Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मतदानाचा वाढला टक्का

$
0
0

महापालिकेसाठी ६१ टक्के मतदान; शहरात काही ठिकाणी किरकोळ वाद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेसाठी वादावादीच्या किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. मागील पंचवार्षिकपेक्षा यंदा मतांचा टक्का वाढला आहे. सरासरी ६१ टक्के मतदानाची नोंद झाली असून, १२२ जागांसाठी ८२१ उमेदवारांचे भवितव्य आता बॅलट मशिनमध्ये बंद झाले आहे. वाढलेल्या मतदान टक्केवारीचा फायदा कोणाला होणार याकडे लक्ष लागून आहे.

पहिल्यांदाच झालेल्या बहुसदस्यीय प्रभागरचनेत अनेक ठिकाणी मतदारांची एकगठ्ठा नावे गायब झाली, तर काही ठिकाणी मतदारांची नावे इतर प्रभागांत वर्ग झाल्याने मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. मतदान प्रक्रिया सुरू होताच चार बूथवर बॅलेट मशिन बंद पडले, तर पाच ठिकाणी एरर आल्याने मशिन बदलण्यात आले. हा गोंधळ मिटवला तरी मतदार यादीतल्या घोळाने यंत्रणेसह मतदारांची तारांबळ झाली.

प्रथमच बहुसदस्यीय प्रभागरचनेचा फटका मतदारांना बसला होता. उमेदवारांची वाढलेली संख्या, बॅलट मशिनची वाढलेल्या संख्येमुळे मतदार गोंधळात सापडले. त्यामुळे मतदारांचे प्रबोधन करतांना यंत्रणा जेरीस आली होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत अवघे १८.५० टक्के मतदान झाले होते. साडेतीन वाजेपर्यंत हा आकडा ४३.३३ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. साडेतीन वाजेनंतर मतांचा टक्का चांगलाच वाढला होता. लक्ष्मीदर्शन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर काही भागांमध्ये मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडल्याचे चित्र होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरात ५० बुथवर मतदान सुरू होते.

गोंधळाने हक्क हिरावला

नेहमीप्रमाणे मतदार यादीतल्या गोंधळाने यंत्रणेसह मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सर्वच प्रभागांमधल्या मतदार यादीतल्या गोंधळामुळे जवळपास पाच ते सात टक्के नागरिकांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले. अनेक मतदारांचे थेट प्रभाग बदलण्यात आले होते. एकाच कुटुंबातील व्यक्तींचे बूथ बदलण्यात आले. मतदार यादीतील गोंधळामुळे अनेक मतदान केंद्रावर वादावादीच्या घटना घडल्याने तणावही निर्माण झाला.

उत्साह अन् निरुत्साह

मतदानात मोठ्या प्रमाणावर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला असला, तरी काही ठिकाणी यादीतून नावे गायब झाल्याने तसेच स्थलांतरीत झाल्याने मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग अतिशय थंड होता. काही ठिकाणी बोगस मतदान करण्याचाही प्रयत्न झाला. चार मतदान केंद्रामध्ये उमेदवारच आमने-सामने आल्याने त्यांच्यात वादावादी झाली. परंतु, पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. यामुळे यंत्रणेला चांगलीच कसरत करावी लागली.

महापालिका मतदान टक्केवारी
१९९२ : ६७ , १९९७ : ६५, २००२ : ५५.३९, २००७ : ६०, २०१२ : ५७.१८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा परिषदेसाठी ६८ टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात यंदा सुमारे ६८ टक्के मतदान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्याने ही टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली. आता गुरुवारी (दि. २३ फेब्रुवारी) रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात सरासरी ६८ टक्के मतदान झाले असून, २०१२ मध्ये सरासरी ६२.२० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या ७३ गट आणि पंचायत समित्यांच्या १४६ गणांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हा परिषद गटासाठी ३३८, तर गणांसाठी ६७३ अशा एकूण १०११ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले. मतदारांच्या गर्दीमुळे सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. जिल्ह्यात सरासरी ६८ टक्के मतदान झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी दिली आहे.

तालुकानिहाय मतदान टक्केवारी

बागलाण ६५, मालेगाव ७२, देवळा ६६, कळवण ७४, सुरगाणा ७०, पेठ ६५, दिंडोरी ७८, चांदवड ६४, aनांदगाव ७५, येवला ७१, निफाड ६१, नाशिक ६८, त्र्यंबकेश्वर ६७, इगतपुरी ७०, सिन्नर ६९, एकूण ६८.००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टक्कावाढीचा फायदा कुणाला?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निवडणुकीत मतदान टक्केवारीतील वाढ म्हणजे मतदारांचा प्रस्थापितांच्या विरोधात कौल असल्याचा तर्क आजवर मानला गेला आहे. याच आधारावर नाशिक महापालिकेत झालेले विक्रमी मतदान म्हणजे मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला धोक्याचा इशारा देणारे, तर शिवसेना-भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची चिन्हे आहेत. आता वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शिवसेनेला होतो की भाजपला हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

व्हिडीओ प्रकरण, बंडाळी यामुळे काहीसे पिछाडीवर गेलेल्या भाजपने शेवटच्या टप्प्यात शिवसेनेला चांगली फाइट दिल्याचे मतदानाच्या वाढलेल्या आकडेवारींतून दिसून येत आहे. वाढलेल्या टक्केवारीने शिवसेना आणि भाजपमधील संख्यात्मक दरी कमी होईल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात केली जात आहे. दुसरीकडे मतदारांच्या गोंधळामुळे महापालिकेची वाटचाल त्रिशंकूकडे गेल्याचेही संकेत मिळत आहेत. महापालिकेसाठी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी जवळपास तीन ते साडेतीन टक्क्यांनी वाढली असून, मतदान ६१ टक्क्यांवर गेले आहे. सन २००७ मध्ये ६० टक्के मतदान झाले होते, तर २०१२ मध्ये ५७.१८ टक्के मतदान झाले होते. गेल्यावेळेस नाशिकमध्ये सत्तांतर होवून मनसेची सत्ता आली होती. परंतु, नगरसेवकांच्या पळापळीने मनसेला ओहोटी लागली होती. त्यामुळे नाशिक महापालिकेत शिवसेना आणि भाजपमध्येच फाइट होईल असे चित्र होते. मधल्या काळात दोन लाखांचे व्हिडीओ प्रकरण, तिकीट वाटपात झालेला गोंधळ, निष्ठांवतांची नाराजी आदी कारणांमुळे भाजप बॅकफूटवर गेला होता. शिवसेनेचा जोर वाढल्याने हाच पक्ष क्रमांक एकवर राहील, असे चित्र होते. निवडणुकीच्या दोन ते तीन दिवस आधी भाजपने नकारात्मकता बदलण्यात बऱ्यापैकी यश मिळवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने भाजपला काहीसा दिलासा मिळाला, तर शेवटच्या टप्प्यात यंत्रणेनेही भाजपला साथ दिल्याचे चित्र होते. त्यातच मतदानाची टक्केवारी वाढल्याने हा फायदा कोणाला होईल याची चर्चा आता सुरू झाली आहे. वाढलेल्या टक्केवारीने शिवसेना आणि भाजपमधील जागांमधील अंतर कमी होईल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. असे असले तरी मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तीनही पक्ष सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावतील.

