Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कशावर मारू शिक्का?

$
0
0

कशावर मारू शिक्का?

चावडी अन् कट्या-कट्ट्यावर चर्चांचे फड रंगू लागले होते... देशात वा राज्यात काय होणार यापेक्षा आपापल्या प्रभागाचंच प्रत्येकाला पडलं होतं... वर्कर अन् सामान्यांच्याही नसानसात पॉलिटिक्स भिनलेलं असल्यानं दारोदारी अन् घरोघरी त्याची चर्चा होणंही तसं साहजिकच होतं... चावडीवर तर सगळ्यांचीच मापं काढली जात होती...

ग्रामस्थ-१ : आपण उभ्या आयुष्यात लई इलेक्शन पाह्यलं, काही खेळलो बी... पण यंदासारखं किचकट अन् अवघड इलेक्शन नाही पाह्यलं राव... एका माणसाला चार मतं टाकायची आहेत...

ग्रामस्थ-२ : अरं, खेळातसुद्धा पहिले तीनच विनर काढले जातात, इथं तर चौघे काढायचे आहेत... अडाणी माणसाचं कामच राह्यलं नाही मंडळी...

ग्रामस्थ-१ : अरं, यंदा ताई-माई-आक्कावर नेमका कशावर मारू शिक्का, असं म्हणण्याची वेळ आली आहे राव... विचारसुद्धा पक्का व्हायला वेळ लागतोय...

ग्रामस्थ-३ : ह्ये क्लिस्ट इलेक्शन आसलं तरी ते समजून तर घ्यायाला पाहिजेच राव... त्ये डेमो सुरू केलंत ना म्हणे... तिथं बघायचं... नाहीतर नातवाकडून मोबाइलवर शोधायचं कसं व्होटिंग करायचं ते... व्होटिंग तर करावेच लागणार ना भाऊ!

ग्रामस्थ-१ : निवडून येतील चार अन् कामाच्या वेळेला एक नाही हाजिर व्हायचा... वरून ह्या भागातून मतं मिळाली नाही म्हणून काम नाही करणार... तिथं माझे वर्करच नाही, अशी कारणं सांगून चौकडी काम नाही करायची राव!

ग्रामस्थ-३ : सरकार तर म्हणतंय की मोठ्या पॅनेलमुळे प्रभागाचा विकास सोपा होईल…?

ग्रामस्थ-१ : विकासबिकास काही नाही...पण, मोठ्या पार्टीवाल्यांचा विजय नक्कीच सोपा होईल अशी शाळा आहे ही...

ग्रामस्थ-२ : पण यंदा एक लई बरं झालं... पॅनल मोठं झाल्यानं खूप लोकांना चान्स मिळतोय इलेक्शनचा... त्यो आपला बाळ्या आत्ता कुठं पंचविशीत असंल, मिळालं नव्हं त्याला तिकीट... उद्या नगरसेवकसुद्धा होईल...

ग्रामस्थ-३ : व्हय व्हय... यंदा तरणी पोरं लई आहेत इलेक्शनमंधी.. लोकशाहीसाठी ही चांगली गोष्ट आहे... नवीन लोकांना चान्स मिळायलाच हवा...

ग्रामस्थ-१ ः अरं, सगळी पोरं नाही निवडून येत... काही बरबादसुद्धा होतात यातून... इलेक्शन लई वाईट गोष्ट आहे... त्याची नशा चढली की काही खरं नाही... पंचविशीतली जेवढी पोरं इलेक्शनमंधी उभी आहेत, त्यापेक्षा जास्त पोरं आता बीअर बारच्या बाहेर उभी दिसतात... (सीनिअर मंडळींना हा मुद्दा पक्का पटला होता... नव्या पिढीचं काय होणार हा विचार करीत चार सदस्यीय पॅनल क्लिष्टच आहे, यावर त्यांचं एकमत झालं होतं.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थी वाहतूक एेरणीवर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नांदूर नाका येथे शालेय वाहनातून पडून एका चारवर्षीय बालकाला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एेरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करताना सातत्याने काही ना काही दुर्घटना घडत असल्याने शिक्षण विभागाने याप्रश्नी लक्ष घातले आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाकडून सोमवारी मुख्याध्यापकांची बैठकही घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली.

काही महिन्यांपूर्वीच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता पुन्हा शालेय बसमधूनच मुलगा तोल जाऊन पडल्याची घटना घडली आहे. यात या मुलाला जीव गमावावा लागला आहे. या प्रकरणांतील गांभीर्य पाहत ही बैठक घेण्यात येणार आहे. स्कूल बस, व्हॅन यांमध्ये महिला मदतनीसची नियुक्ती, विद्यार्थ्यांची काळजी अशा विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

घटना घडल्यावरच येते जाग

विद्यार्थी वाहतुकीत सातत्याने होणारे अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे. परंतु, केवळ असे अपघात घडल्यावरच आरटीओ, पोलिस विभाग, शिक्षण विभाग यांना जाग येत असल्याचे वारंवार दिसून येते. जोपर्यंत परिस्थिती सुरळीत आहे तोपर्यंत या बाबींकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते आणि घटना घडली, की ती ताजी असेपर्यंतच बैठका घेतल्या जातात. या प्रश्नांवर ठोस उपाय निघत नसल्याने पालकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.


यापूर्वीही दुर्घटना

शहर परिसरात यापूर्वीही अनकेदा शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना अपघतांच्या घटना घडल्याचे दिसून आले आहे. मात्र, तरीही यासंदर्भात पोलिस यंत्रणेसह बहुतांश शाळांचे प्रशासनदेखील पुरेशा उपाययोजना करीत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता या बालकाचा जीव गेल्यानंतर तरी ठोस उपाययोजना होईल का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.


माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीचे नियोजन झाले आहे. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापकांचीही बैठक घेण्यात येणार असून, त्यांना विद्यार्थी सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

-रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा बंडखोरांना अल्टिमेटम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर भाजपने कारवाईची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या बंडखोर उमेदवारांना पक्षाने दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या दोन दिवसांत माघार घेऊन पक्षाच्या उमेदवाराचे समर्थन करा, असे आवाहन करतानाच माघार न घेणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा भाजपने बंडखोरांना दिला आहे. अशा डझनभर बंडखोरांची यादी तयार करण्याचे काम पक्षीय पातळीवर सुरू झाले आहे.

