Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिंहस्थातील रेल्वे भाडेवाढ मागे घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ पर्वणीकाळात रेल्वे प्रशासनाकडून भाडेवाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, या निर्णया विरोधात विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी दंड थोपटले आहेत. ही भाडेवाढ त्वरित मागे घ्यावी, या मागणीसाठी सोमवारी साधु महंत रस्त्यावर उतरले.

सिंहस्थासाठी देश विदेशातून कोट्यवधी लोक येणार आहेत. प्रवासी वाहतुकीमध्ये रेल्वे सर्वात मोठी भूमिका बजावणार आहे. सर्वाधिक भाविक रेल्वेद्वारेच येणार आहेत. मात्र सिंहस्थ काळात नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांकडून अतिरिक्त प्रवासभाडे आकारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सिंहस्थ हा हिंदूंचा सर्वांत मोठा धार्मिक उत्सव आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने १५ स्वतंत्र गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बदल्यात त्यांनी अन्यायकारक पद्धतीने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या भाढेवाढीमुळे भाविकांना १७५ ते ४२० रुपये अधिक मोजावे लागण्याची भिती साधू-महंतांकडून व्यक्त होऊ लागली आहे. या व्यतिरिक्त सप्टेंबर २०१५ पर्यंत नाशिक येथून कोणत्याही रेल्वेचे तिक‌िट काढणाऱ्या भाविकांना नियमित तिकीटदरापेक्षा ५ ते १० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा लाखो भाविकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. म्हणूनच या निषेधार्थ मंगळवारी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नंदकुमार जाधव म्हणाले, हिंदूंच्या उत्सवांवर कर लादून तो पैसा अन्य पंथियांच्या यात्रांना दिला जातो. अन्य पंथियांवरील ही उधळपट्टी मागे घेतल्यास हिंदूंच्या यात्रांवर अशा प्रकारचा कर लावण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे शासनाने ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी. हज यात्रेला अनुदान आणि सिंहस्थ पर्वाला भाडेवाढ हे हिंदू कदापि सहन करणार नाही. ही भाडेवाढ एका आठवड्याच्या कररहित करा, तसेच भाविकांना सर्वातोपरी सोयीसुविधा पुरवा अशी मागणी त्यांनी केली. खासदारांनी या विषयात लक्ष घालून ही भाडेवाढ हाणून पाडावी अशी प्रतिक्रिया महंत ग्यानदास महाराज यांनी नोंदविली आहे.

या प्रसंगी अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महंत भक्तीचरणदास, महामंडलेश्‍वर गोपीकृष्णदास, सनातनचे नंदकुमार जाधव, दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थ आराखडा बदलावरून प्रशासन कोंडीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सिंहस्थ आराखड्यात घुसविण्यात आलेल्या जादा विषयातील २१ कोटी २७ लाख रुपयांच्या जादा कामांवरून प्रशासनाला कोंडीत पकडण्याची तयारी शिवसेनेसह सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे. महासभेच्या मंजुरीशिवाय या विषयाना प्रशासनाने परस्पर मंजुरी दिल्याचा आरोप शिवसेनेने केला असून, थेट विशेष महासभा घेण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीनेही या प्रकरणावरून प्रशासनालाच कोंडीत पकडले आहे. तर ज्या सदस्यांच्या उपसुचनेवर मंजुरी देण्यात आली आहे, त्यांनीही हात वर केल्याने प्रशासनही कोंडीत सापडले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेतर्फे ११२९ कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्याला महासभेची मंजुरी देण्यात आली असून, त्यातून महापालिकेची कामे केली जात आहेत. मात्र ९ जून रोजी महासभेत जादा विषयामध्ये तब्बल २१ कोटी २७ लाखांची कामांना मंजुरी देण्यात आल्याचे समोर आले आहे. महापालिकेत सिंहस्थासाठी ९० कंत्राटी अभ‌ियंत्यांची भरती केली जाणार आहे. सोबत अग्निशमनसाठी ७८४ कंत्राटी फायरमन आणि वाहनचालक, कॉलसेंटरसाठी कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या विषयांना शिखर समिती आणि महासभेचीही मान्यता नाही. मात्र नगरसेवक यंशवत निकुळेंच्या उपसुचनेवर जादा विषयात मंजुरी दिल्याचे आता उघड झाले आहे. गदारोळात हा विषय मंजूर झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र याला शिवसेनेनसह राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. प्रशासनाने हा विषय घुसवल्याचा आरोप करत ही प्रक्रियाच संशयास्पद असल्याचा आरोप आता केला जात आहे. महासभा आणि प्रशासकीय मान्यता न घेताच परस्पर निव‌िदा प्रक्रिया राबविल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

सिंहस्थाच्या नावाखाली हा संधीसाधूपणा असल्याचा आरोप शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. विशेष महासभा बोलावून यावर चर्चा करावी, अशी मागणी करत, राज्यसरकारकडे या संदर्भात तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. तर स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनीही 'कोट्यवधीच्या विषय जादा विषयात येतात कसे' असा सवाल केला आहे.

विशेष महासभा घेऊन यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे. तर यशवंत निकुळे यांनीही याबाबत हात झटकले असून, केवळ सुरक्षा कंपाऊडचा विषयच उपसुचनेत होता असा दावा केला आहे. त्यामुळे जादा विषयात घुसवलेले विषय प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याबाबत आपले स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी मिलीभगत करून जादा विषयात २१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा सगळा प्रकार संशयास्पद असून त्याची चौकशी झाली पाहिजे. साधूंच्या नावाखाली सुरू असलेला संधीसाधूपणा बंद झाला पाहिजे.

- अजय बोरस्ते, गटनेता,शिवसेना

जादा विषयात कोट्यवधीचे विषय मंजुरीला यायला नकोत. त्यामुळे तात्काळ विशेष महासभा बोलावून या विषयावर चर्चा करायला हवी. या प्रक्रियेला आमचा विरोध आहे.

- शिवाजी चुंभळे, सभापती, स्थायी समिती

माझ्या उपसुचनेत केवळ स्वागत कमान आणि सुरक्षा कंपाऊडचा विषय होता. अन्य विषयाची आपल्याला माहिती नसून त्याच्याशी आपला काहीच संबंध नाही. जादा विषयात कसे आले ते माहीत नाही.