पॅनलऐवजी संमिश्र मतदान!

महापालिका निवडणुकीत शिवेसना व भाजपची लाट असली तरी बहुसंख्य प्रभागांमध्ये पक्षांचे पॅनल मात्र लंगडे झाल्याचे दिसून आले. शिवसेनेचे बहुसंख्य प्रभागात पूर्ण पॅनल लागेल असे चित्र निवडणुकीपूर्वी होते. परंतु, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदार गोंधळलेला दिसला. उमेदवार पाहूनच मतदान झाले. त्यामुळे एकाच पक्षाचे पूर्ण पॅनल लागणाऱ्या प्रभागांचा आकडा खूपच घटला आहे. त्याचा नेमका फायदा कुणाला होतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. बहुसदस्यीय पद्धतीत मतदाराने पूर्ण पॅनलऐवजी संमिश्र मतदान केल्याचेच सूतोवाच मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंडावळ्या बांधून बजावले ‌राष्ट्रीय कर्तव्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

लोकशाहीत निवडणुका हा एक राष्ट्रीय उत्सव असून या उत्सवात प्रत्येकाने सहभागी होवून प्रत्येकाने मतदानाचे आपले कर्तव्य पार पाडावे असे अपेक्षित असते. बहुतांश जणांना या कर्तव्याशी देणेघेणे नसते. परंतु, अंगाला लागलेली हळद, लग्नासाठी पाहुणे आणि वऱ्हाडी दारी येवून थांबलेले, अन् काही तासांतच लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या तयारीत असलेल्या भाग्यश्री जगताप या तरुणीने मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पडता यावे म्हणून लग्नाच्या रेशीम गाठीत बांधण्याच्या वेळेआधीच मतदान केंद्रावर जाऊन तिने मतदान केले.

माणिकशा नगरमधील रहिवाशी असलेल्या भाग्यश्री जगताप हिचा मंगळवारी सकाळी अकरा वाजता विवाह सोहळा होता. लगीनघरी कार्यक्रमाची धांदल सुरू असतानाही तिने विवाहाच्या अगोदर मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून आपले कर्तव्य पूर्ण केले. सकाळी आठ वाजता द्वारका भागातील अटलबिहारी वाजपेयी शाळेत जाऊन त‌िने मतदानाचा हक्क बजावला. अंगावर हळद असताना बाहेर निघण्याची तसदीही न घेणाऱ्या तरुणींसाठी भाग्यश्रीने एक वेगळा आदर्श ठेवला आहे. यातून तिने मतदानाचा सकारात्मक संदेश दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वोटिंग स्ल‌िप क्लृप्ती पोलिसांनी हाणून पाडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आचारसंह‌िता असताना मतदारांना आपल्या पक्षाच्या चिन्हाची माहिती व्हावी यादृष्टीने छापण्यात आलेल्या मतदार चिठ्ठ्या पोलिसांनी जप्त करीत उमेदवारांना दणका दिला. काही ठिकाणी मोबाइल तसेच मतदार चिठ्ठ्यांचे मशिन जप्त करण्यात आले. पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच धावपळ झाली.

मतदार याद्यांमधील गोंधळ, मतदारांचे शेवटपर्यंत राजकीय पक्षांवर विसंबून राहणे तसेच इंटरनेटवरील यादीत नाव असताना प्रत्यक्षात यादीत नावच नसणे, असे प्रकार सकाळपासून सुरू झाले. भर उन्हात हा खेळ सुरू असताना बूथबाहेर मतदारांच्या सहाय्यासाठी कार्यकर्ते बसवण्यात आले होते. शहरातील सर्वच प्रभागांमध्ये राजकीय पक्षांनी मतदार स्लीप तयार करून ठेवल्या होत्या. मात्र, आपल्याच उमेदवाराचे नाव आणि चिन्ह स्पष्टपणे दिसेल याची काळजी संबंध‌ितांनी घेतली. सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होताच पोलिसांच्या ही बाब लक्षात आली. प्रत्येक बूथजवळ बसलेल्या कार्यकर्त्यांकडे असलेल्या या चिठ्ठ्या पोलिसांनी जप्त केल्या. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, अतुल झेंडे यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. याबाबत श्रीकांत धिवरे म्हणाले की, बूथच्या १०० मीटर आत पक्षाचे चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या पोहचल्यास, संबंध‌ितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. पुढील कार्यवाही टाळण्यासाठी आम्ही सकाळपासून हजारो वोटिंग स्ल‌िप जप्त केल्याचे उपायुक्त धिवरे यांनी सांगितले. अनेक उमेदवारांनी वोटिंग स्ल‌िप वाटपासाठी मशिनचा वापर केला. या मशिनही पोलिसांनी जप्त केल्या.

मोबाइलही जप्त

मतदान केंद्रात बसलेल्या पोलिंग एजंटांसह कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, अनेक जणांनी मोबाइलचा वापर सुरू ठेवला. वडाळा गावासह इतर ठिकाणी असे मोबाइल जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांनी दिली. बॅरकेडिंगसह इतर बंदोबस्त चोख असून, गोंधळाची परिस्थिती उद््भवणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याचे झेंडे यांनी सांगितले.

