Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘मसाप’ निवडणुकीसाठी नवनिर्माणची मोर्चेबांधणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पदाधिकारी प्रचारासाठी बुधवारी कुसुमाग्रज स्मारकात नवनिर्माण पॅनलच्या उमेदवारांची विशेष बैठक झाली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक १५ मार्चला होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या १८ जिल्ह्यातील सभासदांना पोस्टाने मतपत्रिका पाठवण्यात आल्या असून त्याद्वारे मतप्रक्रिया होणार आहे. या मतपत्रिका १४ मार्चपर्यंत पुण्यात पोचल्यानंतर १५ मार्च रोजी मतपत्रिकांची मोजणी होणार असून जिल्ह्यातील सभासदांच्या संख्येनुसार विभागाला प्रतिनिधित्व दिले जाणार आहे.

जिल्ह्यात 'मसाप'चे एकूण ५५० सभासद असून त्यासाठी दोन जागांवर मतदान घेतले जाणार होते; मात्र कवी प्रकाश होळकर व नितीन ठाकरे यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. संस्थेचे इतर पदाधिकारी हे थेट सभासदामधून निवडले जातात. नवनिर्माण पॅनलचे कार्याध्यक्षपदासाठी राजेंद्र बर्वे, कार्यवाहपदासाठी सुनील महाजन व कोषाध्यक्षपदासाठी योगेश सोमण यांनी नाशिकच्या सभासदांची भेट घेऊन आपल्या पॅनलचा अजेंडा समजावून सांगितला.

राजेंद्र बर्वे म्हणाले, की साहित्य संमेलनाच्या मतदान प्रक्रियेत सर्व सभासदांना थेट सामावून घ्यावेत यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच पुणे येथील महाराष्ट्र परिषदेची इमारत मोडकळीस आली आहे. ती नव्याने बांधली जाण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. बाल साहित्याला विशेष स्थान दिले जाणार आहे. साहित्य केंद्री वातावरण निर्मितीवर भर दिला जाणार आहे.

मतदान मात्र अवश्य करा!

'मसाप'च्या कार्यवाह माधवी वैद्य म्हणाल्या, की कुणालाही मतदान करा पण मतदान अवश्य करा असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी महाराष्ट्र परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष विनायकदादा पाटील, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, कार्यवाह स्वानंद बोदरकर, किशोर पाठक व डॉ. रमेश वरखेडे यांच्यासह सभासद उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुसऱ्यांच्या सुखासाठी राबणारे कष्टात!

$
0
0



दुसऱ्यांच्या सुखासाठी राबणाऱ्या कामगारांपैकी प्रथम डोळ्यापुढे येतात ते म्हणजे बांधकाम कामगार. जगासाठी बंगले, सोसायट्या ते बांधतात पण स्वतः मात्र राहतात कसेबसे लहानशा घरात. गवंडी, प्लंबर, वीटा, वाळू वाहण्यापासून ते सेंट‌रिंगसारखी अतिकष्टाची पण तितकीच कौशल्याची कामे ते करतात. प्रसंगी जोखीमही पत्करतात. त्यांना काम देणारे प्रचंड पैसे कमावतात. पण हे कामगार कष्टाचेच जीवन जगतात. मजूर नाक्यांवर ते कामाच्या प्रतिक्षेत तासनतास ताटकळतात. राज्यात चारी दिशेला विखुरलेले हे कामगार आहेत. त्यांची संघटना बांधणे अतिशय कठीण आहे. काही नेत्यांनी कष्टपूर्वक त्यांची युनियन केली, यशस्वीपणे. वर्षानुवर्षे सतत आंदोलने केली. राज्यस्तरीय बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मिळवले. ते स्थापनेपासून व्यावसायिकांकडून १ टक्का दराने सेस वसूल करीत आहेत. आजपर्यंत राज्यात साडेचार हजार कोटी सेस जमा झाला आहे. सततच्या चळवळीमुळे मंडळाने प्रसुती, शिक्षण, अपघात, विमा, शिष्यवृत्ती, अपंगत्व अशा कितीतरी कल्याणकारी योजनांमध्ये वाढ केली. कामगारांना आरोग्य विमा स्मार्ट स्वरूपामध्ये ओळखपत्र देण्याचे मान्य झाले.

कामगारांचे बांधकाम क्षेत्रातील लक्षणीय योगदान, सततची चळवळ, जोडीला मंडळ, विविध कल्याणकारी योजना तरीही खऱ्या अर्थी विविध लाभांपासून कामगार कोसो दूर आहेत. त्यांना चांगले सुसह्य राहणीमान प्राप्त झालेले नाही. कागदावर सर्व गोष्टी झाल्यात. पण कामगारांची मंडळाकडे नोंदणीचे प्रोसिजर क्लिष्ट आहे. कामाची व्याप्ती बघता मंडळाचे मनुष्यबळ तोकडे आहे. एकूणच काय तर सरकारचा नाकर्तेपणा. कामगारांकडे बघण्याचा सरकारचा दृष्टीकोन योग्य व कर्तव्य तत्परतेचा हवा. तो नाही म्हणून चळवळ उग्र करण्यास कामगार वा त्यांच्या संघटनांकडे पर्याय राहात नाही. सध्याचे सरकार तर नोंदणी पुरी व्हावी जिल्हा निहाय मंडळ स्थापन्न व्हावीत यामध्ये पुढाकार घेऊन प्रोसिजर सुटसुटीत सोपे करण्याऐवजी कामगार कायद्यांमध्ये कामगार विरोधी बदल करण्यामागे लागले आहे.

दुसरे असे कामगार म्हणजे दिवसभर मणामणांच्या ओझी, पोती पाठीवर-मानेवर वाहणारे माथाडी कामगार. रेल्वे गाडीत मालधक्का-सरकारी धान्य गोडाऊन, गॅस प्रकल्प, खाजगी उद्योग अशा ठिकाणी लोडिंग-अनलोडिंगची प्रचंड अंग मेहनतीची ते काम करतात. राज्यात १२ लाखांच्यावर त्यांची संख्या आहे. समाजव्यवस्थेमध्ये श्रमाला कमी मूल्य देण्याच्या प्रथेमुळे सर्वसाधारणपणे दिवसा-रात्री राबणाऱ्यांना ना पुरेसा मोबदला मिळत ना चांगले जीवन.

संघटनांच्या सततच्या प्रभावी आंदोलनामुळे माथाडींची सेवा नियमित करणे सेवाशर्ती निश्चित करणे, कल्याणकारी योजना करणे यासाठी स्वातंत्र्याच्या २२ वर्षानंतर सरकारने त्यांच्यासाठी कायदा केला. कायद्यानुसार माथाडी कामगार मंडळाकडे मोठी लेव्ही बोर्डात भरण्याची पद्धत सुरू झाली जेणेकरून त्यांना विविध लाभ जसे पीएफ, बोनस, घरभाडे नुकसान भरपाई, सुट्ट्या मिळाव्यात.

