Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आता लॉ प्रवेशासाठीही सीईटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उच्च शिक्षण संचालनालयाकडून २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाच्या लॉ अभ्यासक्रमासाठी यंदा प्रथमच सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. लॉच्या तीन वर्षीय व पाच वर्षीय या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. येत्या २२ मेला राज्यभरात ही १५० मार्कांची परीक्षा घेतली जाणार आहे.
लॉ अभ्यासक्रमाला सर्वच शाखांचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत असल्याने अनेकदा या महत्त्वाच्या अभ्यासक्रमाकडे तितकेसे गांभीर्याने न पाहता दुय्यम भावनेने पाहिले जाते. एखादा कोर्स करता करता कायद्याची जाण मिळविण्यासाठी म्हणून विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. या परिस्थितीमुळे लॉ अभ्यासक्रमाचा दर्जा ढासळत असल्याचे मध्यंतरी या क्षेत्रातील नामवंतांच्या निदर्शनास आले होते. यामुळे या अभ्यासक्रमाचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यातील एक भाग म्हणून या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. लिगल अॅप्टिट्युड, लॉजिकल अॅण्ड अॅनालिट, जनरल नॉलेज, इंग्रजी, बेसिक मॅथ्स या विषयांचा समावेश यामध्ये असणार आहे. दोन तासांची कालावधी या परीक्षेसाठी दिला जाणार असून नकारात्मक गुणांकन पद्धतीचा अवलंब परीक्षेत होणार नाही.
लॉ बरोबरच इंजिनीअरिंग, एमसीए, एमबीए, बीएड, बीपीएड आदी परीक्षांच्या सीईटीच्या तारखाही जाहिर करण्यात आल्या आहेत. लॉ अभ्यासक्रमाची सीईटी २२ मे ला होणार आहे. याचदिवशी हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचीही परीक्षा होणार असल्याने ज्या विद्यार्थ्यांना कायद्याचा अभ्यास करायचा आहे, तेच सीईटी देतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​'या' उपसंचालकांचेही अखेर निभावले !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'पालथ्या घड्यावर पाणी' या न्यायाने अखेर अनेक तक्रारींचा मारा सहन करत अखेर शिक्षण विभागाचे उपसंचालक भगवान सूर्यवंशी हे सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र या निवृत्तीनंतरही त्यांच्याविषयी असणाऱ्या तक्रारीच्या पाढ्याची अवस्था 'जैसे थे'च आहे. सरकारी व्यवस्थेतील ढिम्मपणामुळे अधिकाऱ्यांचे कसे निभावले जाते याचाच प्रत्यय यामुळे आला आहे.
नाशिकला लाभलेले शिक्षण उपसंचालकांचे हे विभागीय पद गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वादातच सापडत गेले आहे. ३१ मार्च रोजी निवृत्त झालेल्या भगवान सूर्यवंशी या उपसंचालकांची काराकीर्दही यास अपवाद ठरली नाही. आधीचे शिक्षण उपसंचालक तुकाराम सुपे यांच्याच कार्यपद्धतीचा काहीसा कित्ता गिरवत यांनीही या पदाच्या लौकीकाप्रमाणे कारभार सांभाळल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात गुरूवारी रंगली होती.
सूर्यवंशी यांच्या काराकिर्दीला वादाच्या काही प्रसंगांची किनार होती. तरीही त्यांच्या आवाक्यातील अधिकारांच्या प्रभावाने त्यांच्याकडून नाशिककरांच्या असणाऱ्या किमान अपेक्षाही पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत, याबाबत खंत व्यक्त करताना नवे उपसंचालक तर कार्यक्षम लाभतील अशी अपेक्षा आता नाशिककर करत आहेत.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा शुल्क नियंत्रणाचा मुद्दा शहरात अनेक वर्षांपासून गाजतो आहे. शाळांच्या फी नियंत्रणाबाबत झालेली वेगवेगळी आंदोलन अन् तक्रारींना अद्याप न्याय मिळू शकलेला नाही. या प्रकारच्या तक्रारी करण्यास पुढाकार घेणाऱ्या पालकांच्या गाठीशी तर या कार्यालयाकडून मार खाण्याचाच अनुभव आहे. जळगाव परिसरातील शाळा ट्रान्सफर प्रकरणात तर उपसंचालक या पदाची चौकशी त्यांच्याच पदास करण्याचे आदेश दिला गेल्याचाही या कार्यालयातला इतिहास आहे. याशिवाय मुंबई अन् पुण्यासारख्या अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात उपसंचालक कार्यालय अपयशीच ठरले आहे. तर अद्यापपर्यंत शिक्षण हक्क कायद्यानुसार 'आरटीई' चा प्रवेशही या कार्यालयास सक्षमपणे मार्गी लावता आलेले नाहीत. याशिवाय काही नामांकीत शिक्षणसंस्थांमध्येही या पदाची वादग्रस्त प्रतिमा निर्माण करण्यात गत उपसंचालकांची परंपरा राहिली आहे.
आता नव्या उपसंचालकांच्या बाबतीत तरी देव पावावा अशी इच्छा व्यक्त करतानाच किमान अडचणी मार्गी लागून नाशिकच्या फसू पाहणाऱ्या शैक्षणिक चाकास गती मिळावी, अशी अपेक्षा या निवृत्तीच्या निमित्ताने शिक्षक संघटना अन् शिक्षण विभागातील कार्यालयांसह पालक आणि संस्थाचालकांमध्ये रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​एसटी कर्मचाऱ्यांसाठी पुस्तकांचा खजिना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांच्या नावाचा जयघोष करुन, हातात भगवे झेंडे घेऊन जल्लोष करीतच साजरी केली जात असल्याचे चित्र वर्षानुवर्षे बघायला मिळते. मात्र, शिवजयंती कृती समितीने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करुन देत अशा तरुणाईसमोर नवा आदर्श उभा केला आहे.
शिवाजी महाराजांची जयंती ही केवळ पुष्पहार अर्पण करुन घोषणा देण्यापुरती मर्यादित राहू नये, यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. मृत्युंजय, हिंदू, प्रकाशवाटा, भाग्यवान, आमचा बाप अन् आम्ही, कवचकुंडले, हिटलर, छावा, व्यक्ती आणि वल्ली अशी एकूण २१ पुस्तके या उपक्रमांतर्गत शिवजयंती कृती समितीतर्फे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या कामगार शाखेस वाचनासाठी ही पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विभाग नियंत्रक यामिनी जोशी, कामगार अधिकारी अश्विनी चपके, विभागीय वाहतूक अधिकारी मनिषा सपकाळ, सागर पळसुले, विभागीय लेखाधिकारी बाळासाहेब उगले यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. शिवजयंती कृती समितीचे सुभाष जाधव, अरुण तिडके, विजय उगले आदी यावेळी उपस्थित होती. राजकारणाशी निगडीत असतानाही शिवजयंती कृती समितीने साजरी केलेल्या या उपक्रमाने समाजासमोर आदर्श उभा राहिल, असा विश्वास सुभाष जाधव यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन वर्षांनंतर मिळणार नुकसान भरपाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात सन २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व रोगांच्या प्रादुर्भावामुळे भात पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसाने झाले होते. या नुकसानीची तब्बल तीन वर्षांनी सरकारने दखल घेतली आहे. तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या जवळपास ९१८० लाभार्थ्यांना प्रती हेक्टरी ७५०० रुपयांप्रमाणे जवळपास १ कोटी २६ लाख रुपयांचे नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे.

