Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कांदा आणणार डोळ्यात पाणी

$
0
0

आवक मंदावल्याने भाव कडाडले: चार हजारचा टप्पा ओलांडला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे चौदा हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले. याचा परिणाम आता कांदा दरवाढीवर झाला आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा कमाल चार हजार रुपये क्विंटलने विकला जात आहे, तर किरकोळ बाजारात ३५ ते ४० रुपये दराने ग्राहकांना खरेदी करावा लागत आहे. यंदा नवीन लागवडही खोळंबल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.

सध्या बाजारपेठेत मार्च-एप्रिलमध्ये साठलेला कांदा बाजारात येत आहे. व्यापारी व काही मोठ्या शेतकऱ्यांकडेच फक्त कांदा उपलब्ध असल्याने बाजारभाव वाढले आहेत. गेल्या आठवड्यापासून कांद्याने चार हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी लासलगाव व पिंपळगाव बसवंत या प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याला कमाल चार हजार रुपये भाव मिळाला. आवक घटल्याने तसेच मागणी वाढल्याने कांदा दरात वाढ झाली आहे. सध्या कर्नाटकातूनही कांदा आवक होत नसल्याने त्याचाही परिणाम भाववाढीवर झाला आहे.

कांद्यावरील निर्यातमूल्य वाढवूनही दर आवाक्यात आणणे कठीण झाले आहे. बुधवारी लासलगावमध्ये कांद्याला किमान २१००, कमाल ३९०० तर सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. पिंपळगाव बसवंतमध्ये किमान २२००, कमाल ४०१६ तर सरासरी ३६५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सटाणा, येवला, मनमाड, कळवण आदी बाजारपेठांमध्ये कांद्याला सरासरी ३५०० रुपये भाव मिळत आहे.

नाफेडचा कांदा रवाना

नाफेडने मार्च-एप्रिलमध्ये पिंपळगाव व लासलगावमध्ये कांदा खरेदी करून वेअर हाऊसमध्ये साठवला आहे. राजधानी दिल्लीसह व इतर मोठ्या बारा शहरांमध्ये नाफेडतर्फे कांदा पाठविला जाणार आहे. दिल्लीसाठी कांद्याचे ट्रक रवाना झाले असून, इतर शहरातही लवकरच कांदा पाठविला जाणार आहे.

भाववाढीचे गमक

किरकोळ बाजारात नाशिक बाहेर सद्यस्थितीत कांदा पन्नास रुपये किलोने विकला जात आहे. बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमाल चार हजार रुपये भाव मिळत असला तरी फक्त चार ते पाच ट्रॅक्टरांना हा दर मिळत आहे. किमान भाव हा दोन हजाराच्या आतबाहेरच आहे. यामुळे चार ते पाच ट्रॅक्टरांना मिळालेल्या दरानुसारच किरकोळ बाजारात कांदा विक्री होत असल्याने व्यापाऱ्यांची चांदी होत आहे. मात्र, याचा फटका शेतकरी व ग्राहकांना बसत आहे. हमीभाव नसल्याने ही झळ सोसावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांची कर्जाला कंटाळून आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा\ चांदवड

बागलाण तालुक्यातील कोटबेल येथील भाऊसाहेब रंभा साबळे या तरूण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यात गत पंधरवाड्यात दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच चांदवड तालुक्यातही एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली.

कोटबेल येथील शेतकरी भाऊसाहेब रंभा साबळे (वय ३२) यांनी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कर्जास कंटाळून आत्महत्या केली. देना बँकेकडून त्यांनी सुमारे दोन लाख रुपये कर्ज घेतले होते. खासगी सावकारांचे देखील एक लाख रुपयांचे कर्ज होते. कर्ज काढून शेती करीत असताना पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट त्यांच्या समोर होते. दुबार पेरणीसाठी देखील आर्थिक परिस्थिती हालाखीची दिसत असल्याने त्यांनी आपली जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे.

चांदवड : ट्रॅक्टर घेण्यासाठी घेतलेले कर्ज फेडणे दुष्काळसदृश्य स्थितीत मुश्किल झाल्याने चांदवड तालुक्यातील काळघोडे येथील तरूण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रामभाऊ भास्कर शेळके (वय ४०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

रामभाऊ यांचे वडील तसेच भाऊ यांनी या आधी आत्महत्या केली असून, आता घरात एकमेव असलेल्या रामभाऊ यांच्या आत्महत्येने त्यांच्या घरावर जणू आभाळ कोसळले आहे. शौचालयास जातो असे सांगून रामभाऊ राहत्या घरातून बाहेर पडले ते घरी परत आलेच नाही. त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह साहेबराव शेवाळे यांच्या विहिरीत आढळून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेची तिजोरी काँग्रेसच्या हाती

$
0
0

सभापतीपदी ताहेरा शेख; ‌सत्ताधारी तिसरा महाजचे दोन नगरसेवक फुटले

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महापालि‌केच्या स्थायी समिती सभापती निवडीच्या फुटाफुटीच्या राजकारणात अखेर काँग्रेसने सत्तारूढ तिसरा महाजवर मात केली. काँग्रेसच्या ताहेरा शेख यांनी तिसरा महाजच्या यास्मिनबानो एजाज बेग यांचा दोन मतांनी पराभव केला. यामुळे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा काँग्रेसच्या हातात आल्या असून, तिसरा महाजला मोठा धक्का बसला आहे.

स्थायी समिती सभापतीपदाची निवड प्रक्रिया नाशिक महसूल विभागाचे अप्पर आयुक्त आर. जी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयुक्त डॉ. लतिश देशमुख, महापौर हाजी मोहम्मद इस्माईल व पदाधिकारी उपस्थित होते. सभापतीपदासाठी काँग्रेसकडून माजी महापौर ताहेरा शेख रशीद तर महाजकडून यास्मिनबानो एजाज बेग यांचे अर्ज आले होते. पक्षीय बलाबलनुसार काँग्रेस व महाज दोघांकडे समसमान पाच सदस्य होते. यामुळे अन्य पक्ष व आघाडीतील सदस्य कोणाच्या पारड्यात आपले बहुमोल मत टाकतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

मनपा सभागृहात निवड प्रक्रिया सुरू झाल्यावर हात उंचावून उमदेवारांना मत देण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या ताहेरा शेख रशीद यांना एकूण नऊ सदस्यांनी मतदान केले. यात त्यांच्या काँग्रेसच्या पाचही सदस्यांसह तिसरा महाजच्या एजाज उमर व युसूफ कादरी यांची दोन मते तर शहर विकास आघाडीचे उपमहापौर युनूस इसा व बाळू आहिरे यांची दोन अशी नऊ मते मिळाली. महाजच्या यास्मिनाबानो एजाज बेग यांना मात्र स्वतःच्या पक्षातील पाच मते देखील आपल्या बाजूने राखता आली नाहीत. महाजची तीन, शिवसेनेची दोन, मालेगाव विकास आघाडी एक, जद एक अशी केवळ सात मते मिळाली. या विजयामुळे काँग्रेसच्या गोटात मनपात कॅमबॅक केल्याचा आनंद असून, तिसरा महाजमध्ये अस्वस्थता पसरली आहे. गेल्या वेळी महापौर निवडीत महाजने शिवसेना, शहर विकास आघाडी यांच्या मदतीने काँग्रेसकडील महापौरपद खेचून आणले होते. मात्र स्थायीत त्यांना तो करिश्मा करता आला नाही.

