Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वर्धापनदिनानिमित्त ‘मटा’ आजपासून आपल्या भेटीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्पावधीतच नाशिककरांच्या मनात आपले स्थान बळकट करणाऱ्या 'महाराष्ट्र टाइम्स'चा बुधवारी, ८ जून रोजी वर्धापनदिन होणार आहे. यानिमित्त सोमवार, सहा जूनपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह 'मटा' आपल्या भेटीला येत आहे. त्याचबरोबर बुधवारी वेगवेगळ्या क्षेत्रांतील सहा दिग्गजांशी संवादाचा अनोखा कार्यक्रम नाशिककरांच्या भेटीसाठी आणला आहे. मूळचे नाशिककर नसलेल्या, परंतु तरीही नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या कला, संगीत, क्रीडा, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा खडतर प्रवास श्रवण करण्याची संधी 'मटा'ने उपलब्ध करून दिली आहे. बुधवारी गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुलात सायंकाळी पाचला हा 'मटा संवाद' रंगणार आहे.

निष्पक्ष आणि निर्भीड वृत्तपत्र अशी वाचकांच्या पसंतीची पावती मिळविणारा 'मटा' नाशिकमध्ये आठ जून रोजी सहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. अल्पावधीतच 'मटा'ने नाशिककरांचा विश्वास संपादन करीत त्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा जोपासणाऱ्या अन् विकासाकडे झेपावणाऱ्या नाशिकनगरीची स्पंदने अलवार टिपली. आक्रमकपणा तसूभरही कमी होऊ न देता गैरप्रकारांवर कोरडे ओढले. चांगल्याचे कौतुक केले अन् यशाला गवसणी घालणाऱ्यांच्या पाठीवर अभिमानाने कौतुकाची थापही दिली. वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांची आणि कार्यक्रमांची मेजवानी नाशिककरांना मिळणार आहे. मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा प्रवास करणाऱ्या अन् सांस्कृतिक ठेवा जपतानाच स्मार्ट बनू पाहणाऱ्या या नगरीने अनेक कलारत्नांना मानसन्मान दिला. या रत्नांनीदेखील नाशिकचा बहुमान वाढविला. मूळचे नाशिकचे नसलेले, परंतु आता पक्के नाशिककर म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्रज्ञ डॉ. भीष्मराज बाम, जयपूर घराण्याच्या नामवंत गायिका मंजिरी असनारे केळकर, ज्येष्ठ गायिका रागिनी कामतीकर, सपकाळ नॉलेज हबचे रवींद्र सपकाळ, पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य गायक अविराज तायडे, उद्योजक देवेंद्र बापट या सर्वांनीच आपापल्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करून नाशिकचा लौकीक वाढविला. या मान्यवरांना ऐकण्याची संधी 'मटा'ने नाशिककरांना उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी 'मटा' संवादमध्ये हत्तींशी संवाद साधणारे आनंद शिंदे या अवलियाचा परिचय वाचकांना झाला. पशू-पक्ष्यांची भाषा जाणणारे आणि त्यांचा हुबेहूब आवाज काढणारे अकोले तालुक्यातील ठकाबाबा गांगड यांच्याशी 'मटा'ने साधलेला संवाददेखील वाचकांना अनोखा अनुभव देऊन गेला. बुधवारी रंगणाऱ्या 'मटा संवाद'चा अवश्य आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मटा’तर्फे उपक्रमांची लयलूट

$
0
0

'पत्र नव्हे मित्र' हे ब्रीद जपणाऱ्या 'महाराष्ट्र टाइम्स' च्या नाशिक आवृत्तीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त वाचकमन प्रफुल्लीत करणाऱ्या विविधांगी उपक्रमांची लयलूट करता येणार आहे. या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने सोमवारपासून (६ जून) उपक्रमांना सुरूवात होणार असून १९ पर्यंत हे उपक्रम सुरू राहतील. नाशिककरांच्या या उपक्रमातील सहभागाने हा आनंद द्विगुणित होणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स' चा वर्धापनदिन ८ जून रोजी साजरा होणार आहे. पाच वर्षांच्या कालावधीत 'मटा'च्या नाशिक आवृत्तीला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. समृध्द वृत्तपत्रीय वाचन परंपरेसोबतच राबविलेल्या उपक्रमांच्या संकल्पनेलाही वाचकांनी मनात स्थान दिले. भविष्यातील नव्या ध्येयशिखरांच्या दिशेने चालताना आजवर साथ देणाऱ्या वाचकांसाठी 'मटा' ने वर्धापन दिन आनंदोत्सवा निमित्त नवे उपक्रमही खास वाचकांसाठी आणले आहेत. वाचकांनी या उपक्रमांचा मनमुराद आनंद लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज बु-या-का वर्कशॉप झुंबा डान्स या फिटनेस अक्टिव्हिटीशी समांतर असणारा बु-या-का वर्कशॉपपासून सोमवारी (दि. ६) या उपक्रमांना प्रारंभ होईल. झुंबा डान्सचे हे वर्कशॉप इंदिरानगर परिसरातील केंब्रीज स्कूलनजीक संताजी हॉल येथे होणार आहे. कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी हा उपक्रम मोफत असेल. तर इतरांना सहभागासाठी ५० रुपये शुल्क द्यावे लागेल.

'प्रदूषणमुक्त नासर्डी' मोहीम बुधवारी 'प्रदूषणमुक्त नासर्डी' या 'मटा' व 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या उपक्रमाला बुधवारी (दि. ८) सुरुवात होणार आहे. नाशिकची ओळख असणाऱ्या गोदावरी नदीची उपनदी म्हणून नंदिनी नदीचे अस्तित्व आहे. काळाच्या ओघात शहरीकरणाच्या परिणामी नंदिनीची हरविलेली मूळ ओळख तिला बकालतेच्या कचाट्यातून सोडवून देत पुन्हा मिळवून देण्याचा संकल्प या मिशनमध्ये सोडण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ८ वाजता नासर्डी नदीजवळ या उपक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होईल.

बुधवारी सायंकाळी रंगणार 'मटा संवाद' गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुलमध्ये बुधवारी (दि. ८) सायंकाळी ५ वाजता 'मटा संवाद' उपक्रम होणार आहे. यात नाशिकमध्ये नव्याने येऊन गायन, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रांमध्ये उंची ओळख मिळविणाऱ्या नामवंतांचा प्रवास या कार्यक्रमात उलगडला जाईल. यात सहभागी नामवंतांमध्ये उद्योग क्षेत्रातून देवेंद्र बापट, गायन क्षेत्रातून मंजिरी असणारे केळकर, रागिणी कामतीकर व अविराज तायडे आणि शिक्षण क्षेत्रातून रवींद्र सपकाळ यांचा सहभाग असणार आहे.

पांडवलेणी हेरिटेज वॉक शहरातील इतिहासाचा ठेवा असणाऱ्या पांडवलेणी येथे गुरुवारी (दि. ९) हेरीटेज वॉक या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता हा उफक्रम होईल.

