Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भरपाईपोटी हवेत आणखी ७२ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सप्टेंबर ते मार्चदरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून सुमारे ७२ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. नुकसानभरपाईची ही रक्कम मिळावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे.

नोव्हेंबर आणि डिसेंबर म‌हिन्यात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला ५५ कोटी रुपये प्राप्त झाले. पिक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असले तरी नुकसानग्रस्तांना अजून मदत प्राप्त होऊ शकलेली नाही. नोव्हेंबरपूर्वी झालेल्या पावसाबाबत तसेच जानेवारीनंतर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शासनाकडून निधी मिळू शकलेला नाही.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर तसेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे ५६२ गावे बाधित झाली होती. तेथील ९४ हजार ६५९ शेतकऱ्यांचे ३९३४४.१२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सप्टेंबरमध्ये १०१६ शेतकऱ्यांच्या १८०.१६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. ऑक्टोबरमध्ये १९४१ शेतकऱ्यांचे ९९६.९४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. फेब्रुवारी २०१५ मध्ये २० हजार ८५९ शेतकऱ्यांचे १९५५.४७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाचा फटका बसला. तर मार्चमध्ये सर्वाधिक १५ हजार ५२२ शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यांची ६०३१ हेक्टर क्षेत्रावरील पिके उद्‌ध्वस्त झाली. १० ते १४ मार्च या कालावधीत बेमोसमी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे ३०१८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या सर्व नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. मात्र, शासनाकडून त्यांना अद्याप कोणतीही आर्थिक मदत प्राप्त झालेली नाही. ही मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंग्रजी भाषेवर बंदी आणा

$
0
0

भालचंद्र नेमाडे यांचे प्रतिपादन; गिरणागौरव पुरस्काराचे वितरण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंग्रजी शाळांचे आक्रमण ही चिंतेची बाब आहे. साम, दाम, दंड, भेद वापरा परंतु इंग्रजीचे हे वर्चस्व झुगारून द्या. आपल्या मुलांना मराठी शाळेत घाला, इंग्रजी शाळेत घालून त्यांचे प्राण घेऊ नका, अफूवर जशी बंदी घालण्यात आली आहे. तशी आपण एकजूट करून इंग्रजीवर बंदी आणण्यासाठी चळवळ उभी करा, असे आवाहन ज्ञानपीठ पुरस्कार घोषित, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केले.

गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा पहिला जीवनगौरव पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार अत्यंत वेगळ्या पध्दतीने विसापूर (ता. कळवण) येथील शेतकरी दाम्पत्य भास्कर गुंजाळ व सरस्वती गुंजाळ यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला. रविवारी महाकवी कालिदास कलामंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पुरस्काराला उत्तर देताना नेमाडे म्हणाले, की इंग्रजी ही भाषा म्हणून शिकण्यासाठी हरकत नाही; परंतु तिचा दबाव घेण्याचे कारण नाही. आपण जगाचे जितके आकलन आपल्या मातृभाषेतून करू शकतो तितके इतर कोणत्याच भाषेतून करून शकत नाही. दीडशे वर्षे ज्यांनी आपल्यावर राज्य केले त्यांचा पगडा सोडायलाच आपण तयार नाही. अगदी झोपडपट्टी इंटरनॅशनल स्कूल नावाने इंग्रजी शाळा सुरू झाली तर त्यात आपल्या पाल्याचे अॅडमिशन घ्यायला आपण मागेपुढे पहाणार नाही, असेही नेमाडे म्हणाले.

नेमाडे म्हणाले, की शहरी माणूस हा आयते खाणार असतो त्यामुळे त्याने आता शेतकऱ्यांसाठी टॅक्स देण्याची गरज आहे. त्याला शेतकरी टॅक्स असेच संबोधण्यात यावे. त्यासाठी मी आता चळवळ उभारण्याच्या तयारीत आहे. अडाणी, असंस्कृत लोकांनीच आतापर्यंत संस्कृती टिकवली आहे. ते आतापर्यंत वहात असलेला संस्कृतीचा भार आता आपण आपल्या खांद्यावर घ्यायला हवा. नवता ही परंपरेतच असते, बाहेर कोठेही नसते हे समजून घ्यावे असा सल्लाही नेमाडे यांनी यावेळी दिला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आनंद अॅग्रोचे उध्दव आहेर, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार यांची उपस्थिती होती. दीपक चव्हाण लिखित 'बांधावरचा उद्योजक' या पुस्तकाचे व सुगंधदान या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उध्दव आहेर म्हणाले, की गारपीटीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीतून सावरायला हवे, आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करायला हवा. आत्महत्या करण्यापेक्षा उभारी घेऊन दाखवावी, त्यातच शेतकरी राजाचे कल्याण सामावलेले आहे.

याप्रसंगी सुरेश खानापूरकर, संजय पाटील, विजय हाके, विलास पाटील, दीप्ती राऊत, सुभाष नंदन, डॉ. दिग्विजय शहा, स्मिता तांबे, कृष्णा बच्छाव, अभिमन जाधव, सुनीता पाटील अविनाश भामरे, प्रतिभा होळकर, व कवी कमलाकर देसले यांचा गिरणा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पूरस्कारमूर्तींच्या वतीने स्मिता तांबे व कमलाकर देसले यांनी छोटेखानी भाषण केले.

वैशाली आहेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश पवार व दत्ता पाटील यांनी मानपत्राचे वाचन तर नेमाडे यांचा दीपक करंज‌ीकर यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. पुरस्कार स्विकारताना संबळ वाजविण्याची विलक्षण कल्पना यावेळी राबविण्यात आली. ते वाजविणारे कृष्णा साबळे व पार्टीचा सत्कार यावेळी नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

डोळ्यांना सुखावणारे नेपथ्य

कलादिर्ग्शक अरुण रहाणे यांनी संपूर्ण कालिदास कलामंदिराचा वापर करून डोळ्यांना सुखावणारे नेपथ्य तयार केले होते. यात कलामंदिराच्या मेनगेटवर चंद्रमौळी झोपडीसारखे साकारण्यात आले होते. मेनगेटमधून आत येताच वडाच्या झाडाचा चौथरा व त्यावर स्थापित ग्रामदेवता अशी रचना करण्यात आली होती तर स्टेजवर आदिमाया सप्तश्रृंगी देवीच्या मंदिराची कमान व प्रतिमा ठेवण्यात आली होती.

