Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गोविंदनगरमध्ये चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एटीएममधून पैसे काढून घराकडे परणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी व मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना भुजबळ फार्म परिसरात घडली. गोविंदनगर येथील भावसार भवनमागे राहणाऱ्या अर्चना जयंत एंडाईत (वय ४६) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, की बुधवारी रात्री आठच्या सुमारास एंडाईत मुंबई- आग्रा हाय-वेवरील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. पैसे काढून परतत असताना भुजबळ फार्ममागील श्रीजी लक्झरिया इमारतीसमोर दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्यावर थेट हल्लाच चढवला. चोरट्यांनी जोरात चापट मारून एंडाईत यांच्या गळ्यातील सुमारे ७५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी आणि मंगळसूत्र ओरबाडून नेले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

महिलेचा विनयभंग

महिलेस मारहाण करीत विनयभंग करण्यात आल्याची घटना द्वारका परिसरात घडली. या प्रकरणी समीर इब्राहीम मिर्झा (वय ३९, रा. लेखानगर) याच्याविरुद्ध भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मालेगाव येथील आंबेडकरनगर भागात राहणाऱ्या महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. द्वारका परिसरातील मालेगाव टॅक्सी स्टँडवर पीडित महिला बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उभी होती. त्या वेळी संशयिताने तिला 'ये भवाने' असे संबोधल्याने वाद झाला. महिलेने जाब विचारला असता संशयिताने तिचे केस धरून मारहाण करीत विनयभंग केला. या प्रकरणी सहाय्यक निरीक्षक लोखंडे तपास करीत आहेत.

जुगार अड्ड्यावर छापा

हॉटेल एक्स्प्रेस इनमागील ढेमसे मळ्यातील जुगार अड्डा पोलिसांनी उद््ध्वस्त केला. पोलिसांनी अड्डा चालकासह सात जुगारींना जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पंकज भरत पाटील (रा. सिडको) असे जुगार अड्डा चालवणाऱ्या मुख्य संशयिताचे नाव आहे. हॉटेल एक्स्प्रेस इनमागील ढेमसे मळ्यात उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह रोकड व अन्य साहित्य असा सुमारे ६६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हवालदार पाळदे तपास करीत आहेत.

तडीपार शिंपी जेरबंद

शहरासह जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असताना शहरात वास्तव्यास असलेल्या कामटवाडे येथील पंकज प्रकाश शिंपी (रा. साई संकुल, आनंदनगर, कामटवाडे) यास पोलिसांनी जेरबंद केले. शिंपीवर विविध पोलिस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे शिंपीविरोधात जानेवारीमध्ये तडीपारीची कारवाई करण्यात आली. दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असताना शिंपी मात्र शहरात राहत असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी रात्री मोगलनगर येथील सूर्योदय बीअरबार परिसरात सापळा रचून शिंपीला जेरबंद केले. हवालदार शेळके तपास करीत आहेत.

कामगाराचा मृत्यू

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडल्याने शिंगवे बहुला येथील रवी बाबूराव उगले (वय ४५) या कामगाराचा देवळाली कॅम्प परिसरात बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. लॅम रोडवरील दर्शन अकादमी येथील एका बांधकामावर काम करीत असताना उगले कोसळले. गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

तरुणाची आत्महत्या

लोखंडे मळा परिसरातील चंद्रशेखर देवेंद्रसिंग (वय २८) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. त्याने बुधवारी दुपारी आत्महत्या केली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी आकस्मिक गुन्ह्याची नोंद केली असून, हवालदार सोनवणे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाबूंपुढे मुख्यमंत्रीही हतबल!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गतिमान प्रशासन आणि सुशासनाचा दावा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच लालफितीच्या कारभारापुढे हतबल व्हावे लागल्याचे नाशिक दौऱ्यात दिसून आले. बाबूशाहीने जलयुक्त शिवार योजना रखडल्याबाबत कारणांचा पाढाच त्यांच्यापुढे वाचला. टेंडर, कार्यारंभ आदेश, लोकांचा विरोध अशी कारणे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आली. त्यावर संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनीही मग बाबू मंडळीला फैलावर घेत लालफितशाहीची कारणे आणखी किती दिवस सांगणार, असा थेट सवाल केला. तुमच्यातली अकार्यक्षमता झटका, असा सज्जड इशाराच त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. दोन-दोन वर्षे कारणे सांगणे शोभत नसल्याचे सांगून यापुढे कारणे सांगणे थांबवा, अशा शब्दांत फडणवीस यांनी यंत्रणेला खडसावले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी झालेल्या नाशिक विभागस्तरीय आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यानी स्वागताचे सोपस्कार पार पाडत जलयुक्तचा आढावा सुरू केला. यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जिल्ह्याच्या कामाचे सादरीकरण केले. त्यानंतर '८० टक्के कामे पूर्ण झाले असली तरी २० टक्के कामे अपूर्ण का' असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. योजना सुरू होऊन दोन वर्षे झाली, तरी कामात कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले.

धुळे व नंदुरबारमध्ये जलयुक्तच्या कामांची संथ गती होती. तर नाशिकमधील सिन्नर, सटाणा, कळवणमध्येही सिंचन विहिरींचेही काम समाधानकारक नव्हते. धुळ्यात जलयुक्तच्या काही कामांना मंजुरीही मिळालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारल्यावर आपणही आताच बदली होऊन आल्याचे सांगितले. तर काहींनी टेंडर झाले नाही, कार्यारंभ दिला नाही, लोकांचा विरोध, अशी कारणे सांगण्यास सुरूवात केली. त्यामुळे मुख्यमंत्री संतापले. 'योजनेचा दुसरा टप्पा आला तरी पहिल्या टप्प्यातील कामे होऊ शकली नाहीत. ह‌ी सरकारचा महत्त्वाकांक्षी योजना आहे. प्रशासकीय मंजुरीला दीड वर्ष लागते, ही लालफितशाहीची कारणे आहेत. तुम्ही कार्यक्षम नसल्याचेच सांगत अाहात. मी योजनेसाठी गावोगाव फिरतो तरीही तुम्हाला योजनेचे गांभीर्य लक्षात येत नाही,' या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. 'दोन वर्षे कारणे सांगणे शोभत नाही. कार्यपद्धतीत सुधारणा करून यापुढे कारणे सांगून नका', असा सज्जड इशाराही फडणवीस यांनी दिला.