- यशवंत निकुळे, नगरसेवक, मनसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम प्रकल्पांमध्ये आता परदेशी तंत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जगातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये १६ व्या स्थानी असलेल्या नाशिक शहरातील बांधकाम प्रकल्पांमध्ये आता परदेशी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे येथील बांधकामाचा दर्जा वाढतानाच ग्राहकांना गुणवत्तापूर्ण घरे उपलब्ध होऊ लागली आहेत.

शहरात शेकडोच्या संख्येने बांधकाम व्यावसायिक आहेत. शिवाय सुवर्ण त्रिकोणातील असलेल्या आणि मुंबई-पुण्यानंतर झपाट्याने विकसित होणाऱ्या नाशिक शहरात रिअल इस्टेट क्षेत्राला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच नाशकात आता वैविध्यपूर्ण असे प्रकल्प आकारास येत आहेत. या व्यवसायालाही आता नवा चेहरा लाभत आहे. बांधकाम व्यवसायात कार्यरत झालेली सध्याची नवी आणि तरूण पिढी ही थेट परदेशातच उच्च शिक्षण घेऊन आली आहे. त्यामुळे तेथील शिक्षणातून मिळालेले धडे आणि संकल्पना या नाशकातील गृहप्रकल्पांमध्ये राबविल्या जात आहेत. त्याशिवाय स्पर्धेत टिकण्यासाठी, वेगळा प्रकल्प सादर करण्यासाठ, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन संकल्पनांचाही वापर केला जाऊ लागला आहे. त्यामुळे प्रस्थापित आणि जुन्या व्यावसायिकांकडूनही आता परदेशी तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. अॅल्युमिनिअम सेंटरिंग, जीआयएस प्रणाली, इंटरनॅशनल मास्टर प्लॅन, सोशल मीडियाचा वापर, रेटिंग कन्सेप्ट, सेल्स आणि मार्केटिंगमधील आधुनिक ट्रेंडस यासारख्या कितीतरी बाबींचा वापर केला जात असल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. त्याचा परिणामही दिसून येत असून नाशकात वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पही आकाराला येत आहेत.

नाशकातील बांधकाम क्षेत्रात आता परदेशातून शिक्षण घेतलेली नवी पिढी कार्यरत झाली आहे. शिवाय अत्याधुनिक तंत्र आणि यंत्रांचा वापरही सुरू झाला आहे. यामुळे नाशकात दर्जेदार प्रकल्प साकार होत आहेत.

- अनंत राजेगावकर, माजी अध्यक्ष, क्रेडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींना शिफारशी लागू करा

$
0
0

मधुकर पिचड यांची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासह त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ. विजय केळकर समितीने सुचवलेल्या शिफारशींसह त्यांच्या अहवालाची राज्य सरकारने तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केली आहे.

आदिवासींचे स्वतंत्र केडर तयार करावे अशी मागणी करीत सरकार आणि सचिव बदलले की, विकासाच्या योजना आणि धोरणे बदलत असतात. त्यामुळे आदिवासींवरील प्रयोग थांबवा, अशा इशारा पिचड यांनी दिला. अनुसूचित जमातीचे आकडे सरकारने त्वरित जाहीर करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. शासकीय विश्रामगृहावर पत्रकांराशी बोलताना पिचड यांनी आदिवासींच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका केली. आदिवासी भागातील कुपोषण आणि बालमुत्यूच्या घटना टाळण्यासाठी आम्ही खावटी कर्ज योजना सुरू केली होती. मात्र, या सरकारने ती योजनाच बंद केली आहे. यामुळे आदिवासी भागात कुपोषण आणि बालमुत्यू वाढणार आहेत. ही योजना तत्काळ सुरू केली पाहिजे. आदिवासींच्या विकासासाठी केळकर समितीने २०१३ मध्ये तयार केलेल्या उच्चाधिकार समितीच्या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी केली पाहिजे. हा अहवाल स्वीकारल्यास आदिवासींचा विकास होईल, असा दावा त्यांनी केला. या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण राज्यपालांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आकडे जाहीर करा

सरकारने २०११ मध्येच जनगणना जाहीर केली. मात्र, सामाजिक आणि आर्थिक जनगणनेची आकडेवारी जाहीर केलेली नाही. यात राज्यातील अनुसूचित जमातीही जनगणना करण्यात आली आहे. मात्र, ती अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे ती त्वरित जाहीर करून आदिवासींची लोकसंख्या किती ते कळू द्या, अशी मागणी त्यांनी केली. छगन भुजबळांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

कॅम्पमध्ये पाठवा

आदिवासी आयुक्त डॉ. सोनाली पोंक्षे यांच्यावर टीका केली. आयुक्तालयात राणी दुर्गावतीच्या स्मृतीदिनी कार्यक्रम घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाच त्यांनी दुर्गावती कोण असा प्रश्न विचारला होता. आदिवासी माहिती नसलेल्या अधिकाऱ्यांना आरएसएस कॅम्पमध्ये पाठवा असा संताप त्यांनी व्यक्त केला.

तर घरात घुसू

माळीण दुर्घटनेला ३० जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. नव्या सरकारनेही दुर्लक्ष केले. माळीणच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरात घूसून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलामांचे निधन अन् सुटीच्या अफवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माजी राष्ट्रपती व भारताचे मिसाईल मॅन डॉ. अब्दुल कलाम यांच्या निधनाचे धक्कादायक वृत्त नागरिकांच्या कानावर धडकताच सोशल मीडियाही सोमवारी त्यांच्या आठवणीत बुडून गेला. काही वेळातच डॉ. अब्दुल कलाम यांच्या निधनाने राष्ट्रीय दुखवट्याचे संदर्भ देत केंद्र सरकारने एकदिवसीय सुटी जाहीर केल्याच्या पोस्ट वाऱ्यासारख्या पसरल्या. सुटीच्या या अफवेमुळे मंगळवारीही सकाळी बराच वेळ नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती होती.

एकिकडे डॉ. कलाम यांच्या निधनाच्या वृत्तावर कुणाचा विश्वास बसत नव्हता तोच पसरलेल्या सुटीच्या सोशल मीडियातील पोस्टनेही चर्चा घडविली. दुखवट्यामुळे एकदिवसीय राष्ट्रीय सुटी पंतप्रधानांनी जाहीर केल्याचे संदर्भ सरकारी चौकटीच्या भाषेत सोशल मीडियावर अपडेट झाले. यानंतर कलामांची, आपल्या मृत्यूनंतर सुटी न देता नागरिकांनी एक तासभर जास्त काम करण्याची इच्छा व्यक्त केलेली पोस्टही वेगाने फिरू लागली. काही न्यूज चॅनल्सवरही सुटीच्या न्यूज फ्लॅश झाल्या. सोशल मीडियाच्या या प्रतापाचे परिणाम मात्र मंगळवारी सकाळी दिसून आले. शाळा महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण तुलनेने कमी होते. सोशल मीडियाच्या पोस्टच्या परिणामी बहुतांश जणांना शासकीय कार्यालये सुरू असल्याची खात्री करून घ्यावी लागत होती.

