Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बहुजनांकडून आदिवासींचे शोषणच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी
सूर्याच्या अस्तित्त्वापासून व पृथ्वीच्या निर्मितीपासून आदिवासींची जीवनप्रणाली अविरत सुरू आहे. बहुजन समाजाकडून आदिवासींचे नेहमीच शोषण होत आले आहे. व्यवस्थेतील हा भेदाभेद ज्यादिवशी मिटेल तो सोनियाचा दिनु असेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी वाहरू दादा सोनवणे यांनी व्यक्त केले.

लोकलढा सांस्कृतिक चळवळ, आदिवासी भटके, ओबीसी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक आयोजित पहिले दलित साहित्य संमेलन पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृहात रविवारी झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाहरू सोनवणे बोलत होते. साहित्य संमेलनात अनेक नामवंत साहित्यिकांनी विचार मांडताना आदिवासी भटके दलित आणि ओबीसी सर्वांनी आपापल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासठी संघटीत होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. सोनवणे यांनी आदिवासींची आधीची जीवन प्रणाली, संपत्ती, बहुजन समाजाकडून होणारे शोषण, शासन व्यवस्था,

श्रमाची निर्मिती, कुटुंबव्यवस्था, श्रीयांची आभूषणे, पुरुषप्रधान संस्कृती, आदिवासी यांच्यातील संघर्ष, व्यवस्थेतील भेदाभेद याविषयी माहिती दिली. कार्यक्रमात अनुभवी आणि नवोदित कवींचे कवी संमेलन झाले. या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या आदिवासी लोकांनी जलसा आणि आदिवासी समूहनृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. पहिल्या सत्रात मुंबई मंत्रालयातील अप्पर सचिव अंबादास चंदनशिवे, विक्रीकर विभागाचे सहआयुक्त कैलास चतुर, नगरसेवक दामोदर मानकर यांनी विचार मांडले.

दुसऱ्या सत्रात 'आजचा सांस्कृतिक दहशतवाद आणि दलित, आदिवासी भटके, ओबीसी कष्टकऱ्यांच्या एकजूटी समोरील आव्हाने' या विषयावर जेष्ठ विचारवंत कुमार शिरवळकर, प्रा.राजेश ढवळे (नांदेड), प्रा.सचिन गरुड (इस्लामपुरा), प्रा.डी.ए.दळवी (मुंबई) यांनी आपले विचार मांडले. यावेळी कवी विजयकुमार मीठे, कवी तुकाराम धांडे, प्रा.गंगाधर अहिरे यांच्यासह रवींद्र मालुंजकर, मनीषा पिंगळे, रमेश भोये, सोमनाथ भावे, सचिन गांगुर्डे, राजेश जाधव, देवदत्त चौधरी, प्रमोद अहिरे, हेमंत भोये, प्रमोद देशमुख, प्रशांत केंदळे यांनी विविध कविता सादर केल्या. पुंडलिक भोये, विठ्ठल शिंगरे आदिंनी जलसा सादर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कल्याणीच्या शिरपेचात दोशी फेलोशिपचा तुरा

$
0
0

Prashant.bharvirkar

@timesgroup.com

नाशिक : साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे कलेच्याप्रती समर्पित वृत्तीने काम करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विनोद दोशी फेलोशीपची यंदाची नावे जाहीर झाली असून, त्यात नाशिकची गुणी अभिनेत्री कल्याणी मुळे हिचा समावेश आहे. कल्याणीची निवड ही भारतातील रंगकर्मींमध्ये असून, एक लाख रुपये अशी फेलोशीपची रक्कम आहे. ही फेलोशिप मिळणे रंगकर्मींसाठी अत्यंत मानाचे समजले जाते.

फेलोशीपचे यंदा अकरावे वर्ष आहे. कलेच्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊन काम करणाऱ्या व कला क्षेत्रातच महत्त्वाकांक्षी कारकीर्द करू इच्छिणाऱ्या तरूण रंगकर्मींना साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे ही फेलोशीप दिली जाते. फेलोशीप वितरण समारंभ २१ फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहे. या पुरस्काराचे यंदाचे अकरावे वर्ष असून, आतापर्यंत ४७ कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कल्याणी मुळे हिने नात्याची गोष्ट, मिडनाईट फ्ल्यूट या एकांकिका केल्यावर संगीत समिती स्वयंवर, ती खिडकी, सावित्रीचे उपाख्यान या नाटकांमध्ये तिने मुख्य भूमिका केल्या. त्यासाठी तिला दोन्ही राऊंडमध्ये अभिनयाचे मेडलही मिळाले होते. नाशकातून तिने अनेक नाट्यअभिवाचनाचे प्रयोगही केले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (एनएसडी) तिची झालेली निवड ही तिच्या करिअरसाठी चार चाँद लावणारी होती. तिला एनएसडीमध्ये अभिनयाचे गोल्ड मेडलदेखील मिळाले. एनएसडीच्या ब्रोशरवर झळकणारी उत्तर महाराष्ट्रातील ती एकमेव अभिनेत्री आहे. सध्या ती गोव्याच्या रंगभूमीवर काम करीत असून, 'अनसीन' नावाचा तिचा प्ले अत्यंत गाजत आहे. एका सिरियलमध्येही तिने भूमिका केलेली आहे.

या पुरस्कारासाठी विनोद आणि शरयू दोशी फाउंडेशनकडून प्रतिष्ठानला दरवर्षी पाच लाख रुपयांची देणगी मिळते. प्रत्येकी एक लाख रुपयांचा हा पुरस्कार शिष्यवृत्ती स्वरुपाचा असून त्यासाठी पुरस्कार विजेत्याला अर्ज करावा लागत नाही. त्याचप्रमाणे हा पुरस्कार मिळाल्यानंतर कलाकार आपल्या इच्छेनुसार ही रक्कम खर्च करू शकतो. पुरस्काराची रक्कम कलाकारांना १२ धनादेशांद्वारे दिली जाते. त्यामुळे कलाकारांना मासिक खर्चासाठी चांगला हातभार मिळतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटकोत माजी विद्यार्थी मेळावा; शालेय आठवणींना उजाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सकाळी ११ वाजता शाळेची घंटा वाजली... सर्व विद्यार्थी पटापट आपल्या वर्गाकडे वळाले... एक साथ नमस्ते म्हणून शिक्षकांना अभिवादन करण्यात आले. प्रार्थना झाली... तास सुरू झाला... हा तास कोणत्याही शैक्षणिक विषयाचा नसून शाळेविषयीच्या आठवणींचा होता. सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी आठवणींची ही अनमोल कुपी उघडली अन् बालपण परतून आल्यासारखे सगळेच त्यात हरखून गेले.