तालुक्यात सन २०१३ मध्ये अतिवृष्टी झाल्याने भात पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याबरोबर करपा, मावा, तुडतुड या रोगाचा व किडीचा भात पिकावर प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडले होते. यासंदर्भात आमदार निर्मला गावित यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार व कृषी अधिकारी यांची भेट घेवून पाठपुरावा केला होता. इगतपुरीचे तत्कालीन तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला होता. यासंदर्भात भात पिक नुकसानग्रस्त १२१ गावाच्या ९१८० शेतकऱ्यांना जवळपास १ कोटी २६ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. याबाबत नुकसान भरपाईची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा तासांत आली २७० कोटींची बिले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी (३१ मार्च) रोजी रात्री बारापर्यंत ३३० कोटींची एक हजार ४३४ बिले लेखा कोषागार विभागात दाखल झाली आहेत. गुरूवारी सायंकाळी

सहापर्यंत केवळ ६० कोटींची ३७४ बिले कोषागारात दाखल झाली होती. मात्र त्यानंतरच्या सहा तासांमध्ये तब्बल २७० कोटींची बिले कोषागारात दाखल झाली.

शुक्रवारी आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी देखील दोन हजार ३१४ बिले मंजुरीच्या प्रतिक्षेत होती. त्यामुळे मार्च एण्डनंतरही आणखी दोन ते तीन दिवस बिले मंजुरीचे काम कोषागारात सुरू राहणार आहे. बुधवारी एकाच दिवसात ६९० बिले दाखल झाली होती. बिलांच्या मंजुरीसाठी सरकारने सुरू केलेल्या इस्टिमेट अलोकेशन मॉनेटरिंग संगणकीय प्रणालीचा उपयोग झाला.

कर्मचारींचे प्रवास भत्ता,

वेतन, मेडिक्लेमची बिले मंजुरीसाठी १५ मार्चची मुदत असल्याने तसेच प्रत्येक ३ महिन्यांची बिले त्या-त्या तिमाहीत मंजूर करण्याची सक्ती केल्याने

यंदा ३१ मार्चला कामाचा ताण बराच कमी झाला.

शुक्रवारी (३१ मार्चला) रात्री बारावाजेपर्यंत ३३० कोटी २८ लाख २३८६ रुपयांची बिले दाखल करण्यात आली. त्यानंतरही नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी (१ एप्रिलला) दोन हजार ३१४ बिले मंजुरीचे काम सुरू होते.

त्यामध्ये सरकारचे पुरवणी बिल, सानुग्रह अनुदानाचे बिलांचे विषय, सरकारी योजनेवरील खर्च, सुधारित प्राकलनांच्या मंजुरी विषयांच्या

बिलांची संख्या अधिक आहे. हे काम आणखी दोन ते तीन दिवस सुरू

राहणार आहे. त्यामुळे कोषागार विभागता अजून काही दिवस मार्च एण्डचा फिव्हर सुरू राहणार आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हंडाभर पाण्यासाठी पायपीट

$
0
0

सटाणा परिसरात पाणीबाणी
म. टा. वृत्तसेवा, सटाणा


दुष्काळाच्या झळा राज्यभरात जाणवत आहेतच. त्या आता नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यालाही तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. काही भागात तर गावकऱ्यांना पाण्यासाठी थेट दोन ते तीन किलोमिटर पायपीट करावी लागत आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभीलाच ही बिकट अवस्था असल्याने अखेर प्रशासनाला आवर्तने किती आणि कोठे द्यायची हा मोठा प्रश्न पडला आहे.


