Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नियमित करदात्यांना अपघात विमा

$
0
0

नाशिक : नाशिक महापालिका हद्दीत नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी व स्लमचार्जेस भरणा करणाऱ्या करदात्यांना अपघात विमा देण्याचा निर्णय महापालिकेन घेतला आहे. गेल्या वर्षी या अपघात योजनेचा केवळ नऊच करदात्यांनी लाभ घेतला आहे.

नियमित करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेन अपघात विमा योजना सुरू केली आहे. त्यात मार्च अखेरपर्यंत नियमित कराचा भरणा केल्यास करदात्यास ५० हजार रुपयांपर्यंतचा अपघात विमा संरक्षण दिला जातो. मात्र, सन २०१३-१४ या वर्षात नऊ अर्जदारांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे. नागरिकांनी वेळेवर कर भरल्यास नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. या अपघात विम्याचे जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचा ‘मिल्खा’ ऑस्ट्रेलियात

$
0
0

अरविंद जाधव, ना​शिक

नोकरी-प्रपंचात गुरफटल्यावर व्यक्ती आपल्या इच्छा आकांश गुंडाळून ठेवतात. शालेय जीवनातील चांगला खेळाडू नंतर त्या खेळाकडे ढुंकूनही पाहत नाही. असे अनेक चांगले खेळाडू समाजात दिसतात. त्यातीलच एक असलेले अंबड पोलिस स्टेशनचे हवालदार नंदू रामभाऊ उगले हे होय. मात्र, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर उगलेंनी आपला धावण्याचा छंदच जोपासला असे नाही तर या कर्तृत्वाचा झेंडा रोवण्यासाठी ते लवकरच ऑस्ट्रेलियात जाणार आहे.

पोलिस दलात १९९० मध्ये भरती झालेल्या उगलेंचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील समशेरपूर. दहावीपर्यंत गावातच शिक्षण घेतलेल्या उगलेंना व्यायमासह धावण्याची आवड सुरुवातीपासूनच होती. पुढे शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर हाच छंद त्यांना पोलिस दलापर्यंत घेऊन आला. भरती प्रक्रियेमध्ये सर्वांत जलद धावण्याच्या त्याच्या विक्रमामुळे तत्कालीन आयुक्त के. के. कश्यप यांनी त्यांचा सत्कार केला.

पोलिस म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या उगलेंवर प्रापंचिक जबाबदारी येऊन पडली. जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेतलेल्या उगलेंना मग धावण्यासाठी वेळ अपूरा पडू लागला. त्यातच पैशांचे सोंगही घेण्यासारखे नव्हते. हळूहळू उगलेंच्या खेळातील व्यवसायिकात मागे पडली. दोन मुलांले झाल्यानंतर त्यांचे शिक्षण आणि त्यांच्या खेळातील आवड जोपसण्यावरच उमले यांनी भर दिला. २०१२ त्यांची मुलगी अंकिता तायक्वादो स्पर्धेसाठी नागपूरला गेली. तिथे तिने मेडल मिळवले.

पाल्यांच्या आग्रहामुळे सरावाला सुरुवात

मुलीच्या यशामुळे नंदू उगलेंमधील खेळाडू जागा झाला. अंकीता व मुलगा मेघनील यांनी वडिलांच्या छंदाला जोपसण्याचा विडाच उचलला. उगलेंनी धावण्याचा सराव सुरू केला. पत्नी सुरेखा यांनीही जोड व्यवसाय सुरू करून पतीला आर्थिक मदत करण्यात खारीचा वाटा उचलला. त्यांनी सर्वात प्रथम मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. २१ किलोमीटरचे अतंर त्यांनी दोन तासात पार पाडले. अवधी जास्त लागला. मात्र, त्यामुळे खचून न जाता सराव सुरूच ठेवला. त्यानंतरच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये हेच अंतर त्यांनी दीड तासात कापले. पुढे मविप्र,

केरळ, हैदराबाद, ठाणा, गोदा मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घेतला. दरम्यान, हरियाणा येथील रोहतकमध्ये ३५ वी नॅशल मास्टर अॅथेलिटिक्स स्पर्धा पार पडली. त्यातील चार प्रकारापैकी १५०० मीटर धावणे आणि २ बाय २ १०० मीटर रिलेमध्ये त्यांना रजत पदक मिळाले. ४३ वर्षिय उगले यांच्यातील उत्साह पाहून इंडिया मास्टर अॅथेलिटिक्स संघटनेने ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली आहे.

खेळातील व्यावसायिकता जपण्यासाठी वेळ आणि पैसा लागतो. विशेषतः राष्ट्रीय किंवा आतंरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्याची आवश्यकता भासते. दोन्ही मुले इंजिनीअरिंगला असून वडील १४ वर्षांपासून पक्षघाताने आजारी आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियात कसे जायचे याची विवंचना समोर आहे. त्यातून काही मार्ग निघाला तर नक्कीच यश मिळवेन.

- नंदू उगले, हवालदार, अंबड पोलिस स्टेशन

दिलीप दातीर यांच्यातर्फे मदत

अंबड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले नंदू रामभाऊ उगले यांची ऑस्ट्रेलियात होणाऱ्या अॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. घराची बेताची परिस्थिती असलेल्या उगले यांना माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश दिला. यावेळी अन्य दानशूर व्यक्तींनीही उगले यांना मदत करावी, असे आवाहन दातीर यांनी केली.

प्रश्न आर्थिक जुळावाजुळवीचा

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठी आर्थिक तरतुदीची गरज आहे. पोलिस कल्याणनिधीमधून शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिले असून अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उगले यांचे सहकारीही मदतीसाठी एकटवले आहे. समाजातील इतर स्तरातून मदतीचा ओघ मिळाल्यास ऑस्ट्रेलियाला पोहचणे शक्य होईल, अशी अपेक्षा उगलेंना वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानगंगा सक्षमतेसाठी ‘थिंक टँक’

$
0
0

विविध क्षेत्रातील ९ तज्ज्ञ मुक्त विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने वैविध्यपूर्ण उपक्रम सुरु केले असून ज्ञानगंगेला सशक्त करण्यासाठी 'थिंक टँकची' निर्मिती करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागात आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञ आणि संशोधकांना विद्वत परिषदेवर संधी देवून त्यांच्या सूचनांद्वारे अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेलेल्या किंवा शिक्षणापासून कोसो दूर असलेल्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविण्यासाठी मुक्त विद्यापीठाची स्थापना केली आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यासाठी विद्यापीठाद्वारे विद्वत परिषद कार्यरत असते. या परिषदेवर मात्र बहुतांशवेळा कुलगुरुंच्या मर्जीतले किंवा विद्यापीठाशी संबंधित व्यक्तींना घेतले जाते.

त्यामुळे या परिषदेच्या व्यासपीठाचा प्रभावीपणे वापर केला जात नाही. मात्र, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी या परिषदेला थिंक टँकचा दर्जा देत विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यात नियुक्त केले आहे. या मान्यवरांनी केलेल्या विविध सूचना आणि शिफारशींचा विचार करुन वैशिष्ट्यपूर्ण अशा अभ्यासक्रमांची रचना केली जाणार आहे. त्याद्वारे विविध विभाग आणि विषयातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळ्याचा अमेरिकेत जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैश्विक सोहळा असलेला सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या अडीच महिन्यांवर येवून ठेपला असताना या सोहळ्याचा जागर आता अमेरिकेत होत आहे. मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)च्या प्रांगणात होणाऱ्या कुंभथॉन या आंतरराष्ट्रीय परिषदेत मंगळवारी रात्री (अमेरिकेत सकाळी) विशेष चर्चासत्र होत आहे.

