दोन धनुष्य आणि दोन कमळ असा कौल मतदारांनी दिला. नगरसेवक उत्तम दोंदे याचा पराभव करीत राकेश दोंदे यांनी कमळ फुलवले. सेनेच्या चंद्रकांत खाडे यांचा विजय लता पवार यांनी सहज होऊ दिला नाही. या प्रभागात किरण गामणे (सेना) आणि कावेरी घुगे यांचा विजयही महत्वाचा ठरला. प्रभाग २८ मध्ये शिवसेनेंतर्गत बंडाळी असताना तीन नगरसेवक निवडून आले. या ठिकाणी नात्यागोत्यांचा विचार करता सेनेच्या मतांचे विभाजन झालेले दिसले. भाजपच्या प्रतिभा पवार यांनी येथे बाजी मारली. दरम्यान, अरूणा दिलीप दातीर यांनी अपक्ष राहून सुवर्णा मटाले यांना चांगली लढत दिली. दरम्यान, भाजपच्या दृष्टीने प्रभाग २९ सर्वात महत्त्वाचा ठरला. येथे तीन कमळ फुलले तर रत्नमाला राणे यांच्या रूपाने सेनेने येथे खाते उघडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारपुत्र अखेर विजयी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपचे आमदार व शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप विजयी झाले आहेत. या निवडणुकीत चार प्रवर्गांत भाजपने तीन जागा राखल्या असल्या तरी शिवसेनेने एक जागा पटकावली आहे. या प्रभागात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय कंरजकर यांना ठाण मांडून बसण्याची घोषणा करून खळबळ निर्माण केली. त्यानंतर सानप यांचे कार्यकर्ते असलेले विलास आव्हाड यांना उमेदवारी दिली होती, तर राष्ट्रवादीने आमदारपुत्राच्या विरोधात विद्यमान नगरसेवक समाधान जाधव यांना उतरवल्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज होता; पण या निवडणुकीत भाजपने यश मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

आमदार सानप तीन वेळा याच प्रभागातून निवडून आले. त्यानंतर ते उपमहापौर, महापौर व नंतर आमदार झाले. मात्र, यावेळेस त्यांनी प्रथमच आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवले. त्यामुळे त्यांना सर्वच पक्षांनी लक्ष्य केले होते. मच्छिंद्र सानप यांच्या शिक्षणाचा मुद्दा यावेळी उपस्थित होऊन त्याविरुद्धही तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे ही निवडणूक वेगवेगळ्या कारणाने लक्षवेधी ठरली. आमदार सानप यांच्या दृष्टीनेही ती प्रतिष्ठेची होती. मात्र, त्यांना संपूर्ण शहरातही फिरावे लागत असल्यामुळे त्यांना या प्रभागात फारसा वेळ देता आला नाही. त्यामुळे एकूणच अंदाज व्यक्त करतानाही आमदारपुत्र पराभूत होतील अशी चर्चा होती; पण हे सर्व अंदाज अखेर फोल ठरले व मच्छिंद्र सानप यांचा विजय झाला.

स्वपक्षाची फिल्डिंग

आमदार पुत्राला पराभूत करण्यासाठी फक्त विरोधी पक्षच नाही, तर स्वपक्षीय छुप्या पद्धतीने रसद पुरवत होते. त्यांनी उघड विरोध केला नसला तरी त्यांना सानप यांची ताकद कमी करण्याची इच्छा होती. मात्र, तसे काहीच झाले नाही. उलट नाशिकमध्ये सर्वाधिक जागा जिंकून भाजपने यश मिळवल्यामुळे सानप यांचे वर्चस्व वाढले आहे.

आमदारांना मंत्रिपद

आमदार सानप यांनी महापालिकेत यश मिळवल्यास त्यांना मंत्रिपद दिले जाईल अशीही चर्चा आहे. त्यामुळे सानप यांनी महापालिका सुरुवातीपासून प्रतिष्ठेची केली. विविध पक्षांच्या अनेक नगरसेवकांना त्यांनी पक्षात घेऊन संख्या वाढवली. या निवडणुकीत शहरात यश मिळूनही जर पुत्र पराभूत झाला असता तर हे यश फारसे महत्त्वाचे नसते. त्यामुळेही ही निवडणूक त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौर, उपमहापौर विजयी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मनसेचे महापौर अशोक मुर्तडक यांनी शिवसेना, भाजपच्या उमेदवारांचा पराभव करत चौथ्यांदा विजयी प्राप्त केला, तर अपक्ष असलेले उमपमहापौर गुरुमित बग्गा यांनीही तिसऱ्यांदा विजय प्राप्त करून भाजपच्या उमेदवाराला धक्का दिला. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलेल्या दोन्ही विद्यमान पदाधिकाऱ्यांनी यश मिळवले असले तरी महौपारांना मात्र शहरातील १२२ प्रभागांत अवघे पाचच नगरसेवक निवडून आणता आले. गेल्या वेळी मनसेचे ४० नगरसेवक होते. यंदा त्यांचा आकडा तब्बल ३४ ने घसरला.

महापौर अशोक मुर्तडक हे प्रभाग क्रमांक सहामधून ड प्रवर्गात उभे होते. त्यांनी या प्रभागात चार मनसेचे उमेदवार उभे केले होते; पण त्यात तिन्ही जागांवर मनसेचा दारुण पराभव झाला. या प्रभागात तीन ठिकाणी भाजपने विजयाचा झेंडा फडकावला, तर एका जागेवर मनसेचे मुर्तडक यांचा विजय झाला. मुर्तडक यांना १०,२८५ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार दीपक विश्वनाथ पिंगळे यांना ७९४८ मते मिळाली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार दामोदर मानकर यांना ७,१५४ मते मिळाली. महापौरांच्या शेजारीच असलेल्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी मात्र आपल्याबरोबर दोन उमेदवार निवडून आणले. त्यांच्या प्रभागात एकच उमेदवार पराभूत झाला.


बग्गांचा विजय महत्त्वाचा

प्रभाग क्रमांक पाचमध्ये यापूर्वीही अपक्ष असलेले गुरुमित बग्गा यांनी सुरुवातीपासून पक्षाकडून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी दोन अपक्ष व दोन मनसेचे उमेदवार घेऊन आघाडी केली. त्यांच्या पॅनलमध्ये अपक्ष असलेल्या विमल पाटील व मनसेच्या नंदिनी बोडके विजयी झाल्या, तर मनसेचे उल्हास धनवटे यांचा पराभव झाला. या ठिकाणी भाजपचे कमलेश बोडके या एकमेव उमेदवाराला यश मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरला पहिल्यांदाच फुलले कमळ!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सातपूरला पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच भाजपने मुसंडी मारत आठ जागांवर विजय मिळविला. शिवसेनेने पाच, मनसेने दोन, तर रिपाइंने एका जागेवर विजय संपादन केला आहे. सातपूर क्लब हाऊस येथे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र बेहेरे यांच्या मार्गदर्शनाखाली १२ टेबलांवर मतमोजणी करण्यात आली. निवडून आलेल्या उमेदवारांना बेहेरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत विजय साजरा केला.

गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेत मनसेला आपली जादू दाखविता आली नसल्याने केवळ दोन जागांवरच समाधान मानावे लागले. रिपाइंला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. प्रभाग ९ मध्ये विद्यमान नगरसेवक दिनकर पाटील यांच्यासह भाजपचे पूर्ण पॅनल निवडून आले. प्रभाग १० मध्येदेखील विद्यमान नगरसेवक शशिकांत जाधव यांच्यासह भाजपच्या पॅनलने मुसंडी मारली. प्रभाग ८ मध्ये शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक विलास शिंदे यांचे पूर्ण पॅनल विजयी झाले. प्रभाग ११ मध्ये मनसेचे स्थायी समिती सभापती सलिम शेख यांच्यासह केवळ दोन जागा मिळविता आल्या. शिवसेना व रिपाइंने एक जागा मिळविली.

