Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

`तीन दिवसांआड पाणी द्या!`

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पालिकेच्या गंगासागर साठवण तलावात सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा बघता पालिकेने शहरवासीयांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर तक्ते यांनी केली आहे. यासंदर्भात तक्ते यांनी नगराध्यक्ष व पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मागणी मान्य न झाल्यास येत्या ७ ऑक्टोबरपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

पालखेड डाव्या कालव्याचे पाणी आवर्तन प्राप्त होताना येवला शहराला पाणीपुरवठा करणारा नगरपालिकेचा शहरातील गंगासागर साठवण तलाव १५ दिवसांपूर्वी भरण्यात आला. यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी झालेल्या पावसाने देखील तलाव ओसंडून वाहिला होता. याबरोबरच येवला शहराला पाण्याचा स्रोत असलेल्या पालखेड धरणातही सध्या ९८ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याने एकंदरीत चित्र बघता शहराच्या सध्याच्या ५ दिवसाआड एकवेळेस केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात पालिकेने बदल करणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेने तसे न केल्याने शहरवासियांवर अन्याय झाला आहे, असे रत्नाकर तक्ते यांनी नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे व पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पालिकेच्या गंगासागर साठवण तलावाला असलेल्या गळतीमुळेही पाणी वाया जात असल्याने वाया जाणाऱ्या पाण्याचा शहरवासियांना प्रत्यक्षात उपयोग होत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...तरच मुलाच्या आत्म्याला शांती मिळेल!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

मुलाला कोणी मारले तरी आपण भांडतो. माझा तर पोटाचा गोळा मुंबईत झालेल्या लोकल बॉम्बस्फोटात या जगातून कायमचा निघून गेला. नऊ वर्षांपूर्वी मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना फाशी का नाही? नियतीच्या एका तडाख्याने आमचे स्वप्न चिरडणाऱ्या या सर्व आरोपींना फाशी दिली तरच माझ्या प्रशांतच्या आत्म्याला शांती मिळेल, असे उदगार प्रशांतची आई आशालता बेंडाळे यांनी काढले आहेत.

बुधवारी मोक्का कोर्टाने रेल्वे बॉम्बस्फोट खटल्यातील १२ पैकी ५ दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली. तर अन्य सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नऊ वर्षांपूर्वी मुंबईत घडलेल्या या भीषण बॉम्बस्फोटाने अवघा देश हादरला होता. या दुर्दैवी घटनेत १८९ नागरिकांचा बळी गेला होता. यात लासलगावचा प्रशांत बेंडाळे याचाही समावेश आहे. बुधवारी मोक्का कोर्टाचा निकाल येताच लासलगावच्या बेंडाळे कुटुंबीयांपुढे त्या काळ्या दिवसाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

माझ्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नाला अवघे २६ दिवस झाले होते. आम्ही कुंटुंबीय मुलाचा संसार मांडण्यासाठी लासलगावहून मुंबईला गेलो होतो. ती ११ जुलै २००६ ची संध्याकाळ होती. मुंबईत नोकरीस असलेला इंजिनीअर प्रशांत बेंडाळे नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरी परतण्याची आम्ही कुटुंबीय वाट पाहत होतो. अवघ्या २६ दिवसांपूर्वीच प्रशांतचे लग्न झाले होते. मुंबईत त्यांचा संसार मांडून देण्यासाठी गेलो होतो. मात्र, त्यांचा मृतदेह घेऊन लासलगावी परतावे लागले. हे सांगतांना आई आशालता यांचा कंठ दाटून आला तर कुटुंबावर आभाळ कोसळलं म्हणत त्यांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. गेली नऊ वर्षे आम्ही ज्या यातना भोगतोय त्या दहशतवाद्यांना थोडी समजणार आहेत. एकतर हा निकाल देण्यासाठी उशीर झाला आहे. त्यात काहींना फाशी, काहींना जन्मठेप तर काही आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही फाशीची कारवाई होण्याची अपेक्षा आहे. या खटल्यातील केवळ ५ आरोपींना फाशी दिली. उर्वरित ७ आरोपींना जन्मठेप दिली, याबाबत आम्ही समाधानी नाही, असेही आशालता बेंडाळे यांनी म्हटले आहे.

प्रशांत परतलाच नाही!

११ जुलै २००६ च्या दिवशी प्रशांत घरी परतण्यासाठी सायंकाळी माटुंगा स्थानकातून लोकलच्या पहिल्या वर्गाच्या डब्यात शिरला. आणि पुढच्या काही क्षणात तो बसलेल्या लोकलच्या डब्यात भीषण बॉम्बस्फोट झाला. मुंबईत उपनगरीय लोकलमधील साखळी बॉम्बस्फोटात माटुंगा रेल्वेस्थानकात लोकलमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात लासलगावच्या प्रशांत बेंडाळेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ब्लड स्टोरेज सेंटर नवसंजीवनी ठरणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळालीतील एकमेव असलेल्या रोंचाबाई सुगनोमल मनवानी या रक्तपेढीतील ब्लड स्टोरेज सेंटरचा लाभ परिसरातील सुमारे ३२ गावातील नागरिकांना होणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला हे सेंटर नवसंजीवनी प्रदान करणार असल्याचे प्रतिपादन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर प्रदीप कौल यांनी केले.

कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये जागतिक रक्तदाता दिवसाचे औचित्य साधत आयोजित ब्लड स्टोरेज सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला रोंचाबाई सुगनोमल मनवानी रक्तपेढीत या सेंटरचे लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी रक्तपेढीसाठी सहकार्य करणारे साचुजी मनवानी, मधू मनवानी, उपाध्यक्ष सचिन ठाकरे, कर्नल चंद्रशेखरन, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विलास पवार, जनकल्याण रक्तपेढीचे सचिव दिलीप कुलकर्णी, ज्येष्ठ नगरसेवक बाबुराव मोजाड, आशा गोडसे, प्रभावती धिवरे, कावेरी कासार, भगवान कटारिया, मीना करंजकर, सतीश मेवानी, डॉ. उन्मेश पत्की, डॉ. जयश्री नटेश आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. मनीषा होनराव यांनी रक्तपेढीचा इतिहास सांगितला. यावेळी १९८८ पासून आजपर्यंत विविध व्यक्ती व संस्था यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून सर्वांच्या प्रयत्नाने आज हे सेंटर उभे राहत असल्याचे 'सीईओ' पवार यांनी सांगितले. तर उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी रक्तघटक निर्मितीसाठी एफडीए व एसबीटीसी ने सूचित केलेल्या विविध नियमांप्रमाणे या रक्तपेढीत बदल करीत जनकल्याण रक्तपेढीच्या सहकाऱ्याने ब्लड स्टोरेज सेंटरचा लाभ गरीब जनतेला मिळावा यासाठी विशेष सवलतीत येथे रक्त, रक्तघटक, प्लाझ्मा आदी उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमात जनकल्याण रक्तपेढीचे दिलीप कुलकर्णी यांनी सांगितले, की येथील रक्तपेढीस कोणत्याही क्षणी रक्त अथवा रक्ताशी निगडीत कोणत्याही घटकाची कमतरता भासू दिली जाणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधारकार्डसाठी वणवण थांबेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

आधारकार्ड काढण्यासाठी सर्वसामान्यांना रोजच करावी लागणार वणवण संपणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे. महसूल विभागाने ई-सेवा सेतू केंद्र नेमलेल्या ठिकाणी आठवड्यातून एकदाच आधार नोंदणी केली जात असल्याने ठराविकच नोंदणी होतात. यासाठी महापालीकेने सातपूर विभागाच्या टाऊन हॉलमध्ये सातपूरकरांसाठी पुन्हा नव्याने आधार नोंदणी केंद्र सुरू केले आहे. परंतु, या ठिकाणी विभागातील पालकांची मुलांचे आधार नोंदणीसाठी मोठी गर्दी होत असल्याने अनेकांना त‌ाटकळत बसावे लागते. महापालिकेने किमान तीन ते चार ठिकाणी विद्यार्थ्यांना आधार नोंदणीचे केंद्र सुरू करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

नाशिक शहराचा समावेश केंद्र सरकारच्या मेट्रो सिटीमध्ये करण्यात आला आहे. परंतु, महापालिकेकडून शहरवासियांना नागरी सुविधा हव्या त्या प्रमाणात मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच सिहंस्थ कुंभमेळ्याचे नाव सागंत महापालिकेचे अधिकारी कामात असल्याचे सांगत असतात. अशातच सातपूर विभागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत आधार नोंदणी करण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु, ठराविक शाळांमध्येच आधार नोंदणी होत असल्याने इतर विद्यार्थ्यांनी आधार नोंदणी करावी कुठे? असा सवाल पालकांना उपस्थित होतो. तसेच महसूल विभागाने ई-सेवा सेतूचालकांना आधार नोंदणीचे कामे दिली आहेत. मात्र, यात आठवड्यातील केवळ एकच दिवस ई-सेवा केंद्रचालक आधार नोंदणीचे काम करत असल्याने अनेकदा पालकांना पुढील आठवड्यात येण्याचा सल्ला दिला जातो. आधार नोंदणीचे केंद्र सुरू करावे याबाबत सातपूरच्या सभापती उषा शेळके यांनी मागणी केली होती. सभापती शेळके यांच्या मागणीला महसूल विभागाने प्रतिसाद देत एक आधार नोंदणी केंद्र सातपूर महापालिकेच्या टाऊन हॉलमध्ये सुरू केले आहे. परंतु, विभागातील मोठ्या प्रमाणावर पालकांची गर्दी याआधार नोंदणी केंद्रावर होत असल्याने अनेकांना ताटकळत थांबावे लागते.

जादा आधार केंद्रांची गरज

शाळा कॉलेजांमधील स्कॉलरशीपसाठी बँक खाते अनिवार्य आहे आणि बँकखात्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. मात्र, आधार नोंदणीचे प्रमाण अधिक नसल्याने अनेक विद्यार्थी व पालकांना नोंदणी न करताच माघारी परतावे लागते. यासाठी महापालिकेने सातपूर विभागात किमान तीन ते चार ठिकाणी आधार नोंदणीचे केंद्र सुरू करावेत, अशी मागणी पालकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राम ठेक्यावरून रणकंदन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साधुग्रामच्या स्वच्छतेच्या ठेक्यावरून गेले महिनाभर आयुक्त आणि स्थायी समितीमधील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. साधुग्रामच्या स्वच्छतेचे काम अन्य ठेकेदारांकडून करून घेण्यासाठी स्थायी समितीची मंजूरी नसतांना, आयुक्तांनी ठराव क्रमांक २९९ चा आधार घेत, स्थायीची मंजूरी असल्याचा दावा केला आहे. तर स्थायी समितीने असा ठरावच केला नसल्याचा दावा केल्याने आयुक्त व स्थायी समिती पुन्हा आमने सामने उभे ठाकले आहेत.

स्थायीला सादर केलेल्या पत्रात आयुक्त दिशाभूल करत असून हा संपूर्ण प्रकारच चुकीचा असल्याचा दावा सभापती शिवाजी चुंभळे यांनी केला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राममधील ५ कोटी ५९ लाख रुपयांच्या स्वच्छतेच्या ठेक्यावरून दोन महिन्यापासून समिती आणि आयुक्त असा संघर्ष सुरू आहे. वॉटरग्रेस कंपनी आणि क्रिस्टल कंपनीतील हा वाद थेट उच्च न्यायालयात पोहचला असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. साधुग्रामची स्वच्छता आवश्यक असल्याने आयुक्तांनी आपल्या अधिकारात संबंधित काम हे दिग्विजय एंटरप्रायजेस आणि सय्यद असीफ अली या कंपनीकडून करून घेतले. सिंहस्थ संपल्यानंतर आयुक्तांनी स्थायी समिती सिंहस्थ कामांचा गोषवारा सादर केला असून त्यात साधुग्रामच्या स्वच्छतेचे काम स्थायी समितीच्या ठराव क्रंमाक २९९ नुसार केल्याचा दावा करण्यात आला आहे. गुरूवारच्या स्थायी समिती सदरची कामे ही महाराष्ट्र महापालिका अधिनियममधील कलम ६७ (३) क नुसार सादर केल्याचा दाखला दिला आहे. केवळ आणिबाणीच्या स्थितीत असलेल्या अधिकारांचा वापर आयुक्तानी या ठेक्यात करत स्थायी समितीला पुन्हा डिवचले आहे.