तिसरा महाजला नाराजीचा फटका

महापौर निवडणुकीत जद, शिवसेना आणि शहर विकास आघडीच्या जोरावर सत्ता मिळवण्यात महाजला यश मिळाले. मात्र, स्थायी सभापतीच्या निवडीत आधीपासूनच त्यांना अंतर्गत नाराजीचा फटका बसेल अशी शक्यता होती. महापौर हाजी मोहम्मद इब्राहीम यांच्यासोबत शहर विकास आघाडीचे उपमहापौर युनूस ईसा यांचे मतभेद झाले. महाजचे नगरसेवक एजाज उमर यांना सभापतीपदाची उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले. या अंतर्गत नाराजीचा फटका बसल्याने महजला स्थायी सभापतीपद गमवावे लागले.

महिला बालकल्याण समिती सभापतीपदी गवळी

स्थायी समिती सभापती निवडीबरोबरच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड करण्यात आली. सभापतीपदाकरिता शहर विकास आघाडीच्या संगीता गवळी यांचा एकमेव अर्ज तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या रेखा येशीकार यांचे अर्ज दखल झाले होते. त्यामुळे या दोघांची बिनविरोध निवड निश्चित होती. त्यांची औपचारिक घोषणा बुधवारी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतिरोधकासाठी शिवसेना आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोड येथे अवजड वाहनांना बंदी घालावी, इंगळेनगर चौफुलीवर तातडीने सिग्नल आणि गतिरोधक बसवावेत या मागणीसाठी शिवसेनेने बुधवारी अचानक रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतुक अर्धा तास विस्कळीत झाली. जेलरोडवर चार चौकांमध्ये गतिरोधक बसविण्याचे प्रशासनाने मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

इंगळेनगर चौकात चार दिवसांपूर्वी जेलच्या कर्मचाऱ्याचा ट्रकखाली मृत्यू झाला होता. सहा महिन्यांपूर्वी एक महिला ट्रकखाली ठार झाली होती. दोन वर्षात आठ जणांचा मृत्यू झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. मागणी करूनही उपाययोजना होत नसल्याने शिवसेनेने रास्ता रोको केला. शिवसेना विभागप्रमुख नितीन चिडे, राजू लवटे, विक्रम खरोटे, बाळासाहेब गाडगीळ, बाळासाहेब शेलार, बाबा बच्छाव, परिक्षीत तळोकर, अरुण मुळाणे, मसूद जिलानी, महेंद्र पोरजे, राजेश बोराडे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहळदे, वाहतूक शाखेचे निरीक्षक गाडे यांनी मध्यस्थी केले. महापालिकेच्या विभागीय अधिकारी कुसुम ठाकरे याही घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांना शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले. बिटकोपासून इंगळेनगर चौफुलीपर्यंत रहदारी व नागरिकांचा राबता वाढला आहे. बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरू आहे. त्यातच अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतुकीमुळे या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. योग्य कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा ‌इशारा शिवसेनेने निवेदनाद्वारे दिला आहे.

प्रशासनाच्या नाकार्तेपणामुळेच जेलरोडवर अपघात होत आहेत. बाहेर गेलेला माणूस परत येईल की, नाही याची साशंकता असते. अधिक बळींची वाट न पाहता सिग्नल व गतिरोधक बसवावेत. - तुळशीदास इंगळे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआय प्रवेशासाठी रांगा

$
0
0

अंतिम फेरीला सुरूवात; एकूण २७ ट्रेडसाठी १००६ जागा

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी जिल्हाभरातील इच्छूक विद्यार्थ्यांनी सातपूर येथे गर्दी केली आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनी पहाटेपासूनच सातपूर आयटीआयबाहेर रांगा लावल्या आहेत.

अंतिम फेरीच्या प्रवेश प्रक्रियेत एकूण २७ ट्रेडसाठी १००६ जागा भरल्या जाणार आहेत. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने दोन वर्षांपासून आयटीआयचे प्रवेश ऑनलाइन केले आहेत. यामध्ये काही ट्रेड एक तर अन्य ट्रेड दोन वर्षांसाठी आहेत. ऑनलाइन प्रवेश घेण्यासाठी सायबर कॅफेमध्ये जाणे आवश्यक झाल्याने याचा सर्वाधिक त्रास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. आयटीआयने सुरू केलेल्या लॉनलाइन प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केल्यापासूच सर्व्हर डाऊन असल्याच्या तक्रारी आयटीआयकडे येत आहेत. यामुळे प्रवेश अर्ज सादर केलेले ग्रामीण भागातील विद्यार्थी रोजच आयटीआयच्या प्रवेशद्वारावर चकरा मारत आहेत.

दरम्यान, बुधवारपासून आयटीआय प्रवेशाच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली. गुणवत्तेच्या आधारावर होणाऱ्या या निवड प्रक्रियेत आपली वर्णी लागते का हे जाणून घेण्यासाठी पहाटेपासून विद्यार्थ्यांनी सातपूर आयटीआयच्या प्रवेशद्वारावर रांगा लावल्या. दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसात विद्यार्थ्यांच्या लांबच्या लांब लागलेल्या रांगा त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या.

आयटीआयच्या अंतिम फेरीत झालेल्या प्रवेश प्रक्रियेत २७ ट्रेडसाठी १००६ जागांसाठी दिवसभर प्रवेश प्रक्रिया सुरू होती. अंतिम फेरी प्रवेशासाठी आयटीआयचे प्राचार्य एस. बी. नलावडे, उप-प्राचार्य डी. एस. जाधव, अविनाश वाघ, ए. बी. भालेराव, आर. एम. विभांडीक आदींनी परिश्रम घेतले. जिल्हातील सर्वच भागातील विद्यार्थी अंतिम फेरीसाठी उपस्थित होते.

अडचणी काही कमी होईना!

