मकरसक्रांतीचा सण म्हटला की, जानेवारीत गल्लोगल्ली पतंग उडतांना दिसतात. पतंगाच्या मांज्यामुळे मुक्या पक्षांचा जीव तर जातोच परंतु आता या पतंगाच्या मांजाने महावितरणचे वायरमनही त्रस्त झाले आहेत. मांज्यामुळे विद्युत तारा एकमेकांना लटकत विद्युत पुरवठा रोजच खंडीत होतो. पर्यायाने वायरमनांना रोजच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
↧