पुढचे साहित्य संमेलन काश्मिरमध्ये

अगदी मराठीचा वास जेथे येईल तेथे साहित्य संमेलन भरविण्याची प्रथा साहित्य परिषद पाडत आहे. त्यामुळे पुढील संमेलन जम्मू-काश्मिरमध्ये भरवले गेले तर त्याचे नवल वाटायला नको अशी कोपरखळी भालचंद्र नेमाडे यांनी मारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केसीबी ठेवीदारांचे साखळी उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केबीसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांची ठेव रक्कम परत करण्यासाठी समिती गठित करावी तसेच मुख्यमंत्र्यांनी मुंबई अधिवेशनात दिलेल्या तोंडी आश्वासनांची तातडीने पूर्तता करावी, अशा मागण्या सरकारदरबारी पोहोचविण्यासाठी केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केबीसी ठेवीदारांनी साखळी उपोषणाला सुरवात केली आहे.

सामान्य गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर ठेवी गोळा करून भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण पसार झाले आहेत. ठेवी परत मिळत नसल्याने व्यथित झालेल्या नाशकातील मायलेकांनी आत्महत्या केली. त्यानंतर राज्यभर आंदोलने झाली. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या वेळीही मोर्चा, धरणे आंदोलन करून समितीने राज्य सरकारचे या विषयाकडे लक्ष वेधले. विधी व न्याय राज्यमंत्री रणजित पाटील यांनी ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देऊ असे तोंडी आश्वासन दिले आहे. मात्र, घोषणा आणि आश्वासनांपलीकडे काहीच होत नसल्याने समितीने पुन्हा आंदोलनाचा मार्ग अनुसरला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. सरकारने जप्त केलेल्या केबीसीच्या प्रॉपर्टीचा लिलाव करून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत कराव्यात, सरकारने ठेवीदारांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्यातील तुरतुदींनुसार त्वरीत अध्यादेश काढावा, चव्हाण दाम्पत्याला अटक करण्यासाठी कायदेशीर कार्यवाही त्वरीत पूर्ण करावी, प्रत्येक जिल्हास्तरावर केबीसी ठेवीदारांच्या प्रश्नांबाबत उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी लवकरात लवकर नेमावेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारने तोंडी आश्वसनाऐवजी लेखी आश्वासने द्यावीत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. ६ ते ९ एप्रिलदरम्यान साखळी उपोषण, १० एप्रिलला मेळावा आणि ११ एप्रिलपासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा समितीचे अध्यक्ष करण गायकर यांनी दिला आहे. यावेळी कार्याध्यक्ष गणेश कदम, उपाध्यक्ष संजय सावंत, विजय काकडे, विजय वाहुळे आदींनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्ट मिळवा सहज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परदेशातील प्रवास म्हटला की पासपोर्टची आठवण होते आणि मग धावपळीत आपण पासपोर्ट काढण्याच्या मागे लागतो. पण टेक्नॉलॉजीने सर्वच गोष्टी आता सोप्या केल्या आहेत. ऑनलाईन पासपोर्ट प्रक्रियेनेदेखील हा मार्ग सोपा झाला आहे. पासपोर्ट काढण्यासाठी आता पूर्वीसारखी किचकट पद्धत जास्त प्रमाणात नसल्याने हे कामही लवकरात लवकर होऊ शकते. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पासपोर्ट काढण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ऐनवेळी होणारी गडबड कमी होऊ शकते.

परदेशातील प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र म्हणजे पासपोर्ट अशी साधारण माहिती आपल्याला असते. मात्र, आजच्या परिस्थितीत विचार करायचा झाला तर फक्त परदेशातील प्रवासाचे प्रूफ म्हणून आता याची गरज राहिली नसून आपण या देशाचे नागरिक आहोत, तसेच आपली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी पुरावा म्हणून याचा समावेश होतो. पण एजंट किंवा टूर कंपनीकडे जा आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा याचा कंटाळा आपल्याला येतो. परंतु, आता पासपोर्ट काढणे सोपे झाले आहे.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आपला पासपोर्ट वेळेत मिळू शकतो. त्यासाठी फक्त काही कागदपत्रांची पूर्तता आणि थोडासा वेळ यासाठी द्यावा लागतो.

अशी आहे प्रक्रिया

ऑनलाईन पासपोर्ट अप्लिकेशनमुळे ही सर्व किचकट प्रक्रिया आता सोपी झाली आहे. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या passportindia.gov.in या वेबसाईटवरून तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकतात. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर लॉगिन करून अप्लिकेशन फॉर्म भरायचा असतो. त्यानंतर ऑनलाइन पेमेंट आणि मुलाखतीसाठी घ्यावी लागणारी अपॉईंटमेंट ही स्टेप आहे. अपॉईंटमेंट मिळाल्याने आपला महत्त्वाचा वेळ खर्च होत नाही.

मुलाखतीसाठी जाताना सर्व कागदपत्रांची पूर्तता करायची असल्याने त्याचीही माहिती या वेबसाईटवर मिळू शकते. कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत यापासून ते आपले अप्लिकेशन स्टेटस पाहण्याची सर्व सोय यामध्ये उपलब्ध असल्याने तोही त्रास कमी झाला आहे. काही कारणास्तव आपल्याला मुलाखतीला जाणे शक्य नसल्यास मुलाखतीची वेळ बदलण्याची देखील सुविधा यामध्ये आहे. मात्र यासाठी काही अटी लागू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर घसरल्याने रास्तारोका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