तसेच आणखी एक महत्त्वाचा दंडक म्हणजे मंडळाचे लाभ मिळण्यासाठी कामगार नोंदीत झाला पाहिजे. हाच मोठ्ठा प्रश्न आहे. ३५ टक्के लेव्ही द्यावी लागू नये म्हणून काहीही करून नोंदणी होऊ नये असे पाहण्यात येते. राज्यातील १०-१२ लाख व जिल्ह्यातील ७५ हजार कामगारांपैकी १० टक्केच नोंदीत आहे. तेव्हा कामगारांची परिस्थिती किती बिकट आहे हे लक्षात येईल. लाभांपासून ते मंडळ स्थापना अशा लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टीसाठी कामगारांना संघटनांना संघर्षाचे एकमेव हत्यार हाती घ्यावे लागते. नोंदणी अधिक होण्यासाठी मंडळांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सरकारचा हस्तक्षेप व वचक पाहिजे. पण तसे नाही! राबणाऱ्या कामगारांच्या श्रमाला मूल्य नाही हीच गोष्ट येथेही खरी ठरते. समाजातच मूलतः दृष्टीकोनात बदल होणे आवश्यक आहे. चळवळीचे महत्त्वही पटले पाहिजे.

सुरक्षा रक्षक कामगार म्हणजे जो सदैव दुसऱ्यांचे संरक्षण करतो; पण स्वतः असतो कायम असुरक्षित. त्याला तब्बल बारा-बारा तास काम करावे लागते. पीएफ सुट्ट्या, कामगार विमा योजना, नोकरीची शाश्वती, किमान वेतन, साधा गणवेशही नाही. अशा हलाकीच्या परिस्थितीत त्याला काम करावे लागते. वैशिष्ट्य म्हणजे आपल्या पसंतीची युनियन करण्याचा घटनात्मक अधिकारही नाकारला जातो. अशाही परिस्थितीत युनियन्स कष्टपूर्वक त्यांच्या संघटना बांधून त्यांच्यावरील अन्याय दूर करीत आहे. युनियनच्या चळवळीमुळे प्रमुख जिल्ह्यांमध्ये सुरक्षा रक्षकांच्या हक्कांचे संरक्षण व नोकरीचे नियमन करावे म्हणून सुरक्षा रक्षक मंडळाची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु, सार्वजनिक क्षेत्रात जे काम सुरक्षा रक्षक करतो तेच काम करणाऱ्या पूर्वीच्या कर्मचाऱ्याला तिपटीहून अधिक पगार मिळतो असे जीवघेणे चित्र आहे. सरकारची त्याला संमती आहे. हल्लीचे सरकार तर कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल करून अधिक कठोर पावले उचलत आहे.

एकत्रित विचार केल्यास मानवतावादी विचार समाजात लोप पावत आहे, असे दिसते. खंरतर आधुनिक भौतिकवादाच्या तत्त्ववेत्यांनी फार पूर्वीच मांडले आहे की, समाज हा मानवतावादी विचारावर उभा असला पाहिजे.

(लेखक कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकांसाठी सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील १८ ते २५ वयोगटातील युवकांसाठी सैन्य व पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी २३ ते २५ फेब्रुवारी या काळात निवड करण्यात येणार आहे. समाज कल्याणतर्फे याचे हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण आवश्यक असून प्रशिक्षणासाठी येताना जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, बारावी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक, रहिवासी दाखला, सेवा योजन कार्यालयांतर्गत नावनोंदणी दाखला व ओळखपत्र यांचे मूळ दाखले व साक्षांकित प्रतिसोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या निरोगी व सक्षम असायला हवा. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी २३ ते २५ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, नाशिक-पुणे रोड, नाशिक येथे हजर राहण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेटी बचाओ’साठी आराखडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारतर्फे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. अभियानाच्या प्रभावी अमलबजावणीसाठी अधिकारी व नागरिकांकडून सुचना मागवून एकत्रित कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी बुधवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तर कृतिदलाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी (सीईओ) अधिकारी मिलिंद शंभरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे, जिल्हा शल्य ‍चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी देवेंद्र राऊत आदी उपस्थित होते.

यावेळी कुशवाह म्हणाले, विविध स्तरातून प्राप्त सुचनांच्या आधारे आराखडा तयार करण्यासाठी सविस्तर बैठकीचे आयोजन करा. विषयाचे गांभीर्य समाजाच्या विविध स्तरावर पोचविण्यासाठी प्रयत्न केले जावेत. मुलीच्या जन्माचे स्वागत करताना 'पीसीपीएनडीटी' कायद्याच्या प्रभावी अमलबजावणीकडे लक्ष द्या, अशी सूचना यावेळी त्यांनी केली. प्रत्येक आठवड्याचा कृती अहवाल सादर करण्याच्या सुचनाही संबंधितांना करण्यात आल्या. मुलींच्या संरक्षणासंबंधी असलेल्या यंत्रणेची माहिती नागरिकांपर्यंत पोचवावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाची सुरुवात हरियाणातील पानिपत येथे जानेवारी २०१५ मध्ये करण्यात आली. पहिल्या टप्प्यात देशातील १०० आणि राज्यातील १० जिल्ह्यांचा समावेश या अभियानांतर्गत करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यास ५ फेब्रुवारी २०१६ पासून सुरुवात झाली असून त्यात देशातील ६१ आणि राज्यातील नाशिकसह ६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्ह्यात महिलांचे प्रमाण ९३४

'बेटी बचाओ' अभियानांतर्गत पाच वर्षाखालील मुलींच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे, दरवर्षी लिंग गुणोत्तर वाढविणे, मुलींचा पोषणस्तर उंचावणे, माध्यमिक शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढविणे, प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृह आदी विविध उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात ० ते ६ वयोगटातील मुलींचे प्रमाण ८९० असून महिलांचे प्रमाण ९३४ असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... तर वाचला असता जीव!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयितांसमवेत एवढ्या रात्री जाऊ नका असे मंगवाना यांची पत्नी, आई आणि मुलाने त्यांना सांगितले. मात्र, रणजीत मंगवाना यांनी ऐकले नाही. कुटुंबीयांचे ऐकले असते तर रणजीत यांचा जीव वाचू शकला असता अशी माहिती पुढे आली आहे.