महापालिका निवडणुकांसाठी यंदा भाजपतर्फे निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने यंदा भाजपकडून महापालिकेसाठी ७०० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. मात्र, निवडून येण्याचे मेरिट लक्षात घेऊन भाजपने उमेदवारी वाटप केली. त्यामुळे निष्ठावंत डावलले गेल्यानंतर त्यांनी बंडखोरी केली आहे. जवळपास दहा प्रभागांमध्ये भाजपचे बंडखोर आहेत. या बंडखोरांमुळे भाजपचा ‘शंभर प्लस’चा नारा अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे पक्षाने अशा बंडोबांना थंड करण्यासाठी लागलीच नाशिकमध्ये मुंबईतून निरीक्षक धाडले आहेत. या नेत्यांनी नाराजांना एकत्रित आणत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यातील काहींनी आपला नाराजीनामा मागे घेत पक्षाच्या प्रचारकार्यात सक्रियता दर्शविली, तर काही जण निवडणूक रिंगणात कायम राहिले. त्यामुळे अशा बंडखोरांचा फटका पक्षाच्या उमेदवाराला बसू नये याकरिता पक्षाच्या वतीने या बंडखोरांना दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. यामध्ये सुरेश पाटील, मधुकर हिंगमिरे, प्रदीप घूमकर यांच्यासह डझनभर बंडखोरांचा समावेश आहे. अशा बंडखोरांनी दोन दिवसांत पक्षाशी चर्चा करून माघार घ्यावी, तसेच आपल्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर करावा; अन्यथा त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चव्हाणांची एंट्री की पवारांचीच चलती!

$
0
0

दीपक महाजन, कळवण

तालुक्यातील कनाशी व अभोणा गटात होणाऱ्या लढती लक्षवेधी ठरणार आहेत. कनाशी गटातून माजी आमदार यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार पुत्र यांच्यात समोरासमोर होणारी लढत म्हणजेच विधानसभेची रंगीत तालीम ठरणार आहे. तर आभोणा गटात ४० वर्षांची आमदारकी ज्या यशवंत गवळींमुळे (तत्कालीन भाजप उमेदवार) पवार परिवाराला गमवावी लागली त्या गवळींविरोधात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी आव्हान उभे केले आहे.

यशवंत गवळी काँग्रेसकडून हक्काच्या अभोणा गटात नशीब आजमावणार आहेत. कळवण तालुक्यातील खर्डेदिगर गटात जयश्री पवार व मानूर गटात डॉ. भारती पवार उभ्या राहणार असल्याने त्यांच्याशी फारशी तुल्यबळ लढत होईल असे चित्र वाटत नाही. यंदाची जिल्हा परिषद निवडणूक माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या कुटुंबातील तिन्ही सदस्यांभोवतीच फिरणार की खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना आपल्या पुत्राच्या माध्यमातून कळवण तालुक्यावर पकड निर्माण करण्याची संधी मिळते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत यशवंत गवळी यांनी विराधाला विराध केल्यामुळे ए. टी. पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभावाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीकडून आभोणा गटात तळामाळापर्यंत आखणी करण्यात आली आहे. तसेच गवळी यांनाही ही निवडणूक आता सोपी न राहिल्यामुळे त्यांनी आपले अस्तित्व राखण्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे कळवण तालुक्यातील या गटाकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

खर्डेदिगर गटातून राष्ट्रवादीच्या जयश्री पवार, भाजपकडून झेलुबाई ठाकरे, अपक्ष जयमाला खांडवी, माकपकडून लता बर्डे, शिवसेनेकडून मीराबाई पवार, काँग्रेसकडून वंदना बहिरम यांच्यात लढत आहे.

मानूर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार, माकपाकडून हेमलता दिनेश पवार, अपक्ष बेबीबाई सोनवणे यांच्यात लढत होईल. या गटातील काँग्रेसच्या उमेदवार रंजना पवार यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला. अभोणा गटातून काँग्रेसकडून माजी जि. प. सदस्य यशवंत गवळी, राष्ट्रवादीकडून जयश्री पवार किंवा ऐनवेळी सुभाष राऊत, भाजपकडून जितेंद्र ठाकरे, माकपकडून विश्वनाथ थैल यांच्यात लढत आहे.

लक्षवेधी लढत

कनाशी गटातून राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, भाजपकडून खासदारपुत्र समीर चव्हाण, काँग्रेसकडून पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ गायकवाड, माकपकडून हिराजी चौधरी यांच्यात लक्षवेधी लढत होईल. शिवसेनेकडून बाबुराव कोल्हे यांची उमेदवारी छाननीत बाद ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्मला गावितांची ठाणापाड्यात कसोटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यातील ठाणापाडा गट मातब्बरांच्या लढाईने लक्षवेधी ठरणार अहे. आमदार निर्मला गावित यांचा मुलगा हर्षल गावित रणांगणात उतरल्याने चुरस निर्माण झाली आहे. गावित, भाजपच्या तालुकाध्यक्षा कौशल्या लहारे, राष्ट्रवादीच्या भारती भोये, माकपचे रमेश बरफ यांच्यात लढत रंगणार आहे. तालुका निर्मितीनंतर प्रथम राष्ट्रवादी त्यानंतर माकप व आता काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या गटावर पुन्हा आपलेच वर्चस्व ठेवण्यासाठी स्वतः आमदार पुत्रांना उमेदवारी करावी लागत आहे.

ठाणापाडा गट हा दुर्गम आहे. येथे विकासाचा अनुशेष भरून काढतांना सात वर्षांत आलेल्या अनुभवानुसार जिल्हा परिषद माध्यमातून मूलभूत सुविधा अधिक वेगाने मिळू शकतात. त्यामुळेच या गटासाठी पक्षाला उमेदवार नसल्याने स्वतःच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. या भागाचे प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून मांडण्यासाठी हर्षल सक्षमपणे काम करेल, असा विश्वास आमदार गाव‌ित यांनी व्यक्त केला आहे. या गटात पुर्वापार कम्युन‌िस्टांचे वर्चस्व आहे. तालुका निर्मितीनंतर राष्ट्रवादीचा दबदबा निर्माण झाला आहे. तसेच भाजपच्या उमेदवारांसाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी लक्ष घातले आहे. असे असताना काँग्रेसने हर्षल यांना दिलेली उमेदवारी ही खरोखरच अस्तित्त्वाची लढाई आहे. आदिवासी विकास मंत्री सावरा आणि आमदार गावित यांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या या लढतीकडे लक्ष आहे. माकप आणि राष्ट्रवादीने दिलेले उमेदवारदेखील त‌ितकेच तुल्यबळ आहेत. माकपचे रमेश बरफ हे त्र्यंबक पंचायत सम‌ितीचे माजी सभापती आहेत. राष्ट्रवादीच्या भारती भोये यांचे पती रघुनाथ भोये हे डॉक्टर आहेत. शिवसेनेचे नितीन लाखन हे सरपंच असून, त्यांचा राजकीय दबदबा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपत्तीत ‘हिरें’ची चमक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माघारीकडे सगळ्यांचे लक्ष लागून असले तरी गटातील उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करताना दिलेली संपत्तीचे विवरण पत्रावरील आकडे पाहून लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकाही फिक्या पडतील असे कुणालाही सहज वाटेल.

जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक रिंगणात असलेले उमेदवारांची मालमत्ता मात्र अब्ज आणि कोटीची उड्डाणे घेत असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषद गटातील टॉप टेन कोट्याधीश उमेदवारांची संपत्ती सर्वसामान्य मतदारांना अचंबित करणारी आहे. तालुक्यातून निमगाव गटातील भाजपचे उमेदवार जगन्नाथ दशरथ हिरे (जे. डी.) यांची स्थावर व जंगम मालमत्ता मिळून एकूण १ अब्ज ७० कोटीच्या घरात पोहचली आहे. अब्जावधी उमेदवारांच्या रांगेत शिवसेना, भाजपचे उमेदवार आघाडीवर असून काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार मात्र लाखातच राहिले आहेत.

गटासाठी दाखल करण्यात आलेल्या ५६ अर्जांमध्ये उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र सादर करताना मालमत्तेचे विवरण दिले आहे. त्यात ही माहिती स्पष्ट झाली आहे. तालुक्यातील ७ गटातील कळवाडी, रावळगाव, दाभाडी, निमगाव व सौंदाणे गटातील भाजप सेनेचे उमेदवारांची मालमत्ता कोटीत आहे. जे. डी. हिरे यांच्यानंतर सौंदाणे गटातील भाजपच्या मनीषा रत्नाकर पवार यांची एकूण मालमत्ता ५६ कोटी ५३ लाख इतकी आहे. तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास कांदे यांच्या पत्नी अंजली कांदे या कळवाडी गटातून उमेदवारी करीत असून त्यांची एकूण मालमत्ता ३ कोटी ७३ लाख इतकी आहे. उमेदवारांची मालमत्ता कोटीच्या घरात असताना पंचायत समिती गणातदेखील कोट्यधीश असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात पाटणे गणातील भाजप उमेदवार अरुण संतोष पाटील यांची एकूण मालमत्ता ३ कोटी ९५ लाख इतकी आहे. तर झोडगे गणातील भाजपच्या सुवर्णा विजय देसाई यांची एकूण मालमत्ता ३ कोटी ७४ लाख इतकी आहे. सौंदाणे गणातील भाजपच्या संगीता संजय वाघ या देखील ३ कोटी ३३ लाखच्या धनी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचार सभांमधून झडणार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मैदान मारण्यासाठी बुलंद तोफा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टार प्रचारकांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्यात येणार आहे. विविध पक्षांनी त्यासाठीची तयारी केली असून, उद्यापासून या तोफा धडाडण्यास सुरुवात होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, माजी महसूल राज्यमंत्री सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, पंकज भुजबळ आणि नवाब मलिक यांच्या सभांचे नियोजन केले आहे.काँग्रेसची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याच सभा जिल्ह्यात व्हाव्यात, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे. याखेरीज माजी मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, बाबा सिद्दीकी, राधाकृष्ण विखे पाटील, आमदार भाई जगताप, खासदार मुजफ्फर हुसेन आदींच्या सभांची मागणी करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाने पर्यटन मंत्री जयप्रकाश रावल आणि आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांना प्रचारासाठी मैदानात उतरविले आहे. सध्या तालुका आणि गाव पातळीवर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू असून, दिंडोरी आणि इगतपुरी तालुक्यात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभही झाला आहे. शिवसेनेने स्टार प्रचारकांची फौजच प्रचारासाठी उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, एकनाथ शिंदे, दादा भुसे, नीलम गोऱ्हे, आमदार गुलाबराव पाटील, व्याख्याते नितीन बानगुडे पाटील, शरद पोंक्षे, डॉ. अमोल कोल्हे यांच्या सभांचे पक्षाकडून नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. ११) रोजी या सभांचा शुभारंभ घोटी येथून होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिकीट मशिनद्वारे मतदार स्लिपांचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आपले मतदान केंद्र, अनुक्रमांक याची माहिती कळविण्यासाठी यापूर्वी मतदानाना हाताने लिहिलेल्या स्लिपा पूर्वी घरोघर वाटल्या जात असे. मात्र, कार्यकर्त्यांची कमतरता भासू लागल्याने हेच काम आता तिकीट मशिनद्वारे केले जात आहे. मतदारांच्या दारात तिकीट मशिनच्या सहाय्याने अशा स्लिपांचे वाटप होत आहे.

निवडणुका जाहीर झाल्या की पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातर्फे स्लिपा छापून त्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयात लिहून मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी तयार केली जात असे. या स्लिपा तयार करणासाठी अक्षर चांगले असेलेल्यांसह जनसंपर्क चांगला असलेल्या कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपविली जात असे. अनेकदा तयार स्लिपा केवळ कार्यकर्ते न मिळाल्याने मतदारांपर्यंत पोहचत नव्हत्या. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या स्लिपा घरोघर पोहचाव्या यासाठी मतदारांचा डाटा कॉम्प्युटरमध्ये फिड करून स्लिपा तयार करण्याची शक्कल लढविली. मात्र, छापील स्लिपा घरोघरी वाटण्याचे काम कार्यकर्त्यांच्या टंचाईमुळे खंडीत होत असे. स्लिपा न मिळाल्यास अनेक मतदार मतदानाला जाणे टाळत. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुन्हा स्लिपा वाटण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, नेहमीऐवजी तिकीट मशिनच्या सहाय्याने स्लिपा तयार केल्या जात आहे. मतदारांचा डाटा तिकीट मशिनमध्ये फिड करून घरोघरी प्रिंट केलेल्या स्लिपांचे वाटप केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तंत्रनिकेतन बंदचा निर्णय रद्द करा

$
0
0

धुळे महापालिकेत होणार ठराव; राष्ट्रवादीची मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर सरकारने वेळोवेळी अन्याय केला आहे. मात्र या अन्यायाविरोधात आता युवासेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षाचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज बंद करण्याचा एकतर्फी निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. हा कॉलेज बंद करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय रद्द करावा म्हणून महापालिकेच्या महासभेत ठराव करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज मोरे यांनी महापौर कल्पना महाले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात, महाराष्ट्र सरकारने धुळे जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज बंद करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. या निर्णयाची चाहूल लागताच सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी आवाज उठवायला सुरुवात केली. शहराचे आमदार अनिल गोटे यांनीही पत्रक काढून शासकीय तंत्रनिकेतन बंद होऊ देणार नाही, शासनाला असा निर्णय घेऊ देणार नाही, माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे, असे आश्वासन दिले होते. मात्र तरीदेखील सरकारने एकतर्फी निर्णय घेतला.

