Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चला उघडूया समानतेचा गाभारा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शनी मंदिर असो वा मारुती मंदिर किंवा कार्तिकस्वामी... अशा काही मंदिरांमध्ये प्रवेश ‌मिळणार नसल्याने करायचाच नाही, अशी मानसिकता दुर्दैवाने महिलावर्गाची तयार झाली आहे. हा पूर्वापार चालत आलेला पगडा महिलांच्याच मनात भेदाभेद निर्माण करीत आहे. अशा मंदिरांमध्ये वर्षानुवर्षे पायच न ठेवल्याने ती जागा आपल्यासाठी नाहीच, असंच त्यांचं पक्कं मत बनलंय.

समानतेच्या या युगात भेदाभेदाला स्थान नसल्याची भावना महिलांच्या मनात खोलवर रुजविण्याची आवश्यकता आहे. महिलांनीही पुढे येऊन भेदाभेदाला मूठमाती देत अशा मंदिरांचे गाभारा उघडण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत. 'जे आपल्या धर्मानं सांगितलंय तेच केलं पाहिजे. शनी, मारुती, कार्तिकस्वामी या मंदिरांमध्ये बायकांनी जाऊच नये. उगीच कशाला विषाची परीक्षा पाहायची?', असा संवाद साधणाऱ्या मीना (नाव बदललेलं आहे) त्या कित्येक महिलांच्या प्रतिनिधीच; ज्यांना आजही महिलांच्या काही ठराविक मंदिरांमधील प्रवेशाबद्दल भीती आहे.

नाशिक शहराची मूळातच धार्मिक शहर अशी ओळख आहे. त्यामुळे दुर्मिळ अशा वेद मंदिरापासून विविध प्रकारची मंदिरे नाशिकमध्ये पाहायला मिळतात. सर्वच मंदिरांमध्ये प्रवेश देण्याबाबत महिला आणि पुरुष असा भेदभाव केला जात नसला तरी शनी, मारुती, कार्तिकस्वामी या मंदिरांमध्ये जाण्यास अनेक महिलाच उत्सुक नाहीत. पूर्वापार पाळत आलेल्या परंपरांमुळेच आजही अनेक महिला काही ठराविक मंदिरांमध्ये न जाण्याची पथ्ये पाळत आहेत. हे चित्र पूर्णपणे बदलण्याची आवश्यकता आहे.

आधी बदला मानसिकता

शनीची वक्र दृष्टी महिलांवर पडणे चांगले नसते, त्यामुळे शनीचे जवळून व थेट दर्शन घेऊ नये. हनुमान ब्रह्मचारी असल्याने महिलांनी हनुमानाच्या मूर्तीला हात लावू नये. कार्तिक स्वामींना महिलांचा चेहरा पाहणे निषिध्द असल्याने महिलांनी कार्तिक पौर्णिमा वगळता कार्तिक स्वामी मंदिरामध्ये जाऊ नये, असे अनेक गैरसमज प्रचलित आहेत. कित्येक महिला या पलिकडे जाऊन विचारच करीत नसल्याने

आजही या मंदिरांमध्ये जाणे त्या टाळतात. मंदिर प्रवेशाबद्दल महिलांचीच मानसिकता बदलण्याची गरज आहे. पुरुषांना या मंदिरांमध्ये प्रवेश चालतो; परंतु आपल्याला नाही, हा पूर्वापार चालत आलेला पगडा महिलांच्याच मनात भेदाभेद निर्माण करत आहे. यावर प्रबोधन हा योग्य पर्याय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन अभियंत्यांना सक्तमजुरी

$
0
0

सदोष मनुष्यवध प्रकरण; ठेकेदाराचाही समावेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेद्वारे लॅमरोडवरील सौभाग्यनगरमध्ये उभारण्यात येणारी कमान कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ठेकेदारासह महापालिकेच्या तीन अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने चौघांनाही दोन वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. पाठक यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

महापालिकेचा ठेकेदार किशोर मुरलीधर एखंडे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता उदय मुकंद धर्माधिकारी, उप अभियंता सुनील सावन रौंदळ, शाखा अभियंता मोहमद अलीस मोहमद गौस अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

लॅमरोडवर सौभाग्यनगरमध्ये महापालिकेच्या वतीने स्वागत कमान उभारणीचे काम सुरू होते. १८ जानेवारी २०११ रोजी रिक्षावर कमान कोसळल्याने सुरेश दादा पगारे (४१, रा. सुंदरनगर, देवळालीगाव) व धनश्री विजय घायवटे (२१, रा. अनमोल पार्क, सायखेडा रोड) यांचा मृत्यू झाला होता. तर बांधकाम मजुराचा मुलगा अनिल बुद्धपाल नन्नावरे (६, रा. लॅम रोड) हा गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. याप्रकरणात या चौघांसह बांधकाम सुपरवायझर आनंदा चौरे व संजय म्हस्के अशा सहा जणांवर नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या घटनेचे पडसाद राज्यात उमटले होते. तसेच महापालिकेने ठराव करून स्वागत कमानींच्या बांधकामांना स्थगिती दिली होती.

कमानीच्या बांधकामात त्रूटी होत्या. तसेच संशयितांना हलगर्जीपणा केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. पाठक यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील म्हणून ए. जे. देशमुख यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. तीन अभियंते व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना दोन वर्षे सक्तमजुरीची व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु सुपरवायझर चौरे व म्हस्के यांच्या विरूद्ध सबळ पुरावे नसल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॉकेटचा बार फुसका!

$
0
0

सातपैकी एकाच रॉकेटने घेतला वेध; कृत्रिम पाऊस नाहीच

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कृत्रिम पाऊसही सायगाव पंचक्रोषीतील ग्रामस्थांवर मेहेरबानी करण्यास राजी नसल्याचे सोमवारी पुन्हा पहायला मिळाले. रविवारी वाऱ्याने आर्द्रतायुक्त ढगांना पिटाळून लावले तर सोमवारी रॉकेट्सनेच मान टाकल्याने प्रयोग फसला. तंत्रज्ञान देखील निसर्गापुढे फोल ठरल्याने शेतकऱ्यांच्या होत्या नव्हत्या अपेक्षांवरही पाणी फेरले गेले. आता असा प्रयोग १० ते १५ दिवसांत पुन्हा येथेच केला जाणार आहे.

येवला तालुक्यातील पूर्व भागाकडे पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे सायगावसह आसपासच्या गावांमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मान्सूनच्या हंगामातही भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि इंटरनॅशनल स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टड‌ीज (आयएसपीएस) च्या वतीने कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सुमारे १५ जणांचे पथक रविवारीही सकाळी या प्रयोगासाठी सायगाव फाट्यावरील शिवारात पोहोचले. एकूण सात रॉकेट्स सोडण्याचे ठरविण्यात आले होते. सकाळी सात वाजून दोन मिनिटांनी पहिले रॉकेट सोडण्यात आले. वातावरणाचा अंदाज घेत सकाळी साडे अकरापर्यंत ज्ञानांजली नावाचे हे सर्व रॉकेट्स सोडण्यात आले. त्यापैकी तीन रॉकेट्सचा स्फोटच झाला नाही. तर दोन रॉकेट्सचा ढगांवर आदळण्यापूर्वीच स्फोट झाला. एक रॉकेट उडाले. परंतु दिशा चुकल्याने ते रस्त्यावर पडले. तर एकच रॉकेटचा ढगामध्ये स्फोट झाला. मात्र त्यावेळी अपेक्षित ढग नसल्याने त्याचा उपयोग होऊ शकला नाही. त्यामुळे रविवारी प्रत्यक्षात रॉकेट उडवूनही हा प्रयोग फसला.

