Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

...अन् सेल‌ेब्र‌िटींसोबत झाली बाप्पाची आरती

$
0
0
लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी काय करू अन् काय नको या भावनेतून जाणाऱ्या गणेश भक्तांना ‘मटा’ने बुधवारी सुखद धक्का दिला. गणरायाच्या आगमनाने भाव‌िकांचा उत्साह दुणावला असताना ‘मटा’तर्फे एसएमएस कॉन्टेस्ट आयोज‌ित करण्यात आली होती.

‘मेळा’तून लवकरच सिटीबसची सेवा

$
0
0
जुने सीबीएस परिसरातील वाहतुकीची कोंडी, प्रवाशांची गैरसोय आणि आर्थिक लूट या सर्व बाबी लक्षात घेता मेळा बसस्टॅण्डमधून शहराच्या सर्व भागात जाणाऱ्या सीटीबसची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

ग्रीन आर्किटेक्चर ठरेल नाशिकची ओळख

$
0
0
मुंबई व पुण्यापाठोपाठ नाशिकचा विकास होत असल्याने सध्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या इमारती तयार होत आहेत. या इमारतीच नाशिकचे वेगळेपण ठरु शकतात असा विश्वास आयडिया आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला असून यासाठी त्यांनी ग्रीन आर्किटेक्चरची संकल्पना मांडली आहे.

शंकेची पाल चुकचुकली अन्

$
0
0
आपल्या अवतीभोवती इतक्या घटना घडतात पण आपण त्या कधी, का, आणि कशामुळे घडल्या याबाबात चिंतन क्वचितच करतो. मात्र काही घटना ‌किंवा प्रसंग आपल्या समोर घडतात आणि त्याबाबात आपण खूप विचार करतो.

मेडिकलसमोरील डोकेदुखी

$
0
0
अवघ्या एक किंवा दोन मार्क्स अभावी राहणारे बॅकलॉक्स कमी करण्यासाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी स्प्लीट मार्क्ससाठी लढत द्यायला सुरूवात केली आहे. एका विषयात मिळणारे ग्रेस मार्क्स हे दोन किंवा त्यापेक्षा जास्त विषयात विभागून मिळावे यासाठी राज्यभरातील सुमारे १५ मेड‌िकल कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांकडून नाश‌िकच्या आरोग्य विद्यापीठाकडे रेटा सुरू आहे.

डॉक्टरने जिंकला स्टोक कांगरी

महापालिकेचा पैसा खासगी बँकेत

$
0
0
राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाप्रमाणे महापालिकेने आपल्या ठेवी खासगी बँकेत ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकी दरम्यान तसा प्रस्ताव सदस्यांसमोर ठेवण्यात आला होता.

भक्तांसाठी गणेश मंडळे सज्ज

$
0
0
दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने गणेश मंडळांना देखाव्याच्या कामात व्यत्यय आला होता. त्यामुळे अनेक मंडळांची सजावटीची कामे अपूर्णच होती. परंतु बुधवारी पावसांने उघडीप घेतल्याने सार्वजनिक मंडळांच्या तयारीला वेग आला असून गणेश भक्तांच्या स्वागतासाठी मंडळे सज्ज झाली आहेत.

लोडशेडिंगविरोधी आंदोलकांवर गुन्हा

$
0
0
वीज वितरण कंपनीतर्फे मंगळवारी अचानक लोडशेडिंग करण्यात आल्याने संतप्त नागरिक व गणेशभक्तांनी केलेल्या आंदोलनाच्या विरोधात वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.

शिवकालीन नाल्याचे पुनरुज्जीवन

$
0
0
बागलाण तालुक्यातील नामपूर येथील युवकांनी शिरपूर पॅटर्नचा आदर्श घेत शिवकालीन लोंढा नाल्याचे पुनरुज्जीवन घडवून आणले आहे.