दर १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला येत्या जुलै महिन्यात प्रारंभ होत आहे. लाखो साधू आणि भक्तांच्या आगमनामुळे हा सोहळा वैश्विक होतो. या सोहळ्याचे आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, या सोहळ्याचे योग्य ते नियोजन होणेही आवश्यक आहे. तंत्रज्ञानाची जोड देवून या सोहळ्यात आपत्ती घडू नये आणि अत्याधुनिक तंत्रांचा वापर करुन या सोहळ्याला चार चाँद लावण्यासाठी कुंभथॉन ही संकल्पना मांडण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून या संकल्पनेद्वारे इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांसह आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांपर्यंत सर्वांना सामावून घेण्यात आले आहे. कुंभथॉनमधील विचार मंथनातून पुढे आलेल्या दहा विविध संकल्पनांवर सध्या काम केले जात आहे. या संकल्पना येत्या जून महिन्यात प्रत्यक्षात येणार असून, तत्पुर्वी या संकल्पनांचे सादरीकरण करण्यासाठी अमेरिकेतील जगविख्यात एमआयटी संस्थेमध्ये विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

कुंभथॉनच्या आयोजनात सहभागी असलेले आयटी तज्ज्ञ सुनील खांडबहाले, टीसीएसचे संदीप शिंदे, एमकेसीएलचे सुभाष पाटील, टेन एक्स ग्रोथचे अजय सिंगानिया हे पाच जण एमआयटीत दाखल झाले आहेत. एमआयटीचा वार्षिक महोत्सव गेल्या रविवारपासून (१२ एप्रिल) सुरु झाला आहे. गेल्या वर्षभरात एमआयटीच्या विद्यार्थी व संशोधकांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचे सादरीकरण त्यात केले जाते. आता त्याच महोत्सवात कुंभथॉनचेही सादरीकरण होत असल्याचे शिंदे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले आहे.

इनोव्हेशन सेंटर

साथीचे रोग, मेडिकल ट्रॅकिंग, क्राऊड मॅनेजमेंट, २डी अँड ३डी मॅप, लोकल कम्युनिटी रेडिओ, अन्नदान, अशा एकूण १० प्रकल्पांवर कुंभथॉनमध्ये काम केले जात आहे. तसेच, हे प्रकल्प अत्यंत प्रभावशाली कसे होऊ शकतील, यावर तेथे विचारमंथन केले जाणार आहे. नाशिकसारख्या शहरात अशा प्रकारच्या वैश्विक सोह‍ळ्याला संशोधनाची जोड देण्यात येत असल्याने नाशिकला इनोव्हेशन सेंटर व्हावे असा विचार आम्ही तेथे मांडत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याद्वारे एकूणच नाशिक शहराचे ब्रँडिंग होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ!

$
0
0

तीन वर्षांपासून प्रथमोपचार पेट्यांची खरेदी बंद; उपचारांभावी दहा वर्षांत आठशे मृत्यू

विनोद पाटील, नाशिक

आदिवासी विकास विभागाने आदिवासी आश्रमशाळांसाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रथमोपचार पेट्यांची खरेदीच केलेली नाही. त्यामुळे साडेचार लाख विद्यार्थी जीव मुठीत धरूनच शिक्षण घेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे आदिवासी आश्रमशाळांमध्ये प्रथमोचाराअभावी दहा वर्षांत ७९३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी विभागाच्याच सर्व्हेक्षणात समोर आली आहे. मोठ्या योजनांच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी करणारा हा विभाग विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत असल्याचेच स्पष्ट होत आहे.

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा या शिक्षणापेक्षा गैरप्रकारांसाठीच चर्चेत असतात. भ्रष्टाचार, नोकरभरती, निकृष्ठ आहारपुरवठा, मुलींचे विनयभंग अशा घटना नित्याचाच बनल्या आहेत. त्यास राजकीय उदासीनतेसोबतच प्रशासकीय पातळीवरील उदासीनताही कारणीभूत आहे. राज्यात शासकीय आश्रमशाळांची संख्या ५५२, तर खाजगी अनुदानित आश्रमशाळांची संख्या ५५६ आहे. या ११०८ आश्रमशाळामंध्ये दरवर्षी साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, आश्रमशाळांमधील गैरसोयींमुळे दरवर्षी सरासरी ५० ते ६० मुलांचा मृत्यू होतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णतः हेळसांड विभागाकडून केली जात आहे.

आश्रमशाळा दुर्गम भागात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना, अपघात, विविध आजार, विंचू व सर्पदंश सारख्या घटनांमध्ये प्रथमोपचार मिळाला नाही, तर त्यांचा मृत्यू ओढावतो. त्यामुळे आश्रमशाळांसाठी प्रथमोपचार पेट्यांची खरेदी करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने २०११ मध्ये घेतला होता. पहिल्या वर्षी सव्वा कोटी रुपये खर्चून या पेट्यांची खरेदी करण्यात आली. या पेट्यांचे आयुष्य एक वर्षाचेच असल्याने दरवर्षी या पेट्या हाफकीन संस्थेतर्फे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लालफितीचा फटका आदिवासी विद्यार्थ्यांना बसला असून, सन २०१२ पासून या पेट्यांची खरेदीच लालफितीत अडकली आहे. दरवर्षी साधारणतः दीड ते दोन कोटींची आवश्यकता असतांनाही गेल्या तीन वर्षांपासून खरेदी झाली नाही.

राज्यातील ११०८ आश्रमशाळांमध्ये २००२ ते २०१२ दरम्यान ७९३ मुलांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. यात सर्पदंशाने ५५, नैसर्गिक मृत्यू व आत्महत्या १७६ तर प्राथमिक उपचार न मिळाल्याने ४३४ मुलांचा मुत्यू झाल्याचे आढळून आले.

हायकोर्टाचा इशारा

आदिवासी आश्रमशाळांची दयनीय स्थिती आणि तोकड्या सुविधांसंदर्भात पुण्यातील याचिकाकर्ते रवींद्र तळपे यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. मुलांच्या मुत्यूसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात ७ एप्रिलला सुनावणी झाली असून, पंधरा दिवसांत उपाययोजनांची माहिती सादर करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत. माहिती सादर न केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा कोर्टाने दिला आहे. त्यामुळे विभागाच्या वतीने सध्या कागदोपत्री उपाययोजनांची जुळवाजुळव सुरू आहे. दरम्यान, अहवालानंतरही आश्रमशाळांमधील उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. एवढ्या मुलांचा जीव जावूनही आदिवासी विभागाने झोपचे सोंग पांघरले आहे.

एकीकडे विभागात शेकडो कोटींचे घोटाळे उघड होत असताना, केवळ दीड ते दोन कोटींच्या खरेदीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आदिवासी मुलांबद्दल आदिवासी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता असून, आता न्यायालयच यांदर्भात निर्णय घेणार आहे.