बुधवारी रात्री पाऊणच्या सुमारास मंगवाना घराजवळ आले. त्याचवेळी घराबाहेर थांबलेले संशयित त्यांना आपल्या समवेत चालण्यास सांगत होते. त्यावेळी हे चौघे कशासाठी आले अशी विचारणा पत्नी गीता, आई कमलाबाई यांनी रणजीत यांना केली. या चौघांसोबत तुमचे अनेकदा भांडण झाले आहे. त्यांनी तुम्हाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. तेव्हा त्यांच्यासमवेत जाऊ नका असे त्यांना सांगूनही रणजीत यांनी ऐकले नाही, असे गीता यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

रणजीत कपडे बदलून घराबाहेर पडले. काही विपरीत घडेल या धास्तीने गीता व नणंद पूनम रिक्षातून मागोमाग गेल्या. त्यावेळी जैन भवनजवळ रणजीत यांना मारहाण सुरू होती. आरडाओरड करीत त्यांनी रणजीतच्या दिशेने धाव घेतली. मात्र, त्याचवेळी संशयितांनी गावठी कट्ट्यातून रणजीत यांच्या डोक्यात गोळी झाडली. मदतीसाठी दोघींनी आरडाओरडा केला. मात्र, तत्काळ मदत मिळू शकली नाही. कुटुंबीयांचे ऐकले असते तर रणजीत यांचा जीव वाचू शकला असता अशी चर्चा या घटनेमुळे सुरू आहे. रणजीत यांच्या पश्चात आई कमलाबाई, पत्नी गीता, मुलगा युवराज (वय ९), विराज (वय ७) आणि साईराज (वय ३) असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनविसे जिल्हा संघटकपदी गावंडे

$
0
0

म. टा.​ प्रतिनिधी​, देवळाली कॅम्प

आगामी मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पदाधिकाऱ्यांचे खांदेपालट मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण राज ठाकरे यांनी अवलंबले आहे.

यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी आदित्य शिरोडकर यांची निवड करण्यात आली असून संघटकपदी सचिन गावंडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारी सोडून सन्मानाने जगणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कालपर्यंत आम्ही पोलिसांपासून दूर धावत होतो. परंतु, पोलिसांनी वेळीच डोळे उघडल्याने आता स्वत:चे करिअर घडविण्यासाठी धावणार आहोत. कळत नकळतपणे आमचे पाऊल गुन्हेगारी क्षेत्रात पडत होते. परंतु, आता गुन्हेगारीची वाट सोडून सन्मानाने जगण्याचा संकल्प आम्ही करणार आहोत, अशी ग्वाही पोलिस अधिकाऱ्यांना देताना त्यांच्या डोळ्यांत होती पश्चातापाची आसवे.

शहरातील गुन्हेगारी टोळ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत तसेच, कळत नकळतपणे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या १५ ते १७ वयोगटातील मुलांचे पोलिसांकडून समुपदेशन करण्यात आले. अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. केवळ सिडकोतच नव्हे तर शहरात दहशत निर्माण करणारी टिप्पर गँग, राक्या कोष्टी गँग, पाण्या बोरसे गँगशी संबंधित सुमारे १०० हून अधिक मुलांना समुपदेशनासाठी अंबड पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले होते. विशेष म्हणजे पोलिस निरीक्षक बर्डेकर यांनी केलेल्या आवाहनाला या मुलांनीही उत्तम प्रतिसाद दिला. गुन्हेगारी क्षेत्राकडे वळल्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या धोक्याची कल्पना त्यांना देण्यात आली. तुम्ही सर्व कामगार आणि कष्टकऱ्यांची मुले आहात. तुमचे पालक कष्टाने आणि सन्मानाने जीवन जगत असताना तुम्ही गुन्हेगार असा शिक्का स्वत:वर मारून घेणार का? असा सवाल या मुलांना विचारण्यात आला. कळत नकळतपणे केलेले कोणतेही बेकायदेशीर कृत्य हा गुन्हा असतो. तुम्ही कितीही चांगले असाल तरी कायदा गुन्ह्याचे स्वरूप पाहून कार्यवाही करतो, याची जाणीव या मुलांना करून देण्यात आली.

डोळ्यांत होती पश्चातापाची आसवे

मैदानी खेळ खेळा, शरीर बलदंड करून पोलिस किंवा सैन्य दलात भरती व्हा. त्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही बर्डेकर यांनी या मुलांना दिली. तुम्हाला पुस्तके पुरविण्यापासून ते मान्यवरांचे मार्गदर्शन मिळवून देण्यापर्यंतचे उपक्रम राबविण्यात पोलिस पुढाकार घेतील, अशी ग्वाही ही दिली. मोबाइल, पैसे अशा किरकोळ स्वरुपाच्या आमिषांना भुलून गुन्हेगारांच्या पावलांवर पाऊल ठेवू नका, असे आवाहन करण्यात आले. यापूर्वी झालेल्या चुका पुन्हा करणार नाही, असा शब्द देताना काही मुलांच्या डोळ्यांमधून यावेळी आसवे गळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज मस्तकाभिषेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

श्री मांगीतुंगी सिद्धक्षेत्र येथे विविध धार्मिक उत्सव, महापूजा, जन्मकल्याणक, जन्माभिषेक, केवलज्ञान कल्याणक विधी संपन्न होऊन अंतिम मोक्ष कल्याणक पूर्णाहुती हवन व रथयात्रा उत्साहात होऊन भगवान ऋषभदेव यांची मूर्ती दर्शनाकरिता भाविकांसाठी खुली करण्यात आली. आज (१८ फेब्रुवारी) पासून ६ मार्चपर्यंत महामस्तकाभिषेक सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ऋषभगिरी पर्वतावर भाविकांना येण्या-जाण्यासाठी मार्ग खुला केला आहे.

जैन धर्मिय परंपरेनुसार भगवान ऋषभदेव यांना दैवत्व बहाल करण्याचा संपूर्ण विधी झाल्यानंतर अंतिम कार्यक्रम मोक्ष कल्याणक हा विधी बुधवारी सकाळी पार पडला. भगवान साक्षात मोक्ष अर्थात अनतांत विलीन होऊन अमिनिद्रय सुखात निमग्न राहून परत कधीही या पृथ्वीवर अवतार घेणार नाही. यामुळेच या विधीला जैन बांधव मोक्ष कल्याण विधी म्हणून संबोधित असतात. यासाठी आवश्यक विधीपूजा, महापूजा करण्यात आल्या.

दरम्यान, आज, गुरुवारी ऋषभगिरी पर्वतावरील भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी उंच मूर्तीवर महामस्तकाभिषेक सोहळा होत आहे. हा महामस्तकाभिषेक समारंभ दि. ६ मार्च २०१६ पर्यंत सुरू असणार आहे. यासाठी ऋषभगिरी पर्वत न्हाऊन निघाला आहे. या पर्वताच्या मध्यापर्यंत वाहन ये- जा करू शकते. मात्र मूर्तीपर्यंत पोहचण्यासाठी सुमारे १५० पायऱ्या चढून जावे लागणार आहे. महामस्तकाभिषेक समारंभाच्या निमित्ताने लिप्टचे काम पूर्णत्वास आले असून, लोखंडी जिने व पायऱ्यांचे टप्पे देखील तयार करण्यात आले आहेत.