आयुक्तांच्या दाव्यामुळे आपल्या अधिकारावर अतिक्रमण झाल्याचे सांगून सभापतींसह समिती सदस्य आक्रमक झाले आहे. संबंधित ठराव क्रमांक हा क्रिस्टल कंपनीला काम देण्याचा असतांना, आयुक्तांनी समितीला चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप सभापतींनी केला आहे. ठेकेदारांची बिले काढण्याची वेळ आली असतांना, समिती व आयुक्तांमध्ये पुन्हा ठिणगी पडली आहे. आयुक्तांच्या या कृतीचा आपण जाब विचारणार असल्याचे सभापती चुंभळे यांनी म्हटले आहे.

आयुक्तांचा हा सर्व प्रकार चुकीचा असून दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा कायदेशीर अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचे सभापतींनी म्हटले आहे. गुरूवारची सभा स्थगित झाल्याने या विषयावर चर्चा होवू शकली नाही. मात्र, पुढील सभेत या पत्रावरून समिती विरूद्ध समिती असे चित्र रंगणार आहे.

बिल काढू नका-क्रिस्टल

स्थायी समिती व आयुक्तांमध्ये संघर्ष सुरू होताच संबंधित कामाचा ठेका न मिळालेल्या क्रिस्टल कंपनीने आयुक्तांना पत्र लिहून संबंधित कामाचे बील न काढण्याची मागणी केली आहे. सद्यस्थितीत हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत संबंधित कामाचे बिल अदा करण्यात येवू नये, अशी मागणी कंपनीने आयुक्तांकडे केली आहे. संबंधित कंपनीने बिल काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा केला असून बिल काढल्यास ते न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. त्यामुळे साधुग्रामच्या ठेक्याचे बिल काढू नका अशी मागणी केली आहे. त्यामुळे वादाला आणखीन फोडणी मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर फणफणले तापाने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वातावरणातील बदल आणि ऑक्टोबर हिटने शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, महापालिकेसह खाजगी रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांची संख्या झपाटयाने वाढली आहे. विशेष म्हणजे डेंग्यूनेही पुन्हा डोके वर काढल्याने सप्टेंबर महिन्यात शहरात डेंग्यूचे तब्बल ४४ रुग्ण आढळून आले आहेत. साथीचे आजार, स्वाइन फ्ल्यू आणि डेंग्यूचे प्रमाण वाढल्याने आरोग्य विभागाला धडकी भरली आहे. सध्याचा काळ हा डेंग्यूंची उत्पत्ती वाढविण्यासह व्हायरल आजारांसाठी सर्वात अनुकूल असल्याने शहरात डेंग्यूचे व तापाचे प्रमाण वाढल्याचा खुलासा वैद्यकीय विभागाने केला आहे.

गेल्या वर्षी शहरात साथीच्या आजारासह डेंग्यूने पावसाळ्यात थैमान घातले होते. यावर्षी सिंहस्थ कुंभमेळा असल्याने आरोग्याबाबत आणि विविध आजाराबाबतीत अगोदरच काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे सिंहस्थात आजार कंट्रोलमध्ये दिसले. मात्र सिंहस्थ संपताच शहरात साथीच्या आजारांसह डेंग्यू आणि स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. सप्टेंबर महिन्यातील वैद्यकीय विभागाच्या अहवालातही धोक्याची घंटा देण्यात आली असून, स्वाइन फ्ल्यू, डेंग्यूसह सर्दी, ताप व खोकल्याच्या आजाराने शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. स्वाइन फ्ल्यू सदृश्य आणि तापाच्या रुग्णांमुळे शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालये सुद्धा पेशंटने फुल झाली आहेत. सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांची डॉक्टरांकडे गर्दी दिसत आहे.

डेंग्यूचा डंख

सप्टेबंर महिन्यात डेंग्यूचे शहरात ११० सॅम्पल घेण्यात आले होते. त्यापैकी १०३ सॅम्पल परत आले असून, त्यात ५३ जणांचे अहवाल पॉझ‌िटीव्ह आले आहेत. त्यापैकी ४४ रुग्ण हे शहराच्या हद्दीतील तर ९ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. सध्यस्थिती डेंग्यूची विस्तार झपाट्याने होत असून, सध्याचे पोषक हवामान डेंग्यूची संख्या वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याने सावध राहण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईची ’भाजीपाला कोंडी’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशभरात कोणत्याही अडथळ्याशिवाय वाहतूक व्हावी, यामागणी साठी ऑल इंडिया मोटार काँग्रेसने गुरूवारपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आज, शुक्रवारपासून जिल्ह्यातील भाजीपाल्याची निर्यात थांबवण्याचा निर्णय मालवाहतूकदार संघटनेने घेतलाआहे. तसे झाल्यास त्याचा फटका मुंबईकरांना बसू शकतो.

संघटनेच्या प्रतिनिधींनी सकाळी सहा वाजता आडगाव, ​शिंदे, विल्होळी आदी ठिकाणी आंदोलन सुरू केले. आंदोलनात सहभागी नसलेल्या वाहनचालकांना गांधीगिरी पध्दतीने थांबविण्यात आले. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून लागलीच सोडले. दुपारच्या सुमारास आडगाव येथील संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी आंदोलनातून दूध-भाजीपाला, शालेय मुलांची वाहतूक करणारी वाहने यांना वगळण्यात आले होते. गुरूवारपासून किमान भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आंदोलनात सहभागी करून घेण्याचा निर्णय यावेळी झाला. संघटनेच्या आदेशानुसार भाजीपाल्याची निर्यात रोखण्यात आल्यास मुंबईकरांची पंचाईत होऊ शकते. नाशिकमधून मुंबईला मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची निर्यात होते.

नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अंजु सिंघल यांनी सांगितले की, नाशिकमध्ये १० हजारापेक्षा जास्त वाहने आहेत. शहराबाहेरून आलेल्या वाहनांची संख्या सुमारे ५ हजार आहे. ही सर्व वाहने उभी असून आता कांदा, फळे तसेच भाजीपाल्याची निर्यात थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. संपूर्ण भारतात माल वाहतुकीद्वारे टोल नाक्यावर अंदाजे १४ कोटी रुपयांची वसुली होते. या वसुली होण्याच्या किमतीच्या दुप्पट रक्कम मालवाहतूदार संघटना सरकारला देण्यास तयार आहे. मात्र, व्यवसायातील अडथळा दूर करावा, अशी आमची मागणी असल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले.

उद्योगांनाही बसणार फटका

नाशिक शहरातील भाजी विक्रेते, पेट्रोल वाहतूकदार तसेच औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनातर सहभागी झाले आहेत. हा संप जास्त दिवस चालल्यास रोजच्या जीवनमानावर परिणाम होणार आहे. औद्योगिक उत्पादनावर देखील परिणाम होणार आहे. मालवाहतूकदारांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला असून, याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंकराचार्य मुख्यमंत्र्यांवर कडाडले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुशावर्त आणि गोदावरीचे पावित्र्य हे इतर कुठल्याही तीर्थापेक्षा श्रेष्ठच आहे. त्यासाठी साधू-महंत येथे येतात. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानसरोवराचे पाणी कुशावर्तात अर्पण करून गोदेच्या पावित्र्याचा अपमान केला असून, मुख्यमंत्र्यांना हिंदू धर्माचा विसर पडला असल्याची टीका द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केली.

सिंहस्थ कुंभमेळ्यातील त्र्यंबकेश्वर येथील तिसऱ्या शाही पर्वणीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कैलास मानसरोवरातील पाणी कुशावर्तात प्रवाहीत करण्यात आले. शाहीपर्वणी दरम्यान कुशावर्त कुंडातच लाखो साधू-महंत आणि भाविक स्नान करतात. विशेष म्हणजे हे पाणी आणण्यासाठी चीन सरकारने पुढाकार घेतला होता. इंडो-चायना मैत्री योजनेचा तो एक भाग होता. याबाबत शंकाराचार्यांनी नाराजी व्यक्त करीत धार्मिकदृष्ट्या ही बाब अयोग्य असल्याचे म्हटले आहे. 'अशा कृत्याचा जाब भाविकच मुख्यमंत्र्यांना विचारतील,' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पाण्याचा संगम केल्याने कुशावर्ताचे धार्मिक महत्त्व वाढण्याऐवजी कमी झाल्याचे म्हटले आहे.

साईबांबाना विरोधच

साईबाबांना विरोध केला म्हणून एका व्यक्तीने कोर्टात धाव घेतली. त्यासंदर्भांत चुकीचे वार्तांकन झाले. शिर्डीमध्ये भाविक मोठ्या श्रध्देने जातात. मात्र, खिसे कापूपासून सावधान, अशा फलकांनी त्यांचे स्वागत होत असल्याची उपरोधीक टीका त्यांनी केली. देव, गुरू किंवा व्यक्ती अशा कोणत्याही व्याख्येत साईबाबा येत नसल्याने मूर्ती पुजेला आपला कायम विरोध असल्याचे शंकराचार्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर राज्य सरकारने अंधश्रध्दा निर्मुलन कायदा संमत केला. त्यांच्या हत्येचा तपास सुरू असून, यात थेट सनातन संस्थेलाच दोषी ठरवण्याचे काहीच कारण नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडको, सातपूरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिकचा चारही बाजूंनी विकास होत असतांना शहरात अपप्रवृत्तींचीही वाढ होत आहे. शहरातील सर्वाधिक कामगार वस्ती असलेल्या सिडको व सातपूर भागात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. यामध्ये ठिकठिकाणी सर्वाधिक जुगारांचा अड्डे मोठ्या प्रमाणावर असून मटक्यांचे प्रमाण वाढले आहे.

नाशिक शहराचा विस्तार गेल्या काही वर्षांत मोठ्या झपाट्याने होत आहे. यामध्ये सिडको व सातपूरच्या कामगारवस्ती देखील वाढत आहेत. परंतु, विकसित होत असलेल्या सिडको व सातपूरच्या कामगारनगरीत अवैध धंद्यांचे प्रमाण वाढत आहे.

थेट कारवाईची मागणी

अवैध धंद्यांबाबत सिडको व सातपूर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी माहिती असून देखील कारवाई करणार कोण? असा सवाल उपस्थित जागरुक नागरिकांनी केला आहे. पोलिस आणि राजकीय व्यक्ती यांच्यात अवैध धंद्यावरून अर्थकारण ठरले असल्याने कारवाईचा नेहमीच केवळ फार्स दाखविला जातो. पोलिस व राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी सिडको व सातपूरमधील नागरीकांनी केली आहे.

येथे आहेत अवैध धंदे

सिडकोतील विजयनगर, राणेनगर, पवननगर व सर्वाधिक एमआयडीसीतील शांतीनगर झोपडपट्टीत अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. सातपूरमध्ये गंगापूररोड, धुव्रनगर, धर्माजी कॉलनी, भवरमळा, श्रमिकनगर, सातपूर मळे परिसर, चुंचाळे गाव आदी ठिकाणी जुगार अड्डे व मटक्यांचे अवैध धंदे सुरू आहेत. या अवैध धंद्यांवर काही अल्पवयीन मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांचा पहाटेपासून ठिय्या असतो. त्यातच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती दिवसभर ठाण मांडून असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळणी गेली भंगारात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

