Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कांद्याचे भाव स्थिर

$
0
0
आवक घटल्याने उन्हाळी कांद्याची तेजीकडे वाटचाल सुरू असतानाच मंगळवारी मात्र सटाणा मार्केट कमिटी आणि नामपूर सब मार्केटमध्ये अचानक सातशे ते आठशे क्विंटल आवक वाढल्याने कांद्याचे भाव ४६०० रुपयांपर्यत स्थिर होते.

महावितरणकडून गा-हाण्यांची दखल

$
0
0
ग्राहक पंचायतीच्या तक्रारी रास्त असून, त्यानुसार महावितरणच्या कार्यप्रणालीत सुधार करण्यासाठी या तक्रारींची त्वरित दखल घेतली जाईल आणि कारवाई करण्यात येईल असे आश्वासन नाशिक परिमंडळाचे चीफ इंजिनिअर के.व्ही.अजनाळकर यांनी दिले.

नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन तोकडे

$
0
0
वीज कोसळणे, झाड पडणे, घराची भिंत पडणे, पुरात वाहून जाणे, यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात वर्षाला किमान १५ जण जिल्ह्यात मृत्युमुखी पडत असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय वाइनला थायलंडचे आवतण

$
0
0
भारतीय वाइन उद्योगाला आता थायलंडच्या बाजारपेठेने वेलकम केले असून, लवकरच थाई जेवणाच्या टेबलावर वाइन दिसू शकणार आहे.

निवड श्रेणीवरून सेवानिवृत्त शिक्षकांत नाराजी

$
0
0
नाशिक जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणी लागू करण्याच्या कामी अन्याय्य धोरण अवलंबिले जात असल्याची खंत सेवानिवृत्त शिक्षकांकडून व्यक्त केली जात असून, विशिष्ट वर्षापूर्वीच्या शिक्षकांना या श्रेणीपासून वंचित ठेवले जाऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे.

ओतूर लघुपाटबंधारेची गळती अखेर थांब‌णार

$
0
0
तालुक्यातील ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाची गळती थांबविण्याच्या कामास तब्बल ३५ वर्षांनंतर मुहूर्त सापडला आहे. या प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी शासनाने सुमारे दोन वर्षांपूर्वी ७ कोटी १२ लाखांच्या खर्चास प्रशासकीय मान्यताल दिली होती.

ऐन गणेशोत्सवात लोडशेडिंगमुळे संताप

$
0
0
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये लोडशेडिंग केले जाणार नसल्याची ग्वाही देऊनही मंगळवारी सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत लोडशेडिंग करण्यात आल्याने सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये तीव्र असंतोष पसरला.

युवक काँग्रेसचा माजी तालुकाध्यक्ष अटकेत

$
0
0
जन्मदात्या पित्याने आपल्या आठ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी रात्री बागलाण तालुक्यातील नामपूर येथे उघडकीस आला.

चंदनाच्या झाडाची चोरी

$
0
0
बागलाण तालुक्यात चंदनचोरांनी पुन्हा डोके वर काढले आहे. विरगांव शिवारातील अमर पाटील यांच्या शेतातून मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चंदनाचे एक मोठे झाड चोरून नेले.

सभापतीसाठी मनसेची मोर्चेबांधणी

$
0
0
मनपाच्या महिला व बालकल्याण समिती सभापतिदासाठी येत्या १३ तारखेला निवडणूक होणार आहे.

विर्सजनासाठी २९ कृत्रिम तलाव

$
0
0
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने कृत्रिम तलावांची परिणामकारकता लक्षात घेऊन महापालिकेकडून गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जनासाठी असे तलाव उभारण्याची योजना आखली असून त्याअंतर्गत शहर परिसरात २९ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत.

...तिथे प्रोजेक्टर कसे बसणार ?

$
0
0
तब्बल साडेपाच कोटी रुपये खर्च करून महापालिका प्रशासनाने मनापच्या काही शाळांमध्ये प्रोजेक्टर बसवले आहेत. प्रोजेक्टरच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे.

‘नाशिकचा महाराजा’ची पेटंटवारी

$
0
0
एखादी वस्तू अथवा संशोधनाचे पेटंट मिळाल्याचे आपण ऐकून असलो, तरी आता थेट गणेशमूर्तीचेही पेटंट घेतले जात आहे. मुंबई-पुण्यातील हा ट्रेण्ड नाशिकमध्येही येऊ पहात असून कॉलेजरोडवरील राजमुद्रा मित्र मंडळांने स्थापन केलेल्या ‘नाशिकचा महाराजा’ची यंदाची मूर्ती पेंटटसाठी नोंदविली आहे.

सरकारने घ्यावी पीडित मुलींची जबाबदारी

$
0
0
महिलांवर अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन गुन्हेगारांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यासह नराधमांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या अल्पवयीन मुलींची जबाबदारी राज्य सरकारने उचलावी अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी बसून राहतात’

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयातील वन हक्क कक्षातील १५ कर्मचारी कामाशिवाय बसून राहत असल्याची तक्रार आदिवासी विकास आयुक्त संभाजीराव सरकुंडे यांनी केली आहे.

रडतखडत ५४ लाखांचा करमणूक कर जमा

$
0
0
डिजिटायझेशननंतर करमणूक कराचा निर्माण झालेला तिढा सुटता सुटत नसून, बुधवार अखेर जिल्हा प्रशासनाकडे २९ लाख रुपयांचा करमणूक कर जमा झाला आहे.

...तर प्रांताधिकारी नकाराधिकार वापरणार

$
0
0
जिल्ह्यातील ६५ ग्रामपंचायतींनी वाळू उपशाच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांना विश्वासात घेण्याचे काम प्रांताधिकाऱ्यांनी सुरू केले आहे.

छेडछाड रोखण्यासाठी १० पथके तैनात

$
0
0
गणेशोत्सवादरम्यान होणा-या गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांची छेडछाड करून हुल्लडबाजी करणा-या रोडरोमियोंना रोखण्यासाठी शहर पोलिसांनी १० पथके तैनात केली आहे.

जिल्हाधिका-यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न

$
0
0
वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा मागे पडल्याने आदिवासी विकास आयुक्त संभाजीराव सरकुंडे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

चार दिवस ढिंच्याक ढिच्याक!

$
0
0
गणेशोत्सवाचा उत्साह लक्षात घेत गणेशभक्तांना दिलासा देणारा निर्णय बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत गणेश मंडळांना मनोरंजनपर कार्यक्रम, आरास खुले ठेवणे आणि वाद्य वाजविण्यास ‌परवानगी देण्यात आली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images