Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रावसाहेब दानवेंच्या दौऱ्याकडे सर्वच पक्षांचे लक्ष

$
0
0



नेत्यांच्या पक्षांतर चर्चेमुळे ढवळले राजकीय वातावरण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत विविध पक्षांचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षांतर करणार असून त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.

लोकसभा, विधानसभेत मुसंडी मारणाऱ्या भाजपने आता महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना केली आहे. भाजपची पक्षांतर नाट्याची धुरा माजी आमदार वसंत गिते, सचिन ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गिते यांनी भाजप प्रवेश करताना मनसेला खिंडार पाडण्याची तयारी केली. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. आता, फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपने संघटनेची ताकद वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. भाजप प्रवेशावेळी गितेंसोबत आलेल्या नगरसेवकांना कारवाईला समोरे जावे लागले असते तसेच निधीलाही कात्री लागली असती. आता परिस्थिती बदलली असून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. गेल्या काही दिवसांपासून गुप्त बैठकांचे सत्र पार पडते आहे. दानवे याच्या उपस्थितीत रविवारी (दि. २७) होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख राजकीय पक्षातील पदाधिकारी, नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी दिली. मनसे, काँग्रेस व इतर पक्षाचे किमान २८ नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. मनसेच्या काही नगरसेवकांनी तर २०१६ मध्ये ब्रॅण्डींगसाठी वापरले जाणारे कॅलेडर व इतर साहित्य सुध्दा भाजपच्या नावाने तयार केल्याची चर्चा सुरू आहे. मनसेचे २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीत ४० सदस्य निवडून आले. हेमंत गोडसे, संपत शेलार, नगरसेवका शिंदे यांच्या रुपाने मनसेला खिंडार पडले. माजी महापौर यतीन वाघ सुध्दा अज्ञातवासात असून त्यांचा भाजपप्रवेश पक्का मानला जातो आहे. दरम्यान, होणाऱ्या डॅमेज कंट्रोलला रोखण्यासाठी मनसेकडून कोणतीही तयारी केली जात नसल्याचे चित्र सध्या तरी दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थाचे ६४ कोटी महापालिकेच्या खात्यात

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कामांचे राज्य सरकारकडे बाकी असलेल्या २०२ कोटीपैकी ६४ कोटी रुपये सोमवारपर्यंत (दि. २८) महापालिकेच्या तिजोरीत जमा होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने २० विभागांच्या कामांचे गुणवत्ता तपासणी अहवाल सादर करण्यास सांगितले होते. सोमवारी हे काम पूर्ण केल्याने महापालिकेला पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने खर्च केलेल्या निधीपैकी २०२ कोटी रुपये राज्य सरकारकडून येणे बाकी आहेत. राज्य सरकारने महापालिकासहीत इतर विभागांसाठी १७१ कोटी सिंहस्थ निधी अंतर्गत सिंहस्थ कक्षाकडे जमा सुध्दा केला आहे. मात्र, निधी देण्यापूर्वी संबंधित विभागाने गुणवत्ता तपासणी अहवाल सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने कळवले होते. सिंहस्थ कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाल्याने महापालिकेची सध्या वाईट अवस्था आहे. अनेक कामे रखडली असून १७१ कोटीपैकी किमान १०० कोटी रुपये महापालिकेला पदरात पडण्याची शक्यता होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने गुणवत्ता अहवाल सादर करण्यास सांगितल्याने सर्व गडबड झाली. महापालिकेने कामांचा गुणवत्ता अहवाल सादर करताना घोळ घातला. ​त्यामुळे जेवढ्या कामांचा गुणवत्ता अहवाल सादर केला तेवढाच निधी महापालिकेला मिळाल्याचा दावा केला जातो आहे.

सिंहस्थ कामांची १३० कोटींची देयके प्रलंबित आहेत. आता फारतर ६४ कोटी रुपये हातात मिळणार असल्याने महापालिकेच्या विवंचनेत भर पडणार आहे. महापालिकेने केलेल्या सर्व कामांचा गुणवत्ता अहवाल सादर झाला नसल्याने महापालिकेच्या निधीवर सक्रांत आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेच्या तिजोरीत आता राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यात ६४ कोटी रुपये जमा होणार असल्याने महापालिकेवरील आर्थिक भार कमी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट सोनं विकणारी टोळी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

उपनगर पोलिसांनी बनावट सोनं विकणाऱ्या राजस्थानच्या तीन जणांना शिंदे गावाजवळील ब्राह्मणवाडे येथे अटक करून त्यांच्याकडून पाच किलोचे बनावट सोनं जप्त केले. कानाराम जेठाजी सोळंकी (वय ६०, मांडवा), दलारामा देवाराम राठोड (वय ४०, उमेदाबाद), सुखराम भीमाराम वाघेला (वय ३०, कावतारा, सर्व राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सहाय्यक आयुक्त रवींद्र वाडेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, निरीक्षक बाळासाहेब कोटकर उपस्थित होते. कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चन्ना, गायकवाड, कडभाने, शिंदे, शेख, अहिरे, धारणकर, वाजे, आरोटे, जगताप, संगभोर आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

जगदीश नागरे (वय ३६, शिखरेवाडी कार्नर, नाशिकरोड) यांनी उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. १९ डिसेंबरला नागरे उपनगरनाक्याहून सिन्नरला जात असताना दोघांनी त्यांची टाटा टेम्पो गाडी थांबविली. जेसीबीने जमीन खोदताना जुने सोनं सापडल्याचे सांगून पाच लाखाला एक किलो सोनं विकण्याचा प्रस्ताव ठेवला. पुरावा म्हणून त्यांनी नागरे यांना खऱ्या सोन्याची माळ दाखवत दोन मणी काढून दिले. सोनाराकडे जाऊन खात्री करण्यास सांगितले. दोघांना शिंदेगावाजवळ सोडून दिल्यानंतर नागरे यांनी सराफाकडे जाऊन मणी सोन्याचे असल्याची खात्री केली. २२ डिसेंबरला सकाळी पावणे नऊला फोन करून संशयितांनी त्यांना शिंदे गावाजवळ बोलावले. नागरे यांनी एक किलो सोन्यासाठी दीड लाख रुपयेच दिले. मात्र, संशयितांनी पाच लाखाचा आग्रह धरला. नागरेंना घेऊन ते ब्राह्मणवाडे गावाजवळील तीन पालांवर (तंबू) गेले. तेथे आणखी तीन जण होते. त्यांनी सोन्याची माळ नागरे यांना देऊन दीड लाख रुपये घेतले. नाशिक येथे सोनाराकडे नागरे यांनी माळ दाखविली असता ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