जाधवांची सरशी

प्रभाग १० मध्ये शिवसेनेने तगडे पॅनल दिल्याने अनेकांचे लक्ष या प्रभागाकडे लागले होते. परंतु, दोनदा नगरसेवक राहिलेले शशिकांत जाधव यांनी बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे. येथे भाजपचे चारही उमेदवार निवडून आल्याने भाजपकडे एकहाती सत्ता आली आहे. जाधव यांनी तिसऱ्यांदा शिवसेनेचे शांताराम कुटे यांना पराभूत केले. जाधव यांनी कुटे यांच्यावर १ हजार ७० मतांनी विजय संपादन केला. भाजपच्या माधुरी बोलकर यांनी शिवसेनेच्या डॉ. वृषाली सोनवणे यांचा ६२४ मतांना पराभव केला. विशेष म्हणजे भाजपच्या पल्लवी पाटील यांनी मनसेच्या कलावती सांगळे यांचा केवळ ११ मतांनी पराभव केल्याने प्रभाग १० ब मधील निवडणूक लक्षवेधी ठरली. पाटील यांना १५ पोस्टल मते मिळाली, तर सांगळे यांना केवळ ५ मिळाली. त्यामुळे पाटील यांनी ११ मतांनी सांगळे यांच्यावर विजय मिळविला. विद्यमान नगरसेविका सुरेखा नागरे यांचे पती शिवसेनेचे गोकुळ नागरे यांचा भाजपचे ज्येष्ठ उमेदवार सुदाम नागरे यांनी १ हजार ९२३ मतांनी पराभूत करत बाजी मारली. भाजपच्या सर्वच उमेदवारांनी पॅनल टू पॅनल प्रचाराने विजय संपादन केल्याचे जाधव यांनी सांगितले.


दिनकर पाटील यांची बाजी

माजी महापौर दशरथ पाटील यांनी नगरसेवक दिनकर पाटील यांच्यासमोर पुत्र प्रेम पाटील याला उभे केले होते. त्यामुळे नाशिककरांचे प्रभाग ९ मधील लढतीकडे लक्ष लागले होते. परंतु, येथे पाटलांचाच करिष्मा चालला. भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने प्रभाग ९ मधून निवडून आले. प्रकाश लोंढे यांना भाजपचे रवींद्र धिवरे यांनी ४ हजार ५१५ मतांनी पराभूत केले. शिवसेनेचे सागर जारे यांनी ३ हजार ८३५ अधिक मते मिळवत दुसरे स्थान पटकावले. पाटील यांनी शिवसेनेच्या साहेबराव जाधव यांचा तब्बल ५ हजार ७६५ मतांनी पराभव केला. भाजपच्या हेमलता कांडेकर यांनी १० हजार १४८ मते मिळवत शिवसेनेच्या ज्योती काळे यांचा ५ हजार २७ मतांनी पराभव केला. भाजपच्या डॉ. वर्षा भालेराव यांनी शिवसेनेच्या सविता गायकर यांचा २ हजार १२३ मतांनी पराभव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थीम पार्कचे आज लोकार्पण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगावकरांसाठी पर्वणी ठरणाऱ्या ‘पद्मश्री डॉ. भवरलाल जैन थीम पार्क’ अर्थातच ‘भाऊंचे उद्यान’चा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. २५) सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्राचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होत आहे.

कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आमदार एकनाथ खडसे, सुरेश जैन, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर नितीन लढ्ढा, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, पद्मश्री डॉ. सुशील मुन्सी, चंदुलाल पटेल, सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, पोल‌सि अधीक्षक जांलिदर सुपेकर, मुख्याधिकारी आस्तिककुमार पांडे, उपमहापौर ललित कोल्हे, स्थायी समिती सभापती वर्षाताई खडके, सभागृह नेते रमेश जैन, आयुक्त जीवन सोनवणे, ज्येष्ठ समाजसेवक तथा संघपती दलीचंद जैन, कविवर्य ना. धों. महानोर आदी मान्यवर उपस्थित असतील.

जैन उद्योग समुहाच्या माध्यमातून काव्यरत्नावली चौकात हे पार्क उभारण्यात आले आहे. कुटुंबातील सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी आल्हाददायक आणि आनंद देणाऱ्या या थीम पार्कमध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तीन एकरचे हे थीम पार्क जळगावकरांसाठी ड्रीम पार्कच म्हणता येईल. जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन व संचालक अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रसिद्ध वास्तुविशारद शिरीष बर्वे यांनी पार्कचे डिझाईन केले आहे. या पार्कमधील झाडे आहे तशीच ठेवून निसर्गसंपदा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समाजाचे काम म्हणजे ऋणाची कृतज्ञपणाने केलेली अल्पशी परतफेड असते. या भावनेतून जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी सामाजिक बांधिलकीला सदैव अग्रक्रम दिला. पार्कदेखील त्याचाच भाग असल्याचे जैन समुहाने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅलेटचा वाद जाणार कोर्टात

$
0
0

नाशिक : महापालिका निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेले बॅलेट मश‌िन हे संशयास्पद असून मतदानानंतर मश‌िनमध्ये अचानक वाढ झाली, तर अनेक मश‌िन सील केलेले नव्हते, असा आरोप आता पराभूत उमेदवारांनी केला आहे. अनेक ठिकाणी मतदान कमी आणि मतमोजणी जास्त झाली असल्याचा आरोप शिवसेनापुरस्कृत पराभूत उमेदवार व माजी सभापती संजय चव्हाण यांनी केला. त्यामुळे सर्व पराभूत उमेदवारांनी बॅलेट मश‌िनच्या घोळाबद्दल हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माह‌िती चव्हाण यांनी दिली. राज्य निवडणूक आयुक्त, मनपा आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रतिवादी करणार असल्याचे त्यांनी सांग‌ितले.
महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर बॅलेट मश‌िनमधील घोळाचा वाद उफाळून आला आहे. प्रभाग क्र. ३ व ३० मधील उमेदवारांनी तर मतमोजणीच बंद पाडली होती. त्यामुळे पराभूत उमेदवारांनी गुरुवारीच आयुक्तांची भेट घेऊन बॅलेट मश‌िनमधील गोंधळावर आक्षेप घेतले होते. परंतु, ते धुडकावून लावण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी या घोळाला प्रशासकीय यंत्रणेला जबाबदार धरले असून, थेट हायकोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. संजय चव्हाण यांनी यासंदर्भात पुढाकार घेत, हायकोर्ट व स्थानिक कोर्टात याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती दिली. मतदानाच्या दिवसापेक्षा मतमोजणीच्या दिवशी अधिक मश‌िन मोजल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मश‌िनचे सील अगोदरच फोडण्यात आले होते, तर मतदान कमी आणि मतमोजणीत मात्र जास्त मते दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्त, मनपा आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रतिवादी करून न्याय मागणार असल्याचे त्यांनी सांग‌ितले.

न्याय मिळेपर्यंत लढत राहणार

पंचवटी : भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर करून ईव्हीएममध्ये घोळ घालून भाजपचे उमेदवार निवडून आणले आहेत. न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा देणार असल्याचे पंचवटीतील प्रभाग एक, दोन आणि तीनमधील पराभूत उमेदवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मीडिया सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अॅड. जे. टी. शिंदे, सचिन लुणावत, विलास आव्हाड, संदीप भवर, गणेश चव्हाण, हर्षद पटेल, अनंत सूर्यवंशी, सोमनाथ वडजे, सचिन अहिरे उपस्थित होते. मतमोजणीला थांबविल्यानंतर डिस्प्लेमध्ये अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते, असे हर्षद पटेल यांनी सांगितले. सरकारी यंत्रणा हाताशी घेऊन ईव्हीएममध्ये सोयीनुसार उमेदवारांना निवडून आणण्याची व्यवस्था केली होती. या प्रकरणाचा न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू राहील, असे जे. टी. शिंदे यांनी सांगितले. ईव्हीएमवर हरकती घेतल्या तरी मशीनचा पंचनामा केला नाही. याविषयी जनहित याचिका दाखल केली आहे, असे संदीप भवर यांनी सांगितले.