कृषी विद्यापीठ नाहीच

कृषी विद्यापीठासाठी धुळे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, त्यासाठी जागा काही प्रमाणात निधीची तरतूद असूनही कृषी विद्यापीठ जळगाव जिल्ह्यात पळविण्याचा घाट घातला जात आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र धुळ्यात व्हावे, यासाठी राष्ट्रवादीसह इतर पक्षांनीदेखील आंदोलने केली. मनपाने जागा देण्याचा ठरावही केला होता. मात्र, तो ठराव सरकारने

विखंडीत करून धुळेकर जनता

आणि विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. आता शासकीय तंत्रनिकेतन बंद झाले तर धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बाहेरच्या जिल्ह्यात प्रवेशासाठी भटकावे लागेल. त्यातही बाहेरच्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यासाठी केवळ ३० टक्के जागा राखीव राहतील. त्यामुळे जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. म्हणून सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज रद्द करण्याचा सरकारचा निर्णय आहे. त्याविरोधात ठराव करून तो सरकारला पाठवावा, अशी मागणी मनोज मोरे यांनी महापौर कल्पना महाले यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव उमेदवारांची यंत्रणेला डोकेदुखी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी माघारीनंतर आता ८२१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यात महिला, तसेच अपक्षांची संख्या मोठी असून, ही वाढलेली संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली आहे. एका बॅलेट युनिटमध्ये १५ उमेदवार बसतात. परंतु, अनेक प्रभागांत २० ते ३० पेक्षा जास्त उमेदवार असल्याने मोठ्या संख्येने बॅलेट, तसेच कंट्रोल युनिटची आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेने १० टक्के अतिरिक्त मागणी नोंदवत ४ हजार ५७८ बॅलेट युनिट प्राप्त केले असून, एक हजार ५४९ कंट्रोल युनिटची आवश्यकता आहे. ३१ पैकी १६ प्रभागांत ३, ८ प्रभागांत २, तर ७ प्रभागांमध्ये ४ बॅलेट युनिट लागणार आहेत. त्यामुळे मतदारांचीही मतदान करताना तारेवरची कसरत होणार आहे.

महापालिका निवडणुकीत माघारीनंतर किती उमेदवार रिंगणात आहेत, याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. पाच राष्ट्रीय पक्षांसोबतच अपक्षांची संख्या मोठी आहे. त्यामुळे चार सदस्यीय प्रभागांमध्ये उमेदवारांची संख्या ही २० आणि ३० च्याही पुढे गेली आहे. एका प्रभागात चार सदस्य निवडून द्यायचे असून, अ, ब, क, ड साठी प्रशासनाने प्रत्येकी ६ ते ७ उमेदवार अपेक्षित धरले होते. परंतु, काही ठिकाणी ही संख्या ८ ते १० पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे वाढलेल्या उमेदवारांचा भार प्रशासनावर आला असून, बॅलेट संख्या व कंट्रोल युनिट वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय प्रशासनासमोर राहिलेला नाही. काही प्रभागांमध्ये तीन ते चार बॅलेट मशिन ठेवाव्या लागणार आहेत. प्रभाग क्रमांक १०, ११, १४, १६, १७, २१, २९ या सात प्रभागांमध्ये चार बॅलेट युनिट लागणार आहेत, तर प्रभाग १, २, ३, ४, ८, ९, १३, १८, १९, २२, २३, २५, २६, २७, ३० आणि ३१ मध्ये प्रत्येक मतदान केंद्रामध्ये ३ बॅलेट युनिट ठेवावे लागणार आहेत. प्रभाग ५, ६, ७, १४, १५, २०, २४, २८ या ८ प्रभागांमध्ये बॅलेट युनिटची संख्या दोन लागणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी एका बॅलेट युनिटवर दोन अ, ब गटाचे उमेदवार राहणार आहेत. परंतु, गोंधळ होऊ नये यासाठी थेट चारही गटांसाठी वेगवेगळे कलर कोड देण्यात आले आहेत. शहरात जवळपास एक हजार ४०७ मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे या मतदान केंद्रांसाठी ४ हजार १६४ बॅलेट युनिट लागणार असून, दहा टक्के अतिरिक्त मागणी पकडून ही संख्या ४ हजार ५७८ पर्यंत गेली आहे. यासाठी आवश्यक असलेले कंट्रोल युनिट हे एक हजार ४०८ आहेत. परंतु, १० टक्के अतिरिक्त मागणी पकडून ही संख्या एक हजार ५४९ पर्यंत गेली आहे. प्राप्त झालेल्या बॅलेट व कंट्रोल युनिटची रचना तयार केली जात आहे.


येथे राहणार पसारा...

३१ प्रभागांपैकी ७ प्रभागांमध्ये चार बॅलेट युनिट राहणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदाराला मतदान करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. या सात प्रभागांतील मतदान केंद्रांवर बॅलेट युनिटचा पसारा राहणार आहे. एका टेबलवर चार बॅलेट युनिटचा पसारा राहणार असून, प्रत्येक बॅलेट युनिटवर एक मतदान केल्यांतर मतदाराला पुढे सरकावे लागणार आहे. त्यामुळे प्रभाग १०, ११, १४, १६, १७, २१, २९ या सात प्रभागांमधील मतदारांची मतदान करताना कसोटी लागणार आहे.


जिल्हा प्रशासनाची मिटली चिंता

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अखेर कंट्रोल आणि बॅलेट युनिट यंत्रे मिळाली असून, प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मुंबई व पुण्यातून ही यंत्रे आणण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली. दि. २१ फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी दोन हजार ६४२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर दोन यंत्रे ठेवली जाणार असून, त्यामुळेच केंद्रांच्या संख्येनुसार पाच हजार २८४ मतदान यंत्रांची गरज भासणार आहे. मात्र, प्रशासनाकडे सुस्थितीतील पाच हजार ६२१ बॅलेट आणि पाच हजार ७७ कंट्रोल युनिट उपलब्ध होती. पुरेशी मतदान यंत्रे उपलब्ध नसल्याने प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे वाढीव ५०० बॅलेट आणि एक हजार कंट्रोल युनिटची मागणी केली होती. राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार करून मुंबई-पुण्यातून यंत्रे आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार प्रशासनाला पुण्यातून एक हजार ३८ कंट्रोल, तर मुंबई शहरातून एक हजार ५०० बॅलेट युनिट प्राप्त झाले आहेत. लवकरच या यंत्रांची प्रशासन चाचणी घेणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे सुपरफास्ट

$
0
0

सिन्नर ते खेड १३७ किमी लांबीचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत नाशिक-पुणे या चौपदरी मार्गावरील सिन्नर-खेड हा १३७ किलोमीटर लांबीचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे. यामुळे नाशिक-पुणे प्रवास सुपरफास्ट झाला असून, कनेक्टिव्हीटी वाढून विकासाला आणखी बूस्ट मिळणार आहे. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिक-पुणे अंतर हे सहा तासांवरून अवघ्या तीन तासांवर येणार आहे.

