Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सहा दुचाकींसह दोघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर पोलिसांनी मोटरसायकल चोरणाऱ्या दोन संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सहा मोटरसायकली जप्त केल्या आहेत. या दुचाकी टिटवाळा व वाशिंद रेल्वे स्टेशन येथून चोरल्या असल्याचे समजते.

या प्रकरणी बहिरू भीमा जाधव (वय २२) रा. आंबेडकर नगर, सिन्नर. मूळ रा. कोकण वाडी, ता अकोले, जि. अहमदनगर तसेच गोरख पुंडलिक खोकले (वय ३२) रा. आयटीआयजवळ, सिन्नर, मूळ रा. पाचपट्टे, ता. अकोले, जि अहमदनगर, अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन लाल रंगाच्या बजाज पल्सर, एक काळ्या रंगाची बजाज पल्सर, एक लाल व पांढऱ्या रंगाची यामाहा एफ झेड, एक काळ्या रंगाची बजाज डिस्कव्हर अशा सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. आणखी दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. या दुचाकी त्यांनी टिटवाळा व वाशिंद रेल्वेस्टेशन येथून चोरल्या असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे, एएसआय रमेश निकम, पोलिस हवालदार मधुकर देशमुख, लक्ष्मण धकाते, प्रीतम लोखंडे, सुशांत मरकड, नितीन जाधव, सुदाम धुमाळ, सचिन पिंगळ, सचिन करंडे, भगवान शिंदे, किरण गांगुर्डे, नितीन मंडलिक, रवींद्र टर्ले, श्रीकांत दोंदे, आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार्यालय स्थलांतरास कळवणमध्ये विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण शहरातील शासकीय कार्यालये स्थलांतरित होऊ नयेत, यासाठी कळवण व्यापारी महासंघ व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदार अनिल पुरे यांना निवेदन देण्यात आले. तसेच, या प्रश्नी त्वरित मार्ग न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कळवण शहरापासून पाच कि.मी. अंतरावर कोल्हापूर फाटा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय बांधण्यात आले आहे. या कार्यायालयास सुरुवातीपासून विरोध झाला असतानाही ही इमारत उभारण्यात आली. व्यापारी व नागरिकांचा वाढता विरोध पाहता विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार ए. टी. पवार यांनी या मध्यवर्ती इमारतीत शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज सुरू करू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार तसा पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, निवडणुकीचा निकाल वेगळा आल्याने ही प्रक्रिया थांबली. नवीन वर्षात शहरातील किमान भाडेतत्वावरील कार्यालये या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत हलविण्यात येणार असून, त्यानंतर टप्याटप्याने इतरही कार्यालये स्थलांतरीत होतील. म्हणून कळवण शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनलाल संचेती यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांचे नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी तहसीलदार अनिल पुरे यांना निवेदन देत या प्रश्नी कळवणची जनता गंभीर असून, जर कार्यालये स्थलांतरित झाले तर व्यापारी पेठ उद्ध्वस्त होऊन कळवण बकाल होईल याकरिता कार्यालये स्थलांतरीत करू नका, अशा आशयाचे निवेदन दिले.

या प्रश्नी मार्ग काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विलास शिरोरे, सागर खैरनार, दीपक वाघ, प्रवीण बिरारी, उमेश सोनवणे आदींसह व्यापारी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहक परिषदेच्या बैठकांकडे अधिकाऱ्यांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
ग्राहकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून अनेकदा जागो ग्राहक जागोचा नारा दिला जात असला तरी नागरिक आणि प्रशासनातील अधिकारीही जागे होत नसल्याचे वास्तव आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या ग्राहक संरक्षणच्या बैठकांमध्ये अनियमितता असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकांना विविध विभागांचे अधिकारीच दांडी मारत असल्याने ग्राहक हित जपणार कोण, असा सवाल उपस्थित होतो आहे.

समाजात वावरणारी प्रत्येक व्यक्ती ग्राहक म्हणून व्यावसायिकासमोर जात असते. अगदी खाद्यपदार्थांपासून ते घर खरेदी करणारा प्रत्येक जण ग्राहक असतो. मात्र अशा वेगवेगळ्या स्तरांतील ग्राहकांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक केली जात असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस येतात. फसवणूक झालेल्या अशा ग्राहकांना ग्राहक न्यायालयाचे दरवाजा ठोठावण्याचा अधिकार असला तरी तसे करण्याबाबत नागरिक उदासीन असल्याचा ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. तोंडी तक्रार करण्यासाठी शेकडो लोक पुढे येत असले तरी न्यायासाठी झगडणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही नसतात, अशी कैफियत चळवळीतील कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन होतो की नाही, याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात येते. ग्राहक संरक्षण तक्रार निवारण परिषदेच्या सदस्यांना या बैठकींना निमंत्रित करण्यात येते. अनेकदा ही बैठक अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली जाते. या बैठकीला वजनमापे विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, गॅस वितरण कंपन्या, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस, महावितरण, राज्य महामार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे असते. जिल्हाधिकाऱ्यांकडून तशी सक्ती केली जात असली तरी काही ना काही कारणे सांगून अधिकारी या बैठकांना उपस्थित राहणे टाळतात. त्याऐवजी ते लिपीक किंवा तत्सम प्रतिनिधींना बैठकीला पाठवून स्वत:ची सुटका करवून घेतात. गत बैठकीत उपस्थित तक्रारींवर काय कार्यवाही केली याची माहिती संबंधित प्रतिनिधींना देता येत नाही. तक्रारींचे वेळेत निरसन होत नसल्याने चळवळीतील कार्यकर्त्यांचाही हिरमोड होतो आहे.
महिन्याला किंवा किमान दोन महिन्यातून एकदा ग्राहक संरक्षणबाबत बैठक घेणे आवश्यक आहे. मात्र, चालू वर्षात अनियमितता दिसून आली. वर्षभरात तीन बैठका होऊ शकल्या. प्रशासनातील अधिकारीही ग्राहक हिताबाबत उदासीन आहेत. परिस्थिती सुधारणार का?