टाइम्स गॉट टॅलेंट टाइम्स गॉट टॅलेंट ऑडिशन या उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि. १०) विविध कलागुणांचे परफॉर्मन्स होणार आहेत. यात केवळ कल्चर क्लब सदस्यांना प्रवेश असेल. त्यांच्या परफॉर्मन्सची सर्व तयारी त्यांनी स्वत: करून यायचे आहे. सोबत परफॉर्मन्सच्या सीडीही आणाव्यात. सावाना वस्तुसंग्रहालय हेरीटेज वॉक हा उपक्रमही १० जून ला सकाळी ८ वाजता पार पडणार आहे.

पोथ्यांच्या विश्वाची शनिवारी घडणार सफर गर्गे वाडा व पोथ्यांच्या विश्वाची सफर हा हेरिटेज वॉक शनिवारी (दि. ११) सकाळी ८.४५ वाजता होईल. यासाठी श्री काळारा मंदिराच्या पश्चिम दरवाजावळ इच्छुकांनी जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्री बाई समर्थ शनिवारी नव्याने चर्चेत आलेले 'श्री बाई समर्थ' हे नाटक शनिवारी (दि. ११) सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. श्री बाई समर्थ या नाटकाची भेट वाचकांसाठी 'मटा' ने आणली आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात हे नाटक होईल.

'नाण्यातून महाराष्ट्र' 'नाण्यातून महाराष्ट्र' या अनोख्या कार्यक्रमाचे रविवारी (दि. १२) आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचा इतिहास उलगडणाऱ्या नाण्यांचे प्रदर्शन गंगापूर रोड येथील कुसुमाग्रज हॉल येथील स्वगत हॉल येथे होणार आहे. सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन होईल.

गोदाघाटावर सोमवारी हेरिटेज वॉक गोदाघाट येथे सोमवारी (दि. १३) हेरिटेज वॉक होणार आहे. इतिहास अभ्यासक देवेंद्र पंड्या यांच्या अभ्यासू संदर्भाने हा वॉक फुलणार आहे. यात सहभागी होण्यासाठी १३ जून रोजी सोमवारि सकाळी ८ वाजता रामकुंड येथे इच्छुकांनी जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महिनाभर कार्यक्रमांची रेलचेल 'मटा'च्या वर्धापन दिनानिमित्त पूर्ण महिनाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. यात १६ जून रोजी पिस्टल अॅण्ड रायफल शूटींग हा उपक्रम पंचवटीतील हिरावाडी परिसरातील शुटींग क्लबमध्ये पार पडणार आहे. तर १७ जून रोजी टाइम्स गॉट टॅलेंट या उपक्रमात १० जूनच्या ऑडिशनमधील यशस्वी सदस्यांचे परफॉर्मन्स सादर होणार आहेत. १९ जून रोजी फादर्स काँटेस्टमध्ये वडिल या विषयावर दीडशे शब्दांमध्ये निबंध स्पर्धा होणार आहे. यातील विजेत्यांनाही प्रायोजकांच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय आणखी काही कार्यक्रमांचीही घोषणा वेळोवेळी 'मटा' मधून जाहीर करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील बेशिस्त शाळांना ‘छडी’!

$
0
0

शुल्क नियमन कायद्याचे उल्लंघन करीत दरवर्षी केली जाणारी फी वाढ, पालक शिक्षक संघाचे अनियमित कामकाज, शालेय साहित्य, गणवेश खरेदीची सक्ती अशा तक्रारी वारंवार दाखल होत असल्याने जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी शहरातील सहा इंग्रजी शाळांना नोटीसा बजावल्या आहेत. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले जात असल्याचा दावा मंचने केला आहे.

इंग्रजी शाळांचा वाढती मुजोरी पालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अव्वाच्या सव्वा फी वाढीमुळे तर त्यांच्या पालकांचे धाबे दणाणले आहे. सातत्याने कायद्याचे उल्लंघन करीत स्वघोषित नियमांनुसार शाळा प्रशासन नियम बनवित असल्याची तक्रार त्यांच्या वतीने केला जात आहे. त्यामुळे अशा सर्व बाबींविरोधात चौकशी व्हावी, यासाठी कारणे दाखवा नोटीस शाळांना विभागाकडून पाठविण्यात येत आहे. अशोका युनिव्हर्सल स्कूल वडाळा व चांदसी शाखा, नाशिक केम्ब्र्रिज स्कूल, पाथर्डी रोड, सेंट लॉरेन्स स्कूल, सिंहस्थनगर, सेंट फ्रान्सिस स्कूल, तिडके कॉलनी व राणेनगर शाखा या सहा शाळांना नोटीस देण्यात आली आहे. पालकांनी केलेल्या तक्रारीबाबत शाळेने आठ दिवसांच्या आत खुलासा द्यावा, असा आदेश शिक्षण विभागाने दिला आहेत. खुलासा करण्यात शाळांनी दिरंगाई केली तर आरटीई कायदा २००९ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शाळांची खर्च तपासणी नाहीच सेंट लॉरेन्स व सेंट फ्रान्सिस या शाळांनी पालकांनी केलेल्या आंदोलनानंतर फी वाढ कमी केली होती. मात्र, या शाळांचे शिक्षक पालक संघाचे कामकाज नियमानुसार होत नसल्याने नोटीस देण्यात आली आहे. शाळांचे खर्च तपासण्याचे अधिकार शिक्षण विभागाला आहेत. मात्र, असे खर्च तपासले जात नसल्याने शाळा असे धाडस सर्रास करीत असल्याचा आरोप शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाने केला आहे.

या शाळांना नोटीस अशोका युनिव्हर्सल स्कूल, वडाळा अशोका युनिव्हर्सल स्कूल, चांदसी नाशिक केम्ब्र्रिज स्कूल, पाथर्डी रोड, सेंट लॉरेन्स स्कूल, सिंहस्थनगर, सेंट फ्रान्सिस स्कूल, तिडके कॉलनी सेंट फ्रान्सिस स्कूल, राणेनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखो हातांनी पर्यावरण संवर्धन