येत्या मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल अशी भीती नागरिकांना आहे. या सर्व परिस्थितीत प्रशासन कोणतीही ठोस पावले उचलताना दिसत नाही. त्यासाठी या परिसरात तातडीने टँकर सुरू करावे अशी मागणी होत आहे. शहरासाठी गत पंधरवाड्यातच चणकापूरचे एक आर्वतन दिल्याने एक दिवसाआड पिण्याच्या पाणी मिळू लागले आहे. मात्र या गिरणा नदीपात्रात थोडेच पाणी शिल्लक असल्याने शहरात येत्या दिवसांत दोन ते तीन दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हरणबारी धरणामुळे मोसम खोऱ्यातील जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत नसली तरी नामपूरसह काटवन परिसरात अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर तळवाडे, देवळाणे, सुराणे, अजमीर सौंदणे या ठिकाणी केवळ एकच टँकरद्वारे या ठिकाणी पाणीपुरवठा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशक’ हिरा मायदेशी आणणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या शिरपेचातील नाशक हिरा म्हणजेच `आय ऑफ गॉड शिवा' आजही परप्रांतीयांच्याच ताब्यात आहे. हा नाशिकचा अनमोल ठेवा २०० वर्षांनी का होईना पुन्हा मायभूमीत परत आण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी प्रतिक्रिया नाशिककरांनी शुक्रवारी 'मटा'ने प्रसिद्ध केलेले 'त्र्यंबकेश्वराचा `नाशक` भोगतोय वनवास!' या वृत्तावर व्यक्त केली. `नाशक` हिऱ्याच्या वृत्त सोशल मीडियावरही ह‌िट ठरले. तर खासदार हेमंत गोडसे व खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाशक पुन्हा त्र्यंबकेश्वरमध्ये आणण्यासाठी पंतप्रधान व परराष्ट्रमंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली आहे.

नाशक हिरा पुन्हा त्र्यंबकेश्वराच्या खजिन्यात आणण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान प्रयत्न करेल, असे देवस्थानच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या,'महाराष्ट्र टाइम्समध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये नाशक हिऱ्याबाबतच चर्चा होती. नागरिक हा हिरा पुन्हा देवस्थानात कसा दाखल होईल, याबाबत विचारणा करत होते. देवस्थानने बैठक घेऊन हिरा परत आणण्यासाठी ठराव करावा म्हणजे मुख्यमंत्री व खासदारांमार्फत हा विषय केंद्रापर्यंत नेता येईल.

नाशक हिरा पुन्हा भारतात आणणे शक्य आहे. यासाठी ऑर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाकडे महाराष्ट्र पुरातत्त्व खात्यातून पाठपुरावा करण्यात येईल. याबाबत नाशिककरही पुरातत्त्व खाते किंवा ऑर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाकडे पत्रव्यवहार करू शकतात.

डॉ. श्रीकांत घारपुरे, सहायक संचालक, पुरातत्त्व नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झरा उशाशी, रामकुंड उपाशी !

$
0
0

Satish.kale@timesgroup.com

नाशिककरांची तहान शमविणारी गोदामाई कोरडी पडल्याने रामकुंडावर येणाऱ्या भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे रामकुंडात बोअर खोदण्याचाही विचार झाला; मात्र रामकुंडापासून काही अंतरावर असलेल्या काझीगढी परिसरात ज‌िवंत झरा चोवीस तास वाहतो आहे. याकडे मात्र प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. या झऱ्याचे पाणी रामकुंडात सोडल्यास भाविकांची गैरसोय दूर होऊ शकते. तसेच नागरिकांनाही या पाण्याचा वापर करता येऊ शकतो.

नाशिककरांना भीषण पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना रामकुंडात स्नानासाठी पाणी साडू नये, असे निर्देश हायकोर्टाने दिल्याने धरणातील पिण्याचे पाणी रामकुडांत सोडणे बंद करण्यात आले आहे. मात्र देशभरातून येणाऱ्या भाविकांची निराशा होऊ नये म्हणून रामकुंडात थोडे का खेळते पाणी ठेवणे गरजेचे असल्याने महापालिकेने रामकुंड परिसरात बोअर घेऊन कुंडात पाणी सोडण्याचा विचार करीत आहे. मात्र रामकुंडात बोअर घेण्यास पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवला आहे. रामकुंडातील जलस्त्रोतांना बोअरमुळे धक्का लागून हे स्त्रोतांचे नुकसान होऊ शकते, अशी ‌भीती व्यक्त केल्याने ही शक्यताही बारगळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत रामकुंडात खेळते पाणी ठेवणे व परिसरातील नागरिकांना वापराचे पाणी म्हणून गोदावरी नदीच्या आजूबाजूला असलेल्या पुरातन झऱ्यांच्या पाण्याचा वापर प्रभावीपणे करता येऊ शकतो. असाच एक जिवंत झरा काझीगढी गाडगेमहाराज धर्मशाळा परिसरात आढळून आला आहे. दृष्काळाच्या झळा बसत असतानाही हा झरा चोवीस तास वाहत असूनही महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. या पाण्याचा वापर योग्य पद्धतीने झाल्यास जुने नाशिक परिसरात नागरिकांची पायपीट थांबू शकते.

महापालिकेचे दुर्लक्ष का?

शहरवासियांना पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवण्याचे आवाहन एकीकडे नाशिक महापालिका करते अन् अशा जिवंत जलस्त्रोतांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. या झऱ्याखाली सध्या नागरिक आपले वाहने, कपडे धुत असल्याचे त्याचा उपयोग फारसा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता प्रशासनाने याकडे गांभीर्याने पहावे, अशी अपेक्षा आहे.