पराभूत उमेदवारांकडून आडगाव बंद
म. टा. वृत्तसेवा, आडगाव
ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानात भाजपने मतमोजणीत सेटिंग करीत हेराफेरी केल्याचा आरोप करीत प्रभाग दोनमधील सर्व पराभूत उमेदवारांनी आडगाव बंदची हाक दिली होती. याला गावकऱ्यांनी प्रतिसाद देत गावात कडकडीत बंद पाळला. त्यामुळे आडगावमधील सर्व व्यवहार बंद होते. शिवाय, गावात तणावपूर्ण शांतता होती. सकाळी बराच वेळ पोल‌िस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला होता.
सकाळी गावातील मारुती मंदिरात आडगावमधील सर्वपक्षीय उमेदवारांनी एकत्र येत फेरमतदानाची मागणी केली. यावर कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेची निवडणूक आतापर्यंत शांततेत पार पडली असताना मतमोजणीच्या दिवशी हिंसक वळण लागले. नागरिकांनी दगडफेक केल्याने अखेर पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागल्याची घटना रात्री घडली. या ठिकाणी तीन-चार वेळा मतमोजणी बंद पाडण्यात आली होती. भाजप मतमोजणीत सेटिंग करीत असल्याचा आरोप करीत निवडणूक यंत्रणेला विरोध दर्शवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे निर्विवाद वर्चस्व

$
0
0


gautam.sancheti@timesgroup.com

Tweet @sanchetigMT


नाशिक ः स्थलांतरित, नववसाहत, झोपडपट्टी, जुने नाशिक असा संमिश्र भाग असलेल्या पंचवटी विभागात महापालिका निवडणुकीत भाजपने २४ पैकी १९ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. भाजपचे आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्यासाठी होम ग्राउंडवरची ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. त्यांनी विरोधी पक्षांबरोबरच स्वपक्षीयांशी संघर्ष करून त्यात यश मिळविले. सानप यांच्यामुळे हा विभाग सर्वांच्याच रडारवर होता. या वर्चस्वाच्या लढाईत सानप अपयशी ठरले असते, तर त्यांना मोठा फटका बसला असता. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांनी मित्रपक्षासह विरोधी पक्षांना जोरदार धक्का दिला आहे. याच विभागातून रंजना भानसींच्या रुपाने महानगराला नवा महापौर मिळण्याची शक्यता आहे.

या विभागात गेल्या निवडणुकीपेक्षा तब्बल १२ जास्त जागा जिंकत भाजपने ७ वरून १९ वर मुसंडी मारली. या विभागात राष्ट्रवादी व काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, तर मनसेची ७ जागांवरून दोन जागांवर घसरण झाली आहे. शिवसेनेची एक, तर अपक्षांच्या गेल्या वेळेच्या दोन जागा मात्र कायम राहिल्या आहेत. २०१२ च्या निवडणुकीत मनसे व भाजपने वर्चस्व राखत प्रत्येकी सात जागा मिळविल्या होत्या. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने पाच, तर शिवसेनेला अवघ्या एक जागेवर समाधान मानावे लागले होते. या विभागात काँग्रेस दोन जागांवर स्थिरावली, तर दोन अपक्षांनीसुद्धा बाजी मारली होती. पण, या वेळी सर्वच चित्र बदलले व भाजपने सहाही प्रभागांत कमी-अधिक प्रमाणात कमळ फुलवले.

प्रभाग एक

किशोर सूर्यवंशी मार्ग, बोरगड, चामरलेणी, म्हसोबावाडी, म्हसरूळ गावठाण व शेतीशिवार असा भाग असलेल्या या प्रभागाने निकालाचे ओपनिंग केले. या प्रभागात भाजपच्या पूनम धनगर, रंजना भानसी, गणेश गिते व अरुण पवार यांनी यश मिळवून चारही जागा जिंकल्या. या प्रभागात सलग चार वेळा निवडणूक जिंकणाऱ्या रंजना भानसी पुन्हा निवडून आल्या. त्यांना शिवसेनेच्या जयश्री चव्हाण यांनी कडवे आव्हान उभे केले होते, तर दोन वेळा नगरसेविका झालेल्या शालिनी पवार यांच्याऐवजी त्यांचे पती अरुण पवार रिंगणात होते, त्यांनाही यश मिळाले. या भागातून आता शहराला महापौर मिळणार असल्यामुळे येथे विकासकामे प्रचंड होतील, अशी मतदारांची अपेक्षा आहे.

प्रभाग दोन

आडगाव मळे परिसर, एमईटी कॉलेज, दुर्गानगर, नांदूर-मानूर गाव व शेती शिवाराचा हा प्रभाग आहे. या प्रभागातदेखील भाजपचे चारही उमेदवार निवडून आले. त्यात पूनम सोनवणे, सुरेश खेताडे, उद्धव निमसे, शीतल माळोदे यांचा समावेश आहे. दोन वेळा नगरसेवक झालेले काँग्रेसचे उद्धव निमसे यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे त्यांना त्याचा फायदा झाला. त्यांच्या विरोधात तीन वेळा नगरसेवक राहिलेले ‘शेकाप’चे अॅड. जे. टी. शिंदे हे शिवसनेच्या तिकिटावर रिंगणात उतरले होते. पण, त्यांचाही पराभव झाला. या प्रभागात सर्वाधिक मतदान झाले होते. त्यामुळे येथे धक्कादायक निकालाची शक्यता वर्तवली जात होती. पण, मतमोजणीनंतर चारही जागांवर कमळच फुलले. शिवसेनेने झुंज दिली असली, तरी मतांचा फरक चारही ठिकाणी मोठा आहे.

प्रभाग तीन

प्रभाग तीनमध्ये रासबिहारी शाळेमागील परिसर, गोपाळनगर, ओमनगर, क्षीरसागर कॉलनी, बाप्पा सीताराम परिसर, कृष्णनगर, टकलेनगर, एसटी डेपोमागील परिसर, स्वातंत्र्यवीर सावरकर परिसर आहे. यात भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप सलग चार वेळा निवडून आले आहेत. याच भागाने त्यांना उपमहापौर, महापौर आणि आमदारपदापर्यंत नेले. यंदा त्यांनी मुलगा मच्छिंद्रला रिंगणात उतरवत यश मिळविले. या प्रभागात मच्छिंद्र यांच्या बरोबर प्रियांका माने व रुची कुंभारकर निवडून आले आहेत. पण, एका जागेवर भाजपच्या कुसुम शिंदे यांचा पराभव करून शिवसेनेच्या पूनम मोगरे यांनी यश मिळविले आहे. या प्रभागात मच्छिंद्र यांच्याविरोधात सानप यांचेच समर्थक विलास आव्हाड यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेतली होती. पण, त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते पडली, तर राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक समाधान जाधव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते पडली.

प्रभाग चार

नामको कॅन्सर हॉस्पिटलमागील परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती, सीडीओ-मेरी, निमाणी बस स्टॅण्ड, आर. पी. विद्यालय, सूर्या आर्केड, सुविधा हॉटेल परिसराचा या प्रभागात समावेश आहे. या प्रभागात झोपडपट्टीचा मोठा भाग असून, येथे भाजपने चारही जागांवर विजय मिळविला. शांता हिरे, सरिता सोनवणे, जगदीश पाटील, हेमंत शेट्टी यांना यश मिळाले आहे. या प्रभागात विद्यमान नगरसेवक डॉ. विलास घोलप यांच्या मातोश्री प्रतिभा घोलप, सर्वसाधारण गटातून माजी नगरसेवक भगवान भोगे, राष्ट्रवादीच्या कविता कर्डक यांनाही पराभव पत्करावा लागला. याच प्रभागात शिवसेनेच्या एबी फाॅर्मचा गोंधळ झाला. त्यामुळे हा फाॅर्म फाडण्याचा विषयसुद्धा बराच चर्चेत आला. त्यानंतर शिवसेनेने येथे आपले चारही उमेदवार पुरस्कृत केले. पण, अखेरच्या टप्प्यात फक्त तीन उमेदवार रिंगणात राहिले. पक्षाचे चिन्ह नसल्यामुळे येथे गोंधळ कायम होता, त्याचा फटका सर्वच उमेदवारांना बसला.