निमित्त होते, दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या अमृतपूर्ती महोत्सव वर्षाचे. सीबीएसजवळील डा. दे. बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये रविवारी हा अभूतपूर्व सोहळा रंगला. १९५२ पासूनचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व निवृत्त शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होते. प्रत्येक वर्गात सुविचार लिहिण्यात आले होते. परिपाठाच्या तासानी शाळेला सुरूवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना बोधकथा सांगून नंतर बातम्यांचे वाचन करण्यात आले. शाळेत असताना वर्गात जे काही व्हायचे त्याची प्रचिती पुन्हा या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना आली.

आठवणींच्या तासांनंतर मधली सुटी झाली. सर्व माजी विद्यार्थी, शिक्षकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर पुन्हा सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले. शिक्षक भि. रा. सावंत यांनी चित्रकलेचा तास घेतला. अत्यंत मनोरंजक पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांना चित्र काढण्याच्या युक्त्या सांगितल्या. त्यानंतर झालेल्या खुल्या अधिवेशनात भारती आव्हाड या माजी विद्यार्थिनीने गणेश वंदना सादर केली. माजी विद्यार्थी व माजी शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आले. माजी शिक्षक भास्कर तानपाठक, द. श्री. भटमुळे यांनी शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. प्रकाश अकोलकर व वि. वि. करमरकर यांनी मान्यवर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने तर सचिन जोशी व आनंद तुपसाखरे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांनी संस्थेची भूमिका मांडली. तर सेक्रेटरी हेमंत बरकले यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याला गरज २७० टँकर्सची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत असून प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १८ टँकर्सद्वारे तहान भागविली जात असली तरी जुलै २०१६ पर्यंत तब्बल २७० टँकर्सची आवश्यकता भासेल अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, लवकरच टँकर वाटपाचे अधिकारी संबंधित तहसीलदारांकडे हस्तांतरीत केले जातील, अशी ग्वाही प्रशासनाने शनिवारी राज्य महसूल मंत्र्यांना दिली.

पावसाने यंदा जिल्ह्यावासियांवर वक्रदृष्टी केली. त्यामुळे सर्वाधिक धरणांचा जिल्हा असूनही बराचशी धरणे भरू शकली नाहीत. त्यामुळे यंदा संबंध जिल्ह्यावरच पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. जिल्ह्यात दौऱ्यावर आलेल्या शिवसेनेच्या मंत्री गटाने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेतला. सद्यस्थितीत जिल्ह्यात बागलाण, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यातील एकूण १८ गावे आणि ६६ वाड्यांमध्ये टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. मात्र, दिवसेंदिवस धरण पातळी खालावेल तसे पाणीटंचाईचे हे संकट अधिकच गडद होत जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी या बैठकीत दिली. सद्यपरिस्थितीचा अंदाज घेता जुलै २०१६ पर्यंत जिल्ह्यातील अनेक गावे आणि शेकडो वाड्या वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी २७० टँकर्सची मदत घ्यावी लागणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

अजुनही काही गावांमध्ये टँकर्सची मागणी होत असली तरी ते पुरविले जात नसल्याच्या तक्रारी आमदारांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे केल्या. विशेषत: राठोड यांनी सिन्नर तालुक्यात केलेल्या पाहणीत दोन गावांमध्ये टँकर्सची आवश्यकता असूनही ते पुरविले जात नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात आल्या. या गावांमध्ये तातडीने टँकर पुरविण्याची व्यवस्था करा, असे आदेश राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

पुरवठ्यासाठी १३ कोटींचा खर्च

जिल्हा परिषदेने ऑक्टोबर २०१५ ते जून २०१६ या कालावधीसाठीचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील ९८२ गावे आणि ११११ वाड्या अशा २ हजार ९३ ठिकाणी संभाव्य पाणीटंचाई जाणविण्याची भीती त्यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नऊ प्रकारच्या उपाययोजना करण्यात येणार असून त्यावर ३० कोटी १२ लाख १३ हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. प्रगतीतील नळ योजना पूर्ण करणे, विंधन विहिर घेणे, नळयोजना विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयोजना, विंधन विहिर विशेष दुरुस्ती, विहिर खोल करणे, खासगी विहिर अधिग्रहण करणे आणि टँकर्स किंवा बैलगाडीसारख्या साधनांद्वारे पाणी पुरवठा करणे यांसारख्या उपाययोजना केल्या जात आहेत. ४१७ गावे आणि ८०० वाड्या अशा १२१७ ठिकाणी २६८ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. केवळ टँकर्सद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर १३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

अधिकारांचे हस्तांतरण

टँकर्स वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असले तरी पाणी पुरवठा निर्णय प्रक्रियेत वेळ जाऊ नये, स्थानिक पातळीवर तत्काळ निर्णय घेऊन टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करता यावा यासाठी हे अधिकारी तहसीलदारांकडे हस्तांतरीत करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच दिले. मात्र, जिल्ह्यातील तहसीलदारांना हे अधिकार अद्याप प्राप्त झाले नसल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. अधिकार हस्तांतरणाबाबतचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. ते प्राप्त होताच कार्यवाही करू, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी राठोड यांना दिली.

... तर त्यांची वेतनवाढ रोखा!

केवळ १६ हजार रुपये थकीत असल्याने त्र्यंबकेश्वर येथील प्रसुतीगृहाला १० वर्षांपासून सील ठोकण्यात आल्याचे ऐकून शिवसेना मंत्रिगटाने तोंडात बोटे घातली. प्रशासनाच्या दोन विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे १० वर्षांत ‌‌किती रुग्णांची गैरसोय झाली असेल याचा विचार केला का? असा संतप्त सवाल संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. मनुष्यबळाच्या अभावामुळे निलंबनाची नाही मात्र संबंधित अधिकाऱ्याची एक वेतनवाढ रोखायला हवी, अशी सूचना राज्यमंत्री राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला केली.

