Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अन्यथा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बारावीची परीक्षा उद्यापासून (दि.१८) सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी ज्युनिअर्सच्या प्राध्यापकांनी असहकार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कायम विनाअनुदानित मधील कायम शब्द कागदोपत्री वगळल्यानंतरही शिल्लक असणारी त्याची अंमलबजावणी, राज्यातील अधांतरी आयटी शिक्षकांचे स्थैर्य आणि संच मान्यतेमधील त्रुटी या प्रमुख मागण्यांसह तब्बल २५ मागण्यांच्या यादीसाठी ज्युनिअर्सच्या प्राध्यापकांनी उच्च व माध्यमिक बोर्डाचे नाक दाबले आहे.

वर्षानुवर्षापासून ज्युनिअर कॉलेजमधील बहुतांश प्राध्यापकांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी दोन वर्षांपूर्वी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कारही टाकण्यात आला होता. याच आंदोलनाची पुनरावृत्ती यंदा पुन्हा होते आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकांची वस्तूस्थिती सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न असून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याची संघटनेची भूमिका नाही, अशी माहिती संघटनेचे राज्य सरचिटणीस संजय शिंदे यांनी 'मटा' शी बोलताना दिली. या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डालाही मंगळवारी देण्यात आले.या बहिष्कार आंदोलनाच्या कालावधीत प्रत्येक दिवसाकाठी केवळ एकच उत्तरपत्रिका तपासेल, अशा पध्दतीने असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. ज्युनिअर्सच्या प्राध्यापकांचे आंदोलन पेटल्यास त्यास सरकार कारणीभूत राहील, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे सचिव अनिल महाजन,उपाध्यक्ष डी. जे. दरेकर, डी. एल. कदम, महिला प्रतिनिधी एम. डी. निचळ आदी उपस्थित होते.

वेळोवेळी सामंजस्याची भूमिका घेऊनही सरकारचा योग्य प्रतिसाद नाही. आश्वासनांची पूर्तता नाहीच. विद्यार्थ्यांना वेठीला धरण्याचा उद्देश नाही. मात्र, त्यामुळे हे असहकार आंदोलन आहे.

प्राध्यापक संजय शिंदे ,

राज्य सरचिटणीस, शिक्षक महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप सरकारचा माकपकडून निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्वांना शिक्षण सर्वांना रोजगार मिळालाच पाहिजे, मोदी सरकार होश मे आओ, देशकी एकता टूट रही है नौजवानो एक हो जाओ, जो हिटलर की चाल चलेगा वो कुत्तेकी मौत मरेगा यांसारख्या घोषणा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मोदी सरकार विरोधातील रोष व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले.

पक्षाच्या केंद्रीय कार्यालयावर रविवारी हल्ला करण्यात आला. तसेच माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा पक्षाच्या शहर समितीने निषेध केला. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देणे व तत्सम घटना घडल्यास कायद्यानुसार चौकशी होऊन कारवाई करावी. मात्र, अशा घटनेचा आधार घेऊन डाव्या व पुरोगामी चळवळीतील तरुण विद्यार्थ्यांना देशद्रोहासारख्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून केला जातो आहे. धर्मांध शक्तींचा खरा चेहरा उघड होत असून आणीबाणी सदृश दहशत सर्वत्र अनुभवायला येत असल्याचा आरोप माकपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. आंदोलनात अॅड. वसुधा कराड, श्रीधर देशपांडे, तानाजी जायभावे, सचिन भोर, सीताराम ठोंबरे, दिनेश सातभाई आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीडीआर’विरोधात सर्वपक्षीय संताप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या नव्या टीडीआर धोरणाविरोधात मंगळवारच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकजूट दाखवत अन्यायाला वाचा फोडली. नवे टीडीआर धोरण अन्यायकारक असून त्यामुळे नाशिकच्या विकासाला ब्रेक लागणार असल्याचा आरोप करण्यात आला. सुमारे साडेतीन तास बैठकीत चर्चा होवून नवे धोरण फेटाळण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला आहे. तर टीडीआर धोरणावरून सर्वपक्षीयांनी भाजपला पुन्हा घेरले.

महासभेत नगरसेवकांनी धोरणाची चिरफाड करत, नाशिकचा विकास कसा खुंटणार याची आकडेवारीच सभागृहात सादर केला. राज्य सरकार सर्वच निर्णय नाशिकसाठी मारक घेत असल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे. मनसेने भाजपला लक्ष करत सरकारचा निषेध करून भाजपवर पुन्हा हल्लाबोल केला. पाण्यापाठोपाठ टीडीआरमुळे भाजपवर दोन पाऊल मागे येण्याची वेळ आली आहे.

आमचा पक्ष नाशिककर

नव्या टीडीआर धोरणामुळे महापालिकेला पॅरीलिसीस अॅटक येणार आहे असा आरोप उपमहापौर गुरूमीत बग्गा यांनी आरोप केला. टीडीआर धोरणामुळे महापालिकेने गेल्या काळात २० लाख चौरस मीटर जागा संपादित केली असून सुमारे एक हजार कोटी रुपयांवर आहे. या निर्णयामुळे मोठ्या जागेची किंमत कमी आणि छोट्या जागेची किंमत जास्त होणार आहे. सरकार ऐकत नसेल तर मग आम्ही पक्षभेद विसरू. त्यावेळेस आमचा पक्ष हा नाशिककर असेल, असा इशारा बग्गा यांनी दिला आहे.

मोरुस्करांचे खडे बोल

भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी एकतर्फी किल्ला लढविला. हा निर्णय नव्या ले-आऊटलाच लागू करावा यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. सरकार संवेदनशील आहे. सरकार चुकेल तिथे आवाज काढा. मात्र, कधीतरी आपणही चुकतो त्याबद्दलही सत्ताधाऱ्यांनी विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७९० उमेदवारांचे सदस्यत्व होणार रद्द!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गतवर्षी एप्रिलमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च अजूनही सादर न करणाऱ्या उमेदवारांना त्यांचे सदस्यत्व गमवावे लागणार आहे. खर्च सादर करण्याची शेवटची मुदत सोमवारी सायंकाळी संपली. सुमारे ७९० सदस्यांनी खर्चच सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता बळावली आहे.

