Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

इकडे हातोडा; तिकडे दरारा

$
0
0
नाशिक महापालिकेने आठवडाभराच्या कालावधीनंतर सोमवारी पाथर्डीफाटा ते पाथर्डीगांव या परिसरातील रस्त्यालगतची अनेक अतिक्रमणे जमीनदोस्त केले. मात्र, दररोज पाथर्डीफाटा येथे रस्त्यावरील अनधिकृत भाजी बाजाराचे अतिक्रमण कायमचे हटविणार काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पीककर्ज प्रतिएकर मर्यादा घटवली

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीककर्जाच्या रकमेत घट करण्याचा निर्णय घेतला आहे. द्राक्ष पिकाला प्रतिएकरी एका लाखाऐवजी ८५ हजाराचा कर्जपुरवठा करण्यात यावा, असा प्रस्ताव प्रशासक मंडळाने ठेवला असून त्यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आरटीओ कार्यालय सामसूम

$
0
0
प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) एजंटांना येण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाचा परिणाम सोमवारी दिसून आला. आरटीओ कार्यालयात एंजटस नसल्याने सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली.

जुने नाशिकमध्ये रेड मार्किंग

$
0
0
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अतिक्रमणधाराकंना दिलेली आठवडाभराची दिलेली डेड लाईन संपूनही जुने नाशिक परिसरात स्वत:हून कोणतेच अतिक्रमण काढलेले नाही.

उत्तर महाराष्ट्रासाठी पाणी राखीव ठेवावे

$
0
0
उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा विभागातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी दमणगंगा-पिंजाळ व नार-पार प्रकल्पाचे पाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून गुजरात राज्याला देण्याचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन आहे.

मनमाडला धावत्या रेल्वेत चोरी

$
0
0
हैदराबाद अजमेर एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशाची सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज असलेली बैग चोरट्याने हातोहात लंपास केली. यामुळे धावत्या रेल्वेतील गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मळवाडी ते कटके वस्ती रस्ता कामाची चौकशी करा

$
0
0
नगरसूल शिवारातील मळवाडी ते कटके वस्ती वहिवाट रस्ता मजबुती कामात ठेकेदाराने स्वत:च्या मर्जीने मूळ रस्ता सोडून इतर शेतकऱ्यांच्या बांधावरून रस्ता तयार करण्यास सुरुवात केल्याने संबधित शेतकऱ्यांनी या रस्ता कामास हरकत घेतली आहे.

ममदापूर परिसरातील गावांचा पाणीप्रश्न सुटणार

$
0
0
येवला मतदारसंघातील ममदापूर येथील मेळाच्या बंधाऱ्यास ६ कोटी ४५ लक्ष रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. शासन निर्णयानुसार ५ कोटी पेक्षा जास्त खर्च असल्याने प्रस्ताव सचिव समितीच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.

एका दिवसात ३२ लाखांची वसुली

$
0
0
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या आदेशावरून महापालिकेच्या सातपूर विभागाकडून थकबाकीदार गाळेधारकांविरोधात धडक वसुली मोहीम राबविण्यात आली. शनिवारी एकाच दिवसात ३२ लाख रुपयांची वसुली महापालिकेच्या विविध कर विभागाने केली आहे.

बसस्थानक परिसरातील अतिक्रमणेही हटविणार

$
0
0
परिसरातील अतिक्रमणांवर बुधवार (ता. २१) पासून हातोडा पडणार असून, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जय्यत तयारी केली आहे. नाशिकरोड बसस्थानक परिसरातील गाळेही हटविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ग्रामीण पोलिस उपविभाग कार्यालयाचे स्थलांतर?

$
0
0
ग्रामीण पोलिसांचे उपविभाग कार्यालय गडकरी चौकातील परिमंडळ एकच्या जागेत स्थलांतरीत करावे, असा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

झेडपीच्या विकासकामांचा विभागीय आयुक्त घेणार आढावा

$
0
0
नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले येत्या मंगळवारी (ता.२०) जिल्हा परिषदेतील कामकाजासह विकासयोजनांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे विभागप्रमुखांनी आयुक्तांपुढे माहिती सादर करण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव सुरू केली आहे.

झेडपीत लघुपाटबंधारेच्या निधीवरून रंगले राजकारण

$
0
0
जिल्हा परिषदेत शाळा दुरुस्ती निधी पळविण्याचे राजकारण थांबत नाही तोच आता लघुपाटबंधारे विभागाला मिळालेल्या १४ कोटींच्या निधीवरून राजकारण सुरू झाले आहे. लघुपाटबंधारेच्या या निधीतून तब्बल १९३ बंधाऱ्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

जुन्या नाशकात अतिक्रमण मोहिमेचा धसका

$
0
0
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा जुने नाशिक परिसरातील अतिक्रमणधारकांनी धसका घेतला आहे. पहा आणि प्रतीक्षा करा (वेट अॅन्ड वाच) यानुसार अतिक्रमण निर्मूलन पथक आपल्याकडे धडकते याची रोज खात्री करून घेतली जात आहे.

मुंबई अर्ध मॅरेथॉनमध्ये कविताला सुवर्णपदक

$
0
0
महाराष्ट्राराची अग्रणी धावपटू व नाशिकची सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत हिने मुंबई येथे झालेल्या अर्ध मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक मिळवले. तिने २१ किलोमीटर अंतर अंतर विक्रमी वेळेत पूर्ण करून पुन्हा एकदा नाशिकचे नाव उज्वल केले.

नाशिककर यंदा फेस्टिव्हल्सला मुकणार

$
0
0
दरवर्षी नाशिककरांना सांस्कृतिक तसेच विविध प्रकारच्या मनोरंजनाचा आनंद देणाऱ्या नाशिक आणि वाइन फेस्टिव्हलला यंदा मुकावे लागणार आहे. जिल्ह्यात झालेल्या गारपिटीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही फेस्टिव्हल आयोजित न करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

रहिवाशी भागात थांबणाऱ्या कंटेनर चालकांना नोटिसा

$
0
0
रहिवाशी भागाला लागून उभ्या राहत असलेल्या कंटेनरमुळे नागरिक हैराण झाले होते. याबाबत `मटा`ने कंटेनरमुळे रहिवाशी भागात अडथळा असे वृत्त प्रसिद्ध केले होते. `मटा`च्या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने कंटेनर चालकांना नोटिसा देत समन्स देण्यात आले.

मागासवर्गीय शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ

$
0
0
मागासवर्गीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत होती. मात्र, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि होणारी मागणी लक्षात घेता येत्या ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिकरोड ते जत्रा हॉटेल वाहतूक मार्गात बदल

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नांदुर-मानुर येथे संत जनार्दन पुलाजवळ पूल बांधण्याचे काम सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जत्रा हॉटेल ते नाशिकरोड मार्गावरील वाहतूक २ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

तरुणाचा खून : चौघे ताब्यात

$
0
0
माझ्याकडे पाहून का थुंकलास अशी विचारणा करणाऱ्या तरुणाचा धारदार हत्यारांनी वार करून खून करण्यात आला. शनिवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास इंदिरानगरातील रंगरेज मळा परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images