'जम‌िनीवर या'

महापालिकेतही भाजपचीच सत्ता येईल अशा भ्रमात राहू नका, असा सज्जड इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांवरील हल्ला अजामीनपात्र गुन्हा?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिसांवरील हल्ला हा संपूर्ण यंत्रणेवरीलच हल्ला असून, सरकार असे हल्ले सहन करणार नाही असा इशारा देतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवरील हल्ल्याचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची घोषणा केली. पोलिसांवरील हल्ल्यांचे खटले लवकर तडीस नेले जात नसल्याने हल्लेखोरांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे अशा हल्लेखोरांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करून तो असे खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यासाठी आपण मुख्य न्यायमूर्तींची भेट घेणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी पोलिसावंरील हल्ल्यांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. मागील आठ-दहा वर्षांपासून पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाई करून अजामीनपात्र गुन्हे दाखल केले आहेत. या हल्ल्यांचा आढावा घेतला असता, पोलिसांवरील हल्ल्यांचे खटले लवकर निकाली निघत नाहीत. त्यामुळे हल्लेखोरांचे मनोबल वाढते. अशा खटल्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे आता अशा प्रकारचे खटले यापुढे फास्ट ट्रॅक कोर्टांमध्ये चालविले जाणार आहेत. हल्लेखोरांवर कारवाई होतेच असा संदेश समाजात जाणे आवश्यक असून, तो जाण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

नाशिक विभागात जलयुक्त शिवारसह विविध योजनांचे काम समाधानकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवाराचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर मागेल त्याला शेततळे योजनेचे कामही प्रगतीपथावर आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक सिंचन विहिरींची कामे सुरू आहेत. आता विहीर पूर्ण होताच शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन दिले जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानाचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून, ४ हजार ८४१ ग्रामपंचायतींपैकी २५३२ ग्रामपंचायतींमध्ये काम पूर्ण झाले आहे. रमाई व शबरी आवास योजनेचे कामही प्रगतीपथावर असून, आता प्लॉट घेण्यासाठी ५० हजार रुपये सरकार देणार आहे. दर तीन महिन्यांनी या योजनांचा आढावा घेतला जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यानी सांगितले. उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांग‌ितले.

राइट टू सर्व्हिस

सेवा हमी कायद्याचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. यात महसूल विभागाला २७ लाख ९२ हजार अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी २७ लाख १०८ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. त्यामुळे जवळपास ९८ टक्के या कायद्याची अंमलबजावणी झाली आहे. ग्रामविकास विभागाकडे ११ लाख ६ हजार ६०८ अर्ज दाखल झालेत. तर १० लाख ९८ हजार अर्ज निकाली निघाले आहेत. त्यामुळे या कायद्याची यशस्वी अंमलबजावणी झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.


कांद्याबाबत केंद्राला साकडे

कांद्याला अनुदान देण्यासंदर्भात कालच राज्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख दिल्लीत गेले होते. त्यांनी कृषी विभागाशी संबधित वरीष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली असून, कांद्याला अनुदान वाढवून देण्याची मागणी केली आहे. सरकार त्याबाबत सकारात्मक असून कांदा अनुदान वाढवून देण्याची घोषणा लवकरच होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांग‌ितले.

आधारशी योजना लिंक

विविध शासकीय योजनांचा आढावा घेतल्यानंतर एकाच योजनेचा लाभ अनेकांनी घेतल्याचे समोर आले. त्यामुळे विशेष सहाय्य योजना या आधार कार्डशी लिंक केल्या जाणार आहेत. त्यामुळे चुकीची कामे टळतील, असा दावा त्यांनी केला. यामध्ये सर्व महत्वाच्या योजना समाविष्ट केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांग‌ितले.

'तो' हल्ला राजकीय नाही

मुंबईत मनसेकडून परप्रांतीय भाजीविक्रेत्यांवर केलेल्या हल्लाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचा दावा केला. राज्यात अशा प्रकारचे हल्ले होणार नसल्याचे सांगत, मनसेकडून मारहाण झाल्याचे वृत्तही त्यांनी फेटाळून लावले. किरकोळ मारहाणीच्या घटनांना पक्षाचे नाव देवून त्या घटनांना वेगळेच वळण दिले जात असल्याचे सांगत, तो हल्ला राजकीय नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पुराव्यासाठी पोलिसांनी शोधला साप!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकालनीय किंवा गूढ गुन्ह्याचा उलगडा करताना पोलिसांना सुईच्या टोकाएवढा पुरावाही यश देण्यासाठी पुरेसा ठरतो. पुराव्याची एक-एक कडी जोडून लपलेल्या गुन्हेगाराचा माग काढून शकतात. यासाठी गुन्ह्यातील पुरावा महत्त्वाचा ठरतो. मुंबई नाका पोलिसांनी असाच एक पुरावा गुरूवारी शोधून काढला. हा पुरावा बंदूक किंवा एखादे हत्यार नाही. तर, चक्क विषारी सापच आहे. साप चावलेल्या महिलेवर उपचार सुरू असून, पोलिसांना तिच्या जबाबाची प्रतीक्षा आहे.

शहरात तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना नवीन नाहीत. अनेक नागरिक दरवर्षी सर्पदंशाने मृत्युमुखी पडतात. मात्र, सर्पदंशानंतर पोलिस सापाला शोधून त्याला कोठडीत ठेवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. मुंबई नाका पोलिसांनी मात्र ही जबाबदारी पार पाडली आहे. त्यासाठी कारणही तसे घडले असून, बेशुध्दावस्थेत उपचार घेणाऱ्या महिलेला नैसर्गिक पध्दतीने सर्पदंश झाला की, तिला ठार मारण्याच्या उद्देशाने हे कृत्य कोणी केले याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. सदमीन एस. शेख असे या महिलेचे नाव आहे. वडाळारोडवरील कौशल पार्क येथे राहणाऱ्या शेख यांना बुधवारी सर्पदंश झाला. त्यांना तातडीने एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, त्या बेशुध्दावस्थेतच आहेत.

दरम्यान, सोशल मीड‌िया अॅक्ट‌िव्ह झाला. शेख यांना जीवे मारण्याच्या उद्देशानेच एका अज्ञात महिलेने 'तो' साप शेख यांच्या अंगावर फेकल्याची पोस्ट व्हॉटस अॅपवर व्हायरल झाली. यामुळे पोलिसांसमोरही यक्ष प्रश्न निर्माण झाला. या घटनेची महत्त्वपूर्ण साक्षिदार असलेल्या शेख हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने तसेच त्या जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने पोलिसांनी आपला मोर्चा सापला शोधण्याकडे वळवला. बुधवारी स्थानिक सर्पमित्रांच्या आधारे शेख यांच्या घरात सापाची शोध मोहीम पार पडली. मात्र, साप सापडलाच नाही. यानंतर, गुरूवारी निफाड तालुक्यातील उगाव येथील सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. त्याने शोध मोहीम सुरू करीत काही वेळातच शोकेसमध्ये ठाण मांडून बसलेल्या विषारी सापाला पकडले. पोलिसांनी सापाला तात्काळ वनविभागाच्या स्वाधीन केले. जबाब देण्याइतपत शेख यांना बरे वाटत नाही, तोपर्यंत सर्वच अंगाने घटनेचा तपास केला जाईल, असे मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांनी सांगितले.

