Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सुरगाण्यात एकाचा मृत्यू

$
0
0

नाशिक : परतीच्या पावसाने शुक्रवारी दुपारी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. सुरगाणा तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह विजा पडल्या. तालुक्यातील चिखली गाव परिसरात यशवंत लक्ष्मण चौधरी आणि युवराज चंदर भोये (दोघांचेही वय १५) बैलांना घेऊन जात असताना वीज अंगावर पडून यशवंतसह बैल ठार झाला. तर युवराज जखमी झाला. दिंडोरी तालुक्यातही पावसाने कहर केला. अहिवंतवाडी परिसरात वीज अंगावर पडून जगन बहिरम आणि हिरामण बहिरम असे दोघेजण जखमी झाले. टाकळी विंचूर येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने सुरेश मोरे यांच्या घराचे पत्रे उडाले. या दुर्घटनेत ते जखमी झाले.

पेठ तालुक्यातील भाटविहरा येथे वीज अंगावर पडून नारायण तुंगार यांच्या मालकीचा बैल ठार झाला. तर ‍दिंडोरी तालुक्यातील पिंप्रीअंचला येथे वीज अगांवर पडून पंडित गावित या शेतकऱ्याची गाय मृत्यूमुखी पडली. चांदवड तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. साळसाणे येथे वीज पडून सुदाम जाधव यांच्या मालकीची गाय मृत्यूमुखी पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यभरात दमदार पाऊस

$
0
0

जिल्ह्यात वादळी पाऊस; एक युवक ठार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह राज्यातून बेपत्ता झालेल्या पावसाने शुक्रवारी सर्वत्र दमदार हजेरी लावली. नाशिकसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा परिसरात पावसाच्या आगमनाने सुखावले असून, विदर्भात मात्र पावसाचा टिपूसही नव्हता. नाशिकमध्ये दुपारनंतर आकाशात ढगांनी गर्दी केली आण‌ि संध्याकाळी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाला सुरूवात झाली. वादळी वाऱ्यासह कोसळेल्या मुसळधार पावसाने जिल्हावासियांना अक्षरश: झोडपून काढले. सुरगाण्यात वीज अंगावर पडून युवक ठार झाला तर त्याचा एक साथीदार जखमी झाला. दिंडोरी, चांदवड, निफाड, त्र्यंबकेश्वरमध्येही विजांच्या कडकडाटासह धुव्वांधार पाऊस पडल्याने तीन जनावरे दगावली व पाचजण जखमी झाले. शहरात मात्र तुरळक सरींनी हजेरी लावली. पुढील २४ तासांतही राज्यात पावसाच्या हजेरीची शक्यता असेल, हवामानखात्यातर्फे वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यालयास हवे आधुनिकीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

महापालिकेचे जेलरोड येथील कार्यालय विविध समस्यांनी त्रस्त आहे. आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कार्यालयात रेकार्ड ठेवण्यासाठी व्यवस्था नाही. कार्यालय छोटे असल्याने नागरिकांना बसण्यास जागा नाही. ऊन-पावसात त्यांना उभे रहावे लागते. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

जेलरोड येथील सावरकरनगरमध्ये महापालिकेचे कार्यालय आहे. येथे घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचे काम प्रामुख्याने केले जाते. सुमारे तीस हजार मिळकतधारक आणि पंधरा हजार नळधारक आहेत. त्यांच्याकडून वसूली करता करता नाकी नऊ येतात. कार्यालयात कर्मचाऱ्यांना बसायला जागा नाही की नागरिकांना उभे राहण्यास जागा नाही. त्यामुळे चार-पाच नागरिक उभे राहिले तरी त्यांची रांग कार्यालयाबाहेर येते. टेबल खुर्च्या जुनाट असून त्यांची संख्याही कमी आहे. कपाटे नसल्याने नागरिकांशी संबंधित रेकॉर्ड ठेवण्यासाठीही सुरक्षित जागा नाही. संगणक व प्रिंटर्स जुने झाले आहेत. येथील ब्रॉडबॅन्ड आडगावशी जोडलेले असल्याने संगणक अचानक बंद पडतात. नागरिक आणि आणि कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अतिक्रमणचा फटका

कार्यालयाच्या दरवाजाची सिमेंटची चौकट खराब झाली असून दरवाजा उखडला आहे. त्यामुळे येथे चोरीची भिती नागरिकांनी व्यक्त केली आहे. कार्यालयाच्या बाहेर पत्र्याचे शेड होते. ते अतिक्रमित असल्याने सहा महिन्यांपूर्वी महापालिकेच्याच अतिक्रमण पथकाने हटविले. तेव्हापासून नागरिकांना उन्हा-पावसात उभे राहावे लागत आहे. कार्यालय नवीन जागेत स्थलांतरीत करावे किंवा सध्याच्या कार्यालयाचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण करण्याची तीव्र गरज आहे.

जेलरोडच्या कार्यालयात घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेन्चेसची व्यवस्था करावी. कार्यालयाचा विस्तार केल्यास नागरिकांना ऊन व पावसात उभे राहावे लागणार नाही.

- अमोल भोसले

कार्यालयात नवीन संगणक यंत्रणा नाही. ती उपलब्ध केल्यास नागरिकांचा आणि कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल. जुनाट फर्निचर बदलून नवे दिल्यास नागरिकांची कागदपत्रे व दफ्तर सुरक्षित राहील.

- अविनाश गायकवाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुशावर्त घाटाची लांबी वाढवावी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर ये‌थे सिंहस्थ निर्विघ्न झाला. अर्थात देवदर्शनासाठी आणि स्नानासाठी अत्यंत बिकट परिस्थती निर्माण झाल्याने येथील पंचअग्नी आखाड्याचे सभापती श्री महंत गोपालानंद ब्रह्मचारी यांनी मंदिर दर्शनाची सुयोग्य व्यवस्था करावी आणि कुशावर्त घाटाची लांबी वाढवावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यांच्याकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्र्यंबकेश्वर येथे दिवसागणिक गर्दी वाढत आहे. या गर्दीच्या कालावधीत भाविकास दर्शन आणि स्नान घडले पाहिजे. गर्दीच्या कालावधीत ध्वनीक्षेपकावरून दर्शनबारीत आठ वाजेनंतर उभे राहू नका, दर्शन मिळणार नाही, अशा सूचना देण्यात येत होत्या. त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. कुशावर्त तिर्थास पूर्वेच्या बाजूने नवा घाट बांधून तो जोडण्यात आला तर अधिक भाविकांना त्याचा लाभ घेता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. कुशावर्ताबाबत काही निर्णय घेताना जर नागरिकांना बाधा पोहचत असेल तर प्रथम त्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे. किमान दहापट भरपाई मिळाली पाहिजे, असे देखील त्यांनी सांगितले. याप्रसंगी अग्नी आखाड्याचे सचिव महंत गोविंदानंद ब्रह्मचारी हे देखील उपस्थित होते.े.