$
0
0

एकीचे बळ मिळते फळ याचा प्रत्यय देत नाशिककरांनी रविवारी अस्वच्छतेला पळवून लावले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज हजारो नागरिक स्वच्छतादूत बनून रस्त्यावर उतरले. अस्वच्छतेवर झाडू फिरला अन बघता बघता एक हजारांहून अधिक ठिकाणे स्वच्छतेमुळे लख्ख झाली. मी अस्वच्छता करणार नाही अन इतरांनाही स्वच्छता राखण्यासाठी प्रवृत्त करेन अशी शपथ यावेळी घेण्यात आली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शहरासह जिल्ह्यात आज मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण देखील करण्यात आले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाशिकसह जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात १३२२ ठिकाणी सुमारे ७०० मेट्रिक टन कचरा स्वच्छ करण्यात आला. सरकारी कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे सदस्य, नागरिक अशा ७६ हजार ७९० जणांनी या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छतेसाठी योगदान दिले. या सत्कार्याला लाखो हातांचे बळ मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने शहरात अनेक ठिकाणी स्वच्छता नांदू लागल्याचे पहावयास मिळाले.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शहरासह जिल्ह्यात स्वच्छता तसेच वृक्षारोपन मोहीम राबविण्याचा संकल्प करण्यात आला होता. या मोहिमते मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदींनी केले होते. रविवारी सकाळीच शहरात ठिकठि‌काणी या मोहिमेला सुरुवात झाली. सकाळी सातपासूनच लोक हातात झाडू, पाट्या, फावडे व तत्सम साहित्य घेऊन घराबाहेर पडले. आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवायला या भावनेतून कामाला सुरुवात केली. शहरात गांधी तलाव परिसरात महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त डॉ. गेडाम, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, उपमहापौर गुरुमीत बग्गा, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, अतिरिक्त आयुक्त जीवन सोनावणे, पर्यवरणप्रेमी राजेश पंडित, निशिकांत पगारे आदींच्या मुख्य उपस्थितीत स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. यावेळी सर्वांना स्वच्छता राखण्याची शपथ देण्यात आली. कचरा उचलण्यासाठी महापालिकेतर्फे वाहनांची सोय करण्यात आली तर गोदावरी आणि नासर्डी पात्रात स्वच्छतेसाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. शहरातील विविध भागात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेच्या ठिकाणी भेट देवून जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी सहभागी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा उत्साह वाढविला. यावेळी ते म्हणाले की, सरकारी आदेशाची वाट न पहाता प्रत्येक नागरिकाने स्वतःहून या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे. त्यासाठी वर्षातून एक वेळा ही मोहीम न राबवता दर दोन महिन्यानी मोहीम राबवावी. नासर्डी नदीपात्रात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात उपायुक्त वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. रामकुंड, गोदाघाट, गांधी तलाव, यशवंत महाराज पटांगण, उंटवाडी येथील दोंदे पूल, सातपूर आयटीआय जवळील नासर्डी, ठक्कर बसस्थानक, सीबीएस बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसर, तिडके कॉलनीतील नासर्डी नदीपात्र, मुंबईनाका, शिवाजी वाडी, दादासाहेब गायकवाड सभागृहा मागील बाजू, रामकुंड ते टाळकुटेश्वर मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर ते कन्नमवार पूल

वनमहोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद जुन्या जकात नाक्याच्या मागे, हॉटेल कस्तुरीच्या शेजारी, दिंडोरी रोड, वन विभाग पश्चिम क्षेत्र परिसरात वनमहोत्सव झाला. पाच हजारापेक्षा अधिक झाडं लावण्यात आली. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत उपक्रम राबविण्यात आला. अबालवृध्द या उपक्रमात सहभागी झाले. एक कुटुंब एक झाड संकल्पनेतंर्गत वन महोत्सवाच्या ठिकाणी अनेकजण पाच लिटर पाण्याने भरलेली कॅन घेऊन आले. तेथे रोपे देऊन रोपण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बांबू, मुरुडशेंड, करवंद, काळाकुडा, काटेपांगरा, बुचपागारा, खिरणी, पुत्रंजीवा, पळस, वरुण, काटेसावर, कडूनिंब, आपटा, वड, पिंपळ, पापडा, भोकर, खैर, जंगली बदाम, फणस, आसाना, विलायती चिंच, बेल, साग, कहांडोळ इत्यादी पर्यावरण पूरक तसेच दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्यात आली. या ठिकाणी महापालिकेने देखील पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले होते.

गतवर्षीपेक्षा यंदा तिप्पट प्रतिसाद... स्वच्छता मोहिमेत यंदा ७६ हजार ७९० नागरिक सहभागी झाले. गतवर्षी २० हजार नाशिककरांनी शहरासह त्र्यंबकमध्ये मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यावेळी ३७४ टन कचरा काढण्यात आला. यावेळी पूर्ण जिल्ह्यात मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये ७०१.४ टन कचरा संकलित करण्यात आला. ८६ सरकारी खाती व स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या. शहरात ४४ शाळा, कॉलेजेस, विभागातील नागरिकांनी सहभाग घेतला. गतवेळी ६९ ठिकाणांची सफाई करण्यात आली. यंदा १३२२ स्थळे होती. यंदा ८ हजार ३९ अधिकारी सहभागी झाले. गतवेळी ३ हजार ७७ अधिकारी कर्मचारी सहभागी झाले.

यांनी घेतला सहभाग...

शासकीय कार्यालये ८६

सहभागी झालेले लोक ७६ हजार ७९०

स्वच्छ केलेली ठिकाणे १ हजार ३२२

साफ केलेला कचरा ७०१. ४ मेट्रीक टन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्षांनीच केली तक्रार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शहराची पाणी वितरण व्यवस्था कोलमडावी, नागरिकांनी सत्ताधारी आघाडीला पाण्याबाबत जाब विचारावा, पाण्यावरून विद्यमान नगराध्यक्षांपुढे अडचणी निर्माण व्हाव्यात, यासाठी राजकीय द्वेषातून वागदर्डी धरण परिसरात विजेच्या तारा तोडणे, मोटारींची वायर नादुरुस्त करणे, असे प्रकार सुरू असून, या प्रकरणाची त्वरित चौकशी करावी व राजकारणातून अवघ्या शहराला वेठीस धरणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे केल्याची माहिती नगराध्यक्ष प्रवीण नाईक यांनी दिली.

शहराचा पाणीप्रश्न नाजूक असताना व पाणीटंचाईशी शहरवासीय झुंज देत असताना गलिच्छ राजकारण खेळून पाणी वितरण व्यवस्था ढासळावी, यासाठी वागदर्डी धरणाजवळ मोटारींची वायर तोडण्यात आली. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होऊन आयुडीपी भागात दोन दिवस पाणीपुरवठ्याला विलंब झाल्याचे नगराध्यक्ष प्रवीण नाईक यांनी पत्रकारांना सांगितले. पालिका कर्मचाऱ्यांनी पाइप व मोटारींची तपासणी केली असता दोष आढळला नाही. मात्र, जमिनीखाली असलेली केबल ठेचून तुटलेल्या अवस्थेत गुंडाळून दगडाखाली झाकून ठेवल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याचे प्रवीण नाईक यांनी स्पष्ट केले. दुरुस्तीनंतर दोन दिवसांनी पाणीपुरवठा सुरळीत झाला. पण, त्याचा फटका नागरिकांना बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळांच्या दरात तेजी कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्प दरामुळे संत्री व पपईवर मनसोक्त ताव मारणाऱ्या नाशिककरांना उन्हाळ्यात मात्र फळांसाठी जादा पैसे मोजावे लागले. जून महिना उजाडला तरी फळांचा राजा आंब्यांचे दर कमी झालेले नाहीत. पाऊस पडेपर्यंत तरी आंब्याचे दर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. इतर फळांचे दरही टिकून आहेत.