रॉकेटच्या प्रयोगाला सुरूवात झाल्याचे समजताच पंचक्रोषीतील ग्रामस्थांनी सायगाव फाट्यावर गर्दी केली. या गर्दीमुळे प्रयोगात अडथळा येणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली. प्रयोगाला सुरूवात झाल्याने पाऊस पडेल या आशने शेतकरी सुखावले. परंतु प्रयोग असफल ठरल्याने त्यांच्या होत्या नव्हत्या अपेक्षाही मावळल्या. यंत्रणेने हार मानता पुन्हा प्रयोग करावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

...अन् ठोका चुकला

कृत्रिम पावसासाठी पथकाने प्रथम चार रॉकेट उड्डणासाठी सज्ज केले. सर्वांच्या नजरा त्यावर खिळल्या. उत्सुकता शिगेला पोहोचली. काय होणार, पाऊस पडणार का अशी कमालीची उत्कंठा दिसून आली. सात वाजून तीन मिनिटांनी पहिले रॉकेट तिरपे होवून जमिनीवर कोसळले. त्यानंतर दोनच मिनिटांनी दुसरे रॉकेट सुसाट झेपावून ढगांमध्ये ब्लास्ट झाले. त्यामुळे पथकासह शेतकरी, अधिकारी यांच्या आशा पल्लवीत झाल्या. सात वाजून २० मिनिटानी ३ रॉकेट सोडले. मात्र ते जागेवरच फुटले. यानंतर ७ वाजून ५० मिनिटांनी चौथे, ९ वाजुन ३५ मिनिटांनी पाचवे, ११ वाजता सहावे तर ११ वाजून १४ मिनिटांनी सातवे रॉकेट सोडण्यात आले.



इंधन म्हणून वापरण्यात आलेली साखर अपेक्षित रिझल्ट्स देऊ शकली नाही. वातावरणही तेवढे अनुकुल नव्हते. तांत्रिक दृष्ट्या आजच्या प्रयोगात काही उणीवा राह‌िल्या. या सर्व प्रयोगाचे आम्ही रेकॉर्डिंग केले आहे. त्याचा अभ्यास करून पुढील प्रयोगात उणीवा दूर करण्याचा प्रयत्न राहील. - अब्दुल रेहमान वान्नु, ट्रस्टी आयएसपीएस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रायोगिक रेल्वेगाड्या कायम ठेवाव्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रायोगिक तत्वावर नाशिकसाठी सुरू करण्यात आलेल्या गाड्या कायम ठेवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिकरोड-इटारसी, नाशिकरोड- कोलकता, भुसावळ-नाशिकरोड, इगतपुरी-ओढा-इगतपुरी आदी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्यांना थांबे दिले आहेत. या गाड्या कुंभनंतर कायम ठेवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नाशिकला का शक्य नाही?

नाशिकरोडपेक्षा छोट्या असलेल्या अकोल्याहून तिरुपती, हैदराबादला गाडी सुटते. वीस हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेला नगरसूलला सर्व सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. नगरसूलहून नसरापूर, चेन्नई, जालन्याला गाडी सुटते. शिर्डीलाही गाडी जाते. तेथील भाविक त्र्यंबकेश्वर, नाशिकलाही येऊ इच्छितात. त्यामुळे साऊथ सेंट्रलच्या या गाड्या इच्छाशक्ती असल्यास नाशिकलाही येऊ शकतात. चौथ्या स्टेशनमुळे नाशिकरोडहून गाड्या सोडता येतील. मुंबई, नागपूर, कोकणात, गोवा, सावंतवाडीपर्यंत जाण्यासाठी हक्काची गाडी नाशिकरोडहून सोडावी. विदर्भात जाण्यासाठी फक्त गीतांजली आहे. तिचा शेवटचा थांबा कोलकता आहे. त्यामुळे त्यात कायम गर्दी असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‌‌सिंहस्थात टाळा; पशुंची हत्या

$
0
0

पेटाचे फलकाव्दारे भाविकांना आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोवंश हत्या बंदी केल्यानंतर गायींची हत्या तसेच, मांसाहारही केला जात नाही. मग, कोंबडी आणि अन्य प्राण्यांची मांसाहारासाठी हत्या का केली जाते, असा सवाल पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेन्ट ऑफ अॅनिमल्स (पेटा) इंडियातर्फे फलकाव्दारे करण्यात आला आहे. अशा आशयाचे फलक शहरातील विविध ठिकाणी लावून कुंभमेळ्यात मांसाहार टाळण्याचे आवाहन पेटाव्दारे करण्यात येत आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पेटातर्फे जनजागृतीचे असे फलक लावण्यात आले आहेत. कुंभमेळ्यानिमित्त लाखो भाविक नाशिक शहरात येत आहेत. याच उद्देशाने पेटाने जनजागृती अभियान सुरू केले आहे. तसेच, मांसाहारासाठी पशुहत्या करू नका, असे आवाहन केले आहे. हिंदू धर्मात कुंभमेळा हा मोठा धार्मिक सोहळा मानला जातो. गायींना हिंदू पवित्र मानतात. त्यामुळे त्यांची हत्या करून त्याचा मांसाहार करीत नाहीत. त्याचप्रमाणे इतर प्राण्यांची देखील हत्या करून त्यांचे मांसाहार टाळण्याचे आवाहन पेटाने केले आहे.

मांसाहारामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल पेटा इंडियाच्या आहारतज्ज्ञ भुवनेश्वरी गुप्ता यांनी सांगितले की, कोंबड्या देखील गायींप्रमाणे त्यांच्या पिल्लांसाठी प्रत्येक वेळी जागृत आणि कोणत्याही छळाप्रती संवेदनशील असतात. तरीही त्यांना क्रूरतेने आणि अगदी निर्दयीपणे कोणताही दुसरा विचार न करता ठार केले जाते. शाकाहाराचा स्वीकार करून प्राण्यांप्रती, स्वत:प्रती आणि प्राणीमात्राप्रती दया दाखविण्याचे आवाहन देखील गुप्ता यांनी केले. तसेच मांसाहार करण्यासाठी घेऊन जातांना कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या आणि इतर प्राण्यांना वाहनांमध्ये अत्यंत निर्दयीपणे कोंबून नेतात. त्यामुळे गुदमरून त्यांचे प्राण आधीच गेलेले असतात. असे पेटाचे म्हणणे आहे.

मांसाहार करणाऱ्या माणसापेक्षा शाकाहार करणाऱ्या व्यक्ती जास्त तंदरुस्त असतात. तसेच शाकाहार करणाऱ्या व्यक्तिंना हार्टअॅटॅक, डायबिटीज, कॅन्सर यासारखे अन्य आजार होण्याची शक्यता कमीच असते. तसेच हे सर्व आजार झालेल्या व्यक्ती जास्त करून मांसाहार करणाऱ्या असल्याचे आढळले आहे. त्यामुळे शाकाहार करण्याचे आवाहन पेटाने केले आहे.

प्राण्यांचे भक्षण कशासाठी?

शहरात मोक्याच्या ठिकाणी लावलेल्या पेटाच्या फलकांमुळे शहरात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. या फलकावर कोंबडीचे धड आणि गायीचे शीर असलेल्या प्राण्याचे छायाचित्र दाखविण्यात आले आहे. तसेच त्यासोबत 'जर गाय पवित्र म्हणून हत्या केली जात नाही तर इतर प्राण्याचे तरी भक्षण का करता! या आशयाचा संदेश देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतर्गत पार्किंगसाठी राखीव जागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्वणी व्यतिरिक्त रामकुंड परिसरात भाविकांची गर्दी उसळल्यास पार्किंगची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे पोलिस प्रशासनाने बी. डी. भालेकर हायस्कूल मैदान, गोल्फ क्लब मैदान तसेच मेरी मैदान येथील जागा पार्किंगसाठी राखीव ठेवण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे.