वेदमाता गायत्री प्राणप्रतिष्ठा

त्र्यंबकेश्वर येथील श्री पंचअग्नी आखाड्याचे आराध्य दैवत वेदमाता गायत्री आहे. येथे वेदमाता गायत्रीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या प्रसंगी पूजा करण्यासाठी सभापती श्रीमहंत गोपालनंद ब्रह्मचारी, आचार्य महामंडलेश्‍वर ब्रह्मश्री रामकृष्णनंद, सचिव श्रीमहंत गोविंदानंद ब्रह्मचारी, ठाणापती दुर्गानंद आदी उपस्थित होते. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी आखाड्याला भेट देऊन गायत्री मातेची पूजा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावर आणखी एक बळी

$
0
0

भरधाव वाहनाच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोणार्कनगर बसस्टॉप येथे दुचाकीवर थांबलेल्या २२ वर्षीय युवकास भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. अनिकेत सुनील पन्हाळे असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो पंचवटी कारंजा परिसरातील रहिवासी आहे. मुंबई-आग्रा हायवे स्थानिक रहिवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असून, सुरक्षेच्या दृष्टीने यात योग्य ते बदल करण्याची मागणी केली जात आहे.

जत्रा चौफुली लगतच्या कोणार्कनगर येथील चामुंडा तंदूर हॉटेलसमोर शुक्रवारी सकाळी अपघताची घटना घडली. पंचवटीकारंजा परिसरात राहणारा अनिकेत आपल्या दुचाकीने (एमएज १५ एफए १२६१) कोणार्कनगर येथे पोहचला होता. बसस्टॉपजवळ थांबलेला असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेला अनिकेत जागीच मृत्युमुखी पडला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक फरार झाला. या घटनेची माहिती कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी आडगाव पोलिसांना माहिती दिली. व्यावसायिक गौतम ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, या घटनेमुळे मुंबई-आग्रा हायवेची उपयुक्तता पुन्हा एकदा वादाचा विषय ठरली आहे. अपघाताच्या मालिका रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या सचिन अहिरे यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले की, काही महिन्यातच या रस्त्यावर २८ अपघात झाले. यात २० नागरिक मृत्युमुखी पडले असून, गंभीर जखमी झालेल्या नागरिकांची संख्या ५० च्या पुढे आहे. जून २०१३ ते १४ या कालावधीत हजाराच्यावर अपघात झाले असून, यात सुधारणा होणे अपेक्षित असल्याचे अहिरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी टँकरलाही जीपीएस यंत्रणा

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

नाशिक : दुष्काळी परिस्थितीमुळे धास्तावलेल्या राज्य सरकारने पाण्याचा काटकसरीने वापर केला जावा, यासाठी आग्रही भूमिका स्वीकारली आहे. पाणी टँकर्सच्या फेऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूकदारांकडून नवीन निविदा स्वीकारताना तसेच करारनामा करताना टँकरवर जीपीएस यंत्रणा बसविण्याबाबतची महत्त्वपूर्ण अट घातली आहे. या यंत्रणेची देखभाल दुरुस्ती टँकर वाहतूकदाराने स्वःखर्चानेच करावयाची आहे. ही अट अंमलात आल्यास राज्यात पाण्याचा पैसा करणाऱ्यांना मोठा आळा बसणार आहे.

रेशनचे धान्य, केरोसीन इतकेच नव्हे तर गौण खनिजांच्या वाहतुकीत काळाबाजार होऊ नये, यासाठी संबंधित वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्याची राज्य सरकारची आग्रही भूमिका आहे. पाठोपाठ आता पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी टँकर्समध्ये जीपीएस प्रणाली बसविण्याची आग्रही भूमिका राज्य सरकारने स्वीकारली आहे. यंदा राज्यातील बहुतांश भागांतील धरणे पूर्ण भरू शकलेले नाहीत. पाऊस पडला नाही तर जानेवारीपासून राज्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावण्याची भीती सरकाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. याच अनुषंगाने या विभागाने पाणी काटकसरीने वापराबाबतच्या सूचना सर्व जिल्हा प्रशासनांना केल्या आहेत.

सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून एक किलोमीटर अंतरावरील विहिरींद्वारे भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालावी, ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी आतापासूनच जलसंधारणासाठी जलयुक्त शिवार अंतर्गत विविध उपाययोजना, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी शिवकालीन पाणी साठवण योजना राबविण्यात यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. यापुढे लवकरच वरिष्ठ भूवैज्ञानिक, कनिष्ठ भू वैज्ञानिकांना संभाव्य टंचाईग्रस्त पाणलोट क्षेत्रनिहाय व गावनिहाय आराखडे तयार करण्याचे काम प्राधान्याने हाती घ्यावे लागणार आहे. यंदा ज्या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस पडला तसेच पाण्याची पातळी सरासरीपेक्षा दोन मीटरने खाली गेली, अशा तालुक्यांमधील गावांची यादी तातडीने तयार करावी आणि जलस्वराज्य योजनेंतर्गत सुरू असलेल्या योजनांचे स्त्रोत बळकटीकरणाचे काम वेळेत पूर्ण करून त्यातील पाण्याचा लाभ गावाला मिळेल, अशी व्यवस्था लवकरात लवकर करावी, असे जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले आहे. विंधन विहिरींची वेळोवेळी दुरुस्ती करून त्या चालू अवस्थेत ठेवाव्यात, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पाण्याचा अनिर्बंध उपसा तसेच अपव्यय होणार नाही, याची जिल्हा परिषदेने काळजी घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांना सूचना