पंचवटीतील मुंबई आग्रा महामार्गावरील अमृतधाम जवळील विडीकामगारकडे जाणाऱ्या मुख्य १०० फुटी मॉडेल रोडवरील गंगोत्री विहार सोसायटीमधील गार्डनची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिसरातील सर्वात मोठी आणि मुख्य रोडवरील जुनी ही कॉलनी आहे. महापालिका प्रशासनाने या उद्यानाकडे लक्ष देत तत्काळ स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सप्तशृंगी देवीचे मंदिर असल्यामुळे गंगोत्री विहार सोसायटीतील गार्डनमध्ये नेहमीच भाविकांची गर्दी असते. मात्र, गार्डनमधील अस्वच्छता आणि तुटलेली खेळणी पाहून नागरिकांसह चिमुकल्यांचा हिरमोड होतो. तत्कालीन नगरसेवक आणि कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण करण्यात आलेल्या गार्डनची परिसरातील ख्याती होती. मात्र, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. अस्वच्छता आणि दुरवस्थेमुळे या गार्डनची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. गार्डनमधील मंदिराभोवती गवताचे साम्राज्य पसरले आहे. अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक व बालगोपाल दर्शनासाठी या मंदिरात सकाळ सायंकाळ येतात. मात्र, गवतामधून साप किंवा किटक, विंचू बाहेर येणार तर नाही ना? अशी धास्ती त्यांना सतावते.

गार्डनमध्ये जुने वडाचे झाड आहे. परिसरातील हजारो महिला दरवर्षी वटपौर्णिमेला पूजा करण्यासाठी या गार्डनमध्ये येतात. मात्र, या वडाची अवस्थाही खूप वाईट झाली आहे. झाडाच्या अनेक फांद्या आपोआप गळून पडत आहेत. त्यामुळे या झाडाजवळ जायलाही अनेकजण घाबरतात. आजूबाजूला बालगोपाल यांच्यासाठी बसविण्यात आलेल्या खेळण्यांचे नुकसान झाले आहे. अनेकदा मुले खेळताना फांदी पडण्याची भीती वाटते. त्यामुळे पालकांना लक्ष ठेवावे लागते.

स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी

अस्ताव्यस्त वाढलेल्या वडाच्या झाडाच्या फांद्या कमी कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गार्डनमध्ये गवतही वाढले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गार्डनची नीट स्वच्छता करावी, सर्व पथदीप सुरू करावेत, मंदिराभोवती सभामंडप उभारण्यात यावा, अशीही देखील मागणी नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाला गार्डनच्या स्वच्छतेसंदर्भात अनेकदा अर्ज दिले आहेत. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयंघोषित पदाधिकाऱ्याची ‘रिपाइं’मधून हकालपट्टी

$
0
0



नाशिकरोड : पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांचे नियुक्ती पत्र नसलेल्या स्वंयघोषित पदाधिकाऱ्याची पक्षातून लवकरच हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली.
नाशिकरोडच्या टाऊन हॉलमध्ये रिपब्लिकन पक्षाचा (आठवले गट) कार्यकर्ता मेळावा आणि पदग्रहण सोहळा नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते. नगरसेवक सुनील वाघ अध्यक्षस्थानी होते. पवन क्षीरसागर, सुनील कांबळे, रामबाबा पठारे, प्रिती भालेराव, नाशिकरोडचे अध्यक्ष समीर शेख, दिनेश जाधव, भारत निकम, आदी व्यासपीठावर होते. लोंढे म्हणाले, की कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीचे काम करावे. नवीन पदाधिकाऱ्यांनी पदाला शोभेल, अशा जोमाने काम करावे. पदाचा उपयोग पावती पुस्तकासाठी न करता कामासाठी करा. निधी गोळा करा पण त्यांचे कामही दाखवा, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींच्या प्रश्नांसाठी राज्यपालांचे सचिव मैदानात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

आदिवासींसाठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचत नसल्याची राज्यपालांनी गंभीर दखल घेत आदिवासींच्या योजनांचा आढावा घेण्याची जबाबदारी सचिव परिमलसिंह यांच्यावर सोपवली आहे. प्रत्येक जिल्ह्यात जावून आदिवासी योजनांचा आढावा घेणार असून परिमलसिंह लवकरच नाशिकच्याही दौऱ्यावर येणार आहे. जिल्ह्यातील प्रलंबित वनजमिनीचा प्रश्न, कुपोषण आणि आश्रमशाळांसंदर्भातील माहिती सादर करण्याचे आदेश सिंह यांनी आदिवासी विभागाला दिले आहेत.

आदिवासींच्या विविध योजनांची योग्य अमंलबजावणी होत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. योजनांमधील भ्रष्टाचारामुळे त्या अधिक बदनाम झाल्या आहेत. या योजनांची तपासणी करण्यासाठी जबाबदारी स्वत: राज्यपाल सी. विद्यासागरराव यांनी सोपवली आहे. त्यामुळे सचिव परिमलसिंह आता प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्याची माहिती घेत आहेत. ते नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून त्यापूर्वीच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह आदिवासी विभागाकडून विविध योजनांची माहिती मागविली आहे. त्यामुळे यंत्रणांचेही धाबे दणाणले आहेत.

आदिवासींच्या विविध योजनांची जिल्ह्यातील स्थिती काय आहे? या योजनांचे लाभार्थी किती? आश्रमशाळांची स्थिती, आदिवासी विभागातील भरती, वसतीगृहांची स्थिती, प्रवेशाची स्थिती, शालेय साहित्याचे वाटप, कुपोषणाची स्थिती, उपाययोजना अशा प्रश्नांची जंत्रीच सादर करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. आदिवासी हेच मूळ निवासी आहेत. त्यामुळे त्यांना कसण्यासाठी वनजमिनी देण्याच्या निर्णयाची किती अमंलबजावणी झाली याचाही आढावा घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात वनजमिनींचे १२ हजार प्रकरणे ही प्रांताधिकारी स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांचा विकास होत नसून वैयक्तिक दाव्यासह सामूहिक दावेही त्वरित निकाली काढा, असे स्पष्ट आदेश सिंह यांनी प्रशासनाला दिले.