प्रभाग पाच

प्रभाग पाचमध्ये कुमावतनगर, मालेगाव स्टॅण्ड, रामकुंड परिसर, शनी चौक, सरदार चौक, काळाराम मंदिर, सीतागुंफा परिसर, ढिकलेनगर, नाग चौक हा परिसर आहे. येथे उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी दोन जागांवर अपक्ष, तर दोन जागांवर मनसेचे उमेदवार दिले होते. त्यात या आघाडीला तीन जागांवर यश मिळाले. येथे बग्गांबरोबरच विमल पाटील व मनसेच्या नंदिनी बोडके विजयी झाल्या, तर भाजपचे कमलेश बोडके यांनी उल्हास धनवटे यांचा पराभव केला. या ठिकाणी बग्गा व माजी खासदार माधवराव पाटील यांचे चिरंजीव संजय पाटील यांची लढत चुरशीची होईल, असा अंदाज होता.पण, बग्गांनी या प्रवर्गात ६ हजार २८० ची आघाडी घेत विजय मिळविला. भाजपला एकाच जागेवर येथे समाधान मानावे लागले. महापालिकेत पक्षाच्या वर्चस्वामुळे अशी आघाडी करणे तसे धोकादायक होते. पण, बग्गा यांच्या अभ्यासूवृत्तीमुळे त्यांना येथे यश मिळाले. या प्रभागात मनसेचे शहराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अॅड. राहुल ढिगले यांनी निवडणूक न लढवता उल्हास धनवटे यांना उमेदवारी दिली होती. पण, त्यांचा या प्रभागातून पराभव झाला. मनसेला येथे एकाच जागेवर समाधान मानावे लागले.

प्रभाग सहा

मखमलाबाद गावठाण, कोशिरे मळा, उदयनगर, तळेनगर, आदर्शनगर, कौशल्यानगर, रामवाडी असा भाग या प्रभागात आहे. येथे भाजपने तीन जागा राखल्या असून, एका जागेवर विद्यमान महापौर अशोक मुर्तडक यांनी मनसेकडून विजय मिळविला. या प्रभागात भाजपचे पुंडलिक खोडे, सुनीता पिंगळे व भिकूबाई बागुल यांनी विजय मिळविला आहे. भाजपवासी झालेले दामोदर मानकर यांना येथे पराभव पत्कारावा लागला. या प्रभागात महापौरांमुळे मनसेला सर्वच जागांवर यश मिळेल, असा सर्वांचा अंदाज होता. पण, जातीय समीकरणाने व प्रभागाच्या बदलामुळे येथे भाजपसोडून सर्वांनाच धक्का बसला. भाजपने तीन जागांवर यश मिळविल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी असा प्रवास करून भाजपवासी झालेले सुनील बागुल यांचे वर्चस्व वाढणार आहे. महापौरांना शिवसेनेचे दीपक पिंगळे यांनी कडवे आव्हान निर्माण केले होते. पण, महापौरांनी येथे मोठ्या फरकाने बाजी मारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इनकमिंग’नंतरही शिवसेनेचा मुखभंग

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या महापालिका निवडणुकीत २२ संख्याबळ असलेल्या शिवसेनेचे पक्षांतरानंतर संख्याबळ तब्बल ४७ वर जाऊन पोहोचले होते. यंदाही अन्य पक्षांतील नगरसेवकांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे महापालिकेवर भगवाच फडकणार, असे चित्र निर्माण करणाऱ्या शिवसनेच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे. यंदाचे संख्याबळ ३५ वर जाऊनही शिवसेनेचे नुकसानच झाल्याचे दिसून येत आहे.

शहरातील भरपूर सभा आणि शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून महापालिकेवर भगवा फडकावण्याची मनीषा बाळगणाऱ्या शिवसेनेचा प्रत्यक्षात मुखभंग झाला आहे. पक्षांतराच्या लाटेत सर्वाधिक लाभ शिवसेनेला झाला. कारण, गेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या मदतीने २२ नगरसेवक असलेली शिवसेना यंदाच्या निवडणुकीला सामोरी जाताना अतिशय फॉर्मात होती. कारण, अन्य पक्षांतील तब्बल २५ नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधले. त्यामुळे आता स्वबळावर सत्ता येणारच, अशा अाविर्भावात शिवसेनेचे पदाधिकारी वावरत होते. मित्रपक्ष व सत्ताधारी भाजपला लक्ष्य करीत आणि विविध प्रकारचे तोंडसुख घेणाऱ्या शिवसेनेने शहरात सर्वाधिक सभा घेतल्या. विविध क्लृप्त्याही योजल्या. मात्र, पदरी अपयशच आले आहे.

एबी फॉर्मचा झालेला गोंधळ, सर्वाधिक गुन्हेगार उमेदवार, तब्बल ११ पुरस्कृत उमेदवार द्यावे लागणे, यामुळे प्रारंभीच शिवसेना अडचणीत आली. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अजय चौधरी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन जे गायब झाले ते परत फिरकलेच नाहीत. माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गटबाजी, ऐनवेळी शिवसेनेत येऊन उमेदवारी नाकारण्याचे किंवा देण्याचे प्रकार या साऱ्यामुळे शिवसेनेला अपयश प्राप्त झाले. इनकमिंगवर समाधान मानताना प्रत्यक्षात ज्यांना पक्षात घेत आहोत ते विजयी होतील का, शिवसैनिक त्यांना आपलेसे करतील का, याचा कुठलाही विचार शिवसेनेच्या नेतृत्वाने केला नाही. पक्षांतर्गत नेत्यांमधील चढाओढीतून शिवसेनेत इतरांना आणण्याचे काम केले गेले. प्रत्यक्षात त्याचा शिवसेनेला फायदा कमी आणि तोटाच अधिक झाला. अनेक प्रभागांत पॅनलने प्रचाराऐवजी स्वतंत्र प्रचारावर भर दिला गेला. ही सारीच कारणे शिवसेनेला सत्ता मिळविण्यात अडचणीची ठरली.

--

दृष्टिक्षेपात शिवसेनेची सदस्य संख्या

२०१२ च्या निवडणुकीनंतर ः शिवसेना व रिपाइं २२

२०१७ च्या निवडणुकीला सामोरे जाताना ः शिवसेना व रिपाइं ४७

२०१७ मधील विजयानंतर ः शिवसेना ३५


--

शहरातील निकाल हा धक्कादायकच आहे. महापालिकेवर भगवाच फडकला असता; पण मतदारयाद्यांमधील घोळ, सत्ता असल्याने प्रशासन व सत्तेचा केलेला गैरवापर, लक्ष्मीदर्शनाचा करण्यात आलेला प्रयोग या साऱ्यामुळे भाजपला यश मिळाले आहे.

-अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवनामाचा दुमदुमला जयघोष

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बम बम भोलेच्या गजरात, प्रदोष व महाशिवरात्र असा दुहेरी योग साधत शिवभक्तांनी शुक्रवारी शिव मंदिरांत गर्दी केली होती. मध्यरात्रीपासून सुरू झालेले धार्मिक विधी, पहाटेपासून दर्शनासाठी लागलेल्या भाविकांच्या रांगा, पालखी सोहळा आणि शिवनामाचा जयघोष, अशा भक्तिमय वातावरणात शहारातील शिव मंदिरे फुलली होती.

कपालेश्वराला रांगा

रामकुंडावरील कपालेश्वर मंदिरात पहाटेपासून भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसरात सकाळपासूनच विविध संस्थांतर्फे केळी, खिचडी आणि दूध वाटप केले जात होते. कपालेश्वराच्या पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी लोटली होती. पहाटे ३.३० वाजता मंदिराचे पुजारी व गुरव मंडळींच्या हस्ते पूजा करण्यात येऊन दर्शनाला प्रारंभ करण्यात आला. वसंत धारणे, अजित गर्गे, शरद दीक्षित, प्रसाद साकोरकर यांनी पौराेहित्य केले. सकाळपासून गर्दीचा ओघ कायम होता. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. दुपारी ४ वाजता कपालेश्वराची पालखी काढण्यात आली. यावेळी पालखीत पंचमुखी मुखवटा दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. हा मुखवटा सोमवती अमावास्या, श्रावणी सोमवार व शिवरात्र यावेळीच दर्शनासाठी बाहेर काढण्यात येतो. मुखवट्याचे मानकरी व ट्रस्टी श्री वैद्य परिवाराने त्याचे पूजन केले. महाशिवरात्रीचा रात्री १२ ते ३ हा काळ महत्त्वाचा असल्याने कपालेश्वर मंदिरात महापूजा करण्यात आली. यावेळी महापूजा, रुद्राभिषेक, उत्तरांगपूजा करण्यात येऊन दीपोत्सव करण्यात आला. पहाटे ४.३० वाजता करुणास्तवन करून पूजेचा समारोप झाला.