सिन्नर-खेड या १३७ किमी लांबीच्या चौपदरीकरणाचे काम आयएल अँड एफएस या कंपनीला डीबीएफओटी या तत्त्वावर मिळाले होते. गेल्या अडीच वर्षांपासून कंपनीने युद्ध पातळीवर काम करून १३७ पैकी १०४ किमी रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी भूसंपादनाच्या अडथळ्यामुळे सुमारे ३० किमी बाह्यवळण रस्त्याचे काम प्रलंबित आहे. सुमारे ७६ टक्के काम पूर्ण झाल्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पथकर वसुली करण्यास मंजुरी दिली. पूर्ण झालेल्या रस्त्यात ६७ किमी नवीन रस्ता, ८ बाह्य वळण रस्ते, ५ घाट दुरुस्ती, ९ मोठे व २३ लहान पूल आहेत. ८ ग्रेड सेपरेटर, वाहने ये-जा करण्यासाठी ३२ ठिकाणी अंडरपास पूल, ट्रकपार्किंग तसेच अनेक ठिकाणी पथदिव्यांची सोय आहे. हिवरेगाव पावसा (अहमदनगर) आणि चालकवाडी (पुणे) या पथकर नाक्यांवर अँब्युलन्स, क्रेन, स्वच्छतागृह आदींची सुविधा आहे. सिन्नर-खेड एक्स्प्रेस वे ही उपकंपनी नव्याने केलेल्या चौपदरी रस्त्याची २० वर्षे देखभाल दुरुस्ती करणार आहे. हा महामार्ग दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा भाग आहे.

कनेक्टिव्हिटी वाढणार

नाशिकहून पुणे येथे जाण्यासाठी पनवेलमार्गे एक रेल्वे सोडल्यास इतर व्यवस्था नाही. त्यातही हा प्रवास दूरचा आहे. त्यामुळे नाशिक-पुणे महामार्ग झाल्यास त्यातून या दोन्ही महानगरांची कनेक्टिव्हिटी वाढून दोन्ही शहरांच्या विकासाला बूस्ट मिळेल.

उद्योगाला फायदा

नाशिकच्या उद्योजकांना या महामार्गामुळे फायदा होणार आहे. चाकण, चिंचवड व पुणे येथील औद्योगिक वसाहत या महामार्गामुळे जवळ येणार आहे. त्यातून उद्योगांना वाहतुकीला लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होईल.

काम अपूूर्ण; तरीही टोल वसुली

या प्रकल्पासाठी हिवरगावपावसा आणि चालकवाडी या दोन ठिकाणी शनिवार (११ फेब्रुवारी) मध्यरात्रीपासून पथकर वसुली सुरू झाली. सिन्नर ते खेड व त्यानंतर पुन्हा खेडला टोल भरावा लागेल. या तिन्ही टोलनाक्यांवर १४२ रुपये टोल लागेल. सद्यपरिस्थितीत, सिन्नर ते आळेफाटा या दरम्यान बहुतांश रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर, आळेफाट्यापासून नारायण गाव, मंचर आणि खेड या ठिकाणी एक सलग कामेदेखील सुरू झालेली नाहीत. तरीदेखील टोल आकारणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळ येशू यात्रेत लाखो भाविक

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील प्रसिद्ध बाळ येशू यात्रेला शनिवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. देशभरातून आलेल्या पाच लाखांवर भाविकांनी बाळ येशूचे दर्शन घेऊन पवित्र मिसाचा लाभ घेतला. आज, रविवारी (दि. १२) या यात्रेचा समारोप होणार आहे.

मुख्य तंबूत सकाळी अकराला नाशिकचे बिशप लुर्डस डॅनियल यांनी भाविकांना मिसा (प्रार्थना व संदेश) दिली. ते म्हणाले, की सर्वांनी एकमेकांशी सुसंसाद ठेवल्यास जगात शांतता नांदेल. एकत्र कुटुंबपद्धतीनेच सर्वांना प्रेम लाभेल, सर्वजण सुखी होतील.

सकाळी सहा ते सायंकाळी सातदरम्यान दर तासाला एक मिसा (प्रार्थना) घेण्यात आली. शामियान्यात एका वेळी सुमारे तीन ते चार हजार भाविक उपस्थित होते. इंग्रजी, तमीळ व मराठी भाषांत मिसाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. फादर ट्रेव्हर मिरान्डा, रुडी फर्नांडिस, सेड्रिक रिबेलो, डायनेशस लोबो, बॅप्टिस्ट पिन्टो, एमल डिक्रूज आदींनीही मिसा दिली. बाळ येशूचे दर्शन घेण्यासाठी मंदिराशेजारील नवीन यात्रेकरू भवनाशेजारी पहाटेपासून रांगा लागल्या होत्या. यात्रा शांततेत पार पडावी म्हणून शंभरावर स्वयंसेवक सेवा देत होते. दर्शन घेतल्यानंतर भाविक मिसासाठी मुख्य शामियान्याकडे रवाना होत होते. तेथे प्रार्थना झाल्यावर सेंट झेवियर्स शाळेच्या आवारातून भाविकांना सोडण्यात येत होते.


वाहनांचीही जत्रा

बाळ येशू यात्रेमुळे परिसरात वाहनांचीही जत्रा भरल्याचा भास होत होता. देशभरातून भाविकांची शेकडो वाहने आल्याने नेहरूनगर वसाहत, जेतवननगर आणि उपनगर येथे वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. नवीन व जुन्या यात्रेकरू भवनात निवासाची सोय करण्यात आली होती. देवाला नवस म्हणून भाविकांनी मेणबत्ती, घर, बाहुली, गाडी, भोवरा यांची प्रतिकृती वाहिली.