सिंहस्थादरम्यान वर्षभर भाविकांचा शहरात ओघ सुरू राहील. शाहीस्नानाचे मुहूर्त वगळता इतर वेळी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून, रामकुंड हेच भाविकांचे श्रध्दास्थान ठरणार आहे. तसेच, साधुग्राममध्येही गर्दी होण्याची शक्यता आहे. साधुग्राममध्ये येणाऱ्या भाविकांसाठी पोलिस प्रशासनाने आठ ते नऊ ठिकाणांवर पार्किंगची सुविधा केली आहे.

याशिवाय घाटाचा वापर देखील वाहनांच्या पार्किंगसाठी होणार आहे. मात्र, रामकुंडाबाबत तशी परिस्थिती नाही. सध्या गाडगे महाराज पुलाजवळच वाहने अडवण्यात येत असून एकादशी, चतुर्थी किंवा इतर महत्त्वाच्या धार्मिक उत्सावावेळी गौरी पटागंण तसेच तपोवनात जाणारा रस्ता वाहनांनी भरून जातो. यानंतरही वाहनांची संख्या वाढल्यास वाहतूक कोंडीसह इतरही प्रश्न उद्भवू शकतात. यामुळे तीन ठिकाणांची पार्किंगसाठी निवड केली आहे.

आणखी तीन ठिकाणी होणार पार्किंग

पोलिसांनी पर्वणी व्यतिरिक्त रामकुंड परिसरात येणाऱ्या वाहनांसाठी बी.डी. भालेकर हायस्कूल मैदान, गोल्फ क्लब मैदान आणि मेरी मैदान ही तीन ठिकाणे निवडली आहेत. त्या अनुषंगाने या मैदानांवर पायाभूत सुविधा पुरविण्याबाबत महापालिकेला पोलिस प्रशासनाने पत्र दिले आहे.

पोलिस प्रशासनाचे पत्र प्राप्त झाले असून, त्या दृष्टीने तीन ठिकाणी पार्किंगबाबतच्या सोयीसुविधा पुरवण्याचे काम हाती घेण्यात येईल. रामकुंडावर येणाऱ्या भाविकांसाठी येथे पार्किंगची सुविधा निर्माण केली जाऊ शकते. - आर. एम. बहिरम, उपायुक्त, महापालिका

रामकुंडावर पर्वणी व्यतिरिक्त येणाऱ्या भविकांची गर्दी वाढल्यास वरील तीन पार्किंगचा वापर केला जाणार आहे. रामकुंड परिसरात वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा नसून, नवीन पार्किंगमुळे वाहतूक कोंडी सारखी समस्या उद्भवणार नाही. या पार्किंगचा वापर कशा पध्दतीने करायचा याचा निर्णय परिस्थितीवर अवलंबून असेल. - पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिकाल भवंतांपासून जीवाला धोका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्रिकाल भवंता आणि धर्माचार्या साध्वी शिवानी दुर्गा संघवाहिनी सरस्वती यांचातील वाद पुन्हा सुरू झाला आहे. त्रिकाल भवंता यांच्यापासून आपल्या जीवास धोका असल्याचे शिवानी दुर्गा यांनी म्हटले आहे.

त्रिकाल भवंता यांनी आजपर्यंत एखादे प्रवचन, सत्संग, धार्मिक मार्गदर्शन केले असल्यास त्याचा व्हिडीओ तसेच छापील पुरावा प्रसिध्दी माध्यमांकडे आणि सोशल मीडियावर जाहीर करावा, असे आवाहन शिवानी दुर्गा यांनी केले आहे. सिंहस्थ कुंभमेळा आणि वाद-विवाद हे ठरलेलेच असते. मात्र, त्यास आता नवीन वळण लागू पहात आहे.

साध्वी शिवाणी दुर्गा यांनी त्रिकाल भवंता या धर्माचा व श्रध्देचा बिझनेस करीत आहेत. त्यांनी आपणास तशी ऑफर दिली होती. मात्र, यातील गैरप्रकार आपणास वेळीच लक्षात आला. कुंभमेळा ही त्यांच्या व्यवसायास मोठी बाजारपेठ असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. यामुळे आपण वेळीच सावध झालो. जानेवारी २०१५ मध्ये प्रथम त्या आपल्या आश्रमात येवून भेटल्या व त्यांनी आपणास येणारा कुंभमेळा ही चांगली संधी आहे, असेही सांगितले होते, असे शिवानी दुर्गा यांनी नमूद केले. कुंभमेळयात ढोंगी साधू आपल्या संस्कृती परंपरेस बदनाम करीत आहेत. तसे होऊ नये म्हणून आपण स्वतःस साध्वी म्हणविणाऱ्या त्रिकाल भवंता यांचा भांडाफोड केला, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवानी दुर्गांचे त्रिकाल भवंतांना पाच प्रश्न

> स्वतःला साध्वी म्हणविणाऱ्या त्रिकाल भवंता यांचे गुरू कोण आहेत?

> गुरू-शिष्य परंपरा कोणती आहे?

> कोणत्या आखाड्याशी संबंधित आहे?

> संन्याशी दीक्षा केव्हा घेतली?

> धर्मशास्त्रचे अध्ययन केले असेल तर धर्मप्रचार व प्रसारकरिता कसा व कुठे वापर केला आहे?

या प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे देवू शकत नसतील तर, त्रिकाल भवंता यांनी भाविकांची फसवणूक करण्यापेक्षा कुंभमेळा सोडून जावे, असे शिवानी दुर्गा यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ सज्ज ‌

$
0
0

सिंहस्थासाठी २०० हरित बस; प्रवाशांसाठी विविध सुविधांची व्यवस्था

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे. 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद घेऊन प्रवासी सेवेचा अविरत ध्यास घेतलेली राज्य मार्ग परिवहन महामंडळाची 'एसटी' सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.

आपत्कालीन परिस्थितीतील दुरुस्ती यंत्रणा, नूतनीकरण केलेली बसस्थानके 'एस.टी.' ने उपलब्ध करून दिले आहेत. एस.टी.च्या माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगली सुविधा मिळावी यासाठी तीन हजार बसेसचे नियोजन करण्यात आले असून, या बसेसकरिता सहा हजारपेक्षा अधिक वाहक-चालक, पर्यवेक्षक, कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. पर्वणीकाळात प्रत्येक बस दर ८ ते १० तासात स्वच्छ होईल यावरही महामंडळाचा विशेष भर राहणार असून, हरितकुंभाची संकल्पना ध्यानात घेऊन बसस्थानकांच्या स्वच्छतेवरही लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक बाह्य वाहनतळावर बस दुरुस्तीची कार्यशाळा आवश्यक त्या यंत्रांसह कार्यन्वित केली जाणार असून, याच ठिकाणी कर्मचाऱ्यांना विश्रांती कक्ष, शुद्ध पाणी, स्वच्च्छतेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नाशिकरोड आगाराचे काम पूर्ण झाले असून, महामार्ग बसस्थानकाचे तसेच त्र्यंबकेश्वर येथील जव्हार फाटा बसस्थानकाचेही नूतनीकरण केले आहे. सात बसस्थानकांवर कायमस्वरुपी सीसीटीव्ही लावले आहेत.

पर्वणी काळात एका दिवसासाठी १०० रुपये शुल्क भरून पर्वणी पास प्रवाशांना घेता येईल. या पासद्वारे दिवसभर नाशिक, त्र्यंबक शहरांतर्गत ठिकाणी तिकीट न काढता भाविकांना प्रवास करता येईल. त्याशिवाय नाशिक, शिर्डी, सप्तशृंगीगड, भीमाशंकर आदी ठिकाणी जाण्यासाठी ८४७ रुपये भरून चार दिवस प्रवासाचा पास देखील दिला जाणार आहे. राज्यातील सर्व बसस्थानकांवर हे पास प्रवाशांना उपलब्ध होतील. धार्मिक, पर्यटनस्थळे पाहण्यासाठी ४०-५० प्रवाशांच्या गटाने जर एकत्र बसचे आरक्षण केल्यास लगेच बस पुरविण्यासाठी 'कोठूनही कोठे' प्रवास संकल्पना कार्यन्वित केली जाणार आहे. प्रवासाच्या एक दिवस अगोदर राज्यात कुठल्याही आगारात हे आरक्षण करता येईल, असे विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले.