नागरे यांनी उपनगर पोलिसांकडे तक्रार केली. गुन्हा दाखल केल्यानंतर श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कोटकर व सहकाऱ्यांनी शिंदे पळसेत जाऊन संशयितांना फोन लावला. मात्र, तो बंद होता. नागरे पोलिसांना घेऊन ब्राह्मणवाडे येथे गेले. पोलिसांनी राजस्थानी लोकांच्या पालाला घेराव घालून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मण्यांच्या माळाचे सहा व साखळ्यांचे तीन गुच्छ तसेच पिवळ्या धातूचे तारांचे बंडल असे पाच किलो बनावट सोने, पाच मोबाइल जप्त केले.

लोक बोध घेत नाहीत

पाच वर्षापूर्वी उपनगरच्या कॅनलरोड भागात अशाच पद्धतीने बनावट सोनं दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालून एका टोळीने पोबारा केला होता. दोन वर्षापूर्वी गुन्हे शाखेच्या युनिट तीनने सिन्नरफाटा येथे बनावट सोने विकणाऱ्या टोळीला पकडले होते. अशा घटना वारंवार घडूनही लोक आमिषामुळे बोध घेत नसल्याचे चित्र आहे.

राजस्थानी टोळीने गुजरात, राजस्थान, महाराष्ट्रासह अन्य राज्यातही अनेकांना ठकविल्याचा संशय आहे. त्यादिशेने तपास सुरू आहे. दोन फरार संशयितांचा शोध सुरू आहे.

- श्रीकांत धिवरे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राजीव गांधी जीवनदायी’चे लाभार्थी वाढवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक दुर्बल घटकांसाठी राजीव गांधी जीवनदायी योजना उपयुक्त असली तरी लाभार्थ्यांचे प्रमाण अवघा एक टक्का असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी २६ जानेवारीपूर्वी शि‌बिर घेऊन प्रत्येक तालुक्यात किमान तीन हजार लोकांपर्यंत ही योजना पोहोचवा, असे आदेश जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी मंगळवारी आरोग्य यंत्रणेला दिले.

राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ घेता येतो. २१ नोव्हेंबर २०१२ पासून जिल्ह्यात ही योजना राबविण्यास सुरुवात झाली. सुमारे ९७१ आजारांवर त्यांतर्गत मोफत उपचार होतात. सुमारे दीड लाख रुपयांपर्यंतचा उपचार खर्च या योजनेंतर्गत केला जातो. जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटल्समध्ये ही योजना राबवली जाते.

जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी ६५ टक्के लोकसंख्या आर्थिक दुर्बल घटकामध्ये समाविष्ठ आहे. जिल्ह्यात एकूण ३२ लाख लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सर्वच लोक आजारी पडत नाहीत हे वास्तव असले तरी प्रत्यक्षात केवळ ३२ हजार १८५ रुग्णांनीच आतापर्यंत योजनेचा लाभ घेतल्याची माहिती बैठकीतून पुढे आली. योजना अजून अनेक लोकांपर्यंत पोहोचली नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून, ती पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, असे आदेश देण्यात आले आहेत.

बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांसह अधिकारी उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांत ८२ कोटी रुपये खर्चापर्यंतचे उपचार रुग्णांना मोफत देण्यात आल्याची माहिती डॉ. जगदाळे यांनी दिली.

महिनाभरात उपचार देणे आवश्यक

राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या प्रसाराकरिता शिबिरांचे आयोजन करण्यास सांगण्यात आले असून, नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रत्येक शिबिरासाठी एक लाख रुपयांचा निधी देण्याचे विचाराधीन आहे. २६ जानेवारीपूर्वी १५ तालुक्यांमध्ये ही शिबिरे घ्यावी लागणार आहेत. प्रत्येक शिबिरातून किमान १०० रुग्णांना पुढील महिनाभराच्या काळात उपचार मिळवून देण्याची जबाबदारी यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा शल्य ‌चिकित्सक अंमलबजावणीसाठी समन्वयक म्हणून काम पहावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपसूचनांमध्ये हरवले महासभेचे बजेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महासभेसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरणारे यंदाचे बजेट उपसूचनांमध्ये हरविल्याची कबुली खुद्द महापौरांनीच दिली आहे. स्थायीने सादर केलेल्या बजेटला उपसूचनांसह मंजुरी देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात प्रशासनाला ठरावच सादर केला नाही. आतातर सुधारित बजेट तयार करण्याची लगबग सुरू झाली असून, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच लोकप्रतिनिधींच्या बजेटशिवाय कामकाज झाल्याचा दावा केला जातो आहे.

चालू आर्थिक वर्षासाठी प्रशासनाने एक हजार ४३७ कोटी रुपयांचे बजेट तयार केले होते. स्थायी समितीने त्यात जवळपास ३०० कोटी रुपयांची वाढ सुचवून महासभेला १ हजार ७६९ कोटी रुपयांचे बजेट सादर केले. अर्थसंकल्पाच्या विशेष महासभेत लोकप्रतिनिधींनी नगरसेवक निधी, विविध कामे यात वाढ करण्यासाठी उपसूचना मांडल्या.