तिजोरी फोडून ९ लाखांची रोकड चोरी

$
0
0
रविवार कारंजा येथील सिटी सेंटर कॉम्प्लेक्समधील एका फायनान्स कंपनीचे ऑफिस फोडून चोरट्यांनी ९ लाख रूपयांची रोकड लंपास केली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली.

‘सीएट’मध्ये कंत्राटी कामगारांचे आंदोलन

$
0
0
सातपूर एमआयडीसीतील सीएट कंपनीत कंत्राटी कामगारांनी गुरुवारी सकाळी काम बंद आंदोलन केले. मात्र, कामगारांच्या मागण्यांवर तोडगा निघाल्याने दुपारपासून कामगारांनी काम सुरू केले.

जुगा-यांविरोधात धडक मोहीम

$
0
0
रेल्वे सुरक्षा बलाच्या तेजस्विनी या विशेष पथकासोबत रेल्वे पोलिसांनी गाड्यांमध्ये खेळल्या जाणा-या जुगाराविरोधात मोहीम तीव्र केली आहे.

दारुबंदीचा ‘देखावा’

$
0
0
काल सुरु असलेल्या मुसळधार पावसात तिघे मित्र गणपती पहायला निघाले. काल‌िदास मंदिरासमोरचे गणपती पाहून त‌िघांनी गंजमाळकडे प्रस्थान केले. तिघेही ‘देशप्रेमी’ असल्याने आलोच आहोत तर ‘गमभुलाव’मध्ये जाऊन येऊ असा एकाने प्रस्ताव मांडला.

शैक्षणिक संस्थांमध्येही हवा सीसीटीव्ही वॉच

$
0
0
शाळा, कॉलेज व शैक्षणिक संस्थांच्या आवारात होणारे गैरप्रकार व रोडरोमियोंच्या उच्छादास आळा बसावा म्हणून प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी होताना दिसते मात्र याकडे निधीचा अभावाचे कारण पुढे करीत संस्था सीसीटीव्हीबाबत ठोस निर्णय घेताना दिसत नाहीत.

सिग्नल्सला सौर ऊर्जेचा सहारा

$
0
0
शहरातील कार्यन्वित असलेल्या २३ सिग्नल्सपैकी २० सिग्नल्ससाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. ३ सिग्नल्सवर यापूर्वीच सौर यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. सौर ऊर्जेच्या वापराबरोबर सर्व सिग्नल्सवर टायमर बसवण्यात येणार असून यासाठी महापालिका १९ लाख रूपयांचा खर्च करणार आहे.

अनंत रूपांच्या स्वामीचे अनोखे दर्शन

$
0
0
गणेशाच्या विविध रूपांचे दर्शन घेताना अष्टविनायक फिरावे लागते; गणेशाची विविध भावमुद्रांमधील अनोखी रूपे एकाच ठिकाणी पहायला मिळाली तर...याच संकल्पनेतून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साधना कलादालन येथे गणेश शिल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

वादग्रस्त डीपीवर सोमवारी महासभा

$
0
0
शहर विकास आराखडासंबंधी (डीपी प्लॅन) चर्चा करण्यासाठी २९ ऑगस्टला आयोजीत केलेली महासभा अवघ्या दोन मिनीटांत तहकुब करण्यात आली होती.

लोका सांगे ब्रह्मज्ञान...

$
0
0
‘सावधान ! तुम्ही सीसीटीव्हीच्या नजरेत आहात’ असे फलक शहरातील प्रत्येक सोसायट्यांमध्ये दिसू लागले आहेत. तंत्रज्ञानाचा स्वीकार करून विकास साधा असे ब्रह्मज्ञान देणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात अशी कोणतीही सूचना आपल्याला दिसणार नाही.

बतावणी करणारा भामटा जेरबंद

$
0
0
बिझनेस बँक येथे थांबलेल्या वाहनचालकाला पैसे खाली पडल्याची बतावणी करून २० हजार रूपयांची चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भामट्याला नागरिकांनी पकडून उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images