काझी गडी परिसरात पूर्वी जुने वाडे होते. त्या वाड्यांना लागून काही विह‌िरी होत्या; परंतु आता ते वाडे पडले. मात्र विह‌िरी तशाच असल्याने त्याचे झऱ्यांमध्ये रुपांतर झाले आहे. या जागेत पाण्याचा एक हौद असुन येथे या पाण्याचा वापर गाड्या, कपडे धुण्यासाठी होतो. या पाण्याचा साठा करता आला तर परिसरातील नागरिकांना याचा वापर करता येईल व रामकुंडाचा प्रश्नही सुटेल.

जयवंत आव्हाड, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​जेईई ऑफलाइनसाठी विद्यार्थी सज्ज

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, नाशिक
देशातील आयआयटी आणि एनआयटी संस्थांमध्ये इंजिनीअरिंगच्या प्रवेशांसाठी सीबीएसईच्या वतीने घेण्यात येणारी जेईई ऑफलाइन ही परीक्षा आज (३ एप्रिल) शहरात सुमारे २३ केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी शहर व जिल्ह्यातून सुमारे १५ हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत.
राज्यातल्या इंजिनीअरिंग कॉलेजेससाठी यंदापासून सीईटी (कॉमन एन्ट्रन्स टेस्ट) होणार आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना जेईई मेन ही परीक्षा बंधनकारक नाही. मात्र, अखिल भारतीय स्तरावर १५ टक्के कोट्यातील प्रवेशांसाठी या परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्यात येणार असल्याने या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही. आज होणाऱ्या परीक्षेच्या माध्यमातून २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी पहिल्या वर्षास आयआयटी व एनआयटीचे प्रवेश होतील. सीबीएसईच्या वतीने पेन अॅण्ड पेपर बेसड् या पद्धतीने आजची परीक्षा पार पडणार आहे. तर ऑनलाइन पद्धतीने होणारी परीक्षा ही यंदा ९ आणि १० एप्रिल रोजी होणार आहे. ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेत मॅथ्स, केमेस्ट्री आणि फिजिक्स या तीन विषयांसाठी एकूण ३६० गुणांची परीक्षा होईल. प्रश्नाच्या योग्य उत्तरास ४ गुण असतील तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाणार आहे. देशभरात १२४ केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेत देशभरातून लाखो विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. या परीक्षेतून पात्र ठरणाऱ्या सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्सड या पुढील टप्प्यातील परीक्षेसाठी बसता येईल.
बीई व बीटेक या अभ्यासकमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर १ तर बी.आर्क. किंवा बी.प्लॅनिंग या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्यांना पेपर २ द्यावा लागणार आहे. पेपर १ हा ऑफलाईन किंवा ऑनलाइन पद्धतीने देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांच्या हाती आहे. नव्या शैक्षणिक वर्षात आयआयटी किंवा एनआयटीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेईई मेन महत्त्वाची परीक्षा आहे. राज्यभरात नाशिकसह पुणे, मुंबई, नागपूर व ठाणे या पाच शहरात परीक्षा पार पडणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र समिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका कार्यक्षेत्रांतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षक संघटनांची बैठक नुकतीच कऱ्हाड येथे पार पडली. शिक्षकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी राज्य पातळीवर स्वतंत्र समिती असावी, यासाठी नाशिक मनपा प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जिभाऊ अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
महाराष्ट्रातील नगरपालिका व महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांना शंभर टक्के वेतन राज्य सरकारमार्फत मिळते. जिल्हा परिषदेप्रमाणे एलटीसी योजना लागू करावी, गटविमा योजना, अनुकंपा योजना लागू करावी, केंद्रप्रमुख पदे निर्माण करुन ती भरावीत, मेडिकल बिल व इतर प्रलंबित बिले त्वरित मिळावीत, नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण समितीवर नगरपालिका किंवा महानगरपालिका शिक्षक, संघटनेच्या प्रतिनिधींनाही संधी मिळावी, या प्रश्नांवर येथे चर्चा करण्यात आली. तसेच हे प्रश्न सरकारी यंत्रणेच्या नजरेस आणून देण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या बैठकीस राज्यातील २२ नगरपालिकांचे व महानगरपालिकांचे शिक्षण प्रतिनिधी हजर होते. या समितीच्या अध्यक्षपदी कऱ्हाड येथील अर्जुन कोळी, कार्याध्यक्षपदी इचलकरंजीचे संजय आवळे, सरचिटणीस पदासाठी अहमदनगरचे अरुण पवार आदी पदांसाठीही यावेळी निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक संघटनांची झेडपीसमोर निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शिक्षणाधिकारी कार्यालयावर अनागोंदी कारभार व भ्रष्टाचाराचा निषेध करीत जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा मुख्याध्यापक संघ, नाशिक जिल्हा टीडीएफ व नाशिक जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. जिल्हा परिषेदसमोर शनिवारी या संघटनांनी हे आंदोलन करीत चौकशीची मागणी केली.
शिक्षण खात्याशी निगडीत कार्यालयांमधील कामकाजांवर शिक्षक संघटनांची नाराजी आहे. शिक्षण विभागातील कामकाज पारदर्शी पद्धतीने होत नसून भ्रष्टाचार पद्धतीत कामकाज सुरू असल्याची जोरदार टीका या संघटनांनी यावेळी केली. कामकाजात सुधारणा न झाल्यास संघटनेच्या पाचही जिल्ह्यांतील सदस्यांना एकत्रित करुन आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय या संघटनांच्या वतीने घेण्यात आला आहे.
अंशदायी पेन्शन योजना रद्द करण्यात यावी, पीएफच्या स्लिप्स तात्काळ मिळाव्यात, अनुकंपा योजनेखाली तात्काळ नोकरी देण्यात यावी, सामान्य प्रशासन विभागाच्या १८ फेब्रुवारीच्या निर्णयाप्रमाणे ४५ दिवसात फाईल निकाली निघायली हवी, दप्तर दिरंगाई कमी व्हावी म्हणून सन २००५ ची नागरिकांची सनद याप्रमाणे कामकाज व्हावे. तसेच अनुदानास पात्र झालेल्या विनाअनुदानित शाळांना अनुदानाचे पत्र देण्यात यावे, अधिक्षक देवरे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींचा निकाल लावून कारवाई करावी या मागण्यांची पूर्तता लवकरात लवकरात व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी आर. डी. निकम, विलास पाटील, जमनादास अहिरराव, राजेंद्र सावंत, पुरुषोत्तम धांडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्ष समितीतर्फे आज महावादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नववर्ष स्वागत यात्रा समिती व संस्कृती संवर्धन न्यासच्यावतीने गुढीपाडव्याचे स्वागत करण्यासाठी पंचवटी परिसरातून साक्षी गणेश मंदिर, सुंदर नारायण मंदिर, नागचौक या तीन ठिकाणाहून आणि द्वारका येथून हिंदू नववर्ष यात्रांची सुरुवात होणार आहे. या यात्रेचा समारोप जुना भाजी बाजार, गोदाघाट, नारोशंकर मंदिरासमोर होणार आहे. समारोपप्रसंगी श्रीराम शक्तिपीठाचे १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहील.