पालखी मिरवणुकीत जयघोष

पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मंदिरापासून पालखीला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवल्यानंतर सायंकाळी रामकुंडावर पूजन करण्यात आले. यावेळी विश्वाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी १०८ औषधींनी मुखवट्याला अभिषेक घालण्यात आला. मंदिरात अनेक महिलांनी त्रिपूर वाती जाळल्या. यावेळी दोन हजार लिटर दुधाचे वाटप करण्यात आले. परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. रात्री उशिरापर्यंत हा भक्तिसागर, शिवनामाचा जयघोष कायम होता. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले होते.


ठिकठिकाणी उत्साह

गंगाघाटावरील निळकंठेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर येथेही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. गंगाघाटावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्यानंतर परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. कपालेश्वर मंदिराची रांग मालवीय चौकातल्या रामाच्या रथापर्यंत पोहोचली होती. गंगाघाटावर खाऊची व खेळण्यांची दुकाने लावण्यात आली होती. अबालवृद्धांनी यात्रेचा आनंद लुटला. तीळभांडेश्वर मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे नाशिकरोडच्या मुक्तिधाम, बिर्ला मंदिर, वालदेवी-दारणा संगमावरच्या संगमेश्वर मंदिरात परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती.


महिलांनी केले जागरण

महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ झाला. सुवासिनींनी शिव मंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतऱ्याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण केले. काही महिलांनी घरात ओल्या मातीचे शिवलिंग तयार करून त्याचे पूजन केले. कुमारिकांनीदेखील व्रत करून पूजा केली. महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या दिवशी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी समाप्त होतो. अनेक महिला मंडळांनी असा जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. जुन्या नाशकातल्या काही वाड्यांमध्ये जागरण करण्यात आले.

--

ओंकारेश्वर मंदिरातर्फे पालखी

नाशिक : सावतानगर येथील ओंकारेश्वर महादेव मंदिर देवस्थानतर्फे महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. यात परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

मंदिरात पहाटे पाच वाचता दहा दाम्पत्यांच्या हस्ते शिवलिंगाची महापूजा करण्यात आली. यानंतर सकाळी ११ वाजता सावतानगर परिसरातून महाशिव प्रतिमेची पालखी काढण्यात आली. सावतानगरमधील तरुणच नव्हे तर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनीही पालखी खांद्यावर घेत या सोहळ्यात सहभागी होण्याचा आनंद लुटला. पालखीचे ठिकठिकाणी रांगोळ्या आणि सडा शिंपत स्वागत करण्यात आले. सावतानगरमधून निघालेली पालखी हिरे विद्यालय, सावतानगर बसस्टॉप, शुभलक्ष्मी मंगल कार्यालय, पाटीलनगर, दत्त मंदिर, गार्गी कॉलेजमार्गे नेत परत सावतानगरला आणण्यात आली. नवनिर्वाचित नगरसेवक श्याम साबळे यांनी पालखीचे शुभलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ स्वागत केले. सावतानगरमध्ये पालखी आल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. महिलांनी फुगड्यांचा फेर धरला. दुपारी चार वाजता मंदिरात महिला भजनी मंडळातर्फे भजनांचा कार्यक्रम झाला. मंदिरात आलेल्या भाविकांना सायंकाळी साबुदाण्याच्या खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


नगरसेवकांचा सत्कार

महाशिवरात्रीनिमित्त मंडळातर्फे नवनिर्वाचित नगरसेवक सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, श्याम साबळे, भाग्यश्री डोमसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड उपस्थित होते. याच कार्यक्रमात महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. यात सुमारे ३०० महिलांनी सहभाग घेतला. त्यापैकी १२ जणींना मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाटील, हिरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर आता भाजपमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. भाजपचे शहर उपाध्यक्ष दिनकर पाटील यांचा मुलगा अमोल पाटील प्रभाग क्र. ८ मधून पराभूत झाला आहे. या पराभवाला आमदार सीमा हिरे जबाबदार असल्याचा आरोप अमोल पाटील याच्याआडून दिनकर पाटील यांनी केला आहे. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना दिलेल्या पत्रात सीमा हिरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मदत केल्याचा आरोप केला आहे, तर सीमा हिरे यांनीही पाटील पितापुत्रांना उत्तर देत, आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.

ज्या गंगापूर गावाच्या भरवशावर पाटील यांनी निवडणूक लढवली तेथून त्यांना शंभर मते मिळाली असल्याचा टोला लगावत, जे कोणत्या पक्षात आहेत, ते जनतेला कळत नाही, त्यांनी पक्षनिष्ठा शिकवू नये, असा चिमटा काढला आहे. प्रभाग क्र. ८ मधून शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून आले असून, भाजपचे पॅनल पराभूत झाले आहे. त्यात दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांचाही समावेश आहे.

सेनेला मदत केल्याचा आमदार हिरेंवर आरोप

अमोल पाटील यांनी या पराभवासंदर्भात थेट आमदार हिरे यांना जबाबदार धरले आहे. हिरे यांना विनंती करूनही त्या प्रचारात सहभागी झाल्या नाहीत असे सांगत, हिरे यांचे निवासस्थान या मतदारसंघात असूनही त्यांनी प्रचार केलेला नाही. राजकीय आकसापोटी हिरे यांनी उघड उघड शिवसेनेच्या उमेदवारांना मदत केली आहे. कार्यकर्त्यांना दमबाजी करून शिवसेनेचा प्रचार केल्याचा आरोप अमोल पाटील यांनी केला आहे. आमदार हिरे यांनी पक्षविरोधी काम केल्यानेच शिवसेनेचा विजय झाल्याचा दावा पाटील यांनी पत्रात केला आहे.

पक्ष बदलणाऱ्यांनी पक्षनिष्ठा शिकवू नये ः आमदार हिरे

पाटील पिता-पुत्रांच्या आरोपाला आमदार हिरे यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. अमोल पाटील यांना सावरकरनगरमध्ये सर्वाधिक मते पडली आहेत, तर ज्या गंगापूर गावाच्या भरवशावर त्यांनी उमेदवारी केली, त्या गंगापूर गावात पाटील यांना शंभर मतेही मिळालेली नाहीत. त्यामुळे पाटील पिता-पुत्रांनीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. स्वतःला निष्ठावंत म्हणून घेणारे पाटील कोणत्या पक्षात आहेत हे जनतेला आठवावे लागते, असा टोला लावत वारंवार पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये, असा टोला दिनकर पाटील यांना लगावला आहे. त्यामुळे दिनकर पाटील आणि आमदार हिरे आता आमनेसामने आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सेनेच्या बालेकिल्ल्याला हादरा

$
0
0

सेनेच्या बालेकिल्ल्याला हादरा


fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक : महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकरोड विभागात भाजपने मुसंडी मारून तब्बल बारा जागांवर विजयश्री खेचून आणली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकरोडमध्ये शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात येईल की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या दोन्ही कन्या या ठिकाणी पराभूत झाल्याने पक्षाला धक्का बसला आहे. त्यामुळे या भागातून शिवसेनेचे वर्चस्व कमी होऊन भाजपाला फायदा झाला आहे.

प्रभाग १७

येथील दोन जागा शिवसेनेला व दोन जागा भाजपला मिळाल्या आहेत. शिवसेना व भाजपची प्रत्येकी एक जागा आढाव कुटुंबीयांकडे आली आहेत. शिवसेनेचे प्रशांत दिवे विजयी झाले. भाजपच्या सुनंदा मोरे अवघ्या चारशे मतांनी पराभूत झाल्या. ब गटातील शिवसेनेच्या मंगला आढाव यांना ९ हजार २३० मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या ज्योती जाधव यांना अवघी चार हजार मिळाली. मंगला आढाव या व्यापारी बॅँकेच्या संचालक असल्याने त्याचा त्यांना फायदा झाला. क गटातून शिवसेनेच्या सुमन सातभाई यांनी आशा पवार यांचा पराभव करुन विजयश्री खेचून आणली. या प्रभागात खरी चुरस होती ती शिवसेनेचे शैलेंद्र ढगे आणि दिनकर आढाव यांच्यात. मागील पराभवाचा वचपा काढत भाजपचे दिनकर आढाव यांनी तब्बल ३ हजारांनी आघाडी घेत विजय मिळविला.