शेख यांचा जबाब घेण्यात आलेला नाही. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या जबाबानंतरच सत्य परिस्थिती समोर येईल. सर्पमित्रांच्या मदतीने शेख यांच्या घरातील साप पकडून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

- आनंद वाघ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘म्हाडा’ला ‘घरघर’; २०० कोटी ठप्प!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबईसह मोठ्या शहरांत 'म्हाडा'च्या घरांना प्रचंड मागणी असताना नाशिकमध्ये मात्र 'म्हाडा'ने बांधलेल्या ९८३ घरांपैकी अवघे १२३ घरे विकली गेली आहेत. त्यामुळे 'म्हाडा'चे २०० कोटींहून अधिक रक्कम ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे १२३ घरांपैकी काहींनी केवळ बुकिंग रक्कम भरली आहे, तर काहींनी पूर्ण रक्कम दिली आहे. त्यात ज्यांनी पूर्ण रक्कम भरली आहे, त्यांनाही 'म्हाडा'ने हरित लवादामुळे घरांचा ताबा न दिल्यामुळे 'म्हाडा'ची डोकेदुखी वाढली आहे.

पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) बांधकामांना घातलेल्या बंदीचा फटका 'म्हाडा'लाही बसला आहे. घरांची बांधकामे पूर्ण झाली असली तरी एनजीटीच्या आदेशामुळे नगररचनाकडून या घरांना भोगवटा प्रमाणपत्र दिले जात नाही. अगोदरच 'म्हाडा'ने बांधलेल्या घरांच्या किमती खासगी बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेल्या घरांपेक्षा जास्त असल्याने ही घरे शिल्लक आहेत. त्यामुळे 'म्हाडा'ला ही दुहेरी डोकेदुखी झाली आहे.

दोन महिन्यांपूर्वीच 'म्हाडा'ने पाथर्डी येथील घरांच्या किमती कमी केल्या. त्यातील २०६ फ्लॅटपैकी मध्यम उत्पन्नगटातील बीएचकेच्या १७ फ्लॅटची बुकिंग झाली, तर मध्यम उत्पन्नगटातील टू बीएचकेच्या २०६ पैकी ५४ फ्लॅट बुक झाले. तरीसुद्धा १८८ फ्लॅट शिल्लक आहेत. ज्या ग्राहकांनी पूर्ण पैसे भरून फ्लॅट घेतले, त्यांना 'म्हाडा'ने हरित लवादामुळे ताबा न दिल्यामुळे या ग्राहकांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला बँकेचा हप्ता व अगोदर असलेल्या घराचे भाडे असा दुहेरी मार बसत असल्यामुळे त्यांच्या चकरा 'म्हाडा'च्या

कार्यालयात वाढल्या आहेत. इतर स्कीममध्ये घेण्यात आलेल्या फ्लॅटधारकाची हीच स्थिती आहे. 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर सगळ्यांना घरे मिळावीत, यासाठी 'म्हाडा'च्या नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने नाशिकमध्ये आडगाव, पंचक, मखमलाबाद, म्हसरूळ, पाथर्डी येथे नव्याने साइड डेव्हलप करून फ्लॅट बांधले; पण या स्कीममध्ये मोठ्या प्रमाणात घरे शिल्लक आहेत.

असे अडकले २०० कोटी

आडगाव येथे ३०९ प्लॅट आहेत; पण त्यातील १८ प्लॅटची बुकिंग झाली असून, ३८० फ्लॅट शिल्लक आहेत. त्यामुळे ६८ कोटी 'म्हाडा'चे पैसे ठप्प झाले आहेत. पंचक येथे १४० फ्लॅट असून, त्यातील एकही विकला गेला नाही. त्यामुळे येथे ३७ कोटींच्या आसपास रक्कम अडकली आहे. मखलमलाबाद येथे ११२ फ्लॅट असून, एकही विकला गेला नाही. त्यामुळे ३१ कोटी ३६ लाखांचा व्यवहार झाला नाही. म्हसरूळ येथे ५६ फ्लॅट असून, त्यातली ३४ बुक झाली असून, २२ शिल्लक आहेत. येथेही ६ कोटी अडकले आहेत. पाथर्डी येथे १८८ प्लॅट शिल्लक असून, येथे ५७ कोटी रुपये गुंतवणूक झाली आहे. विशेष म्हणजे या स्कीममध्ये १२३ फ्लॅट बुक झाले असले तरी सर्वांची रक्कम पूर्ण आलेली नाही. त्यामुळे हा आकडासुद्धा २० कोटींच्या आसपास आहे. त्याचबरोबर ही घरे वर्षे दोन वर्षांपासून बांधकाम होऊन पूर्ण झाल्यामुळे त्याच्या व्याजाची रक्कम काढल्यास तो मोठा तोटा 'म्हाडा'ला असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा पुन्हा रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नामपूर पाठोपाठ सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी गोलटी कांदा घेण्यास विरोध दर्शविल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलाव उधळून लावला. विक्रीसाठी आणलेला गोलटी कांदा सटाणा-मालेगाव राज्य महामार्गावर ओतून रास्तारोको आंदोलन छेडले. तणावपूर्ण स्थिती झाल्याने तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांनी कांदा उत्पादक व बाजार समितीचे मुख्य प्रशासक यांच्याशी चर्चा केल्याने आंदोलन मागे घेतले असले तरी या चर्चेत व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकून आपली भूमिका कायम ठेवल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शुक्रवारी कांदा लिलावास प्रारंभ झाला असता डोंगरेज येथील कांदा उत्पादक शेतकरी एकनाथ लक्ष्मण खैरनार यांचा गोलटी कांदा लिलावास व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवित नामपूर येथील घटनेचीच रि ओढल्याने कांदा उत्पादक बिथरले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सटाणा-मालेगाव रोडवरील बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर गोलटी कांदा ओतून आंदोलन केले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ताठर भूमिका घेतल्याने तहसीलदार सुनील सैंदाणे, पोलिस निरीक्षक बशीर शेख यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. शेतकरी ऐकण्याची मनस्थितीत नसल्याने तहसीलदार यांनी रमेश देवरे यांच्याशी चर्चा केली. आंदोलकांशी चर्चा करून सरसकट कांदा खरेदी करण्याचे सांगण्यात आले. आंदोलनात भाऊसाहेब जाधव, साहेबराव सोनवणे, आप्पा सोनवणे, एकनाथ बच्छाव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या दारी ‘ढोल बजाव’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

लासलगाव शहर व ग्रामीण भागात गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली असून, लासलगाव शहरात जवळपास ६५ हून अधिक मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. परंतु, महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विजेचा लपंडाव सुरू असल्याने गणेश भक्त वैतागले आहेत. तत्काळ सुरळीत वीजपुरवठा करावा या मागणीसाठी लासलगावला महावितरणच्या विरोधात सर्व गणेश मंडळांच्यावतीने ढोल ताशा वाजवून आंदोलन करण्यात आले. मोर्चाचे आयोजन पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आले.