आयटीआयच्या ऑनलाइन प्रक्रियेत पारदर्शकपणा आणण्याचा व्यवसाय शिक्षण व प्र‌शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. मात्र, यातून इच्छूक उमेदवारांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. टप्प्या टप्पयाने जाहीर झालेल्या प्रवेशाच्या यादीमध्ये उमेदवारांची नावे गाळली गेली आहेत. पहिल्या यादीत गुणवत्तेनुसार संधी न मिळालेले हजारो विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीमध्ये गुणवत्तेनुसार आपोआप प्रक्रियेमध्ये येणे अपेक्षित होते. मात्र, कट ऑफ लिस्टप्रमाणे एकदा यादीमध्ये नाव आले नाही की उमेदवार प्रवेश प्रक्रियेतूनच बाद होत आहे. त्यापेक्षा कमी गुण असलेल्या मात्र दुसऱ्या फेरीच्या कट ऑफ लिस्टमध्ये उमेदवारांना मात्र प्रवेश मिळाला. प्रवेश प्रकियेतील या त्रुटींवर प्रशासनाला कोणताही तोडगा काढता आलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांडपाणी गोदापात्रात!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर शिवाजीनगरमध्ये महापालिकेची मुख्य ड्रेनेज लाईन फुटल्याने हजारो लिटर सांडपाणी गोदावरीच्या पात्रात मिसळत आहे. या सांडपाण्यामुळे परिसरतील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने लक्ष घालण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

सातपूर, शिवाजीनगर भागातील ध्रुवनगर परिसरात कॅनलरोडला लागून असलेल्या मुख्य सांडपाण्याच्या ड्रेनेज गेल्या दहा दिवसांपासून फुटल्याने हजारो लिटर सांडपाणी नैसर्गिक नाल्यातून गोदावरी नदीच्या पात्रात मिसळत आहे. परंतु, एकीकडे महाकुंभाचे नियोजन महापालिका व जिल्हा प्रशासन करत असतांना दुसरीकडे गोदावरी पात्रात मिसळणारे सांडपाणी बंद कधी होणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यातच दहा दिवासांपासून कॅनलरोडला लागून असलेले ड्रेनेज लिकेज झाल्यामुळे परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी फुटलेल्या ड्रेनेजच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले. परंतु, दहा दिवसांहून अधिक दिवस उलटले असतांना फुटलेले ड्रेनेजचे काम होणार, तरी कधी असा प्रश्न रहिवाशी उपस्थित करत आहेत. तसेच फुटलेल्या ड्रेनेजमधून हजारो लिटर सांडपाणी पवित्र गोदावरीच्या पात्रात मिसळत जात आहे. यासाठी शिवाजीनगर भागातील मुख्य सांडपाण्याची असलेल्या ड्रेनेजची तत्काळ दुरुस्ती महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

दोन आठवड्यापूर्वी कॅनलरोड लगत असलेल्या मुख्य सांडपाण्याच्या ड्रेनेज फुटले. याबाबत महापालिका व स्थानिक नगरसेवकांना माहिती दिली. परंतु, अद्याप ड्रेनेजची दुरुस्ती झालेली नाही. दुर्गंधीचा रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. - मधुकर पाटील, रहिवाशी, ध्रुवनगर कॅनलरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय अर्थमंत्र्यांना साकडे

$
0
0

सेंट्रल गोदावरीला केंद्राच्या योजनेचा लाभ देण्याची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या इंटरेस्ट सबवेशन योजनेअंतर्गत नाशिकच्या सेंट्रल गोदावरी कृषक सेवा संस्थेच्या सभासदांना लाभ मिळावा या मागणीसाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखालील संस्थेच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री अरुण जेटली यांना साकडे घातले आहे. संस्थेच्या मागणीवर विचार करण्याचे आश्वासन मंत्र्यानी दिले आहे. तसे झाल्यास संस्थेला कमी दराने कर्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांनाही कमी दराने कर्जपुरवठा होऊ शकेल.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली इंटरेस्ट सबवेशन योजना सुरू आहे. या अंतर्गत ३ लाखापर्यंतच्या कर्जाला ७ टक्के व्याज दराची आकारणी करण्यात येणार आहे. यासाठी आरबीआयने सर्व बँकाना आदेशित केले आहे. मात्र, सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्था ही सभासद शेतकऱ्यांना १०.२५ टक्क्यांनी कर्ज देत आहे. सेंट्रल गोसावरी सह. संस्था ही २७ गावांमधील शेतकऱ्यांना शेती उत्पन्नावर आधारित कर्ज देत असते. उत्पादनानंतर वर्षाअखेर शेतकरीवर्ग या कर्जाची फेड सव्याज करत असतो.

केंद्र सरकारच्या इंटरेस्ट संबवेशन योजने अंतर्गत या शेतकर्‍यांना कर्ज वाटप करण्याची परवानगी दिल्यास शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळेल, अशी मागणी अरुण जेटली यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी या शिष्टमंडळात खा. हरिश्‍चंद्र चव्हाण, खा. हेमंत गोडसे, माजी खा. देविदास पिंगळे, नगरसेवक दिनकर पाटील, रामदास चव्हाण, केशव निरगुडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा पुजारी अन‍् मराठवाड्याचा ‘कृत्र‌िम’ पाऊस

$
0
0

प्रशांत देसले, नाशिक

जसजशी सिंहस्थ पर्वणी जवळ येऊ लागली तसतशी गोदाघाट, पंचवटी, तपोवन, साधुग्रामच्या चहलपहलमध्ये भर पडतेय. येथे येणाऱ्या असंख्य पर्यटक, भाविकांपैकी एक म्हणजे जनार्दन मुंडे. साधारण सत्तरीच्या घरातील हा वृद्ध. अंगकाठीने तसा धडधाकट. धोतर, सदरा आणि डोक्यावर गुलाबी रंगाचे पागोटे. पागोट्यावरून कुणीही ओळखेल की हे खोड मराठवाड्यातलंच असावं! सकाळीच रामकुंडात डुबकी घेऊन नुकतेच घाटावर ते आले असावेत. वारा सुटल्यामुळे त्यांना हुडहुडी भरली होती. तरीही ओल्या अंगाने ते काहीतरी धडपड करताना दिसले. रामकुंडावर प्रकाशासाठी उभारलेल्या टॉवरभोवती आपलं ओलं धोतर कसंबसं गुंडाळत होते. मात्र वारा काही जमू देईना. कुतूहल म्हणून त्यांच्या जवळ गेलो. तर ते चांगलेच भांबावले. पटकन धोतर सोडून पिशवीत कोंबायले लागले. नंतर गप्पा रंगल्या आणि त्यांना हायसं वाटलं. गप्पांमध्ये ते असे काही खुलले की आपल्याबरोबर कोणकोण आलंय, गावाकडं पाऊस न्हाय, तुमचं नाशिक लय भारी हाय... इथपर्यंत बऱ्याच गप्पा रंगल्या.