जि. प.च्या आरोग्य विभागाने या ११ केंद्रे स्थापन केली. सुमारे तीन रुग्णांनी या ठिकाणी सेवा घेतली असून, अत्यंत अवघड अशा तीन ते चार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेच्या तीन सुसज्ज बंबासह सटाणा, मालेगाव येथील अग्निशामक दलाचे पथक या सुरक्षितेतसाठी तैनात केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिलाने पळवले तोंडचे पाणी

$
0
0

बिलाने पळवले तोंडचे पाणी

म. टा. प्रतिनिधी, सिडको

अनियमितपणे मिळणारी पाण्याची बिले आणि बिलावर येणारा हजारो रुपयांचा आकडा यामुळे सिडको तसेच सातपूर परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. पाण्याचे स्वतंत्र कनेक्शन घेतल्यानंतरही जुन्या एकत्रित कनेक्शनच्या बिलाची भरपाई करण्याची वेळ या भागातील रहिवाशांवर आली आहे.

सिडको व सातपूरच्या अनेक भागात बांधकाम व्यावसायिकांनी रो-हाऊसेस उभारताना केवळ एकाच व्यक्तीच्या नावावर पाण्याचे कनेक्शन घेऊन अनेक घरांना पाणी पुरवठा केला. पुरेसा पाणी पुरवठा मिळण्यासाठी कालांतराने या रहिवाशांनी स्वतंत्र कनेक्शन घेतले. परंतु यावेळी जुन्या कनेक्शनधारकांचे बिल घेऊन ते कनेक्शन बंद करण्याचे काम महापालिकेने केले नाही. याचा मोठा फटका जुने कनेक्शन ज्या ग्राहकाच्या नावावर आहे त्याला बसत असल्याचे निदर्शनास आले आहे. नवीन स्वतंत्र कनेक्शनच्या बिलासह जुन्या एकत्रित कनेक्शनच्या बिलाची भरपाई अनेकांना करावी लागत आहे. याबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. पाण्याचे नवीन कनेक्शन देताना संबधित ग्राहकांनी मागील बिलाची रक्कम अदा केली आहे की नाही, याबाबत कुठलीच माहिती न घेता कनेक्शन देण्याचे काम महापालिकेमार्फत झाले आहे. त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी रहिवासी क‌रीत आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणात जलकुंभ, पण तहान भागेना!

$
0
0

अंगणात जलकुंभ, पण तहान भागेना! म. टा. प्रतिनिधी, पंचवटी 'आमच्या भागात नव्हे तर आमच्या अंगणात पाण्याचा जलकुंभ असूनही आमची तहान भागत नाही', असा सूर पंचवटीतील सिद्धेशवर नगरातील महिलांकडून उमटत आहे. या भागात अतिशय कमी दाबाने पाणी येत असल्याने लवकरात लवकर पुरेशा दाबाने पाणी मिळावे अशी मागणी महिलांनी केली आहे.

सिध्देश्वर नगरातील गणपती मंदिराच्या परिसरात पाण्याचा भव्य जलकुंभ असूनही परीसारतील नागरिक मुबलक पाण्यापासून वंचित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात ही समस्या कायम आहे. यबाबात अनेकदा मागणी करुनही त्यावर कार्यवाही झालेले नसल्याचे सांगण्यात आले. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाणी भरण्यास बराच वेळ लागतो, कित्येकदा पाणी पूर्ण भरुन होईपर्यंत पुरवठा बंद होतो अशी माहिती या भागातील रहिवाशांनी दिली.

याबाबत अभ्यास करुन पाणीपुरावठा योग्य दाबाने कसा करता येईल याचे नियोजन करण्याची सूचना पाणी पुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना केल्याचे सभापती शिंदे यांनी सांगितले. पाणी पुरवठा विभागाला सूचना मिळालेल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी कधी होईल याबाबत मात्र नागरिकांमधून शंका उपस्थित होत आहे. तसेच या परिसरात खूप मोठा प्लॉट आहे व मंदिरही आहे. पण या भागात उद्यान नाही. या ठिकाणी उद्यानची निर्मिती करावी, मंदिराच्या समोर सभामंडप उभारावा आणि आमदार निधीतून ग्रीन जिम तयार करावी अशी मागणी देखील रहिवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्र गेले, फलक उरले!

$
0
0

केंद्र गेले, फलक उरले!

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेने गोदावरी आपत्कालीन वैद्यकीय सेवा व प्राथमिक स्वास्थ्य केंद्राची उभारणी केली होती. कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तीन तारखा झाल्यानंतर हे आरोग्य केंद्र बंद झाले होते. परंतु आरोग्य केंद्र बंद झाले असताना इथे लावलेले आरोग्य केंद्राचे फलक मात्र आजही तसेच आहेत. प्राथमिक स्वास्थ्य केंद्रआपत्कालिन वैद्यकीय सेवा असे फलक इथे असल्याने या भागात येणारे पर्यटक आरोग्य केंद्राची विचारणा करत असल्याचे पुजाविधी करणाऱ्या गुरुजींमार्फत सांगण्यात आले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण अहवालाची निर्मितीपूर्वीच दुर्दशा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून तयार होणारा पर्यावरण अहवाल यंदाही दुर्दशेच्या फेऱ्यात सापडला आहे. फेब्रुवारी महिना सरत आला असून, सदर अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेला अद्याप ठेकेदारच उपलब्ध झालेला नाही. ३१ जुलैच्या आत सदर अहवाल महासभेला सादर करणे बंधनकारक असून, दोन-तीन महिन्यांत ठेकेदार वस्तुनिष्ठ अहवाल तयार करणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहर परिसरातील वातावरण शुध्द ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे दरवर्षी शहरातील वातावरणात काय बदल होतात? शहरातील पाण्याची शुध्दता, कचरा, हवा तसेच ध्वनी प्रदूषण यांचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून त्यावर ठोस उपाययोजना महापालिकेने राबवणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका दरवर्षी या क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करते. वर्षभरातील सण-उत्सव यासह इतर घडामोडींमुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून अहवाल प्रशासनामार्फत महासभेला सादर केला जातो. हा अहवाल तयार करण्यासाठी सुमारे ४ लाख रुपये खर्ची पडतात. मात्र, बऱ्याचदा या अहवालातील जुनीच माहिती नव्याने सादर केल्याचे प्रकार उघडकीस येतात. त्यामुळे पर्यावरणीय स्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल समोर येत नाही. तसेच या अहवालातील दाव्यांबाबत गांर्भियाने विचार होताना दिसत नाही. सध्या, २०१६ या वर्षातील पर्यावरण स्थिती अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. मात्र, हा प्रकार वराती मागून घोडे दामटण्यासारखा असल्याची टीका केली जात आहे.


निष्पन्न काय होणार?

