Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अमुल्य ठेव्यांची वाताहत

$
0
0
शहराचा सर्वांगिण विकास करण्याची अंतिम जबाबदारी महापालिकेची असते. त्यात पायाभूत सुविधांबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेने साहित्य तसेच संस्कृतीला प्राधन्य द्यावे अशी सर्वसामान्य नागरिकांची रास्त अपेक्षा असते. त्यास नाशिक महापालिकासुध्दा अपवाद नाही.

तीन लाखांचा गुटखा जप्त

$
0
0
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी दिवसभरात दोन ठिकाणी छापे टाकून तीन लाख सात हजार रुपयांचा गुटखा, पान मसाला, सुगंधीत सुपारी व तंबाख जप्त केला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संप केला वेतनही घेतले

$
0
0
विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपात सहभागी झालेल्या नाशिक जिल्ह्यातील तब्बल १९ हजार कर्मचाऱ्यांनी सरकारी आदेशालाच हरताळ फासल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होतानाच दोन दिवसाचे वेतनही घेतल्याचेही स्पष्ट होत आहे.

६५ वृक्षांचे पालकत्व

$
0
0
नाशिक-त्र्यंबकेश्वर या रस्त्याच्या चौपदरीकरणाअंतर्गत पुनर्रोपित होणाऱ्या वृक्षांची जबाबदारी घेण्यास बांधकाम व्यावसायिकांनी मान्यता दिली आहे. एकूण ६५ वृक्षांचे पालकत्व बांधकाम व्यावसायिक घेणार आहेत. त्यामुळे वृक्ष पुनर्रोपणाच्या बाबतीत आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.

एस्कॉर्टमध्ये होतोय महाघपला

$
0
0
एस्कॉर्टद्वारे मालेगाव महापालिकेला मिळणारे उत्पन्न नाशिकपेक्षा अनेकपटीने अधिक असल्याचे समोर आल्याने नाशिक महापालिकेच्या एस्कॉर्ट उत्पन्नांत मोठ्या प्रमाणावर घपला होत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

अखेर मुहूर्त सापडला!

$
0
0
महापालिकेची सत्ता मिळून दीड वर्ष झाली तरी विकासकामांना प्रारंभ न झालेल्या मनसेला अखेर मुहूर्त सापडला आहे.

सिन्नरमधील अतिक्रमणांना रोखण्याची मागणी

$
0
0
सिन्नर शहरात दिवसेदिवस अतिक्रमणे वाढत असून, त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.

मांजरपाड्याचा दुसरा टप्पाही मार्गी लागणार

$
0
0
बहुचर्चित मांजरपाडा वळण योजनेचा दुसरा टप्पा लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

बाप्पा मढणार दागिन्यांनी!

$
0
0
गणेशाचा उत्सव म्हणजे सजावटीचा उत्साह. पारंपरिक ते ट्रेण्डी सजावट करण्यासाठी हाच कालावधी असल्याने बच्चेकंपनी ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण बाप्पाच्या दिमतीला हजर राहतात.

कृषी पंपाचे बिल भरणे आवश्यक

$
0
0
कृषी पंपधारकांनी पाच त्रैमासिक बिलांपैकी दोन त्रैमासिक बिलांची रक्कम तातडीने भरावी. उर्वरित तीन त्रैमासिक बिलांची रक्कम ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात तीन समान हफ्त्यांत भरावी असा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राष्ट्रीय जलपरिषदेत गोदावरी बचावाचा ठराव

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारण्याचा ठराव करण्यात आला आहे. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाचव्या राष्ट्रीय जलसंमेलनात गोदावरी बचावाचा निर्धार करण्यात आला.

सर्वशिक्षा अभियानामार्फत विद्यार्थ्यांना गणवेश

$
0
0
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या जबाबदारीचा काही भाग सर्व शिक्षा अभियानामार्फत उचलण्यात आला आहे.

समाज कल्याणच्या १४ व १५ ला परीक्षा

$
0
0
समाज कल्याण आयुक्तालय, पुणे आणि त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांतर्गत शिक्षण विभागातील पदांसाठी १४ व १५ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये विभागस्तरावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

जादुटोणाविरोधी कायद्यावर रविवारी व्याख्यान

$
0
0
अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीमार्फत प्रा. शाम मानव यांच्या ‘जादुटोणा विरोधी कायदा : समज-गैरसमज’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ सप्टेंबरला (रविवार) दुपारी साडेबारा वाजता महाकवी कालिदास कलामंदिरामध्ये हे व्याख्यान होणार आहे.

आणखी किती दिवस गढूळ पाणी प्यायचं ?

$
0
0
पुन्हा वाढला डासांचा उपद्रव सिडको परिसरात साचून राहिलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे डासांचा उपद्रव पुन्हा वाढला आहे. जागोजागी वाढलेली गाजरगवत, ओपन प्लेसेसवर वाढलेली झाडे, झुडुपे यामुळे डासांना लपायला आयतीच जागा मिळत असून डासांच्या चावण्यामुळे रोगराई पसरण्यातही वाढ होत आहे.

रिव्हॅल्युएशनच्या मागणीला जास्त मार्कांचा उतारा

$
0
0
अनुभवातून सुचले शहाणपण ? उत्तरपत्र‌िकेमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न झाल्याचा अनुभव आरोग्य विज्ञान विद्यापीठाला गतवर्षी आल्याने या प्रकरणी तीन चौकशी सम‌ित्यांनी सल्ल्यांचे डोस विद्यापीठाला दिले होते.

‘गेट वेल सून’ सवलतीच्या दरात

$
0
0
नाट्यप्रेमी नाशिककरांना सातत्याने चांगली नाटके उपलब्ध करुन देणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मार्फत ‘गेट वेल सून’ हे नाटकही सवलतीच्या दरात पहायला मिळणार आहे. रीडर्स ऑफर काँटेस्टमधील विजेत्यांना हे नाटक मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे.

तेरा शिक्षकांना आदर्श पुरस्कार

$
0
0
महापालिकेकडून दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षण विभागाने जाहिर केला असून शहरातील १३ शिक्षकांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कार जाहीर केला आहे. मागील दोन वर्षांपासून पुरस्कार देताना होणारी चालढकल पाहता यंदा तरी वेळेवर पुरस्कारांचे वितरण व्हावे अशी अपेक्षा शिक्षक वर्गातून व्यक्त केली जात आहे.

नाशिकरोडला उद्या पाणी नाही

$
0
0
नाशिकरोड विभागातील भीमनगर येथील जलकुंभाची गळती बंद करायची असल्याने काही भागात शुक्रवार सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. अशी माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

जलपुजनावर विरोधकांचा बहिष्कार

$
0
0
गंगापूर धरणात अपेक्षित पाणीसाठा झाल्यानंतर शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांच्या हस्ते दरवर्षी जलपुजन केले जाते. त्यास सत्ताधारीसह विरोधी गटातील सर्व पदाधिकारी हजर असतात.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images