यंदा आंब्यांची भरमसाट आवक होऊनही दर मात्र कमी झालेले नाहीत. अक्षय तृतीयेनंतर आंब्यांची मागणी काही प्रमाणात घटते. जूनमध्ये पावसाला सुरुवात झाली की आंब्यांचे दर खाली येतात. मात्र, यावर्षी अजूनही आंब्याचे दर टिकून आहेत. पन्नास रुपयांपासून १२० रुपये किलोपर्यंत आंब्‍यांची विक्री होत आहे. हापूस, केशर, बदाम, राजापुरी, देवगड, कर्नाटकी हापूस आदी प्रकारच्या आंब्यांचे दर जैसे थे आहेत.

सफरचंद, चिकू, केळी, अननस, संत्री, आदींचे दर जैसे थे आहेत. आंब्यांमुळे या फळांची मागणी कमी असली तरी दर मात्र चढेच आहेत. यामुळे नाशिककरांना फळांसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.

किलोचे दर आंबे - ५० ते १२०, सफरचंद - १२० ते १६०, डाळिंब - ३० ते ५०, संत्री - ६०, अननस - ५० ला एक, किवी - ३० ला एक, नारळ - ३० ला एक, केळी - ३० रुपये डझन, टरबूज - ३० ते ७० रु. नग

दर स्थिरावले गेल्या तीन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढले असल्याने गृहिणींचे बजेट वाढले आहे. पालेभाज्यांसह व फळभाज्यांची पाण्याअभावी आवक थोडी वाढल्याने दर थोडे कमी झाले आहेत. पाऊस लवकर पडल्यास दर कमी होण्याची शक्यता आहे. पालेभाज्यांची जुडी दहा रुपयांपासून तीस रुपयांपर्यंत मिळत आहेत. तर, फळभाज्यांचे दर ४० ते ६० रुपये किलोदरम्यान स्थिर झाले आहेत. मिरची अजूनही तिखट असूनही ७० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. पाऊस लवकर पडला तर जुलैमध्ये भाजीपाल्याची आवक वाढू शकते. अन्यथा भाजीपाल्याचे दर आणखी कडाडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालकाच्या घरावर कामगारांचा हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कंपनीतील कामाबाबतच्या कारणाहून मालकाने कामगारांना नोटीस बजाविल्याने या कामगारांनी मध्यरात्री मालकाच्या घरावर सशस्त्र हल्ला केल्याची घटना अशोकामार्ग येथे घडली. या प्रकरणी विश्वनाथ नायडू यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात चौघांना अटकही करण्यात आली आहे.

अशोका मार्गानजीकच्या कल्पतरूनगर येथील श्री अव्हेन्यू अपार्टमेंटमधील रहिवासी विश्वनाथ नायडू यांच्या कंपनीत त्यांनी काही कामगारांना नोटीस बजावली होती. यामध्ये उत्तम सोनवणे, पंकज शिंदे, साजीद सैय्यद, बिल्लान अन्वर शेख व आणखी काही जणांना नोटीस बजावली होती. या कारणाहून संतप्त कामगारांनी आणखी काही साथीदार जमवत नायडू यांच्या सोसायटीत मध्यरात्रीनंतर शिरकाव केला. यावेळी वॉचमनने त्यांना हटकताच त्याला मारहाण करीत नायडू यांच्या दारावरही लाथाबुक्क्यांनी प्रहार केले. यावेळी लाकडी दंडूके आणि तलवारीचाही धाक या टोळक्याने दाखविल्याचे नायडू यांनी मुंबई नाका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दार न उघडल्याने त्यांच्या वाहनावरहीर दांडक्‍याने प्रहार करती वाहनाचे नुकसान केले. या प्रकरणी पोलिसांना संशयितांचा शोध घेत उत्तम सोनवणे, पंकज शिंदे, साजिद सैय्यद, बिलाल अन्वर शेख व आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सैय्यद व शेख यांसह आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दहा लाखांची घरफोडी सिडकोतील शिवशक्ती चौक येथील रहिवासी मुकेश त्र्यंबक सोनवणे यांच्या घरातून मार्च महिन्यात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे साडेदहा लाखांचा माल लंपास केला. यात साडेसोळा किलो वजनाची व सुमारे आठ लाख रुपये किमतीची चांदीची प्लेट, ९४ ग्रॅम वजनाचे अडीच लाखांचे दागिने व काही रोख रक्कम असा सुमारे साडेदहा लाखांचा माल लंपास केला. या प्रकरणी अंबड पोलिसात शनिवारी (४ जून) गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, चोरी झाल्यानंतर इतक्या उशिराने गुन्हा दाखल होण्यामागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान शहरात घरफोडीचे सत्र सुरुच असून, पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

चिथावणीप्रकरणी गुन्हा नाशिकरोड परिसरातील पंचशीलनगरनजीक चव्हाण मळा येथे काढलेल्या झोपडपट्ट्या पुन्हा त्या जागेवर उभ्या करण्यासाठी गणेश उन्हवणे व शशी उन्हवणे यांनी त्यांच्या तीस ते चाळीस साथीदारांसोबत लोकांना चिथावणी दिली. झोपड्या काढलेल्या जागेवर कंपन्या बांधण्यासाठी आलेल्या लोकांना मारहाण करीत दमदाटी केल्याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सुदर्शन बर्वे यांनी फिर्याद दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोंगरगावात बिबट्याच्या हल्ल्यात सात जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड तालुक्यातील व दुगावनजीक असलेल्या डोंगरगाव येथे बिबट्याने रविवारी अचानक केलेल्या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्यासह आठ जण जखमी झाले. जखमींवर चांदवडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा बिबट्या डोंगरगावातील जुन्या गोबर गॅसच्या सात ते आठ फूट खोल खड्ड्यात पडला असून, त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात चांदवड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक संजय मोरे यांच्यासह विक्रम बर्डे, बबन शिंदे, जितेंद्र शिंदे, जयराम शिंदे, लखन बर्डे, संजय गायकवाड जखमी झाले आहेत. यात पोलिस नाईक मोरे गंभीर जखमी असून, त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चांदवडपासून १२ किलोमीटरवरील डोंगरगाव येथे रविवारी दुपारी एकच्या सुमारास पडक्या विहिरीजवळ बिबट्याचे आगमन झाले आणि त्याने अचानक सुकदेव अंबू बर्डे (वय ५५) यांच्यावर हल्ला केला. या वेळी एका महिलेने बिबट्यावर कुऱ्हाड फेकून मारल्याने बिबट्या गावाच्या दिशेने पळाला. त्यानंतर बिबट्याने विक्रम बर्डे, बबन शिंदे, जितेंद्र शिंदे, जयराम शिंदे, लखन बर्डे, संजय गायकवाड यांच्यावर हल्ला चढवत जखमी केले. यात अनेकांच्या हाताला, पोटाला जखमा झाल्या आहेत. या वेळी बंदोबस्तासाठी दाखल झालेले पोलीस कर्मचारी संजय मोरे यांनाही पंजा मारून जखमी केले. त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्याच्या वृत्ताने परिसरातील नागरिकांनी डोंगरगावात धाव घेतली.