टी. बी. साळुंके
अखिल भारतीय ग्राहक पंचायत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची समायोजनाची अट शिथिल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिका क्षेत्रात हद्दवाढीनंतर समाविष्ट झालेल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या ५९ कर्मचाऱ्यांना मनपा सेवेत सामावून घेतल्यानंतर वेतन भत्त्यांसाठी आस्थापना खर्चाची ३५ टक्केची अट शिथिल करण्यात आली आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांना देखील मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते देता येणार आहेत. ही माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात शहारानजीक असलेल्या सोयगाव, भायगाव, द्याने, दरेगाव, म्हाळदे, सायने या गावांचा २००७ मध्ये हद्दवाढीत समावेश झाला. या गावात ग्रामपंचायतीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ५९ कर्मचाऱ्यांना मालेगाव मनपा आस्थापनेवर समायोजित करून घ्यावे यसाठी ना. भुसे यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने ऑगस्ट २०१५ मध्ये मान्यता दिली. मात्र, ही मान्यता देते वेळी एकूण आस्थापना खर्च ३५ टक्के राहील, अशी अट अंतर्भूत करण्यात आली होती. त्यामुळे समायोजन झालेल्या ५९ कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होऊ शकत नव्हता. ही अट शिथिल करावी यासाठी ना. भुसे यांनी शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केल्याने आस्थापना खर्चाच्या ३५ टक्क्याची अट शिथिल करण्यास मान्यता दिली असून, या कर्मचाऱ्यांना देखील मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते देता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्ष-किरण विभागातील बदलांवर मार्गदर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

रेडिओग्राफर्स असोसिएशनचे तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील संमेलन नुकतेच इगतपुरी येथील हॉटेल मानस लाइफ स्टाइल रिसॉर्ट येथे पार पडले. वैद्यकीय क्षेत्रातील क्ष-किरण विभागातील होणारे अत्याधुनिक बदल हा या संमेलनाचा मूळ उद्देश होता.

या संमेलनाचे उद्घाटन मविप्रचे क्ष-किरण विभाग प्रमुख डॉ. गाडगीळ यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष त्रिलोकी मिश्रा, जगदीश जगताप, वाजिद रेड्डी, शंकर भगत आदींनी मार्गदर्शन केले. या संमेलनात नाशिक विभागातून विलास भदाणे यांची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या संमेलनास भारतातून तसेच दुबई ,जर्मनी, जपान येथील काही रेडिओग्राफर्स उपस्थित होते. यावेळी क्ष किरण विभागातील बदलांवर चर्चा करण्यात आली.

या संमेलनाचे आयोजन सरचिटणीस विलास भदाणे यांनी नाशिक युनिटचे अध्यक्ष नरेंद्र वाघ, दीपक वाणी, अभिजीत पगारे, संदीप अहिरे, हरिष देसाई, अनुप नाडे, सनी शिंदे, गणेश काकडे, गणेश खालकर, नितीन बर्गे आदींच्यां सहकार्याने व प्रयत्नाने यशस्वी पार पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्यांचा हंगाम, एटीएम कंगाल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वर्षाअखेरीच्या तोंडावर सुट्यांचा हंगाम आल्यामुळे आगामी सलग ४ दिवस बँका तसेच सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पैशांची चणचण भासण्यासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी बुधवारी पैसे काढण्याचा सपाटा लावल्याने शहरातील अनेक एटीएममध्ये खडखडाट झाल्याचे दिसून आले. बँकांमध्येही दिवसभर गर्दी दिसून आली.

वर्षअखेर जवळ येतानाच ईद आणि नाताळच्या निमित्ताने सुट्यांचा बोनान्झा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाला आहे. गुरुवारपासून थेट रविवारपर्यंत सलग ४ दिवस सुट्या लागून आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुरुवारी (२४ डिसेंबर) ईद ए मिलाद, शुक्रवारी (२५ डिसेंबर) नाताळ, शनिवारी (२६ डिसेंबर) महिन्यातील चौथा शनिवार आणि रविवारी (२७ डिसेंबर) साप्ताहिक सुटी असे सलग चार दिवस सुट्यांमुळे बँका, सरकारी कार्यालये, निमसरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट राहणार आहे.