प्रश्न विश्वासार्ह्यतेचा!

सोमवारच्या दिवशी सोशल मीडियाने नाशिककरांसमोर संभ्रम निर्माण केला. सोशल मीडियाने तर शहरात चक्क दोन बॉम्ब सापडल्याच्या अफवाही वेगाने पसरविल्या. बॉम्बशोधक पथकाचे नेटवरील फोटोग्राफ्स अन् त्यावरील बॉम्ब सापडल्याचे कोट्सही वेगाने फिरू लागल्याने नागरीक संभ्रमात होते.. परिणामी सोशल मीडियाच्या विश्वासर्ह्यतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखो विद्यार्थी अन् मोजके मशीन

$
0
0

नाशिक : मे महिन्याच्या सुट्यांमध्ये शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक जमा करण्याचा काढलेला अध्यादेश शाळांसाठी डोकेदुखी ठरला होता. रात्रीतून आधार क्रमांकाची मागणी करताना शासनाने मात्र पुरेशी यंत्रणाच उपलब्ध करून दिली नसल्याने शाळांसमोरील आव्हानेही वाढली होती. लाखो विद्यार्थ्यांसाठी हे किट्स पुरेसे ठरतील काय? असा सवाल शाळांच्या वतीने विचारला जात आहे.

आधार केंद्रावर विद्यार्थ्याचे आधार कार्ड काढताना पालकांमध्ये हमरी तुमरी आणि वादाचे प्रसंग रोजच घडताहेत. या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे गेल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी गुजरातच्या कंपनीकडून सुमारे दहा आधार किट्स मागविले आहेत. पैकी यातील काही किट्सच्या वापरातून आणखी काही शाळांमध्ये आधारच्या नोंदणीस सुरुवातही करण्यात आली. शाळा तेथे आधार केंद्र सुरू करण्याची घोषणाही प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असली तरीही विद्यार्थ्यांचा आधार डेटा जमा करण्यासाठीची मुदत कधीच सरली आहे. शहरातील शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता आधार पुरेशा आधार मशिन्सची तरतूद प्रशासनाने त्वरित करण्याची मागणी आहे.

शिक्षकांची कसरत

विद्यार्थ्याचा आधार क्रमांक जमा करण्याच्या प्रक्रियेत गुंतलेल्या शिक्षकांना लवकरच कुंभाच्या ड्युटीवरही हजर व्हावे लागणार आहे. आधारचा डेटा गोळा करण्याचे टार्गेट साधायचे की कुंभातील गाईड बनण्याच्या तयारीला लागायचे, असाही सवाल शिक्षकासमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक केंद्रावरचे विद्यार्थी सेटला मुकणार?

$
0
0

ज‌ितेंद्र तरटे , नाशिक

तब्बल दीड वर्षाच्या अंतराने आलेल्या 'सेट' परीक्षेची पर्वणी साधण्यासाठी सज्ज असलेल्या सुमारे सात ते आठ हजार उमेदवारांच्या स्वप्नांवर कुंभमेळ्याच्या मावळत्या पर्वणीची टांगती तलवार आहे. २९ ऑगस्टची नाशिकची कुंभपर्वणी संपण्यापाठोपाठ ३० ऑगस्टला रविवारी सेट परीक्षेचे नियोजन शहरातील केंद्रांवर करण्यात आले आहे. लक्षावधी भाविकांचा या दिवशीचा अपेक्षित ओघ आणि पोलिस व प्रशासनाचे नियोजन लक्षात घेता, परीक्षा केंद्र गाठण्याचे मोठे आव्हान विद्यार्थ्यांसमोर असणार आहे.

पोलिस यंत्रणेच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरातील रस्त्यांचे नियोजन बदलले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून चौफेर काही किलोमीटर्सपर्यंत 'नो व्हेईकल झोन' असणार आहे. शहरात खाजगी वाहनांच्या प्रवेशावर मर्यादा आहेत. एसटी बसगाड्यांचे रस्ते, वेळा आणि स्थानकांचे नियोजनही परिस्थितीनुरूप असणार आहे. अशा स्थितीत परीक्षा केंद्रावर पोहचण्याची वेळ चुकली गेल्यास उमेदवारांना परीक्षेला मुकावे लागणार आहे. शहरातील शाळा व कॉलेजेस २८ व २९ ऑगस्टला बंद असणार आहे. या काळात परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे नंबर टाकण्यापासून ते पेपरचे नियोजन कसे करायचे, हा प्रश्न परीक्षा यंत्रणेपुढे आहे.

पुणे विद्यापीठाने सोडवावा प्रश्न!

३० ऑगस्ट रोजी सेट परीक्षेला सकाळी ९.३० वाजता सुरूवात होईल. तर या परीक्षेचा दुपारच्या सत्रातील पेपर दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत असेल. पर्वणीच्या मावळत्या दिवसासोबत काही नियम शिथिल होणार असले तरीही शहराच्या क्षमतेच्या अनेकपट लोकसंख्या यादिवशी असणार आहे. परीक्षा पुढे ढकलावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्याचे अधिकार पुणे विद्यापीठास आहे. विद्यार्थ्यांची संभाव्य अडचण लक्षात घेतल्यास यात बदल करणे विद्यापीठास शक्य होईल.

प्रा. देविदास गिरी, सेट-नेट परीक्षा मार्गदर्शक, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांमध्येच आधारकार्ड नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शालेय विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळवून देण्यात पालकांचीच अधिक दमछाक होऊ लागली आहे. याबाबतच्या तक्रारी वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने शाळांमधूनच आधार कार्ड नोंदणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी १५ किट्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही माहिती उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव यांनी दिली.