निफाड उपबाजार आवारावर व्यापारी कांद्याचे बाजारभाव कमी पुकारत असल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी लिलाव प्रक्रिया बंद पाडत निफाड येथे सुमारे अर्धा तास रास्तारोको आंदोलन केले. अचानक झालेल्या या रास्तारोकोमुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निफाड येथे औरंगाबाद-नाशिक महामार्ग रोखून धरल्याचे काळातच निफाडचे तहसीलदार डॉ. संदीप आहेर, पोलिस प्रशासनासह बाजार समितीचे संचालक भास्करराव पानगव्हाणे, बबनराव सानप, सहसचिव जी. एम. आढांगळे, व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार डागा यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तहसीलदार आहेर व बाजार समिती संचालकांनी शेतकऱ्यांची समजूत काढल्याने सुमारे अर्धा तासानंतर शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले. मार्चएण्‍ड व सुटींमुळे निफाड उपबाजाराचे कामकाज नऊ बंद राहिले होते. त्यानंतर सोमवारी लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजारावर शेतमालाच्या लिलावाला सुरुवात करण्यात आली. सोमवारी ४५८ वाहने कांदा लिलावासाठी दाखल झाली होती. त्यातील २५८ वाहनांतील कांद्याचा लिलाव पूर्ण झाला होता. त्यानंतर दुपारच्या सत्राला सुरुवात होताच व्यापारी लासलगावच्या तुलनेत कमी भाव पुकारत असल्याचा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव प्रक्रिया बंद पडली. लासलगाव बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर सोमवारी लाल कांद्याला सरसरी ९२५ रुपयांचे भाव मिळाले आहेत. तर, निफाड उपबाजार आवारावर लाल कांद्याला सरासरी दर लासलगावच्या तुलनेत २२५ रुपये कमी पुकारण्यात येऊन ते ७०० रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होऊन त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे निफाड उपबाजार आवारावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आवारावर बाजार समिती अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी थेट महामार्गाकडे धाव घेऊन रास्तारोको केल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. दरम्यान निफाड उपबाजार आवारावर ३ हजार ७३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. बाजारभाव किमान ३०० रुपये, कमाल १ हजार १ रुपये, तर सरासरी भाव ९०० रुपये प्रती क्विंटल होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ उमेदवारी अर्ज अवैध

$
0
0

जिल्हा महिला बँकेसाठी आठ उमेदवारी अर्ज अवैध

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सद्या सुरू असून, उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत बँकेच्या विद्यमान चेअरमन व व्हा. चेअरमन यांच्यासह आठ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. अंतिम छाननीअंती एकूण ४२ अर्जातून ३४ अर्ज वैध तर, आठ अर्ज अवैध ठरविण्यात आले.

विद्यमान चेअरमन सुमन दिनानाथ बागले यांच्या अर्जावर योगिता अपूर्व हिरे व शीतल संजय भामरे यांनी हरकत घेतली होती. महाराष्ट्र सहकारी संस्‍था अधिनियम १९६० च्या कलम ८८ अन्वये विद्यमान चेअरमन सुमन बागले यांना ३७.०९ लाख रक्कम खर्चास जबाबदार धरण्यात आले आहे. यामुळे त्यांचा अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरविण्यात आला.

सर्वसाधारण गटातील विद्यमान व्हा. चेअरमन भारती तुषार अधृंटकर, सिंधू युवराज पाटील यांच्याही अर्जावर शीतल भामरे यांनी वरीलप्रमाणे आक्षेप घेतला होता. त्यानुसार दोघींचाही अर्ज अवैध ठरविण्यात आला. सर्वसाधारण गटातील पुष्पा मदन पारख यांच्या अर्जावरही शीतल भामरे यांनी हरकत घेतली होती. त्यांचाही अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ताईबाई चिंधू सोनवणे व अलका सुरेश गोपाळे यांचेही अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. अंतिम छाननी अंती एकूण ४२ अर्जातून ३४ अर्ज वैध ठरविण्यात आले. यामध्ये तीन इतर मागास वर्ग, तीन भटक्या जमाती, विमुक्त जाती/विशेष मागास वर्ग, चार अनुसुचित जाती जमाती व २४ सर्वसाधारण गटातून नामनिर्देशन वैध ठरविण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खैरनार व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद परदेशी यांनी ही माहिती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरे महाविद्यालयाच्या खेळाडूंना पदके

$
0
0

सुवर्ण आण‌ि रौप्य पदके जिंकली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चंदिगड येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय रोइंग आंतरविद्यापीठ स्पर्धेत नाशिकच्या हिरे महाविद्यालयाने सुवर्ण आण‌ि रौप्य पदकाची कमाई केली.

या स्पर्धा ४ मार्च ते २८ मार्च दरम्यान पोक डॅम चंदीगड येथे झाल्या. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात संतोष कडाळे, राजेंद्र सोनार, अनिकेत हाळदे, प्रसाद जाधव व महेश मते या पाच खेळाडूंचा समावेश होता. ४ स्कल या क्रीडा प्रकारात या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तम खेळाच्या जोरावर विजय संपादन केला. तसेच सिंगल या क्रीडा प्रकारात संतोष कडाळे याने द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदकाची कमाई केली. रोइंगमध्ये सुवर्ण पदक मिळविणारा विद्यापीठाचा व नाशिकचा पहिला संघ ठरला आहे. या निवडीबद्दल संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रशांत हिरे, समन्वयक अपूर्व हिरे, प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, उपप्राचार्य डॉ. नंदू पवार, उपप्राचार्या डॉ. मृणाल भारद्वाज यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. क्रीडा संचालक डॉ. दिनेश कराड यांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला दराचा चढता आलेख

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

दरमहिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर चांगलाच परिणाम होऊन भाजीपाल्याची आवक मंदावली असून, भाव तेजीत आहेत. सध्या प्रत्येक भाजीपाल्याचे दर पाच ते पंधरा रुपयांनी वाढले आहेत.

पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पाऊस, ढगाळ वातवरण याचा परिणाम सर्वच शेतमालावर झाला असल्याचे दिसून येत आहे. उत्पादन घटल्यानंतर आवक कमी झाली आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून, पारा ३५ अंशाच्या वर सरकला आहे. या वातवरणात मेथी, गवार, कारले, गिलके, भेंडी, घेवडा शिमला मिरची या भाज्यांना चांगली मागणी असते. परंतु, आवक कमी सरासरी बाजारभाव ५० ते ६० रुपये किलो या प्रमाणे आहेत.

बटाटा, वांगे, कोबी, फ्लॉवरचे दर स्थिर

बाराही महिने मागणी असलेले बटाटा, वांगे, कोबी, फ्लॉवर यांची आवक चांगली असल्याने १० ते २० रुपये किलो दरम्यान भाव स्थिर आहेत. उन्हाळ्यात सर्वात जास्त मागणी कैरी, काकडी, मुळा, गाजर, आले, लिंबू यांना असते. तसेच टरबूज, खरबूज, संत्री, शहाळे यांना मागणी वाढी लागली असून, सध्या टरबुजाचे दर ३० ते ७० रुपये नग असे आहेत. संत्री ८० रुपये किलो तर शहाळे ३५ रुपये असे दर आहेत.