‘सूचक’ रंग उत्सुकतेचा विषय

आचारसंहिता नियमांशी कसे खेळायचे याची जाणीव असलेल्या उमेदवारांनी पक्षाशी सुसंगत रंगांचा खुबीने वापर केला. झेंडे, विशिष्ट रंगांच्या साड्या परिधान केलेल्या महिला, उमेदवाराची ओळख पटेल त्याच रंगाच्या छत्र्यांचा वापर सर्रास झाला. उमेदवारदेखील पक्षाच्या झेंड्याच्या रंगाशी साधर्म्य असलेल्या वेशात दिसून आले. पक्षाचे प्राबल्य असलेल्या विभागानुसार झेंडे, छत्र्या तसेच साड्यांचे रंग बदललेले दिसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाही रंगणार ‘मटा’ वुमन्स बाइक रॅली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. महिलांची ही प्रत्येक क्षेत्रातील कामगिरी त्यांचा आत्मविश्वास बळकट करण्यासाठी अत्यंत मोलाची ठरत असते. याच आत्मविश्वासाचे मोल आणखी वाढविण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे महिला दिनानिमित्त ‘वुमन्स एम्पॉवरमेंट बाइक रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. भोसला मिलिटरी कॉलेजच्या मैदानावर ५ मार्च रोजी सकाळी ७ वाजता रॅलीस प्रारंभ होणार आहे.
‘मटा’तर्फे गेल्या काही वर्षांपासून ८ मार्च या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी बाइक रॅली आयोजित केली जाते. ही बाइक रॅली म्हणजे अनेकींसाठी औत्सुक्याचा विषय असतो. गेल्या वर्षीही मोपेड बाइकबरोबरच बुलेटवर स्वार होत पारंपरिक संस्कृतीचे दर्शन महिलांनी या रॅलीत घडविले होते. १८ वर्षे वयोगटापुढील व लायसन्सधारक महिलांना यात सहभागी होता येणार आहे.

असा असेल मार्ग
भोसला मिलिटरी कॉलेजपासून सुरू झालेली ही रॅली कॉलेजरोड, डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड, जेहान सर्कल, नवशा गणपती, बारदान फाटा, साधना मिसळ, मोतीवाला कॉलेज, त्र्यंबक रोड, एबीबी सर्कल व पुन्हा भोसला मिलिटरी कॉलेज येथे समाप्त होणार आहे.

नोंदणी आवश्यक
रॅलीत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ६६३७९८७ या क्रमांकावर सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत संपर्क साधा किंवा ७०४०७६२२५४ या क्रमांकावर BIKERALLY - सहभागी होणाऱ्या महिलेचे नाव असे टाइप करुन पाठवावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे रविवारी भगूरला हेरिटेज वॉक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक व स्वातंत्र्यवीर म्हणून ओळखले जाणारे विनायक दामोदर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे भगूर येथे रविवारी, २६ फेब्रुवारीला सकाळी ८.३० वाजता हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. भगूर येथील सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे ‘मटा’ हेरिटेज वॉकच्या माध्यमातून स्वा. सावरकरांना अभिवादन तसेच त्यांच्या कार्याची माहिती करून देण्यात येणार आहे.

देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (जन्म २८ मे १८८३; मृत्यू २६ फेब्रुवारी १९६६) हे आजही देशभक्तीच्या विचारांनी तरुणांच्या नसानसांत सळसळताना दिसतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदूसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. कवी व लेखक म्हणूनही प्रसिद्ध असलेल्या स्वा. सावरकरांनी पत्रकारिता ते समाजसुधारक म्हणूनही केलेले कार्य अनोखे आहे. असे अनेक पैलू मटा हेरिटेज वॉकच्या माध्यमातून थेट त्यांच्याच जन्मघर असलेल्या स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकात उलगडले जाणार आहेत. हेरिटेज वॉकमध्ये प्रा. रामनाथ रावळ, प्रशांत पाटील, न‌िखील देशमुख उपस्थितांना सावरकरांच्या विविध पैलूंविषयी माहिती देतील. सावरकांच्या घरातील स्वातंत्र्यलक्ष्मीची मूर्ती खंडोबा मंदिरात आहे हे मंदिर व स्वातंत्र्यलक्ष्मीचे दर्शनही घेण्याची संधी हेरिटेज वॉकच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच करंजकर गल्लीतील मुरलीधर मंदिरही पाहण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.

काय पाहता येणार?

हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होऊ इच्छ‌िणाऱ्यांनी सकाळी ८.३० वाजता सावरकर स्मारकात जमायचे आहे. स्वा. सावरकरांचे जन्म घर पाहिल्यानंतर करंजकर गल्लीतील मुरलीधर मंदिर व त्यानंतर अष्टभुजा स्वातंत्र्यलक्ष्मीची खंडोबा मंदिरातील मूर्ती पाहणार आहोत.

नावनोंदणी आवश्यक

मटा हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सहभागी होऊ इच्छ‌िणाऱ्यांनी रमेश पडवळ यांच्या ८९९९००८५८८ या क्रमांकावर आपले नाव व सोबत येणाऱ्यांची संख्या व्हॉटसअप अथवा एसएमएस करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगाव, चांदवडच्या उमेदवारांमध्ये धाकधूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड व नांदगाव जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला सत्तासंपादनाकडे घेऊन जातो आणि कोणाचा वारू थोपवतो याकडेच अवघ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे. मंगळवारी मतदान झाल्यानंतर बुधवारी विविध तर्कवितर्क व अंदाजांना उधाण आले.

चांदवड व नांदगावमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विजयाची खात्री असल्याचे दिसते. मात्र, शिवसेना व भाजप बरोबरच बंडखोर अपक्ष उमेदवारांचे मोठे आव्हान असल्याने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत नांदगावमध्ये सत्ता संपादन करणे आघाडीला जड जाईल, असे दिसते. गेल्या निवडणुकीत नांदगावमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. या वर्चस्वाला छेद देण्यासाठी शिवसेनेने केलेली तयारी या निवडणुकीत आघाडीसाठी अडचण ठरेल, असे दिसते. तर चांदवडमध्येदेखील शिवसेना भाजपसह अपक्षांचा मोठा प्रभाव जाणवल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे तुल्यबळ उमेदवार या प्रभावाला कसे दूर सारतात याचा फैसला गुरुवारी होणार आहे.

माजी आमदार शिरीष कोतवाल, उत्तमबाबा भालेराव, डॉ. सयाजी राव गायकवाड यांच्या नेतृत्वाचा कस या निवडणुकीत लागला असून, चांदवडमध्ये आघाडीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपलाही

मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचा विषय आहे. २०१२ मधील निवडणुकीत चांदवडमध्ये ६४.९० इतके मतदान झाले होते. ते यंदा २.८३ टक्क्याने वाढले आहे. तर नांदगावमध्ये यंदा गेल्या पंचवार्षिकपेक्षा मतदानात मोठी वाढ झाल्याने ५२.३८ पेक्षा १० ते साडे दहा टक्के जास्त म्हणजे ६३.५९ एवढे मतदान झाल्याने मतदानाचा हा वाढलेला टक्का कोणाला तारक ठरतो किंवा कोणाच्या अपेक्षांना सुरुंग लावतो हे पाहण्यासाठी उद्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. शिवसेना व भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवून परस्परांना शह दिला आहे. त्याचा आघाडीला फायदा होतो, की वेगळे लढूनही दोघे आपली ताकद वाढवतात हेदेखील उद्या कळणार आहे.