महापौर अशोक मुर्तडक यांनी सर्व सदस्यांच्या उपसूचनांसह बजेट मंजूर केले. प्रत्यक्षात याबाबत कोणताही ठराव तयार करून तो प्रशासनाला सादर करण्यात आला नाही. याबाबत महापौरांना विचारणा केली असता, महासभेत प्रत्येक सदस्यांच्या मागणीचा विचार करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. तसेच उपसूचनांचाही विचार करावा लागतो. सदस्यांच्या उपसूचनांची यादी मोठी होती. यामुळे बजेटचे काम पुढे जाण्यास विलंब झाल्याचे मुतर्डक यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटनुसारच सुधारीत बजेट तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे महासभेच्या बजेटला आता कोणतीही किंमत नसल्याचे स्पष्ट होते. महासभेचा अधिकार यामुळे डावलला गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांना हुडहुडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून, मंगळवारी नाशिकमध्ये ७.४ अंश इतके राज्यातील नीचांकी तापमान नोंदविले गेले आहे. निफाड तालुक्यात किमान तापमान ६.७ अंश नोंदविले गेले आहे. पहाटेच्या सुमारास हा पारा आणखी उतरण्याचा अंदाज आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे थंड हवेचे ठिकाण म्हणून लौकीक असलेल्या महाबळेश्वपेक्षा नाशिकचे तापमान अधिक घसरले असून, नाशिककर सध्या हुडहुडीचा अनुभव घेत आहेत. मंगळवारी दिवसभर वातावरणात गारठा जाणवत होता. थंडीचा कडाका वाढल्यामुळे दिवसाही उबदार कपडे परिधान करण्यास नागरिकांकडून प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.

विशेष म्हणजे नाशिक लगतच्या जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातही तापमानाचा पारा खाली घसरला आहे. मंगळवारी जळगाव जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश, तर नगर जिल्ह्यात हेच तापमान १०.६ अंश नोंदविले गेल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये हेच तापमान १३.१ अंश नोंदविले गेले.

दरवर्षी नाताळच्या कालावधीत थंडीचा कडाका वाढत असल्याचा अनुभव नाग‌रिक घेतात. यंदाही तसा अनुभव येऊ लागला आहे. त्यामुळेच शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटत असल्याचे पहावयास मिळत आहे. सायंकाळनंतर गारठा वाढत आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस किमान तापमान ९ ते ११ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे ते अधिक घसरण्याचीही शक्यता आहे. थंडीचा फायदा गहू, हरभरा या पिकांना होणार असला तरी कडाका वाढत गेल्यास द्राक्ष पिकांचे मणी तडकून नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत

आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मशिन जाळल्याने कोटमगावला तणाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

कोटमगाव येथील सोसायटीच्या मतदानप्रकरणी निर्माण झालेला वाद अद्याप मिटलेला नाही. मतदानावरून झालेल्या भांडणाची कुरापत काढून सहा संशयितांनी एका घरावर दगडफेक करून कुटुंबीयांना दमबाजी केली. तसेच, ५० लाखांचे पोकलॅण्ड मशीन पेटवल्याने तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र वाडेकर यांनी कोटमगाव येथे जाऊन नागरिकांची बैठक घेतली. गुंडांना अटक करावी, गावातील अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान, कोटमगाव हाणामारी प्रकरणी नाशिकरोड कोर्टाने भानुदास शिवाजी घुगे व केशव सुहास म्हस्के यांना न्यायालयीन कोठडी दिली. तसेच, अन्य सात आरोपींना जामीन मंजूर केला.

नाशिकरोड पोलिस ठाण्यात पुष्पा ज्ञानेश्वर घुगे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रविवारी (दि. २०) रात्री दोन वाजेच्या सुमारास पुष्पा, त्यांची जाऊ आणि मुली घरात झोपल्या होत्या. संशयित भानुदास शिवाजी घुगे, अक्षय सुभाष म्हस्के, गौरव शिवाजी घुगे, योगेश अशोक घुगे, पंडित रामदास घुगे आणि त्यांचा एक साथीदार यांनी घरावर दगडे फेकली. तसेच त्यांचे मशीनही जाळण्‍यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीचा विचार करताना...

$
0
0

विजय संकलेचा


आपले लाडके शहर अखेर सर्वानुमते सशर्त स्मार्ट सिटी होण्यास हिरवा कंदिल मिळाला आणि आता खऱ्या अर्थाने आपले शहर वेगाने घोडदौड करू लागेल अशा आशा तमाम नाशिककरांच्या मनात पल्लवित झाल्या आहेत. एसपीव्हीबद्दल गेले काही दिवस आपण उलटसुलट बरेच ऐकत होतो. सदर एसपीव्हीबद्दल दस्तरखुद्द महापौर, उपमहापौर तसेच नगरसेवक यांना महानगरपालिकेची विश्वस्त या नात्याने तिची स्वायत्तता धोक्यात येईल अशी शंका होती व ती रास्तदेखील होती. परंतु सर्वांशी चर्चेअंती ती आता सशर्त व अटीशर्तीवर ती आता दूर झाली आहे व नाशिक महानगर पालिका कंपनी म्हणून तिचे स्वतंत्र व तरीदेखील स्मार्ट सिटी अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध लोकोपयोगी योजना यावर तिचा अंकुश राहणार हे आता निर्विवाद आहे. अर्थात इथे हेही विशेष नमुद करावयास हवे की या दृष्टीने आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रथम पासूनच लोकांचा सहभाग यावर भर दिला व नाशिककरांनी देखील आता त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