पलायन करण्याच्या प्रयत्नात बिबट्या गावातील जुन्या गोबर गॅसच्या खड्ड्यात फसला असून, त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरा लावला असून, रात्री उशिरापर्यंत बिबट्या पिंजऱ्यात आलेला नसल्याने डोंगरगावावर दहशतीचे सावट होते. डोंगरगावात बिबट्याने हल्ला केल्याची ही पहिलीच घटना असल्याचे ग्रामस्थांनी या वेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शंभर उद्यानांचा संपणार वनवास

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील शंभर उद्यानांची देखभाल व दुरुस्ती करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सेवाभावी संस्था किंवा खासगी मंडळाच्या नावावर ही उद्याने देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शिवसेना १९ जून रोजी वर्धापन दिनी मंडळे व संस्थाच्या नावे उद्याने दत्तक घेणार आहे. त्यामुळे काही उद्यानांचा वनवास संपणार आहे.

शहरातील उद्यानांची सध्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मनसेला शह देण्यासाठी शंभर उद्याने दत्तक घेण्याची तयारी शिवसेनेने आयुक्तांकडे दर्शवली होती. परंतु, राजकीय पक्षांना अशा प्रकारचे उद्याने ही देखभाल दुरूस्तीला देता येत नाही. त्यामुळे शिवसेनेला ही उद्याने मिळणार नाहीत, असा दावा केला जात होता. परंतु, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शिवसेनेसमोर स्वयंसेवी संस्था व सामाजिक मंडळाचा प्रस्ताव ठेवला आहे. मंडळे व संस्थामार्फत ही उद्याने देखभाल व दुरूस्तीला देता येतील असे पत्र शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना दिले आहे. त्यामुळे शिवसेना ही उद्याने संस्था व मंडळाच्या नावाने दत्तक घेणार आहे. शिवसेनेचा येत्या १९ जूनला वर्धापन दिन आहे. या वर्धापनदिनाच्या निम‌त्तिाने काही उद्याने शिवसेना दत्तक घेणार आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैभवच्या निकालाने गहिवरले गाव!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दहावीची परीक्षा दिल्यानंतर चांगले गुण मिळविण्याचे व कॉलेजला जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द या छोट्याशा गावातील वैभव सांगळे निकालाची डोळ्यात प्राण आणून वाट पहात होता. पण, काही दिवसांपूर्वी शेतात कांदे झाकत असताना अंगावर वीज पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालात त्याला ७७.८० टक्के गुण मिळाले. वैभवचा हा निकाल पाहताना गावकरी व मित्रांना त्याच्या आठवणींनी उचंबळून आले, तर त्याचे अवघे घर आपले गुणी लेकरू या जगात नाही आता या गुणांचे काय करायचे? या भावनेने आसवात बुडाले.

जळगाव खुर्द येथून रोज नांदगावच्या व्ही. जे. हायस्कूलमध्ये शिक्षणाच्या ओढीने येणारा व शिकून खूप मोठं होण्याची आस बाळगून असणारा वैभव सांगळे ७७.८० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला. हे पाहून त्याच्या शाळेतील शिक्षकांनाही गहिवरून आले. वैभवचे आईवडील, कुटुंबीय, मित्र आणि शाळेतील शिक्षक यांना वैभवच्या या यशाचा अभिमान वाटत आहे. पण, आपला हा निकाल पाहायला तो स्वतःच या जगात नाही, हे वास्तव त्यांचे काळीज कुरतडून टाकत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यात अचानक आलेल्या वादळाने शेतात कांदे झाकण्यासाठी वैभव गेला आणि काही फुटांवर उभ्या असलेल्या आईवडिलांच्या डोळ्यांदेखत अंगावर वीज कोसळून क्षणार्धात वैभवचा मृत्यू झाला.

शेतीकाम करून शिक्षण घेणाऱ्या वैभवने दहावीचे पेपर दिले होते. निकालाची त्याला आस होती, पण आपला निकाल पाहणे त्याच्या नशिबात नव्हते. हुशार वैभव दहावी पास झालाय पण आनंदाश्रूपेक्षा दुःखाश्रूने पालकांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या आहेत. आता या हुशार पण आपल्यात नसलेल्या गुणी विद्यार्थ्यांची गुणपत्रिका पंधरा जून रोजी मिळाल्यानंतर त्याच्या घरी जाण्याचा मनोदय व्ही. जे. हायस्कूलचे पर्यवेक्षक डी. डी. आहिरे, गिलाणकर यांनी व्यक्त केला आहे.

वैभवच्या आठवणींनी आज सारे भावविवश झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीने गुणी, हुशार मुलाच्या आयुष्याची दोरी कापली गेली. निकालाची प्रतीक्षा करीत महाविद्यालयात जाण्याचे इमले बांधणाऱ्या वैभवच्या स्वप्नांवरच जणू कोसळली आहे. या हुशार मुलाची सतत आठवण येत राहील. - डी. डी. आहिरे, नांदगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात खून अन् जाळपोळीचे थांबेना सत्र

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील एका युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण घाटात फेकून दिल्याचे सोमवारी (दि.६) उजेडात आले. वैभव परदेशी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो अशोक स्तंभ परिसरातील रहिवाशी आहे. एकीकडे ग्रामीण पोलिस गुन्ह्याची नोंद करीत असताना दुसरीकडे बोधलेनगर परिसरातील भगवती दर्शन अपार्टमेंटमधील दोन दुचाकींची जाळपोळ करण्यात आल्याचे समोर आले. या दोन घटनांचा थेट संबंध नसला तरी गुन्हेगारांनी शहर पोलिसांना जेरीस आणले असल्याचे यामुळे पुन्हा एकदा सिध्द झाले. हे सत्र केव्हा थांबणार असा सवाल नाशिककर करीत आहेत.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परदेशीवर २००२ मध्ये तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. २००६ चा दंगलीचा खून वगळला तर तो २००१ ते २००२ या वेळेतच परदेशी सक्रिय होता, असे पोलिस रेकॉर्डवरून स्पष्ट होते. गेल्या काही वर्षांपासून शांत असलेल्या परदेशीचा खून कोणी व कोठे केला हे तपासात समोर येईल. मात्र, यामुळे तोरंगण घाटात मृतदेह फेकून देण्याच्या यापूर्वीच्या घटनेला उजाळा मिळाला आहे. सातपूर भागात खून करून दोघा युवकांचे मृतदेह येथेच फेकून देण्यात आले होते. ही घटना वर्षाप्रांरभीच घडली होती. यातील काही आरोपी अजूनही फरारच आहे. रात्री अपरात्री मृतदेह फेकून देणाऱ्या गुन्हेगारांची कोणतीही माहिती शहर तसेच ग्रामीण पोलिसांना मिळालेली नसून, शहरात गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय असल्याचे परदेशीच्या हत्येनंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडीधारकांसह शाळेला दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, अमृतधाम / सिडको पंचवटी परिसरातील औरंगाबाद नाक्यावरील तपोवनातील मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करून आपले बस्तान बसविणाऱ्या लोकांना सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या मदतीने हटविले. तसेच सिडको प्रशासनाने देखील सद्‌भावना चौकातील शाळेसह अन्य दोन ठिकाणचे अतिक्रमण काढले.