जुलै अखेरीस अहवाल महासभेत सादर होणे बंधनकारक आहे. अद्याप कार्यक्षम संस्था पुढे न आल्याने महापालिकेला दुसऱ्या वेळेस निविदा सूचना प्रसिध्द कराव्या लागल्या आहेत. १८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्जांची विक्री होणार असून पुढील प्रक्रिया २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, त्यासाठी सदर संस्थांनी रस दाखवणे आवश्यक आहे. साधारणतः पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत संबंधित संस्थेला आपला अहवाल तयार करावा लागणार असून त्यातून फारसे काही निष्पन्न होणार नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुशिलाबाईचा दवाखाना

$
0
0

धनंजय गोवर्धने
चांगल्या कापडाची मोठ्या आकाराची बाळाती दुपटी करुन, स्वच्छ धुवून वाळवून, घड्या करुन ठेवे, घरात किराणा सामान भरुन ठेवे आणि गरज भासेल तेव्हा कोणा तरी मोठ्या बाईला, मावशीला, काकूला बरोबर घेऊन सुशिलाबाईच्या दवाखान्यात जाई.

पंचवटीतल्या शनिमंदिरासमोर सुशिलाबाईचा दवाखाना होता. खरंतर हा एक मुंबईस्थित गुजराथी कुटुंबियांनी त्यांच्या ट्रस्ट मार्फत चालवलेला 'केलीबाई ट्रस्ट'चा धमार्थ दवाखाना होता. कोपऱ्यावरती एका भिंतीवर सिमेंटच्या काळ्या रंगात रंगवलेला फळा होता. बाजूला गाळ्यांमध्ये दुकाने होती. टेलर, किराणा, किरकोळ वस्तू अशी, मधोमध घडीचा लोखंडी दुमडणारा दरवाजा, रात्री बेरात्री तेथून आवाज देता यायचा. दरवाजा उघडला की आधार वाटायचा, सुशिलाबाई लगेच यायच्या गोऱ्यापान, उंच, भरपूर काळे केस, त्यांचा मोठा अंबाडा, मानेवरती रुळणारा गोल आकाराचा तपकिरी रंगाच्या फ्रेमचा चष्मा, पांढरी शुभ्र नऊवारी साडी, पांढराच ब्लाऊज, प्रसन्न चेहरा, प्रेमळ आवाज, त्यांच्या आवाजानेच बाईला धीर यायचा.

लाकडी व अरुंद पायऱ्यांवर चढून वर गेले की एक टप्पा, तिथं मोठी खिडकी, वरती सात-आठ पायऱ्या सहज सोप्या, उजव्या बाजूला लाकडी कपाटं, त्या कापाटावरती लहान मोठ्या आकाराच्या काचेच्या बाटल्या, त्यात तिळाच्या तेलासारखा पण जास्त घट्ट आणि लालसर द्रव पदार्थ त्यात तरंगणारे विविध आकाराचे आणि आरशातले लालसर गर्भ. मला त्यांच्याविषयी नेहमी उत्सुकता असे. पण धाडस होत नसे. एक भीती वाटायची. दवाखान्यात गंभीर वातावरण असायचे. बाई आल्या की, सर्वांशी आस्थेने बोलत. हवं नको ते औषधांची चौकशी करत. बाईला घरच्या माणसांची उणीव भासू नये याची दक्षता घेत. आईला आणलेला तुपाचा शिरा आई एक घास घे असं म्हणून डब्याच्या झाकणात गरम गरम शिरा काढून देई.

लहानपणी खेळतांना पडलं लागलं की गणेशवाडीच्या कोपऱ्यावरती असलेल्या दवाखान्यात जायचो. तीन दगडी पायऱ्या चढून आत गेलं की डाव्या हाताला कंपाऊंडरची केबिन, उजवीकडे एक मोठ्ठा टेबल त्यावर हिरवं वूलनचं कापड, डाव्या हाताला लाकडी त्रिकोणी पाटी त्यावर पांढऱ्या अक्षरात डॉ. देव असं लिहिलेलं, एक दोन पेन कागद आणि स्टेथस्कोप, किरकोळ लागलं की कंपाऊंडर काकाच काळपट, जांभळट असं आयोडीन कापसावर घेऊन जखमेवर लावत. फुंकर मारत आपण दोन्ही हातांनी गुडघा कितीही घट्ट धरुन ठेवला तरी डोळे फितूर व्हायचे. जखम जास्त असली तर काका एक डबा उघडायचे त्याचा भपकन वास यायचा. मग एक सुरी घेऊन ते डब्यातला मलम कागदावर काढून त्याची पूडी बांधून द्यायचे. एक दोन दिवसात जखम भरुन यायची.

थंडी वाजून ताप आला आणि एक दोन दिवस राहिलाच तर मग डॉ. बदलानींकडे जावं लागे. डॉ. लालचंद बदलानी मालवीय चौकात त्यांचा दवाखाना. ते पंजाब सिंध प्रांतातले. त्यांची डॉक्टरकीची पदवी, ग्रुप फोटो भिंतीवर लावलेला आणि शरीर शास्त्रातील पुस्तकात दिसणाऱ्या आकृत्या चित्र रंगीत मोठ्या आकारात भिंतीवर फ्रेम करुन लावलेली. बदलानी डॉक्टरांकडे आत तपासण्याची छोटी खोली टेबलाच्या वरती एक दिवा त्याला चिनीमातीचं कोटिंग असलेली पत्र्याची शेड आणि एक भोवऱ्याच्या आकाराच्या वरती छोटं चाक असलेला चिनी मातीचा गोळा दिव्याची वायर त्यावरुन फिरवलेली. डॉक्टर तपासतांना तो दिवा हाताने ओढून घेत आणि काम होताच हाताने सरकवून देत. ताप मोजून होईपर्यंत ते रमेशला सूचना देत इंजेक्शन द्यायचे असेल तर सिरींज उकळायला सांगत किंवा औषध सांगत. तोपर्यंत रमेशने केस पेपरच्या गठ्ठ्यातून नावाचा केस पेपर एकत्र टाचणी लावून ठेवलेले असत. कधीतरी एकदमच पैसे दिले जात चार किंवा पाच रुपये झाले की, डॉक्टरांची फी किरकोळ असे त्यांच्याकडे जाताना एक झाकण असलेली काचेची बाटली स्वच्छ धूवून न्यावी लागत असे. डॉक्टरांनी थंडी ताप याच्यावरती एक लाल रंगाचं औषध तयार करुन एका मोठ्या काचेच्या बाटलीत भरुन ठेवलेलं असे. रमेश कंपाऊंडर काचेच्या बाटलीत ते औषध भरे. त्यावरती एक कागदाची पट्टी त्याला तीन घड्या घालून एका विशिष्ठ आकारात कापून तो कागद बाटलीवर चिकटवून गोळ्यांच्या तीन पुड्या बांधून देई.

रात्रीतून दरदरून घाम येई आणि दुसऱ्या दिवशीच बरे वाटे. हे लाल औषध डॉक्टरांचे संशोधन होतं.