माजी आमदार संजय पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपने ज‌ि. प. व पं. स. निवडणुकीत ग्रामीण भागात निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विशेषतः भालूर गटात पवार बंधू बाजी मारून शिवसेनेचे आव्हान संपुष्टात आणतात की शिवसेना हा गड सर करते व नांदगावमध्ये आघाडीला पराभूत करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चांदवडमध्ये तळेगाव रोही, दुगाव, वडनेर भैरव, वडाळी भोई या चारही गटात चुरस तर न्यायडोंगरीतील आहेर कुटुंबातील आजी विरुद्ध नात या चर्चेतील लढतीकडे, यासह साकोऱ्याची प्रतिष्ठेची लढाई, भालूरमधील प्रतिष्ठा व अस्तित्वाची निवडणूक आदींच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार लाख मतदारांनी फिरवली पाठ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महानगरपालिकेच्या ३१ प्रभागांतून १२२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत साडेचार टक्क्यांच्या आसपास वाढ झाली. मात्र, तरीही चार लाख १२ हजार मतदारांनी या निवडणुकीत पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. गेल्या वेळी मतदानाची टक्केवारी ५७.१८ होती, तर यावेळी हीच टक्केवारी ६१.६० इतकी असून, त्यात ४.४२ टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत महिला व पुरुषांनी बरोबरीने मतदान केले असले तरी पुरुषांचा टक्का थोडा जास्तच आहे. ६०.५४ महिलांनी तर ६२.५२ टक्के पुरुषांनी मतदान केले. ही आकडेवारी गेल्या वेळच्या तुलनेत १.९८ टक्क्यांनी वाढली आहे. प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे मतदानाचा आकडा वाढला असला, तरी ३९ टक्के मतदार मात्र वेगवेगळ्या कारणांनी मतदानाला आलेच नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत १० लाख ३ हजार मतदान असताना ५ लाख ७५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत १० लाख ७३ हजार ४०८ मतदारांपैकी ६ लाख ६१ हजार १९९ मतदारांनी हक्क बजवला आहे. त्यात ५ लाख ७० हजार ६९९ पुरुष मतदारांपैकी ३ लाख ५६ हजार ८५५ मतदारांनी मतदान केले. महिलांमध्ये ५ लाख २ हजार ६३७ मतदारांपैकी ३ लाख ४ हजार ३४१ मतदारांनी हक्क बजावला.


तृतीथ पंथ‌ियांची तीन मते

मतदानाचा हक्क मिळूनही ७२ पैकी तीन तृतीयपंथ‌ियांनी मतदान केले. विशेष म्हणजे ही तिन्ही मते वेगवेगळ्या प्रभागांत होती. त्यात प्रभाग क्रमांक ९ व १० मध्ये प्रत्येकी एक मत तर प्रभाग क्रमांक २७ मध्ये एक मतदान झाले.

सर्वधिक मतदान प्रभाग दोनमध्ये

आडगाव, अमृतधाम व नांदूर-मानूर गाव हा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वाधिक मतदान झाले. या प्रभागात ३४ हजार ४९० मतदार होते. त्यापैकी २३ हजार ७८७ मतदारांनी आपला हक्क बजावला. याची टक्केवारी ६८.९७ होती. यात १२ हजार ७९० पुरुष, तर १० हजार ९९७ महिलांनी आपला हक्क बजावला. सर्वात कमी मतदान शिखरेवाडी परिसरात असलेल्या प्रभाग क्रमांक २० मध्ये झाले. यात ३२ हजार ७१ मतदारांपैकी १७ हजार ६६२ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यात पुरुषांची संख्या ९ हजार ३७२ तर महिलांची संख्या ८ हजार २९० होती.


सामाजिक संस्थांचा पुढाकार

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनेक सामाजिक संस्थांसह व्यावसायिक व संघटना पुढे आल्या. काहींनी चित्रपट तिक‌िटावर सूट जाहीर केली तर काहींनी हॉटेलमध्ये डिस्काऊंट जाहीर केला. यातून टक्केवारी वाढण्यात हातभार लागला. राज्य निवडणूक आयोग व महानगर पालिका प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून अनेक कार्यक्रम घेतले. त्यामुळे या टक्केवारीत वाढ झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यश-अपयश कुणाच्या नशिबी?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येवल्यात मंगळवारी अगदी चुरशीने मतदान झाल्यानंतर गुरुवारी (दि.२३) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कोणाच्या नशिबी सात्वन येते आणि कोणाला गुलाल उधळण्याची संधी, याबाबतची उत्कंठता शिगेला पोहोचली आहे.