गतवर्षी जिल्ह्यातील ५९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका एप्रिलमध्ये झाल्या. निवडणुकीचे निकालही लगेचच महिनाभरात जाहीर झाले. निवडणुकीत केलेल्या खर्चाचा तपशील जिल्हा ग्रामपंचयात निवडणूक शाखेकडे सादर करणे उमेदवारांना बंधनकारक आहे. निवडणुकीत वारेमाप खर्च तर केला गेला नाही ना यावर निवडणूक विभाग लक्ष ठेऊन असतो. जिल्ह्यातील २००० हून अधिक उमेदवारांनी निवडणूक शाखेकडे खर्चच सादर केला नाही. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसाही पाठविल्या. मात्र, त्याकडेही उमेदवारांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे अशा उमेदवारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. तत्पूर्वी उमेदवारांना शेवटची संधी देण्याचे सुचविण्यात आले. त्यानुसार खर्च सादर करण्यासाठी त्यांना आणखी एक संधी देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी (दि. १५ फेब्रुवारी) रोजी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवडणुकीतील खर्चाचा तपशील आणि खुलासा सादर करणे आवश्यक होते. मात्र, या मुदतीपर्यंत केवळ एक हजार २१६ उमेदवारांनी खर्च जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. ७९० उमेदवारांनी खर्च सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून केली जाण्याची शक्यता बळावली आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनाच खर्च सादर करणे बंधनकारक आहे. ज्या उमेद्वारांनी निवडणुकीपूर्वीच माघार घेतली त्यांना खर्च सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहयोच्या फाईल्स रखडल्यास कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

रोजगार हमी योजनेच्या कामांची मजुरांकडून मागणी होत असल्यास तत्काळ कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचना रोहयोचे उपजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिल्या. तसेच, रोहयोच्या फाईल्स रखडल्या तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा गाडीलकर यांनी दिला आहे.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत येवला तालुक्यात सुरू असलेल्या कामांसंदर्भात गाडीलकर यांनी आढावा बैठक घेतली. त्यात ते बोलत होते. यावेळी गाडीलकर यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांची सरपंचांकडून माहिती घेतांना कुठे-कुठे मागणी आहे, याची विचारणा केली. मजुरांकडून जेथे मागणी होईल तेथे नियमात बसत असतील तर तत्काळ कामे उपलब्ध करून द्या, रस्त्यांची कामे कमी व जलसंधारणाची कामे अधिक प्रमाणामध्ये हाती घ्या, सार्वजनिक कामांना प्राधान्य द्या, शौचालयाची वैयक्तिक कामे तातडीने पूर्ण करा व कामांसंदर्भात तक्रार येणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीस २० गावांचे सरपंच तसेच प्रांताधिकारी वासंती माळी, तहसीलदार शरद मंडलिक, पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ आदी उपस्थित होते.

तर कारवाई करणार रोजगार हमी योजनेच्या फाईल्स काही टेबलावर बरेच दिवस धूळ खात पडतात. काही अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे या फाईल्स बरेच दिवस रेंगाळत पडतांना पुढेच सरकत नाहीत यावर या बैठकीत जोरदार चर्चा झडली. त्याचा धागा पकडत रोहयोचे उपजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी असा प्रकार झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. रोहयोच्या फाईली कोणी अधिकारी दाबून ठेवत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी तंबीच त्यांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांसाठी १० कोटी मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहर आणि तालुक्यातील विविध विकासकामांसाठी एकूण १० कोटी ८९ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. ही माहिती राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. या निधीतून प्रामुख्याने मालेगाव मनपा हद्दवाढीतील कामे, शहरातील बगीचे आणि लघुपाटबंधारे योजनेची कामे केली जाणार आहेत.

मालेगाव शहर आणि हद्दवाढीतील गावांच्या विकासासाठी राज्यमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा आयुक्त किशोर बोर्डे, महापौर हाजी मोहम्मद इब्राहीम व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी बैठक घेऊन विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. त्या प्रस्तावाला मंजुरी देत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी स्तरावरून एकूण ६ कोटी २८ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे.

हद्दवाढीतील गावांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी १ कोटी ३२ लाख रुपये, वार्ड १, ३ व १० मधील नागरी दलित वस्ती सुधार योजनेसाठी तीन कोटी ६६ लाख रुपये तर मालेगाव तहसील शेजारील अभ्यासिकेसाठी १ कोटी ३० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, मालेगावकरांसाठी अत्याधुनिक बगीचासाठी जिल्हा वार्षिक नरोत्थान योजनेतून २ कोटी १५ लाख मंजूर करण्यात आले आहेत. यात ५० टक्के निधी मनपा तर ५० टक्के निधी जिल्हा नियोजन अंतर्गत मिळणार आहे.

शहरातील विकासकामांसाठी निधी मंजूर होतांनाच तालुक्यातील गावातील पाणीटंचाईमुक्त होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लघुपाटबंधारे योजनांच्या कामांना देखील २ कोटी ४६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातील गाळणे येथे साठवण बंधारा, वनपट, पोहणे येथे को. पा. बंधारे, मोहपाडा, अस्ताने, वनपट गाळणे क्र. १ व २ जळकू, कंधाने येथे सीमेंटप्लग बंधारे व दुरुस्ती अशी कामे या निधीतून होणार आहेत. यामुळे पाण्याच्या भूजलपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

मालेगावात होणार सुसज्ज बगीचा मालेगाव शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता मध्यवर्ती ठिकाणी असा एकही बगीचा किंवा उद्यान नाही. कधीकाळी कॉलेज रोडवर असलेले मनपा उद्यानाच्या जागी देखील आता प्रांताधिकारी आणि तहसील कार्यालय झाले आहे. त्यामुळे २ कोटी १५ लाख रुपयातून शहरवासीयांना सुसज्ज बगीचा मिळणार आहे. कॅम्प भागातील डी. के. चौका शेजारील मनपाच्या मोकळ्या भूखंडात हा बगीचा विकसित होणार आहे. यात जॉगिंग ट्रक, अत्याधुनिक खेळणी, खुला मंच अशा सुविधा असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायन्स क्लबचे रंगले स्नेहसंमेलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव येथील लायन्स क्लबच्या वतीने नुकतेच लायन्स सदस्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनास मालेगाव, मनमाड, नाशिक व पुणे येथील लायन्स सदस्य, त्यांचे परिवार आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.

मालेगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम तापडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल श्रीकांत सोनी उपस्थित होते. सदस्यांचा आणि त्यांच्या परिवारांचा सत्कार करणे आणि त्यानिमित्ताने संवाद साधने हा या संमेलनामागील उद्देश होता. या संमेलनास चंद्रहसजी शेट्टी, गिरीश मालपणी, मिलिंद पोफळे, अभय चोकसी आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकेता कूटमुटीया यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीता तापडे, महेश पोफळे, सचिन जोशी, गोकुळ तापडे, योगेश शिरापुरे, संजय जनांनी, चेतन कूटमुटीया, राकेश वाघ, संजय येवला, विलास शाह, भाग्येश पटनी, भरत अहिरे, डॉ. पराग जैन, विजय जैन आदींसह मिडटाऊन सदस्यांनी परिश्रम घेतले. सुधीर शर्मा यांनी आभार मानले. या स्नेहसंमेलनात लायन्स सदस्य व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी विविध संस्कृतिक कार्यक्रम, एकांकिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी सुपरफास्ट एक्स्प्रेसला ठाणे थांबा नाहीच

$
0
0

राज्यराणी आधी पंचवटीला ठाणे थांबा मिळावा म्हणून खासदार हेमंत गोडसे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे यांनी प्रयत्न केले. रेल्वे बोर्डाला प्रस्ताव मिळाल्यानंतर पंचवटीच्या ठाणे थांब्याची रंगीत तालीम झाली. मात्र, पंचवटी कल्याणमध्ये पीक टाईमलाच प्रवेश करते. यावेळी मुंबईकरांना घेऊ जाणाऱ्या लोकल गाड्यांचे टाईमटेबल अत्यंत व्यस्त आहे. पंचवटीचा ठाणे थांबा या टाईमस्लॉटमध्ये अॅडजस्ट होत नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

महसुलात भरीव वाढ पंचवटी आणि राज्यराणी या इंटरसिटी कनेक्टिव्ही ट्रेनमुळे मुंबईला प्रवास करणाऱ्या नाशिककरांची मोठी सोय झाली आहे.

व्यावसायिक, चाकरमानी, रुग्णांना दिलासा मिळाला आहे. पंचवटी एक्स्प्रेसला प्रचंड गर्दी असते. तिकीट काढूनही अनेकांना उभे राहून प्रवास करावा लागतो. अनेक प्रवासी कल्याणला उतरून ठाणे, कळवा, डोंबिवलीला जातात. नाशिकहून जाणारी ट्रेन ठाण्याला थांबत नाही. हा मान प्रथमच राज्यराणीला मिळाला आहे. पंचवटीला ठाणे थांबा मिळाल्यास महसुलात वाढ होणार आहे.

लोकाश्रय हवा राज्यराणीही प्रथम कुर्ल्यापर्यंतच धावत होती. तेथून लोकल पकडून सीएसटीला जावे लागत होते. प्रवाशांच्या लढ्यानंतर तीन महिन्यांपासून सीएसटीपर्यंत धावत आहे. नाशिक ते सीएसटी दरम्यान एकही थांबा नव्हता. नंतर सुटणारी पंचवटी तिच्या आधी पोहचते. त्यामुळे प्रवाशी पुन्हा पंचवटीलाच गर्दी करू लागले होते. राज्यराणीचा तोटा वाढत होता. आता ती ठाण्याला थांबणार आहे. प्रवाशांनी ‌तिला प्रतिसाद देऊन यशस्वी करणे गरजेचे आहे.

राज्यराणी एक्स्प्रेसचे शेड्यूल राज्यराणी एक्स्प्रेस नाशिकहून सकाळी सव्वा सहाला सुटते. मनमाडहून मुंबईला जाताना राज्यराणी (गाडी क्रमांक २२१०२) ठाण्याला ९.२० वाजता थांबेल व ९.२१ वाजता सुटेल. मुंबईहून नाशिकला जाताना राज्यराणी (गाडी क्रमांक २२१०१) ठाण्याला सायंकाळी ७.३० वाजता थांबेल व ७.३१ वाजता निघेल. फक्त एक मिनिटाचा हा थांबा असेल. गाडी नाशिकला १०.१३ वाजता पोहचेल.

पंचवटीला ठाणे थांबा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, तांत्रिक कारणामुळे ते अवघड आहे. नाशिककरांना राज्यराणीने प्रवास करून तिचा महसूल वाढवावा. तिला लोकाश्रय द्यावा. - राजेश फोकणे, रेल्वे सल्लागार समिती

राज्यराणी ठाण्याला थांबल्यास रेल्वेचा महसूल वाढेल असे मी रेल्वे बोर्डाला पटवून दिले. त्यांनीही सहकार्य केले. आता प्रायोगिक तत्वावर ही गाडी ठाण्याला थांबणार आहे. रेल्वे प्रशासाला कायम थांब्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. - हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजपासून बारावीची परीक्षा