नियोजनानंतरही वाहतूक कोंडी

यात्रेमुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत बंद ठेवण्यात आली होती. पुणे-सिन्नरकडून येणारी व द्वारका सर्कल, मुंबईकडे जाणारी वाहने बिटको चौक, देवळालीगाव, पाथर्डी फाटामार्गे सोडण्यात आली. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पुणे-सिन्नर या बाजूकडून येणारी व द्वारका सर्कलमार्गे धुळ्याकडे जाणारी वाहने बिटको चौक, जेलरोड, नांदूर नाका, जत्रा चौफुली यामार्गे सोडण्यात आली. द्वारका चौक-नाशिककडून पुणे-सिन्नरकडे जाणारी वाहने फेम सिनेमा सिग्नल, ड्रीम सिटी, नारायणबापू चौक, सैलानीबाबा चौक, जेलरोडमार्गे इतरत्र रवाना झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिन्यात वाढले १४ लाख प्रवासी

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची घटत असलेली प्रवासीसंख्या वाढवण्यासाठी महामंडळाकडून विशेष अभियान राबविल्यानंतर नाशिक जिल्ह्यात प्रवासी संख्येत एका महिन्यात १४ लाख प्रवासी वाढल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १३ आगारांत ही वाढ झाली असून, या आगारांनी दिलेले टार्गेटही आेलांडले आहे. राज्यातील महामंडळाच्या २५० आगारांमधून या अभियानाला १ जानेवारी २०१७ रोजी सुरुवात करण्यात आली असून, हे अभियान ३१ मार्चपर्यंत सलग तीन महिने चालणार आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या सूचनेनुसार राज्यात हे अभियान राबविण्यात येत असून, त्यात नाशिकला यश मिळाले आहे.

या अभियानाद्वारे राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या एसटी आगारांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी दरमहा एक लाख रुपयांचे रोख बक्षीस महामंडळाकडून देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकावरील आगारास ७५ हजार रुपयांचे व तृतीय क्रमांकावरील आगारास ५० हजारांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. उत्कृष्ट सांघिक कामगिरी करणाऱ्या विभागाला ५० हजारांचे विशेष बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे राज्यात या अभियानत सर्वांनीच भाग घेतला. एसटीच्या चालक-वाहकांना प्रवासी वाढविण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्याकरिता प्रत्येक आगार पातळीवर या अभियानात सर्वाधिक प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहकास दरमहा रोख ५ हजार रुपयांचे, तसेच त्याला या कामगिरीबद्दल साथ देणाऱ्या चालकाला तीन हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या १३ आगारांत २०१६ मध्ये १ कोटी ४९ लाख ९७ हजार प्रवाशांनी प्रवास केला. या अभियानात एसटी महामंडाळाने जिल्ह्याला १ कोटी ५४ लाखांचे टार्गेट दिले होते. पण, या टार्गेटपेक्षाही ९ लाख प्रवासी जास्त मिळवून जिल्ह्याने ही कामगिरी साधली आहे.

---

जिल्ह्यातील आगारनिहाय स्थिती (संख्या लाखांत)

---

आगार जानेवारी २०१६ टार्गेट जानेवारी २०१७

--

नाशिक -१ २२.०८ २२.०८ २२.२९

नाशिक -२ ३७.९ ४०.१७ ४४.८६

मालेगाव ९.०५ ९.७० ९.७३

मनमाड ६.६३ ७.११ ७.१

सटाणा ११.२२ ११.२२ ११.४८

सिन्नर १२.६७ १२.६७ १३.५४

नांदगाव ६.२ ६.३२ ६.५

इगतपुरी ४.६२ ४.७१ ४.९८

लासलगाव ७.८१ ८.२२ ८.७४

कळवण ९.९९ १०.१९ ११.२८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचारामध्ये येईना रंगत...

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठीचे मतदान हे अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपले असतानाही प्रचाराचा रंग अजूनही फिकाच आहे. प्रचारासाठी उमेदवार दारोदार फिरत असले, तरी निवडणुकीचा माहोल अजूनही तापत नसल्याने आता राजकीय पक्षांनीच धसका घेतला आहे. मुंबई, ठाणे, नागपूर व पुण्यात प्रचाराचा धडाका सुरू असतानाच नाशिकमधील शांतता आता उमेदवारांसह राजकीय पक्षांसाठी धोक्याची वाटू लागली आहे. मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा व प्रचार रॅल्यांअभावी निवडणुकीचा रंग फिका वाटत असल्याने मतदारसही संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे मतदारांना चार्ज करण्यासाठी प्रशासनासह राजकीय पक्षांनाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचारसभा या १६ फेब्रुवारीनंतरच होणार आहेत, तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेही फिरकत नसल्याने अजून आठवडाभर तरी प्रचाराचा रंग फिकाच राहणार असल्याचे चित्र आहे.

महापालिका निवडणुकांचे पडघम वाजत असले, तरी निवडणुकीचा माहोल अद्यापही तयार झालेला नाही. महापालिकेचीसाठी आचारसंहिता लागून एक महिना झाला, तरी निवडणुकीचे वातावरण अद्याप तापलेले नाही. उमेदवारीसाठी राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. त्यामुळे माघारीनंतर तरी निवडणूक प्रचाराला जोर येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु, जवळपास ८२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतानाही प्रचार थंडाच असल्याने उमेदवारांसह राजकीय पक्ष कोड्यात पडले आहेत. महापालिकेसाठी काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी, तर काही ठिकाणी पंचरंगी लढती होत आहेत. त्यामुळे प्रचारात चुरस येईल, असे वाटत होते. परंतु, माघारी होऊन चार दिवस लोटले, तरी निवडणुकीचा माहोल तापत नसल्याचे चित्र आहे. केवळ उमेदवारच प्रभागात फिरत असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे.

मुंबई, पुणे, ठाणे व नागपूर या महापालिकांमध्ये प्रचाराचा धुरळा उडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. परंतु, याउलट चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. शिवसेनेने मुंबईवर लक्ष केंद्रित केल्याने उद्धव ठाकरे शेवटच्या टप्प्यात नाशिकमध्ये येणार आहेत. उद्धव ठाकरे यांची सभा १७ फेब्रुवारीला गोल्फ क्लबवर होणार आहे, तर राज ठाकरेंचीही १७ फेब्रुवारीला त्याच मैदानावर सभा होणार आहे. मुख्यमंत्री याच मैदानावर १८ फेब्रुवारीला तोफ डागणार आहेत, तर काँग्रेसच्या वतीने अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सभा होणार आहेत. राष्ट्रवादीकडूनही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक यांच्या सभा होणार आहेत. परंतु, या सर्व सभा शेवटच्या टप्प्यात होणार असल्याने अजून आठवडाभर तरी निवडणूक प्रचाराचा रंग फिकाच राहणार असल्याचे चित्र आहे.


सेनेत जोर, भाजपत शांतता

महापालिका व जिल्हा परिषदेसाठी प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या सभांना सुरुवात झालेली नाही. मात्र, असे असले, तरी शिवसेनेने आपले मंत्री निवडणुकीच्या रंगणात उतरवून प्रचार तापविण्याचा

प्रयत्न केला आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी इगतपुरी व नाशिकमध्ये सभा घेऊन वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी नाशिकरोडला प्रचार सभा घेऊन सभांना सुरुवात केली आहे. सोमवारी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे नाशिकमध्ये रोड शो करून जाहीर सभा घेणार आहेत. दुसरीकडे भाजपमध्ये अजूनही शांतता आहे. पालकमंत्री वगळता अजून मोठा नेता नाशिकमध्ये फिरकलेला नाही. त्यामुळे प्रचाराची शांतता कोणाला मारक ठरते, याची चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरुष उमेदवारांपुढे पाच महिलांचे आव्हान!