जिल्हा परिषदेच्या पाच गटांसह पंचायत समितीच्या दहा गणातील निवडणुकीसाठी मंगळवारी येवला तालुक्यातील १६७ मतदान केंद्रांवर एकूण १ लाख ५० हजार ६०४ मतदारांपैकी १ लाख ९ हजार १९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सरासरी ७२.५० टक्के मतदारांनी ‘ईव्हीएम’च्या 'वरील कळ दाबली. गट-गणातील पंधरा जागांवर निवडणूक रिंगणात उतरलेल्या एकूण ६४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. मंगळवारच्या मतदानात तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी अगदी उशिरापर्यंत मतदान झाले. मुखेड गटातील निमगाव मढ, चिचोंडी खुर्द, पाटोदा गटातील पाटोदा, अंदरसूल गटातील रास्ते सुरेगाव या मतदान केंद्रांवर मतदान संपण्याच्या अवघा तासभर मतदारांच्या रांगा लागल्याने सायंकाळी साडेपाच वाजेनंतरदेखील मतदान सुरू होते. चिचोंडी खुर्द व निमगाव मढ येथील केंद्रावरील मतदान पावणेआठ वाजेच्या सुमारास संपले. पाटोदा येथील एका मतदान केंद्रावर मतदान सव्वाआठ वाजेपर्यंत चालले. मतदान यंत्रातून नक्की काय बाहेर येणार, याची महाउत्कंठा लागली आहे. ‘झेडपी’च्या काही गटांचा अपवाद वगळता तालुक्यात अत्यंत अतितटीच्या लढती झाल्याची चर्चा मतदानानंतर झडू लागली. मतदानावरून एकंदरीत अंदाज बांधता येत नसल्याने बहुतांश गट-गणातील उमेदवारांची मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिला निकाल साडेअकराला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निकालाची हंडी आज फुटणार असून, राजकीय पक्षांसह उमेदवारांची अग्निपरीक्षा होणार आहे. १२२ जागांसाठी ८२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. महापालिका प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून, शहरात दहा ठिकाणी मतमोजणी होणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. मतमोजणीसाठी प्रत्येक ठिकाणी ११ टेबल राहणार असून, ४८८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दहा वाजता मतमोजणी सुरू होणार असून, पहिला निकाल हा साडेअकरा वाजेपर्यंत येईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेला गालबोट लागू नये म्हणून सुरक्षेसाठी पोल‌िसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महापालिका निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता नागरिकांना निकालाचे वेध लागले आहेत. मंगळवारी १२२ जागांसाठी ६१.६० टक्के इतके विक्रमी मतदान झाले. त्यामुळे टक्केवाढीचा फायदा नेमका कोणाला होणार, याची चर्चा सुरू असून, सर्वांचे लक्ष आता गुरुवारी येणाऱ्या निकालाकडे लागले आहे. महापालिकेने मतमोजणीसाठीची जय्यत तयारी केली आहे. शहरात दहा वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे. निवडणुकीसाठी तीन प्रभाग मिळून एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. त्यानुसारच सहा विभागांत दहा ठिकाणी मतमोजणीचे केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक केंद्रावर ११ टेबल ठेवण्यात आले असून, प्रभागानुसार मतमोजणी केली जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतमोजणीसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी व ४८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातपूर क्लब हाऊस येथील मतमोजणी केंद्रावर चार प्रभाग असल्याने १२ टेबल लावण्यात येणार आहेत.


पाच ते सात फेऱ्या

प्रत्येक प्रभागात ३० ते ५० मतदान केंद्र आहेत. त्यामुळे एका प्रभाग, एक मतदान केंद्र यानुसार ११ टेबलवर मोजणी केली जाणार आहे. एका प्रभागाच्या पाच ते सात फेऱ्या होणार असून, पहिला निकाल येण्यास ११.३० वाजणार असून संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया तीन वाजेपर्यंत संपणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.


फेरीनुसार होणार घोषणा

प्रत्येक मतमोजणी केंद्राबाहेर नागरिकांसाठी ध्वनीक्षेपकाची व्यवस्था करण्यात आली आहे. फेरीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी हे कोणाला किती मते मिळाली, हे जाहीर करणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना हा निकाल ऐकता येणार आहे. अंतिम निकाल हा राज्य निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय जाहीर करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतरच तो जाहीर होणार आहे.



प्रभाग- मतमोजणीचे ठिकाण

१ ते ३ - विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी

४ ते ६ - एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल, पेठ रोड, पंचवटी

७, १२, २४ - शिवसत्य क्रीडा मंडळ मैदान, माणिक नगर, गंगापूररोड

८ ते ११ -सातपूर क्लब हाऊस, सातपूर

१३ ते १५ - महात्मा फुले कलादालन, शालिमार

१७ ते १९- शासकीय तंत्रनिकेतन, सामनगावरोड

१६, २३, ३० - शर्मा मंगल कार्यालय, दीपाली नगर

२० ते २२ - विभागीय कार्यालय, नाशिकरोड

२५, २६, २८- प्रबोधनकार ठाकरे सभागृह, अंबड

२७, २९, ३१- राजे संभाजी स्टेडियम, सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाणमध्ये मातब्बरांना धक्का!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातही मतदानाची टक्केवारी वाढल्याने अनेक मातब्बरांना धक्के बसण्याची शक्यता आहे. तालुक्यात सर्वाधिक मतदान पठावे दिगर या आदिवासी गटात सर्वसाधारण जागेसाठी (७३.१४) झाल्याने येथील विजयाचे समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

पठावे दिगर जि. प. गटात राष्ट्रवादीचे संजय सोनवणे, भाजपचे मन्साराम गावीत तर अपक्ष उमेदवार गणेश अहिरे यांच्यात चुरस होती. सर्व आदिवासी समाजबांधव एकत्र आल्याने या ठिकाणी मतांची टक्केवारी वाढली आहे. जायखेडा या सर्वसाधारण गटात दुसऱ्या क्रमांकाचे मतदान (६९.४१) झाले. राष्ट्रवादीचे यतीन पगार, काँग्रेसच्या मनिषा भामरे तर अपक्ष डॉ. नवलसिंग पवार यांच्यात तिरंगी सामना झाला. ब्राह्मणगाव गटात शिवसेना-भाजपमध्ये झालेल्या सरळ सामन्यात ६८.५८ टक्के मतदान झाले. या ठिकाणी बच्छावद्वयींमध्ये सामना रंगला आहे. ताहाराबाद गटात ५२.६३, नामपूर गटात ५५.४४, वीरगाव गटात ५८.८७, तर ठेगोंडा गटात ६१.५३ टक्के मतदान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुकरी शोमध्ये मिळाल्या झटपट रेसिपी टिप्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हॉलभर दरवळलेला फोडणीचा सुंगध...बिया काढलेले हॉलो टोमॅटो वडे...गजरेला स्वीट डिश...डायटीश स्प्राऊट्स दहीवडा अशा एकाहून एक सरस अशा हटके रेसिपी...विविध डिश तयार करताना उपस्थितांच्या मनात पडणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना मास्टर शेफ विष्णू मनोहर.. हे चित्र होते ‘टाइम्स ग्रुप’तर्फे आयोजित ‘द कुकरी शो’या उपक्रमाचे.

हॉटेल एमरल्ड पार्क येथे ग्रीन व्ह्युव्ह हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या पत्नी सौम्या कृष्णा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या वेळी मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी मॉझिरीला चीज रोल्स राइस, गजरेला स्वीट डीशेस, डायटिंग स्प्राऊट दहीवडा आदी डिशेस बनवून दाखवल्या. उपस्थितांनी या रेसिपी लिहून घेतल्या, तर काहींनी कार्यक्रमाचे रेकॉर्डिंगही केले. या उपक्रमात मास्टर शेफ मनोहर यांनी कमी वेळेत कमी जिन्नसांपासून चटकदार हटके रेसिपी कशी बनवता येईल याची माहिती दिली.याप्रसंगी ‘टाइम्स ग्रुप’च्या नाशिक ब्रँच हेड मंजिरी शेख यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे सौम्या कृष्णा आणि मास्टर शेफ विष्णू मनोहर यांचा सत्कार करण्यात आला. ‘द कुकरी शो’चे व्हेन्यू पार्टनर द एमरल्ड पार्क, असो. स्पॉन्सर इंडोलाइन, कोपार्टनर सुवर्णनक्षत्र आणि बनिया बाजार, तर हॉलिडे पार्टनर दुर्वांकूर हॉलिडेज् हे होते. सूत्रसंचालन जया गोसावी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायकवाड पुन्हा प्राचार्यपदी

$
0
0

Jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : @jitendratartemt

पाच वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळ (बीसीयूडी) च्या संचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. व्ही. बी. गायकवाड यांचा कार्यकाळ नुकताच पूर्ण होत आहे. यामुळे त्यांनी कर्मभूमी नाशिकमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नुकतीच मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम कॉलेजच्या प्राचार्यपदाची सूत्र पुन्हा हाती घेतली आहेत.