लासलगाव शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. ऐन सणासुदीच्या काळात तरी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी गणेश भक्तांनी केली आहे. परंतु, यात महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे दिवसातून अनेकदा वीजपुरवठा खंड‌ित होत आहे. गणेशोत्सवात वारंवार वीजपुरवठा खंडित होऊ लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

विघ्नहर्त्याच्या उत्सवात येणारे महावितरणचे विघ्न दूर करावे, अशी मागणी गणेश भक्तामधून जोर धरत आहे. यावेळी लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि महावितरणचे सहायक अभियंता आर. एस. चव्हाण यांनी लवकरात लवकर या वर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. भैय्या भंडारी, सुरज नाईक, गणेश इंगळे, दत्ता पाटील, राजू कराड, अभिजित जाधव यांच्साह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोळगावला भरतेय व्हरांड्यातच शाळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शिक्षणासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र व्यवस्थेचा बळी ठरत आहेत. 'प्रशासन हातपाय पसरी विध्यार्थ्यांना मात्र ओसरी' असे चित्र निफाड तालुक्यातील कोळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पाहायला मिळत आहे.

कोळगाव येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थानी कुलुप लावल्याने विद्यार्थी ओसरीवर बसून शिक्षण घेत आहेत. शाळेत केवळ दोनच शिक्षक असून, विद्यार्थी संख्या १०६ आहे. गेल्या काही महिन्यांपासून या शाळेला शिक्षक नाही. दोन शिक्षक १०६ विद्यार्थ्यांना शिकवतात. मागणी करूनही शिक्षक न मिळाल्याने अखेर ग्रामस्थानी चार दिवसांपूर्वी शाळेला कुलूप ठोकले. याआधी ग्रामस्थांनी निफाड शिक्षण अधिकारी यांच्याकडे विद्यार्थ्यांसह उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. मात्र, फक्त अस्वासन मिळत गेले. गटशिक्षण अधिकारी थोरात यांनी शाळेला भेट दिली व पंधरा दिवसासाठी एक शिक्षक देतो असे आश्वासन दिले. दर पंधरा दिवसांनी नवीन शिक्षक देतो असा नवा फतवा काढून ग्रामस्थाची एक प्रकारे चेष्टा करन्याचा प्रयत्न केला केला. त्यामुळे शाळेला शिक्षकासाठी किती वाट पहावी लागणार आहे, असा सवाल पालकांनी केला आहे. यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य विलास वाघ, बाबासाहेब घोटेकर, दशरथ घोटेकर, शरद वाघ, उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांस गुन्हे शाखा तीनच्या पथकाने इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चेतनानगर येथून रंगेहाथ अटक केली. या खंडणीखोरांकडून गुन्हे शाखा तीनच्या पथकाने खंडणी म्हणून स्वीकारलेली दोन लाख रुपयांची रक्कम, दोन गावठी पिस्तूल, ३० जिवंत काडतुसे, दोन मोबाइल व दोन दुचाकी असा चार लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही माहिती शुक्रवारी पोलिस उपायुक्त दत्ता कराळे यांनी नाशिकरोड येथे पत्रकार परिषदेत दिली.

पोलिस उपायुक्त दत्ता कराळे यांनी सांगितले, की रामचंद्र भागवत (रा. वृंदावन कॉलनी, कामत हॉटेल मागे) यांच्याकडे खंडणी मागितली गेली होती. या प्रकाराची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल

यांना मिळताच त्यांनी गुन्हे शाखा तीनच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा तीनचे पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी एक वाजता राणेनगर परिसरातील स्पंदन झेरॉक्स व सायबर कॅफे या दुकानाजवळ सापळा रचून गणेश वामन कंकाळ (वय ३८, रा. राधानिवास, राजवाडा, मधुकर नगर,पाथर्डीगाव) व प्रशांत मधुकर अलई (वय ३२, रा. स्वामी हाईटस, फ्लॅट नंबर ३, आरटीओ कार्यालयाजवळ, पेठरोड, पंचवटी) या दोघा खंडणीखोरांना मोठ्या शिताफिने रंगेहाथ अटक करण्यात यश मिळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

माहितीच्या अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून पेगलवाडी येथील फरशीवाले बाबा यांच्या कुटुंबाकडून खंडणी मागणाऱ्या नाशिकरोड येथील संजय सुकदेव शेजवळ याच्यासह इतर दोघांवर खंडणी उकळून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी नाशिकरोडच्या एका आयुर्वेद डॉक्टरने तक्रार दिली.

संजय सुकदेव शेजवळ याच्यासह अनिल मोहन बाविस्कर (रा.पळसे) व योगेश चिंतामण जगताप (रा. शिंदेगाव) या दोघांच्या विरोधात डॉ. मोहन देवपुरी पुरी यांनी नाशिकरोड पोलिसांत वरील आशयाची तक्रार दिली. तीन वर्षांपूर्वी अनिल बाविस्कर व योगेश जगताप हे दोघांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वर्गणी मागितल्याने डॉ. पुरी यांनी त्यांना पाच हजार रुपये वर्गणी दिली होती. त्यानंतर त्यांच्याकडे या दोघांनी दरवर्षी वर्गणी मागितली. पुरींनीही वर्गणी दिली. त्यानंतर योगेश जगताप याचे डॉ. पुरींकडे येणे-जाणे वाढले. तो बेरोजगार असल्याने त्यास त्यांनी कामही दिले. त्यानंतर त्याने डॉ. पुरी यांच्याकडे थेट ५१ हजार रुपये वर्गणी मागितली. परंतु, डॉ. पुरींनी त्यास नकार देताच योगेश जगताप याने त्यांच्याकडील कामही सोडले. त्यानंतर धुळे येथून 'अहिरे'नामक व्यक्तीने तुमच्या औषधात किडे निघाले असून, तुम्ही बोगस व्यवसाय करतात त्यामुळे मी तुमच्याविरुद्ध तक्रार का करू नये, अशी विचारणा फोनद्वारे केली. हे प्रकरण मिटवायचे असेल, तर पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यावर डॉ. पुरी यांच्याकडून द्वारका येथे ५० हजार रुपये घेताना भिमराव कोंडाजी अहिरे यास ३ मे २०१४ रोजी भद्रकाली पोलिसांनी अटक केली होती. हा प्रकार अनिल मोहन बाविस्कर व योगेश चिंतामण जगताप या दोघांच्या सांगण्यावरून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितल्याने पोलिसांनी या दोघांनाही अटक केली होती. यावेळी पँथर्स रिपब्लिकन पार्टीचा उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशी ओळख देत संजय सुकदेव शेजवळ यानेच या तिघांना जामीन मिळवून आणला होता.