- रवींद्र तळपे, याचिकाकर्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा प्रशासनाचे हरितकुंभसाठी पाऊल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरणपूरक व्हावा यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. 'हरितकुंभ'बाबत जनजागृती करण्यासाठी राज्यस्तरीय ऑडिओ व व्हिडिओ जिंगल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला राज्यभरातून प्रतिसाद मिळेल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.

कुंभमेळा पर्यावरणपूरक व्हावा यासाठी प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे हा वैश्विक उत्सव असल्याने त्यात अधिकाधिक घटकांना सामावून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. म्हणूनच जिंगल्स स्पर्धेच्या माध्यमातूनही हरितकुंभच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जिंगल्स ३० ते ६० सेकंदांची असणे आवश्यक आहे. प्लास्टिकमुक्ती, नदी प्रदूषण रोखण्यात नागरिकांचा सहभाग, पर्यावरण रक्षण या संकल्पनेवर आधारित जिंगल्स स्पर्धकांकडून मागविण्यात आल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याला अनुरूप चित्रीकरण व संकल्पना असणे अपेक्षित आहे. जिंगल्स निर्माता सादर करणार असलेली कलाकृती ही त्याची मूळ कलाकृती असावी. तसे प्रतिज्ञापत्रही स्पर्धकाला सादर करावे लागणार आहे. स्पर्धकांच्या संकल्पनांचा उपयोग प्रशासनाकडून जनजागृतीसाठी केला जाणार आहे. पुरस्कारप्राप्त जिंगल्सचे प्रसारण विविध दृकश्राव्य माध्यमाद्वारे करण्याचे अधिकारही जिल्हा प्रशासन राखून ठेवणार आहे.

उ‌त्कृष्ट जिंगल्सला पुरस्कार

व्हिडिओ जिंगल्स स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार रुपये २५ हजार, द्वितीय रुपये २० हजार, तृतीय रुपये १५ हजार आणि उत्तेजनार्थ रुपये ५ हजाराची दोन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ऑडिओ जिंगल्स स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार रुपये २० हजार, द्वितीय रुपये १५ हजार तृतीय रुपये १० हजार आणि उत्तेजनार्थ रुपये ५ हजार अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. इच्छुकांनी जिंगल्स प्रवेशिका सीडी/डीव्हीडी फॉर्मेटमध्ये जिल्हा माहिती अधिकारी, सारडा संकुल, तिसरा मजला, महात्मा गांधी रोड, नाशिक (दूरध्वनी क्रमांक - ०२५३/२५७८६८६) येथे ३० एप्रिलपर्यंत सादर कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दुर्बल घटकांसाठी सहकारी बँका वरदान’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजातील दुर्बल घटक, मध्यवर्गीय घटकांची आर्थिक उपलब्धतेची गरज भागविण्यासाठी नागरी सहकारी बँकांची कामगिरी महत्त्वाची असते. अशा बँकांनी पारदर्शी प्रशासन आणि जनहिताच्या माध्यमातून लोकजीवनाला आधार दिला आहे, असे निरीक्षण माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मांडले.

विश्वास को ऑपरेटीव्ह बँकेला पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पवार म्हणाले, की विश्वास बँकेने तळागाळातील घटकांचा विश्वास जपला आहे. सद्यस्थितीत बँकींग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू आहे. काळानुसार बदल स्वीकारणाऱ्या आणि काळाच्या बरोबरीने चालणाऱ्या बँकाच नवी आव्हाने पेलू शकतील. अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी प्रशिक्षण, कार्यशाळांचे आयोजन हे बँकेच्या प्रगतीसाठी महत्वाचे आहे. सहकाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबित्वाची प्रयोगशील जाणीव सामान्य माणसांपर्यंत नेण्याचे महत्वाचे कार्य सहकारी बँकांनी केले आहे, या कार्यात विश्वास बँकेचा सहभागही उल्लेखनीय असल्याचा गौरवही पवार यांनी केला.

बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी स्वागत व प्रास्तविक केले. बँकेच्या दोन दशकांच्या कालावधीतील एकूणच वाटचालीची, आगामी उद्दिष्टांची माहिती पवार यांनी घेतली. यावेळी रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ, विश्वास ज्ञान प्रबोधिनी रिसर्च इसिन्स्टट्यूट, यशवंतराव चव्हाण ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय आदी उपक्रमांची माहिती यावेळी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पवार यांना देण्यात आली. देशातील नागरी सहकारी बँकांची आर्थिक स्थिती, सहकारी बँकांसाठी असलेले कायदे, ग्रामीण बँकांची परिस्थिती आदी विषयांवर यावेळी पवार यांनी संवाद साधला.

यावेळी विनायकदादा पाटील, आमदार हेमंत टकले, बँकेचे उपाध्यक्ष विलास हावरे, मानद कार्यकारी संचालक अजित मोडक, जनसंपर्क संचालक मंगेश पंचाक्षरी, संचालक डॉ. सुभाष पवार, डॉ. चंद्रकांत संकलेचा, शशिकांत पारख, घन:श्याम येवला आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूररोडचा ‘लढा’ सोशल मीडियावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विकासकामांना अडथळा ठरणारी गंगापूर रोडवरील झाडे हटवावीत यासाठी गंगापूर रोड विकास कृती समितीने चळवळ हाती घेतली आहे. या चळवळीला व्यापक रूप देण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेण्यात येत असून फेसबुक पेजही सुरू करण्यात आले आहे.

गंगापूर रोडवर मधोमध असणारी झाडे धोकादायक ठरत असून त्यामूळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचा कृती समितीचा दावा आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने गंगापूर रोडच्या विकासासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, वृक्षप्रेमींकडून टाकण्यात आलेल्या याचिकेमुळे न्यायालयाने नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील झाडे तोडण्यास मनाई केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने रस्ता रुंदीकरण आणि तत्सम विकासकामे मार्गी लावण्यावर मर्यादा आल्या आहेत. रस्त्यालगत तसेच मधोमध असलेल्या झाडांमुळे येथे दुभाजकही बसू शकलेले नाहीत.

एकाच रस्त्यावरून गंगापूर आणि नाशिक अशा दोन्ही बाजूची वाहतूक होत असल्याने अपघातांनाही निमंत्रण मिळते आहे. विकासाची मागणी असलेल्या समविचारी नागरिकांनी एकत्रित येऊन गंगापूर रोड विकास कृती समिती स्थापन केली आहे. त्या माध्यमातून रविवारी मानवी साखळी आणि स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या चळवळीला व्यापक रूप देण्यासाठी दोन दिवसापूर्वी 'जीआरव्हीकेएस नाशिक' या नावाने फेसबुक पेज सुरू करण्यात आले आहे.

त्यावर गंगापूर रोडच्या विकासात अडथळा ठरणाऱ्या झाडांची छायाचित्रेही टाकण्यात आली आहेत. नागरिकांचा पाठींबा वाढावा आणि ही चळवळ पुढे घेऊन जाता यावी या उद्देशाने सोशल मीडियाची मदत घेण्यात येत असल्याचे समितीकडून सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमित करदात्यांना अपघात विमा

$
0
0

नाशिक : नाशिक महापालिका हद्दीत नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी व स्लमचार्जेस भरणा करणाऱ्या करदात्यांना अपघात विमा देण्याचा निर्णय महापालिकेन घेतला आहे. गेल्या वर्षी या अपघात योजनेचा केवळ नऊच करदात्यांनी लाभ घेतला आहे.