मुंडे मूळचे माजलगावचे. बीडहून औरंगाबादमार्गे रेल्वेप्रवास करून जवळपास सात-आठ डोकी नाशिकला आली होती. त्यात काही बायकाही होत्या. सहज विचारलं, 'नाशिक पहिल्यांदाच आलात का?', त्यांनी मराठवाडी लयेत उत्तर ‌दिलं, 'व्हयं, सकाळी सकाळी उतरलो खरी बस अड्ड्यावर, पण पावसानं खोडा घातला. तास दीड तासानं बस अड्ड्याच्या बाहेर पडलो, पायीच निघालो होतो, इतक्यात एक बडवे बुवा (पूजारी) दिसले. त्यांनी आम्हासनी वाट दावली आण कुठंकुठं कायकाय पाहायचं तेही सांगितलं.' इतक्यात रिमझ‌िम पाऊस सुरू झाला. या रिमझिम पावसाला या सत्तरी ओलांडलेल्या म्हाताऱ्याने 'कृत्र‌िम-कृत्र‌िम' असा अजबच शब्दप्रयोग केला. मी म्हटलं, 'तुमच्याकडे अशा पावसाला 'कृत्र‌िम-कृत्र‌िम' पाऊस म्हणतात का?.' तेव्हढ्यात जवळच बसलेली त्यांची सुनबाई, इंद्रायणी मुंडे हताश स्वरात म्हंटली, आमच्याकडे पाऊस न्हाई भाऊ, त्यात टीव्हीवर एकदा या बाबानं ऐकलं की सरकार कृत्र‌िम पाऊस पाडणार हाय. तवापासून यो बाबा असा हलका पाऊस आला का 'कृत्र‌िम-कृत्र‌िम' पाऊसच म्हणतोय.' या एका वाक्यात मराठवाड्यातील भीषण दुष्ळाची दाह‌कता सरींवर सर येतांनाही जाणवली. त्यांच्यासोबत भागवत मुंडे, रावसाहेब मुंडे आणि सदाशिव तिडके होते. नाशिकला वेळीअवेळी बरसणाऱ्या पावसाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. त्यातील रावसाहेब मुंडे जाताजाता एव्हढंच बोलले, 'तुमच्याकडे जशी माणसं परोपकारी आहेत, तसाच तुमच्याकडचा पाऊसही मनमोकळा ‌दिसतोय. आम्ही तास-दोन तास बस अड्ड्यावरच खोळंबलो असतो, पण त्या भल्या माणसाने (पुजारी) आम्हासनी वाट दावली आणि आम्ही इथवर आलो, आता इथून निघतोय त्र्यंबकला आणि तेथून परत गावाकडं.' गप्पा सुरू होत्या तोपर्यंत पावसाने चांगलाच जोर धरला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्वणी काळात शाळांना सुटी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ पर्वणी काळात सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना तीन दिवस सुटी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या व आपत्कालीन नियोजनाच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये या सुट्ट्या भरुन काढल्या जाणार आहेत.

नाशिकमध्ये पहिली पर्वणी २९ ऑगस्ट रोजी आहे. तसेच दुसरी पर्वणी १३ सप्टेंबर आणि तिसरी पर्वणी १८ सप्टेंबरला आहे. यापैकी पहिल्या पर्वणीला शनिवार, दुसऱ्या पर्वणीला रविवार तर १८ सप्टेंबर म्हणजेच तिसऱ्या पर्वणीला शुक्रवार आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशी पर्वणी असली तरी आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी या सुटी देण्याचे नियोजन आहेत.

सिंहस्थ काळात कोट्यवधी भाविक शहरात येण्याची शक्यता असल्याने साहजिकच गर्दी वाढून शाळेच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याचीही शक्यता आहे. या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीला सामोरे जाऊ लागू नये, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पर्वणी काळात शाळांना सुट्ट्या दिल्यामुळे शाळांच्या इमारती या आपत्कालीन व्यवस्था म्हणून राखून ठेवण्याचा उद्देशदेखील यामुळे सार्थ होणार आहे. काही अनपेक्षित प्रसंग ओढावल्यासही या इमारती मदतशीर ठरणार आहे. त्यामुळे शाळांना सुट्ट्या देणे हे सुरक्षा व सोयीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पर्वणी काळात सुट्ट्या मिळणार, याची कल्पना सर्व शाळांना देण्यात आली असली तरी शाळांना अधिकृत पत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांसह सर्वांना या पत्राची प्रतीक्षा आहे.

पूर्वतयारी म्हणून पर्वणी काळात सुट्टया देण्यात येणार आहे. गर्दीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, हा या मागील उद्देश आहे. - यशवंत जाधव, शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परराज्यात कुंभमेळ्याचा जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना शहरातील विविध मार्ग, सोयी-सुविधा आणि सुरक्षितता याची माहिती व्हावी, यासाठी पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक विविध राज्यांच्या दौऱ्यावर गेले आहे. स्थानिक मीडियाशी संपर्क साधून हे अधिकारी नाशिक तसेच त्र्यंबकेश्वरमधील माहिती भाविकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहे.

कुंभमेळ्यासाठी किमान ७० ते ८० लाख भाविक हजेरी लावण्याची शक्यता असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली या उत्तर भारतातील प्रमुख राज्यासह गुजरातसह काही दक्षिणेतील भाविकांचा यात समावेश असणार आहे. विशेषतः उत्तर भारतीय भाविकांची संख्या मोठी असून त्यांच्यापर्यंत नाशिक शहरात येणारे विविध रस्ते मार्ग आणि रेल्वेचे नियोजन पोहचणे गरजेचे आहे. शहरातील पार्किंग व्यवस्था, हॉस्पिटल, घाटांची माहिती इतकेच नव्हे तर टॉयलेटस इत्यादी विषयी माहिती उपलब्ध करून दिल्यास भाविकांचा गोंधळ उडणार नाही, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. त्यानुसारच प्रशासनाने एक पथक तयार केले असून त्यांना परराज्यातील विविध शहरात पाठवण्यात येते आहे. नुकतेच हे पथक इंदौर येथे पोहचले. पोलिस उपायुक्त पकंज डहाणे, ग्रामीण पोलिस दलातील वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक शैलेश जाधव यांच्यासह ​​जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा समावेश होता. तिथे त्यांनी भाविकांना कुंभमेळ्याशी निगडीत आवश्यक माहिती दिली.

वृध्द व्यक्तींसाठी विशेष सूचना

सिंहस्थ कुंभमेळ्यात अनेक वृध्द व्यक्ती सहभागी होतात. प्रचंड गर्दीच्या काळात म्हणजे शाही पर्वणी दरम्यान वृध्दांनी सहभागी होण्याऐवजी इतर दिवशी शहरात आले तर ते चांगले होईल, अशी विशेष सूचना परराज्यातील भाविकांसाठी करण्यात येते आहे. इतर दिवशी भाविकांना थेट रामकुंडापर्यंत येता येईल. तेच इतर दिवशी मोठी पायपीट होणार असून प्रशासनास भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले जाते आहे.