$
0
0

परीक्षा केंद्रांच्या भोवताली कडेकोट पोलिस बंदोबस्तासह विद्यार्थ्यांसाठी १२ तास ऑनलाइन कौन्सिलिंग आणि कॉपीमुक्त अभियानासाठी भरारी पथके अशी मध्यवर्ती यंत्रणाही बोर्डाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी गुरूवारी (दि. १८) बारावीचे विद्यार्थी इंग्रजीच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. ही परीक्षा २८ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यतील एकूण ३५७ कॉलेजेसमधून ६९ हजार ४१५ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. तर विभागातून ही विद्यार्थी संख्या १ लाख ५६ हजार ३८९ आहे. नाशिक विभागात धुळ्यासह जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. नाशिकमधून ६९ हजार विद्यार्थी तर धुळे जिल्ह्यातून २३ हजार ६३७ विद्यार्थी , जळगावातून २७ हजार ५७० विद्यार्थी तर नंदुरबारमधून १५ हजार ७६७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

भरारी पथकेही तैनात गत काही वर्षांच्या तुलनेत कॉपी मुक्त अभियानास जिल्ह्यासह विभागात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विभागाच्या तुलनेत कॉपी मुक्तीमध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. गतवर्षी विभागात कॉपीच्या ३० केसेस भरारी पथकांना आढळून आल्या होत्या. यातील विद्यार्थ्यांची चौकशी होऊन दोषींवर बोर्डाने कारवाई केल्याची माहिती विभागीय कार्यालयाने दिली. यंदाही शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकासह स्वतंत्र महिला पथक, भरारी पथके व जिल्हाधिकाऱ्यांचे पथक अशी व्यवस्था असणार आहे.

पाच संवेदनशील केंद्र नाशिक जिल्ह्यात पाच परीक्षा केंद्रांना संवेदनशील घोषित करण्यात आले आहे. यात कळवणमधील ननाशी व कनाशी, निफाडमधील भाऊसाहेब नगर, दिंडोरी व त्र्यंबकेश्वर या केंद्रांचा समावेश आहे. भरारी पथकांच्या माध्यमातून या केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

ऑनलाइन कौन्सिलिंग सुविधा ऐन परीक्षेच्या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागतो त्या विद्यार्थ्यांशी बोर्डाने नियुक्त केलेले कौन्सेलर ऑनलाइन संवाद साधणार आहेत. यासाठी बोर्डाने उपलब्ध करून दिलेल्या मोबाइल क्रमांकांवर विद्यार्थ्यांना संवाद साधता येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा विषयक कुठल्याही दडपणासंदर्भात सकळी ८ ते रात्री ८ या बारा तासांच्या कालावधीत कौन्सिलर्सशी संवाद साधावा, असे आवाहन बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे.

कौन्सिलिंगसाठी संपर्क कौन्सिलिंगसाठी बोर्डाने संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. ते पुढील प्रमाणे : ९८९०१४४१८५, ९१२२४५३२३५, ९८५०२४६३८९, ९८९०१४४१८५, ९८२२७१३९९५, ९४२२०५३३९१, ९९२३६८८१९१, ९९२२४५३२३५, ९७६३६६७४१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे कॅफे व्यापले ‘धुरात’

$
0
0

नाशिकमध्ये मॉर्डन कल्चर आल्याचे अभिमानाने म्हटले जात असले तरी त्याची कीड भिनत चालली आहे. नाशकातील अनेक कॅफेमध्ये सिगारेट ही पॅशन म्हणून ओढली जात असल्याचं निदर्शनास येत आहे. बाहेरून चकचकित असलेल्या कॅफेमध्ये आत गेल्यावर तरुण-तरुणी ग्रुप्सनी सिगारेट फुकतांनाचे चित्र दिसत आहे. तरुणांसोबत अगदी चेन स्मोकर असल्याप्रमाणे तरुणीही सिगारेट पितांना दिसतात. या कॅफेमध्ये जणू धुराचं साम्राज्य आहे की काय असा समज होऊ शकतो. एका हातात चहा किंवा कॉफीचा कपासोबत सिगारेट असणं म्हणजे प्रतिष्ठा असं या तरुणाईला वाटू लागलं आहे. अगदी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या कॅफेज निव्वळ सिगारेटच्या धुरामुळे व्यापलेल्या दिसत आहेत. मात्र, सिगारेटचे दुष्परिणाम जाणणारी ही तरुणाई या व्यसनाच्या विळख्यात का फसतेय, हे समजणे कठीण झाले आहे.

बेकायदा सिगारेट झोन सिगारेट पिणाऱ्यांमध्ये हायक्लास सोसायटीसह सामान्य घरातील तरुण-तरुणी दिसून येत आहेत. कॅफेमध्ये फक्त सिगारेटला मागणी होतांना पाहून कॅफे मॅनेजर्सकडून अशट्रे टेबलवर ठेवायला सुरुवात केली आहे. कॅफेच्या डस्टबीनमध्ये जळालेल्या सिगारेटची थोकटे बाहेर येत असतात. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई असतांना कॅफेचालकांकडून बेकायदा सिगारेट झोन निर्माण केले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमोल झाला वैशालीचा नाथ

$
0
0

वऱ्हाडी होते अनाथ मुली, नगरसेवक शैलेश ढगे, अशोक सातभाई, स्टेट बँकेचे अधिकारी सचिन वाजरे, बालाजी भाई आदी मान्यवर. मध्यस्थी करणाऱ्या रमेश जोशी गुरुजींनी विवाह लावला. वैशालीची बिदाई करतांना मानलेल्या आई सुमनचे डोळे डबडबून आले.

वैशाली खराडे बालपणापासून अनाथ. १८ वर्षाची झाल्यानंतर पुण्याच्या बालकल्याण समितीने तिला जेलरोडच्या दसक येथील नारी विकास केंद्रात पाठवले. संचालक व्ही. एन. दिनकर, मानलेली आई सुमन दिनकर, अधीक्षका शोभा गायकवाड, समुपदेशक परविना हेगडे, भावना उपाध्ये आणि तिच्यासारख्याच १७ अन्य अनाथ बहिणी अशी प्रेमाची माणसं भेटली. कधी अभ्यासिकेत शिक्षिका तर कधी मेडिकल, फार्मात पार्टटाइम जॉब करीत तिने संगणक, शिवणकला प्राप्त केली. मुक्त विद्यापीठातून बीएचे व नांदेडहून डीएडचे शिक्षण घेतले.