किलोचे दर

आले ‍ ८०

लिंबू १२०

बीट ४०

गाजर ३०

टोमॅटो २५

मुळा २०

काकडी ४०

कैरी ४०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्याच्या टँकरसाठी वाढली मागणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे वातावरण दूर होत असताना तालुक्यात रणरणत्या उन्हाने गावोगावी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. खिरमनी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून आणखी पाच ते सहा गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील असंख्ये गावांना पिण्याचे पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. दरवर्षी तालुक्यात काही गावांना तर बारमाही टँकरची गरज असताना यंदा मात्र पावसाळ्यापासून गेल्या महिन्यापर्यंत एकाही गावाला टँकरची गरज भासली नाही. मात्र, मार्च महिन्यात खिरमानी येथे टँकरने तर कऱ्हे येथे विहीर अधिग्रहीत करण्यात आली असल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले. पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. तालुक्यातील पिंपळदर, रामतीर, रातीर, चौगाव, भाक्षी व अजमेर सौंदाणे या गावांनी टँकरसाठीचे मागणी प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविले असून, या गावांची पाहणी पथकाकडून करून टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे तहसीलदार पोतदार व गटविकास अधिकारी बहिरम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलली बाजारपेठ

$
0
0

सोयाबीनच्या भावात तेजी; कांदा दरात घसरण

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

नऊ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी सुरू झालेल्या लासलगाव बाजार समितीत उन्हाळ व लाल कांद्याची जोरदार आवक झाली. बाजार समिती शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेली होती. धान्य बाजारात सोयाबीनच्या दरात जोरदार तेजी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

बाजार समिती सुरू झाल्याने अडत व्यापाऱ्यांसह इतर व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले.

सोमवारी लिलाव प्रक्रियेला सुरुवात होताच लाल कांद्याच्या दरात सुमारे २५ ते ३० रुपयांची अल्पशी घसरण पहावयास मिळाली. मात्र, उन्हाळ कांद्याचे दर टिकून होते. एकीकडे कांद्याचे दर स्थिर असतानाच दुसरीकडे आवक मंदावल्याने सोयाबीनच्या बाजारभावात सोमवारी २५० रुपयांची तेजी दिसून आली. गेल्या २७ मार्च रोजी बाजार समिती बंद होताना सोयाबीनचे बाजारभाव किमान २ हजार ५००, कमाल ३ हजार २९० तर सरासरी ३ हजार २९० रुपये प्रती क्विंटलवर बंद झाले होते. सोमवारी धान्य बाजारातील लिलाव सुरू होताच सोयाबीनच्या कमाल दरात २५५ रुपयांची तेजी होऊन बाजारभाव ३ हजार ५४५ रुपयांवर पोहचले, तर किमान दर ३५२ रुपयांनी वाढून २ हजार ८५२ व सरासरी बाजारभाव २२९ रुपयांनी वाढून ३ हजार ४९९ रुपयांवर पोहचले. सोमवारी लासलगाव बाजार समितीत लाल व उन्हाळ कांद्याची सुमारे २५ हजार क्विंटल आवक झाली होती.





शेतमालाचे बाजारभाव (क्विंटलमध्ये)

प्रकार‍ किमान भाव कमाल भाव सरासरी

लाल कांदा ३०० १२१४ ९२५ रुपये

उन्हाळ कांदा ५०० १४२० ११५१ रुपये

सोयाबीन २८५२ ३५४५ ३४९९ रुपये

गहू १३४० २१२६ १४०० रुपये

बाजरी ११०० १६३७ १४९१ रुपये

हरभरा २९०९ ३४७४ ३४५० रुपये

तूर २५०० ५४५२ ५००० रुपये

अभोणा व कनाशी उपबाजार येथे कांदा आवक चांगली असून, चांगला कांद्यास सरासरी ८०० ते ८५० रुपये भाव पुकारला जात आहे. अवकाळी पाऊस व गारपीट झाली असतानाही तालुक्यात कांदा उत्पादन चांगले झाले असल्याने या पुढे आवक वाढू शकते.

- रवींद्र हिरे, सचिव, कळवण बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानामध्ये मद्यपींची गर्दी

$
0
0

टवाळखोरांकडून खेळण्यांची मोडतोड; महिलावर्ग भयभीत

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोडच्या भीमनगर कॉलनीतील गार्डन्स टवाळखोर आणि मद्यपींचा अड्डा झाली आहेत. मद्यपींची नेहमी असणारी गर्दी परिसरातील सामाजिक शांतता आणि संस्कृती धोक्यात आल्याची धास्ती रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

प्रभाग ३७ मधील भीमनगर परिसरात सम्राट चौक, ख्रिश्चन कॉलनी आणि ब्रह्मगिरी सोसायटी येथे एकूण पाच गार्डन्स आहेत. तेथे खेळणी नाहीत, जी आहे ती मोडलेली आहेत. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाला वारंवार कळवून काहीही उपयोग होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. लॉन्स किंवा फुलझाडे नसल्याने गार्डन नावापुरती उरली आहेत. यामुळे या उद्यानांमध्ये गोंधळ घालणाऱ्या टवाळखोरांसह मद्यपींची अधिक गर्दी असते.

प्रस्ताव बासनात

ब्रह्मगिरी सोसायटीतील पूर्वेकडील गार्डनमध्ये वीस वर्षात एकदाच खेळणी बसविण्यात आली. त्या आता मोडकळीस आल्या आहेत. वृक्षरोपणाचा प्रस्ताव स्वयंसेवी संस्थेने दिला होता. परंतु, महापालिकेने प्रतिसाद दिला नाही. येथील गेट तुटलेले आहे. लॉन्स नाहीत की ज्येष्ठांना बसण्यास बेंच नाहीत. पेव्हर ब्लॉक, बेरींग तुटलेले आहे. या सोसायटीच्या पश्चिमेकडील गार्डन चांगल्या प्रकारे विकसित केले होते. आता दोन्ही गेट आणि खेळणी तुटलेली आहे. तेथेही रात्री मद्यपी मुक्कामाला असतात.