अधिकाधिक भाविकांना प्रशासकीय नियोजनाची माहिती पोहचणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासनातर्फे इंदूरनंतर सूरत, बडोदा, अहमदाबाद, हैदराबाद, लखनऊ आदी शहरात प्रेस कॉन्फरन्स घेतल्या जाणार आहे. - पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचालकांची ‘वाटमारी’

$
0
0

दिशादर्शक फलकांअभावी उडाली धांदल; पर्यायी मार्ग शोधतांना दमछाक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील तब्बल १५ रस्ते पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केले असले तरी नागरिकांनी कोणत्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा हे दर्शविणारे फलकच न लावल्याने वाहनधारकांची बुधवारी धांदल उडली. दिशादर्शक फलक लावण्याची तसदी पोलिस घेणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला आहे.

मनमानी पध्दतीने वागणाऱ्या पोलिसांनी असा बदल करताना नागरिकांना विश्वासात घेतले नाही. बदलाची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर त्याची अधिसूचना काढण्यात आली. केवळ पर्वणीच्या काळात असे बदल केले जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून यापूर्वी सांगण्यात आले होते. परंतु, रविवारपासूनच (दि. २) त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे तब्बल १८ सप्टेंबरपर्यंत हे बदल अंमलात आणले जाणार असल्याने वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. नोकरदार, व्यापारी आणि विद्यार्थी अशा सर्वांचेच त्यामुळे हाल होत आहेत. म्हणून नागरिकांनी या बदलाविरोधात ओरड सुरू केली आहे. विशेष म्हणजे पोलिस स्वत:च्या खासगी तसेच परिचितांच्या वाहनांसाठी बॅरीकेटींग बाजूला करतात. मात्र, अन्य नागरिकांना मात्र पर्यायी मार्गानेच जाण्यास सांगितले जाते. अशी सापत्न वागणूक का असा सवाल नागरिकांकडून पोलिसांना विचारला जात आहे. त्यातून रामकुंड, मालेगाव स्टँड तसेच औरंगाबाद नाका परिसरात नागरिक आणि पोलिस यांच्यात वादाचे प्रसंगही उदभवू लागले आहेत. विशेष म्हणजे हे बदल कोणाला विश्वासात घेऊन करण्यात आले. तब्बल १३ ते १५ रस्ते आतापासूनच बंद करण्याची गरज पोलिसांना का वाटली, असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

पोलिसांनी अचानक केलेल्या बदलावर नागरिक नाराज असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांच्यापर्यंत आल्या आहेत. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन गावी गेले आहेत. ते गुरुवारपर्यंत (दि. ६) नाशिकमध्ये परततील. त्यावेळी त्यांच्याशी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, अशी माहिती कुशवाह यांनी दिली आहे.

नागरिकांचा संताप

पंचवटी : शहरात सुरू झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये या नावाखाली पोलिसांनी पर्वणीच्या आधीच शहरातील मुख्य रस्ते बंद केल्याने पंचवटीकरांची कोंडी आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच दिशादर्शक फलकांची उभारणी न करताच मुख्य रस्ते बंद करण्यात आल्याने नागरिकांना फेरा मारून जावे लागत आहे. अन्य पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडीही होत आहे. यातून छोट्यामोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे पंचवटी परिसरातील नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. औरंगाबाद रोड बंद केल्यामुळे नांदूर आणि निफाडसह अन्य ठिकाणी जाणारी सर्व वाहने अमृतधाममार्गे वळविण्यात आली आहेत. अमृतधाम परिसरात अचानक रहदारी वाढल्याने नागरिक भांबावले आहेत. रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. येत्या १९ ऑगस्ट रोजी साधुग्राममधील ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी साधू-महंतांच्या आतापासून रस्ते बंद केले जात आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून पोलिसांनी रस्ते बंद केले आहे. मात्र, सामान्यांच्या सुरक्षेची सुद्धा काळजी घ्यावी, असे आवाहन नागरिकांनी केले आहे.

दिशादर्शक फलक कुठे?

ज्या ज्या ठिकाणचे रस्ते बंद केले आहे त्या परिसरात पर्यायी रस्ते पोलिसांनी खुले करून दिले आहेत. परंतु, हे रस्ते कोणते याची वाहनचालकांना माहिती मिळावी यासाठी दिशादर्शक फलक लावणे आवश्यक होते. असे फलक लावण्यात न आल्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडाला. शहरात सातत्याने फिरणाऱ्यांची अडचण होत नसली तरी जे कधीतरी शहरात येतात किंवा कधीतरीच एखाद्या परिसरात जातात त्यांची मात्र धांदल उडत असल्याचे पहावयास मिळत आहे.

रस्ते बंद करण्यापूर्वी पोलिसांनी परिसरातील नागरिकांचा विचार लक्षात घेणे गरजेचे होते. पोलिसांची हा निर्णय म्हणजे मनमानी आहे. त्यास नागरिकांचा विरोध कायम राहणार. - रुची कुंभारकर, नगरसेवक

औरंगाबाद रोडची रहदारी अमृतधाममार्गे वळविल्याने वाहनाची वर्दळ अचानक वाढली आहे. नागरिकांना पायी चालणे कठीण झाले असून रस्ता ओलांडतांनाही जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. - मोहन सहाने, नागरिक

अमृतधाम परिसरात अनेक शाळा आणि कॉलेजेस आहेत. रहदारी वाढल्याने विद्यार्थी संकटात सापडले आहेत. ते घरापर्यंत सुरक्षित येणार की नाही याची पाल‌कांना काळजी लागलेली आहे. - सुशीला पवार, गृहिणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण समितीसाठी महाआघाडीचे पारडे जड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतीपदासाठी तीन उमेदवारांचे चार अर्ज, तर उपसभापती पदासाठी चार उमेदवारांचे पाच अर्ज दाखल झाले आहेत. मनसे, राष्ट्रवादी, अपक्ष आणि काँग्रेसची महाआघाडी असली तरी काँग्रेसने उपाध्यक्षपदासाठी स्वतंत्र अर्ज भरल्याने चुरस वाढली आहे. तर गेल्या वेळेस एकी दाखवणाऱ्या शिवसेना-भाजपने यावेळेस मात्र सभापती आणि उपसभापती पदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शिक्षण समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्याचा बुधवार शेवटचा दिवस होता. सभापतीपदासाठी अपक्ष संजय चव्हाण, शिवसेनेच्या हर्षा बडगुजर, भाजपच्या ज्योती गांगुर्डे यांनी अर्ज दाखल केले आहेत, तर उपसभापती पदासाठी मनसेचे गणेश चव्हाण, शिवसेनेच्या हर्षा बडगुजर, काँग्रेसच्या वत्सलाताई खैरे, भाजपच्या ज्योती गांगुर्डे यांनी अर्ज दाखल केले.