आज महावादन
जुना भाजी बाजार, गोदाघाट, नारोशंकराच्या मंदिरासमोर सायंकाळी ६ वाजता महावादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महावादन कार्यक्रमात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील १३ पथकांचे सुमारे १००० ढोलवादक सहभागी होणार आहेत. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, १००८ सोमेश्वरानंद सरस्वती, ढोलताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, तबलावादक पंडित कमलाकर वारे, खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांची उपस्थिती राहणार आहे.


६ एप्रिलला महारांगोळी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या दोन्ही महापुरूषास अभिवादन म्हणून १२५ फूट बाय १२५ फूट रांगोळी १२५ महिलांच्या सहभागातून सकाळी ६ ते १० च्या दरम्यान रेखाटण्यात येणार आहे. महारांगोळीचा हा मान वेणाभारती महाराज यांच्या हस्ते रांगोळी रेखून होईल. सायंकाळच्या कार्यक्रमात एसीपी एन. अंबिका उपस्थित राहणार आहेत. रांगोळीचे प्रदर्शन ८ एप्रिलपर्यंत खुले ठेवण्यात आलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​'फ्रेंच भाषा शिकणे ही काळाची गरज'

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
देशात रोजच नवनवीन कंपन्या येऊ पाहात आहेत. या कंपन्यांमध्ये फ्रेंच बोलणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गरज असल्याने 'अलियोन्स फ्रोन्सिज'सारखे ट्रेनिंग सेंटर त्यात योग्य ती मदत करणार आहेत. याठिकाणी सुटसुटीतपणे फ्रेंच भाषा शिकविण्यात येणार आहे. असे प्रतिपादन फ्रान्सचे भारतातील जनरल दूव पेरों यांनी केले.
फ्रेंच भाषा शिकविणाऱ्या 'अलियोन्स फ्रोन्सिज'चे नव्या जागेत स्थलांतर झाले. या केंद्राचे उदघाटन जनरल दूव पेरों यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भाषेची अभिव्यक्ती करायची तर फ्रेंचमधून असे म्हटले जाते त्यामुळे ही भाषा शिकण्यासाठी प्राधान्य दिले जावे. फ्रेंच भाषा कल्पनांची देवाणघेवाण करणारी भाषा आहे.
या केंद्रात शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबरच डॉक्टर, इंजिनीअर, गृहिणी, वकील शिक्षण घेत आहेत. फ्रेंच संस्कृतीचा प्रचार होण्यासाठी केंद्रात नियमितपणे फ्रेंच सिनेमे दाखविण्यात येतात. फ्रेंच खाद्य पदार्थांचे वर्ग घेतले जातात. वाईन संस्कृतीशी ओळख होण्यासाठी द्राक्षमळ्यांच्या भेटीचे आयोजन करण्यात येते. नाशिकच्या केंद्रात भाषांतराचे कामही केले जाते. या केंद्रात ए १, ए २, बी १, बी २ हे स्तर शिकवले जातात. दरवर्षीच्या मार्च, जुलै, सप्टेंबर आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नवीन वर्गांची नोंदणी होते.
फ्रेंच भाषेचे शिक्षण म्हणजेच 'अलियोन्स फ्रोन्सिज' हे समीकरण जागतिक स्तरावर मान्यता पावलेले आहे. या संस्थेचे अत्याधुनिक वाचनालय, मोठे वर्ग आणि चर्चासत्राचे वर्ग असलेले नवीन केंद्र गंगापूर रोड येथे नव्याने सुरू करण्यात आलेले आहे. 'अलियोन्स फ्रोन्सिज' या संस्थेचे मूळ उद्दिष्ट्य फ्रेंच भाषेचा आणि संस्कृतीचा जगभर प्रसार असा असून २०१४ सालापर्यंत जगातील पाच खंडात १३७ देशात या संस्थेची ८५० केंद्रे आहेत. भारतातील २२ शाखांमधून १० हजार विद्यार्थी दरवर्षी शिक्षण व पदवी घेऊन बाहेर पडत
आहेत. नाशिकच्या शाखेचे काम सोनम वाधवा पहात असून त्यांचे शिक्षण फ्रान्समध्ये झालेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसला प्रथमच मिळणार संधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