कर्तृत्ववान आणि कार्यक्षमतेने छाप पाडणारे प्राचार्य म्हणून डॉ. व्ही. बी. गायकवाड यांचा लौकिक आहे. ७ जून २०१२ मध्ये त्यांनी केटीएचएमचे प्राचार्यपद सोडून विद्यापीठाच्या बीसीयूडी विभागाचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. दरम्यानच्या कालावधीत विद्यापीठाशी संबंधित अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात त्यांचा पुढाकार राहिला आहे. याशिवाय नाशिकच्या पुणे विद्यापीठ विभागीय उपकेंद्र निर्मितीसाठीही त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

डॉ. गायकवाड यांच्या विद्यापीठातील संचालक पदाचा कार्यकाळ अद्याप तीन महिने शिल्लक आहे. विद्यापीठाचा नवा कायदाही प्रस्तावित आहे. या कायद्यात हे पद रद्द करण्याचेही प्रस्तावित आहे. या संदर्भातील अंतिम निर्णयावर अद्याप शासनाचा शिक्कामोर्तब नसला

तरीही सद्यस्थितीत तरी डॉ. गायकवाड यांनी स्वगृही परतणे पसंत केले. सध्या विद्यापीठाचा बीसीयूडी संचालक पदाचा पदभार आंतरप्रणाली अभ्यासकेंद्राचे प्रमुख (मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे) डॉ. राजा दीक्षित यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

पदाच्या जागी अधिकार मंडळ

नव्या सरकारने पुढे केलेला विद्यापीठ कायदा अनेक दृष्टीने चर्चेचा विषय ठरला. या प्रस्तावित कायद्यातील अनेक तरतुदींवर सरकारकडून शिक्कामोर्तब शिल्लक आहे. यातीलच एक बाब म्हणजे बीसीयूडी (महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळ) च्या जागी नवे अधिकार मंडळ अस्तित्वात आणणे प्रस्तावित आहे. या कायद्यात अधिसभा व विद्यापरिषदांचे अधिकार कमी करून कुलगुरू व शासनास अधिक अधिकार बहाल करण्यात आले आहेत. अशा अनेक बदलांमुळे हा कायदा चर्चेच्या केंद्रस्थानी राहीला.

बीसीयूडी संचालक पदाचा कार्यकाळ अद्याप तीन महिने शिल्लक आहे. मात्र , कर्मभूमी नाशिकमध्ये पुन्हा मविप्र संस्थेने सोपविलेली जबाबदारीही तितकीच महत्वाची वाटते. ‘नॅक’ साठी तयारीसोबत अनेक नवी उद्दिष्ट आहेत. त्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन.

डॉ. व्ही.बी.गायकवाड,
माजी संचालक, बीसीयूडी, पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुभाजकांवरील हिरवळ कोमेजली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नवीन सिंहस्थ मार्गाच्या सुशोभिकरणाच्या माध्यमातून दुभाजकांवर लावण्यात आलेली रोपे कोमेजून सुकून गेली आहेत. पाण्याच्या अभावामुळे वाळलेल्या रोपांमुळे या रस्त्यावरचे सौंदर्यच लोप पावले आहे. लाखो रुपये खर्च करून दुभाजकांवर विविध प्रकारेच्या रोपांची लागवड करण्यात आलेली होती. त्या रोपांना गोदावरीला आलेल्या पुराचा फटका बसला. जी काही रोपे शिल्लक होती, त्यांना पाणीच देण्यात आले नाही, त्यामुळे ते रोपे पाण्याअभावी सुकून गेली आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अनेक सुशोभिकरणाची कामे करण्यात आली त्यात गाडगे महाराज पूलापासून ते टाळकुटेश्वर पूलापर्यंतच्या नवीन सिंहस्थ मार्गावरील सुशोभिकरणाचा समावेश करण्यात आला. होता. या मार्गावर पथदीप बसविण्यात आले होते. ते पथदीप ज्या दुभाजकांवर बसविण्यात आले होते.

त्या दुभाजकांना आकर्षक रंग देण्यात आला होता. या दुभाजकांमध्ये माती टाकून त्यावर फुलांच्या रोपांची लागवडही करण्यात आली होती. त्यांना आलेल्या फुलांनी या रस्त्याचे सौंदर्य खुलून गेले होते. मात्र, गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्यात दुभाजकावरील या रोपांना फटका बसला, तरीही त्यातील काही रोपे तग धरून होती. त्यांच्या देखभालीकडे आणि त्यांना त्यांना वेळेवर पाणी देण्यात आले नसल्यामुळे ही रोपे सूकून गेली. सध्या हा दुभाजकांचा भाग एकदम भकास दिसत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुसज्ज मार्केट वापराविना

$
0
0

दुर्गा गार्डन परिसरातील मार्केट धूळखात; भाजीबाजाराकडे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

एकीकडे सिन्नर फाटा आणि नाशिकरोड परिसरात भाजीबाजारासाठी जागा नसल्याची बोंब होत असते. तर दुसरीकडे उड्डाणपुलाखाली भाजीबाजार भरवण्यात येतो. याउलट दुर्गा गार्डनजवळील सुसज्ज असे भाजीपाला मार्केट वापराविना पडून आहे. अशा परिस्थितीत याठिकाणी भरणाऱ्या भाजीबाजाराने तयार भाजीबाजाराच्या समस्यांचा बाजारच भरला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

नाशिकरोड परिसरातील उड्डाणपुलाखालील भाजी बाजाराचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून रेंगाळला आहे. या भाजीबाजारामुळे शिवाजी पुतळा ते बिटको चौक या दरम्यान दररोजच वाहतूक कोंडीचा सामना स्थानिक नागरिकांना करावा लागत आहे. दुसरीकडे महापालिकेनेच लाखो रुपये खर्च करून उभारलेला दुर्गा गार्डनलगतचा भाजीबाजार मात्र वापराविना पडून आहे. त्यामुळे या भाजीबाजारात समस्यांचाच बाजार भरल्याचे दिसून येत आहे.

