पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमिवर साथीच्या रोगांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये दाखल होणाऱ्या पेशंटच्या संख्येत वाढ होत असून मागील आठवड्याच्या तुलनेत तापाचे पेशंट वाढल्याचे दिसून येते. आरोग्य विभागाच्या पाहणीत तब्बल १२४ घरांमधील पाण्याचे नमुने दुषीत आढळल्याने शहराला डेंग्यूचा धोका निर्माण झाला आहे.
↧