सलग चार दिवस सुट्या मिळत असल्याने सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे नियोजन केले आहे. खासकरुन पर्यटनाला जाण्याचा अनेकांचा कल आहे. बँका बंद राहणार असल्याने आगामी चार दिवस एटीएममध्ये पैशांची उपलब्धता होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. बुधवारी रात्रीच आम्ही एटीएममध्ये पैसे भरणार असल्याचे बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, अवघ्या एक किंवा दोन दिवसाच्या सुटीतच एटीममध्ये पैशांचा खडखडाट होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात ग्राहकांची मोठीच पंचाईत होणार असल्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅरोलवरील कैद्यास कोनांबेत अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा व पॅरालेवर सुटलेल्या कैद्यास सिन्नर पोलिसांनी कोनांबे येथून जेरबंद केले. गुन्हा वणी पोलिसांच्या हद्दीत झाला असल्याने त्यास वणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दौलत त्र्यंबक चतुर (रा. काजीमाळे, ता. दिंडोरी) यास सत्र न्यायालयाने भादवी कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्याने दारूच्या नशेत देवचंद हरी गांगुर्डे याचा खून केला होता. त्याचा खून केल्याचा गुन्हा सिध्द झाल्याने न्यायालयाने दौलत चतुर यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यात त्याने पाच वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर घरातील व्यक्तीच्या आजाराचे निमित्त करून तीन महिन्याच्या पॅरोलवर सुटला होता. मात्र, मुदत संपूनही तो सेंट्रल जेलमध्ये दाखल झाला नाही. तो वेषांतर करून कोनांबे शिवारात राहत होता. याची माहिती सिन्नर पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे, पोलिस हवालदार नितीन मंडलिक, रवींद्र टर्ले, श्रीकांत दोंदे आदींनी आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. या प्रकरणी वणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला असल्याने त्यास वणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आला थंडीचा महिना, तब्येत सांभाळा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मागील आठवड्यापासून नाशिकमधील वातावरणात कमालीचा बदल होत आहेत. कडाक्याच्या थंडीचा सामना नाशिककर करीत आहेत. मंगळवारी पारा ६ अंशापर्यंत घसरल्याने आरोग्याच्या समस्यांनीही डोके वर काढले आहे. सर्दी, खोकला याबरोबरच सांधेदुखीची समस्या अनेकांना जाणवत असल्याने दवाखान्यांमध्येही गर्दी असल्याचे चित्र होते.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अस्थिरता असल्याने या बदलाचा त्रास लहान बालके, आबालवृद्ध व संधीवाताचा त्रास असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतो. याबरोबरच प्रतिकारशक्ती कमी असल्याच्या कारणांनी अनेक जणांना वातावरणातील बदल सहन करण्यास अडथळे येत आहेत. लहान वयातील मुलांना या वातावरणाचा त्रास अधिक होत असल्याने ज्या व्यक्तींना इन्फेक्शन झाले आहे, अशांच्या सान्निध्यापासून लहान मुलांना दूर ठेवणे, तसेच ऊबदार कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवणे हितकारक असल्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञ देत आहेत. याबरोबरच योग्य आहार घेण्यावर विशेष भर देण्याचा सल्लाही डॉक्टर देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहर सुरक्षेसाठी अवघे दहा पोलिस

$
0
0

कैलास येवला, सटाणा

सरासरी दिवसाकाठी एक गुन्हा घडणाऱ्या सटाणा शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवघे १० पोलिस कर्मचारी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सुमारे ५० हजार लोकसंख्येच्या संरक्षणासाठी अवघ्या दहा पोलिसांच्या पाठबळावर शहरवासीयांना निश्चित रहावे लागत आहे.

बागलाण तालुक्यातील १७९ गावांसाठी सटाणा व जायखेडा ही दोन पोलिस ठाणी कार्यरत आहेत. पैकी १०० गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या सटाणा पोलिस ठाण्यात अवघे ५१ पोलिस कर्मचारी काम करीत असले तरीही तालुक्याचे मुख्यालय असलेल्या सटाणा शहरासाठी अवघे १० पोलिस बळ असल्याने शहरवासीयांनी शांत झोपावे कसे असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे शासनाने सटाण्यासारख्या संवेदनशील शहरात किमान पोलिसांचे संख्याबळ वाढविण्याची मागणी होत आहे.

नोव्हेंबर २०१५ अखेर सटाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ३१० गुन्हे दाखल झाले. याचाच अर्थ ३६५ दिवसांत सरासरी एक गुन्हा या ठिकाणी घडत असताना शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवघे १० पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत.