तब्बल २५० ओटे रिकामे

नाशिक महापालिकेने दुर्गा गार्डनलगत उभारलेल्या भाजीबाजाराचे तत्कालीन महापौर नयना घोलप यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले होते. या भाजीबाजारात सुमारे २५० भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची सोय होणार आहे. परंतु, अद्यापपर्यंत या भाजीबाजारात भाजीपाला विक्रेत्यांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी, महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्यासारखे आहे.

लोकप्रतिनिधींची अनास्था

दुर्गा गार्डनलगतच्या भाजीबाजाराचा वापर शहरातील विविध भागात भाजीपाला विक्रेत्यांनी करावा, यासाठी स्थानिक नगरसेवकांनी गेल्या काही वर्षांत कोणतेही प्रयत्न केले नाहीत. या अनास्थेमुळे हा भाजीबाजार आज विविध समस्यांचे आगार बनला आहे.

नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा भाजीबाजाराचा प्रश्न असाच ताटकळत पडला असल्याचे यावरून दिसून येते.

स्थलांतरास लागेना मुहूर्त

नाशिकरोडच्या बिटको चौकातील उड्डाणपुलाखालील भाजीबाजार अनधिकृत पार्किंग व वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या समस्येवर तोडगा काढण्यास महापालिका प्रशासनास सुचलेले नाही. वास्तविक बघता उड्डाणपुलाखालील भाजीबाजार दुर्गागा र्डनलगतच्या भाजीबाजारात स्थलांतरित करणे आवश्यक आहे. मात्र, त्याप्रमाणे कोणतीही कृती महापालिका प्रशासनाकडून होताना दिसत नाही. अथवा त्यासाठी अद्याप तरी मुहूर्त लागत नाही, त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

आवश्यक सुविधा द्या!

दुर्गागार्डन भाजीबाजारात भाजीपाला विक्रेत्यांनी बसण्यास नापसंती दर्शविली आहे. याठिकाणी आवश्यक मुलभूत सुविधा नसल्याचा त्यांचा आरोप आहे. तर ओट्यांची संख्या कमी व भाजीपाला विक्रेत्यांची संख्या जास्त असल्यानेही या भाजीबाजाराचा प्रश्न वादात सापडला आहे. त्यामुळे याठिकाणी सुविधा दिल्यास आम्हाला सोयीचे होईल, असे भाजीविक्रेत्यांचे म्हणणे आहे. दुर्गा गार्डन येथील भाजीबाजारात जाण्यासाठीचा रस्ता पुरेसा नाही. या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांची वाहने भाजीबाजारापर्यंत जाऊ शकत नाही. तसेच या भाजीबाजाराला अस्वच्छतेचे ग्रहणच लागलेले आहे. जे काही मोजके व्यावसायिक ओट्यांचा वापर माल साठविण्यासाठी करतात त्यांनाही या समस्यांनी बेजार केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारसांमुळे ‌दिग्गजांची वाढली धाकधूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेवर कोणाची सत्ता येईल आणि कोणत्या राजकीय नेत्याचा वारस महापालिकेत एंट्री करेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महापालिकेत दिग्गजांसह आमदार व माजी महापौरांचे पुत्र निवडणुकीच्या रिंगणात असून, राजकीय वारसाची लढाई कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अर्धा डझनपेक्षा जास्त वारसांच्या भवितव्याचा निकाल आज स्पष्ट होणार असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गजांचे वारसदार आपले नशीब आजमावत आहेत. महापालिकेत वडिलांचा वारस म्हणून एंट्री करायच्या तयारीत आहेत. या नेत्यांनी तिकीट वाटपात घराणेशाही केली असली तरी, मतदार या घराणेशाहीला कसा प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागून आहे. नगरसेवक, महापौर, आमदारकी भूषविल्यानंतर राज्यपातळीवरील राजकारणाकडे झेपावत असतांना या नेत्यांनी आपल्या वारसांना पालिकेच्या राजकाणात प्रवेश करून घराणेशाही सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात माजी महापौरांचे पुत्र निवडणुकीच्या रिंगणात असून, कोण राजकीय वारसाची लढाई जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप, माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील, माजी महापौर अशोक दिवे यांचे दोन्ही पुत्र प्रशांत व राहुल निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

माजी आमदार व माजी महापौर असलेले वसंत गिते यांचे पुत्र प्रथमशे गिते, स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांचे पुतणे कैलास चुंभळे, माजी स्थायी समिती सभापती उत्तम कांबळे यांचे पुत्र समीर कांबळे, शिक्षण सभापती संजय चव्हाण यांची कन्या स्नेहल चव्हाण, भाजपचे उपाध्यक्ष दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील, माजी नगरसेवक केशव अण्णा पाटील यांचा पुत्र राम पाटील, राष्ट्रवादीचे नेते नाना महाले यांचे पुत्र अमोल महाले, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल यांच्या मातोश्री भिखुबाई बागूल यांचा समावेश आहे. तसेच माजी आमदार बबन घोलप यांची कन्या नयना घोलप या ही नशीब आजमावत आहेत.


हिरे, आहेरांचा वारस कोण

नाशिकच्या राजकारणात मोलाचे योगदान असलेल्या आहेरांचेही वारस या निवडणुकीत नशीब आजमावत आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या चुलत बहीण हिमगिरी आडके व आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे हे प्रभाग सातमधून नशीब आजमावत आहेत. दोघांसमोर तगडे उमेदवार असल्याने कोण पालिकेत प्रवेश करणार याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणीला हिंसक वळण

$
0
0

पोलिसांचा गोळीबार तर आंदोलकांकडून आंधारात दगडफेक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोप प्रत्यारोपातून वाढलेल्या वादानंतर पंचवटीतील प्रभाग तीन मध्ये संध्याकाळनंतर हिंसक आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये फ्री स्टाईल झाली. आंदोलनकर्त्यांना आवरताना पोलिसांना लाठीचार्ज आणि नंतर हवेत तीन ते चार राउंड फायर करावे लागले. आंदोलनकर्त्यांच्या दगडफेकीत एका पोलिस कर्मचाऱ्यासह तीन ते चार अधिकाऱ्यांना गंभीर दुखापत झाली. रात्री उशिरा हा गोंधळ आवरण्यात पोलिसांना यश आले.