माहिती कक्षही सुरू

एस.टी. महामंडळाच्या वतीने नाशिकरोडला 'माहिती कक्ष' कार्यन्वित करण्यात येणार असून, २३१८३०८ या क्रमांकावर कुठूनही संपर्क साधल्यास कुंभमेळ्याची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील हरितकुंभ संकल्पनेबद्दल जनजागृतीसाठी पोपटी रंगाच्या नव्या २०० बसेस रस्त्यावर धावत असून, प्रवाशांसाठी त्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या आहेत. कुंभमेळ्यात सेवाभावी परंपरा आणि सूक्ष्म नियोजनातून प्रवाशांना सुखद धक्का देऊन 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद सार्थ ठरविण्यासाठी एस.टी. ने सूक्ष्म नियोजन केले आहे.



या सुविधा मिळणार

> प्रवाशांच्या माहितीसाठी अद्ययावत 'माहिती कक्ष

> नाममात्र दरात पर्वणी पासेस

> चार दिवस प्रवासाचा पास

> बस पुरविण्यासाठी 'कोठूनही कोठे' प्रवास संकल्पना

> राज्यात कुठल्याही आगारात आरक्षणाची सुविधा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मेट्रों’साठी कांदा होलसेल दरात

$
0
0

नाफेडचा अडीचशे टन कांदा रवाना; सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

महानगरांमधील किरकोळ बाजारात कांद्याने अर्धशतकाचा आकडा गाठल्याने अखेर या वाढीव दरावर काहीसे नियंत्रण यावे, यासाठी केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा मेट्रो शहरामध्ये पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी बारा गाड्यांमधून कांदा रवानाही करण्यात आला आहे.

सध्या कांदा चांगलाच भाव खात आहे. यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचे दर चाळीस ते पन्नास रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. याची दखल घेत सरकारने ग्राहकांना कमीत कमी भावात कांदा उपलब्‍ध करून देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. यासाठी कांद्यावरील निर्यातमूल्य आधीच वाढविले आहे. आणिबाणीच्या काळात कांदा उपलब्‍ध व्हावा, यासाठी सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी करून ठेवला आहे. आता कांद्याचे दर वाढल्याने सरकारतर्फे नाफेडचा कांदा बाजारात उपब्लध करून दिला जात आहे.

किरकोळ बाजारात कांद्याने पन्नाशी ओलांडल्याने टंचाई असलेल्या दिल्लीसह इतर शहरांमध्ये कांद्याचे दर हे स्थिर रहावे याकरिता हा नाफेडने खरेदी केलेला कांदा पाठविण्यात येणार आहे. आतपर्यंत १२ गाड्यांमधून २४० टन कांदा रवाना झाला आहे. केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून मे व जून २०१५ मध्ये २५०० टन कांदा हा लासलगाव आणि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून खरेदी करून वेअर हाऊसमध्ये साठवला आहे. नाफेडला केंद्र सरकारकडून आठ शहरामध्ये कांदा पुरवठा करण्याची सूचना मिळाली आहे. त्यानुसार लासलगाव आणि पिंपळगाव बसवंतमधून कांदा पाठवण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. नाफेडच्या माध्यमातून हा कांदा १५ ते १६ प्रती किलो या दराने खरेदी करण्यात आला असून, तो कांदा आता दिल्लीमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे.

२४ रुपये दराने मिळणार कांदा

सर्व खर्चांसह २३ ते २४ रुपये होलसेल दरात हा कांदा राजधानीत धडकणार आहे. सध्या व्यापाऱ्यांचा कांदा हा ३० ते ३२ रुपये होलसेल दराचा आहे. त्या तुलनेत ७ ते ८ प्रती किलो दराने हा कांदा ग्राहकांना कमी दरात उपलब्ध होणार असल्याचे नाफेडचे संचालक तथा लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाचे गाळे पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

नाशिक महापालिकेने उभारलेल्या अनेक वास्तूंचा वेळेवर लिलाव न झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. गंगापूर रोडवरील आनंदवल्ली गावातील महापालिकेच्या गाळ्यांचा निव्वळ वीज जोडणी नसल्यामुळे अद्याप लिलाव होऊ शकेलेला नाही. विशेष म्हणजे १० वर्षांपासून हे गाळे धूळखात पडून आहेत.

महापालिकेने शहरात नाशिकरोड, पंचवटी, मध्य नाशिक, सिडको व सातपूर भागात उभारलेले व्यापारी गाळे नेहमीच वादात राहिली आहेत. यात अनेक ठिकाणचे लिलाव महापालिकेने केले खरे, परंतु वादात झालेल्या लिलावांमुळे काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी लिलाव लावलेले गाळेच ताब्यात घेतलेले नाहीत. याउलट आनंदवल्ली गावात महापालिकेने ३२ गाळ्यांची उभारली केली आहे. यात आठ महिन्यापूर्वी महापालिकेने ३२ गाळ्यांचा लिलाव केला होता. परंतु, संबंधित गाळे धारकांना वीज कनेक्शन उपलब्ध नसल्याने लिलावात गेलेले गाळे व्यापाऱ्यांच्या ताब्यातच देण्यात आलेली नाहीत. यामुळे मात्र लिलाव होऊन केवळ वीज कनेक्शन न मिळाल्याने महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महापालिकेने उभारलेल्या या गाळ्यांमध्ये गावातील स्थानिक व्यवसायिकांसाठी देखील गाळे राखीव ठेवण्यात आले आहेत. परंतु, स्थानिक गाळेधारकांना भाडे किती असणार, याची रक्कम ठरली नसल्याने तोही वादाचा विषय आहे. मात्र, महापालिकेने लिलाव होतात वीजेचे कनेक्शन तत्काळ उपलब्ध केले असते तर महापालिकेच्या तिजोरीत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले असते.

याबाबत महापालिकेचे उपायुक्त रोहिदास बहिरम यांना विचारले असता त्यांनी देखील वीज कनेक्शन नसल्याने लिलावात दिलेल्या गाळ्यांचा ताबा व्यापाऱ्यांना दिला नसल्याचे सांगितले. यासाठी महापालिका आयुक्तांनी वीज कनेक्शन उपलब्ध करून लिलावात दिलेल्या गाळ्यांचा ताबा देण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे. या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते, असेही मत व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’साठी उसळली गर्दी

$
0
0

नाशिकरोडच्या शाळांमध्ये आधारकेंद्राची वाढती मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड सेतू कार्यालयावर मंगळवारी अचानक पालकांची गर्दी उसळली. दुप्पट अर्ज स्वीकारूनही पालकांनी कार्यालयाचा फलक प्रचंड गोंधळ घातला व मोर्चा काढला. अखेर सर्व नागरिकांचे अर्ज कार्यालयाने स्वीकारले. दरम्यान, शाळांमध्येच आधारकार्डची सोय करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने बालवाडीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आधारकार्ड सक्तीचे केल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. आधीच संख्येने कमी असलेल्या सेतू कार्यालयात नागरिकांची गर्दी होत असताना आता पालकांची भर पडली आहे. नेते व समाजकंटकांच्या मारहाणीमुळे शहरातील सेतू कार्यालये व आधारकार्ड केंद्र बंद पडू लागली आहेत.