शालेय विद्यार्थ्यांची आधारकार्ड नोंदणी सरकारने सक्तीची केली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या केंद्रांवरून आधार कार्ड प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांची रीघ लागली आहे. मात्र, एका दिवसात ठराविक संख्येतच नोंदणी करणे शक्य होत असल्याने वारंवार चकरा मारण्याची वेळ पालकांवर येत आहे. त्यांना रिकाम्या हाती परतावे लागत असल्याने जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी वाढू लागल्या होत्या. त्यातच ही कार्यवाही करणाऱ्यांकडून नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने आपापसात वाद उदभण्याचे प्रकारही वाढले आहेत. विद्यार्थ्यांची तसेच अन्य नागरिकांचीही एकाच ठिकाणी आधारकार्ड नोंदणीसाठी गर्दी होऊ लागल्याने सेतू कार्यालयांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. आधार नोंदणीसाठी पैसे उकळण्याचे प्रकारही त्यामुळे सुरू झाले असून, तशा तक्रारीही वाढल्या आहेत.

अखेर शाळांमधूनच आधारकार्ड नोंदणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र १५ किट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रुंग्ठा विद्यालयातून आधार नोंदणीला सुरुवात झाली आहे. लवकरच अन्य सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्येही ही नोंदणी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी जाधव यांनी दिली.

विद्यार्थ्यांचे फोटो आवश्यक

विद्यार्थ्यांना शाळांमधून आधार कार्ड मिळविताना कोणती कागदपत्रे द्यावी लागणार हा प्रश्न देखील पालकांकडून उपस्थित होतो. विद्यार्थ्यांनी केवळ त्यांचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत बाळगणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आधार नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थी सायबर कॅफेवरूनही आधार कार्ड मिळवू शकणार आहेत. आधार नोंदणी क्रमांक विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाळ्याला पावणे तीन लाखाची बोली

$
0
0

महापालिका मालामाल; पहिल्या सेक्टरमधील ६० गाळ्यांची लिलाव प्रकिया पूर्ण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तपोवनात कुंभमेळ्याच्या कालावधीत तीन महिन्यांसाठी उभारण्यात आलेल्या गाळ्यांच्या लिलावाने बुधवारी उच्चांक गाठला. किमान १८ हजारांपासून तब्बल पावणेतीन लाखांपर्यंतच्या बोली एकेका गाळ्यासाठी साधुग्राममध्ये लागली. सायंकाळी उशीरापर्यंत पहिल्या सेक्टरमध्ये ६० गाळ्यांची बोली अंतिम झाली. तीन सेक्टर मिळून एकूण १३१ गाळ्यांचा लिलाव व्यावसायिक उद्दिष्टाने महापालिकेकडून केला जात आहे.

कुंभाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने व्यावसायिक वापरांसाठी तात्पुरत्या स्वरूपात गाळे उभारण्यात आले आहेत. या गाळ्यांचे लॉट्स पडणार असल्याने बुधवारी सकाळी १० वाजेपासून व्यावसायिकांनी साधुग्राममध्ये गर्दी केली. गाळे घेण्यासाठी इच्छुकांकडून अनामत रक्कम दहा हजार रुपये आकारण्यात येत होती. अनामत जमा करण्यास सुरुवात झाल्यानंतर शेकडो व्यावसायिकांच्या उपस्थितीने गर्दीची झुंबड उडाली. साधुग्राममधील आरोग्य केंद्राच्या समोरील पालिकेच्या कार्यालयात या लिलावांवर बोली लागली.

महिला बचतगट, अंध-अपंग, सेवाभावी संस्था या गटांसाठी काही स्टॉल्स राखीव ठेवण्यात आले होते. लिलावाच्या मंडपाबाहेर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. सकाळी ११ वाजेपासून अनामत जमा करण्यासाठी सुरुवात झाली. यावेळी शिस्तीच्या अभावामुळे इच्छुकांची झुंबड उडाली. गर्दीवर नियंत्रण ठेवताना यंत्रणेसमोर काही काळ आव्हान निर्माण झाले. मात्र, काही वेळानंतर परिस्थिती आटोक्यात आली.

गर्दीमुळे चक्का जाम

इच्छुकांसोबत आलेल्या गर्दीमुळे या परिसरातील रस्ताही जाम झाला होता. या परिसरात नागरिकांनी गाड्याही रस्त्यावर उभ्या केल्याने वाहतूकीला अडसर होत होता. या परिसरात जमलेल्या गर्दीमुळे फळ आणि खाद्याविक्रेत्यांच्या फेरीवाल्यांचीही येथे भर पडली. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणेला वारंवार प्रयत्न करावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांसाठी ‘अच्छे दिन’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहतुकीसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून रिक्षाकडे पाहिले जाते. नाशिक नगरीत सिंहस्थ पर्वास सुरुवात झाली आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी देशविदेशातील अनेक भाविक, पर्यटन येत आहेत. शहरात दाखल होणाऱ्या या लोकांना नाशिक दर्शनासाठी रिक्षावर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे तपोवनात रिक्षावाल्यांना सध्या 'अच्छे दिन'चा अनुभव येत आहे. या काळात अत्यंत विश्वासार्ह म्हणून रिक्षावाल्यांकडेच पाहिले जाणार असल्याने त्यांच्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे.

गर्दीचा मोसम पाहून रिक्षावाले भाडे वाढवतात ही ओरड कायम केली जात असली तरी यंदा सिंहस्थ किंवा साधुग्राममध्ये फेरफटका मारण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी रिक्षावाल्यांनी भाडेदरात कोणतीही वाढ केलेली नाही. पूर्वी रामकुंडाहून तपोवनात जाण्यासाठी ३० ते ५० रुपये भाडे घेतले जात असे. आताही तितकेच पैसे आकाराले जातात. रिक्षा सितागुंफावरून घ्यायची असल्यास या भाड्यामध्ये १० ते २० रुपये वाढ करण्यात येते. त्यामुळे सुटीच्या दिवशी साधुग्राममध्ये जाऊन पर्यटनासाठी फेरफटका मारणे सामान्य माणसाला सहज शक्य होत आहे. असे असले तरी मुख्य सिंहस्थात मात्र या भाड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रशासनाची हवी मदत

सर्व रिक्षाचालकांना शहर व जिल्ह्यातील रोडमॅप, प्रेक्षणीय स्थळांचा फोटोचार्ट, सीबीएसपासून त्या-त्या स्थानाचे अंतर किलोमीटरमध्ये व त्यासाठी रिक्षाचालकाने प्रतिसिट आकारावयाचे भाडे याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी, असे निवेदन भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने पोलिस आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. सिंहस्थात रिक्षाचालक व मालक यांना ड्रेसकोड देण्यात यावा, प्रत्येक रिक्षाचालकाकडे लायसन्स, बिल्ला व आरसी बुक अवश्य असावे. रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्या व संशयित हालचाली वाटणाऱ्या व्यक्तीचा मोबाइलमध्ये फोटो घ्यावा किंवा रिक्षात बसलेल्या व्यक्तीने प्रेक्षणीय स्थळाची रेकी केली किंवा अनावश्यक माहिती विचारल्यास त्याबाबत स्थानिक पोलिस स्टेशन किंवा ट्रॅफिक पोलिस यांना त्वरित माहिती द्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते हरवले खड्ड्यात

$
0
0

घोटी-सिन्नर रस्त्याची अवस्था; आमदार गावितांकडून पाहणी

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील घोटी-सिन्नर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने महामार्गच उद्धवस्त झाला आहे. महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे वाहनधारकांना पाठदुखी लागली असून, वाहनांचे नुकसानही सोसावे लागत आहे.