नियमित करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेन अपघात विमा योजना सुरू केली आहे. त्यात मार्च अखेरपर्यंत नियमित कराचा भरणा केल्यास करदात्यास ५० हजार रुपयांपर्यंतचा अपघात विमा संरक्षण दिला जातो. मात्र, सन २०१३-१४ या वर्षात नऊ अर्जदारांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे. नागरिकांनी वेळेवर कर भरल्यास नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. या अपघात विम्याचे जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचा ‘मिल्खा’ ऑस्ट्रेलियात

$
0
0

अरविंद जाधव, ना​शिक

नोकरी-प्रपंचात गुरफटल्यावर व्यक्ती आपल्या इच्छा आकांश गुंडाळून ठेवतात. शालेय जीवनातील चांगला खेळाडू नंतर त्या खेळाकडे ढुंकूनही पाहत नाही. असे अनेक चांगले खेळाडू समाजात दिसतात. त्यातीलच एक असलेले अंबड पोलिस स्टेशनचे हवालदार नंदू रामभाऊ उगले हे होय. मात्र, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर उगलेंनी आपला धावण्याचा छंदच जोपासला असे नाही तर या कर्तृत्वाचा झेंडा रोवण्यासाठी ते लवकरच ऑस्ट्रेलियात जाणार आहे.

पोलिस दलात १९९० मध्ये भरती झालेल्या उगलेंचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील समशेरपूर. दहावीपर्यंत गावातच शिक्षण घेतलेल्या उगलेंना व्यायमासह धावण्याची आवड सुरुवातीपासूनच होती. पुढे शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर हाच छंद त्यांना पोलिस दलापर्यंत घेऊन आला. भरती प्रक्रियेमध्ये सर्वांत जलद धावण्याच्या त्याच्या विक्रमामुळे तत्कालीन आयुक्त के. के. कश्यप यांनी त्यांचा सत्कार केला.

पोलिस म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या उगलेंवर प्रापंचिक जबाबदारी येऊन पडली. जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेतलेल्या उगलेंना मग धावण्यासाठी वेळ अपूरा पडू लागला. त्यातच पैशांचे सोंगही घेण्यासारखे नव्हते. हळूहळू उगलेंच्या खेळातील व्यवसायिकात मागे पडली. दोन मुलांले झाल्यानंतर त्यांचे शिक्षण आणि त्यांच्या खेळातील आवड जोपसण्यावरच उमले यांनी भर दिला. २०१२ त्यांची मुलगी अंकिता तायक्वादो स्पर्धेसाठी नागपूरला गेली. तिथे तिने मेडल मिळवले.

पाल्यांच्या आग्रहामुळे सरावाला सुरुवात

मुलीच्या यशामुळे नंदू उगलेंमधील खेळाडू जागा झाला. अंकीता व मुलगा मेघनील यांनी वडिलांच्या छंदाला जोपसण्याचा विडाच उचलला. उगलेंनी धावण्याचा सराव सुरू केला. पत्नी सुरेखा यांनीही जोड व्यवसाय सुरू करून पतीला आर्थिक मदत करण्यात खारीचा वाटा उचलला. त्यांनी सर्वात प्रथम मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. २१ किलोमीटरचे अतंर त्यांनी दोन तासात पार पाडले. अवधी जास्त लागला. मात्र, त्यामुळे खचून न जाता सराव सुरूच ठेवला. त्यानंतरच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये हेच अंतर त्यांनी दीड तासात कापले. पुढे मविप्र,

केरळ, हैदराबाद, ठाणा, गोदा मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घेतला. दरम्यान, हरियाणा येथील रोहतकमध्ये ३५ वी नॅशल मास्टर अॅथेलिटिक्स स्पर्धा पार पडली. त्यातील चार प्रकारापैकी १५०० मीटर धावणे आणि २ बाय २ १०० मीटर रिलेमध्ये त्यांना रजत पदक मिळाले. ४३ वर्षिय उगले यांच्यातील उत्साह पाहून इंडिया मास्टर अॅथेलिटिक्स संघटनेने ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली आहे.

खेळातील व्यावसायिकता जपण्यासाठी वेळ आणि पैसा लागतो. विशेषतः राष्ट्रीय किंवा आतंरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्याची आवश्यकता भासते. दोन्ही मुले इंजिनीअरिंगला असून वडील १४ वर्षांपासून पक्षघाताने आजारी आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियात कसे जायचे याची विवंचना समोर आहे. त्यातून काही मार्ग निघाला तर नक्कीच यश मिळवेन.

- नंदू उगले, हवालदार, अंबड पोलिस स्टेशन

दिलीप दातीर यांच्यातर्फे मदत

अंबड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले नंदू रामभाऊ उगले यांची ऑस्ट्रेलियात होणाऱ्या अॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. घराची बेताची परिस्थिती असलेल्या उगले यांना माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश दिला. यावेळी अन्य दानशूर व्यक्तींनीही उगले यांना मदत करावी, असे आवाहन दातीर यांनी केली.

प्रश्न आर्थिक जुळावाजुळवीचा

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठी आर्थिक तरतुदीची गरज आहे. पोलिस कल्याणनिधीमधून शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिले असून अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उगले यांचे सहकारीही मदतीसाठी एकटवले आहे. समाजातील इतर स्तरातून मदतीचा ओघ मिळाल्यास ऑस्ट्रेलियाला पोहचणे शक्य होईल, अशी अपेक्षा उगलेंना वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानगंगा सक्षमतेसाठी ‘थिंक टँक’

$
0
0

विविध क्षेत्रातील ९ तज्ज्ञ मुक्त विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने वैविध्यपूर्ण उपक्रम सुरु केले असून ज्ञानगंगेला सशक्त करण्यासाठी 'थिंक टँकची' निर्मिती करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागात आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञ आणि संशोधकांना विद्वत परिषदेवर संधी देवून त्यांच्या सूचनांद्वारे अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेलेल्या किंवा शिक्षणापासून कोसो दूर असलेल्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविण्यासाठी मुक्त विद्यापीठाची स्थापना केली आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यासाठी विद्यापीठाद्वारे विद्वत परिषद कार्यरत असते. या परिषदेवर मात्र बहुतांशवेळा कुलगुरुंच्या मर्जीतले किंवा विद्यापीठाशी संबंधित व्यक्तींना घेतले जाते.

त्यामुळे या परिषदेच्या व्यासपीठाचा प्रभावीपणे वापर केला जात नाही. मात्र, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी या परिषदेला थिंक टँकचा दर्जा देत विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यात नियुक्त केले आहे. या मान्यवरांनी केलेल्या विविध सूचना आणि शिफारशींचा विचार करुन वैशिष्ट्यपूर्ण अशा अभ्यासक्रमांची रचना केली जाणार आहे. त्याद्वारे विविध विभाग आणि विषयातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळ्याचा अमेरिकेत जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैश्विक सोहळा असलेला सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या अडीच महिन्यांवर येवून ठेपला असताना या सोहळ्याचा जागर आता अमेरिकेत होत आहे. मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)च्या प्रांगणात होणाऱ्या कुंभथॉन या आंतरराष्ट्रीय परिषदेत मंगळवारी रात्री (अमेरिकेत सकाळी) विशेष चर्चासत्र होत आहे.