शाळांमुळे ताण-तणाव

नाशिकरोडला महापालिकेत आधारकार्ड केंद्र सुरू झाले होते. मात्र, तेथील कामगारांना मारहाण केल्यामुळे हे केंद्र बंद पडल्याने नागरिकांचा मोर्चा महसूल कार्यालयाशेजारील सेतू कार्यालयाकडे वळाला. तेथे लांबचलांब रांगा असतानाच पालकही आल्याने सेतू कार्यालयावर प्रचंड ताण आला. शाळांना आधारकार्डसाठी ३१ आगस्टपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे मंगळवारी पहाटे चारपासूनच काही पालकांनी रांग लावली. मंगळवारी फक्त अर्ज स्वीकारले जातात. नंतर दररोज सुमारे दोनशे आधारकार्डाचे काम केले जाते. मात्र, अचानक हजारपेक्षा अधिक नागरिक जमा झाल्याने कार्यालयात धक्काबुकी, गोंधळ झाला.

मशिन व मनुष्यबळ हवे

आधारकार्डाचे जिल्हा समन्वयक अनिल घोलप म्हणाले, की नाशिकरोड सेतू कार्यालयात एका खोलीत चालते. येथे फक्त दोन कर्मचारी आणि दोन मशिन आहेत. सुटीच्या दिवशी राबूनही काम पूर्ण करणे अशक्य झाले आहे. एक महिन्यापासून लोड प्रमाणाबाहेर वाढला आहे. मशिन्स व मनुष्यबळ त्वरित वाढवून मिळाल्यास समस्या सुटेल.

पालक पहाटेपासून रांगेत उभे आहेत. घरची कामे सोडून चार तास उभे राहिल्याने पाय दुखायला लागलेत. आधारकार्डासाठी शाळांना मुदतवाढ द्यावी. - रागिनी पवार, पालक

सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत मुलांच्या आधारकार्डासाठी मुदत दिली आहे. ९० टक्के मुलांचे आधारकार्ड बाकी आहे. पालक व मुलांची ओढाताण कमी करण्यासाठी प्रत्येक शाळेत केंद्र सुरू करावे. - दत्तात्रय धात्रक, संस्थापक, धात्रक शिक्षण संस्था

सेतू कार्यालयाची व त्यातील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. शाळांमध्येच आधारकार्डाची सोय केल्यास प्रश्न सुटेल. शासनाने आधारकार्डासाठी मुदतवाढ दिली नाही तर तीव्र आंदोलन छेडू. - जगन गवळी, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसा होणार निर्मल कुंभमेळा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

गोदावरी नदीच्या प्र‍दूषणावरून साधू महंत आणि सामान्य भाविकांकडून जिल्हा प्रशासनावर वारंवार तोंडसुख घेतले जाते. मात्र, भाविकांकडून गोदापात्रात सर्रास निर्माल्य अर्पण केले जात असल्याने कसाकाय निर्मळ कुंभमेळा पार पडणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकसह संपूर्ण देशभरातून दररोज लाखो भाविक येत आहेत. यातील बहुतांश भाविक विविध धार्मिक विधी करतांना दिसतात. त्यामुळे पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी गोदावरी नदीपात्रात दिवे, सुकलेली किंवा ताजी फुले सोडू नका, असे आवाहन भाविकांना वेळोवेळी केले जाते. मात्र, धार्मिक विधीच्या नि‌मित्ताने भाविक नदीपात्रात फुले आणि दिवे अर्पण करीत आहेत. यामुळे गोदापात्र प्रदूषित होत आहे. मात्र, याकडे भाविकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतांना कुणीही दिसत नाही.

सध्या भाविकांची संख्या वौत असल्याने गोदापात्रावर ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले निर्माल्य कलश अपुरे पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. निर्माल्य कलश वाढविण्याची गरज आहे. तसेच महापालिकेने दररोज दिवसातून किमान दोन वेळा घंटागाडी आणून ते कलश रिकामे करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

येथे कलशांची गरज

मालेगांव बसस्थानक, पोलिस चौकी, गंगा गोदावरी माता मंदिर, वस्त्रांतरगृह, जुना भाजीबाजार, देवी मंदिर, कपालेश्वर मंदिर, साईबाबा मंदिर, देवमामलेदार मंदिर आणि पंचवटीतील सर्व पुलांजवळ दोन्ही बाजुंनी निर्माल्य कलश ठेवण्याची गरज आहे. तसेच रामकुंडापासून तपोवनापर्यंत कलश ठेवावे. साधुग्राम मध्येही चौकाचौकात कचरा जमा करण्यासाठी कुंड्यांची गरज भासत आहे. जागोजागी निर्माल्य कलश ठेवल्यास नदीपात्रात टाकले जाणारा कचरा कमी होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिसांची हुकूमशाही गर्दी

$
0
0

नसतांनाही रोखली औरंगाबाद नाक्यावरील वाहतूक; नागरिकांना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांनी औरंगाबाद नाका ते निलगिरी बाग हा महामार्ग मंगळवारपासून वाहतुकीसाठी बंद केला. परिणामी वाहनधारकांना रासबिहारी चौक, बी. डी. कामगारनगरला सुमारे तीन किलोमीटरचा वळसा मारून नाशिक किंवा धुळ्याकडे जावे लागत आहे.

तपोवन परिसरातही सर्वच मार्गांनी येणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. त्यासाठी रस्त्यांवर बॅरीकेट्स उभे करण्यात आले आहेत. सध्या आवश्यकता नसताना किंवा तपोवनात भाविकांची फारशी गर्दी नसतानाही रस्ता बंद का? व पर्यायी मार्गांचे दिशादर्शन करण्यासाठी औरंगाबाद नाक्यासारख्या ठिकाणी पोलिस नेमण्याचे सौजन्यही पोलिस अधिकाऱ्यांकडून दाखविण्यात आलेले नाही. पोलिसांचा मनमानी कारभार आणि अधिकारांच्या गैरवापरामुळे वाहनधारकांच्या वेळेचा तसेच इंधनाचा अपव्यय तर होतोच; परंतु त्याचबरोबर त्यांना मनस्तापही सहन करावा लागत आहे.

मर्जीतील वाहनांसाठी नियम धाब्यावर

औरंगाबाद रोडवरील निलगिरीबाग परिसर असो अथवा तपोवनातील लक्ष्मीनारायण मंद‌िरासमोरील परिसर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तासाठी पोलिस नेमण्यात आले आहेत. मात्र, या पोलिसांच्या परिचयाचा वाहनधारक आला की त्याच्यासाठी बॅरीकेट्स बाजूला हटवून वाहनासाठी रस्ता खुला केला जातो. अन्य वाहनधारकांना मात्र फेरा मारून जाण्यास सांगितले जाते. वाहनधारकांशी सौजन्याने बोलण्याची तसेच त्यांच्या शंकांचे ‌योग्य पद्धतीने निरसन करण्याची तसदी पोलिसांकडून घेतली जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

अवैध प्रवासी वाहतुकीला अभय

लक्ष्मीनारायण मंद‌िरापासून तपोवनात जाण्यासाठी अन्य वाहनांना प्रवेशबंद असला तरी रिक्षावाल्यांना जाता यावे. यासाठी बॅरीकेट्सच्या बाजूने थोडी जागा ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे अन्य वाहनधारकाने तेथून जाण्याचा प्रयत्न केल्यास कर्तव्यदक्ष पोलिस त्याला हटकतात. परंतु, रिक्षाचालक फ्रंटशीट घेऊन खुलेआम अवैध प्रवासी वाहतूक करीत असले तरी त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. रिक्षावाल्यांना अभय का दिले जातो याची चौकशी पोलिस आयुक्तांनी करायला हवी अशी नागरिकांची मागणी आहे.

हे मार्ग वाहतुकीसाठी बंद

> स्वामीनारायण पोलिस चौकी ते निलगिरीबाग (औरंगाबाद रोड)

> तपोवन क्रॉसिंग ते तपोवन (साधुग्राम)

> मारुती वेफर्स ते तपोवन (साधुग्राम)

> मिर्ची हॉटेल चौफुली ते स्वामीनारायण चौक व साधुग्राम

> पंचवटी कॉलेज ते तपोवन व साधुग्राम

> कन्नमवार पुलाखालून ते साधुग्राम

> नवीन टाकळी घाट संगम (पूल) ते मिर्ची हॉटेल चौफुली

> के. के. वाघ ते स्वामीनारायण पोलिस चौकीपर्यंत सर्व्हिस रोड व आग्रा महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक उड्डाणपूलावरून व पूलाखालून आग्रारोडने जाऊ शकेल.