मुळात स्मार्ट सिटी म्हणजे काय? याचे आयुक्तांनी सर्वार्थाने उत्तम सादरीकरण लोकांपुढे तसेच संबंधित अधिकाऱ्यापुढे केले व त्याचा योग्य तोच परिणाम झाला. आजची युवा पिढी टेक्नो-सॅव्ही होऊ घातली आहे. किंबहुना आहेच व याच भविष्यात बहुपयोगी पडणाऱ्या तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून शहरवासियांचे वास्तव्य अधिक सुखकर कसे होईल हा त्याचा गाभा तर आहेच. त्याचबरोबर, एरवी शहराला भेडसावणारे पाणी, वीज, रस्ते, गटार-नाले, साफ-सफाई, इ. चे सुव्यवस्थापन या तंत्रज्ञानाच्या आधारे अधिक सुकर होणारे ठरणार आहे. तसेच शहराच्या सौंदर्यात अधिक आकर्षक रस्ते दुभाजक निर्माण होऊ शकतात. यात उत्तम रस्त्यांच्यामध्ये सुशोभित वाहूतक बेटांपासून ते अधिक आकर्षक रस्ते दुभाजक निर्माण होऊ शकतात. असे म्हणतात की, रस्ते हे कोणत्याही शहराच्या रक्तवाहिन्याच आहेत व ते परतीला पोषकच ठरतात. शहराच्या हद्दीतले काही आजमितीस दुर्लक्षित राहिलेले भाग या अशा अनेक रस्त्यांच्या जाळ्यामुळे केवळ अधिक जवळ येणार नाहीत तर अशा भागांचा विकास देखील लवकर होण्यात सहाय्यभूत ठरतील याचा निश्चितच योग्य तो परिणाम शहरातल्या नागरिकांच्या राहणीमानात तर पडणार आहेच. त्याच बरोबर नवनवीन उद्योग धंदे व त्यात प्रामुख्याने सेवा उद्योग (सर्विस इंडस्ट्री) यांना हे वातावरण अधिक पोषक ठरेल. हे सर्वश्रूतच आहे की, शहरात सेवा उद्योगाच्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार व तोदेखील कुशल तंत्रज्ञानाधिष्ठीत रोजगाराची उपलब्धता वाढीस लागणार आहे.

याचा थेट परिणाम दर माणसी Affordabale income वाढ होऊन शहरातल्या अर्थ चलनाला गती प्राप्त होईल व पर्यायाने शहराचा विकास होण्यास मोठा हातभार लागणार आहे. या उद्योगधंद्यांना लागणारे सर्व infrastructure बरोबरीने शहर वाय-फाय देखील होणार आहे. ज्यामुळे शहरातील नागरिकांचा उत्तम संपर्कासाठी व तसेच बहुविध उपयोग होणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीतीत देखील याचा उपयोग प्रामूख्याने होऊ शकतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची बीआरटीएस, मेट्रोसारखी साधने उपलब्ध झाल्यास रस्त्यावरची वाहतूक सुरळीत व प्रदूषणमुक्त होण्यास देखील मोठा हातभार लागणार आहे. शहराच्या निकोप वाढीसाठी जशा या वरील सर्व सुखसुविधा लागतात त्याचप्रमाणे, शहराचे सौंदर्य खुलविण्यासाठी व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शहर कलासक्त व सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. किंबहुना तो त्याचा गाभाच आहे. त्यातूनच आपल्या शहराची ओळख पटत असते.

स्ट्रीट आर्ट ही पाश्चात्य देशांच्या धर्तीवर आधारित अशीच एक नाविन्यपूर्ण योजना आहे. ज्यात शहरातल्या रस्त्यालगत दुर्लक्षित व पडीक जमिनीचा वापर उत्तम पेंटिंग्स वा अन्य कलात्मक गोष्टींना अधिक उठावदार होऊ शकतील व शहरातला एक कलासक्त शहर म्हणून नवीन आयाम देऊन जाईल. त्याच्याच जोडीला न्यूयॉर्कमधील टाईम स्क्वेअरप्रमाणे आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शहरातल्या नागरिकांना एकत्र जमून आपली कला सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळावे हा यामागील उद्देश आहे, मध्यंतरी आयुक्तांनी याबद्दल सुतोवाच केले आहेच. तसेच मुंबईसारख्या शहरापासून आता केवळ दोन तासाच्या अंतरावर वसलेल्या आपल्या नाशिक शहराला आपल्या शहराला अनेक स्तरावर उपयोग होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन सिस्टर सिटीज- मुंबई, ठाणे व नाशिक ही संकल्पना राबविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यातून कला, सांस्कृतिक, वाणिज्य, पर्यटन व त्या अनुषंगाने अनेक उद्योग धंद्यांना चालना मिळू शकेल. या दोन शहरातील सुज्ञजन एकत्र येऊनच हे सहज साध्य होणार आहे. वाहतुकीचा सर्व वाढत्या शहरांबरोबरीने आपल्या शहराला देखील भेडसावणारा ज्वलंत प्रश्न आहे. त्याकरिता मेट्रो सुरू करण्यासाठी आपल्या शहरातल्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेल्या कॅनालवरील जागेचा विचार केल्यास सर्वोत्तम ठरणार आहे. यामुळे त्यावर व त्याच्या आजूबाजूला वाढणाऱ्या बकाल वस्तींचा प्रश्नदेखील सुटू शकतो. ही तर केवळ नांदी आहे. असे अनेक उपक्रम, योजना शर वासीयांच्या दृष्टीने सर्वार्थाने हितकारक व शहराच्या विकासात व सौंदर्यात भर टाकणारे आता सहजतेने उभे राहू शकतात व २१ व्या शतकातले सर्वांगसुंदर शहर म्हणून आपल्या नाशिक शहराचा बोलबाला न झाल्यास नवल!!