सटाणा कार्यक्षेत्रासाठी ५२ पोलिस कर्मचारी आहेत. त्यात सटाणा पोलिस ठाण्यासाठी १० कर्मचारी, डांगसौदाणे बीट असलेल्या २६ खेड्यांसाठी तीन पोलिस कर्मचारी, लखमापूर बीट असलेल्या २४ खेड्यांसाठी तीन पोलिस कर्मचारी, वीरगाव व ठेंगोडा या दोघा बीटकरिता प्रत्येकी दोन कर्मचारी देण्यात आले आहेत.

दोन पोलिस कर्मचारी कायमस्वरूपी गैरहजर असून, तीन कर्मचारी प्रतिनियुक्तीवर देण्यात आलेले आहेत. दोन हवालदारांची बदली झाली असली तरीही घोटी व जायखेडा येथून ते बदलून आलेले नाहीत. चार पुरूष व एक महिला कर्मचारी वैद्यकीय रजेवर आहेत. दोन पोलिस कर्मचारी कोर्टकामासाठी राखीव ठेवण्यात येतात. तर, एक कर्मचारी शेषन कोर्टासाठी आहे. या कर्मचाऱ्यांना समन्स देणे, कैदी ने-आण करण्याची कामे देण्यात आलेली आहेत. पोलिस मुख्यालयात असलेल्या तुरुंगांसाठी एक गार्ड व तीन कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना एक गार्ड व दोन कर्मचारी नियुक्तीवर आहेत. दोन ठाणे अंमलदार असून त्यांची नियुक्ती तक्रारी, गुन्हे दाखल करण्यासाठी आहेत. दोन कर्मचारी सीसीटीएनएस व तर दोन कर्मचारी वायरलेस यंत्रणेवर तैनात ठेवण्यात आले आहेत. तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर क्राईम रेकॉर्ड, गुन्हे तपास, चौकशी करण्याची कामे सोपविण्यात आली आहेत. तर, दोन कर्मचारी गोपनीय कामासाठी देण्यात आलेले आहेत.

सटाण्यात पोलिस यंत्रणेवर कामाचा ताण

तब्बल ४२ कर्मचाऱ्यांवर कामे सोपवून सटाणा शहरासाठी अवघे १० पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. एक पोलिस निरीक्षक व दोन पोलिस उपनिरीक्षकांचा यात समावेश आहे. यामुळ शहरातील कायदा सुव्यवस्था, सण उत्सव, मिरवणूक जयंती, पुण्यतिथी, बंदोबस्त या सारखे उपक्रम साजरे होत असल्याने पोलिसांची दमछाक होण्यास वेळ लागत नाही. यामुळे पोलिस यंत्रणेवर कामाचा ताण जाणवत आहे. दिवसभर उपरोक्त कामे करून आलेल्या कर्मचाऱ्यांना रात्री गस्तीसाठी पाठविण्यात येत असल्याने पोलिसांचे मनोधैर्य खचत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशक्ती संगमसाठी साडेसात हजार स्वयंसेवक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सलग नऊ दशकांपासून समाजातील विविध क्षेत्रांमध्ये सेवारूपाने कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे एकत्रिकरण व्हावे, या उद्देशाने ३ जानेवारी रोजी पुण्यात आयोजितशिवशक्ती संगम सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातून सुमारे साडेसात हजार स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

शंकराचार्य न्यास येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.देशभरात सुमारे दीड लाख सेवाप्रकल्पांमध्ये कार्यरत असणाऱ्या अफाट सेवाकार्याची माहिती स्वयंसेवकांना व्हावी. संघटनेच्या व्यापक कार्याचा आढावा त्यांच्यासमोर मांडला जावा, या उद्देशाने संघाच्या पश्चिम प्रांतातील सुमारे सात जिल्ह्यांमधून १ लाख स्वयंसेवक या सोहळ्यासाठी पुण्यात एकत्रित येणार आहेत.

पुण्यातील हिंजवडीच्या आयटी पार्क शेजारील मारुंजी, जांबे व नेरेत या गावांच्या परिसरात हा उपक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासमवेत सरकार्यवाह भैय्याजी जोशी उपस्थित राहणार आहेत. नाशिक शहरातून ७४३३ स्वयंसेवकांनी ह्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. गेल्या चार महिन्यापासून ह्या कार्यक्रमाची नोंदणी प्रक्रिया सुरु होती.

नाशिक शहरात दोन टप्प्यात नोंदणी करताना २३ विस्तारक कार्यकर्त्यांनी शहरातील ७ भागात प्रत्यक्ष घरोघरी आणि महाविद्यालयात संपर्क करून नोंदणी केली. संपर्क विभागाने ह्या निमित्ताने विशेष व्यक्तींचा संपर्क केला. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाला एक बारकोड क्रमांक देण्यात

आला आहे. हा क्रमांक पाहून व शिवशक्ती संगमस्थळी सर्वाना प्रवेश देण्यात येणार आहे. नाशिक शहरातून अनेक नागरिक आणि मान्यवर ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तीन गावातील ४५० एकर परिसरात हा भव्य शिवशक्ती संगम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांवर फीवाढीचा भुर्दंड

$
0
0

सरकारी निष्क्रियतेमुळे शाळांना १५ टक्के फीवाढीची मुभा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सर्व विनाअनुदानित, इंटरनॅशनल स्कूल, अल्पसंख्याक शाळांना २०१६-१७ या शैक्षणिक वर्षी १५ टक्के फीवाढ करण्याची मुभा मिळणार आहे. मुंबई हायकोर्टात यासंदर्भात दाखल एका याचिकेवर सुनावणीदरम्यान हा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच देण्यात आला.

महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक संस्था नियंत्रण कायदा २०११ ला आव्हान देणारी याचिका खासगी संस्थाचालकांनी दाखल केली होती. त्याची सुनावणी न्यायमूर्ती अनूप मोहता आणि न्या. ए. सय्यद यांच्या खंडपीठापुढे झाली. कायद्याला आव्हान देणारी याचिका असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल स्कूल्स इन इंडिया आणि अनएडेड स्कूल्स फोरम या संघटनांनी दाखल केली आहे. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण कायदा आम्हाला लागू होत नाही. या कायद्याअंतर्गत आमच्या संस्था येत नाही. फीवाढीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. या कायद्यांतर्गत आमच्या शाळा येत नाहीत, अशी भूमिका या संस्थांनी मांडली आहे. फीवाढ करण्यासाठी पालक शिक्षक संघ व शासकीय यंत्रणेचीही परवानगी घेण्याची गरज नसल्याचाही दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. यावर निकाल देतांना १५ टक्के फीवाढ करण्याची मुभा हायकोर्टाने दिली.

या खासगी संस्थाचालकांना १५ टक्क्यांपेक्षा अधिक फीवाढ करायची असेल तर पालक शिक्षक संघ व शासकीय यंत्रणेची परवानगी घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील खासगी संस्थाचालकांनी या निकालाचे स्वागत केले आहे तर दुसरीकडे पालक वर्गाचे ‌प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनांनी राज्य सरकारवर टीका करीत नाराजी व्यक्त केली आहे.


लक्ष पुढील सुनावणीकडे

या याचिकेसंदर्भात पुढील सुनावणी १८ जानेवारी २०१६ रोजी होणार आहे. त्यावेळी राज्य सरकार काय भूमिका मांडते, याकडे पालकवर्गाचे लक्ष लागले आहे. राज्य सरकार आपली भूमिका ठोसपणे मांडण्यात यशस्वी झाल्यास या फीवाढीच्या भूर्दंडापासून मुक्तता होण्याची पालकवर्गाला आस आहे.


खासगी शाळांना दिलासा देणारा निकाल आहे. काळानुसार फीवाढ करणे गरजेचे आहे. साधारणपणे दरवर्षाला दहा टक्क्यांनी आपल्याला महागाईला सामोरे जावे लागते. त्यानुसार शाळांसाठीही फीवाढ योग्य आहे. मात्र, एकदा फीवाढ केल्यानंतर शाळांनी किमान दोन वर्षे तरी त्यात वाढ करू नये.

- सचिन जोशी, शिक्षण अभ्यासक

सरकारने कोर्टासमोर व्यवस्थित बाजू न मांडल्याने पालकांना फटका बसणार आहे. पालकांच्या हिताचा विचार करतांना शाळांचे खर्च तपासल्यानंतर भूमिका घेणे योग्य ठरेल. असेल.

- मिलिंद वाघ,

शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधीचा थांगपत्ता लागेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिला व बालकल्याण समितीसाठी अर्थसंकल्पाच्या तरतुदीपैकी पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो. मात्र, अधिकारी त्याचा विनियोग करण्यासाठी इच्छुक नाहीत. कामात रस नसलेल्या अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वत्सला खैरे यांनी केली. बुधवारी समितीच्या झालेल्या बैठकीत प्रत्येक विभागात सुसज्ज महिला केंद्र सुरू करण्याचा ठराव करण्यात आला.