माहितीसाठी धावपळ

थेट राज्यपालाचे सचिवच मैदानात उतरल्याने माहितीची जमावाजमव करण्यासाठी यंत्रणेची धडपड सुरू झाली आहे. सोबतच योजनांची योग्य अंमलबजावणी न करता आदिवासींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाही सिंह यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडी जोशात; युती कोमात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील महत्त्वाच्या सात नगरपंचायती व दीडशे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या निवडणुकांसाठी फौज मैदानात उतरवली आहे. आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीने या निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेत, निरिक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करत या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेना भाजपच्या गोटात अद्यापही शांतता आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्यातल दिंडोरी, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा, पेठ या मोठ्या नगरपंचायतीच्या १ नोव्हेंबर रोजी निवडणुका आहेत. सोबतच दीडशेच्यावर ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही १ नोव्हेंबरलाच होत आहेत. या सातही नगरपंचायती या मोठ्या असल्याने ग्रामीण राजकारणावर त्यांचा चांगलाच प्रभाव असून त्या आघाडीच्याच ताब्यात आहेत. तर या नगरपंचायती ताब्यात घेण्याची संधी युतीला प्राप्त होणार आहे. त्यामुळे ग्रामीण राजकारण चांगलेच तापणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहे. दोन्ही पक्षांनी या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने या नगरपंचायतीची जबाबदारी हेवीवेट नेत्यांकडे

सोपविली आहे. स्थानिक आमदार, माजी आमदारांवर निवडणुकीची जबाबदारी टाकत पक्षाने राज्यपातळीवरून निरीक्षकही नियुक्त केले आहेत. सोबतच उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू करत आघाडी घेतली आहे.

आघाडीने या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या असतांनाच सत्ताधारी भाजप शिवसेना या पक्षात मात्र शांतता आहे. आघाडीने उमेदवार निवडीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही भाजपा व शिवसेनेत निवडणुकीची कोणतीही तयारी दिसून येत नाही. सत्ताधारी पक्षातील या शांततेमुळे कार्यकर्त्यांमध्येच अस्वस्थता आहे. शिवसेना व भाजपा एकत्रित लढणार की स्वतंत्र लढणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. ग्रामीण भागातील आघाडीची सत्ता पलटवण्याची शिवसेना व भाजपला ही नामी संधी आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र पक्षाकडून कोणतीही तयारी दिसत नसल्याने कार्यकर्तेच सैरभैर होतांना दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनराई बंधाऱ्यांमुळे पाणीप्रश्न सुटणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर ग्रामपंचायतीने दोन वर्षात बांधलेले वनराई बंधारे व शासनाच्या विविध योजनांची विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले तसेच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी पाहणी केली. ही कामे बघून प्रभावित झालेल्या विभागीय आयुक्तांनी सर्वच ग्रामपंचायतींनी वनराई बंधारे बांधण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

वाळविहिर ग्रामपंचायतीने मागील वर्षी सतरा वनराई बंधारे बांधले. यावर्षी लोकसहभागातून वाकी खापरी नदीवर वीस वनराई बंधारे बांधणार आहे, असा निर्धार सरपंच सुनीता लचके व ग्रामसेवक प्रमोद ठाकरे यांनी व्यक्त केला. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सिमेंट बंधारा दुरुस्त केला. हे काम पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

ग्रामपंचायतीस वनविभागाने दिलेल्या योजनेंतर्गत सौरपंप बसविला आहे. या सौरपंपाची पाहणी केली व राबविलेल्या उपक्रमाबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व अधिकारी यांचे कौतुक केले. ग्रामपंचायतीस वनविभागाच्या माध्यमातून मिळालेल्या पीठाची गिरणी, मसाला गिरणी सुरू केली आहे. तसेच शेडमध्ये वनपौज अंतर्गत मधसंकलन सुरू केले असल्याने त्यातून ग्रामीण भागात रोजगार सुरू होणार आहे. यावेळी गटविकास अधिकारी किरण कोवे, सहायक बीडिओ जगन सूर्यवंशी, विस्तार अधिकारी सुनील पाटील, प्रकाश लचके, ग्रामसेवक प्रमोद ठाकरे ग्रामस्थ नवसू लचके, रामा सराई, निवृत्ती सोडनर, ग्रामसेवक दीपक पगार आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायतीने योग्य ठिकाणीनी बंधारे बांधले. या बंधाऱ्यांमुळे उन्हाळ्यात जनावारांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. तसेच, नवीन गावठाण व बागायतीलाही पाणी मिळेल. बंधाऱ्याजवळील असलेले पाणीपुरवठा योजनेचे बोअरवेल ओवरफ्लो झाले ही समाधानाची बाब आहे.

- एकनाथ डवले, विभागीय आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्नावरून गोंधळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील चौगाव ग्रामपंचातीच्या हद्दीत असलेल्या चौगाव बाऱ्हे आदिवासी वस्ती परिसरात सुमारे दीडशे ते दोनशे विहिरींचे खोदकाम झाल्याने या परिसरात आदिवासी बाधवांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. यामुळे शिवारातील विहिरींचे पाणी बंद करण्यात यावे, अशी मागणी शेकडो आदिवासी बांधवांनी ग्रामसभेत केल्याने त्या ठरावबाबत चर्चा सुरू असताना गोंधळ निर्माण झाला. यामुळे निर्णय होऊ शकला नाही.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. चौगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या चौगाव बाऱ्हे वस्ती परिसरातील जमिनीवर सुमारे शंभर ते दीडशे विहिरी खोदण्यात आल्या आहेत. शिवारात विहिरींचे अतिप्रमाण झाल्यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. या विहिरींमधून दररोज टँकरद्वारे पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असतो. या विहिरी डोंगरामधून येणाऱ्या पाण्याच्या स्त्रोताजवळ असल्याने पाणी हे धरणामध्ये जात नाही. आजूबाजूच्या परिसरातील शेकडो शेतक-यांना याचा फायदा होत असला तरी आदिवासींचे मात्र हाल होत आहेत.

गेल्या तीन वर्षापासून धरण कोरडेठाक आहे. पावसाळ्यात पाणी आल्यावर नाल्याला बांध घालून पाणी अडवून विहिरीमध्ये टाकले जात असल्याने पाणीटंचाई जाणवते. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर हाल होऊन पाणीटंचाई भेडसावते. आदिवासी जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. जनावरे देखील पाण्याअभावी दगावतात. धरण उशाशी आणि आदिवासी जनता उपाशी अशी स्थिती होते. यामुळे या व‌िहिरींना आळा घालण्याची मागणी आदिवासींकडून होत आहे.