(लेखक नगररचना आणि बँकिंग क्षेत्राचे अभ्यासक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गोदाकाठचं रामायण’ ला पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूर येथे झालेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात नाशिकमधील लेखक दत्तात्रेय बैरागी यांच्या 'गोदाकाठचं रामायण' या पौराणिक कादंबरीस 'सुधा-कुसूम' कादंबरी प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. पद्मगंधा प्रतिष्ठान आणि साहित्य विहार संस्थेतर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार असून राज्यभरातून आलेल्या अनेक कादंबऱ्यांमधून या कादंबरीची निवड करण्यात आली. निवडक उत्तमोत्तम साहित्यकृतींची निवड करुन त्यांना पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने वाङमय पुरस्कारांनी गौरवण्यात येते. पद्मगंधा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे, साहित्य विहारच्या अध्यक्ष आशा पांडे, राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. वि. स. जोग, समारोह सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. मनोहर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व एक हजार रुपये देऊन बैरागी यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अनेक नामवंत साहित्यिक व रसिक बहुसंख्येने उपस्थिती होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधींचे दावे एलआयसीकडे पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
उत्तर महाराष्ट्रातील तब्बल अडीच लाख विमाधारकांचे बँक खाते एलआयसीशी (भारतीय आयुर्विमा महामंडळ) जोडलेले नसल्याने तब्बल ७०० कोटी रुपयांची रक्कम धोक्यात आली आहे. येत्या मार्चपर्यंत खाते जोडण्याचे फर्मान एलआयसीने सोडल्याने विमाधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आयुर्विम्यापेक्षाही वर्षानुवर्षे आयुष्याची पुंजी म्हणून सामान्य नागरिक एलआयसीकडे पहात आले आहेत. वयाच्या उत्तरार्धात मिळालेली रक्कम हाती पडावी, अशी त्यांची अपेक्षा असते. काही वेळा कर्त्या माणसाचा मृत्यू होतो, त्यावेळी त्याच्या वारसांना ताबडतोब रक्कम मिळणे गरजेचे असते. मात्र, काही ग्राहकांचे राष्ट्रीयकृत बॅँकेत खाते नसल्याने त्यांना रक्कम देण्यास एलआयसीने असमर्थता दर्शवली आहे. याबाबत २०१४-१५ या आर्थिक वर्षात एलआयसीच्या नाशिक विभागाने शंभर टक्के दावे निकाली काढले आहेत. निकाली काढलेल्या ग्राहकांची संख्या अडीच लाख आहे. त्यांना नाशिक विभाग सातशे कोटी रुपये देणे लागते. यापैकी जास्तीत जास्त दावे जानेवारी ते मार्च या तिमाहीतील आहेत. भारत सरकारच्या आदेशानुसार १ जुलै २०१५ पासून सर्व प्रकारची रक्कम नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरद्वारे द्यावेत, असे सूचित करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक ग्राहकाने मॅँडेट फॉर्म देणे आवश्यक आहे. या फॉर्म मध्ये पॉलिसीधारकाने त्यांच्या बॅकेच्या खात्याचा नंबर आयएफएस कोड एमआयसीआर कोड इत्यादी माहिती भरुन एकदाच एलआयसीच्या शाखेत जमा करायचा आहे. एकदा फॉर्म भरल्यानंतर भविष्यात देण्यात येणाऱ्या सर्व रकमा या त्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. या पध्दतीमुळे ग्राहकांचा फायदाच होणार आहे. चेक हरवणे, गहाळ होणे असे प्रश्न उद्भवणार नाही. त्याच प्रमाणे मिळालेली चेक बँकेत भरण्यासाठी जावे लागणार नाही. कुणाला खाडाखोडही करता येणार नाही. त्यामुळे गैरव्यवहार टळतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतपुरवठा आराखड्यात कृषीला झुकते माप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील कृषी विकासाला चालना देणारा ९ हजार ५०० कोटींचा विक्रमी पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. गत वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये सुमारे एक हजार कोटी रुपयांची वाढ केली असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

गेली दोन तीन वर्ष सातत्याने अस्‍मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शेतकरी खचत असून, त्यातूनच आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग त्याच्याकडून स्वीकारला जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्याद्वारे दिलासा देण्याचा प्रयत्न आगामी वर्षाच्या आराखड्यातून करण्यात आला आहे. गतवर्षी त्यामध्ये कृषी विकासासाठी २८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा ती वाढवून ३ हजार ५०० कोटी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पतपुरवठा धोरणाबाबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी मिलिंद शंभरकर, स्टेट बँक ऑफ इंडिया व सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक, जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक तसेच जिल्ह्यातील बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गतवेळेचे पतपुरवठा धोरण, सद्यस्थिती आणि यंदा आराखड्यात कोणत्या क्षेत्राला किती प्राधान्य द्यावे यावर चर्चा करण्यात आली.

याबाबत कुशवाह म्हणाले, चालू वर्षी एप्रिलमध्ये ८ हजार ५०४.१९ कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडा घोषित करण्यात आला होता. मात्र, यंदा त्यामध्ये सुधारणा करण्यात आली असून, एक हजार कोटींनी तो वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी वर्षाचा आराखडा ९ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामध्ये ३५०० कोटी रुपये केवळ कृषी कर्जाशी संबंधित बाबींवर ठेवण्यात आले आहेत.

पीककर्जावर भर देण्यात आला असून, त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल, असे बोलले जात आहे. याखेरीज लघु उद्योगांवरही यंदा ९०० ऐवजी १५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व क्षेत्रांत क्षमता दाखवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात आपली क्षमता दाखविली पाहिजे. यात केवळ खूप अभ्यासानेच विद्यार्थी घडत नसतात, तर इतर कला गुणांमध्ये देखील विद्यार्थ्यांनी उतरले पाहिजे. असे मत प्राचार्य पी. टी. कडवे यांनी व्यक्त केले.

अंबड इंडस्ट्रीज् अॅण्ड मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) तर्फे उद्योजकांच्या पाल्यांचा कौतुकाची थाप म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य पी. टी. कडवे यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आयमाच्या के. आर. बूब सभागृहात झालेल्या कार्यक्रमात यावेळी ७० उद्योजकांच्या पाल्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य मिळविल्याबद्दल आयमा ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

पालकांना मार्गदर्शन करताना कडवे म्हणाले, आपल्या पाल्यांना शालेय जीवनापासूनच आयएएस, आयपीएस अशा परीक्षांबाबत पाल्यांना माहिती देणे गरजेचे आहे. जेणेकरून शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना आयएएस व आयपीएसच्या परीक्षा देताना सोपे जाईल. तसेच शिक्षण संस्थांनी देखील पैसे कमविणे हाच उद्देश न ठेवता विद्यार्थी कसे घडतील याचा विचार करावा असा सल्ला देखील त्यांनी शिक्षण संस्थांना दिला.

आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी मुलांना टीव्ही, मोबाइल या सर्वांचे फायदे व तोटे सांगितले. टीव्ही, मोबाइलमुळे मुलांची बौद्धिक क्षमता खालावत जात असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत असतो. पर्यायाने मुलांना नैराश्य प्रसंगी येऊ शकते. मुलांना सर्वगुणसंपन्न बनविण्यासाठी

पालकांनी रोजच मुलांशी संवाद साधला पाहिजे असेही मत पाटील यांनी मांडले.याप्रसंगी आयमाचे सरचिटणीस राजेंद्र आहिरे, आयपीए कन्सल्टंन्ट व पेटंट अॅटोर्नी, अॅड. उमा भट्टड, माजी अध्यक्ष सुरेश माळी, निलीमा पाटील, जे. आर. वाघ, प्रमोद वाघ, प्रज्ञा पाटील, एन. डी. ठाकरे, आर. एस. नाईकवाडे यांसह उद्योजक व त्यांचे पाल्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांमध्ये रुजवा व्यायाम संस्कार

$
0
0

स्वाती पाचपांडे, नाशिक

सुमेधाकडे तिची बारा वर्षांची भाची इरा सुटीनिमित्त आली होती. सुमेधाने ठरविले की भाचीला छानसा वेळ देऊन तिचा व्यक्तीमत्व विकास घडवून आणावा. इराचा मात्र बव्हंशी वेळ टीव्ही पाहण्यात जात होता. एकदा टीव्हीसमोर बसली की सोबत खाऊचे बकाणे भरणे सुरूच असायचे. इराला समजावून सांगावे तरी कसे हा प्रश्न आता सुमेधाला पडला होता. तिला राहावलेच नाही आणि तिने इराला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अर्थातच इराला ते आवडले नाही.

इरा लहान असताना आई कामात असली की तिला कार्टून लावून द्यायची आणि आईची सुटका होऊन जायची. जेवणही पोगो पाहत पाहत, त्यामुळेच तर ती अशी टीव्हीभक्त झाली होती. नंतर तिला खेळायला बाहेर पाठवायचा प्रयत्न करून पाहिला पण ती आता सामाजिकदृष्ट्या एकलकोंडी झाली होती. तिचे कुणाशीच पटत नव्हते. इराने असं एकलकोंडं व्हावं हे आईबाबांना तरी कुठे वाटत होतं?, पण तसंच तर होत होतं. इराने चुकीची जीवनशैली स्वीकारल्याने तिचे वजन वाढले होते. ती बारा वर्षाच्या मानाने बेढब दिसू लागली होती.

हे इराच्याच नव्हे तर आजकाल अनेक मुलांच्या बाबतीत दिसून येते. हे टाळण्यासाठी आजच्या पालकांनी लहान वयापासूनच आपल्या मुलांना हलक्या-फुलक्या व्यायामाची सवय लावली पाहिजे. व्यायाम केला की दमायला होते, मग भाजीपोळी आरामात पोटात जाते आणि त्याचे उत्तम पचन देखील होते. या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांची सुयोग्य वाढ होऊन आरोग्य उत्तम राहते. व्यायाम म्हणजे जिममध्ये जाऊन करावयाचा व्यायाम नसून त्यांना मोकळ्या हवेत मैदानी खेळ खेळायला घेऊन जाणे. शाळेतील विविध क्रीडाविषयक उपक्रमांमध्ये त्यांना जाणीवपूर्वक भाग घ्यायला लावला पाहिजे. सोपी योगासने किंवा जिमनॅस्टिक याची आवड मुलांमध्ये रुजवायला हवी. खेळताना शरीराचा तोल कसा सांभाळावा तसेच खेळताना डोळे आणि हातपाय यांचा योग्य समन्वय कसा राखावा हे देखील शिकवावे. योग्य वेळापत्रक आखून द्यावे ज्यात अभ्यासाबरोबर खेळालाही वेळ राखून ठेवता येईल. सायकलिंग, पोहणे, पतंग उडवणे हे सोपे व्यायम प्रकार आहेत. त्यात काही पारंपरिक खेळांचा समावेश करता येईल.

खेळाला महत्त्व दिल्याने सर्वांगीण विकास तर होतोच आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हारजीत कशी स्वीकारावी याचे जणू प्रशिक्षणच लहान वयात मिळते. मुलांमध्ये खिलाडूवृत्ती विकसित होते. आयुष्यात यश तसेच अपयश सारख्याच वृत्तीने स्वीकारण्याचे बाळकडू मुलांना अवगत होत असते. म्हणूनच मुलांनी रोज अभ्यास करणे जितके गरजेचे आहे तितकेच व्यायाम व खेळ यांना प्राधान्य देणेही गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कत्तलखान्यावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

राज्यात बंदी असलेल्या गोवंश जनावरे कत्तलीसाठी आणलेल्या जुने नाशिकच्या नाईकवाडीपुरा परिसरातील एका घरातील कत्तलखान्यावर भद्रकाली पोलिसांनी छापा टाकून दहा गोवंश जनावरे हस्तगत केली. या प्रकरणी बेकादेशीर मटण विक्री करणारा रईस नामक व्यक्तीस पोलिसांनी अटक केली असून, दुकानातील मटणही ताब्यात घेतले आहे.

कत्तल करण्यात आलेला जनावर कोणता याविषयी माहिती घेण्यात येत असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड व त्यांच्या सहकारी यांनी सकाळी नऊच्या सुमारास छापा घालत ही कारवाई केली. जुने नाशिक परिसरात राज्यात बंदी असलेल्या गोवंश जनावरे कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर मिळून येत असून, ही गोवंश जनावरे कोठून व कोण पुरवठा करतो याची पोलिस चौकशी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकरी वाचवा’ची सामूहिक हाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या १७ व्या जिल्हा अधिवेशनात उपस्थित शेतकरी बांधवांनी 'शेतकरी वाचवा, शेती वाचवा' अशी सामूहिक हाक दिली. किसान सभेच्या माध्यमातून आपल्या हक्कासाठी लढायचे असा संकल्प व ठराव या अधिवेशनात करण्यात आला.