बायोमेट्रीक घेणार हजेरी

वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी त्यांना ठरवून दिलेल्या कार्यक्षेत्रात उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बायोमेट्रीक मशिन बसविण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

अधिकारी धारेवर

मुंडेगाव आरोग्य उपकेंद्राची इमारत तयार होऊन पाच वर्ष उलटली; मात्र अजुनही तेथे वीज व पाणी नाही, अनेक सरकारी दवाखान्यांत वैद्यकीय अधिकारी, परिचारीकाच उपस्थित नसतात, महावितरण व वैद्यकीय विभागाच्या चुकीच्या कारभारामुळे त्र्यंबकेश्वरमधील प्रसुतीगृह १० वर्षांपासून बंद अशा तक्रारींचा पाढा शिवसेना मंत्रिगटाने जिल्हाधिकारी कार्यालयात वाचून दाखविला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची लक्तरे त्यामुळे वेशीवर टांगली गेली.

जिल्हा दौऱ्यावर आलेल्या शिवसेना मंत्रिगट समितीने शनिवारी विविध तालुक्यांमधील अनेक गावांना भेट दिली. सर्वाधिक तक्रारी सरकारी दवाखाने आणि महावितरण संदर्भात प्राप्त झाल्याचे आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले. ग्रामीण भागात नेमणुकीवर असणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी अनेकदा तेथे हजर नसतात. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होतात अशी कैफियत ग्रामस्थांनी मांडली. जिल्हा परिषदेमधील वैद्यकीय अधिकारी सुशील वाघचौरे आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना यामुळे चांगलेच धारेवर धरले. राज्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांनी प्रश्नांची सरबत्ती करीत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांची दुरवस्था याकडे लक्ष वेधले. अधिकारी, कर्मचाऱ्यांची ग्रामीण भागातच निवासाची व्यवस्था असतानाही अनेकजण तेथे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना रात्री अपरात्री उपचार मिळत नाहीत. तुम्ही संबंधितांवर काय कारवाई केली असा सवाल उपस्थित करण्यात आला.

इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंद असल्याचे पाहणीत आढळून आले. मात्र, हे केंद्र सुरू असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी वाघचौरे यांनी केला.

'आम्ही खोटे बोलत आहोत का?' असा प्रश्न राज्यमंत्री राठोड यांनी केला. इगतपुरी तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करण्यात आली. पाच वर्ष उलटूनही अद्याप तेथे वीज आणि पाणी या मूलभूत सुविधा नाहीत. केंद्र गावापासून दूर असून केंद्रासमोर स्मशानभूमी असल्याने कर्मचारी येथे थांबत नसल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. हे केंद्र दिवसभर सुरू राहील याची खबरदारी घ्या, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी करणार आश्रमशाळांची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी आश्रमशाळांमधील मुलांना दयनीय अवस्थेमध्ये ठेवले जात असल्याचे पाहून शिवसेना मंत्रीगटासमवेत आलेल्या आमदारांचा संताप अनावर झाला. आश्रमशाळांमधील गैरसोयींबद्दल तक्रारींचा पाऊस पडल्याने जिल्हाधिकारी यांनी स्वत: या आश्रमशाळांची पाहणी करून तेथे उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

आदिवासी तालुक्यांमध्ये पाहणीसाठी गेलेल्या आमदारांनी तेथील आश्रमशाळांमधील विदारक वास्तव प्रशासनासमोर कथन केले. कळकटलेल्या भिंती, आश्रमशाळांची झालेली दुरवस्था, सुरक्षारक्षकाच्या ‌अभावामुळे धोक्यात आलेली मुलींची सुरक्षितता, ऐन हिवाळ्यात सुस्थितीतील गाद्या आणि चादरींचा अभाव, पाणी तसेच स्वच्छतागृहाअभावी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय गणवेषाशिवायच शाळेत जाणारी मुले अशी परिस्थिती आमदारांना पहावयास मिळाली. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पत्र्याच्या पेट्याही मोडकळीस आल्या असून त्यांना टुथपावडर, साबण, तेलही सुमार दर्जाचे दिले जात असल्याचे पाहणीत आढळून आले. सरकार या मुलांच्या सुविधांसाठी पैसे मोजत असेल तर त्याचा योग्य विनयोग व्हायला हवा अशी अपेक्षा राज्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांनी व्यक्त केली. अशा गैरसोयींमुळे सरकारची बदनामी होत असून ती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली.

जिल्ह्यातील आश्रमशाळांची परिस्थिती सुधारावी यासाठी आपण स्वत: सर्व आश्रमशाळांची पाहणी करू अशी ग्वाही कुशवाह यांनी दिली. पाहणी करून असुविधा व दुरवस्था असलेल्या आश्रमशाळांच्या संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता शेतकरी आत्महत्येचा कलंक नको!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील तानाजी महादू बऱ्हे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि बँकेच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली. आता हेच कर्ज वसुलीसाठी बँक त्याच्या मुलाकडे तगादा लावत असून तो ही त्रासला आहे. आणखी एका शेतकरी आत्महत्येचा कलंक जिल्ह्यावर लागू नये यासाठी तातडीने पाऊले उचला, असे आदेश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्याला १०० टक्के टँकरमुक्त आणि शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचे उद्दिष्ट्य ठेवा, अशी सूचनाही करण्यात आली.

राज्य सरकारने सामान्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या योजना जिल्ह्यात किती प्रभावीपणे राबविल्या जातात याचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांच्यासह महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि शिवसेनेचे काही आमदार जिल्हा दौऱ्यावर आले होते. दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. रात्री साडेदहापर्यंत ही बैठक सुरू होती. अजूनही सरकारच्या योजना शेवटच्या सामान्य नागरिकापर्यंत पोहाचत नसल्याबद्दल शिंदे यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. सरकारी यंत्रणेच्या गलथान कारभाराचे दर्शन घडल्यामुळे जिल्हा परिषद, वीज वितरण कंपनीतील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

यावेळी शिंदे म्हणाले, की कोणतीही योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी असा सरकारचा उद्देश असतो. त्यासाठीच सरकार योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, अजूनही योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. शेतकरी आत्महत्येसारखे दुर्दैवी प्रकार रोखण्यासाठी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान आवश्यक आहे. त्यांना आपल्या मानसिकतेमध्ये बदल करावा लागेल असे मतही शिंदे यांनी व्यक्त केले.