बायकांना मात्र त्यांच्या आजारपणात जास्तच हाल सोसावे लागत. आई बऱ्याच वेळा राममंदिरातून तूळस बेल आणायला सांगे. तूळस बेल, लवंग मिरे, याचा काढा करे आणि तो दिला जाई. जून्या साड्या पांढरं शुभ्र धोतर यांचे चौकोनी बारीक तुकडे करी, दोन टोक कर्णाच्या टोकाला जोडून त्याचा त्रिकोणी आकार करे उरलेल्या दोन्ही बाजूंच्या कडा आत दुमडून घेई, ओठ घट्ट मिटावे तशी घडी दाबून त्यावरुन हाताने शिलाई करी एक वरच्या बाजूला हूक तयार करुन ठेवे असे तीनचार छोटे लंगोट शिवून ठेवे.

आईच्या एका घासात किती पटकन पोट भरुन जाई. दवाखान्यात धोंड्याबाई आणि कोंड्याबाई अशा दोन मावशी होत्या. त्या सर्व दवाखाना दणाणून सोडत. लहान पोरांवर ओरडत त्यामुळे बाकड्यावर गुपचूप बसून रहावे लागे. दवाखान्यात लहान मुलांचे कपडे वाळत घालण्यासाठी मोठ्या शेगड्या होत्या. त्यात कोळसे पेटवले की त्यात काहीतरी टाकून त्यावरती बांबूची मोठी टोपली झाकली जाई. त्या टोपीवरती सर्व लहान मुलांचे कपडे वाळवले जाई. त्या धुराचा एक वेगळा ओलसर औषधी वास पसरुन राही. पंचवटीतल्या शेकडो बालकांचा जन्म इथं झाला असेल, अवघड प्रकरण असेल तर जुन्या नगरपालिकेच्या मागे दवाखाना होता तिथे जावे लागे. जुनं कुणी सापडत का? म्हणून पंचवटीत गेलो तर दवाखाना बंद झालेला, इमारत पडली आहे. नवं कॉम्प्लेक्स उभं राहतंय. दोन आजीबाई भेटल्या काही आठवत नाही पण सुशिलाबाई फार चांगल्या होत्या एवढंच म्हणाल्या. एका खासगी ट्रस्टचा धमार्थ दवाखाना बाईच्या सुस्वभाविक समर्पित सेवेमुळे सुशिलाबाईंचा झाला. त्या फक्त नर्स होत्या. आता तो समर्पित भाव संपलाय आता दवाखाना डॉक्टरांच्या नावापेक्षा सुपर स्पेशालिटी, सुखसोयींनी ओळखला जातो. रात्री बेरात्री दवाखान्यात जाताना आधार वाटण्याऐवजी भीती वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात रविवारी जाट संमेलन

$
0
0

अभिनेते धर्मेंद्र यांच्या हस्ते उदघाटन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील जाट समाज सेवा समिती ट्रस्ट व नवी दिल्ली येथील जाट बायोग्राफिकल सेंटरच्यावतीने रविवारी (२१ फेब्रुवारी) राष्ट्रीय जाट बौद्धिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ चित्रपट अभिनेते धमेंद्र यांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन होणार असून देशभरातील जवळपास एक हजार जाट बांधव त्यास उपस्थित राहणार आहेत.

जी. पी. फार्म, गिरणारे, गंगापूर रोड येथे राष्ट्रीय जाट बौद्धिक संमेलनाचे आयोजन होणार असल्याची माहिती जाट समाज सेवा समिती ट्रस्टचे अध्यक्ष श्रीचंद लक्ष्मणराव रणवा आणि सचिव बाबूलाल गोपाराम नारदानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संमेलनात विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय जाट महासभेचे अध्यक्ष अजय सिंह, अनिवासी भारतीय हर्ष कुमार, रोटरी इंटरनॅशनलचे डी. जी. अनिल बेनिवाल यांना आमंत्रित करण्यात आले आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये जाट समाजाला आरक्षण प्राप्त आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातही समाजाला राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रांमध्ये आरक्षण मिळणे गरजेचे आहे, असे मत कोषाध्यक्ष अभयराम कादयान आणि संरक्षक दिलीपसिंग बेनिवाल यांनी व्यक्त केले आहे.

संमेलन यशस्वीतेसाठी चंद्रभान नैन, शीलसिह नेहरा, राम अवतार नैन, ईश्वरलाल धायल, राजेंद्र बुडानिया आदी प्रयत्नशील आहेत. संमेलनासाठी निमंत्रितांनी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जाट समाज सेवा समितीने केले आहे.

संमेलनाचा उद्देश

संमेलनात प्रामुख्याने जाट समाजाचे संगठन अधिक बळकट करणे, राष्ट्रीय स्तरावर सामाजिक नेटवर्क तयार करणे आदी सामाजिक विषयांसह दिल्लीत जाट भवन कॉम्प्लेक्‍सचे बांधकाम, जाट इतिहास व सांस्कृतिक परंपरेवर चिंतन-मंथन, समाजातील बेरोजगारी, शिक्षण व ग्रामीण विकास यासारख्या विषयांवर चर्चा, तसेच सामाजिक कुप्रथा आणि आचार संहिता यावर परिसंवाद, चर्चासत्र आदींच्या माध्यमातून समाज जागृती करण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष राजेंद्र पिलानिया आणि बनेसिंह झांझडिया यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट किन्नरांची शोध मोहीम

$
0
0

तृतीय पंथीयांच्या त्रासाला अनेक लोक कंटाळतात. रस्त्यात अडवून पैसे घेणे, रेल्वेत प्रवासात विक्षित हावभाव करणे. घरात कुणी नसताना महिलांना त्रास असे प्रकार होतात. मात्र, नाशिकच्या तृतीय पंथीयांनी बनावट तृतीय पंथीय शोधून पोलिसांच्या हवाली करण्याची मोहीम उघडली आहे. त्यासाठी जिल्ह्यात पथके तैनात केली आहेत. सिन्नर येथे तृत्तीय पंथीय असल्याचे भासवून नागरिकांना लुबाडणाऱ्या काही युवकांना पकडण्यात या पथकाला यश आले. त्यांनी या तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. शहरात महिलांसह नागरिकांना तृतीय पंथीयांच्या त्रासाबद्दल अनेक तक्रारी येत होत्या. विरूध्द कारवाई करण्यासाठी सलमा गुरू यांच्या नेतृत्वाखाली ही पथके कार्यरत आहेत.

पोलिस आयुक्तांना निवेदन खान्देशातील जळगाव, भुसावळ या भागातून काही युवक नाशिकमध्ये आले आहे. त्यांनी पंचवटीतील आडगाव नाका तसेच पाथर्डी फाटा येथे झोपड्या टाकल्या आहेत. सकाळी उठून स्त्रीवेश परिधान करीत मद्यपान करायचे आणि आणि लोकांना थेट घरामध्ये घुसून त्रास देणे सुरू करायचे, असा नित्याचा प्रकार सुरू आहे. नाशिकमधील स्थानिक तृतीय पंथीयांनी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. नाशिकच्या तृतीय पंथीयांकडून कधीही पैशासाठी कुणाला त्रास दिला जात नाही. असे पैसे कुणी मागतांना आढळल्यास त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे सांगण्यात आले आहे.