गेल्या वेळी शिवसेना-भाजपने एकत्र येऊन अर्ज दाखल केले होते. मात्र, यावेळी तसे घडले नाही. भाजप आणि सेनेने दोन्ही पदांसाठी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष गटात एकीचे दर्शन होते. महाआघाडीतर्फे सभापतीपदासाठी संजय चव्हाण यांचाच अर्ज आला. तर उपसभापती पदासाठी मात्र काँग्रेसच्या वत्सलाताई खैरे यांनीही स्वतंत्र अर्ज दाखल केला. काँग्रेसने दावा ठोकल्याने उपसभापतीपदावरून वाद होण्याची शक्यता आहे. महाआघाडीत झालेल्या समझोत्यानुसार संजय चव्हाण सभापतीपदासाठी आणि गणेश चव्हाण उपसभापतीसाठी नाव निश्चित झाल्याने शिक्षण समितीवर चव्हाण राज येण्याची शक्यता आहे.

मनसेतही धूसफूस

शिक्षण समितीतल्या उमेदवारीवरून मनसेतही धुसफूस सुरू आहे. उपसभापती पदासाठी मनसेच्या वतीने गणेश चव्हाण यांचा अर्ज दाखल झाला तर, मीना माळोदे यांनीही अर्ज भरण्याचा आग्रह धरला. मीना यांचे पती बालाजी माळोदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न शहराध्यक्ष राहुल ढिकले व गटनेता अनिल मटाले यांनी केला. यावेळी अर्ज भरण्याच्या ठिकाणीच माळोदे यांनी वाद घातला. आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केल्याने मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत त्यांना सांभाळण्याची कसरत मनसेला करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळापत्रक कोलमडले

$
0
0

अप गाड्यांना आठ ते दहा तास उशीर

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

मध्य प्रदेशातील हर्दा येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे मुंबईला जाणाऱ्या अप गाड्यांना आठ ते दहा तास उशीर झाला. सहा गाड्या रद्द करण्यात आल्या. मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या मंगला व अन्य गाड्या पनवेलमार्गे वळविण्यात आल्या. तथापि, भुसावळ ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या नेहमीच्या स्थानिक गाड्या वेळेत होत्या.

मध्य प्रदेशातील हर्दा येथील पूल पावसामुळे खचला. पुलावरून कामायनी आणि जनता एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. इटारसी-मुंबई, एलटीटी-जबलपूर, सीएसटी जबलपूर या अप आणि डाऊनच्या सहा गाड्या रद्द झाल्या. मुंबईला जाणाऱ्या अन्य गाड्या आठ ते दहा तास उशिराने धावत होत्या. मध्य रेल्वेची मुंबईहून निघालेली मंगला एक्सप्रेस पनवेलमार्गे रवाना झाली. पश्चिम रेल्वेनेही बहुसंख्य गाड्या वळवल्या.

मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या इटारसी, नागपूर, भुसाळमार्गे रवाना झाल्या. रिझर्व्हेशन केलेल्या प्रवाशांना याचा फटका बसला. पंचवटी, नाशिक-पुणे आदी नेहमीच्या रेल्वेगाड्यांवर परिणाम न झाल्याने प्रवाशांनी सुस्कारा सोडला. सिंहस्थात एखादा अपघात घडल्यास काय अवस्था होईल, अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर धरणात ६७ टक्के पाणीसाठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मागील आठवड्यात झालेला समाधानकारक पाऊस व दोन दिवसांपासून पुन्हा तुरळक सरी कोसळत असल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा ६७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण धरण साठा मात्र ३४ टक्के इतका आहे.

येवल्या तालुक्यातील सायगावात कृत्रिम पाऊस पाडण्याची मोहीम फसल्याने बळीराजा चांगलाच धास्तावला आहे. परंतु, धरण क्षेत्रात होत असलेल्या सरासरी पर्जन्याने जिल्ह्यातील धरणसाठ्यात पाण्याचा साठा वाढू लागला आहे. धरणांच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे धरणांमध्ये हळूहळू पाणी साठू लागले आहे. गंगापूर धरण ६७ टक्क्यांपर्यंत भरल्याने आशा पल्लवीत होऊ लागल्या आहेत. निदान पाणीकपातीचे संकट सध्या तरी टळले असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

शहरासह जिल्ह्यातील मोठे व मध्यम स्वरुपातील एकूण २३ धरण साठ्यात एकूण ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शहरातील गंगापूर धरणात सध्या ३ हजार ७८० दलघफू पाणी असून, हा साठा ६७% पर्यंत पोहोचला आहे. तर कश्यपी धरणात सध्या ६९६ दलघफू पाणी असून, हा साठा ३८% पर्यंत पोहोचला आहे. तसेच गौतमी गोदावरी धरणात ६४६ द.ल.घ.फु. पाणी साठा असून ३४% पर्यंत हा साठा पोहोचला आहे. जिल्ह्यातील पालखेड धरण समुहात येणाऱ्या धरणसाठ्यात पालखेड, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, दारणा, भावली, मुकणे, वालदेवी, नांदुरमध्यमेश्वर, कडवा, आळंदी, आणि भोजापुर या धरणांमध्ये एकूण सरासरी ५६% पाणीसाठा झाला आहे. त्यात इगतपुरी तालुक्यातील भावली धरण १००% भरून वाहू लागले आहे तर नांदूरमध्यमेश्वर बंधाराही भरून वाहू लागला आहे.

गिरणा खोऱ्यात सर्वांत कमी म्हणजे केवळ १२ टक्के जलसाठा आहे. या खोऱ्यात म्हणजेच चणकापूर, पुनद, हरणबारी, केळझर, नागासाक्या आणि गिरणा धरणांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यावर पीकसंकट!

$
0
0

३४ हजार हेक्टरवर दुबार पेरण्यांची भीती; आभाळाकडे लागले डोळे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील नांदगाव, येवला आणि देवळा तालुक्यात दोन ‍दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, अजूनही ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट घोंगावते आहे. या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला नाही तर दुबार पेरण्या कराव्या लागतील, अशी चिंता जिल्हाधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील पाऊस, धरणसाठा तसेच टंचाईची परिस्थितीच्या आढावा घेतला. जिल्ह्यात टँकरने होणारा पाणीपुरवठा, दुबार पेरणीची परिस्थिती, पीक कर्जवाटप, पीक विमा, जलयुक्त शिवारची कामे शेतकरी आत्महत्या याबाबतची माहिती फडणवीस यांना देण्यात आली.