महिला व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनांना राहण्याच्या दृष्टीने या केंद्राचा वापर होऊ शकतो. याच ठिकाणी​ रोजगार व आर्थिक मदत उपलब्ध करून देणारे केंद्र सुरू करण्याचा ठराव बैठकीत मांडण्यात आला. त्यास सदस्यांनी मंजुरी दिली. शहरातील पीडित महिलांना समुपदेशन केंद्राची आवश्यकता असून, त्या दृष्टीने राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे सन २००२ मध्ये महासभेने शहरातील विविध भागात समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. एका वार्डात त्याची सुरुवात देखील करण्यात आली होती. मात्र, थोड्याच दिवसात समुपदेशन केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांनी आपले काम बंद केले होते. परिणामी तेव्हापासून पीडित महिलांसाठी उपयोगी असलेल्या समुपदेशन केंद्राकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रत्येक विभागात कायमस्वरूपी केंद्र उभे राहिल्यास महिला व बालकल्याण विभागाच्या सर्व योजना एकाच छताखाली राबवणे शक्य होऊ शकते. तसेच, बचत गटांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. आम्ही ठराव केला. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासनाने करणे अपेक्षित असल्याचे मत खैरे यांनी व्यक्त केले. महिला व बालकल्याण समितीसाठी अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो. सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार कागदोपत्री हे काम होते. प्रत्यक्षात त्याचा कोणताही फायदा होत नसल्याचे खैरे यांनी स्पष्ट केले. याची सर्वस्वी जबाबदारी महिला व बालकल्याण समितीच्या अधिकारी वसुधा कुर्णावळ यांची असल्याचा ठपका खैरे यांनी ठेवला. अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या योजना अथवा प्रस्ताव समोर आणले तर महिलांसाठी अनेक उपक्रम राबवणे शक्य आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून असे कोणतेही काम होत नाही. वारंवार सूचना देऊनही कामात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करून याठिकाणी तत्काळ कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची विनंती आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे करण्यात आल्याचे खैरे यांनी स्पष्ट केले. बैठकीला उपसभापती शीतल भामरे सदस्या नंदिनी जाधव, रूपाली गावंड आदी हजर होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचा अवैध उपसा केल्यास करा गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात ज्या गावांसाठी पाणी आरक्षित आहे ते त्याच गावापर्यंत पोहोचावे, यासाठी वहन मार्गावर अत्यंत कडक बंदोबस्त ठेवावा तसेच अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी बुधवारी दिले.

डवले यांनी महसूल विभागाच्या विविध विषयांचा त्रैमासिक आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पाणीटंचाईवर प्रामुख्याने चर्चा झाली. पाण्याचे आरक्षण सोडताना वहन मार्गावर बंदोबस्ताचे नियोजन करतानाच त्या मार्गावरील वीजपुरवठा खंडित करावा. अवैध उपशाविरोधात कठोर कारवाई करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. जलयुक्त शिवार योजनेची कामे धिम्या गतीने होत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. योजनेच्या पुढील टप्प्यात प्रत्येक तालुक्यात दोन कामे सुरू करणे अपेक्षित आहे. जी कामे झालेली आहेत त्यांचे फोटो अपलोड करण्याबाबत अधिकारी उदासीन असल्याबाबत नाराची व्यक्त करण्यात आली. जलयुक्तची कामे मुदतीत पूर्ण करावीत, असे आदेश त्यांनी दिले. जलयुक्तच्या कामांसाठी रोजगार हमी योजनेतून मजुरांना कामे उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटकपेक्षा जास्तच वेतनवाढ करार करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

'आयटक'चे अध्यक्ष भालचंद्र कांगो मंगळवारी (दि. २२) अंबड एमआयडीसीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत द्वारसभा घेतली. कांगो यांना आव्हान देत 'सीटू' कामगार संघटनेचे नेते डॉ. डी. एल. कराडा यांनी आयटकपेक्षा अधिक रकमेचाच वेतन करार करू असा विश्वास व्यक्त केला आहे.

कांगो कंपनीत आल्यावर उपस्थित काही कामगारांनी निर्दशने केली होती. यात सीटू युनियनचेही काही कार्यकर्ते होते. कांगो यांना 'सीटू'ने प्रसिद्ध पत्रकाद्वारे बुधवारी पुन्हा आव्हान दिले. आयटकचे कांगो यांनी पाच वर्षांसाठी कुठलाही महागाई भत्ता न वाढवता वेतनवाढ केली आहे. यामुळेच नाराज होऊन ९० टक्के कामगारांनी सीटू युनियनचे सभासत्व स्वीकारले असून आयटकपेक्षा निश्चितच चागंला करार करणार असल्याचे डॉ. कराड यांनी पत्रकात म्हटले आहे. सीटूकडे स्पष्ट बहुमत असतांना गुप्त मतदान घेण्याची आमची तयारी आहे. आयटकपेक्षा मोठा करार करणार, मग आयटक सीटूमध्ये समाविष्ट करा असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुदानाचा गैरवापर झाल्यास फौजदारी गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने शौचालय उभारणीसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे साडेचार हजार लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले आहे. वैयक्तिक स्वरूपात मिळणाऱ्या अनुदानाचा गैरवापर झाल्याचे आढळल्यास संबंधितावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिला आहे.

केंद्र व राज्य सरकारमार्फत स्वच्छ भारत (नागरी) अभियानांतर्गत शौचालय उभारणीचा कार्यक्रम महापालिकेने हाती घेतला आहे. यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी शहरात सर्वेक्षण केले होते. त्यात ५१ हजार ५८४ कुटुंबांच्या घरात शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले. ४४ हजार ६८० कुटुंबांकडून सार्वजनिक शौचालयांचा वापर होत असून, ७ हजार १७४ कुटुंबे मात्र उघड्यावरच शौचविधी पार पाडत असल्याचे स्पष्ट झाले.