घोटी-सिन्नर रस्त्याची दुरवस्था झाल्याने आमदार निर्मला गावित यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. वाहनचालक, प्रवासी, भाविक, शिर्डीला जाणारे साई पदयात्री यांची होणारी गैरसोय लक्षात घेता तात्पुरती उपाययोजना म्हणून आमदार गावितांच्या सूचनेवरून महामार्गाच्या दुरुस्तीला तत्काळ सुरुवात करण्यात आली. मात्र ही दुरुस्ती तात्पुरती असून, या महामार्गाच्या नूतनीकरणासाठी शासनाने २७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. टेंडर प्रोसेसमध्ये आहे. दिवाळीनंतर या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार निर्मला गावित यांनी दिली. घोटी-सिन्नर-शिर्डी हा साई मार्ग असला तरी, या रस्त्यावरून वाहनाची होणारी ये-जा म्हणजे एक कसरतच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता मिळेल का रस्ता?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

माजी उपमहापौरांचा प्रभाग, उच्चभ्रू लोकांची पॉश वस्ती मात्र येथेही विविध समस्यांचे ग्रहण कायम आहे. खड्ड्यांनी व्यापलेले अंतर्गत रस्ते, अनियमित घंटागाडी, बंदपथदीमुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य अशी रहेनुमानगरची अवस्था आहे. या समस्यांमधून सुटका कधी होणार असा प्रश्न स्थानिक रहिवाशांना पडला आहे.

रहेमुनानगर येथे पथदीपांसाठी रस्त्यांच्या कडेला पोल टाकण्यात आले. मात्र, त्यावर अद्याप लाईट लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पथदीपांचा प्रकाश पडतच नाही. लाईट लावण्यात आलेल्यांपैकी काही पथदीप नीट उभे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ते एका बाजुला कलले आहेत. ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची स्थिती आहे. असे झाल्यास अपघात होण्याची भीती नागरिकांना सतावते आहे. काही पथदीपांमधून पुरेसा प्रकाश पडत नाही. अशा खांबावर लावण्यात आलेले लाईट दुय्यम दर्जाचे असल्याचा स्थानिकांना संशय आहेत. त्यामुळेच त्यांचे आयुष्य काही दिवसात संपल्यात जमा झाले आहे.

आमदार गावित यांच्यासह माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, जि. प. सदस्या बेबिताई माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता शैलजा नलावडे, शाखा अभियंता गिरीश सावंत यांनी रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजविण्याची कामे तत्काळ सुरू करण्याची सूचना दिली.

कचऱ्याची समस्या गंभीर

परिसरात घंटागाडी येत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळेच मोकळ्या भूखंडावर आणि रस्त्यालगत उघड्यावर कचरा टाकला जातो. पावसाळ्याच्या दिवसात कचरा कुजून असह्य दुर्गंधी पसरली आहे. अस्वच्छता वाढल्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याचही स्थानिकांचे म्हणणे आहे.

चिखलातून शोधावा लागतो मार्ग

नव्याने विकसित होत असलेल्या या भागात नवनवीन इमारती उभ्या रहात आहेत. घरे झाली मात्र त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी पक्के रस्तेच नाहीत. माती आणि दगडांनी व्यापलेले ठिकठिकाणी खड्डे असलेल्या रस्त्यातून मार्ग काढण्याची कौशल्या वाहनचालकांना पार पाडावे लागत आहे. सध्या पावसाळा असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. चिखलातून मार्ग काढत घर गाठावे लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंजणार वाल्मिक रामायण पाठ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आचार्य महामंडलेश्वर स्वामी विद्यानंद सरस्वती यांचे नाशिक नगरीत आगमन होत असून, येथील श्री हरी बोल नगर, चिंतामणी मंगल कार्यालय, पंपिंग स्टेशन जवळ, गंगापूर रोड येथे १९ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर या कालावधीत त्यांचे वास्तव्य आहे. या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात देशभरातील साधू महंत, संत, आदिवासी व शिष्यगण सहभागी होत आहे. यानिमित्ताने नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच वाल्मिक रामायणाचा पाठ होणार आहे

प्रत्येक कुंभ पर्वणीमध्ये स्वामी विद्यानंद सरस्वती श्री हरिबोल नगराची स्थापना करतात व तेथून सर्व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. त्याच पार्श्वभूमीवर १९ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर पर्यंतच्या वास्तव्यात विश्वकल्याणासाठी अनेक धार्मिक विधी व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. १९ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर या कालावधीत सकाळी सहा ते दुपारी बारा व रात्री आठ ते दहा या वेळेत दररोज १०८ वैदिक ब्राह्मण अकरा लाख पंचवीस हजार श्री हनुमान चालिसा पारायण पूर्ण करतील. २१ ते २७ ऑगस्ट या कालावधीत प्रयागराज चे भागवताचार्य श्री ऋषिराज तिवारी महाराज दररोज दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत श्रीमद भागवत कथेचे निरूपण करतील. ३० ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत अहमदाबाद चे नंदकिशोर शास्त्री सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत संगीतमय रामचरित्र मानसचे पारायण करतील.

३० ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ग्वालीयरचे ब्रह्मचारी विष्णु चैतन्य महाराज दुपारी तीन ते सायंकाळी सात यावेळेत श्रीरामकथेचे प्रवचन करतील. ९ ते १६ सप्टेंबर या कालावधीत शक्करगड राजस्थान चे स्वामी जगदीश पुरी महाराज दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत श्रीमदभागवत ज्ञानयज्ञ करतील. १७ ते २५ सप्टेंबर या कालावधीत शरयू तट, अयोध्देच्या डॉ. सुनिता शास्त्री दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत रामायण आख्यान सांगतील.