दर १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला येत्या जुलै महिन्यात प्रारंभ होत आहे. लाखो साधू आणि भक्तांच्या आगमनामुळे हा सोहळा वैश्विक होतो. या सोहळ्याचे आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, या सोहळ्याचे योग्य ते नियोजन होणेही आवश्यक आहे. तंत्रज्ञानाची जोड देवून या सोहळ्यात आपत्ती घडू नये आणि अत्याधुनिक तंत्रांचा वापर करुन या सोहळ्याला चार चाँद लावण्यासाठी कुंभथॉन ही संकल्पना मांडण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून या संकल्पनेद्वारे इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांसह आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांपर्यंत सर्वांना सामावून घेण्यात आले आहे. कुंभथॉनमधील विचार मंथनातून पुढे आलेल्या दहा विविध संकल्पनांवर सध्या काम केले जात आहे. या संकल्पना येत्या जून महिन्यात प्रत्यक्षात येणार असून, तत्पुर्वी या संकल्पनांचे सादरीकरण करण्यासाठी अमेरिकेतील जगविख्यात एमआयटी संस्थेमध्ये विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

कुंभथॉनच्या आयोजनात सहभागी असलेले आयटी तज्ज्ञ सुनील खांडबहाले, टीसीएसचे संदीप शिंदे, एमकेसीएलचे सुभाष पाटील, टेन एक्स ग्रोथचे अजय सिंगानिया हे पाच जण एमआयटीत दाखल झाले आहेत. एमआयटीचा वार्षिक महोत्सव गेल्या रविवारपासून (१२ एप्रिल) सुरु झाला आहे. गेल्या वर्षभरात एमआयटीच्या विद्यार्थी व संशोधकांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचे सादरीकरण त्यात केले जाते. आता त्याच महोत्सवात कुंभथॉनचेही सादरीकरण होत असल्याचे शिंदे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले आहे.

इनोव्हेशन सेंटर

साथीचे रोग, मेडिकल ट्रॅकिंग, क्राऊड मॅनेजमेंट, २डी अँड ३डी मॅप, लोकल कम्युनिटी रेडिओ, अन्नदान, अशा एकूण १० प्रकल्पांवर कुंभथॉनमध्ये काम केले जात आहे. तसेच, हे प्रकल्प अत्यंत प्रभावशाली कसे होऊ शकतील, यावर तेथे विचारमंथन केले जाणार आहे. नाशिकसारख्या शहरात अशा प्रकारच्या वैश्विक सोह‍ळ्याला संशोधनाची जोड देण्यात येत असल्याने नाशिकला इनोव्हेशन सेंटर व्हावे असा विचार आम्ही तेथे मांडत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याद्वारे एकूणच नाशिक शहराचे ब्रँडिंग होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ!

$
0
0

तीन वर्षांपासून प्रथमोपचार पेट्यांची खरेदी बंद; उपचारांभावी दहा वर्षांत आठशे मृत्यू

विनोद पाटील, नाशिक

आदिवासी विकास विभागाने आदिवासी आश्रमशाळांसाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रथमोपचार पेट्यांची खरेदीच केलेली नाही. त्यामुळे साडेचार लाख विद्यार्थी जीव मुठीत धरूनच शिक्षण घेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे आदिवासी आश्रमशाळांमध्ये प्रथमोचाराअभावी दहा वर्षांत ७९३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी विभागाच्याच सर्व्हेक्षणात समोर आली आहे. मोठ्या योजनांच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी करणारा हा विभाग विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत असल्याचेच स्पष्ट होत आहे.

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा या शिक्षणापेक्षा गैरप्रकारांसाठीच चर्चेत असतात. भ्रष्टाचार, नोकरभरती, निकृष्ठ आहारपुरवठा, मुलींचे विनयभंग अशा घटना नित्याचाच बनल्या आहेत. त्यास राजकीय उदासीनतेसोबतच प्रशासकीय पातळीवरील उदासीनताही कारणीभूत आहे. राज्यात शासकीय आश्रमशाळांची संख्या ५५२, तर खाजगी अनुदानित आश्रमशाळांची संख्या ५५६ आहे. या ११०८ आश्रमशाळामंध्ये दरवर्षी साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, आश्रमशाळांमधील गैरसोयींमुळे दरवर्षी सरासरी ५० ते ६० मुलांचा मृत्यू होतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णतः हेळसांड विभागाकडून केली जात आहे.

आश्रमशाळा दुर्गम भागात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना, अपघात, विविध आजार, विंचू व सर्पदंश सारख्या घटनांमध्ये प्रथमोपचार मिळाला नाही, तर त्यांचा मृत्यू ओढावतो. त्यामुळे आश्रमशाळांसाठी प्रथमोपचार पेट्यांची खरेदी करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने २०११ मध्ये घेतला होता. पहिल्या वर्षी सव्वा कोटी रुपये खर्चून या पेट्यांची खरेदी करण्यात आली. या पेट्यांचे आयुष्य एक वर्षाचेच असल्याने दरवर्षी या पेट्या हाफकीन संस्थेतर्फे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लालफितीचा फटका आदिवासी विद्यार्थ्यांना बसला असून, सन २०१२ पासून या पेट्यांची खरेदीच लालफितीत अडकली आहे. दरवर्षी साधारणतः दीड ते दोन कोटींची आवश्यकता असतांनाही गेल्या तीन वर्षांपासून खरेदी झाली नाही.

राज्यातील ११०८ आश्रमशाळांमध्ये २००२ ते २०१२ दरम्यान ७९३ मुलांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. यात सर्पदंशाने ५५, नैसर्गिक मृत्यू व आत्महत्या १७६ तर प्राथमिक उपचार न मिळाल्याने ४३४ मुलांचा मुत्यू झाल्याचे आढळून आले.

हायकोर्टाचा इशारा

आदिवासी आश्रमशाळांची दयनीय स्थिती आणि तोकड्या सुविधांसंदर्भात पुण्यातील याचिकाकर्ते रवींद्र तळपे यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. मुलांच्या मुत्यूसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात ७ एप्रिलला सुनावणी झाली असून, पंधरा दिवसांत उपाययोजनांची माहिती सादर करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत. माहिती सादर न केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा कोर्टाने दिला आहे. त्यामुळे विभागाच्या वतीने सध्या कागदोपत्री उपाययोजनांची जुळवाजुळव सुरू आहे. दरम्यान, अहवालानंतरही आश्रमशाळांमधील उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. एवढ्या मुलांचा जीव जावूनही आदिवासी विभागाने झोपचे सोंग पांघरले आहे.

एकीकडे विभागात शेकडो कोटींचे घोटाळे उघड होत असताना, केवळ दीड ते दोन कोटींच्या खरेदीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आदिवासी मुलांबद्दल आदिवासी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता असून, आता न्यायालयच यांदर्भात निर्णय घेणार आहे.