नाशिक महापालिकेच्या ताब्यातील तपोवनातील ५४ एकरच्या मोकळ्या भूखंडावर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील तसेच परराज्यातील काही नागरिक कुटुंबीयांसह शहरात विविध प्रकारच्या व्यवसायानिमित्त आलेले आहेत. त्यांनी मोकळ्या भूखंडावर झोपड्या उभारून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून अतिक्रमण न करण्याच्या अनेकदा सूचना केल्या. परंतु, त्यांनी जागा खाली करून न दिल्याने सोमवारी महापालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागातील अधिकारी व पोलिस यंत्रणा आणि आडगांव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित लोकांना जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित झोपडीधारकांनी प्रशासनाने कारवाई करण्यापूर्वी भूखंडवरून आपले साहित्य हटविले.

संबंधित भूखंडावरील सर्व झोपड्या यापूर्वी सिंहस्थ काळात हटविण्यात आल्या होत्या. तसेच त्या पुन्हा वसणार नाही याची काळजी देखील प्रशासनाने घेतली होती. मात्र, सिंहस्थ कुंभमेळा आटोपल्यानंतर या भूखंडावर पुन्हा अतिक्रमण झाले. प्रशासनाकडून अनेक वेळा ताकीद देण्यात आल्यानंतरही झोपडीधारक हटण्यास तयार होत नसल्याचे विभागीय अधिकारी ए. पी. वाघ यांनी सांगतले. त्यामुळे धडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन झाले.

सिडकोत शाळेचे अतिक्रमण हटविले सिडको : नाशिक महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर सिडको प्रशासनानेही अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. सिडकोतील सद्‌भावना चौकात सोमवारी एका शाळेसह अन्य दोन ठिकाणचे अतिक्रमण सिडको प्रशासनाने हटविण्यात आले.

सिडकोतील सद्‌भावना चौकातील श्रीमती इंदिरा गांधी एज्युकेशन सोसायटीची आदर्श विद्यालय शाळा आहे. सन १९८४ पासून ही शाळा पत्र्याच्या शेडमध्ये भरते. ही शाळा सिडकोच्या जागेवर अतिक्रमित उघडकीस आले. त्यानंतर सिडको प्रशासनाने संबंधित संस्थेला पत्र देवून अतिक्रमण काढून घेण्याची सूचना केली. मात्र, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:हून अतिक्रमण न काढल्याने सिडकोने पोलिस बंदोबस्तात थेट कारवाई केली. शाळा बंद असली तरी त्याठिकाणी असलेल्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईस सुरुवातीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सिडको प्रशासन अतिक्रमण काढण्याबाबत ठाम असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचा विरोध मावळला. जेसीबीच्या सहाय्याने शाळेचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.

श्रीमती इंदिरा गांधी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अनेक वर्षांपासून ही शाळा सुरू आहे. संबंधित भूखंड सिडकोने द्यावा यासाठी पत्रव्यवहारही केला आहे. आता येत्या १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसवायचे कोठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. - सुभाष कोठावदे, अध्यक्ष, इंदिरा गांधी एज्युकेशन सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रहिवाशांनीच टाकले गतिरोधक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर अशोकनगर भागात अलीकडच्या काळात वाढलेल्या रस्ते अपघातांमुळे धोकादायक ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी त्रस्त नागरिक, नगरसेवकांकडून वेळोवेळी केली जात आहे. परंतु, त्याकडे महापालिका व पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने स्थानिक रहिवाशांनीच गतिरोधक टाकण्याचे काम हाती घेतले आहे. सावरकरनगर भागातील वाढते अपघात लक्षात घेता रहिवाशांनीच येथे स्वखर्चाने गतिरोधक टाकले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

परिसरातून अनेकदा सुसाट जाणाऱ्या वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. महापालिका व पोलिस प्रशासन यांनी किमान गरज असेल अशा ठिकाणी गतिरोधक व दुभाजक टाकावेत, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह सातपूरकरांनी वेळोवेळी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता प्रत्यक्ष नागरिकांनीच गतिरोधक टाकले आहेत. आता तरी प्रशासन उर्वरित ठिकाणी गतिरोधक टाकणार का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

सातपूर भागातील रस्त्यांवर गरजेच्या ठिकाणी गतिरोधक व दुभाजक टाकावेत, अशी मागणी स्थायी समिती सभापती सलीम शेख व नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली होती. मात्र, त्याकडे महापालिका व पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अलीकडे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या अपघातांचा त्रास लक्षात घेता सावरकरनगर भागातील रहिवाशांनी रस्त्यावर स्वखर्चाने गतिरोधक टाकले असून, अन्य धोकादायक ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी केली आहे. बेफामपणे वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीदेखील येथील रहिवाशांनी पोलिसांकडे केली आहे. परंतु, त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.



सावरकरनगर भागात वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तक्रारींनंतरही कार्यवाही न झाल्याने रहिवाशांनीच येथील रस्त्यांवर स्वखर्चातून गतिरोधक बसविले आहेत. - नरेंद्र पाटील, स्थानिक रहिवासी



सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी सावरकरनगरच्या रस्त्यावरून जात असताना अचानक जोरात आलेल्या वाहनाची धडक बसून मला इजा झालेली आहे. अनेकांना असा त्रास होऊनही उपाययोजना न झाल्याने आम्ही स्वखर्चाने गतिरोधक रस्त्यावर टाकले आहेत. - सविता ढगे, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फी भरल्यानंतरही विद्यार्थ्यांना डावलले

$
0
0

पहिल्याच दिवशी शाळेकडून अडवणूक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळेने केलेल्या फी वाढीविरोधात एल्गार पुकारणाऱ्या पालकांची अडवणूक करण्यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी काही पाल्यांना जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. गतवर्षीच पाच हजार रुपये भरून बस फी भरल्यानंतरही शाळेकडून आलेला हा अनुभव मनमानी असल्याचे शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचने म्हटले आहे.