जिल्ह्यात आतापर्यंत ३९३ मिमि पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी आजपर्यंत ४७४ मिलीमीटर पाऊस पडला होता. यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ३७ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, गतवर्षी हाच पाणीसाठा ४४ टक्के होता. नांदगाव, देवळा, येवला तालुक्यात आतापर्यंत केवळ १५ टक्के पाऊस पडल्याने चिंताजतनक परिस्थिती आहे. तेथे दोन दिवसांपासून पावसाला सुरूवात झाल्याने पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे. मात्र रविवारपर्यंत समाधानकारक पाऊस न पडल्यास ३४ हजार हेक्टरवर दुबार पेरण्या कराव्या लागतील अशी भीती कुशवाह यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, येवला, मालेगाव, बागलाण, कळवण, चांदवड, देवळा या भागातील शेतकरी अद्यापही आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होत आहे. मात्र, पाऊस पडत नसल्याने त्याचा हिरमोड होत आहे.

पावसाने पाठ फिरविल्याने ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सिन्नर येथे सर्वाधिक २४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्याखालोखाल येवला आणि बागलाणमध्ये प्रत्येकी १० टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे. जिल्ह्यात ऑक्टोबरपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याची माहिती कुशवाह यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वक्फ बोर्डचा पुन्हा खराब वक्त!

$
0
0

खान नजमुल इस्लाम, जुने नाशिक

कुठल्या ना कुठल्या कारणाने सदैव चर्चेत राहणारे राज्य वक्फ बोर्ड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या बोर्डाला दुर्दैवाने अद्यापपर्यंत अध्यक्ष मिळू शकलेला नाही. त्यातच आता बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचीही (सीईओ) बदली झाली आहे. त्यामुळे ही संस्था पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडली गेली आहे. वक्फ बोर्डाचा खराब वक्त कधी दूर होणार, असा सवाल मुस्लिम समुदाय उपस्थित करीत आहे.

वक्फ बोर्डाचे सीईओ सय्यद एजाज हुसेन औरंगाबाद जिल्हा न्यायालयात रूजूही झाले आहेत. त्यांच्या जागी रेहाना काझी यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश असतानाही त्यांनी भूमाफियांच्या दहशतीमुळे पदभार स्वीकाराला नसल्याची चर्चा आहे. सय्यद हुसेन यांनी सीईओ पदावर असताना आपल्या पारदर्शक कारभाराने वक्फ बोर्डाला जीवदान देण्याचा प्रयत्न केला. वक्फच्या जमिनी बळकावणाऱ्या भूमाफियांविरुध्द कारवाईचा बडगा उगारून त्यांना सळो की पळो करून सोडले. त्यानंतर हुसेन यांना हटविण्यासाठी भूमाफियांनी हालचाली सुरू केल्या. या छळाला कंटाळून हुसेन यांनी स्वतःच राज्य सरकारकडे बदलीची विनंती केली होती. वक्फ बोर्डाच्या राज्यात सुमारे एक लाख एकर जमिनी आहेत. त्यापैकी सुमारे सत्तर हजार एकर जमिनी भूमाफियांनी बळकावल्या असल्याचे सरकारच्या चौकशी समितीला आढळून आले. हा अहवाल विधानसभेच्या पटलावर असून, त्यावर कार्यवाही झालेली नाही.

भूमाफियांचे फावले

सीईओपद रिक्त झाले असताना सात वर्षांपासून वक्फ बोर्ड अध्यक्षपदाचाही प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी ती स्थगित केली. सलग नवव्यांदा हा प्रकार घडला. अध्यक्ष व सीईओ सुद्धा नसल्याने भूमाफियांचेही पुन्हा एकदा चांगलेच फावले आहे.

बोर्डात काम करताना अनेक अडचणी आल्या. मात्र, वक्फच्या हितासाठी मी सारे काही सहन केले. भूमाफियांकडून होणारा छुपा छळ, अपुरा कर्मचारी वर्ग, अनुदानाची वानवा, रिक्त अध्यक्षपद अशा अडचणींना सामोरे जावे लागले. - सय्यद एजाज हुसेन, माजी सीईओ, राज्य वक्फ बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण संवर्धनावरही नाशिकचा ठसा

$
0
0

नाशिकच्या कॅप्टन सिद्धार्थ चक्रवर्ती यांच्या संयुक्त राष्ट्राच्या उपक्रमात सहभाग

जितेंद्र तरटे, नाशिक

ड्रग्ज स्मगलिंग पाठोपाठ माश्यांच्या स्मगलिंगचा प्रश्न जगातील सागरी परीघासमोरील आव्हान बनला आहे. वर्षाकाठी २५ बिलियन यूएस डॉलर्स एवढी बेकायदेशीर मासेमारी करण्यात येते अन् त्यामुळे सागरी पर्यावरण धोक्यात येते आहे. संयुक्त राष्ट्रांनी या प्रश्नी विशेष असे जागतिक धोरण लवकर जाहीर करावे, असा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयातील जागतिक परिषदेत ठामपणे मांडत नाशिकच्या कॅप्टन सिध्दार्थ चक्रवतीने 'यूएन' सदस्यांचे लक्ष या प्रश्नाकडे नुकतेच वेधत सागरी पर्यावरण क्षेत्रातही नाशिकचा ठसा निर्माण केला आहे.

फ्रावशी अकादमी आणि आरवायके सायन्स कॉलेजचा विद्यार्थी असलेला कॅप्टन सिध्दार्थ 'मरीन' विभागातील उच्च शिक्षण घेऊन दशकभर नेव्हीमध्ये कार्यरत होता. सध्या तो 'सी शेफर्ड ग्लोबल' या जागतिक स्तरावरील एनजीओ सोबत कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वी सागरी मोहिमेवर असताना अंटार्टिकाच्या हद्द‌ीतील मौल्यवान 'टूथफिश'च्या स्मगलिंगचे मोठे रॅकेट कॅप्टन सिध्दार्थ यांच्या टीमने यूएनच्या इंटरपोल यंत्रणेस पकडून दिले होते. 'गिलनेट' या विशिष्ट प्रकारचे ७२ किलोमीटर अंतराचे, सुमारे ८० टन वजनाचे जाळे अन् यात फसलेले सुमारे ५० टन वजनाचे मृत 'टूथफिश' सिध्दार्थ यांच्या प्रयत्नातून पुन्हा समुद्रात सोडण्यात आले होते. या साहसी मोहिमेची दखल घेत 'युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट' उपक्रमांतर्गत सागरी पर्यावरण विषयावर चिंतन करण्यासाठी 'यूएन' मुख्यालयाने न्यूयॉर्कमध्ये व्याख्यान आयोजित केले होते. जगभरातील दोन हजार सदस्यांसमोर सुमारे दीड तासांच्या ११ व्याख्यानात नाशिकच्या कॅप्टन सिध्दार्थला 'ओव्हर फिशिंग अँड इल‌िगल फिशिंग' या विषयाच्या मांडणीसाठी ७ मिनिटांचा कालावधी मिळाला. भारताच्या पंतप्रधानांचे व्याख्यान 'यूएन'च्या ज्या व्यासपीठावरून झाले त्याच व्यासपीठावर विचार मांडण्याची संधी मिळाल्याने हा अनुभव अंगावर शहारे आणणारा ठरल्याचे कॅप्टन सिध्दार्थ सांगतात.