साहित्य नेत्यांच्या घरी

सम्राट चौकातील गार्डनमध्ये व्यायामशाळेत दीडशे व्यायामपटू होते. साहित्य आणले की ते चोरीस जाते. मॅट, डंबेल्स आदी साहित्य नेत्यांच्या घरात गेल्याचा व्यायामपटूंचा जाहीर आरोप आहे. साहित्य चोरीमुळे व्यायामपटूंची संख्या कमी झाली असून व्यायामशाळा बंद करण्याची वेळ आली आहे. टवाळखोरांमुळे परिसरातील पाण्याचे मीटर, नळ चोरीला जात आहेत.

वीस वर्षाचा हिशेब द्या

भीमनगर परिसरात वीस वर्षापूर्वी गार्डन्स तयार करण्यात आली. आजपर्यंत एकदाच खेळणी बसविण्यात आली. देखभालीसाठी ठेकेदारांना नियमित पैसे दिले जात आहेत. तरीही दुरवस्था आहे. गार्डनवर वीस वर्षातील झालेल्या खर्चाचा हिशेब द्या, अशी रहिवाशांची मागणी आहे.



ख्रिश्चन कॉलनीतील पाण्याच्या टाकी असलेल्या गार्डनमध्ये जॉगिंग ट्रॅक करून खेळणी बसविल्यास नागरिकांचा वावर वाढेल. टवाळखोर व मद्यपींना आळा बसेल. परिसरात रात्री पोलिस गस्त वाढवावी.

- नितीन चंद्रमोरे, रहिवाशी

गार्डन्समध्ये दिवे तसेच लॉन्स आणि फुलझाडे लावावीत, ज्येष्ठांसाठी बेंच बसवावेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तुटलेल्या खेळणी काढून नव्या बसवाव्यात.

- श्रीकांत शार्दुल, रहिवाशी

बाहेरच्या मद्यपींचा उपद्रव

सम्राट चौकातील गार्डनमध्ये व्यायामशाळाही आहे. गार्डनमधील झोपाळा आणि घसरगुंडी तुटलेली आहे. येथे हिरवळ नावालाही दिसत नाही. येथे वारुळ असून साप निघण्याचे प्रकार नियमितपणे घडत असल्याने लहान मुलांनी येणे बंद केले आहे. याचा गैरफायदा घेत बाहेरचे टवाळखोर आणि मद्यपींनी येथे अड्डा केला आहे. त्यामुळे महिलांना सायंकाळी ये-जा करणे मुश्कील झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

`मेरी शाळेजवळ गतिरोधक बसवा`

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

दिंडोरी रोडवरील वाहतूक दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत असल्यामुळे मेरी-दिंडोरी मार्गावरील शाळेसमोर गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी सीडीओ-मेरी शाळेच्या पालक संघाने केली आहे.

मेरी-दिंडोरी रस्त्यावर मेरी कार्यालयाचे विश्रामगृह आहे. त्याच्याचजवळ पोस्ट ऑफिस आणि पुढे मराठी व इंग्लिश माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्याही अधिक प्रमाणात आहेत. या ठिकाणी शाळकरी मुलामुलीबरोबरच अनेक लोक विविध कामांसाठी सतत येत असतात. त्यामुळे या मार्गावर दिवसभर वर्दळ सुरू असते. मेरीकडून शहराकडे व शहराकडून मेरी व दिंडोरीकडे ये-जा करणारी भरधाव वेगाने धावणारी हजारो वाहने धावतात. अशावेळी रस्ता ओलांडतांना जीव मुठीत घ्यावा लागतो. रस्त्याच्या मध्यभागी लावलेली झाडी सुद्धा जीवघेणी ठरत आहेत. त्यामुळे निदान शाळेकडे जाणाऱ्या ठिकाणी तरी गतिरोधक टाकावेत, अशी मागणी सीडीओ-मेरी शाळेच्या पालक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष रमाकांत सोनावणे आणि शाळेचे मुख्याध्यापक आनंद वाणी यांनी केली आहे.

अन्यथा रस्त्यावर उतरू

अनेक वेळा परिसरातील लोकप्रतिनिधी यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केले आहे. परंतु, याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून काम करावे अशी मागणी होत आहे. जून महिन्यापर्यंत गतिरोधक टाकले नाहीत तर शाळेतील सर्व मुले, पालक, शिक्षक आणि कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

`मुक्त`मध्ये ४५०० नियतकालिके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात युजीसी इन्फोनेटच्या सुमारे ४ हजार ५०० नियतकालिकांची उपलब्धी करण्यात आली आहे. तशी माहिती इन्फ्लीबनेट केंद्राचे संचालक डॉ. जगदीश अरोरा यांनी दिली आहे.

विविध विषयांत संशोधन करू इच्छिणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांना संशोधन कार्यात संदर्भ साहित्य म्हणून वापरण्यासाठी युजीसी इन्फोनेटच्या माध्यमातून सुमारे ८ हजार ५०० इलेक्ट्रॉनिक जर्नल्स इंटरनेटद्वारा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यातील सुमारे ४ हजार ५०० नियतकालिकांची उपलब्धी मुक्त विद्यापीठात झाली असल्याचे डॉ. अरोरा यांनी सांगितले. विद्यापीठाच्या यश इन येथे यूजीसी इन्फोनेट प्रोगामचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. अरोरा यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निरंतर विद्याशाखेचे संचालक डॉ. राजेंद्र वडनेरे होते.

संशोधन आणि विविध शैक्षणिक कार्यात या नियतकालिकांची उपलब्धी, वापर आणि हाताळणी याबाबत विस्तृत विश्लेषण यासारख्या सेवा पुढे विद्यापीठाच्या विविध अभ्यासकेंद्रांनादेखील देता येतील, असे आश्वासन अरोरा यांनी दिले. या विविध उपक्रमांचा विद्यापीठास कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव सांळुखे यांच्या मार्गदर्शनातून समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल, असा विश्वासही अरोरा यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास नाशिक विभागातील विविध शैक्षणिक संस्थांचे ग्रंथपाल, विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम सहायक ग्रंथपाल प्रकाश बर्वे, आयटी केंद्राचे अभिजीत पाटील, प्रमोद जावळे आदींनी विशेष प्रयत्न केले. डॉ. मधुकर शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शुभांगी देसले यांनी आभार मानले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण शुल्क समिती वादात

$
0
0

आज मुंबईत सुनावणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील आरोग्य विज्ञान आणि उच्च व तंत्र शिक्षण अभ्यासक्रमासाठीचे शैक्षणिक शुल्क निश्चित करण्यासाठी मंगळवारी (७ एप्रिल) मुंबईत सुनावणी होत असतानाच या समितीचे कामकाज वादात सापडले आहे. समितीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करीत असले तरी आरोग्य विज्ञान विद्यापीठच त्याचे सदस्य नाही. शिवाय, समितीच्या कामकाजात पारदर्शकता नसल्याचा आरोपही केला जात आहे.