महापालिकेच्या या पंचवार्षिकमधील शेवटच्या वर्षीच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. विविध पक्षांमधील ज्या नगरसेवकांना आतापर्यंत एकही पद भूषविता आले नाही असे नगरसेवक प्रभाग समितीच्या सभापती होण्यास इच्छुक आहेत. पंचवटी प्रभाग समितीतही अशीच स्थिती आहे. या सभापतीला कार्यकाळ फारसा मिळणार नसला तरी शेवटच्या टप्प्यात कामकाजाची गती वाढत असल्याने या पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे.

शहरात नगरसेवकांच्या पक्षांतराचे वारे जोरदारपणे वाहत असताना पंचवटीत मात्र शांत वातावरण होते. २०१२ च्या निवडणुकीत ज्या पक्षाकडून निवडून आले त्याच पक्षात किती नगरसेवक राहतील हा प्रश्न आहे. पक्षांतराचा फटका मनसेला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपचे पदाधिकारी मोठे मासे गळाला लावण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.

या पंचवार्षिकमध्ये पंचवटी प्रभाग समितीवर भाजपच्या प्रा. परशराम वाघेरे, शालिनी पवार, मनसेच्या लता टिळे, राष्ट्रवादीच्या सुनीता शिंदे यांची वर्णी लागली. शेवटच्या सभापतीपदासाठी महाआघाडीतील नगरसेवकाला संधी मिळणार आहे. भाजप, मनसे, राष्ट्रवादी या पक्षांच्या नगरसेवकांनी संधी मिळालेली असल्याने आता काँग्रेसला संधी आहे. मात्र काँग्रेसचे नगरसेवक या पदासाठी कितपत उत्सुकता दाखवितात हा प्रश्न आहे.

मनसेचे अशोक मुर्तडक, डॉ. विशाल घोलप, लता टिळे, गणेश चव्हाण, राहुल ढिकले, शिवसेनेच्या मनीषा हेकरे, राष्ट्रवादीच्या सुनीता निमसे, सुनीता शिंदे, समाधान जाधव, रुपाली गावंड, कविता कर्डक, भाजपच्या शालिनी पवार, सिंधू खोडे, रंजना भानसी, परशराम वाघेरे, ज्योती गांगुर्डे, फुलावती बोडके यांना विविध पदांची संधी मिळाली आहे.

अपक्ष दामोदर माऩकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने त्यांची गणती भाजपमध्ये करण्यात येत आहे. काँग्रेसचे उद्धव निमसे यांनी स्थायी समिती सभापती पद भूषविलेले आहे. तर विमल पाटील या स्थायी समितीच्या सदस्य असल्याने त्यांची प्रभाग समिती सभापतीपदी विचार होण्याची शक्यता कमी आहे.

मनसेच्या मीना माळोदे, रुची कुंभारकर हे मात्र पदांपासून वंचित राहिले आहेत. या पदासाठी कुणाला संधी मिळते याकडे लक्ष लागले आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशवंत मंडईत होणार मल्ट‌पिर्पज पार्किंग!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा विकास योजने अंतर्गत नाशिक शहरात मल्ट‌पिर्पज पार्किंग उभारण्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यानी दिली. रविवार कारंजा येथील यशवंत मंडई येथे मल्ट‌पिर्पज पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव असून हा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करावा, अशी मागणीही त्यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांनी तातडीने प्रस्ताव पाठविल्यास यशवंत मंडईत मल्ट‌पिर्पज पार्किंग होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेंतर्गत सरकारने विविध महापालिकांना निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात नाशिकला मल्ट‌पिर्पज पार्किंगसाठी दहा कोटी मंजूर केले आहेत. शासनाकडून यासाठी पाच कोटी मिळणार असून उर्वरीत पाच कोटी महापालिकेला टाकावे लागणार आहेत. त्यामुळे आमदार फरांदे यांनी मनपा आयुक्तांना पत्र देवून हा पाच कोटीचा निधी हा रविवार कारंजा येथील यशवंत मंडईच्या पुनर्विकासासाठी वापरून तेथे मल्ट‌पिर्पज पार्किंग उभे करण्याची मागणी केली आहे. आयुक्तांनी यांसदर्भातील प्रस्ताव तातडीने सरकारकडे दाखल केल्यास हा निधी मिळणार आहे. उर्वरीत पाच कोटींचा निधी महापालिकेने टाकल्यास येथील वाहतुकीचा प्रश्न मिटणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राज्यसरकारने मंजूर केलेला पाच कोटींचा निधी यशवंत मंडईत मल्ट‌पिर्पज पार्किग उभारण्यासाठी खर्च करता येईल. मनपा आयुक्तांनी सरकारकडे प्रस्ताव सादर केल्यास, त्याचा पाठपुरावा करून पार्किंग उभे करू.