रोखणार आंतरराष्ट्रीय पळवाटा

आंतरराष्ट्रीय स्तरावर भिन्न देशांच्या भिन्न कायद्यांच्या पळवाटांचा आधार घेऊन सागरी चाचे यथेच्छपणे सागरी खजिना लुटतात. यामुळे जागतिक पर्यावरणाचे अतोनात नुकसान होते. हे रोखण्यासाठी उभय देशांमध्ये युनायटेड नेशन्स समन्वयकाची भूमिका निश्चितच दमदारपणे निभावेल. यासाठी या यंत्रणेच्या माध्यमातून या विषयात नवी जागतिक धोरणे राबविली जाण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून मी जीवनभर पाठपुरावा करेल, असेही कॅप्टन सिध्दार्थ यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

'नेव्हीमध्ये नोकरी करताना दहा दहा महिने बोटीवर असायचो. समुद्राच्या ऊसळणाऱ्या लाटा आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करताहेत, असं नेहमी वाटायचं. समुद्राचं भावविश्व समजावून घेताना त्याचं पर्यावरणच मानव ओरबाडतो आहे हे प्रकर्षाने जाणवलं अन् सागरी पर्यावरणाच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय एनजीओसोबत कार्य सुरू केले.' - सिध्दार्थ चक्रवर्ती, कॅप्टन, सी शेफर्ड ग्लोबल (इंटरनॅशल एनजीओ) ----

मुख्यमंत्री आज नाशकात

ना‌शिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरूवारी नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा कामांचा आढावा घेतला जाणार आहे. साडेचार वाजता मुख्यमंत्र्याचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे. अंबडमध्ये एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, त्यांनतर शासकीय विश्रामगृहावर सहा वाजता कुंभमेळ्याची आढावा बैठक घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार क्विंटल कांदा चोरीला

$
0
0

मनमाड : कांद्याला सोन्याचा भाव आल्याने कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. म्हणून की, काय चोरीला जाणाऱ्या वस्तूंच्या यादीत कांद्यनेही जागा घेतली आहे. नांदगांव तालुक्यातील सीताराम संतुबा गोयेकर (रा. तांदेवाडी) या शेतकऱ्याच्या खळ्यातील ४ क्विंटल कांदा मंगळवारी चोरीला गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. ज‌ीवापाड जपलेला कांदा चोरीला गेल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला नांदगाव पोलिस ठाण्यात धाव घ्यावी लागली.

शेतकरी गोयेकर यांना बुधवारी रस्त्यावर कांद्याची काही टरफले आणि मोटारसायकलच्या चाकांचे ठसे दिसले. त्यांनी टरफले व ठशांचा माग काढला. एका ठिकाणी त्यांना कांदा आढळून आला. त्यांनी तातडीने याची माहिती नांदगांव पोल‌िसांना दिली. पोलिसांनी लहानू कचरू ठाकरे, शंकर महादू मोरे (रा. टाकळी) या संशयितांवर कांदा चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र आता कांदा पोलिसांच्या ताब्यात असून, तो फिर्यादी गोयेकर यांना कधी मिळेल, याची प्रतीक्षा त्यांना लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लथ यांच्या चित्रांची भुरळ

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

आर्किटेक्ट शर्वरी लथ यांच्या चित्रांचे प्रदर्शन नुकतेच मुंबई येथे भरविण्यात आले होते. 'सेलिब्रेट क्रिएटिव्हिटी' या प्रदर्शनात त्यांनी काढलेली चित्रे मांडण्यात आली होती. अॅबस्ट्रॅक्ट, कंटेम्पररी, जॉमेट्रिकल, मोनोक्रोमेटीक, स्पिरिच्युअल या विषयांवरील त्यांच्या चित्रांची रसिकांना भूरळ घातली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते.

'सेलिब्रेट क्रिएटिव्हिटी' या दोन दिवस भरलेल्या प्रदर्शनाला चित्ररसिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. या प्रदर्शनातून संकलित झालेला निधी कॅन्सरवरील संशोधनासाठी काम करणाऱ्या संस्था आणि कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारासाठी देण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला अभिनेत्री अमिषा पटेल, रिमा लागू, मृणाल कुलकर्णी, अभिनेता सचिन खेडेकर तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. या प्रदर्शनातील चित्रांना रसिकांनी दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारी ‘पोस्टकार्डस् फ्रॉम लेनिनग्राड’

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्यातर्फे 'सिनेमा कट्टा' उपक्रमांतर्गत शनिवार (८ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक मारियाना रोंदो (व्हेनेझुएला) यांचा 'पोस्टकार्डस् फ्रॉम लेनिनग्राड' हा स्पॅनिश भाषेतील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट गंगापूर रोडवरील सावरकरनगर येथे असलेल्या ठाकूर रेसिडन्सीमध्ये दाखविण्यात येणार आहे.

रसिकांसाठी दर महिन्याला जागतिक व भारतीय भाषेतील अभिजात व कलात्मक चित्रपट दाखविण्यात येत असून त्याच साखळीतील हा पुढील चित्रपट आहे. पोस्टकार्डस् ही एका अर्थाने एका कुटुंबाची गोष्ट आहे तशीच ती एका राष्ट्रातील राजकीय घटनांचीदेखील आहे. साठच्या दशकात एका हुकूमशहाच्या तावडीतून सुटून व्हेनेझुएला लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. काही तरुण मंडळी जंगलात राहून बंदुका घेऊन त्या प्रयत्नात असतात आणि त्यात एका तरुणीचाही सहभाग असतो.

सतत लष्कराचा ससेमिरा व मृत्यूचे सावट अशा परिस्थितीत ती आई होते. सर्वसाधारणपणे अशा परिस्थितीत जन्माला आलेल्या मुलांचे हाल होतात. त्या लहान मुलांना राजकारण, सत्ता, लष्कर, विचारधारा वगैरे गोष्टी कळत नाहीत. दिग्दर्शिकेने या सर्व अस्थिरतेचे, मुलांच्या आपली ओळख शोधण्याच्या प्रयत्नांचे अचूक चित्रण केले आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा कालावधी ८५ मिनिटांचा आहे. चित्रपट पाहण्यास नाशिककर रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images