१७ ते २७ सप्टेंबर या कालावधीत रोज सकाळी आठ वाजता अथर्वशीर्षाच्या मंत्रघोषात गणपती अभिषेक केला जाईल. या आयोजनात सदगुरूदेव स्वामी अखंडानंद मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्ट, बरूमल श्री भीड भजन महादेव संन्यास आश्रम, बलसाड श्री हरी सत्संग समिती, मुंबई श्री नाशिक सेवा समिती व श्री अखंड विद्या आरण्याक शिष्य भक्त मंडळ बरूमल या संस्था सहभागी होत आहेत. स्वामी विद्यानंद सरस्वती यांनी २० वर्षांपासून कैलास मठ व आवादन अखंडाचे पीठाधिश्वर व आचार्य पद गौरविले आहे; त्यानंतर ते महामंडलेश्वर झाले. परंतु त्यांनी आदिवासींच्या सेवेकरीता पदांचा त्याग केला. आता ते गुजरातेतील धरमपूर तालुक्यातील बरूमाल येथे हिंदु धर्माच्या व विश्वाच्या कल्याणासाठी अष्टधातूनिर्मित एकादश मुखी शिवलिंग व सनातन धर्माच्या सर्व देवीदेवतांची स्थापना करून जवळपास पाचशे आदिवासी गावात अन्न, शिक्षण, आरोग्य, संस्कार व राष्ट्रभक्तीभाव आदिंबद्दल जागृती व धर्मांतर थांबविण्यासाठी प्रकल्प सुरू केले.

या आदिवासींचे जीवनच त्यांनी बदलून टाकले आहे. आजमितीस आश्रमात १ हजाराहून अधिक आदिवासी मुली उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण व निवास सेवेचे लाभ घेत आहेत. नाशिकमध्ये बऱ्याच कालावधीनंतर ही आध्यात्मिक मेजवानी मिळणार असून, भाविकांनी व श्रोतृवर्गाने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मगिरीकडे भाविकांचा ओढा

$
0
0

केशव ढोन्नर, त्र्यंबकेश्वर

सिंहस्थातंर्गत ब्रह्मगिरी पर्वत परिसरातील कामे झाल्याने पर्यटकांचा ओढा परिसराकडे वाढला आहे. ब्रह्मगिरीकडे जाणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्ट पासून ते भातखळा पर्यंत पूर्वी कच्चा रस्ता होता. त्यामुळे येथे नेहमी अपघात होत असे. या रस्त्यावर पायऱ्यांची कामे झाल्याने बिकट वाट अधिक सुकर झाल्याने पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.

ब्रह्मगिरीवर गोदावरीचे उगमस्थान आहे. भगवान शंकराने जटा आपटून गोदावरीस भुतलावर आणले या पौराणिक अख्याय‌िका दाखविणारी स्थळे येथे आहेत. भाविक आणि पर्यटक येथे जिज्ञासेने येत असतात. पावसाळयात अधिक सोयीचे आणि सुरक्ष‌ितता जपणारे असे काम शासनाने केले आहे. आषाढवारीनंतर ब्रह्मगिरीकडे येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढतो.

मार्ग निश्चित करा

सिंहस्थ कालावधीत लाखो भाविक ब्रम्हगीरी पर्वतावर येतात. सिंहस्थकाळात कुशावर्त आणि त्र्यंबक मंदिराकडे जाण्याचा मार्ग पोलिस व प्रशासनाने निश्चित केला आहे. मात्र ब्रह्मगिरीकडे जाणाऱ्या मार्गाबाबत निर्देश नसल्याने भाविकांचा गोंधळ होत आहे. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी चौकी तयार करून भाविकांना मार्गदर्शन व सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. तर पर्वतावर पोलिस बंदोबस्ताची मागणीही गोविंदराव मुळे यांनी व्यक्त केली आहे.

आणखी एक कोटींची कामे होणार

ब्रह्मगिरी परिसर वनविभागातर्फे ४ कोटी २१ लाख रूपयांची सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेली कामे झाली आहेत. नव्याने १ कोटी १० लाख रूपयांची कामे होणार आहेत. ही कामे ऑक्टोबरपर्यंत होतील, असे विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिमझिम पावसाने साधुग्राम ‘चिंब’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरामध्ये दोन ते तीन दिवसांपासून रिमझिमत्या पावसाने जोर धरल्यानंतर तपोवनातील साधुग्राम परिसर चिंब झाला आहे. सातत्याच्या पावसामुळे येथे सुरू असणारी कामेही मंदावली असून, सर्वत्र चिखल तयार झाल्या आहेत. या स्थितीतून मार्ग काढताना पालिकेसह कंत्राटी कामगारांना आणि आश्रमांमधील सेवेकऱ्यांचा कस लागतो आहे.

साधुग्राम परिसरात आता परराज्यातून येणाऱ्या साधू संतांचा ओघ वाढू लागला आहे. जागोजागी अंत‌िम टप्प्यातील तंबूंपासून तर भव्य मंडप उभारणीच्या तयारी सुरू आहे. पालिकेचे काम धिम्यागतीने सुरू असल्याचे चित्र सुरूवातीला होते. दरम्यान सुरू झालेल्या पावसामुळे येथील रस्ते आणि पाणी, शेड यासारख्या सुविधांची दैना होत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी ड्रेनेजचे पाईप जमिनीतून उचकून वर आले आहेत. काही ठिकाणी नळाच्या तोट्यांना लागलेली गळती, अद्यापही शेड्समध्ये असणारा सुविधांचा अभाव आणि पावसानंतर रस्त्यांची दैना झाल्याने प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.

परराज्यांमधील बड्या शेड्स उभारण्यासाठी कामगार त्यांच्या कुटुंबांसह दाखल झाले आहेत. अद्याप लिलावात न गेलेल्या गाळ्यांमध्ये या कुटूंबांनी तात्पुरता डेरा टाकला होता. ज्या साधू बैरागींना अद्याप स्वतंत्र जागा नाही किंवा समूहाबाहेर एकट्या पडलेल्या साधूंनी मिळेल त्या जागी जमेल तशी व्यवस्था करण्यात धन्यता मानली आहे. मात्र दोन दिवसांपासूनच्या पावसापासून त्यांचीही गैरसोय झाली आहे.