पाणीपुरवठा करण्यासाठी वापरात येणारे सरकारी टँकर्स सुस्थितीत नसल्याचे अनेकदा सांगितले जाते. त्यामुळे सरकारच्या मालकीचे टँकर असूनही अनेकदा पाणीपुरवठ्यासाठी खासगी टँकर्स भाडेतत्त्वावर घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवते. परिणामी सरकारचा पाणीपुरवठ्यावरील खर्चही अव्वाच्यासव्वा वाढतो. म्हणूनच सर्व टँकर्स सुस्थितीत ठेवावेत आणि जिल्हाधिकारी मागणी करतील तेव्हा त्यांना सुस्थितीतील टँकर पुरविले जावेत, अशा सक्त सूचना सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे टँकर वाहतूकदारांशी हातमिळवणी करून स्वत:चे उखळ पांढरे करवून घेण्याच्या सरकारी बाबूंच्या उद्योगालाही चाप बसणार आहे. तसेच नागरिकांना पाणीही वेळेत मिळू शकणार आहे. तसेच टँकरच्या फे-याही कळू शकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असाधारण अभिनिवेषाचे ‘निसटलेले रहस्य’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कथा अभिवाचनाचा आवेश, जबरदस्त शब्दफेक, साजेसा अभिनय आणि कथेला समर्पक असे सादरीकरण, संगीत व अक्षरलेखन असा सुरेख मेळ जमून आला होता कुसुमाग्रज स्मारकात. निमित्त होते कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित रंगालय उपक्रमात शुक्रवारी 'तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य' या दीर्घकथेचे अभिवाचनाचे.

प्रायोगिक रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेता अतुल पेठे यांनी या दीर्घ कथेचे वाचन केले. कथेचे लेखन सुप्रसिध्द नाट्यलेखक जयंत पवार यांनी केले होते. तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य ही त्यांची अत्यंत वेगळी आणि मर्म भेदी दीर्घकथा असून अतुल पेठे यांनी आपल्या अभिवाचनातून तिचे अतिशय परिणामकारक सादरीकरण केले. नाटकघर निर्मित या अभिवाचन-नाट्याचा प्रयोग कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात झाला.

बाबी हा भावकथा लिहिणारा लेखक. लेखकपणा त्याला वारशाने मिळाला. त्याचे काका डी. विश्वनाथ हे रहस्यकथा लेखक. बाबीचे अतिशय सुरळीत सुरू असताना ते एकदिवस त्याच्या स्वप्नात येतात व 'हा दैवाचा खेळ निराळा' ही त्यांची अपुरी कथा पूर्ण करण्याचे फर्मान सोडतात. बाबी भावकथा लेखक त्याला रहस्याचा पिंडच नसतो परंतु त्याचे काका रोज त्याच्या स्वप्नात येऊन त्याला कथानक सांगतात. त्यातून पुढे उलगडत गेलेले खरेखुरे रहस्य बाबीला उकलत जाते. दिवाकर व बगाराम या काकांच्या मानसपुत्रांच्या मदतीने बाबी कथा लिहू लागतो व एकदिवस ही पात्रेच त्याला भेटून त्यांचे मनोगत सांगू लागतात असा आशय असणारी ही दीर्घकथा अतुल पेठे यांनी अतिशय आवेशपूर्ण भाषेत सादर केली.

मराठी रहस्य कथामालिकांची दुनिया, त्याचे लेखक, या रहस्य कथांचे डिटेक्टिव्ह नायक, खून प्रकरण हाताळण्याची पद्धत, रहस्य कथा लेखनाची सूत्र आणि ह्या कथेच्या आतल्या आणि बाहेरच्या माणसाची वास्तव व आभासी दुनिया अशा एकात एक गुंतलेल्या पदरातून जगणं आणि कला यांच्यातील परस्पर रहस्यमय संबंधाविषयी ही कथा सांगू पाहते. प्रयोगाची प्रकाश योजना प्रदीप वैद्य यांची होती. संगीत नरेंद्र भिडे, संजय देशपांडे आणि अतुल पेठे यांचे तर अक्षर लेखन कुमार गोखले यांचे होते. रेखाचित्रे तुषार गुंजाळ यांची व रंगमंच सहाय्य विशाल राऊत, कृथार्त शेवगावकर यांचे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामायण हे अतिपावन जीवनचरित्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'जो वेदांनाही कळला नाही अशा अनादी, अनंत, अगम्य, परब्रह्म, परमात्मा प्रभू श्रीरामाचे जीवनचरित्र अर्थात रामायण अतिपावन आहे. या मनभावन रामायणातील अरण्यकांडात प्रभू श्रीराम पंचवटीक्षेत्री आल्याचा उल्लेख आहे. प्रभू श्रीरामाचं आगमन ते सीताहरण ही मनोहर लीला पंचवटीक्षेत्री घडली आहे.' असे प्रतिपादन अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे प्रवक्ता, सल्लागार व पीठाधिश्वर महंत डॉ. बिंदू महाराज यांनी केले.

रामदिव्य, लक्ष्मणरेषा, सीताहरण, जटायूमरण या प्रसंगावर आधारीत दत्तात्रेय बैरागी यांच्या लेखणीतून पाझरलेल्या 'गोदाकाठचं रामायण' या धार्मिक कादंबरीस्वरूप ग्रंथाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन पीठाधिश्वर डॉ. बिंदू महाराज यांच्या हस्ते व श्रीराम मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब कळमकर, सभापती डॉ. दिलीप जोशी यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. बिंदू महाराज म्हणाले, 'या लीलेची श्रध्दापूर्वक चिकित्सा करुन व गोदाकाठच्या वयोवृद्धांशी सुसंवाद साधून साहित्यिक दत्तात्रेय बैरागी यांनी गोदावरीच्या परमकाठावर घडलेलं रामायण अर्थात गोदाकाठचं रामायण समग्रपणे व समर्थपणे लिहीले आहे. नदीकाठच्या गावांवर व विविध स्थळांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या रामायणामुळे धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक वीण पुन्हा गुंफली जाणार आहे. प्रभू श्रीरामाचे पंचवटीतील सहा महिन्यांचे वास्तव्य, परमपावन गोदावरीला व आसपासच्या भुमीला झालेला पावन चरणस्पर्श, रामाच्या आगमनाने बदललेली परिस्थिती, ऋषीमुनींना, पशुपक्ष्यांना मिळालेले अभय, प्रभू रामाचं सामर्थ्य आणि त्याच्या मनोहर लीलेचं वर्णन या गोदाकाठच्या रामायणात सक्षमपणे प्रकट झाले आहे. अर्थात हा ईश्वरी संकेत असावा असे मला वाटते. कादंबरी वाचताना ती मनावर अधिराज्य गाजवते. कादंबरीतील प्रसंग डोळ्यांसमोर तरळतात. गोदाकाठच्या रामायणावर इतके सुंदर, सखोल भाष्य करणारे हे एकमात्र पुस्तक असावे असे मला वाटते. कादंबरीत तब्बल ४५ गावांचा तर महत्त्वपूर्ण निवडक अशा २६ गावांचा समावेश असून, ही कादंबरी शंभराहून अधिक स्थळांचा विचार करणारी आहेच; परंतु रामायणातील अरण्यकांडाच्या पूर्वार्धावर नवा प्रकाशझोत टाकणारी व गोदाकाठच्या स्थळांना, गावांना प्रकाशझोतात आणणारी आहे. यामुळे रामभक्तांना ती निश्चितच भावेल. कुंभपर्वात जवळपास एकाच महिन्यात या कादंबरीस्वरुप ग्रंथाच्या चार आवृत्त्या प्रकाशित व्हाव्यात, हेच या पुस्तक लिखाणामागील यश असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गांधीजींची चळवळ सामान्यांपर्यत पोहचली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'भारतीय स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींचे योगदान मोठे आहे. अखंड भारताच्या स्वातंत्र्याच्या दिशेने गांधीजींच्या लढ्याची दिशा होती. भारताची फाळणी टाळण्यासाठी गांधीजींचे प्रयत्न राहीले. सर्व भारतीयांना एकत्र ठेवून विकास साधण्याचे त्यांच्या कार्याचे सूत्र होते', असे मत 'साधना'चे संपादक विनोद शिरसाठ यांनी व्यक्त केले.