भाजपचे शहराध्यक्ष, तसेच आमदार बाळासाहेब सानप यांच्या पुत्राच्या उमेदवारीमुळे लक्ष लागलेल्या प्रभाग तीनच्या मतमोजणीतील गोंधळ उशिरापर्यंत सुरू राहिला. दोन इव्हीएम मशिन टाकण्यात आले, निवडणूक अधिकारी आणि पर्यवेक्षक अधिकारी मद्य पीऊन आले, मेमरी कार्ड बदलण्यात आले असे डझनभर आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आले. या प्रश्नांना पुरक उत्तरे देण्यात निवडणूक अधिकारी अपयशी ठरल्याने कार्यकर्त्यांमधील असंतोष वाढत गेला. त्यातच भाजपाच्या तीन तर सेनेच्या अवघ्या एका उमेदवारास विजय मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यातच शहरात सर्वत्र भाजपाला बहुमत मिळाल्याची वार्ता पुढे आल्याने असंतोष निर्माण झाला. रात्री आठ वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांसह निवडणूक कर्मचाऱ्यांच्या दिशेने जोरदार दगडफेक केली.
पोलिसांनी सुरूवातीस लाठीचार्ज करीत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्त्यांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी यानंतर हवेत गोळीबार केला. मीनाताई ठाकरे स्टेडीयमच्या आजुबाजुस असलेल्या काळोखाचा फायदा घेत लपलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी शोधून ताब्यात घेतले. या बाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले की, संध्याकाळी अंधार पडल्यानंतर आंदोलकाचा जोर वाढला. त्यानुसार आम्ही सुरूवातीस समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लाठचार्ज व शेवटी हवेत गोळीबारा झाला. आता परिस्थिती नियंत्रणात असून, संबंधीतांना अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे.

काही समाजकंटकांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला केला होता. माझ्यासह आमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे - डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी मंत्री घोलपांच्या दोन्ही कन्यांचा पराभव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या व विद्यमान आमदार योगेश घोलप यांच्या भगिनी नयना व तनुजा यांना पराभवाचा धक्का बसला. तनुजा घोलप या प्रभाग क्रमांक २१ मधून, तर नयना घोलप या प्रभाग क्रमांक २२ मधून रिंगणात होत्या.

शिवसेनेत घराणेशाहीला स्थान नाही, हे पुन्हा एकदा मतदारांनी घोलपांच्या कुटुंबाला बाजूला सारून दाखवून दिले. माजी महापौर नयना घोलप यांच्या महापौरपदाच्या कारकीर्दीविषयी मतदारांमध्ये नाराजी होती. स्वतःच्या प्रभागातील कामे त्या मार्गी लावू न शकल्याचे त्यांच्या प्रभागातील मतदारांचे म्हणणे होते. ही अस्वस्थता मतदारांनी मतपत्रिकेतून दाखवून दिली.

माजी महापौर विनायक पांडे यांच्या मुलाला व भावजयींना पक्षातूनच झालेला विरोध सर्वश्रुत आहे. पांडेच्या कुटुंबीयांना तिकीट नाकारल्याने मोठा गदारोळ झाला होता. पांडे कुटुंबीयांना एक न्याय व घोलप कुटुंबीयांना एक न्याय यामुळेदेखील शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. घोलपांनी आपले राजकीय वजन वापरुन कुटुंबीयांना उमेदवारी मिळवली असल्याचे मतदारांचे म्हणणे होते.

घोलप स्वतः माजी मंत्री, मुलगा योगेश हा आमदार व दोन्ही मुलींना शिवसेनेची उमेदवारी त्यामुळे पक्षातदेखील त्यांच्या कर्तृत्वाबाबत नाराजीचा सूर होता. घोलपांनीही मध्यंतरी वादग्रस्त विधान केल्याचे मतदारांच्या लक्षात होते. ही नाराजी मतदारांनी मतपत्रिकेद्वारे दाखवून दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात दाम्पत्यांपैकी सहा घरी

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणूक रिंगणात नशीब आजमवणाऱ्या एकूण सात दाम्पत्यांपैकी केवळ बडगुजर दाम्पत्याच्याच पदरात यश पडले आहे. उर्वरित सहा दाम्पत्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

२०१२मध्ये एकूण ३ दाम्पत्ये महापालिकेत निवडून आली होते. त्यात सुधाकर व हर्षा बडगुजर, दिनकर व लता पाटील आणि शिवाजी व कल्पना चुंभळे यांचा समावेश होता. यंदाच्या निवडणुकीत एकूण ७ दाम्पत्यांनी रणांगणात उडी घेतली होती. प्रभाग २५मधून शिवसेनेच्या तिकिटावर विद्यमान नगरसेवक दाम्पत्य सुधाकर बडगुजर आणि हर्षा बडगुजर हे रिंगणात होते. या दोघांनाही मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे. महापालिकेच्या सभागृहात पुन्हा निवडून जाण्याचा मान त्यामुळे त्यांना मिळाला आहे. याच प्रभागात भाजपकडून इच्छुक असलेले, पण त्यानंतर बंडखोरी केलेले दाम्पत्य प्रकाश व चित्रा अमृतकर हे क आणि ड गटातून रिंगणात होते. मात्र, अपक्ष राहून त्यांनी घातलेली साद मतदारांनी नाकारली आहे. शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांचे पुतणे रविकिरण घोलप यांनी प्रभाग २०मधून दावेदारी केली होती, तर त्यांच्या पत्नी सुषमा यांनी रविकिरण यांची चुलत बहीण व माजी महापौर नयना घोलप यांच्याविरोधात प्रभाग २२मधून अपक्ष उमेदवारी केली होती. या घोलप दाम्पत्यालाही मतदारांनी साथ दिलेली नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी अधिकृत पक्षाच्या उमेदवारांना त्याचा फायदा झाला आहे.

प्रभाग २२ मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार स्नेहल देशमुख आणि त्यांचे पती चैतन्य यांनी अपक्ष उमेदवारी केली. या दोघांनाही या ठिकाणी यश प्राप्त करता आलेले नाही. प्रभाग ३ मध्ये सचिन शिवाजी अहिरे आणि रोहिणी अहिरे या दाम्पत्याने अधिकृत पक्षाच्या उमेदवारांसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. हे दोघेही पराभूत झाले. त्यामुळे गेल्या वेळच्या तुलनेत यंदा केवळ एकच दाम्पत्य महापालिकेत प्रतिनिधीत्व करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images