Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बांधकामात अडकले येवल्याचे उपजिल्हा रुग्णालय

0
0
येवला तालुका ग्रामीण रुग्णालयाची इमारत देखणेपणाने सर्वांनाच आकर्षित करीत असली तरी सुविधा नसलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे.

घरकुल लाभार्थी निधीपासून वंचित

0
0
त्र्यंबकेश्वर पंचायत समितीत घरकुलाच्या लाभार्थ्यांना वारंवार चकरा मारण्याची वेळ आली आहे. याबाबत गणेशगाव वाघेरे येथील १५६ लाभार्थ्यांनी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांची भेट घेवून घरकुलाचा हफ्ता देण्याची मागणी केली आहे.

प्रजासत्ताकदिनावर बहिष्काराचा इशारा

0
0
इगतपुरीतील पिंपळगाव मोर येथील सार्वजनिक स्मशानभूमिची दुरवस्था झाली आहे. या स्मशानभूमी जागेच्या मोजणीसाठी दोन वेळा मोजणी फी भरूनही इगतपुरी भूमिअभिलेख कार्यालयाने उडवाउडवीची उत्तरे देऊन तारीख पे तारीख देत राहिले.

तीर्थक्षेत्र विकासांतर्गत ३ कोटी निधीची मागणी

0
0
सटाणा नगर परिषद हद्दीतील विकासकामांसाठी तीर्थक्षेत्र क्षेत्र विकास अंतर्गत सुधारणा करण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांचा विकास निधी पालिकेला मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र सोनवणे यांनी शिष्टमंडळासह प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन सादर केले.

नाशिक विभागातील ९४१ गाव होणार टंचाईमुक्त

0
0
नाशिक विभागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानात नाशिक विभागातील ९४१ गावांचा समावेश करण्यात आला असून ही गावे जानेवारी २०१६ पर्यंत शंभर टक्के टंचाईमुक्त करण्यात येणार आहेत.

‘त्या’ ४० अधिकाऱ्यांना नोटीस

0
0
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी प्रमाणात पल्स पोलिओ अभियान राबविले गेल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सुरखदेव बनकर यांनी जिल्ह्यातील ४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

आश्रमशाळांमध्ये स्वच्छतेचे धडे

0
0
आदिवासी आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जागृती करण्यासाठी आदिवासी विकास विभाग आणि युनिसेफ (युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड) यांनी हातात हात घेतला आहे.

अभिनव मराठी शाळेत भाजपचे ठिय्या आंदोलन

0
0
प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या जेलरोड येथील अभिनव आदर्श मराठी शाळेचे वाढीव बांधकाम स्थगित करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मुख्याध्यापकांच्या कक्षात दीड तास ठिय्या आंदोलन केले.

दमणगंगा, नार-पारचा करार जाहीर करा

0
0
महाराष्ट्र गुजरातमधील दमणगंगा-पिंजाळ आणि नार-पार पाणीवाटपाच्या कराराला काँग्रेसला जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने फेटाळून लावला असून हा करार जाहीर करा असे आव्हान भाजपला केले आहे. हा करार महाराष्ट्राच्या हिताचा नसल्यानेच त्याची चार वर्ष अमंलबजावणी झाली नसल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी केला आहे.

‘त्या’ जेसीपी मालकास ४ लाखापर्यंत दंड

0
0
खरेदी केलेल्या नवीन जेसीपी यंत्राची नोंदणी न करता तो जुनाच असल्याचे दाखवून प्रादेशिक परिवहन विभागाचा महसूल बुडवणाऱ्या मालकास सुमारे चार लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. हे प्रकरण नुकतेच समोर आले असून, आरटीओ विभागाने दंडात्मक कारवाईस सुरुवात केली आहे.

धूर फवारणी ठेक्यासह काझीगडी विषय चर्चेला

0
0
महापालिची महासभा मंगळवारी (ता. २०) होत असून त्यात वादग्रस्त धूर फवारणी ठेक्याच्या विषयासह, वाढीव पाणी आरक्षण मागणी, घनकचरा व प्रदूषणावर भांडवली खर्चाच्या २५ टक्के रक्कम खर्च करण्यासह अर्थसंकल्पाचा विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आला आहे.

उपचारादरम्यान दोघा कैद्यांचा मृत्यू

0
0
उपचार घेत असलेल्या दोघा कैद्यांचा सोमवारी मृत्यू झाला. यातील एका कैद्यावर जेलमध्ये तर दुसऱ्या कैद्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी आकस्मात गुन्ह्याची नोंद केली आहे.

पळसेतील बळीराजाचे ‘शोलेस्टाईल’ आंदोलन

0
0
अतिक्रमण हटविण्यास विरोध करीत पळसे येथील शेतकरी विजेच्या उच्च दाबांच्या तारांच्या टॉवरवर चढला. नातेवाईक व पोलिसांनी विनंती केल्यावर अर्ध्या तासानंतर तो खाली उतरला.

३ महिन्यात ४५ टक्के करवसुलीचे आव्हान

0
0
करवसुलीमुळे सरकारच्या तिजोरीत भर पडत असली तरी, करवसुलीचे उद्दिष्‍ट मुदतीत गाठता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.

साधुग्रामसाठी जमीन हस्तांतरणास सुरुवात

0
0
साधुग्रामसाठी १०२ शेतकऱ्यांची १२० एकर जागा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली असून, त्यापैकी २५ एकर जागा सोमवारी महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ५८ कोटींचे अनुदान जमा

0
0
दुष्काळग्रस्त १३४६ गावांपैकी ४५७ गावांमधील सुमारे १ लाख ४७ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सरकारने ५८ कोटी २३ लाख रुपयांचे अनुदान जमा केले आहे. अजूनही ६१ टक्के शेतकरी अनुदानापासून वंचित असून, हे अनुदान ३१ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

मानसिक छळाला कंटाळून केंद्रप्रमुखाचा राजीनामा

0
0
नाशिक महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी किरण कुंवर यांच्याकडून मानसिक छळ होत असल्याने आपण केंद्रप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचा आरोप अपंग शिक्षिकेन केला आहे.

येथील ताज्या भाज्या, फळेच पूर्णब्रह्म !

0
0
सेंद्रिय पध्दतीने उत्पादीत केलेला ताजा आणि टवटवीत भाजीपाला तसेच रसाळ फळे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणारे फार्मर मार्केट चांगलेच बाळसे धरू लागले आहे. स्वाध्याय परिवाराशी जोडलेले प्रा. प्रभाकर मोराणकर यांच्या आंतरिक तळमळीतून साकारलेल्या या मार्केटमध्ये विषविरहीत पौष्टीक भाजीपाला सामान्य नागरिकांना मिळू लागला आहे.

अल्टीमेटमनंतर दीडशे अतिक्रमणे जमीनदोस्त

0
0
नाशिक महापालिका हद्दीतील अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी आयुक्तांनी दिलेली आठ दिवसांची मुदत संपल्यानंतर सोमवारपासून शहरात पुन्हा धडाक्यात अतिक्रमण निर्मूलन मोह‌मिेला सुरूवात करण्यात आली.

गुप्त धनासाठी नरबळीचा प्रयत्न

0
0
सटाणा पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एकलव्य नगरमध्ये गुप्त धनासाठी पोटच्या मुलीचा बळी देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नरबळीचा कट रचण्यापूर्वीचा सदर मुलीने पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images