- रवींद्र तळपे, याचिकाकर्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलनाका प्रशासन नरमले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

प्रसारमाध्यमे व राजकीय नेत्यांचा दबाव वाढल्यानंतर पिंपळगाव बसवंत येथील वादग्रस्त टोल प्रशासनाने स्थानिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय स्थगित केला आहे. याबाबत एक मे नंतर निर्णय घेतला जाईल, असे टोल प्रशासनाने स्थानिक कामगारांना कळविले आहे. त्यामुळे या कामगारांना पंधरा दिवसांचे तरी अभय मिळाले आहे.

टोलनाक्यवरील नोकरी कायम राहावी यासाठी टोल प्रशासनाशी लढा देण्याचा निर्धार स्थानिक कामगारांनी व्यक्त केला असून, त्यासाठी भारतीय मजदूर संघ प्रणित महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटनेचे स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेत पिंपळगाव टोलनाक्यावर काम करणा-या स्थानिक कामगारांसह शंभरपेक्षा अधिक कामगार सहभागी

झाल्याने संघटनेचा लढा तीव्र होणार आहे. त्यामुळे नेहमी या ना त्या कारणावरून वादात असलेला हा टोलनाका नव्याने वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

टोल नाक्यावरील स्थानिक सुरक्षा कामगार स्थानिक वाहनचालकांशी मिलीभगत करीत असल्याचा आरोप करीत टोल प्रशासनाने या कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. किमान ७० ते ७५ जणांना नोकरीपासून मुकावे लागणार होते. मात्र, स्थानिक राजकीय पदाधिकारी व काही संस्थांनी आवाज उठविल्याने हा विषय चांगलाच गाजला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धन्य धन्य निवृत्ती देवा...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

धन्य धन्य निवृत्ती देवा असे म्हणत हजारो भाविक उटीच्या वारीच्या निमित्ताने नाथांच्या चरणी लिन झाले. चैत्र वद्य एकादशीस दुपारी दोन वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीस दाहक उन्हाळ्या शितल चंदनाचा लेप म्हणजेच उटी लावली तेव्हा सभामंडपात उपस्थित वारकरी संत एकनाथांचा अभंग म्हणत तल्लीन झाले होते.

चैत्र वद्य एकादशीचे दुपारी दोन ते तीन वाजेच्यादरम्यान शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा हरिनामाच्या गजरात संपन्न झाला. सभामंडपात ह. भ. प. सुरेशमहाराज गोसावी यांनी अभंग सेवा सादर केली. दुपारी दोन वाजता दर्शनरांग थांबवून संत निवृत्तीनाथांच्या समाधीस चंदनाची उटी लावण्यात आली. या प्रसंगी समाधी मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर पाटील तसेच विश्वस्त महामंडलेवर डॉ. राधाकृष्ण महाराज लहवीतकर, सुमनताई खुळे आदिंसह जयंत महाराज गोसावी तसेच नित्यसेवेकरी भाविक उपस्थित होते. क्षेत्र ञ्यंबकेवर येथे दशमीपासूनच भाविकांची मांदियाळी अनुभवास आली आहे.

चैत्र वद्य दशमीचे सायंकाळपासूनच शहरात भाविकांचा ओघ सुरू झाला होता. मंदिर आणि परिसरात पेंडाल टाकून भजन कीर्तनाची सोय केली होती. एकादशीच्या पहाटेपासूनच तीर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी रिघ लागली होती. टाळ मृदुंग भगव्या पताका यांनी पौष वारीच्या आठवणींना उजाळा देत शहर वारक-यांनी यात्रा पटांगणासह संपूर्ण शहर गजबजले होते. सायंकाळपर्यंत भाविकांचा ओघ सुरू होता. त्र्यंबकराजाच्या मंदिरात देखील वारकरी भाविकांची गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या गंगापूर नाक्यावर वाहतुकीचा बोजवारा

$
0
0

प्रवीण बिडवे

रोगापेक्षा इलाज कसा भयंकर असतो हे महापालिकेचा उफराट्या ‍कारभारामुळे नागरिकांना दिसू लागले आहे. गंगापूर रोडवरील जुन्या गंगापूर नाक्यावर वाहतुकीचा बोजवारा उडविणारे बोलके चित्र सध्या नागरिकांच्या चर्चेचा विषय बनले आहे. या चौकातील सर्कल काढून वाहतूक सिग्नल बसविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले खरे, मात्र उघड्या पडलेल्या या चौकात वाहने एकमेकांसमोर उभी येऊन ठाकल्याने अपघातांना निमंत्रण मिळू लागले आहे. सिग्नल बसविल्यांनतर सर्कल तोडले असते तर चालू शकले नसते का असा सवाल उपस्थित होतो आहे.

वाहतूक व्यवस्था सुरळीत हवी असेल तर त्याचे नियोजन असायलाच हवे. ते नसेल तर त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांना सर्वांनाच सामोरे जावे लागते. शहरातील वाहतुकीचे नियोजन करताना काही मुख्य चौकांमध्ये वाहतूक सिग्नल बसवायला हवेत हा विचार पुढे आला. त्याबाबतची कार्यवाही आता सुरू होऊ लागली आहे. मात्र, त्यातही महापालिकेचे नियोजन चुकू लागले की काय अशी विचारणा नागरिकांकडून होऊ लागली आहे.

अशोकस्तंभ ते गंगापूर गाव हा रस्ता गंगापूर रोड म्हणून प्रचलित आहे. उच्च आणि उच्च मध्यमवर्गीयांची वसाहत म्हणूनही या परिसराकडे पाहिले जाते. या रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्या सुटाव्यात अशी नागरिकांची नेहमीचीच मागणी राहिली आहे. त्यादृष्टीने महापालिका, पोलिसांचा वाहतूक विभाग प्रयत्न करताना दिसतात. त्याला काही अंशी यश आले असले तरी अजूनही या रस्त्यावरील वाहतूकीत बऱ्याचशा सुधारणा व्हाव्यात अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

जुना गंगापूर नाक्याचा परिसर वर्दळीचाच आहे. डोंगरे वसतिगृह, प्रमोद महाजन उद्यान, शहरातील मोठे लॉन्स, मंगल कार्यालये, मखमलाबाद, कॅनडा कॉर्नर आणि थेट पंचवटीकडे जाण्यासाठीचा मुख्य मार्ग म्हणून या चौकाकडे नागरिकांकडून पसंती दिली जाते. या चौकातील वाहतुकीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. तसे होण्याचे कारणही महापालिकेच्या चुकलेल्या नियोजनात दडले आहे. गेल्या आठवड्यात या चौकातील सर्कल काढून टाकण्यात आले. त्यामुळे हा चौक मोठा आणि मोकळा झाल्यासारखे वाटत असले तरी तेथील वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांची दमछाक होऊ लागली आहे. या चौकात वाहनधारकांच्या वेगाला कमी करण्याचे काम या सर्कलमुळे होते. सर्कलवरच हातोडे पडल्याने हा चौक मोकळा झाला असला तरी तो वाहनधारकांना वेगाने वाहने दामटविण्याचे ठिकाण वाटू लागले आहे. यातूनच या चौकामध्ये लहान मोठे अपघात आणि अशा अपघातांची शक्यता बळावली आहे. पूर्वी लोक सर्कलला वळसा मारून जात असत. त्यामुळे चौकात येणाऱ्या वाहनधारकाचा वेग आपसूकच कमी होत असे. आता वेगावर नियंत्रण आणणारा सर्कलच भुईसपाट झाला आहे. परिणामी मोकळ्या रस्त्यावर वाहनधारकांकडून वहानेही वेगाने दामटविली जात आहेत.

या चौकातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठीच महापालिकेकडून सर्कल काढण्यात आले याबाबत दुमत नाही. चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्याचा निर्णय झाल्याने सर्कल काढण्याचा निर्णय झाला. परंतु, सिग्नल न बसविताच सर्कल काढणे कितपत व्यवहार्य आहे, याचाही विचार व्हायला हवा होता. तो न झाल्याने या चौकातील वाहतुकीच्या समस्या वाढल्य आहेत. सिग्नल यंत्रणा बसविल्यानंतर सर्कल काढला असता तर सध्या होत असलेले अपघात रोखता आले असते असे मत जाणकारांकडून व्यक्त होऊ लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुभाजकामुळे गैरसोय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोडला जंक्चर केल्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अपघाताचे प्रमाण कमी होणार असल्यामुळे पादचाऱ्यांकडून स्वागत होत असले तरी जंक्चरमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून लांबून वळसा घालावा लागत असल्याने नाराजी देखील व्यक्त होत आहे.

दत्तमंदिर चौक ते व्दारका दरम्यान अनेक ठिकाणी महामार्गाला कॉलनी रस्ते येऊन मिळतात. या उपरस्त्यांना वाहनधारक सिग्नल न दाखवता महामार्गावरून अचानक वळत असल्याने अपघात होत आहेत. ही धोक्याची वळणे दुभाजक टाकून बंद करण्यास महामार्ग प्राधिकरणाने प्रारंभ केला आहे. दत्तमंदिर ते व्दारका दरम्यान अशी सात जंक्चर (रस्ता क्रॉसिंग) सुरू राहणार आहेत. त्यामध्ये बोधलेनगर, आंबेडकरनगर, उपनगर बसस्टाप, दत्तमंदिर, शिक्रेवाडी, काठेगल्ली, विजयममता यांचा समावेश आहे. येथून नेहमीप्रमाणे वाहनांना महामार्गाच्या दोन्ही बाजूला जाण्यास जागा ठेवण्यात आली आहे. मात्र, बिटको कॉलेज, जेतवननगर, गांधीनगर विमानतळ समोर जंक्चर करून दुभाजक टाकल्याने रस्ता ओलांडणे पादचारी आणि वाहनधारकांसाठी दिव्य झाले आहे.

येथे आहे गरज

विजयममता चौक ते व्दारकादरम्यान रस्ता दुभाजक बुझल्यामुळे चारचाकी व दुचाकी दुभाजक ओलांडून अचानक महामार्गावर येतात. त्यामुळे अपघात होत आहेत. समाज कल्याण कार्यालय, बोधलेनगर, आंबेडकरनगर, जेतवननगर आदी ठिकाणी अशा धोक्यांमुळेच जंक्चर बंद करणे आवश्यक झाले आहे.

येथे होते अडचण

बिटको कॉलेजसमोरील रस्ता क्रॉसिंग (जंक्चर) बंद केल्याने विद्यार्थ्यांना दुरून वळसा घालावा लागत आहे. गांधीनगर विमानतळासमोरील क्रॉसिंगही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे उपनगर नाक्याला जाऊन गांधीनगरकडे वळावे लागते. तसेच उपनगरहून गांधीनगरप्रेसकडे जायचे झाल्यास आंबेडकरनगरला जाऊन वळसा घ्यावा लागतो. या दोन्ही ठिकाणी वाहनांची रांग असल्याने रस्ता ओलांडायला दीर्घ प्रतिक्षा करावी लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकवर्गणीतून विकासकामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्पमध्ये लोकवर्गणीतून येत्या रविवारी (दि. १९) ६० लाख रुपये खर्चाच्या भूमिगत गटार योजनेच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी मदत करणाऱ्या दानवीरांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाला प्रारंभ होत आहे. या उपक्रमासाठी लामरोड मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गोडसे यांनी प्रयत्न केले आहेत.

लामरोडच्या दुरवस्थेसंदर्भात 'मटा'ने वाचा फोडली आहे. वॉर्ड क्रमांक ४ मधील महत्त्वाच्या भूमिगत गटार योजनेच्या शुभारंभ प्रसंगी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार राजाभाऊ गोडसे, खासदार हरिशचंद्र चव्हाण, शिवसेना उपनेते बबनराव घोलप आदी उपस्थित राहणार आहे.

लामरोड भागातून सांडपाणी निचरा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने या परिसरात सातत्याने दुर्गंधी व डासांचा त्रास सर्व सामान्यांना होत होता. याचीच दखल चंद्रकांत गोडसे यांनी परिसरातील नागरिक व व्यापारी यांच्या सहाय्याने ६० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. या पैशातून सुमारे ८७५ मीटर लांबीच्या भूमिगत गटार योजनेसाठी विठ्ठलवाडी ते बालगृह रोड १४ लाख रुपये तर बालगृह रोड ते निकीसागर येथील नाल्यापर्यंत ४४ लाख रुपये खर्चाचे सिमेंट पाईप टाकण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाल्यांमुळे आरोग्य धोक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळाली परिसरातील गोडसे मळा भागात असणाऱ्या नागरिकांचे आरोग्य उघड्या गटारींमुळे धोक्यात सापडले आहे. सततच्या दुर्गंधीमुळे रहिवाशी हैराण झाले असून या भागात असणाऱ्या गटारांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकहून केली जात आहे.

गेल्या अनेक वर्षापासून या भागातील बुचरी खान्यामुळे परिसरात कायमची दुर्गधी पसरत असून यामुळे नागरिकांना हैराण केले आहे. विविध आजारांना या दुर्गंधीमुळे आमंत्रण मिळत असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी लष्करालगतच्या या भागात नवीन वसाहती निर्माण झाल्या आहे. या वसाहतींमधून वाहणारे सांडपाणी थेट नाल्यात सोडले जाते. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या नाल्याची प्रशासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून स्वच्छताच करण्यात आलेली नाही. सांडपाण्यामुळे नाल्यालगत आणि गोडसे मळा परिसरात जंगली वनस्पतीचे जाळे निर्माण झाले आहे. याच नाल्यामधून रात्रीच्या वेळी अनेक साप फिरतात नागरिकांना नेहमीच दिसतात. यामुळे परिसरात लहान बालके रसत्यावर येण्यास घाबरतात. सापांची दहशत पावसाळ्याच्या दिवसात अधिक गडद होत जाते.