--

प्रभाग १८

या प्रभागातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पवन पवार याला भाजपने प्रवेश देत पावन करून घेतले होते. त्यामुळे हा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला होता. मात्र तिकीट वाटपावेळी त्याला तिकीट न देता भाजपच्या शरद मोरे यांना तिकीट देण्यात आल्याने पवन पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, मतदारांनी मोरे यांनाच विजयी केले. शिवसेनेच्या माजी नगरसेविका शोभना शिंदे यांनाही या लाटेत पराभव स्वीकारावा लागला. ब गटातील नगरसेविका रंजना बोराडे या निवडून आल्या. मंदा फड यांचा अवघ्या दोनशे मतांनी पराभव झाला. क गटात सचिन हांडगे यांच्या मातोश्री मीरा हांडगे या भाजकडून निवडून आल्या. शीतल ताकाटे व मनसेच्या रोहिणी पिल्ले यांनी चांगली लढत दिली. या प्रभागात खरी लढत झाली ती ड गटात. या ठिकाणी मागील निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झालेले अशोक सातभाई व माजी नगरसेवक सुनील बोराडे यांना नवख्या विशाल संगमनेरे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. या प्रभागात विशाल संगमनेरे निवडून येण्यासाठी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी परिश्रम घेतल्याची चर्चा होती.

प्रभाग १९

येथून शिवसेनेच्या संतोष साळवे यांना मतदारांनी पुन्हा एकदा निवडून दिले. मागील पंचवार्षिकमध्ये त्यांना सत्तेत सहभागी होता आले नव्हते. त्यांचे प्रतिस्पर्धी कन्हैया साळवे यांना मतदारांनी यंदा नाकारले. राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका शोभा आवारे यांना या प्रभागातून पराभवाला सामोरे जावे लागले. या ठिकाणी शिवसेनेच्या जयश्री खर्जुल निवडून आल्या. भाजपचे पंडित आवारे यांनी शिवसेनेचे बलाढ्य उमेदवार अंबादास ताजनपुरे व शिवाजी भागवत यांना पराभूत केले. शिवाजी भागवत यांच्या पत्नी वैशाली भागवत गेल्या पंचवार्षिकात नगरसेविका होत्या.

प्रभाग २०

येथून भाजपचे अंबादास पगारे निवडून आले. त्यांना शिवसेनेच्या अशोक पगारे यांनी कडवी झुंज दिली. सुरुवातीला कॉँग्रेस, नंतर राष्ट्रवादी व निवडणुकीच्या तोंडावर भाजपत प्रवेश केलेल्या सीमा ताजणे पुन्हा निवडून आल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सुनीता गायकवाड यांचा पराभव केला. या प्रभागात खरी चुरस होती ती संभाजी मोरुस्कर आणि गिरीश मुदलीयार यांच्यात. या दोघांपैकी मतदार कुणाला कौल देणार, हा या ठिकाणचा मुद्दा होता. बालाजी मंदिराच्या मुद्द्याचा फायदा संभाजी मोरुस्कर यांना झाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या अगोदरही मोरुस्कर या प्रभागात सातत्याने निवडून येत आहेत. ताराराणी सभागृह, त्यांनी बांधलेले हायटेक वाचनालय हा त्यांच्या प्रचाराचा मुद्दा होता. त्यांना केलेली कामे लोकांच्या नजरे समोर असल्याने लोकांनी त्यांना निवडून दिले. मनसेतून भाजपवासी झालेल्या संगीता गायकवाड यांनीही येथून बाजी मारली.

--

प्रभाग २१

शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांची कन्या तनुजा घोलप या दुसऱ्यांदा रिंगणात असल्याने त्याकडे नाशिकरोडकरांचे लक्ष लागले होते. येथून कोमल मेहरोलिया दुसऱ्यांदा निवडून आल्या. अपक्ष नयना वाघ यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. ब गटातून मनसेतून शिवसेनेत आलेले रमेश धोंगडे यंदा पुन्हा नगरसेवकपदी विराजमान झाले. याच गटातून अस्लम मणियार यांचा पराभव झाला. श्याम खोले यांच्या पत्नी ज्योती खोले शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या. शिवसेनेचे सूर्यकांत लवटे यांची दुसऱ्या प्रभागातून आलेले काँग्रेसचे सतीश मंडलेचा यांच्याशी लढत झाली. या ठिकाणी सूर्यकांत लवटे निवडून आले.

--

प्रभाग २२

येथील चारपैकी तीन जागा शिवसेनेला मिळाल्या व एक जागा भाजपला मिळाली. अ गटात भाजपच्या सरोज आहिरे निवडून आल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी माजी महापौर शिवसेनेच्या उमेदवार नयना घोलप पराभूत झाल्या. त्या निवडून याव्या म्हणून बबनराव घोलप व आमदार योगेश घोलप यांनी जंगजंग पछाडले होते. या ठिकाणी तिसऱ्या स्थानावर अपक्ष जगदीश पवार राहिले. या प्रभागात सर्वाधिक मते मिळाली ती शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी सत्यभामा गाडेकर यांना. त्यांनी भाजपच्या उमेदवार दीपाली कोठुळे व माजी नगरसेविका लंकाबाई हगवणे यांचा पराभव केला. क गटात शिवसेनेच्या सुनीता कोठुळे यांनी प्रणाली कोठुळे व गौरी साडे यांचा पराभव केला. पोटनिवडणुकीत निवडून आलेले केशव पोरजे पुन्हा निवडून आले. त्यांनी भाजपचे प्रभाकर पाळदे व मनसेचे जयराम हगवणे यांचा पराभव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेच्या विजयात धोक्याची घंटा

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

नवीन नाशिक विभागात संख्याबळ सर्वाधिक असले तरी भाजपच्या वाढत्या बळामुळे सेनेसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. विधानसभेपाठोपाठ या विभागातील मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवरील आपला विश्वास दृढ केला आहे. सेनेचा बालेकिल्ला म्हणता म्हणता येथे २०१२ मध्ये मनसेने घोडदौड केली, तर आता भाजपचे आठ ठिकाणी कमळ फुलले. येथे सैनिक म्हणून कमी, तर सुभेदार म्हणून सुरू झालेली भांडणे शेवटपर्यंत मिटलीच नाहीत.

शिवसेनेची खरी ताकद नाशिकरोड आणि नवीन नाशिक विभागात दिसून येते. महापालिका निवडणुका जाहीर होताच आयारामांनी या विभागांमध्ये प्रवेशासाठी तोबा गर्दी केली. अर्थात, याचा थेट परिणाम कार्यकर्त्यांवर झाला. सुरुवातीपासून शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता मतमोजणीवेळी प्रकट झाली. नवीन नाशिकमध्ये सर्वच ठिकाणी सेनेच्या विजयात पक्षाच्या करिश्मापेक्षा व्यक्तिसापेक्षता अधिक दिसून आली. बालेकिल्ल्यातील ही बदलती हवा पुढे वादळाचे रूप घेईल की शिवसैनिक पक्षाला वैभव प्राप्त करून देतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. नवीन नाशिक विभागात सेनेचे १५, भाजपचे ८, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला असून, काटाकाटीचे राजकारण सेनेच्या ताकदीवर परिणाम करून गेल्याचे दिसते.

प्रभाग २४ मध्ये शिवसेनेच्या प्रवीण तिदमे यांना भरभरून मतांचे दान पडले. शिवसैनिक म्हणून अनेक वर्षांपासून तिदमे यांनी केलेल्या कामाची ही पावती म्हणता येईल. तेच या प्रभागात मतदारांनी कैलास चुंभळे यांना घराचा रस्ता दाखवत थेट शिवाजी चुंभळे यांना यापुढे मतदारांना गृहीत न धरण्याचा सल्ला दिला. कल्पना चुंभळे आणि कल्पना पांडे या येथून निवडून आल्या. राजेंद्र महाले यांच्याप्रमाणे अश्विनी बोरस्ते यांची मात्रा येथे चालली नाही. पक्षाचे चिन्ह आडवे आले की ऐनवेळेस दुसऱ्या पक्षाकडे त्यांनी केलेली चाचपणी मतदारांना भावली नाही, याबाबत दोन मतप्रवाह निर्माण झालेले दिसतात. शिवसैनिकांची फौज आणि चुंभळे, तसेच पांडेंची ताकद असताना येथे राष्ट्रवादी पक्षाने अस्तित्व टिकवले हेच महत्त्वाचे.