या माहितीच्या आधारे महापालिकेने त्या ७ हजार १५४ कुटुंबांकडून शौचालय उभारणीसंबंधी अर्ज भरून घेतले होते. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर त्यातील ८७७ अर्ज तांत्रिक मुद्द्यांवरून बाद ठरविण्यात आले. तर, ६ हजार ०७३ लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान प्रशासनाकडून देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्याकरिता २२४ ठिकाणी सामूहिक शौचालय उभारले जाणार आहेत. दरम्यान, शौचालयासाठी देण्यात येणाऱ्या निधीचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित लाभार्थीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. लाभार्थीने अनुदानाचा वापर योग्य होईल हे पहावे, असे आरोग्यधिकारी डॉ. डेकाटे यांनी स्पष्ट केले.

अडीच कोटी रुपयांचे वाटप

महापालिकेने आतापर्यंत ४ हजार ५०० लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यावर प्रत्येकी ६ हजार रुपयांचे अनुदान जमा केले आहे. उर्वरित अनुदान शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अदा केले जाणार आहे. महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत उपलब्ध निधी २ कोटी ५३ लाख रुपयांचे वाटप केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळांमध्ये नाताळाची धूम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या रंगुबाई जुन्नरे प्राथमिक शाळेत ख्रिसमस, ईद, दत्तजयंती साजरी करण्यात आली. काही जण सांता क्लॉजची लाल टोपी घालून तर काहीजण सांतासारखीच वेशभूषा करून शाळेत दाखल झाले. ख्रिसमस ट्री, सोनेरी रंगाचे बॉल्स यांची आकर्षक सजावट शाळेत करण्यात आली. राधा देसाई यांनी विद्यार्थ्यांना या तिन्ही सणांची माहिती दिली.

स्ट्रॉबेरी स्कूल

नाशिक : अक्षर संस्कार फाऊंडेशन संचलित स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यात आले. सांता क्लॉजची वेशभूषा करीत विद्यार्थी शाळेत आले. शिक्षकांनी ख्रिसमस सणाची माहिती दिली. 'जिंगलबेल, जिंगलबेल' या गीतावर नृत्य करीत विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशनची मजा लुटली. शाळेच्या संचालक सायली काळे व मुख्याध्यापिका रिना गोविल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

वाघ गुरूजी शाळा

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित वाघ गुरूजी बाल शिक्षण मंदिर व आदर्श शिशु विहार या शाळेत नाताळ सण उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. शाळेतील संगीत शिक्षक शेवाळे यांनी नाताळ सणाची विविध गाणी सादर केली. विद्यार्थी सांताक्लॉजच्या विविध वेशभूषेत आल्यामुळे परिसर आनंदमय झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या व खाऊवाटप करण्यात आला. शाळेतील शिक्षिका ललिता शिंदे यांनी नाताळ सणाची माहिती सांगितली. अनिता हांडगे यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमास कल्पना पाटील, सरला ठाकरे, विशाखा पवार, वैशाली रकिबे, अनिता पवार, कविता जाधव, लता हांडोरे, तनुजा वाघ, नूतन गायकवाड, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॅमेज कंट्रोलचा पक्षांकडून प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संभाव्य पक्षातंराचा कमीत कमी फटका बसावा, यासाठी सर्वच पक्षांकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू झाला आहे. भाजपाकडे आकर्षित होणाऱ्या इतर पक्षांतील कार्यकर्ते व नगरसेवकांचा ओढा कमी होत असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात असून, पक्षातंरनाट्याचे सस्पेन्स २७ डिसेंबरपर्यंत आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.

शहरात २७ तारखेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा मोठा सोहळा पार पडणार आहे. या दरम्यान अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण यांच्यासहीत मनसेचे ९ नगरसेवक व शेकडो कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेणार असल्याचे सांगितले जात आहे. चव्हाणांचे पक्षांतर नि​श्चितच मानले जात असून, मनसेच्या नगरसेवकांमध्ये द्विधा मनस्थिती असल्याची चर्चा आहे.

सुरुवातीस हा आकडा १२ च्या पुढे होता. आता, तो नऊपर्यंत आला असून, आणखी दोन दिवसात यात आणखी घट होणार असल्याचा दावा विरोधकांकडून होत आहे. मनसेला बाय करून नेमके भाजपाची वाट पकडावी की शिवसेनेची, असा प्रश्न महत्त्वाचा असून त्यावर खल होत असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहेनजी चार किलो सोना देना है !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घराचा पाया खदताना सोने सापडले. किमान चार किलो आहे. दुर्देवाने आम्ही खूप गरीब असून, राजस्थानमध्ये त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केला तर अडचण येईल. आम्ही तुमचा नंबर सोशल साईटवरून घेतला. तुम्ही हे सोने निम्म्या किमतीत घ्या किंवा एखाद्या सोनाराला विका, बहेनजी बहुत जरूरत है, असा काकुळतीला आलेला संवाद साधत सर्वसामन्यांना गंडा घालणारा भामटा सध्या नवे सावज शोधतो आहे. पुढील 'शिकार' करेपर्यंत पोलिसांनी कारवाई केली तर फसवणुकीचा मोठा प्रकार टळू शकतो.