आदिवासी वस्तीत पाण्याची सोय नसल्याने पाण्याची टाकी व गुरांसाठी पाण्याचा हौद उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. या निवेदनाचे ग्रामसभेत ग्रामसेवक एस. आर. शेख यांनी वाचन केले. या विषयावर चर्चा होताच ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाला. ग्रामसभेत नारायण गांगुर्डे, लक्ष्मण गांगुर्डे, केवळ गांगुर्डै, प्रभाकर मांडवडे, शिवाजी गांगुर्डे, बापू शेवाळे, राजेंद्र गांगुर्डै, गोविंद जाधव यांच्यासह आदिवासी शिवाजी माळी, प्रकाश माळी, यशंवत माळी, पांडूरंग पवार, नानाजी माळी, प्रल्हाद पवार, रवींद्र पवार, यशवंत माळी, दादाजी पवार, दयाराम पवार, वामन पवार आदींसह महिला उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्ला‌स्टिक कॅरिबॅगवर बंदी आणण्याचा ठराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामविकास मंत्रालयाने सुचविलेले विविध उपक्रम व योजना तातडीने राबविण्याचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. प्लास्टिक कॅरिबॅग वापरावर बंदी आणण्याचा ठरावही करण्यात आला.

ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र गांगुर्डे होते. भास्करराव बनकर, दीपक बनकर, बापूसाहेब पाटील, किरण लभडे, कौस्‍तुभ तळेकर, चंद्रकांत बनकर आदी यावेळी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांनी ग्रामपंचायतीकडून सरकारला अपेक्षित उपक्रमाबाबत माहिती दिली. याशिवाय प्रधानमंत्री मुद्रा योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यासाठी व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे भास्करराव बनकर यांनी स्पष्ट केले. ग्रामस्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी शहरातील प्रत्येक वॉर्डात सूचनाफलक लावून ग्रामस्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम हाती घेण्याचा निर्णय भास्करराव बनकर यांनी व्यक्त केला. शहरातील मनाडी नाल्याचे पाणी महामार्गालगत पाइपलाइन टाकून पाराशरी नदीत सोडण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे भास्करराव बनकर यांनी सांगितले.

आरोग्य विभागाच्या वतीने डी. बी. जाधव यांनी डेंग्यू, कुष्टरोग या आजाराची लक्षणे व उपाययोजना याबाबत माहिती दिली. पंचायत समितीचे किरण देशमुख यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी प्रशांत घोडके, किरण लभडे, बादशाहभाई शेचा, जयंत मुथा, शामराव जाधव आदींनी सहभाग नोंदवला. ग्रामसभेस आप्पा जाधव, राजेंद्र झुटे, अरमान शेख, इलियास अत्तार, रमेश सूर्यवंशी, तौफीक शेख आदी उपस्थित होते.

हागणदारीमुक्तसाठी प्रयत्न

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा संत तुकडोजी महाराज स्वच्छ भारत अभियान संपूर्ण शहरात प्रभावीपणे राबविण्याच निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. तसेच संपूर्ण शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्लास्टिक कॅरिबॅग वापरावर बंदी आणण्याचा ठरावही करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्रांतीनंतर जोरदार हजेरी

$
0
0

टिम मटा

गणेशोत्सवानंतर पावसाने आठवडाभर विश्रांती घेतली होती. मात्र, शुक्रवारी नाशिक जिल्ह्यात विविध भागात विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे बळीराजाच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी कोसळलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना सुसह्य वाटले.

कळवणला झोडपले

कळवण शहरासह संपूर्ण तालुक्यात परतीच्या पावसाने शुक्रवारी संध्याकाळी विजेच्या कडकडासह मुसळधार हजेरी लावली. गणेशोत्सवानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने चिंता निर्माण झाली होती. धरणसाठ्यातील पाण्यावर पूर्ण वर्ष कसे काढणार व त्याचबरोबर शेतीला पाणी कसे मिळेल, अशी चिंता वाटत होती.

शुक्रवारी सकाळपासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झालेले असताना संध्याकाळी पाच वाजेनंतर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने सुरुवात केली. साधारणतः दीड तास पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतरही रिमझिम पाऊस सुरूच होता.

भादव्याच्या भाजून काढणाऱ्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना परतीच्या पावसाने जोरदार वृष्टी केल्याने सामान्यजण सुखावले आहेत. तसेच हा पाऊस अजून काही दिवस बरसला तर आगामी काळातील शेती तसेच पिण्याचे पाण्याचे संकट दूर होईल.

पिकांना जीवदान

त्र्यंबकेश्वर येथे प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह दुपारी दीड वाजेच्या दरम्यान पावसाने त्र्यंबक तालुक्यास झोडपले. भात आणि नागली वरईस पावसाची प्रतीक्षा होती. उन्हाच्या तडाख्याने उभी पिके सुकली होती. त्यांना नवसंजीवनी मिळाली.

निफाडमध्ये मुसळधार

लासलगावजवळील टाकळी विंचूर, खडकमाळेगाव, वनसगाव, थडी सारोळे, कोटमगाव आदी परिसरात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे दीड तास चाललेल्या तुफान पावसामुळे या गावांमधील शेतशिवारांमध्ये पाणी तुंबल्याचे चित्र दिसून आले. वादळामुळे टाकळी विंचूर परिसरात काही घरांचे नुकसान झाले असून, घराचा पत्रा उडून अंगावर पडल्याने सुरेश कारभारी मोरे हे टाकळी येथील रहिवाशी जखमी झाले.लासलगाव व परिसरातील गावांमध्ये सध्या सर्वत्र लाल कांद्याची लागण सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या या पावसामुळे कांदा लागवडीला काहीसा फायदा होणार आहे. गेल्या दोन, तीन वर्षांपासून कधी गारपीट तर कधी दुष्काळ असा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागल्याने कष्टकरी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पाळले आहे. यंदाही पावसाळी मोसमात आभाळ रुसून बसल्याने निम्म्याहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी नगदी पीक असलेल्या लाल कांद्याची सध्या लागवड सुरू आहे.