संजय शेजवळ, अनिल बाविस्कर, योगेश जगताप व डॉ. बागडे या चौघांनी डॉ. पुरी यांना पुन्हा नाशिकरोडच्या उड्डाणपुलाखाली भेटून आपल्याविरुद्धची केस मागे न घेतल्यास व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देत बदनामी करून नाशिकरोड सोडून जाण्यास भाग पाडू, अशी धमकी दिली व पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. दि.२ सप्टेंबर २०१६ रोजी या चौकडीने पुन्हा नाशिकरोडच्या उड्डाणपुलाखालील भाजीबाजारात डॉ. पुरी यांना गाठत खंडणी मागितली. यावेळी डॉ. पुरी यांनी भीतीपोटी ४० हजार रुपये डॉ. बागडे याच्याकडे दिले. परंतु, संजय शेजवळ याच्याविरुद्ध पेगलवाडी प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याचे माध्यमांतून समजताच डॉ. पुरी यांनीही आपली वरील आशयाची तक्रार नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल केली.

अॅसिड हल्ल्याचीही दिली होती धमकी

डॉ. पुरी यांचे सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे सुरू असलेल्या आयुर्वेदीक हॉस्पिटल व कंपनीच्या बांधकामाच्या ठिकाणी जाऊन तेथील सुरक्षारक्षकाजवळ संजय शेजवळ याने डॉ. पुरी यांच्यावर अॅसिड हल्ला करण्याची धमकी दिली होती. यावेळीही त्याच्याविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात डॉ. पुरी यांनी तक्रार दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वसंरक्षणासाठी द्या, शस्त्र वापरण्याची मुभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कायदा आणि सुव्यवस्था राखणारे, तसेच नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी उचलणाऱ्या पोलिसांवर होत असलेल्या जीवघेण्या हल्ल्यांचा शुक्रवारी नाशिक शहरात निषेध नोंदविण्यात आला. निवृत्त पोलिस कल्याण प्रतिष्ठान आणि हेडक्वार्टर बॉईज फ्रेंडस सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या या मूकमोर्चाद्वारे समाजापर्यंत आणि सरकारपर्यंत भावना पोहोचविण्यात आल्या.

पोलिसांना स्वसंरक्षणार्थ शस्त्र वापरण्याचे स्पष्ट आदेश द्या, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. पोलिस मुख्यालयातून दुपारी मोर्चाला सुरुवात झाली. तत्पूर्वी तेथेच पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शरणपूर रोड, सीबीएस चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी प्रवेशद्वारावर पोहोचला. हल्लेखोर हिंसक मार्गाचा अवलंब करीत असताना निवृत्त पोलिस मात्र घोषणाबाजी न करता सत्याग्रहाचा अवलंब करीत मूकपणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आले. तेथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. हे हल्ले पोलिसांवर नव्हे, तर सरकारवरील हल्ले आहेत. प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर स्वसंरक्षणार्थ शस्त्र वापरण्याचे स्पष्ट आदेश द्या, वाहतूक पोलिसांनाही रिव्हॉलवर द्या, हल्लेखोरांवर कारवाई करताना राजकीय हस्तक्षेपाला थारा देऊ नका, पोलिसांवर दबाव आणू पाहणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

सरकारी कामात अडथळा हा गुन्हा अजामीनपात्र करावा, तसेच अशा गुन्ह्यातील आरोपीला किमान सात वर्षांची शिक्षा असावी, अशी मागणीही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. मोर्चामध्ये संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब पोटे, चंद्रकांत बनकर, शांताराम महाजन, श्रीकांत जावळे, रमेश पाटील, पोलिस बॉईज संघटनेचे मोबीन सय्यद, संदीप चव्हाण, युवराज पांडे, योगेश पवार, माधवी सारंगधर, इंदुमती गायकवाड आदी सहभागी झाले.

काँग्रेसतर्फेही निषेध

पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे त्यांचे मनोधैर्य खच्ची होत आहे. पोलिसांच्या अंगावर वाहन घालणे, पोलिसांशी हमरीतुमरी करणे अशा पध्दतीने पोलिसांना लक्ष्य करण्यात आले आहे. अशा समाजकंटकांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, शहरात लवकरात लवकर सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, शाहू खैरे, राहुल दिवे, आण्णा पाटील, लक्ष्मण मंडाले आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी काम अन् अडथळा आण!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिसांसह सरकारी कामात अडथळा आणण्याची एक फॅशनच रूढ होऊ पाहत आहे. अर्थात विरोध करणारे सर्व चुकीचेच असतात असेही नाही. मात्र, त्याचा थेट परिणाम विरोध करणाऱ्यांना भोगावाच लागतो. चालू वर्षात अशा प्रकारचे तब्बल ३० गुन्हे दाखल आहेत. यात, पोलिसांना विरोध करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

चालू वर्षात पोलिसांना विरोध होऊन त्यांना मारहाण करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास शहरातील पिंपळचौकात वाद मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस कर्मचारी विजय मोरे यांच्यावर अल्पवयीन तरुणांसह एकाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. त्यापूर्वी उपनगर पोलिसांच्या पथकावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न झाला. या घटनांनी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्याचमुळे सेवानिवृत्त पोलिस संघटनेसह कार्यरत पोलिसांच्या कुटुंबीयांनी याविरोधात मूकमोर्चा काढून निषेध व्यक्त केला. सरकारी कामात हस्तक्षेप करणे, अरेरावी, धक्काबुक्की, शिवीगाळ, मारहाण किंवा हल्ला करण्यासारखे प्रकार सातत्याने होत असून, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांना लागलीच जामीन मिळतो हे या कायद्याचे अपयश म्हणून पुढे येत आहे. पोलिसांमध्ये वाहतूक पोलिसांना हा विरोध जास्त प्रमाणात सहन करावा लागतो. यंदाच्या वर्षात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ३३ गुन्हे दाखल आहेत. यातील, १५ गुन्हे पोलिसांशी संबंधित आहेत. मागील वर्षी कलम १५३ नुसार ६० गुन्हे दाखल होते. त्यात, पोलिसांशी आरेरावी करणे, दमबाजी करणे, हल्ला करणे अशा स्वरूपाच्या २८ गुन्ह्यांचा समावेश होता.

सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करीत आहोत. याचा अनुभव काहींनी घेतला आहे. युवकांकडून हे प्रकार जास्त घडतात. पोलिस जनतेसाठी काम करतात, याची जाणीव ठेवावी.

- सचिन गोरे, सहायक पोलिस आयुक्त, क्राईम ब्रँच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नकोशी’ला सोडले वाऱ्यावर!

$
0
0

निर्दयी आई-बापाचा पोलिसांकडून शोध; चिमुकलीवर उपचार सुरू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गौरीच्या आगमनातून स्त्रीशक्तीचा सर्वत्र जागर सुरू असताना शुक्रवारी एका निर्दयी आईने अवघ्या १५ दिवसांच्या चिमुरडीला मरण्यासाठी फेकून दिल्याची घटना समोर आली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या त्या आई-वडिलांचा पोलिस शोध घेत असून 'त्या' कोवळ्या जीवावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी संशयितांना शोधून कडक शासन करण्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे.

शुक्रवारी सकाळी काही नागरिक व्दारका-मुंबई नाका या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. येथील वाणी हाऊसजवळ नागरिकांना मोकळ्या पटांगणातील झाडी झुडपात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. पहाटेच्या गारव्यात इतके लहान मुल इथे कसे, असा प्रश्न संबंधितांना पडला. त्यांनी झाडीत जाऊन पाहिले असता, शालित गुंडाळलेली अवघ्या १२ ते १५ दिवसांची मुलगी त्यांना आढळून आली.

सजग नागरिकांनी लागलीच मुंबई नाका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या मुलीला लागलीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याबाबत बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांनी सांगितले की, सदर मुलीला पहाटेदरम्यान सोडण्यात आले असावे. तिला गंभीर दुखापत नसली तरी डास व किटकांनी चावल्यामुळे हातापायावर इजा झाली आहे. नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुलीला आणखी दुखापत होण्यापूर्वीच ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचली. गणेशोत्सवाची धूम व गौरीचे आगमन झाल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना नकोशा मुलीला फेकल्याच्या घटनेने नागरिकांसह पोलिसही हळहळले असून, त्या दाम्पत्याचा तपास केला जात आहे.

भाभानगर ते भारतनगर झोपडपट्टीपर्यंतच माग

मुलीला मरण्यासाठी फेकून देणाऱ्या निर्दयी आई-बापाचा शोध घेण्यासाठी मुंबई नाका पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. घटनास्थळी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. डॉग स्कॉडने भाभानगर आणि तेथून पुढे भारतनगर झोपडपट्टी असा माग काढला. मात्र, भारतनगर येथे रिक्षा थांबतात तिथे श्वान घुटमळले. त्यामुळे यापुढचा प्रवास मुलगी फेकून देणाऱ्यांनी वाहनाने केल्याचे प्रथमदर्शनी दिसते.

माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार नि​श्चितच शोधून काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमचा तपास सुरू झाला असून, सदर मुलीला उपचारानंतर 'वात्सल्य'कडे सोपविण्यात येईल. अनैतिक संबंधामुळे असे प्रकार वारंवार घडतात.

- आनंद वाघ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेलाच मिळाला चेन स्नॅचिंगमधून धडा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुलाबरोबर भांडण करणाऱ्या युवकाला धडा शिकवण्यासाठी एका महिलेने चक्क चेन स्नॅचिंग झाल्याचा बनाव केला. मात्र, मुंबई नाका पोलिसांनी अवघ्या एका तासात हा प्रकार उघडकीस आणला. खोटी तक्रार करणाऱ्या महिलेला कोर्टाने सक्त ताकीद देत एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.

मुंबई नाका पोलिस स्टेशनचे कर्मचारी गुरुवारी दुपारी गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताची तयारी करीत होते. याच वेळी एक महिला धावत आली. आपण द्वारका परिसरातील कराड चिवडा येथून पायी जात असताना २५ वर्षे वयाचा, पांढरी पँट, चेक्सचा पांढरा शर्ट घातलेल्या तरुणाने माझ्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची पोत खेचून पोबारा केल्याचे सांगितले. त्यामुळे लागलीच सर्व यंत्रणा कामाला लागली. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशन गाठले. दुसरीकडे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांच्या आदेशाने शहरात नाकाबंदी लावण्यात आली. मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने त्या महिलेला द्वारका परिसरात नेले. एवढ्या गजबजलेल्या परिसरात चेन स्नॅचिंग झाली, यावर पोलिसांचाही विश्वास नव्हता. त्यात, तिने एवढे स्पष्टपणे आरोपीला पाहिले मग आराडाओरड होऊन आरोपीला नागरिकांनी अटकाव कसा केला नाही, असा प्रश्नही पोलिसांसमोर होता. तरीही पोलिसांनी आजूबाजूच्या दुकानदारांकडे चौकशी केली. या चौकशीत महिलेने कथन केलेल्या घटनेला एकही साक्षीदार मिळाला नाही. त्यामुळे सदर महिलेला पुन्हा पोलिस स्टेशनला आणून पोलिसांनी तिचीच चौकशी केली. पोलिसी खाक्यानंतर तिने तोंड उघडले. ही महिला पूर्वी ज्या भागात राहत होती, तिथे तिच्या मुलाचे अन्य एकाशी भांडण झाले होते. गुरुवारी हे दोन मुले पुन्हा आमनेसामने आले. त्यामुळे त्याला खोट्या केसमध्ये अडकावयचे म्हणून संशयित महिलेने सर्व बनाव रचला. मात्र, पोलिसांनी या खेळावर अवघ्या एका तासात पडदा पाडला. पोलिसांनी दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत संशयित आरोपी महिलेला कोर्टात हजर केले. कोर्टानेही संशयित महिलेची कान उघडणी करीत एक हजार रुपयांचा दंड ठोठवला.

अतिशय क्लेशदायक स्वरूपाची ही घटना आहे. वैयक्तिक भांडणाचा हेतू सफल करण्यासाठी महिलेने पूर्ण यंत्रणेचा वापर केला. तिचा बनाव उघड झाल्यानंतर तिला शिक्षाही मिळाली. पोलिस जनतेचे काम करतात, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

- आनंद वाघ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक रुपयात सॅनिटरी नॅपकिन!