केटीएचएम कॉलेजच्या वतीने रावसाहेब थोरात हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गांधी जयंतीनिमित्त हा उपक्रम पार पडला. 'गैरसमजांच्या भोवऱ्यात अडकलेला महात्मा' या विषयावर त्यांनी विचार मांडले.

शिरसाठ म्हणाले, 'गांधीजींच्या चळवळीच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस कायम राहीला. सत्य-अहिंसा व सत्याग्रहाच्या माध्यमातून सामान्य माणसाला अहिंसक लढ्यासाठी या चळवळीने प्रवृत्त केले', असेही शिरसाठ म्हणाले. एका बाजूला गांधींच्या विचाराचा जगभर अभ्यास होतो आहे. त्यातून या प्रतिमेचे सकारात्मक पैलूही समाजाला मिळताहेत. तर दुसऱ्या बाजूला गांधींवर मोठी टिकाही होत आहे. या टीकेबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मात्र गांधीजींनी स्वीकारलेली भूमिका तत्कालीन परिस्थितीला धरून होती, असेही मत त्यांनी मांडले. स्वातंत्र्य चळवळीतील गांधींचे स्थान त्यांनी घेतलेल्या भूमीका व आंदोलन तसेच गांधींचे नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बॅरीस्टर जीना या सर्वांशी असलेल्या संबंधावरही प्रकाशझोत या व्याख्यानात टाकण्यात आला.

प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे म्हणाले, 'जगभरातील विचारवंताना गांधीजींबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. अनेक देशातील स्वातंत्र्य चळवळींना गांधींच्या विचारांची प्रेरणा आहे.' यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डॉ. स्नेहल सोनवणे, डॉ. एम. बी. मत्सागर, प्रा. डी. जी. गायकवाड, डॉ. एस. सी. पाटील, डॉ. पी. व्ही. कोटमे उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा. अशोक सोनावणे यांनी केले. उपप्राचार्य डी. जी. गायकवाड यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममध्ये पाण्याची नासाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेल्या अवघ्या १० ते १२ साधूंसाठी महापालिकेकडून २४ तास पाणी पुरवठा केला जातो आहे. मुख्य पाइपलाईनला जोडलेले अनेक नळ तुटून पडले आहेत किंवा चोरी गेले असून, यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो आहे. दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने साधुग्रामचा १०० टक्के पाणी पुरवठा थांबवावा किंवा नळाच्या तोट्या तरी बसवून घेण्याची मागणी होते आहे.

तिसऱ्या शाही पर्वणीनंतर साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेल्या साधू-महंतांनी लागलीच परतीचा मार्ग पकडला. मात्र, एकाच वेळी संपूर्ण साधूग्राम रिकामे झाले नाही. एका एका सेक्टरमधील थोडे फार तंबू हलविण्यात आले. यामुळे साधुग्राममध्ये पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा पुरविण्याची

जबाबदारी महापालिकेसहीत इतर विभागाना पार पाडावी लागली. आरोग्य विभागाने हात झटकल्याने कचऱ्याची समस्या उभी राहिली. आता साधुग्राममध्ये अवघ्या दोन खालशांचे तंबू असून, त्यात काही साधू वास्तव्यास आहे. या साधूंच्या विनंतीनुसार महापालिकेने पाणी तसेच वीजपुरवठा कायम ठेवला. मात्र, येथे एकाच प्रेशर पाईपवर अनेक नळाच्या तोट्या बसवण्यात आल्या आहेत. साधू हटले तसे साधुग्राममध्ये भुरट्या चोरट्यांनी हात साफ करण्यास सुरूवात केली. अनेक नळाच्या तोट्या गायब असून, त्यातून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो आहे. दुष्काळजन्य परिस्थितीत पाणी वाचवण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

महापालिकेने दिले आश्वासन

पाणी पुरवठा विभागाचे सुप्रीटेन्डट इंजिनीअर आर. के. पवार यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली. त्यांनी सांगितले की, साधुग्राममधील बहुतांश पाइपलाईनचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. दोन खालशांचे तंबू असल्याने त्यांनी पाणीपुरवठा सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यांना आम्ही ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यांनी ती २ ऑक्टोबरपर्यंत वाढवून मागितली होती. ज्या पाइपलाईनवरून संबंधीत खालशांना पाणी पुरवठा होतो, त्या पाइपलाईनवर अन्यत्र कुठे पाण्याचा अपव्यय होतो का? हे पाहण्यासाठी कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. महापालिकेने खालशांना दिलेली मुदत आता संपली असून, साधुग्राममधील पाणी पुरवठा १०० टक्के बंद होईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओवेसी नको, शांतता हवी!

$
0
0

मुस्लीमांनी एमआयएमला दाखवले काळे झेंडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नांदेड,औरंगाबाद,मुंबई नंतर नाशिकमध्ये विस्तार करण्याच्या इराद्याने नाशिकमध्ये असलेल्या एमआयएम पक्षाच्या नेत्यांना शनिवारी स्थानिक मुस्लीमांच्या रोषाचा सामना करावा लागला. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत काढलेल्या रॅलीला स्थानिक मुस्लिमांनी काळे झेंडे दाखवत,आम्हाला ओवेसी नको, शांतता हवी असल्याचा नारा दिला आहे.