अधिवेशन स्थळाला कॉ. गोविंद पानसरे, व्यासपीठाला कॉ. भगवंत ठोंबरे तर प्रवेशद्वाराला कॉ. एल. एम .पाटील असे नाव देण्यात आले. यावेळी किसान सभेच्या जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. त्यात जिल्हाध्यक्षपदी भास्कर शिंदे तर कार्याध्यक्षपदी प्रा. के. एन. अहिरे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

किसान सभेच्या अधिवेशनाचा प्रारंभ क्रांतिसिह नाना पाटील यांच्या प्रतिमेला हार घालून करण्यात आला. या वेळी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, कॉ. एल. एम. पाटील आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. अधिवेशनाचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी उत्तम ठोंबरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे राज्य सचिव अॅड. हिरालाल परदेशी, शेतकरी वाचवा अभियानाचे निमंत्रक राम खुर्दळ, किसान सभेचे कार्याध्यक्ष प्रा. राजू देसले, जिल्हा सचिव भास्कर शिंदे यांची उपस्थिती होती.

अधिवेशनाला मार्गदर्शन करताना किसान सभेचे राज्य सचिव हिरालाल परदेशी म्हणाले की, किसान सभेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या म्हणून कसोशीने प्रयत्न करावे लागतील. शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के नफा देवून शेती मालाच्या घामाचा दाम शेतकऱ्याला देण्यासाठी लढा उभारू असेही ते म्हणाले. प्रा. राजू देसले यांनी प्रास्ताविकात शेतकरी वाचला तर देश वाचेल, यासाठी शेतकरी बांधवानो आता मरायचे नाही किसान सभेच्या माध्यमातून हक्कासाठी लढायचे असा नारा दिला. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनीही मनोगत व्यक्त केले .

अधिवेशनाच्या शेवटी किसानसभेची जिल्हा कार्यकारणी तीन वर्षांसाठी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. सचिवपदी कॉ. देविदास भोपळे (नांदगाव), उपाध्यक्ष नामदेव राक्षे (इगतपुरी), संजय बैरागी (घोटी), जगन माळी (सिन्नर), संपत थेटे (नाशिक) तसेच जिल्हा कार्यकारिणीत कॉ. किरण डावखर, शिवाजी शिंदे, देवचंद सुरसे, सूर्यभान शिंदे, बाळासाहेब काळे, विष्णुपंत गायखे यांची निवड करण्यात आली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉ. किरण डावखर, कॉ. रमजान पठाण, कॉ. अनिल देशमाने, अॅड. दत्तात्रेय गांगुर्डे, संपत शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

अधिवेशनातील ठराव

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या.

कांद्याचे निर्यातमूल्य कमी करा.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबवा.

शेतकऱ्यांच्या शेतावर पोट रस्ता द्या, बांधावरील कामे रोजगार हमीतून करा.

स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार खर्च + ५० टक्के नफा हमीभाव यानुसार द्या.

शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प केंद्र व राज्य सरकारने जाहीर करावा.

कृषिमूल्य आयोगात शेतकरी प्रतिनिधी वाढवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिवाळी शिबिरामुळे होतात श्रमसंस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपळगाव बसवंत

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. हिवाळी शिबिरातून ग्रामीण भागाचा कायापालट होऊन श्रमसंस्कार होतात, असे प्रतिपादन मविप्रचे शिक्षणाधिकारी प्रा. एस. के. शिंदे यांनी केले.

के. के. वाघ कॉलेजच्या नारायणटेंभी येथील हिवाळी शिबिराचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, प्रा. डी. डी. काजळे, पंचायत समिती सदस्य अनिल बोरस्ते, बाजार समितीचे संचालक गोकुळ गीते होते. प्राचार्य डॉ. शिंदे यांनी स्वागत तर एनएसएस प्रमुख प्रा. ज्ञानोबा ढगे यांनी प्रास्तविक केले. सतीश मोरे म्हणाले की, श्रमसंस्कार व मनोरंजन यांचा मिलाप म्हणजे हे शिबिर आहे. एनएसएसच्या माध्यमातून स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान यशस्वी होऊ शकते. गणेश बनकर म्हणाले, की गावाचा कायापालट करण्याची ताकद एनएसएसमध्ये आहे. विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी सुसंवाद साधावा. सरपंच शैला गवळी व उसरपंच अरुण गवळी यांनी अशा उपक्रमांमुळे नारायणटेंभी हे आदर्श व स्वच्छ गाव म्हणून साकारेल असे सांगून गाव आदर्श करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

अप्पा मोरे, उपप्राचार्य एस. वाय. माळोदे आदी उपस्थित होते. प्रा. अल्ताफ देशमुख यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. अश्विनी कदम यांनी आभार मानले. प्रा. अभिजित पवार, प्रा. उज्ज्वला डेरे, प्रा. गोकुळ बोरसे, नितीन सरोदे, रुपेश पवार, प्रियंका ढोकरे आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत तीन कोटींची रस्ताकामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

देवळाली मतदारसंघात तीन कोटींच्या रस्ता कामांना नागपूर हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी बजेटमध्ये मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार योगेश घोलप यांनी दिली.