अंबडमध्ये काम करणारा व सिडकोत राहणारा अमोल कुटुंबीयांसह नारी विकास केंद्रात आला. माता-पित्यांना सांभाळणाऱ्या वैशाली सारख्या मुलीचीच त्याला शोध होता. बोलणी पक्की झाली अन् दोघांची लगीनगाठ बांधली गेली.

पन्नास हजाराची एफडी स्टेट बँकेत वैशालीच्या नावे अमोलने ५० हजार रुपयांची एफडी ठेवली. त्यातून वयाच्या ५२ व्या वर्षापासून महिना ११ हजाराची पेन्शन मिळेल. नारी केंद्राने २५ अनाथ मुलींचे विवाह याच पद्धतीने लावले आहेत. विवाहात अश्विनी सपकाळला एक लाखाची तर सोनाली पिंगळेला ४० हजारांची एफडी मिळाली होती.

वैशालीला सुरक्षित व सुशिक्षित घरात द्यायचे होते. खरोटे कुटुंबीयांकडून या अपेक्षा पूर्ण होत असल्याने मी वैशालीच्या वतीने होकार दिला. - सुमन दिनकर, मानलेली आई

वैशालीसारखीच कष्टाळू, प्रेमळ व समजदार सून हवी होती. समाजात मुली बघण्यापेक्षा आधारश्रमाची वाट धरली. चांगली सून मिळाली आहे. - वंदना खरोटे, सासू

वैशालीसारख्या मुलीला हक्काच घर मिळावे, समाजापुढे आदर्श उभा रहावा ही माझी इच्छा होती. तो संकल्प पूर्ण झाल्याने आनंद होत आहे. - अमोल खरोटे, पती

प्रेमळ, समजदार, पैशापेक्षा माणुसकी जपणारे, स्त्रीचा आदर करणारे सासर असावे, अशी माझी अपेक्षा होती. ती पूर्ण झाल्याने आनंदी आहे. - वैशाली खराडे-खरोटे, नववधू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्रानेच केला घरात हात साफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

व्हिडीओ गेम खेळण्यासाठी नेहमी घरी येणाऱ्या मुलाच्या मित्रांनीच घरातून सव्वालाखांचा ऐवज चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मित्राच्याच घरी चोरी करणाऱ्या या अल्पवयीन संशयितांची कर्तबगारी पाहून इंदिरानगर पोलिस आणि वरिष्ठ अधिकारीही आवाक् झाले.

इंदिरानगर परिसरातील चार्वाक चौक येथील वंदना अपार्टमेंटमध्ये संतोष वाटपाडे कुटुंबासह राहतात. त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, टॅब, मोबाइलसारखा महागड्या वस्तू असा सव्वालाखांचा ऐवज चोरीस गेला होता. त्यांनी या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये मंगळवारी (दि. १६ ) फिर्याद दिली. पोलिसांनी वाटपाडे कुटुंब तसेच, या इमारतीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडे प्राथमिक चौकशी सुरू केली. त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. त्यानुसार त्यांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरलेला ऐवज पोलिसांच्या ताब्यात दिला. यापैकी एक मुलगा वाटपाडे यांच्या मुलाचा मित्र आहे. कॉम्प्युटरवर व्हिडीओ गेम खेळण्यासाठी तो मुलासमवेत घरी येत असत. एके दिवशी त्याने घराच्या कुलुपाची चावी चोरून नेली. मंगळवारी दुपारी वाटपाडे कुटुंबीय घरी नव्हते. याचाच फायदा घेऊन तो आणि त्याचा एक साथीदार या इमारतीमध्ये आले. चावीद्वारे कुलूप उघडून घरात प्रवेश केला. घरातील ऐवज चोरून त्यांनी पोबारा केला.

पोलिसांनी इमारतीमधील रहिवाशांकडे चौकशी केली तेव्हा साधारणत: १३ ते १४ वयोगटातील दोन मुलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याची माहिती पुढे आली. संशयित मुलांना तत्काळ ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे वाटपाडे यांच्या घरातील लाकडी कपाटातून चोरलेले सोन्याचे दागिने, एक हजार रुपयांची रोकड, टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले दोन हजार रुपये किमतीचा टॅब, मोबाइल असा एक लाख २३ हजार रुपये किमतीचा ऐवज मिळून आला. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जे. आर. शेख व पोलिस उपनिरीक्षक एच. आऱ. घुगे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.


रिक्षामध्येच केली तरुणाने आत्महत्या


रिक्षातच विष प्राशन करून संदीप वसंत पवार (वय ४०, रा. यशोमंगल सोसायटी, गंगावाडी, रविवार पेठ) यांनी आत्महत्या केली. मंगळवारी (दि.१६) सायंकाळी रविवार पेठ परिसरात हा प्रकार घडला. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी पार्किंगमध्ये लावलेल्या रिक्षात विषारी औषध सेवन केले. त्यांना बेशुद्धावस्थेत पाहिल्यानंतर नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सरकारवाडा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

धारदार शस्त्राने वार

मोटरसायकल बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी एकावर धारदार शस्त्राने वार केले. काठेगल्ली परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे. सिद्धार्थ किसन उन्हवणे (वय २३, रा. बागवानपुरा) हा काठेगल्ली परिसरातून मोटरसायकल काढण्यासाठी गेला होता. त्याने संशयित महेश सुरेश जाधव, सुमीत विष्णू खाणे आणि एका अल्पवयीन संशयिताला त्यांची मोटरसायकल बाजूला घेण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने तिघांनी उन्हवणे यास मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिकाम्या तिजोरीवर भूसंपादनाचे ‘ओझे’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शनिवारी (ता.२०) होत असून, या सभेवर भूसंपादनाचे १२८ कोटी ४७ लाख रुपयांचे २० प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. हे सर्व प्रस्ताव व्यपगत होणार असल्याने स्थायीला ते मंजूर करावे लागणार आहेत. परंतु तिजोरीत खळखडाट असताना एवढा निधी येणार कुठून, असा सवाल आहे. दरम्यान, घंटागाडीला निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आहे.