$
0
0

महापालिका शाळांमध्ये वेंडिंग मशिन्स; आरोग्याच्या दृष्टीने उचलणार पाऊल

ashwini.kawale@timesgroup.com

Tweet : @ashwinikawaleMT

नाशिक : वयात येणाऱ्या मुलींना योग्य शारीरिक माहिती न मिळाल्याने पुढे वेगवेगळ्या शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. यातील गांभीर्य लक्षात घेत महापालिका शिक्षण समितीने पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या १३ माध्यमिक शाळांमध्ये मुलींची गरज ओळखत सॅनिटरी वेंडिंग मशिन्स लावण्यात येणार आहे. केवळ एक रुपयाचा कॉइन टाकून विद्यार्थिनींना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ग्रामीण भागातील व गरीब, गरजू विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. शाळेत आपल्या वैयक्तिक बाबी बोलतानाही त्यांच्यात अनेकदा अस्वस्थता दिसून येते. अशा परिस्थितीत मासिक पाळीदरम्यान या शाळांमधील विद्यार्थिनींची मोठी मानसिक घालमेल होत असते. हे लक्षात घेत महापालिका शिक्षण समितीने हे पाऊल उचलले आहे. तेरा माध्यमिक शाळांमध्ये आठ ते दहा सॅनिटरी वेंडिंग मशिन्स लावून विद्यार्थिनींचा हा काळ सुकर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. विविध कंपन्यांच्या सीएसआर उपक्रमातून यासाठी निधी मिळविला जाणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या २०१४ च्या शिफारशींनुसार महिलांच्या कामाच्या ठिकाणी तसेच शाळा, कॉलेजमध्ये अशी मशिन्स बसविण्यात यावी, असे म्हटले आहे. त्याची अंमलबजावणही या माध्यमातून होणार आहे.

स्त्रीरोगतज्ज्ञांकडून मार्गदर्शन

वयात येणाऱ्या मुलींना त्यांच्यात होणाऱ्या शारीरिक बदलांची माहिती मिळणे गरजेचे असते. ही माहिती नसेल तर त्यांच्या शारीरिक समस्यांकडे बळावण्याचा धोका अधिक असतो. ही परिस्थिती उद्भवू नये, यासाठी या शाळांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ विशेष मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी शिबिर घेण्याचे नियोजन केले जात आहे.

माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी योग्य माहिती असावी, तसेच शाळेत येण्यास त्यांना अडथळे येऊ नये, यादृष्टीने सॅनिटरी वेंडिग मशिन्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएसआरमधून सहकार्य मिळाले नाही तर आम्ही स्वतः हे मशिन्स उपलब्ध करून देऊ.

- नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, शिक्षणसमिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रमाणापेक्षा उंच झाडांच्या फांद्यांची छाटणी करा

$
0
0

तारवाला नगरातील रहिवाशांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, अमृतधाम

पंचवटीमधील मेरी-दिंडोरी रोडवरील तारवाला नगरात सर्वच भागात अनेक उंच झाडी झाली आहेत. त्यांच्यापासून तारवाला नगरातील नागरिकांना वाहतुकीस त्रास होत आहे. त्यांच्या फांद्यादेखील रस्त्यावर लांबपर्यंत पसरल्या असल्याने त्यांची छाटणी करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

तारवाला नगरात चहूबाजूंनी वृक्षारोपण केले आहे. सर्वत्र उंच झाडी वाढल्या असून त्यांच्या फांद्यादेखील वाढल्या आहे. या फांद्या एका बाजूने झुकल्याने रस्त्यावर काही ठिकाणी त्यांच्या कमानी तयार झाल्या आहेत. यांचा नागरिकांना त्रास होत असून यांची छाटणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. यामध्ये काही झाडांच्या फांद्या खूपच ठिसूळ आहेत. त्यामुळे या फांद्या जोराची हवा आल्यास तुटून पडण्याची अधिक भीती आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, बालगोपाळ आणि सर्वांना खूपच धाक व भीती वाटते. या फांद्या मनपाच्या उद्यान विभागाने वेळीच काढाव्यात.


झाडांच्या वाळलेल्या फांद्या, पालापाचोळा यांची परिसरात खूप घाण होत असते. फांद्या कापल्याने परिसरात दिवसा असणारा अंधार कमी होईल आणि सर्वत्र मोकळी हवा खेळती राहील. घरासमोर लहान मुले खेळतात तीही मनमोकळे पणाने खेळू शकतील. याची साफसफाई होणे गरजेचे आहे.

- पद्माकर महाजन, स्थानिक रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादात रखडले रस्ता रुंदीकरण

$
0
0

महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग कारणीभूत; आडगावमध्ये वाहतूक कोंडी

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आडगाव गावातील जुना महामार्ग हा अद्यापही महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वादामुळे रखडला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण महापालिकेच्या अखत्यारित येत नसल्याने त्याकडून हे काम होत नाही. तरी या मार्गावरील रुंदीकरण लवकर करावे अशी मागणी ‌स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

हा रस्ता अरुंद असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. शिवाय यारस्त्यावर यामुळे छोटे मोठे अपघातही होत असतात. या समस्येबाबत स्थानिक नगरसेवक, महापालिका प्रशासन यांचेही दुर्लक्ष होत असल्याने हे रखडले आहे. त्यांच्याकडूनही याबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाही, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. आडगावात लोकसंख्या वाढत चालली आहे. तसेच नागरिकीकरण होत असल्याने याठिकाणी मुलभूत सुविधा देणे आवश्यक झाले आहे. मात्र प्रशासन याबाबत उदासीन दिसून येत आहे.

प्रशासन उदासीन

जुना महामार्ग असलेला गावचा मुख्य रस्ता महापालिकेकडे वर्ग नसल्याचे कारण देत प्रशासनाने हा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. त्यामुळेच या रस्त्याचे रुंदीकरण होऊ शकलेले नाही. ३० वर्ष उलटूनही हा अरुंद रस्ता महापालिका प्रशासनाने, झालेल्या नगरसेवकांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसते. आडगावमध्ये तलाठी कार्यालय, बँका, कॉलेजेसमुळे आजूबाजूच्या परिसराशी संपर्क येत असतो. त्यामुळे सिटीबस वाहतूक, मालवाहतूक, एच.ए.एल बसेसचा कायम राबता असतो. तसेच सय्यदपिंपरी, माडसांगवी, चांदोरी, खेरवाडी, विंचूर गावळी या परिसरातील शेतकरी व नागरिक या रस्त्याने ये-जा करत असतात. म्हणूनच या रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. बस स्थानकदेखील याच रस्त्यावर असल्याने सकाळी व संध्याकाळी कायम वाहतूक कोंडी होते.


हा रस्ता अरुंद असल्याने व वाढत्या अतिक्रमणामुळे पार्किंगमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. शिवाय याठिकाणी यामुळे छोटे मोठे अपघातही होत असतात.
तरी प्रशासनाने याबाबत त्वरित नियोजन करणे गरजेचे आहे.