देवयानी फरांदे, आमदार





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृक्षारोपणातून दिला सामाजिक संदेश

$
0
0

पूनम अहिरे, कॉलेज क्लब रिपोर्टर

गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यांत सक्रिय सहभाग असणार्या के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रिकल विभागाच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करुन सामाजिक संदेश दिला आहे. सिन्नर एमआयडीसी येथे या विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट दिली.
इंडस्ट्रिअल व्हिजीट अंतर्गत विद्यार्थ्यांनी परिसरात वृक्षारोपण करत पर्यावरण जपण्याचा अनमोल संदेश दिला. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर व विभागप्रमुख डॉ. बी. ई. कुशारे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. जवळपास ७० विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करत असतानाच पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. इलेक्ट्रिकल विभागाच्या प्रा. सुनिता खैरनार यांच्या समवेत विद्यार्थी उपस्थित होते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाखरांची तृष्णा भागवण्यासाठी सरसावले चिमुकले

$
0
0





राकेश हिरे, कॉलेज क्लब रिपोर्टर

उन्हाळ्यात जाणवणाऱ्या तीव्र पाणी टंचाईने माणसासोबतच पशुपक्ष्यांचेही हाल होत आहेत. पिण्यासाठी घोटभर पाणी मिळाले नाही तर जिथे मानवाची अवस्था अर्धमेली होते तिथे पशुपक्ष्यांची काय गत होत असेल याचा अंदाज येतो. म्हणूनच या पाखरांची तहान भागविण्यासाठी कळवण येथील फागंदर जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकले सरसावले आहेत. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाने शाळेच्या परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट ही वाढला आहे.
दिवसेंदिवस पाण्याची कमी होत असलेली पातळी आणि दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे प्रत्येकाची चिंता वाढली आहे. रानावनातील पाण्याचे पाणवठे कोरडेठाक झाल्याने पशुपक्षीदेखील आपली तृष्णा भागविण्यासाठी पाण्याच्या शोधार्थ भटकताना दिसताहेत. ही बाब लक्षात घेत पाखरांना पाण्याची सहज उपलब्धता व्हावी म्हणून देवळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फागंदर येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात असलेल्या झाडांवर जाड आवरण असलेल्या बाटल्या कापून झाडांच्या बुंध्याना अडकवल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थी दररोज त्या बाटल्यांमध्ये पाणी टाकतात. त्यामुळे याठिकाणी पाणी पिण्यासाठी पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे.
तहानेने व्याकूळ झालेल्या पक्ष्यांसाठी विद्यार्थ्यांनी निर्माण केलेली पाण्याची ही व्यवस्था सुखावह ठरली असून फागंदर शाळेचे मुख्याध्यापक आनंदा पवार यांच्या मार्गदर्शनातून व उपक्रमशील शिक्षक खंडू मोरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी भूतदयेचा आदर्श निर्माण केला आहे.
-----------

पालकांकडूनही अनुकरण
विद्यार्थ्यांनी शालेय आवारात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या केलेल्या या सोयीचे महत्त्व पटल्याने शाळेला भेट देणाऱ्या पालकांनी आणि गावातील ग्रामस्थांनीही या उपक्रमाची अंमलबजावणी करत आपापल्या घराजवळ पक्ष्यांसाठी आणि मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची अशी व्यवस्था केली आहे.

-----
'माणसांसाठी सर्वच स्तरावर काम केले जाते मात्र मुक्या जीवांसाठी खूप कमी लोक काम करतांना दिसतात. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनावर भूतदयेचे संस्कार करत आम्ही उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकणाऱ्या पक्ष्यांना पाणी उपलब्ध करून दिले आहे.'
खंडू मोरे, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, फागंदर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे मेगा ब्रॅण्डिंग

$
0
0

जनसंवादासाठी उभारणार स्वयंसेवकांची फौज

म. टा. खास प्रतनिधी, नाशिक

भाजपचा घटता जनाधार आणि शिवसेनेने निर्माण केलेली कोंडी फोडण्यासाठी भाजपच्या निवडक प्रदेश धुरिणांनी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत शनिवारी विचार मंथन केले. शिवसेनेच्या आक्रमकतेला आक्रमकतेनेच उत्तर देण्याबरोबरच ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करण्यावर बैठकीत जोर देण्यात आला. भाजपचा घटता जनाधार सावरण्यासाठी सरकार जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी केंद्र व राज्याच्या योजनांचे ब्रॅण्डिंग केले जाणार असून, त्यासाठी ४६ हजार स्वयंसेवकांची फौज उभी करण्याचा निर्णय बैठकीत झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये शनिवारपासून दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीच बैठक सुरू झाली. एकनाथ खडसेंसह राज्यभरातील भाजपचे निवडक ६०0 पदाधिकाऱ्यांनी पुढील वर्षभरातील भाजपच्या वाटचालीवर बंद खोलीत दोन तास चर्चा केली. यात विशेषतः भाजपचा शहरीसह ग्रामीण भागातील घटत्या जनाधारावर चर्चा झाली. ग्रामीण भागात काँग्रेस व राष्ट्रवादी संदर्भातील सहानुभूती वाढत आहे. त्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करत, शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून केंद्र व राज्यातील योजना त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी भाजपच मैदानात उतरणार आहे. सध्याचे वर्ष शेतकरी स्वाभीमानी वर्ष साजरे केले जाणार असून, सरकार जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी ४६ हजार स्वयंसेवकांची फौज तैन्यात करण्यात येणार आहे. त्यांच्या मार्फत भाजप हा घर घर पोहणार असून, आपली पाळेमुळे राज्यात अधिक भक्कम करणार आहे.