रस्त्यांची कामे त्वरित करावीत, अशी देवळाली मतदारसंघातील अनेक गावांमधून मागणी होती. रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अधिकारी व मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर २३ रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्याचे घोलप यांनी सांगितले. मतदारसंघातील मंजूर रस्त्यांची कामे पुढीलप्रमाणे- नवीन सामनगाव ते चाडेगाव फाटा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, राज्य मार्ग शिंदेगाव ते शिवाजीनगर कालनी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, जातेगाव ते दहेगाव रस्ता सुधारणा, राष्ट्रीय महामार्ग ३० ते तळेगाव जातेगाव रस्ता तसेच पिंपळद ते जातेगाव रस्ता सुधारणा, मुळेगाव जातेगाव रस्ता सुधारणा, चेहेडी बेलतगव्हाण ते संसरी रस्त्याची सुधारणा, आंबेबहुला गौळाणे ते महापालिका हद्द रस्ता सुधारणा, मातोरी ते दऱ्याबाई मंदिर रस्ता सुधारणा, ओढा ते गंगापाडळी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, सैय्यद पिंपरी ते ओढा लाखलगाव चेहेडी रस्ता बांधकाम, विल्होळी ते आंबडशिव रस्ता मजबुती व डांबरीकरण, साडगाव ते घोडेगाव रस्त्यावर पूल बांधणे, जाखोरी ते जोगलटेंभी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, लोहशिंगवे फाटा ते लोहशिंगवे गाव रस्ता करणे, पळसे गावातून जुना पळसे साखर कारखाना रस्ता डांबरीकरण.

पुलांच्या मंजूर झालेल्या कामांमध्ये दरी दऱ्याबाई मंदिर रस्त्यावर मोरीचे बांधकाम, रोहिले गंगाम्हाळुंगी रस्तायवर मोरी, पिंपळद (ना.) ते दहेगाव रस्त्यावर मोरी, राजुला बहुला ते लहांगेवाडी रस्तायवर मोरी, वासाळी दुडगाव

रस्त्यावर काकजळी नदी मोरीचे बांधकाम, धोंडेगाव शास्त्रीनगर गंगाम्हाळुंगी रस्त्यावर मोरीचे काम, ओझरखेड धोंडेगाव रस्त्यावर मोरीचे काम करणे, भगूर लहवित वंजारवाडी रसत्यावर पुलाचे काम करणे यांचा समावेश आहे. या कामांना मंजुरी मिळाल्यामुळे रस्त्याचे प्रश्न लवकरच सुटतील. यामुळे वाहनचालकांची कसरत कती होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने सोमवारी रात्री आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हितेश संजय पाटील, असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता.

मूळ अमळनेर जिल्ह्यातील रहिवाशी असलेला हितेश आडगाव परिसरातील मातृ दर्शन सोसायटी​ जवळील हरी ओम इमारतीत भाडेकरू म्हणून राहत होता. परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याची माहिती हितेशला समजल्यानंतर त्याने आत्महत्या केली, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, घटनेचा पुढील तपास आडगाव पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेस्ट ड्राईव्हच्या नावाने सफारीची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टेस्ट ड्राईव्हसाठी घेऊन गेलेल्या नव्या कोऱ्या १३ लाख रुपयांच्या टाटा सफारीची चोरी झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, द्वारका परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास द्वारका येथील शोरूममध्ये ग्राहकांची वर्दळ होती. त्यावेळी रस्त्यावरून चालत आलेला एक भामटा थेट शोरूममध्ये आला. त्याने वाहनाबाबत थोडीफार चौकशी करून टेस्ट ड्राईव्ह करण्याची मागणी केली.

संबंधित चोरट्यांच्या वाहन परवान्याची किंवा इतर कोणत्याही कागदपत्राचौकशी केल्याशिवाय सेल्समन देवेंद्र मनोज पवार (वय २१) याला भामट्यांसोबत पाठवण्यात आले. मुंबई-आग्रा हायवेने मुंबईच्या दिशेकडे निघालेल्या भामट्याने साधारणतः एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर चाकू बाहेर काढून सेल्समन पवारला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, पवारला वाहनाबाहेर फेकून फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर शोरूममध्ये सीसीटीव्ही नाहीत. या वाहनांची कोणतीही नोंदणी झालेली नसल्याने तपासात अडचणी निर्माण होत असल्याचा दावा पोलिस सूत्रांनी ​केला.

राठी आमराईजवळ चेन स्नॅचिंग

पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत व पेंडल चोरट्यांनी तोडून नेले. ही घटना राठी आमराईजवळ सोमवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधुनमधून होणाऱ्या स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्याची मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिसर्च सेंटरमध्ये विकिरण प्रक्रियेस सुरुवात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

लासलगाव येथील भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर संचलित कृषक या कृषी उत्पादन संरक्षण केंद्रात फळे, अन्न पदार्थ व मसालेजन्य पदार्थांवर विकिरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाची शेतकरी व व्यापाऱ्यांना माहिती व्हावी यादृष्टीने बुधवारी लासलगाव येथील प्रकल्पावर अॅग्रोसर्ज ईरीडेश इंडिया प्रा. लिमिटेड यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

लासलगाव येथील प्रकल्पात याआधी कांदा व आंबा आदी कृषी उत्पादनांवरच विकिरण प्रक्रिया केली जात होती. आता विकिरण पद्धतीचा वापर करून कांदे, बटाटे यांना कोंब येऊ न देणे, गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये यातील कीटक नष्ट करणे, केळी, आंबे यासारख्या फळांची पिकण्याची क्रिया लांबविणे, मांस, मासे जास्त काळ टिकविणे तसेच त्यातील रोगजंतू नष्ट करणे व मसाल्याचे निर्जंतुकीकरण करणे आदी गोष्टी या प्रकल्पात साध्य करता येणार आहेत. विकिरण प्रक्रियेमध्ये उष्णतेचा वापर न करता पदार्थ टिकविले जात असल्यामुळे त्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहतो. गॅमा किरण कुठल्याही पदार्थात खोलवर जाऊ शकत असल्यामुळे बाजारात ठेवण्यात येणाऱ्या सीलबंद पदार्थांवरही प्रक्रिया करता येते. शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादित शेतमालाची रेडिएशन करून साठवणूक केली तर त्याची टिकवण क्षमता वाढून योग्य भाव मिळतील, असे मत अग्रोसर्ज एरिडीएटर इंडिया प्रा. लिमिटेडचे महेश पारीख म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images