साधुग्राममध्ये शेड्स उभारण्यासाठी खड्डा खणतानाही अद्याप ओली जमीन, ओले बांबू अशा स्थितीचा सामना करावा लागतो आहे. लाकूडफाटाही काही ठिकाणी भिजून गेला आहे. साधुग्रामच्या विविध विभागांना जोडणाऱ्या रस्त्यावर टाकण्यात आलेला मुरूम पावसाच्या हलक्या सरींमध्ये उखडला जातो आहे. या परिसरात सुरू असलेल्या कामांमुळे मोठी वाहनेही येथून ये-जा करतात. यामुळे येथे खड्डे पडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौरांची सारवासारव

$
0
0

जादा विषयांचा वाद पेटला; आयुक्तांना अधिकार पूर्वीच्या महापौरांकडून

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सिंहस्थ आराखड्यात घुसविण्यात आलेल्या जादा विषयातील २१ कोटी २७ लाख रुपयांच्या कामांचा विषय अंगलट येण्याची शक्यता असल्याने सत्ताधाऱ्यांनी आता सारवासारव सुरू केली आहे. विरोधकांनी कोडींत पकडल्यानंतर महापौरांनी रामायण बंगल्यावर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली आहे. आयुक्तांना सिंहस्थातील कामांचे अधिकार देण्याचा ठराव हा आपल्या काळातील नसून तत्कालीन महापौरांचा असल्याचा दावा महापौर अशोक मुर्तडक यांनी केला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अतिरिक्त कामांसाठी ९ जून रोजी महासभेत जादा विषयामध्ये तब्बल २१ कोटी २७ लाखांची कामे मंजुरी देण्यात आली आहेत. केवळ पालकमंत्र्यांच्या सुचनेवरून ही कामे मंजूर करण्यात आली असून, त्याचा भार नेमका कोण सहन करणार ते स्पष्ट करण्यात आलेले नाही. यात महापालिकेत सिंहस्थासाठी ९० कंत्राटी अभ‌ियंत्यांची भरती करणे, अग्निशमनसाठी ७८४ कंत्राटी फायरमन आणि वाहनचालक, कॉलसेंटरसाठी कर्मचाऱ्यांची भरती करणे, साधुग्रामचा मुख्य दरवाजा, साधुग्रामला कुंपण आदी विषयांचा समावेश आहे.

या विषयांना शिखर समिती आणि महासभेचीही मान्यता नाही. मात्र नगरसेवक यंशवत निकुळें आणि अनिल मटालेंच्या उपसुचनेवर जादा विषयात मंजुरी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. प्रशासनाने हा विषय घुसवल्याचा आरोप करत ही प्रक्रियाच संशयास्पद असल्याचा आरोप शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने केला आहे. यातील कर्मचारी भरतीच्या विषयात तर, मंजुरी पूर्वीच निव‌िदा काढण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांना घेरले असून, प्रशासनासह सत्ताधारी या प्रकरणात अडचणीत आले आहेत. या विषयावर जादा गदारोळ होऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी आता धावपळ सुरू केली आहे. सायंकाळी रामायणवर महापौरांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन यात सारवासारवचे प्रयत्न सुरू केले. विरोधकांना नेमके उत्तर देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी बराच वेळ खल केला. यासाठी उपमहापौरांचीही मदत घेण्यात आली.

महापौरांनी एकीकडे विरोधकांचे आरोप खोडून काढत, दुसरीकडे 'तो मी नव्हेच' अशी भूमिका घेतली आहे. आयुक्तांनी आपल्या अधिकारात विषय मंजूर केले असले तरी, यासाठी पूर्वीच्याच महापौरांनी आयुक्तांना असे अधिकार दिल्याने आपला संबंध नसल्याचा दावा केला आहे. या वादातून आपली स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत, तत्काल‌ीन महापौर अॅड. यतीन वाघ यांच्यावर त्यांनी खापर फोडले आहे.

निधी कोण देणार?

पालकमंत्र्यांच्या आदेशाने ही कामे होत असली तरी, या कामांचा निधी कोण देणार यावरच महापालिकेलाही स्पष्ट उत्तर देता येत नाही. पालकमंत्र्यांनी केवळ तोंडीच आदेश दिल्याने या खर्चाचा भार महापालिकेलाच सहन करावा लागणार आहे. त्यामुळे पूर्वीच्या सिंहस्थ आराखडा पूर्ण का नव्हता, असा सवाल आता केला जात आहे. तर आपत्कालीन सारखे कामे जादा विषयात आलीच कशी, असा सवालही विरोधकांकडून विचारला जात आहे. त्यामुळे हे प्रकरण मनसेवरच उलटण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. सिन्नरकडे पाठ फिरविणाऱ्या पावसाने मंगळवारपासून तालुक्यातील काही भागात जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ४० टक्के पाऊस पडला आहे.

शहरात सकाळपर्यंत ११.३ मि.मी. पाऊस पडला. बुधवारी किमान तपमान २१.७ डिग्री सेल्सियस तर कमाल २५.९ अंश सेल्सियस तपमानाची नोंद झाली. २१ जुलैपर्यंत जिल्ह्यात तीन हजार ४३३ मि. मी. पाऊस पडला. मात्र गेल्या दहा दिवसात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने हे प्रमाण पाच हजार ४०९ मि.मी. पर्यंत पोहोचले आहे. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास शहरात मुसळधार पाऊस झाला. दिवसभर अधूनमधून सरी कोसळतच होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायगावात पाडणार कृत्रिम पाऊस

$
0
0

आशिया खंडात प्रथमच इंधनासाठी साखरेचा वापर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येवला आणि नांदगाव तालुक्याच्या मध्यावर असलेल्या सायगाव येथे कृत्रिम पाऊस पाडण्याचे निश्चित झाले असून, शनिवारी किंवा रविवारी हा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आशिया खंडात पहिल्यांदा अशा प्रयोगासाठी इंधन म्हणून साखरेचा वापर केला जाणार आहे.

पावसाने ओढ दिल्याने राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली गतिमान केल्या होत्या. गेल्या आठवड्यात तज्ज्ञांच्या पथकाने जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी देखील सुरू केली होती. येवला आणि नांदगाव तालुक्यातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर आता जिल्हा प्रशासन आणि इंटरनॅनल स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज (आयएसपीएस) ने रॉकेट फायरिंगद्वारे सायगाव येथे कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी (१ ऑगस्ट) किंवा रविवारी (२ ऑगस्ट) हा प्रयोग होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांनी सांगितले.