$
0
0


रामनाथ माळोदे, पंचवटी

एकेकाळी निवडणुकीसाठी महिला राखीव जागेसाठी महिला उमेदवार मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी शोधाशोध करावी लागत होती. मोठ्या मुश्किलीने सक्षम महिला उमेदवार मिळायच्या. आता मात्र महिलांसाठी मिळणाऱ्या पन्नास टक्के आरक्षणामुळे राजकारणात महिलांचा सक्रिय सहभाग दिसू लागला आहे. किंबहुना पुरुषांपेक्षा महिला राजकारणात सक्षमपणे काम करू लागल्या आहेत. पंचवटीत २४ जागांसाठी १३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात महिला उमेदवारांची संख्या ७५ आहे, यावरून हे चित्र स्पष्ट होत आहे. एवढेच नव्हे, तर पंचवटीतील सहा प्रभागांपैकी पाच प्रभागांमध्ये दीप्ती हिरवे, ललिता चौधरी, सविता बडवे, शकुंतला निकम आणि चित्रा तांदळे या पाच महिलांनी थेट पुरुष उमेदवारांपुढेच आव्हान उभे केले आहे.

प्रभाग एक

प्रभाग एक ड या सर्वसाधारण खुल्या गटातून दीप्ती हिरवे या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २०१२ च्या निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविली होती. त्या निवडणुकीत त्यांनी सर्वसाधारण महिला राखीव जागेवर चांगली लढत दिली होती. त्या निवडणुकीत त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला होता. या निवडणुकीत मतदारांची सहानुभूती मिळणार असल्याचे त्यांचे मत आहे. विज्ञान शाखेच्या पदवीनंतर त्यांनी एमबीए केलेले आहे. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांचा नेहमी अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो. त्यांची विरोधात सात पुरुष उमेदवार आहेत.

प्रभाग दोन

प्रभाग दोन अ मधील अनुसूचित जमाती राखीव जागेवर ललिता चौधरी या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी करीत आहेत. वाणिज्य शाखेच्या पदवीधर असलेल्या चौधरी या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. सामाजिक कार्यात पुढाकार घेत असल्याने त्या महिलांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या विरोधात सहा पुरुष उमेदवार आहेत.

प्रभाग चार

प्रभाग चारमधून सविता बडवे या नागरिकांचा मागास प्रवर्गातून अपक्ष उमेदवारी करीत आहेत. त्या प्राध्यापक असून, मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये सेवेत आहेत. शिवसेना पुरस्कृत भगवान भोगे, मनसेचे भास्कर लोणारे, भाजपचे जगदीश पाटील आणि राष्ट्रवादीचे राजेश माने यांच्या विरोधात त्या निवडणूक रिंगणात आहेत.

प्रभाग सहा

प्रभाग सहा अ मधील अनुसूचित जमातीसाठी राखीव जागेवर चित्रा तांदळे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी नगरसेवक डॉ. जगन्नाथ तांदळे यांच्या त्या पत्नी असून, त्यांनी २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. या निवडणुकीत त्या मनसेेकडून उमेदवारी करीत आहेत.

प्रभाग पाच

प्रभाग पाच अमधील इतर मागास प्रवर्गातून शकुंतला निकम उमेदवारी करीत आहेत. त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले असून, महिला सहकारी बँकेचे त्यांनी प्रतिनिधीत्व केलेले आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असल्याने त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भाजपचे कमलेश बोडके, शिवसेनेचे मनोज अदयप्रभू आणि मनसेचे उल्हास धनवटे यांच्याशी त्यांची लढत आहे.

२००७ ची पुनरावृत्ती होणार?

रंजना भानसी यांनी २००७ च्या महापालिका निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी राखीव जागेवरून पुरुष उमेदवारांशी लढत दिली होती. या लढतीत त्यांनी विजयश्री खेचून आणली होती. तसा विजय मिळविण्याचा या महिला उमेदवारांचा प्रयत्न राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोजगार मेळाव्यात ७५ विद्यार्थ्यांना संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेजमध्ये आयोजित रोजगार मेळाव्यास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. यात सुमारे ११ कंपन्यांनी कर्मचारी नियुक्तीसाठी सहभाग घेतला. यात इच्छुक २५० विद्यार्थ्यांपैकी ७५ विद्यार्थ्यांना संधी मिळाली.

शैक्षणिक वर्ष २०१६-२०१७ या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तृतीय वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बीबीए, बीसीए, बीएस्सी (संगणकशास्र), एमए., एम.कॉम, एम.एस्सी. या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा पर्वणीच ठरला. मेळाव्यासाठी नाशिक येथील ११ विविध नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यात युवाशक्ती फाऊंडेशन, युनिक अॅक्वा सिस्टीम, करिअर क्लब कन्सल्टन्सी, आय प्रोसेस सर्व्हिसेस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, डब्लूएनएस, बीएसआर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपन्यांनी घेतलेल्या मुलखतींमध्ये कॉलेजच्या २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पैकी ७५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सरचिटणीस हेमंत धात्रक, सहचिटणीस तानाजी जायभावे, प्राचार्य डॉ. वसंत वाघ, उपप्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला. प्राचार्य डॉ. वसंत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्लेसमेंट समन्वयक डॉ. विजय नौकुडकर, डॉ. संजय सानप, प्रा. सुदाम भाबड, स्नेहल कासार, प्रा. सचिन साळवे यांच्यासह कार्यालयीन प्रमुख राजेंद्र तिवडे आदींनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीबाजार बनला डोकेदुखी

$
0
0

सिडकोसह सातपूर भागातील समस्या; वाहनांना अपघाताचा धोका

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहराचा चारही बाजूंनी लोकवस्ती गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. यात रोजच जेवणात लागणारा भाजीपाला ही सर्वांचीच गरज आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून मुख्य रस्त्यांवरच भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने मांडली आहेत. यामुळे नवीन नाशिक सिडको व सातपूर भागात रस्त्यावर भरणाऱ्या भाजी बाजाराला महापालिका पर्याय शोधणार का, असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यातच मुख्य रस्त्याच्या कडेला भरणाऱ्या भाजी बाजारात चुकून एखादा अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण, असाही सवाल सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने आरक्षित जागांवर भाजी विक्रेत्यांची सोय उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

नाशिक शहराची चारही बाजूंनी लोकवस्ती वाढली आहे. वाढत्या लोकवस्तीत रहिवाशांच्या गरजादेखील वाढल्या आहेत. यात रस्ते, पाणी, वीज व आरोग्याच्या सुविधा महापालिका पुरविण्यात नेहमीच प्रयत्न करत असते. वाढत्या लोकवस्तीत भाजी मार्केटची सुविधा मात्र महापालिकेला पूर्ण करता आलेली नाही. कामगार वस्तीच्या असलेल्या नवीन नाशिक सिडको व सातपूर भागात मुख्य रस्त्यांवरच भाजीपाला बाजार गेल्या काही वर्षांत वसला आहे.