उपनगर पोलिसांनी दोन दिवसापूर्वी स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या राजस्थानी भामट्यांना जेरबंद केले. यामुळे परराज्यातील ही टोळी संपुष्टात आल्यासारखे वरवर दिसते. प्रत्यक्षात राजस्थानमधून शहरात आलेल्या किंवा राजस्थानमधून ऑपरेट होणाऱ्या या टोळ्यांचा उच्छाद सुरूच असून, दररोज नवनवीन सावज ते मोबाइलच्या माध्यमातून शोधत आहेत. गंगापूररोडवरील श्रीकृष्ण कॉलनीत राहणाऱ्या स्मिता कुलकर्णी यांना असाच एक कॉल १२ डिसेंबर रोजी आला. तुम्ही एका खरेदी विक्रीचे काम करणाऱ्या साईटवर टाकलेला नंबर आम्ही पाहिला आणि तुम्हाला फोन केला, असे समोरील व्यक्तीने सांगितले. आमच्या घराचे काम सुरू असताना आम्हाला चार किलो सोने सापडले. हे सोने परराज्यात विकले तर कमीत कमी त्रास होईल, असे वडिलांचे म्हणणे असून तुम्ही आम्हाला मदत करा, अशी विनंती त्या व्यक्तीने कुलकर्णी यांना केली. त्यावर कुलकर्णी यांनी त्यास पैसे नसल्याचे वारंवार सांगितले. मात्र, सदर व्यक्तीने पिच्छा सोडला नाही. त्याने कुलकर्णी यांच्या मोबाइलवर सोन्याच्या ​​चिप्सचे फोटो, स्वतःचे ड्रायव्हिंग लायसन्स व राजस्थानमधील पत्ता इतकी माहिती पुरवली. आजही सदर मोबाइलवरून कॉल येत असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

सोशल साईट धोकादायक

तात्पुरत्या व्यवहारांसाठी सोशल साईटवर टाकण्यात येणाऱ्या मोबाअल नंबरचा वापर चोरटे सहजतेने करतात. कुलकर्णी यांनी आपल्याकडील एका श्वानांच्या पिल्लांची अॅड सोशल साईटवर टाकली होती. तिथूनच आरोपींना हा क्रमांक मिळाला. दरम्यान, पोलिस देखील प्रत्यक्ष तक्रारदार समोर येण्याची प्रतीक्षा करतात. तर, सर्वसामन्य नागरिक माहिती देण्यासाठी पोलिसांकडे जाण्याचे टाळतात. नागरिक व पोलिसांमधील याच ताणलेल्या संबंधाचा फायदा भामट्यांना होत आहे.

हा प्रकार फसवणुकीचा असू शकतो, याची कल्पना आहे. तसाच तो इतरांची फसवणूक करीत असेल याची खात्री वाटते. मात्र, पोलिसांची मदत घेणे सोयीस्कर ठरणार काय याबाबत शाश्वती नसल्याने तक्रार दिली नाही. पोलिसांना आवश्यकता असल्यास आपण माहिती देऊ शकतो.

- स्मिता कुलकर्णी, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खो-खो निवड चाचणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या वतीने ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय किशोर किशोरी राज्य खो-खो स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी नाशिक जिल्हा किशोर किशोरी खो-खो अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २ व ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता सीबीएससमोरील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे होत आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडू ५ फेब्रुवारी २००२ नंतर जन्मलेला असावा. तरी संलग्न संस्थांनी संस्थेच्या प्रमुखाच्या स्वाक्षरीसह प्रवेशअर्ज उमेश आटवणेद्वारा श्रीराम विद्यालय, पंचवटी, रमेश सानपद्वारा वैनतेय विद्यालय निफाड, आर. डी. चौधरी, अलंगुण ता. सुरगाणा यांच्याकडे जमा करावा, असे आवाहन जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले व सचिव मंदार देशमुख यांनी केले आहे. स्पर्धेतील विजेत्या संघांना १५०१ व उपविजेत्या संघांना ११०१ रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय प्रत्येक गटात वैयक्तिक १५१ रुपयांचे प्रत्येकी तीन बक्षिसे दिली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडकरांची कामगिरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय राजीव गांधी खेल अभियान अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या जयभवानी व्यायामशाळा व छत्रे विद्यालयाच्या संघाने चमकदार कामगिरी करत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. नाशिक संघातील प्राजक्ता काळे, साक्षी पांडे आणि अनामिका शिंदे यांनी सुवर्णपदक मिळवले. केरळ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात त्यांची निवड झाली आहे.

नूतन दराडे, खुशाली गांगुर्डे यांनी रौप्यपदक पटकावले. संघातील मंदार खालकर, समीर कुणगर विद्यार्थी खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली. या खेळाडूंना प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडूंचे जयराम सानप, मोहन गायकवाड, बाळासाहेब पाटील, दत्ता शिंपी, दिलीप कोळपकर, छत्रे विद्यालयाचे पी. जी. धारवाडकर, दिनेश धारवाडकर प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक विजयकांत आहेर, के. एस. लांबोळे यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images