येवला आणि नांदगाव तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या सायगावची या प्रयोगासाठी निवड करण्यात आली आहे. नांदगाव तालुक्यात केवळ सात टक्के पाऊस पडला आहे. अंदरसूल अंतर्गत हे गाव येत असून, तेथे ५३ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून येथे ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस न पाडताच ढग वाहून जातात. ढगांमध्ये पुरेशी आद्रता असल्यानेच या प्रयोगासाठी सायगावची निवड केल्याचे सांगण्यात आले.

असा पाडणार पाऊस

बाष्पाच्या ढगांवर रॉकेटद्वारे सिल्व्हर आयोडाईड सोडले जाणार असल्याचे आयएसपीएसचे ट्रस्टी अब्दुल रेहमान वान्नु यांनी सांगितले. प्रयोगासाठीची सर्व सामग्री शुक्रवारी येवल्यात आणण्यात येईल. त्यानंतर वातावरणाचा अंदाज घेऊन प्रयोग केला जाणार आहे. रॉकेट ढगांवर आदळण्यास काही सेकंद लागतील परंतु, त्यानंतर ५० मिनिटांनंतर पाऊस पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना ‘आधार’ची सक्ती नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यास सुरुवात झाली आहे. अकरा शाळांची प्राधान्य यादी प्रशासनाने बनविली असून, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड शाळांमध्येच काढण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणांहून आधारकार्ड काढण्याची सक्ती करू नये, असे आदेश जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने शाळांना काढले आहेत. रुंग्ठा आणि रंगुबाई जुन्नरे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यास सुरुवात झाली असून, गुरुवार (‌दि.३०) पासून अन्य शाळांमध्येही सुरुवात होणार आहे.

आधारकार्डसाठी शाळांनी विद्यार्थ्यांकडे तगादा लावल्याने पालकांचीच दमछाक होऊ लागली होती. याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिध्द केले. जिल्हा प्रशासनाने शाळांमधूनच विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड नोंदणीचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. त्यासाठी १३ किट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पखाल रोडवरील सावित्रीबाई फुले विद्यालय, गांधीनगर येथील जनता विद्यालय, गंगापूर रोडवरील नवरचना प्राथमिक विद्यालय तसेच निर्मला कॉन्व्हेंट स्कूल, अभिनव बालविकास मंदिर, शालिमार येथील सागरमल मोदी स्कूल, दिंडोरी रोड येथील सीडीओ मेरी, सिडको येथील मुक्तानंद बाल विद्यालय, इंदिरानगर येथील डे केअर सेंटर, नाशिकरोड येथील जेडिसी बिटको हायस्कूल येथे गुरुवारपासून विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यास सुरुवात होईल. ही माहिती उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव यांनी दिली. या शाळांमधील खूपच कमी विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड असल्याने तेथे प्राधान्याने मोहीम हाती घेतल्याची माहिती जाधव यांनी दिली. या शाळांमधील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झाली की पुन्हा द्वितीय प्राधान्य यादी तयार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात ३२, ग्रामीण भागात ६५ किट्स

शहरात महापालिकेची सात प्रभाग कार्यालयांमध्ये प्रत्येकी एक, सिडको, सातपूर, नाशिकरोड आणि मेरी येथील सेतू उपकार्यालयांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे बारा आणि शाळांमध्ये १३ अशा एकूण ३२ ठिकाणी आधारकार्ड काढता येणार आहेत. शाळांव्यतिरिक्त अन्य ठिकाणांवर जाऊन नागरिक आधारकार्ड काढू शकणार आहेत. केवळ शहरांमधीलच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढता यावेत, यासाठी जिल्ह्यात ६५ किट्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी भरतीत भूमिपुत्रांवर अन्याय

$
0
0

'अग्निशमन'चा मुंबईच्या प्रशिक्षणार्थींकडे ओढा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थात आपत्कालीन विभागासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या भरतीत स्थानिक प्रशिक्षित बेरोजगार तरुणांना डावलले जात आहे. मनसेच्या सत्ताकाळात भूमिपुत्रांवर हा अन्याय केला जात असल्याचा आरोप शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अग्निशमन प्रशिक्षण केंद्राने नाशिकच्या ४७ तरुणांना भरती करण्याची शिफारस केली असतानाही अग्निशमन विभागाने मुंबईच्या तरुणांची भरती करण्याचा घाट घातला आहे. आपत्कालीन परिस्थितीत नाशिकच्या तरुणांचा जास्त फायदा होणार असतानाही अग्निशमन दलाचा भर मुंबईच्या तरुणांकडे असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेच्या वतीने सिंहस्थात आपत्कालीन परिस्थितीत १३८ प्रशिक्षणार्थींची भरती केली जात आहे. यासाठी अग्निशमन सेंटर्सचे प्रशिक्षण पूर्ण केल्याची अट असून, अग्निशमन विभागाने यासाठी मुंबईतल्या कालीना येथील अग्निशमन प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षणार्थींची दोन महिन्यासाठी भरती करण्याचा घाट घातला आहे. त्यांना प्रत्येकी सहा हजार मानधन दिले जाणार आहे. सद्यस्थितीत हे कालीना केंद्राचे कर्मचारी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेत असून, त्यांनाच पुढे कार्यरत करण्यााचा अग्निशमनचा प्रयत्न आहे. दुसरीकडे महाराष्ट्र शासनाच्या अग्निशमन केंद्रातर्फे प्रशिक्षण घेतलेले नाशिकमध्ये ४७ कर्मचारी असून, त्यांना डावलले जात आहे. सिंहस्थासाठी या कर्मचाऱ्यांची भरती अग्निशमन विभागाने करावी, अशी शिफारस शासनाच्याच केंद्राने केली आहे. असे असतानाही अग्निशमन विभाग मात्र, मुंबईच्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देत आहे. आपत्कालीन परिस्थितीत नाशिकमधील कर्मचाऱ्यांचा मदतीसाठी जास्त फायदा होऊ शकतो, असा दावा अजय बोरस्ते व प्रकाश लोंढे यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांना नाशिकची पूर्ण माहिती आहे. मात्र, मुंबईच्या कर्मचाऱ्यांना नाशिकची माहिती नसताना ते आपत्कालीन परिस्थितीत कशी मदत करतील, असा सवाल केला. यामुळे नाशिकच्या तरुणांना प्राधान्य द्यावे, अशी सेनेची मागणी आहे. मनसेची सत्ता असलेल्या महापालिकेतच भूमिपुत्रांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे आता मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images