प्रभाग २५ मध्ये बडगुजर दाम्पत्यांचा मोठा विजय झाला. एकाच प्रभागासाठी मतदान झालेले असताना सुधाकर बडगुजर यांच्यापेक्षा हर्षा बडगुजर उजव्या ठरल्या. त्या तुलनेत श्यामकुमार साबळे यांना मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला. भाग्यश्री ढोमसे यांनी भाजपचे कमळ येथे फुलवले. ‘अ’ आणि ‘ब’ वॉर्डाच्या तुलनेत ‘क’ आणि ‘ड’मध्ये उमेदवारांची संख्या मोठी होती. त्यामुळे चारही उमेदवार सेनेचे येतील, असा ठाम विश्वास सेनेच्या गटातून कधी व्यक्त झाला नाही. त्यातच मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अपक्षांनी मतविभाजन केले. २५ मध्ये ब आणि ‘ड’मध्ये शिवसेनेला आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी, तसेच ते टिकवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. २५,१६४ पैकी बहुतांश मतदारांनी ‘अ’ आणि ‘ब’मध्ये सेनेला डोळे झाकून मतदान केले, तर तेच ‘क’ आणि ‘ड’मध्ये विभाजित झाले. सेनेच्या एकतर्फी विजयाला यामुळे धक्का बसला.

प्रभाग २६ मध्ये भाजपने मोठ्या प्रमाणावर पैशांचे वाटप केल्याचा आरोप झाला. प्रत्यक्षात येथे तीन शिवसेना आणि एक भाजप असे समीकरण मतदारांनी जुळवून दिले. माकपचा गड मानल्या जाणाऱ्या भागात तानाजी जायभावे आणि वसुधा कराड यांचा पराभव बरेच काही सांगतो. या प्रभागासाठी भंगार बाजार हटवण्याचा मुद्दा दोन्ही बाजूंनी चर्चिला गेला. भंगार बाजार हटल्यामुळे दिलीप दातीर यांच्यासह शिवसेनेला फटका बसेल असे बोलले जात होते. प्रत्यक्षात मतदारांनी हा मुद्दा महत्त्वाचा होता हे यातून अधोरेखित केले. माकप आणि भाजपत झालेल्या मतविभागणीचा फायदा शिवसेनेला झाला. अलका आहिरे यांच्या रूपाने येथे एक कमळ फुलले. भागवत आरोटे, दिलीप दातीर यांना स्थानिक नातेगोते फायद्याचे ठरले.

प्रभाग २७ मध्ये मात्र मतदारांनी दोन धनुष्य आणि दोन कमळ असा संमिश्र कौल दिला. नगरसेवक उत्तम दोंदे यांच्या पराभवाची कारणमीमांसा शिवसेनेला करावी लागणार आहे. राकेश दोंदे यांनी विद्यमान नगरसेवक दोंदेंना मात देत कमळ फुलवले. दुसरीकडे शिवसेनेच्या चंद्रकांत खाडे यांचा विजय लता पवार यांनी सहज होऊ दिला नाही. खाडेंना अवघ्या २५४ मतांची आघाडी मिळाली. २७ ‘क’मध्ये किरण गामणे (शिवसेना), सोनल निकुंभ (भाजप) आणि संगीता दातीर (मनसे) यांच्यात मोठी चुरस झाली. १५,८०० पैकी तब्बल १३ हजार मते या तिघींमध्ये विभागली गेली. अगदी पाचशे मतांच्या फरकाने गामणे यांनी बाजी मारली. तेच ‘ड’मध्ये मात्र कावेरी घुगे यांनी शिवसेना उमेदवार तसेच विद्यमान नगरसेविका शोभा फडोळ यांच्यावर तब्बल एक हजार मतांनी विजय मिळवला. एकीकडे शिवसेना उमेदवारांना काही मतांचा लीड मिळाला असताना भाजपच्या एका जागेवर मात्र मतांचा मोठा फरक दिसून आला.

प्रभाग २८ मध्ये शिवसेनेत अंतर्गत बंडाळी उभी राहिली. दिलीप दातीर यांच्या पत्नीने या प्रभागात अपक्ष उमेदवारी केली. विशेष म्हणजे छुप्या प्रचारातदेखील त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा मटाले यांना चांगली लढत दिली. दातीर यांनी प्रचाराला जोर लावला असता तर येथे धनुष्यबाण निसटला असता. या प्रभागात एकूण तीन शिवसेना नगरसेवक निवडून आले, तर भाजपच्या प्रतिभा पवार यांनी विद्यमान नगरसेविका शीतल भामरे यांना पराभूत केले. या ठिकाणी दत्तात्रेय सोनवणे, सुवर्णा मटाले आणि दीपक दातीर यांनी पॅनलनुसार प्रयत्न केले. मात्र, अरुणा दातीर यांची पक्षविरोधी कारवाई आणि शीतल भामरे यांचा पराभव बराच काही स्पष्ट करतो.

प्रभाग २९ भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. या प्रभागात छाया देवांग, मुकेश शहाणे आणि नीलेश ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या रत्नमाला राणे विजयी झाल्या. नवीन नाशिक विभागातील या प्रभागात भाजपसाठी हे सर्वांत मोठे यश ठरले. येथे शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने घातलेल्या एबी फॉर्ममुळे अरविंद शेळके आणि सतीश खैरनार या दोन पुरस्कृत उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचता आले नाही. भाजपच्या आक्रमणापुढे विरोधी पक्षाचे प्रयत्न कमी पडले. काँग्रेसचे लक्ष्मण जायभावे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल महाले यांचा पराभवदेखील महत्त्वाचा ठरला. सिडकोत यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादीची उरलीसुरली ताकद संपुष्टात आली असून, यापुढे शिवसेना- भाजपत खरी लढाई होताना दिसेल.

सेना स्वयंभू, तर भाजपमागे हिरेंची ताकद

नवीन नाशिक विभागात सुधाकर बडगुजर, शिवाजी चुंभळे, दिलीप दातीर, डी. जी. सूर्यवंशी असे गट असून, शिवसेनेच्या विजयामागे व्यक्तिसापेक्ष ताकद उभी आहे. याउलट भाजपच्या वतीने आमदार अपूर्व हिरे यांची व्यूहरचना, तसेच पक्षीय पातळीवर झालेले काम दिसते. या पक्षांमधील हाच विरोधाभास शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काय चित्र निर्माण करतो हे पाहणे रंजक ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७६ हजार मतदारांनी केला ‘नोटा’चा वापर

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या ३१ प्रभागांतून १२२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीकडे ४ लाख १२ हजार मतदारांनी पाठ फिरवली होती. त्यात आता निकालानंतर ‘नोटा’चा वापर करणाऱ्या ७६ हजार २७० मतदारांची भर पडली अाहे. या मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबून योग्य उमेदवार नसल्यामुळे कोणत्याही उमेदवारांच्या पारड्यात मत टाकले नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या या निवडणुकीत ४ लाख ८८ हजार २७० जणांचे मत या यशात नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६१.६० होती. पण, ‘नोटा’मुळे मतांच्या संख्येतही घट होणार आहे. एकूण मतांच्या संख्येत ‘नोटा’ची टक्केवारी २.९२ असल्याचेही निवडणूक आयाेगाने दिलेल्या आकडेवारीत स्पष्ट केले आहे.

विविध कारणांचा फटका

स्थानिक स्वराज संस्थेत स्थानिक उमेदवार हा प्रत्येक भागातून उमेदवारी करत असतो. त्यामुळे त्याचा त्या भागाशी संबंध असतो. त्यामुळे या मतदानाची आकडेवीर खरतर ७० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान असायला हवी. पण, ती साधारण ६० टक्क्यांच्या आसपास असते. ही टक्केवारी कमी होण्यामागे अनेक कारणेही आता पुढे येऊ लागली आहेत. मतदारयादीतील घोळही यात प्रमुख कारण आहे. त्यातच अनेक नावे प्रभाग सोडून दुसरीकडे टाकल्यामुळे मतदार फारसा उत्सुक नसतो. त्याचप्रमाणे मतदार केंद्रही दूर असल्यामुळे मतदार जात नाहीत. काही ठिकाणी स्थानिक वाद नको म्हणून अनेक जण मतदानाच्या भानगडीतच पडत नाहीत. पण, शहराच्या विकासासाठी व विविध प्रश्नांसाठी मतदारांनी पुढे येणे गरजेचे आहे.