शिवसेनेभोवती पिंगा नाहीच भाजप विरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेला फारसे महत्त्व न देण्याची रणनीती या बैठकीत आखण्यात आली आहे. 'शिवसेनेभोवती पिंगा घालायचाच नाही,' असा आक्रमक बाणा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्याला प्रदेशाध्यक्षासह, मुख्यमंत्र्यांनीही हमी भरत, यापुढे शिवसेनेसमोर नमते घ्यायचेच नाही, असा निर्धार या बैठकीत व्यक्त केला असून, त्यावर आता रविवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. 'आता भाजपच मोठा भाऊ असून तो मोठा भाऊच राहील,' असे कृतीतून दाखवून दिले जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि भाजपचा संघर्ष अधिक चिघळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी गायले एकमेकांचे गोडवे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रदेश कार्यकारिणीत राज्यातील प्रमुख प्रश्नांवर चर्चा सुरू असतांनाच, बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एकमेकांचे गोडवे गात आपलीच पाठ थोपटून घेतली. दानवे यांनी सरकारचे काम चांगले असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांवर स्तूतीसुमने उधळली तर मुख्यमंत्र्यांनी जशास तसे परतफेड करत दानवेंच्या नेतृत्त्वाखाली पक्ष चांगली कामगिरी करत असल्याचे सर्टिफिकेट दिले आहे. सोबतच एकनाथ खडसेंसह इतर मंत्र्यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. त्यामुळे एकमेकांचे गोडवे गाण्यासाठी बैठक होती की काय, असा सवाल पदाधिकारी करत होते.

नाशिकमध्ये सुरू असलेल्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दुष्काळी परिस्थितीतही सरकार उत्तम काम करत असल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हंटले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासह राज्य विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री करत असून त्यांचे कार्य यशस्वी आहे. मंत्र‌िमंडळाला पूर्ण दुष्काळी भागात ते घेऊन गेलेत. गेल्या ५० वर्षात जेवढी कामे झाली नाहीत, तेवढी कामे भाजप सरकारने दीड वर्षात केल्याचा दावा करत दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली.

मुख्यमंत्र्यां - नीही दानवेंच्या कारकिर्दीवर स्तुतीसुमने उधळत, पक्षाची धुरा ते यशस्व‌ीपणे सांभाळत असल्याचे कौतुकोद्गार काढले. सरकार आणि संघटन सध्या राज्यात एकत्र काम करत आहे. दानवेंच्या कार्यकाळात पक्षाची घौडदौड सुरू आहे. प्रदेशाध्यक्षांच्या कामगिरीची उत्तम ठसा त्यांनी उमटविला आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाचा वारू चौफेर उधळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तसेच महसूलमंत्री एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सुधीर ठाकरे यांनी यशस्वीपणे आपल्या मंत्रालयाचा कारभार हाकला असल्याचे सांगत मंत्र्यांची पाठ थोपटली. त्यामुळे एकमेकांच्या गोडवेगाण्यावर चांगलीच चर्चा रंगली होती.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातीयवादाचे विष कालविणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फुले, शाहू आंबेडकरांचे नाव घेऊन काही लोकांनी महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले. सांप्रदायिकतेच्या, जातीयवादाच्या नावाखाली विष कालविण्याचे काम काही घटकांकडून सुरू आहे. त्यांना विकासात स्वारस्य नाही. विकासाच्या मुद्दयावर ते निवडूनही येऊ शकत नाहीत. म्हणूनच त्यांच्याकडून `नॉन इश्यू` उभे केले जातात. परंतु, त्यामुळे विचलित होऊ नका. आपण अंगिकारलेली आर्थिक नितीच देशाला, विकसनशील महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नाशिकमध्ये व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यकारीणी बैठकीच्या समारोप प्रसंगीत ते बोलत होते. यावेळी काँग्रेससारख्या विरोधी पक्षाचा समाचार घेतानाच गडकरी यांनी विविध घटकांसाठी केंद्र सरकार राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, की देशात महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. पंजाब आणि हरियाणाच्या तुलनेत येथील फारच कमी क्षेत्र सिंचनाखाली आहे. दुष्काळ हा सरकारसाठी कसोटीचा काळ आहे. म्हणूनच केंद्र सरकारने दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा लाभ महाराष्ट्रालाही मिळणार आहे. सिंचनासाठीचे बंद पडलेले राष्ट्रीय प्रकल्प (एआयबीपी) सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील गोसी खुर्द हा साडेतीनशे कोटींचा प्रकल्प आता सुमारे १८ हजार कोटींवर गेला आहे. असे प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्राने ८० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याखेरीज प्रधानमंत्री सिंचन योजनेत २० हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याने सिंचनवाढीला मदत होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. कोराडी वीज प्रकल्पासाठी सांडपाण्याच्या वापराचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. यापुढील काळात विद्युत प्रकल्पांसाठी शुध्द पाण्याऐवजी शहरातील सांडपाणीच वापरण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे गडकरी यांनी स्वागत केले. ड्रीप एरीगेशन मोठ्या प्रमाणावर करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. सेंद्रीय शेती व सेंद्रीय खतांना जगात किंमत आली आहे. म्हणूनच सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. खत‌निर्मितीसाठी कचऱ्याचा उपयोग करून घेतला जाणार असल्याचे सांगत गडकरी यांनी `वेस्ट इन टू वेल्थ`चा नारा दिला. आसमानी संकटामुळे उभी पिके शेतकऱ्यांसमोरच आडवी होतात. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जातो. आत्मविश्वासाने उभा राहू पाहणारा शेतकरी पुरता कोलमडतो. अशा शेतकऱ्यांना पंतप्रधान फसल विमा योजनेमूळे आधार मिळेल. नुकसान भरपाईच्या ६५ टक्क्यांपर्यंत विमा मिळू शकेल अशी माहिती त्यांनी दिली.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>