देशाच्या रक्षणासाठी सीमेवर काही वर्ष घालविणाऱ्या आणि निवृत्तीनंतर शेती करणाऱ्या इगतपुरी तालुक्यतील वाघेरे येथील कृष्णा शिंदे या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते याबद्दल शिंदे यांनी खेद व्यक्त केला. व्हिसेरा आणि तत्सम तांत्रिक कारणांमुळे आपण किती दिवस शेतकरी कुटुंबाला मदतीपासून वंचित ठेवायचे? शेतकरी कुटुंबांची फरफट होऊ देऊ नका, त्यांना हेलपाटे मारायला लावू नका अशा सूचना त्यांनी दिल्या.

मग का होणार नाहीत आत्महत्या?

दौऱ्यात अनेक शेतकऱ्यांनी मंत्री तसेच आमदारांची भेट घेऊन कैफियत मांडली. विहिरींवर मोटारी बसविल्या असल्या तरी विहिरीत पाणी नाही. मोटारी बंद असतांना मोठ्या रकमेचे वीजबील दिले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. शेतकऱ्यांना तुम्ही असे अंदाजे बील देऊ लागलेत तर शेतकरी आत्महत्या का करणार नाही, असा संतप्त सवाल शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केला. अशी अंदांजित बीले कमी करण्यासाठी तातडीने पाऊले उचला असे आदेशही त्यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅमेझॉनवर मराठी बुकस्टोअर

$
0
0

पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर

पूर्वी मराठी पुस्तके खरेदीसाठी साहित्य संमेलन वा प्रदर्शनाची वाट पहावी लागे. काळाच्या ओघात पुस्तके दुकानांमध्ये विक्रीस आली. सध्याच्या धावपळीच्या युगात सगळे काही घरबसल्या मागवता येते आणि आता यात भर पडली आहे ती मराठी पुस्तकांची. मराठी पुस्तके सर्वात मोठ्या साईटवर एका क्लिकमध्ये उपलब्ध होणार आहेत.

ऑनलाइन मराठी पुस्तके या पूर्वी बुकगंगासारख्या वेबसाइटद्वारे मिळविता येत होती. आता अॅमेझॉनवरही मराठी बुकस्टोअर लाँच करण्यात आले. त्यामुळे कादंबरी, कथासंग्रह, काव्यसंग्रह, आत्मचरित्र, धार्मिक, आर्थिक, बालसाहित्य, पाककला यांसारख्या विविध विषयांवरील विविध मराठी पुस्तके घरबसल्या मागविता येणार आहेत.

१० ते ५० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंटही अॅमेझॉन देत आहे. अगदी ५० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत पुस्तकांची किंमत आहे. हार्डकवर, पेपरबॅक व बोर्डबुक या फॉरमॅटमध्ये ही पुस्तके उपलब्ध आहेत. गिफ्ट देण्यासाठी हार्डकवर व हाताळण्यासाठी पेपरबॅक हे फॉरमॅट उपयुक्त आहे. पुस्तक खरेदी करताना तुम्हाला पुस्तकाच्या विस्तृत माहितीबरोबरच पुस्तक वाचलेल्यांचे रिव्ह्यू जाणून घेता येतील. प्रामुख्याने विश्वास पाटील, रणजित देसाई, व. पू. काळे, पु. ल. देशपांडे, रत्नाकर मतकरी या साहित्यिकांचे पुस्तके या साईटवर उपलब्ध आहेत. शिवाजी सावंत यांच्या मृत्यूंजय, वि. स. खांडेकरांच्या ययाति, कुसुमाग्रज यांच्या नटसम्राट व भालचंद्र नेमाडेंच्या कोसला या कादंबरीला सर्वात जास्त मागणी व पसंती आहे. ऑनलाइन शॉपिंगधारकांनीही यावर समाधान व्यक्त केले आहे.

अॅमेझॉनवर मराठी पुस्तकांची विक्री होणार ही बातमी मराठी साहित्यविश्वाला व लेखक वाचकांना सुखावणारी आहे. यातून मराठी पुस्तकांची विक्रीही वाढेल. गाजलेल्या पुस्तकांसह नवोदितांच्या पुस्तकांनाही मागणी उपलब्ध होईल. - किरण भावसार, लेखक

मराठी पुस्तके शॉपिंग साईट्सवर अधिक उपलब्ध नव्हते. पण अॅमेझानवर आता मराठी बुकस्टोअर वाचकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. मराठी साहित्यविश्वाला चांगले दिवस येतील हे नक्की. घरबसल्या मराठी पुस्तके वाचता येणार आहे. - सुरज गावंडे, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समूह गायनाची घेणार ‘झेप’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील झेप संस्था आणी नाशिक महापालिकेच्या शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने येत्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (दि. २५) ११ हजार मुलांचे देशभक्तीपर समूह गायनाचा घेणार आहे. संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची तयारी सध्या सुरू आहे. 'झेप'तर्फे होणारा हा कार्यक्रम विक्रम असणार असल्याची माहिती उपमहापौर गुरूमित बग्गा यांनी दिली आहे.

झेप संस्थेच्या वतीने नाशिककरांना विविध देशभक्तीपर कार्यक्रमाची मेजवानी दिली जाते. येत्या प्रजाकसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सुद्धा नाशिककरांना देशभक्तीची आठवण करून देणारा अनोखा कार्यक्रम करण्याची कल्पना संस्थेतर्फे पुढे ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी उपमहापौर बग्गा यांच्या दालनात संगितकार श्रीकृष्ण चंद्रात्रे यांचा अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात समूहगाण कार्यक्रमाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहवून देशभक्ती रुजवावी अशी अपेक्षा चंद्रात्रे यांनी व्यक्त केली. उपमहापौर बग्गा यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी समूहगायन कार्यक्रम सुरू झाला. मागील वर्षी ७ हजार विद्यार्थ्यांनी समूहगायन कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. आता हा सहभाग ११ हजार मुलांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला बग्गा यांच्यासह चंद्राते, के. के. झोटिंग, .रो. नि. गोसावी, वि. वा. निपानेकर, एस. आट. पिंगळे, के. डी. हेमंत, अरुणा काकड, एम. एन. निकम, सुप्रिया कुलकर्णी, प्रशांत धामने आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वेध’मधून उलगडले व्यवसायाचे सूत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बुध्दीमत्ता ही कोणत्याही विशिष्ट क्षेत्राची मक्तेदारी नाही. कोणत्याही क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवायचा असल्यास ध्यास व प्रयत्नांची सांगड घालावी लागते हे सूत्र वेध व्यवसाय प्रबोधन परिषदेतून उलगडले.