ओवेसी देशका सौहार्द बिघाडते है,उनकी एमआयएम पार्टीसे मुस्लिमका विकास नही विनाश हैं, न हिंदु-मुस्लिम की एकता झिंदाबाद अशा घोषणा एमआयएमच्या रॅलीसमोर दिल्यात.त्यामुळे भद्रकालीत तणाव निर्माण झाला होता.मात्र पोलीसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला .

आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका असल्याने एमआयएम पक्षाने आपली ताकद विस्तारण्याची तयारी नाशिकमध्ये सुरू केली आहे.त्यासाठी एमआयएमच्या आमदारांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन आयोजीत कऱण्यात आले होते.नाशिकरोड येथून रॅली काढत,महाकवी कालीदास कलामंदीरात भव्य मेळावा आयोजीत केला होता.दुपारी ही रॅली भद्रकाली परिसरात आल्यानंतर स्थानिक मुस्लिमांनी एमआयएम व ओवेशींच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचा प्रयत्न केला.रॅली जुने नाशिकच्या शहीद अब्दुल हमीद चौकात पोचताच येथे मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्यांनी हातात भारतीय ध्वज फडकवित हिंदु-मुस्लिम सब एक हैं अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. रियाज मेमन, सोहेल बेग, शेख रियाज बाबु, इरफान पठाण,यांच्या अनेक मुस्लिम बांधव यात सहभागी झाले होते. नाशिक मध्ये हिंदु-मुस्लिम एकोप्याने जातीय सलोख्यात राखला जात असुन एमआयएमच्या प्रवेशाने हे वातावरण दुषित होण्याची शक्यता आहे.ओवेशींच्या वादग्रस्त विधांनानी पुर्वीच देशात अराजकता माजत असुन देशातील एकता अखंडता धोक्यात आली आहे.त्यामुळे आमचा एमआयआयला विरोध असल्याचे यावेळी मुस्लिम बांधवांनी यावेळी सांगितले.

यावेळी स्थानिकांनी ओवेसी आणि एमआयएमच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.स्थानिकांनी थेट काळे झेंडे दाखवत,तिंरगा फडकवला.त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण पसरले. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना एकमेकांपासून दूर केले.पोलीस संरक्षणात ही रॅली पुढे काढून देण्यात आली.ओवेसी यांच्या पक्षाला सुरूवातीला स्थानिक मुस्लीमांनी विरोध करत,ग्रहण लावले आहे.त्यामुळे एमआयएमच्या विस्ताराला लगाम बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पावसामुळं दोघांचा बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ढगांचा गडगडाट अन् विजांचे तांडव अशा पावसाच्या रौद्ररुपाने शनिवारी जिल्हावासियांची दाणादाण उडविली. पावसाने दोघांचा बळी घेतला असून, पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये निफाड तालुक्यातील शिंगव्याच्या माजी सरपंचासह नानेगावातील एका मजुराचा समावेश आहे. दोन दिवसांत पावसाने तिघांचा बळी घेतला असून, तब्बल नऊजण जखमी झाले आहेत. नाशिकसह त्र्यंबक, इगतपुरी, देवळा, येवल्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्र्यंबकेश्वरमध्येही अवघ्या तासाभरात ८० मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसाने जिल्ह्यात शुक्रवारी कमबॅक केले. वादळी वाऱ्यासह पुनरागमन करणाऱ्या पावसाने सुरगाण्यात यशवंत चौधरी (वय १५) या तरुणाचा बळी घेतला होता. तर चार जनावरेही मृत्युमुखी पडली. शनिवारी दुपारपर्यंत शहरासह जिल्ह्यात वातावरण ढगाळ होते. कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरणाचा अनुभव नागरिक घेत होते. दुपारी अड‌‌ीचपासून ढगाळ वातावरणामुळे वातावरणात अंधारून आले. त्यानंतर काही वेळातच पावसाने जोरदार हजेरी लावली. शिंगवे येथे दुपारी चारच्या सुमारास माजी सरपंच वाळू देवराम मोगल (वय ५४) यांच्या घरावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. तर नाशिक तालुक्यातील नानेगाव येथे शेतावरील कामे उरकल्यानंतर घराकडे परतत असताना अंगावर वीज कोसळल्याने गिरधर लक्ष्मण भरसाट (३५, रा. गोटवीरा, ता. पेठ ) हा शेतमजूर ठार झाला. त्याच्यासोबतचे आनंदा चौधरी, मीनानाथ चौधरी, प्रकाश चौधरी, रामदास चौधरी व पुंडलिक गावित हे पाच जण जखमी झाले. तर देवळाली जवळील दोनवाडे येथे वीज अंगावर पडून सचिन गांगुर्डे (वय १८) हा तरूण जखमी झाला. देवळा तालुक्यात मकरंदवाडी येथील निंबा जाधव यांच्या म्हशीचाही वीज अंगावर पडून मृत्यू झाला. निंबा जाधव यांच्या मालकीची ही म्हैस होती. दरम्यान, कसारा घाट येथे दरड कोसळल्याने मुंबई-नाशिक वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम झाला. ही वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. तर येवला तालुक्यात पावसाने ढगांच्या गडगडाटासह जेमतेम हजेरी लावली.

शिंगवे गावावर शोककळा

शिंगवे गावचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वाळू मोगल यांच्या मृत्यूमुळे शिंगवे गावावर शोककळा पसरली. अंगावर वीज पडल्याने मोगल गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नाशिकमध्ये हलविण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोगल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते होते. निफाड तालुक्यातील राजकारणात त्यांचा दबदबा होता. शिंगवे येथील प्रगतीशील शेतकरी असलेल्या मोगल यांनी माजी सोसायटी चेअरमन, गोदावरी लिफ्ट चेअरमन अशी पदे त्यांनी भुषविली होती.

भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान

यंदा गरज नव्हती तेव्हा गारपीट, अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. तर जेव्हा पावसाची गरज होती तेव्हाच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची खरीपातील पिके हातची गेली. आताही शेतकऱ्यांनी टोमॅटो, भोपळा, दोडकी, गिलके यांसारख्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे. मात्र वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने हे अशा भाजीपाल्याच्या वेली उध्वस्त केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरेल तसेच धरणे भरली तर पुढील वर्षभराची चिंता मिटेल असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचे सुरक्षा कवच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी कुंभनगरी सज्ज झाली असून, भक्तांचा उत्साह ​शिगेला पोहचला आहे. शहरात नवरात्रोत्सवाचा फिव्हर हळूहळू वाढत असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला आहे. सक्रिय झालेल्या चेन स्नॅचर्सला रोखण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

शहरासह जिल्ह्याभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वणी येथील सप्तशृंगी गड भाविकांच्या आगमनासाठी सज्ज झाला असून, चांदवड तसेच येवला तालुक्यातील कोटमगाव येथील जत्रांचे भाविकांना खास आकर्षण आहे. नाशिक शहराचे ग्रामदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या कालिका मातेच्या जत्रेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मंदिर प्रशासनाने मंदिरात सीसीटीव्ही बसवले आहेत. कालिका माता मंदिरासह भगूर परिसरातील रेणुका माता मंदिरात देखील नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे.

असा आहे बंदोबस्त

झोन एकमध्ये पोलिसांचे लक्ष केंद्रित असून, तसाच काहीसा बंदोबस्त भगूर परिसरात असणार आहे. झोन एकमधील सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये सर्वाधिक सात पोलिस निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यानंतर ३० पीएसआय, १५० पोलिस कर्मचारी, ४० महिला पोलिस कर्मचारी, १९५ होमगार्डस एक स्ट्रायकिंगफार्स आणि पाच वाहने असा बंदोबस्त देण्यात आला आहे. भद्रकाली, पंचवटी, गंगापूर आणि आडगाव पोलिस स्टेशन मिळून नवरात्रीसाठी १७ पीआय,

७० पीएसआय, ६६१ पोलिस कर्मचारी, २०० महिला पोलिस कर्मचारी, ५९० होमगार्डस २ एसआरपीएफच्या तुकड्या, चार स्ट्राय​किंग फोर्स आणि २३ वाहने देण्यात आली आहे. गर्दीच्या वेळी साध्या वेषातील पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुमारे ६०० मंडळांचा सहभाग

सार्वजनिक ठिकाणी नवरात्रोत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळाकडून परवानागी घेण्याचे काम अद्याप सुरू आहे. साधारणतः ५०० पेक्षा अधिक सार्वजनिक मंडळाची नोंदणी दरवर्षी होत असते. यात यंदा वाढ होण्याची शक्यता आहे. याबरोबर विविध लॉन्स आणि सभागृहात दांडिया तसेच गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे.

चेन स्नॅचिंग रोखण्याचे आवाहन

नवरात्रोत्सवादरम्यान महिला वर्गाची लगबग असते. याचाच फायदा घेत चोरटे चेन स्नॅचिंग करतात. पहाटे आणि संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर महिला घराबाहेर पडत असल्याने चोरट्यांना आयती संधी उपलब्ध होते. चालू वर्षी सप्टेंबर महिना अखेरपर्यंत शहरात ७१ स्नॅचिंगच्या घटना घडल्या असून, त्यातील अवघ्या १२ घटनांचा तपास लागला आहे. तेच गत वर्षी हे प्रमाण ५६ इतके होते. या पार्श्वभूमीवर महिलांनी दागिने न घालून घराबाहेर पडणे उचित ठरू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पन्नास हजार रुपयांची खंडणी द्या अन्याथा तुमचे काही खरे नाही, असे धमकवणाऱ्या तडीपार संशयिताविरोधात देवळाली पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

देवळाली परिसरातील सन्ससाई लेनमध्ये राहणाऱ्या जगदीश भवनदास मनवाणी (वय ४७) या व्यावसायिकाला सध्या तडीपार असलेला अनुपदास लखन हा गुंड गेल्या सहा दिवसांपासून खंडणीसाठी धमकावत आहे. लखन सध्या पुणे शहरात वास्तव्यास असून, त्याने मोबाइलद्वारे मनवाणी व त्यांच्या मुलाला ५० हजाराच्या खंडणीसाठी धमकी दिली. १० ऑक्टोबर रोजी लखनने शेवटचा कॉल केला. यानंतर, सोमवारी मनवाणी यांनी पोलिसांना संपर्क करून तक्रार दाखल केली.

भिकुसामध्ये अपहार

भिकुसा पेपर प्रायव्हेट लिमिटेड या हिरावाडीस्थित कंपनीत ४४ लाख १७ हजार ४४ रुपयांचा अपहार झाल्याची फिर्याद परशराम विश्वनाथ क्षत्रिय (वय ५५) यांनी दिली आहे. संशयित बलराम विश्वनाथ क्षत्रिय आणि गौरी विश्वनाथ क्षत्रिय यांच्यासह चौघा संशयितांनी कंपनीचे पैसे कपंनीच्या खात्यावर जमा केले नाहीत. संशयितांनी या पैशांचा अपहार करीत इतर संचालकांचा विश्वासघात केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत पंचवटी पोलिसांनी सहा संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

साडेसहा तोळे सोने जप्त

उपनगर पोलिस स्टेशन हद्दीत झालेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी एका सोनारास अटक करून त्याच्याकडून ६४. ५ ग्रॅस सोने जप्त केले. उपनगर हद्दीतील गुन्ह्याप्रकरणी क्राईम ब्रँचच्या युनिट तीनचे पोलिस निरीक्षक संजय सानप व त्यांच्या पथकाने एका इराणीस अटक केली होती. चौकशीत संशयिताने संबंधित सोनाराचे नाव सांगितल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

विद्यार्थ्याचा मृत्यू

सिन्नर : येथील ब. ना. सारडा विद्यालयाचा इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी महेश खंडू उगले हा मैदानावर खेळत असताना अचानक जमिनीवर पडला. त्यास तातडीने जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

संध्याकाळी साडेपाच वाजता शाळेची सुटी होणार होती. त्यापूर्वी महेश उगले हा इतर विद्यार्थ्यांबरोबर मैदानावर खेळण्यासाठी गेला होता. मात्र, खेळत असताना तो अचानक मैदानावर कोसळला. त्यावेळी उप‌स्थित विद्यार्थी व शिक्षकांनी त्यास जवळ असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सिन्नर पोलिस करीत आहे.

तरुणाचा मृत्यू

नाशिक : जनावरांना पिण्यासाठी पाणी काढून देत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने नांदगाव तालुक्यातील नांदुरा इथे बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी आकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. गोरक्षनाथ भाऊसाहेब आयनोर (वय २२) असे त्या तरुणाचे नाव आहे.