महापालिकेची स्थायी समितीची सभा ही तब्बल तीन आठवड्यानंतर शनिवारी होत आहे. या सभेत विविध आरक्षित जम‌िनी संपादीत करण्याचे सर्वाधिक प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशान्वये भूसंपादन करणे, १२७ च्या नोटीसनुसार भूसंपादनाचे प्रस्ताव यात समाविष्ट आहेत. यात पिंपळगाव खांब मलशुद्धीकरण केंद्रासाठी तीन कोटीच्या प्रस्तावाचा समावेश आहे. नाशिक सर्व्हे क्रमांक २५८ मध्ये डीपी रोडसाठी रुंदीसाठी संपाद‌ीत करण्यात येणाऱ्या जागेच्या बदल्यात १५ कोटी ४२ लाख देणे, पंचवटी क्रीडांगणासाठी वाढीव मोबदला, सर्व्हे क्रमांक ८६८ मधील हायस्कूल जागेच्या आरक्षणासाठी २६ कोटी २६ लाख रुपये मोबदला देण्याचे प्रस्ताव आहेत.

स्थायी समितीवर ठेवण्यात आलेले भूसंपादनाचे प्रस्ताव व्यपगत होणारे आहेत. त्यामुळे स्थायी समितीला त्यांना मंजुरी द्यावीच लागणार आहे. मात्र महापालिकेची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून, तिजोरीत सध्या खळखळाट आहे. नगरसेवकांच्या विकासकामांसाठी सुद्धा निधी मिळत नाही. अशा स्थितीत एवढा पैसा महापालिका देणार कसा असा प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. शासनाने टीडीआर धोरणातही बदल केल्याने टीडीआर देऊन जमीन संपादीत करणे शक्य नाही. त्यामुळे सव्वाशे कोटी महापालिका देणार कुठून असा प्रश्न विचारला जात आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रॉपर्टी व्यावसायिकाची गोळी झाडून हत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या एकाची पत्नी आणि बहिणीसमोर डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. बुधवारी मध्यरात्री पाऊणच्या सुमारास आर्टीलरी रोडवरील जैन भवनसमोर ही खळबळजनक घटना घडली. पूर्ववैमन्स्यातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, संशयित चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस आयुक्त रवींद्र वाडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत जगशरण मंगवाना (वय ३५, रा. फ्लॅट क्र. १४, देवरथ अपार्टमेंट, फर्नांडीस वाडीसमोर, नाशिकरोड) असे खून झालेल्याचे नाव असून त्याची पत्नी गीता (वय २७) यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. दोन सख्ख्या भावांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोह‌ित उर्फ माले गोविंद डिंगम, मयूर चमन बेद, संजय उर्फ मॉडेल चमन बेद आणि विनोद राजाराम साळवे (रा. फर्नांडीस वाडी, नाशिकरोड) अशी आरोपींची नावे आहेत. गीता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री पाऊणच्या सुमारास रणजित घरी आले. पाठोपाठ संशयितही घरासमोर येऊन रणजित यांच्याशी बोलू लागले. माझे थोडे काम आहे त्यांच्याबरोबर जाऊन येतो असे सांगत रणजित यांनी अॅक्ट‌िव्हा मोपेड काढली. संशयित रोहीत याच्यासमवेत ते निघून गेले. अन्य तिघेजण दुसऱ्या मोटरसायकलवरून सोबत गेले. काहीतरी विपरीत घडण्याच्या भितीपोटी गीता आणि त्यांची नणंद पूनम गोहेर या देखील रिक्षातून त्यांच्या मागोमाग गेल्या. जैन भवनजवळ संशयित रणजित यांना संशयित मारहाण करीत होते. गीता आणि पूनम यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. त्याचवेळी संशयितांपैकी तिघांनी रणजित यांना पकडून ठेवले व संशयित रोह‌ित याने रणजित यांच्या डोक्यात मागून गोळी झाडल्याचे गीता यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर संशयित तेथून पसार झाले. रात्रगस्तीवर असलेले वाहतुकचे पोलिस निराक्षक एम. एम. बागवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. डीसीपी श्रीकांत धिवरे, एसीपी रवींद्र वाडेकर, गुन्हे शाखेचे एसीपी सचिन गोरे, पोलिस निरीक्षक अशोक भगत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. रणजित यांना प्रथम बिटको हॉस्पिटलमध्ये व तेथून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निळ्या पूररेषेतील बांधकामांना बंदी?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
गोदावरी नदीकाठावरील लाल व निळ्या पूररेषेतील बांधकामाना सरसकट बंदी घालण्याचा 'निरी'चा अहवाल महापालिकेने फेटाळून लावला असून, केवळ निळ्या पूररेषेतील बांधकामांनाच बंदी घालण्याची शिफारस केली आहे. सोबतच गावठाणातील जुने वाडे पाडून तीथे पुर्नविकास करण्यालाही महापालिकेने संमती दर्शवली आहे. त्यामुळे गावठाणातील हजारो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. तर, निळ्या पूररेषेत जम‌िनी घेऊन ठेवलेल्या बिल्डरांना मोठा झटका बसला आहे. दरम्यान, लोकोपयोगी कामे असल्यास जलसंपदा व पर्यावरण विभागाची परवानगी घेऊन या क्षेत्रात बांधकामे करण्याला हिरवा कंदील महापालिकेने दाखवला आहे.