तर पोलिसांशी साधा संपर्क! खरे तृतीय पंथीय रस्त्यात कधीच कुणाकडे काही मागत नाहीत. कुणाच्या घरी बारसे, विवाह अशी शुभकार्य असतील तेव्हा समाजातील विविध स्तरावरील लोकांकडूनच तृतीय पंथीयांना मानाने बोलावले जाते. बिदागी देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद मागितले जातात. यासाठी त्यांना चांगली रक्कम मिळते. त्यामुळे खरे तृतीयपंथी कधीच कुणाला त्रास देत नाही. त्रास देणारे तृतीय पंथीय आढळल्यास नागरिकांनी त्यांना जवळच्या पोलिस ठाण्यात घेऊन जावे, असे आवाहन सलमा गुरू यांनी केले आहे.

दिवाळी, होळी, जन्मदिवस अशाच वेळी आमचे लोक नागरिकांच्या घरी जातात. त्यांना तेथे व्यवस्थित बिदागी मिळते. त्यामुळे आमची बदनामी होऊ नये म्हणून आम्ही ही मोहीम सुरू केली आहे. - सलमा गुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रशासनाकडून हक्कभंग

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधिमंडळाच्या विशेषाधिकारांचे उल्लंघन होऊ नये यासाठी स्थापन झालेली समिती नाशिक दौऱ्यावर आलेली असतानाच नाशिकच्या प्रशासनाकडून 'हक्कभंग' झाल्याचा प्रकार समोर आला आहे. डिसेंबरमध्ये शिवसेना मंत्र्यांचा दौरा हा अधिकृत होता काय, अशी शंका प्रशासनाने उपस्थित केली. यातून विधिमंडळ सदस्यांच्या व त्यातही मंत्र्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार जिल्हा प्रशासनाने केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मंत्र्यांनी भेट दिलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे प्रस्तावच रद्द करण्याची किमयाही प्रशासनाने साधलेली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या २२ आमदारांनी ग्रामीण भागात जावून शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेतले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या घरी जावून त्यांचे सांत्वन करीत जिल्ह्यातील १२२ शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत या शिष्टमंडळाने केली. राज्यभरात दौरे झाल्यानंतर शिंदे यांनी अहवाल तयार करुन तो शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. त्यावर प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आल्याने शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना देण्यात आले असता, हा दौरा अधिकृत (सरकारी) होता काय, असा प्रश्नच जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. जिल्ह्याचे राजशिष्टाचार अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना या दौऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. मंत्र्यांच्या `ओएसडीं`कडूनच हा दौरा आल्याचे खेडकर यांनी सांगितले. त्यामुळे कार्यवाही नाही, तर किमान या बैठकीचे इतिवृत्त तरी द्या, असे आर्जव गोडसे यांनी केले. शिवसेना नेत्या तथा राजशिष्टाचार समितीच्या अध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी याबाबत माहिती घेतली जाईल, असे स्पष्ट केले आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीच्या क्रेटमधून बॅटरीजची चोरी!

$
0
0

अनिल रामलाल वर्मा (२३) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी चोरीच्या तब्बल ३२ बॅटरी हस्तगत केल्या आहेत. मूळ मध्य प्रदेश राज्यातील इंदूर येथे राहणारा वर्मा काही महिन्यापूर्वी नाशिकमध्ये आला. थोड्याच दिवसात त्याने सिडको परिसरातील सिंहस्थनगर येथे बस्थान बसवले. दरम्यानच्या काळात सिडको, उत्तमनगर, कामटवाडे, अंबड भागात बॅटरी चोरीच्या गुन्ह्यांनी कळस गाठला. दुचाकी, कार, ट्रक, टेम्पो, रिक्षा अशा वेगवेगळ्या वाहनांतील बॅटरींची सातत्याने चोरी होत असल्याने वाहनचालक धास्तवले.

वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलिस आयुक्त अतुल झेंडे तसेच अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पो​लिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी बॅटरी चोरीच्या गुन्ह्याकडे लक्ष दिले. पवननगर ते मोरवाडी या रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला असता संशयित अनिल वर्मा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. याबाबत बर्डेकर यांनी सांगितले, की चोरीसाठी घराबाहेर पडणारा अनिल आपल्यासोबत भाजी ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे क्रेट घ्यायचा.

अगदी दोन मिनिटात वाहनाची बॅटरी खोलून तो क्रेटमध्ये टाकयाचा. यानंतर कधी सायकल तर कधी मोटारसायकलने घरी पोचायचा. चोरी केलेल्या बॅटऱ्या त्याने भद्रकाली परिसरातील भंगार विक्रेत्यांना विक्री केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असे बर्डेकर यांनी स्पष्ट केले. संशयित ​अनिल वर्माकडून एकूण ३२ बॅटरी हस्तगत करण्यात आल्या असून त्याची किंमत २ लाख १० हजार रुपये इतकी असल्याचे तपास अधिकारी हवालदार दत्तात्रय विसे यांनी स्पष्ट केले. वर्माला अटक करण्यासाठी गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक इगोले, रवींद्र सहारे, अनिल दिघोळे, शंकर काळे, विजय वरंडळ, धनंजय दोबाडे, रावजी मगर, दत्ता गोरे आदींनी प्रयत्न केले.

सिडको सॉफ्ट टार्गेट सिडकोत नागरिकांकडून आपली वाहने उघड्यावर किंवा घरासमोरील रस्त्यावर उभी केली जातात. अशा वाहनांवर अनिललने लक्ष केंद्रीत केले होते. या गाड्यांमधील बॅटरी अगदी दोन मिनिटात काढण्याचे कसब वापरून तो घटनास्थळावरून फरार व्हायचा. भाजीच्या क्रेटमध्ये बॅटरी ठेवली जात असल्याने कुणाला संशय देखील येत नव्हता. मात्र, अखेर तो पोलिसांच्या ताब्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांची गर्दी; अभिषेकाचा मान पाटण्याच्या दांपत्याला

$
0
0

म. टा, वृत्तसेवा, सटाणा

श्री मांगीतुंगी सिद्धक्षेत्र येथील १०८ फूट उंच भगवान ऋषभदेव यांच्या मांगी पर्वतावरील मूर्तीचा महामस्ताकाभिषेक सोहळा सकाळी ११ वाजेच्या सुमारास धार्मिक व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. मुख्य अभिषेक सिद्धीकलश स्वरूपात सर्वाधिक बोली बोलणारे कमलकुमार जैन आहरा (बिहार) यांना सत्पनीक मिळाला. यानंतर २१ प्रकारच्या विविध अभिषेकाच्या बोलींनी गुरुवारी भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीवर १०८ प्रमुख इंद्र इंद्रायणीच्या सहाय्याने महामस्ताकाभिषेक सोहळा संपन्न झाला.