पाच वर्षांपासून नाशिकमध्ये होत असलेल्या वेध व्यवसाय प्रबोधन परिषदेत रविवारी बहुरंगी बुध्दीमत्ता या विषयावर मान्यवरांच्या मुलाखती झाल्या. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी अतिशय रंगतदार पध्दतीने या मुलाखती घेतल्या. विविध क्षेत्रातील पाच प्रकारची माणसे या परिषदेच्या व्यासपीठावर एकत्र आली होती. ऊर्जा क्षेत्रात संशोधन करणाऱ्या डॉ. प्रियदर्शन कर्वे यांनी सामान्य माणसांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी निर्माण केलेल्या निर्धूर चुलीची माहिती दिली. सायकलिस्ट महाजन बंधू आणि डॉ. सुनील वर्तक यांनी रेस अॅक्रॉस अमेरिका या विक्रमी सायकल शर्यतीचे अनुभव लोकांपुढे मांडले. दुपारच्या सत्रात डॉक्टर विदाऊड बॉर्डर या संस्थेतर्फे आपत्तीग्रस्त लोकांना मानसिक आधार देणाऱ्या डॉ. कामिनी देशमुख यांनी आपले अनुभव कथन केले. त्यांनी विविध देशात केलेले काम उपस्थितांसमोर सांगितले. महाराष्ट्रातील एका खेड्यात राज्यातील पहिली डिजिटल शाळा चालवणाऱ्या संदीप गुंड या तरुणाच्या मुलाखतीने कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवले. वेधची सांगता मधूर पडवळ या तरुणाच्या सत्राने झाली. जगभरातील लोकवाद्य जमा करण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या या तरुणाने जमा केलेली लोकवाद्य ऐकणे व अनुभव ऐकणे हा एक रंगतदार अनुभव होता. यापल्या खुमासदार शैलीने या मुलाखती डॉ. नाडकर्णी यांनी एका उंचीवर नेऊन ठेवल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातील अश्विनी भार्गवे आणि त्यांच्या विद्यार्थीनींनी वेधचे गीत सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईवर फुंकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मोसम खोऱ्यातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याची तीव्रता लक्षात घेता मोसम खोऱ्यासह मालेगाव तालुक्यातील बहुतांश गावांना लाभ मिळण्यासाठी हरणबारी धरणाचे पहिले आवर्तन सोडण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

गत पावसाळ्यात कमी झालेल्या पावसाने सर्वत्र पिण्याच्या पाण्याची आगामी काळात भीषण टंचाई लक्षात घेता हरणबारी धरणातील संपूर्ण जलसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आमदार दीपिका चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक पगार, शशिकांत कोर यांनी आंदोलनाद्वारे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. यामुळे अखेर सकाळी सहा वाजेच्या सुमारास हरणबारीचे पहिले आवर्तन सुमारे २८८ दशलक्ष घनफूट इतके पाणी सोडण्यात आले.

मालेगाव शहरापर्यंत पाणी पोहच झाल्यास आवर्तन बंद केले जाणार असून, या काळात नदीकाठावरील मोटारी बंद करण्यात आल्या आहेत. मोसम खोऱ्यातील नामपूरसह मालेगाव तालुक्यातील १०० गावांना पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा व कांदा पिकांचा प्रश्न मार्गी लागणार असून, रब्बी पिकांना जीवदान मिळणार आहे.

बालागण तालुक्यात सध्या कांदा लागवडीचा हंगाम सुुरू आहे. मात्र, पाण्याअभावी नदीकाठावरील लागवड खोळंबली होती. आवर्तनामुळे नदीकाठच्या विहिरींना फायदा होणार आहे. यामुळे कांदा लागवडीला लवकरच जोमाने सुरुवात होणार असून, लागवड झालेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. अनेक शेतक-यांनी नदीकाठी विहिरी खोदून ठेवल्या आहेत. यामुळे मोसम खो-यातील रब्बी पिकांना हे आवर्तन फलदायी ठरणार आहे. तसेच जनावरांच्या चा-यांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. आवर्तन सोडल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. यामुळे आणखी काही दिवस पाणीटंचाईपासून सुटका होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंब‌‌कमध्ये सेना-भाजपात रस्सीखेच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या अंजनाबाई मधुकर कडलग आणि भाजपच्या विजया दीपक लढ्ढा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दोन्ही गटाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामुळे सेना विरुध्द भाजप अशी सरळ लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गत आठवड्यात नगरसेवकांच्या एका गटाने मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विविध प्रकाराच्या चर्चांना उधाण आले आहे. शह-काटशहाच्या राजकारणाने परिसिमा गाठली आहे. सोमवारी अंजना मधुकर कडलग यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत नाशिक मनपा शिक्षणमंडळ सदस्य बाळासाहेब कोकणे उपस्थित होते. तसचे, नव्याने सेनेत दाखल झालेले सर्व नगरसेवक व तृप्ती धारणे, शकुंतला वाटाणे, सिंधू मधे, अलका शिरसाठ, रवींद्र सोनवणे, ललित लोहगावकर आदी उप‌स्थित होते. त्याचप्रमाणे शिवसेना शहरप्रमुख छोटू पवार, गणपत कोकणे, पंकज धारणे, संजय हरळे, मनोहर महाले आदी समर्थकही उपस्थित होते.

भाजपच्या विजया लढ्ढा यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे शहराध्यक्ष उदय दीक्षित, उपाध्यक्ष शामराव गंगापुत्र, माजी नगराध्यक्ष मांगीलालशेठ सारडा, दत्तूशेठ कदम, भरतशेठ नार्वेकर, संजयशेठ लढ्ढा, माजी नगराध्यक्ष प्रशांत तुंगार, किरण अडसरे, गिरीश जोशी, युवराज कोठुळे उपस्थित होते.

विजया लढ्ढा यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एका अर्जास त्यांच्या गटासोबत असलेले शिवसेना नगरसेवक संतोष कदम हे सुचक आहेत. विजया लढ्ढा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना संतोष कदम यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. सेना-भाजप यांच्यात सरळ लढत होणार असेल, तर सेनेचे संतोष कदम अर्ज दाखल करण्याच्या घटकेपर्यंत भाजपच्या गोटात असल्याचे दिसून येत आहेत. मतदानाच्या दिवशी काय घडेल ते तेव्हाच स्पष्ट होईल.

नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सेनेची दावेदारी मजबूत मानली जात आहे. मात्र, त्र्यंबक नगरपालिकेचा इतिहास पाहता ऐनवेळी भाजपही वरचढ ठरू शकतो. आपल्या पक्षातील नगरसेवकांची मर्जी सांभाळण्याबरोबरच विरोधी गटातील नगरसेवक फोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. यामुळे ऐनवेळी कोण कोणाच्या गटात जाते, हे आैत्सुक्याचे ठरणार आहे. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांमध्येच नगराध्यक्षपदासाठी लागलेल्या चढाओढीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भू करमापकास लाच घेताना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भू कर मापक गणी अहमद शेख याला २५०० रुपयांची लाच घतांना नाशिक लाचलुचपत विभागाने सोमवारी (२१ डिसेंबर) रंगेहाथ पकडले.

येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भू कर मापक गणी अहमद शेख यास एसीबीने सापळा रचून लाच घेताना पकडले. तक्रारदार यांची तालुक्यातील साकूर येथील शेती (गट नंबर १८९) आहे. या शेतीची मोजणी करण्यासाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय मालेगाव येथे योग्य ते शुल्क भरून अर्ज केला होता. त्यानुसार १६ डिसेंबर रोजी अहमद शेख यांनी शेती मालकांच्या शेतीची मोजणी केली. हद्दखुणा दाखविणे आणि नवीन नकाशा देण्यासाठी शेतीमालकाने विनंती केली असता गणी शेख याने त्यांच्याकडे चार हजार रुपयांची मागणी केली. याबाबत शेती मालकांनी एसीबी नाशिक यांच्याकडे तक्रार दाखल केली. सोमवारी दुपारी मनमाड चौफुली येथे लाचखोर गणी अहमद शेख यास अडीच हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या संदर्भात कॅम्प पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनकर पॅनलला पराभवाचा धक्का

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मविप्र संचालक दिलीप मोरे, संस्थेचे सचिव बाळासाहेब जाधव व युवानेते सतीश मोरे यांच्या नेतृत्वाखालील नम्रता पॅनलने तेरापैकी आठ जागा जिंकत नेत्रदीपक विजय प्राप्त करीत स्पष्ट बहुमत मिळविले. माजी आमदार ‌दिलीप बनकर व भास्कर बनकर यांच्या पॅनलला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले.

गत दहा दिवसांपासून नम्रता व विकास पॅनलच्या वतीने निफाड, दिंडोरी व चांदवड या तालुक्यात प्रचाराचा धडाका उडवला होता. दोन्ही पॅनलकडून शिक्षण संस्थेची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. माजी आमदार दिलीप बनकर व भास्कर बनकर यांच्यासाठी मातब्बर नेते शिरीष कोतवाल, श्रीराम शेटे आदी नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. यामुळे निवडणुकीत चुरस वाढली होती. बनकर पॅनलची दावेदारीही मजबूत मानली जात होती. मात्र, मतदारांनी त्यांच्याविरोधात कौल दिला. नम्रता पॅनलसाठी मविप्र संचालक दिलीप मोरे यांनी तरुणांना हातीशी घेत एकहाती झुंज दिली. निवडणुकीख निकाल जाहीर झाल्यानंतर नम्रता पॅनलच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी माणिकराव बोरस्ते, पंढरीनाथ देशमाने, दिलीप मोरे, सतीश मोरे, शिवाजीराव निरगुडे, संपतराव डोखळे, साहेबराव मोरे, रमाकांत जाधव, शशिकांत जाधव, सतीश देशमाने, दिलीप देशमाने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवण तालुक्यात मजुरांची टंचाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

पाण्याची टंचाई असूनही थोड्याफार पाण्यावर शेतकरी कांदा लागवडीला पसंती देत आहे. एकाचवेळी कांदा लागवड सुरू असल्याने कळवण तालुक्यात मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. तसेच, मजुरीचे दरही वाढविले आहेत. कांद्याला भाव नसतानाही मजुरी वाढल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

मजूर टंचाईमुळे त्यांचा भाव वधारून स्पेशल वाहनातून त्यांची वाहतूक करावी लागत आहे. त्यातच दिवसा लाईट नसल्याने कांदा लागवडीनंतर रात्रीचे पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यंदा शेतकऱ्यांनी गहू आणि हरभऱ्याकडे पाठ फिरवली आहे.

बेज, पाटविहीर, खेडगाव, नाकोडे, रवळजी, मोकभणगी, निवाणे, शिरसमणी, अभोणा आदी भागातील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीवर भर दिला आहे. यामुळे मजुरांची मागणी वाढली आहे. त्यांच्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी लागत आहे. ज्यांच्याकडे वाहन नाही त्यांना देखील भाडेत्‍त्वावर वाहन करून मजुरांना येण्या जाण्याची सोय करावी लागत आहे. तसेच वाढीव मजुरीही द्यावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झळकेंच्या जादूने चिमुकले मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

आजवर आपल्या जादूच्या कार्यक्रमांनी अनेकांची मने रिझवणाऱ्या प्रभाकर झळके यांनी रविवारी येवला तालुक्यातील अनकुटे येथील शनिमंदिरात आयोजित कार्यक्रमात बच्चे कंपनीला वेगवेगळे जादू दाखवून मंत्रमुग्ध केले.