> मुंबई नाशिककडून औरंगाबादकडे जाणारी वाहने धुळे रोडने जत्रा हॉटेलपासून नांदूरनाका मार्गे जाऊ शकेल.

> टाकळीगाव परिसरातून धुळे, मुंबईकडे जाणारी वाहने तपोवनकडे न जाता आग्रारोड टाकळीफाटा मार्गे जातील.

> औरंगाबादकडून नाशिककडे येणारी वाहने निलगिरीबाग येथून उजवीकडे वळून रासबिहारी चौक व बी. डी. कामगार नगरमार्गे धुळे, मुंबई, नाशिककडे जाऊ शकतील. औरंगाबादकडून पुणे, नाशिककडे जाणारी वाहने नांदूरनाका येथून डाव्या बाजूने जेलरोडमार्गे जाऊ शकतील.

रामकुंड परिसरातही वाहनबंदी

> मालेगाव स्टँड ते रामकुंड

> इंद्रकुंड ते रामकुंड

> मतेवाडा ते कपालेश्वर मंद‌िर

> मालवीय चौक ते सरदार चौक

> काळाराम मंदिर दक्षिण दरवाजा ते सरदार चौक व काळाराम मंद‌िर उत्तर दरवाजा ते शनिमंद‌िर कपालेश्वर

> गाडगे महाराज पूल ते मालेगाव स्टँड

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग...

> काट्या मारुती ते नागचौक, गजानन चौक, सेवाकुंज, दिंडोरी नाक्याकडे जातील.

> रामकुंडाकडे येणारे भाविक वाहने काट्यामारुती गणेशवाडी, आयुर्वेदिक कॉलेज या मार्गानी येऊन रोकडोबा पटांगण, - श्रध्दा लॉन्स, अमरधाम रोड च्या दोन्ही बाजूच्या लेनवर पार्किंग करून पायी रामकुंडावर जातील.

> परतीच्या मार्गासाठी गौरी पटांगण, देवी चौक, गणेशवाडी, काट्यामारुती चौक किंवा गौरी पटांगण-अमरधाम या मार्गाने मार्गस्थ होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉटर ग्रेसवरून प्रशासन तोंडघशी

$
0
0

वॉटरग्रेस ब्लॅकलिस्टेडच; आयुक्तांचे स्थायीला पत्र

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममधील स्वच्छतेचा साडेपाच कोटी रुपयांचा वादग्रस्त ठरावाचा वाद शमण्याची शक्यता आहे. वॉटर ग्रेस कंपनी ब्लॅकलिस्टेड असल्याचा खुलासा आयुक्तांनी केला आहे. स्थायी समिती सभापतींना दिलेल्या पत्रात संबंधित ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्ट यादीतून बाहेर काढण्याचा ठराव झाला असला तरी त्याला प्रशासकीय मान्यता नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे वॉटरग्रेस संदर्भातील स्थायी समितीची भूमिका योग्य असल्याचे समोर आले आहे. प्रशासन या प्रकरणात आता उघडे पडले आहे. वॉटर ग्रेस कंपनीला प्रशासनाकडून अनेक फायदे पोहचवण्यात आल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे.

साधुग्राममधील स्वच्छतेच्या साडेपाच कोटींच्या ठेक्यावरून गेल्या महिनाभरापासून स्थायी समिती, प्रशासन आणि न्यायालयात वाद सुरू आहेत. निविदा प्रक्रियेत सर्वाधिक कमी दरकराराची निविदा असणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनीला ब्लॅकलिस्ट असल्यावरून ठेका न देता, दुसऱ्या क्रमांकाच्या क्रिस्टल एजन्सीला काम देण्याचा ठराव केला होता. स्थायी समितीच्या या निर्णयाविरोधात वॉटर ग्रेस कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपण ब्लॅकलिस्टेड नसल्याचे आणि घंटागाडीचा ठेका चालवत असल्याचा दाखला दिला होता. त्यावरून न्यायालयाने या ठेक्याला स्थगिती दिली होती. त्यामुळे स्थायीच्या कारभारावरच संशय निर्माण झाला होता. यावरून गेल्या पंधरा दिवसांपासून स्थायी विरूद्ध असा आयुक्त असा वाद रंगला आहे.

प्रशासन वॉटर ग्रेसला मदत करीत असल्याने चिडलेल्या स्थायी समिती सभापतींनी वॉटर ग्रेस संदर्भात आयुक्तांना थेट पत्र लिहून ब्लॅकलिस्टेड संदर्भात प्रश्न विचारले होते. मंगळवारी अतिरिक्त आयुक्तांना पत्र लिहून वॉटर ग्रेस संदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला ९५ लाखांचे जादा सेवाशुल्क दिल्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे.

सोबतच स्थायी समितीने १८ जून २००९ रोजी वॉटरग्रेसला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढण्याचा ठराव केला आहे. तथापि प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने नमूद केले आहे. तसेच रॉयल्टी २२ टक्क्यांवरून १५ टक्के करण्यासंदर्भात व कराराची मुदत वाढ करण्यासंदर्भात स्थायी समिती व महासभेचा कोणताही ठराव नाही. मात्र, करारात बदल करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आलेले असले तरी त्याला मान्यता घेण्याचे तत्कालिन शहर अभियंत्यांना दिलेल्या आदेशाची अंमलबाजवणी झाली नसल्यचा खुलासा अतिरिक्त आयुक्तांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत आता प्रशासनच तोंडघशी पडले आहे.

दबावानंतर प्रशासनाचे उत्तर

वॉटरग्रेस कंपनीला घंटागाडीच्या ठेक्याला मुदतवाढ देण्यासाठी रविवारचा दिवस निवडणाऱ्या तत्पर प्रशासनाने सभापती शिवाजी चुंभळे यांच्या पत्राला पाच दिवस उत्तर दिले नाही. सभापतींनी ३१ जुलै रोजी पत्र दिले होते. मात्र, सभापतींच्या पत्रामुळे प्रशासनच अडचणीत येणार असल्याचे लक्षात आल्यानंतर उत्तर देण्यास टाळाटाळ केली जात होती. मात्र, शेवटी मंगळवारी सभापतींनी पत्र दिले नाही तर माध्यमांकडे जाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाने घाईघाईत पत्राला उत्तर दिले. सायंकाळी पत्र सभापतींच्या हातात टेकवले. या पत्रात आयुक्तांनी थेट प्रशासनाच्याच चुका उघड केल्याने स्थायी समितीचा वॉटरग्रेस संदर्भातील स्टॅन्ड योग्य होता, असे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदाजपत्रक आले अडचणीत

$
0
0

एलबीटी निर्णयाचा महापालिकेला फटका; ३३२ कोटींची स्थायीची वाढही होणार रद्द

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने एलबीटी अंशतः रद्द केल्याने महापालिकेच्या अंदाजपत्रकावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. एलबीटीमुळे तब्बल ४५० कोटींचा फटका महापालिकेला बसणार असल्याने अंदाजपत्रकाची नव्याने आखणी करावी लागणार आहे. सोबतच सिंहस्थाच्या कर्जाचा आर्थिक भारही आल्याने आणि उत्पन्न थेट ५५ टक्के कमी होणार असल्याने पालिकाच आर्थिक खाईत लोटली जाणार आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या अंदाजपत्रकाला लगाम लावावा लागणार आहे.