मुख्य रस्त्यावर भाजीपाला विक्रेते बसत असल्याने मार्केटमधील भाजी विक्रेत्यांना ग्राहकच मिळत नसल्याचा आरोप नेहमीच केला जातो. रस्त्यावर भाजीपाला विक्रेते बसत असल्याने कामावरून घरी जाणारे कामगार रस्त्यावर बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांकडूनच भाजीपाला घेतात. यामुळे रस्त्यावर अनेकदा वाहतूक कोंडीदेखील होत असते. परंतु, रस्त्यावर भरणाऱ्या भाजीपाला बाजाराला महापालिका पर्याय शोधणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. रस्त्यावर भरणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाईही करण्यात येते. परंतु, कारवाईनंतर पुन्हा भाजी विक्रेते रस्त्याच्या बाजूला आपली दुकाने मांडत असतात. त्यासाठी महापालिक‌ेने रस्त्यांवर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे.

नवीन नाशिक सिडको व सातपूरच्या अनेक भागात मुख्य रस्त्याच्या कडेलाच भाजीपाला बाजार भरतो. या भाजीपाला बाजारामुळे सांयकाळी रोजच वाहतूक कोंडी होत असते. यामुळे एखादा मोठा अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण? महापालिकेने रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांची स्वतंत्र सोय केली पाहिजे.

गणेश दुसाणे, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पपया नर्सरीजवळ मुख्य जलवाहिनीला गळती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेच्या त्र्यंबकेश्वररोडवरील स्वागत कमानीला लागून असलेल्या पपया नर्सरीजवळ मुख्य जलवाहिनीला शनिवारी (दि. ११) अचानक गळती लागली. सातपूर गाव व महात्मानगर पाणी टाकीला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे हजारो लीटर पाणी वाया गेले आहे.

जलवाहिनीला गळती लागण्याचे पाणीपुरवठा विभागाला समजताच पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला. जलवाहिनीला पाणी गळती लागल्याने सातपूर गाव

व महात्मानगर परिसरात रात्री उशिराने पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, चार महिन्यांपूर्वीच गळतीच्या ठिकाणी दुरुस्तीचे काम केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वसुधैव कुटुंबकम्’मधून जागवली एकीची भावना

$
0
0

विद्यार्थ्यांच्या नाट्याविष्काराने देवळालीकर भारावले

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

शालेय शिक्षण घेतानाच लहान विद्यार्थ्यांच्या मनावर भारतीय संस्कृतीत असलेल्या एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व समजावे. या उद्देशाने येथील मविप्र संचालित आदर्श शिशू विहार या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनातून ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेवर आधारित विविध नृत्य व नाटिका प्रस्तुत करीत अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळायला भाग पाडले.

कार्यक्रमात सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यानंतर सुरू झालेला प्रवास हा अनेकांना आश्चर्यचकित करणारा होता चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भूपाळीपासून सुरुवात करत आजच्या समाजव्यवस्थेवर भाष्य करणारे अंधश्रद्धा, रूढी परंपरा, स्त्री-पुरुष भेदभाव, स्त्रीभ्रूण हत्या, मुलीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तिचे विविध रूपात होणारे दर्शन अत्यंत संवेदशीलपणे मांडण्याचा प्रयत्न केला.

अज्ञानाच्या जोखडातून बाहेर निघायचे असेल तर आजची समाजव्यवस्था बदलली पाहिजे, असा संदेशच त्यांनी ‘पॅरेंट्स डे’चे औचित्य साधत या स्नेहसंमेलनातून दिला. प्रास्ताविकातून शाळेच्या मुख्याध्यापिका विनिता भोईर यांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पना स्पष्ट केली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बॉश कंपनीचे परदेशी पदाधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक लोकरे, चंद्रकांत गोडसे, सोमनाथ खातळे आदींसह

स्थानिक व्यवस्थापन व शालेय समितीचे सदस्य, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य व नाटिकांमधून सादर केलेल्या अभिनयाबद्दल उपस्थितांनी रोख रक्कम देत बक्षिसेही दिली. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना नायडू, मानसी नेटके यांनी केले तर आभार वैष्णवी आमेर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व कर्मचारी प्रयत्नशील होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरुंद रस्त्याची समस्या गंभीर

$
0
0

मानूरगावच्या रस्त्याला हवी संरक्षक भिंत

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

औरंगाबाद रोडकडून मानूर गावाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकाला जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. त्यातच हा वळणाचा रस्ता नाल्याजवळून वळसा घेऊन गावाकडे जात असलेल्या ठिकाणी खोल नाला आहे. या नाल्याची खोली पन्नास फुटांपेक्षा जास्त आहे. मात्र, या नाल्याच्या बाजूला संरक्षक भिंत नसल्यामुळे या अरुंद रस्त्याची समस्या गंभीर बनली आहे.

नाशिक महापालिकेच्या पूर्वेच्या हद्दीला असलेल्या मानूर गावचा महापालिकेच्या स्थापनेपासून समावेश करण्यात आलेला आहे. असे असले तरी या गावाकडे अजून विकासाची गंगा पोहचली नाही. या गावाकडे जाणारा मुख्य रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. अरुंद रस्त्यालगत नाला असून हा नाला उत्तरेकडून दक्षिणेकडे गावाच्या दिशेने वाहत जाऊन गोदावरी नदीला मिळतो. या नाल्याची गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या भागातील खोली ही पन्नास फूटांपेक्षा जास्त आहे. याच बाजूने रस्ता खचू लागला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात या रस्ताने मानूरच्या घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नाल्याच्या बाजूने लाकडी बल्ल्या वापरून बॅरिकेटस् लावण्यात आले होते. त्यावेळी भाविकांच्या सोयीसाठी दक्षता घेतली होती. या मार्गाने भाविक तर कधी आले नाहीच, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या काळजीचा काही उपयोग झाला नाही. सिंहस्थ पर्वण्यांचा कालावधी संपताच हे बॅरिकेटस् काढण्यात आले. येथे गावच्या नागरिकांना या मार्गाने रोजच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, या गोष्टींकडे नाशिक महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images