झळके यांनी विद्यार्थ्यांना जादूचे विविध प्रयोग दाखवून मनोरंजन केले. याबरोबरच विद्यार्थ्यांच्या मनातील अंधश्रध्दाही दूर केली. श्रद्धा बाळगताना अंधश्रद्धेला दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. जादू ही एक हातचलाखी असणारी कला असून, विद्यार्थी सुध्दा ती शिकू शकतात, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा अनकुटे, मोठा मळा व आर्यनिकेतन येवला या शाळेतील विद्यार्थी तसेच माध्यमिक विद्यालय व शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी दीपक बोंबले व किशोर गायकवाड यांनी झळके यांचा यथोचित सत्कार केला. अनिल महाजन यांनी झळके यांच्या कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण बोंदरे, रत्नाबाई सोनवणे, भानुदास देसले, सोनाली कळसकर, सविता कर्डिले यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकचा नगराध्यक्ष सोमवारी होणार जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निर्धारित कार्यकाळ संपल्याने त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनघा फडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने येथे नगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मंगळवारी (दि. २२) नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. त्याच दिवशी मंगळवारी दुपारी २ ते ४ या वेळेत नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. सायंकाळी ४ नंतर अवैध नामनिर्देशन पत्रांची यादी नगरपरिषद सभागृहात प्रसिध्द होईल. वैध नामनिर्देशन पत्राची यादी सोमवारी, दि. २८ डिसेंबर राजी प्रसिध्द करून लगेचच माघार घेतली जाणार आहे. दुपारी २ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून निकाल घोषित केला जाणार आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या आठ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तमंदिरात जयंती महोत्सवाला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी नाशिक

गोदाकाठावरील एकमुखी दत्त मंदिरात जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला सुरुवात झाली असून, २४ डिसेंबर रोजी दत्त जन्माचा मुख्य सोहळा पार पडणार आहे.

दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे व अखंड नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाला १८ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून, २ जानेवारीपर्यंत कार्यक्रम होणार आहेत. या कालावधीत रोज दुपारी १ ते ४ या कालावधीत गुरुचरित्र पारायण, सायंकाळी ५ ते ७ दत्त भक्त भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी ७ ते ८.३० पर्यत ह.भ.प. सुनीलबुवा कुलकर्णी यांचे कीर्तन व प्रवचन होणार आहे. २२ तारखेला श्रीराम महीला मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम होणार असून, २४ तारखेला सायंकाळी ६.१५ वा. दत्त जन्मसोहळा होणार आहे. २७ डिसेंबर रोजी पहाटे ६ वाजता रुद्राभिषेक व महापूजा आयोजित केली असून, सकाळी ९ ते १२ या वेळेत चतुर्वेद, शांतीपाठ प्रायश्चित विधी, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, पंचांग विधी, मंडप प्रवेश होणार आहे. याच दिवशी द्वितीय सत्रात श्री वास्तू मंडल स्थापना श्री योगिनी मंडल स्थापना, श्री क्षेत्रपाल मंडल स्थापना, श्री प्रधान मंडल, व सदगुरू मंडल स्थापना, देवताभिषेक सायंपूजन महाआरती व प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. २८ डिसेंबर रोजी पहाटे ६ वाजता श्रींचा रुद्राभिषेक व महापूजा होणार असून, सकाळी ९ ते १२ या वेळेत चतुर्वेद शांतीपाठ स्थापित देवता पूजन व अभिषेक, अग्निस्थापन, नवग्रह हवन, प्रधान हवन होणार आहे. दुपारी ३ ते ६ या वेळेत प्रधान हवन व मंगलारती होणार आहे.

२९ डिसेंबर रोजी पहाटे ६ वाजता रुद्राभिषेक महापूजा सकाळी ९ ते १२ या वेळेत चतुर्वेद शांतीपाठ स्थापित देवता पूजन व अभिषेक, अग्नी स्थापन, स्थापित देवता उत्तरांग हवन, प्रधान हवन, देवता हवन, उत्तरांग हवन, महाबली पूजन, द्वितीय सत्रात महाबली पूजन यज्ञाची पूर्णाहुती होणार असून, १ जानेवारीला महाप्रसादाचे वाटप होणार आहे. २ जानेवारीला सत्यदेव महापूजा होणार आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे अवाहन मंदिराचे मुख्य पुजारी मयुर बर्वे यांनी केले आहे.

औदुंबर भक्त मंडळ व चिदानंद परिवार यांच्यावतीने देखील दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सामूहिक गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत साखलाज मॉल कालिकामंदिराजवळ होणार आहे. २२ ते २४ दरम्यान सकाळी ४ ते ८ याकालावधीत गुरुचरित्र पारायण होणार आहे. २४ तारखेला दुपारी ३ वाजता दत्तचरण पादुकांची मिरवणूक काढण्यात येणार असून, ६ वाजता देवता आवाहन, ६.३० वाजता दत्त जन्म, ७.३० वाजता महाआरती, सायं. ८.३० वा. अविराज तायडे यांचा अभंगवाणी हईल. २५ तारखेला दुपारी ३ ते ५ यावेळेत सत्यदत्त पूजा व सायंकाळी ८ ते १० यावेळेत अजित कडकडे यांचे गायन होईल. २६ तारखेला सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत दत्तयाग होणार आहे. सायंकाळी ८ ते १० पुष्कराज भागवत यांचा भक्तीसंगीत कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजाराच्या नोटेतून स्वच्छतेचा धडा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदाकाठ, सिटी सेंटर मॉल, कॉलेजरोड, महामार्ग बसस्थानक यासारख्या गर्दीच्या ठिकाणी शंभर किंवा हजार रुपयाची नोट सापडते. काही लोक त्या नोटा उचलतात, खिशात टाकतात आणि थोड्या वेळाने हिच खोटी नोट उचलणाऱ्यांना खरा धडा शिकवून जाते. तो धडा असतो 'स्वच्छ नाशिक, हरित नाशिक'चा.

रस्त्यावर पडलेली नवी कोरी नोट उचलण्यासाठी जितका वेळ आपण देतो तितकाच वेळ नाशिक स्वच्छ ठेवण्यासाठी आपण देऊ शकतो, असा संदेश 'युथ युनायटेड' या संस्थेतर्फे ध्वनीचित्रफितीतून देण्यात आला. 'स्वतःमध्येच बदल घडवा जो तुम्हाला जगामध्ये बघावासा वाटतो' हा महात्मा गांधी यांचा विचार यात उदधृत करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर आजपर्यंत ५० हजाराहून अधिक लोकांनी बघितला आहे. नाशिकमध्ये तीन लाख नव्वद हजार घरे असून नाशिक महापालिकेच्या १९२ घंटागाड्या आहेत. 'आपले नाशिक स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे' हा संदेश नाशिककरांपर्यंत पोहोचवण्यासाठी युथ युनायटेडमध्ये सहभागी असलेल्या युवकांनी पुढाकार घेतला असून त्यात ते यशस्वी ठरले आहेत. विवेकराज ठाकूर, पायल शाह, शिवम आहेर, राकेश सरवर, हिमानी पुरी, विपीन खानकरी या युवकांनी स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून कृतीशील पाऊल उचलले व त्यात ते यशस्वी ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ख्रिसमसनिमित्त सजली बाजारपेठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ख्रिस्ती बांधवांबरोबरच सर्व धर्मियांचा आवडता सण ख्रिसमस अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असल्याने तयारीला वेग आला आहे. या सणाचे आकर्षण असणाऱ्या सांता क्लॉजच्या लाल चुटूक टोप्या, हिरवेगार ख्रिसमस ट्री, चॉकलेटचे बॉक्स यांची गर्दी बाजारात दिसू लागली आहे.

