Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिन्नरमध्ये टँकर सुरू करण्याची मागणी

$
0
0
सिन्नर तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसताना पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद केले आहेत.

स्वाइन फ्लूचा दुसरा बळी

$
0
0
बागलाण तालुक्यात रविवारी पुन्हा स्वाइन फ्लूने दुसरा बळी घेतला. सटाणा शहरातील सुप्रिया शाम जाधव या पंचवीस वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला आहे.

मॅकडोनाल्डचे लायसन रद्द होणार?

$
0
0
कोल्डकॉफीत झुरळ आढळून आलेले असतानाही असहकार्याचा कांगावा करणाऱ्या मॅकडोनाल्ड या रेस्टॉरंटचे लायसन रद्द होण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात कमीत कमी तीन लाख रुपये दंड करण्याच्या हालचालीही अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केली आहे.

हायकोर्टाच्या आदेशाचे पालन व्हावे

$
0
0
मुंबई हायकोर्टाने ग्रंथपालांच्या सुधारित वेतनश्रेणीत आडकाठी ठरलेल्या शिक्षण संचालकांचे यापूर्वीचे पत्र रद्द करण्याचे आदेश एका याचिकेवर निर्णय देताना दिले होते.

प्रवाशास लुटले

$
0
0
बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीला एकटे गाठून तिघा भामट्यांनी त्याच्याकडील दोन मोबाइल व रोख रक्कम असा २८ हजार ३०० मुद्देमाल चोरी केला. ही घटना चांडक सर्कल परिसरात घडली.

जिल्हा कृती समितीची बैठक गुंडाळली

$
0
0
ठेवीदारांच्या प्रश्नांबाबत ठोस निर्णय न घेता आणि आधीच्या निर्णयावर अंमलबजावणीची कुठलीही भूमिका स्पष्ट न करताच जिल्हा शासकीय कृती समितीची बैठक गुंडाळण्यात आल्याचा आरोप पा. भां. करंजकर यांनी केला आहे.

सरकारी कार्यालयांसाठी कोर्टात याचिका

$
0
0
देवळा तालुक्याची सर्व सरकारी कार्यालये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व्हावीत, यासाठी मुंबई हायकोर्टात जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुलगा की मुलगी?

$
0
0
मनमाड रेल्वे स्टेशनवर प्रसूत झालेल्या महिलेला उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर तिने आपल्याला मुलगी नव्हे तर मुलगा झाल्याचा दावा केला आहे.

प्रशिक्षणार्थी तरुणीचे रॅगिंग

$
0
0
प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणा-या १८ वर्षीय तरूणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी १० जणांवर महाराष्ट्र रॅगिंग अॅक्टमधील कलम ४ नुसार सोमवारी गुन्हा दाखल केला.

अनधिकृत बांधकाम सर्वेक्षणाच्या हालचाली

$
0
0
गोदावरी नदीपात्रालगत असलेल्या पूररेषेत अनधिकृतरित्या बांधकामे होत असल्यामुळे अशा बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जलसंपदामंत्र्यांनी दिले होते.

महागाईविरोधात शिवसेनेचा संताप

$
0
0
आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली.

९१ हजार ग्राहकांची वीज तोडली

$
0
0
नाशिक परिमंडळातील महावितरणने थकबाकी विरोधात कारवाईचा बडगा उगारला असून वीज बिल न भरणाऱ्या ९१ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे.

गंगापूर रोड परिसरातील रस्त्याची दुरवस्था

$
0
0
महिन्याभरापूर्वी झालेल्या पावसामुळे शहराच्या अनेक भागातील रस्त्यांची झालेली दूरवस्था अद्यापही कायम आहे. सावरकरनगर परिसरातही रस्त्यांच्या या समस्यांनी नागरिकांना हैराण करुन सोडले आहे.

अर्ज करूनही मिळेना बीपीएल शिधापत्रिका

$
0
0
पिंपळगाव, दाढेगाव परिसरातील नागरिकांनी अर्ज करुनही बीपीएल शिधापत्रिका मिळत नसल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे. मागणी केलेल्या नागरिकांना बीपीएल शिधापत्रिका ताबडतोब द्याव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भीमशक्ती संघटनेने दिला आहे.

नाशिकरोड परिसरात साथीच्या रोगाचे थैमान

$
0
0
नाशिकरोड परिसरातील अनेक भागांमध्ये डेंग्यू तसेच साथीच्या रोगांची लागण झालेले पेशंट आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली असून महापालिकेने वेळीच दखल न घेतल्यास जास्त फैलाव होण्याचा धोका आहे.

‘डीएड’ प्रवेशांना अखेर सुरुवात

$
0
0
गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या डीएडच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला अखेर १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. शहरातील बी. डी. भालेकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रवेश केंद्र सुरू करण्यात आले असून दोन दिवसात चारशे विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत.

‘राग’ देऊ नका

$
0
0
धाने पोळल्यावर माणूस ताकही फुंकून पितो; माणूस इतकी काळजी घेतो तर कायद्याचे व्यवस्थापन करणारे किती काळजी घेत असतील. परंतु याच काळजी घेण्याच्या नादात कधीकधी भलत्यालाच गळाला लावून पोलिसदादा घेऊन जातात.

विद्यार्थ्यांना धडे बँकिंग प्रणालीचे

$
0
0
शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळणेही त‌ितकेच आवश्यक असल्याने फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीतर्फे बँकिंग प्रणालीचे धडे देण्यात आले. शाळेच्या तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी इंडस्ट्रीयल क्रेडीट अँड इनव्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच आयसीआयसीआय बँकेला भेट दिली.

‘त्या’ शिक्षकाला अखेर नारळ

$
0
0
विद्यार्थीनींशी गैरवर्तन करणाऱ्या वाय. डी. बिटको शाळेतील टी. बी. आहिरे या शिक्षकाला अखेर शाळेने काढून टाकले आहे. या शिक्षकाविरुध्द भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. १ सप्टेंबरपासून त्याला शालेय कामकाजातून मुक्त केल्याचे संस्थेमार्फत सांगण्यात आले.

बंद पॉलिसींवर कायमची गदा

$
0
0
विमा नियामक प्राधिकरणाच्या (इर्डा) निर्देशानुसार, दोन वर्षांपासून बंद असलेल्या विमा पॉलिसींचे पुनरुज्जीवन येत्या एक ऑक्टोबरपासून होऊ शकणार नाही. त्यामुळे नाशिक विभागात बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी दोन लाख ८० हजार विमेधारकांच्या हाती फक्त एक महिना आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images