देवस्थानच्या वाहनाने ऋषभगिरीवर जाण्यासाठी सोय करण्यात आली होती. सुमारे दहा वाहनांद्वारे एका वेळी १५ ते २० जणांना जाण्याची सोय असल्याने सकाळपासूनच सर्वेतोभद्र महल येथे कुटुबीयांनी गर्दी केली होती. तत्पर्वी बुधवारी या अभिषेक सोहळ्यासाठी विविध प्रकारच्या बोली बोलण्यात येवून अभिषेकांचा बहुमान देण्यात येत होता.

सर्वप्रथम प्रथम कलश सिद्धी कलश या जलाभिषेकाचा बहुमान बिहार राज्यातील पाटणा जवळील आहरा येथील कमलकुमार जैन यांनी मिळविला. त्यांच्या वतीने सर्वप्रथम जलाभिषेक करण्यात आला. यानंतरचा बहुमान वीरेंद्र हेगडे, अनिल कुमार जैन, मूर्तीकार सी. आर. पाटील यांना देण्यात आला. अभिषेक सोहळ्यासाठी परमपूज्य गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी, अर्यिका श्री चंदनामती माताजी, कर्मयोगी पीठाधीश स्वस्तिश्री रवीद्रकिर्ती स्वामीजी व आचार्य अनेकान्त सागरजी यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक उत्सव व विधी संपन्न झाला. अभिषेकांनी भगवान ऋषभदेव यांना प्रसन्न करण्यात आले. यानंतर पुष्पवृष्टी होवून आरती व शांतीधारा करण्यात आला. दिवसभर ऋषभगिरी पर्वतावर अभिषेक करण्यासाठी जाणाऱ्या जैन भाविक व महिला भक्तगणांना प्रवेश देण्यात येत होता. यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होवू नये याची काळजी व्यवस्थापनाने घेतली होती. मात्र, अभिषेक सोहळ्यासाठीही विशेष निमंत्रित असल्याने अनेकांची तारांबळ उडाली. तर पर्वतावर जाण्यासाठी देवस्थानची वाहने असल्याने मोठी झुंबड दिसून येत होती. यावेळी देवस्थानच्या वतीने व शासनाने बांधण्यात आलेल्या लिप्ट तयार झाल्याने भाविकांना येजा करण्यासाठी मोठी सोय झाली होती. चारपैकी तीन बाजूच्या लिप्ट सुरू झाल्याने या लिप्टच्या सहाय्याने भगवान ऋषभ यांच्या माथ्यापासून महामस्तकाभिषेक करण्यात आला. संजय पापडीवाल, सुमेर काला, सुवर्णा काला, प्रमोद कासलीवाल, भूषण कासलीवाल, प्रमोद जैन, पारस लोहारे आदींनी महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी विशेष व्यवस्था केली होती. महामस्तकाभिषेक समारंभ ६ मार्च २०१६ पर्यंत सुरू असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुक उमेदवारांचा सिव्ह‌िलमध्ये गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस भरतीसाठी फिटनेस सर्टीफिकेट घेण्यासाठी सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये गर्दी केलेल्या उमेदवारांनी गुरूवारी सकाळी गोंधळ घातला. काही उत्साही मुलांनी शुल्क भरणा केंद्राच्या खिडकीची काच फोडल्यानंतर सिव्ह‌िल प्रशासनाने बाह्य रुग्ण तपासणी विभाग बंद करीत पोलिसांना पाचारण केले.

पोलिस दलातील शिपाई पदाच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी गुरूवारपर्यंत मुदत होती. दरम्यान, अर्ज भरताना शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असल्याची माहिती उमेदवारांपर्यंत पोहचली. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याची बाब सरकारने यापूर्वीच स्पष्ट केली होती. स्वसाक्षांकित अर्जाद्वारे आपण मैदानी चाचणी परीक्षेत पात्र असल्याचे लेखी सुध्दा पुरे होते. मात्र, सिव्ह‌िल हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडील प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अफवा पसरल्याने मागील तीन ते चार दिवसांपासून सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये इच्छुक उमेदवारांनी एकच गर्दी केली. बाह्य रुग्ण तपासणी विभागात प्रमाणपत्र वितरणासाठी एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने उमेदवारांना दिवसभर ताटकळत उभे राहवे लागत होते. त्यातच गुरुवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याने सकाळपासून उमदेवारांनी गर्दी केली.

वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने काही उमेदवारांचा संताप अनावर झाला. त्यातील काहींनी शुल्क भरणा केंद्राच्या खिडकीची काच फोडली. यानंतर सिव्ह‌िल प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. काही वेळातच सरकारवाडा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, बहुतांश उमेदवारांनी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगत तेथेच ठाण मांडले. सदर प्रमाणपत्र आवश्यक नसल्याचे पत्रक प्रशासनाने काढल्यानंतर सुध्दा उमेदवार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी उमेदवारांची समजूत काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याभरात सापडले नऊ कॉपीबहाद्दर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुरुवारपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये पहिल्याच दिवशी कम्पलसरी विषय असणाऱ्या इंग्रजीच्या पेपरला जिल्ह्यात ९ कॉपी बहाद्दरांवर भरारी पथकाने कारवाई केली. तर, नाशिक विभागात हीच संख्या १३ वर गेली. पहिल्याच दिवशी कॉपीबहाद्दरांच्या इराद्याने बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानासमोर आव्हान उभे केले आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमक शिक्षण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील ८४ परीक्षा केंद्रांवर इंग्रजीचा पेपर सुरळीत पार पडला. काही ठिकाणी भरारी पथकांमनी केलेल्या कारवाईत ९ विद्यार्थ्यांवर कॉपी केस दाखल करण्यात आली. विभागात नंदूरबार जिल्ह्यात २ तर जळगाव जिल्ह्यातही २ अशा एकूण १३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातून ६९ हजार विद्यार्थ्यांनी तर नाशिक विभागात नाशिकसह धुळे, नंदूरबार, जळगाव या जिल्ह्यांमधून १ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.

कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, महिला भरारी पथक अशी विविध स्तरावर भरारी पथके तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांच्या रोजच्या भेटींसह विविध परीक्षा केंद्रांवर पथकांच्या अचानक भेटी असणार आहेत. कुठल्याही परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांना शंका असल्यास त्यांनी परीक्षा केंद्रातील कार्यालयाशी संपर्क साधावा. सोशल मीडियावर पसरणाऱ्या परीक्षा विषयक वृत्ताची खात्री यंत्रणेकडून करूनच विश्वास ठेवावा, असेही आवाहन बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, इंग्रजी पाठोपाठ आता शनिवारी (दि.२०) मराठी व इतर भाषांचा पेपर होईल. तर सोमवारी (दि.२२) रोजी हिंदी विषयाचा पेपर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images