चोरीच्या घटनांत वाढ

ना‌शिक : ना‌शिक शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हिरावाडी परिसरात भुरट्या चो-यांचे प्रमाण वाढल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. या भागात रात्रीची गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दोन महिन्यात तेरा तडीपार

शहरातील विविध भागात गुन्हेगारी कृत्य करून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १३ व्यक्तींना पोलिसांनी तडीपार केले. मागील दोन महिन्यात पोलिसांनी ही कारवाई केली. झोन एकमधील सहा तर झोन दोन मधील सात समाजकंटकांचा यात समावेश आहे. याबरोबर, पोलिसांनी तीन गुन्हेगारांविरोधात झोपडपट्टी गुन्हेगारी अॅक्टनुसार एमपीडीएचे प्रस्ताव तयार केले असून, त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कामगारांचे झाडू आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात साफसफाईचे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत वेतन मिळाले नसल्याच्या निषेधार्थ छावा, क्रांतीवीर सेनेने झाडू आंदोलन पुकारले. झाडू व पाट्या घेऊन सफाई कामगार थेट राजीव गांधी भवन येथे धडकल्याने या ठिकाणी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान साधुग्रामसह २४ तास साफसफाई करण्याकरिता महापालिकेने दोन ठेकेदारांना ठेका दिला. साधुग्राम, शाहीमार्ग आणि रामकुंड या परिसरात स्वच्छता राखण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर होती. यासाठी ठेकेदारांनी उत्तर भारतातील विविध राज्यामधून शेकडो कर्मचाऱ्यांची आयात केली. या कर्मचाऱ्यांचे वेतन बँक खात्यात जमा करून त्याची पावती सादर केल्यानंतर ठेकेदाराला पैसे अदा केले जातील, अशी अट महापालिकेने ठेकेदाराला घालून दिली. तीन शाही पर्वणीदरम्यान पैसेच मिळत नसल्याची तक्रार अनेकदा या कर्मचाऱ्यांनी केली. आंदोलन सुध्दा छेडले. मात्र, ठेकेदाराने आश्वासन देत कर्मचाऱ्यांना पुन्हा कामास लावले. आता, ​तिन्ही शाही पर्वणी संपून महिना होत आला असून, हे कर्मचारी वेतनासाठी नाशिकमध्ये अडकून पडले आहेत. या सर्वांचे प्रतिनिधित्व करीत छावा क्रांतीसेनेने गोल्फ क्लब ते राजीव गांधी भवन मोर्चाचे आयोजन केले. विविध घोषणा देत कर्मचाऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. यानंतर मोर्चेकऱ्यांच्या प्रतिनिधींनी आयुक्त प्रवीण गेडाम यांची भेट घेतली. दोन दिवसात पैसे देण्याची तजवीज होईल, असे आश्वासन गेडाम यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी​ शिवा तेलंग, करण गायकर, रोशन घाटे, विजय वाहुळे, संतोष माळोदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्रेडाईचे आज कामबंद आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध प्रकारच्या सरकारी धोरणे आणि अडथळ्यांना कंटाळून ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांनी केलेल्या आत्महत्येची दखल घेत देशभरात घटस्थापनेच्या दिवशी कामबंद आदोलन करण्याचा निर्णय क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने घेतला आहे. त्यानुसार नाशकात जवळपास एक लाख जण त्यात सहभागी होणार असल्याचा दावा क्रेडाईने केला आहे.

बांधकाम परवाना वेळेत न मिळणे, ना हरकत दाखले मिळण्यासाठी पैशाची मागणी होणे, वाढत्या महागाईत निश्चित वेळेत प्रकल्प पूर्ण करता न येणे, सरकारी नियम व कायद्यांची योग्य अंमलबजावणी न होणे, काही क्लिष्ट नियमांचा सोयीनुसार अर्थ काढला जाणे, अशा विविध बाबींना कंटाळून बिल्डर सूरज परमार यांनी जीवनयात्रा संपवली. देशभरातच ही परिस्थिती असून, याची गंभीर दखल घेत क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने आज, मंगळवारी कामबंद आंदोलनाचा ठराव केला आहे. बांधकामावर काम करणाऱ्या मजुरापासून ते बिल्डरांपर्यंत सर्वच या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी दिली. या बंदमध्ये आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनीअर्स, इंटेरिअर डिझायनर्स, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनीअर्स या संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. बांधकामाचे परवाने देण्याच्या पद्धतीत बदल घडवावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आणि महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना दिले.

सर्व व्यवहार चेकने

पारदर्शक कामकाजासाठी क्रेडाई आग्रही असून, क्रेडाईचे सर्व सदस्य चेकने व्यवहार करण्यास तयार असल्याची माहिती ठक्कर यांनी दिली. लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असल्याने आणि निश्चित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चेकचे व्यवहार उपयुक्त ठरतील. यासंदर्भात अर्थक्रांतीचे प्रणेते विवेक बोकील यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे येत्या काही दिवसातच आयोजन करण्यात येणार असल्याचे ठक्कर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिजीत मुहूर्तावर आज घटस्थापना

$
0
0

घरोघरी उत्सवाची जय्यत तयारी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आज, १३ ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरूवात होणार आहे. घटस्थापनेसाठी सकाळी ११.४९ पासून १२.३७ पर्यंतचा काळ उत्तम असल्याचे ज्योतिष अभ्यासकांचे म्हणणे आहे. पाच वर्षांनंतर आलेल्याअभिजीत काळात यंदा घटस्थापना होणार आहे. नवरात्र उत्सवाची घरोघरी जय्यत तयारी करण्यात आली आहे. घटाचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिला वर्गाने बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या देवी उपासनेच्या काळाला नवरात्र उत्सव म्हणतात. घरोघरी घट स्थापना केली जाते. देवीपुढे अखंड दीप लावला जातो. देवी महात्म्य नावाचा ग्रंथ वाचला जातो. प्रतिपदा तिथीमध्ये वृध्दी होत असल्याने नवरात्री १० दिवसांच्या असतील. दसऱ्याचे पर्व मात्र नवमीलाच असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घटस्थापनेसाठी पाऊण तास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनेक वर्षांनंतर शारदीय नवरात्र घटस्थापनेचा मुहूर्त दिवसा आला आहे. दरवर्षी ब्राह्ममुहूर्त किंवा रात्रीच घटस्थापनेचा मुहूर्त असतो. सूर्योदयानंतर दहा घटी म्हणजेच अभिजीत मुहूर्तावर यंदाची घटस्थापना होणार आहे. पाच वर्षांनी हा मुहूर्त आला आहे. सकाळी ११.४९ ते दुपारी १२.३७ पर्यंतचा काळ उत्तम असणार आहे.