सटाण्यात वादळी पाऊस

बागलाण तालुक्यातही विविध भागात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांना दिलासा मिळणार आहे. मालेगाव तालुक्यात दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. ‌संध्याकाळी ढगाळ वातावरण होते. काही ‌‌ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परप्रांतीय तरुणाचा निर्घृण खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोवर्धन गंगावाडी शिवारातील जवाहरलाल एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च सेंटरच्या पाठीमागील मोकळ्या जागेत मोतीराम महंत पंडित (वय ४५) या व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. मोतीरामचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. त्याच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा होत्या.

कामटवाडा परिसरातील डीजीपीनगर येथे राहणारे मोतीराम पंडित गुरुवारपासून घरी परतले नव्हते. तसेच त्यांचा मोबाइल फोनही नॉटरिचेबल होता. यामुळे पंडित यांच्या पत्नीने अंबड पोलिस स्टेशनमध्ये पती बेपत्ता असल्याची माहिती दिली. पोलिस या घटनेचा तपास करीत असतानाच आज मोतीराम पंडित यांचा मृतदेह गंमत जंमत हॉटेलसमोर आढळून आला. पंडित यांचा निर्घुण खून झाल्याचे पुरावे आढळून आल्याने नाशिक तालुका पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मूळचे बिहारमधील रहिवाशी असलेले पंडित कुंटुंब कामानिमित्त काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये स्थायिक झाले. छोटे मोठे बांधकामाचे कामे घेऊन पंडित आपली गुजराण करीत होते. गुरुवारी संध्याकाळी पंडित यांचे त्यांच्या पत्नीशी शेवटचे बोलणे झाले. यानंतर मात्र, पंडित यांचा मृतदेहच सापडला. गुरुवारी मध्यरात्री पंडित कोणासोबत होते, खुनाची घटना नेमके कोणत्या कारणासाठी झाली याचा अधिक तपास नाशिक तालुका पोलिस करीत आहेत. या खुनामागे अनैतिक कारण असावे काय याबाबत सध्या काही सांगता येणार नाही, अशी माहिती तपासाधिकारी पोलिस निरीक्षीक उपासे यांनी दिली. सर्वप्रथम मृतदेहाची ओळख पटवण्यात आम्हाला यश मिळाले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा देखील दाखल झाला असून, लवकरच सर्व तथ्य समोर येतील, असा दावा पोलिस निरीक्षक उपासे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या व्हॉटस अॅपवर ‘हाय-हॅलो’चा पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शहर पोलिसांनी गुरूवारी व्हॉट्स अॅप सेवा सुरू केली. ही सेवा कार्यन्वित होताच शुक्रवारी दुपारपर्यंत नाशिककरांचे 'हाय', 'हॅलो' स्वरूपाचे ११० मॅसेजेस येऊन धडकले. ही सेवा लोकाभिमुख करण्यासाठी नागरिकांनी फक्त तक्रारीसाठीच व्हॉटस अॅपनंबरचा वापर करण्याचे आवाहन त्रासलेल्या पोलिसांनी केले आहे.

यापूर्वीही शहर पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारींसाठी खास मोबाइल नंबर जाहीर केले होते. नागरिकांच्या तक्रारी, अवैध व्यवसाय, गुन्हेगारांची माहिती देण्यासाठी असे क्रमांक आवश्यक असायचे. आता ई तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने त्यादृष्टीने पुढे आलेल्या सोशल मीडियाचाही प्रभावीपणे वापर करून घेण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे स्वत:ला अपडेट करून घेत शहर पोलिसांनी व्हॉट्स अॅप सुविधा सुरू केली आहे. नागरिकांना आपल्या तक्रारी, अपघाताच्या घटना किंवा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना ९०७५०११२२२ या व्हॉटस अॅपनंबरवर पोलिसांना कळवू शकतात. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण अत्यल्प वेळेत व्हावे, यासाठी पोलिस दलाने ही सुविधा १ ऑक्टोबरपासून कार्यान्वित केली आहे. शहरातील कोणत्याही पोलिस स्टेशनच्या हद्दीत कोठेही अवैध धंदे, गुन्हेगारीची माहिती, फोटो, ट्रॅफिक जाम याबाबत नागरिकांना तक्रारी करता येणार आहेत. अवैध धंदे, तसेच गुन्हेगारांची माहिती देणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवली जातील. नागरिकांनी निर्भीडपणे या क्रमांकावर आपल्या तक्रारी करण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

अनावश्यक ग्रूप्स अन् संदेश

नियंत्रणकक्षामध्ये सुरू केलेल्या व्हॉट्स अॅप सुविधेचा चांगला उपयोग झाला, तर ही सेवा विधायक ठरेल. मात्र, पहिल्याच दिवशी शुभेच्छा संदेश, मिस कॉल्स, अनावश्यक छायाचित्रे, लघुसंदेश, विनोदाचे संदेश यायला सुरुवात झाली आहे. शुक्रवार दुपारपर्यंत वरील नंबर ११० मॅसेजेस आले. त्यातील फारतर तीन तक्रारी होत्या. सदर नंबरवर लागलीच माहिती देण्यात आली तर अनेक गुन्ह्यांना आळा घालता येऊ शकतो. फक्त तक्रारी साठीच नागरिकांनी या नंबरचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त धिवरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावला गुटखा जप्त

$
0
0

जुने नाशिक : मालेगाव शहरात गुटखा चोरट्या मार्गाने गुटखा आणला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी टाकलेल्या छाप्यात दोन मारुती व्हॅनमधून सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. संशयितांच्या घराच्या झडतीत नऊ लाख रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली. याप्रकरणी अब्दुल अजीज बाबू ऊर्फ हाजी मोहम्मद व अशपाक अब्दुल अजीज या पिता पुत्राला अटक करुन त्यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा व गुटखा प्रतिबंध कायदाअन्वये पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images