राज्यातील आरोग्य विज्ञान आणि उच्च आणि तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाच्या सर्व संस्थांचे शैक्षणिक वर्ष २०१५-१६ या वर्षातील शैक्षणिक शुल्क लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. हे शुल्क निश्चित करण्यासाठी येत्या ७ एप्रिलला (मंगळवारी) मुंबईत जाहीर सुनावणी होणार आहे. वैद्यकीय आणि उच्च व तंत्र शिक्षण या दोन्ही अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क २०१५ या शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार आहे. मंगळवारी सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत वैद्यकीय शिक्षण, तर दुपारी १ ते २.३० या वेळेत उच्च व तंत्र

शिक्षण शुल्क समितीची बैठक होणार आहे.

वांद्रे (पूर्व) येथील चेतना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या सेमिनार हॉलमध्ये होणाऱ्या या सुनावणीस विद्यार्थी, पालक तसेच कॉलेजचे प्रतिनिधी यांना उपस्थित राहता येणार आहे. या सर्वांची मते या बैठकीत जाणून घेतली जाणार आहेत. या सुनावणीबाबत कॉलेजच्या विद्यार्थी आणि पालकांना सूचना दिल्यास त्याचा निश्चितच विचार केला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ चे सूत्र तसेच नियमावली ही समितीच्या www.sssamiti.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ती पाहून आवश्यक त्या सूचना व हरकती द्याव्यात, असे आवाहन समितीच्या कक्ष अधिकारी के. व्ही. साने यांनी केले आहे. मात्र, या समितीच्या कारभाराबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

कर्मचारीच नसतात?

समितीचे कर्मचाऱ्यांना सहावा वेतन लागू असला तरी ते कार्यालयात काम करीत नाहीत. अनेकदा कार्यालयात कुणी आढळून येत नाही. शिवाय कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणारे कुणीही नाही, असा आरोप केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येथे घडतात भावी शिक्षक!

$
0
0

दुरवस्थेने प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बेजार

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

अस्वच्छता... पिण्याच्या पाण्याचा अभाव... फुटलेले बेसिन... तुटलेल्या खिडक्या... गायब झालेले दरवाजे... सापांचा सुळसुळाट... अशी धक्कादायक परिस्थिती एखाद-दुसऱ्या संस्थेची नव्हे तर खुद्द प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची आहे. भावी शिक्षकांचे ज्ञानार्जन होणाऱ्या या जागेत मोठीच असुरक्षितता आणि पायाभूत सोय-सुविधांची अबाळ झाल्याचे निदर्शनास येत आहे.

गंगापूर धरणाला लागून असलेल्या गोवर्धन परिसरात आणि जवाहनर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मागील बाजूस प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला येथील कारभार मात्र धक्कादायक म्हणावा असाच आहे. एखाद्या डोंगर परिसरात असलेल्या गुहेप्रमाणे आणि विनावापर असलेल्या जुनाट वास्तूप्रमाणेच या संस्थेची इमारत आहे. प्रशासनाच्या सावळ्या गोंधळात याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या डीएडच्या जवळपास १०० विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या उन्हाळा सुरु असताना या संस्थेत पाण्याचा एकही थेंब नसल्याचे दिसून येत आहे. गंगापूर धरणाच्या पायथ्याशी ही संस्था असताना समोरच्या शेतातून पाणी आणणे अत्यावश्यक बनले आहे. तर, गेल्या काही दिवसांपासून घरुनच २-३ बाटल्या आणण्याची तंबी देण्यात आल्याची बाब विद्यार्थ्यांनी सांगितली आहे. पिण्यास पाणी नसल्याने बेसिन किंवा बाथरुममध्ये पाण्याचा प्रश्नच नाही. गंगापूर रोडपासून जवळपास अर्धा किलोमीटर असलेल्या आणि उजाड परिसरात असलेल्या या संस्थेकडे जाण्यासाठी रस्ताही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज पायपीट करावी लागते.

विद्यार्थिनींचे मात्र मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० असा संस्थेची वेळ असताना संध्याकाळी काही अनावस्था प्रसंग घडू नये म्हणून एक तासापूर्वीच संस्थेला कुलूप लावले जात असल्याची बाबही येथे वर्षभरापासून घडते आहे. इगतपुरी तसेच विविध भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र दररोजचीच परीक्षा आहे. गंगापूर रोडपर्यंत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांना संस्थेत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे. पावसाळ्यात संस्थेच्या आवारात मोठ्या प्रमाणात साप पकडण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. खिडक्या आणि दरवाजांअभावी संस्थेची इमारतच असुरक्षित बनली असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संस्थेच्या शिक्षक व महिला कर्मचाऱ्यांनाही अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्या तरी त्याबाबत कुणीही अधिक बोलण्यास तयार नाहीत.

पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल मिळावी, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे. तर, इमारतीच्या बांधकाम व पायाभूत सोयी-सुविधांसाठीही प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, निधी मिळू शकलेला नाही. - नितीन बच्छाव, प्राचार्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुभाजकाचा महिरावणीत अडथळा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, सातपूर

त्र्यंबकेश्वर रस्त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्यात सुरू आहे. यात रस्ता दुभाजकात महिरावणी गावाच्या अलिकडे पंक्चर ठेवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन दिले आहे. गावाच्या ठिकाणी दुभाजकात पंक्चर टाकल्याने वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून महिरावणी गावाच्या अलिकडे पंक्चर टाकण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महिरावणी गावातून उत्तरेस दुडगाव, पिंपळगाव गरुडेश्वर, गणेशगाव, शिवनगाव, राडेवाडी, गंगाम्हाळूंगी, गोविंदपूर आणि गिरणारे येथील मार्केटमध्ये जाण्यासाठी वाहनचांलाकांना रस्ता तयार करण्यात आला आहे. परंतु, गावातून रस्ता गेल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळेच महिरावणी गावाच्या अलिकडे दुभाजकात पंक्चर ठेवण्याची मागणी गावातील शेतकऱ्यांनी केली सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. गावातून वाहतून वळविल्यासे मोठी वाहतूक कोंडी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच गावातील रस्ता अरुंद असल्याने अपघात देखील होण्याची शक्यता असल्याने पर्याय म्हणून गावाच्या अलिकडे असलेल्या रस्त्याला दुभाजकातून पंक्चर ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

महिरावणी गावाच्या उत्तरेस अनेक छोटी मोठी गावे आहेत. त्यातच गिरणारे येथील मार्कटमध्ये जाणारे शेतकरी महिरावणी गावातूनच वाहने नेतात. यासाठी त्र्यंबकेश्वरच्या सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणात दुभाजक टाकत असतांना महिरावणी गावाच्या अलिकडे पंक्चर ठेवण्याची गरज आहे. गावातून वाहने वळविल्यास रोजच वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार आहे.
- तुळशीराम कोरडे, शेतकरी, महिरावणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओच्या नावाखाली वाहनधारकांची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनाचे पासिंग व इतर कामे करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) विभागात पैसे द्यावे लागतात, असे सांगून थेट वाहनधारकाची 'लूट' करण्याच्या घटना विविध वाहनांच्या शोरूम्समध्ये घडत आहेत. याविरोधात कडक उपाययोजना करण्याऐवजी ग्राहक मंचासह पोलिसांकडे तक्रारी करण्याचे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

गंगापूररोडवरील आनंदवली परिसरात राहणाऱ्या ​व्ही. डी. भामरे या ज्येष्ठ नागरिकाने १७ मार्च रोजी एक दुचाकी खरेदी केली. दुचाकी डिलरने कोटेशन तयार करून दिले. त्यात ५२ हजार ५५१ रुपये दुचाकीची किंमत, आरटीओकडे होणाऱ्या कामांसाठी ४ हजार ५८८ रुपये, इन्सुरन्ससाठी १ हजार ४९७ तर तारणगहाणचे ६४० अशी ५९ हजार २७६ रुपयांची एकत्रित किंमत दर्शवण्यात आली. भामरे यांनी सर्व पैसे डिलरकडे जमा केले. मात्र, डिलरकडून ८९० रुपयांचा हिशेब नसलेल्या पावत्या भामरे यांच्या हातात देण्यात आल्या. त्यात आरटीओकडे ३ हजार ५३८ तसेच १६० रुपये जमा करण्यात आल्याचे दाखवले. उर्वरित ८९० रुपयांची पावती का दिली नाही, याची चौकशी भामरे यांनी संबंधित डिलरकडे केली. तेव्हा हे पैसे आरटीओला द्यावे लागतात, असे स्पष्टीकरण संबंधित डिलरने दिले. महिन्याभरात शहरात हजारो वाहनांची विक्री होत असते. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस येण्याची गरज असल्याची भावना भामरे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अशा प्रकाराच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्याचे सांगितले. मागील महिन्यात विभागाने २५ ते ३० डिलरची बैठक घेतली. त्यात सर्व डिलर्संना ताकीद दिल्याचे स्पष्टीकरण बनसोड यांनी दिले. तसेच अनधिकृतपणे पैसे जमा करणे मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा असून वाहनधारकांना काही तक्रारी असल्यास त्यांनी आरटीओसह ग्राहकमंच किंवा पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन बनसोड यांनी केले.

आरटीओनेच कारवाई करावी

आरटीओच्या नावाखाली वाहनधारकांची सर्रास लूट होत असताना या प्रकरणी आरटीओनेच कारवाई करणे अपेक्षित आहे. दुचाकी घेताना पैसे भरल्यानंतर काही दिवसांनी सर्व पावत्या वाहनधारकाच्या हातात पडतात. यात बराच कालावधी खर्च होतो. त्यामुळे पैशांचा हिशेब लागत नाही. आरटीओच्या नावाने पैसे उकळले जात असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचा छडा लावण्याची मागणी ग्राहकांकडून केली जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खून प्रकरणात पारदर्शक चौकशी व्हावी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

गंगापूररोडवरील रामेश्वरनगर येथील सुशिक्षित घरात झालेल्या विवाहितेच्या हत्येप्रकरणाची पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी करीत आम आदमी पक्षातर्फे पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांना निवेदन सादर करण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हुतात्मास्मारक येथून मोर्चा काढण्यात आला.

गंगापूररोडला राहणाऱ्या स्वाती उर्फ अनुजा पाटील या २४ वर्षीय विवाहितेचा ३० मार्च रोजी रात्री तिच्या सासरच्यांनी खून केल्याचा गुन्हा गंगापूररोड पोलिसांकडे दाखल आहे. स्वातीने बीई इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. संशयित आरोपी आणि स्वातीचा सासरा निवृत्ती पाटील इंजिनीअर आहे. तिचा पती पियुष पाटील हा देखील इंजिनीअर असून सुशिक्षीत घरात हुंड्यासाठी खूनाची घटना होणे खेदजनक असल्याची प्र​तिक्रिया मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. हुतात्मा स्मारक येथून सुरू झालेला मोर्चा सीबीएस, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ आणि पुढे पोलिस आयुक्तालयापर्यंत गेला. आम आदमी पक्षाचे जिल्हा समन्वयक जितेंद्र भावे, जगबीरसिंग, राजू आचार्य, प्रियदर्शन भारतीय, राधा आचार्य, सतीश भारती, जगमेरसिंग खालसा, संजय भावे तसेच स्वाती पाटीलचा भाऊ रोहन पाटील यांच्यासह इतरांनी मोर्चात सहभाग नोंदवला. या प्रकरणाची कमीत कमी वेळेत पारदर्शक चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली. त्यांची रवानगी सध्या पोलिस कोठडीत आहे. मात्र, एकंदरीत पोलिसांवरील सर्वसामन्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जितेंद्र भावे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0