गोदावरी प्रदूषणासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने 'निरी'ची नियुक्ती केली होती. 'निरी'ने प्रदूषणासह नद‌ीपात्रातील बांधकामांसदर्भात विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला होता. त्यात नदीपात्रात ५० वर्षाचा पूर गृहीत धरून लाल व निळ्या पूररेषेतील बांधकामांवर सरसकट बंदीची शिफारस केली होती. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नियुक्त केली होती. या समितीने निरीच्या पूर्ण शिफारशी लागू करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. हा निर्णय घेतल्यास नदीकाठावरील बांधकामांना मोठा फटका बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकांकडूनच कायद्याचे उल्लंघन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भावी पिढी घडविण्यात मोलाची भूमिका बजावणारे अनेक शिक्षकच शिक्षण कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचा दावा प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने केला आहे. शहरात ६०० तर ग्रामीण भागात ९०० असे जवळपास १५०० शिक्षक हे शाळेत नोकरी करतानाच खासगी क्लासेस घेत असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. त्यामुळे या सर्व शिक्षकांवर कारवाई करावी या मागणीसाठी असोसिएशनच्या वतीने गुरुवारी (१८ फेब्रुवारी) सकाळी ११.३० वाजता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घातला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागीय कायद्यानुसार कोणत्याही अनुदानित अथवा विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना खासगी शिकवणी घेण्यास प्रतिबंध आहे. तसेच, या शिक्षकांना इतर कोचिंग क्लासेसमध्ये शिकविण्याची परवानगीही नाकारण्यात आली आहे. असे असतानाही जिल्ह्यात दीड हजारांवर असे कोचिंग क्लासेसचे शिक्षक आहेत की, जे शाळांमध्ये नोकरी करीत आहेत. या प्रकरणामुळे प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या कर्मचाऱ्यांचा पारा चढला आहे.

विद्यार्थ्यांचे इंटरनल परीक्षांचे मार्क्स या शिक्षकांच्या हाती असल्याने त्यांच्याकडे क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो. मात्र, जे विद्यार्थी हे क्लास टाळतात, त्यांच्यावर शिक्षक शाळेत या ना त्या मार्गाने दबाव आणत असतात. यातून अनेक समस्यांना मार्ग फुटत आहे, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले. शिवाय एकीकडे सरकारचा महसूल व दुसरीकडे क्लासमधून मिळणारी दुय्यम कमाई शिक्षक आपल्या घशात घालत असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे. अशा विविध बाबी आज शिक्षणाधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिल्या जाणार आहेत. तसेच, सरकारी अनुदानप्राप्त व विनाअनुदानित शाळा-कॉलेजमध्ये नोकरीस असून, खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकांविरुद्ध अनेकवेळा निवेदने देऊन सुद्धा ठोस कारवाई केली गेली नाही. याचा जाब विचारण्यासाठी संघटनेच्या वतीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घातला जाणार आहे. जिल्ह्यातून चारशे ते पाचशे क्लासचालक या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय टेनिस संघात नाशिकच्या तीन खेळाडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रीडा व युवक मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे राजीव गांधी खेल अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या माहिलांच्या राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघामधे नाशिकच्या तेजल कुलकर्णी, कोमल नागरे, जीताशा शास्त्री यांची निवड झाली आहे.

बिहारमधील पाटणा शहरातील पाटलीपुत्र क्रीडा संकुलात या स्पर्धा होतील. सोलापूर येथे झालेल्या महिलांच्या राज्य निवड चाचणी स्पर्धेतून महाराष्ट्र राज्य महिला टेनिस संघाची निवड करण्यात आली. तेजल, जिताशा आणि कोमल या सर्व खेळाडू आंतरराष्ट्रीय टेनिस प्रशिक्षक राकेश पाटील यांच्याकडे निवेक क्लब येथे नियमित सराव करतात. त्यांच्या या निवडीबद्दल निवेकचे पदाधिकारी भीष्मराज बाम, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे आदींनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषद विशेषाधिकार समिती आज नाशकात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद विशेषाधिकार समितीची विभागीय स्तरावरील बैठक आज (१८ फेब्रुवारी) नाशिक येथे होणार आहे. ही अकरा सदस्यीय समिती असून, त्यामध्ये विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विधान परिषद सदस्य विजय ऊर्फ भाई गिरकर, डॉ. अपूर्व हिरे, राजेंद्र जैन, सतीश चव्हाण, नरेंद्र पाटील, अ‍ॅड. निरंजन डावखरे, अ‍ॅड. राहुल नार्वेकर, शरद रणपिसे, जनार्दन चांदूरकर व विशेष निमंत्रित श्रीकांत देशपांडे यांचा समावेश आहे.
ही समिती नाशिक विभागातील सर्व विधान परिषद सदस्य व विधानसभा सदस्य, शासकीय विभागांचे प्रमुख यांच्याबरोबर सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळेत सरकारी विश्रामगृह येथे विविध विषयांवर दोन स्वतंत्र बैठका घेणार आहे. बैठकीस विभागातील सर्व जिल्हाधिकारी, सीईआे पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक, विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. समितीची मुख्य बैठक दुपारी दोन वाजता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागपूरला विजेतेपद, पुणे उपविजेता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वडाळा रोड येथील जे. एम. सी. टी. (जुम्मा मस्जिद चॅरिटेबल ट्रस्ट) तंत्रनिकेतन महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आंतर तंत्रनिकेतन राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत नागपूरने पुणे शहर संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