संस्थेच्या चांदसी येथील शाळेमतील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी न भरल्यास या विद्यार्थ्यांना उद्यापासून शाळेत नेले जाणार नाही, अशा धमकीचे फोन शाळेतून पालकांना आल्याच्या तक्रारी आहेत. शाळेने यंदा केलेली फी वाढ ही ९३ टक्के असून, ती नियमबाह्य असल्याचा पालकांचा आक्षेप आहे. तर, फी वाढविणे हा शाळेचा अधिकार असून, पालकांनी निमूटपणे वर्षभराची वाढीव फी भरावी अशी शालेय व्यवस्थापनाची अपेक्षा आहे. या विरोधात पालकांनी सोमवारी शाळेत भूमिका मांडली. पालक वादग्रस्त वाढीव फी पैकी पहिल्या महिन्याची फी भरण्यास तयार असताना शाळा मात्र बाराही महिन्याची फी भरण्याच्या मुद्द्यावर अडून आहे. ही फी न भरल्यास विद्यार्थ्यांना बसप्रमाणेच जेवणापासून अन् शिक्षणापासूनही वंचित ठेवले जाईल, अशी धास्ती पालकांनी व्यक्त केली आहे.

शाळेच्या या मनमानीविरोधात पालकही पाल्यांची समांतर वाहतूक व जेवणाची व्यवस्था करत आहेत. पुस्तक खरेदी प्रकरणीही शाळेकडून अशीच अडवणूक होत असल्याची तक्रार केली आहे. शाळेने मनमानी सोडण्याचे आवाहन मंचने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजकंटकांनी पेटवल्या बोधलेनगरला दुचाकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड बोधलेनगर येथे समाजकंटकांनी दहशत निर्माण करण्यासाठी सोमवारी पहाटे दोन दुचाकी पेटवून दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक-पुणे मार्गावर बोधलेनगर आहे. येथील भगवती दर्शन अपार्टमेंटमध्ये जीवन रमेश पगारे (३०) राहतात. रविवारी रात्री त्यांनी आपली सीबीझेड (एमएच १५ सी डब्लू ५४३९) आणि अॅक्टिव्हा (एमएच १५ सीएम ६८१८) या दुचाकी पार्किंगमध्ये लावल्या. पहाटे समाजकंटकांनी त्यांच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. सकाळी हा प्रकार लक्षात येताच पगारे यांनी उपनगर पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक आयुक्त रवींद्र वाडेकर, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, उपनिरीक्षक पवार आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. दहशत निर्माण करण्यासाठी या गाड्या जाळल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यापूर्वीही उपनगरमधील लोखंडे मळा आणि उपनगर बाजारात वाहने जाळण्यात आली होती. सिन्नरफाटा येथेही वाहने जाळण्याच्या घटना घडल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकशाही दिनी रॅगिंगची तक्रार

$
0
0

शहरातील विस्डम इंटरनॅशनल आणि केंब्रिज या दोन शाळांविरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या लोकशाही दिनी तक्रार करण्यात आली. विस्डमविरोधात रॅगिंग, मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल तर क्रेबिजविरोधात शाळा सोडल्याचा दाखला देत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील विविध विभागांशी संबंधित ४७ तक्रारी आल्या. त्यावर तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस उपायुक्त विजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर उपस्थित होते. विस्डम हायस्कूलविरोधात वेदांत अभिजित गोराणे या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने तक्रार केली आहे. त्यात त्याने शाळेत असलेल्या गुंडांपासून संरक्षण मिळावे, शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांच्या शाळेतील गुन्हेगारी स्वरुपाच्या हरकतीवर नियंत्रण करावे, असे म्हटले आहे. या तक्रारीत त्याने संस्थाचालक व त्यांचा नातेवाईक असलेला सातवीत शिकणारा मुलगा दादागिरी करतो, असाही उल्लेख केला आहे. केंब्रिज स्कूल विरोधात शिवानी कैलास पाटील या दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीने शाळा सोडल्याचा दाखला मिळत नसल्याची तक्रार केली आहे. पूर्ण शुल्क भरल्यानंतरही फी बाकी असल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलेले आहे. या दोन्ही शाळांच्या तक्रारींची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत विस्डमची तक्रार पोलिसांकडे तर केब्रिज हायस्कूलची तक्रार शिक्षणाधिकारी यांच्याकडे देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. अन्य तक्रारींमध्ये भूमी अभिलेख, महसूल, पोलिस, महावितरण, शिक्षण आदी विभागांशी संबंधित तक्रारींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सृ‌ष्टिसौंदर्याने बहरले ‘जर्नी’ प्रदर्शन

$
0
0

प्रदर्शनात मांडल्या निवडक ३५ कलाकृती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदीमानवापासून आपल्या मनातील भावना चित्र स्वरुपात गुहेच्या पृष्ठभागावर रेखाटण्यास प्रारंभ झाला. त्यावेळी त्याने निर्मिलेली कलाकृतीचा उद्देश भिन्न असला तरी भावनांचा प्रकटीकरण करणे हा एकमेव उद्देश होता. याच भावनांना चित्र स्वरुपात आणण्याचे काम नाशिकमधील प्रख्यात चित्रकार अतुल भालेराव यांनी 'जर्नी' या चित्रप्रदर्शनाद्वारे केले आहे.

अमेरिकेतील प्रसिध्द चित्रकार मॅथॉड्रिस्ट सुनिव्हर्सिटीचे अध्यक्ष विलास टोणपे यांच्या हस्ते कुसुमाग्रज स्मारकात प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात सृष्टी सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न चित्रकार अतुल भालेराव यांनी केला आहे. या प्रदर्शनात निवडक ३५ कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणची तसेच महाबळेश्वर, पाचगणी, मुंबई वेरुळ येथील सौंदर्यस्थळे त्यांनी जलरंगात रंगवली आहेत. नाशिकमधील चित्रकारांच्या निर्सगचित्रणाची परंपरा संपूर्ण भारतात प्रसिध्द आहे. त्याला अनुसरूनच त्यांनी स्वतःची चित्रशैली विक‌सित केली आहे. कधी चित्र सौंदर्य पारदर्शक रंगात, तर कधी अपारदर्शक रंगात त्यांनी रंगवले आहेत. यासाठी वॉटर कलर व अॅक्रेलीक रंगांचा प्रभावीपणे वापर केला आहे. यातील काही चित्रे मिश्र माध्यमातही रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. जलरंगाचा प्रवाहीपणा, माध्यम हाताळण्याची हातोटी त्यांच्या चित्रात वैशिष्ट्याने जाणवते. माध्यमावर असणारी पकड त्यातून जाणवते. पावसाळ्यातील हिरवीगार वनराई, निर्सगात दडलेली हिरव्या रंगांची विविधता, वृक्ष, वेली, गवत, शेतातील पिकं ही चित्र रेखाटताना नदीकाठ, जलाशय, पर्वतांमधील विविधता, ग्रामीण भागात आढळणारे सृष्टी सौंदर्य, तेथील पुरातन वाडे-घरे यांची रचना जशीच्या तशी दिसते. नाशिकमधील मेनरोड येथील महापालिकेची इमारत, मेनरोड, कुंभमेळ्यातील गर्दी, पाण्यातील प्रतिबिंब, टेरेस व्ह्यू, जेजुरी गडावरील दृश्य, सोमेश्वर, व्हिक्टोरीया पूल यातील चित्र प्रेक्षकांना आकर्षित करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनी’ला हवी लोकसहभागाची साथ !