जसजसा ख्रिसमस सण जवळ येऊ लागतो, तसतशी दुकाने, शॉपिंग मॉल्स सजू लागतात. शहरातील चर्चची रंगरंगोटी पूर्ण झाली असून, रोषणाईची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. या सणानिमित्त येशू ख्रिस्तांच्या जन्माचा देखावा साकारला जात असतो. त्यामुळे हा देखावा बनविण्यात अनेक कारागिर कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आकर्षक चॉकलेट्स, सांता क्लॉजचे टॉईज, ग्रिटींग कार्ड्स या वस्तू बाजारात दिसतात.

ख्रिसमसची सायंकाळ हॉटेलमध्ये जाऊन साजरा करण्यावर अनेकांचा भर असतो. त्यामुळे हॉटेल्सलाही ख्रिसमसचा स्पेशल लूक देण्यासाठी तयारी सुरू असून, काही हॉटेल्समध्ये ती पूर्णही झाली आहे. सोनेरी रंगाची घंट्या, कापूस, रेनडिअर्स आदी साहित्याचा वापर करून हॉटेल्स सजली आहेत.

लाँग विकेंड

ख्रिसमस शुक्रवारी येत असल्याने एकामागे एक याप्रमाणे सुट्यांचा आनंद म्हणजेच लाँग विकेंड अनुभवता येणार आहे. त्यामुळे पिकनिक प्लॅन्सच्या तयारीलाही जोर आला असल्याचे ट्रॅव्हल एजन्सीजकडून समजते.

शाळांमध्ये तयारी

लहान मुलांमध्ये ख्रिसमस या सणाचे विशेष आकर्षण असते. गिफ्ट घेऊन येणारा सांता हा प्रत्येक विद्यार्थ्याचाच आवडता असतो. यादिवशी शाळांना सुटी असल्याने अनेक शाळा आतापासूनच ख्रिसमस साजरा करण्यास प्राधान्य देत आहेत. सांताच्या कपड्यांमध्ये, लाल टोपीमध्ये विद्यार्थी 'जिंगलबेल, जिंगलबेल' गाणे सादर करताना दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदर्शनांमुळे मैदान धोक्यात!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील खेळाडू-क्रीडाप्रेमींसाठी हक्काचे ठिकाण असलेल्या इदगाह मैदान वारंवार होणाऱ्या प्रदर्शन, सर्कस आदी विविध कार्यक्रमांमुळे संकटात सापडले आहे. अशाच एका हातमाग वस्तू प्रदर्शनामुळे क्रिडाप्रेमी आणि प्रशासन एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. इदगाह मैदानावर खेळाडूंना प्रदर्शनातील वस्तुंसाठी आलेले ट्रक रिकामे होताना दिसले. खेळाडूंनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या घरी धाव घेतली.

आयुक्तांच्या घरी शंभर-दोनशे खेळाडूंची गर्दी झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आयुक्तांनी खेळाडूंच्या नाराजीची दखल घेत त्यांना कार्यालयात भेटावयास बोलाविले. सदर प्रदर्शनासाठी जुलै महिन्यात मंजुरी दिली होती. प्रदर्शनाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या प्रदर्शनाला नाही म्हणता येणार नाही, अशी माहिती त्यांनी खेळाडूंना दिली. मात्र, क्रिडाप्रेमींना दिलासा देत मैदानाच्या अर्ध्याच भागावर प्रदर्शन भरले आणि अर्धे मैदान खेळण्यासाठी राखीव असेल असे आश्वासन त्यांनी खेळाडूंना दिले.

यापूर्वी अनेकदा महापालिका अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासने खेळाडूंना दिली होती. तरी देखील पुन्हा नव्या प्रदर्शनाला अथवा कार्यक्रमाला मान्यता महापालिकेकडून दिली जात असल्याने क्रिडाप्रेमी नाराज होते. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने मैदान सर्कससाठी दिले होते. त्यावेळी नाराज खेळाडूंनी सर्कशीचे तंबू उखडले होते. तेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा शेवटचा कार्यक्रम राहील अशी तोंडी ग्वाही दिली होती. पण आता क्रीडाप्रेमींना लेखी आश्वासन हवे आहे.

खेळायला जायचे तरी कुठे?

गोल्फ क्लब मैदान आणि महात्मा नगरचे मैदान क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यात असल्याने ही मैदाने सामान्यांसाठी खुली नाहीत. ही मैदाने त्यांच्या सभासदांना खेळण्यासाठी राखीव असल्याचे गाऱ्हाणे खेळाडूंनी मांडले. तसेच एका सामन्यासाठी तब्बल दहा ते पंधरा हजार फी आकारली जाते. मोफत खेळणे शक्य होईल, असे हे इदगाह मैदान एकमेव आहे. ते सुद्धा वारंवार प्रदर्शन भरविण्यासाठी व्यावसायिक तत्वावर महापालिकेकडून दिले जात असल्याने खेळायचे कुठे अशी व्यथा क्रीडा रसिकांनी मांडली.


मैदानांवर वस्तू प्रदर्शन भरविल्याने खेळायचे कुठे? प्रदर्शनांचा कालावधी मोठा असतो. तसेच ही प्रदर्शने मैदानांची वाईट अवस्था करतात. महापालिकेने मैदाने व्यावसायिक कामासाठी देऊ नये. मैदाने खेळण्यासाठी राखीव ठेवावीत.

- मनीष मोदी, खेळाडू व व्यावसायिक

हातमाग प्रदर्शनासाठी जुलैमध्ये मान्यता दिली होती. प्रदर्शनाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या प्रदर्शनाला ऐनवेळी नाही म्हणता येणार नाही. निम्म्या मैदानावर प्रदर्शन भरले आणि अर्धे मैदान खेळण्यासाठी राखीव असेल.

- डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images