घटस्थापनेसाठी दोन पत्रावळी घेऊन त्यात परडी ठेवली जाते. परडीत काळी माती घालून एक सुगड (मातीचे भांडे) ठेवतात. त्याला कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढतात. त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाने लावतात. त्यावर एक नारळ म्हणजेच श्रीफळ ठेवतात. त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळद कुंकू लावतात. हार वेणी गजरा घालतात. घटा खालच्या काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरतात. या घटाजवळच अखंड नंदादीप लावतात. घटावर फुलांच्या माळा सोडल्या जातात. सकाळ-संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा केली जाते.

नवरात्र उत्सव काळांत देवळांतून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात. या उत्सवाला सध्या सार्वजनिक स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. नवरात्रीला सध्या जे सार्वजनिक स्वरूप आले आहे. त्यामध्ये मुले-मुली नऊ दिवस गरबा खेळतात. मुला-मुलींसाठी अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम राबविले जातात. मुलींना आवडणारा हादगा हा सुध्दा याच दिवसात करतात. मुली पाटावर हत्ती काढून त्याच्या भोवती फेर धरतात. हादग्याची गाणी म्हणतात. नवनव्या खिरापती केल्या जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमणगंगा-पिंजाळ प्रश्न हायकोर्टात!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दमणगंगा-पिंजाळ नदी जोड योजनेचा सामंजस्य करार करण्याबाबत राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून, या कराराला जलचिंतन संस्थेने तीव्र विरोध केला आहे. येत्या शनिवारी संस्थेच्यावतीने आंदोलन केले जाणार असून, त्यानंतर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली जाणार असल्याचे संस्थेने निश्चित केले आहे.

दमणगंगा-पिंजाळ लिंकचा (डीपी लिंक) गुजरात व केंद्र सरकारबरोबर अंतिम जलकरार करण्याबाबतचे पत्र गेल्या १७ एप्रिल रोजी जलसंपदा खात्याच्या तत्कालिन सचिव मालिनी शंकर यांनी केंद्र सरकारला पाठविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ जानेवारी रोजी केंद्रीय जलसंपदा मंत्री उमाभारती यांना पाठविलेल्या पत्राचा संदर्भ देत दमणगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्पाचा जलकरार अंतिम करण्याचे ते पत्र असल्याची माहिती जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोणत्याही राज्याशी अंतिम जलकरार करताना राज्याचे सर्वोच्च सभागृह विधानसभा-विधानपरिषद, राज्य मंत्रिमंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्यातील जनता यापैकी कोणाचीच मान्यता न घेता जलसंपदा खाते अशा पद्धतीची पत्रे केंद्र सरकारला पाठवत असल्याचे जाधव म्हणाले.

दमणगंगा खोऱ्याचा बृहत आराखडा तयार करण्याचे काम कोकण पाटबंधारे विकास महामंडळामार्फत चालू आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा-२००५ मधील कलम १५ च्या तरतुदीनुसार औरंगाबाद हायकोर्टाने राज्य सरकारला महाराष्ट्रातील पाच नदी खोऱ्यांचे जल आराखडे तयार करण्याचे आदेश दिले आहेत. दमणगंगा खोऱ्याचा आराखडा अंतिम नसताना राज्य सरकारला जलकराराची घाई का आहे? या करारासाठी केंद्र सरकारचा राज्यावर दबाव आहे काय, असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला आहे.

आराखडा करा, समितीची स्थापना करा

दमणगंगेच्या खोऱ्यात महाराष्ट्राच्या हक्काचे किती पाणी उपलब्ध आहे याचा जलशास्त्रीय अभ्यास मेरीच्या महासंचालकांकडे उपलब्ध आहे. त्यानुसार दमणगंगेच्या खोऱ्यात एकूण ६६.५० टीएमसी इतके पाणी आहे. त्यापैकी ३० टीएमसी पाणी जरी मुंबईकडे वळविले तरी उर्वरित ३६.५० टीएमसी पाणी दमणगंगा-गोदावरी लिंक मार्फत गोदावरी खोऱ्यात मराठवाड्याचा दुष्काळ हटविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे राज्य सरकारने दमणगंगा व नार-पार खोऱ्याचा विस्तृत आराखडा तयार करावा, जलकरार करण्यापूर्वी शास्त्रीय अभ्यासासाठी समिती स्थापन करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक अध्यक्षांचे शुक्लकाष्ठ संपेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेच्या विविध शाखांवरील दरोड्याच्या सत्राने हैराण झालेले या बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यामागील शुक्लकाष्ठ संपत नसल्याचे दिसून येते. दराडे यांच्या कॉलेजरोडवरील बंगल्यातही चोरट्यांनी हातसफाई केली आहे. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची दराडे यांनी ना कुठे वाच्यता केली, ना तक्रार नोंदवलेली! भुताटकीची बाधा झाल्याने बँक अडचणीत आल्याचे विधान केल्यापासून दराडे यांच्याबाबत शहरात विशेष चर्चा झडत आहेत.

दराडे यांचा कॉलेजरोड परिसरातील पोलिस चौकी येथे बंगला आहे. चार दिवसांपूर्वी चोरट्यांनी हा बंगला फोडून आत उचकापाचक केली. बंगल्यातील काही रक्कम किंवा कागदपत्रे चोरीला गेली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, चोरीच्या घटनेनंतर तक्रार देण्यास दराडेंनी स्पष्ट नकार दिल्याने पोलिसांची गोची झाली. याबाबत माहिती देताना दराडे यांनी सांगितले की, माझा मुलगा चार दिवसांपूर्वी तिथे पोहचल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. चोरीला काहीही गेले नसल्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली नाही. बँकेच्या चोऱ्यांसाठी भुताटकीला कारणीभूत ठरवणारे दराडे आता नवीन काय गौप्यस्फोट करतात, याची चर्चा होत आहे.

चोरीच्या उद्देशाबाबत संशय

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगल्यातून २० हजार रूपयांची रोकड लंपास झाली आहे. चोरट्यांना चोरी करण्यासारखे खूप साहित्य होते. मात्र, ते सर्व सोडून निघून गेले. त्यामुळे ही चोरी पैशांसाठी नव्हे तर इतर कारणांमुळे झाली असावी. गेलेल्या वस्तु किंवा कागदपत्रांची सखोल चौकशी करून तक्रार दाखल करावी, अशी मुभा पोलिसांनी दराडे यांना दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images