राज्य सरकारने एलबीटी वसुलीत बदल केल्याने आता महापालिकेत तब्बल ३२ हजार व्यापाऱ्यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. ५० कोटींची उलाढाल असणारे शहरात ९१ व्यापारी आणि उद्योजक असून, त्यांच्याकडून सरासरी महिन्याला १५ कोटींच्या आसपास एलबीटी मिळणार आहे. तर दर महिन्याची एलबीटी सरासरी ६० कोटी रुपये आहे. त्यामुळे दरमहा ४० ते ४५ कोटींची तिजोरीत तूट येणार आहे. महापालिकेचाच बांधिल खर्च दरमहा सरासरी ३५ कोटी आहे. त्यामुळे बांधिल खर्चासाठीच २० कोटींची तूट येणार आहे. यासाठी महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग महापालिकेकडे सध्या तरी उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या पाइपलाइनमध्ये असलेले २१८६ कोटींचे अंदाजपत्रकही अडणचणीत आले आहे. एलबीटीची साडेसातशे कोटी आवक गृहीत धरून हे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र, त्यात साडेचारशे ते पाचशे कोटींची तूट येणार असल्याने अंदाजपत्रकाचे नियोजन कोलमडणार आहे. त्यातच स्थायी समितीने या अंदाजपत्रकात तीनशे कोटींची भर घातली आहे. एकीकडे निधीत कपात, तर दुसरीकडे अंदाजपत्रकात वाढ झाल्याने हे अंदाजपत्रक प्रशासनाला राबविणे डोईजड होणार आहे.

महापालिकेच्या महासभेत त्याला मंजुरी दिली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच एलबीटी बंद झाल्याने आहे त्यास्थितीत त्याला मंजुरी देण्याचे मोठे आव्हान आहे. अडीच हजार कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिल्यास महापालिका आर्थिक बोज्याखाली दबली जावू शकते. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडला आहे. त्यातच सिंहस्थाचे चारशे कोटींचे कर्ज कसे फेडावे, हाही प्रश्न आ वासून उभा आहे. या कर्जाचा दरमहा हफ्ता देण्याचे आव्हान असतांना कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचीही ऐपत महापालिकेची राहणार नाही. त्यामुळे पालिकेला राज्य सरकारच्या अनुदानावरच अवलंबून रहावे लागणार आहे.

कर्जाचा डोंगर अन् कठीण समय

सिंहस्थ कुंभमेळा विकास आराखड्यातील राज्य शासनाच्या वाट्याच्या ६६९ कोटींपैकी केवळ ४८७ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला आतापर्यंत दिला आहे. यातील महापालिकेच्या वाट्याची २३० कोटी रुपयांची तरतूद करण्यासाठी मंजूर ४०० कोटींच्या कर्ज उभारणीतील २६० कोटी तत्काळ उचलावे लागणार आहे. अशा प्रकारे सिंहस्थानिमित्त कर्जाचा डोंगर उभा राहत असतानाच आता एलबीटीचा फटका बसणार आहे. परिणामी येणाऱ्या काळात महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. कर्जाचा बोजा आणि सिंहस्थ निधीतील २५ टक्के वाटा उपलब्ध करणेही महापालिकेला अवघड जाणार आहे. सिंहस्थ विकासकामांसाठी महापालिकेचा हिस्सा असलेली रक्कम आणि महापालिकेच्या विकासकामांसाठी शिल्लक असलेल्या कर्जाचे २०५ कोटी रुपये उचलण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विशेष मुलांना ‘मोबाइल टीचर’ची साथ

$
0
0

शिक्षण मंडळाचा अभिनव उपक्रम; मदरशांसाठीही राबविणार संकल्पना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विजयला शाळेत जायची इच्छा आहे, मात्र, तो विशेष गरजा असलेल्या अपंगात मोडत असल्याने त्याला शाळेपर्यंत येता येत नाही... नुकत्याच झालेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्व्हेक्षणात विजयचीही नोंदणी झाली. अशा मुलांसाठी महापालिकेच्या शिक्षण मंडळाने सोडविण्याचा प्रयत्न केला असून, शिक्षक आता त्याला शिकविण्यासाठी थेट त्याच्या घरी जाणार आहेत. मोबाइल टीचर संकल्पना मदशांमधील मुलांसाठीही राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील, अशी आशा आहे.

राज्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी नुकतेच राज्यात सर्व्हेक्षणाची मोह‌ीम राबविण्यात आली. या मोह‌िमेत महापालिका क्षेत्रात १०५७ मुले ही शाळाबाह्य आढळली. या मुलांना शाळेत दाखल करून घेण्याची मोहीम सध्या शिक्षण विभागाकडून राबविली जात आहे. मात्र यातील बहुसंख्य मुले ही अपंग आणि मदरशांमधील आहेत. १०५७ पैकी ५१ मुले ही पूर्णतः अपंग असून, ती शाळेपर्यंत येऊ शकत नाहीत. तर मदरशांमध्ये २२१ मुले असल्याने त्यांना शाळेत दाखल करून घेण्यास मदरशांनीच नकार दिला आहे. त्यामुळे अशा २७२ मुलांसाठी शिक्षण मंडळाने मोबाइल ट‌ीचरचा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष गरजा असलेल्या या अपंग मुलांना आठवड्यातून दोनदा त्यांच्या घरी जाऊन महापालिकेचे शिक्षक शिक्षणाचे धडे देणार आहेत. तर मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या २२१ मुलांना मदरशांमध्येच इंग्रजी, गण‌ित आणि सायन्सचे शिक्षण देण्याचा शिक्षण मंडळाने निर्णय घेतला आहे.

महापालिकेचे शिक्षक मदरशांमध्ये जाऊन त्यांना या तीन विषयांचे धडे देणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे धार्मिक शिक्षणासोबतच व्यावहारिक शिक्षणही पूर्ण होणार आहे. सोबतच सहावीनंतर या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या उर्दू शाळांमध्ये दाखल करून घेतले जाणार आहे. त्यामुळे या वंचित मुलांनाही या अभिनव उपक्रमामुळे शिक्षणाची सुविधा मिळणार आहे. दरम्यान, महापालिकेने आतापर्यंत ३७९ शाळाबाह्य मुलांना आतापर्यंत शाळेत प्रवेश दिला आहे. तर ८० मुले ही स्थलांतर‌ित झाली आहेत.

शाळाबाह्य मुलांच्या सर्व्हेक्षणात आढळलेली विशेष गरजा असलेली अपंग आणि मदरशांमधील मुले शिक्षणापासून वंच‌ित राहू नये, यासाठी मोबाइल टीचरचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. - उमेश डोंगरे, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतीच्या शाहीमार्गातही करणार बदल?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी परिसरात असलेल्या धोकेदायक वाड्यांमुळे शाही मिरवणुकीला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने परतीच्या शाहीमार्गातही बदल करण्याची तयारी प्रशासनाने सुरू आहे. या निर्णयाला अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराजांनीही सहमती दिली असून, या प्रस्तावावर सध्या प्रशासनातर्फे खल सुरू आहे. या नव्या परतीच्या शाहीमार्गाची घोषणा लवकरच केली जाणार आहे.