मध्यवर्ती कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने सोमवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रल्हाद भगवंत रोकडे (२७) असे त्याचे नावे आहे. या प्रकरणी अस्कमात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अवनखेड (ता. दिंडोरी) येथील प्रल्हाद रोकडे याला अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी २१ डिसेंबर २०१४ रोजी अटक केली होती. त्याला कोर्टाने प्रारंभी पोलिस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी दिली होती. तेव्हापासून तो जामीन मिळण्याच्या प्रतीक्षेत होता. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास त्याने आपली चादर फाडून तिच्या चिंध्या तयार केल्या. मंडल क्रमांक सातच्या बॅरेक क्रमांक दोनमधील शौचालयातील खिडकीच्या गजाला चिंध्याचा दोर बांधून गळफास घेतला. कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिका-यांनी त्याला रात्री साडेतीनच्या सुमारास तपासून मृत घोषित केले. कारागृह अधीक्षकांनी नाशिकरोड पोलिसांनी घटना कळवली.

बारा महिन्यांत तीन घटना

गेल्या वर्षी २९ एप्रिलला मेवा झावरे या कैद्याने वायरच्या घासणीच्या गळफास घेतला. त्याची तीनच महिन्यांनी सुटका होणार होती. त्यानंतर २२ जुलैला याच कारागृहात नाना नामदेव पाटील या ४७ वर्षीय गुजरातच्या कैद्याने स्वच्छतागृहावरील पाचशे लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत आत्महत्या केली होती. त्या अगोदरच्या आठवड्यात एका कैद्याने लोखंडी बारवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरवाढ टळली!

$
0
0

महासभेने घरपट्टी, पाणीपट्टीचा प्रस्ताव फेटाळला

घंटागाडीचा ठेका दहाऐवजी तीन वर्षांसाठी

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महासभेत सातत्याने येणाऱ्या खासगीकरणाच्या प्रस्तावांविरोधात नगरसेवकांनी सोमवारी सर्वपक्षीय एकजूट दाखवली. प्रशासनाने उद्यानांच्या देखभाल दुरूस्तीचे खासगीकरण, घंटागाडीच्या दहा वर्षांच्या ठेक्यासह घरपट्टी आणि पाणीपट्टीची दरवाढ फेटाळून लावली. उद्यानाचे कंत्राट बचत गटांना तर, घंटागाडीचा ठेका दहाऐवजी तीन वर्षे विभागनिहाय देण्याचा निर्णय झाला.

घरपट्टी आणि पाणीपट्टीतील लिकेजेस शोधून सर्व्हेक्षण करण्याचे आदेश देत महापौरांनी प्रशासनांच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. सभागृहात अनेक वेळा नगरसेवक विरूद्ध प्रशासन असा संघर्ष झाल्याने तणावही निर्माण झाला होता. मात्र, आयुक्तांनी आपल्यावरील टीका खिलाडूवृत्तीने घेतल्याने वाद टळला. महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. घंटागाडी, उद्यानाचे खासगीकरण, घरपट्टी व पाणीपट्टीत दरवाढ असे सत्ताधाऱ्यांच्या अडचणीत आणणारे प्रस्ताव प्रशासनातर्फे सादर करण्यात आले होते. या सर्व विषयांवर वादळी चर्चा करण्यात आली. उद्यान देखभाल दुरूस्तीच्या सात कोटी ४५ लाखांच्या प्रस्तावाला नगरसेवकांनी विरोध करीत बचत गटांनाच काम देण्याचा निर्णय घेतला. आयुक्तांनी स्पष्टीकरण देवूनही नगरसेवकांनी बचत गटांनाच काम देण्याचा आग्रह धरल्याने महापौरांनी प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळला. घंटागाडीचा ठेका दहा वर्षासाठी देण्याचा प्रशासनाने मांडलेला प्रस्ताव साडेतीन तासाच्या चर्चेनंतर फेटाळून लावला. आयुक्तांनी प्रस्तावावर सविस्तर खुलासा देवूनही नगरसेवकांनी मागील ठेकेदाराचा अनुभव लक्षात घेत, दहा वर्षासाठी हा ठेका देण्यात विरोध केल्याने शेवटी महापौरांनी तीन वर्षांसाठी विभागनिहाय हा ठेका देण्याचा निर्णय घेतला. येत्या दोन वर्षांत निवडणुका आहेत. त्यामुळे घरपट्टी-पाणीपट्टीची दरवाढ केली तर नागरिकांचा रोष ओढावण्याची शक्यता लक्षात घेऊन दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात.

नगरसेवक- आयुक्त आमने सामने

अनेकवेळा नगरसेवक विरुद्ध आयुक्त असा सामना झाला. शिवसेनेचे विलास शिंदे यांनी घंटागाडीचा प्रस्ताव म्हणजे सुपारी असल्याचा आरोप केला. त्यामुळे आयुक्तांनी हस्तक्षेप करीत आरोप माझ्याबद्दल आहे का, असा थेट प्रश्न करीत डॉकेटवर माझ्या सह्या असल्याचे सांगितले. सुपारी आणि नजरसमोर ठेवल्याचा आरोप सिद्ध करून दाखवा असे सांगत, बोलायचे म्हणून काहीही बोलू नका असा दमही आयुक्तांनी भरला. त्यावर शिंदेनी हे विधान आपल्यासाठी नसल्याचा खुलासा केल्याने तणाव निवळला. काँग्रेसचे गटनेते उत्तमराव कांबळे आणि आयुक्तांमध्येही शाब्दिक वाद झाले.

नगरसेवक पडले भारी!

प्रशासनाकडून केवळ खासगीकरणाचेच प्रस्ताव आणले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी सभेत केला. त्यामुळे खासगीकरणाचे आणलेले सर्व प्रस्ताव फेटाळायचेच, अशा पावित्र्यात सर्वपक्षीय नगरसेवक होते. आयुक्त गेडाम यांनी घंटागाडीसह उद्यानाच्या देखभाल दुरूस्तीच्या खाजगीकरणाचे समर्थन करीत सविस्तर खुलासा केला. मात्र, नगरसेवकांनी त्यांच्या प्रस्तावांचे कौतुक करीत, प्रस्तावही फेटाळण्यास भाग पाडले. त्यामुळे प्रशासन विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष पहायला मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images