प्रमाणात होतेय वाढ

एकीकडे मतदान न करण्याची अनेक कारणे असली, तरी आता मतदान केंद्रात जाऊन ‘नोटा’चे बटण दाबण्याचे प्रमाणही वाढले आहे. योग्य उमेदवार नसणे, अशिक्षित उमेदवार, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार असणे यांसारखी कारणे यामागे आहेत. त्यातच काही जण चांगल्या उमेदवारांनाही नाकारतात, पण तो त्यांचा हक्क असतो. त्यामुळे ही संख्याही मतदानाच्या या टक्केवारीत आता कमी होऊ लागली आहे.

अशी आहे आकडेवारी

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा या प्रकारात साडेचार टक्क्यांच्या आसपास वाढ झाली आहे. गेल्या वेळी मतदानाची टक्केवारी ५७.१८ होती, तर यावेळी हीच टक्केवारी ६१.६० राहिली. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत १० लाख ३ हजार मतदान असताना ५ लाख ७५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत १० लाख ७३ हजार ४०८ मतदारांपैकी ६ लाख ६१ हजार १९९ मतदारांनी हक्क बजावला. त्यात ‘नोटा’ची संख्या ७६ हजार २७० आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेच्या गडावर भाजपचे राज्य

$
0
0

विनोद पाटील, नाशिक

भाजपने शहरातील सर्व सहा प्रभागांमध्ये चांगली कामगीरी करत महापालिकेवर एकहाती वर्चस्व मिळवले आहे. त्यात नाशिक पूर्व विभागाचा वाटाही मोलाचा ठरला आहे. नाशिक पूर्वमधील १५ पैकी १२ जागा जिंकत या विभागावरही एकहाती वर्चस्व मिळवले आहे. या विभागात भाजपसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या माजी आमदार वसंत गिते यांच्या पुत्राने बाजी मारली असली तरी विद्यमान नगरसेवक प्रा. कुणाल वाघ यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेलाही जबर फटका बसला असून, सचिन मराठे या दिग्गज नगरसेवकाला पराभव सहन करावा लागला आहे. मनसेला आपला गड गमवावा लागला आहे.

नाशिक पूर्व विभाग हा गेल्या वेळी मनसेचा बालेकिल्ला होता. या भागातील २४ पैकी ९ जागांवर मनसेचे वर्चस्व होते. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे ५, काँग्रेस ४, भाजप २ आणि शिवसेनेचा एक सदस्य निवडून आला होता. मात्र, चार सदस्यीय प्रभागरचनेनंतर यातील काही भाग हा पश्चिम विभागाला जोडला गेल्याने या विभागातील सदस्यसंख्या घटली आहे. प्रभाग क्र. १५, १६, २३ आणि ३० हा परिसर या भागाला जोडला गेला आहे. या चार प्रभागांमध्ये १५ जागा असून, यातील १२ जागांवर आता भाजपने विजय मिळवला आहे. काँग्रेस २, राष्ट्रवादीने एक जागा पटकावली आहे. शिवसेना आणि मनसेला या भागात खातेही खोलता आलेले नाही. नाशिक पूर्वमधील प्रतिष्ठेच्या प्रभाग क्र. १५ मधील वसंत गिते यांचा मुलगा प्रथमेश गिते यांनी यापूर्वी तीन वेळा या भागाचे नगरसेवकपद भूषविलेले सचिन मराठे यांचा पराभव केला आहे. प्रभाग क्र. १६ मध्ये भाजपचे विद्यमान नगरसेवक प्रा. कुणाल वाघ यांचा काँग्रेसचे राहुल दिवे यांनी दारुण पराभव केला आहे. भाजपचे गटनेते व ज्येष्ठ नेते सतीश कुलकर्णी यांनी आपला गड राखला आहे.

गितेंनी प्रतिष्ठा राखली

प्रभाक क्र. १५ या तीनसदस्यीय प्रभागात भाजपने एकहाती विजय मिळवला आहे. भाजपच्या वतीने प्रथमेश गिते, सुमनताई भालेराव, अर्चना थोरात विजयी झाले आहेत. यातील सर्वांत प्रतिष्ठेची लढाई ही तीन वेळा नगरसेवक राहिलेले शिवसेनेचे सचिन मराठे आणि प्रथमेश गिते यांच्यात झाली. या प्रभागात वसंत गिते यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, गिते यांनी आपली प्रतिष्ठा कायम राखत मराठे यांचा तब्बल दीड हजार मतांनी पराभव केला. अर्चना थोरात यांनी शिवसेनेच्या सीमा पवार यांचा चार हजार मतांनी पराभव केला आहे. सुमन भालेराव यांनी काँग्रेसच्या अर्चना टाकेकर यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव केला आहे. तिन्ही उमेदवारांचा विजय हा मोठ्या फरकाने झाला असून, गितेंच्या पक्षातील वजनामुळे पालिकेतील महत्त्वाची पदे या प्रभागाला मिळण्याची शक्यता आहे. अर्चना थोरात दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यामुळे या पदासाठी त्या सर्वांत जास्त दावेदार आहेत.

दिवेंनी गड राखला

प्रभाग क्र. १६ मधील नागरिकांनी संमिश्र कौल दिला असला तरी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या प्रभागातून काँग्रेसकडून राहुल दिवे, आशा तडवी, राष्ट्रवादीकडून सुषमा पगारे, तर भाजपकडून अनिल ताजनपुरे निवडून आले आहेत. माजी महापौर अशोक दिवे यांनी या प्रभागावरील वर्चस्व कायम ठेवले आहे. या भागातून गेल्या वेळी भाजपचे प्रतिनिधित्व करणारे प्रा. कुणाल वाघ मात्र राहुल दिवे यांच्याकडून पराभूत झाले आहेत. राहुल दिवे यांनी वाघ यांचा तब्बल दोन हजार मतांनी पराभूत केले. ते पराभूत झाले असले तरी अनिल ताजनपुरे यांनी भाजपची जागा भरून काढली आहे. राष्ट्रवादीनेही या भागात प्रतिनिधित्व मिळवले आहे.

शतप्रतिशत भाजप

प्रभाग क्र. २३ मधील चारही जागांवर कमळ फुलले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश कुलकर्णी यांनी आपला गड राखत भाजपच्या चारही जागा जिंकल्या आहेत. कुलकर्णी यांनी शिवसेनेचे उमेदवार ऋषिकेश वर्मा यांचा तब्बल आठ हजार मतांनी पराभव केला, तर माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे यांनी सेनेच्या सुनील खोडे यांचा चार हजार मतांनी पराभव केला. मिर्झा शाहीन बेग या मुस्लिम समाजाच्या एकमेव नगरसेविका याच प्रभागातून निवडून आल्या आहेत. त्यांनी सेनेच्या निर्मला थेटे यांचा दीड हजार मतांनी पराभव केला. मनसेतून भाजपवासी झालेल्या यशवंत निकुळे यांच्या पत्नी रूपाली निकुळे यांनीही सेनेच्या वर्षा बोंबले यांचा चार हजार मतांनी पराभव केला आहे. अनुसूचित जमाती गटातून त्या निवडून आल्या असून, त्यांना महापौरपदाची संधी आहे.

चव्हाण यांचा पराभव

प्रभाग क्र. ३० मधील चारही जागांवर कमळ फुलले आहे. यापूर्वी या प्रभागावर मनसेचे वर्चस्व होते. मात्र, भाजपने आता तो खेचून आणला आहे. एबी फॉर्मच्या घोळामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना इथे अपक्ष लढण्याची वेळ आली होती. सतीश सोनवणे आणि दीपाली कुलकर्णी यांनी मनसेतून पक्षांतर करत भाजपकडून निवडणूक लढवली होती. त्यांना यश आले असून, मोठ्या फरकाने त्यांनी विजय मिळवला आहे. या प्रभागात शिक्षण समितीचे सभापती संजय चव्हाण आणि सतीश सोनवणे यांच्यात सामना होता. सोनवणे यांनी चव्हाण यांचा तब्बल पाच हजार मतांनी पराभव केला आहे. अपक्ष नगरसेविका व शिवसेनेतून निवडणूक लढवणाऱ्या रशिदा शेख यांनाही दारुण पराभव पत्करावा लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images