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स'चा इनिशेएटिव्ह प्रोग्रॅम 'चला, नासर्डीला नंदिनी करू या'मध्ये रोजच शेकडोंच्या संख्येने लोक सहभागी होत असून, नाशिक शहरातील विविध सामाजिक संस्था आणि अनेक स्वयंसेवकांनी स्वत:हून या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची तयारी दाखवल्यामुळे ही चळवळ आता लोकव्यापक बनू पहात आहे. 'मटा'च्या वर्धापनदिनी, ८ जून रोजी सकाळी ८ वाजता गोरक्षनाथ पूल, दादासाहेब गायकवाड नगर, सातपूर येथे नदीच्या स्वच्छतेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यात शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, नंदिनी नदीशी संबंधित नगरसेवक, प्रशासन यांचा सहभाग राहणार आहे.

वाढत्या शहराच्या गरजा भागवता-भागवता नाशिककरांनी सरस्वती, कपिला, नासर्डी, अरूणा, वरूणा या गोदावरीच्या उपनद्या गमावल्यातच जमा आहेत. हा वारसा पुन्हा एकदा मिळवून त्याला समृध्द करण्याच्या हेतूने 'महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडिया'तर्फे नासर्डी उर्फ नंदिनी नदीचे पुनरूज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत बेळगाव ढगा येथे संतुषा डोंगराच्या पायथ्याशी असलेला नंदिनीचा उगम ते आगर टाकळी येथे असलेल्या गोदावरी संगमापर्यंतचा नदी टप्पा स्वच्छता व सुशोभिकरण हे प्राथमिक लक्ष्य आहे.

नंदिनी ही गोदावरीची उपनदी आहे. परंतु या नदीचे वाढत्या नागरिकरणाच्या रेट्यात नासर्डी नाला असे नामकरण झाले. अतिशय संपन्न वारसा लाभलेल्या या नदीला तिचे पूर्वीचे बारमाही स्वरूप पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडिया'तर्फे प्राथमिक पाऊल उचलण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात तज्ज्ञ समितीने महिरावणी डॅम ते आगरटाकळी संगम या टप्प्यातील सात ठिकाणांची पाहणी केली. दुसऱ्या टप्प्यात नाशिकमधील डिसिजन मेकर अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात एक बैठक नुकतीच घेण्यात आली. त्यात नदी पुनरूज्जीवनासंदर्भात अनेक सुचना आल्या. त्या नोंदवून त्यावर काम सुरू करण्यात आलेले आहे. यासाठी 'मटा'कडे अतिशय तज्ज्ञ मंडळीदेखील सहभागी झाली आहे.

नंदिनी नदीबाबत नाशिककरांना आवाहन केल्यानंतर या चळवळीमध्ये अनेक नाशिककर सहभागी झाले. कुणी सुशोभिकरण करून देण्यासाठी तर कुणी स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासंदर्भात फोनवरून कळवले तर अनेकांनी 'मटा'च्या ऑफिसला भेट देत या कामात झोकून देण्याची तयारी दाखवली. नाशिकची नदी पुन्हा पूर्ववत करण्यासाठी वाटेल ते श्रम करण्याची त्यांची तयारी हेच या प्रोजेक्टचे यश आहे.

श्रमदानासाठी संस्थांना आवाहन

नासर्डी नदीचे नंदिनीत रूपांतर करण्याकामी नाशिकमधील सामाजिक 'महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडिया'तर्फे आवाहन करण्यात येत आहे. नदीची स्वच्छता करण्यापासून सुशोभिकरणापर्यंत अनेक छोट्या-मोठ्या कामांसाठी आणखी मनुष्यबळ लाभणार आहे. हे काम सुरूच राहणार असल्याने प्रत्येकाचा या कामात सहभाग आवश्यक आहे. 'नासर्डीला नंदिनी करू या' या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संस्थांनी, प्रशांत : ९५०३६७७७४० यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलमध्ये सापडले आठ मोबाइल

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात भिंतीलगत आठ मोबाइल आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिनाभरातील अशी दुसरी घटना आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात कारागृहाचे हवालदार भाऊसाहेब खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. कारागृहाच्या भिंतीलगत गस्त घालत असतांना खरात यांना कृषी गोदामाच्या भागात भिंतीजवळ आठ मोबाइल, हेडफोन व चार्जरही सापडले. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवली. सहाय्यक निरीक्षक वाळेकर तपास करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी होमगार्डच्या बूटामध्ये सीमकार्ड व मोबाइल सापडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुळे भाऊ गुणांतही ‘सेम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इयत्ता दहावी, बारावीचा एखादा विद्यार्थी घरात असला, तर त्या घरचे दूरचित्रवाणी संच, अन्य सर्व गोष्टी बंद करून अभ्यास एके अभ्यास असे सामान्य चित्र पाहायला मिळते. परंतु, यास अपवाद ठरवत दुबे कुटुंबीयांच्या घरात इयत्ता दहावीत कार्तिकेय व विनायक या दोन्ही जुळ्या भावांनी हसत-खेळत यश संपादित करून दाखविले. सीबीएसईच्या निकालात कार्तिकेयने ९५.२ टक्के, तर विनायकने ९४.२ टक्के गुण मिळविले आहेत. कार्तिकेय व विनायक या जुळ्या भावांचे वडील कंपनीत नोकरी करतात. इयत्ता दहावीची परीक्षा देत असल्याची मनात काळजी होती. त्यातही सीबीएसईची परीक्षा अवघड समजली जाते. परंतु, वर्षभराच्या नियोजनबद्ध अभ्यासातून त्यांनी यश संपादित केले. दोघा भावांध्ये वेळोवेळी स्पर्धाही लागायची. जास्त गुण मिळण्याच्या धडपडीव्यतिरिक्त या स्पर्धेचा अन्य काहीही उद्देश नव्हता. दोघांचा आवडीचा विषय गणित असल्याने दोघेही पुढील शिक्षण अभियांत्रिकी शाखेतून घेण्याची इच्छा व्यक्त करतात. त्यादृष्टीने अभ्यास केला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) किंवा यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेतून शिक्षण घेण्याची इच्छाही कार्तिकेय याने व्यक्त केली.

आमच्या घरात दोन मुले बोर्डाची परीक्षा देणार असले, तरी त्याबद्दलचा तणाव कधी जाणवला नाही. वर्षभर नियमित अभ्यासावर भर देत त्यांनी परीक्षेत यश संपादित केले. सोबतच खेळालाही तितकेच महत्त्व दिले. रोज साधारणत: एक तास खेळायचे. या व्यायामाचाही फायदा त्यांना झाला.

-पारुल दुबे, कार्तिकेय व विनायकची आई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images