विलास माळोदे, स्थानिक रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉवरग्रीडचा टॉवर कोसळला

$
0
0

अवनखेड शिवारातील घटना; तीन कामगार जखमी

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

तालुक्यातील अवनखेड शिवारात उभारण्यात येत असलेला पॉवरग्रीडचा ५०० फुटाचा मनोरा शनिवारी अचानक कोसळला. तीन परप्रांतीय कामगार यात जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शेतीचेही नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली.

निफाड दिंडोरी तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित पॉवरग्रीड टॉवर लाइनला शेतीचे नुकसान व सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करूनही प्रशासनाने टॉवर उभारणी सुरू ठेवली. दिंडोरी-निफाड तालुक्यातून ज्या भागातून ही विद्युत वहिनी प्रस्तावित आहे तेथे सध्या द्राक्ष बागा उभ्या आहेत. तसेच या परिसरात शेतकरीही वस्तीवर राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र प्रशासनाने शेतकऱ्यांचे विरोधाला न जुमानता टॉवरचे काम सुरू केले. गेल्या आठवड्यात शिरवाडे वणी शिवारात शेतकऱ्यांनी सरण रचत आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाने मध्यस्थी करत फेर सर्वेक्षणाचे आश्वासन दिले होते. त्यानंतर कंपनीने अवनखेड शिवारात गोटीराम मोरे यांच्या उभ्या पिकात टॉवर उभारणी सुरू केले होते. टॉवर उभारणी होऊन किरकोळ काम बाकी असतानाच सदर टॉवर कोसळला. यावेळी तीन परप्रांतीय कामगार टॉवरवरून खाली पडले. त्यातील एक कारागीर टॉवरखाली दाबला गेला. तर दोघांना अँगलचा मार लागला. टॉवर कोसळताना मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर टॉवरलाइन बागायती क्षेत्र व नागरी वसाहती ऐवजी अन्य भागातून नेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, घटनास्थळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोल‌िस निरीक्षक मधुकर गावित यांनी भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांनी सदर टॉवर कामास तीव्र विरोध करत टॉवरमुळे होणाऱ्या शेतीचे नुकसान दाखवत सदर प्रश्नी न्याय देण्याची मागणी केली. यावेळी अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, वलखेडचे रघुनाथ पाटील, ज्ञानेश्वर शिंदे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. मंडळ अधिकारी बोराडे यांनी पंचनामा केला तर दिंडोरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली.

पॉवरग्रीड कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. टॉवर उभारणीत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात आले आहे. तसेच अकुशल कामगारांकडून टॉवरची उभारणी केली जात असल्याचे दिसत आहे.

- हरिश्चंद्र चव्हाण, खासदार

शेतकरी तीन वर्षापासून संघर्ष करीत आहेत. या लाईनचा मार्ग बदलणे हाच सोयीस्कर मार्ग आहे.

- नरहरी झिरवाळ, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबारमध्ये ‘डीजे’मुक्त गणेशोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार शहर पोलिस ठाण्याने 'डीजे'मुक्त गणेशोत्सव उपक्रम राबविला असून, त्याला गणेश मंडळे व डीजे मालकांनी प्रतिसाद दिला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल कटके, उपनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणदिवे यांनी सर्व गणेश मंडळांना आवाहन केले होते. त्यास गणेश मंडळे व डीजे मालकांकडून प्रतिसाद मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकातून तब्बल ४१ कैद्यांना पॅरोल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत असलेल्या तब्बल ४१ कैद्यांना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाने गेल्या तीन वर्षांत पॅरोल मंजूर केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील युवा वकील पल्लवी पूरकायस्थ हिच्या खून प्रकरणी साजिद मोगल याला शिक्षा झाली होती. नाशिकरोड कारागृहात रवानगी झाल्यानंतर तो काही दिवसांनी पॅरोलवर (संचित रजा) काश्मीरला आपल्या मूळ गावी गेला. मात्र, परत न आल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. साजिदला पॅरोल मंजूर केल्याबद्दल तत्कालीन कारागृह अधीक्षकांना निलंबित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बलात्कार व खून प्रकरणातील गुन्ह्यातील कैद्यांना पॅरोल न देण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच जाहीर केला आहे.

भ्रष्टाचाराला आळा

नाशिकच्या कारागृहात सर्वांत जास्त कैदी आहेत. तसेच, पॅरोलवर जाणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. गृह मंत्रालायच्या आकडेवारीनुसार नाशिकच्या कारागृहातून ७७१ कैद्यांना गेल्या तीन वर्षांत पॅरोल मंजूर झाला होता. त्यापैकी ४१ जण रजा संपल्यानंतर परतलेच नाहीत. नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्यूरोच्या अहवालानुसार राज्यातील विविध कारागृहांमधून २००९ ते २०१४ यादरम्यान १० हजार १४४ गुन्हेगारांना पॅरोल मंजूर झाला आहे. त्यापैकी १ हजार ५९६ परतलेच नाहीत. याची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्र प्रिझनर्स (मुंबई फर्लो अॅण्ड पॅरोल) कायद्यात गेल्या ऑगस्टमध्ये दुरुस्ती केली. नवीन निकषानुसार बलात्कार, खून, खंडणीसाठी अपहरण, दहशतवादी कृत्य यातील गुन्हेगारांना पॅरोल दिला जाणार नाही. फक्त अतिमहत्त्वाच्या कारणासाठीच त्यांना पॅरोल दिला जाईल. ही रजा वाढवली जाणार नाही. पॅरोलचा कालावधी सर्व प्रकारच्या कैद्यांसाठी ९० वरून ४५ दिवसांचा करण्यात आला आहे. अपवादात्मक परिस्थितीत तो तीन वर्षांत फक्त ६० दिवसांपर्यंतच वाढवता येईल. कारागृह प्रशासन पातळीवरील भ्रष्टाचाराला आळा बसावा, या उद्देशाने हे नवीन बदल करण्यात आले आहेत.

कैद्यांकडून निषेध

राज्यातील कारागृहांमध्ये ३० हजार कैदी आहेत. त्यापैकी ७० टक्के कैदी हे कच्चे आहेत. त्यांच्यावर खटले सुरू आहेत. तीस टक्के कैदी शिक्षा झालेले म्हणजे पक्के कैदी आहेत. त्यापैकी दोन टक्के गंभीर गुन्ह्यातील दोषी आहेत. त्यामुळे पॅरोलच्या नियमाबाबत कैद्यांमध्ये असंतोष आहे. पुण्याच्या येरवडा जेलमधील कैद्यांनी पॅरोल हक्कावर गदा आल्याचा निषेध केला आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक कारागृहातील कैद्यांनीही पॅरोल मिळत नसल्याची व त्याची रक्कम जास्त असल्याची तक्रार करत आंदोलन केले होते. याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, ती पॅरोलच्या नियमांबाबत चर्चा करणार आहे. मात्र, धोरणात बदल केला जाणार नाही, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images