जलवाहिनी बदलण्याची गरज

गोडसे मळा भागात पथदीपही कायम बंद अवस्थेत आढळून येतात. पिण्याच्या पाण्याची २ इंची पाईपलाईन आहे. ती त्वरित बदलण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. नागरिकांची वस्ती दिवसेंदिवस वाढत असून पिण्याचे पाणी पुरत नसल्यामुळे विजेच्या मोटर लावून पाणी खेचण्याची स्पर्धा लागलेली दिसते. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या काही वसाहतींमध्ये ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. ज्यांच्याकडे मोटारी नाहीत त्यांची अवस्था अधिक वाईट आहे. त्यामुळे जलवाहिनी बदलण्याची गरज असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

देवळाली कॅन्टोन्मेन्ट प्रशासनाच्या वतीन परिसरात नियमितपणे स्वच्छता केली जावी व घंटागाडीच्या माध्यमातून नियमित कचरा उचलण्यात यावा. - अविनाश गजरे

प्रशासनाकडून दररोज सुमारे एक तास पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यातील निम्म्यापेक्षा अधिक वेळ पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. - सावित्रीबाई पालवे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'नासा'ला हवे प्रायोजकत्व

$
0
0

मंदार देशमुख

'नासाचा उच्चार केल्यावर डोळ्यासमोर येते ती अमेरीकेतील अंतराळ संस्था. जिच्या सहाय्याने अंतराळातील ज्ञात नसलेल्या गोष्टींची माहिती होते. तर नाशिकमधील नासा म्हणजे नाशिक ऑटोमोटीव्ह स्पोर्टस् असोसिएशन. जिची स्थापना १९८० च्या उत्तरार्धात भास्कर पटवर्धन, होशी पटेल, धनंजय वडनगरे, रमेश बर्डे, देशपांडे बंधू यांनी एकत्र येऊन केली. इतर खेळांच्या संघटना व 'नासा' यांच्यात मुलभूत फरक आहे. ऑटोमोटीव्ह स्पोर्टसची गणना मुलत: खर्चिक व साहसी खेळामध्ये होते. त्यामुळे इतर खेळांच्या स्पर्धांना लाभणारा खेळाडूंचा, संघाचा सहभाग व 'नासाला लाभणारा प्रतिसाद याची तुलनाच होऊ शकत नाही. कारण दोन्ही ठिकाणच्या स्पर्धा आयोजनात सुद्धा खुप मोठा फरक आहे. ऑटोमोटीव्ह स्पोर्टस् म्हणजे काळाबरोबर गती व सुरक्षिततेशी असलेली स्पर्धा.

'नासा' ची स्थापना झाल्यानंतर पहिले तपभर स्पोर्टस् रॅलीच्या स्पर्धा सातत्याने आयोज‌ति केल्या जात होत्या. ऑटोमोटीव्ह स्पोर्टस् असल्यामुळे त्या काळात कॅस्ट्रॉल अथवा व्हिडोलच्या माध्यमातून त्यांना प्रायोजकत्व लाभत होते. पण काळाच्या ओघात दूरचित्रवाणी या माध्यमाचा प्रसार वेगाने झाला व त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर आक्रमण केले. त्यामुळे एखाद्या शहरात होणारी व प्रसिद्धीच्या मर्यादा असलेल्या रॅलीला प्रायोजकत्व देण्यापेक्षा क्रिकेट अथवा ज्या खेळांचे प्रसारण टीव्हीच्या माध्यमातून सातत्याने घरबसल्या होत असल्याने त्याकडे सगळ्यांचे लक्ष गेले. प्रिंट मीडियापर्यंत मर्यादीत असलेल्या या साहसी खेळाला प्रायोजकत्व मिळविणे दिवसेंदिवस 'नासा'ला अवघड होत गेले. मधल्या कालखंडात राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या फेरीचे आयोजन नाशिकमध्ये केले जात होते. त्यामध्ये नासाचा वाटा सहआयोजका इतका मर्यादीत स्वरूपाचा होता. पुण्याच्या ऑटोमोटीव्ह स्पोर्टसमधील एक अग्रगण्य स्पर्धक म्हणून जो सुपरिचीत होता अशा शाम कोठारीने स्वत:ची स्पोर्टस् ट्रेक नावाची कंपनी काढली व जिचे नव्याने गुड स्पिड असे बारसे झाले. त्याच्या मदतीने सदर स्पर्धांचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले. कालांतराने 'नासाच्या कार्यकारीणी सदस्यांमध्ये काही बदल झाले. नवीन पिढीशी जे नाते सांगू शकतील असे मनिष चिटको, शेरजाद पटेल व त्यांचे इतर सहकारी भास्कर पटवर्धनांच्या मदतीला आले व काळाच्या ओघात थोडीशी मंदावलेली, थोडी मागे पडलेली 'नासा'च्या नव्याने नवीन आव्हाने स्विकारण्यास तयार झाली.

येत्या रविवारी ६ ते ७ वर्षांनंतर 'नासा'च्या वतीने ७५ स्वयंसेवकांच्या सहकार्याने ड्रमस्टीक लगुन रिसॉर्ट फॅम‌लिी नेव्ह‌गिेशन रॅलीचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात येत आहे. अंदाजे १०० कि.मी. अंतराची दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी या रॅलीचे आयोजन केले आहे. इतर रॅली व ही रॅली याच्यात मुख्य फरक आहे तो वेग अथवा गतीचा. इतर रॅलीमध्ये गतीला महत्त्व दिले जाते. पण या रॅलीमध्ये नुसत्या वेगाला नव्हे; तर जबाबदारीने सार्वजनिक ठिकाणी वाहने चालवताना त्यांच्या नियमाचे पालन करत ही स्पर्धा जिंकण्याचे आव्हान नजरेसमोर ठेवून यात सहभागी व्हावे लागणार आहे. अंदाजे पस्त‌सि ते चाळीस प्रवेशिका आयोजकांनी गृहीत धरल्या आहेत. तर स्पर्धेचे १०० कि.मी. चे अंतर स्पर्धेला प्रत्यक्ष प्रारंभ झाल्यापासून सुमारे १८० ते १९० मिन‌टिांमध्ये पूर्ण होऊन पहिला स्पर्धक हा त्र्यंबक-वाडीवऱ्हे रस्त्यावरील स्पर्धेचे प्रायोजकत्व ज्यांनी स्विकारले आहे. त्या ड्रमस्टीक लगून रिसॉर्ट, शेवगे डांग या ठिकाणी पोहोचेल असे आयोजकांना वाटते.

सुमारे तीन दशकांपेक्षा जास्त काळ नासा ही संस्था नाशिकमध्ये कार्यरत आहे. या काळात संस्थेने, पदरमोड करून संस्था जपणाऱ्या कार्यकर्त्याच्या एका पिढीची ओळख नाशिककरांना करून दिली. पण सध्याच्या व्यवहारी व आधुनिक जगात विविध प्रकारच्या प्रसारमाध्यमांचे समाज जीवनावर अतिक्रमण झालेले आहे. अशा परिस्थितीत आदर्शवादाला व्यावहारीक जोड देणे आता गरजेचे झाले आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेचे, रॅलीचे आयोजन करताना 'नासा'ने आता विचार केला पाहिजे तो आर्थिक गंगाजळीचा. त्यामुळे याच्या आयोजनातून दोन पैसे तरी त्यांच्या स्वत:च्या संस्थेसाठी शिल्लक ठेवणे आता क्रमप्राप्त झाले आहे. तरच भविष्यातील नव्या स्वप्नांना ते सहजपणे सामोरे जावू शकतील. वेळ-वेग-अंतर पद्धतीचे रॅलीचे आयोजन करणाऱ्या नासाला गरज आहे. ती त्यापुढे धन हा शब्द लिह‌ण्यिाची व ती वास्तव्यात आणण्याची. त्यांच्या कृत‌‌ीशील पंखांना भरारी घेण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live

Latest Images