नव्या शाहीमार्गापाठोपाठ आता परतीचा मार्गही बदलला जाणार आहे. सद्यस्थितीत कपालेश्वर मंद‌िर, खांदवे सभागृह, मालवीय चौक, पाथरवट लेन, जुना आडगाव नाका असा परतीचा मार्ग राहणार आहे. मात्र या मार्गावर अनेक ठिकाणी धोकेदायक वाडे व इमारती आहेत. दुर्घटनेची भीती असल्याने महंत ग्यानदास महाराज यांना प्रत्यक्ष घटनास्थळीची परिस्थिती समजावून सांगण्यात आली आहे. त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या बदलाला संमती दिली आहे. त्यामुळे परतीचा शाहीमार्ग हा इंद्रकुंड, पंचवटी कारंजा, निमानी बसस्थानक आणि आडगाव नाका असा राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांची रस्ते कोंडी

$
0
0

नाशिक-औरंगाबाद हायवेसह १५ रस्ते केले बंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याची पोलिसांनीच जरा अधिक धास्ती घेतल्याचे चित्र सध्या शहरात आहे. कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही पर्वणीला अजून २५ दिवसांचा कालावधी असताना वाहतूक पोलिसांनी शहरातील नाशिक-औरंगाबाद हायवेसह १५ रस्ते चक्क बंद केले आहेत. आश्चर्य म्हणजे वाहतूक मार्गात बदल करण्याची पूर्वसूचना नाशिककरांना द्यायला विसरलेल्या पोलिस प्रशासनाने दोन दिवसांनी त्याची जाहीर नोटीस काढली. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या कार्यकाळात हा अजब कारभार सुरू झाल्याने वाहतूक पोलिसांच्या हुकुमशाहीवर नाशिककर संतापले आहेत. नाशिककरांचा ग्रामोउत्सव असलेल्या सिंहस्थासाठी पोलिस नागरिकांचे सहकार्य अपेक्षित धरतात मात्र कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय त्यांचीच कोंडी करीत असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा अनुभव सध्या शहरवासी घेत आहेत. सिंहस्थाच्या नावाखाली आपण केलेला कोणताही बदल नागरिकांकडून स्वीकारला जाईल या विश्वासाने पोलिसांकडून अनपेक्षित बदल अक्षरश: लादण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. गोविंदनगर अंडरपास येथे किमान एकेरी वाहतूक सुरू करावी असा जनरेटा विविध उपाययोजनांच्या माध्यमातून लावण्यात आला असला तरी अंडरपासची रुंदी वाढविण्याच्या अवास्तव उपायावर अडून पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी आपल्या कोर्टातील चेंडू आता महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोर्टात टोलविला आहे. सूचनांचा अंगीकार करायचाच नव्हता तर त्या मागितल्या तरी कशाला असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे. बरे, अंडरपास बंद केल्यानंतर नागरिकांनी जेव्हा मोहीम उघडून सूचनांचा पाऊस पाडण्यास सुरूवात केली तेव्हा पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सूचना व हरकती मागविल्या. वरातीमागून घोडे हा प्रकार पोलिसांकडून रस्ते बंद बाबतही अवलंबला सुरूच असून त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत.

२० सप्टेंबरपर्यंत सासुरवास !

तपोवन परिसरातच नव्हे तर रामुकंड आणि गाडगे महाराज पुलापर्यंतच्या परिसरातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत. विशेष म्हणजे २० सप्टेंबरपर्यंत (तब्बल दीड महिना) हे बदल कायम राहणार असून, स्थानिक नागरिकांना त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. तीन पर्वणींच्या कालावधीत नऊ दिवस हे रस्ते बंद ठेवण्यास विरोध नसला तरी दीड महिना आम्ही त्रास का सहन करावा असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थात संघ परिवार जपणार सेवाभाव

$
0
0

सुकाणू समितीची स्थापना; हजारो स्वयंसेवक राहणार कार्यरत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाचे आव्हान पेलताना विविध सामाजिक संघटनांपाठोपाठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या मोहिमेत प्रवेश केला आहे. गत सिंहस्थातील कार्याचा अनुभव गाठीशी असताना यंदाच्या सिंहस्थासाठीही संघ परिवारातील संघटनांनी विशेष नियोजन केले आहे. संघाच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळा सुकाणू समिती तयार करण्यात आली आहे.

ज्येष्ठ स्वयंसेवक रमेश तथा दादा गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद एकनाथ कुलकर्णी हे सिंहस्थ कुंभमेळा सुकाणू समितीचे मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी बघत आहेत.एकूण कार्यात यात्रेकरूंना मार्गदर्शन, आरोग्यसेवा, आपत्ती निवारण, कमानी, रांगोळ्या आदींद्वारे स्वागत, अन्नछत्र, खोया-पाया विभागातून सहाय्य, वाहतूक व्यवस्थेस मदत, धार्मिक जागरणपर पुस्तकविक्री अशा अनेकविध कार्यातून हजारो संघ परिवारातील स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत.

सामाजिकतेलाही उजाळा

या पर्वात सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी १४, १५ व १६ सप्टेंबर रोजी अनुक्रमे वनवासी बंधूंचे स्नान व संमेलन, अनुसूचित जातींचे स्नान आणि संमेलन, भाट, वंशावळी लेखक यांचे संमेलन, हे विशेष कार्यक्रम घेतले जाणार आहेत. दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी पवित्र गोदावरीत वनवासी बंधूंचे स्नान होणार आहे. धर्म जागरण विभागाच्या या संमेलनास २५ हजार वनवासींची उपस्थिती राहण्याची अपेक्षा सिंहस्थ कुंभमेळा सुकाणू समितीचे मुख्य समन्वयक आनंद कुलकर्णी यांनी व्यक्त केली. दुपारी अनुसूचित जाती-जमाती संमेलन होणार आहे. या बांधवांचे गोदास्नान दि. १६ सप्टेंबर रोजी ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत होणार आहे, तर याच दिवशी वंशावळी लेखक, भाट किंवा चारण असे म्हणतात. त्यांचे संमेलन व स्नान १६ रोजी होणार आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांचे संमेलन होणार आहे. हे सर्व कार्यक्रम पंचवटी कॉलेजच्या आवारात होणार आहेत, तर त्र्यंबकेश्वर येथे ५ सप्टेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंतीनिमित्त अखिल भारतीय मार्गदर्शन मंडळाची बैठक आणि ६ सप्टेंबर रोजी कार्यकर्ता संमेलन होणार आहे. ६ सप्टेंबर रोजी जनार्दन स्वामी आश्रमात संत संमेलन होणार आहे. या कार्यक्रमाचे अंतिम स्वरूप १५ आणि १६ ऑगस्ट रोजीच्या बैठकीनंतर येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमुक्तीसाठी बैलगाडी मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

शासनाने कर्जाचे पुनर्गठन योजना न राबविता व मोठा शेतकरी, लहान शेतकरी असा भेदभाव न करता तत्काळ सरसकट कर्ज व वीजबिल माफ करावे, अशा विविध मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्यात, यासाठी छावा क्रांतिवीर सेनेतर्फे कळवण तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून घोषणाबाजी करण्यात आली.

संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण तालुकाप्रमुख प्रदीप पगार यांनी बुधवारी कळवण बसस्थानकापासून कळवण तहसील कार्यालयापर्यंत शासनाच्या कार्यपद्धती विरोधात घोषणाबाजी करीत ढोल ताशाच्या गजरात बैलगाडी मोर्चा काढला. महाराष्ट्रात तसेच कळवण तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षीही बऱ्याच ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. चालू वर्षी बोगस कांदा बियाणे, महागडे औषधे व रासायनिक खते, वाढती मजुरी त्यातच अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सोसायटीचे कर्ज, बँकेच्या कर्जाचे वाढते व्याज, अवाजवी वीजबिल यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. यंदा सात जूनच्या पावसानंतर चांगल्या प्रमाणात पावसाचा जोर नाही. शेतातील उभी पिके जळत असून, त्यामुळे दुबार पेरणीचे संकट आ वासून उभे आहे. शासनाने त्वरित या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देत धीर देवून सन्मानाने पुन्हा उभे करावे. त्याचप्रमाणे सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत बेजबाबदार वक्तव्य करून शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहे. शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून सरकारने पुढील मागण्या त्वरित मान्य करून दिलासा द्यावा, असे तालुकाप्रमुख प्रदीप पगार म्हणाले.

यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, ग्रामीण जिल्हाध्‍यक्ष शिवाजी मोरे यांच्यासह गिरीश पगार, विक्रांत पगार, राजू पगार, अनिल बधान, हेमराज जाधव, अमित गेडाम, नितीन पाटील, किरण बोरसे, नितीन बोराडे, सागर माळूंदे आदींसह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छावा क्रांतिवीर सेनेच्या मोर्चास राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मनसे यांनी पाठिंबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images