उपांत्य सामन्यात पुणे शहरने वाघोली (पुणे) संघाला ३८ विरुद्ध २४ अशा गुणांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली होती तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात नागपूरने सोलापूरला ४२ विरुद्ध १९ असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. नागपूर आणि पुणे यांच्यातील अंतिम लढत अत्यंत चुरशीची झाली. पहिल्या सत्रात दोन्ही संघाचे गुण ११-११ असे होते. दुसऱ्या सत्रात पुण्याने आघाडी घेऊन १४ गुणांची भर घातली तर नागपूरला केवळ ७ गुण वसूल करता आले. तिसऱ्या सत्रात नागपूर संघातील कुलदीप देशमुख, यश खंडवाणी, अभिराम तपासे यांनी एकमेकांत चांगला समन्वय साधून चांगले पास देत १० गुण नोंदवले, तर साहिल भुरे आणि यश कारखाटे यांनी चांगले संरक्षण केल्यामुळे पुणे संघाला केवळ ८ गुण मिळविता आले. चौथ्या अखेरच्या सत्रातही नागपूरच्या खेळाडूंनी तब्बल १८ गुण नोंदवले तर पुण्याला केवळ ८ गुण नोंदवता आले. त्यामुळे नागपूरने हा अंतिम सामना ४६ विरुद्ध ४१ असा जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुण्यातर्फे मजीद रोद्दे याने १२ गुण नोंदवून चांगली शर्थ दिली तर मंगेश टेमघर आणि आशिष शिंदे यांनीही चांगले प्रयत्न केले. परंतु ते आपल्या संघाचा पराभव टाळू शकले नाहीत.

विजेत्यांना आणि उपविजेत्यांना महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे आयोजक जे. एम. सी. टीच्या वतीने चषक, प्रमाणपत्र तसेच सर्व संघांना किट देण्यात आले. विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे साहीबे सज्जादा कायदे मिल्लत सय्यद महेमूद अश्रफुल जिलानी, कछोचा शरीफ (उत्तर प्रदेश), संस्थेचे सचिव हाजी हिसामुद्दिन खतीब, अध्यक्ष रौफ पटेल, क्रीडा संचालक माणिक गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेची तांत्रिक बाजू नाशिकच्या बास्केटबॉल प्रशिक्षक राजेश क्षत्रीय आणि नाशिक जिल्हा बास्केटबॉल असो‌सिएशनचे सचिव जाकीर शेख यांनी सांभाळली.

सामन्यांचा निकाल

उपांत्य सामने

पुणे विजयी विरुद्ध वाघोली (पुणे) (३८-२४)

नागपूर विजयी विरुद्ध सोलापूर (४२ - १९)

अंतिम सामना :-

नागपूर विजयी विरुद्ध पुणे शहर ( ४६-४१)

वैयक्तिक गुण

कुलदीप देशमुख - १२ गुण,

यश खंडवाणी - ७ गुण

अद्वैत पाटील - ७ गुण

मजीद रोद्दे - १२ गुण

रोहन भोसले - ९ गुण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळ कसोटीचा; दबून जावू नका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भ्रष्टाचार आरोपांमुळे 'ईडी'कडून भुजबळ कुटुंबीयांची चौकशी सुरू असल्याने संकटात सापडलेल्या माजी मंत्री छगन भुजबळांनी बुधवारी नाशिकची धावती भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.

सध्या कसोटीचा काळ आहे त्यामुळे दबून जावू नका; पुन्हा जोमाने कामाला लागा, असा सल्ला भुजबळ यांनी आपल्या समर्थकांना दिला. राज्य सरकार माझ्याशी सुडाने वागत आहे. मात्र, आपण यातून सहिसलामत बाहेर पडू, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भुजबळांच्या धावत्या भेटीतही भुजबळ फार्म हाऊसवर कार्यकर्त्यांनी भेटीसाठी गर्दी केली.

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ सध्या 'ईडी'च्या अटकेत आहेत. सोबत पंकज भुजबळही चौकशीच्या फेऱ्यात आहे. तर भुजबळांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. समीरच्या अटकेने थेट भुजबळ विरुद्ध केंद्र व राज्य सरकार असा संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा संकटातही गेल्या मंगळवारी अमेरिकेहून परतलेल्या छगन भुजबळांच्या पाठीशी नाशिकमधील त्यांचे समर्थक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वागतासाठी थेट मुंबईत गेले. आपल्या समर्थकांच्या माध्यमातून भुजबळांनी सरकारसह पक्षालाही ताकद दाखवली. त्यामुळे या कार्यकर्ते व समर्थकांचे आभार मानण्यासाठी भुजबळांनी बुधवारी नाशिकचा धावता दौरा केला. भुजबळ फार्म हाऊसवर आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी चुंभळे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, उपमहापौर गुरूमीत बग्गा, संजय चव्हाण, कविता कर्डक यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.

यावेळी भुजबळांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना, सध्याचा काळ कसोटीचा आहे. दबून जावू नका असा सल्ला दिला. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखवा, असे आवाहन केले. राज्यात अनेक वेळा सत्तांतरे झाली. मात्र, कोणतेच सरकार सुडबुद्धीने

वागले नाही. विद्यमान सरकार

सुडाचे राजकारण करत आहे. राजकीय संकेत पायदडी तुडवित आहे. परंतु, कार्यकर्त्यांनी घाबरू नये. आपल्याला काहीही होणार नाही. यातून आपण सहीसलामत बाहेर येवू असा विश्वास भुजबळांनी कार्यकर्त्यांना दिला.

कार्यकर्त्यांचा उत्साह

छगन भुजबळ हे नाशिकमध्ये केवळ एक तासासाठी येणार असल्याचे सुरुवातीला नियोजन होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्या उत्साही कार्यकर्त्यांमुळे भुजबळांना अधिक वेळ थांबावे लागले. त्यांना कार्यकर्त्यांचा हिरमोड करता आला नाही. दुपारी तीन वाजता आलेल्या भुजबळांना भेटण्यासाठी नाशिकसह जिल्हाभरातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच होता. चार वाजेच्या सुमारास त्यांना मुंबईला परतायचे होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या वाढत्या गर्दीमुळे त्यांना सायंकाळी उशिरापर्यंत थांबावे लागले.

कविता राऊतचा सत्कार

प्रसिद्ध धावपट्टू सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतचा दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक तसेच रिओ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल भुजबळांच्या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भुजबळ यांनी कविताला रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशिक्षक विजेंद्रसिंग, पती महेश तुंगार, प्रेरणा बलकवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images