‘महाभारतात योद्धे अनेक आहेत परंतु, लक्षात राहतो तो कर्ण; असे का तर त्याच्यापुढे दानशूर ही उपाधी लागलेली आहे. दानशूर नाशिककरांनी या मुलांना जे भरभरून दान दिले आहे, ते लक्षात ठेवून ही मुले उद्या कुणाला तरी अशीच मदत करतील’, असा आशावाद पोलिस अकादमीच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य हरिष बैजल यांनी बुधवारी ‘मटा हेल्पलाइन’च्या चेकप्रदान सोहळ्यात व्यक्त केला.
↧